Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मानवी जीवनशैली ठरतेय चिमण्यांना घातक!

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : काही वर्षांपूर्वी अंगणात दाणे टिपायला येणारी चिमणी आता दिसेनाशी झाली. चिऊ-काऊची गोष्ट सांगणाऱ्या आजीलाही आपल्या नातवांना दाखवायला चिमणी सापडत नाही. या चिमण्या गेल्या कुठे? असा प्रश्न मानवालाच पडायला लागला. परंतु, तिच्या अस्तित्त्वाला ठेच पोहोचवायला आपणच कारणीभूत ठरले आहोत. या वास्तवाकडेच त्यांनी जाणते-अजाणतेपणाने दुर्लक्षच केले आहे.

पूर्वी असणारे वाडे, कौलारू घरे म्हणजे चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी हक्काची जागा असायची. आता अशी घरे गेली. त्याजागी मोठमोठ्या बिल्डिंग्ज उभ्या राहिल्या. चिमण्यांना घरट्यासाठी असलेली ही हक्काची जागा त्यामुळेच हिरावली गेली. चिमण्यांच्या या नष्ट होणाऱ्या अधिवासास मानवी जीवनशैलीच जबाबदार असल्याचे 'जागतिक चिमणी दिवसा'निमित्त पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. छोटछोट्या गावांचा विस्तारही आता शहरीकरणाकडे झुकला आहे. अधिकाधिक सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी विकासाच्या दिशेने जाता-जाता निसर्गाचीच खोडी काढणे मानवाने सुरू केले. याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून या ना त्या नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून भोगावा लागत आहे. परंतु, जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असलेल्या चिमणी या छोट्याशा पक्ष्यावर त्याचा सर्वात मोठा परिणाम होत आहे. शहरीकरणाच्या अतिरेकापायी चिमणी या पक्ष्याचे दर्शनच दुर्मीळ झाले आहे.

बदललेल्या आर्किटेक्चरच्या पद्धती, काँक्रिटीकरण, मोबाइल रेडिएशन, शेतातील पिकांवरील घाटक कीटकनाशके या सर्व बाबी चिमणीच्या विनाशासाठी कारणीभूत ठरत असल्याचे चिमण्यांचे अभ्यासक डॉ. मोहत्तम दिलावर सांगतात. चिमण्यांना पिण्यास पाणीही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठी आपत्ती ओढावली आहे. हे चित्र बदलण्यासाठी चिमण्यांसाठी घरटे उपलब्ध करून देण्याची, त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा पुरविण्याची गरज पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

चिमणी गणना हाईना!

२० मार्च २०१०पासून जागतिक स्तरावर चिमणी दिवस साजरा केला जात आहे. ३० देशांपेक्षा जास्त देश हा दिवस साजरा करतो. युरोप व दक्षिण आशियाई देशांमध्येही या दिवसाचे मोठे आकर्षण आहे. भारतामध्ये रुस्सेट, स्पॅनिश, साईण्ड, हाऊस, ट्री चिमण्यांचे हे पाच प्रकार प्रामुख्याने आढळतात. 'एनएफएस' (नेचर फॉरेव्हर सोसायटी) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताशिवाय जगातील इतर देशांमध्ये एका ठराविक कालावधीत चिमणीगणना केली जाते. त्यामुळे चिमण्यांचे प्रमाण, वाढ यांविषयी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असते. भारतात मात्र दुर्दैवाने चिमणीगणना होत नसल्याने चिमण्यांच्या प्रमाणाविषयी माहितीही अधांतरीच राहते.


बदलत्या जीवनशैलीचा परिणाम चिमण्यांवर झाला आहे. याच जीवनशैलीचा परिणाम चिमण्यांना भोगावे लागत आहेत. मात्र, हीच परिस्थिती कायम राहिली तर आपल्यालाही भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

- डॉ. मोहम्मद दिलावर, संस्थापक, नेचर फॉरेव्हर सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप-राष्ट्रवादीचा शिवसेनेवर निशाणा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शिवसेनेवर मित्रपक्ष भाजपासह राष्ट्रवादीने निशाणा साधत प्रतिहल्ला केला. शिवसेनेचा मोर्चा हा जनतेची दिशाभूल करणारा असून, अभ्यास न करताच सेनेने मोर्चा काढल्याचा आरोप भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला आहे. शिवसेनेला निवडणुकीची भीती वाटत असल्यानेच मित्रपक्षाला कोंडीत पकडण्याचे राजकारण सेना करीत असल्याचा आरोप फरांदे यांनी केला आहे. तर, सर्वसामान्य जनतेबद्दल एवढा जिव्हाळा असेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जयंत जाधव यांनी दिला आहे. भाजप सरकारकडून नाशिकवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेनेने शनिवारी भव्य धडक मोर्चा काढला. त्यामुळे सत्तेतील मित्रपक्षाने काढलेल्या मोर्चाने भाजपचा तिळपापड झाला असून, शिवसेनेचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. आमदार फरांदे यांनी पत्रक काढून शिवसेनेवरच निशाणा साधत, सेना जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यानीच उत्तर महाराष्ट्रातील उद्योग उद्‍ध्वस्त करण्याचा डाव आखला होता, असा आरोप फरांदे यांनी केला आहे. एकलहरे केंद्राचा ६६० मेगावॅटचे केंद्र एकलहरेमध्येच होणार असल्याचा दावा करती पाणी न्यायालयाच्या आदेशाने सोडल्याचा दावा केला आहे. टीडीआर कायदा महाराष्ट्रासाठी असल्याचे सांगत वनविभागाच्या कार्यालय स्थलांतराचे समर्थन केले आहे. सेनेचे आरोप निराधार व खोटे असून, मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेला कणव दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सेनेला मनपा निवडणुकीची भीती वाटल्याने असे उद्योग करीत असल्याचा आरोप केला आहे. भाजपप्रमाणेच राष्ट्रवादीनेही सेनेवर हल्लाबोल केला आहे. नाशिककरांवर पाणी कपातीचे आलेले संकट, विदर्भ व मराठवाड्याला सवलतीने वीज देण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमधील स्टील व प्लास्टिक उद्योग स्थलांतर होण्याचा धोका, शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, शासनाच्या टीडीआर धोरणामुळे सामान्य नाशिककरांचे घराचे स्वप्न भंगून विकास थांबणार आहे. हे सर्व निर्णय सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेनेच्या सरकारने घेतलेले असताना या निर्णयाविरोधात नाशिक शहरात मोर्चा काढणे हे कितपत योग्य आहे, असे प्रश्न जयंत जाधव यांनी उपस्थित केले. शिवसेनेला सत्तेत राहण्याचा मोह आवरला जात नाही. सत्ताधारी पण तुम्हीच व आंदोलनकर्ते सुद्धा तुम्हीच. शेतकरी व सर्वसामान्य जनतेविषयी शिवसेनेला एवढा जिव्हाळा असेल, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडून विरोधी बाकावर बसावे, असे आव्हान मोर्च्याची खिल्ली उडविताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जयंत जाधव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटके जोशी समाजाची जातपंचायत बरखास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याची भटके जोशी समाजाची जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय शनिवारी नाशिकमध्ये घेण्यात आला. लक्ष्मी लॉन्स येथील समाजबांधवांच्या मेळाव्यात पंचांनी हा निर्णय घेतला. यावेळी जातपंचायत मूठमाती विरोधी अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी संविधानाची प्रस्ताविका देऊन पंचांचे अभिनंदन केले.

राज्यभरात पसरलेला भटके जोशी समाज गावोगाव भटकून भविष्य पाहण्याचा व्यवसाय करतो. या समाजातील सर्व महत्त्वपूर्ण निर्णय जातपंचायतीमार्फत घेतले जातात. या प्रक्रियेला विरोध करणाऱ्या समाजबांधवांना पंचांच्या आदेशावरून वाळीत टाकले जात असे. समाजातील मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या कुटुंब‌ियांना जातीबाहेर काढल्याचा तसेच प्रेमविवाह करणाऱ्या मुलीस मारून टाकण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार नाशकात २०१३ मध्ये घडला होता. 'महाराष्ट्र टाइम्स'ने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर सहा जातपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर एकवटलेल्या समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. तरीही जात पंचायत बरखास्तीच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल पावणे तीन वर्षांचा काळ लोटला आहे. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सजग पदाधिकाऱ्यांनी पुढाकार आणि परिश्रम घेतल्याने जात पंचायत बरखास्त झाल्याची भावना समाजातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शनिवारी झालेल्या मेळाव्यात जातपंचायत बरखास्तीची घोषणा करण्यात आली.

यावेळी आमदार बाळासाहेब सानप, भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके, पल्लवी रेणके, नाशिक जिल्हा जोशी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब हिंगमिरे, मधुकर हिंगमिरे आदी मान्यवर उपस्थित होते. या निर्णयाबाबत शिंदे म्हणाले, 'विस्कटलेला समाज एकत्रित आला असून, जातपंचायत बरखास्तीचा निर्णय घेऊन समाजाने अनिष्ठ रुढी आणि परंपरांना मूठमाती दिली आहे. सामूदायिक विवाह, तसेच गोरगरीबांसाठी विधायक उपक्रम राबविण्याचे काम यापुढेही सुरू राहील. प्रबोधनाच्या मार्गाने बरखास्त झालेली ही बारावी जातपंचायत असल्याचे चांदगुडे यांना सांगितले. तर भटके जोशी समाजाच्या पंचांनी घेतलेल्या निर्णयाचे अविनाश पाटील यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांसप्रकरणामुळे भाजप आक्रमक

$
0
0

संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या

म. टा. प्रतिनिधी, सिडको

सिडकोतील गणेश चौकजवळील जुने स्टेट बँक चौकात एका व्यक्तीने बुलेटवर येत भर रस्त्यात गोवंश मांस टाकल्याचा आरोप करीत भाजपने रविवारी आंदोलन छेडले. अशा प्रकारे सामाजिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीच्या बुलेटचा नंबर दिल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याबद्दल भाजपने संताप व्यक्त केला. गोवंश मांस रस्त्यात टाकणाऱ्यांवर कारवाई मागणी भाजपने पोलिसांकडे केली आहे.

येत्या काही दिवसात विविध धार्मिक सण तसेच शिवजयंती होणार आहे. धार्मिक सणांना गालबोट लागावे म्हणून सिडकोमध्ये एका व्यक्तीने गोवंश मांस भर रस्त्यात टाकत शांतताभंग करण्याचा कुटील डाव केल्याचा आरोप करीत भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले. गोवंश मांस टाकण्यात आलेल्या ठिकाणी भाजपने रास्ता रोको आंदोलन केले. अंबड पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होत संबंधित समाजकंटकास अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात परिसरातील रहिवाशांसह भाजपा सिडको मंडल अध्यक्ष गिरीश भदाणे, गणेश ठाकूर, रवी पाटील, शेखर निकुंभ, शैलेश साळुंखे, यशवंत नेरकर आदी सहभागी झाले.


पोलिसांचा 'तपास' सुरूच

गोमांस भररस्त्यात टाकून पळ काढणाऱ्या व्यक्तीच्या बुलेटचा क्रमांक अंबड पोलिसांना दिला. मात्र, तरीही तपास सुरू असल्याचे पोलिस सांगत आहेत. काही दिवसांनी येणाऱ्या धार्मिक सणात गोवंश मांस रस्त्यात टाकून जातीय तेढ निर्माण होणार नाही, याबाबत पोलिसांनी काळजी घ्यावी, अशी अपेक्षा भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संदीप’चे विद्यार्थी चमकले राष्ट्रीय स्तरावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदौरमधील पिथमपूर येथे आयोजित केलेल्या 'एसएई-इंडिया बाजा २०१६' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत नाशिकमधील संदीप फाऊंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत सहभागी होत त्यांनी राष्ट्रस्तरावर २७वा क्रमांक मिळवला. व्हेईकल डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरिंग यांबाबतचे प्रात्याक्षिक मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रातर्फे दरवर्षी घेतली जाते. यामध्ये संदीप फाऊंडेशनच्या मॅकेनिकल शाखेतील विद्यार्थ्यांनी 'ऑल टेरिअन व्हेईकल' ही कोणत्याही प्रदेशात चालू शकणाऱ्या वाहनाची निर्मिती केली. या कॉलेजच्या २५ विद्यार्थ्यांच्या टीमने यामध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेचा पहिला राऊंड पंजाबमधील चित्कारा विद्यापीठामध्ये पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी 'ऑल टेरिअन व्हेईकल' प्रकल्पाचे डिझाईन सादर केले. या वाहनाची माहिती, होणारा फायदा, गरज अशा सर्व विषयांची माहिती सादर केली. परीक्षकांच्या पसंतीस हा प्रकल्प उतरल्यानंतर पुढे 'एसएई-इंडिया बाजा २०१६' या मेन राऊंडमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली. या गाडीचे सर्व पार्ट्स विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आहेत. टेक्निकल इन्स्पेक्शन व काठ‌ीण्य पातळीच्या पायऱ्या ओलांडून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना संदीप फाऊंडेशनचे मेकॅनिकल विभागाचे प्रमुख विक्रम कोल्हे व प्रा. डॉ. आर. जी. तातेड यांचे मार्गदर्शन लाभले.

अशी होती टीम कॅप्टन - मृण्मय कुलकर्णी व्हेईकल ड्रायव्हर - निखिल तपक‌िरे ब्रेक सिस्टीम - श्रीविजय गणपत्ये श्रीनिवासन् तेजस पेटकर - स्टीअरिंग अॅण्ड व्हील जिओमेट्री हिमांशू केडिया - सस्पेशन्स

या स्पर्धेतून खूप काही शिकण्यास मिळाले. संपूर्ण व्हेईकल आम्हा विद्यार्थ्यांनाच तयार करायचे असल्याने प्रात्याक्षिक ज्ञान मिळाले. शिवाय औद्योगिक जगतात काय अपेक्षित असते याची जाणही आली. - मृण्मय कुलकर्णी, कॅप्टन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्मवीर एक्स्पो’तून तंत्रज्ञानात्मक आविष्काराचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजिनीअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी पॉवर सेक्टर व जलव्यवस्थापनावर विशेष संशोधन करून राष्ट्राची प्रगती साधली पाहिजे. विद्यार्थ्यांनी 'कर्मवीर एक्स्पो'सारख्या या स्पर्धेत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक आविष्कार सादर केले आहेत. त्याचा लाभ त्यांना प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात कार्य करताना होईल, असे प्रतिपादन क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे उपाध्यक्ष मुकुल श्रीवास्तव यांनी केले. के. के. वाघ इंजिनीअरींग कॉलेजमध्ये इलेक्ट्रीकल विभाग व आयटी लोकल नेटवर्क नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 'कर्मवीर एक्स्पो' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे स्पर्धेचे चौदावे वर्ष होते. या दोन दिवसीय स्पर्धेत देशभरातील १३९ ग्रुप्सअंतर्गत तब्बल ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीवास्ताव बोलत होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची गरज असून, या क्षेत्रात वावरण्याचा आत्मविश्वास यामुळे बळकट होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्य केशव नांदूरकर यांनी प्रास्ताविकात कॉलेजच्या उपक्रमांविषयी व संस्थेविषयी माहिती दिली व प्रगतीचा आढावा घेतला. स्पर्धेचे परीक्षण डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, निखिल खताळे, धीरज मेथीकर, नॉबर्ट डिसूझा, चंद्रकांत मोहीकर, एन. एल. पंजाबी यांनी केले. यावेळी फोटोग्राफी स्पर्धा व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धाही घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशिनाथदादा टर्ले, पॉवरिका कंपनीचे जनरल मॅनेजर मनिष गुप्ता, डी. एस. शिंदे, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, नॉबर्ट डिसूझा, विभागप्रमुख डॉ. बी. ई. कुशारे आदी उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते प्रकल्प ब्लाईंड असोसीट बूट, अॅडव्हान्स सेफ्टी ड्राईव्ह, स्मार्ट गाईड फॉर ब्लाईंड, सोलर ऑटोरिक्षा, इ‌‌म्प्लीमेंटिंग अॅडव्हेन्स सिस्टीम फॉर कंट्रोलिंग हॅण्डिकॅप्ड व्हेईकल, स्मार्ट व्हिल चेअर, ग्रीपमीट.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुमान संमेलनाला नाशिककरही जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतभरातील शहीद जवानांच्या परिवारासाठी कार्यरत असलेल्या सरहद या पुणे येथील शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे संत नामदेवांचे विचार भावी पिढीत रुजवावे त्यांना संताबद्दल जिज्ञासा जागरुक व्हावी, यासाठी घुमान कर्मभूमीत येत्या ३ व ४ एप्रिलला बहुभाषिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशकातून हजारो भाविक व संत नामदेव महाराज प्रेमी यात सहभागी होणार आहे.

घुमान येथे देशातील प्रास्तावित पहिले भाषा भवन पंजाब सरकारच्या माध्यमातून घुमान येथे उभारणार आहे. प्रथमच झालेल्या अभूतपूर्व संमेलनात डॉ. सदानंद मोरे, साहित्यिक श्रीपाल सबनीस, राजन खान, संयोजक भारत देसरडा, डॉ. सतीश देसाई, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, विजय कोलते, साहित्यिक रामदास फुटाणे, अरुण जाखडे, संतसिंग मोघा, ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषा तज्ज्ञ संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्यसह महाराष्ट्रभरातील संत नामदेव प्रेमी भाविक उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाच्या निमित्ताने बहुभाषिक साहित्य संमेलनात देशभरातील सर्व भाषा आणि साहित्य जोडण्याचा अनोखा संगम हा उपक्रम राबविण्याची सरहद संस्थेची संकल्पना असून या संस्थेने पुढाकार घेवून बहुभाषिक साहित्य संमेलन भरविले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पसा’मध्ये २७ मार्चला नास्तिक मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहीद भगतसिंग विचारमंचाच्या वतीने येत्या २७ मार्च रोजी नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळक पथ, शालिमार येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात प्रख्यात लेखिका आणि मुंबई विद्यापीठातील संचालिका मुग्धा कर्णिक या 'नास्तिकांचे जगासाठी योगदान' या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उत्तम कांबळे हे 'माझा नास्तिकतेचा प्रवास' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात सन २०१४ पासून नास्तिक मेळाव्यास प्रारंभ झाला. शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनाच्या म्हणजे २३ मार्चच्या जवळच्या शनिवारी वा रविवारी हा मेळावा आयोजित केला जातो. सन २०१४ मध्ये मुंबई, पुणे व पणजी येथे, तर सन २०१५ मध्ये या तिन्ही शहरांसह नाशिक व अहमदनगर येथे नास्तिक मेळावे झाले. यंदाच्या वर्षी दिल्ली व नागपूर येथेही हे मेळावे होत आहेत. सामाजिक परिस्थितीमुळे बऱ्याच व्यक्ती नास्तिक असूनही नास्तिकता दडवून ठेवतात. आपल्या विचारांचे बरेच लोक समाजात आहेत, हे देखील त्यांना माहीत नसते. अशा नास्तिकांनी वर्षातून एकदा एकत्र यावे, एकमेकांना भेटावे, एकमेकांचे विचार जाणून घ्यावेत, तसेच नास्तिकते बाबतचा न्यूनगंड दूर व्हावा हा या मेळाव्यांमागील हेतू आहे. दरम्यान, या मेळाव्यासाठी सर्व नास्तिक, अज्ञेयवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, मानवतावादी, मुक्तचिंतक व विवेकवाद्यांना खुला प्रवेश असून, मेळाव्याची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने MaharashtraAtheist.com या संकेतस्थळावर करता येणार आहे. अधिक माहितीसाठी श्यामला चव्हाण (९८२२६१२०९१), मयूर कुलकर्णी (९९२३८६७९८७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तिच्यासाठी’तून आज महिलांना मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजसुधारणेच्या चळवळीपूर्वी महिला अन्याय व शोषणास मोठ्या प्रमाणात बळी पडत होत्या. स्त्री शिक्षणाविषयक प्रबोधनामुळे हे प्रमाण कमी झाले असले तरी ते थांबलेले नाही. आजही अशा अनेक महिला आहेत, ज्यांना त्यांचे हक्क व अधिकारांविषयी माहिती नसल्यामुळे त्या स्वतःवरील अन्याय, शोषण सहन करतात. याविषयक माहिती महिलांना मिळावी, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' व 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' यांच्या संयुक्त विद्यमाने 'तिच्यासाठी' या मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. अॅड. मिलन खोहर सेमिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात बाजी मारत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे किंवा मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे महिलांना आजही अन्याय, अत्याचाराला सामोरे जावे लागते. हे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने या सेमिनारमधून कायदेविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीसाठी व महिलांसाठी हा सेमिनार महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये महिलांविषयक असलेल्या कायद्यांची माहिती, महिलांचे हक्क व अधिकार, कौटुंबिक समुपदेशन व महिला हक्कांच्या दुरुपयोगांचा संभ्रम यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शंकांचे निरसनही तज्ज्ञांकडून केले जाणार आहे. सेमिनार पूर्णतः मोफत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधील स्वगत हॉल या सेमिनारचे व्हेन्यू पार्टनर आहेत.

कार्यक्रम स्थळ दिनांक : २१ मार्च, सोमवार वेळ : दुपारी ३ ते ५ ठिकाण : स्वगत हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विद्या विकास सर्कलजवळ, गंगापूर रोड, नाशिक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ आंदोलनावर मंगळवारी तोडगा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने अर्थ संकल्पात १ टक्का अबकारी कर लावल्याच्या निषेधार्थ सराफांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. बंद मागे घ्यावा यासाठी दिल्लीत केंद्रीय मंत्री पियूष गोयल व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात बैठक झाली. मात्र, या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, पुण्यात सराफ राज्य संघटनेची मंगळवारी (दि. २२) बैठक होणार आहे. यात तोडगा निघण्याची शक्यत‌ा वर्तविली जात आहे.

सराफांचे १ मार्चपासून आंदोलन सुरू आहे. सराफांच्या राज्यस्तरीय संघटना आणि केंद्रीय संघटना यांच्यात १९ मार्च रोजी दिल्लीतील भाजप कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेम्स अॅण्ड ज्वेलरी असोसिएशन, महाराष्ट्र सराफ आणि सुवर्णकार असोसिएशन इत्यादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी केंद्र सरकार केंद्रीय अबकारी कर कमी करण्यास सरकार तयार नसून त्यात शिथिलता आणली जाईल, असे शहा यांनी सराफांच्या शिष्य मंडळाला अश्वासन दिले. याबाबत साठ दिवसात निर्णय घेतला जाईल असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले; मात्र गेल्या २० दिवसांपासून तोडगा न निघाल्याने सराफ व्यावसायिक नाराज होते. दुकाने उघडायचे की नाही याबाबत साशंकता होती. याबाबत संघटनेमध्ये एकमत होत नसल्याने काही सराफांनी रविवारी दुकाने उघडली. परंतु, जिल्हा असोसिएशनने आदेश दिल्यानंतर दुकाने पुन्हा बंद करण्यात आली. पुढील दिशा ठरेपर्यंत कुणीही दुकाने उघडू नये असे आवाहन गिरीश टकले, राजेंद्र ओढेकर, गिरीष नवसे, कन्हैय्या आडगावकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रक्तदान ही तरुणांची नैतिक जबाबदारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रक्तदान ही प्रत्येक सुजाण व सुदृढ नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. दान केलेल्या रक्ताची उणीव दात्याच्या शरीरात अगदी काही दिवसांमध्येच भरून निघते, पण हेच रक्त एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्यात महत्त्वाचे ठरू शकते, असे प्रतिपादन मातोश्री शिक्षण संस्थेचे सचिव कुणाल दराडे यांनी केले. मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निक व संजीवनी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे, उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य संजय बागुल, आयोजक प्रा. रवि पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रक्त व त्यातील महत्त्वाचे घटक यांचे आयुष्य तुलनेने कमी असते. त्यामुळे रक्तपेढ्यांना सतत व एकसारखा रक्तपुरवठा होणे गरजेचे ठरते. केवळ आपतीवेळी अथवा अत्यावश्यक असताना रक्तदान करण्यापेक्षा सर्व पात्रताधारक रक्तदात्यांनी स्वेच्छेने व नियमितपणे रक्तदान करण्याची सवय अंगीकारली पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. खराटे यांनी व्यक्त केले. आजच्या विज्ञाननिष्ठ युगात देखील रक्ताला पर्याय सापडलेला नाही, त्यामुळे गरजूंना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रक्तदान हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. सर्व तरुणांनी पुढे येऊन समाजसेवेचा हा मार्ग मोठ्या उत्साहाने जोपासला पाहिजे, असे आवाहन प्राचार्य संजय बागुल यांनी केले. रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्रा. रवि पाटील यांनी केले. योगेश गायधणी यांनी रक्तदानाविषयी जनजागृती केली. याप्रसंगी विभागप्रमुख प्रा. मंगेश सानप, प्रा. रमेश अदमाने, प्रा. सागर सोनवणे, प्रा. दीपक थोरात, प्रा. दीपक शेळके, प्रा. अश्विनीकुमार चावडा, प्रा. मयूर गायधणी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळांच्या ज्यूसला वाढती पसंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने फ्रूट ज्युसची मागणीही वाढू लागली आहे. यामुळे अननस, संत्री, अॅपल या फळांची मागणी वाढली आहे. द्राक्षांचीही आवक चांगली होत असून दरही नियंत्रणात आहेत. शहरात रसवंतीची संख्याही वाढली असून उसाच्या रसाला सर्वाधिक मागणी आहे.

उन्हाळा लागला की रसाळ फळांची मागणी दुप्पट होते. बाजारात सर्व प्रकारची फळे उपलब्ध असली तरी ज्युससाठी लागणा-या फळांना अधिक मागणी आहे. उन्हाळी फळ म्हणून ओळखल्या जाणा-या टरबुजांचीही आवक चांगली असून मागणीही वाढली आहे. यामुळे २० रुपये नगापासून ८० रुपये नगाने टरबूज मिळत आहे.

सोनाका, थॉमसन, शरद सीडलेस, जम्बो ब्लॅक आदी प्रकारची द्राक्षे ४० ते ८० रुपये किलोप्रमाणे मिळत आहेत. यंदा द्राक्ष निर्यातीवर अधिक भर असल्याने द्राक्षमणी अद्याप बाजारात दाखल झालेले नाहीत.

यंदा तापमानाचा पारा ३५ अंशांवर पोहोचल्याने नागरिक फळांच्या ज्यूसबरोबरच रेडिमेड मँगो, अॅपल, संत्रा ज्यूसलाही पसंती देत आहेत. यामुळे स्वीट्सच्या दुकानांमध्येही हे ज्यूसचे पॅक वजनानुसार उपलब्ध झाले आहेत. ताक, मठ्ठाची दुकाने थाटण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्या कडाडल्या; दर आणखी वाढणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणीटंचाईची झळ भाजीपाल्यालाही बसली असून, आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. यामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांचेही दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. सरासरी तीस ते चाळीस टक्केच भाजीपाल्याची आवक होत असून, येत्या काळात आवक आणखी घटून गृहिणींचे बजेट वाढविण्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात भाज्यांचे दर कमी होते. यामुळे भाजीपाल्याचे बजेट आवाक्यात होते. मात्र, आता पाणीटंचाईमुळे आवक घटत चालल्याने भाज्यांच्या दरात तेजी आली आहे. मेथीची जुडी पुन्हा २० ते ३० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गवार, कारले, गिलके, दोडके, मिरची यांनी पन्नाशी ओलांडली आहे. वाटाण्याचा हंगामही संपत आला असून, आवक खूपच घटली आहे. कोबी, फ्लॉवरनेही रंग दाखवायला सुरुवात केली आहे. यामुळे गेल्या आठवड्यात मुबलक मिळणारा भाजीपाल्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

आवक ३० टक्केच!

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक अवघी ३० टक्केच होत आहे. मुंबई व गुजरातमध्येही भाजीपाला पाठविला जात आहे. यामुळे आवकेवर परिणाम होत आहे. येत्या काही दिवसात भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.

अंडे झाले स्वस्त

ना‌‌शिक : गेल्या महिन्यात सहा रुपये प्रती नगप्रमाणे मिळणाऱ्या अंड्यांच्या किमतीत उन्हाळा लागताच घसरण झाली आहे. अंडे किरकोळ बाजारात चार रुपये प्रती नग तर गावठी अंडे पाच रुपये प्रती नगप्रमाणे मिळत आहे. सण्डे हो या मंडे असे म्हणून अनेकांच्या जेवणात अंड्यांचा समावेश असतो. हिवाळा लागला की अंड्यांची मागणीही वाढते. मात्र, उन्हाळ्यात अंडे गरम पडतात म्हणून अंड्ड्यांची मागणी घटते. सध्या अंडे किरकोळ दुकानात ४८ रुपये डझनप्रमाणे तर गावठी अंडे ५५ ते ६० रुपये डझनप्रमाणे मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळी महासंघाचा भुजबळांना पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण माळी समाज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठीशी आहे. लवकरच ते भाजप सरकारकडून सुरू असलेल्या राजकीय सूडाच्या भावनेने झालेल्या कार्यवाहीतून निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वास महाराष्ट्र माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष बाजीराव तिडके यांनी व्यक्त केले आहे.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे तिडके यांनी भुजबळांना पाठिंबा कळवला आहे. माळी महासंघाच्या एका सदस्याने भुजबळ यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीशी माळी महासंघाचा कोणताही संबंध नसल्याचा दावा तिडके यांनी केला आहे. दरम्यान, राजकीय सूड बुद्धीने भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात आली असून याचा आम्ही निषेध करीत आहोत. भुजबळ यांनी समाजासाठी केलेले कार्य दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही तिडके यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी टँकर मंजुरीला वेग!

$
0
0

३० जूनपर्यंत तहसीलदारांना अधिकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तालुक्यातील दुष्काळाच्या दाहकतेची पुरेपूर जाणीव तहसीलदारांना असल्याने आता तेथे गरजेनुसार टॅँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. तहानलेल्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या टँकर मंजुरीसाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी हा निर्णय हितकारक ठरणार आहे.

जिल्ह्यात कोठेही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावयाचा असेल तर त्याबाबतची मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे कोणत्याही गावात अथवा वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी हवे असेल तर तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागतो. मागणी मान्य करावी, अशी परिस्थिती आहे की नाही याबाबतचा अभिप्राय संबंधित तालुक्यातील तहसीलदार तसेच, प्रांतांकडून मागविला जातो. त्यानंतर टँकरच्या मागणीबाबत योग्य तो निर्णय घेतला जातो. या प्रक्रियेत बरेच दिवस व्यर्थ जातात. पाण्याची निकड असलेल्या गावकऱ्यांना टँकरसाठी प्रतीक्षा करावी लागते.

दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळणाऱ्या ग्रामस्थांना टँकर मंजुरीसाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी राज्य सरकारने त्याबाबतचे अधिकार तहसीलदारांना देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हे अधिकार जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत. नाशिक तालुका वगळता जिल्ह्यातील अन्य १४ तालुक्यांमध्ये आता ३० जूनपर्यंत तहसीलदारच टँकरला मंजुरी देऊ शकणार आहेत. यामुळे टँकरचे प्रस्ताव येताच तहसीलदार त्यावर तत्काळ निर्णय घेऊ शकणार असून, नागरिकांना फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

जिल्ह्यात २४३ ठिकाणी धावताहेत ७४ टँकर

एकीकडे धरणांमधील पाणी पातळी कमालीची खालावल्याने नागरिकांना शहरात पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. तर, ग्रामीण भागाची भिस्त टँकरवरच अवलंबून आहे. आजमितीस जिल्ह्यात ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९२ गावे आणि १५१ वाड्या अशी २४३ ठिकाणे टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. त्यासाठी ३२ खासगी तर ४२ सरकारी टँकरची मदत घेण्यात येते आहे. त्यांच्या दररोज एकूण २६१ फेऱ्या होत आहेत. येवल्यात सर्वाधिक ३७ गावांमध्ये सध्या टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तर, सर्वाधिक प्रत्येकी ५४ वाड्या सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात आहेत. याखेरीज गावांसाठी १३ तर केवळ टँकरसाठी ४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि निफाड तालुक्यांत सुदैवाने अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मैत्रेय गुंतवणूकदारांना संजीवनी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना लवकरच पैसे परत मिळणार आहेत. यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने आणि कोर्टाच्या आदेशाने इस्क्रो हे ​वेगळ्याच्या धाटणीचे बँक खाते सुरू करण्यात आले आहे. आजवर, या खात्यात मैत्रेय ग्रुपच्या संचालकानी दीड कोटी रुपयांपैकी ७४ लाख रुपये जमा केले आहेत. उर्वरीत रक्कम दोन दिवसात भरली जाणार आहे. गुंतवणूकदारांना मैत्रेय ग्रुपने पैसे कसे परत करावे, याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, त्यावर २३ मार्च रोजी कोर्टात फैसला होऊ शकतो.

राज्यात चर्चेत असलेल्या मैत्रेय ग्रुपच्या संचालिका वर्षा मधुसदन सत्पाळकर यांना कोर्टाने काही अटींवर २० दिवसांचा जामीन दोन मार्च रोजी मंजूर केला. गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याच्या दृष्टीने सत्पाळकरांनी पोलिसांनी सादर केलेल्या अटींवर अंमलबजावणी करण्यास कोर्टात सहमती दर्शवली होती. यात प्रामुख्याने नाशिकमध्ये दाखल झालेल्या तक्रारदारांचे पैसे जमा करण्याबाबतचा ऊहापोह करण्यात आला होता. दोन मार्चपर्यंत शहर पोलिसांकडे ६६१ तक्रारदार आले होते. या तक्रारदारांनी सुमारे १ कोटी ५० लाख रुपये मैत्रेयमध्ये गुंतवले होते. तेवढे पैसे सत्पाळकरांनी बँकेत जमा करावे, अशी पोलिसांची मागणी कोर्टाने मान्य केली. पोलिसांच्या या प्रस्तावानुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार अॅक्सिस बँकत इस्क्रो खाते सुरू करण्यात आले. जामीन मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी सत्पाळकरांनी या खात्यात ७४ लाख रुपये जमा केले. उर्वरित पैसे दोन दिवसात जमा होतील. याबाबत बोलताना तपास अधिकारी आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनचे सिनीअर पीआय सीताराम कोल्हे यांनी सांगितले की, सत्पाळकरांचा पासपोर्ट जमा असणे आणि इस्क्रो खाते सुरू होणे हे या तपासाच्या दृष्टीने जमेच्या बाजू ठरल्या आहेत.

तक्रारदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याबाबतची माहिती कोर्टात सादर केली जाणार आहे. आजमितीस तक्रार समोर आलेल्या तक्रारदारांनी तीन कोटी रुपये गुंतवल्याचे दिसते. हे पैसे सत्पाळकरांनी खात्यात जमा केल्यास गुंतवणूकदारांना ते कोर्टाच्या आदेशाने देण्यात येतील. पोलिसांकडे तक्रार दाखल असेल तरच कोर्टात त्यावर निर्णय होऊ शकतो, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इस्क्रो खाते सुरू करून गुंतवणूकदारांना परत पैसे देण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी, अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे. या खात्याची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना होती. सीबीआयमध्ये आर्थिक शाखेचे प्रमुख म्हणून काम केलेल्या जगन्नाथन यांचा अनुभव या निमित्ताने उपयोगी पडल्याचे सांगितले जाते.

इस्क्रोमुळे कायदेशीर प्रक्रिया बंधनकारक

इस्क्रो खाते सुरू करण्यासाठी कंपनीतर्फे बँकेशी करार करण्यात येतो. हा करार झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार कंपनीला पैसे भरावे लागतात. एकदा पैसे भरल्यानंतर संबंधित कंपनीला ते पैसे परत काढता येत नाही. गुंतवणूकदारांना पोलिसांच्या रिपोर्टनुसार आणि कोर्टाच्या आदेशाने काढता येतात. दरम्यान, ज्या तक्रारदारांनी आजवर तक्रार दाखल केलेली नाही, त्यांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पैसे परत मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐंशी दिवसांचाच पाणीसाठा

$
0
0

नकाणे तलावात एकूण १२२ एमसीएफटी पाणी शिल्लक, आयुक्तांकडून पाहणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात मोठ्या पाणसंकटास सामोरे जावे लागणार आहे. कारण नकाणे तलावात केवळ ऐंशी दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे नागरिकांसाठी पाण्यासाठीची वणवण आता वाढणार आहे. या भीषण परिस्थितीत आता धुळेकरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.


सध्या शहराला ६० टक्के पाणीसाठा हा तापी पाणीपुरवठा योजनेतर्गंत होतो. तर ४० टक्के पाणीसाठा शहरालगत असलेल्या नकाणे तलावातून होतो. मात्र नकाणे तलावाच्या पाण्याच्या पातळीत घट होवून तलावातील मृतसाठा मिळून एकूण १२२ एमसीएफटी एवढ्याच पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे महापालिकेतर्फे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतच मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कदम, बांधकाम अभियंता कैलास शिंदे, संजय अग्रवाल आदींनी या तलावांची सोमवारी पाहणी केली.

शहरातील नकाणे तलावाची क्षमता ३५५ एमसीएफटी असून सद्यस्थितीत तलावातून दररोज एक ते सव्वा एमसीएफटी पाणी घेतले जाते. हा जलसाठा पुढच्या केवळ ८० ते ८५ दिवसच पुरेल, त्यामुळे आता धुळेकरांसमोर पुढे पाणसंकट उभे राह‌ीले आहे. या सर्व परिस्थितीला पाहून येत्या काळात पाणीटंचाई होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. जेणेकरून नागरिकांना पाण्याचा पुरवठा तीन ते चार दिवसाआड करता येईल. पांझरात पाणी सोडल्याने नदी वाहू लागली आहे. नकाणे तलावाच्या पाण्याचा वापर बंद करण्यात येऊन सरळ नदीतून पाणी उचलण्यात येत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नकाण्यातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे. अशी माहिती पाहणीदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी हरणमाळ तलावाला भेट दिली. त्याची क्षमता ४५० एमसीएफटी आहे. मात्र सध्याला या तलावात केवळ मृतसाठाच शिल्लक आहे. या तलावातून फक्त दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी ५ एलएलडी पाणी घेतले जाते. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, म्हणून प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. शहरात तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा हाेत आहे. यात आणखी एक दिवस वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी पाणी बचतीचे आवाहन मनपाकडून केले आहे.


९ जूनपर्यंतच पाणी

मार्च महिन्यातच धुळे शहराला पाणीटंचाईची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. याचा प्रत्यय नकाणे तलावातील पाणीसाठ्याने आलाच आहे. सद्यस्थितीला केवळ ऐंशी दिवसांचाच पाणीसाठी शिल्लक असल्याने नकाणेतून पाणीपुरवठा बंद करुन दुसरीकडून पाणीपुरवठा सुरू केला गेला आहे. तसेच अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. मात्र जर पाणीसाठा वाढला नाही तर ९ जूननंतर धुळेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद कॉलेजमध्ये रंगला युगांतर-२०१६

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

गणेशवाडीतील आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयात 'युगांतर -२०१६' अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर होते. प्राचार्य एस. एस. दासरी यांनी स्वागत केले. प्रत्येकाने सर्व प्रकारच्या उपक्रमात सहभागी होऊन उत्तम कलाकौशल्य आत्मसात करावे, असे सांगितले. जेष्ठ कवी व विनोदी लेखक नरेश महाजन यांनी विविध विनोदी गोष्टी सांगून सर्वांना मनमुराद हसवले. प्रत्येकात अनेक कलागुण दडलेले असतात त्यांचा विकास केला पाहिजे, असे उदगीरकर यांनी सांगितले. जनरल सेक्रेटरी कुमारी अनुपमा पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आनंदमेळा, गीतरंग, विविध डेज साजरे करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख वैद्य नंदलाल पवार, वैद्य शिवानंद तोंडे, वैद्य लक्ष्मीकांत जोशी उपस्थित होते. वैद्य भीषण मोगल व अश्विनी पाटील यांनी विविध खेळाचे आयोजन केले होते. अश्विनी एकतपुरे व श्रीकांत वाकुडकर यांनी सूत्रसंचालन केले. शारदा पुरी हिने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहांगे, वारुंगसेंना करा अपात्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांच्याकडून येथील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वारंवार शिवीगाळ करणे, धमकी देणे, सरकारी कामात अडथळा असे प्रकार घडत आहेत. संबंधित पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अपात्रतेची कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी येथील राजपत्रीत अधिकारी संघटना, राज्य ग्रामसेवक संघटना, वैद्यकीय अधिकारी संघटना, विस्तार अधिकारी संघटना यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

इगतपुरी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे व उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांनी येथील गटविकास अधिकारी किरण कोवे, सहाय्यक अधिकारी जगन सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे, विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे यांसह अन्य कर्मचाऱ्यांशी सातत्याने गैरवर्तन केले आहे. त्यांच्या त्रासला कंटाळून संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिस तक्रार दिली असून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी अधिकारी वर्गात अत्यंत संतापाची भावना आहे. या घटनेचा निषेध म्हणून मालेगावी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. अप्पर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संबंधित सभापती व उपसभापती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करावी, तसेच त्यांना अपात्र ठरविण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास संपूर्ण जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील संघटनेने दिला आहे.

सिन्नरला आंदोलन

सिन्नर : इगतपुरी पंचायत समिती सभापती, उपसभापती यांना तत्काळ अटक करावी व त्यांना अपात्र ठरवण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सिन्नर शाखेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार मनोज खैरनार यांना निवेदनात देण्यात आले. याप्रसंगी कैलासचंद्र वाघचौरे, आर. एस. धुराळे, राजेंद्र माळी, पी. के. सदगीर, बे. के. खैरनार यांच्यासह ४८ ग्रामसेवक सहभागी झाले होते.

त्र्यंबकमध्ये निषेध

त्र्यंबकेश्वर ः सभापती गोपाळ लहांगे आणि उपसभापती पांडूंग वारूणसे यांना तत्काळ अटक करून त्यांना पदावरून अपात्र ठरवा या मागणीसाठी त्र्यंबक पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालवार मोर्चा काढला. मोर्चात गटविकास अधिकारी ज्ञानदा फणसे, जलसंपदाचे वनमाने रावसाहेब, विस्तार अधिकारी राठोड, सागर भाऊसाहेब सहभागी झाले होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव बसवंतला आज कडकडीत बंद!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

येथील काही समाजकंटकांनी मद्यधुंद अवस्थेत रविवारी रात्री दोघांना तलवारीचा धाक दाखवत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची अवहेलना केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेचा निषेध नोंदवित शिवप्रेमींनी सोमवारी बैठक घेवून समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. मंगळवारी पिंपळगाव शहरात बंद पाळण्यात येणार आहे.

रविवारी रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान सचिन दशमाने हे शिवाजी नगरातून आपल्या मित्रांसह मोटारसायकलवरून घरी जात असताना इनोव्हा कारमधून आलेल्या भारत गांगुर्डे याच्यासह काहींनी अडविले. त्यांनी दशमानेंना एका कार्यकर्त्याच्या घराचा पत्ता विचारला. दशमाने यांनी नकार देताच गांगुर्डेच्या साथीदारांनी तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. दशमाने यांच्या मोटारसायकलच्या पुढच्या भागावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचीही या टवाळखोरांनी अवहेलना केली. यादरम्यान दशमाने व त्यांच्या साथीदाराने तेथून पळ काढला.

या घटनेचे वृत्त कळताच भास्कर बनकर, दीपक बनकर, पंढरीनाथ दशमाने यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना या घटनेबाबत माहिती दिली. मात्र शिवजयंती तोंडावर असल्यामुळे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी मंगळवारी शहर बंदची हाक दिली असून सकाळी दहा वाजता निफाड फाट्यावरून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भरत गांगुर्डे व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अभय दिले असल्याचा आरोप शहरवासीयांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images