Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेल्वे पार्किंग ‘दाम’दुप्पट

$
0
0
रेल्वेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधांच्या दरात वाढ होत असून दोन दिवसापासून रेल्वेने पार्किंगच्या दरात वाढ केली आहे. यामुळे गाडी पार्किंग करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसते आहे.

शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे या!

$
0
0
‘नाशिक मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे झेपावले आहे. हा विकासाचा वेग प्रचंड आहे. विकासाची प्रक्रिया सुरू असताना जीवनशैलीतील बदलांचा फटका शहराला बसतो. यातून निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.’ असे प्रतिपादन निर्मल ग्राम निर्माण केंद्राचे श्रीकांत नावरेकर यांनी केले.

कांद्याला उच्चांकी भाव

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर गुरुवारी लाल कांद्याला २३३१ रुपये हा हंगामातील उच्चांकी भाव मिळाला. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात एकसारखी भाववाढ होत आहे. भाववाढीचे मुख्य कारण कांदा उत्पादनात झालेली घट असल्याचीही बाब समोर येत आहे.

आम्ही उपेक्षितच, डबेवाल्यांची खंत

$
0
0
इंग्लडच्या प्रिन्स चार्ल्ससह जगभरातील मॅनेजमेंट गुरूंना भुरळ घालणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांप्रती राज्य सरकारची उदासीनता कायम आहे.

पंचवटीत ४ दुचाकींची जाळपोळ

$
0
0
पंचवटीत पार्किंगमधील ४ दुचाकी समाजकंटकांनी पेटवून दिल्या. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आली. आजुबाजूच्या परिसरातील पेट्रोलचोरांनीच हा प्रकार केला असावा असा पोलिसांचा अंदाज असून पंचवटी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी दिली.

कुठे आहेत आमची मुलं?

$
0
0
घराच्या अंगणात खेळणारी दोन शाळकरी मुलं अचानक गायब होऊन दहा दिवस झाली आहेत. मुलं हरविल्याच्या दु:खानं दोन्ही आया सैरभैर होऊन अख्या शहरात त्यांना शोधतायेत. सततच्या धावपळीमुळे त्या दोघी तणावाखाली आहेत.

मुंबईसाठी आता सी प्लेनची सफारी!

$
0
0
नाशिक आणि मुंबईसाठी प्रवासी विमान वाहतूक अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर असली तरी पर्यटनाच्या माध्यमातून सी प्लेनची (सागरी विमान) सफारी नाशिककरांना येत्या एप्रिलपासून करता येणार आहे.

सरकारच्या लेखी आम्ही उपेक्षितच!

$
0
0
इंग्लडच्या प्रिन्स चार्ल्ससह जगभरातील मॅनेजमेंट गुरुंना भुरळ घालणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांप्रती राज्य सरकारची उदासिनता कायम आहे. घरांसाठी भूखंड, रुग्णसुविधा, सरकारी वीमा अशा मागण्या मुंबई डबावाला असोसिएशनकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत असल्या तरी सरकारकडून आश्वासंनाशिवाय काहीही हाती लागत नसल्याची खंत संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.

पंचवटीत इमारतीचा भाग कोसळला

$
0
0
पंचवटीतील कपालेश्वर मंदिराजवळ असलेल्या गोएंका धर्मशाळेचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून इमारतीतील व्यावसायिक गाळ्यांचे नुकसान झाले आहे.

अति घाई... जीव घेई

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ ओलांडताना अनेकदा अपघात झाले आहेत. त्यातून काहींना किरकोळ दुखापती झाल्यात तर काहींना आपले जीव गमवावे लागले आहेत. अति घाई जिवावर बेतत असल्याचे ज्ञात झाल्यानंतरही प्रवासी शहाणे बनलेले दिसत नाहीत.

नाम बडे और...!

$
0
0
बड्या धेंडांचे नाव पत्रिकेत प्रसिध्द करावे मात्र ऐनवेळी त्यांनी कार्यक्रमाला टप्पा द्यावा ही बाब नवी नाही. अमूक सेलिब्रेटी येणार म्हणून पोस्टर प्रसिध्द करून त्या कार्यक्रमाला गर्दी खेचली जाते, त्यानंतर वेळेवर सेलिब्रेटीला काही काम निघाले असे सांगत वेळ मारून नेली जाते.

शत प्रतिशत पक्षश्रेष्ठी

$
0
0
भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून चार हात लांब राहण्याची खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची विनंती पक्षश्रेष्ठींनी मंजूर केल्याने या पदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पोषण कोणाचे?

$
0
0
विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याआधी ते अन्न संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी वा मुख्याध्यापक नेमून देईल त्या शिक्षकांनी खाऊन बघणे आवश्यक असते. मात्र या अन्नाच्या 'गुणवत्ते'विषयीचा 'लेखाजोखा' या मंडळींसमोर रोजच उलगडला जात असल्यामुळे ते अन्नाला हातही लावायला तयार होत नाहीत.

'धडक' नव्हे 'स्वच्छता' मोहीम

$
0
0
महापालिकेच्या ६२ नंबर शाळेतील ९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडताच महापालिकेच्या सर्व शाळांवर 'धडक मोहीम' राबविणार असल्याची माहिती शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली होती.

ज्युनिअर कॉलेज प्राध्यापकांच्या बहिष्काराला तात्पुरती स्थगिती

$
0
0
ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या परीक्षा बहिष्काराच्या आंदोलनाला राज्य ज्युनियर कॉलेज शिक्षक महासंघाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.

एलईडी निविदेतून केंद्राच्या मार्गदर्शिकेला आव्हान

$
0
0
एलईडीच्या निविदेतच असंख्य त्रुटी असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शिकेला आव्हान देणारी ही निविदा असल्याचा आरोप अपक्ष गटनेते गुरुमित बग्गा यांना पुराव्यासह पत्रकार परिषदेत केला.

महापौरांच्या दौ-यात आमदारांचाच बोलबाला

$
0
0
'महापौर तुमच्या दारी' उपक्रमाला शुक्रवारपासून सुरुवात झाली खरी; परंतु या दौ-यात महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या ऐवजी आमदार वसंत गिते हेच भाव खाऊन गेले. दौ-यात बहुतांश नागरिकांनी आ. गिते यांनाच आपल्या समस्या सांगितल्या.

पणन मंत्र्यांचा पिंगळेंना दिलासा

$
0
0
बाजार समितीमधील गैरव्यवहारप्रकरणी देविदास पिंगळे यांचे सदस्यत्त्व अपात्र ठरविण्याचे आदेश रद्द करून पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी खासदार पिंगळेंना दिलासा दिला आहे.

रामवाडी रस्त्याला खड्डयांचे ग्रहण

$
0
0
पावसाळी गटार योजनेमुळे खड्ड्यांत गेलेले शहरातील रस्ते मार्गावर येत असताना, रामवाडीला जोडणारा रस्ता मात्र याला अपवाद ठरला आहे. वेगवेगळ्या कामांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून खोदलेला हा रस्ता दुरूस्तीचे भानही महापालिका प्रशासनाला राहिलेले नाही.

११ वर्षीय मुलीचा विनयभंग

$
0
0
भंगार दुकानात दारूची बाटली विकण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलीबरोबर बिभस्त चाळे करणा-या दुकानादाराविरोधात सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही संतापजनक घटना शिवाजीनगर परिसरातील कार्बन नाका येथे गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images