Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पोलिस स्टेशनमध्ये गर्दी वाहनांची

$
0
0

पोलिस स्टेशनमध्ये गर्दी वाहनांची

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने शहरातील विविध पोलिस स्टेशन्सना अडचणीची ठरत आहेत. वारंवार आवाहन करूनही वाहन मालकांनी कागदपत्रे सादर न केल्यामुळे वर्षानुवर्षे ही वाहने जशीच्या तशी पडून आहेत. त्यामुळे शहरातील अनेक पोलिस स्टेशन्स अशा वाहनांनी भरुन गेली आहेत.

या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी व अन्य कामासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहनेही मोठ्या प्रमाणावर जागा व्यापून घेत आहेत. परिणामी पोलिस कर्मचाऱ्यांनाच वाहन पार्किंगला जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच जप्त केलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य ते आदेश मिळत नसल्याने ही वाहने आता भंगार अवस्थेत पोहोचली आहते. त्यामुळे पोलिसांनाही ती सांभाळणे जिकरीचे होत आहे. मद्यपी व भुरटे चोर कधी कधी पोलिसांची नजर चुकवून या भंगारातील वाहनांचे सुटे भाग चोरत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे ही वाहने पोलिसांसाठी जास्तीची डोकेदुखी ठरू लागली आहेत.

अपघातातील अवजड वाहने, चोरीच्या मालाची वाहतूक करणारे मोठे ट्रक्स यासारखी वाहनेही पोलिस स्टेशनच्या आवारात अडचण निर्माण करत आहेत. कोर्टामार्फत देण्यात आलेला वाहन सोडविण्याचा आदेश वाहन मालकांनी पोलिस स्टेशनला न आणून दिल्याने ही अवजड वाहने इथेच पडून आहेत. काही पोलिस स्टेशन्समध्ये तर जवळच्या हॉटेलमध्ये येणारे ग्राहकही आपली वाहने सर्रासपणे पार्क करत असल्याचे दिसून येते. पार्किंग आणि जप्तीच्या या वाहनांमुळे शहरातील कित्येक पोलिस स्टेशन्स वाहनांच्या विळख्यात असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात रंगणार बालकवी संमेलन

$
0
0

शहरात रंगणार बालकवी संमेलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकहितवादी संस्थेच्या पुढाकाराने नाशिकमध्ये बालकवी संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येत आहे. नाशिकमध्ये दरवर्षी बालकवींचे संमेलन व्हावे अशी कल्पना कुसुमाग्रजांनी मांडली होती. ही जबाबदारी लोकहितवादी मंडळाने स्वीकारली असून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी शनिवारी (२७ फेब्रुवारी) हे संमेलन होणार आहे.

राका कॉलनीतील ज्योतीकलश सभागृहात सकाळी नऊ वाजता या संमेलनाला सुरुवात होणार आहे. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी हा लहान गट तर इयत्ता आठवी ते दहावी हा मोठा गट असणार आहे. संमेलनात प्रवेश मोफत असून सहभागी होणाऱ्या बालकवीने दोन कविता पाठवायच्या आहेत. त्यातील एक कविता कुसुमाग्रजांची तर दुसरी कविता स्वरचित असणे आवश्यक आहे. कविता फुलस्केप कागदावर सुवाच्च अक्षरात लिहून प्रत्येकी तीन प्रतीत शाळेच्या प्रमाणपत्रासह गुरूवारपर्यंत (२५ फेब्रुवारी) पाठवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर, २०१, सारडा संकुल, वकीलवाडी, महात्मा गांधी रोड, नाशिक ४२२००१ या पत्त्यावर कविता पाठवायची आहे.

या दोनही गटांसाठी पहिल्या तीन नंबरसाठी ५०१, ३०१, २०१ रुपयांची तर १०१ रूपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. ज्या कविता संमेलनासाठी पाठवणार आहेत त्या पाठ करून सादरदेखील करायच्या आहेत. याचबरोबर आपल्या शाळेचा फोन नंबर, इ मेल अॅड्रेस कळवायचा आहे. विद्यालयातील जास्तीत जास्त बालकवींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन लोकहितवादी संस्थेच्या वतीने अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी तसेच सरचिटणीस नवीन तांबट यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी चळवळ व राजकारण

$
0
0

​प्रा. डॉ. विवेक खरे
भारतातील एक अग्रगण्य विद्यापीठ असलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ मागील आठवड्यापासून सर्वच प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमांतील चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. हैदराबादमधील केंद्रीय विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी चळवळीचे केंद्र असलेल्या 'जेएनयू'तील घटनाघडामोडींनी देशाच्या राजकारणाचा एक हिणकस चेहरा जगासमोर येतो आहे. देशप्रेम, देशद्रोह या शब्दांच्या नवीन व्याख्या आज जन्माला येत आहेत. भारताच्या समाजकारणावर आणि राजकारणावर दूरगामी परिणाम घडवून आणणाऱ्या या घटनांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

जगाच्या विविध भागातून 'जेएनयू'त विद्यार्थी शिकायला येतात. वेगवेगळ्या जाती धर्माच्या, विचारसरणीच्या तसेच सांस्कृतिक पृष्ठभूमी असलेल्या या विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे जगभरात अत्यंत आदराने पाहिले जाते. शिक्षणाबरोबरच समाजातील वैचारिक विश्वात या विद्यार्थ्यांचे योगदान आजवर महत्त्वपूर्ण राहिले आहे. भारतच नव्हे तर जगातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांसारख्या अनेक क्षेत्रात हे विद्यार्थी आपली चमकदार कामगिरी करीत आले आहेत. मुक्त वैचारिक अवकाश, देशातल्या तसेच जगातल्या सामाजिक प्रश्नांवर सातत्याने घडणाऱ्या चर्चा, विचार आणि वर्तन यातील सैलपणा, सर्व प्रकारच्या विचारसरणीचा आदर ठेवून आपली निश्चित अशी भूमिका तयार करण्यावर असलेला विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचा भर अशा अनेक गोष्टींमुळे वैशिष्टपूर्ण असलेले हे विद्यापीठ आहे. प्रकाश करात, सीताराम येचुरी, नीला सत्यनारायण अशी आज राजकारणात सक्रिय असलेली नेतेमंडळी याच विद्यापीठातून शिकून पुढे आलेली आहेत. या विद्यापीठात जर काही विद्यार्थी आपण ज्या देशात राहतो त्याच्या विरुद्धच घोषणाबाजी करीत असतील, कट -कारस्थाने रचत असतील तर ही बाब नक्कीच असमर्थनीय आहे. तिचा निषेध झालाच पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला राजकीय हेतूने प्रेरित होऊन विद्यार्थ्याना सत्ताधाऱ्यांनी वेठीस धरणे हे देखील चुकीचे आहे.

विद्यापीठांच्या नेमक्या कार्याविषयी सांगतांना पंडित नेहरू म्हणतात, की 'मानवतावाद, सहिष्णुता, विवेक, कल्पनांचे साहस आणि सत्याचा शोध घेणे व मानवी उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाणे हे विद्यापीठांचे काम आहे.' आज भारतातील विद्यापीठे ही उद्दिष्टे पूर्ण करतांना दिसतात काय असा प्रश्न पडतो. विद्यार्थी म्हणजेच युवक ही देशाची शक्ती आहे असे अभिमानाने आपण म्हणतो. भारत हा आज तरुणांचा देश आहे असेही उच्चरवाने सांगण्यात येते आहे. या तरुणांनीच देशातील विशिष्ट विचारसरणी माननाऱ्या राजकीय पक्षाला सत्तासोपानापर्यंत पोहचविले. सत्ता मिळाल्यावर मात्र विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा एककलमी कृतिकार्यक्रम सत्ताधाऱ्यांकडून हाती घेण्यात आला आहे असे चित्र निर्माण झाले आहे. विद्यार्थी चळवळी आणि त्यांच्या आडून होणारे राजकारण याचादेखील या अनुषंगाने विचार करायला हवा.

जगात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या काळात विद्यार्थ्यांच्या चळवळी जन्माला आल्या. पुढे या चळवळीतून त्या त्या देशाला काही चांगले नेतेही मिळाले. विद्यार्थी चळवळ आणि राजकारण यांच्यात नेहमीच घनिष्ट संबंध राहिला आहे. भारतात तर स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यापासूनच विद्यार्थी चळवळी निर्माण झाल्याचे चित्र दिसते. शहीद भगतसिंग यांनी विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्यांनी व त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांनी 'नौजवान भारत सभा' नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. स्वातंत्र्योत्तर काळात विविध पक्षांच्या भूमिकांवर आधारलेल्या युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संघटना जन्माला आल्या. 'युवक काँग्रेस' 'युवक क्रांतिदल' 'ऑल इंडिया स्टूडंटस फेडरेशन', 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद', 'ऑल इंडिया शीख स्टूडंटस फेडरेशन', यांसारख्या विद्यार्थी संघटना आपापल्या पक्षीय विचारसरणी बरोबर घेवूनच सक्रिय राजकारणात पुढे आल्या. या संघटनांमधून आणि चळवळीतूनच देशाला चांगले नेतृत्व करणारे नेतेही मिळाले. देशपातळीवर विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांसारखे तर राज्यासह देशपातळीवर आपल्या वक्तृत्वाची भुरळ घालणारे प्रमोद महाजन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांचा उल्लेख करता येईल. बदलत्या काळानुसार मात्र विद्यार्थी संघटनाचे आणि त्यांच्या मागे असलेल्या राजकीय पक्षांच्या राजकारणाचे स्वरूपही बदलू लागल्याचे दिसते.

वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आज शिक्षण घेणारी तरुण विद्यार्थ्यांची पिढी विचार करू लागली आहे. समाज व्यवस्थेची, धर्म व्यवस्थेची चिकित्सा करू लागली आहे. त्या व्यवस्थेला प्रश्न विचारू लागली आहे. जागतिकीकरणाच्या युगात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगातल्या मानवतावादी चळवळीशी आपल्याला जोडून घेवू लागली आहे. अशा या विचारी पिढीवर स्वार होऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करीत आहे. विद्यापीठीय विद्यार्थी संघटनांना आपल्या ताब्यात घेवू पाहत आहे. दिल्लीपासून ते अगदी नाशिकपर्यंतही हेच चित्र अनुभवायला मिळत आहे. अर्थात यात काही गैर असण्याचे कारणही नाही. मात्र यातून काही धोकेही निर्माण होत आहेत हे खरे! पक्षीय राजकारणाचा भाग झालेल्या या विद्यार्थी संघटनांमध्ये आज निकोप राजकारण राहिले नाही. त्यांच्या निवडणुकीत अपप्रवृतींचा शिरकाव झाला. महाविद्यालये, विद्यापीठांच्या वर्गाबाहेर असणारे राजकारण वर्गातल्या बेंचपर्यंत येवून ठेपले. डावा-उजवा, पुरोगामी-प्रतिगामी अशी बिरुदे लावून विद्यार्थ्यांमध्ये भेद केला जावू लागला. त्यांना विशिष्ट धर्म, विशिष्ट जातीत, पंथात आणि विचारसरणीत बंदिस्त केले जावू लागले. स्वत:हून विचार करण्याची, भूमिका ठरवण्याची त्यांची बौद्धिक शक्तीच नष्ट केली जावू लागली. राज्यघटनेने त्यांना दिलेल्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याला नख लावण्याचे काम सगळ्याच पक्षांनी करायला सुरुवात केली. त्यातूनच मग या विद्यापीठांमध्ये संघर्ष निर्माण होत गेले.'जेएनयू'तील वर्तमान संघर्ष हा देखील याला अपवाद नाही. मागील ५७ वर्षांपासून या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेवर डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टूडंटस फेडरेशन, ऑल इंडिया स्टूडंटस युनियन, स्टूडंटस फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांचे वर्चस्व राहिले. उजव्या विचारांच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने असंख्य प्रयत्न करून देखील त्यांना विद्यापीठाच्या संघटनेवर ताबा मिळविता आला नाही. देशात आपले सरकार असूनही आपण काहीच करू शकत नाही या म्हणून मग दमनशाहीच्या मार्गाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न ही संघटना आणि तिच्या मागे असलेले सरकार करू पाहते आहे. त्यामधूनच ही संघर्ष मालिका निर्माण झाली आहे. अर्थात सूडबुद्धीने केल्या जाणाऱ्या या राजकारणात विद्यार्थ्यांची देशनिष्ठा, देशप्रेम आणि त्यांचे विद्यार्थीपण हरवू नये ही अपेक्षा सर्वसामान्य माणसांना वाटणे स्वाभाविक आहे.

(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप-प्रत्यारोपात प्रचाराचा समारोप

$
0
0

१९ जागांसाठी रविवारी मतदान म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यात नाशिकरोडच्या बिझनेस बॅँकेच्या निवडणुक जाहीर प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी थांबली. मतदारांच्या भेटी घेऊन भूमिका पटवून देण्यावर उमेदवारांनी भर दिला. जेलरोडच्या कोठारी कन्या शाळेत १९ जागांसाठी रविवारी (दि. २१) मतदान होणार आहे.

विमान चिन्ह असलेल्या सत्ताधारी सहकार पॅनलमध्ये अनुभवी व्यक्ती जास्त आहेत. त्यांनी नियोजबद्दरित्या प्रचार केला. या पॅनलची नेतृत्वाची धुरा वसंतराव नगरकर, विजय संकलेचा, अशोक तापडिया हे सांभाळत आहेत. त्यांना श्रीनिवास लोया, डॉ. पूनमचंद ठोळे, विजय चोरडिया, मोहन लाहोटी, बसंत गुरुनानी, सुरेश टर्ले, नेमीचंद कोचर, सचिन घोडके, डा. उमेश नगरकर, गोरखनाथ बलकवडे, गोपी अलठक्कर आदींची साथ लाभत आहे. निवृती चाफळकर आणि जीवन घिया आदर्श पॅनलची धुरा सांभाळत असून अमलोकचंद भंडारी, प्रवीणकुमार लोढा, जीवन घिया, सतीश कलंत्री, रामनिवास सारडा, चंद्रशेखर दंदणे, मंगेश खोडदे, संदीप झारेकर, विजय देशमुख, मुकुंद शिंदे, दीपक लवटे, सदाशिव अत्तरदे, काद्री दाऊद मोहमद, संदीप जाधव आदींची साथ त्यांना लाभत आहे. पाच हजार मतदार आणि वेळ कमी असल्याने दोन्ही पॅनलने अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम्स तयार करुन प्रचार केला.

..

सोशल मीडियाचा वापर

गेल्या 18 वर्षात बँकेने प्रतिकुल परिस्थितीत कशी वेगात प्रगती केली, ठेवी, भागभांडवल कसे वाढवले यावर सहकारचा प्रचारात भर होता. या पॅनलपुढे आदर्शने रोडरोलर चिन्ह घेऊन चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यांनीही प्रचारात कसर ठेवली नाही. सत्ताधाऱ्यांचा कथित भ्रष्टाचार, गैरकारभार यामुळे बँक धोक्यात कशी आली यावर त्यांचा प्रचारात भर राहिला. दोन्ही पॅनलकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीचा मुद्दा गाजणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेच्या आज होणाऱ्या महासभेत करवाढीचा निर्णय गाजण्याची शक्यता आहे. तसेच, अतिक्रमण, नळजोडणी मोहिमेसह पाणीपुरवठा, डीपी प्लॅनच्या विषयांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम यांच्या अध्यक्षतेखाली आज, शनिवारी महासभा होणार आहे. या महासभेत एकूण सात विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. यातील घरपट्टी वसुली विभागाकडून महानगर पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रचलित मनपा करात वाढ सुचवण्याचा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. सध्या मालेगाव मनपाच्या खिळखिळी झालेल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने करवाढीचा या विषयावर जोरदार चर्चा होणे अपेक्षित असून, नगरसेवकांकडून विरोध होऊ शकतो.

महासभेत प्रस्तावित करवाढीच्या विषयासह गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम, अवैध नळजोडणी बंद करणे मोहीम, पाणीपुरवठा, स्वच्छता, या विषयांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या महासभेत मालेगाव शहराच्या विकास आराखड्यावर जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे मालेगाव मनपाच्या बांधकाम विभागातील परवानग्या, अनधिकृत बांधकाम, डीपी प्लॅनचे झालेले उल्लंघन यामुळे मनपाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत उपायोजना करण्यासाठी नगरसेवक सखाराम घोडके यांनी प्रस्ताव सादर केला आहे. शहराचा वाढता विस्तार आणि सर्रास सुरू असलले बांधकाम नेहमीच वादाचा विषय राहिला असल्याने याबाबत देखील महासभेत पडसाद उमटू शकतात.

मागील महासभांचे इतिवृत्त कायम करणे या विषयावर देखील काँग्रेस नगरसेवक अस्लम अन्‍सारी यांनी गेल्या महासभेत नगरसचिव यांच्या राजीनाम्याचीच मागणी लावून धरली होती. यावेळी देखील महासभा क्रमांक सहा ते नऊचे इतिवृत कायम करणे हा विषय वादग्रस्त ठरू शकतो. या प्रमुख विषयांसह शहरातील पे अॅण्ड पार्क भाडेतत्त्वावर देणे, पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणी, मनपा हद्दीतील जाहिरात बोर्ड लावण्याची उपविधी तयार करणे हे विषय चर्चेला असणार आहेत.

मनपा गृहकर वसुली विभागाकडून मनपा कारच्या प्रचलित दरात सुधारीत दर लागू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मालेगाव मनपाची आर्थिक स्थिती लक्षात घेवून आणि अनेक शासकीय योजनात मनपाच्या हिस्साची रक्कम यातून उपलब्ध व्हावी, यासाठी ही करवाढ अपरिहार्य झाली आहे. यात एकूण दहा प्रकारचे विविध कर अंतर्भूत आहेत. कर विभागाने या प्रस्तावाद्वारे प्रचलित करांच्या दरात दोन टक्के वाढ सुचवली आहे. यातून मनपाला सुमारे पाच कोटी रुपये वाढीव उत्पन्न अपेक्षित आहे. सध्या मनपाचा आस्थापन खर्च ४४ टक्क्यांवर गेला असून, उत्पन्न मात्र घटले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी मनपा निवडणुका डोळ्यासमोर असल्याने ही सुचवण्यात आलेली करवाढ सत्ताधारी आणि विरोधक मान्य करतील का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
थकीत रकमेचा करा भरणा मालेगाव महानगरपालिका हद्दीतील थकबाकीदार मिळकतधारकांनी दिनांक १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या आर्थिक वर्षातीरल घर व पाणीपट्टीच्या रकमेचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले आहे. मालेगाव महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतधारकांना दिनांक १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या आर्थिक वर्षातील घर व पाणीपट्टीची बिले पाठविण्यात आलेली आहेत. ज्या मिळकतधारकांनी अद्याप घर व पाणीपट्टीची रक्कम भरलेली त्यांनी सात दिवसांच्या आत जमा करावी, अन्यथा त्यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार जप्तीची व दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, थकीत पाणीपट्टीधारकांचे नळकनेक्शन बंद करण्यात येईल.

शहरातील विविध विकासकामांतील मनपाचा आर्थिक हिस्सा देण्यासाठी उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. या आधी २००३ मध्ये अशी करवाढ सुचवण्यात आली होती. सध्याची मनपाची आर्थिक स्थिती व शहरातील विकासकामे लक्षात घेता हा सुधारीत दर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दोन टक्के इतकी ही वाढ असून, शहरविकासाच्या दृष्टीने ही करवाढ अपरिहार्य आहे. - कमरुद्दीन शेख, उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथकाकडून ९० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे अचानकपणे भेट देत गावातील दुध डेअरीची तपासणी केली. या तपासणीत दुधात भेसळ केली जात असल्याच्या संशय अधिकाऱ्यांच्या पथकाला आल्याने भेसळयुक्त तब्बल ९० लिटर दूध नष्ट करण्यात आले.

येवला तालुक्यातील निमगाव मढ गावात पोहचलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुधात भेसळ झाल्याचा संशय व्यक्त करीत दूध नष्ट करतानाच या दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. निमगाव मढ येथे दुधात नेमकी कुठल्या स्वरुपाची भेसळ होती याबाबत अनेक अंदाज लावले जात होते. दोन ठिकाणी या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असली तरी या भेसळीच्या स्वरुपाबाबत अधिक माहिती अधिकृतपणे देण्याचे या अधिकाऱ्यांनी टाळल्याचे चित्र दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे गुरुवारी बजेट

$
0
0

प्रशासनाचा वास्तवादावर भर; सत्ताधारी फुगवट्याकडे कल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत गेल्या वर्षाच्या बजेटची अमंलबजावणी झाली नसली तरी प्रशासनाने नव्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या बजेटचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. महापालिका आयुक्त स्थायी समितीवर प्रारूप गुरुवारी (दि. २५) बजेट सादर केले जाणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नाची साधने कमी झाल्याने आणि पुढील वर्षी निवडणूक असल्याने आयुक्तांना बजेट सादर करतांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सोबतच करवाढ टाळावी लागणार आहे. त्यामुळे बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर फुगवटा येण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून सध्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे बजेट तयार करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी आयुक्तांनी स्थायीला १४३७ कोटीचे बजेट सादर केले होते. त्यात महासभेनेने ३३२ कोटींची वाढ केली होती. त्यामुळे बजेट १७६९ कोटींवर गेले. परंतु, या बजेटला मंजुरी देण्यास डिसेंबर उजाडला. तर मंजुरीनंतर बजेटची छपाईच झाली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीचे बजेट प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी येऊ शकले नाही. त्यामुळे आता नव्या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूक आहे. त्यामुळे या बजेटमध्ये नगरसेवकांना निधी देण्यासह मोठ्या प्रमाणावर विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. सोबतच शहरातील रस्ते व डांबरीकरणावर अधिकचा खर्च येणार आहे. तर अमृत, नदी संवर्धन योजनांसाठी निधी राखीव ठेवावा लागणार आहे. तर दुसरीकडे उत्पन्नाची साधने मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहेत. तर उत्पन्न वाढविण्यासाठी करवाढ करावी लागणार आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवाढीला सत्ताधाऱ्यांचा विरोध असेल. सध्या तिजोरीत खडखडाट असून एलबीटीमुळे आर्थिक परिस्थिती खराब आहे. प्रशासन वास्तववादी बजेट सादर करण्यावर भर देणार आहे. तर सत्ताधारी बजेट फुगविण्यावर भर देणार आहे. त्यामुळे बजेटवरून सत्ताधारी व प्रशासन यांच्यातही जुंपणार आहे.

स्थायीसाठी शुक्रवारी निवड

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २९ फेब्रुवारी रोजी पूर्ण होत रिक्त होणाऱ्या नव्या सदस्यांची निवड येत्या शुक्रवारी (दि. २६) केली जाणार आहे. त्यासाठी विशेष महासभा होणार असून त्यात पक्षीय कोट्यानुसार नव्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूक असल्याने स्थायीचे हे शेवटचे वर्ष असेल. त्यामुळे नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात निवडणुकीची तारीख निश्चित होणार आहे. भाजपच्या रंजना भानसी, कुणाल वाघ, आरपीआयच्या ललिता भालेराव, अपक्ष गटाच्या रशीदा शेख, काँग्रेसचे राहुल दिवे, मनसेच्या सुरेखा भोसले, शिवसेनेचे शैलेश ढगे, शोभा फडोळ असे आठ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे या रिकाम्या होणाऱ्या जागांसाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाय चोरणारा कामगार गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील वैदिक पॉलिमर्स कारखान्यातील सुमारे दहा लाख रुपयांच्या दोन डाय (साचा) चोरणाऱ्या एका कामगाराला मुसळगाव पोलिसांनी मोठ्या कौशल्याने ओडिशा राज्यातून ताब्यात घेतले. त्याने सांगितल्याप्रमाणे महागड्या डायचा शोध घेतला जात आहे.

मुसळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी या गुन्ह्याबाबत पत्रकारांना माहिती दिली. गेल्या सहा वर्षांपासून वैदिक पॉलिमर्स या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी कंपनीतून ३२ व २२ कॅरेट असणाऱ्या सुमारे दहा लाख रुपये किमतीच्या दोन डाय या कामगारांनी चोरून नेल्या होत्या. कंपनीचे मालक विश्वनाथ व्यंकटेश अय्यर यांनी २९ जानेवारी रोजी या प्रकरणी मुसळगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

कामगारांची पुरेशी माहिती नसतांना व त्यांचे मोबाइल क्रमांक ही निटशे माहिती नसताना पोलिसांनी माहिती मिळवत दुकानातून नव्याने घेतलेल्या मोबाइल वरून त्यचा इएमआई क्रमांक मिळवत त्यांचे लोकेशन प्राप्त केले. डायची चोरी करताना वापरलेली दुचाकीच्या (एमएच १५ बीसी ८३७६) लोकेशनवरून शिर्डी येथील वाहन पार्किंगमधून जप्त करण्यात आली. कंपनीच्या मालकाने कामगाराशी संपर्क साधला असता त्यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली व त्या बदल्यात डाय परत देण्याची बोली झाली. तोपर्यंत त्यांचे लोकेशन झारखंड व नंतर ओडिशा राज्यात बदलले गेले. त्यानंतर पोलिसांनी ओडिसातील महाकाल पाडा पोलिस ठाणे, केंद्रपाडा जिल्हा या ठिकाणाहून स्थानिक पोलिसांच्या मदतीने चित्तरंजनदास पुलमनी (वय २७) यास शिताफिने ताब्यात घेतले. त्या नंतर कोर्टातून प्रवासात ताबा घेत त्यास सिन्नर येथे आणले. त्याने दिलेल्या जबाबावरून त्या महागड्या डायचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ संजयदास अद्याप फरार आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपधीक्षक दीपक गिरे, तुळशीराम चौधरी, लक्ष्मण बदादे, तुषार मरसाळे, जितेंद्र बागुल, आदींनी कामगिरी बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्यांना’ही मिळणार मोफत गणवेश

$
0
0

महापालिकेकडून खुल्या, ओबीसी व एनटी संवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : शाळा.. जिथे समानतेचे धडे मनावर कोरणे आवश्यक असते. परंतु, समाजाने टाकलेल्या कुंपणांमुळे या वयात चिमुकले विद्यार्थी समानते पलिकडे जातात आणि त्यांच्यामध्ये असमानतेचे संस्कार अनाहुतपणे रुजतात. विद्यार्थ्यांमध्ये ही भावना निर्माण होऊ नये, यासाठी नाशिक महापालिकेने पावले उचलली आहेत. भेदभावाची ही भावना टाळण्यासाठी मनपा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला मोफत गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची कळी खुलणार आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येते. सर्व मुली, अनुसूचित जमाती व द्रारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) मुलांना या योजनेचा लाभ मिळतो. दोन गणवेशांसाठी प्रत्येकी ४०० रुपये विद्यार्थ्यांना दिले जातात. या योजनेचा लाभ २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात २८ हजार ४०५ विद्यार्थ्यांना मिळाला होता. मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, शीख, बौद्ध, जैन या समाजातील मुले व मुलींनाही ही योजना अल्पसंख्यांक विभाग योजनेतून लागू आहे. यातून केवळ जनरल, एनटी व ओबीसी याच संवर्गातील विद्यार्थीवर्ग वंचित होता. यांनाही हा लाभ मिळावा, यासाठी मनपाच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना या योजनेचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती मनपा शिक्षणसमितीचे प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी दिली आहे. त्यामुळे मनपाच्या १२७ शाळांमधील खुला, एनटी व ओबीसी या संवर्गातील सात हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जाती, संवर्गाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये समानतेची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी महापालिका शाळांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

मोफत गणवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, त्यांच्या मनातही भेदभावाची भावना निर्माण होऊ नये, यासाठी हा प्रयत्न आहे. मागील वर्षीच या योजनेचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे तो करता आला नाही. यंदा मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच गणवेश वाटप केले जाणार आहे.

- उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, शिक्षणसमिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडांगळी, जेजुरी यात्रेसाठी जादा बसेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माघी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र जेजुरी तसेच, सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे मोठी यात्रा भरते. या यात्रांना जाणाऱ्या भाविकांचे प्रमाण मोठे असून, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे.

माघी पोर्णिमेला श्री क्षेत्र जेजुरी येथे मोठी यात्रा भरते. सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे सती माता आणि सामत दादा यांची मोठी यात्रा असते. दि. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत या दोन्ही यात्रा असून, तेथे भाविकांचा ओघही मोठा असतो. म्हणूनच एसटी महामंडळाने सिन्नर येथील आगारातून २८ जादा बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसेस सोडणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. वडांगळी येथील यात्रेसाठी जिल्ह्यातील विविध भागांतून २० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. नाशिक, नाशिकरोड, लासलगाव आणि सिन्नरमधून या बसेस सोडण्यात येणार आहेत. नाशिकहून सायखेडा, करंजगाव मार्गे तीन तर जायगाव, बारागाव पिंप्री मार्गे चार बसेस सोडण्यात येणार आहेत. नाशिकरोड येथून नायगावमार्गे तीन, लासलगावहून वडांगळीसाठी चार तर सिन्नरहून सर्वाधिक सहा जादा बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे आज वाजविणार बिगुल

$
0
0

राज ठाकरे नाशकात; मनसेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. २०) मनसेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. राज ठाकरे मनसे व मनविसेच्या नवीन कार्यकारिणीला मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच महापालिकेच्या कामकाजाचा धावता आढावा घेतील. महापालिका निवडणुकीचा बिगूल ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून वाजवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महापालिकेच्या निवडणूक वर्षभरावर येवून ठेपली असून त्याची तयारी मनसेने सुरू केली आहे. गेल्या चार वर्षात झालेल्या कामासह नव्या पदाधिकाऱ्यांच्या बळावर मनसे निवडणुकीचा सामना करणार आहे. गेल्याच महिन्यात मनसेने रखडलेली शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात मनविसेचीही नवी शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. माजी आमदार वसंत ‌गीते यांनी मनसेमध्ये पाडलेले खिंडार बुजविण्यात पक्षाला काही प्रमाणात यश आले आहे. पक्षात नव्याने पदे मिळालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राज ठाकरे शुक्रवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा इंद्रप्रस्थ हॉलमध्ये मेळावा होणार असून त्यात राज ठाकरे संबोधित करणार आहे. निवडक पदाधिकाऱ्यांशी यावेळी ते चर्चा करणार आहे‌त. त्यानंतर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ठाकरे पुण्याला रवाना होणार आहे.

कामांचे होणार ब्रॅण्डींग

महापालिका निवडणुकीचा बिगूल ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून वाजविणार आहे. पुढील वर्षभर मनसेच्या वतीने नाशिकमधील कामांचे ब्रॅण्डींग करणार असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांचा ते वर्ग घेणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याने मनसेच्या निवडणूक तयारीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे मनसे पदाधिकाऱ्यांसह इतर पक्षीयांचेही लक्ष लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवानगी येवल्यात ऑनलाइन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिका हद्दीत आता लवकरच 'ऑनलाइन प्रणाली' पद्धतीने बांधकाम परवानगी व त्यातील इतर बाबींची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात पालिकेचे परवानाधारक असलेले शहरातील आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर, सुपरवायझर यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत येवला नगरपालिका हद्दीत राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे बांधकाम परवानगी ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करण्याची हमी संबंधितांनी दिल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आता राज्यातील सर्वच नगरपालिकांमध्ये बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता यापुढे सर्वच नगरपालिकांमध्ये ऑनलाइन प्रणालीद्वारे बांधकाम परवानगी दिली जाणार आहे. यासाठी या महिन्यातील ६ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात एका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे प्रधान सचिव (महिती तंत्रज्ञान) व प्रधान सचिव (नगरविकास) यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक विभागातील सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी व इंजिनीअर यांची प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाताना त्यात ऑनलाइन बांधकाम पद्धती राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार शहरातील आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीयर, सुपरवायझर यांच्या बैठकीत संकल्पना व मार्गदर्शक तत्वे समजावून सांगण्यात आली. या बैठकीस पालिका मुख्याधिकारी वाघ, नगरअभियंता जयेश भैरव, मुख्य लिपिक पी. वाय. मांडवडकर यांच्यासह येवला शहरातील इंजिनीअर असोसिएशनचे संजय पाटील, सारंग पाटील, मंगेश पैठणकर, अमित लाड, भूषण लाड, विशाल चंडालिया आदी उपस्थित होते.

येत्या १५ दिवसांत पुन्हा एकवार बैठक घेतली जाणार आहे. त्यात बांधकाम परवानगी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. प्रशिक्षण दिले जाईल. बैठकीत नगरपालिका हद्दीत शासन नियमाप्रमाणे बांधकाम परवानगी ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करण्याची हमी संबंधितांनी दिली आहे. राहुल वाघ, मुख्याधिकारी, येवला नगरपालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका

$
0
0

मध्य रेल्वेच्या ताफ्यात तिकीट तपासणीसाची संख्या अपुरी असल्याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. यातील प्रत्येकाला पकडणे तिकीट तपासणीसांना शक्य होत नाही. त्यामुळे नाशिक विभागाने जानेवारीत मुख्य तिकीट निरीक्षक (सीटीआय) व रेल्वे पोलिस फोर्स (आरपीएफ) नाशिक यांच्यातर्फे विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मनमाडहून सुटणाऱ्या व नाशिकमार्गे जाणाऱ्या गाड्या सर्व गाड्या या मोहिमेत तपासणी करण्यात आली. सकाळी निघणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करणारा एकही प्रवासी आढळला नाही तर सर्वात जास्त विनातिकीट प्रवासी गोदावरी एक्सप्रेसमध्ये आढळले. या गाडीत एका महिन्यात २०२ प्रवासी आढळले तर त्यांच्याकडून ७९ हजार ९४५ रुपये वसूल करण्यात आली. यात लांब पल्ल्याच्या गाड्या तपासण्यात आल्या नाहीत.

'टीसी'ची संख्या अपुरी

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर टीसींची संख्या अपुरी असल्याने याचा गैरफायदा फुकटे प्रवाशी व अनधिकृत व्यावसायिक घेत आहेत. आरक्षणगृहाच्या पाठीमागील बाजुस नव्याने बांधण्यात आलेल्या मार्गावर टीसी नसल्याने फुकट प्रवाशांची चांदी झाली आहे. एका महिन्यात रेल्वेला तब्बल तीन लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. नाशिकरोड हे भुसावळ डिव्हीजनमध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेशन म्हणून गणले जाते. या स्टेशनवरून उत्तर भारतात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने टीसींची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

२१ टीसींची गरज प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत टीसींची संख्या निम्म्याने कमी आहे. स्टेशनवर एकूण २१ टीसींची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात नऊच टीसी आहेत. भुसावळ डिव्हीजनमध्ये काही दिवसांपूर्वी ६५ टीसींची नेमणूक करण्यात आली; मात्र त्यातील एकही टीसी नाशिकरोडसाठी अद्याप मिळू शकलेला नाही.

फ्लाइंग स्कॉडच नाही रेल्वेत फिरणाऱ्या अनधिकृत व्यवसायिकांना जरब बसविण्यासाठी तसेच फुकट्यांना दंड करण्यासाठी भुसावळ डिव्हीजनमध्ये फ्लाइंग स्कॉडच नाही. इतर मार्गांवर फ्लाइंग स्कॉड आहे. भुसावळ ते इगतपुरी या मार्गावर अनेक व्यावसायिक अनधिकृत व्यवसाय करून रेल्वे प्रवाशांना लुबाडतात. या व्यावस‌ायिकांना थोपविण्यासाठी फ्लाइंग स्कॉडची गरज आहे.

प्रवाशांची भामटेगिरी ट्रेन आल्यानंतर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी टीसी उपलब्ध नसल्याने फुकट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी बहुतांश प्रवाशांना या स्टेशनवर टीसी नसल्याचे माहिती झाले आहे. त्यामुळे काही प्रवासी मुद्दाम तिकीट काढण्याचे टाळतात. तसेच आरक्षणगृहाच्यामागे नव्याने बांधण्यात आलेल्या मार्गावर तिकीट तपासणी होत नसल्याने फुकटे प्रवासी या मार्गाचा अवलंब करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत जैन मंदिराचा सुवर्णमहोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी शहरातील मध्यवर्ती साकारलेले जैन धर्मियांचे श्रद्धास्थान जैन मंदिराचा ५० व्या वर्षपूर्ती कार्यक्रमाची भव्य शोभायात्रेने तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाने सांगता झाली. या शोभा यात्रेस घोटी शहर जैन समाज बांधव व विविध जैन मंडळाच्या सहयोगातून गुरुवारी घोटी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. श्री मुनिसुव्रत स्वामी यांच्या जयजयकाराने संपूर्ण घोटी नगरी दुमदुमली होती. शहरात विविध संस्थांच्या वतीने मुनिसुव्रत स्वामी यांना अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यासाठी स्थानिक संस्थानचे पदाधिकारी व संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली.

घोटी शहरातील वीस बंगला परिसरातून सवाद्य मिरवणुकीने शोभायात्रेला सुरुवात झाली. मुनिसुव्रत स्वामी यांच्या जयजयकार व विविध वाहनांवर देखावे सादर करून शोभायात्रा उत्साहात पुढे जात होती. शहरात ग्रामपलिका, बँका, पतसंस्था आदी विविध संस्था व मान्यवरांनी ठिकठिकाणी अभिवादन करण्यात केले. श्री मुनिसुव्रत स्वामी यांच्या भव्यमूर्ती तसेच शोभा यात्रेस जैन बांधव व भगिनी भक्तिरसात चिंब झाले होते. विशेष करून अष्टपद पूजा, अठरा अभिषेक पूजा, शांतीकलश स्नात्र पूजा आदी विविध पूजा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या भव्य शोभायात्रेमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. जैन मंदिर येथे संध्याकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. तसेच हजारोंच्या उपस्थिताने जैन भवन येथे महाप्रसादाचा लाभ घेतला.

या शोभा यात्रेस जि. प. सदस्य अलकाताई जाधव, उदय जाधव, भाजप तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, उपसरपंच समाधान जाधव, सदस्य रामदास शेलार, बाळासाहेब सुराणा आदी मान्यवर सहभागी झाले होते. रामचंद्र सुरीश्वर समुदायाचे प.पू भव्यचंद्र महाराज व सिद्धसेन महाराज यांच्यासह विविध संत व साध्विगण या सोहळ्यानिमित्त घोटी शहरात आलेले होते. सदर कार्यक्रमात सहभागी सुरत, नवसारी, राजकोट, मुंबई, मालेगाव, नाशिक आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित झाले होते.

एक अनोखा संगम सध्या मांगीतुंगी येथे जैन धर्मियांचे तीर्थंकर ऋषभदेव यांची अखंड पाषाणात कोरण्यात आलेली १०८ फुटी भव्य मूर्ती भाविकांसाठी खुली करण्यात आलेली आहे. तेथे भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घोटी येथे प्रसिद्ध असलेल्या जैन मंदिराची ५० वी वर्षापूर्ती असल्याने अनेक कार्यक्रम व ध्वजारोहण करण्यात आले. हा अनोखा संगम या निमित्ताने पहावयास मिळाला आहे. या सोहळ्याचा आनंद साजरा होत असताना शहरात जवळपास पाच हजार कुटुंबांना मिठाईचे पाकीटे वाटण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉम्प्टनमध्ये बिबट्याचा ठिय्या

$
0
0

नेहमीप्रमाणे पहाटे सफाईचे काम करणारे कर्मचारी क्रॉम्प्टन कंपनीच्या जीआयएस डिव्हिजनमध्ये गेले. तेथे सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाला कुणी जंगली प्राणी लपून बसला असल्याचे समजले. त्याने याबाबत सफाई काम करणाऱ्या आपल्या वडिलांना सांगितले. कंपनी व्यवस्थापनाला देखील याबाबत कळविण्यात आले. प्राणीमित्र मनीष गोडबोले व बाळू बोराडे यांना बोलाविण्यात आले. कंपनीत असलेला प्राणी हा बिबट्याचा बछडा असल्याचे समजल्यानंतर कंपनी व्यावस्थापनाने पोलिस व वनविभागाला तत्काळ माहिती दिली. पोलिस व वनविभागाचे अधिकारी कंपनीत सकाळी ९ वाजेच्या सुमारास दाखल होत बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू झाली. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिनेश बर्डीकर आपल्या टिमसह बंदोबस्तासाठी कंपनीत उपस्थित झाले. यानंतर तब्बल अडीच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याच्या बछड्याला उप-वन क्षेत्रपाल अधिकारी अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेशुद्ध करून पकडण्यात आले.

बिबट्या एक वर्षाचा नर वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशन टिममधील वन अधिकारी शरद थोरात यांनी जीआयएस डिव्हिजनमध्ये कपाटाखाली लपून बसलेल्या बिबट्याच्या बछड्याची माहिती घेतली. त्याला बेशुद्ध करण्यासाठी पहिला इंजक्शनचा डोस दिला. मात्र, इंजक्शनचा मारा हुकला. त्यामुळे दुसऱ्या इंजक्शनचा डोसचा मारा करण्यात आला. तो योग्य ‌ठिकाणी बसल्याने बछडा क्षणार्धात बेशु्द्ध झाला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. बछडा एक वर्ष वयाचा नर जातीचा असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले. वनविभागाच्या रेस्क्यू टिममध्ये वनविभाग अधिकारी प्रशांत खैरनार, व्ही. जी. कांबळे, एस. ए. खान, बी. एच. बोकडे, सरोदे आदी कर्मचारी सहभागी झाले.

एक वर्षे वयाचा बिबट्याचा बछडा रात्रीच्यावेळी कंपनीत आला होता. कंपनी व्यवस्थापनाने माहिती दिल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन टिमसह कंपनीत दाखल झालो. यानंतर कपाटाच्या खाली बसलेल्या बछड्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन पकडण्यात आले. - अनिता पाटील, उप वन क्षेत्रपाल अधिकारी, नाशिक

इंजक्शनमुळे बेशुद्ध झालेला बिबट्या दुपारी बारा वाजेनंतर शुद्धीवर आला. त्याला खायला मांस देण्यात आले. सध्या त्या बिबट्याची प्रकृती सुस्थितीत असून त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. - प्रशांत खैरनार, वन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव शहरात लवकरच हॉकर्स झोन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरात लवकरच हॉकर्स झोन आणि नो हॉकर्स झोन जाहीर केले जाणार आहे. याबाबत एक महिन्याच्या कालावधीत हरकती व सूचना मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येथील शहर फेरीवाला समिती व साई एकता फेरीवाला युनियनच्या वतीने मालेगाव शहरात फेरीवाला धोरण लागू करण्यात यावे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. या धोरणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सोमवारी आयुक्त किशोर बोर्डे यांच्यासोबत बैठक घेण्यात येवून फेरीवाला धोरण निश्चित होत नाही, तोवर शहरातील फेरीवाल्यांना रस्त्यावरील रहदारीस अडथळा न आणता व्यवसाय करतो येवू शकतो, असा निर्णय आयुक्तांनी दिला होता. यामुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. तसेच, बुधवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपायुक्त कमरूद्दीन शेख, नगररचनाकार सय्यद शाकिल आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. फेरीवाला युनियनचे राजेंद्र ठाकरे, देवा पाटील, सुधाकर जोशी आदि पदाधिकारी उपस्थित होते. २१ ऑक्टोबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार हॉकर्स झोन जाहीर करावेत, फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण व्हावे अशा मागण्या युनियनच्या वतीने मांडण्यात आल्या.

आयुक्तांची गैरहजेरी! शासन निर्णयानुसार शहरातील फेरीवाला धोरणाच्या बाबतीत वेगाने कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच या धोरणावरच शहरातील एकूण १,४५६ फेरीवाल्यांचे भवितव्य अवलंबून आहे. असे असतांनाही बैठकीस आयुक्त किशोर बोर्डे उपस्थित राहू न शकल्याने फेरीवाला धोरण राबवण्याबाबत मनपा प्रशासन खरच गंभीर आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गहू, हरभऱ्याचे उत्पादन घटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील असमतोलपणा व त्यातच कमी प्रमाणात झालेल्या पर्जन्यमान यामुळे यंदा खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामाला सुध्दा 'बुरे दिन 'आले आहेत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या गहू पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. तर ज्वारीसह, कांदा व इतर नगदी पिके पाण्याअभावी धोक्यात सापडली आहेत. त्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात आल्याने शेतकरी वर्गास यंदाचे आर्थिक वर्ष तोटा देणारे ठरत आहे कमी पर्जन्यमानामुळे रब्बीला मोठा फटका बसल्यामुळे जिल्हाभरात गव्हाच्या व हरभऱ्याच्या पिकासह इतर नगदी पिकांच्या उत्पन्नात निम्म्याने घट होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या कृषी नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणुन नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, अलीकडच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील खरीप व रब्बी पिकाला फटका बसत आहे. त्यातच अवेळी आलेला पाऊस, अवकाळी, गारपीट व कमी झालेल्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. त्यामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते.

इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगामासाठी यंदा ४ हजार ८०२ हेक्टर सरासरी लागवडीसाठी गृहीत धरण्यात आले होते. मात्र, पाण्याअभावी अवघ्या २ हजार ४८० हेक्टरवर रब्बीच्या पिकांची लागवड झाली आहे. त्यातच तालुक्यात रब्बीत १,४५१ हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड होत असते. यंदा फक्त ९८५ हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने अवकृपा केल्याने रब्बी हंगामावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यात गव्हाची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात सरासरी ७६ हजार ८०० हेक्टर गव्हाचे क्षेत्र असतांना केवळ ३७ हजार ८७२ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झालेली आहे. त्याचबरोबर याच हंगामातील हरभऱ्याच्या बाबतीतही तीच गत आहे. ४१ हजार १०० हेक्टर क्षेत्र हरभऱ्यासाठी असूनही केवळ २६ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा गव्हाबरोबर आता हरभऱ्याचेही उत्पन्न घटणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ज्वारी व कांदा अव्वल यंदाच्या रब्बी हंगामात फक्त कांदा व ज्वारीने आघाडी घेतली असून, जिल्ह्यात यंदा १ लाख ३९ हजार ३९० हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे, तर १ लाख १९ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र, असे असूनही सर्वाधिक वाईट स्थिती ऊस पिकाची झाली आहे. यंदा फक्त ६ हजार २१२ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. इगतपुरी तालुक्यात फक्त ३३९ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची, तर अवघ्या ११८ हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेटी बचाव’ फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फसवणूक करणारे भामटे काय योजना आणून सर्वसामान्यांच्या ​खिशातील पैसे काढून घेतील, याचा नेम नाही. दुप्पट पैसे, जास्त व्याज अशा भंपक आमिषांना खूप जण बळी पडतात. याबाबत काही प्रमाणात जनजागृती होत असल्याने गुजरात राज्यातील भामट्यांनी एक नवी आयडीया लढवत शेकडो वाहनधारकांना गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. यातील एका संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

मयूर वाघेला (वय ३१, रा.भावनगर), भावेश धनाजी सुरवैया (रा.गुजरात), सुनील टाटिया, गोविंद पाटील (दोघे रा. नाशिक) अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. यातील वाघेलाला अंबड पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो पोलिस कोठडीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील चारचाकी वाहनांना 'बेटी बचाव, बेटी पढाव' असा संदेश लावलेले बॅनर दिसून येत होते. या बॅनरसंदर्भात करार करणे आणि त्याद्वारे वाहनधारकांना मोबादला देण्याचे काम लेखानगर परिसरातील साईलिला कार अॅडव्हरटायझिंग या शाखेमार्फत सुरू होते. सुरत येथे मुख्य शाखा असलेल्या कंपनीने काही महिन्यापूर्वी लेखानगरसह शहरात बऱ्याच ठिकाणी उपशाखा सुरू केल्या. या शाखेतील व्यक्ती परिचितांना आपल्या कारवर जाहिराती लावण्यास उद्युक्त करीत होते. याबाबत माहिती देताना अंबड पोलिस स्टेशनचे पीएसआय सुमेध सोनाने यांनी सांगितले की, पाच लाखपासून १० लाख रुपये किमतीच्या कारनुसार कंपनी मोबादला परत करणार होती. समजा साडेसात लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची कार असेल तर कंपनीच्यावतीने बेटी बचाव, बेटी पढाव किवा अशा तत्सम जाहिरात लावण्यासाठी देण्यात आल्या. महिन्याभरात एक वाहन जाहिरातीसह एक हजार किलोमीटर फिरले तर त्याला ९ ते १० हजार रुपयांचा परतावा मिळणार होता. कर्ज काढून वाहने घेणाऱ्या वाहनधारकांना कंपनीची ही ऑफर पसंत पडल्याने शेकडोच्या संख्येने वाहनधारक नोंदणी करण्यासाठी पुढे आले. लेखानगर येथील शाखेतच ९० वाहनधारकांची नोंदणी आहे. नोंदणीसाठी वाहनधारकाला कंपनीकडे सुरुवातीस पाच हजार रुपये रोख आणि ३१ हजार रुपयांचा धनादेश द्यावा लागला. दुसऱ्या महिन्यात पुन्हा ३१ हजार रुपयांचा धनादेश कंपनीने घेतला. अर्थात मोबादला म्हणून वाहनधारकास दोन महिन्यात अवघे १९ ते २० हजार रुपये मिळाले. प्रत्येक वाहनधारकांकडून साधारणतः ४० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे उकळून कंपनीने शटर बंद केले असल्याचे पीएसआय सोनाने यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात साक्ष नोंदवण्याचे काम सुरू आहे. फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी आपली तक्रार देण्यासाठी अंबड पोलिस स्टेशनशी संपर्क साधवा. हा घोटाळा मोठा असून तक्रारदारांनी पुढे येणे आवश्यक आहे.

- सुमेध सोनाने,

पीएसआय, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरसंख्येत चारपट वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील गावांची तहान वाढतच चालली असून, गवर्षापेक्षा यंदा फेब्रुवारी महिन्यातच टँकर्सच्या संख्येत चारपट वाढ झाली आहे. अनेक गावांचे प्रस्ताव दाखल असून, टँकर संख्येत आणखी वाढ होणार आहे.

दुष्काळी भागांना पाणी पुरविण्यासाठी सध्या ५१ टँकर्सच्या तब्बल १६८ फेऱ्या दररोज होत आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत केवळ १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यापेक्षा चारपट अधिक टॅँकर यंदा पुरवावे लागत असून, जुलै २०१६ पर्यंत तब्बल २७० टँकर्सची आवश्यकता भासू शकते, असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

पावसाने यंदा पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. नाशिक सर्वाधिक धरणांचा जिल्हा असला तरी यंदा बराचशी धरणे निम्मीही भरू शकलेली नाहीत. दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, दिवसेंदिवस गावोगावी फिरविल्या जाणाऱ्या टँकरच्या संख्येतही त्यामुळे वाढ होत आहे.

सिन्नर, येवला, नांदगाव आणि बागलाण, देवळा या तालुक्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या चारही तालुक्यांमध्ये ५८ गावे आणि १०१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. येवल्यात सर्वाधिक २१ गावांना तर सिन्नरमध्ये सर्वाधिक ५३ वाड्या आणि १० गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. बागलाण तालुक्यात १४ गावांना तर नांदगाव तालुक्यात ३३ वाड्या आणि सहा गावांमध्ये टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात एकूण आठ गावे आणि ६४ वाड्या अशा ७२ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यासाठी केवळ १३ टँकरची मदत घेण्यात येत होती. यंदा त्यामध्ये तब्बल चार पटीने वाढ झाली आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणाने गाठला तळ, आता पाणीकपात अटळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावल्याने येत्या काळात शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस उघडे पडणारे धरणातील जॅकवेल चॅनल यंदा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच उघडे झाले आहे. सोबतच धरणाच्या गेटचा तळही उघडा पडला आहे. शहराला नव्याने वाढीव पाणी उपलब्ध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे आता कपातीशिवाय कोणताही पर्याय महापालिका प्रशासनापुढे नाही. आज, शनिवारी (ता. २०) वाढीव कपातीची घोषणा केली जाणार असल्याचे समजते.

सध्या वाढवून दिलेल्या ३०० दशलक्ष घनफूट पाण्याव्यतिरिक्त नव्याने ३०० दशलक्ष घनफूट पाणी वाढवून मिळण्याची मागणी महापालिकेने केली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव पाण्याची मागणी फेटाळली असून, ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे बंधन आयुक्तांना घालण्यात आले आहे. सध्या महापालिकेकडून १५ टक्के पाणीकपात केली जात आहे. सध्याच्या १२.३५ दशलक्ष घनफूटने पाणीपुरवठा केल्यास हा साठा ५ जुलैपर्यंत पुरणारा आहे. त्यामुळे महापौरांनी तातडीने भाजप आमदारांसह सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक ११ फेब्रुवारीला बोलाविली होती. परंतु, या बैठकीत वाढीव पाणीकपातीला आमदारांनी विरोध केला होता. याच बैठकीत पालकमंत्र्यांनी गंगापूर धरणातून आणखी वाढीव ३०० दलघफू पाणी आरक्षित केल्याचे अधिकृत पत्र महापालिकेला दिले नसल्याचे समोर आले होते. हा प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पालिकेला वाढीव पाण्याचे पत्र पाठवून पाणीसाठी ३१ जुलैपर्यंत वापरण्याचे बंधन घातले आहे. उपलब्ध पाण्यात २५ दिवसांचा तुटवडा जाणवत आहे. तर धरणाने आताच तळ गाठला आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली असून, प्रशासनावरील पाणीकपातीचा दबाव वाढला आहे. महासभेने अगोदरच आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवसाची पाणीकपात लागू केली जाणार आहे. ही पाणीकपात विभागवार करायची, की जलकुंभनिहाय करायची याचा फैसला आज होणार आहे. आता राजकारण्यांचा दबाव सहन करायचा नाही, असा निर्धार प्रशासनाने केला आहे. शुक्रवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जंलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाणीसाठ्याचा निश्चित आकडा जाणून घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images