Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अर्धवट रस्त्यामुळे वाहनधारक हैराण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, इं‌दिरानगर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने शहरातील अनेक रस्ते रिंगरोड म्हणून विकसीत केले आहेत. त्यातच गोविंदनगर येथून जाणारा रिंगरोड कार्यान्वीत करण्यात आला आहे. परंतु सिडकोकडून येतांना हा रस्ता अर्धवट सोडल्याने वाहनधारकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मनोहर नगरकडून सिटी सेंटर मॉलकडे जाताना असलेल्या चौफुलीवरच हा रस्ता आहे. याठिकाणी रस्त्याला डांबरीकरण न केल्याने या रस्त्यावर आता खडी आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. जड वाहनांसह सर्वच प्रकारची वाहने या रस्त्यावरून दररोज ये-जा करीत असल्याने, आता रस्त्यावरील दगडसुद्धा बाहेर येऊ लागले आहेत. डांबरीकरण नसल्याने या रस्त्यावरून वाहनांची येजा होताना खूपच धूळ उडत असते. त्यातच याठिकाणी पथदिपांचीही सोय नसल्याने रात्रीच्यावेळी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सिटी सेंटर मॉलजवळील सिंग्नलजवळच हा रस्ता अर्धवट राहिला आहे की ठेवला आहे?, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या रस्त्याचे तातडीने काम करून इतर रस्त्यांप्रमाणे याठिकाणीही डांबरीकरण करावे तसेच पथदीप बसवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

महापालिकने डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरपासून थेट गंगापूररोड किंवा पंचवटीकडे जाण्यासाठीचा हा रिंग रोड तयार केला आहे. या रस्त्याचा बराचसा भाग गोविंदनगरमधून जातो. मागील काही महिन्यांपासून इंदिरानगर येथील उड्डाणपुलाचा बोगदा बंद असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बरीचशी कमी झाली होती. मात्र मागील आठवड्यात हा बोगदा सुरू केल्याने गोविंदनगर व मनोहर नगरमधील वाहतूक पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. शहराला वळसा न घालता लवकरात लवकर इंदिराकडे किंवा इंदिरानगरहून सातपूर, सिडकोकडे जाता यावे म्हणून या रस्त्याचा वापर होत असतो. मात्र हा रस्ता अर्धवट असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर विभागात कार्यरत असलेल्या सर्व सरकारी कार्यालयांमध्ये महापालिकेच्या सातपूर विभागाकडून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सरकारी कार्यालये किंवा त्याठिकाणी राहणाऱ्यांना होणारा अस्वच्छतेचा त्रास दूर करण्यासाठी ही मोहीम हाती घेतल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.

या मोहीमेअंतर्गत गंगापूर गावातील महापालिका रुग्णालय, सातपूरचे कामगार विमा रुग्णालय, सातपूर पोलिस ठाणे, महापालिकेचे सातपूर विभागीय कार्यालय, सातपूर पोलिस ठाण्यातील रहिवाशी कॉटेज, महापालिकेच्या अग्निशमन दला शेजारील रहिवाशी भाग या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे व विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

सरकारी कार्यालयातील कचऱ्याबाबत नेहमीच तक्रारी असल्याने विशेष ही स्वच्छता मोहीम राबवत असल्याचे डॉ. बुकाणे यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या तीस कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज करंजे यांनी याबाबत आरोग्य विभागाचे आभार मानत, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे आवाहनही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारींवर बसविले ढापे

$
0
0

म. टा .प्रतिनिधी, पंचवटी पंचवटीतील विविध चौकात आणि ठिकठिकाणी गटारीवरील ढापे गायब झाली आहेत. यामुळे उद्भविणाऱ्या समस्यांची बातमी नुकतीच 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिध्द केली होती. या बातमीची दखल घेत हे ढापे बसविण्यास सुरुवात झाली आहे. गटारीवरील ढापे निघाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघातही यामुळे झाले होते. रात्रच्यावेळी अपघातांचे प्रमाण वाढले होते तसेच रात्री पायी चालणाऱ्यांवरही अनेकदा या ढाप्यांमुळे पडण्याची वेळ आली होती. याबाबतची बातमी प्रसिद्ध करताच पंचवटी विभागातील महापालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली. गटारींची दुरुस्ती करून ढापे बसविण्यास या भागात सुरुवात झाली असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचे कर्मचाऱ्यांमार्फत सांगण्यात आले. या तातडीना सुरू झालेल्या कामाबद्दल नागरिकांनी 'मटा'चे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारणातून आवर्तन सोडण्याची मागणी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प देवळालीतील नागरी व लष्करी विभागास पिण्याच्या पाण्यासाठी केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दारणा धरणातून आवर्तन सोडावे, अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केल्याची माहिती कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांनी सांगितले.

सध्या उपलब्ध असलेला जलसाठा येत्या १८ तारखेपर्यंत पुरणार असून पुढे लष्करासह नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागरार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीअर प्रदीप कौल, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी प्रशासकीय पातळीवर चर्चा करून जलसंपदा विभागास कळविले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेन्ट व एमईएसच्या बंधाऱ्यातील पाणी साठ्याची पाहणी केली. देवळालीसह लष्करी विभागाची लोकसंख्या दीड लाखाच्या जवळपास असून, पाणीटंचाईमुळे तातडीने आवर्तन सोडणे गरजेचे असल्याचे बोर्डाचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांनी पाहणीदरम्यान स्पष्ट केले. कार्यकारी अभियंता शिंदे यांनी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला दिला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ, मात्र जलसंपदा विभागाने आमची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी मोजाड यांनी केली. यावेळी दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, तानाजी करंजकर, गेरीसन इंजिनियर मेजर पियुष जैन, आसिस्टंट इंजिनीअर स्मिता मोरे, इंजिनीअर आर. सी. यादव यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरण मे मध्येच तळ गाठणार

$
0
0

जून, जुलैत भीषण पाणीटंचाई भासणार; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरण मे महिन्यातच तळ गाठणार असून, जून व जुलैत धरणातून पाणी उचलताना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची कबुली प्रशासनानेच महासभेत दिली आहे. जॅकवेलपर्यंत पाणी पोहचविण्यासाठी आतापासून उपाययोजना कराव्या लागणार असून, जून जुलैत शहरात पाणीबाणीचे संकट गंभीर होणार आहे. त्यामुळे मे पासून शहरात आठवड्यातून तीन दिवस कपात अटळ असणार आहे.

गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा पावसाळ्यात ५७ फूटापर्यंत असतो. परंतू सध्या हा साठा २६ फूटापर्यंत आला असून, अजून १६ फूटापर्यंत महापालिका धरणातून पाणी उचलू शकते. त्यानंतर पुढील पाणी महापालिकेला पाणी लिफ्ट करावे लागणार आहे. त्यासाठी मोठी यंत्रणा लागणार असून, आतापासूनच उपाययोजना केल्या नाहीत तर जून व जुलै महिन्यात नाशिककरांवर भीषण पाणीटंचाई ओढावणार आहे. जूनपासून पाणी लिफ्ट करण्यासाठी जॅकवेलपर्यंत चर खोदावी लागणार आहेत. त्यामुळे पालिकेला मोठा खर्च करावा लागणार आहे. जूनपासून दररोज २०० ते २५० एमएलडी पाणी महापालिका धरणातून उचलू शकणार आहे. त्यामुळे पाणीकपात ५० टक्क्यांवर येणार असून, यंत्रणा धरणातील गाळामुळे बंद पडणार आहे. त्यामुळे पाणीबाणीची गंभीर स्थिती भाजपवर येणार आहे. त्यामुळे नाशिककरांवर कपातीची टांगती तलवार शेवटपर्यंत कायम राहणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महासभेने टंचाई उपाययोजनासाठी अकरा कोटी खर्च करण्याला मान्यता दिली आहे.

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिककरांना शेवटपर्यंत पाणी पुरवू, अशी ग्वाही देणाऱ्या भाजपच्या भूमिकेकडे आता नाशिककरांचे लक्ष लागून आहे. गंगापूर धरणाचे पाणी जायकवाडीला सोडल्यानंतर पाणी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. परंतू प्रशासनाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे भाजप नाशिककरांना पाणी कुठून देणार, असा सवाल नगरसेवकांकडून केला जात आहे. जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी कपात आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनावर भाजप कसा दबाव आणतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेमी इंग्रजी शाळांचा प्रस्ताव फेटाळला

$
0
0

प्रस्तावाचा मार्ग प्रशासनाकडून चुकला; प्रस्ताव शिक्षण समितीवर ठेवण्याचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या इंग्रजी शाळांचे सेमी इंग्रजी शाळेत रुपांतर करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव महासभेने प्रशासनावरच पलटवला आहे. गरीबांच्या मुलांना इंग्रजी शिक्षणापासून वंच‌ित का ठेवता असा सवाल करत, इंग्रजी शाळांची स्थिती सुधारा, अशी मागणी सदस्यांनी केली. हा प्रस्ताव शिक्षण समितीवर न ठेवता परस्पर महासभेवर का ठेवला, असा प्रश्न शिक्षण समिती सभापतींसह सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे महापौरांनी हा प्रस्ताव महासभेवर चुकीच्या पद्धतीने आल्याचे सांगून तो शिक्षण समितीसमोर ठेवण्याचा आदेश दिले. दरम्यान, महापालिकेच्या १२८ शाळांना सुरक्षा रक्षक पुरविण्याचे आदेशही महापौरांनी दिले असून, शिक्षकांचे वेतन नियम‌ित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही महासभेत घेण्यात आला.

महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रशासनाकडून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे रूपांतर सेमी इंग्रजीत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतू सदस्यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतला. सभापती संजय चव्हाण यांनी हा प्रस्ताव शिक्षण समितीवर न ठेवता परस्पर महासभेवर का घेतला असा प्रश्न उपस्थित केला. समितीवर चर्चा झाल्यानंतर तो महासभेकडे यायला हवा होता. परंतू तसे झाले नाही. समितीच्या दुर्दशेची कहानी त्यांनी विशद केली. समितीच्या सदस्या हर्षा बडगुजर यांनीही विरोध करत, मुलांनी पुढे जायला हवे असे सांगत ठरवा आलाच कसा असा सवाल उपस्थित केला. नंदीनी जाधव यांच्यासह सुधाकर बडगुजर यांनी प्रस्तावाला विरोध करत, इंग्रजी शाळांना सुविधा देण्याची मागणी केली.

उपमहापौर बग्गा यांनी शिक्षकांचे पगार निघत नसल्याने शिक्षक येत नसल्याचा दावा केला. इंग्रजी शाळांची इमारत कच्च्या पायावर उभी आहे. त्यामुळे ती कशी उभी राहणार असे सांगत, ७४३ मुलांसाठी दहाच शिक्षक असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. काही ठिकाणी तर मदतनीस शाळा चालवत असल्याचा दावा त्यांनी केला. मुलांचे पाप आपल्यावर घेऊ नका असा त्यांनी सांगीतले. शाळांची स्थिती सुधारण्याची गरही त्यांनी व्यक्त केली. त्यावर महापौरांन‌ी प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळत हा प्रस्ताव प्रथम शिक्षण समितीच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश दिले.

शाळांना सुरक्षा रक्षक

महापालिकेच्या मालकीच्या १२८ शाळांमध्ये सुरक्षा रक्षक नसल्याने शाळांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे शाळांना सुरक्षारक्षक देण्याची मागणी सदस्यांनी महासभेत केली. त्यावर महापौरांनी मनपाच्या सर्व शाळामंध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. खाजगी एजन्सीला शाळांच्या सुरक्षेचे काम दिले जाणार असून, सुरक्षा रक्षक पुरवताना मुलामुलींच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आदेशही महापौरांनी दिले.

शिक्षकांचे पगार वेळेवर

महापालिकेच्या शिक्षकांचे वेतन नियम‌ित होत नसल्याची तक्रार नगरसेविका नंदीनी जाधव यांनी सभागृहात केली. त्याची महापौरांनी गंभीर दखल घेत, खुलासा करण्याचे आदेश प्रशासनला दिले. प्रशासन अधिकारी उमेश डोंगरे यांनी शासनाच अनुदान वेळेवर मिळत नसल्याने वेतन झाले नसल्याचा खुलासा केला. त्यावर आयुक्तांनी शासनाचे अनुदान मिळेपर्यंत महापालिकेच्या तिजोरीतून वेतन देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सभागृहाने मान्यता दिल्याने आता थेट पालिकेच्या तिजोरीतून होणार असल्याने शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ अटकेचे महासभेत पडसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी मंत्री छगन भुजबळांना ईडीकडून झालेल्या अटकेचे पडसाद महासभेत उमटले असून, राष्ट्रवादीकडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तर भाजपकडून अटकेचे समर्थन करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या गटनेत्या व विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी जायीतवादी सरकार शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना दाबत असल्याचा आरोप केला. भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसह, काँग्रेस व अपक्ष सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कविता कर्डक यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. अच्छे दिन दाखवणाऱ्यांच्या काळात विजय मल्ल्या पळून जातो आणि चौकशीला सहकार्य करणाऱ्यांना अटक केली जात असल्याचा आरोप करीत केंद्र व राज्याचा निषेध केला.

तर भाजपच्या संभाजी मोरुस्कर यांनी जशास तसे उत्तर देत, कायद्याप्रमाणे सर्वांवर कारवाई होत असल्याचा दावा केला. सोबतच न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार किरिट सोमय्या यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता दिवसाआड पाणी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात दररोज २० टक्के पाणीकपातीसह आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सहन करणाऱ्या नाशिककरांना लवकरच आणखी एक जबर धक्का बसणार आहे. ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील पाणीसाठा पुरविण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन दिवस पाणीबंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिककरांना दिवसाआड पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. महासभेने आता संभाव्य पाणीकपातीसह फेरनियोजनाचे संपूर्ण अधिकार आयुक्तांना आहेत.

पाणीटंचाईच्या संभाव्य स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी ११ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर ठेवला होता. त्यात पाणीकपातीचा मुद्दा पुन्हा समोर आला असून, संभाव्य भीषण पाणीटंचाईचे वास्तव महासभेसमोर आले. सदस्यांनी एक दिवसाच्या पाणीबंदच्या निर्णयामुळेच नागरिकांना दोन दिवस त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. प्रशासनाने पाणीपुरवठ्याची वस्तुस्थिती सादर करण्याची मागणी केली. त्यावर अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी गंगापूर धरणाचे वास्तववादी चित्र सभागृहासमोर ठेवले. सद्यस्थितीत धरणात महापालिकेच्या वाट्याचे १४५७ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, ते १३८ दिवसापर्यंत पुरवायचे आहे. प्रतिदिन १०.५६ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला तरच तो पुरणार आहे. परंतु, सध्या १२.३५ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जात असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शाश्वत पाण्यासाठी जलजागृती महत्त्वाची’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अनियमीत पाऊस व विविध क्षेत्रात होणारा पाण्याचा वाढता वापर यामुळे पाणीटंचाईची समस्या वाढत आहे. या परिस्थितीवर मात करून शाश्वत पाण्यासाठी जलजागृती महत्त्वाची आहे, असे मत जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ यांनी बुधवारी जलजागृती सप्ताहाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, पाटबंधारे प्रकल्प अधीक्षक अभियंता अलका आहिरराव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी १० वाजता शहरातील शिवतीर्थ चौकातून जलदिंडींला जिल्हाधिकारी मिसाळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ढोल, लेझीमच्या तालात जलदिंडी, चित्ररथाला शिवतीर्थापासून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात या दिंडीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी मिसाळ यांच्या हस्ते दहा नद्यांचे पाणी कलशात एकत्रित करुन या मंगलमय कलशाचे पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी 'जल प्रतिज्ञा' घेतली.

जिल्हाधिकारी मिसाळ पुढे म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसमृद्धीकडे या ब्रिदवाक्याप्रमाणे जलजागृती होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. पाण्याची एकंदर उपलब्धता, पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा गरजेपुरता वापर, शेतीसाठी सुक्ष्म सिंचनाचा वापर, जलस्त्रोत व धरणांच्या जलाशयाच्या ठिकाणी होणारे प्रदूषण, पायाभूत सुविधांचे रक्षण याबाबत जनमानसात जागृतीची आवश्यकता असल्याचेही ते यावेळी म्हणाले. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक आहे. त्या अनुषंगाने १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सर्वांनी लोकसहभागातून जलसाक्षरतेसह जलजागृती करुन पाण्याचे महत्व जनतेला पटविण्याचे काम यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्‍घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आठव्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमीत बग्गा यांच्या हस्ते होणार आहे. आज (१७ मार्च) सायंकाळी ६ वाजता गंगापूर रोडवरील विश्वास लॉन्स येथे या उपक्रमाचे उद्‍घाटन होणार आहे. चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलावंत या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

या कलावंतांमध्ये गायक अली होस्टन, अभिनेत्री रेणुका शहाणे, निरजा फेम प्रशांत गुप्ता, प्रांजली बिरारी, राजू पार्सेकर, राजू मेश्राम, गजेंद्र अहिरे, राज पार्सेकर आदी उपस्थित राहणार आहेत. रेणुका शहाणे यांच्या 'आठवण' या चित्रपटाचा वर्ल्डप्रिमीयर त्यांच्याच उपस्थितीत होणार आहे. आरती नागपाल यांच्या 'आय फॉर आय सर्व्हाइड' या चित्रपटाने सोहळ्यास सुरुवात होईल. थ्री कलर्स या इरानियन फिल्ममेकर 'मुझेन तारीन' यांच्या ‌चित्रपटाचा प्रिमीयर होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात नाशिककरांचाही सक्रिय सहभाग असणार आहे. समारोप २० मार्च रोजी दुपारी ४ वाजता या उपक्रमाची कुसुमाग्रज स्मारक येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्चएंडला बँक हॉलिडे

$
0
0

२३ मार्च रोजी होळी, २४ मार्च रोजी धुलिवंदन, २५ मार्च रोजी गुडफ्रायडे, २६ मार्च रोजी चौथा शनिवार व २७ मार्च रोजी रविवार असे सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत. या मोठ्या सुटीमुळे एटीएममध्ये खडखडाट जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बँकांना सलग सुटी मिळण्याचे प्रसंग अनेकदा येत असतात. एटीएममध्ये पैशांचा तुटवडा झाल्यास ग्राहकांना खरेदीसह महत्त्वाच्या कामांसाठी डेबिट कार्डचा वापर करावा, असा सल्ला एसबीआयचे विभागीय मॅनेजर पी. नंदा यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधनातून प्रासादिकता यावी

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर 'आपले ज्ञान, कर्म, संशोधन समाजोपयोगी असावे. आपले ज्ञान एकमेकांना आदानप्रदान करा, तरच त्यातून ज्ञानसमृद्धी होईल. समाजात नाते, अनुसंधानअनुबंध निर्माण करा. आपल्या शिक्षणातून, संशोधनातूनकामातून प्रासादीकता यावी,' असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी केले.

नाशिकरोडच्या चांडक बिटको चांडक कॉलेजमध्ये बायोटेक विभाग व बीसीयूडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'जैवतंत्रज्ञान - रिसेन्ट अॅडव्हान्सेस इन बायोटेक्नॉलॉजी' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले होतो. त्यावेळी ते अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते.

गोसावी म्हणाले,'जैवतंत्रज्ञान विषयात संशोधनाला खूप वाव आहे. संशोधन परिणामकारक, उपायकारक व इकोफ्रेंडली असावे. ९० दिवसांत तांदूळ पिकवण्याचे तंत्र आपण शेतकऱ्यांसाठी आत्मसात केले आहे. शिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी केवळ एकतर्फी काम करून चालत नाही. पुरेपुर अभ्यास, चिंतन, मंथन करून विचारवंत व निरीक्षक होता आले पाहिजे. आपले व्यक्त‌मित्व बहुआयामी अष्टपैलू असावे, यासाठी आवश्यक गोष्टी आत्मसात करा.'

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पुणे विद्यापीठाचे मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख डॉ. एस. एल. देवपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोस्टर प्रदर्शनही आयोजित केले होते. एकूण ११० विद्यार्थी व ८५ प्राध्यापकांनी सहभाग घेऊन ३४ प्राध्यापकांनी आपले संशोधनपर प्रबंध दुपारच्या तांत्रिक सत्रात सादर केले. सदर चर्चासत्रास समन्वयिका प्रा. डॉ. मंजुषा कुलकर्णी, प्रा. डि. जी. बेलगावकर, डॉ. डी. जी. शिंपी यावेळी उपस्थित होते. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्रा. मिनाक्षी राठी, अश्विनी घनबहादूर, सविता बुवा, गीता जागिरदार, प्रिया सोनवणे, प्रियंका बेलगावकर, विशाखा महाजन, धनेश्वर, भावसार आदिंनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील दाम्पत्याचे आंदोलन सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी भाजप नगरसेवक दिनकर पाटीलकाँग्रेस नगरसेविका लता पाटील यांनी मंगळवारपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दुसऱ्या दिवशी या आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. पाटील दाम्पत्यांच्या मागण्या सोडण्याचे लेखी आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटील यांनी पत्र घेण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलनाचा त‌िढा सुटू शकलेला नाही. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी एकीकडे आयुक्तांना समर्थन नसल्याचे सागून दुसरीकडे समर्थनाचे पत्र काढल्याने प्रशासन बुचकळ्यात पडले आहे.

घंटागाडी, स्वच्छता, गार्डन्स, टीडीआर धोरण अशा शहराला भेडसावणाऱ्या विविध विषयांवरून भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील व काँग्रेस नगरसेविका लता पाटील यांनी महासभेत मंगळवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेष मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी पाटील दाम्पत्याने सभागृहात ठिय्या आंदोलन केले आहे. बुधवारी आयुक्तांनी आंदोलन सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटील यांच्या हटवादी भूमिकेमुळे आंदोलन सुटू शकले नाही. तर भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी सायंकाळी पत्र काढून पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र भाजपच्या काही नेत्यांनी आयुक्तांना फोन करून या आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा केला. त्यामुळे पाटील दाम्पत्यांच्या आंदोलनाबाबत प्रशासन बुचकाळ्यात पडले आहे. भाजप नेत्यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे प्रशासनाचीच कोंडी वाढली आहे.

दरम्यान, आयुक्तांनी आपण चर्चेसाठी तयार असल्याचे सांगून शहरात शंभर टक्के आलबेल नाही, पण शंभर टक्के घाणही नाही असा दावा त्यांनी केला. जेवढे प्रश्न सोडविता येतील तेवढे सोडण्याचा प्रयत्न सोडवित असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजय माल्यासह भुजबळावर वाक् बाण

$
0
0

राजकीय नेत्यांवर किंवा एखाद्या बड्या उद्योजकाची सोशल मीडियात टिंगल उडविली जावी, ही बाब आता नवीन राहिलेली नाही. नेटीझन्सच्या कानावर या बातम्या पडल्या की हमखास त्यावर जोक्स तयार करून एकमेकांना पाठवले जातात. यातून फुटणारे हास्याचे कारंजे अधिकच चेव आणतात अन् आणखीन जोक्स तयार करुन पाठविले जातात. आता याचे शिकार झाले आहेत विजय माल्या आणि छगन भुजबळ.

माल्या यांच्यावर बँकांचे तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून निघून गेल्यामुळे तर भुजबळ यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामुळे आपत्ती ओढावली आहे. या दोघांच्या प्रकरणाची बाब समोर आल्यापासून व्हॉट्सअॅपवर हास्यकल्लोळ माजला आहे. या दोघांवर जोक करून शरद पवार, अजित पवार, राहुल गांधी या नेत्यांची जोडही त्यांना दिली जात आहे. माल्या व भुजबळ या दोघांनी केलेल्या घोटाळ्याचे पैसे मी देतो पण आमची चौकशी करू नका, अशा आशयांच्या या जोक्सनीही सध्या सोशल मीडिया रंगात आला आहे.

अशा मेसेजेची चलती
विजय माल्याचे लोन मी फेडतो, छगन भुजबळचे पैसेपण भरतो, सहाराचे पण भरतो, सगळ्यांना सोडवतो, पण आता तरी मला पंतप्रधान करा.

- एक प्रामाणिक नागरिक, मु. पो. बारामती

नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार माल्याने आकाशवाणीला फोन करुन, 'दिस जातील दिस येतील, भोग सरलं सुख येईल', हे गाण वाजवण्याची रिक्वेस्ट केली आहे.

गांव में दो शराबी बातें कर रहे थे.. ... ये विजय माल्या इमानदारी में गया.. बर्बाद हो गया पर दारू की क्वालिटी ना बिगडने दी बंदे ने.

भुजबळांना अटक. पहिलीच्या धड्यात सांगितले होते की, छगन कमळ बघ. पण ऐकले नाही. मग दुसरे काय होणार?

विजय माल्या, ललित मोदी यांच्यासारखे नॉन मराठी बिलंदर आपल्याला अटक होणार याचा सुगावा लागताच परदेशी पळून जातात आणि आमचे छगनराव बिचारे 'मागे'च राहतात. अशाप्रकारे प्रत्येक बाबतीत मराठी माणूस 'मागे' पडत चाललाय, ही अतिशय शरमेची बाब आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांसाठी एमजीआयआरचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शिक्षण आणि समाजाच्या प्रवाहापासून तुटलेल्या मनुष्यबळातील हुन्नर शोधून ते कसब विकसित करण्यारी एमजीआयआर ही संस्था नाशिकच्या कैद्यांसाठी पुढाकार घेणार आहे. संस्थेचे संचालक पी. बी. काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. मुंजे इन्स्ट‌िट्यूट येथे आयोजित 'स्मार्ट व्हीलेज' कार्यशाळेत काळे यांनी सहभाग घेत ग्रामविकासाविषयी मंथन केले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. काळे म्हणाले, अनेक वर्षांपासून वर्ध्याच्या एमजीआयआर (महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था, वर्धा) या संस्थेचे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात बिकट परिस्थितीशी झगडणाऱ्या अतिसामान्य ग्रामस्थांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्या लोकांच्या प्रशिक्षणासोबतच त्यांना सर्व प्रकारचे पाठबळ या संस्थेच्या माध्यमातू देण्यात येते. सामान्यत: रोज हाता तोंडाशी गाठ पडेल इतके उत्पन्न असणाऱ्या नाग‌रिकांचा जीवनस्तर उंचाविण्यात ही संस्था यशस्वी ठरते आहे. मात्र देशात छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासारखी राज्य या संस्थेच्या उपक्रमांचा विशेष फायदा घेत असले तरीही महाराष्ट्रच या बाबतीत उदासीन असल्याची खंतही यावेळी काळे यांनी केली.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून उपयुक्त प्रशिक्षण देऊन उत्पादकता आणि त्यांचे वैयक्तीक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी काळे यांनी दिली. देशभरात

संस्थेच्या विविध प्रयोगांबद्दलही त्यांनी माहिती दिली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थायीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीची प्रक्र‌िया पूर्ण झाल्यानंतर नगरसचिव विभागाने सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्र‌िया सुरू केली आहे. सदस्य निवडीचा ठराव प्राप्त झाल्यानंतर सभापती पदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव नगरसचिवांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून आता निवडणूक तारखांची घोषणा केली जाणर आहे. दरम्यान, निवडणुकीची प्रक्र‌िया सुरू होताच राजकीय पक्षांच्या हालचालींमध्ये वेग आला आहे.

स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडीची प्रक्र‌िया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे नगरसचिव विभागाने सभापती पदासाठी निवडणूक प्रक्र‌िया राबवण्यास गती दिली आहे. सदस्यांच्या निवडीचा ठराव महापौरांकडून प्राप्त झाल्यानंतर नगरसचिव विभागाकडून सभापतीपदाची निवडणूक घेण्यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या कार्यालयाकडे सादर केला. विभागीय आयुक्तांकडून आता सभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांच्या नजरा आता आयुक्तांच्या निर्णयाकडे लागून आहेत. दरम्यान, हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विभागीय आयुक्त एक किंवा दोन दिवसात निवडणुकीची घोषणा करतील. पुढील आठवड्यात २५ मार्चपूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्तांकडे निवडणूक प्रक्र‌ियेसंदर्भातील प्रस्ताव दाखल झाल्यानंतर राजकीय पक्षांनीही निवडणुकीच्या हालचाली गतीमान केल्या आहेत. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्षांच्या महाआघाडीत सभापतीपदासाठी रस्सीखेच असून मनसेच्या दाव्यानंतर काँग्रेसनेही सभापतीपदाची मागणी केली आहे. तर विरोधकांमध्ये अजूनही दुहीचे

वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्याच्या वेळेत वीजबंद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्वांना समतोल पाणी मिळावे यासाठी महापालिकेने आता पाणीपुरवठ्याच्या कालावधीत वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रस्ताव महावितरणकडे ठेवला आहे. पालिकेच्या पाइपलाइनमधून मोटारी लावून पाणी ओढून घेणाऱ्यांना आळा बसणार असल्याचा दावा केला जात आहे. पाणीपुरवठा कालावधीत वीज पुरवठा खंडित ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांनी बुधवारी महावितरणला सादर केला आहे. शहरात सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींचे निरसन कण्यासाठी पालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनमधील पाणी वीजपंपांच्या सहाय्याने नागरिक ओढून घेत असल्याचे पालिकेच्या लक्षात आले आहे. बहुतांश नागरिकांकडून पालिकेच्या पाइपलाइनला मोटार लावून पाणी वरच्या मजल्यांवर नेले जाते. त्यामुळे पाइपलाईनचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचत नसल्याने नागरिकांना पाणीच मिळत नसल्याचे चित्र आहे. जलकुंभाजवळील नागरिकांना पाणी मिळत असले तरी दूरवरच्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यासाठी पालिकेने मोटारी लावणाऱ्यांवर कारवाईही सुरू केली आहे. परंतु, त्याला मर्यादा असल्याने आता थेट जलकुंभातून पाणी सोडल्यानंतर त्या, त्या भागातील वीजपुरवठा पाणीपुरवठ्याच्या काळापर्यंत खंडित ठेवण्याची मागणी महापालिकेने महावितरणकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येचे सत्र सुरुच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक सिन्नर तालुक्यातील खंबाळे गावात एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. गेल्या सहा दिवसांत निफाडमध्ये तीन, तर कळवणमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्या. सिन्नरमध्ये या वर्षात आतापर्यंत दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. चिंधू सुकदेव बोडके (वय ३३, रा. खंबाळे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी १४ मार्च रोजी त्यांनी विषारी औषध सेवन केले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल बुधवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. बोडके यांच्यावर कर्ज होते. मात्र ते वसुलीसाठी तगादा लावला जात होता का याची माहिती प्रशासन घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसच्या धडकेने महिला ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक बोधलेनगर परिसरात भरधाव सिटी बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण केली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत चालक स्वत:ची सुटका करवून तेथून पळून गेला. अपघातामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. मीना अशोक शार्दुल (५०, रा. बोधलेनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. सायंकाळी घराकडे परतण्यासाठी नाशिकपुणे महामार्ग ओलांडत असताना वाहने वेगात आली. त्यामुळे त्या गोंधळल्या. त्या महामार्गाच्या मधोमध थांबून राहिल्या. त्याचवेळी नाशिकरोडहून पांडवलेणीकडे चाललेल्या एमएच २० डी ९३४२ या भरधाव बसच्या चाकाखाली त्या सापडल्या. जखमी अवस्थेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंगाली कारागिरांची बंदमुळे उपासमार

$
0
0

सोने-चांदीच्या उत्पादन शुल्कमध्ये एक टक्क्याने करवाढ केल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात व सराफ व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी संपूर्ण देशभरात पुकारलेल्या बंदच्या हाकला प्रतिसाद मिळत असला तरी या सराफांकडे दागिने घडविण्यासाठी व विविध कामांसाठी लागणारा कारागीर वर्ग संकटात सापडला आहे. यातील सर्वाधिक कामगार पश्चिम बंगालमधून आपले गाव सोडून उदरनिर्वाहासाठी नाशिकसह अन्य भागात वास्तव्यास आहेत. दिवसाकाठी मिळणाऱ्या शे-पाचशे रुपयांच्या आधारे ते गुजराण करतात. मात्र, आता बेमुदत बंद सुरू असल्याने त्यांच्यासमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बंदमुळे यांचेही हाल सराफांकडून सोनाच्या विविध दागिने खरेदी केल्यानंतर गाठण्यासाठी म्हणून आपण सराफ बाजारात छोटछोट्या कामांमधून उदरनिर्वाह करणारा पटेकरी, जंगम व गाठवणारे अशा संबधित व्यावसायिकांना देखील या संपाचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्याकडे ग्राहक फिरकत नसल्याने सराफ बाजारात शुकशुकाट दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images