Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

श्री भैरवनाथांच्या रथयात्रा तयारीस वेग

$
0
0

मंदिर परिसर रोषणाईने नटला, श्रींच्या रथाला रंगरगोटी

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नरकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांची भव्य यात्रा गुरुवारी (दि. २१) एप्रिल रोजी साजरी होत असून यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झगमगला आहे. मंदिर परिसरात असलेली गणेशाची मूर्तीची रंगरंगोटी पूर्णत्वास आली आहे. तसेच भैरवनाथाचा लाकडी सागवानी रथाचीही रंगरंगोटी पूर्ण झालेली आहे.
यात्रेच्या दिवशी सिन्नरच्या विडी कामगारांनी दिलेल्या निधीतून तयार केलेल्या रथातून श्री भैरवनाथ महाराजांच्या मुकूटाची संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात येते. हरीभक्त पारायण श्री त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा साजरी होत आहे. काही वर्षांपूर्वीच मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने सिन्नरच्या वैभवात एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. त्यानंतर देवाला नैवद्य दाखवून भाविकांना महाप्रसाद दिला जातो. यावेळी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, सोबत फटाक्यांची आतिषबाजीही केली जाते. रात्री दहा वाजता करमणुकीचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. यात्रेच्या निमित्ताने भैरवनाथ महाराजांचा मुखवटा असलेला रथ संपूर्ण गावातून फिरतो. या रथाला ओढण्यासाठी बैलजोड्या जुंपण्यात येतात. यावेळी शेकडो बैलजोड्या शहरात येतात.
जे सिन्नरकर नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी जातात, ते या निमित्ताने सिन्नरला येतात. यात्रेमुळे सिन्नर शहरात दिवाळीच साजरी होते. प्रत्येक घरातून श्री भैरवनाथाला पुरणपोळीचा नैवद्य दिला जातो श्रींच्या रथामागे हजारो कावडीधारक पहाटेपासून संध्याकाळपर्यंत असतात. गंगेचे पाणी आणून देवाला अभिषेक केला जातो. या यात्रेसाठी शहरवासी सज्ज झाले आहे.

असा आहे रथाचा मार्ग

यात्रेच्या दिवशी पहाटे सहा वाजेपासून भैरवनाथ मंदिरापासून रथाची मिरवणूक काढण्यात येते. तालुक्यातील शेतकऱ्याकडून आपल्या बैलजोडीच्या सहाय्याने हा रथ ओढला जातो. नाशिकवेस मार्गे या रथाचे मार्गक्रमण सुरू होऊन गंगावेस, लाल चौक, महालक्ष्मी रोड, शिवाजी चौक, वावी वेस, लोंढे गल्ली, तानाजी चौक, गावठा, पुन्हा शिवाजी चौकमार्गे गणेश पेठ या मार्गाहून संपूर्ण शहरातून रथयात्रा सुरू राहते. सायंकाळी सहा वाजता हा रथ पुन्हा मंदिरात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘व्हीजन नाही, तर मिशनची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही कामाची आखणी करताना नुसते व्हीजन ठेवून चालत नाही, तर मिशनही राबवावे लागते, असे प्रतिपादन इस्त्रो सॅटेलाईट सेंटरचे चंद्र व मंगळ यान प्रकल्पातील तज्ञ ऊर्जा सयंत्र विभाग समूहाचे निर्देशक व वरिष्ठ शास्त्रज्ञ, इंजिनीअर नितीन घाटपांडे यांनी केले.

नाशिक महानगरपालिका व नॅशनल स्पेस सोसायटी (नाशिक चॅप्टर) च्या वतीने आयोजित भारताची अवकाश क्षेत्रातील नेत्रदीपक प्रगती, अवकाश क्षेत्रातील क्षितीजे, भारतीय अवकाश संशोधन केंद्राचा प्रवास व भावी योजना, या क्षेत्रात असलेल्या तरुणांच्या संधी या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मार्स ऑरबीटर मिशन (मंगळ यान मोहिमेचा प्रवास) उपस्थित श्रोत्यांना ध्वनी चित्रफितीद्वारे उलगडून दाखवला. ते म्हणाले की, मंगळ यान मोहीम आखतांना आम्ही फार काळजी घेतली होती. या मोहिमेची सुरुवात २०११ ते २०१३ मध्ये करण्यात आली. या कालावधी त्याचे डिझाईन तयार करुन बांधणीला सुरुवात करण्यात आली. हे यान सूर्य, पृथ्वी व मंगळ यांच्या कक्षेत फिरणार होते. याच्या प्रत्येक भागाची वेगवेगळ्या दोनशे तज्ञांच्या माध्यमातून प्रत्येक विभागाची चाचणी घेण्यात आली. यावेळी त्यांनी पृथ्वी सोडण्यासाठी यानाला आठ किलोमीटर प्रती संकेद इतका वेळ लागत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या गतीवर कसे नियंत्रण ठेवले जाते, हे ही त्यांनी स्पष्ट केले. अवकाशात पोहचल्यानंतर त्याच्या कार्यपध्दतीच्या वेगवेगल्या शैली उलगडून सांगितल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नॅशनल स्पेस सोसायटी नाशिक चॅप्टरचे अविनाश शिरोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापौर अशोक मुर्तडक यांनी नितीन घाटपांडे यांचा पुस्तक देऊन सत्कार केला. नाशिक महापालिकेतर्फे दर महिन्याला नामवंत अशा शास्त्रज्ञ व तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह सहाय्यक आयुक्त जयश्री सोनवणे, अनिल चव्हाण, प्रकाश साळवे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला नाशिककर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

हा योगायोगच आहे! अवकाश संशोधन क्षेत्राचा इतिहासही नितीन घाटपाडे यांनी सांगितला. ते म्हणाले की, एएसएलव्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही याची निर्मिती भारताने केली आहे. मात्र, लवकरच जीएसएलव्ही मार्क तीन या लॉन्चरची निर्मिती करण्यात येणार आहे. १९ एप्रिल १९७५ रोजी आर्यभट्ट उपग्रह रशियातून सोडण्यात आला. त्या दिनाचे औचित्य साधून आज हे व्याख्यान होत आहे, हा योगायोग असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोपेंच्या जन्मस्थळाचे पुनर्निर्माण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

सन १८५७ च्या उठावात ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडतानाच भारतीयांच्या रगारगात जाज्ज्वल्य देशप्रेमाची ज्योत पेटती ठेवणारे थोर सेनापती तात्या टोपे यांना १५७ वी पुण्यतिथीनिमित्त सोमवारी शहरात अभिवादन करण्यात आले. तात्या टोपे यांचे जन्मस्थान असलेल्या गंगादरवाजा भागातील वास्तूचे लवकरच पुनर्निर्माण करण्याची घोषणा उपनगराध्यक्ष पंकज पारख यांनी केली.

शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय संघटनांनी सेनापती या कार्यक्रमात सहभाग घेतला. फटाक्याच्या जोरदार आतषबाजीने तात्या टोपे यांना सलामी देण्यात आली. सेनापती तात्या टोपे शिक्षण संस्था व सेनापती तात्या टोपे परिवार, येवला नगरपालिका, धडपड मंच आदींच्या वतीने तात्या टोपेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष पंकज पारख, नगरध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी सपत्नीक तात्या टोपे यांच्या पुतळ्याला अभिषेक केला. संस्थेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र पटेल, येवला व्यापारी बँकेचे संचालक धनंजय कुलकर्णी, किशोर सोनवणे, अतुल पैठणकर, जेष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके, बाळासाहेब लोखंडे यांनीही सोमवारी सकाळी गंगादरवाजा भागातील तात्या टोपे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. यावेळी प्राचार्य रामदास कहार, जी. बी. गायकवाड, पर्यवेक्षक दत्ता महाले उपस्थित होते.

सेनापती तात्या टोपे यांचे जन्मस्थान असलेल्या गंगादरवाजा भागातील वास्तूची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेची परवानगी घेवून या जागेतील बांधकामाचे पुनर्निर्माण स्वखर्चाने करण्याची घोषणा उपनगराध्यक्ष पंकज पारख यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वरचे कालवे कुचकामी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

दुष्काळी परिस्थितीत थेंब-थेंब पाण्यासाठी दाहीदिशा वणवण सुरू असताना गेल्या पंधरवड्यात नांदूरमध्यमेश्वर धरणातून नगर जिल्ह्यात पाणी घेऊन जाणारे दोन कालवे फुटले. त्यातून हजारो लीटर पाणी वाया गेले. शंभर वर्ष पूर्ण झालेले हे कालवे आता कुचकामी झाले आहेत, त्यामुळे त्यांची दुरुस्ती गरजेची असून पाटबंधारे विभाग या कामाकडे का लक्ष देत नाही, हा खरा प्रश्न आहे.
ब्रिटिशांनी १८८९ मध्ये गोदावरी, कादवा, दारणा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर दगड, चुना, माती यांचा वापर करुन एक किलोमीटर लांबीचे नांदूरमध्यमेश्वर धरण बांधले. याच धरणातून १९१५ साली उजवा कालवा आणि डावा कालवा पूर्ण करण्यात आला. या दोन्ही कालव्यांमुळे निफाड, सिन्नर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर या नाशिक आणि नगर जिल्ह्यातील, कोपरगाव तालुक्यातील शेती बहरली तसेच तालुक्यांमधील पाणीप्रश्नही सुटला. मात्र आता विभागाने या दोन्ही कालव्याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. त्यांना वारंवार याबाबत पाठपूरावा करूनही गांभीर्याने घेतले जात नाही. कालवा परिसरातील शेतकऱ्यांनी या बाबी अनेकदा निदर्शनास आणून देऊनही त्यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. यावरून हा विभाग कामासाठी किती प्रामाणिक आहे, याची कल्पना येते. या कालव्याचे सर्वेक्षण होऊन त्याच्या दुरुस्तीसाठी आता नियोजन करावे लागेल. त्यासाठी अधिकारी वर्गाने अंदाजपत्रक तयार करावे तसेच या धरणातील गाळ काढनेही खूप गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक अपात्रतेवर आज निर्णय?

$
0
0

जिल्हा बँक बरखास्तीच्या उंबरठ्यावर; संचालकांनी ठेवले देव पाण्यात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा सहकारी बॅँकेच्या संचालकांना अपात्र ठरविण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाध‌िशांच्या पीठासमोर अंतिम सुनावणी होणार आहे. यात जिल्हा बँक अध्यक्षांसह अन्य अकरा संचालकांच्या अपात्रतेचा फैसला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बरखास्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्हा बँक संचालकांच्या नजरा या निर्णयाकडे लागल्या आहेत.

राज्य सरकारने सहकारी बँकामंधील भ्रष्ट संचालकांना अपात्र ठरवत त्यांना दहा वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा कायदा केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा बँकेचे वर्तमान अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह अकरा संचालक अपात्र होणार आहेत. या निर्णयाविरोधात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाध‌ीशांसमोर घेण्याची विनंती राज्य सरकारने केल्याने सध्या या याचिकेची सुनावणी घेण्यात येत आहे.

शनिवारी जिल्हा बँक संचालकाच्या अपात्रतेच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतले. यावेळी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक गणपतराव पाटील, परवेज कोकणी उपस्थित होते. जिल्हा बॅँकेच्यावतीने अॅड. ओतुरकर यांनी युक्तिवादात सरकार निर्णयावरच आक्षेप घेतला. संबंध‌ित कायदा हा फक्त विधानसभेत पारित झाला आहे. परंतु, विधानपरिषदेत त्याला अंतीम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हा कायदा लागू होत नसल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, सरकार पक्षाने संचालकांचा दावा फेटाळून लावला असून, मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर कायद्यात रुपांतर होत असल्याचा दावा केला आहे.

..यांची होणार गच्छंती

राज्यसरकारच्या निर्णयामुळे अध्यक्षांसह तब्बल ११ संचालक अपात्र ठरणार आहेत. त्यात अध्यक्ष दराडे यांच्यासह संचालक माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार जे. पी. गावित, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अॅड. माणिकराव कोकाटे, गणपतराव पाटील, दिलीप बनकर, परवेज कोकणी, अद्वय हिरे, अॅड. संदीप गुळवे, धनंजय पवार यांचा समावेश आहे. या सर्वांना सहकार विभागाने अगोदरच अपात्रतेच्या नोट‌िसा बजावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात ६७ कोटी वाचविल्याचा दावा खोटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान झालेली कामे ही गुणवत्तापूर्वक नसून, त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली आहे. तसेच सिंहस्थात महापालिकेने ६७ कोटी रुपये वाचविल्याचा दावाही खोटा असून कामांची सखोल चौकशी केल्यास महापालिकेला सरकारला पैसे परत करावे लागतील, असा दावा त्यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी नाशिककरांची लूट केली असून मनपा बरखास्त करावी, अशी मागणी पाटील त्यांनी केली आहे.

सिंहस्था कामांसंदर्भात पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून सत्ताधारी मनसेच्या कामकाजावर टीका केली आहे. सिंहस्थात ६७ कोटी रुपये वाचव‌िल्याचा दावा खोटा आहे. सिंहस्थात केलेली कामांची गुणवत्ता ही आयआयटी पवईकडून तपासण्याची घोषणा आयुक्तांनी केली होती. परंतु, स्थानिक आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून गुणवत्ता तपासण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जुन्याच कामांना रंगरंगोटी करून नवे दाखव‌िण्यात आले.

सन २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळा हा केवळ ६८ कोटीत झाला होता. परंतु, २०१५ च्या कुंभमेळ्यात २३७८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. सोबतच महापालिकाही कर्जबाजारी करण्यात आली आहे. त्यामुळे सिंहस्थातील कामे ही पालिकेने बेवसाईटवर टाकावीत आणि त्याचा जनतेला जाहीर हिशेब द्यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

शिवसेना किंवा भाजप

काँग्रेस सोडल्यानंतर आपण कोणत्या पक्षात जाणार यावर विचारलेल्या प्रश्नांना पाटील यांनी बगल दिली आहे. आपल्या स्वच्छ प्रतिमेचा ज्यांना वापर करायचा असेल, त्या पक्षांनी आपल्याकडे यावे, असे आवाहन करत शिवसेना किंवा भाजप यापैकी एका पक्षात आपण जाणार असल्याचे सूतोवाचही पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिंसेच्या प्रणेत्याला वंदन

$
0
0


टीम मटा, नाशिक

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी 'अहिंसा परमो धर्मः'चा संदेश देत आणि यंदाच्या दुष्काळाचे भान राखत पाणीबचतीबाबत प्रबोधन करून शहर परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले. शहरातील सर्वच जैन मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम होऊन शोभायात्रा, चित्ररथांमुळे चैतन्यदायी झालेल्या वातावरणात विविध उपक्रम पार पडले. विविध जैन संघटनांनी समाजोपयोगी, तसेच धार्मिक उपक्रमांद्वारे भगवान महावीरांना वंदन केले. जैन सोशल ग्रुपतर्फे 'मिशन जलसेवा'

भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुपतर्फे आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याचे टँकर पुरविण्यात येणार असून, ही अत्यंत भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मंगळवारी केले. जैन सोशल ग्रुप नाशिकतर्फे मिशन जलसेवा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० पाड्यांमध्ये १३ एप्रिल ते १५ जून या कालावधीत पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठविले जात अाहेत. लोकसंख्येप्रमाणे रोज किंवा एक दिवसाआड याचा पुरवठा होत आहे. एकूण ३५० टँकर पाठविण्यात येणार असून, हे अतिशय मोलाचे काम असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या मिशनच्या औपचारिक उद््घाटनावेळी ते बोलत होते.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून गंगापूर धरण्यातून गाळ काढण्यासाठी जैन सोशल ग्रुपने सहकार्य करावे, अशी सूचना केली. त्यास त्वरित प्रतिसाद देत ग्रुपचे अध्यक्ष विजय लोहाडे व सचिव संदीप कटारिया यांनी या उपक्रमामधील सहभागाची हमी दिली दिली. ते म्हणाले की, जैन सोशल ग्रुप ही गत ३३ वर्षांपासून कार्यरत असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था असून, ग्रुपद्वारे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

पू. रमणिक मुनीजी महाराज साहेब, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा व विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले यांनीही मिशन जलसेवा उपक्रमाचे कौतुक केले. जीवदया कार्यक्रमांतर्गत स्थानकवासी संघ संचालित खंबाळा गोशाळा, मंदिरमार्गी संघ संचालित विल्होळी गोशाळा, पिंपळगाव येथील गोशाळेला प्रत्येकी ५ टन चारा पाठविण्यात आला. अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने झालेल्या मेगा रक्तदान शिबिरात ३७० रक्तपिशव्यांचे संकलन झाले.

दरम्यान, सकाळी ७ वाजता नाशिक सेवा संघातर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेद्वारे जैन सोशल ग्रुपतर्फे संत गाडगे महाराज पुतळा, महाबळ चौक, रविवार कारंजा, अशोक स्तंभ व चोपडा लॉन्स येथे पाणीबचत व स्वछता यावर सप्तसूर ग्रुपतर्फे जनजागृतीपर पथनाट्ये सादर झाली. त्यासाठी आमोद मेहता, जयचंद पटणी, नावीनजी चौकसी, सचिन शाह, म्हसरूळ बालमंडळ, सतीश पारख, कांतिलाल चोपडा, अभय तातेड, अजय ब्रह्मेचा, प्रणय संचेती, दिलीप पहाडे, प्रवीण संचेती, अमित कोठारी, हेमंत दुगड, नीलेश भंडारी, ललित मोदी, सचिन गंग, हर्षवर्धन गांधी आदींनी सहकार्य केले.
सिडकोत शोभायात्रेने फेडले पारणे

भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त सिडको येथील सकल जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सिडकोवासीयांच्या नेत्रांचे पारणे फेडले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक कलांच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीचा हा सोहळा देखणा ठरला. मिरवणुकीद्वारे विश्वशांती आणि सदभावनेचा संदेश देतानाच भगवान महावीरांचा जयजयकार करण्यात आला.

सिडको परिसरातील जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आकर्षक रथ, त्यावर विराजमान भगवान महावीरांची प्रतिमा, ढोल-ताशा पथकाला आलेले उत्साहाचे भरते यामुळे मिरवणुकीची श्रीमंती अधिकच वाढली. महावीरांच्या दया, क्षमा, शांतीच्या संदेशांचे फलक घेऊन समाजबांधव सहभागी झाले होते. राणाप्रताप चौक येथील जैन स्थानकातून शोभायात्रेला सुरुवात झाली. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते शोभायात्रेचे उदघाटन झाले. भगवान महावीर यांनी दिलेल्या सत्य, अहिंसा, संयम, क्षमा व तप या विचारांचे आचरण प्रत्येकाने केल्यास भारताचेच नव्हे तर विश्वाचे कल्याण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विजयनगर, उत्तमनगर, पवननगर, रायगड चौक, सावतानगरमार्गे सकाळी अकराच्या सुमारास ही शोभायात्रा त्रिमूर्ती चौकातील जैन स्थानकात पोहोचली. मालवकेशरी सौभाग्यमरूजी म. सा. यांचे सुशिष्य प. पू. उपप्रवर्तक श्री प्रमोदमुनीजी म. सा. यांच्या अमृतवाणीचा लाभ यावेळी भाविकांना मिळाला. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जयंती कार्यक्रमात त्रिमूर्ती चौक, पवननगर, राणाप्रताप चौक येथील श्री वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक श्राविका संघांशी संलग्न शेकडो जैन बांधव, तसेच राणाप्रताप चौकातील नवकार ग्रुप, पवननगर येथील महावीर युवक मंडळ, त्रिमूर्ती चौक येथील जय जिनेन्द्र ग्रुप, उंटवाडी येथील आनंद ग्रुप आणि भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी सतिश सुराणा, पंकज चतुरमुथा, दुर्गेश पारख, माणिकचंद लोढा, भवरीलाल दुगड, संजय ओस्तवाल, अशोक चोपडा, नंदा चोरडिया, वैशाली नहाटा, ललिता चोरडिया, गणेश साखला, अनिल कर्नावट, राजू लोढा, पंकज साखला, प्रकाशचंद नहाटा आदींनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री काळाराम मंदिरात कीर्तन महोत्सवास प्रारंभ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

येथील श्री काळाराम मंदिरात कीर्तन महोत्सवाला सोमवार (दि. १८)पासून प्रारंभ झाला असून, मंगळवारी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे यांचे श्रीराम जीवनदर्शन या विषयावर व्याख्यान झाले.

डॉ. गुट्टे म्हणाले की, प्रभू रामचंद्रांवर प्रेम करणारे आणि निष्ठा असणारे बंधू लक्ष्मण, पत्नी सीता, भक्त हनुमान आणि जटायू व वानर सेना यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या कर्तव्याचे आपण मंथन केले पाहिजे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन आनंदी केले पाहिजे.

महोत्सवात रात्री जगन्नाथ महाराज पाटील यांचे वारकरी सांप्रदायिक कीर्तन, तर उद्धव महाराज जावडेकर यांचे श्री शिवशंकर या विषयावर नारदीय कीर्तन झाले. आज, बुधवारी (दि. २०) सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. यशवंत पाठक यांचे कीर्तन प्रबोधन या विषयावर व्याख्यान होईल. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात येईल आणि सायंकाळी साडेसहा वाजता पंढरपूर येथील जयवंत महाराज बोधले यांचे वारकरी सांप्रदायावरील कीर्तन, रात्री योगेश्वरजी उपासनी व श्रीकृष्ण महाराज सिन्नरकर यांच्या कीर्तनाची जुगल बंदी होईल.

गुरुवारी (दि. २१) सायंकाळी साडेपाच वाजता अरे संसार संसार- निसर्गकन्या बहिणाबाई या विषयावर डॉ. आरती दातार यांचे व्याख्यान होईल. आमदार प्रा. देवयानी फरांदे स्वागत करतील. साडेसहा वाजता संजय महाराज धोंगडे यांचे कीर्तन होईल. साडेआठ वाजता स्मिता आजेगावकर आणि स्मिहन महाराजांचे कीर्तन होईल. शुक्रवारी (दि. २२) सुधाकर बाळकृष्ण पुजारी स्मृती कीर्तनभूषण व कीर्तनसेवा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी डॉ. मो. स. गोसावी अध्यक्षस्थानी राहतील. वनाधिपती विनायकदादा पाटील, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, आमदार डॉ. राहुल आहेर आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकमध्ये महिलांचा तिसऱ्यांदा हिरमोड

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

श्री त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी प्रयत्नशील असलेल्या पुण्याच्या स्वराज संघटनेच्या महिलांचा मंगळवारी तिसऱ्यांदा हिरमोड झाला. महिलांना पुन्हा एकदा मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाविकांच्या रांगांमुळे गाभाऱ्यात जाण्याची वेळ संपल्याने महिलांना परतावे लागले. 'उघड दार देवा आता' असे म्हणण्याची वेळ महिला आंदोलकांवर आली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील बहुचर्चित प्रवेशप्रकरण स्वराज संघटनेच्या महिलांनी लावून धरल्याने विश्वस्त धास्तावले आहेत. मागील आठवड्यात प्रवेशावरून झालेल्या वादावादीनंतर महिलांना अपमानास्पद वागणूक देऊन प्रवेश नाकारला म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वनीता तानाजी गुट्टे यांनी त्र्यंबकेश्वरमधील दोनशे ते अडीचशे ग्रामस्थांविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर विश्वस्त तसेच ग्रामस्थांविरोधात त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी पुन्हा स्वराजच्या सात आठ महिलांनी सकाळी सहाच्या सुमारास पूर्व दरवाजाने मंदिरात प्रवेश केला. मात्र, दर्शन रांगेत गर्दी असल्याने त्यांना ताटकळत उभे रहावे लागले. सात वाजल्याने गाभाऱ्यातील प्रवेश बंद करण्यात आल्याने या महिलांना उंबऱ्यातूनच दर्शन घेत बाहेर पडावे लागले. दरम्यान, स्वराजच्या महिलांना मंदिरात प्रवेश करताना मोबाइल घेऊन जाण्यास तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना महिलांबरोबर प्रवेश नाकारण्यात आला. धक्काबुक्की व ग्रामस्थांच्या भीतीने स्वराज्य महिलांनी संरक्षणासाठी त्यांच्यासोबत बाऊन्सर ठेवले होते. यामुळे मंदिर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनाही घ्यावा लागतोय पाण्याचा शोध

$
0
0

हिमांशू नीतनवरे, नाशिक

नेहमी चोरांच्या तपासात आणि गुन्ह्यांच्या उलगडा करणाऱ्या पोलिसांनाही आता कामाच्या व्यापातून वेळ काढून पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथील पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी आता टँकरवरच निर्भर रहावे लागत आहे. दर दिवसाआड येणाऱ्या टँकरकद्वारेच या पोलिस कर्मचाऱ्यांना पाणी मिळत आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येतून पोलिसही सुटले नसल्याचे दिसून येत आहे.

नाशिकपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे पोलिस स्टेशनची निर्मिती सहा महिन्यांपूर्वी झाली आहे. या ठिकाणी २० पुरुष आणि २ महिला पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांना सध्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दर दिवसाआड येणाऱ्यां टँकरवरच या पोलिसांना तहान भागवावी लागत आहे. ३ हजार लोकवस्ती असलेल्या बाऱ्हे येथून गुजरातची सीमा ११ किलोमीटर अंतरावर आहे. ३ हजार लिटरचा पाण्याचा टँकर आल्यानंतर या टँकरमधील पाणी इतर भांड्यामध्ये भरण्यासाठी पोलिसांची कसरत होत आहे.

नाशिक जिल्ह्यात ४० पोलिस ठाणे असून, केवळ बाऱ्हे पोलिसांनाच पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, नवीनच असलेल्या या पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी अद्याप क्वार्टर्सही उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे भाड्याच्या घरात त्यांना रहावे लागत आहे. ६० गावे आणि वाड्यांचा परिसर या पोलिस स्टेशनला जोडला असल्याने त्याचा मोठा ताण या पोलिसांवर आहे. शिवाय ग्रामीण भागात सुरू असलेल्या तब्बल १२ तासांच्या भारनियमनाबरोबरच कमकुवत मोबाइल नेटवर्कलाही पोलिसांना तोंड द्यावे लागत आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे या ठिकाणचे पोलिस कठीण प्रसंगातूनच जात असल्याचे दिसून येत आहे.

हे पोलिस स्टेशन सध्या भाडेतत्वावर आहे. आम्ही लवकरच नवीन इमारतीत जाणार आहोत. पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

- सुनील तावडे,
सहाय्यक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये पुन्हा संघर्ष, एक महिला बेशुद्ध

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात आज पुन्हा एकदा महिलांना गाभारा प्रवेश नाकारण्यात आला. रितसर परवानगी घेऊन मंदिरात गेलेल्या पुण्यातील स्वराज संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांना 'ड्रेस कोड'चे कारण देत गावातील महिलांनी रोखले आणि धक्काबुक्की केली. त्यात एक महिला भोवळ येऊन बेशुद्ध पडल्याने हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्वराज संघटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी १५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

स्वराज संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी याआधीही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली होती. त्यानुसार या महिलांना पुजेसाठी आज सकाळी ६ ते ७ या दरम्यानची वेळ देण्यात आली होती. त्यानुसार या महिला आज दर्शनसाठी गेल्या असता त्यांच्या ड्रेसवर आक्षेप घेत त्यांना मंदिराच्या दारातच रोखण्यात आले. मंदिर प्रशासनाने मंदिर प्रवेशासाठी 'ड्रेस कोड' निश्चित केलेला आहे. त्यानुसार ड्रेस नसल्याचे कारण देत या महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, त्यानंतरही महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि वाद पेटला. यावेळी स्वराजच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. त्यात एक महिला बेशुद्ध होऊन खाली कोसळली.

दरम्यान, शनिशिंगणापूरमध्ये शनिचौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला असताना तसेच मंदिरांमध्ये महिला-पुरुष भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राज्य सरकारने दिलेला असतानाही त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिर प्रशासन 'ड्रेस कोड'वर अडून बसल्याने हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

ओल्या वस्त्राची अट

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात कॉटन किंवा सिल्कच्या ओल्या वस्त्रानिशी प्रवेश करावा, अशी अट मंदिर प्रशासनाने घातलेली आहे. हा नियम पुरुष व महिला भाविकांना बंधनकारक करण्यात आलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात कार्यरत असलेले विभागीय वाहतूक अधिकारी एच. यू. पाटील यांनी तक्रारदार वाहकाकडून खातेअंतर्गत चौकशीत शिक्षा कमी देण्यासाठी ७ हजारांची लाच मागितली. यावर तक्रारीनुसार पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. याप्रकरण शहर पोलिस ठाण्यात भष्ट्राचाराचा गुन्हा दाखल करून एच. यू. पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विभाग नियंत्रक कार्यालयातील विभागीय वाहतूक अधिकारी पाटील यांच्याबाबत तक्रारी होत्या. मात्र त्याबाबत महामंडळाच्या प्रशासनाकडून दखल घेतली जात गेली नाही. पाटील यांच्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खात्यातर्गंत चौकशी करून त्यांना योग्य ती कारवाई करून शिक्षा देण्याचे काम देण्यात आले होते. यासाठी ते एसटी चालक, वाहकांकडून पैसे घेऊन खात्यातर्गंत चौकशीत कर्मचाऱ्यांना शिक्षा कमी देत असत तसेच मध्यस्थी करीत आर्थिक लूट करत होते. याबाबत बुधवारी चालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. याबाबतच्या कारवाई पथकात पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक विजय चौरे, कर्मचारी अरूण पाटील, जितेंद्र परदेशी, संतोष माळी, संदीप सरग, कैलास शिरसाठ, किरण साळी, संदीप पाटील आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी यात्रोत्सवाला शुक्रवारी (दि. २२) पासून सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी एकविरा देवी ट्रस्ट व यात्रा उत्सव समितीतर्फे मंदिर व परिसरात विद्युत रोषणाईसह सुशोभिकरण करण्यात आले आहे. या उत्सवाने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लहान मुलांसाठी खेळणींची दुकाने, पाळणे थाटायला सुरुवात झाली आहे. यात्रा २० ते ३० एप्रिलपर्यंत चालणार असून एकविरा देवीचे मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडूनही सुरक्षेव्यवस्थेबाबत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहे.

दरवर्षाप्रमाणे यंदाही बुधवार (दि. २०) पासून चैत्र शु.चावदसनिमित कुळधर्म, कुळाचार, आरत्या, मान-मानता आणि जाऊळ शेंडी उतरविण्यासाठी खान्देशासह मध्यप्रदेश गुजरात राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. साधारण पंधरा दिवस या यात्रोत्सवात लहान मुलांच्या खेळण्यांसह, महिलांसाठी दागिने, संसारपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ आदींची दुकाने थाटण्यात आली आहेत. दुष्काळाचा काहीसा फटका व्यावसायिकांना बसण्याची शक्यता नाकरता येणार नाही, अशी माहिती एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

यात्रेच्या सुरुवातीस शुक्रवारी (दि.२२) रोजी चैत्र. शु. पौर्णिमेला दुपारी चार वाजता एकविरा देवीची पालखी व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी आमदार अनिल गोटे, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर जयश्री अहिरराव, जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ, मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले, जिल्हा पोलिस प्रमुख साहेबराव पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.

सुरक्षेसाठी कॅमेरे

हा यात्रोत्सव दि. २० ते ३० एप्रिलपर्यंत पार पडणार आहे. यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर व परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तर पोलिस दलाकडून २४ पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेकडून भाजपची पोलखोल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

गंगापूर धरणावरील पाणी मोजण्यासाठीचे महापालिकेचे मीटर बंद असल्यामुळे मनसेसह प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपलाच मनसेने आता उघडे पाडले आहे. महापालिकेला बंद पाणीमीटरमुळे दंड करण्याची नोटीस देणारा जलसंपदा विभाग जळगाव जिल्ह्याला वेगळा तर नाशिकला वेगळा न्याय लावत असल्याचे समोर आले आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील एकाही धरणावर पाणीमीटर नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. जळगाव महापालिका मोजदाद न करता पाणी उचलत असताना नाशिकला प्रामाणिकपणाची शिक्षा दिली जात असल्याचा आरोप गटनेते अनिल मटाले यांनी केला आहे.

गंगापूर धरणावरील महापालिकेचे पाणीमीटर सहा महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप भाजपचे आमदार व गटनेते सतीश कुलकर्णी यांनी केला. भाजपच्या आमदार सीमा हिरे, गटनेते सतीश कुलकर्णी व नगरसेवक दिनकर पाटील यांनी याच मुद्द्यावरून महापालिकेला कोंडीत पकडले. तसेच मीटर बंद असल्याने जलसंपदा विभागाला महापालिकेला नोटीस बजावण्यास सांग‌ितले. जलसंपदा मंत्रीच नाशिकचे पालकमंत्री असल्याने या विभागाने घाईघाईत महापालिकेला दीडपड दंडाची नोटीस बजावली आहे. भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाचे भांडवल करत, मनसेसह महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना घेरण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

परंतु, भाजप व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या आरोपांची पोलखोल मनसेने केली आहे. महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव महापालिका वाघूर धरणातून मीटर न लावताच पाणी उचलत असल्याचा आरोप गटनेते अनिल मटाले यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही धरणातून पाणी उचलतांना महापालिका किंवा नगरपालिकेने मीटर लावले नाही. परंतु, नाशिकने प्रामाणिकपणा दाखवत २००६ पासून मीटर बसव‌िले. या प्रामाणिकपणाची शिक्षा भाजपनेते व जलसंपदा मंत्री नाशिकला देत असल्याचा आरोप मटाले यांनी केला आहे. महापालिकेने जलशुद्ध‌िकरण केंद्रावरसुद्धा बल्क मीटर बसवले असून पाणी जपून वापरत आहेत. तसेच मीटर संदर्भातील वर्कऑर्डर १४ फेब्रुवारीलाच काढली असून कोणताही दंड आम्ही देणार नसल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत भर पडली आहे.

आदेशाआधीच पाणीकपात

भविष्यातील पाणीटंचाईची गरज ओळख मनसेने शहरात शासनाचे कोणतेही आदेश नसतांनाही २० टक्के पाणीकपात केली होती. पाण्याची उधळपट्टी होऊ नये म्हणून पालिकेने पाऊले उचलली. असे असतांनाही मीटरच्या नावाखाली जलसंपदाकडून पालिकेला दोषी धरणे योग्य नाही. पाण्याची बचत करत असतांना मीटरचे कारण दाखवून कोंडीत पकडण्याचा भाजपसह मंत्र्यांचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

कोट...

जलसंपदामंत्र्यांच्या जिल्ह्यातील धरणांवर मीटर न लावता पाणी उचलले जाते. परंतु, नाशिक मनपाला व मनसेला प्रामाणिकपणाची शिक्षा दिली जात आहे. पालकमंत्री व भाजपचे तीनही आमदार हे जलसंपदा विभागाचे हीत बघताहेत की, नाशिकचे हेच समजत नाही. या दुजाभावाची नाशिककर धडा शिकवतील.—अनिल मटाले, गटनेते, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर अॅड. आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारेन

$
0
0

सर्व मतभेद विसरून रिपब्लिकन गटांचे एक्य होत असेल तर मी अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे केले.

काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी आम्ही युतीला साथ दिली. सर्व गट निळ्या झेंड्याखाली एकत्र आल्यास आपण भाजपशी झालेली युती तोडू असेही त्यांनी जाहीर केले. रिपब्लिकन गटांमध्ये एक्य व्हावे; यावर मी सहमत आहे. ऐक्य झाल्यास त्याच्या अध्यक्षपदी अॅड. प्रकाश आंबेडकरांची निवड करा. त्यांनी नकार दिला तर मला अध्यक्ष करा असेही ते म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त निघालेल्या भीमरथ यात्रा आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे स्वागत नाशिकरोड येथे करण्यात आले. तामिळनाडूमधील कन्याकुमारी ते मध्य प्रदेशातील महू अशी ही यात्रा काढण्यात आली आहे. नाशिकरोड येथे आलेल्या यात्रेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि भारतीय रिपब्लिकन पार्टीतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ही भीमरथ यात्रा काढण्यात आली आहे. नाशिकरोडच्या शिवाजी पुतळ्याजवळ रथयात्रा आली. यावेळी खासदार रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सीमा आठवले, पुत्र जित आठवले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुन‌ील कांबळे, नगरसेवक सुनील वाघ, समितीचे अध्यक्ष देविदास दिवेकर आदी उपस्थित होते. सार्वजनिक उत्सव समितीतर्फे समितीचे अध्यक्ष हरिष भडांगे, कार्याध्यक्ष विलासराज गायकवाड, माजी नगरसेवक संजय भालेराव, दिलीप दासवाणी, युवक जिल्हाप्रमुख अमोल पगारे, नाशिकरोड अध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष भारत निकम, माथाडी कामगार नेते रामबाबा पठारे आदींनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायाधीश अवमान; वकील संघातर्फे निषेध

$
0
0

येथील फॅमिली कोर्टात महिला न्यायाधीशांना चप्पल फेकून मारल्याच्या निषेधार्थ कौटुंबिक वकील संघाने शुक्रवारी अर्धा दिवस कामकाजात भाग घेतला नाही. दुपारी काळ्या फिती लावून काम केले. विभागीय महसूल आयुक्त कार्यालय तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र वाडेकर यांना निवेदन दिले.

फॅमिली कोर्टात दोन दिवसांपूर्वी न्या. कविता व्ही. ठाकूर यांच्या न्यायालयात प्रियंका दीपक पवार यांच्या घटस्फोटाची सुनावणी सुरू होती. निकालानंतर पक्षकार प्रियंका यांनी न्या. ठाकूर यांना आपली चप्पल फेकून मारली. नंतर तिने पती दीपक पवार यांनीही दुसऱ्या चपलेने झोडपले. पोलिसांनी प्रियंका यांना अटक केली. न्यायाधीशांच्या या अवमानाच्या निषेधार्थ वकिलांनी काळ्या फिती लावून काम केले. नंतर विभागीय आयुक्त कार्यालय व सहाय्यक पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. कौटुंबिक न्यायालय बारचे अध्यक्ष अॅड. शिरीष पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र चंद्रमोरे, सचिव एकनाथ पवार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष बाळासाहेब आडके, सचिव सुरेश निफाडे, महिला प्रतिनिधी अॅड. अर्पणा पाटील, अॅड. इंद्रायणी पटनी आदी उपस्थित होते.

कायद्याचे पालक असलेल्या न्यायाधीशांवरच भ्याड हल्ला झाला आहे. संबंधित आरोपी महिलेविरूद्ध त्वरित खटला चालवून त‌िला कडक शिक्षा करावी. दरम्यान, नाशिकरोड वकील संघातून कोणीही या महिलेचे वकिलपत्र घेतले नाही. जामीन नामंजूर करण्यात आल्याने तिची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आल्याचे अॅड. अपर्णा पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे ‘एकला चलो रे’!

$
0
0

शिवसेनेचे उत्तर महारष्ट्र विभागीय शिबिर रविवारी (दि. २४) नाशिकमध्ये होत असून उत्तर महाराष्ट्रातील अडीच हजार पदाधिकाऱ्यांना पक्षाचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे निवडणुकांसाठी कानमंत्र देणार आहेत. जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिका निवडणुकांचे रणशिंग या शिबिरात फुंकले जाणार आहे. भाजप दबावाच्या राजकारणाला शह देण्यासाठी विशेषत: शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यापुढे 'एकला चलो रे'चा संदेश शिबिरातून ठाकरे देणार आहेत.

शिवसेनच्या वतीने नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे शिबिर रविवारी (दि. २४) नाशिकमध्ये होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शिबिराला दिवसभर उपस्थित राहणार असून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, पक्षाचे नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य असे तब्बल अडीच हजार पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. शिवचरित्र व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत.

नाशिक महापालिका, जिल्हा परिषदेसह उत्तर महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या पुढील वर्षी निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची रणनीती या बैठकीत ठरविली जाणार आहे. या निवडणकांचे रणशिंगच फुंकले जाणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला या शिबिरातून उत्तर दिले जाणार असून आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याचा कानमंत्र शिवसैनिकांना दिला जाणार आहे. भाजपने मोठ्या भावाची जागा घेत शिवसेनेला साततत्याने दुय्यम वागणूक दिली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड सतांप असून भाजपच्या वाढत्या दबावाला झुगारण्यासाठी यापुढील सर्वच निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या जाणार आहेत. त्याची घोषणाच या शिबिरातून होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने या शिबिराकडे भाजपसह इतर पक्षाचेही लक्ष लागलेले आहे.

भुसेंकडून तयारीचा आढावा शिबिराच्या पार्श्वभुमीवर शिवसेना कार्यालयात सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख अजय चौधरी, ग्रामीण संपर्क प्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, धुळे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, नंदुरबार जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, दीपक गवते, राजेंद्र पाटील, शिरीष चौधरी आदी उपस्थित होते.

नाशिकसाठी शक्तिप्रदर्शन शिवसनेचे नाशिक महापालिकेकडे विशेषत: लक्ष आहे. येत्या निवडणुकीत महापालिकेवर स्वबळावर भगवा भडकावण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहेत. भाजपसोबत युतीची शक्यता मावळली असून शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या शिबिराच्या निमित्ताने शिवसेना शहरात शक्तिप्रदर्शन करून ताकद दाखविणार आहे. महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. यात अनेक पदाधिकारी व नगरसेवकांचे प्रवेश सोहळाही होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जादा दरांमुळे शीतपेय ‘हॉट’

$
0
0

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर नागरिकांकडून शीतपेयांना मोठी मागणी केली जात असते. नेमकी हिच संधी साधून शीतपेय विक्रेते कूलिंग चार्जेसच्या नावाखाली नागरिकांना मोठ्या प्रमाणात लुट केली जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून आता शीतपेयाला हॉट झाल्याचे म्हणण्याची वेळ आली आहे.

उन्हाळ्यात शीतपेयाला नागरीकांकडून मोठी मागणी असते. त्यातच चालू वर्षी दुष्काळामुळे पाणीटंचाई आहे. त्यामुळे साहजिकच लाही करणाऱ्या तप्त उन्हात दिलासा मिळावा यासाठी नागरिक शीतपेयाला पसंती देतात. शीतपेय विक्रेते नेमक्या याच परिस्थितीचा गैरफायदा उठवतांना दिसत आहेत. कूलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा जादा पैसे उकळले जात आहेत.

शहरी भागापेक्षा महामार्गालगतचे हॉटेल्स, ढाबे, खाणावळी आदी ठिकाणी तर शीतपेय विक्रेत्यांकडून नागरिकांना अक्षरशः लुबाडले जात आहे. वेळेअभावी आणि गरज म्हणून अतिरिक्त पैसे मोजून नागरिक शीतपेय खरेदी करतात. वास्तविक बघता शीतपेयाच्या बॉटल्सवर छापील किमतीमध्ये सर्व चार्जेसचा समावेश असतो. तरीही विक्रेते पुन्हा कुलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे उकळत आहेत.

आधी तक्रार; मग कारवाई वस्तुच्या छापील किंमतीपेक्षा जादा पैशांची मागणी करत असतील तर विक्रेत्याविरूद्ध ग्राहक संरक्षण विभागाकडे तक्रार करावी लागते. मात्र, अशी तक्रार करण्याची वेळ नागरिकांना येणार नाही याची काळजी शासकीय पातळीवर घेतली जावी, अशी माफक अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारी बाबूंनी उंटावरून शेळ्या हाकू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात.

शीतपेयाच्या छापील किंमतीपेक्षा जादा किंमत देऊ नये, विक्रेत्याकडून शीतपेय खरेदीची पावती घ्यावी. तसेच कूलिंग चार्जेसच्या नावाखाली जादा पैसे आकारणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध (०२५३ - २५३१९३९) या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी. - सुधाकर शिंदे, लिगल मेट्रॉलॉजी कंट्रोलर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्यांना सरसकट मदतीची प्रतीक्षा

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांना निकष आणि चौकशीच्या जाचात न अडकविता सरसकट एक लाखाची मदत देण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली आहे. तब्बल सव्वा महिना उलटूनही मदतीच्या घोषणेचे सरकारी निर्णयात रूपांतर न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. सरकार शेतकरी आत्महत्येचेही भांडवल तर करीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घोषणांच्या पावसातून अंमलबजावणीचे पीक उगवणार कधी, अशी प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

राज्यात रोज कोठे ना कोठे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. उत्तर महाराष्ट्रात एक जानेवारी ते ३१ मार्च २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १०० शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. बळीराजाच्या आत्महत्येचे हे सत्र सुरूच असून, केवळ उत्तर महाराष्ट्रात अशा घटनांनी द्विशतकाकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे. शेतकरी आत्महत्येच्या अनेक घटना सरकारी निकषांत बसत नसल्याने पीडित कुटुंबांना सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते.

गेल्या तीन वर्षांत एकट्या उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येची ३९७ प्रकरणे पात्र, तर ४२६ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. अशीच परिस्थिती राज्यातील अन्य विभागांचीही आहे. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीसाठी तगादा हे सरकारी मदतीसाठीचे महत्त्वाचे निकष आहेत. या निकषांत बसणाऱ्या आत्महत्येच्या प्रकरणांना राज्य सरकारकडून एक लाखाची मदत केली जाते. अशी प्रकरणे संबंधित तहसीलदारांमार्फत जिल्हा प्रशासनाकडे दाखल केली जातात.

अपात्र, फेरचौकशीत अडकली प्रकरणे

शेतकरी आत्महत्येसंबंधी पोलिसांचा अभिप्राय आणि शवविच्छेदनाचा अहवाल आवश्यक असतो. याशिवाय नापिकीची समस्या असेल तर कृषी विभागाचा अहवाल, कर्जासंबंधीची माहिती आणि कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचे पुरावेही सरकारी लाभ मिळवून देण्यासाठी ग्राह्य धरले जातात. या सर्व चौकशीच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने आत्महत्या केल्यास चौकशीशिवाय त्याच्या कुटुंबीयांना तातडीने एक लाख रुपयाची मदत देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उन्हाळी अधिवेशनात १५ मार्च रोजी केली होती. याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या अन्य घोषणांचा पाऊसही पाडण्यात आला. मात्र, त्यातून प्रत्यक्षात अंमलबजावणीचे पीक उगवू शकलेले नाही. सव्वा महिना उलटूनही या घोषणेचे सरकारी निर्णयात रूपांतर न झाल्याने पूर्वीच्या निकषांच्या आधारे अशी प्रकरणे तपासली जात आहेत. परिणामी, अनेक प्रस्ताव अपात्र ठरत असून, काही प्रकरणे फेरचौकशीच्या फेऱ्यात अडकून पडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टिप्पर’च्या पठाणला तीन वर्षे कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सेंट्रल जेलकडे परतण्याच्या तयारीत असताना पीएसआयला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण यास कोर्टाने दोषी ठरवत तीन वर्षे कारवासाची शिक्षा सुनावली. मारहाणी​ची घटना २०१३ मध्ये झाली होती. समीर विरोधात अशीच आणखी एक तक्रार दाखल असून, त्यावर लवकरच सुनावणी सुरू होऊ शकते.

सिडकोतील एका व्यावसायिकाने खंडणीने दिली नाही म्हणून टिप्पर गँगच्या सदस्यांनी त्याच्याकडील सुमारे एक कोटी रुपयांची लूट केली होती. चेन स्नॅचिंग, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या टिप्पर गँगची दहशत मोडून टाकण्यासाठी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी टिप्पर गँगच्या सदस्यांविरोधात मोक्का कलमाचा वापर केला. यात, गँगचा म्होरक्या समीरही सापडला. सन २०१३ च्या सुरुवातीला ही कारवाई करण्यात आली. तेव्हापासून समीर पठाण सेंट्रल जेलमध्ये आहे. अटक झाल्यानंतर काही महिन्यांनी आजारपणामुळे समीरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांमुळे प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याची रवानगी पुन्हा सेंट्रल जेलमध्ये करण्यात येणार होती. त्याला नेण्यासाठी अंबड पोलिस स्टेशनचे तत्कालीन पीएसआय गावित हे पोलिस पथक घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी समीर व त्याचे वडील नासीर पठाण यांनी जेलमध्ये परत जाण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता समीरने हातातील बेड्यांसह थेट गावित यांच्यावर हल्ला केला. यात गावित यांचे डोके फुटले. इतर पोलिसांनी बाप लेकास जेरबंद केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर गावित व इतर साक्षिदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. त्यात समीर दोषी आढळल्याने सत्र न्यायाधीश ढवळे यांनी समीरला तीन वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आणखी एका घटनेची लवकरच सुनावणी पोलिस अधिकाऱ्यास मारहाण करण्याची आणखी एक घटना जिल्हा कोर्टात घडली होती. या प्रकरणात सुध्दा समीर पठाणसह टिप्पर गँगच्या इतर साथिदारांचा समावेश होता. या खटल्याचीही लवकरच सुनावणी सुरू होणार आहे. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे समीर व त्याचे साथिदार कायद्याच्या कचाट्यात सापडले असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images