Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अखेर 'झूम' ४ मे ला

$
0
0
औद्योगिक समस्या, अडी-अडचणींसाठी महत्त्वाची असलेली जिल्हा उद्योग केंद्राची बैठक (झूम) येत्या चार मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. गेल्या महिन्यात १९ तारखेला ही बैठक झाल्यानंतर या महिन्यात ती होऊ शकलेली नाही.

रस्त्यावरील खडीमुळे दररोज होतायेत अपघात

$
0
0
द्वारका परिसरात उड्डाण पुलाच्या कामासाठी खडी आणली असून ही खडी रस्त्यावर पसरल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. या खडीमुळे पोलिस चौकीसमोर रोज अपघात घडत आहे.

सोमाणी गार्डनमध्ये पाण्याचा अपव्यय

$
0
0
नाशिकरोडच्या सोमाणी गार्डनमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या टाकीचे नळ खराब झाल्याने पाणी गळती सुरु आहे. प्रशासनाला याबाबत तक्रार करुनही प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

'एमटीसीडी'ही साकारणार वाइन पार्क

$
0
0
वाइन उद्योगातील क्षमता आणि पर्यटनाचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेही (एमटीडीसी) वाइन पार्क विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १० कोटी रुपये खर्चुन विविध सोयी-सुविधांनी युक्त असे हे पार्क विंचूर येथील वाइन पार्कमध्ये साकारले जाणार आहे.

वीजबिलांचे ऑनलाइन पेमेंटच बेस्ट!

$
0
0
महावितरणने सुरू केलेल्या ऑनलाइन वीजबिल भरण्याच्या सुविधेला नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षात नाशिकरांनी ऑनलाइन विजबिलांपोटी तब्बल ६७ कोटी रुपये जमा केले आहेत.

किरणा दुकानातील गुटखा जप्त

$
0
0
राज्यात बंदी असूनही गुटखाविक्रीचे काम शहरात बिनधोक सुरू आहे. अगदी छोट्या छोट्या पानटपरीत सर्रास विकला जाणारा गुटखा आता किरणा दुकानामध्येही मिळत असल्याचे मनपाच्या अन्न सुरक्षा अधिका-यांनी केलेल्या कारवाईदरम्यान उघडकीस आले आहे.

दहावीसाठी यंदापासून 'आयसीटी' अनिवार्य

$
0
0
दहावीच्या अभ्यासक्रमात कार्यानुभवामध्ये समाविष्ट केलेल्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) विषयाऐवजी विद्यार्थ्यांना आता इन्फर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी (आयसीटी) हा विषय अभ्यासावा लागणार आहे.

सेवामार्गातर्फे दुष्काळी भागाला २१ जलकुंभ

$
0
0
श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्लास्टिकच्या २१ टाक्या देण्यात आल्या. दुष्काळी भागासाठी सेवामार्गातर्फे दोन आठवड्यांपासून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्तांसाठी दीड लाखांची मदत

$
0
0
श्री दक्षिणमुखी हनुमान भक्त प्रतिष्ठानतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. प्रतिष्ठानने दुष्काळामुळे यंदाचा हनुमान जयंती उत्सवही साध्या पद्धतीने साजरा केला.

भूमिगत वीजतारांसाठी ५ कोटी मंजूर

$
0
0
ठिक‌ठिकाणी लटकणाऱ्या उघड्या वीजतारांमुळे होणारे अपघात, शहराला येणारे ओंगळवाणे रूप आता सटाणा शहरात तरी दिसणार नाही.

आसोदा येथे दंगलीनंतर शांतता

$
0
0
आसोदा येथे गुरुवारी रात्री दोन गटांत झालेल्या दंगलीनंतर शुक्रवारी आसोद्यात तणावपूर्ण शांतता होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चेक न वटल्याने वसाकाला नोटीस

$
0
0
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या जे. डी. पवार यांच्या संचालक मंडळाने ऊस लागवड व ठिबक सिंचन अनुदान वाटपासाठी साखर आयुक्तांची परवानगी नसतानाही २८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यातील एक कोटी ४७ लाख रुपयांच्या रकमेचे चेक जैन एरिगेशनला दिले आहेत.

घरफोड्यांतून दोन लाखांची लूट

$
0
0
शहरातील उपनगर, इंदिरानगर आणि भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोड्यांच्या वेगवेगळ्या तीन घटनांत चोरांनी तब्बल दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल चोरी केला.

मनमाड, येवल्याचा पाणीप्रश्न तीव्र होणार

$
0
0
जायकवाडी धरणात ४८ तासांत पाणी सोडण्याच्या हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशावर राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे.

राज्य बनले टँकरमय!

$
0
0
राज्यात दुष्काळाची स्थिती ‍भीषण असून दिवसेंदिवस टँकरच्या संख्येत वाढच होत आहे. नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या पाच जिल्ह्यांत भयानक स्थिती असून येथील ४०० गावांना तब्बल ४४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

रेल्वेचा १ कोटीचा दंड

$
0
0
अन्नधान्य साठवणुकीसाठी देशातील सर्वात जास्त क्षमतेचा असलेल्या मनमाडच्या अन्न महामंडळाला रेल्वेने गेल्या दहा महिन्यांत तब्बल एक कोटी १७ लाख ४० हजार १०० रुपये असा भूर्दंड आकारला आहे.

जलसंकट येणार?

$
0
0
जायकवाडी धरणात ४८ तासांत पाणी सोडण्याप्रश्नी औरंगाबाद हायकोर्टात राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने जलसंकट उद्‍भवण्याची चिन्हे आहेत.

शिवसैनिक आहात, हे लक्षात ठेवा!

$
0
0
'आपण विरोधक आहोत हे विसरू नका... जनतेच्या प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले पाहिजे... इथे तर आंदोलनेही होत नाहीत... तुम्ही एवढे शांत कसे? गट-तट विसरा... कामाला लागा, आपण शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवा'

पाणी पेटणार?

$
0
0
राज्य सरकारची पुनर्विलोकन याचिका औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळल्याने पाण्याचा पेच अधिकच गंभीर झाला असून यामुळे यादवी सदृश परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसच्या उच्चाटनाशिवाय देशाला भवितव्य नाही

$
0
0
महागाई, भ्रष्टाचार निर्मूलन, महिलांवरील अत्याचार, अंतर्गत व सीमेवरील आंतकवाद, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या आघाड्यांवर अपयश आल्यामुळे निवडणूक जिंकू शकत नाही, अशी खात्री झाल्यामुळे जात, पंथ आणि धर्म या आधारावर देशातील जनतेचे विभाजन करण्याचे तंत्र काँग्रेसने अवलंबिले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images