Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अपात्र संचालकांचा आज फैसला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहकार विभागाच्या नव्या नियमानुसार सहकारी बॅँकांमधील संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असून, संचालकांच्या याचिकांवर बुधवारी (दि. २) मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. संचालकांनी नव्या नियमावलीतील पूर्वलक्षी प्रभाव या शब्दाला आव्हान दिले आहे. न्यायालयाच्या निर्णय संचालकांच्या विरोधात गेल्यास नाशिक जिल्हा बँकेच्या वर्तमान अध्यक्षांसह ११ जण अपात्र ठरणार आहे. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज्य सरकारने सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याच्या हेतूने जानेवारी महिन्यात नवीन अध्यादेश काढत जिल्हा व नागरी बँकेत प्रशासक नियुक्तीस कारणीभूत ठरणारे संचालकांना पुढील १० वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविले. अध्यादेशात पूर्वग्रहलक्षी हा शब्द असल्याने गेल्या मागील काळापासून ही कारवाई सुरू झाल्याने नाशिकसह राज्यातील अनेक बंकामध्ये भ्रष्टाचार केलेल्या संचालक अडचणीत आले आहे. नाशिकमध्ये विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह तब्बल ११ संचालक या शब्दामुळे अपात्र ठरणार आहेत. राज्यातील कोल्हापूर, धुळे, पुणे आणि नाशिक जिल्हा बँकेतील विद्यमान संचालक मंडळच अडचणीत सापडले आहेत.

त्यामुळे सरकारच्या या अध्यादेशाविरोधात संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नाशिक जिल्हा बँकेने दाखल केलेल्या याचिकेवर १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत शासनाला बाजू मांडण्यासाठी १७ फेब्रुवारी ही तारीख दिली होती तर त्यावर अंतिम निर्णय २ मार्च रोजी घोषित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे न्यायालयाच्या बुधवारच्या निर्णयाकडे नाशिक जिल्हा बँकेतील ११ संचालकासह राज्यातील अन्य जिल्हा बँक संचालकांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिग्नलद्वारे खुलणार इंदिरानगरचा अंडरपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उभारण्यात आलेल्या उड्डानपुलाखाली म्हणजेच इंदिरानगर अंडरपासजवळ नेहमी वाहतूक कोंडी व अपघात होत असल्याने बोगदाच बंद करण्यात आला. दरम्यान, बोगद्याच्या समस्येवर आमदार देवयानी फरांदे यांनी इंदिरानगर येथील ज्ञानेश्वर संकुलात नागररिकांशी संवाद साधला. यावेळी इंदिरानगर बोगद्यात संभाव्य असलेल्या बदलास पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या निर्णयानंतर खुलणार असल्याचे नागरिकांशी संवाद साधतांना आमदार फरांदे यांनी सांगितले.

इंदिरानगरहून गोविंदनगरकडे जाण्यासाठी तर गोविंदनगरकडून इंदिनानगरला जाण्यासाठी टाकण्यात आलेल्या चुकीच्या बोगद्यामुळे रोजच वाहतूक कोंडी होत होती. यामुळे वाहतूक पोलिसांना रहदारी सुरळीत‌ करणे अवघड झाल्याने पोलिस आयुक्तांनी अखेर इंदिरानगर बोगदा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी वाहनचालक व रहिवाशांच्या मोठ्या त्रासाला पोलिसांना सामोरे जावे लागले. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने अखेर बोगदाच बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंदिरानगर व गोविंदनगरच्या भागातील रहिवाशांना सुमारे २ किलोमिटर फेरा मारून जावे लागत आहे. याबाबत आमदार फरांदे यांनी तक्रारी मांडल्या. वाहनचालक व रहिवाशांच्या तक्रारी लक्षात घेता आमदार फरांदे यांनी इंदिरानगरच्या ज्ञानेश्वर संकुलात नागरिकांशी संवाद साधत काही उपाय रहिवाशांनी सुचविले आहेत. बोगद्याच बैठकीत तक्रारींचा पाऊसच उपस्थितांनी पाडला होता. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे हरिकिसन रेड्डी यांनी पॉवर पॉईंटद्वारे इंदिरानगर बोगद्याचे सादरीकरण केले. यात बोगदा सुरू केल्यावर अनेक अडचणी येतील अशी माहिती रेड्डी यांनी दिली. यात प्रायोगिक तत्वावर इंदिरानगर बोगद्याच्या बाहेर सिग्नल यंत्रणा उभारण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जातांना यूटर्न घेऊन जाण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तर इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जातांना सरळ बोगद्यातून जाण्याबाबत बैठकीत ठरविण्यात आले. मात्र, याबाबत पोलिस आयुक्तांच्या निर्णयानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे आमदार फरांदे यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितेल. बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, नगरसवेक सतीश कुलकर्णी, नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांच्यासह रहिवाशी उपस्थित होते.

इंदिरानगरच्या बोगद्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी व बोगदा कसा सुरू करता येईल याबाबत वाहनचालक व रहिवाशांची चर्चा ठेवण्यात आली. यात काही उपाय बोगदा वाहतुकीस खुला करण्यासाठी शोधले आहेत. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी याबाबत लवकरच भेटून तोडगा काढणार आहे.

- देवयानी फरांदे, आमदार, मध्य नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेतूची धुरा आता दोन कंपन्यांकडे

$
0
0

सध्या परीक्षांचा माहोल आहे. दहावी, बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होताच पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रीयेची धांदल सुरू होते. या मिशन अ‍ॅडमिशनच्या टप्प्यातून जाताना विद्यार्थी आणि पालकांकडे कॉलेजेसकडून विविध दाखल्यांची मागणी केली जाते. एखादा जरी दाखला नसेल तरी संबंधित विद्यार्थी प्रवेशाला मुकण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच परीक्षांचे निकाल जाहीर होताच पालक आणि विद्यार्थी दाखले मिळविण्यासाठी सेतू कार्यालयांकडे धाव घेतात. उत्पन्नाचा दाखला असो अथवा नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, नॅशनॅलिटी, डोमेसाइल, अधिवास असे विविध प्रकारचे दाखले लवकर मिळावेत यासाठी जिल्ह्यात १८ ठिकाणी सेतू कार्यालयांची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

मात्र, या सेतू कार्यालयांबद्दलच्या तक्रारी आणि गलथान कारभार अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. गेली अनेक महिने जिल्ह्यातील या १८ ठिकाणांवरील 'सेतू' केंद्राच्या ठेक्याची नेमणूक प्रक्रिया रखडली होती. अन्य पर्याय नसल्याने जुन्याच ठेकेदाराकडून दाखल वितरणाचे काम करून घेतले जात होते. काही महिन्यांपूर्वी या ठेकेदारांबद्दलच्या तक्रारी वाढल्या. 'सेतू'चे काम नवीन ठेकेदाराकडे द्यावे, अशी मागणी होऊ लागली. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याची धावपळ आणि अन्य कारणामुळे जिल्हा प्रशासनाकडून वेळकाढू धोरण अवलंबिले जात होते. एप्रिल, मे महिन्यांत ‌विविध परीक्षांचे निकाल जाहीर होणार असल्याने तत्पूर्वीच नवीन ठेकेदाराला काम देऊन दाखले वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि गतिमानता आणावी अशी मागणी जोर धरत होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निवड प्रक्रिया राबवून दोन कंपन्यांची निवड केली आहे.

यापूर्वी शहर व जिल्हा सेतूची कामे 'ध्येयपूर्ती' या संस्थेकडे होती. आणखी महिनाभर तेच ही कामे पाहतील. टेरा सॉफ्टवेअर व गुजरात इन्फोटेक या कंपन्यांची टेंडर मंजूर झाली आहेत. येत्या१ एप्रिलपासून ते 'सेतू'मधील आपल्या निश्चित जबाबदाऱ्या पाहतील. - नितीनकुमार मुंडावरे, उपजिल्हाधिकारी

कंत्राटासाठीही वेटिंग! 'सेतू'चे कंत्राट मिळावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून गुजरात इन्फोटेक ही कंपनी प्रयत्न करीत होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे या कंपनीला प्रतीक्षा करावी लागली. 'सेतू'मधील गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसू लागल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी टेरा सॉफ्टवेअर कंपनीला तर शहरासाठी गुजरात इन्फोटेक कंपनीला कंत्राट दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे नाशिक वाचवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झाली आहे. मनसेच्या माजी महापौरासह तीन नगरसेवकांना गळाला लावल्यानंतर आता भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. राज्य सरकारकडून नाशिकवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नगरसेवकांना आक्रमक होण्याचे आदेश संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी दिले आहे. त्यामुळे येत्या १९ मार्च रोजी राज्यसरकारच्या अन्यायकारक धोरणासह गुन्हेगारी विरोधात मोर्चा काढण्यात येणार असून 'नाशिक वाचवा' असा नारा शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनचे नाशिक संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी महापालिकेतील शिवसेना गटनेता कार्यालयात महानगरातील नागरी प्रश्नांबाबत नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, महानगर प्रमुख अजय बोरस्ते, विनायक पांडे, यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करतांना चौधरी यांनी नगरसेवकांना नागरी समस्यांबाबत आक्रमक होण्याचा आदेश नगरसेवकांना दिला. महानगरच्या वतीने १९ मार्च रोजी निघणाऱ्या 'नाशिक वाचवा' मोर्चासाठी प्रत्यके प्रभागातील नागरिकांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, तरुणांना नाशिक महानगराच्या पाणीटंचाई, शहरातील वाढती गुन्हेगारी, विजेचा प्रश्न, बेरोजगारी या सारख्या अन्यायकारक प्रश्नाची माहिती देऊन त्यांना मोर्चात सामील करून घेण्याचे फर्मान त्यांनी सोडले. तसेच नाशिकवर होणाऱ्या अन्यायाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक प्रभागात बैठका, चौकसभा आयोजित करून जनजागृती करावी जेणे करून या मोर्चाचे रुपांतर जन आंदोलनात व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेची ताकदच वाढणार असून विविध पक्षातील अनेक नगरसेवक पक्षात येण्यास इच्छुक आहेत. तुमच्या कुठलाही प्रभागात तसेच ज्या ठिकाणी आपला पदाधिकारी निवडणूक लढण्यास सक्षम असेल अशा कुठल्याही ठिकाणी बाहेरून उमेदवार आयात केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

गटबाजी थांबविण्याची तंबी

चौधरी यांनी पक्षात गटबाजी करणाऱ्यांनाही थेट तंबी दिली. शिवसेनेत या नंतर पक्षांतर्गत कुठलीही गटबाजी किंवा हेवेदावे चालणार नाहीत. कुणालाही आपली मत मांडायची असतील तर आपण थेट मला संपर्क करा. परंतु, एकमेकाबद्दल कुरघोडी खपवून घेतली जाणार नाही. शिवसेनेत सर्वात जास्त महत्त्व हे शिस्तीला आहे. त्यामुळे गटबाजी थांबवा अन्यथा कारवाईचा सामना करा, अशा इशाराच त्यांनी माजी पदाधिकाऱ्यांना दिला.

नाशिक झाले हिरोशिमा-नागासाकी!

बैठकीला मार्गदर्शन करतांना चौधरी यांनी नाशिकची तुलना थेट हिरोशिमा व नागासाकी शहरांशी केली. सध्या राज्य सरकारकडून नाशिकवर अन्याय केले जात आहे. नाशिकचे पाणी पळविण्यासह कार्यालयांचे स्थलांतर केले जात आहे. त्यामुळे सरकारला नाशिकचे हिरोशिमा व नागासाकी करायचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित करत आपण या सरकारमध्ये असल्याचे चौधरी विसरलेत. आपण नाशिकवरचा अन्याय सहन केला जाणार नसल्याचे सांगत त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्यावरील डेलिनेटर्सठरताहेत निरुपयोगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

लॅमरोडवर जागोजागी सुरक्षेचा उपाय म्हणून लावण्यात आलेले रोड सेफ्टी डेलिनेटर्स उखडण्याच्या ‌िस्थतीत आहेत. केवळ दोनच दिवसात हे डेलिनेटर्स रस्त्याच्या बाजूला पडले असून ते सध्या निरुपयोगी ठरत आहेत.

रस्त्याने चालताना, गाडी चालवताना आजूबाजूला असलेली झाडे, तसेच रस्त्यातील अडथळ्यापासून सुरक्षा व्हावी या हेतूने लॅमरोडच्या दुतर्फा नुकतेच कॅन्टोन्मेन्ट बोर्डामार्फत रोड डेलिनेटर्स लावण्यात आले आहेत. हे डेलिनेटर्स रस्त्यावर घट्ट बसण्यासाठी लावण्यात आलेले काँक्रीट व खिळेही वरती

निघून आले आहेत. डेलिनेटर्स रस्त्यावर घट्ट बसविण्यासाठी तीनही बाजूला योग्य पद्धतीने खिळे मारणे आवश्यक आहे. मात्र तशी खबरदारी प्रशासनाने घेतली नसल्याचे दिसून येत आहे.

लॅमरोडवरील तेजुकाया कॉलेजचे विद्यार्थी येता-जाता त्या डेलिनेटर्सना पायाने मारत आहेत. त्यामुळे हे खिळे ाणखीनच निघून जात आहेत. तसेच स्पीड ब्रेकर जवळील डेलिनेटर वाहनाच्या धडकेने तुटण्याची शक्यता आहे. किमान पाचशे ते सहाशे रुपयाचे एक असलेले हे डेलिनेटर्स रस्त्यावर शो पीस ठरू नयेत यासाठी प्रशासनाने लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय कार्यालयातही खासगीकरण

$
0
0

श्रीधर देशपांडे

देशातील केंद्रीय सरकारी कार्यालये ही सरकारच्या विविध खात्यांचे प्रशासकीय कामकाज बघतात. त्याचप्रमाणे देशातील कायद्यांची अंमलबजावणी व त्यांना कार्यान्वित करणे हे काम या कार्यालयांमधून होते. घटनेप्रमाणे देशाच्या राज्य कारभाराचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती हे असतात. राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली प्रशासकीय क्षेत्रांतर्गत ही खाती काम करतात. तेव्हा ही फार मोठी प्रशासकीय जबाबदारी स्वातंत्र्योत्तर काळापासून तेथील कर्मचारी, कमगार अंगावर घेऊन यशस्वीरित्या पार पाडत आले आहेत. सरंक्षण खाते, रेल्वे, पोस्ट, सरकारी प्रिंटिंग प्रेस, प्रसिद्धी खाते, फॉर्मस् स्टोअर अॅण्ड स्टेशनरी, मेडिकल स्टोअर डेपो अशी खाती सुपरिचित आहेत.

१९९८ मध्ये देशात संघटीत क्षेत्रात एकूण २८२ लाख स्टाफ होता. त्यातील मोठा हिस्सा हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे. २००९ मध्ये एकूण स्टाफ संख्या २४८ लाख झाली तर २०११ मध्ये मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात एकूण संख्या २४२ लाख इतकी खाली आली. थोडक्यात म्हणजे, देशाच्या राज्य कारभाराच्या प्रशासकीय क्षेत्रात या कर्मचाऱ्यांचे योगदान चालू आहे. प्रश्न असा आहे की, वर्षानुवर्षे या डिपार्टमेंटची कामे, व्यवस्थापन व्यवस्थितपणे सुरू असतांना जसजसा तेथील कारभार वाढत जाईल तसतशी तेथे अधिकाधिक रिक्रूटमेंट व्हावयास पाहिजे. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांचे संबंध शांततेचे, सामंजस्याचे हवेत. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे यावर एक धावती नजर टाकू.

रेल्वेमध्ये पॅसेंजर व गुडस् ट्रेन्समध्ये भरीव वाढ झाली असतांना तेथील स्टाफची संख्या १६ लाखावरून १३ लाखांपर्यंत खाली आली आहे. सरकारी केंद्रीय कार्यालये व संरक्षण क्षेत्रात ७ लाख जागा रिक्त आहेत. सरकारने या जागा भरण्यास पूर्ण नकार दिलाय. सार्वजनिक क्षेत्रासह मिनीमम गव्हर्नमेंट - मॅक्झिमम गव्हर्नन्सच्या नावाखाली सध्याचे सरकार नोकरभरतीवर मूग गिळून बसले आहे.

पोस्ट खात्याचे बाबतीत बघा देशात अशी व्यक्ती नसावी (अपवाद वगळता) की ज्याने पोस्टाच्या सेवेचा फायदा घेतला नसेल. काही वर्षांपूर्वी पोस्टमन घरोघरी किती लोकप्रिय होता! सरकार, उद्योग, संस्था, व्यक्ती प्रत्येक घटकाला पोस्टाने मनःपूर्वक विविध प्रकारची सेवा दिली आहे. तरीसुद्धा कित्येक वर्षांपासून पोस्टात असंतोष आहे. तेथील संघटनांची तक्रार आहे की त्यांच्या संघटनांना विचारात न घेता सरकारने 'टास्क फोर्स'द्वारे टपाल विभागाचे सहा कंपन्यांमध्ये रूपांतर करून खासगीकरणाची वाटचाल सुरू केली आहे. ६ मे २०१५ च्या बेमुदत संपाच्या नोटिसनंतर सरकारने पीजेसीएच्या प्रतिनिधींबरोबर डाक भवन दिल्ली येथे सेक्रेटरी (पोस्टस्) यांच्या उपस्थितीत बोलणी केली. त्यामध्ये सर्व मुद्यांवर सहमती झाल्याने संप स्थगित झाला. तथापी ३ लाखाच्या संख्येत असलेल्या ग्राम डाक सेवक हा वर्षानुवर्षे काम करीत असून संघटनांच्या सततच्या आंदोलनानंतरही त्यांचा प्रश्न अनिर्णित राहिला. नाशिक जिल्ह्यात त्यांची संख्या २५-३० हजार आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे सरकारी प्रिटिंग प्रेस तर बंद करण्याचाच सरकारने निर्णय घेतला आहे. नाशिकच्या प्रसिद्ध गांधीनगर प्रेसची आजची अवस्था सर्वज्ञात आहे. पूर्वीच्या २५०० ची तेथील कर्मचाऱ्यांची संख्या केवळ शंभरच्या आसपास येऊन ठेपली आहे. हे ज्वलंत उदाहरण बोलके आहे. सोर्ससारखी इतरही उदाहरणे आहे. संरक्षण क्षेत्रात गोपनियता फार महत्त्वाची आहे. तेथेही खासगीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. थोडक्यात, या सर्व केंद्रीय सरकारच्या कार्यालयात खासगीकरण रेटून नेण्याचा सरकारच्या निर्णयाला प्रखर विरोध करण्याखेरीज संघटनांकडे दुसरा मार्ग राहिला नाही आणि म्हणून ते विरोध करीत आहे.

वेगवेगळ्या प्रसंगी व लोकसभेत देखील खुद्द पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री यांनी रेल्वेमनना आश्वासित केले की सरकारचा भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाचा विचार नाही. असे असतांनाही डॉ. देब रॉय कमिटीने जो रिपोर्ट सादर केला तो भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाचा सरळसरळ आराखडा (रोडमॅप) होता.

या परिस्थितीत 'नॅशनल जॉईंट कौन्सिल ऑफ अॅक्शन' पुढे सरकारने पुढे काही पर्याय ठेवला आहे असे कोणाला तरी म्हणता येईल का? एनजेसीएने म्हणून जंतरमंतर, दिल्लीमध्ये सरकारच्या धोरणा विरोधात प्रत्यूत्तर म्हणून १ लाखाच्या रॅलीसमोर ठरावाद्वारे निर्धार व्यक्त केला की, सर्वच्या सर्व केंद्रीय कार्यालयातील सर्व संघटनांच्या एकत्रित विरोधाला सरकार काही किंमत द्यावयास तयार नसेल तर बेमुदत संपाशिवाय आता कुठलाच पर्याय नाही. त्यांनी २३ नोव्हेंबर २०१५ तारीख निश्चित केली. आऊट सोर्सिंग, एफडीआयला विरोध, फायदेशीर पेन्शन, ग्रामीण डाक सेवकांना कायम सेवेत घेणे इत्यादी मागण्याही केल्या. कायदेशीर बाब म्हणून मतदानही घेतले. दरम्यान सातवा वेतन आयोग जाहीर झाल्यावर त्याचा आढावा घेण्यासाठी एनजेसीएने सामंजस्यपूर्वक वरील संप पुढे ढकलला. परंतु सातव्या वेतन आयोगाने त्यांचे समाधान न झाल्यामुळे पुन्हा एनजेसीएने बेमुदत संपाची पुढील ११ एप्रिल २०१६ तारीख निश्चित केली. सरकार आता तरी 'सामंजस्याची' भूमिका घेऊन योग्य निर्णय घेईल व बेमुदत संप टाळण्यासाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे.

बेमुदत संपासारखा इतका मोठा निर्णय घेण्यामागे पूर्ण अभ्यास व विचारांती सर्व संघटनांची एकत्रपणे ही भूमिका आहे की या डिपार्टमेंटमधील रेल्वे-संरक्षण इत्यादी व्यवस्थापनांमध्ये खासगीकरणाची कुठलीच आवश्यकता नाही. खासगीकरणाचे समर्थन करता येत नाही. कारण त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जसे खूप नुकसान होणार आहे तसेच देशाचेही नुकसान होणार आहे. गेल्या काही वर्षांच्या संबंधित आकडेवारीने, स्टॅटिस्टिकने हे दाखवून दिले आहे. कारण एकाच उद्योगातील खासगी क्षेत्र त्याच उद्योगातील सार्वजनिक क्षेत्राच्या कामगारांना तुलनेत एकूण खूप कमी वेतन देते. शिवाय देशाच्या तिजोरीतही ते तुलनेने एकूण कमी रकमा जमा करतात. असे संबंधित आकडेवारींवरून निघणारे चित्र आहे. म्हणजे खासगीकरणामुळे कामगार, कर्मचारी आणि सरकार दोघांचेही नुकसान होते.

तरीसुद्धा आजही सरकार खासगीकरणासाठी फार आग्रही आहे या संदर्भात देशाचे माजी राष्ट्रपती मा. के. आर. नारायणन २००० साली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संदेश देताना म्हणाले ते फारच उद्बोधक आहे. राष्ट्रपती बजावतात, 'जर उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या त्रिपदरी जलद लेनमध्ये, पादचाऱ्यांकरिता रस्ता क्रॉसिंगसाठी सुरक्षित जागा सोडली नाही तर दीर्घकाळ, शांतपणे खूप हालअपेष्टा सोसणाऱ्या, सत्ताविहीन जनतेचा मोठा प्रक्षोभ एकदम बाहेर पडेल'.

(लेखक कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता पंचनाम्यांचे सोपस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात मंगळवारी रात्री टाकेद व खेड परिसरात तब्बल तासभर गारपीटसह जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात व न भरून निघणारे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, प्रांतधिकारी बाळासाहेब वाघचौरे, जि. प. सदस्या सुजाता वाजे, उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांच्यासह महसूल व कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

इगतपुरी तालुक्यात खेडभैरव, टाकेद, वासाळी, सोनोशी, बारशिगवे, अडसरे, अधरवड, शिरेवाडी, ठोकळवाडी याभागात मंगळवारी तासभर गारांचा वर्षाव झाल्याने या परिसरातील बागायती पिके पूर्णता उद्धवस्त झाली. टोमॅटो, गहू, कांदा, हिरवा चारा ही पिके आडवी झाली. फ्लॉवर, काकडी, वांगे, हरबरा, जनावरांचा हिरवा चारा ही पिके जमीनदोस्त झाली. या गावांमध्ये जवळपास ९० ते १०० टक्के बागायती पिके नुकसानीला कारणीभूत ठरली. त्यात वीटभट्टी मालकही या तड्याख्यातून सुटले नाही.

या नुकसानीची माहिती मिळताच आमदार राजाभाऊ वाजे, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार महेंद्र पवार, उपसभापती पांडूरंग वारुंगसे, जि. प. सदस्या सुजाता वाजे, पं. स. सदस्य हरिदास लोहकरे, कृषी अधिकारी संजय शेवाळे, मंडळ अधिकारी सुभाष गिते, कृषी मंडळ अधिकारी पाटील, कृषी सहाय्यक जाधव, आंधळे, हरिभाऊ वाजे, अनिल वाजे, बारशिंगवे उपसरपंच गुलाब भले, सोनोशी सरपंच सीताराम खोंडे, नंदू वाजे, वासाळी सरपंच अलका झोले, नामदेव साबळे, मायादरा सरपंच अर्चना लोहकरे आदींसह विविध गावांचे तलाठी यांनी या सर्व गारपीट नुकसानग्रस्त गावात जावून शेतीचे पंचनामे करून अहवाल सादर करावा, अशा सूचना प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी केल्या.

संपूर्ण परिस्थितीसह पाहणी व पीक पंचनामे करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची दखल घेऊन व संबधित यंत्रणेने शासनाला अहवाल सादर करावा. पिकांच्या नुकसानी झाल्याने शेतकऱ्यांना लाभ व नुकसानभरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- राजाभाऊ वाजे, आमदार

कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी तत्काळ या नुकसानग्रस्त शेतीचे व पिकांचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करावयाचे आहेत.

- बाळासाहेब वाघचौरे,

प्रांताधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संविधानासाठी भाजपबरोबर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

'रिपाई हा पक्ष दलितांच्या न्याय हक्कासाठीच कार्यरत असुन दलितांचे रक्षणासाठी केंद्रात व राज्यात पक्षाची भाजपबरोबर युती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलिलेल्या संविधानाला हात लावून ते बदलण्याचे कोणीही हिंमत करू नये.' असे प्रतिपादन रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी अभिवादन सभेत बोलताना केले.

आठवले म्हणाले,'मंत्रीपद मिळविण्याच्या आमिषाने काम करीत नाही तर आंबेडकर यांचे जाती तोडो व समाज जोडोचा म‌िशन पुढे नेत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात दलिताना प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह हा हिंदु धर्माविरुध्द नव्हता तर ते जातीय व्यवस्थे विरुध्द होता.'

रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया आठवले गटातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्ण जयंती व काळाराम मंदिर सत्याग्रह वर्धापननिमित्ताने बुधवारी मानव मुक्ती लढा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टीसीएस’चे इनोव्हेशन सेंट सुरु

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टाटा कन्सल्टन्सी सेंटर अर्थात टीसीएसने त्यांचे इनोव्हेशन सेंटर नाशिकात सुरु केले आहे. इंदिरानगरमधील अशोका बिझनेस एनक्लेव्हमध्ये सुरु झालेल्या या सेंटरद्वारे मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येणार आहे. त्याचा फायदा संपूर्ण जगालाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, या सेंटरच्या निमित्ताने नाशिकचे नाव जागतिक पातळीवर गेले आहे.

आयटी क्षेत्रातील दिग्गज आणि बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या टीसीएस कंपनीने नाशकात इनोव्हेशन सेंटर सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यास मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), महाराष्ट्र सरकार आणि कुंभथॉन यांच्या सहकार्याने डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (डीस्क) हे सेंटर पूर्वीच्या व्हॅसकॉन आयटी पार्क आणि सध्याच्या अशोका बिझनेस एनक्लेव्ह मध्ये १ मार्चपासून सुरु करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सोयी-सुविधांद्वारे या सेंटरचे काम सुरु झाले आहे. हे केंद्र नाशकात कार्यरत असले तरी सोशल मीड‌िया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून या सेंटरशी संपर्क साधता येणार आहे.

जिव्हाळ्याचे विषय

मानवी जिव्हाळ्याचे विषय या सेंटरद्वारे हाताळले जाणार आहेत. काही विषय सेंटरच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत. शंभर टक्के लसीकरण, कृषी उत्पादकता वाढविणे, पाण्याची गुणवत्ता प्रत्यक्ष समजणे, वाहतुकीची जटील समस्या, घराघरातून कचरा १०० टक्के गोळा करणे, गुन्हे शोधणे अशा विविध विषयांवर संशोधन सुरु झाले आहे. तंत्रज्ञानाद्वारे या समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे आवाहन या सेंटरने केले आहे.

या क्षेत्रांवर काम सुरु

आरोग्य आणि स्वच्छता, अन्न आणि कृषी, नागरिकांची सक्षमता आणि पारदर्शकता, गृह आणि वाहतूक, शिक्षण आणि कौशल्य, ऊर्जा, पाणी आणि हवामान, आर्थिक आणि वैयक्तिक सुरक्षा या विषयांवर संशोधनाचे काम या सेंटरमध्ये सुरु करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थातील नवी वाहने धूळखात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेली ५५ पैकी १८ नवी वाहने ही वाहनचालक नसल्याने महापालिकेच्या भाडांरात धूळखात पडून आहेत. महापालिककडे असलेल्या वाहनांसाठी पुरेशे वाहनचालक नसल्याने ही परिस्थिती ओढावली असून, तब्बल ५५ वाहनचालकांची महापालिकेला तातडीने गरज आहे. कंत्राटी पद्धतीने वाहनचालक घेण्याचा महासभेने ठराव केला असतानाही, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर सिंहस्थात ठेकेदारी पद्धतीने घेतलेल्या ८२ वाहनचालकांचे ७१ लाख रुपये बील अद्यापही थकले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, काही वाहने ही अधिकाऱ्यांनाच चालवावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तात्काळ वाहनचालक मिळावेत, अशी मागणी अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेला नवी ५५ वाहने मिळाली होती. त्यात ९ फिरते दवाखाने, एक व्हॅक्यूम व्हॅन, ७ अॅम्बूलन्स, १४ पिकअप, ४ जेट मशीनसह अधिकाऱ्यांसाठीची वाहने खरेदी केली होती. सिंहस्थात या वाहनासांठी ठेकेदारी पद्धतीने ८२ वाहनचालक तीन महिन्यांसाठी घेतले होते. परंतू या वाहनचालकांची मुदत सपल्यानंतर यातील अनेक वाहनांवर वाहनचालक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ६ पिकअपसह तब्बल १८ वाहने ही गेल्या दोन महिन्यापासून भांडार विभागात धूळखात पडून आहेत. तर या वाहनांवर काम केलेल्या वाहनचालकांचे ७१ लाख रुपयांचे वेतनही थकले आहे. पालिकेच्या पटलावर १८० वाहनचालक पदे मंजूर आहेत. परंतू सद्यस्थितीत केवळ १५० वाहनचालक आहेत. तर अग्निशमन विभागात अजून २० ते २५ वाहनचालकांची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आतातरी मंत्रीबुवा विद्यापीठाला पावशील काय ?

$
0
0

विभाजनप्रश्नी शिक्षणमंत्र्यांच्या सूतोवाचाकडे लक्ष

Jitendra.tarte

@timesgroup.com

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनासंदर्भात सातत्याने उठणाऱ्या वावड्या तळाशी बसविण्यासाठी आजचा ‌दिवस तरी फलदायी ठरण्याच्या आशा नाशिककर उराशी बाळगून आहेत. या मुद्द्यावर यापूर्वी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आशावादी आश्वासन दिले असले तरीही या मुद्द्यास उठावण्या देण्याचे प्रयत्न संभाव्य आयुष विद्यापीठ समर्थकांकडून होत आहेत. दरम्यान, आज (३ मार्च) आरोग्य विद्यापीठास शिक्षणमंत्री विनोद तावडे हे भेट देणार असल्याने विभाजनाच्या मुद्द्यावर ठोस असे सकारात्मक आश्वासन देण्याची आशा नाशिककरांच्या मनात आहे.

१९९८ साली तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या विद्यापीठाने अल्पावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळविली आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, पेपरफुटी सारखी प्रकरणे, आरोग्य विज्ञानाच्या कॉलेजसचा दर्जा राखण्याचे आव्हान अशा प्रश्नांशीही हे विद्यापीठ वर्षानुवर्षे झुंजते आहे. ही आव्हाने पेलण्यासाठी अनेक वळणांवर सरकारची साथही विद्यापीठाला अपेक्षित असली तरीही आजवर या मुद्द्यांबाबत विद्यापीठाच्या तोंडास पानेच पुसल्याची वस्तुस्थिती आहे.

हे प्रश्न सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संघटना अन् विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वारंवार मंत्रालयाचे उंबरठे झिजवले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या सत्ताबदलाचे सकारात्मक परिणाम विद्यापीठावर होण्याची अपेक्षा विद्यापीठाशी संबंधित घटकांना होती. मात्र, नव्या रचनेत विद्यापीठ विभाजनाचा घातलेला घाट बघितल्यानंतर 'कालचा गोंधळ बरा होता...' अशी म्हणण्याची वेळ विद्यापीठाच्या घटकांवर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या तोंडचे अनेक घासही हिरावले गेले. यात पहिल्या टप्प्यात नाशिक-मुंबई कॉरिडॉरमध्ये नाशिकच्या समावेशासह, नाशिकचे पाणी अन् त्या पाठोपाठ मराठवाडा, विदर्भाच्या तुलनेत नाशिकला महागड्या दराने वीज देण्याचे मुद्देही उघड झाले. याच प्रक्र‌ियेत आरोग्य विद्यापीठापासून आयुर्वेद, होमिओपॅथी अन् युनानी या विद्याशाखांसाठी नागपूरात वेगळे असे आयुष विद्यापीठ उभारण्याचा घाट घातला गेला. यामुळे नाशिककरांमधील अन्यायाच्या भावनेला शैक्षणिक हब बनू पाहणाऱ्या नाशिकमधूनही खतपाणी मिळाले आहे.

दरम्यान, विभाजन होणार नसल्याचे शिक्षणमंत्री सांगत असले तरीही होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी या विद्याशाखांच्या मनातील धास्ती अद्याप कमी झालेली नाही. परिणामी, या तीनही विद्याशाखांमधील विद्यापीठाशी संबंध‌ित कॉलेजेसने नाशिकच्या विद्यापीठ विभाजनास कडवा विरोध दर्शविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरएसएसचा नव्हे; घटनेचा अजेंडा राबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

देशात धर्मांध व जातीय शक्तींचा उन्माद वाढला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी मनकी बातमध्ये यावर बोलत नाहीत. सरकारला देशापेक्षा आरएसएसची काळजी जास्त आहे. देशाला वाचवायचे असल्यास आरएसएसचा नव्हे तर राज्यघटनेचा अजेंडा राबविला पाहिजे,' असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.

काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वर्धापन दिन कार्यक्रमानंतर प्रा. कवाडे नाशिकरोड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शशिकांत उन्हवणे, गणेश उन्हवणे, संतोष साळवे, संजय अढांगळे, हरीभाऊ जाधव आदी उपस्थित होते. प्रा. कवाडे म्हणाले, 'शांतता, स्थैर्य, सुरक्षा असेल तर देशाचा विकास होतो. सरकारने छावण्या बंद करुन लावण्या सुरु केल्या आहेत. एकीकडे मेक इन इंडिया तर दुसरीकडे हेट इन इंडिया सुरु आहे.

हैद्रबाद विद्यापीठात दलित विद्यार्थी रोहित वेमुलाने आत्महत्या केली नाही तर त्याचा पद्धतशीरपणे संस्थात्मक खून करण्यात आला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच दलित विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. तरुणांना जातीयतेच्या भिंतीत बंदिस्त करण्याचे, मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दरवाजे बंद करण्याचे, शिक्षणाच्या सांप्रदायीकरणाचे षडयंत्र सुरु आहे. देशाचे लक्ष विचल‌ित करण्यासाठीच जेएनयू संघर्ष उकरुन काढण्यात आला आहे. भाजपचे नेते जेएनयूतूनच घडले. मग त्यांनाही देशद्रोही म्हणायचे का? गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुरामला देशद्रोही न म्हणता त्याचे पुतळे उभारले जात आहेत.

काश्म‌िरात भाजप-पीडीपी सरकारच्या राजवटीत देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कारवाई होत नाही. पण कन्हैय्या कुमारला बळी दिले जात आहे. घरवापसी, दादरी हत्याकान्ड, गोवंश हत्याबंदी ही भाजपची नव्हे; तर आरएसएसची धोरणे आहेत. सरकार शेतकऱ्यांची कर्जे

माफ करत नाही. मात्र,

बँकाची अब्जावधीची कर्ज बुडविणाऱ्या उद्योजकांना माफी

देते. देशात सर्वत्र अराजकता

पसरली आहे.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला ‘हरित’चा दिलासा नाहीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील बांधकाम परवानगी थांबविण्याच्या हरित लवादाच्या आदेशाविरोधात महापालिकेचे अपील लवादाने दाखल करून घेतले असले तरी महापालिकेला दिलासा मात्र दिलेला नाही. बांधकाम परवानग्यावरील सरसकट बंदी उठविण्याची मागणी लवादाने फेटाळून लावली आहे. लवादाने मुंबईबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाकडे बोट दाखवले आहे. या अपीलावर १६ मार्च रोजी सुनावणी घेण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. दरम्यान, महापालिकेने लवादाच्या अटी शर्तीच्या अधीन राहून परवानग्या देण्याचे जाहीर केले असले तरी, या अटी व शर्ती जाचक असल्याने बांधकाम करायचे कसे असा सवाल बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे.

कचऱ्याच्या प्रश्नांवरून पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने नाशिकमधील बांधकाम परवानग्या थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून शहरातील बांधकाम परवानग्या थांबल्या असून, बिल्डरांसह ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. शहराचा विकास ठप्प झाला असल्याने व्यावसायिक अस्वस्थ आहेत. तर हरित लवादाच्या निर्णयाला वरच्या न्यायालयात अपील केल्यास निकाल विरोधात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने या निर्णयाला पुण्याच्या हरित लवादात पुर्नविलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने या संदर्भात प्रतिज्ञापत्र तयार केले असून, हरित लवादाचे अॅड. रघुनाथ महाबळ अॅड कंपनी यांना वकीलपत्र दिले आहे. अॅड. महाबळ ही अपील अर्ज दाखल केले असून, त्यावर बुधवारी सुनावणी झाली. लवादाने मनपाचे अपील दाखल करून घेतले असले तरी, बांधकाम परवानग्यावरील बंदी उठविण्याची मागणी लवादाने मान्य केलेली नाही. मुंबई संदर्भात हायकोर्टाने दिलेल्या आदेशाकडे बोट दाखवत, पालिकेला दिलासा देण्यास लवादाने नकार दिला आहे. त्यामुळे बांधकाम परवानग्याबाबतचे शुक्लकाष्ठ संपणार नसल्याचे चित्र आहे. लवादाने या प्रकरणाची सुनावणी १६ मार्चला निश्चित केली असून, तोपर्यंत लवादाचा आदेश 'जैसे थे'च राहणार आहे.

दरम्यान, लवादाच्या अटी शर्तीच्या अधीन राहून महापालिकेने बांधकाम परवानग्या देण्याची तयारी दर्शवली आहे. शहरातील काही बिल्डरांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेतली होती. त्यात आयुक्तांनी लवादाच्या अटी शर्तीनुसार परवानग्या सुरू केल्याचे सांगीतले आहे. परंतू या अटी व शर्ती या बांधकाम व्यावसायिकांसाठी जाचक असल्याचा व्यावसायिकांचा दावा आहे. इमारतीत सीवेज ट्र‌िटमेंट प्लान्ट, कचऱ्याची विल्हेवाट, ग्रीन प्लॅन्टेंशन करणे व्यावसायिकांना परवडणारे नाही. लवादाच्या अटी व शर्ती पूर्तता करणे व्यावसायिकांना शक्य नाही. विशेषता छोट्या उद्योजकांना या अटी व शर्ती मान्य नसल्याने बांधकामे ठप्पच राहणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची विशेष महासभा फिस्कटली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीकपातीवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणाऱ्या प्रशासनाला आता सत्ताधाऱ्यांनीच कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. पाण्याचे फेरनियोजन करण्याचा प्रस्ताव कोणी ठेवावा यावरुन ५ मार्चला होणारी पाण्याच्या विशेष महासभेचे नियोजनच फिस्कटले आहे. पाण्याचे नियोजन बदलण्यासाठी प्रशासनानेच प्रस्ताव ठेवावा अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. तर सत्ताधाऱ्यांनीच हा प्रस्ताव ठेवावा, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे मंगळवारी विशेष महासभेचा मार्ग प्रशस्त होऊ शकला नाही.

विभागवार पाणी कपातीचे नियोजन फसल्याने आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर मंगळवारी पूर्ण दिवस ड्राय डे ठेवण्याची मागणी प्रशासनाने सत्ताधाऱ्यांकडे केली आहे. परंतु आठवड्यातून एक दिवस पूर्ण पाणीबंद ठेवण्याचा ठराव महासभेने दोन महिन्यापूर्वीच मंजूर केला होता. त्यावर भाजप आमदारांच्या दबावामुळे प्रशासनाने कारवाई केली नव्हती. त्यामुळे सत्ताधारी व आयुक्तच आमने सामने आले होते. परंतु २१ फेब्रुवारीपासून विभागवार पाणीकपात सुरू करण्यात आली होती. परंतु या नियोजनाचा फायदा होत नसून तक्रारीच अधिक होत असल्याने विभागवार कपात बंद करण्याची मागणी प्रशासनाने गटनेत्यांच्या बैठकीत केली. त्यावर ५ मार्चला विशेष महासभेत हा विषय चर्चेला आणा अशी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला सांगीतले. त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांच्या सह्या घेऊन ही सभा होणार होती. परंतु प्रशासनाने कपातीचे नियोजन बदलण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला नसल्याने ही सभेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. प्रशासनाच्या मते सदस्यांनीच प्रस्ताव आणावा, अशी भूमिका घेतली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी प्रशासनानेच कपातीच्या नियोजनात फेरबदलाचा प्रस्ताव आणावा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे दोन्हीकंडून प्रस्ताव न आल्याने ५ मार्चची विशेष महासभा होऊ शकलेली नाही.

पाण्याच्या फेरनियोजनाचा प्रस्ताव कोणी सादर करावा यावरून प्रशासन व सत्ताधारीच आता आमने सामने आले आहेत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणाऱ्या प्रशासनाला आता सत्ताधाऱ्यांनीच थेट कात्रीत पकडले आहे. त्यामुळे ही महासभा आता लांबवी आहे असून, पाण्याचा

प्रश्न अधांतरीच राहणार असल्याचे चित्र आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला ‘हरित’चा दिलासा नाहीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहरातील बांधकाम परवानगी थांबविण्याच्या हरित लवादाच्या आदेशाविरोधात महापालिकेचे अपील लवादाने दाखल करून घेतले असले तरी महापालिकेला दिलासा मात्र दिलेला नाही. बांधकाम परवानग्यावरील सरसकट बंदी उठविण्याची मागणी लवादाने फेटाळून लावली आहे. लवादाने मुंबईबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाकडे बोट दाखवले आहे. या अपीलावर १६ मार्च रोजी सुनावणी घेण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. दरम्यान, महापालिकेने लवादाच्या अटी शर्तीच्या अधीन राहून परवानग्या देण्याचे जाहीर केले असले तरी, या अटी व शर्ती जाचक असल्याने बांधकाम करायचे कसे असा सवाल बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे.

कचऱ्याच्या प्रश्नांवरून पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने नाशिकमधील बांधकाम परवानग्या थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून शहरातील बांधकाम परवानग्या थांबल्या असून, बिल्डरांसह ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. शहराचा विकास ठप्प झाला असल्याने व्यावसायिक अस्वस्थ आहेत. तर हरित लवादाच्या निर्णयाला वरच्या न्यायालयात अपील केल्यास निकाल विरोधात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने या निर्णयाला पुण्याच्या हरित लवादात पुर्नविलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने या संदर्भात प्रतिज्ञापत्र तयार केले असून, हरित लवादाचे अॅड. रघुनाथ महाबळ अॅड कंपनी यांना वकीलपत्र दिले आहे. अॅड. महाबळ ही अपील अर्ज दाखल केले असून, त्यावर बुधवारी सुनावणी झाली. लवादाने मनपाचे अपील दाखल करून घेतले असले तरी, बांधकाम परवानग्यावरील बंदी उठविण्याची मागणी लवादाने मान्य केलेली नाही. मुंबई संदर्भात हायकोर्टाने दिलेल्या आदेशाकडे बोट दाखवत, पालिकेला दिलासा देण्यास लवादाने नकार दिला आहे. त्यामुळे बांधकाम परवानग्याबाबतचे शुक्लकाष्ठ संपणार नसल्याचे चित्र आहे. लवादाने या प्रकरणाची सुनावणी १६ मार्चला निश्चित केली असून, तोपर्यंत लवादाचा आदेश 'जैसे थे'च राहणार आहे.

दरम्यान, लवादाच्या अटी शर्तीच्या अधीन राहून महापालिकेने बांधकाम परवानग्या देण्याची तयारी दर्शवली आहे. शहरातील काही बिल्डरांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेतली होती. त्यात आयुक्तांनी लवादाच्या अटी शर्तीनुसार परवानग्या सुरू केल्याचे सांगीतले आहे. परंतू या अटी व शर्ती या बांधकाम व्यावसायिकांसाठी जाचक असल्याचा व्यावसायिकांचा दावा आहे. इमारतीत सीवेज ट्र‌िटमेंट प्लान्ट, कचऱ्याची विल्हेवाट, ग्रीन प्लॅन्टेंशन करणे व्यावसायिकांना परवडणारे नाही. लवादाच्या अटी व शर्ती पूर्तता करणे व्यावसायिकांना शक्य नाही. विशेषता छोट्या उद्योजकांना या अटी व शर्ती मान्य नसल्याने बांधकामे ठप्पच राहणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याची विशेष महासभा फिस्कटली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीकपातीवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणाऱ्या प्रशासनाला आता सत्ताधाऱ्यांनीच कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. पाण्याचे फेरनियोजन करण्याचा प्रस्ताव कोणी ठेवावा यावरुन ५ मार्चला होणारी पाण्याच्या विशेष महासभेचे नियोजनच फिस्कटले आहे. पाण्याचे नियोजन बदलण्यासाठी प्रशासनानेच प्रस्ताव ठेवावा अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. तर सत्ताधाऱ्यांनीच हा प्रस्ताव ठेवावा, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे मंगळवारी विशेष महासभेचा मार्ग प्रशस्त होऊ शकला नाही.

विभागवार पाणी कपातीचे नियोजन फसल्याने आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर मंगळवारी पूर्ण दिवस ड्राय डे ठेवण्याची मागणी प्रशासनाने सत्ताधाऱ्यांकडे केली आहे. परंतु आठवड्यातून एक दिवस पूर्ण पाणीबंद ठेवण्याचा ठराव महासभेने दोन महिन्यापूर्वीच मंजूर केला होता. त्यावर भाजप आमदारांच्या दबावामुळे प्रशासनाने कारवाई केली नव्हती. त्यामुळे सत्ताधारी व आयुक्तच आमने सामने आले होते. परंतु २१ फेब्रुवारीपासून विभागवार पाणीकपात सुरू करण्यात आली होती. परंतु या नियोजनाचा फायदा होत नसून तक्रारीच अधिक होत असल्याने विभागवार कपात बंद करण्याची मागणी प्रशासनाने गटनेत्यांच्या बैठकीत केली. त्यावर ५ मार्चला विशेष महासभेत हा विषय चर्चेला आणा अशी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला सांगीतले. त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांच्या सह्या घेऊन ही सभा होणार होती. परंतु प्रशासनाने कपातीचे नियोजन बदलण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला नसल्याने ही सभेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. प्रशासनाच्या मते सदस्यांनीच प्रस्ताव आणावा, अशी भूमिका घेतली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी प्रशासनानेच कपातीच्या नियोजनात फेरबदलाचा प्रस्ताव आणावा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे दोन्हीकंडून प्रस्ताव न आल्याने ५ मार्चची विशेष महासभा होऊ शकलेली नाही.

पाण्याच्या फेरनियोजनाचा प्रस्ताव कोणी सादर करावा यावरून प्रशासन व सत्ताधारीच आता आमने सामने आले आहेत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणाऱ्या प्रशासनाला आता सत्ताधाऱ्यांनीच थेट कात्रीत पकडले आहे. त्यामुळे ही महासभा आता लांबवी आहे असून, पाण्याचा प्रश्न अधांतरीच राहणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा ग्रंथपालांचे रविवारी चर्चासत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय शिक्षक विभागातर्फे राज्यस्तरीय शाळा ग्रंथपालांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सावता माळी महाराज मंदिर, पालखी रोड, शिर्डी येथे रविवारी (दि.६) दुपारीवाजता हे चर्चासत्र होणार आहे. ग्रंथपालांच्या मागण्यांविषयी पुढील धोरण आखण्याविषयी हे चर्चासत्र घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांचे ग्रंथपाल यामध्ये सहभागी होणार आहेत.

एक वर्षापूर्वी ग्रंथपालांविषयी मागण्यांचा आकृतीबंध जाहीर झाला आहे. सरकारी यंत्रणेकडून मात्र त्याच्या अंमलबजावणीस अजूनही विलंब केला जात आहे. हा अहवाल लवकरात लवकर सादर व्हावा, यासाठी ग्रंथपालांचे हे एकत्रिकरण चर्चासत्राच्या माध्यमातून होणार आहे. तसेच राज्यभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील ग्रंथपालांच्या समस्या व अडचणींबाबत पुढची भूमिका यामध्ये ठरवली जाणार आहे.

शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, शिक्षक आमदार व आकृतीबंध समितीचे सदस्य रामनाथ मोते, शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर व शिक्षक परीषदेचे मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे आदी मान्यवरांची उपस्थिती चर्चासत्राला लाभणार आहे. त्यामुळे ग्रंथपालांच्या मागण्यांच्या पूर्ततेचा अंदाज यावेळी येणार असल्याचे मत परिषदेच्या सदस्यांनी केले आहे. या चर्चासत्रास जिल्ह्यातील सर्व ग्रंथपालांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथालय शिक्षक परिषदेचे विलास सोनार यांनी केले आहे. ग्रंथपालांच्या मागण्यांच्या पूर्ततेविषयी विलंब होत झाला तर १४ मार्चपासून मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाचा इशारा केला जाईल, असा इशाराही परिषदेतर्फे देण्यात आला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`द अनफिनिश्ड’ला नाशिककराच्या फोटोग्राफीचे कोंदण!

$
0
0

Ramesh.padwal@timesgroup.com भारतातील अकरा राज्ये... ३२ हजार किलोमीटरचा प्रवास... दुर्गम भागात सर्व ऋतुंमधील जीवघेणी भटकंती... एका नेमक्या फोटोसाठी तब्बल ३६५ दिवसांची प्रतिक्षा... २००९ ते २०१६ असे आठ वर्षांचे अव्याहत कष्ट... नाशिकचे प्रसिद्ध फोटोग्राफर प्रसाद पवार यांच्या रिसर्चबेस फोटोग्राफीतून हा खडतर प्रवास ३०० पानांच्या `द अनफिनिश्ड' पुस्तकाला दिलेल्या फोटोग्राफीक कोंदणातून साकारला आहे. भारतातील अपूर्णावस्थेतील लेणींवरील अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पासाठी गेली आठ वर्ष प्रसादने घेतलेल्या कष्टांना या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर फिनिशिंग टच मिळाला आहे. दिल्ली येथे `द अनफिनिश्ड' या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. 'मटा'चे ब्रँड अॅम्बेसिडर राहिलेल्या प्रसाद पवार यांच्या कर्तृत्वाची 'मटा'ने वेळोवेळी दखल घेतलेली आहे.

भारताला हजारो अद्‌भूत लेणी अन्‌ मंदिरांचे कोंदण लाभले आहे. दोन ते अडीच हजार वर्षांचा वारसा घेऊन पुढे जात असणाऱ्या या लेणी म्हणजे एक अनोखा इतिहास आहे. मात्र, यातील अनेक लेणी त्यावेळच्या सामाजिक, राजकीय उलथापालथींमध्ये अर्धवट राहिल्या. या अर्धवट लेणींच्या अभ्यासासाठी कोलंबिया विद्यापीठाने `द अनफिनिश्ड' हा प्रोजेक्ट आखला. सामाजिक, कला, राजकीय परिस्थितीचा अभ्यास करण्याचा त्यामागील हेतू होता. या प्रोजेक्टसाठी जगभरातील ५४ फोटोग्राफर्समधून नाशिकचे प्रसिद्ध फोटोग्राफर प्रसाद पवार यांची निवड झाली. त्यांनी 'अत्त दीप भव'च्या रूपाने जिंवत केलेली अंजिठा कोलंबिया विद्यापीठाच्या प्रतिनिधींना भावली होती. ही घटना आहे २००९ ची. त्यानंतर अनफिनिश्ड लेणी, मंदिरे यांच्या फोटोग्राफीला सुरुवात झाली अन्‌ सुरू झाला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा अकरा राज्यांचा प्रवास.

प्रसाद पवार म्हणतात, कोलंबिया विद्यापीठाला फक्त फोटोग्राफी अपेक्षित नव्हती. त्यांना चौकटीबाहेर विचार करून `तो' फोटो पाहणाऱ्याला इतिहासात घेऊन जातोय का? हे अपेक्षित होते. अजिंठ्यातील एका फोटोसाठी चक्क ३६५ दिवस द्यावे लागले. गौतम बुद्धांच्या ध्यानस्थ मूर्तीचे सर्वोत्तम छायाचित्र मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न या पुस्तकाचे कव्हर पेज ठरले आहे. 'अनफिनिश्ड' पुस्तकाचे लेखक रोममधील प्रख्यात शिल्पकार पिटर रॉकवेल व अमेरिकास्थित भारतीय वंशाच्या लेखिका पद्मश्री विद्या दहेजिया यांच्या अपेक्षांना उतरणे सोपे नव्हते. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थातील नवी वाहने धूळखात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेली ५५ पैकी १८ नवी वाहने ही वाहनचालक नसल्याने महापालिकेच्या भाडांरात धूळखात पडून आहेत. महापालिककडे असलेल्या वाहनांसाठी पुरेशे वाहनचालक नसल्याने ही परिस्थिती ओढावली असून, तब्बल ५५ वाहनचालकांची महापालिकेला तातडीने गरज आहे. कंत्राटी पद्धतीने वाहनचालक घेण्याचा महासभेने ठराव केला असतानाही, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर सिंहस्थात ठेकेदारी पद्धतीने घेतलेल्या ८२ वाहनचालकांचे ७१ लाख रुपये बील अद्यापही थकले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, काही वाहने ही अधिकाऱ्यांनाच चालवावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तात्काळ वाहनचालक मिळावेत, अशी मागणी अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेला नवी ५५ वाहने मिळाली होती. त्यात ९ फिरते दवाखाने, एक व्हॅक्यूम व्हॅन, ७ अॅम्बूलन्स, १४ पिकअप, ४ जेट मशीनसह अधिकाऱ्यांसाठीची वाहने खरेदी केली होती. सिंहस्थात या वाहनासांठी ठेकेदारी पद्धतीने ८२ वाहनचालक तीन महिन्यांसाठी घेतले होते. परंतू या वाहनचालकांची मुदत सपल्यानंतर यातील अनेक वाहनांवर वाहनचालक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ६ पिकअपसह तब्बल १८ वाहने ही गेल्या दोन महिन्यापासून भांडार विभागात धूळखात पडून आहेत. तर या वाहनांवर काम केलेल्या वाहनचालकांचे ७१ लाख रुपयांचे वेतनही थकले आहे. पालिकेच्या पटलावर १८० वाहनचालक पदे मंजूर आहेत. परंतू सद्यस्थितीत केवळ १५० वाहनचालक आहेत. तर अग्निशमन विभागात अजून २० ते २५ वाहनचालकांची गरज आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देविदास पिंगळेंच्या वाढल्या अडचणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६३ कोटींच्या आर्थिक नुकसानप्रकरणी सभापती देविदास पिंगळे यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळ व सचिवांच्या अडचणी वाढल्या आहेत. पणन संचालकांनी सन २०१३-१४ वर्षाच्या कालावधीतील फेरलेखापरीक्षणाची मागणी फेटाळून लावली आहे. बाजार समितीतल्या भ्रष्टाचाराची नव्याने चौकशी सुरू झाली आहे. चौकशी अधिकारी एन. डी. गाधेकर यांनी सभापती देविदास पिंगळे यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळ, सचिवांसह बाजार समितीची मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना समन्स बजावले आहे. पंधरा दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पिंगळेंसह संचालक व मालमत्ता खरेदीदारांचे धाबे दणाणले आहे.

लेखापरीक्षणावर पणन संचालकांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर आता चौकशी प्रक्रियेलाही वेग आला आहे. एन. डी. गाधेकर यांनी सभापती पिंगळे यांच्यासह संचालक तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, विमल जुंद्रे यांच्यासह संचालक मंडळ, सचिव आणि या मालमत्ता खरेदीदारांना चौकशीचे समन्स पाठविले आहे. पिंगळे यांच्यासह संचालक मंडळावर तब्बल २८ प्रकारचे आरोप ठेवले आहेत.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images