Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ब्रेनडेड रुग्णाने दिले अनेकांना जीवदान!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील ब्रेनडेड रुग्णाचे डोळे, दोन्ही किडन्या, पोटातील रक्तवाहिन्या या अवयव दानामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळणार आहे. या रुग्णाच्या दोन्ही किडन्यांपैकी एक किडनीचे नाशिकमध्ये तर दुसरीचे मुंबई येथील रुग्णावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. अशा पद्धतीने अवयवदान व प्रत्योरापणाची शहरातील ही पहिली घटना आहे.

ऋषिकेश हॉस्प‌टिलचे संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी या शस्त्रक्रियांबद्दल माहिती दिली. २८ फेब्रुवारी रोजी उमेश पटेल (वय ४६) यांचा शिर्डीजवळ अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांना तातडीने नाशिकच्या सुमन सिफोनी रुग्णालयात हलविण्यात आले. मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. संजय देसाई यांनी रूग्ण ब्रेनडेड असल्याचे घोष‌ति केले. उमेश पटेल यांचा मुलगा जयंत (वय १९) याला डॉक्टरांनी रुग्णाच्या स्थितीबाबत माहिती दिली व अवयव दानाबाबत मार्गदर्शन केले. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याचे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

रुग्णाला ऋषिकेश हॉस्प‌टिलमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर पुणे व मुंबई ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटीशी संपर्क साधण्यात आला. मुंबईतील फोर्टीस हॉस्प‌टिलच्या रुग्णासाठी ह्दय प्रत्यारोपणाला अनफिट ठरल्याने त्याचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही. तसेच यकृतचा पुर्नवापर करणे शक्य झाले नाही. मात्र डोळे, दोन्ही किडनी व पोटातील रक्तवाहिन्या यशस्वीपणे दान करता आले. एका किडनीचे ट्रान्सप्लांट ऋषिकेश हॉस्प‌टिलमध्ये पार पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामार्गावर कब्जा खासगी वाहनांचा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक
द्वारका परिसरातील वाहन कोंडी नाशिकरांसाठी नवीन नाही. त्यातच आता इथल्या उड्डाण पुलाखालील महामार्गावर रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करून काळी-पिवळी टॅक्स‌ीवाले, दुधाचे ट्रक आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये प्रवासी मिळवण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा होत असून वाहतूक पोलिस मात्र याकडे काणाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.
द्वारका चौकात मालेगाव, धुळे, जळगाव, औरंगाबाद येथे जाणाऱ्या वाहनांची नेहमीच गर्दी असते. स्वस्तात आणि जलद प्रवास व्हावा या हेतूने द्वारका परिसरात अनेक प्रवासी रस्त्यात उभे असतात. त्यासाठी ते काळी-पिवळी टॅक्सी, ट्रक आणि खासगी वाहनांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. सोबतच अनेक वाहन कंपन्यांच्या गाड्या याच मार्गावरून जात असल्याने प्रवासी मिळवण्यासाठी त्यांच्यामध्येही स्पर्धा लागेलेली असते. त्यासाठी ते महामार्गाच्या मधोमध गाड्या उभ्या करून प्रवासी भरत असतात. बऱ्याचवेळा अचानक ब्रेक दाबणे, प्रवासी भरण्यासाठी हमरीतुमरीवर येणे आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरणे हे प्रकार वाहतूक पोलिसांसमोर सर्रास सुरू असतात. दुधाच्या गाड्या आणि ट्रकने तर पूर्ण रोड व्यापून टाकलेला आढळतो. यामुळे नाशिककरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. या भागात हातगाड्या लावून काहिंनी लहान व्यवसायही सुरू केल्याचे दिसते.
या प्रकारामुळे अनेकवेळा दुचाकी धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अचानक ब्रेक दाबून वाहन थांबवल्यामुळे इथे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. भर रस्त्यात उभ्या असणाऱ्या या गाड्यांमुळे शालिमार आणि मुंबईकडून येणऱ्या वाहतुकीचा संपूर्ण बोजवारा उडतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस जवळपास १ किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम होणे ही सध्या रोजचीच समस्या झाली आहे. याविषयी कोणी तक्रार केल्यास संबंधित व्यक्तीला दमदाटी करणे, मारामारी करणे असे प्रकार घडत असल्याने हा प्रकार निमूटपणे सहन केलाज जात आहे.
नाशिकचा विकास व्हावा या हेतून शहरातील रस्ते मोठे होत आहेत. परंतु अशा समस्यांमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. अशा पायाभूत सुविधांचाही गैरवापर करण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकारात तातडीने लक्ष घालून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचएएल’च्या कंत्राटी कामगारांना कायम करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको
ओझर येथील हिंन्दुस्थान एरोनेटिक्स लिमिडेट कंपनीतील कंत्राटी कामगारांना न्यायालयाच्या निर्णयानुसार कायम करा, अशी मागणी सीटूने एचएएलच्या व्यवस्थापनाकडे निवदनाव्दारे केली आहे. परंतु एचएएल व्यवस्थापन न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात गेले असल्याचे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले.
ओझर मिग येथील एचएएल कारखान्यात ७०० कंत्राटी कामगार वीस वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहेत. १९७६ मध्ये रुजू झालेल्या कंत्राटी कामगारांना साधे किमान वेतन देखील देण्यात आले नाही. यानंतर सन १९९५ मध्ये एचएएलच्या व्यवस्थापनाने अचानक कंत्राटी ठेकेदाराची नेमणूक करत कामगारांचे वेतन व पीएफ ठेकेदाराकडून देण्यास सुरुवात केली. कंपनीच्या या निर्णयाविरोधात सीटूने २००३ मध्ये मुंबईच्या सेंट्रल गर्व्हमेंट इंडस्ट्रियल ट्रिब्युनलकडे अर्ज दाखल करुन सर्वच कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी केली होती. १४ जानेवारीला एचएएलमधील सर्वच कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा आदेश संबंधित कोर्टाने दिला होता. त्यानुसार सीटूने कंपनी व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे.
परंतु या निर्णयाचा आदर न ठेवता कंपनी व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणे चुकिचे असल्याचे मतही डॉ. कराड यांनी व्यक्त केले. या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने न्याय द्यावा, अशी अपेक्षा डॉ. कराड यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत झेब्रा क्रॉसिंगचे काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
देवळालीतील वडनेर रोडसह विविध भागात नव्याने बनविण्यात आले डांबरी रस्त्यांवरील गतिरोधकांवर झेब्रा क्रॉसिंग करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे वाहनधारकांना रस्त्यांवर असलेले गतिरोधक लक्षात येणे सोपे होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून देवळालीतील विविध भागात रस्ते डांबरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते. डांबरीकरण होऊनही या रस्त्यांवर असलेल्या गतिरोधाकांवर झेब्रा पट्टे मारण्याचे काम रखडून होते. गतिरोधक असल्याचे पटकन लक्षात न आल्यामुळे अनेजण या गतिरोधकांना धडकून पडण्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने पाऊल उचलत कामाला प्राधान्य दिले व झेब्रा पट्टे तयार केले. धोंडीरोड, हौसन रोड, आनंद रोड, कॅम्प रोड याशिवाय शहरातील अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या गतीरोधकांवर झेब्रा क्रॉसिंग केल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडा वसाहतीतील रस्त्यांना लागला मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
येथील वीस हजार म्हाडा वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. ड्रेनेजची नविन लाईन टाकल्यानंतर खोदलेले रस्ते कधी होणार ?, याबाबत 'मटा'ने या भागातील रहिवाशांच्या समस्या मांडल्या होत्या. याची दखल घेत नगरसवेक सलिम शेख व नगरसेविका उषा शेळके यांनी वीस लाख रुपये मंजूर करुन उर्वरीत रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू केले आहे.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेने सातपूर कॉलनीतील वीस हजार म्हाडा वसाहतीत नविन ड्रेनेज लाईनचे काम केले होते. परंतु यावेळी खोदलेल्या रस्त्यांवरूनच रहिवाशांना प्रवास करावा लागत होता. याबाबत 'मटा'ने बातमी प्रसिध्द करताच महापालिकेने हे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले होते. परंतु हे काम अर्धवटच मंजूर असल्याने वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे काम रखडळले. त्यामुळे रहिवाशांना या अर्धवट कामामधूनच खड्डे, माती याचा सामना करावा लागत होता. या दोन्ही नगरसेवकांनी महापालिकेकडून २० लाख रुपये मंजूर करुन उर्वरीत रस्त्यांचे काम सुरू केले आहे. यावेळी वसाहतीतील मान्यवर तसेच रहिवाशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सुप्रेम फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड
सुप्रेम फाऊंडेशन व रोटरी क्लब नाशिक इस्टतर्फे 'सुप्रेम रोटरी महिला गौरव पुरस्कार' देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रशांत भुतडा यांनी दिली. शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, औद्योगिक, प्रशासकीय, क्रीडा, कला क्षेत्रातील महिला तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनेला हा पुरस्कार दिला जाईल.
इच्छुकांनी यासाठी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. यासाठीचे अर्ज बिटको चौकातील रेमण्ड शोरुम शेजारील डॉ. भुतडा क्लिनीक येथून घेऊन तिथेच त्वरित सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत आधी मिळालेल्या पुरस्काराची माहिती प्रमाणपत्र व आपला फोटो द्यावा, असे आवाहन संयोजक डॉ. सुषमा भुतडा, अचल राजे, अतुल मालाणी, मिलिंद पारख यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलचे दिवस

$
0
0

धनंजय गोवर्धने
नारोशंकर मंदिराच्या पूर्व दरवाजासमोर पूर्वी घास बाजार भरत असे. मधोमध एक सिमेंटचा हौद होता, जनावरांना पाणी पिण्यासाठी. तेव्हा जवळपासचे शेतकरी बैलगाडीनेच आपल्या शेतातला भाजीपाला धान्य विकायला आणत. पुढच्या मोकळ्या जागेत बैलगाड्या सोडलेल्या असत. रामसेतू पूल नव्हता तेव्हा सांडव्यावरून येजा करावी लागे. पूल बांधतेवेळी नारोशंकर मंदिरासमोरचे पटांगण सिमेंट-काँक्रिटचे झाले. तेथून पूढे म्हसोबा ते गाडगे महाराज पूल रस्ता खराबच होता. घास बाजारातच मोकळी सपाट जागा मिळे. चौकातल्या शर्मांकडून भाड्याने सायकल घेऊन चुलत भाऊ चंदू, शरद असे सगळे मिळून सायकल शिकत, खेळत असू.

लहान असतांना एक पाय जमिनीवर टेकवत टेकवत तोल सांभाळण्याने सुरुवात होई. मग एक पाय नळी खालून अर्धवट पॅडल मारत मारत चालवणे जमे. मग पूर्ण पॅडल आणि मग आडव्या दांडीवरुन उभं राहून कारण सिटवर बसून पाय टेकत नव्हते. न आपटता सायकल शिकलेला माणूस माझ्या ऐकण्यात नाही. सायकलवरनं पडल्यावर हातापायाला खरचटणं पण तेव्हा आवडे. घरी न सांगता विजयी वीराच्या जखमांसारखी जखम मित्रांमध्ये शुरत्वाने मिरवली जायची.

अशीच एक जूनी सायकल विकत घेतली होती. त्यामुळे दळण, किराणा आणण्यासाठी उपयोग व्हायचा, कष्ट कमी व्हायचे. रात्री सायकलला दिवा लावावा लागे. पोलीस पकडत, डबलसीट चाललो तर ते सायकलची हवा सोडून दम देत. शाळेत असतांना मे महिन्यात एक कोर्स केला होता. त्यात सायकल रिपेअरिंग, स्टोव्ह रिपेअरिंग, बुक बाईंडिंग, वायरिंग, शिलाईकाम शिकलो. त्यामुळे पुढे कधीही असंख्य किरकोळ कामासाठी अडून बसावं लागलं नाही. कॉलेजला असतांना सायकलच महत्त्व जास्तच वाढलं होतं. सीबीएसच्या पुढे पोलीस परेड ग्राऊंड नंतर वस्ती तुरळक होती. आताचे राजीव गांधी भवन त्यासमोरचा परिसर इथे काहीच नव्हतं. कॅनडा कॉर्नरपासून पुढे शेतमळे होते. मलेरिया स्टॉपजवळ मलेरिया निर्मूलनाचे ऑफिस होतं म्हणून त्या स्टॉपला मलेरिया स्टॉप म्हणायचे. विसेंची भरपूर शेती होती. पुढे कुलकर्णींचा मळा, येवलेकर मळा बसस्टॉप होता. तिथं येवलेकरांचे एक छोटंसं सायकल दुरुस्तीचं दुकान होतं. कॉलेजच्या तारेच्या कंपाऊंडच्या आत पत्र्याच्या शेडमध्ये सायकलचा स्टॅण्ड होते. कांद्याच्या चाळीसारखी उतरत्या पत्र्यांची शेड, मधल्या खांबांना आडवी जाड फळी ठोकलेली त्या फळीला इंग्रजी यू आकाराची दोन्ही कडेला खाच केलेली, सायकलचं हॅण्डल दोन्ही हातांनी उचलून द्यायचं, खालच्या काटकोन त्रिकोणी केलेल्या लाकडी तुकड्यात चाक अडकवायचे आणि हॅण्डल खाचेवरती लॉक करुन बाहेर यायचं. स्टॅण्डच्या दरवाजासमोर स्टूल टाकून पिच्चा जैन बसलेला असे. उंचसा केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली. सदरा पायजमा नेहमीचा, त्याच्याकडे सायकल ठेवण्यासाठी दहा पैसे द्यावे लागत किंवा पास काढायचा. नाहीतर मग वर्षभराचा पितळी बिल्ला घ्यायचा. सायकल पंक्चर झाली तर मुलींची गर्दी गेल्यानंतर पंक्चर काढायचं आणि उशीरा जायचं. कधी हवा कमी झालेली असली की, हवा भरताभरता आपलीच हवा टाईट व्हायची. कधी अतिउत्साहात टायरचा आवाज व्हायचा आणि आपलाच चेहरा फाटलेल्या ट्यूबसारखा दिसू लागायचा तर कधी चावी हरवायचीही. जैनकडे सायकलचा एक स्पोक (तार) किल्लीच्या आकारात वाकवलेली ठेवलेली असे. त्याचं तंत्र जैनला माहित होतं. पण त्यासाठी त्याला विनवण्या कराव्या लागत, मग तो प्रेमाने दोनचार शिव्या देत. 'चाव्या सांभाळायाला नकोत ऽऽ.. वगैरे म्हणत एका हाताने लॉकची खटकी दाबून उजव्या हाताने तार गोलाकार फिरवे आणि जादू केल्यागत 'खट्ट' आवाज करून कुलूप उघडे, कधीतरी त्याला चहा पाजावा किंवा नुसतेच थँक यूवरच भागत असे.

कॉलेजाला जातांनाच सायकल पंक्चर झाली तर मग साहसी प्रयोग करावे लागत. श्रीकांत कुलकर्णी हा आमच्यातला सर्वात धाडसी रांगडा होता. तो मला सायकलवर डबलसीट घेत असे. मग मी हातात सायकल धरे किंवा तोच एका हाताने सायकल चालवत दुसऱ्या हातात पंक्चर झालेली सायकलही धरे. चालत्या ट्रकच्या मागच्या बाजूला कोपऱ्यावर असलेल्या साखळीला धरून भरधाव ट्रकसोबत चालण्याचं धाडस तो अनेकदा करी.

एकदा आम्ही सात आठ मित्र मिळून भंडारदऱ्याला सायकलवर गेलो. श्रीकांत सहलीच्या आयोजनात तरबेज त्यामुळे खाण्यापिण्यापासून ते सायकल पंक्चर झाल्यास पान्हा, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, हवा भरण्याचा पंप, सतरंजी, दोरी, एक मोठा कोयता, आणि हो एक ट्रान्झिस्टरही सोबत होता. रात्रीसाठी एक मोठी बॅटरी, सेल, पाणी सोबत घेतले. आम्ही सारे सकाळी लवकर निघालो होतो मजा, गप्पागाणी यात वेळ जात होता. घाटात चढतांना एकाच्या सायकलची चेनच तूटली तरीही आदल्या दिवशी सायकली दुकानदाराकडून तपासून आणलेल्या होत्या. सर्वांचाच मूड गेला. एकतर घाटामुळे सर्वांना दम लागलेला. भंडारदरा भागात दुकानं लवकर बंद होतात म्हणून श्रीकांत एका हाताने सायकल चालवत एका हाताने ती नादुरूस्त सायकल घेऊन घाट चढून तो पुढे भंडारदऱ्याला गेला. आम्ही पोहोचेपर्यंत त्याने दुकानदाराकडून नवीन चेन बसवून घेतली होती.

एकदा कॉलेजला असतांनाच कोणीतरी बातमी आणली की, त्र्यंबकेश्वरला शूटिंग चालू आहे. मनोजकुमार आलेले आहे. आम्ही पाचसहा जण तसेच सायकलवर त्र्यंबकला गेलो होतो. नील पर्वतीच्या पायऱ्यांवर शूटिंग चालू होते. कोणीतरी घरून जुना क्लिकचा कॅमेरा आणला होता. मनोज कुमारना फोटो काढण्यासाठी विनंती केली सारे उभे राहिलो. एकदा दत्ता नाईक, प्रकाश भालेराव असे आम्ही वणीला सप्तश्रृंगगडावर सायकलने गेलो. सायकली खाली दुकानाजवळ लावल्या व तेथेच डबा खाल्ला चहा घेतला. मधल्या रस्त्याने पायी गडावर जाऊन दर्शन घेऊन खाली येईपर्यंत रात्र झाली होती. थकलोही होतो आणि रात्रीचा प्रवास नकोच म्हणून दुकानदाराला विनंती केली. तेव्हा बसही फारशा जात नव्हत्या. त्याच्या दुकानातल्या ओट्यावर सतरंजी टाकून सारे झोपलो. पहाटे लवकर उठून चहा घेऊन वडनेर भैरवला प्रकाश भालेरावच्या घरी गेलो. त्याच्या घरच्यांनाही अचानक पण गोड धक्काच होता. त्याच्या वडिलांनी सर्वांची प्रेमाने चौकशी केली. त्याच्या मळ्यातच बाहेर विहिरीजवळ मस्त थंड पाण्याने अंघोळी केल्या. त्याच्या आईने मायेने पोटभर जेवू घातलं. तिथून आम्ही आग्रारोडला आणि शिरवाडे फाट्याजवळ, पिंपळगावमार्गे नाशिकला संध्याकाळी पोहोचलो. घरचे काळजी करत होते. पण एवढा प्रवास करुन आलेला थकवा आईच्याच डोळ्यात दिसला. ती रागावली ती नाहीच पण गरम गरम जेवून घे आणि विश्रांती घे म्हणाली.

पुढे वडिलांनीच स्कूटर घेतली पण चालवली कधीच नाही. त्यांची एक छोटी लुना होती. तीच ते वापरत, लुनाचं कधीकधी रस्त्यातच पेट्रोल संपे. मग मागच्या चाकाला चेन कव्हरला एक काळं गोल बटण होतं. ते जोराने आत दाबावं लागे. मग लुनाची सायकल व्हायची आणि पॅडल मारून पेट्रोलपंपापर्यंत जाता यायचं. तीन रुपये लिटर पेट्रोल होतं आणि लुनाचा अॅव्हरेज भरपूर होता. आता सायकलची गरज कमी झाली होती ती भाच्याला दिली. तो कॉलेजला जाऊ लागला होता.

मुलगी सातवी पास झाल्यानंतर गावातल्या शाळेत जाऊ लागली म्हणून तिला तिच्या पसंतीची सायकल घेतली तीन हजाराची. नंतर तिनेही ती कामवाल्या बाईच्या मुलीला शाळेत जाण्यासाठी दिली. मुलगा मुंबईला आर्किटेक्चर कॉलेजाला शिकत होता. नोकरी लागल्यावर त्याने नऊ हजार रुपयाची सायकल घेतली. तो कॉलेजला कधीतरी घेऊन जातो. पूर्वी सायकल गरजेची वस्तू होती आता प्रतिष्ठेची झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वर: ‘भयारण्य’ ते ‘रामसार’

$
0
0

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या स्थापनेला काही दिवसांपूर्वीच ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रातील भरतपूर अशी ओळख असलेल्या या अभयारण्याचा सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना आजवर करण्यात आल्या आहेत आणि येत आहेत. या पार्श्वभूमीवर अभयारण्याच्या कामकाजाचा घेतलेला हा आढावा.

सतीश गोगटे

दि. ५ जुलै २०१२ रोजी मटामध्ये मी 'नांदूरमध्यमेश्वरचे भयारण्य' हा लेख लिहिला होता. खरे सांगायचे तर त्या आधी चार ते पाच वर्षे मी या पक्षीतीर्थाला एक पक्षी निरीक्षक म्हणून भेट देत आलो आहे. त्यावेळी या अभयारण्याची अवस्था दयनीय होती. उन्हाळ्यात वृक्षतोड, माती उकरून नेणे याबरोबरच शेळ्या, मेंढ्या, गुरे यांचा मुक्त वावर असणे असे स्वरूप या परिसरात होते. नुकतेच त्या काळात मी भरतपूर पक्षी अभयारण्य पाहिले असल्याने मी नांदुरची तुलना भरतपुरशी करू लागलो. त्याचवेळी मला 'रामसार यादी' विषयी कळाले.

'रामसार ठराव' हा २ फेब्रुवारी १९७१ मध्ये इराणच्या 'रामसार' या शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवर संमत झाला. 'रामसार ठराव' हा जगातील जैवविविधतेने समृद्ध अशा पाणथळ जागांचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या उगमस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी बनविला गेला. या संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथे आहे.

पाणथळ जागा (Wetlands) यांचा उपयोग मनुष्य किंवा इतर प्राणीमात्र स्वत:च्या उपयोगासाठी भरपूर करून घेतात. पाणथळ जागा या इतर पाणवठ्यांपेक्षा उथळ असतात. त्यामुळे आजूबाजूची जमीन सुपीक असते व पाण्याचा वापर तर शेतीवाडी, घरासाठी सतत केला जातो. या कारणामुळेच त्या सुरक्षित राहात नाहीत. पाणी अस्वच्छ असणे, सांडपाण्याची वाढ होणे, याबरोबरच जीवजंतूंचा नाश होणे ही प्रक्रिया घडते आणि सर्वात शेवटी आजूबाजूच्या परिसरावर त्याचा परिणाम होऊन निसर्गाचा ऱ्हास होत जातो. अगदी हेच कारण शोधून रामसार संघटनेने स्थानिक लोकांवर व स्थानिक प्रशासनावर जबाबदारी टाकली आहे ती पाणथळ जागांच्या संरक्षणाची. जगात आतापर्यंत २२०० च्या वर पाणथळ जागांनी रामसार यादीत स्थान मिळवले आहे. त्यामध्ये भारतातील फक्त २६ पाणथळ जागांचा समावेश आहे. त्यातूनही खंत म्हणजे महाराष्ट्रातील अजूनही एकही पाणथळ जागा रामसार यादीत समाविष्ट नाही. यावरून आपल्या निसर्ग अबाधित राखण्याच्या हेतूबद्दल मोठी काळजी वाटते.

या सर्वांवर मात करून नांदूमध्यमेश्वर अभयारण्याने गेल्या सततच्या तीन ते चार वर्षांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र सरकारकडून 'रामसार यादी'तील पहिलेवहिले महाराष्ट्रातील नाव मिळवण्यासाठी अनुमोदन मिळवले आहे. त्याबद्दल मांजरगाव, चापडगाव, भुसे या परिसरातील स्थानिक लोक, शेतकरी, तसेच, महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या (वन्यजीव) नाशिक यांच्या अतिशय मन:पूर्वक प्रयत्नांनी या भागाला एक स्थान मिळवून दिले आहे. वनरक्षक दलात वाढ करीत व स्थानिक युवकांना रोजगार व त्याबरोबरच पक्षी मार्गदर्शक बनवून वॉच टॉवर्स, गॅलरी उभारणे, पक्ष्यांसाठी पाण्यात ढापे बनवणे व पक्षी निरीक्षकांसाठी दुर्बिण उपलब्ध करणे, अद्ययावत निसर्ग निर्वेचन केंद्र उभारणे, अभयारण्यात फिरण्यासाठी पायवाटा बनवणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपद्रवी गुराढोरांचा वावर थांबवण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे ही कामे करण्यात आली. आजकालच्या काळात स्थानिक लोक, स्थानिक संघटना व स्थानिक प्रशासनाच्या टीमवर्कचे हे एक उत्तम उदाहरण ठरावे व त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळावी.

नुकतीच २५ फेब्रुवारी रोजी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या स्थापनेला ३० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने झालेल्या एका हृद्य सोहळ्यात नांदुर मध्यमेश्वर येथे एक छान कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये वनविभागाचे रनाळकर यांच्यासह मिलींद बाबर, डॉ. डेर्ले यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकच्या (एनसीएसएन) वतीने बिश्वरूप राहा आणि मी बनविलेल्या 'नांदुर मध्यमेश्वर - एक समृद्ध पाणथळ जैवविविधता' या अर्ध्या तासाच्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. ही चित्रफीत नांदुर मध्यमेश्वर येथे जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी खास आकर्षण बनू शकते.

(लेखक पक्षी निरीक्षक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत ५१ हरकती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत महापालिकेने संबंधित धार्मिक स्थळांचे ट्रस्टी आणि नागरिकांकडून हरकती मागविल्या. शहरात सुमारे १३४८ अनधिकृत धार्मिक स्थळे असतांना मुदतीत केवळ ५१ हरकती प्राप्त झाल्या. हरकतींना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाने आता नव्याने आकडेमोड सुरू केली आहे. दरम्यान, शहरातील काही पुरातन धार्मिक स्थळांचाही यादीत समावेश करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हायकोर्टात दाखल जनहित याचिकेनुसार सरकारने अनधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कारवाईसाठी २१ ऑक्टोबर २०१५ चे परिपत्रकानुसार कालबध्द कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार २९ फेब्रुवारीला अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे नाशिक महापालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाईबाबत पोलिस विभाग व महापालिका यांच्यामार्फत संयुक्त सर्व्हेक्षण करण्यात आले. सन २००९ पूर्वीची १०६४ व सन २००९ नंतरची २८४ अशी एकूण १३४८ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आलेली आहेत. सदर धार्मिक स्थळांची यादी महापालिका व पोलिस यांच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली असून त्यावर हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी निविदेचे ‘तारीख पे तारीख’

$
0
0

घंटागाडी निविदेचे 'तारीख पे तारीख'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी निविदेला पहिल्या टप्प्यात प्रतिसाद न मिळाल्याने विद्यमान निविदेलाच महापालिकेने तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची तयारी सुरू केली आहे.त्यामुळे घंटागाडीचे तारीख पे तारीख सुरूच असल्याने अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीही वैतागले आहेत. घंटागाडी संदर्भात गुरूवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत निविदापूर्व बैठक झाली. त्याला ११ ठेकेदारांनी हजेरी लावून अटी शर्ती शिथील करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेला २८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

घंटागाडी निविदेला पहिल्या टप्प्यात कडक अटींमुळे ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. निविदापूर्व बैठकीत २१ ठेकेदारांनी सहभाग घेतल्यानंतरही एकही निविदा आली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने १५ मार्चपर्यंत निविदेला मुदतवाढ दिली होता. निविदापूर्व बैठकीत मुंबई, नाशिक व सुरतच्या ११ ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यांनी दंड व किमान वेतन अटी शिथिल करण्याची मागणी केली. आयुक्तांनीही काही अंशी अटी शिथिल करण्याची तयारी दर्शवली आहे. अटी बदलण्याचा निर्णय झाल्यास निविदा प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार आहे. निविदा उघडण्यासाठी २८ मार्चपर्यंत मुदतवाढीची तयारी सुरू आहे. महापालिकेने सद्यस्थितीतील चारही ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट केले आहे. त्यांचा निर्णय कोर्टात प्रलंबित आहे. निकाल ठेकेदारांच्या बाजुने लागल्यास त्यांनाही निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाच्या राजकारणात भाजपची उडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात पडलेल्या दुष्काळाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या हायजॅक करण्यात शिवसेनेने आघाडी घेतली असली तरीही या मुद्यावर आता भाजपानेही झडप घेतली आहे. दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या बळीराजाच्या सात्वंनाचे भांडवल करण्यासाठी आता भाजपचे मंत्रीही मराठवाड्याच्या तीन दुष्काळी जिल्ह्यांमधून थेट मुख्यमंत्र्यांना 'वन डे फिल्ड रिर्पोटींग' करणार आहेत.

मंत्रिमंडळातील सर्व मंत्री शुक्रवारी (दि. ४) मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यात जाऊन दुष्काळाची दाहकता समजावून घेणार आहे. मात्र, शिवसेनेच्या मंत्र्यांनी अगोदर शेताचे बांध गाठून श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेत मित्रपक्षांमध्ये समन्वय नाही का? या प्रश्नावर बोलताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दुष्काळाची दाहकता समजून घेण्यासाठी तळागाळात पोचण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. दोन्ही पक्षातील दुही पावलो-पावली दिसत असली तरी पक्ष सोबत असल्याचा दावा त्यांनी केला. मंत्री दुष्काळग्रस्त तालुक्यांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. कॅबिनेटसमोर अहवालांच्या एकत्रिकरणातून निष्कर्ष काढला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र’च्या जिल्ह्यात आणखी ३८ शाळा

$
0
0

ashwini.kawale @timesgroup.com

राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आणखी ३८ प्राथमिक शाळा लवकरच जिल्ह्यात कार्यन्वित होणार आहेत. यातील अनेक शा‍ळांच्या इमारतींच्या उद् घाटन कार्यक्रमांचा धडाका संस्थेने आखला आहे, विशेष म्हणजे तब्बल ३२ कोटींच्या कर्जाखाली असलेल्या या संस्थेची वाटचालही कर्जमुक्तीकडे सुरु झाली आहे.

'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या ब्रीदासह शिक्षणाचा वसा घेऊन नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक ही संस्था १९१४ सालापासून कार्यरत आहे. सर्व क्षेत्रांचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी संस्थेच्या स्थापनेपासून विविध कामे केली जात आहेत. त्यादृष्टीने मोठे विस्तारीकरण सध्या सुरू आहे. याच अनुषंगाने दऱ्या, खोरे, पाडे यांवरील विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षण पोहोचवण्याच्या उद्देशाने या शाळा सुरू करण्यात येत आहेत. शिक्षणाचा वसा घराघरात पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यरत मविप्र संस्थेने तीन वर्षांपूर्वी ७० स्वयंअर्थसहाय्यता प्राथमिक शाळा सुरू करण्याचे जाहीर केले. यापैकी ३२ शाळांना सुरुवात झाली असून, उर्वरीत ३८ प्राथमिक शाळाही लवकरच सुरू होणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच पिंपळगाव येथील २० हजार स्क्वेअर फूट जागेवर शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद् घाटन करण्यात आले. तसेच ५४ विद्यार्थ्यांसाठी होस्टेल उपलब्ध करुन देण्यात आले. केटीएचएममध्येही गुरुवारी चार मजली इमारतीचे उद् घाटन करण्यात आले. याशिवाय येत्या शनिवारी (५ मार्च) निफाडमधील दातारा येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळेचे उद् घाटन, १२ मार्चला सायखेड्यात शालेय इमारतीचे उद् घाटन, दिंडोरीतील तीसगाव व सिन्नरमधील कोमलवाडी गावांमध्ये शाळांची उपलब्धता, असे अनेक प्रकल्प येत्या काही महिन्यात पूर्णत्त्वास जाणार आहेत.

संस्थेच्या जमीन क्षेत्रफळांमध्येही तब्बल ११८ एकरची भर गेल्या काही वर्षात पडली असून, ३२ कोटींचा कर्जाचे ओझेही कमी केले आहे. आता संस्थेवर केवळ १ कोटी रुपयांचे कर्जच शिल्लक राहिल्याचा दावा संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केला आहे. गेल्या शंभर वर्षांपासून संस्थेच्या इमारतींच्या दुरुस्त्याही झाल्या नसल्याने यंदा सर्व इमारतींच्या दुरुस्तींना प्राधान्य देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. येत्या काळात संस्थेचा भव्य विस्तार व प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा मानस संस्थेचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेच्या छळाचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गांधीनगर प्रेस क्वार्टर येथील एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घराबाहेर काढल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारत सरकार मुद्रणालय कॉलनी, नाशिकरोड येथील एका विवाहितेचा घरकाम व स्वयंपाक येत नाही या कारणाने वारंवार छळ करण्यात आला. तसेच लग्न चांगले करून दिले नाही व लग्नात योग्य तो मान दिला नाही म्हणून वडिलांकडून १५ लाख रूपये आण किंवा भावाच्या नावावर असलेली जागा तुझ्या नावावर करून घे, यासाठी विवाहितेचा प्रचंड छळ करण्यात आला. तिला शिवीगाळ करून, तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले व घरातून काढून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ट्रक पळवला

कृष्णा रो हाऊस, गायकवाड मळा, नाशिकरोड येथून अज्ञात चोरट्याने एक ट्रक पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली. एमएच १५ एके ४४४४ या क्रमांकाचा ट्रक घरासमोरून पार्किंग करून ठेवलेला होता. तेथून अज्ञाताने हा ट्रक पळविला. उपनगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे.

पोत पळवली

शालिमार येथील रुपमिलन कपड्याच्या दुकानासमोरून एका अज्ञात चोरट्याने २४ हजार रुपये किंमतीची एका तोळ्याची पोत पळवून नेल्याची घटना घडली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 'समोरून मोठे साहेब येत आहेत, दागिने पिशवीत काढून ठेवा' असे खोटे सांगून पिशवीच चोरून नेली असल्याने भद्रकाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घरफोडीचा गुन्हा

अज्ञात चोरट्याने घरफाोडी करून एलईडी टीव्ही व होम थिएटर चोरून नेल्याची घटना घडली. आडगाव पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत या वस्तु चोरून नेण्यात आल्या आहेत.

धडकेने युवक ठार

त्र्यंबकरोडवरील वेदमंदिरासमोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेने एमएच १५ इआर ७७७२ या क्रमांकाच्या पल्सरला धडक दिल्याने त्यावरील युवक मनोज अरूण निकम हा ठार झाला. या गुन्ह्याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात पक्की अतिक्रमण जमीनदोस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पक्क्या अतिक्रमण विरोधातही महापालिकेने मोहीम उघडली असून, गुरूवारी सातपूर व पश्चिम प्रभागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. पश्चिम विभागातील एमराल्ड् हाऊस महात्मानगर येथील कमलेश पटेल यांचे सामासिक अंतरात भिंत व लोखंडी गेट सुमारील लोखंडी गेट, एन. एस. धांडे यांचे ओपन टेरेसवरील पक्के विट बांधकाम असलेले पक्के रुमचे अनधिकृत बांधकाम, कमलेश उगले यांचे टेरेसच्या जागेत सुमारील पक्के विट बांधकाम पाडले. तर स्वामी समर्थ इमारतीतील सलोनी अशोक धात्रक यांचे अनधिकृ बांधकाम, नंदलाल कनोजीया यांचे लॉड्रीचे दुकानाचे अनधिकृत बांधकाम हटविले सातपूर विभागातील, सोमेशवर कॉलनीतील जयराम यादव यांचे सामासिक अंतरातील ३० फूट कंपाऊंड वॉल हटविली.

शहरात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी नियोजन फेरबदल लवकरच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात विभागवार पाणीकपात केल्याने अनेक भागात पाणी पोहचत नसल्याचे आयुक्त डॉ. प्रवीम गेडाम यांनी मान्य केले आहे. नगरसेवकांसोबत केलेल्या पाहणी दौऱ्यात बहुतांश नागरिकांच्या पाणी पोचत नसल्याच्या तक्रारी असून त्यात तथ्य आहे. आठवड्यातून एक दिवस पूर्ण पाणीकपातीचा प्रशासनाचा कल असला तरी काही नगरसेवक विभागवार कपातीच्या बाजूने आहेत, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

विभागवार पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी नगरसेवकांच्या मदतीने प्रभागांचा दौरा सुरू केला. आयुक्त डॉ. गेडाम यांनी गुरूवारी नगरसेवक यंशवत निकुळे यांच्यासोबत विनयनगर व इंदिरानगरमध्ये दौरा करीत पाणीपुरवठ्याची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर आयुक्तांनी चुंचाळे परिसरात जावून पाहणी केली. विभागवार पाणीकपातीने अनेक भागात पाणी पोहचत नसल्याचे दिसून आल्याचे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.

काही जणांना आठवड्यातून एक दिवस तर काही नगरसेवकांना विभागवार पाणीकपात मान्य आहे. मात्र, या संदर्भात पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच नाशिककरांच्या हिताचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

चुंचाळे शिवारात पाहणी

सातपूर : चुंचाळे शिवारात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची कैफियत महापालिका प्रभाग क्रमांक ५० चे नगरसेवक सचिन भोर यांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे मांडली होती. तसेच मंजूर झालेली नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही, याचीही त्यांनी आयुक्तांना माहिती दिली. त्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी गुरूवारी दुपारी चुंचाळे शिवारातील म्हाडा व इतर भागांची पहाणी केली. तसेच परिसरातील रहिवाशांसाठी लवकरच मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करू, असे आयुक्तांनी सांगितले.

दंड अाकारणीस काँग्रेसचा विरोध

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विषयावर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेतली. शहराचे हक्काचे पाणी पळवल्याने पाणीबाणीची बिकट स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी दोन वेळा पाणीपुरवठा होत होता. परंतू, एकवेळ आणि तोही केवळ १५ ते २० मिनिटेच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे किमान एकवेळेस तरी पूर्ण पाणीपुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली. एकीकडे पाणीबचतीच्या नावाखाली पूर्ण पाणी द्यायचे नाही आणि दुसरीकडे मोटारी जप्त करणे व दंड करून नागरिकांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे कारवाई थांबवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यावेळी गटनेता शाहू खैरे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी स्थायी समिती सदस्य राहुल दिवे, नरेश पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदाच्या अर्थसंकल्पात संधी, संकटांचे संतुलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात संधीसंकट या दोघांचे व्यवस्थित संतुलन करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्राला हा अर्थसंकल्प आपलासा वाटेल, अशा तरतूदी त्यात आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले.

मुंजे इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित 'अर्थसंकल्प २०१६' या व्याख्यानात ते बोलत होते. अर्थसंकल्पातील तपशीलांविषयी त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. टिळक म्हणाले की, आर्थिक सुधारणांची पंचविशी, जागतिकीकरणात भारताचे बदललेले स्थान व आर्थिक राजकारण या तिन्ही बाबी बघण्यास मिळाल्या. मागील २५ वर्षांच्या काळात भारतीय अर्थसंकल्पाने कधीही यू-टर्न मारलेला नाही.

अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सर्वत्र या अर्थसंकल्पात काय नाही, याविषयीच चर्चा रंगल्या आहेत. मात्र, यात काय आहे, याचा विचार करणे संयुक्तिक ठरेल. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेच्या परिघाबाहेर फेकली गेली होती. परंतु आता ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या जवळ पोहोचते आहे, यावरुन भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास योग्य दिशेने सुरू असल्याचे दिसून येते. अर्थसंकल्पात मांडलेले विचार, केलेल्या तरतूदी यांचा अभ्यास करता पुढील दोन ते तीन वर्षांचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. तसेच यामध्ये भ्रामक कल्पनांना स्थान दिलेले नाही, ही बाब उल्लेखनीय आहे. तसेच त्यांनी एनपीएस आणि पीएफ यांमधील फरक स्पष्ट करुन सांगितला. प्रास्ताविक कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत देशपांडे यांनी केले. दीपाली चांडक यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. संस्थेचे अशोक अग्रवाल, दिलीप बेलगावकर, डी. के. कुलकर्णी आदी उपस्थित होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीचे पंचनामे सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीने जिल्ह्याच्या अनेक भागांना झोडपले असून, यात चार हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीत एकूण ४ जण ठार झाले असून, २४ जनावरांचाही बळी गेला आहे. तर, ६ हजार ७७६ शेतकरी बाधित झाले आहेत.

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने जवळपास ३ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक २ हजार ४५६ हेक्टर क्षेत्र कांद्याचे, तर त्या खालोखाल ८९८ हेक्टर क्षेत्र गव्हाचे क्षेत्र बाधित झाले आहे. शेतातील पिकांबरोबरच जीवित हानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या आपत्तीत ४ जण ठार तर २ जखमी झाले आहेत. शिवाय २४ जनावरे वीज पडून दगावली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नुकसानीची ही आकडेवारी प्राथमिक असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या तीन दिवसांपासून चार-पाच वेळेस तडाखा देणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कसमादे पट्ट्यासह सिन्नर, निफाड, सुरगाणा, देवळा आदी भागात जोरदार हजेरी लावत कृषी मालाचे चांगलेच नुकसान केले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करत दाखल झालेल्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. यात कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, ते २ हजार ४५६ हेक्टर इतके आहे. त्याखालोखाल गहू (८९७.०३), भाजीपाला (१७९), हरभरा (१३७.१), डाळिंब (१३१.४), द्राक्ष (८९.८) आणि फळपिके (१५.५) अशी हानी झाली आहे.

या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा बागलाण तालुक्याला बसला आहे. १७३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली आहे. त्यापाठोपाठ निफाड (७३५ हेक्टर), इगतपुरी (५३२ हेक्टर), मालेगाव (४३० हेक्टर), कळवण (४६ हेक्टर), दिंडोरी (३९ हेक्टर), सिन्नर (३४ हेक्टर) येवला (२ हेक्टर), नाशिक (०.४० हेक्टर) या तालुक्यांची पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण १३५ गावांमध्ये या अवकाळीचा फटका बसला असून, त्यात जवळपास ६ हजार ७७६ शेतकरी बाधित झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी नापासांना कौशल्य गुण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यामधील कौशल्यगुण ओळखून ते विकसित केले जातील. या मोहिमेद्वारे एकही विद्यार्थी प्रवाहाबाहेर न जाण्याची काळजी शिक्षण विभाग घेईल', असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.

मविप्रच्या केटीएचएम कॉलेजात विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते. उद्घाटनाचा औपचारीक सोहळा पार पडल्यानंतर रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या समारंभात तावडे यांनी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. व्यासपीठावरील औपचारीक भाषणबाजी टाळत त्यांनी थेट उपस्थित विद्यार्थ्यांनाच प्रश्न विचारण्यासाठी आवाहन केले. याला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तावडे म्हणाले, 'दहावीच्या वर्गात अपयशी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही चांगली कौशल्य दडलेली असतात. मात्र अपयशाच्या धक्क्यानंतर ही कौशल्य दडपली जातात. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षण विभाग नव्याने प्रयत्न करेल', असे आश्वासन त्यांनी दिले.

ते म्हणाले, 'शिक्षण पध्दतीत नवे बदल अपेक्षित आहेत. विद्यार्थ्यांमधील विविध गुण, कौशल्ये शिक्षकांना ओळखता यावीत. अधिकाधिक मराठी विद्यार्थ्यांनी आयएएस सेवेत यायला हवे. यासाठी सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांकरीता अनुकूल प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी विविध चुटकूले, शेर अन् किस्से ऐकवत रावसाहेब थोरात सभागृहातला माहोल प्रफुल्लीत केला होता. चुकीच्या अन् तथ्यहीन माहितीचे माध्यमेच उदात्तीकरण करत असल्याची बाजूही त्यांनी या सभृहात काँग्रेसच्या वतीने त्यांच्या विरोधात काढलेल्या मोर्चासंदर्भात बोलताना मांडली. मंत्रीपदावर असताना श्री मल्टीमीडिया या कंपनीत सहभागी असल्याचे व ही बाब नियमांना धरून नसल्याने त्यांनी आता राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते लावून धरताहेत. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी मविप्रच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी खासदार माधवराव पाटील, माजी आमदार माणिकराव बोरस्ते, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील आदी उपस्थित होते. मनोगत प्रतापदादा सोनवणे यांनी केले. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी स्वागत केले. सभापती अॅड. नितीन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. मविप्रची महत्त्वाकांक्षी उद्दीष्टे यावेळी सरचिटणीस निलीमा पवार यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षात नऊ शेतकरी आत्महत्या

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. चांदवड तालुक्यातील नामदेव गीते या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.

अवकाळी पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा अशा विविध कारणांमुळे मनोधैर्य खचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी एकूण ८५ शेतकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. यंदाही हे सत्र सुरुच आहे. नामदेव सुखदेव गीते (३५) या तळेगाव रोही (ता. चांदवड) येथे राहणाऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून गीते यांनी विषप्राशन केल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. यातील एका शेतकऱ्याचा प्रस्ताव पात्र ठरला असून २ प्रस्ताव प्रशासनाने नामंजूर केले आहेत. तर, उर्वरीत ५ प्रस्तावांवर निर्णय होणे बाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरांनी अखेर `कपाट` उघडले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी
दीड वर्षापासून शहराचा विकास ठप्प करणाऱ्या कपाट प्रकरणाची कोंडी फुटण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. राज्य सरकार व महापालिकेने कपाटप्रकरणे नियमित करण्यासाठी अर्ज करण्याच्या केलेल्या आवाहनाला शहरातील बांधकाम व्यावयिक व आर्किटेक्ट यांनी अखेर प्रतिसाद दिला आहे. कपाट क्षेत्राशी संबंधित प्रकरणे नियमित करण्यासाठी गुरुवारपर्यंत तब्बल ७८६ अर्ज दाखल झाले आहेत. आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ही संख्या दुपटीने जाण्याची शक्यता आहे.

शहरातील अनेक बिल्डरांनी इमारतीचे बांधकाम करताना फ्री ऑफ एफएसआयच्या क्षेत्रातच आठ बाय दहाचे कपाट बांधून जास्तीचे बांधकाम करून ते ग्राहकांना विक्री केले आहे. परंतु, हा प्रकार नियमबाह्य असल्याने मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि नगररचना विभागाचे तत्कालीन सहाय्यक संचालक विजय शेंडे यांनी या प्रकाराची गंभीर घेत अशा बांधकाम परवानग्या थांबवल्या. त्यामुळे दीड वर्षापासून सुमारे अडीच हजार इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. आयुक्तांच्या पवित्र्यामुळे बांधकाम व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडलेच; शिवाय ग्राहकांनाही आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशन यांच्यासह आमदारांनी शासनाकडे मागणी केली होती. त्याला राज्य सरकारने प्रतिसाद देत, अशा प्रकरणांची नेमकी संख्या सादर करण्याचे आदेश मनपा दिले होते. त्यामुळे आयुक्तांनी अशा प्रकरणांची संख्या कळविण्यासाठी ३ मार्चपर्यंत कट ऑफ डेट देत बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते.

डॉ. गेडाम यांच्या धाडसी कारभारामुळे बिल्डर व आर्किटेक्ट यांच्या मनात धास्ती होती. प्रकरणांची संख्या जाणून घेऊन महापालिका बांधकामांवर बुलडोझर चालवेल, अशी भीती असल्याने गेले सहा दिवस पालिकेकडे अर्जच आले नाहीत. त्यामुळे मनपा प्रशासन सांशक होते. परंतु, गुरुवारी अर्जदारांची संख्या अचानक वाढली. तब्बल सातशे अर्ज एकाच दिवशी दाखल झाले.

चेंडू शासनाच्या कोर्टात

सदर विषय शासनाकडे विचाराधिन व प्रलंबित आहे. शहरातील अशा प्रकरणांची संख्या निश्चित झाल्यानंतर शासनस्तरावर त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी प्रकरणाची व्याप्ती शासनाला जाणून घ्यायची आहे. त्यानंतरच दंडात्मक कारवाई करून कपाटे अधिकृत केली जाणार आहेत. त्यामुळे व्यावसायिकांच्या नजरा आता शासनाच्या भूमिकेकडे लागल्या आहेत. शासन स्तरावर आर्थिक व्यवहार झाल्याचीही चर्चा आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images