Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी दुष्काळात होरपळून निघालेला असतानाच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्याच्या तोंडचे पाणी पळविले आहे. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आठ दिवसांच्या आत मदत दिली जावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास कोणत्याही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. गेली चार वर्ष संकटांचा सामना त्याला करावा लागत असून, यामुळे त्याचे मनोबलही खच्ची होऊ लागले आहे. एकीकडे बेमोसमी पाऊस आणि गारपीट धुडगूस घालतो. तर, यंदा जून ते सप्टेंबर या ऐन हंगामात पावसाने तोंड फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली. हे संकट कमी म्हणून की काय आता पुन्हा अवकाळी पावसाने धिंगाणा घातल्याने जिल्ह्यातील द्राक्षबागा, डाळिंब, कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला या पिकांची मोठी हानी झाली. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, प्रत्येक ठिकाणच्या नुकसानीचे काटेकोरपणे पंचनामे करावेत, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, शिवा तेलंग, ज्ञानेश्वर दाते, ज्ञानेश्वर थोरात आदींनी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसे नगरसेवक टंचाईमुक्तीसाठी सरसावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडून नाशिककरांवर लादलेल्या पाणीटंचाईला सामोरे जातांना मनसेने शहरवासियांसाठी मोफत पाणी टँकर सेवा कार्यान्वित केली आहे. या उपक्रमासाठी आता प्रत्येक नगरसेवकांनी २ महिन्यांचे मानधन दिले आहे.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेने उर्वरित पाण्याचे प्रभावीपणे नियोजन करून नाशिककरांना दिलासा देणे अपेक्षित असताना मनसेनेही भाजपच्या वाटेवर जात पाण्यावरुन राजकारण सुरू केल्याचे वृत्त 'मटा'मध्ये छापून आले. त्याची दखल घेत मनसेने हा उपक्रम सुरू केला आहे. मनसेने शनिवारपासून ७ पाणीटँकर कार्यान्वित केले. पहिल्याच दिवशी पाणीटँकरच्या शहराच्या विविध भागात ३५ फेऱ्या झाल्या. रविवारीही हा जोर कायम होता सकाळपासून नागरिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून पाणीटँकरची मागणी करीत होते. नागरिकांच्या सोयीसाठी रविवारपासून दोन टँकर वाढवण्यात आले असून आगामी काळात गरज पडल्यास आणखी टँकरची तयारी पक्षाने ठेवल्याचे कळवले आहे.

नगरसेवकांची बैठक

उपक्रमचा एक भाग म्हणून रविवारी सकाळी राजगड कार्यालयावर पक्षाच्या सर्व नगसेवकांनी पक्षनेते अविनाश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यात पाणी टंचाईवर आणखी काय उपाययोजना करता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दोन महिन्यांचे मानधन

सामाजिकतेचा भाग म्हणून मनसेच्या नगरसेवकांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमासाठी दोन महिन्यांच्या मानधनाचे चेक जमा केले आहे. त्यामुळे या योजनेसाठी भरीव रक्कम प्राप्त झाली असून पदाधिकाऱ्यांनीही पक्ष कार्यालयात धनादेश जमा करण्यास सुरूवात केली आहे. उपक्रम ३० जूनपर्यंत सुरू रहाणार असून पाणीटँकरसाठी नागरिकांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर दिले आहेत. टॅँकरची गरज असलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजगड कार्यालय ०२५३-२३१७७७८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमाता’ला रोखणार त्र्यंबकच्या महिला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात पुणे येथील भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी स्थ‌ानिक तसेच, बाहेरील विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्‍थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून मंदिरात पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

शनि शिंगणापूरच्या पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा इशारा दिला आहे. मंदिराची परंपरा जोपासण्यासाठी हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदुत्ववादी संघटना, महिला दक्षता समिती, शारदा महिला मंडळ, पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर, माहेश्वरी महिला मंडळ, आदिवासी संघर्ष समिती, त्र्यंबक नगरपरिषद आणि त्र्यंबकचे नागरिक एकत्र येऊन विरोध करणार आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पेंडाल टाकण्यात आला असून, भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी तेथे महिला थांबणार आहेत. बॅरिकेडिंगही केले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे काम पोलिस पार पाडतील. यापूर्वी ​शनिशिंगणापूर येथे झालेल्या आंदोलनाची व तिथे पोलिसांनी काय केली, याची माहिती घेऊन त्यादृष्टीने कारवाईची रूपरेषा आखण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्ता...

$
0
0

वृन्दा भार्गवे
गेल्या दोन दशकात नजरेत भरण्याजोगा बदल घडलेला दिसतो तो तरुणींच्या जीवनशैलीत. असे विधान अनेक पालक ठामपणे करताना आढळतात. प्रत्येकाचा सूर वेगळा असतो. त्यामागचे विश्लेषण निराळे असते. घरातल्या एकुलत्या मुलीने मला लग्न करायचे नाही असे पंचविसाव्या वर्षी सांगितल्यावर तिच्या निर्णयाने चक्रावलेले पालक कारण विचारतात. एखाद्या सामाजिक प्रकल्पात पूर्णत: झोकून देणार हे तिचे उत्तर. दुसरीकडे थोड्या कर्मठ घरातल्या तरुणीने मी अमुक एका धर्माच्या तरुणाबरोबर लग्न करणार असे म्हणणे, त्याक्षणी घरादाराला बसलेला हादरा किंवा ना सामाजिक कामात रस ना लग्नात, केवळ चिक्कार पैसा कमावणार नि फॅशन इंडस्ट्रीत नाव कमावणार असे एखादीने जाहीर करणे. एखादी कमावलेल्या पैशातून जगप्रवासाला निघते. हिंसेचा निषेध आणि शांततेचा स्वीकार हे तिचे स्वप्न. समाजातल्या दुर्बल घटकांसाठीच समाज माध्यमाला वापरण्याचा एखादीचा पण.. तिच्या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारा पुरस्कार. घरात कोणतेही वातावरण नसताना एका नवीनच क्षेत्रात एखादीने घेतलेली उडी. आंतरराष्ट्रीय महिला दिन रोज कोणत्या न कोणत्या राज्यात आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करणाऱ्या असंख्य तरुणी, महिला. अनेक वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करून आपण काही खास केले नाही म्हणत साधेपणाने जगणाऱ्या.

त्यांच्या विचारात, जगण्यात नकारात्मकता यावी असे बरेच गेल्या काही वर्षात घडले. उदाहरणार्थ पंधरा एक वर्षांपूर्वी आयटी कंपन्या, बीपीओ कंपन्या भारतात आल्या. चकचकीत ऑफीसेस, अलिशान इमारतीतील एसीचे वातावरण, अद्ययावत सोयी-सुविधा, त्याच इमारतीत असणारा कॅफे, बार, रेस्तराँ, नोकरीची कळकट ऑफिसेस इतिहासजमा झाली. त्या जागी पॉश केबिन आली. कॉल सेंटर्स आणि लागोपाठ Macdonald, पिझ्झा हट, सीसीडी, बरिस्ताने केलेला प्रवेश यामुळे मोकळेपणाची दालने खुली होत गेली. पदवी मिळालेले तरुण तरुणी कॉल सेंटर्सकडे आकर्षित झाले. कोणत्याही विषयातील पदवी आणि सोबत इंग्रजीचे उत्तम ज्ञान एवढ्या भांडवलावर अनेकजणी २०००च्या आसपास या आउटसोर्सिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये अहोरात्र काम करू लागल्या. भरपूर पगार ही या जॉबची जमेची बाजू. पॉकेटमनीसाठी हात पसरावे लागण्याचे दु:ख विरून गेले. आयुष्य स्वप्नवत वाटावे, अशा क्षणी केवळ दिनक्रमाने बऱ्याचजणींचा भ्रमनिरास झाला. तो त्यातील जीवनशैलीने.

टीम लीडरची सातत्याने चालणारी देखरेख, संतापी, रागीट ग्राहकांशी संयमाने बोलण्याची खोटी कृत्रिम पद्धत, भाषा आणि उच्चारावर रोज घेतली जाणारी मेहनत, आपले नाव बदलून निराळे पाश्चात्य नाव घेतल्याने स्वतःचे खरे नाव, आपली identity लपवून ठेवण्याचा मनस्ताप. एका वेगळ्याच देशातील कोणीतरी ग्राहकाने आपला केलेला अपमान, भारतीय म्हणून केलेली हेटाळणी तरीही जॉब म्हणून आठ तास सलग नाईट शिफ्टमध्ये काम करावे लागणे. त्यातून खांदे, डोळे, डोकेदुखीचे, निद्रनाशाचे आजार. नैराश्याचे आलेले झटके. खाण्याच्या बदललेल्या सवयी. सर्जनशीलता कमी झाल्याने इतर कोणत्याही कामातला उत्साह नाहीसा होणे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक औषधांचे सेवन.

घरापासून दूर महानगरात राहताना स्वतंत्रच राहण्याच्या सवयीने अनेकींच्या नात्यात उलथापालथ झाली. मनावर फारसा ओरखडा उमटू न देता नव्याने उभारी घेत performance या एकाच शब्दाला अनेकजणी सामोऱ्या गेल्या. या जॉबमुळे मध्यमवर्गातील अनेक तरुणींची आडनाव लावणे, जात-पोटजात, धर्म याबद्दलची मते बदलली. एकेरी नाव ही ओळख. स्त्री-पुरुष समानता हा आग्रह, शरीरसंबंध पाप वगैरे नसून गरज आहे यावर शिक्कामोर्तब. जगण्यातला हा आमुलाग्र बदल.

आज branded कंपन्या, कार्पोरेट क्षेत्रातले वातावरण अनेकींना स्वतःमध्ये बदल घडवण्यास भाग पाडते त्याचे मूळ येथे दडलेले दिसते. कधी क्लायेंट मीटिंग्स, events, त्यासाठी घालण्यात येणारे कपडे, फूड, त्याबरोबरीने येणारी पेय, आवडो न आवडो विशिष्ठ पेहरावाचा केलेला वापर. देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवास करताना एकटीत बदल घडवावाच लागणे हा खरोखर एक निर्णायक टप्पा होता. अर्थात या लाइफस्टाइलमुळे तरुणींचे अध:पतन झाले असे नाही. अनेकजणी चटपटीत झाल्या. त्यांची भाषा, त्यांची संवाद साधण्याची पद्धत. सादरीकरण त्यातील डौल, आत्मनिर्भरता हा बदल वाखाणण्याजोगा होता.

काहीजणी कुटुंबकर्त्या बनल्या. स्वत:च्या हिमतीवर महानगरात घरे घेतली. जिम, पोहणे, फिरणे, मनाला वाटेल तसे जगणे यामुळे कोणाचे निर्बंध त्यांना नकोसे झाले. या जगण्याला विरोध झाला तो त्यांच्याच घरातून. कारण ही जीवनशैली घरातल्यांसाठी नवी होती. गेल्या दशकात वर्क फ्रॉम होममुळे अनेकजणी ऑनलाइन जगणे शिकल्या. घरातून बाहेर पडायचे ते एकदम रात्री किंवा ते देखील नाहीच. घरात भाजीपाल्यापासून सगळ्या गोष्टी ऑनलाइन. जगण्यात साथ देणारा एकमेव कॉम्प्यूटर त्यानंतर मोबाइल. संपर्क करायचा झाला तर घरातल्या घरात या साधनांचा वापर. लग्नाच्या वेळेस रजा, गरोदरपणात रजा आणि वर्षभरात १५ दिवस बाहेर बाकी संपूर्ण वेळ घरात. या नव्या जीवनपद्धतीवर अनेक सर्वेक्षण झाली. संशोधन पेपर लिहिले गेले. बाहेरचे प्रदूषण नको, वाहनाचा प्रवास नको, लोकांच्या नजरा नको, जंक फूड खाणे नको म्हणून घरात बसून काम करणाऱ्यांकडून अधिक उत्तम काम होऊ शकतो हा निर्वाळा संशोधनातून दिला गेला.

वर्क फ्रॉम होममुळे त्यांची जीवन जगण्याची पद्धती बदलली. दिवसभर एका खोलीत बंद, सातत्याने तांत्रिक विषयाशी संबंध. घरात बारीकसारीक गोष्टींमध्ये रुची राहिली नाही. विमानाचे तिकीट असो वा रेल्वेचे अथवा बसचे, ड्रेसपासून डायपरपर्यंत घरात बसल्याजागी सगळे काही येत असेल तर त्यांना इतरांशी संवाद साधणे तो कमी होणे वा जास्त झाल्याने संघर्ष होणे अशा कोणत्याच समस्यांना तोंड द्यावे लागत नव्हते.

आता हे सगळे वाईट की चांगले हा प्रश्न बराचसा अप्रस्तूत ठरतो. महिला दिन साजरा करताना ऐतिहासिक, पौराणिक दाखल्यात या तरुणीचे मूल्यमापन करून चालणार नाही. घरे सांभाळणारी, चार भिंतीच्या आत राहणारी ती आणि चार भिंती छेदून आपले आकाश शोधणारी ती, असा तिचा गौरव करताना आर्थिक, सामाजिक, राजकीय, कृषी, क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्र कोणतेही असो अनेक गोष्टींवर मात करत घेतलेला निर्णय कृतीत उतरवणारी आजची तरुणी जगण्याबरोबर शैली बदलत गेली. दगडाला स्पर्श म्हणजे भूतकाळ, फुलाला स्पर्श म्हणजे वर्तमान आणि अग्नीला

स्पर्श म्हणजे भविष्य असे यू-ट्युबच्या एखाद्या चित्रफितीत म्हणणारी एखादी कर्तृत्ववान स्त्री भूतकाळाला ठेचकाळत नाही. या पिढीची बदलत गेलेली ही धारणा महिला दिनाच्या दिवशी लक्षात घ्यायला हवी.

(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या

अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तकातले मनोहारी नाशिक

$
0
0

अशांत किरकिरकर
काही शहरांना प्राचीन, दीर्घ परंपरा असते. त्यांचा इतिहास लिहिला जावा इतके त्यांचे मोठेपण असते. नाशिक हे असेच शहर आहे. नाशिकला प्राचीन परंपरा लाभलेली आहे. पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद््गार काढले आहेत.

मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला नाशिक हे नाव कसे पडले याबाबत दोन मान्यता आहेत. 'नऊ शिखरांचे शहर' म्हणून 'नवशिख' आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, सीता आणि लक्ष्मण नाशिकमधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शुर्पणखेचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्ष्मणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. नाशिकचा डोंगर हा सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.

गौतमीपूत्र सातकर्णी या राजाच्या आधीपासून येथे अनेक राजांनी राज्य केले. नाहापानाचा पराभव येथेचे झाला. नाहापानाच्या काळात गोवर्धन (आताचे गंगापूर) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. शक व सातवाहन यांच्यात नाशिकलाच संघर्ष झाला. इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभिर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. अभिर या प्रदेशातील गवळी राजे होत. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी. प्रारंभी ती शत्रापांची होती. सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोरांची सत्ता आली. त्यांनी मयुरखंडीला (जि. नाशिक) नाशिकची राजधानी बनविले. नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता. सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला. इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले. इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खान्देशातील थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला. इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.

नाशिकला दीर्घ परंपरा आहे. धार्मिक, ऐतिहासिक अशा साऱ्याच अंगांनी नाशिक समृध्द आहे. म्हणूनच ते पुस्तकातून आल्यावर अंगोपांगी बहरलेले वाटते. प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी १९९१ मध्ये 'नाशिक जिल्हा व महानुभाव पंथ' हे पुस्तक लिहिले आणि अलिकडच्या काळात नाशिकमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांना उजाळा मिळाला. या पुस्तकात चक्रधर स्वामींनी ज्या स्थळांना भेटी दिल्या आहे त्यांची वर्णने आली होती. त्यानंतर २००७ मध्ये डॉ. कैलास कमोद यांचे 'माझं नाशिक' पुस्तक आलं. त्यातून नाशिकचे आधुनिक रूप मांडण्यात आले होते. त्यानंतर काही कालावधीतच म्हणजे २०१३ मध्ये 'नाशिक छायाचित्र' पुस्तक प्रकाशन झाले. किशोर अहिरराव यांनी हे पुस्तक केलेले असून त्यात नाशिकचे छायाचित्रातून दर्शन घडविण्यात आलेले आहे. मध्यंतरी विश्वरूप राहा यांचे 'बर्डस ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट कॉन्झर्वेशन गाईड' हे पुस्तक आले. त्यात नाशिकच्या पर्यावरणाविषयी सर्व माहिती देण्यात आलेली होती. नाशिकला येणारे पक्षी याबद्दल त्यात माहिती होती. याच काळात २०१५ मध्ये नाशिकबद्दल विशेषत्वाने मांडणारे ठाकूर भरतसिंह यांचे पुस्तक आले. 'नाशिक युगो युगों की साक्षी नगरी' या शीर्षकाने आलेले हे पुस्तक म्हणजे नाशिकचा संशोधनरूपी परिपाठच आहे. २०१५ मध्येच नाशिकबद्दल इत्थंभूत माहिती असलेले 'तपोभूमी' हे रमेश पडवळ लिखित पुस्तक प्रकाशित झाले. नाशिकचा सर्व बाबतीत विचार या पुस्तकात करण्यात आला आहे. नाशिकचा इतिहास मांडणारी ही पुस्तके आहेच परंतु अद्यापही शहराचे आकर्षण तीळमात्रही कमी झालेले नाही कारण अजूनही नाशिकवर वेगवेगळ्या अंगाने संशोधन होऊन पुस्तके येतच आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे 'सांस्कृतिक नाशिक' या विषयावर एक पुस्तक प्रस्तावित आहे.

नाशिकच्या विशेषावर आलेल्या या पुस्तकांबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्याच आठवड्यात नाशिकवरची आणखी दोन पुस्तके प्रकाशित झाली. एक म्हणजे डॉ. कैलास कमोदांचे 'डिस्कव्हरी ऑफ नाशिक' व दुसरे म्हणजे मधुकर झेंडे लिखित 'चौकांचा इतिहास' ही दोन्ही पुस्तके नाशिकचा इतिहास मांडणारी आहे. ही दोन्ही पुस्तके अतिशय जाणकार, अधिकारी व्यक्तींनी लिहिली आहेत. 'डिस्कव्हरी ऑफ नाशिक' या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दोन पद्मश्री लाभले. डॉ. अश्विन मेहता व कुमार केतकर अशी बडी मंडळी या पुस्तकांसाठी नाशिकमध्ये आली. त्यांनी नाशिकचे पौराणिक व आधुनिक महत्त्व अधोरेखित केले. तर 'चौकांचा इतिहास' हे पुस्तक इल्युजिनिस्ट

पध्दतीने प्रकाशित करण्यात आले. इल्युजिनिस्ट हा जादूतलाच पुढचा प्रकार आहे.

या पुस्तकाची प्रतिकृती अधांतरी नेत मूळ नाशिकचे परंतु विख्यात झालेले जादूगार सतीश देशमुख यांनी हा कार्यक्रम रंगवला. विशेष म्हणजे त्यांनी ही अधांतरी प्रतिकृती प्रेक्षकांमध्येही नेली व कुतूहल निर्माण केले. त्यानंतर 'स्मार्ट नाशिक' या विषयावर नगररचनाकार सुलक्षणा महाजन यांचे व्याख्यान झाले. अतिशय मार्मिक भाषेत त्यांनी नाशिकविषयी कळकळीने काही गोष्टी व्यक्त केल्या. ऐतिहासिक नाशिकने काळाच्या ओघात प्रचंड आधुनिक रूप ल्यायले असले तरीही त्याची जपणूक करणे आपल्याच हाती आहे, हे महाजन यांच्या सांगण्यावरून जाणवले.

नाशिक हे जात्याच सुंदर आहे परंतु त्याला आता आकार देण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच धार्मिकतेत रामाचे, इतिहासात सावरकरांचे असलेले नाशिक पाहताना पर्यटकांना मनस्वी आनंद होणार आहे.

(नाशिक संदर्भ : विकिपिडीया)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणी बचतीसाठी कसरत करणाऱ्या महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचे फेरनियोजन केले आहे. विभागानुसार आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्याऐवजी आता संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दर गुरूवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागात रोटेशननुसार आठवडातून एक दिवस पाणीकपात करण्यात येत होती. मात्र, यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तसेच, पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिंधीसह नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सूचना व तांत्रिक अधिकाऱ्यांचे अभिप्राय लक्षात घेत प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. यापुढे संपूर्ण नाशिक शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोशल मीडिया’मुळे हिंसाचार

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : इंटरनेट सुविधेसह एक स्मार्ट फोन हवा, असा प्रत्येकाचा आग्रह असतो. काळासोबत चालण्याचे 'स्टेटस सिम्बॉल' म्हणून गणले जाणारे हेच आयुध आता कौटुंबिक हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम करीत आहे. सोशल मीडियाचा वापर पती-पत्नीच्या कलहाला कारणीभूत ठरत असून २०१४ च्या तुलनेत २०१५ यात घटनांमध्ये वाढ झाल्याचे महिला सुरक्षा शाखेच्या नोंदीवरून स्पष्ट होते.

हुंडाबळी, हुंड्यामुळे छळ, विनयभंग, महिलांची हत्या याबाबत काम पाहणाऱ्या शहर पोलिस आयुक्तालयातील महिला सुरक्षा विशेष शाखेकडे २०१५ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराबाबत १८८ तक्रारी दाखल झाल्यात. याबाबत माहिती देताना सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, की ​महिला सुरक्षा शाखेकडे तक्रार आली की पती-पत्नीमध्ये प्रथमतः तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी शुल्लक कारणांमुळे एखाद्या कुंटुंबाची वाताहत होऊ नये, असा त्यामागचा हेतू असतो. समुपदेशनानतंरही पती किंवा पत्नीच्या वागण्यात बदल झाला नाही तर पुढे कायदेशीर कारवाई होते. घरगुती भांडणाच्या कारणांची यादी मोठी आहे. पारंपारीक पध्दतीच्या या कारणांमध्ये मोबाइल व सोशल मीडियाचा वापर करण्यावरून झालेल्या भांडणांची नवीन भर पडत असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर व्यक्ती अनेक परिचित आणि अपरीचित व्यक्तींच्या संपर्कात येतो. सोशल मीडियाचा वारंवार वापर करणाऱ्या व्यक्ती त्यातच गुंग असतात. पती-पत्नीच्या नात्यात त्यामुळे दरी निर्माण होण्यास सुरुवात होते. एकदा की संशयाचे भूत सदर व्यक्तीच्या डोक्यात शिरले की एकमेकांवर आरोप केले जातात.

सुखी कुटुंबाचे हे धनी मग ​पोलिस स्टेशनपर्यंत पोचतात. सन २०१५ चा विचार करता, या वर्षात कौटुंबिक हिंसाचार किंवा पती पत्नीच्या भांडणाच्या २५ पेक्षा जास्त केसेस मोबाइल किंवा सोशल मीडियाचा अतिरेक वापर केला म्हणून समोर आल्यात. त्यातील काही वादांवर समुपदेशनानंतर पडदा पडला. तर उर्वरित प्रकरणात गुन्हे दाखल झाले. सन २०१४ मध्ये अशा पध्दतीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अवघे ५ टक्के होते. म्हणजेच एका वर्षात अशा घटनांमध्ये आठ टक्के वाढ झाल्याचे दिसते.

महिला अत्याचार किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांची लागलीच नोंद होते. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये समुपदेशनाचा पर्याय आम्ही वापरतो. अनेक कुटुंब यामुळे पुन्हा एकत्र येतात. सोशल मीडियामुळे उद्भवणारे वाद सुध्दा वाढत असून त्याचा कुटुंबातील प्रत्येकाने विशेषतः पती-पत्नीने सखोल विचार करणे अपेक्षित आहे.

- सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त, क्राइम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांचा कार्यकर्ता

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या उत्तरार्धात काय काम करावं असा प्रश्न पडतो मात्र इंदिरानगरच्या अनंत घोलप यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याचे व्रत हाती घेतले. फेस्कॉम, आयस्कॉम यासारख्या संस्थामधून जेष्ठांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम ते करीत असतात. ज्येष्ठांचे ओळखपत्र असो अथवा निराधार योजनेचे मानधन मिळविण्याचा प्रश्न असो यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

अनंत घोलप हे मुळचे सिन्नर तालुक्यातील वावी या गावचे रहिवासी. प्राथमिक शिक्षण सिन्नर येथे झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण त्यांनी येवल्याला घेतले. तेथेच १९५२ साली पोस्टाच्या क्लार्क पदासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत घोलप चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन नोकरीला लागले. नोकरी करीत असताना नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सेवा बजावली. त्यावेळी पोस्टातील बचत ही सामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पोस्टात पैसे टाकण्यासाठी किंवा काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक येत असत त्यावेळी त्यांना मदत करणे हा त्यांना छंद जडला. काम झाल्यानंतर जेष्ठांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून बरे वाटे. ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी घोलप ज्येष्ठांना मदत करीत असे.

कालांतराने 3९ वर्षे सेवा झाल्यानंतर घोलप यांनी ज्येष्ठांच्या कार्याला वाहून घेतले आणि १९९० पासून आजतायागायत ते विविध संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीत आहेत. यासाठी ते कुणाकडूनही एक पैसादेखील घेत नाही उलट अनेकदा स्वतःच्या खिशातील पैसे घालून त्यांनी कामे केली आहेत व आजही करत आहेत. ज्येष्ठांसाठी काम करीत असतांना त्यांनी आपली लेखनाची आवड जोपासली असून 'ओंजळ' नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. सध्या ते फेस्कॉमच्या माध्यमातून ते काम करीत असतात. या संस्थेचे त्यांनी अध्यक्षपददेखील भूषवले आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यात २५० जेष्ठ नागरिक संघाची स्थापन केली असून १७५ ज्येष्ठ नागरिक संघाचे ते संस्थापक आहेत.

जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक संघाना ते कायमच आरोग्य, पर्यावरण, समाज प्रबोधन, बचतगट असा वेगवेगळ्या विषयांची माहिती देऊन कार्य प्रणव करीत असतात. ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र द्यावे ही मागणी सरकारने पूर्ण केल्याने हुतात्मा स्मारकातील ज्येष्ठ नागरिक संघात सहकाऱ्यांच्या सोबतीने ओळखपत्र केंद्र सुरू केले असून त्या माध्यमातून ज्येष्ठांना ओळखपत्र मिळवून देत असतात. एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर जेव्हा हल्ले होऊ लागले तेव्हा त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी घोलप यांनी राज्य सरकारकडे मागणी केली. २०१० साली सरकारने ती पूर्ण करुन त्याबाबत अध्यादेश काढला. त्या कामासाठीही ते स्थानिक पोलिसांना मदत करीत असतात. ज्येष्ठांना पेन्शनसाठी जी कागदपत्रे लागतात ती पूर्ण करुन देण्याचे काम ते करतात. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून पर्यावरण विषय त्यांनी गांभीर्याने हाताळला असून ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या नातवाच्या नावाने एक झाड लावावे त्याचे संगोपन करावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पर्यावरणाचे फक्त प्रबोधनच करीत नाही तर जुन्या कापडापासून थैल्या तयार करुन दुकानदारांना देण्याचे काम ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून ते करतात. ज्या रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी होत नाही तेथील डॉक्टरांना गुलाब पुष्प देऊन ते कौतुक करतात. ही चळवळ चागल्या तऱ्हेने समाजात रुजावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. ज्येष्ठ नागरिक संघ प्रत्येक शहरात व ग्रामिण भागात कार्यरत आहेत. या संघाला जागेची आवश्यकता असते काही ठिकाणचे समाज मंदिरे ज्येष्ठ नागरिक संघाला मिळाली आहेत त्याचे विरंगुळा केंद्रात देखील रुपांतर करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांना आपला वेळ आनंदाने

व्यातील करता यावा यासाठी व्यायामाची साधने तयार व्हावीत यासाठी ते प्रयत्नशील असतात.

राज्यातील नव्हे तर परराज्यातील जेष्ठ नागरिक संघांनी देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. रोज एका तरी ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न सोडवलाच पाहिजे असा त्यांचा निर्धार असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारच्या धडकेत महिला ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्कार्पीओ कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री पाथर्डी फाटा परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. सरूबाई एकनाथ सदगिर (५५) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पाथर्डी फाटा परिसरातील नरहरी नगर परिसरात राहणाऱ्या सदगीर या त्यांच्या मुलीच्या दुचाकीवरून येत असताना अंबिका हार्डवेअरसमोर त्यांच्या दुचाकीस पाठीमागून आलेल्या एमएच १५, बीडी ९४०० क्रमांकाच्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिली. या धडकेत सरूबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची मुलगी जखमी झाली असून तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

धावत्या रेल्वेतून पडून जखमी

धावत्या रेल्वेतून पडल्याने मधुकर उत्तम तांबे (५०) जखमी झाले. नाशिकरोड परिसरातील मोरेमळा, बालाजीनगरमध्ये राहणारे तांबे पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ येत असल्याने ते दरवाजाजवळ येऊन थांबले. मोरेवाडी रेल्वे गेटजवळ गाडीतील अन्य प्रवाशाचा धक्का लागल्याने ते खाली पडले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. सुरुवातीस बिटको व तेथून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तांबे यांना हलवण्यात आले आहे.

उड्डाणपुलावर एकास ट्रकची धडक

चारचाकी वाहन पंक्चर झाले म्हणून उड्डाण पुलावर थांबलेल्या एकास भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने उडवले. अस्मल खान माईनद्दीन खान (५०) असे त्यांचे नाव असून अपघात शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील उड्डाणपुलावर घडला. मालेगाव येथे राहणाऱ्या खान यांची अल्टो कार पंक्चर झाली होती. कारच्या थोडे पुढे थांबलेल्या खान यांना ट्रकने उडवले. याबाबत भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कट्ट्यांसह काडतुसे जप्त

नाशिकरोड : शहरातील दोन ठिकाणी छापे टाकून गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने देशी बनावटीचे दोन पिस्तुल, दोन मॅगेझीन, सुरा अशी हत्यारे बाळगणाऱ्या दोघा संशयितांना अटक केली. या संशयितांककडे आढळलेली चोरीची कारही जप्त केली आहे.

अटक केलेल्या संशयितांमध्ये देवळाली गाव येथील गांधीधाम बिल्डींगमध्ये राहणाऱ्या संजय बबन धामणे (३५) आणि आडगाव परिसरातील धात्रक फाटा येथील रमेश उर्फ गंगाधर मालिंग शेट्टी (४६) यांचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र बागुल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी दुपारी धामणे याच्या घरी छापा टाकत त्यास शिताफिने अटक केली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तुल, दोन मॅगेझीन, एक सुरा अशी हत्यारे जप्त करण्यात आली.

धामणे याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिस निरिक्षक संजय सानप आणि सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांनी उपनगरच्या दत्तमंदिर परिसरात चोरीची गाडी घेऊन फिरणाऱ्या शेट्टीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी सुरत येथून चोरलेली जीजे१९, एएफ ००३० क्रमांकाची तवेरा कार गाडी जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ बंदचा कारागिरांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय अर्थसंकल्पात सराफी व्यवसायावर एक टक्का अबकारी कर सुरू केल्यामुळे सराफांनी आपली दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका लहान कारागिरांना बसण्यास सुरुवात झाली असून हा बंद जास्त दिवस राहिला तर उपासमारीला तोंड द्यावे लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सराफी व्यावसायिकांनी मंगळवारपासून बेमुदत पुकारला असून हा अबकारी कर रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहीती नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी दिली. बंदमुळे त्यावर अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायावर परिणाम होत आहे. बंदमुळे सराफ बाजारात शुकशुकाट होता. ग्राहकांबरोबरच सराफ व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर परिणाम होत आहे. सराफ व्यवसायिकांवर सरकारने विविध प्रकारचे कर लादून व्यवसायावर गदा आणली जात आहे. या अगोदरही सरकारने विविध कर लादून व्यावसायिकांना व्यवसाय करणे जिकरीचे केले आहे. सरकारच्या या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर हा कर रद्द करावा यासाठी केंद्र सरकारला निवेदन दिले आहे. याबाबत गुरुवारी (दि. १०) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मध्यस्थी करण्याची गळ घातली असून त्याच्याकरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांना मागण्या सादर केल्या जाणार आहे. या अगोदरही सुवर्ण नियंत्रण कायद्यामुळे सुवर्णकारांच्या दोन पिढ्यांना झळ बसली होती. सरकारने हा अबकारी कर सुरू ठेवला तर पुढच्या अनेक पिढ्यांना व्यवसाय करणे कठीण होऊन जाईल. त्याकरता हा कर लादू नये अशी मागणी करण्यात येणार आहे.

पुण्यात बैठक

कराला विरोध करण्यासाठी शुक्रवारी पुण्यात सराफ व्यावसायिकांची बैठक झाली. बैठकीत करबोजामुळे व्यापाऱ्यांचे कसे नुकसान होणार आहे याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच आंदोलन तीव्र करण्यासाठी १० मार्च रोजी पुण्यात तर १३ मार्च रोजी मुंबईत राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निवेदन दिले जाणार आहे. त्यांनीही सराफ व्यावसायिकांची बाजू सरकार दरबारी मांडावी यासाठी गळ घातली जाणार आहे.

सराफांचा आज मेळावा

नाशिकरोड : सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदसंदर्भात सोमवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजता सावाना शेजारील औरंगाबादकर सभागृहात सराफ संघटनेचा जिल्हा मेळावा होणार असल्याची माहिती नाशिकरोड सराफ असोसिएशनचे सरचिटणीस राहुल महाले आणि नितीन महाले यांनी दिली. नाशिकरोडला सराफाच्या बंद आंदोलनात दिलीप सोनवणे, बबन शहाणे, गणेश शहाणे, राहुल म्हसे आदींनी सहभाग घेतला.

भाजी विक्रेत्यांची गर्दी

सराफ व्यावसायिकांचा बेमुदत बंद सुरू असल्याने सराफ बाजारामध्ये भाजी विक्रेत्यांनी गर्दी केली. त्यांनी बंद गाळ्यांसमोर भाज्या विक्रीसाठी मांडल्या. भाजीबाजार भरल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.

लहान कारागिरांवर संक्रांत

सराफ व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्याची झळ कारागिरांना बसते आहे. काम केले तर पैसे मिळत असल्याने कारागिरांची दोन दिवसांपासून मोठी गैरसोय झाली आहे. बंद जास्त दिवस सुरू राहिला तर कारागिरांना उपासमारीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. नाशिकच्या सराफ बाजारातील अनेक कारागीर हे पश्चिम बंगाल तर काही कारागीर मराठवाड्यातून आले आहेत. त्यांना कामाप्रमाणे मंजुरी मिळते. दोन दिवसापासून काम नसल्याने हातावर हात ठेवून ते बसले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला दिनानिमित्त रंगणार बाइक रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नारीशक्तीला सलाम करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला दिनानिमित्त बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. १३ मार्चला (रविवारी) भोसला मिलिटरी कॉलेजपासून सकाळी ७.३० वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. नाशिककर बाइकर्णींना पुन्हा एकदा नारीशक्तीचे प्रदर्शन करण्याची संधी ही रॅली देणार आहे.

पुरुषांच्या बरोबरीने बाइक चालविणाऱ्या महिलांचा या रॅलीला गेल्या वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला होता. बाइकप्रेमी महिलांचे अनेक ग्रुप्स या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जवळपास आठशे महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.

यंदाही अशा बाइकर्णींसाठी ही रॅली होणार आहे. गेल्या वर्षीच्या बाइकर्णींना यासाठी 'मटा'चे आग्रहाचे निमंत्रण आहे. तसेच, गेल्या वर्षी यामध्ये सहभागी होऊ न शकलेल्या महिलांचेही यंदा होणाऱ्या रॅलीमध्ये स्वागत आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही महिलेला यामध्ये सहभागी होता येणार आहे. परंतु, यासाठी लायसन्स असणे आवश्यक आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असून, नाव नोंदणीसाठी मोबाइलवर BikerallyNSK टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा किंवा ६६३७९३९ या नंबरवर संपर्क साधा. चला तर मग तयार राहा बाइक रॅलीचा आनंद लुटण्यासाठी.

स्त्री सबलीकरणाची केवळ भाषणे ठोकण्यापेक्षा महाराष्ट्र टाइम्समार्फत राबविला जाणारा हा बाइक रॅलीचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. कोणाला दाखविण्यसाठी नव्हे तर महिलांमध्ये आत्मविश्यास जागृत करण्यासाठी ही रॅली नक्कीच उपयुक्त ठरेल. आज अनेक मुली गिअर बाइक चालवितात. त्यामुळे काळाच्या सुसंगत असणारा असा हा उपक्रम आहे.

- नेहा जोशी, अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्याने’ केली शिक्षकांचीच ‘शाळा’

$
0
0

व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पैशांची मागणी

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत आदेश प्रशासनाधिकारी साहेबांनी पारीत केला आहे. त्यानुसार प्रत्येक शिक्षकाचा रेकॉर्ड तयार करावयाचा असून प्रत्येकी ३०० रुपये जमा करावेत. ज्याला कुणाला विश्वास नसेल व हे काम स्वतः करायचे असेल तर कृपया फोनही करू नये व डोके खाऊ नये, शिक्षण विभागाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणाऱ्या अशा आशयाचे मेसेजेस शिक्षकांना पाठवून त्या शिक्षकाने शिक्षकांचीच 'शाळा' केल्याचे समोर आले.

आधुनिक तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. हे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. व्हॉट्स अॅपचा गैरवापर करीत वरिष्ठ वेतनश्रेणीच्या नावाखाली काही शिक्षकांनी थेट ३०० रुपयांची मागणी करून इतर शिक्षकांनाच वेठीस धरले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक आघाडीच्या नावाने हा मेसेज गेल्या काही दिवसांपासून फिरत होता. शिक्षण विभाग अशी पैशांची मागणी का करीत आहे, या शंकेने काही सुज्ञ शिक्षकांनी चौकशी करताच या प्रकरणातील गौडबंगाल समोर आले. काही खोडकर शिक्षकांनी हा मेसेज मुद्दाम व्हॉट्सअॅपवर पसरविल्याचे समोर आले. या प्रकरणातून शिक्षकांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेत महापालिका शिक्षण विभागाने ताबडतोब आपली भूमिका स्पष्ट केली. शिक्षण विभागाने पैशांची कोणतीही मागणी केली नसल्याचे जाहीर केले. प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे व उपमहापौर गुरुमीत बग्गा यांच्या सजगतेमुळे अनेक शिक्षकांची आर्थिक लूट थांबली, असे मतही शिक्षक व्यक्त करीत आहेत. याविषयी शिक्षकसेना पदाधिकाऱ्यांंनी बोलण्यास नकार दिला.


कारवाईची मागणी

शिक्षकांकडून पैसे कमावण्यासाठी शिक्षण विभागाच्या नावाने असे खोटे मेसेज तयार केले असल्याचे महापालिका शिक्षकांनी सांगितले आहे. अवैध मार्गाने पैसे गोळा करण्यासाठी शिक्षण विभागाची बदनामी करीत असलेल्या अशा शिक्षकांवर कारवाईची मागणीही त्यांच्यातर्फे करण्यात आली आहे.



व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेजेस फिरत असल्याचे समजताच आम्ही पत्रक काढून शिक्षकांपर्यंत पोहोचवले. कोणत्याही प्रकारच्या पैशांची मागणी शिक्षण विभागाने केली नसून शिक्षकांनी अशा मेसेजेसला भुलू नये, अशी जागरुकता आम्ही केली आहे.

- गुरुमीत बग्गा, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक शहरासह त्र्यंबकमध्ये हायअलर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाकिस्थानातील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे १० दहशतवादी भारतात आणि विशेषतः गुजरात राज्यात हल्ला करण्याची शक्यता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी वर्तवली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याचा कट रचण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर तसेच, शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग जगप्रसिध्द असून, शिवरात्रीनिमित्त येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. शहरात कपालेश्वर, सोमेश्वर या देवालयात भक्तांची मोठी गर्दी होते. भारतीय गुप्तचर संघटनेच्या माहितीनुसार, देशात घुसलेले दहशतवादी गुजरात राज्यात घातपात करण्याची शक्यता आहे. गुजरातच्या सीमेवरच नाशिक जिल्हा असून, येथे त्र्यंबकेश्वरला ज्योतीर्लिंग आहे. त्यादृष्टीने बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल व इतर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या रस्त्यावर चेक पोस्ट उभारण्यात आले असून, वरिष्ठांकडून येणाऱ्या सूचनांनुसार पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक शहरात संध्याकाळच्या सुमारास चेक पोस्ट लावण्यात आले. पोलिसांचे वेगवेगळ्या पथकांच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांच्या सुखासाठी ‘ती’ वेचतेयं आयुष्य

$
0
0

ashwini.patil@timesgroup.com

त‌िला बाईकवर दूरपर्यंत प्रवास करायला आवडते...म्हणून नुसताच प्रवास करून काय मिळवणार...त्यापेक्षा या प्रवासात जर एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर, या प्रवासाचं चीज होईल आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाची लकेरही उमटेल..याच विचाराने प्रेरित होऊन गोव्यातील पंचवीस वर्षाची कँडिडा लुईस या तरुणीने अवघा दक्षिण भारत पिंजून काढला आहे. कँडिडा ही तरुणी आपल्या या बाइकवरच्या प्रवासात अपंगांसाठी निधी जमा करते आहे.

अपंगांचे दुःख वेचण्यासाठी, त्यांना हवी ती मदत करण्यासाठी तब्बल दोन महिने पंधरा ते सोळा हजार किलोमिटर एकटीने प्रवास करून गोव्यातील कँडिडा लुईस या तरुणीने नुकतीच नाशिकला भेट दिली.

कँडिडाने १९ फेब्रुवारीला गोव्याहून या मोहिमेला सुरुवात केली. गोवा-हुबळी-पुणे-मुंबई-नाशिक या प्रवासात तिने अनेक कॉलेज, संस्था, नामांकीत कंपन्या आणि छोट्या शहरांना भेटी दिल्या. कृत्रिम अवयव (हात किंवा पाय) बसविण्याचा खर्च ज्यांना परवडत नाही अशा व्यक्तींसाठी ती निधी जमा करते आहे. आतापर्यंत अनेकांनी तिला मदत केली आहे. बंगळुरूमधील आदित्य मेहता फाऊंडेशनतर्फे हा निधी गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचव‌िला जाणार आहे.

मूळची हुबळी येथील असलेली कँडिडा एका नामांकित कंपनीत फायनान्स स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत होती. मात्र बाइक चालव‌िणे हे तिचे पॅशन. भारतातील विविध राज्यात बाइकवरून प्रवास करून तिने ही आवड जोपासली. मात्र आपल्या या आवडीतून आणि प्रवासातून कुणालातरी मदत व्हायला हवी असा विचार तिच्या मनात डोकावला आणि तेथूनच सुरू झाला नवा प्रवास. या संपूर्ण प्रवासात ती राहण्याचा, खाण्याचा आणि गाडीचा खर्च स्वतः करते. मदत मिळालेला निधी ती फाऊंडेशनला लगेच पाठव‌िते.

तिच्या प्रयत्नांना सर्व स्तरांतून पाठिंबा मिळतो आहे. आपल्या एकुलत्या एक लेकीच्या निर्णयात पालकही खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहिले. आतापर्यंत अनेक अवघड टप्पे त‌िने पार केले आहेत. मात्र या मधून नवीन भारत मला पाहायला मिळतो असेही ती म्हणते. दक्षिण भारतानंतर आता तिचा उत्तर भारताच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋषभदेवांच्या मूर्तीची गिनीज बुकमध्ये नोंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मांगीतुंगी येथील ऋषभगिरी पर्वतावरील अखंड पाषणात कोरलेली भगवान ऋषभदेव यांची १०८ फुटी उंच मूर्तीची जैन तीर्थक्षेत्रात जगात सर्वाधिक उंच मूर्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या महोत्सवाची महाशिवरात्रीनिमित्त मूर्तीवर महामस्तकाभिषेक करून सांगता करण्यात आली.

गिनीजचे भारतातील संचालक स्वप्निल टाकरीकर यांनी श्री मांगीतुंगी येथे येवून मूर्तीचे मोजमाप करून पाहणी केली. टाकरीकर यांनी या मूर्तीची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली असून त्या संदर्भातील प्रशस्तीपत्र ज्ञानमती चंदनामती माताजी यांचेकडे सुपूर्त केले. या वेळी महामंत्री डॉ. पन्नालाल पापडीवाल, सुमरे काला, सुवर्णा काला, पारस लोहारे उपस्थित होते. दर सहा वर्षांनी भगवान ऋषभदेव यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाहणीचे निव्वळ सोपस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
गेल्या आठवड्यात गारपीट व वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान पूर्व पट्ट्यात झाले असतांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पश्चिम पट्ट्याला धावती भेट दिली. अवकाळीच्या तडाख्यानंतर पालकमंत्री जिल्हाभर फिरून सांत्वन करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांनी यावर पाणी फेरत मुबंई जातांना रस्त्यावरच नुकसानीच्या पाहणीचे सोपस्कार पार पाडल्याची टिका शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने धुमाकूळ घातला. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा या प्रमुख पिकांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात जवळपास आठ हजार हेक्टर पिकांचे नुकसान होवून १२ हजार शेतकरी प्रभावीत झाले. अशाप्रसंगी पालकमंत्र्यांकडून मदतीसह सांत्वनची बळीराजाला अपेक्षा होती. परंतु अवकाळी पावसानंतर पालकमंत्री जिल्ह्यात उश‌िरानेच प्रकटले. त्यातही त्यांनी सोमवारी त्यांनी जिल्ह्याचा धावता दौरा करत नुकसानीची पाहणी केली. परंतू सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूर्व भागाकडे पाठ फिरव‌िली. वास्तविक द्राक्ष, डाळींबाचे मोठे नुकसान झाल्याने या फळबागांच्या पाहणीसाठी महाजन येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु महाजन यांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवत मुंबई जातांना इगतपूरी तालुक्यातील काही भागाला भेट देवून पाहणीचे निव्वळ सोपस्कार पार पाडलेत. त्यांच्या या धावत्या दर्शनाने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडिया बुल्सला आवरा, अन्यथा गोदावरीला धोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

इंड‌िया बुल्स कंपनी गोदावरी नदीतून थेट पाणी उचलत असल्याने निफाड तालुका आणि विशेषतः गोदाकाठावरील गावांचा पाणीप्रश्न बिकट होऊ शकतो. त्यामुळे या कंपनी विरोधात लढा उभारायचा निर्णय सायखेडा येथील बैठकीत घेण्यात आला. निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी हा महत्त्वाचा प्रश्न हाती घेतला आहे.

गोदावरी बचाव संघर्ष समितीतर्फे सायखेडा येथे बैठक आयोजित केली होती. इंडिया बुल्स या कंपनीला सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उचलण्याची परवानगी असताना कंपनी सर्रासपणे गोदापात्रातूंन ५०० अश्व शक्तीच्या तीन मोटर्सच्या सहाय्याने पाणी उचलत आहे. अशाच पद्धतीने पाणी उचलणे सुरू राहिले तर येत्या आठ दिवसात गोदावरी नदी कोरडीठाक पडेल, असे राजाभाऊ शेलार यांनी सांगितले. त्यामुळे या पुढील काळात आपल्याला मोठा लढा उभारावा लागेल. अन्यथा कंपनी जर अशाच प्रकारे पाणी ओढत राहीली तर भविष्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, अशी भीती शेलार यांनी व्यक्त केली.

या बैठकीला माजी पंचायत समिती सदस्य जगन कुटे, अश्पाक शैख यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, भविष्याच्या दृष्टीने मोठा धोका असून याविरोधात राजकीय जोडे बाजूला ठेवत लढा देणे गरजेचे आहे. तसेच न्यायालयात जनहीत याचिका दाखल करावी, असा निर्णय निर्णय घेण्यात आला.

गोदाकाठ भागातील ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, असेही यावेळी ठरले. या बैठकीला शिवनाथ कडभाने, विलास मत्सागर, सुरेश दाते, भाऊसाहेब कातकाडे, सुनील कुटे, आदेश सानप, संदीप कुटे, विजय कारे उपस्थित होते. शनिवारी १२ मार्च रोजी सायखेडा येथे याच विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संधी वेलनेस टुरिझमची!

$
0
0

किशोर अहिरे

वेलनेस म्हणजे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न. यामध्ये आपल्या जीवनातील शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि अध्यात्मिक पातळीवर आपले आरोग्य उत्तम राहावे. तसेच भविष्यात यातून निर्माण होणाऱ्या व्याधींपासून लांब राहण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजेच वेलनेस. वेलनेस ही उत्तम आरोग्य कायम राहण्यासाठी केलेली अत्यंत सकारात्मक अशी गोष्ट आहे. यामुळे कुठलीही व्यक्ती त्याच्या अंगी असलेल्या क्षमतांचा पूर्णपणे विकास करू शकते. आरोग्य व वेलनेस या एकमेकांना अत्यंत पूरक अशा संकल्पना आहेत.

यामध्ये प्रामुख्याने

१) आहार व शारीरिक स्वास्थ्य

२) मानसिक आरोग्य

३) बौद्धिकक्षमता

४) सामजिक/ कौटुंबिक स्वास्थ्य

५) व्यावसायिक अंगांचे स्वास्थ्य

६) अध्यात्मिक व तात्विक घटक या गोष्टींचा समावेश होतो.

कुठल्याही प्रकारच्या व्याधी किंवा कोणतेही आजार होऊ नये यासाठी अत्यंत प्रभावीपणे केलेली उपाययोजना म्हणजेच वेलनेस. भारतात उत्तम आरोग्य जपण्यासाठी पूर्वापार अत्यंत प्रभावी अशा उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो यात प्रामुख्याने योगा, आयुर्वेद, निसर्गोपचार आदी पद्धतींचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जातो.

आपल्या केरळ राज्याने वेलनेस टुरिझम या क्षेत्रात गेल्या काही वर्षात आघाडीचे स्थान निर्माण केलेले दिसते. जगभरातील पर्यटक केरळला या आरोग्यवर्धक उपचार पद्धतींचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देतात. गेल्या काही दशकांत अत्यंत झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास तसेच यातून निर्माण झालेले गतिमान आयुष्य यामुळे आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या अत्यंत उग्र स्वरूप धारण केलेल्या दिसतात. मानसिक ताणतणावात झालेली वाढदेखील आपल्या आरोग्यावर परिणाम करतात.

वेलनेस या संकल्पनेचे यामुळेच जगभरात महत्त्व वाढलेले दिसते. आपली जीवनपद्धती आरोग्यपूर्ण कशी होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. हे आता सगळ्यांनाच पटलेले दिसते त्यामुळे वेलनेस टुरिझम (आरोग्य पर्यटन) या क्षेत्राला यातून मोठी संधी निर्माण झालेली दिसते. नाशिक व परिसरात आरोग्य पर्यटनाला इथल्या अल्हाददायी वातावरणात मोठा वाव आहे, देवळालीला असलेले सॅनिटोरीअम्स हे आपल्या आरोग्य पर्यटनाची परंपरा दर्शवतात. सुमारे दोनशे वर्षांपासून मुंबईतील आर्थिकदृष्ट्या संपन्न समुदायांनी देवळालीत आरोग्यधाम (सॅनिटॉरीअम) बांधण्यास सुरुवात केली होती. इगतपुरी येथील विपश्यना केंद्र यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले दिसते. रोजच्या जीवनातून निर्माण होणारे मानसिक ताणतणाव व व्याधी यांच्यापासून मुक्त होण्यासाठी विपश्यनेसारखी ध्यानधारणेची (मेडिटेशन) प्राचीन पद्धतीचा लोक आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करतांना दिसतात. नाशिक येथे असलेले योग विद्याधाम व त्यांसारख्या इतर बऱ्याच संस्था अत्यंत उत्तम दर्जाच्या उपचार पद्धती वापरून रुग्णांना बरे करतांना दिसतात.

नाशिक जवळपासच्या परिसरात योगा, आयुर्वेद तसेच निसर्गोपचार आदी उपचार पद्धती पुरवणाऱ्या संस्था तसेच रिसॉर्ट्स यांना मोठा वाव आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर, नाशिक-इगतपुरी, वणी-दिंडोरी, मांगी-तुंगी परिसरात पर्यटकांना आरोग्य सुविधांसोबतच उत्तम दर्जाची आतिथ्य सेवा जर पुरवली तर आरोग्य पर्यटनाला मोठा वाव मिळेल.

उरळीकांचन, लोणावळा येथे गेल्या काही वर्षात आरोग्य पर्यटन क्षेत्राचा चांगला विकास होतांना दिसतो आहे. त्याच धर्तीवर नाशिक व परिसरात उत्तम दर्जाचे रिसॉर्टस, योगा व मेडिटेशन सेंटर जर विकसित झाले तर या क्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकपासून दोन तासाच्या अंतरावर मुंबई महानगर क्षेत्र आहे. ज्याची आजची लोकसंख्या जवळजवळ सहा करोड आहे. ही बाब नाशिक व परिसरात वेलनेस (आरोग्य पर्यटन) क्षेत्राची वाढ अत्यंत अनुकूल अशी आहे. अगदी पंचतारांकित दर्जाच्या सेवा सुविधा जर यासाठी जर निर्माण केल्या तर पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे आपल्याकडे येतील. यातून ग्रामीण भागात रोजगाराच्या देखील मोठ्या संधी उपलब्ध होतील. तसेच नैसर्गिक (ऑरगॅनिक) भाजीपाला व अन्नधान्य यांची देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. केरळच्या धर्तीवर आपल्या दुर्गम भागात जर अशा सुविधा निर्माण झाल्या तर स्थानिकांच्या सहभागातून उत्तम दर्जाची सेवा आपण पर्यटकांना पुरवू शकतो.

वेलनेस टुरिझम (आरोग्य पर्यटन) याची मुख्यत्वे आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न अशा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे यासाठी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी तयार असतील. त्यामुळे आपण जितक्या उच्च दर्जाच्या सेवा पुरवू तेवढा या क्षेत्राचा विकास होत जाईल.

वेलनेस टुरिझम (आरोग्य पर्यटन) या क्षेत्राला उच्च दर्जाचे आतिथ्यसेवा तसेच करमणुकीची साधने जर पुरवली तर याचा निश्चितच मोठा विकास होण्याची शक्यता आहे. एक मोठी संधी आपले दार ठोठावते आहे. गरज आहे ती यात आपला अधिकाधिक सहभाग होऊन संधीचे सोने करण्याची.

(लेखक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमाता ब्रिगेडच्या मोर्चामुळे भाविकांची घटली संख्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

भूमाता ब्रिगेडचे आंदोलन आणि दहशतवादी हल्ल्याच्या हायअलर्टच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्र उत्सव तणावपूर्ण वातावरण पार पडला. सोमवार आणि सिंहस्थ पर्वकालात आलेला महाशिवरात्रीचा योग असूनही भाविकांची संख्या मात्र रोडावल्याचे दिसून आले.

पहाटे मंदिर दर्शनासाठी खुले झाले तेव्हापासून दर्शनबारी गजबजली होती. मात्र, नेहमीपेक्षा गर्दी कमी असल्याचे स्पष्ट जाणवत होते. अवघे लाखभर देखील भाविक आले नसावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पूर्वदरवाजा दर्शनमंडपाचे बाहेर दर्शनरांग गेली. मात्र, काही तासातच केवळ मंडपातच थांबली. भाविकांनी शिवास बेलपत्र अपर्ण करण्यासाठी गर्दी केली होती.

दुपारी दोन वाजता निघणारी पालखी खास विशेष असते. ही पालखी पाचआळी मार्गे कुशावर्तावर जाते. या मार्गावर संस्थानिक जोगळेकर यांचे निवासस्थान आहे. मंगलवद्यात पालखी निघाली तेव्हा नागरिकांनी सडा संमार्जन रांगोळ्या काढल्या होत्या. कुशावर्तावर विधीवत पूजा होऊन त्र्यंबकराजाचा सुवर्ण मुकूट असलेली पाळखी पुन्हा मंदिरात आली. महाशिवरात्रीस येथे शिवास उसाचा रस अपर्ण केला जातो. यामुळे उसाच्या गुऱ्हाळावर गर्दी होती. शहरातील सर्व शिवमंदिरात हरहर महादेवाचा जयघोष सुरू होता. बेलपत्र कवठाचे फळ आणि उसाचा रस वाहण्यासाठी रांगा लागल्या होत्या. राज्याचे अर्थमंत्री, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

दिवसभर भाविक दर्शनासाठी येत होते. मात्र, दर ‌शिवरात्रीला होणारी गर्दी यावेळी पहायला मिळाली नाही. पेड दर्शनही बंद ठेवण्यात आले होते. तसेच बॅरिकेडिंगमुळे भाविकांना सिंहस्थाचा पुन्हा एकदा अनुभव आला. पोलिसांनी चोख नियोजन केले होते. यामुळे कोणताही अनूचित प्रकार घडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत व्यापाऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा व्यापाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. करीम इस्माईल बागवान (वय ६०) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. बागवान यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास बाजार समितीतील गाळा क्रमांक ५५ येथे गळफास घेतला. घरच्यांच्या संपर्कापासून तुटलेल्या बागवान यांचा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. आर्थिक व्यवहारात फसलेल्या बागवान यांच्यावर कर्ज झाले होते. त्यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

एकास जबर मारहाण

मागील भांडणाच्या कुरापतीमुळे तिघांनी एकास जबर मारहाण केल्याची घटना पंचवटी परिसरात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. जेलरोडपरिसरातील धर्मेंद्र महादू तांबे हे रघुवीर इमारतीसमोरील पानटपरीवर उभे असताना संशयित दीपक गोरख पाटील, बंटी बापू मानकर व लक्ष्मण बापू मानकर यांनी मागील भांडणाची कुरापत काढून फावड्याच्या दांड्याने तांबेना मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images