Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दरोडेखोरांची टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यातील मध्यरात्री गस्तीवरील पथकाने मालेगाव येथील पाच दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी पकडलेल्या पाचपैकी एक जण पळून जाण्यास यशस्वी झाला होता. त्यालाही पकडण्यात पोलिस यंत्रणेला यश आले. या गुन्हेगारांकडून मिळालेल्या साहित्यावरुन त्यांचा दरोडा घालण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
या सर्व प्रकाराबाबत धुळे पालिस दलाकडून एक पत्रकार परिषद घेऊन यांचा खुलासा करण्यात आला. पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील यावेळी अधिक माहिती दिली. यात पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, रामकृष्ण सोनवणे व कर्मचारी शनिवारी मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी अग्रवाल नगर भागात दोन मोटार सायकलवर पाच व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचे या पथकाला दिसले. त्यांना पाहून या पाचही जणांनी वडजाई रोड भागात पळ काढला. या गोष्टीचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तत्काळ यंत्रणा आखून वडजाईरोड परिसरात पहारा ठेवत शोध घेतला. त्यावेळी मुंबई-आग्रा महामार्गाच्या पुलाखालील बोगद्यात या पाचही संशयितांना पोलिसांनी पकडले.
त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे चोरीच्या दोन मोटार सायकल, चार मोबाईल, दोन सुरे, मुखवटे, मोटार स्क्रू-ड्रायव्हर, विविध मोबाइल कंपन्याचे सिमकार्ड आदी साहित्य हस्तगत करण्यात आले. यावरुन हे दरोडा टाकण्याच्या हेतूनेच आले असावेत असे स्पष्ट होते. याप्रकरणी आझानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ग्रीन टेररिस्ट’ प्रकरणाची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महासभेतील चर्चेदरम्यान पर्यावरण प्रेमींना 'ग्रीन टेररिस्ट' म्हणून हिणवण्यात आले. यामुळे मानहाणी झाल्याचा दावा फिर्यादीने केला असून, त्याची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल २४ एप्रिलपर्यंत सादर करावा, असा आदेश कोर्टाने दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे स्विकृत नगरसेवक सचिन महाजन यांच्या अडचणी वाढू शकतात.

स्मार्ट सिटी प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी जुलै २०१५ मध्ये महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नगरसेवक सचिन महाजन यांनी ग्रीन टेररिस्ट असा उल्लेख केला. गोदावरीत गटारयुक्त पाणी मिसळत असल्याचे खोटे फोटो टाकून काही 'ग्रीन टेररिस्ट' स्वत:चे उखळ पांढरे करीत आहेत, असे आरोप करून गोदावरी गटारीकरणविरोधी मंचचे निशिकांत पगारे तसेच राजेश पंडित यांच्याविरोधात महाजन यांनी महासभेत आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. पर्यावरणप्रेमींच्या नावाखाली शहरात 'ग्रीन टेररिस्ट' सक्रिय झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे 'ग्रीन टेररिस्ट' पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली अनेक चांगल्या विकासाच्या योजनांमध्ये खीळ घालत आहेत. त्यांना वेळीच लगाम घालण्याची गरज असून, यातील काही 'टेररिस्ट' गोदावरीत गटारयुक्त पाणी कसे सर्रास मिसळतेय याचे खोटे फोटो फेसबुकवर टाकून दिशाभूल करीत असल्याचे म्हटले होते. या वेळी बोलण्याच्या ओघात महाजन यांनी पगारे आणि पंडित यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले होते. त्यात पंडित यांना महाविद्यालयातून कसे काढून टाकले, या विषयावर प्रकाश टाकला होता. याबाबतची माहिती राजेश पंडित यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मानहाणी झाल्याची तक्रार त्यांनी दिली. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. यानंतर, अॅड. धिरेंद्र पोंक्षे व सर्वेश झोडगेकर यांच्या मार्फत पंडित यांनी प्रथम वर्ग दंडाधिकारी डी. डी. कोळपकर यांच्या कोर्टात फिर्याद दाखल केली.

२४ एप्रिलपर्यंत अहवाल

या प्रकरणात फिर्यादीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चौकशी करून त्याचा अहवाल २४ एप्रिलपर्यंत कोर्टात सादर करण्याचे आदेश न्यायाधीश कोळपकर यांनी दिले. यामुळे राष्ट्रवादीचे स्विकृत नगरसेवक सचिन महाजन यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडिया समाजासाठी वापरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक सोशल मीडियामुळे व्यक्तीला अनुभव मांडण्याचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे दूरची माणसे जवळ येऊ लागली आहेत. या माध्यमाचा उपयोग विधायक सामाजिक कार्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केली.

लायन्स क्लब सभागृहात कलाकुंजतर्फे आयोजित व्हॉट्सअॅप ग्रुपच्या प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्योजक अशोक कटारिया, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, पत्रकार दीपक साळवी, लायन्स क्लबचे अध्यक्ष भाऊ सोनवणे, राज्य सरकारच्या मराठी भाषा संवर्धन पुरस्कार विजेत्या बेबीताई गायकवाड, महेंद्र देशपांडे, संगीता फुके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणाले, 'सोशल मीडिया हे समन्वयाचे आणि संवादाचे उत्तम माध्यम आहे. प्रसारमाध्यमातून न मांडल्या जाणाऱ्या समस्या सोशल मीडियाद्वारे मोठ्या समूहापर्यंत पोहोचतात. व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमामुळे तर विविध वयोगटांतील व्यक्ती एकाच पातळीवर येऊन संवाद साधू शकतात. मात्र हे साधन केवळ चॅटींगपुरते मर्यादीत न ठेवता सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले.

अपारंपरिक क्षेत्रातही नव्या पिढीला मोठ्या संधी उपलब्ध असून, अशा क्षेत्राची माहिती सरकारच्या 'महान्यूज' वेबपोर्टलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. स्पर्धा परीक्षा, कृषी, सरकारची धोरणे आदी माहिती लोकराज्य मासिकामधून प्रकाशित होत असून, ते देखील अधिकाधिक वाचकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. कोणतेही काम कमी दर्जाचे नसून प्रत्येकाने निवडलेल्या क्षेत्राला समाजाकडून प्रतिष्ठा मिळायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गायकवाड म्हणाल्या, 'सरकार आणि समाज एकत्र आल्यास मोठे परिवर्तन शक्य आहे. हल्ली माणसाची मने वाचणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानापासून वाचनसंस्कृती रुजविण्याची प्रेरणा मिळाली तर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या 'अग्निपंख'ने कार्याचे बळ दिले, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छाजेड यांनी भाषा संवर्धन अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सोशल नेटवर्किंगने क्रांती घडवली असून सामाजिक कार्यासाठी चांगली उपयोगात आणता येईल,' असे मत व्यक्त केले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी, गाळ्यांवरुन वादंग?

$
0
0



फेरीवाला झोनवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधक आक्रमक, प्रशासनाची लागणार कसोटी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मंगळवारी (दि. १५) होणाऱ्या महासभेत पाणीटंचाईवर उपाययोजनेसाठी ११ कोटी खर्चासह फेरीवाला झोनच्या आराखड्याला मंजुरीचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच प्रशासनाने शहरातील १७२० गाळ्यांच्या फेरलिलावाचा प्रस्ताव पुन्हा ठेवल्याने प्रशासन विरूद्ध सत्ताधारी असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई उपाययोजनांच्या निविदा प्रशासनाने महासभेची मंजुरी न घेताच सुरू केल्यावरून सत्ताधारी मनसेसह, शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रशासनाला जाब विचारणार आहे.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महासभा होत आहे. यात आनंदवल्ली ते नांदूर पूल दरम्यान गोदावरी नदीपात्रातील पानवेली व तत्सम कचरा बोटीच्या सहाय्याने काढण्याचा एक कोटी खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. तर इंग्रजी शाळांचे रुपांतर माध्यमिक सेमी इंग्रजी शाळांमध्ये करणे, पाणीटंचाईवर उपाययोजनेसाठी ११ कोटीचा खर्च महापालिका निधीतून करणे, महापालिकेच्या मालकीच्या १७२० गाळ्यांचा फेरलिवाव करणे, राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलबजावणीसाठी मुक्त फेरीवाला क्षेत्रे, प्रतिबंधित फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यासह प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाच कोटी खर्चास मान्यता मिळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

यात सर्वाधिक वादळी चर्चा पाणीटंचाई उपाययोजनेच्या ११ कोटीच्या प्रस्तावावर होणार आहे. प्रशासनाने महासभेची मंजुरी घेण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तर पाणीटंचाई उपाययोजनेसाठी राज्यसरकारने निधी द्यावा अशी मागणी अगोदरच सदस्यांनी केली होती. तरीही प्रशासन हा खर्च महापालिका निधीतून करत आहे. तर मंजुरी आधीच निविदा प्रक्रिया सुरू केल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही संतप्त झाले. त्यामुळे प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. तर शहरातील १७२० गाळ्यांच्या फेरलिलाव व रेडिरेकनर दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस असून स्थायी समितीने अगोदरच फेरलिलाव फेटाळला आहे. त्यामुळे महासभेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीलाही विरोध होण्याची शक्यता आहे.

नगरसेवक आक्रमक

प्रशासनाने कॉलनी रस्त्यांमध्ये फेरीवाला झोन प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे यावरून सदस्य प्रशासनाला जाब विचारणार आहे. प्रशासनाने ८३ 'ना फेरिवाला झोन' निश्चित केले आहेत. तर नऊ हजार फेरीवाल्यांसाठी २५० ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या धोरणाला नगरसेवकांसह फेरीवाला संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे या प्रस्तावावरून सदस्य व प्रशासन आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा कडवा विरोध

गाळ्यांच्या फेरलिलावासह रेडिरेकनरच्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला आहे. तर पाणीटंचाई उपाययोजनेचा विषय महासभेने मंजुरी दिली नसतांनाही निविदा प्रक्रिया कशी सुरू झाली असा सवाल गटनेता अजय बोरस्ते यांनी उपस्थित केला आहे. महासभेच्या मान्यतेपूर्वीच अंमलबजावणी कशी केली असा जाब महापौरांनी शिवसेना विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेचे गाळे हे व्यापारासाठी नसून भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी आहेत. त्यामुळे त्यांना १५ वर्षाची मुदतवाढ देवून नियमानुसार १० टक्के दरवाढ लागू करावी, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. तर मनसे, काँग्रेसची महासभापूर्व बैठक मंगळवारी सकाळी होणार आहे.


नासाडी महागात पडणार

पाणीबाणीची स्थिती गंभीर होत असून नासाडी करणाऱ्यांना जबर दंडाची कारवाई प्रशासन प्रस्तावित केली आहे. टंचाईतही पाण्याची नासाडी व बेजबाबदारपणे पाण्याचा वापर करणाऱ्यांवर मोठा आर्थिक दंड ठोठावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. सिंगल कनेक्शनधारकाने पाण्याची नासाडी केल्यास त्याला जागेवरच दोन हजार ते पाच हजार रुपये दंडाची तरतूद होणार आहे. सोसायटीसाठी ८ ते २० हजार आणि व्यावसायिक वापर धारकाला १२ ते ३० हजार रुपये दंड केला जाणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून महासभेने त्यास मंजुरी दिल्यास नागरिकांना जबर दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय वेतन अनुदानाचा रेंगाळला प्रश्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक
राज्यातील अशासकीय आयटीआय वेतन अनुदान प्रश्नावर तयार होणारा प्रस्ताव एप्रिल महिन्यापर्यंत रेंगाळला आहे. महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटना आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक (प्रशिक्षण) यांनी वेतन अनुदान प्रश्नावर एकत्र बसून एक प्रस्ताव १५ दिवसांत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाला सादर करण्याचे आदेश राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले होते. मात्र शनिवारी या आदेशाला १५ दिवस उलटले असले, तरी संचालक व संघटनेची बैठक झालेली नसल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी केला आहे.

बोरस्ते यांनी सांगितले की, १६ फेब्रुवारीला राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यात माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी पाटील यांना अशासकीय आयटीआयमधील विविध समस्यांची माहिती दिली. सन २००० पूर्वीच्या अशासकीय आयटीआयमधील शिक्षकांना वेतन अनुदान देण्यासंदर्भात विनंती केली. त्यावर पाटील यांनी संचालनालयाच्या संचालकांना १५ दिवसांत संघटनेसोबत बैठक घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप बैठक झालेली नाही. यासंदर्भात संचालनालयाच्या संचालकांना विचारणा केली असता एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे वेतन अनुदान संदर्भातील प्रस्ताव तयार होण्यासाठी आयटीआयमधील शिक्षकांना एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या सागरचे राष्ट्रीय स्तरावर यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी आयआयटी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या 'आकार' या टेक्निकल स्पर्धेत नाशिकच्या सागर शिंदे या विद्यार्थ्याने राष्ट्रस्तरावर यश मिळवले. देशभरातून २७४ ग्रुप्सने सहभाग नोंदवलेल्या या स्पर्धेत सागरने पहिला क्रमांक मिळवला.

देशाची वाटचाल स्मार्टनेसकडे होते आहे. या वाटचालीत विद्यार्थ्यांच्या कल्पना जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्या जाणून घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन आयआयटी मुंबईच्या सिव्हिल विभागातर्फे करण्यात आले होते. 'ब्रीज मेकिंग' ही थीम विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी देण्यात आली होती. 'कमीतकमी वजनाचे मॉडेल व जास्त भार उचलण्याची क्षमता' या नियमाखाली विद्यार्थ्यांना हे मॉडेल तयार करायचे होते. त्या अनुषंगाने सागर याने आईसक्रिम स्टिक्स, फेव्हिकॉल व कॉटनचा दोरा यांचा वापर करून ब्रीज तयार केला. २७८ ग्रॅम इतके वजन असलेले मॉडेल तयार केले. ९४ किलो वजन पेलण्याची ताकद या मॉडेलमध्ये असल्याने परीक्षकांच्याही ते पसंतीस उतरले.

केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या सिव्हिल विभागात इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षास शिकत असलेल्या सागर शिंदेने इंटरनेटवरून विविध प्रोजेक्ट्सचा अभ्यास करून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. यापूर्वी आयआयटी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या टेकफेस्टमध्येही सागरने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

इंटरनेटवरून वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करून हा प्रोजेक्ट तयार केला. या स्पर्धेत त्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्या साठी फायदा झाला. पुढचे शिक्षणही स्ट्रक्चर संबंधित विषयात घेऊन अशा प्रोजेक्टवर भर देणार आहे.

- सागर शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही प्रतीक्षेतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशाचे वेळापत्रकाची पुनर्रचना करण्यात आली असली तरी यानुसारही शाळांची नोंदणी अद्याप पूर्णत्त्वास पोहोचलेली नाही. जिल्ह्यातील ३६९ शाळांपैकी २१६ शाळांचीच नोंदणी झाली असून, अद्याप १५३ शाळांची नोंदणी बाकी आहे. शाळांना दिलेला नोंदणीचा कालावधी उलटून गेला असल्याने शिक्षण विभागाने केलेले वेळापत्रक पुन्हा एकदा फोल ठरले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा अधिनियम २००९ नुसार आर्थिक दुर्बल घटकातील बालकांपर्यंत शिक्षणाचा हक्क पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आरटीई प्रक्रिया राबविली जात असते. गेल्या वर्षी या प्रक्रियेत गोंधळ उडाला होता. पालकांमध्ये जनजागृती नसणे, विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतानाही प्रवेश न मिळणे, शाळांनी प्रवेश नाकारणे अशा अनेक समस्यांमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागले होते. यंदा या समस्या येऊ नये व ही योजना पूर्णतः पारदर्शी असावी, यासाठी सर्व प्रक्रिया राज्यभर ऑनलाइन स्वरुपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मागील महिन्याभरापासून शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी वेळापत्रक बनविण्यात आले.

शाळांची नोंदणी पूर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सुरुवात होऊ शकत नाही. यामध्ये येत असलेल्या अडथळ्यांना अभ्यासून योजना राज्यभर राबविली जात आहे. यास विलंब होत असला तरी वेळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील.

- प्रविण अहिरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक विभाग



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मा व्हॅलीत अनुवादीत बहुभाषी सा‌हित्य संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅलीच्या शैक्षणिक संकुलात येत्या २६ आणि २७ मार्चला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय अनुवादित बहुभाषी साहित्य संमेलन होणार आहे. योकोहामा येथील इंडो जपान इंटरनॅशनल रिसर्च सेंटरच्या राजकुमारी गौतम या प्रमुख भाषण करणार असून, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू सुधीर मेश्राम उद्‍घाटक असतील. दहा भाषांतील अनुवादित साहित्यावर यावेळी चर्चा होणार आहे.

संमेलनात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषा, त्यातील साहित्य, अनुवादाची प्रक्रिया यावर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यात फ्रेंच, संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, अमेरिकी इंग्रजी, उर्दू, अहिराणी, लेवा पाटीदार, गुजराती, हिंदी आणि मराठी या भाषांतील साहित्य आणि अनुवादाची पध्दत यावर मंथन होणार आहे.

अंजनेरीच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात हे संमेलन होणार असून, सकाळी नऊला उद्‍घाटन होणार आहे. प्राचार्य डॉ. बापूराव देसाई प्रास्ताविक करतील. पुणे विद्यापीठाच्या बीसीयुडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, आयएमसी बँकेचे संचालक अशोक सोनवणे, भाषा संचलनालयाचे डॉ. संजय पवार, भगवान खैरनार, ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार, शिवाजी पाटील, निळकंठ देसाई उपस्थित राहतील.

फ्रान्सचे लुईस व्हास्ट प्रोव्ही, अमेरिकेतील डॉ. विद्या चिटको फ्रेंच भाषेच्या अनुवादासंदर्भात चर्चा करणार आहेत. न्यू जर्सी येथून सिंधुमती वरणगावकर, डी. एल. ठाकूर संस्कृत प्राकृतवर मार्गदर्शन करणार आहेत.

इंग्रजी साहित्य अनुवादावर डॉ. आसाराम बागूल, प्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, प्रा. मोनाली धांडे, डॉ. राजेश झनकर मार्गदर्शन करतील. उर्दू भाषेसंदर्भात डॉ. रफिकोद्दीन काझी, मुंबईचे मोहतरम अलहाज, अब्दुल मजीत झकेरिया, डॉ. समीर सय्यद चर्चा करणार आहेत.

अहिराणी लेवा पाटीदार भाषेवर डॉ. सुरेश पाटील, डॉ. बाळासाहेब गुंजाळ, प्रा. भगवान पाटील, डॉ. के. के. बच्छाव मंथन करतील. गुजराती भाषेतील अनुवादित साहित्यावर बडोद्याच्या डॉ. लता सुमंत, डॉ. कल्पना गवळी, मनाली जोशी, जयू पटेल चर्चा करणार आहेत. हिंदी भाषेवर दिल्लीच्या डॉ. अनुराधा सिंगर, रांचीच्या डॉ. बालेन्दूशेखर तिवारी, डॉ. रामप्रकाश वर्मा आणि डॉ. प्रतिभा धारासूरकर, चर्चा करतील. मराठी भाषेवरील अनुवादित साहित्यावर मराठी लक्ष्मीकमल गेडाम, डॉ. निलकांत चव्हाण, प्रा. देविदास गिरी मार्गदर्शन करणार आहेत.

२७ मार्चला समारोप

२७ मार्चला दुपारी ३ वाजता राष्ट्रीय हिंदी भाषा सल्लागार सुभाष चंदर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. यावेळी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भाषा विभाग संचालक डॉ. म. सु. पगारे, डॉ. सुनील कुलकर्णी, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राचार्य दिलीप पानगव्हाणे प्रमुख पाहुणे असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्त विद्यापीठाचे कार्य महाराष्ट्रासाठी गौरवास्पद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
'यशवंतराव चव्हाण यांनी सहकार, कृषी, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या दृष्टीकोनातून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आयोजित केलेल्या त्यांच्या जीवनावरील राष्ट्रीय कार्यशाळेतून समाजाला वेगळी दिशा मिळेल,' असा विश्वास सिक्कीम राज्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. यशवंतरावांच्या जन्मापासून मृत्यपर्यंतचा प्रवास कलादालनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याचेही ते म्हणाले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेच्या वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप सोमवारी श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे हे होते. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेचे संचालक डॉ. शरणकुमार लिंबाळे उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील यांनी यशवंतराव चव्हाणांचे प्रसंगावधान, कल्पकता, दूरदृष्टी व धोरणी स्वभावाचे अनेक पदर उलगडले. त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा एकप्रकारे चित्रपटच उपस्थितांसमोर पाटील यांनी आपल्या खास शैलीत सादर केला. उपस्थितांनीही त्याला तशीच दाद दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास उलगडून दाखवला. ते एक समविचारी, बहुजनांचे राज्य होण्यासाठी प्रयत्न करणारे नेते होते. सहकाराची मुहूर्तमेढ रुजवितानाच सत्येची योग्य विभागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केली.

अन् अश्रू अनावर झाले

श्रीनिवास पाटील यांनी यशवंतराव चव्हाणांच्या अनेक आठवणींना या वेळी उजाळा दिला. दरम्यान, वेणूताई आजारी असताना त्यांनी यशवंतरावांची मांडी मागितली तेव्हा मांडीवर डोके ठेवताच त्यांची प्राणज्योत मालवली. हा प्रसंग सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाही. हा प्रसंग ऐकताना सभागृह काही काळ स्तब्ध झाले होते.

सामान्यांची नाळ जपणारे नेतृत्व

'यशवंतराव चव्हाण यांचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान' या विषयावर सकाळी परिसंवाद पार पडला. त्यात भाई वैद्य, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि शंकरराव कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. यावेळी यशवंतराव चव्हाणांविषयी मत मांडताना कुलकर्णी यांनी राजकारणातील सुसंस्कृत शब्दप्रभू म्हणून यशवंतराव चव्हाण यांना उपाधी दिली. साहित्य, कला यांसारख्या क्षेत्रात रममाण होऊनही सर्व सामान्यांची नाळ जपणारे त्यांचे नेतृत्व होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान डोंगराएवढे आहे, असे ते म्हणाले. भाई वैद्य म्हणाले, कृषी औद्योगिक धोरणाचे प्रणेते म्हणून यशवंतरावांनी केलेले कार्य महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ज्ञात आहे. सध्याच्या जागतिक मंदीच्या काळात शेतीला उद्योगाची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे. चारित्र्य आणि चरित्र याचे मूर्तिमंत, आदर्शवत उदाहरण म्हणजे चव्हाण साहेब असल्याचे त्यांनी सांगितले.

मधुकर भावे म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे माणुसकी जपणारे थोर राजकारणी होते. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण स्वैरपणे भटकंती करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. एक सुसंस्कृत, धोरणी, प्रगल्भ, व्यासंगी राजकारणी म्हणून त्यांची कारकीर्द राहिली. समाजातील सर्व घटकांचा विकास साधून हित जपणारा आधारस्तंभ असे यशवंतराव चव्हाण यांचे वर्णन केले. राजकारणाच्या व्यापक क्षेत्रात काम करताना त्यांनी नातीगोती, मित्र मंडळी आणि साहित्यिकांचे संबंध आयुष्यभर जपले यातच त्यांचे थोरपण आहे असे ते म्हणाले.

यावेळी या राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झालेल्या लेखक, शिक्षक आणि विद्यार्थांनी लिहिलेल्या 'यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र' या शोधनिबंधाच्या पुस्तकाचे प्रकाशनही श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यशवंतराव चव्हाण कलादालनाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या संजय पाटील, मनीष वडनेरे, मंगेश जानोरकर आणि विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता बी. व्ही. अजगेकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी आभार मानले. प्रारंभी श्रीनिवास पाटील यांनी मुक्त विद्यापीठाने उभारलेल्या यशवंतराव चव्हाण कलादालनास भेट दिली. यावेळी जुनी छायाचित्रे पाहून त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी कार्यकारिणी विस्ताराच्या मुहूर्ताला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही रखडलेली शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे.

शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह कार्यकारिणीत आठ उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, आठ सरचिटणीस आणि ८३ सदस्यांसह १४७ जणांचा समावेश आहे. विविध आघाड्यांच्या प्रमुखांचीही घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षी महापालिका निवडणूक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची वर्णी लावली जात आहे.

अशी आहे कार्यकारिणी

उपाध्यक्ष : बाळासाहेब पाटील, रामहरी संभेराव, प्रशांत आव्हाड, अनिल वाघ, आशिष नहार, दिलीप राऊत, अनिल भालेराव, सुजाता करजगीकर. कोषाध्यक्ष : बापूराव शिनकर. सरचिटणीस : संभाजीराव मोरूसकर, सुरेश पाटील, प्रशांत जाधव, पवन भगूरकर. चिटणीस : शैलेश जुन्नरे, नरेंद्र सोनवणे,उत्तम उगले, प्रकाश दीक्षित, अलका जांभेकर, संध्या तोडकर, राहुल निरभवणे, गुलाब सय्यद. कायम निमंत्रित सदस्य : प्रा. सुहास फरांदे, गोपाळ पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, विजय साने, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, लक्ष्मण सावजी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, डॉ. राहुल आहेर, विशेष निमंत्रित सदस्य : शालिनी पवार, रंजना भानसी, प्रा. परशराम वाघेरे, प्रा. कुणाल वाघ, सविता दलवाणी, सिंधुताई खोडे, फुलाबाई बोडके, दिनकर पाटील, दामोदर मानकर, सतीश सोनवणे, ज्योती गांगुर्डे, सतीश कुलकर्णी, सतीश शुक्ल, सुहास शुक्ल. राज्य परिषद सदस्य : डॉ. बसंतीलाल गुजराथी, राकेश पाटील, हेमंत आहेर. राष्ट्रीय परिषद सदस्य : नंदकुमार देसाई. भाजयुमो : अजिंक्य साने, महिला मोर्चा : रोहिणी वानखेडे (नायडू), अनु. जाती मोर्चा : संजय गालफाडे, अनु. जमाती मोर्चा : संजय करीपुरे, उद्योग आघाडी : जितेंद्र अवस्थी, ग्राहक मंच : अॅड. विद्देश नाशिककर, वैद्यकीय आघाडी : डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, क्रीडा आघाडी : अमित शुक्ला, पर्यटन विकास मंच : सिद्धार देशमुख, अल्पसंख्यांक मोर्चा : अहमद रझा अलिहुद्दिन काझी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी : चंद्रशेखर पंचाक्षरी, भटके विमुक्त आघाडी : धनंजय माने

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण कराकडे कानाडोळा!

$
0
0

१५ वर्ष जुनी वाहने कराविना रस्त्यावर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार सर्व प्रकारच्या दुचाकी व चारचाकी खासगी वाहनांना १५ वर्षांनंतर प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) पर्यावरण कर जमा करावा लागतो. मात्र, वाहन घेताना एकाच वेळी (वन टाइम टॅक्स) सर्व कर भरणाऱ्या वाहनचालकांना याची माहितीच नाही. त्यातच 'आरटीओ' पर्यावरण कर वसुलीस प्राधन्य देत नसल्याने प्रदूषणाला अटकाव कसा बसणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरी भागातील वाढत्या प्रदूषणाचा फटका समाजाला बसला आहे. अवकाळी पाऊस, उच्च तपमान, सतत बदलते हवामान यासाठी प्रदूषण कारणीभूत ठरते. हवेतील प्रदूषण वाढवण्यासाठी विविध प्रकारची वाहने हातभार लावतात. विशेषतः १५ वर्ष किंवा त्यापेक्षा जुन्या वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर सरकारने ऑक्टोबर २०१० मध्ये एक अधिसूचना प्रसिध्द केली. त्यानुसार १५ वर्षे जुन्या वाहनांसाठी पर्यावरण कर भरावा लागतो. संबंधित वाहनांची तांत्रिक तपासणी करून पुनर्नोंदणी करून घ्यावी लागते. मात्र, अशी कोणतीही प्रक्रिया न करता ही जुनी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर धावत असल्याचे चित्र आहे.

१५ वर्षानंतर कर भरून दर पाच वर्षांनी पुन्हा या वाहनांची तपासणी करून पर्यावरण कर अदा करावा लागतो. या कराबाबत सर्वसामान्य वाहनधारकांना माहितीच नसल्याचा दावा आरटीओकडून केला जातो. साधारणतः खासगी वाहन खरेदी करतांना वन टाइम टॅक्स अदा करतात. यानंतर, कोणताही टॅक्स भरावा लागत नाही, अशी सर्वांची धारणा आहे. पर्यावरण कर भरण्यासाठी आम्ही वेळोवेळी आवाहन केले. मात्र, त्याचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे यापुढे थेट कारवाई करण्याचा इशारा नाशिक विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी दिला आहे.


... अन्यथा वाहन होणार जप्त

मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांची नोंदणी १५ वर्षे वैध असते. अशा वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियम १९५८ नुसार पर्यावरण कर भरणे आवश्यक आहे. या बाबींची पूर्तता न केलेल्या वाहनधारकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये न्यायालयीन अथवा दंडात्मक कारवाई करण्यात येते. पर्यावरण कर न भरलेल्या वाहनधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेठ रोड, नाशिक येथे कर जमा करावा. वैध नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा पर्यावरण कर भरल्याचा पुरावा नसल्यास वाहन जप्त होऊ शकते, असे बनसोड यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण कर भरण्यासाठी वाहनधारकांनी पुढे येणे आवश्यक आहे. अन्यथा, कारवाईचा बडगा उचलण्यात येईल. १५ वर्षे जुन्या वाहनांधारकांकडून हा कर आकरला जातो. अशा वाहनांना शोधणे सहज शक्य नाही.

- जीवन बनसोड,

प्रादेशिक परिवहन अधिकारी



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याला भोसकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको उत्तमनगरच्या बुद्धविहाराच्या समोर असलेले व्यापारी अनिल शिरोडे यांच्यावर अज्ञात इसमाने घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शिरोडे यांच्या पत्नीही जखमी झाल्या. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडल्या प्रकाराने सिडकोत खळबळ उडाली आहे. शिरोडे यांचे उत्तमनगर येथे श्री स्वामी समर्थ किराणा नावाचे दुकान आहे. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ते कुटुंबासह बाहेरगावी जात असतांना एका व्यक्तिने त्यांच्यावर हल्ला केला. शिरोडे यांच्या पत्नीने हल्लेखोराला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने त्याही जखमी झाल्या. हल्लेखोराने त्यांच्याजवळील काही ऐवजही लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अबंड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्यातील आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्ल्यात जखमी झालेले शिरोडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ७६ वाहनांचे सापडले ‘मालक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक वर्षांपासून मालकांच्या प्रतिक्षेत विविध पोलिस स्टेशनच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया पोलिस प्रशासनाने सुरू करणार आहे. पुरावे सादर करून ती परत घेऊन जाण्याचा मंगळवारी (दि. १५) शेवटचा दिवस असून त्यानंतर एका समितीमार्फत या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.

शहरातील सर्वच पोलिस स्टेशनच्या आवारात वाहने खच्चून भरली आहेत. त्यातील काहींबाबात कोर्टात सुनावणी सुरू आहे. उर्वरित बरीचशी वाहनांचे मालक पुढे येत नसल्याने पडून आहेत. तब्बल ५४६ वाहने मागील पाच वर्षांपासून पोलिसांना सांभाळावी लागत आहे. याबाबत क्राइम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, की या वाहनांमध्ये दुचाकींचा मोठा भरणा आहे. संबंधित वाहनांचे नंबर व इतर माहिती शहर पोलिसांच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली. चेसीज नंबर, वाहन क्रमांक व इतर माहितीची खात्री पटल्यानंतर वाहनमालकाने पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक होते. मात्र, मागील २० पेक्षा अधिक दिवसांच्या कालावधीत एकही वाहनमालक समोर आलेला नाही. पोलिसांनी आपल्यापरीने ७६ वाहनमालकांचा शोध घेतला गेला आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडे जमा असलेली वाहने परत नेण्यासाठी मंगळवारपर्यंतची मुदत असून त्यानंतर पोलिस प्रशासन लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे. या वाहनांचा कोर्टांच्या मंजुरीने लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस तसेच आरटीओ अधिकाऱ्यांची एक कमिटी तयार करण्यात आली असून सर्व वाहनांची एक रक्कम ठरवण्यात येईल. साधारणतः‍ १५ मार्चनंतर ही लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर दहा दिवसाला नाशकात एकाचा खून

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : शहरीकरणाच्या रेट्यात माणुसकीचा चेहरा हरवत चाललाय की काय, असा प्रश्न नियमित होणाऱ्या खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे. नाशिकमध्ये सरासरी १० दिवसांच्या अंतराने एकाची हत्या होत असून, २००८ पासून शहरात २९१ जणांचा विविध कारणांसाठी बळी गेला आहे. जनतेचे रक्षक असलेले पोलिसही खून रोखू शकत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर येत आहे.

मानवी जीवाची हत्या, हा माणुसकीच्या दृष्टीने सर्वांत मोठा अपराध मानला जातो. त्याचमुळे दुर्मिळातील दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या गुन्ह्यात तरी संशयितांना फाशीची शिक्षा होते. नाशिक शहराचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत असून, नागरिकरणाच्या रेट्यामध्ये खुनाच्या घटना सहजतेने होत आहेत. २००८ ते २०१५ या आठ वर्षाच्या कालावधीत २९१ खून झाले. २०१६ मध्ये सुध्दा खुनांचे मीटर सुरूच आहे. या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यात खुनाच्या १० घटना घडल्या. मार्च महिन्यात पंचवटीतील टकलेनगर येथे भारती पाटील या शिक्षिकेची पैशांसाठी निर्घृण हत्या करण्यात आली. याबाबत क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, की खुनाच्या ८० ते ९० टक्के घटना ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. आपआपसातील वैमनस्य, प्रेम प्रकरण, इर्षा, झटपट पैसे कमवण्याचा मोह अशी मानसिक कारणे खुनाच्या घटनांमध्ये दडलेली असतात. खून प्रकरणानंतर आरोपींचा माग काढलाच जातो. एखादी घटना अशी असते की त्याचे धागेदोरे उशिरा सापडतात किंवा सापडतच नाही. मात्र, ९९ टक्के घटनांमध्ये संशयित पोलिस जेरबंद करतात. पत्नीच्या चारित्र्याचा संशय, व्यसनाधिनता, हुंड्याची मागणी, जमिनीचा वाद अशा घरगुती किंवा सामाजिक कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय योजना राबवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडणे आवश्यक असल्याचेही गोरे म्हणाले. जुन्या भांडणाची कुरापत काढून आपल्याच मित्राची हत्या करण्याची मानसिकता युवकांमध्ये वाढीस लागते आहे. २०१५ मध्ये खूनाच्या ४० घटना घडल्या. यात सर्वाधिक घटना याच कारणामुळे झाल्याची नोंद पोलिस दरबारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात सरकार विरोधात घोषणाबाजी

$
0
0
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली मनपापासून पायी मोर्चा काढण्यात आला. यानंतर जुना आग्रारोडलगत असलेल्या कराचीवाला खुंटावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कौशल्य विकासामधून मिळणार बळ

$
0
0

रोजगार हमी मजुरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोजगार हमीवरील मजुरांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मजुरांना व्यवसायाद्वारे स्वयंरोजगाराची वाट चोखाळता यावी यासाठी सहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील १५ दिवसांत १५० मजुरांना हे प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगार हमी योजनेचा मोठा आधार आहे. जिल्ह्यात हजारो बेरोजगारांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट या योजनेमूळे साध्य झाले आहे. विहीर खोदाईपासून रस्ते बनविण्यापर्यंतची अनेक प्रकारची कष्टाची कामे या योजनेंतर्गत मजुरांकडून करवून घेतली जातात. या योजनेमूळे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटला असला तरीही त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळू शकलेली नाही. अशा मजुरांसाठी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेवर काम करणाऱ्या राज्यभरातील अधिकाऱ्यांची बैठक अलीकडेच मुंबईत झाली.

या उपक्रमाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश रोजगार हमी विभागाच्या सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात ३१ मार्च २०१६ पर्यंत १५० मजुरांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी दिली आहे.

असा आहे उपक्रम

रोजगार हमी योजनेत १०० दिवस काम केलेल्या कुटुंबातील मजुरांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात संभाव्य लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. राज्यात १ लाख ६३ हजार १०० कुटुंबांपैकी ३८ हजार ४१० कुटुंबांतील अंदाजे ५५ हजार मजुरांनी कौशल्य विकासातून स्वयंरोजगार साधण्याची इच्छा व्यक्त केली होती. सर्व लाभार्थींना पुढील दोन वर्षांत बँक ऑफ महाराष्ट्रच्या RSETI च्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या राज्यात चार हजार तर नाशिक जिल्ह्यात १५० जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. २०१६-१७ मध्ये राज्यात २१ हजार जणांना तर नाशिक जिल्ह्यात १३०० मजुरांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २०१७-१८ मध्ये राज्यात सर्वाधिक ३० हजार मजुरांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याअंतर्गत दुग्धव्यवसाय, कुक्कूटपालन, शेळीपालन अशा शेतीला पूरक व्यवसायांबरोबरच शिवणकाम व तत्मस प्रशिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी त्यांनी सहा दिवसांच्या निवासी शिबिराला उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची उपलब्धता भविष्यकाळातील मोठे आव्हान

$
0
0

रमणी अय्यर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्ष २०५० मध्ये पाण्याची उपलब्धता ही प्रती माणसी १२५५ लिटर प्रतीदिन इतकी खालावण्याची शक्यता असून, बदलते राहणीमान, मध्यमवर्गाची शहरांमधील वाढती संख्या यामुळे पाण्याची उपलब्धता ही भविष्यकाळातील मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन पुण्याच्या एवेरी ड्रोप काउटस फाउंडेशनचे संस्थापक रमणी अय्यर यांनी केले. ते जागतिक प्लंबिंग दिनानिमित्त इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक च्याप्तर द्वारे आयोजित 'आधुनिक प्लंबिंग पद्धतीचे राष्ट्र उभारणीमध्ये स्थान' या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

जागतिक प्लंबिंग दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष सुनील भायभंग, पुण्याच्या एवेरी ड्रोप काउटस फाउंडेशनचे संस्थापक रमणी अय्यर, इंडियन प्लंबिंग असोसिएशन च्या नाशिक च्याप्तरचे अध्यक्ष मिलिंद शेटे, जितेंद्र कोतवाल व दिनेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रमणी अय्यर म्हणाले, सर्व प्रगत देशात नळाचे पाणी कोणत्याही फिल्टर शिवाय घरात पिण्यासाठी वापरतात पण भारतात याची भीती वाटते. भविष्यकाळातील पाण्याची परिस्थिती बघता पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे तसेच प्लंबिंगसाठी मोडेल प्लंबिंग कोडचा वापर करून प्लंबरने देखील यात महत्त्वाची भूमिका बजवावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समाजप्रबोधन, प्रशिक्षण, योग्य तंत्र व सामानांचा वापर करून देशाच्या प्रगतीस आपण सर्वांनी हातभार लावावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याआधी आपल्या प्रास्ताविकात इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक च्याप्तरचे अध्यक्ष मिलिंद शेटे म्हणाले, वर्ष २०१५-२०१६ या वर्षात प्लंबिंग क्षेत्रात नाशिकमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्लंबिंगच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याने नाशिकचे नाव या क्षेत्रात चमकत आहे. या सोबतच सामाजिक जाणीवेतून अनेक कार्यक्रमाचेही आयोजन करून पाणी बचतीचा ही प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून नुकतेच महिलांसाठी प्लंबिंग मेन्टेनन्स प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. त्यामधील यशस्वी महिला दीपाली अष्टेकर, अर्चना भागवत व योगिता महालपुरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सुनील भायभंग म्हणाले, पाणीबचतीचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे व यामध्ये सर्व तांत्रिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने आपल्या नाशिक शहराची ओळख ही काटकसरीने पाणी वापरणारे शहर अशी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी ८३% पाण्याची बचत करू शकणारा शॉवरचा शोध लावणाऱ्या श्रुष्टी नेरकर, महिलांना प्लंबिंग प्र‌शिक्षण देण्यारे घनशाम बडगुजर, प्रायोजक संजय दुर्रानी, बी. आर. सिंग व कल्पेश शाह यांचाही गौरव करण्यात आला. अपघातात निधन झालेल्या प्लंबर किशोर पाटील यांच्या परिवारास रुपये २ लाखाची मदत प्रदान केली. कार्यक्रमाचे सूत्रासंचलन सीमा पेठकर यांनी तर आभार दिनेश क्षीरसागर यांनी मानले. नाशिकमधील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील दाम्पत्याचा सभागृहातच ठिय्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराला आपल्या प्रभागात भेडसावणाऱ्या घंटागाडी, स्वच्छता, गार्डन्स, टीडीआर धोरण अशा विविध विषयांवरून भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील व काँग्रेस नगरसेविका लता पाटील यांनी महासभेत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेष मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी पाटील दाम्पत्याने काळे कपडे घालून सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू करत, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे. पाटील दाम्पत्याचे आंदोलन मागे घेण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न केले; मात्र त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

महासभेत विविध मागण्यासांठी आंदोलन करण्याची मागणी दिनकर पाटील यांनी पंधरा दिवसापूर्वीच केली होती. त्यानुसार पाटील दाम्पत्याने मंगळवारी महासभेत काळे कपडे घालून प्रवेश करत आंदोलनाला सुरूवात केली. आपल्या प्रभागातील विकास कामाच्या मागण्यांसह घंटागा़डीची दुरावस्था, हरित लवादामुळे शहराचा थांबलेला विकास, खत प्रकल्पाला लागलेली घरघर, शहरातील शाळांची व उद्यानाची दुरवस्था, नवीन टीडीआर धोरणामुळे शहराचा थांबलेला विकास यावर आयुक्तांनी खुलासा करण्याची मागणी पाटील यांनी केली. महापौरांनी मात्र आयुक्तांना शेवटपर्यंत संधी न दिल्याने संतप्त होऊन पाटील दाम्पत्याने आंदोलन सभागृह संपल्यानंतर कायम ठेवले. भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

आयुक्तांची शिष्टाई

पाटील दाम्पत्यांनी उपोषण सोडावे यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पाटील दाम्पत्याच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देणारे स्वत:च्या सहीचे पत्र पाटील यांना देण्याची तयारी दर्शवली. आयुक्तांचे पत्र घेऊन उपायुक्त डी. टी. गोतीसे पाटील यांना भेटले. परंतु पाटील यांनी पत्र घेण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी पहिले संगीत समुपदेशन ‘जिंदगी जिंदाबाद’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक 'बायका-मुलांचा उदरनिर्वाह आपण व्यवस्थित करू शकत नाही... आई-वडिलांसाठी औषधपाण्याचा खर्च करू शकत नाही... मुक्या जनावरांना हिरवा चारा खाऊ घालू शकत नाही' या अपराधीपणाच्या भावनेतून होणारी शेतकऱ्याची आत्महत्या थांबविण्यासाठी कलाकारांनी संगीतांच्या माध्यमातून कंबर कसली आहे. 'जिंदगी जिंदाबाद' हा महाराष्ट्रातील पहिला संगीत समुपदेशनाचा कार्यक्रम संगीतकार संजय गिते यांनी तयार केला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी ते गावोगावी समुपदेशन करीत फिरत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब, हासेगाव, मांडवे, सारोळे, भूम, इटकुर अशा अनेक गावात हा उपक्रम झाला. मराठवाडयापाठोपाठ मालेगाव तालुक्यातील टेहरे, पाटणे, वजीरखेडे, वखारी या गावांतही प्रयोग झाले. नैराश्यातून येणाऱ्या शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी मूळापासून काम करण्याची गरज आहे हे जाणून घेत गिते यांनी गावोगावी हा 'शेतकरी वाचवा' उपक्रम सुरू केला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन गीताच्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढविण्याचा हा प्रयत्न असून, याकामी त्यांना बऱ्याच अंशी यश येत आहे. संजय गिते मानसशास्त्र, अधात्म, संगीत यांचा अभ्यास करणारे कलावंत असल्याने लॅण्डमार्क एज्युकेशनच्या प्रेरणने या उपक्रमाला त्यांनी मूर्त स्वरूप आणले. विद्यार्थ्याना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी २००८-२००९ मध्ये त्यांनी केलेले संगीत समुपदेशन त्यानंतर गेली अनेक वर्ष आत्मविकासासाठी मनोसंगीताचे केलेले कार्यक्रम-संशोधन अशा प्रदीर्घ अनुभवानंतर शेतकऱ्यांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्याचा संगीतमय संकल्प गितेंनी केला. ज्या शेतकरी महिलांच्या पतीने आत्महत्या केल्या अशा काही विधवा आणि काही एकल महिला भगिनी या चळवळीमध्ये सहभागी झाल्या. या महिला गिते यांनी तयार केलेली संगीतमय समुपदेशनाची सीडी गावोगावी घेऊन जातात व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतात आणि 'घरचा माणूस गेल्यानंतर मुलाबाळांचे खूप हाल होतात.' असे सांगतात. त्यांच्या स्वतःच्या जीवनातील हाल अपेष्टांचे दाखले देत या सीडीतील ३५ मिनिटांची गाणी शेतकरी तसेच गावकऱ्यांना ऐकवतात. हा उपक्रम विनामूल्य आहे. गीतांमुळे शेतकऱ्यांची मानसिकता बदलुन जातेय. पाऊस, पाणी, कर्ज, निसर्गाची अनिश्चिता अशा समस्यांनी ग्रासलेले शेतकऱ्यांचे चिंताग्रस्त चेहरे या शब्दशक्तीने, सूर शक्तीने फुलुन जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणमधील शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक कळवणमध्ये चार दिवसांपूर्वी विषारी औषध सेवन करणाऱ्या शेतकऱ्याचा सोमवारी दुपारी नाशिकमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. सुभाष उत्तम पानसरे (५२) असे मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते कळवण तालुक्यातील एकलहरे येथील रहिवाशी आहेत. पाच दिवसांपूर्वी त्यांनी विषारी औषध सेवन केले होते. उपचारासाठी कुटुंबीयांनी त्यांना नाशिक शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पानसरे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे प्रत्येकी एक हेक्टर जमीन आहे. तर मुलाच्या नावे ७४ आर एवढी जमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आहेत. पानसरे यांच्यावर एक ते दीड लाखांचे कर्ज असल्याचे समजते. मात्र, याबाबत निश्चित माहिती प्राप्त होऊ शकली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या अडीच महिन्यांत जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून किंवा गळफास घेऊन जीवन यात्रा संपविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images