Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'मनसे'तर्फे शहरात धान्य महोत्सव

$
0
0
घाऊक किमतीत उत्कृष्ट धान्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे १ ते ९ मे दरम्यान 'धान्य महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर होत असलेल्या या धान्य महोत्सवात सेंद्रीय पद्धतीने उत्पादित धान्यही ठेवले जाणार आहे.

चालवा, सौर ऊर्जेवर चालणारी सायकल !

$
0
0
पेट्रोल महागल्याने दुचाकी चालवावी की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. बसच्या तिकिटाचे वाढलेले दर, रिक्षाचालकांकडून होणारी पिळवणूक यावर पर्याय काहीच नाही का? थांबा... आपल्या या समस्येला संडे सायन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांने मार्ग शोधला आहे.

जळगावात पारा ४४.३ वर

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या रविवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची ४४.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

NCP लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात लोकसभेच्या २२ जागा लढवणार असून त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही जागांचा समावेश आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.

थेट अनुदान योजनेत जळगावचा समावेश

$
0
0
केंद्र सरकारच्या थेट अनुदान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या सहा जिल्ह्यांत जळगावचा समावेश झाला आहे.

खान्देशातील पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी

$
0
0
यकृताच्या कॅन्सरमुळे जगण्याची उमेद हरवून बसलेल्या, संगीत शिकवणाऱ्या २६ वर्षांच्या युवकावर जळगावच्या चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या युवकावर उपचार करून शनिवारी त्याला घरी पाठवण्यात आले.

कोट्यवधी रूपये कच-यात

$
0
0
शहरातील कचरा गोळा करण्यासाठी वाहनांवरील खर्च, कचरा डेपोचे व्यवस्थापन अशा विविध कामांसाठी महापालिकेने २०११-१२ या वर्षांत तब्बल एक कोटी रूपये खर्च केले आहेत.

'सिल्व्हर ओक'ने रोखले निकाल

$
0
0
'वर्षभराची फी भरा अथवा निकाल मिळणार नाही' अशी भूमिका घेत सिल्व्हर ओक शाळेने शाळा कर्मचाऱ्यांच्या मुलांचे निकाल रोखल्याची माहिती समोर आली आहे.

गस्तीदरम्यान पोलिस वाहनास अपघात

$
0
0
रात्रीच्या गस्ती दरम्यान समोरील वाहनाच्या तीव्र प्रकाशामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात गंगापूर पोलिस स्टेशनचे पीएसआय सय्यद यांच्यासह तिघेजण जबर जखमी झाले.

सिटीचा प्रीमियम पार्ट नाशिकरोड

$
0
0
नाशिकरोड...नाशिक शहराचा एक अविभाज्य घटक. शहराबाहेरची काही ठिकाणं अशी असतात की त्यांच्या‌शिवाय शहराला पूर्णत्व येत नाही.

नगरसेविकेचेच अनधिकृत बांधकाम

$
0
0
अनधिकृत बांधकामांप्रश्नी राजकीय हस्तक्षेप राज्यभरात गाजत असतानाच नगरसेविका मेघा नितीन साळवे यांनी अनधिकृत पक्ष कार्यालय थाटल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

सोन्यातील घट कर्जदारांच्या मुळावर

$
0
0
एकीकडे सोन्याचे भाव कमी झाल्याचा आनंद असतानाच सोने तारणावरील कर्जाचा हप्ता वाढल्यामुळे सोन्याची स्वस्ताई कर्जदारांना परवडेनाशी झाली आहे.

संगनमताने बँकेचे तीन कोटी लुटले

$
0
0
दिवाळखोरीत असलेल्या कंपनीला गैरमार्गाने कर्ज देऊन त्यानंतर संबंधित कंपनीचा कमी रकमेत लिलाव करून ठाणे जनता सहकारी बँकेने तीन कोटी रुपयांच्या फसवणुकीचा कट रचल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

संतप्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

$
0
0
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्यातील लोकांची तहान भागवण्यासाठी नगर जिल्ह्यातील मुळा आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर शनिवारी रात्री राज्य सरकारने अमलबजावणीला सुरुवात केली. यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

$
0
0
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि संशयित आरोपी विजय दत्तात्रय पोळ (२४) हे पोळवाडा परिसरात राहतात. विजयने संबंधित मुलीशी ओळखत करीत तिला लग्नाचे ​आमिष दाखवले.

... अन् कुत्र्यांची चोरी झाली

$
0
0
गंगापूररोडवरील एका फार्महाऊसमधील ५० हजार रुपये किमतीचे दोन कुत्रे बेपत्ता झाल्यानंतर त्याची तक्रार थेट गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. सुदैवाने बेपत्ता कुत्रे २४ तासांच्या आत सापडले आणि त्यांच्या मालकाचा जीव भांड्यात पडला.

नामी पार्टी !

$
0
0
राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या एकाचे बोलणे आणि त्याचा हावभाव राजकारण्यांना साजेसा असाच आहे. म्हणूनच त्याच्या भोवती काही समर्थकांचा सतत गोतावळा असतो. त्याला पहिल्यांदा भेटणारा नेहमीच प्रभावीत होतो.

सिटी बसला वावडे सर्व्हिस रोडचे

$
0
0
शहरातून जाणा-या मुंबई-आग्रा हायवेला समांतर असलेल्या सर्व्हिसरोडच्या कामाची संथगती आणि सिटी बसचालकांची मनमानमुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला प्रवाशांचा मनस्ताप आजही कायम आहे.

फुलला 'साहित्याचा मळा'

$
0
0
गोदावरी- दारणा आणि वालदेवी या नद्यांच्या पाण्यावर सिंचलेल्या नाशिकरोड परिसरातील नाशिकरोडसह भगूर, देवळाली कॅम्प, विहितगाव, चेहेडी, पळसे, शिंदे, एकलहरे या भागातून सर्वदूर साहित्याचा मळा फुलला...बहरला.

शैक्षणिक हबकडे जाताना...

$
0
0
नाशिकरोड ही वाढता वाढता वाढे या तत्त्वाने निर्माण झालेली वसाहत आहे. एखाद्या ठिकाणी वसाहत निर्मितीनंतर मुलभूत गरजा भागविण्यासाठी चारही बाजुंनी साधनांचा पुरवठा होतो. नाशिकरोडलाही तसेच झाले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images