Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आयुक्तांना पाजले गढूळ पाणी

$
0
0

धुळे मनपा आयुक्त डॉ. भोसलेंना धक्काबुक्की

म. टा. वृत्तसेवा,धुळे

शहरातील माधवपुरा व पालाबाजार परिसरातील नागरिक पाण्याच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत. या समस्येमुळे बुधवारी मनपामध्ये महासभा सुरू असताना येथील नागरिकांनी सभागृहात प्रवेश करत हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी धुळे महापालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांना आपल्या परिसरात येणारे गढूळ पाणी पिण्यास भाग पाडले. यामुळे मनपामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दुष्काळाच्या छायेत धुळे शहरात सध्या पाणीपुरवठा साठ्यानुसार सुरू आहे. त्यासोबतच शहरात काही ठिकाणी गेल्या अडीख्च वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, असे या नारिकांचे म्हणणे होते. त्याचा संताप येऊन शहरातील माधवपुरा आणि पालाबाजारच्या नागरिकांनी बुधवारी मनपाच्या महासभेत येत हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी काही नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात येऊन विरोधात्मक घोषणाबाजी केली.

या गोंधळात काही नागरिकांनी मनपा प्रशासनाला परिसरात पाइपलाइनद्वारे येणारे घाण व दूषित पाणी दाखविण्यासाठी आणले होते. ते दूषित पाणी आंदोलकांनी आयुक्त नामदेव भोसले यांना पिण्यास भाग पाडले. अखेर पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप करुन आयुक्तांना सभागृहाबाहेर नेले. मात्र यावेळीही आयुक्तांना बाहेर काढताना काही नागरिकांनी धक्काबुक्की केली.

याप्रकरणी बुधवारी उशिरापर्यत शहर पोलिस ठाण्यात नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पाण्याची समस्या घेवून आलेल्या नागरिकांचे म्हणणे होते की, गेल्या माधवपुरा, पालाबाजार प्रभाग क्रमांक २१ मध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षापासून दुषित व मैलायुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या भागात गेल्याच वर्षी नवीन पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली होती. मात्र त्याची जोडणी ही मुख्य जलवाहिनीला न जोडता ती जुन्याच पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याचे नगरसेविका मायादेवी परदेशी यांना सांगितले.

यावेळी महासभेत महापौर जयश्री अहिरराव, स्थायी सभापती सोनल शिंदे, विरोधी पक्षनेता संजय जाधव, नगरसेवक, मनपा अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. मात्र समस्या घेवून आलेल्या नागरिकांमुळे महासभेत गोंधळ झाल्याने महासभा तहकूब करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मी माकड नव्हे, लंका जाळणारा हनुमान’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात बुधवारी, धुळे येथील विशेष कोर्टात फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम यांची उलटतपासणी घेण्यात आली. यावेळी संशयिताच्या वकिलांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना, 'मी माकड नाही. परंतु लंका जाळणार हनुमान आहे,' असे वक्तव्य डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

बुधवारी, धुळे जिल्हा विशेष कोर्टात घरकुल घोटाळाप्रकरणी उलटतपासणीचे कामकाज झाले. या प्रकरणातील संशयित माजी आमदार सुरेश जैन यांच्यावतीने अॅड. प्रकाश पाटील यांनी काम पाहिले. सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन यांनी मनपाच्या महासभेत आयुक्त डॉ. गेडाम यांची माकडाबरोबर तुलना केल्याने या प्रकाराचा राग मनात ठेवून गेडाम यांनी घरकुलाविषयी खोटी फिर्याद व खोटी साक्ष दिली असल्याचा मुद्दा अॅड. पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर गेडाम यांनी सांगितले की, 'मी माकड नाही परंतु लंका जाळणारा हनुमान आहे.'

अॅड. पाटील यांनी गेडाम यांना पुढचा प्रश्न केला की, घरकुल योजनेविषयी गुप्तकट तयार करताना तो तुम्ही पाहिला होता का? आणि हा गुप्तकट तयार करण्याची तारीख वार, वेळ कोणती होती? त्यावर गेडाम म्हणाले की, या गुप्तकटाबाबत मी काही ऐकले नाही आणि मला त्याची माहिती नव्हती. मात्र घरकुलांबाबतचा गुप्तकट महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वीपासून सुरू असल्याचे समजते आणि माझ्या फिर्यादीत तथाकथित गुप्तकटाचा विशेष खुलासा दिलेला आहे. नगरपालिका आणि मनपाने घरकुल योजनेविषयी मंजूर केलेले सर्व ठराव हे वैध आहेत हे म्हणणे देखील खरे नसल्याचे गेडाम यांनी सांगितले.

गैरहजर राहिल्याने दंड

कामकाजावेळी आरोपी अशोक रामदास परदेशी व त्यांचे वकील सागर चित्रे हे हजर नसल्याने त्यांना विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांनी पाच हजारांचा दंड केला. तसेच आरोपी शिवचरण ढंढोरे, सरस्वती कोळी, शालीग्राम सोनवणे, साधना कोगटा हे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरूध्द तपासाधिकारीमार्फत चारही आरोपींना अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश केले. मात्र आरोपी शालीग्राम सोनवणे हे मृत झाले आहेत. याबाबत कोर्टात कोणतीही नोंद नसल्याचे न्या. कदम यांनी आरोपींच्या वकिलांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-मुंबई विमानसेवेसाठी मुंबईतील वेळेचा अडथळा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-मुंबई विमानसेवेसाठी असलेली अडथळ्यांची शर्यत अद्यापही कायम आहे. एअर इंडियाच्या १ मे पासून सुरू होणाऱ्या विमानसेवेसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाने वेळेची मंजुरी दिलेली नाही. ती मिळाल्यावरच ही सेवा सुरू होऊ शकणार आहे. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सद्वारे १ मेपासून नाशिक-मुंबई-नाशिक या सेवेबरोबरच पुणे, भावनगर आणि हुबळी या शहरांसाठीचीही सेवा सुरू केली जाणार आहे. म्हणूनच कंपनीने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल)ला पत्र दिले असून त्यात या विमानसेवांना वेळ (स्लॉट) देण्याची विनंती केली आहे. एमआयएएलचा अद्याप त्यास प्रतिसाद मिळू शकलेला नाही. शनिवार वगळता आठवडाभर नाशिक-मुंबई-नाशिक दररोज दोन फेऱ्या प्रस्तावित आहेत. यापूर्वी पायलट आणि विमान उपलब्ध नसल्याने ही सेवा लांबणीवर गेली आहे. आता विमानतळाच्या वेळेचा प्रश्न निर्माण झाला असून तो मिळाल्यावरच सेवा सुरू होऊ शकणार आहे. दरम्यान, ही सेवा सुरू होण्यासाठी कसोशीचा पाठपुरावा सुरू असून १ मे पासून सेवा सुरू होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन चेन स्नॅचर्स जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

कमी वेळेत जास्त पैसे कमावून मौजमजा करण्याच्या उद्देशाने चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघा कॉलेज युवकांसह अन्य एकास अंबड पोलिसांनी अटक केली आहे. या तिघाजणांनी मिळून शहरात सोळा ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे.

अंबड पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर आदींनी ही माहिती दिली. शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढल्याचे दिसून येत होते. त्यातच अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी यामाहा या दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांची चौकशी केली. सुरुवातीला या युवकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी शहरात चेन स्नॅचिंग केल्याचे सांगितले. अंबड पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकलवरून हे गुन्हे केल्याचे सांगितले.

अक्षय शिवाजी पाटील (वय १९, रा. गंगापूर गाव), गजेंद्र धनसिंग पाटील (वय १९, रा. पंचवटी) व सोमनाथ बर्वे (वय २३, रा. पंचवटी) असे या तिघांचे नावे आहे. यातील अक्षय व गजेंद्र हे शहरातील एका कॉलेमध्ये शिक्षण घेत आहेत. कमी वेळात जास्त पैसा मिळवून जीवनात मौजमजा करायची हाच त्यांचा या गुन्हेगारीतील उद्देश असल्याचे समोर आले आहे.

सोळा ठिकाणी केली चेन स्नॅचिंग या तिघांनी अंबड पोलीस स्टेशनात - ३ , सातपूरला - २, गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत -२, मुंबईनाका-२, सरकारवाडा - २ व इंदिरानगर येथे तीन चेन स्नॅचिंग केल्या आहेत. एकूण सोळा चेन स्नॅचिंगचे गुन्हे त्यांनी केले असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा सुटली, पाटी फुटली..!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षभर चाललेला अभ्यास, ट्युशन्स, गृहपाठ, परीक्षा या व्यापातून दोन महिन्यांसाठी का होईना शालेय विद्यार्थ्यांची सुटका झाली अन् 'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला. शहरातील बहुतांश शाळांमध्ये बुधवारी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील अखेरचा पेपर पार पडला. हा दिवस अगदी उत्साहात त्यांनी साजरा केला.

शैक्षणिक वर्षाचा पहिला व शेवटचा दिवस विद्यार्थ्यांसाठी नेहमीच औत्सुक्याचा असतो. अभ्यासाचा ताण, परीक्षा, शिक्षकांचा धाक यांमुळे इतर काही करण्यास वेळ मिळत नाही, अशीही त्यांची तक्रार असते. त्यामुळेच वार्षिक परीक्षेचा शेवटचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा असतो. याचा प्रत्यय बुधवारी पुन्हा एकदा आला. उन्हाळ्याच्या सुटीत कोण काय धमाल करणार, याचे नियोजन गप्पांमधून रंगले होते. रिक्षा, टॅक्सीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रिक्षावाल्या, टॅक्सीवाल्या काकांकडून मिळणाऱ्या पार्टीचे आकर्षण असते. अनेक शाळांच्या बाहेरच अशी मस्त आइसक्रीमची पार्टीची धमालही बघायला मिळाली. आता दीड ते दोन महिने तरी सुटीत आराम मिळणार या कल्पनेनीच अनेकजण सुखावले होते. तर, काहींमध्ये चर्चा होती ती १ मे रोजी लागणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या निकालाची.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातील १५ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यातील पोलिस दलातील अडीचशे अधिकारी, कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे बोधचिन्हे, सन्मानचिन्हे आणि प्रशस्तीपत्रे जाहीर झाली आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १५ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिस दलात कार्यरत असताना गुणवत्तापूर्ण सेवा, क्लिष्ट व थरारक गुन्ह्यांची उकल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करणे, जीव धोक्यात घालून शौर्य गाजविणे यांसारख्या कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्हे देण्यात येते. नाशिक जिल्ह्यातील चार अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्हे तर दोन पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस पदक जाहीर झाले आहे.

कर्तबगार पोलिसांची नावे रमेश गायकवाड (अधीक्षक, गुन्हे अन्वेशन विभाग), रा. जा. देसाई (निरीक्षक, ग्रामीण), अशोक भगत (निरीक्षक, उपनगर), तुषार माळोदे (उपनिरीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी), अरुण अहिरे (एएसआय, शहर), उत्तम सोनवणे (हवालदार, गुन्हे अन्वेशन विभाग), काळू बेंडकोळी, सुभाष जाधव, सचिन काळे (हवालदार, शहर), देविदास वाघ (हवालदार, महाराष्ट्र पोलिस अकादमी), भाऊसाहेब परशराम भगत (पोलिस नाईक, ग्रामीण), दत्तू खुळे (पोलिस नाईक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), सोपानदेव पाटील (पोलिस नाईक, महाराष्ट्र पोलिस अकादमी)

पोलिस पदक प्राप्त अधिकारी छगन देवराज (उपअधीक्षक, ग्रामीण), पंडित पवार (उपनिरीक्षक, ग्रामीण)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळी सुटीसाठी हॅालिडे बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व शक्तीपीठे, तीर्थक्षेत्र व टेक्सटाईल्स हबला जाता यावे, यासाठी उन्हाळी सुटीचे निमित्त साधत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जिल्ह्यात अनेक हॉल‌िडे बस सुरू केल्या असून, त्यात कल्पकता वापरली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा सप्तशृंगडापासून थेट कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड गाड्या सोडण्यात येणार असल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. या गाड्या २२ एप्रिलपासून नियमित धावणार आहे

एस. टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी ही कल्पकता दाखवत पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी एक पाऊल टाकले आहे. या बसेसला जर प्रतिसाद मिळाला तर या बसेस नियमित सुध्दा धावू शकतात. उन्हाळयाच्या सुट्यात बहुतांश जण धार्मिक क्षेत्राला प्राधान्य देत असल्यामुळे तीर्थस्थळ व तीन शक्तीपीठेसाठी जास्त बसेस सोडण्यात आल्या आहेत.

नाशिक येथून थेट अकोला, पंढरपूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, पुसद, गोंदवले येथे गाड्या सोडण्यात येणार आहेत. मालेगाव येथून माहूरगड, अक्कलकोट, तुळजापूर, इचलकरंजीसाठी गाड्या आहेत. मनमाड येथून ओढा नागनाथ, परभणी, जालना, पंढरपूर येथे गाड्या धावणार आहेत. कळवण येथून कल्याण, जालना तर सप्तशृगंगड येथून शेगाव, माहूरगड, तुळजापूर, कोल्हापूर येथे बस जाणार आहेत. पेठ येथून शेगाव, ओंढा नागनाथ, पिंपळगाव येथून माहूरगड, येवला येथून बीड, अक्कलकोट, नांदगाव येथून आंबेजोगाई, परळी, इगतपुरीहून शेगाव, सिन्नर येथून बोरवली, स्वारगेट पुणे येथे बस धावणार आहे. या हॉलिडे बस बरोबरच गर्दीचा अंदाज घेऊन नगर, जळगाव, धुळे येथे १० ते १५ मिनिटांच्या अंतरात बस सोडण्यालाही मंजुरी मिळाली आहे.

सात दिवसात साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन राज्यातील सर्व शक्तीपीठांना सात दिवसात जाता जाईल, यासाठी विशेष पास योजनेचा फायदा सर्वांना घेता येऊ शकतो. या सात दिवसात साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन होऊ शकते. एकाच वेळी कोणालाही साडेतीन शक्तीपीठे करणे अवघड असते पण बसने ते होऊ शकते.

साडेतीन शक्तीपीठे, तीर्थस्थळ व टेक्सटाईल्स हब यांना जोडण्याचे काम आम्ही केले आहे. जास्तीत जास्त प्रवाशांचा प्रवास सुखदायी होवो, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी त्यांच्या मागणीनुसार बस देण्यात आल्या आहेत. सप्तशृंगडावरून पहिल्यांदा सर्व शक्तीपीठीला जाता येईल असे बस नियोजन आहे.

- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडासाठी २४५ जादा बसेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन १५ ते २३ एप्रिल या कालावधीत दररोज २४ तास बसेस पुरविण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. नियमित बसेस व्यतिरिक्त २४५ जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.

शुक्रवारी २२ एप्रिलला चैत्री पोर्णिमा असून, १५ ते २३ एप्रिल या कालावधीमध्ये चैत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त दरवर्षी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर जात असतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी यंदाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी १५ एप्रिलपासून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. केवळ नाशिक शहरातील आगारांतूनच नाही तर जिल्हाभरातून या बसेस सोडण्यात येणार आहेत.

सर्वाधिक ७५ जादा बसेस नाशिक येथील सीबीएस स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. याखेरीज निमाणी बसस्थानकातूनही बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली. मालेगाव, मनमाड, सटाणा, पेठ, येवला, पिंपळगाव बसवंत, नांदगाव बसस्थानकांतून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. नांदुरी वाहनतळ ते सप्तशृंग गड या मार्गावर ७० जादा बसेस धावणार आहेत.

भाविकांसाठी निवाऱ्याची व्यवस्था गडावर येणाऱ्या भाविकांची उन्हामुळे गैरसोय होऊ नये, यासाठी नांदुरी आणि वणी गड येथील बसस्थानकांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. बसस्थानकांवरच प्रवाशांसाठी स्वच्छ पाणीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविक तसेच घाटामध्ये चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी महामंडळाकडून विशेष कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.

नाशिक ७५ मालेगाव २५ मनमाड २० सटाणा १५ पेठ ५ येवला ५ पिंपळगाव बसवंत ५ नांदगाव ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाआघाडीची पुन्हा सरशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीन प्रभाग समित्यांपैकी नाशिक पश्चिमच्या सभापतीपदी काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे, पूर्वच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नी‌लिमा आमले तर पंचवटीच्या सभापतीपदी मनसेचे रुची कुंभारकर बुधवारी बिनविरोध विजयी झाले. गेल्या वेळेस भाजपने बंडखोरांच्या मदतीने पश्चिममध्ये विजय मिळवला होता. मात्र, यावेळेस मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्षांच्या महाआघाडीने यशस्वी रणनीती आखत भाजपला धोबीपछाड दिल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादीकडून नीलिमा आमले यांना संधी जुने नाशिक : महापालिका पूर्व विभागात महाआघाडीचे अधिक संख्याबळाच्या जोरावर महाआघाडीच्या उमेदवार नीलिमा आमले यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. महायुतीच्या दीपाली कुलकर्णीसह राष्ट्रवादीचे संजय साबळे, रंजना पवार, काँग्रेसच्या समिना मेमन, मनसेच्या सुमन ओहळ, अपक्ष रशीदा शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. मनसचे गुलजार कोकणी, अर्चना जाधव, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले विनायक खैरे, मनसेतून भाजपवासी झालेल्या वंदना शेवाळे यांची गैरहजेरी निवडणुकीच्या येळी चर्चेची राहिली. अपक्षेप्रमाणे यश मिळाल्याने महाआघाडीच्या नेत्यांना आनंदाचे उधाण आले. पूर्व विभागात महाआघाडीचा सभापती होईल हे निश्चित झाल्याने युतीने निवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेतला. भाजप व शिवसेनेत बिनसलेले राजकारण व इतर पक्षातून भाजप-शिवसेनेत प्रवेश घेतलेले नगरसेवकांनी पक्षांतर बंदी कायदाचा धसका घेतल्याने अनुपस्थित राहून संभाव्य कारवाई टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दीपाली कुलकर्णी या उमेदवार असल्याने त्या उपस्थित राहत माघार घेतल्याने कारवाई टाळून घेतली. सिडकोचे सभापतीपद काँगेसकडे गेल्याने पूर्व विभागात काँगेसची दावेदारी संपुष्टात आली. यामुळे काँगेसच्या समिना मेमन यांचा हिरमोड झाला. रंजना पवार यांचीही समजूत काढण्यात आली. त्यांनी माघार घेतली. राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले व रंजना पवार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर सभापतीची माळ निलिमा आमले यांच्या गळ्यात अगदी सहजपणे पडली.

रुची कुंभारकर बिनविरोध पंचवटी : पंचवटी प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेचे रुची कुंभारकर यांची बिनविरोध निवड झाली. मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांचे कुंभारकर यांना बळ मिळाल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी अपर आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी १२.३० वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सभापतीपदासाठी दामोदर मानकर, प्रा. परशराम वाघेरे, विमल पाटील व रुची कुंभारकर यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, मानकर यांच्यासह प्रा. वाघेरे आणि विमल पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याने कुंभारकर यांचा निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीची घोषणा होताच सभागृहात उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी यांनी अभिनंदन केले. साभगृहाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त करण्यात आला.

सभापतीपदी काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे नाशिक ः भाजपच्या रणनीतीवर शिवसेनेने पाणी फिरवल्याने नाशिक पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपती काँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे यांची निवड झाली आहे. संख्याबळाअभावी भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतली तरी काँग्रेसच्या योगिता आहेर यांचा अर्ज असल्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली. त्यामुळे पाच मतांनी गागुर्डे निवडून आले आहेत. महाआघाडीच्या वतीने नाशिक पश्चिम सभापतीपदाची उमेदवारी काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता निवडणुक प्रक्रिया सुरू झाली. सभापतीपदासाठी काँग्रेसकडून शिवाजी गांगुर्डे, योगिता आहेर यांनी तर भाजपकडून सुनिता मोटकरी यांनी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून सभापतीपदासाठी गांगुर्डे यांचे नाव निश्चित झाले. दुसरीकडे, आपल्या उमेदवाराला शिवसेना मदत करेल, या आशेने भाजपने रणनीती आखली होती. मात्र, शिवसेना नगरसेवकांनी अनुपस्थिती दाखवल्यामुळे भाजपच्या सुनिता मोटकरी यांनी माघार घेतली. आहेर यांनीही अनुपस्थिती लावली. त्यामुळे मतदानात मनसेच्या सुजाता ढेरे, सुरेखा भोसले, राष्ट्रवादीच्या छायाताई ठाकरे, काँग्रेसचे उत्तमराव कांबळे व गांगुर्डे अशी पाच मते गांगुर्डे यांना मिळाले. तर आहेर यांना शून्य मते मिळाली.

मनसे करणार तक्रार माजी महापौर अॅड. यतीन वाघ यांच्यासह सुनिता मोटकरी व माधुरी जाधव यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे मनसेतर्फे यावेळेस तिघांना गांगुर्डे यांना मतदान करण्यासाठी व्हीप बजावण्यात आले. परंतु, त‌िघांनाही व्हीप झुगारून लावला. वाघ यांनी निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहिले तर मोटकरी व जाधव यांनी उपस्थित राहूनही मतदान केले नाही. त्यामुळे या तिघांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे पक्षशिस्तभंगाची तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांनी दिली आहे. त्यामुळे या तिघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत दहा रुपयात जेवण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

माजीमंत्री डॉ. बळीराम हिरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजार समिती आवारात प्रसाद हिरे यांच्याकडून येथे येणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी 'दहा रुपयात पोटभर जेवण' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदिरा महिला बँकेच्या संस्थापिका इंदिराताई हिरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रसाद हिरे यांनी, माजीमंत्री डॉ. बळीराम हिरे यांनी वैद्यकीय व्यवसायात आणि त्यानंतर राजकरणात सामान्य जनतेच्या सेवेचे व्रत कायम ठेवले, असे सांगितले. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीनेच प्रेरित होवून आगामी काळात सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांच्या सेवेसाठी तत्पर राहणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली होईल, असेही प्रसाद हिरे यांनी सांगितले.

बाजार समिती आवारात आपला शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी बांधवास किमान दोन घास सुखाचे मिळावेत हाच या प्रयत्नमागील प्रामाणिक हेतू आहे. हा उपक्रम पुढेही असाच सुरु राहणार अाहे असे िहरे यांनी सांगितले. आगामी काळात बाजार समिती शेतकरी भवन, व्यापारी सभागृह, समिती हायटेक असे कामे करणार आहे, अशी माहिती हिरे यांनी दिली. यावेळी उपसभापती सुनील देवरे, प्रकाश कांकरीया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गुलाबराव चव्हाण, डॉ. नीता शेवाळे, सुमनताई हिरे, भिका कोतकर, दशरथ निकम, केवळ हिरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक मंचचा ‘एमईटी’ला दणका

$
0
0

Gautam.sancheti @timesgroup.com

नाशिक : विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केल्यानंतर त्याला प्रवेश फीसाठी अडवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने मुंबई एज्युकेशन ट्रस्टला (एमईटी) दणका दिला आहे. प्रवेश रद्द करूनही परत न दिलेली फी, अडवणूक आणि लि‌व्हिंग सर्टिफिकेट न देण्याच्या प्रकाराची मंचने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच प्रवेश फीचे पैसे १० टक्के व्याजासह परत करतानाच मानसिक व शारीरिक त्रासापोटी दंड भरण्याचेही निर्देश मंचने दिले आहेत.

आडगाव परिसरात एमईटीने भुजबळ नॅालेज सिटी साकारली आहे. त्यात विविध प्रकारची कॉलेजेस आहेत. शहरातील कॉलेज रोडवर राहणाऱ्या विशाखा शिंदे या विद्यार्थिनीने कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात २ जुलै २०१४ रोजी प्रवेश घेतला व ७०,५५० रुपये फी भरली. प्रवेश घेतल्यानंतर विशाखाने वैयक्तिक कारणाने तीन महिन्यानंतर प्रवेश रद्द करून फी परत मिळण्याची विनंती केली. पण, भुजबळ नॅालेज सिटीमधून तिला फी परत तर मिळाली नाहीच, पण लिव्हिंग व ट्रान्सफर सर्टिफिकेटही देण्यास नकार दिला. यामुळे विशाखाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे तक्रार केली.

जिल्हा न्यायमंचाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर प्रवेश फीचे ६९,५५० रुपये परत करण्याबरोबरच ४ नोव्हेंबर २०१४ पासून १० टक्के व्याज रक्कम अदा करणेपर्यंत देण्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास मानसिक, शारीरिक त्रासापोटी ७००० व तक्रार अर्जाचा खर्च ३००० असे दहा हजार रुपये देण्याचा दंडही ठोठावला आहे. तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी हा निर्णय दिला. शिंदे यांच्याकडून अॅड. पी. एल. सोनी यांनी काम बघितले.

दरम्यान, या निकालाविरोधात स्टेट कमिशन नाशिक सर्किट बेन्चमध्ये अपिल दाखल करण्यात आले आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी खात्री आहे असे एमईटी प्रशासनाने सांगितले आहे.

राष्ट्रीय आयोगाचा निर्णय प्रवेश घेतलेल्या व्यक्तीने प्रवेश रद्द केल्यास शैक्षणिक संस्थेची ती जागा वाया जाऊन नुकसान झाले, अशी परिस्थिती नसताना शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठ यांना भरलेली फी ठेवून घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी तसे केल्यास ती अनिष्ठ व्यापारी प्रथा ठरेल. प्रवेश रद्द केलेल्या व्यक्तीची फी, प्रोसेसिंग चार्जेस १००० रुपये वजा करून परत करावेत. तसेच, विद्यार्थ्याने जमा केलेले मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेटस आदी मूळ दस्त स्वतःकडे ठेवून न घेता परत करावेत, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश असल्याचे राष्ट्रीय आयोगाने एका याचिकेत म्हटले आहे. तसा संदर्भ नाशिक ग्राहक मंचने निकालावेळी दिला आहे.

रिक्षाचा व्यवसाय करणाऱ्या शिंदे यांना इतकी मोठी शैक्षणिक रक्कम उभे करणे अवघड होते. त्यामुळे आम्ही ग्राहक मंचात दाद मागितली. एमईटीने मंचचा आदेश पाळत त्वरित परतावा आणि दंड देणे आवश्यक आहे. - पी. एल. सोनी, अॅडव्होकेट

सरकारने शिक्षण संस्थांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. मात्र, त्याची माहिती सर्वसामान्यांना नाही. त्यामुळेच अनेक विद्यार्थी प्रवेश रद्द केल्यानंतरही पैसे परत मिळण्यात असमर्थ ठरतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल, तर ग्राहक मंचामध्ये तक्रार करावी. - मेजर पी. एम. भगत, ग्राहक पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे द्या; मृतदेह घ्या!

$
0
0

संतप्त नातलगांचा सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यावर आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मृतदेह ताब्यात देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी अवाजवी पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप एका मृताच्या संतप्त नातलगाने केला आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे हे प्रकार थांबवा आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा आशयाचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले आहे.

सुभाषसिंग शामलाल सिंग (वय २४, रा. मध्यप्रदेश, रा. सिल्वासा) हा काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे तो गावी चालला होता. मंगळवारी (दि.१२) बसने नाशिककरोड रेल्वे स्थानकाकडे जात असतानाच त्याची प्रकृती खालावली. त्याचा चुलतभाऊ अंबिकासिंग (रा. सिल्वासा) याने त्याला नाशिकरोड बसस्थानकातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी पोलिसांकडे मदत मागितली.

पोलिसांनी १०८ क्रमाकांच्या अॅम्ब्युलन्सने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अंबिकासिंगने शहरातील काही परिचयातील व्यक्तींशी संपर्क साधून सुभाषसिंग याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. त्यानंतर सुभाषसिंग यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यासाठी तेथील एका कर्मचाऱ्याने पाच हजार रुपये मागितल्याचा आरोप सुभाषसिंग यांच्या नातलगांनी केला आहे. त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर कर्मचाऱ्याने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. रात्रभर त्यांना मृतदेह ताब्यात मिळू शकला नाही. हा प्रकार जनसेवा अॅम्ब्युलन्स सेवा संस्थेचे पदाधिकारी पाशा शेख यांना समजला. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहि‌ती दिली. त्यानंतर सुभाषसिंग याचा मृतदेह नातेवाईकांना मिळवून दिला. अखेर दुपारी अडीचच्या सुमारास अंबिका प्रसाद हे सुभाषसिंगच्या मृतदेह घेऊन अॅम्ब्युलन्सने मध्य प्रदेशकडे रवाना झाले. तत्पूर्वी अंबिका प्रसाद आणि जनसेवा संस्थेने आरोग्य उपसंचालक आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

पैसे कशासाठी मागत आहात, अशी विचारणा संबंधित कर्मचाऱ्याकडे करण्यात आली. मृतदेहावर केमिकल टाकावे लागले. त्यासाठीचा खर्च म्हणून हे पैसे द्यावे लागतील, असे कर्मचाऱ्याने सांगितले. माझ्याकडे ओळखपत्र मागून अडवणूक करण्यात आली.

- अंबिका सिंग, मृत सुभाषसिंगचा चुलत भाऊ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेकडून दिवाळीत एस्केलेटरची भेट!

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकमध्ये सिटी सेंटर माल, बिगबिजार सारख्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये एस्केलेटर आहेत. त्याच धर्तीवर नाशिकरोड स्टेशनवरील फ्लॅटफार्म क्रमांक एक आणि दोनवर एस्केलेटर बसविले जाणार आहे. महिनाभरात त्याचे काम सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ विभागीय कार्यालयाच्या देखरेखीखाली हे काम केले जाणार आहे. रेल्वेबोर्डाने देशभरात विविध ठिकाणी

एस्केलेटर बसविण्याचे जाहीर केले आहे. दिल्ली स्थानकात पाच- सहा वर्षापूर्वी एस्केलेटर बसविण्यात आले. मुंबईत मोजक्या ठिकाणी एस्केलेटर आहे. ठाणे स्थानकात एस्केलेटर बसविण्याचे नियोजन आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दिलासा एस्केलेटर कार्यान्वित झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान बालके यांना दिलासा मिळणार आहे. सध्याच्या जिन्यावर काठी टेकत जाताना वृद्धांना धाप लागते. उतरताना पाय सटकण्याचा धोका असतो.

लिफ्ट बसविण्याचाही विचार एक्सेलेटर बसविल्यानंतर त्यावर प्रवाशांची गर्दी होणार आहे. जीवाला धोका नको म्हणून गरोदर महिला, वृद्ध एस्केलेटर टाळतात. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन नाशिकरोड स्टेशनवर लिफ्ट बसविण्याच्या विचारात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजूनही प्रकल्पग्रस्तांचे ३०५ कोटी थक‌ीत!

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

विविध प्रकल्पांसाठी नाशिककरांनी आपल्या मालकीच्या शेकडो एकर जमिनी सरकारला देऊनही त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना अद्याप मिळू शकलेला नाही. जिल्ह्यातील १३०४ शेतकऱ्यांचे सरकारकडून ३०५ कोटींहून अधिक रकमेचे येणे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विकासासाठी हातभार लावणारेच सरकारदरबारी उपेक्षित राहत असल्याचे वास्तवही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

मालेगाव तालुक्यातील वडेल येथील शेतकऱ्यांच्या संतापाचा मंगळवारी कडेलोट झाला. पाझर तलावासाठी सरकारला जमिनी देऊनही सुमारे पावणे दहा कोटींचा न्याय्य मोबदला मिळत नसल्याने कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि सरकारी वाहन जप्त केले. अशा अनेक प्रकल्पांसाठी सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या आहेत. बंधारे, तलाव, धरणे यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वाधिक जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर महामार्ग, रस्ते किंवा समाजकल्याणच्या विविध योजनांसाठीही शेतकऱ्यांना आपल्या जमिनी सरकारला देणे भाग पडले आहे. सरकारने त्याचा रास्त मोबदला दिला नाही म्हणून आतापर्यंत २१६९ शेतकऱ्यांनी कोर्टात गाऱ्हाणे मांडले आहे. काही खटले व्यक्तिगत असून, काही सामूहिक स्वरूपाचे आहेत. त्यापैकी १३०४ शेतकऱ्यांशी संबंधित खटल्यांचे निकाल लागले असून, त्यांना न्याय्य मोबदला (वाढीव भरपाई) देण्याचे आदेश दिले आहेत. अशा १३०४ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तब्बल ३०५ कोटी २९ लाख ४४ हजार ४२९ रुपये मिळणे बाकी आहे. उर्वरित ८६५ शेतकऱ्यांच्या खटल्यांचा निकाल अद्याप लागलेला नाही. मात्र ही देणी देखील कोट्यवधींची असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना येणे असलेल्या उधारीची रक्कम आणखी काही कोटींनी वाढणार आहे.

पाटबंधारे विभाग अग्रस्थानी

शेतकऱ्यांनी केलेली वाढीव भरपाईची मागणी रास्त असल्याने कोर्टाने त्वरित भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक ८० ते ९० टक्के भरपाई एकट्या पाटबंधारे विभागाकडून मिळणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त झाल्याने अशी देणी तातडीने दिली जावीत, यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास कितपत यश येईल, हे आता येत्या काळात समजू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकचा गाभारा खुला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वराचा गाभारा आज, गुरुवारी महिलांसाठी खुला होणार आहे. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत महिलांना गाभारा प्रवेशाची सशर्त परवानगी देण्यात आली. सकाळी सहा ते सातच्यादरम्यान ओल्या सुती वा रेशमी वस्रासह महिलांना गाभाऱ्यात जाता येईल, असे विश्वस्तांनी स्पष्ट केले आहे.

शनिशिंगणापूर पाठोपाठ त्र्यंबकराजाचेही मंदिर महिलांसाठी खुले झाल्याने नारीशक्तीच्या संघर्षाचा एकप्रकारे विजय झाला आहे. उच्च न्यायालयाने मंदिर तसेच गाभारा महिलांना खुल्या करण्याबाबत दिलेल्या आदेशानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्तांबरोबरच ग्रामस्थांचेही धाबे दणाणले होते. न्यायालय, प्रशासन तसेच महिला संघटनांच्या वाढत्या दबावापुढे अखेर विश्वस्तांना झुकावे लागले आहे. बुधवारी पुण्यातील स्वराज्य संघटनेच्या महिलांनी मंदिरात ठिय्या दिल्यानंतर त्यांना गाभारा प्रवेशासाठी गुरुवारी पहाटेची वेळ देण्यात आली. पहाटे मंदिर गाभाऱ्यात प्रवेश न दिल्यास जेलभरो आंदोलन करू, असा इशाराच स्वराज्य संघटनेने दिला. या संघटनेच्या पन्नास महिला खासगी बसने बुधवारी तीनच्या सुमारास शहरात दाखल झाल्या होत्या. उत्तर दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या या महिलांना सुरक्षारक्षकांनी अडविले. त्यानंतर मंदिर प्रशासनाशी महिलांनी चर्चा केली. विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांनी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केल्याचे महिलांना सांगण्यात आले. मात्र, महिलांनी गाभारा प्रवेशाची मागणी लावून धरली.

मंदिर गाभाऱ्यात फक्त सकाळी ६ ते ७ यावेळेतच प्रवेश दिला जातो. देवदर्शनासाठी यायचे असेल तर रांगेत या असे देवस्थान प्रशासनाने म‌हिलांना सांगितले. त्यानंतर देवदर्शनासाठी मह‌िला रांगेत आल्या. `स्वराज`च्या महिलांनी तेथेच ठिय्या आंदोलन करीत गाभाऱ्यात प्रवेश देण्याची मागणी केली. हा गोंधळ चार तास सुरू होता. हा वाद सुरू असताना ग्रामस्थ महिला मंदिरात दाखल झाल्या. त्यांनीही `स्वराज्य`च्या महिलांसमोर बैठक मांडत जप सुरू केला. यावेळी महिला विश्वस्त ललिता शिंदे यांनी महिलांशी चर्चा केली. या वादानंतर रात्री उशिरा विश्वस्त मंडळाने बैठक घेऊन गाभारा महिलांना सशर्त खुला करण्याचा निर्णय जाहीर केला.

तणाव अन् धक्काबुक्की! स्वराज्य संघटनेच्या महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू असल्याने भाविकांना दर्शन घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे भाविकांचे त्यांच्याशी वाद झाले. दोन्ही गटांदरम्यान या वेळी धक्काबुक्कीही झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. यादरम्यान धक्काबुक्कीत पोलिस उपनिरीक्षक बेंडाळे यांच्या हातास दुखापत झाली. या गदारोळात एका लहान मुलाचा श्वास गुदमरल्याचाही प्रकार घडला. मुलाला तातडीने मंदिराबाहेर नेण्यात आले.

कायद्यानुसार मंदिर प्रवेश वा गाभारा प्रवेशासाठी कोणालाही अडवता येणार नाही. ओल्या सूती, रेशमी वस्रासह सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान महिलांना गाभाऱ्यात जाता येईल. गर्दीच्या वेळी इतर भाविकांप्रमाणेच त्यांना रांगेत येऊन दर्शन घ्यावे लागेल. त्या त्या दिवशी गर्दी व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येईल.

- डॉ. सत्यप्रिय शुक्ल, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील मंदिरांमध्ये आज रामजन्मोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामनवमीनिमित्ताने शुक्रवारी शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काळाराम, गोराराम, बायकांचा राम, मुठेंचा राम अशा विविध मंदिरात दुपारी १२ वाजता रामजन्माचा कार्यक्रम होणार आहे.

चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस असून या तिथीस भगवान रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. यादिवशी शहरातील विविध मंदिरांमध्ये रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या मूर्तीस फुलांच्या हारांसमवेतच साखरेचे हारही अर्पण केले जातात. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटण्यात येतो. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात रामजन्माचा पाळणा म्हटला जातो.

शु्क्रवारी शहरातील मंदिरांमध्ये भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात सुरू असलेल्या रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन यांचा समारोप होणार आहे.

काळाराम मंदिरात कार्यक्रम

काळाराम संस्थानातर्फे रामनवमी निमित्ताने श्री काळाराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काळाराम संस्थानचा रामनवमी उत्सव गुढीपाडवा ते रामनवमी असा साजरा होतो. या वर्षी सुरु असणाऱ्या या उत्सवाचा मुख्य दिवस अर्थात रामजन्म सोहळा शुक्रवार १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता काळाराम मंदिरात होत आहे.

या उत्सवाच्या पूर्वसंध्येला भाविकांनी काळाराम म‌ंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त मंदिर सजवण्यात आले आहे. संस्थानचे सर्व मानकरी देवसेवक, महालदार, चाकर व विश्वस्थ सोहळा दिमाखदार होण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. राम जन्मोत्सवानंतर हभप चंद्रकांतबुवा वझलवार (नागपूर) यांचे कीर्तन होणार आहे. सकाळी १०.३० ते १२ या वेळेतही कीर्तनाचे आयोजन असून रात्री आठ वाजता रामास छप्पनभोग अन्नकोटाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, १७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सामूहिक रामरक्षा स्तोत्रपठण तसेच प्रशांत महाले व सहकारी व यांचे इन्स्टुमेंटल पठण होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता रामप्रभु रथयात्रा, श्रीराम व गरूड रथ निघणार आहे. या सोहळ्याला हजारो संख्येने भाविक येत असल्याने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी काळाराम मंदिरात दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे सरदार चौक ते मंदिराचा पूर्व दरवाजा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डी गँगच्या नावाने खंडणी वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या नावाने टोळीच्या नावे एका कंत्राटदाराला फोन करून ४० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन परप्रांतीयांना भद्रकाली पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी, की शहरात कंत्राटदार म्हणून काम पाहणारे मनीष भंडारी यांना १० एप्रिल रोजी त्याच्या मोबाइलवर एक कॉल आला होता. समोरील व्यक्तीने त्याची ओळख टायगर मेमन अशी करून दिली. मी दाऊदच्या टोळीमध्ये असून, आमच्या भाईला तुझ्याकडून ४० लाख रुपयांची खंडणी पाहिजे. खंडणीची रक्कम दिली नाही तर तुला आणि तुझ्या परिवाराला संपवून टाकू, अशी धमकी त्या व्यक्तीने भंडारी यांना दिली. या कॉलमुळे हादरलेल्या भंडारी यांनी लागलीच भद्रकाली पोलिस स्टेशन गाठले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी त्यानुसार वरिष्ठांना माहिती देऊन तपास सुरू केला. वास्तविक नाशिकमध्ये अशा टोळ्यांचा फारसा काहीसा संबंध नसल्याने पोलिसांनी स्थानिक पातळीवरच शोध घेतला. त्यात तीन परप्रांतीयांचे संशयास्पद कनेक्शन पोलिसांनी शोधून काढले. तांत्रिक विश्लेषण विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे भद्रकाली पोलिसांनी कथडा परिसरातील देवांग बेकरीशेजारी राहणाऱ्या महंमद जकी निसार अहमद शेख (वय २५), संत कबीरनगरमधील अली सय्यद शेख (२२) आणि वडाळा चौफुली परिसरात राहणाऱ्या सूरज श्यामनारायण साहनी (२३) या तिघांना जेरबंद केले.

संशयित उत्तर प्रदेशातले!
हे तिन्ही संशयित उत्तर प्रदेशातील आहेत. कामानिमित्त ते शहरात आले असून, यातील साहनी दोन वर्षांपूर्वी भंडारी यांच्याकडे कामास होता. भंडारी यांची आर्थिक परिस्थिती त्याला माहीत होती. त्यांचा मोबाइल क्रमांकही त्याच्याकडे होता. साहनीकडे असलेल्या या माहितीच्या आधारे भंडारी यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्लॅन संशयितांनी आखला. मात्र, पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. या तपासकामात पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासह पोलिस उपायुक्त एन. अंबिका, सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, उपनिरीक्षक हनुमंत वारे, दिनकर लवांड, रियाज शेख, सोमनाथ सातपुते, कवीश्वर खराटे, वैभव देशमुख, मिलिंदसिंग परदेशी, संतोष उशीर, राजेंद्र मोजाड, राजेंद्र काळोगे, विष्णू गोसावी, राजेंद्र गांगुर्डे, इजाज पठाण यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार फोडून दीड लाख लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कारची काच फोडून चोरट्यांनी १ लाख ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री गंगापूर रोडवर घडली. कारच्या काचा फोडून आतील किमती मुद्देमाल अथवा पैसे लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत असून, पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

या प्रकरणी खुटवडनगर परिसरातील विनायक रेसिडन्सी येथे राहणाऱ्या विनोद गुलाबराव पाटील यांनी सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. घटनेच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास पाटील हे कुटुंबासमवेत गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डन येथे गेले होते. त्यांनी आपली कार (एमएच १८/एजे २७७२) गार्डनबाहेर पार्क केली. पाटील कुटुंब गार्डनमध्ये गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या कारच्या मागचा काच फोडून रक्कम लंपास केली. काही वेळाने पाटील परत आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. गार्डन किंवा हॉटेलबाहेर पार्क होणाऱ्या कारच्या काचा फोडून चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैं तो जय भीमवाली हूं...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'हे नाणं दिसतया शोभूनं, बाबासाहेबांच्या फोटूनं', 'जगात गाजावाजा', 'भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूं' आदी गौरवगीतांवर आबालवृद्धांचे नृत्य, निळे ध्वज अभिमानाने मिरवणारी तरुणाई... असा उत्साह आणि चैतन्यदायी माहोल गुरुवारी नाशिकमध्ये पाहायला मिळाला. निमित्त होते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे. ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी आंबेडकर जयंती शहरात उत्साहाने साजरी झाली. मोठा राजवाडा येथून निघालेल्या मिरवणुकीत हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा राजवाडा परिसरातून सायंकाळी सहा वाजता आमदार देवयानी फरांदे, महापौर अशोक मुर्तडक, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणुकीला सुरुवात झाली. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोषाने परिसर दणाणला होता. मिरवणुकीत शहरातील २० चित्ररथ सहभागी झाले होते.

शिवाजी रोडवरील आंबेडकर पुतळा येथे बुधवारी रात्री १२ वाजता आंबेडकरी अनुयायांतर्फे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी बुद्धवंदना म्हणण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. रात्री दहा वाजता सुरू झालेला कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता. विविध मंडळांनीही पुष्पहार अर्पण केले. जयंतीनिमित्त नाशिक-पुणे रोडवर तीन दिवसांपासूनच रोषणाई करण्यात आली होती. जागोजागी कमानी उभारण्यात आल्या होत्या. उपनगरात विविध मंडळांच्या वतीने रोषणाई करण्यात आली होती. नाशिक- पुणे रोडवर सिद्धार्थ हॉटेल ते बिटको चौकापर्यंत खांबांना निळे ध्वज लावण्यात आले होते. उपनगर, शिखरेवाडी, दत्तमंदिर येथे विविध मित्रमंडळांतर्फे प्रतिमापूजन करण्यात येऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. नाशिक शहरातदेखील अनेक चौकांत बाबासाहेबांचे होर्डिंग लावले होते. अनेक ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. निळ्या पताकांनी परिसर बहरून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या राजवाड्यातून सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर पुरुष, महिला, लहान मुलांनी ताल धरला होता. मिरवणुकीत एकूण वीस मंडळांनी सहभाग घेतला. भीमशक्ती मित्रमंडळाचा चित्ररथ अग्रभागी होता. मिरवणुकीत या मंडळाने उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा लक्षवेधी ठरला. दुसऱ्या क्रमांकावर संजय साबळे यांच्या राहुल मित्र मंडळाचा चित्ररथ होता. त्यानंतर धम्मजागृती मित्र मंडळ, सम्राट सोशल ग्रुप, उत्कर्ष मित्र मंडळ, दीपक डोके फ्रेंड सर्कल, भीमगर्जना मित्र मंडळ, राहुलवाडी मित्र मंडळ, ब्लू किंग्ज मित्र मंडळ, सुखदेव एज्युकेशन सोसायटी आदी मंडळे सहभागी झाली होती. मिरवणुकीला मोठ्या राजवाड्यातून सुरुवात झाली, चौकमंडई, दूध बाजार, भद्रकाली, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, धुमाळ पॉइंट, महाबळ चौकमार्गे शिवाजी रोडवरील पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या वेळी रस्त्यात जागोजागी मिरवणुकींचे उत्साहात स्वागत करण्यात येत होते. भद्रकाली रिक्षा युनियनतर्फे सरबतवाटप करण्यात आले.

डेसिबल मीटरने तपासणी

डीजेचा आवाज जास्त असू नये, ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा यासाठी प्रथमच डेसिबल मीटरचा वापर करण्यात आला. प्रत्येक मंडळाच्या डीजेसमोर जाऊन तपासणी करण्यात येत होती. ज्या मंडळांचा आवाज जास्त अशा मंडळांना आवाज कमी करण्याबाबत सूचना देण्यात येत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग प्रति‌बंधकाचा गॅस एजन्सीला विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

गॅस ग्राहकांना गॅस सिलिंडर पोहोच करणाऱ्या गॅस एजन्सीच्या वाहनांसोबत आग प्रतिबंधक सिलिंडर असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, शहरातील कोणत्याही गॅस एजन्सीकडून या नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. असे असतांनाही जिल्हा पुरवठा विभागाकडून संबंधित गॅस एजन्सीविरोधात कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील सर्वच उपनगरांत वेगवेगळ्या गॅस एजन्सी आपल्या वाहनांमधून घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करतात. त्यांची वाहने रहिवासी भागातूनच ये-जा करतात. भारतीय आग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार ज्यावेळेस गॅस एजन्सीची वाहने गॅस ग्राहकांना गॅस सिलिंडर पोहोच करण्यासाठी रहिवासी भागातून ये-जा करतात तेव्हा या वाहनांत आग प्रतिबंधक गॅस सिलिंडर असणे बंधनकारक आहे. परंतु, या नियमाचे शहरातील गॅस एजन्सीकडून सर्रास उल्लंघन केले जात आहे. गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही वाहनात आग प्रतिबंधक यंत्रणा आढळून येत नाही.

या संदर्भात संबंधित गॅस सिलिंडर वाहतूकचालकांना विचारले असता ते पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेकडे या गॅस एजन्सी दुर्लक्ष करीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची आहे. मात्र, त्यांच्याकडूनही ठोस कारवाई केली जात नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाईचे धाडस दाखविले पाहिजे.

गॅस सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहोच करणाऱ्या एजन्सीच्या वाहनांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा असणे बंधनकारक आहे. गॅस गोडावूनच्या ठिकाणीच अशा वाहनांची तपासणी केली जाते. तरीही ज्या गॅस एजंसीकडून या नियमाची पायमल्ली होत असेल त्यांचा शोध घेऊन तत्काळ कारवाई केली जाईल.

- आर. एस. वाघ, विक्री अधिकारी, पुरवठा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images