Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

घुमानला भरणार बहुभाषिक संमेलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या घुमान या कर्मभूमीत सरहद संस्थेतर्फे ३ व ४ एप्रिल रोजी बहुभाषिक राष्ट्रीय साहित्य संमेलनाची घोषणा कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्ताने करण्यात आली. विविध भारतीय भाषांचे होणारे हे संमेलन चांगलेच रंगणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी याच तारखांना हे संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिंपी समाज संस्थेचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांची निवड करण्यात आली.

गेल्या वर्षी झालेल्या घुमानमधील संमेलनाचा मान सरहद संस्थेकडे होता. संमेलनाचा सर्व अनुभव पाहता दरवर्षी घुमान येथे साहित्य संमेलन भरवून परंपरा टिकविण्याचे सरहद या सामाजिक संस्थेने ठरविले आहे. देशातील सर्व बहुभाषांचे संमेलन व्हावे, त्यासाठी मराठी भाषेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ख्यातनाम कवी गुलजार यांनी केले होते. कवी गुलजार यांच्या आवाहनानुसार सरहद संस्थेने पुढाकार घेतला असून, घुमान येथे होणाऱ्या संमेलनात गुलजार यांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. गरेश देवी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. मराठीनेच पुढाकार घ्यायला हवा त्या दृष्टीने हे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पडण्यासाठी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार व भारत देसडला, संजय भारद्वाज हे प्रयत्नशील असून या संमेलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निसाका’ चालविण्यास ओबेराॅय यांची तयारी

0
0

निफाड : बॉम्बे एस. मोटर्सच्या सत्पालसिंग ओबेरॉय यांनी निसाका कार्यस्थळावर कामगारांसोबत बैठक घेऊन निसाका चालवायला घेण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट केले.

ओबेरॉय यांनी नाशिक जिल्हा बँकेला थकीत कर्जाप्रति ४ फेब्रुवारीला दिलेला एक कोटी रुपयांचा धनादेश वटला नाही. विक्रीकर विभागाने निसाकाकडील ४७.८० कोटी विक्रीकराच्या वसुलीसाठी १५ मार्चला कारखाना चलअचल मालमत्तेची विक्री करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अशा परिस्थितीत एक कोटींच्या रकमेची सुरक्षिता काय? या कारणास्तव आपण स्टॉप पमेंटची सूचना केली असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवण बंदचा व्यापाऱ्यांचा इशारा

0
0

कळवण : शहरातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाविरोधात कळवण व्यापारी महासंघाच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. स्थलांतरास विरोध दर्शवत निर्णय तत्काळ रद्द न केल्यास येत्या ३ मार्चला कळवण बंद ठेवण्याचा इशाराही उपस्थित व्यापारी बांधवांनी शासकीय यंत्रणेला दिला आहे.

कळवण शहरातील सर्वच कार्यालय एका छत्रछायेखाली यावेत, या हेतूने शासनाने कोल्हापूर फाटा येथे इमारत बांधली. आता अचानक १५ मार्चपर्यंत सर्व कार्यालय स्थलांतरीत करण्याचा फतवा काढला गेल्याने व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाची माहिती होताच व्यापारी महासंघाची तातडीची बैठक अध्यक्ष मोहनलाल संचेती, महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष विलास शिरोरे यांच्या उपस्थितीत वाणी मंगल कार्यालयात पार पडली. बैठकीला रवींद्र देवरे, दीपक महाजन यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक-पालकांनी करावी पुस्तकांची चिकित्सा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता पाठ्यपुस्तकांची चिकित्सा करावी, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांनी दिला. इंडिपेंडन्ट सेकंडरी अॅण्ड हायर सेकंडरी टीचर्स युनियनचा दुसरा वर्धापन दिन पंचवटी येथील पंडित दिंगबर पलुस्कर सभागृहात साजरा झाला. या निमित्ताने आयोजित शिक्षक प्रशिक्षण शिबिरात दरक बोलत होते.

दरक म्हणाले की, पाठ्यपुस्तकांतील आशय दोन प्रकारचा असतो. `उघड` आशय आपल्याला कळतो. मात्र, `छुपा` आशय हा नेहमी विद्यार्थी व शिक्षकांची सृजनशीलता मारणारा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व भावनिक विकास होत नाही. प्रशिक्षण शिबिरानंतर दरक यांनी जिल्हाभरातून आलेले पालक व शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. दुसऱ्या सत्रात भाऊसाहेब चासकर, राहुल गवारे आणि किशोर दरक यांनी शिक्षण आनंददायी होण्यासाठी शिक्षकांनी स्वतःबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण कौशल्य वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. युनियनचे राज्याध्याक्ष रोहित गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. सूर्यभान जगताप यांनी संघटनेचा परिचय करून दिला. किशोर शार्दूल व रवींद्र बगाव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी बागुल, व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी एन. जे. खंडारे, इंडिपेंडन्ट लेबर युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव, डॉ. संजय जाधव, अॅड. अशोक बनसोडे, प्रा. गंगाधर अहिरे आदींसह शिक्षक, मुख्याध्यापक व पालकवर्ग उपस्थित होता. या वेळी शिक्षक व पालकांना मार्गदर्शक ठरणारा सिक्खापद हा रोहित गांगुर्डे यांनी संपादित केलेला विशेषांकही प्रकाशित करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीची टांगती तलवार

0
0

बजेटमध्ये दीड कोटीची शिल्लक दाखविली असून गेल्या वर्षापेक्षा तब्बल ७९ कोटींनी ते घटले आहे. बजेटमध्ये नव्या योजनांचा मोह टाळून आहे त्या योजना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. पुढील वर्षी महापालिका निवडणूक असतांनाही भांडवली कामांसाठी केवळ ४९६ कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, प्रशासनाने ई-गव्हर्नन्सकडून मोबाईल गव्हर्नन्सकडे वाटचाल सुरू केली आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने डॉ. गेडाम यांनी गत वर्षीच्या बजेटलाही ब्रेक लावत, २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे नियोजित १३५७.९६ कोटींचे वार्षिक बजेट शुक्रवारी सादर केले. बजेटमध्ये ९६४ कोटींचे उत्पन्न दाखविले आहे. या अंदाजपत्रकात खर्च १३५६ कोटी ५५ लाख दाखवण्यात आला आहे. महसूली जमा १३५७ कोटी ९६ लाख रुपये दाखवण्यात आले आहेत. एक कोटी ४१ लाख रुपये शिल्लक दाखविली आहे. गतवर्षी १४३७ कोटींचे बजेट होते. त्यात ७९ कोटींची घट झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात ११३८ कोटी खर्चाचा अंदाज आहे. एलबीटी धोरणात झालेला बदल आणि शासकीय अनुदांना कात्री लागल्याने या वर्षी बजेट घटले आहे.

नव्या योजनांना खो बजेटमध्ये कोणत्याही नव्या योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. जुन्याच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आहे. महापालिकेकडे उत्पन्नाचे साधने कमी झाल्याचे सांगत बजेट वास्तववादी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर सरकारकडून एलबीटी रुपाने जादा प्राप्त होणारी अंदाजे रक्कम रुपये ६९ कोटी पुढील वर्षी सरकाराला परत करावे लागण्याची शक्यता आहे.

भांडवली खर्चाला ब्रेक बजेटमध्ये महसूली खर्च ७८३ कोटी ८३ लाख तर भांडवली खर्च ४९६ कोटी दाखविला आहे. पुढील वर्षी महापालिका निवडणूक आहे. त्यामुळे विकासकामे मोठ्या प्रमाणावर असतील. मात्र, उत्पन्नाअभावी तिजोरीत खळखळाट असल्याने विकासकामांना निधी कसा मिळणार असा सवाल प्रशासनाने केला आहे. त्यातच ४९६ कोटीमधून १७७ कोटीचे दायित्व राहील. विकासकामांसाठी ३२० कोटी रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी व प्रशासन संघर्ष उदभवण्याची शक्यता आहे.

महिलांसाठी प्रसाधन गृह हाय कोर्टाच्या निर्देशानुसार महिलांसाठी ११९ ठिकाणी प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहे. पुरुषांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. यासांठी सुमारे ५.७८ कोटी खर्च येणार आहे. तसेच सीएसआर अंतर्गत खाजगी संस्था वा कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांना देखील प्रसाधनगृहे बांधणेस अनुमती देण्यात येणार आहे.

फेरीवाला धोरण महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, फेरीवाल्यांची बायोमेट्रीक पध्दतीने नोंदणी करणे, फेरीवाल्यांना ओळखपत्रे देणे या अनुषंगाने शहर फेरीवाला समितीच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे. अस्तित्वातील फेरीवाल्यांना जागा नेमूण देण्यासाठी जागांची आखणी करण्याचे काम सुरू आहे.

सोमवारी होणार निर्णय महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे आयुक्तांनी करवाढीचा स्वतंत्र प्रस्ताव सादर केला आहे. त्यात घरपट्टीत सरासरी १४ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. त्यात सर्वसाधारण करात ५ टक्के तर इतर करांमध्ये ९ टक्के असे एकूण १४ टक्के वाढ आहे. महापालिकेत पाणीपट्टीचा प्रतिहजार लिटर पाच रुपये असलेला दर तीन वर्षात आठ रुपयांपर्यंत जाणार आहे. तर बिगर घरगुती पाणीपट्टी प्रतीहजार लिटर २२ रुपयांवरून ३० रुपयांपर्यत नेला जाणार आहे. व्यावसायिक वापरासाठी पाणीपट्टी प्रतिहजार लिटर २७ वरून ४० रुपयांपर्यंत नेली जाणार आहे. येत्या तीन वर्षात पाणीपट्टीत ५० टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे नाशिककरांवर अतिरिक्त करभार पडेल. आयुक्तांच्या प्रस्तावावर सोमवारी निर्णय होईल.

ऑनलाइन सवलत सोलर वॉटर हिटरचा वापर केल्यास मालमत्ता करात ५ टक्के सूट देण्यात येत आहे. ई-पेमेटद्वारे कर भरणाऱ्यांना सूट दिली असून, मालमत्ता करासाठी १ टक्का व ५०० रुपयांपर्यंत पाणीपट्टीसाठी अर्धा टक्का व कमाल १०० रुपये राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार

0
0

मागील महिन्यात ८ तारखेला नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयात या विद्यार्थ्यांनी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मोर्चा नेला होता. यावेळी १७ जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी दिले. मात्र, या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने विद्यार्थी अजुनही वसतिगृह व आश्रमशाळांमधील प्राथमिक सुविधांपासूनही वंचित आहेत. सुविधांसाठी तरतूद असतानाही ती मिळत नाही; मग ही रक्कम जाते कुठे, असा खडा सवालही या विद्यार्थ्यांनी येथे उपस्थित केला. या समस्या लवकर सोडविल्या

नाहीत तर राज्यभर सर्व आदिवासी विद्यार्थी एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

३ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत बिघाड भर उन्हात नंदुरबारवरून पायी आलेल्या या विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थ्यांच्या प्रकृती बिघडली. थंडी, ताप यामुळे बेशुद्ध पडतील, अशी परिस्थिती आदिवासी कार्यालयात निर्माण झाली होती. या विद्यार्थ्यांची अवस्था पाहता उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये तपासणीस नेले.

अनेकदा आमच्या मागण्या सनदशीर मागाने मांडल्या आहेत. पण आश्वासन देण्याशिवाय कोणतीही दखल अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. आश्वासन पूर्तीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही पुन्हा अायुक्तालयात आलो आहोत. - तापसिंग पाडवी, विद्यार्थी

अशा आहेत मागण्या शैक्षणिक, विज्ञान साहित्य पुरवावे ग्रंथालय उपलब्ध करून देणे स्पर्धा परीक्षांसाठी अभ्याससाहित्य देणे कॉम्प्युटर्स व टीव्हीची सुविधा द्यावी पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावे वसतिगृह, आश्रमशाळेत पुरेसे कर्मचारी, गणवेश उपलब्ध करून देणे क्रीडा साहित्य व क्रीडा शिक्षक द्यावेत निर्वाह भत्ता वेळेवर उपलब्ध करून देणे महिन्यातून एकदा प्रकल्प अधिकाऱ्यांनी वसतिगृहास भेट द्यावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाटप्रश्नी सरकार हलले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात दीड वर्षापासून वादात सापडलेल्या कपाट प्रश्‍नाची कोडी फुटण्याची शक्यता आहे. क्रेडाई व आर्किटेक्ट असोसिएशनच्या मागणीनुसार अखेर राज्य सरकारने कपाटे अधिकृत करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अशा प्रकरणांची संख्या जाणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कपाट प्रकरणांची संख्या कळविण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत.

शहरातील अनेक बिल्डरांनी इमारतीचे बांधकाम करताना फ्री ऑफ एफएसआयच्या क्षेत्रातच कपाटाऐवजी जास्तीचे बांधकाम करून ते ग्राहकांना विक्री केले आहे. मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विजय शेंडे यांनी गंभीर दखल घेत, अशा बांधकाम परवानग्या थांबवलेल्या आहेत. त्यामुळे अडीच हजार इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. यामुळे बांधकाम व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडलेच; शिवाय ग्राहकांनाही आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशन यांच्यासह आमदारांनी कपाट क्षेत्राचे बांधकाम नियमित करुन द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

कपाट्याच्या प्रकरणांची संख्या किती आहे, त्याची नेमकी माहिती सादर करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सदर विषय शासनाकडे विचाराधिन व प्रलंबित आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी शासनाला अशा प्रकरणांची संख्या कळवायची आहे. सदर तरतुदींचे उल्लंघन करून चटई क्षेत्र निर्देशांक व सामासिक अंतर याबाबत उल्लंघन केलेल्या प्रकरणांची नावे व इतर माहिती नगररचनाला कळवायची आहेत.

कपाट प्रकरणी बांधकाम परवानग्या रखडलेल्या प्रकरणांची संख्या किती आहे, हे शासनाला कळवायचे आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी तातडीने अर्ज करावेत, जेणेकरून शासनाला लवकर निर्णय घेता येईल.

डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारतीय ब्रँड विकसित करावा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ‌

उच्च तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगाद्वारे कमी खर्चात सर्वांना परवडेल, असा भारतीय ब्रँड विकसित व्हायला हवा. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न केल्यास हे शक्य असल्याचा विश्वास राज्य सरकारच्या राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

नाशिक डिस्ट्रीक्ट इनोव्हेशन काऊन्सिल, कुंभथॉन आणि नाशिक इंजिनीयरिंग क्लस्टर यांच्या वतीने शनिवारी इनोव्हेशन डे साजरा करण्यात आला. अंबड येथील इंजिनीयरिंग क्लस्टरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला काकोडकर यांच्यासह टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष हसित काझी, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक इंजिनीयरिंग क्लसटरचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार आदी उपस्थित होते.

यावेळी काकोडकर म्हणाले, की कृषी क्षेत्रासाठी उन्नत तंत्रज्ञानाची गरज असून नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणे शक्य आहे. जगातील बऱ्याच नाविन्यपूर्ण कल्पनांचे मूळ भारतात आढळते. अशा कल्पनांना उत्तम संधीत रुपांतरीत करून चांगले उत्पादन करणे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रासमोरील आव्हान आहे. आपल्याकडे युवकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडे बुध्दीमत्ता आहे. बौद्धीक क्षमतेचा उपयोग नाविन्यपूर्ण कल्पनांना चांगल्या उत्पादनात परिवर्तीत करण्यासाठी करून घेणे गरजेचे आहे.

कुशवाह म्हणाले, की जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देणे, नव्या संशोधकांना सहकार्य करणे, शाळा-कॉलेजात‌ील स्पर्धांच्या माध्यमातून नव्या कल्पना समोर आणणे हा आमचा उद्देश आहे. कृषी क्षेत्रात चांगले प्रयोग होत असून परिषदेच्या माध्यमातून ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.
विज्ञान प्रदर्शनात प्रयोगांचे सादरीकरण

'इनोव्हेशन डे'च्या निमित्ताने येथे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामध्ये केवळ शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांनी प्रयोगांचे सादकरीकरण केले. नाशिकमधीलच नव्हे तर राज्यातील उत्कृष्ट प्रयोग तेथे मांडण्यात आले. त्यामध्ये वॉटर सेव्हिंग शॉवर, सिलिंडरमधील एलपीजी गॅसची गळती रोखणारी अलर्ट सिस्टम, चोराच्या घटना टाळणारी आधुनिक तिजोरी, केआरआरवायपी गारबेज सिस्टम, झाडांना आपोआप पुरेसे पाणी पुरविणारी प्रणाली, स्मार्ट शेती प्रकल्प, सायकलद्वारे लोणी घुसळणारी यंत्रणा यांसारखे अनेक प्रयोग सादर करण्यात आले.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहू खैरेंचे पक्षालाच आव्हान

0
0

लक्ष्मण जायभावेंना डावलले; स्थायीसाठी स्वतःचेच नाव रेटले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीत काँग्रेस गटनेत्यांनीच पक्षाला आव्हान दिले आहे. स्थायी सदस्य निवडीत पक्षाने लक्ष्मण जायभावे यांचे नाव दिले असतांना गटनेते शाहू खैरे यांनी पक्षाचा आदेश डावलत स्वतःचे नाव पुढे सरकविले. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळी उफाळून आली आहे. गटनेताच फुटल्याने पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, शुक्रवारी स्थायी समितीच्या सात सदस्यांची निवड झाली. यात शिवेसना भाजपने प्रस्थापित इच्छुकांना धक्का दिला आहे.

स्थायी समिती आठ सदस्यांसाठी शुक्रवारी विशेष महासभा झाली. त्यास गटनेत्यांकडून पक्ष सदस्यांची नावे महापौरांकडे पाकिटबंद स्वरुपात देण्यात आली. त्यात शिवसेनेकडून मनीषा हेकरे, मंगला आढाव, प्रकाश लोंढे यांचे तर भाजपच्या वतीने दिनकर पाटील, फुलाबाई बोडके, काँग्रेसकडून शाहू खैरे आणि अपक्षांच्या वतीने रशिदा शेख यांची निवड झाली आहे. तर मनसेचे एक सदस्याचे नाव नंतर जाहीर केले जाणार आहे.

काँग्रेसमध्ये शाहू खैरे यांच्यासह लक्ष्मण जायभावे, उत्तमराव कांबळे इच्छुक होते. मात्र, पक्षाने जायभावे यांचे नाव स्थायी समितीसाठी पाठवले. गटनेता खैरे यांनी जायभावेंऐवजी स्वतःचे नावा सदस्यपदासाठी दिले. त्यामुळे महापौरांनी खैरे यांच्या नावाची घोषणा केली. खैरे पक्षादेश डावलणार याची कल्पना शहराध्यक्ष शरद आहेर यांना होती. त्यामुळे त्यांनी सभेआधीच खैरेंची मनधरणी सुरू केली होती. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे पक्षानेही खैरेंच्या या बंडाळीची गंभीर दखल घेत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


शिवसेना-भाजपचे धक्कातंत्र

स्थायी समितीसाठी शिवसेनेकडून हर्षा बडगुजर, विनायक पांडे अशी बडी मंडळी इच्छूक होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलून मंगला आढाव, मनीषा हेकेरे यांना संधी दिली. तर भाजपनेही अनपेक्षिकरित्या गटनेते संभाजी मोरुस्कर ऐवजी दिनकर पाटील यांना संधी दिली. पाटील यांचे पक्षाकडून प्रमोशन करण्यात आले आहे. आतापर्यंत पद न मिळालेल्या फुलाबाई बोडके यांना संधी देवून पक्षाने त्यांनाही न्याय दिला आहे.


खैरे यांच्या बंडाळीची पक्षाने गंभीर दखल घेतली असून प्रदेशाध्यक्षांनी घटनेचे अहवाल मागितला आहे. गटनेत्यानेच पक्षाचा आदेश झुगारला असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. शनिवारी प्रदेशाध्यक्षांना याचा सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे.

- शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

स्थानिक पातळीवर नावासंदर्भात कोणालाही विश्वासात घेतले नाही. आतापर्यंत पक्ष निरीक्षक पाठवून निर्णय घेतला जाई. परंतु, परस्पर निर्णय घेवून पक्षाने थेट महापौरांनाच पत्र पाठविले. स्थानिक पातळीवर निर्णय घेवू द्यायला हवा होता.
- शाहू खैरे, गटनेता, काँग्रेस


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोवतालचे प्रश्न मांडणाऱ्या एकांकिका...

0
0

प्रा. डॉ. विवेक खरे
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे मागील वर्षभरात विविध नाट्य तसेच एकांकिका स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळविलेल्या राज्यातील सर्वोत्तम सहा एकांकिकांचा महोत्सव राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये मागील दोन दिवसांपूर्वीच या महोत्सवातील एकांकिका बघण्याचा आनंद घेता आला.

मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, औरंगाबाद आणि नागपूर येथील तरुण नाट्यकर्मींनी निर्माण केलेल्या या एकांकिका विषय-आशय आणि सादरीकरण या सर्वच बाबतीत आपले वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या होत्या. मानव आणि मानवाच्या सामाजिक पर्यावरणातील विविध प्रश्नांचे दर्शन त्यातून घडविण्याचा स्तुत्य प्रयत्न तरुण नाट्यकर्मी गंभीरपणे करू पाहत आहेत हे आशादायक चित्र आहे.

मागील ३०-३५ वर्षांत मराठी नाट्यवाङमयात 'एकांकिका' या नाट्य प्रकाराने मोलाची भर घातली आहे. कलात्मकता आणि प्रयोगशीलता यामुळे हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीवर सर्वस्वी वेगळा ठरला आहे. एकांकिका हा नाटकासारखाच पण स्वतःच स्वतंत्र अस्तित्व असणारा असा वाङमय प्रकार आहे. एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक असे म्हणता येते, पण ती एक अंकी जरी असली तरी तिच्या त्या एका अंकामध्ये संपूर्णतः आणि स्वयंपूर्णतः असते. एखादी घटना, एखादी स्थिती किंवा एखाद्या घटनेचा एक भाग तिच्यात सादर करता येतो. एकेरी कथानक, पात्रांची मर्यादित संख्या, कमीत कमी कालावधीत साधलेली आशयघनता, विषयाचे वेगळेपण, संवाद आणि संवादभाषेतील सामर्थ्य अशी तिची गुण वैशिष्ट्ये असतात. विजय तेंडूलकर, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवार, पु. ल. देशपांडे, सतीश आळेकर, चं. प्र. देशपांडे, प्रेमानंद गज्वी अशा मराठी साहित्यातील दिग्गज नाट्यलेखकांनी एकांकिका या नाट्यप्रकाराला उंचीवर नेऊन ठेवले. मध्यमवर्गीय जाणिवांचे विषय, आशय विभिन्नता, शैलीची विविधता, प्रयोग तंत्रातील नाविन्यता अशा वैशिष्ट्यांनी मराठी एकांकिकांचे दालन या सर्वांनीच समृद्ध करून नवीन लेखक, दिग्दर्शक यांच्यासाठी एक सुपीक जमीन तयार करून ठेवली.

महाराष्ट्रात आज घडीला एकांकिकांच्या विविध स्पर्धा आयोजित होत आहेत. पुरुषोत्तम करंडक, सवाई महोत्सव, झी गौरव, लोकसत्ता लोकांकिका, पु. ल. करंडक, आय. एन. टी. इत्यादी स्पर्धांना

विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये या सर्व स्पर्धांमधून भाग घेण्याची व बक्षिस मिळविण्याची कायम चुरस असते. मागील काही वर्षांपासून महाविद्यालयीन तसेच विविध नाट्य संस्थांतर्फे सादर होणाऱ्या या स्पर्धांमधील एकांकिका रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊ लागल्याचे दिसते. सर्वोत्तम एकांकिका या उपक्रमातील एकांकिकाही याला अपवाद नव्हत्या.

वर्तमान स्थितीत मानवी समाज असंख्य प्रश्नांनी बेजार झालेला आहे. बेरोजगारी, आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, स्त्रीभ्रूण हत्या, महिलांचे शोषण, भ्रष्टाचार, हरवत चाललेली माणुसकी, माणसाचे आत्मकेंद्री होत शतखंडीत जगणे, दहशतवाद, अस्थिर जगण्याचे सतत मनावर असलेले सावट, विचारांची घुसळण, जागतिकीकरणाच्या रेट्यातून निर्माण झालेले प्रश्न तसेच मानवी वर्तणुकीतून निर्माण झालेले प्रश्न या सर्वांतून येणारी हतबलता, निराशा एकीकडे जोर धरत आहे, तर दुसरीकडे या सगळ्यांतून वाट काढीत, संघर्ष करीत जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती बाळगत माणूस करीत असलेले जीवनक्रमण असे दुहेरी वास्तव आपल्याला बघायला मिळते आहे. साहित्य, कला या मधूनही हे सगळं जिवंत होतांना दिसते आहे. भवतालाच्या या अस्वस्थ परिस्थितीचा वेध कलावंत घेऊ पाहतो आहे. कथा, कविता, नाटक, एकांकिका यांच्यामधून त्याचे हे प्रश्न मांडणे तसेच भवतालच्या समस्यांचा शोध घेणे चालूच आहे. सर्वोत्तम एकांकिकांमधूनही असाच तो घेण्याचा प्रयत्न केला गेलाय असे वाटते.

या महोत्सवात सादर झालेली 'जून जुलै' ही एकांकिका एचआयव्ही बाधित तरुण तरुणीच्या भावविश्वाचा उलगडा करणारी एकांकिका आहे. कोणाच्यातरी चुकीमुळे एड्स या भयानक रोगाला सामोरे जावे लागणारे हे दोघेजण जगण्याची जिद्द मात्र कायम ठेवतांना दिसतात. एकमेकांशी लग्न करून मरेपर्यंत तरी आधार होऊ या, असा आशावादी सूर व्यक्त करतात. प्रतिकात्मक शीर्षक, प्रभावी आणि मार्मिक संवादाद्वारे ही एकांकिका प्रेक्षकांबरोबरच संपूर्ण समाजाने एचआयव्ही बाधितांकडे तुच्छतेने नव्हे तर प्रेमाने बघायला सांगते. 'ड्रायव्हर' ही एकांकिका आयुष्यात संघर्ष करीत नवीन स्वप्न पाहणाऱ्या ड्रायव्हरची कथा सांगते. सरकारी नोकरी मिळवायची पण त्यासाठी दहावीची परीक्षा पास होण्याची जिद्द मनाशी बाळगणारा ड्रायव्हर बायको आणि मुलीच्या स्वप्नासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो, पण अपयश पदरात पडल्यावर निराश होतो. 'विश्वनटी' ही एकांकिका स्त्रीप्रश्नांची चर्चा करते. शरीर विकणारी वेश्या, तिची शिक्षण घेऊ पाहणारी मुलगी, समाजाचा त्या दोघींकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रेमाची फूस लावून शरीरसुख घेणारी पुरुषी मानसिकता आणि त्यातून त्या स्रीला राहिलेला गर्भ आपला नाहीच, असे सांगणारी दांभिकता अशा अनेक अंगाने ही एकांकिका स्त्रीच्या हालअपेष्टांचे, तिच्यावरील अनन्वित अत्याचाराचे वर्णन करते. काव्यात्मकतेने स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडत जाते. 'भक्षक' ही एकांकिका पर्यावरण संदेश देणारी आहे. वन्य प्राणी, त्यांचे नष्ट होणारे निवारे, त्यातून त्यांचे मानवी वस्तीत होणारे आगमन, त्यामुळे माणसांचेही धोक्यात आलेले जीवन, शहरांचा विकास, औद्योगिकीकरण, भुईसपाट होणारी जंगले, प्राणी तर प्राणी पण माणसांच्याही जीवन मरणाचा निर्माण झालेला प्रश्न ही एकांकिका मांडते. 'दृष्टी' ही अनंत सामंत यांच्या कथेवर आधारित एकांकिका दृष्टीहीनांचे प्रश्न, त्यांचा जगण्यासाठी चाललेली धडपड, दृष्टीच्या पलीकडील सृष्टीकडे सकारात्मकरित्या बघण्याची मानवाची गरज अधोरेखित करते. 'कस्टमर केअर' ही नाशिकच्या नाट्यकर्मींची एकांकिका माणसातील हरवत चाललेल्या संवेदनशीलतेवर भाष्य करते. शेतकऱ्याचे दु:ख, कॉल सेंटरवर लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या तरुणीचे दु:ख यांचा उलगडा करते.

या सर्वच एकांकिका वयाने तरुण असणाऱ्या लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी निर्माण केलेल्या आहेत. आशावाद हा त्यांचा स्थायीभाव आहे. आजचा तरुण हा समाजातील प्रश्नांबाबत सजग असलेला दिसतो. आपल्या भोवताली घडणाऱ्या घटना घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण ही तरुण पिढी करीत आहे. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्य निर्मिती आणि सादरीकरणातून प्रकर्षाने पुढे येते.

नवनवीन अचाट कल्पना वापरून, वास्तवाची त्याला जोड देऊन आपले म्हणणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अर्थात यात ते सर्वस्वी यशश्वी होत आहेत हा भाग जरी गौण असला तर कलेच्या माध्यमातून ते सातत्याने काहीतरी करीत आहेत हेही नसे थोडके!

(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामबंद आंदोलनामुळे ‘महसूल’मध्ये शुकशुकाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महसूल विभागाशी संबंधित बरेचसे कामकाज ठप्प झाले.

अवैध गौण खनिज वाहतुकीवर राज्यभर कारवाया सुरू आहेत. मात्र, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या वाळू माफियांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होऊ लागले आहेत. गुरुवारी इंदापूर येथे तहसील कार्यालयातील वाहनचालक काळे यांना तवेरा वाहनाखाली चिरडून ठार करण्यात आले. वाशिम येथे नायब तहसीलदार राहुल वानखेडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आता त्याआधी २३ फेब्रुवारीला मालेगाव तालुक्यातील तलाठी अरुण दाढे, पी. डी. खैरनार, नारायण गायके हे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी जात असताना एमएसजी कॉलेजजवळ मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाने त्यांना धडक दिली. हे तीनही तलाठी जखमी झाले असून, हल्ला करणारे वाळू माफियांचे हस्तक असल्याचा दावा महसूल कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निषेध सभा घेतली. उत्तर महाराष्ट्र राजपत्रीत अधिकारी महासंघ, नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा तलाठी संघ, जिल्हा वाहन चालक संघटना, चतुर्थ महसूल कर्मचारी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची नासाडी पडणार महागात

0
0

महापालिका ठोठावणार आर्थिक दंड; कनेक्शन खंडित करण्याचीही तरतूद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात दिवसेंदिवस पाणीबाणीची स्थिती गंभीर होत चालली असून, ३१ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन आता कठोर पावले उचलत आहे. विशेषतः टंचाईतही पाण्याची नासाडी व बेजबाबदारपणे पाण्याचा वापर करणाऱ्यांवर मोठा आर्थिक दंड ठोठावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.

सिंगल कनेक्शनधारकाने पाण्याची नासाडी केल्यास त्याला जागेवरच दोन हजार ते पाच हजार रुपये दंडाची तरतूद होणार आहे. सोसायटीसाठी ८ ते २० हजार आणि व्यावसायिक वापर धारकाला १२ ते ३० हजार रुपये दंड केला जाणार आहे. स्थायी समितीवर हा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून, दोनदा दंड झाल्यानंतर तिसऱ्यांदा थेट पाणीकनेक्शन बंद केले जाणार आहे.

गंगापूर धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी आता दोन दिवस पाणीकपात करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासंदर्भात स्थायी समितीत चर्चा झाली असून, सदस्यांनीही कपातीची तयारी दर्शवली आहे. तसेच, पाण्याची नासाडी करणाऱ्यांचीही गय केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. प्रशासनाने पाण्याची नासाडी व बेजबाबदारपणे वापर करणाऱ्यांसाठी मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद प्रस्तावित केली आहे. घरगुती कनेक्शनधारक पाण्याची नासाडी करताना आढळला तर प्रथम दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असून, दंड भरेपर्यंत नळकनेक्शन बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, दुसऱ्यांदा आढळला तर त्याला पाच हजार रुपये दंड केला जाईल. तरीही नासाडी सुरूच ठेवली तर नळकनेक्शन कायमचे खंडित केले जाणार आहे. सोसायटीमध्ये पाण्याची नासाडी झाल्यास प्रथम आठ हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे. दुसऱ्यांदा पाण्याची नासाडी आढळली तर २० हजार रुपये दंड ठोठावला जाईल. तिसऱ्यांदा थेट नळकनेक्शन खंडित केले जाईल. व्यावसायिक व्यापारधारकालाही हाच निकष असून, प्रथम १२ हजार तर दुसऱ्यांदा ३० हजार रुपये दंड आकारला जाईल. तसेच तिसऱ्यांदा नासाडी आढळली तर थेट नळकनेक्शन खंडित केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

स्थायी समितीवर हा प्रस्ताव ठेवला जाणार असून, तो मंजूर झाल्यास नागरिकांवर कडक कारवाई होणार आहे. महापालिका यासाठी पथक तयार करणार असून, पथकामार्फत थेट कारवाई केली जाणार आहे. स्थायी समितीने आयुक्तांचा हा प्रस्ताव सकारात्मक घेतला असून, सोमवारी हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे

आयुक्तही मैदानात

पाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेता आता महापौरांपाठोपाठ आयुक्त डॉ. प्रवीण गेडामही मैदानात उतरले आहेत. डॉ. गेडाम यांनी शुक्रवारी लेखानगर व इंदिरानगरमध्ये पाणीपुरवठ्याचा अंदाज घेतला. नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांनी पाण्याचा दाब तपासून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच, नागरिकांना पाणीबचतीबाबत जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. अधिकारी व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या.

अभियंत्याच्या हातात कपात

स्थायी समितीत सदस्यांनी एकवेळ पाणी द्या, पण ते पूर्ण दबावाने करण्याची मागणी केली. अपूर्ण पाणीपुरवठ्यामुळे पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. त्यामुळे शेवटच्या भागात पाणीच पोहचत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. वाटल्यास अजून एक दिवस कपात वाढवा, अशी सूचना केली. त्यावर आयुक्तांनी वाढीव कपातीचा निर्णय हे पाणीपुरवठा विभागातील तांत्रिक अधिकारी घेतली. पाणीपुरवठ्याची त्यांना जास्त माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर हा निर्णय सोपविला असून, त्यांच्या अहवालानंतर पुढील कपातीचा निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याची आवाई; चोरट्यांची धुलाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिडके कॉलनीतील एका बंद बंगल्याच्या आवारात शिरलेल्या दोघा गर्दुल्यांना पकडून नागरिकांनी अद्दल घडवली. या दोघांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या गर्दुल्यांना नागरिक पकडत असताना एकच गलका उठला. यात कोणीतरी बिबट्या घुसला असल्याची अफवा उठवल्याने यंत्रणेची दमछाक झाली.

तिडके कॉलनीतील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राजवळ एका बंद बंगल्याच्या आवारात दोन गर्दुले संशयास्पदरितीने घुसले असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ या दोघांना पकडून त्यांची यथेच्छ धुलाई केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई नाका पोलिसांच्या एका पथकाने लागलीच धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले. याबाबात माहिती देताना सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले की, संशयित आरोपी सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. हे दोघे गर्दुले असून, या बंगल्याच्या आवारात का शिरले याचा तपासादरम्यान उलगडा होईल. नागरिकांनी अशाच पध्दतीने सतर्क राहून पोलिसांना मदत करण्याचे आवाहन भु​जबळ यांनी केले.

दरम्यान, या संशयितांना पकडले जात असताना नागरिकांची एकच गर्दी झाली. त्यात कोणीतरी बंगल्यात बिबट्या शिरल्याची अफवा पसरवल्याने याबाबत व्हॉटस अॅपसह वेगवेगळ्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोकाच्या शिलालेखांची राजकुमारीवर मोहिनी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बौद्ध धर्मामध्ये विशेष महत्त्व असलेल्या माघ पौर्णिमेचे औचित्य साधत बिहारच्या राजगीर येथील वेळूवनातील सोहळ्यात थायलंडच्या राजकुमारी बज्रकितिभ्य यांना नाशिककरांकडून अनोखी भेट देण्यात आली. नाशिकच्या ट्र‌िबिल्स संस्थेतर्फे त्यांना सम्राट अशोकाच्या गिरनार (गुजरात) येथील पहिल्या शिलालेखाचे हस्तलिखित भेट देण्यात आले.

नाशिक येथील रहिवासी व आर्किओलॉजी विभागाची विद्यार्थिनी मैत्रेयी भोसेकर हिने संकलित केलेले ब्राह्मी लिपीतील हे हस्तलिखित राजकुमारी बज्रकितिभ्य यांचे लक्ष्य वेधून गेले. माघ पौर्णिमेला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान बुद्धांनी वर्षावासाच्या काळात या कालावधीदरम्यान १२५० अर्हंत भिक्खुंना 'विनय' या विषयासंदर्भात मार्गदर्शन केले होते. याच कालावधी दरम्यान भगवान बुद्धांनी तीन महिन्यानंतरच्या महापरिनिर्वाणाची कल्पना देखील दिली होती. या दोन घटनांच्या प्रित्यर्थ बिहारमधील राजगिरच्या वेळूवनात दरवर्षी 'माघ पोर्णिमा महोत्सव' आयोजित केला जातो. यंदा वर्षी अनेक देशांचे भिक्खू व बौद्ध धर्मीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. भन्ते अर्यावान्ग्सो यांनी या माघ पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन केले होते. थायलंडच्या राजकुमारी बज्रकितिभ्य या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होत्या. त्यांचे हस्ते येथील ओवदानपातीमोक्ख भूमीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, सांस्कृतिक मंत्री शिव चंद्र राम, महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड उपस्थित होते. ट्र‌िबिल्स संस्थेचे अध्यक्ष अतुल भोसेकर, अनघा भोसेकर, भारत तेजाळे आणि महाराष्ट्रातील १५० जन या कार्यक्रमाला उपस्थित होते. २० फेब्रवारीला सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता २२ तारखेला संध्याकाळी वेळूवनातील तलावाच्या भोवती दीप चंक्रमण करून झाली.

थायलंडच्या राजवाड्यात भरणार प्रदर्शन

नाशिकच्या ट्र‌िबील्सद्वारे अनोखी भेट मिळाल्यानंतर भारावलेल्या राजकुमारी बज्रकितीभ्य यांनी सम्राट अशोकाच्या सर्व शिलालेखांची हस्तलिखित प्रत थायलंडच्या राजवाड्यातील गॅलेरीत प्रदर्शित करण्याची इच्छाही राजकुमारी बज्रकितिभ्य यांनी व्यक्त केली. या उद्देशाने लवकरच सम्राट अशोकाच्या सर्व शिलालेखांचे हस्तलिखित ट्रीबिल्स संस्थेकडून थायलंडला पाठविण्यात येणार असल्याची माहिती ट्र‌िबील्सचे अध्यक्ष अतुल भोसेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रज्ञानच भारताला महासत्ता बनवेल

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागाला परवडणारे व सोपे तंत्रज्ञान विकसित करावे. देशाला त्याचे लाभ मिळवून द्यावेत. हे आव्हान विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पेलले तर भारत महासत्त होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

पिंपळगावच्या क. का. कॉलेजमध्ये प्रयोगशाळा आणि मुलींच्या वसतिगृहाच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक डॉ. विश्राम निकम, मुरलीधर पाटील, विश्वासराव मोरे, प्रतापराव मोरे, माधवराव मोरे, बाळासाहेब वाघ, नानासाहेब बोरस्ते, अरविंद कारे आदी व्यासपीठावर होते. प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी प्रास्तविक व स्वागत केले.

डॉ. काकोडकर म्हणाले की, देश पारतंत्र्यात जाऊ नये असे वाटत असेल तर बाजारात टिकणारे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. त्यावरच देशाचे अर्थकारण अवलंबून आहे. देशबांधणीत शिक्षणाला मोठे महत्त्व आहे. शिक्षणामुळे व्यापक दृष्टीकोन, आकलनशक्ती प्राप्त होते. त्याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण आदी क्षेत्रात भरीव योगदान दिल्यास भारत आर्थिक व लष्करी महासत्ता होईल. नीलिमा पवार म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी संकटापासून पळून जाऊ नये. त्याचा मुकाबला करावा. संशोधक दृष्टी विकसित करावी. त्यासाठी जिज्ञासा वाढवा, सखोल ज्ञान प्राप्त करा.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून कर्मवीरांनी शिक्षणाची चळवळ उभी केली. यावेळी भाऊसाहेब पाटील, अनिल बोरस्ते, संजय मोरे, राजेंद्र मोगले, रवींद्र घेगडे, रवींद्र मोरे, उद्धव निरगुडे, कृष्णा पवार आदी उपस्थित होते. डॉ. शंकर बोऱ्हाडे आणि प्रा. सुसान लारेन्सिया यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बच्चू कडू यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाड्याचे आमदार ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांना जाहीर झाला आहे. येत्या ८ मार्च रोजी सायंकाळी ६.३0 वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित समारंभात कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. स्मृतिचिन्ह, पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

आमदार कडू हे प्रहार युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून, आगळ्या पद्धतीने आंदोलन करून विषय तडीस नेण्याचे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. विधानसभेत प्रभावी भाषणे देणारे कडू विदर्भातील प्रश्न मांडत आले आहेत. त्यांनी थेट अमेठीत जाऊन तेथील गरजू महिलेला घर बांधून दिले. विदर्भातील अनेक गरजूंना मोतीबिंदूपासून ते ब्रेन ट्यूमरपर्यंतच्या आजारांत ते मदत करीत असतात. रुग्णांसाठी ते अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देतात.

माजी आमदार व पत्रकार माधवराव लिमये स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या डॉ. शोभा नेर्लीकर व डॉ. विनायक नेर्लीकर यांनी सार्वजनिक वाचनालयाला दिलेल्या देणगीच्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सन २००३ पासून सुरू झालेल्या या पुरस्काराने आतापर्यंत बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभा फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, भाऊसाहेब फुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात यांना सन्मानित करण्यात आले आहे.

आमदार हेमंत टकले, 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांच्या निवड समितीने बच्चू कडू यांची कार्यक्षम आमदार पुरस्कारासाठी निवड केली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बस होणार मराठी कवितेची वाहक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ‌

'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीद घेऊन धावणारी राज्य मार्ग परिवहन महांमडळाची एसटी आता मराठी भाषेच्या प्रसाराचेही काम करणार आहे. नाशिक जिल्ह्यातील अकराशे बसेसमध्ये कुसुमाग्रज लिखित मराठी कविता लावण्याचा संकल्प मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे ठक्कर बाजार बसस्थानक येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, ज्येष्ठ साहित्यिक किशोर पाठक, गायक मकरंद हिंगणे, शासकीय कन्या कॉलेजच्या मुख्याध्यापिका ज्योती चौधरी, महांमडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड, प्रादेशिक अभियंता एन. एम. सूर्यवंशी, विभाग नियंत्रक यामिनी जोशी, विभागीय वाहतूक अधिकारी सागर पळसुले आदी उपस्थित होते.

मोहिते म्हणाले, राज्यात ठराविक अंतरावर बोलीभाषा बदलते. संवादासाठी प्रत्येक भाषेचे महत्त्व आहे. त्यामुळे व्याकरण आणि तांत्रिकतेत न अडकता भाषेची गोडी इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठीत बोलणे गरजेचे आहे. संस्कारक्षम मन तयार होण्यासाठी घरात मराठीतच संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

पाठक म्हणाले, मराठी भाषा प्रेमळ असली तरी सोपी नाही. प्रत्येक शब्दाला स्वंतत्र अर्थ आहे. मराठीचे वैभव महामंडळाच्या बसने जपले आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांमधील संवादातून त्याची अनुभूती होते. महामंडळाच्या बसवरील वाक्याबाबत प्रवाशांना आपलेपणा वाटत असल्याने मराठीचा प्रसार होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राचार्या चौधरी यांनी कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा दिला. कुसुमाग्रजांचे घर तीर्थक्षेत्रासारखे होते. त्यांच्या कवितेतून वेदना, प्रेम, संघर्ष असे अनेक पैलू अनुभवायला मिळतात. अशा साहित्याच्या वाचनातून प्रगल्भता वाढते आणि जीवनासाठी आवश्यक विविध दृष्टीकोन लक्षात येतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंगणे यांनी 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटीस टिळा' ही कुसुमाग्रजांची कविता सादर केली. प्रारंभी कुसुमाग्रज लिखित कवितेच्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगले बालकवी संमेलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कणा, स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, अनंत, माझे जगणे होते गाणे, माझे जीवनगाणे.. कुसुमाग्रजांच्या या कविता तसेच स्वरचित कविता करीत बालकांनी बालकवी संमेलनात चांगलाच उत्साह निर्माण केला. निमित्त होते, लोकहितवादी संस्थेतर्फे आयोजित 'बालकवी संमेलनाचे'. राका कॉलनीतील ज्योतीकलश सभागृहात हे संमेलन पार पडले.

नाशिकमध्ये दरवर्षी बालकवींचे संमेलन व्हावे, अशी कल्पना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मांडली होती. ही जबाबदारी लोकहितवादी मंडळाने स्वीकारली आणि गेल्या २८ वर्षांपासून अव्याहतपणे सुरूही ठेवली. यासाठीच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी हे संमेलन आयोजित केले जाते. बालकवींना त्यांच्या कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हा संमेलनाचा उद्देश होता. इयत्ता पाचवी ते सातवी हा लहान गट व इयत्ता आठवी ते दहावी हा मोठा गट यानुसार हे स्पर्धात्मक संमेलन घेण्यात आले. शहरातील १२ ते १५ शाळांच्या १३० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांनीही कविता सादर केल्या. प्रत्येक बालकवीने एक कुसुमाग्रजांची कविता तर दुसरी स्वरचित कविता सादर केली. कवी प्रकाश वैद्य यांनी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांच्या छापील कविता भेट म्हणून देऊ केल्या. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त दिलीप साळवेकर, मुकुंद कुलकर्णी, सरचिटणीस नवीन तांबट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. अरुण इंगळे व जयश्री वाघ यांनी परीक्षण केले. दोन्ही गटांमधील पहिल्या तीन विजेत्यांना रुपये ५०१, ३०१, २०१ रुपयांची तर उत्तेजनार्थ विजेत्यांना रुपये १०१ची बक्षिसे प्रदान करण्यात आली.

स्पर्धेतील विजेते

लहान गट प्रथम : अभिषेक जाधव द्वितीय : स्वानंद पारखी तृतीय : ऋतू पाठक उत्तेजनार्थ : मयुरी महाले, गायत्री वाणी

मोठा गट प्रथम : ऋचा शिंदे द्वितीय : केतकी मराठे तृतीय : ज्ञानेश्वरी वाघचौरे उत्तेजनार्थ : तनया जाधव, निनाद कुलकर्णी

सांघिक पारितोषिक लहान गट : शिशुविहार विद्यामंदिर मोठा गट : डे केअर सेंटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदुंनी इस्लाम समाजही समजून घेण्याची गरज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भविष्यात सर्व प्रश्न सारखे असून, सर्वांचे विचार अनेक बाबतीत समान आहेत. मात्र, इस्लाम हा भारतात आणि जगात अधिक चर्चेचा आणि वादाचा केंद्रबिंदू राहणार आहे. हिंदुंनी या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करायला हवा, इस्लाम देखील समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत आणि चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे यांनी केले. शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

प्रा. मोरे पुढे म्हणाले की, विद्यापीठ आणि माध्यमे यात प्रामुख्याने डाव्या विचारांची मंडळी मोक्याच्या जागेवर आहेत. त्यांच्या दहशतवादामुळे हिंदू न्याय विचार मांडणाऱ्याचे ऐकून घेतले जात नाही. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातच नव्हे तर सर्वच विद्यापीठात, सर्व अधिकाराच्या जागा डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींनी बळकावल्या असून, हिंदूंच्या न्यायाची भाषा करणाऱ्यांना कोणताही अभ्यास न करता सरसगट प्रतिगामी ठरवून त्यांना सुविधा, पारितोषिके न देण्याचे कारस्थान विद्यापीठांच्या स्थापनेपासून शिजले आहे. सावरकर, हिंदू संघटन करणारे यांना हीन लेखले जाते. प्रतिगामी अशी शिवी दिली जाते. त्यांना पीएच. डी., प्राध्यापकी नाकारली जाते त्यामुळे लोक नाईलाजाने आपण पुरोगामी आहोत असे दाखवितात. आता यात बदल घडू लागले आहेत असेही मोरे यांनी नमूद केले.

सावरकर सर्व धर्मांना त्यांच्या संख्येच्या आधारे आरक्षण देण्यास तयार होते. मात्र, मुस्लिमांची मागणी ५० टक्के आरक्षणाची होती, ती सावरकरांना मान्य नव्हती. धर्म म्हणजे कर्मकांड नाही. धर्माची जागा पारलौकिक कल्याणासाठी आहे, असे त्यांचे मत होते हे सांगतानाचा शेषराव मोरे पुढे म्हणाले की, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या व्यक्ती या कोणत्याही अभ्यासाशिवाय स्वा.सावरकर यांना प्रतिगामी ठरवितात. खरे तर सावरकर हे या पुरोगाम्यांपेक्षा पुरोगामी होते.

यावेळी न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल, विश्वस्त व सेक्रेटरी आनंद जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. आशिष कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. मोरे यांचा परिचय स्वानंद सोनार यांनी करून दिला. आनंद जोशी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षरांच्या लेण्यात हरवले रसिकमन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रजांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकारलेली एकेक कविता म्हणजे जीवनाचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या अक्षरांचं लेणचं. प्रतिभासंपन्न लेखकाला कविता सुचते तो क्षण साक्षात देव असावा यासारख्या भावनांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. प्रसाद ओक, स्पृहा जोशी आणि सौमित्र यांच्या ओघवत्या शैलीत बाहेर पडणारे नाट्यसंवाद असो की कविता दिलखुलास दाद मिळणार अशी हमी घेऊनच ती आलेली. महाराष्ट्र टाइम्सने मराठी दिनानिमित्त दिलेली ही अनोखी भेट हृदयाच्या कुपीत चिरंतन जपली जाईल, अशी कृतार्थता रसिकजनांनी यावेळी व्यक्त केली.

मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे तात्यासाहेब तमाम साहित्यिकांचे श्रध्दास्थान. ते नाशिककर असल्याचा येथील साहित्यप्रेमी रसिकांना काकणभर अभिमान अधिक. तात्यासाहेबांच्या गाजलेल्या कविता आणि नाट्यसंवाद सौमित्रांसारख्या दिग्गजांनी ऐकवाव्यात यासारखी दुसरी पर्वणी ती कोणती. साहित्य आणि कला विश्वातला हा आगळा वेगळा प्रयोग अनुभवण्यासाठी कालिदास कलामंदिर परिसरात रसिकांची मांदियाळी जमली.

रस‌किांच्या रांगा कलामंदिरात बसण्यासाठी जागा मिळावी, याकरिता रात्री साडेआठपासूनच प्रवेशद्वाराबाहेर रसिकांनी रांगा लावल्या. आवारात गर्दी मावेना म्हणून नऊ वाजता रसिकांना आत सोडण्यात आले. बघता बघता अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांतच कालिदास कलामंदिरची बाल्कनीही हाऊसफुल्ल झाली. कणा, प्रेम यांसारख्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला कुटुंबीयांसह आवर्जुन हजेरी लावली. कर्ण आणि कुंतीमधील संवादाने रसिकांच्या शरीरावर शहारे उभे केले. आवाजातील चढउतार, उत्तम शब्दफेकीमुळे हा संवाद रसिकांच्या हृदयाला भिडला.

महाराष्ट्र टाइम्समुळे एक अप्रतिम कलाविष्कार पाहण्याचा अनुभव मिळाला. कुसुमाग्रजांच्या कवितांचे गारूड साहित्य प्रेमींवर आहेच. या कविता दिग्गज कलावतांच्या तोंडून ऐकायला मिळणे हा अप्रतिम अनुभव होता. - सुनील जाधव

कवी सौमित्र, स्पृहा आणि प्रसाद ओक कुसुमाग्रजांच्या कविता वाचणार ही कल्पनाच वेगळी होती. म्हणून आवर्जुने हा कार्यक्रम पाहिला. महाराष्ट्र टाइम्समुळे एका चांगल्या प्रयोगाचे साक्षीदार होता आले, हे आनंददायी आहे. - श्रध्दा क्षीरसागर

कुसुमाग्रजांच्या अनेक कविता वारंवार वाचल्या आहेत. मराठी दिनाच्या निमित्ताने त्या कलावंतांकडून ऐकायला मिळणार असल्याने आवर्जुन आले. महाराष्ट्र टाइम्समुळे एक दर्जेदार कार्यक्रम पहायला मिळाला. हा कार्यक्रम कायम स्मरणात राहील. - प्रतिभा पाठक

कविता आणि नाट्यसंवादांची सुरेख गुंफण या कार्यक्रमामुळे अनुभवायला मिळाली. कार्यक्रमासाठी निवडलेल्या आणि अतिशय ताकदीने सादर झालेल्या काही नाट्यसंवादांनी अंगावर शहारे उभे केले. महाराष्ट्र टाइम्सने नाशिककरांना मराठी दिनानिमित्त दिलेल्या या आगळ्या वेगळ्या भेटीबद्दल धन्यवाद. - डॉ. भालचंद्र देव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images