Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आरसी बुकचा दुष्काळ अन् कारवाईचा सुकाळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, नाशिक

कागदाचा तुटवडा निर्माण झाल्याने दोन ते अडीच महिन्यांपासून वाहनधारकांना आरसी बुक (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) देण्याची प्रक्रिया ठप्प पडली आहे. तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त वाहनधारकांना आरसी बुकविना वाहने हाकावी लागत आहेत. मात्र, दुसरीकडे वाहनाची कागदपत्रे नसतील तर कारवाई करावीच लागते, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. आरटीओच्या लेटलतीफ कारभारचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, फक्त आरसी बुकसाठी दंडात्मक कारवाई झाली, तर ही रक्कम आरटीओ कार्यालयाकडून वसूल व्हावी, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यासह राज्यातील आरटीओ कार्यालयात देण्यात येणारे आरसी बुक काही वर्षांपूर्वी पुस्तकांच्या स्वरुपात देण्यात येत होते. मात्र, ते सांभाळणे जिकरीचे असल्याने त्यात बदल करण्यात आला. स्मार्टकार्ड तयार करण्यासाठी एका खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. सरकार व ठेकेदारातील करार संपल्यानंतर स्मार्ट कार्ड योजना गुंडाळण्यात आली. सध्या, संबंधित ठेकेदार व सरकारमध्ये तह सुरू असून, त्यावर कधी निर्णय होईल, हे सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाने जुन्याच पध्दतीने आरसी बुक देण्यास सुरुवात केली आहे. छपाईसाठी हा कागद परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, १६ फेब्रुवारी २०१६ पासून हा कागदच नाशिक परिवहन विभागाला प्राप्त झालेला नाही. नाशिक आरटीओ ​कार्यालयात दररोज सरासरी अडीचशे वाहनांचे रजिस्ट्रेशन होते. म्हणजेच, १६ फेब्रुवारीपासून सुमारे १० हजारांपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाली आहे. मात्र, रस्त्यावर फिरणाऱ्या या वाहनांना आरसी बुकच नाही. दरम्यान, कारणे काहीही असली तरी वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत असावी, असे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त देवीदास पाटील यांनी सांगितले. वाहनांचे कागदपत्रे नसतील, तर वाहनमालकावर कारवाई करावीच लागेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. आरटीओच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. जानेवारी ते चालू महिन्यापर्यंत वाहतूक विभागाने एकूण ४२ हजार ४६१ वाहनमालकांवर विविध नियमांनुसार कारवाई केली आहे. यात वाहनाची कागदपत्रे नाहीत म्हणून पाच हजार २९९ वाहन मालकांकडून दंड वसूल करण्यात आला. आरटीओ विभागाकडून आरसी बुक केव्हा उपलब्ध होईल, हे सांगता येत नाही. पोलिसांच्या कारवाईमुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. विशेषतः वाहनास टोईंग केले गेले तर वाहनचालकाच्या समस्या खूपच वाढतात. वाहनचालकास होणाऱ्या त्रासास आरटीओ कार्यालय कारणीभूत असून, त्यांनीच दंडाची रक्कम भरावी, अशी मागणी ग्राहक म्हणून वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

आरसी बुकसाठी कागदाची उपलब्धता नाही. त्यामुळे आरसी बुक देण्याचे काम ठप्प झाले आहे. ही समस्या नाशिकमध्येच नाही तर संबंध राज्यात आहे. यावर लवकरच तोडगा निघेल. वाहनचालकाकडे रजिस्ट्रेशन पावती असते, ती त्यांनी पोलिसांना सादर करावी. - जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन ​अधिकारी

आरसी बुकच मिळत नसल्याने वाहनचालक त्रस्त आहेत. आरटीओ कार्यालयात संपर्क केला की पोस्ट ऑफीसचे कारण पुढे करण्यात येते. नागरिकांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. परिवहन विभागाच्या सावळ्या गोंधळाबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येणार आहे. - गोविंद लोखंडे, शिवसेना पदाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जप्रकरणी बचतगटाला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, नाशिक

महिला बचतगटाला कर्ज मंजूर करून देते, असे सांगत सिडकोतील औदुंबर स्टॉप परिसरात राहणाऱ्या संशयित महिलेने कामटवाडे भागातील सहा महिलांकडून तब्बल ११ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे संशयित महिला अशाच एका प्रकरणात १५ दिवसांपूर्वी सेंट्रल जेलमधून बाहेर आली आहे. या महिलेसोबत आणखी एक एजंट असून, दोघा संशयिताचा अंबड पोलिस शोध घेत आहेत.

वहिदा इब्राहीम खान, असे या संशयित महिलेचे नाव असून, ती औदुंबर स्टॉपजवळील फिरदौस कॉलनीतील नूर मंझील मशिदीजवळ राहते. फसवणुकीची तक्रार कामटवाडे परिसरातील मेजवाणी हॉटेलजवळील योगेश्वर विहार येथील रो हाऊसमध्ये राहणाऱ्या कल्पना शिवाजी हरीकमहाले यांनी दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्या स्वतः आणि त्यांच्या काही ओळखीच्या महिलांनी बचत गट सुरू केला आहे. बचत गटातील महिला सदस्यांना कर्जाची आवश्यकता होती. दरम्यान, हरीकमहाले व इतर महिलांची वहिदा इब्राहीम खानशी ओळख झाली. तुमच्या बचत गटाला कर्ज मंजूर करून देते, त्यासाठी काही पैसे खर्च करा, असे वहिदाने या महिलांना सांगितले. त्यानुसार, जून २०१५ मध्ये फिर्यादी हरीकमहाले यांनी ४५ हजार, सुलताणा शेख यांनी तीन लाख रुपये, स्मिता नाईक दोन लाख, मीराबाई बेलदार दीड लाख, उर्मिला गायकवाड यांचे तीन लाख ७५ हजार आणि रंजना रजपूत यांच्याकडून ७० हजार रुपये असे एकत्रित ११ लाख ४० हजार रुपये वहिदा खानकडे दिले. तुमच्या बचत गटाचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत वहिदाने संबंधित महिलांना देवळाली व्यापारी बँकेचा चेकही दिला. सदर महिलांनी हा चेक वटण्यासाठी दिला असता पैसे शिल्लक नसल्याच्या कारणाने तो परत आला. याबाबत ​हरीकमहाले यांच्यासह इतर महिलांनी वहिदाकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला बचत गटाच्या सदस्यांनी अंबड पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पीएसआय कल्याणी वर्मा करीत आहेत.

सदर महिलेवर अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे. संशयित महिलेसह या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. कर्जप्रकरणात अशा पध्दतीने मदत करणाऱ्या व्यक्तींपासून सर्वांनीच सावध राहायला हवे. - अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचारी २६ ला जाणार सामूहिक रजेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,नाशिक

विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने ७० हजार सदस्यांसह सामूहिक रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे २६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील बसची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार आहे. नाशिक जिल्ह्यात या संघटनेचे पाच हजाराहून अधिक सदस्य असून, त्यात वाहक व चालकांचे प्रमाण मोठे आहे. दरम्यान, या सामूहिक रजेला मंजुरी देऊ नये, असे पत्र महामंडळाकडे आले आहे. यामुळे थोडा गोंधळ उडाला असला तरी संघटना रजेच्या निर्णयावर ठाम आहे.

नाशिक जिल्ह्यात ६२०० कर्मचारी असून, त्यात पाच हजाराहून अधिक कर्मचारी आमचे असल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. करार, कायदा, परिपत्रकातील तरतुदीचा भंग होत असल्याच्या विरोधात हे आंदोलन असल्याची चर्चा असली तरी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरुध्द हे आंदोलन असल्याचे बोलले जात आहे. या आंदोलनात इंटक, शिवसेना प्रणित कामगार संघटना सहभागी होणार नाही.

आमच्या संघटनेच्या विविध मागण्या असून, त्यासाठी आम्ही एक दिवसाची सामूहिक रजा घेतली आहे. मुंबईत आम्ही परिवहनमंत्री दिवाकर रावते व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहोत. या भेटीसाठी जिल्ह्यातून पाच हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. हा संप होऊ नये, म्हणून २५ ते २७ एप्रिलपर्यंत सुट्या देऊ नये असे पत्रक आले आहे. मात्र, आमचा निर्धार पक्का आहे. - विजय पवार, प्रादेशिक सचिव, कामगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, नाशिक

सिडको परिसरातील उत्तमनगर येथील एकता चौक परिसरात राहणाऱ्या अवघ्या २० वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. प्राजक्ता सुशील पाठक असे या विवाहितेचे नाव आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्राजक्ताने राहत्या घरातच साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. यानंतर कुटुंबीयांतील सदस्यांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, प्राजक्ताच्या आत्महत्येच्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.

सात मोबाइल चोरीस गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स परिसरातील आशियाना सोसायटीत राहणाऱ्या नितीन सुभाष दळे यांच्या घरातून संशयित किरण गायकवाड (रा. आनंदवली) याने आपल्या साथिदारासमवेत विविध कंपन्यांचे १७ हजार रुपये किमतीचे सात मोबाइल चोरून नेले. या प्रकरणी दळे यांच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपड्यांची चोरी नाशिक येथे कपडे खरेदी करून आंबेडकर पुतळ्याजवळील शिवाजी गार्डन येथून रिक्षाने घरी जात असलेल्या सोपान संजय शिंदे यांच्या ताब्यातील कपड्याची बॅग, रोकड, मोबाइल असा एकूण १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव येथे राहणारे शिंदे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खरेदी करून घराकडे परतत असताना ही घटना घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर येथे घरफोडी फ्लॅटच्या उघड्या बाल्कनीतून प्रवेश करीत चोरट्यांनी ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील नरसिंहनगर येथील सायली बिल्डिंगच्या सहाव्या क्रमांच्या इमारतीतील फ्लॅट क्रमांक सहामध्ये घडली. येथे राहणारे राहणाऱ्या हर्षद शर्मा (वय ३५) यांच्या घराच्या बाल्कनीमधून चोरट्यांनी प्रवेश करीत आतील लॅपटॉप, मोबाइल व एक हजार रुपये असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या धरणांनी गाठला तळ

$
0
0

जिल्ह्यातील जलाशयांमध्ये अवघे सात टक्केच पाणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांमध्ये सात टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाच धरणे पूर्णत: कोरडीठाक पडली असून, सात धरणांमध्ये केवळ एक ते चार टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी निम्म्या धरणांनी तळ गाठल्याने जलसंकट अधिकच गडद झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात २३ धरणे आहेत. मात्र, धरणे उशाशी असूनही नाशिककरांचा घसा सुकू लागला आहे. गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यातील धरणांमधील पाणी पातळी एक टक्क्याने कमी झाली आहे. त्यामुळे धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा आठ टक्क्यांवरून सात टक्क्यांवर आला आहे. जुलैपर्यंत हे पाणी पिण्यासाठी पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा पाच टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे ऐन एप्रिलमध्येच जिल्हावासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात गंगापूर धरण समूहात गंगापूर, काश्यपी आणि गौतमी गोदावरी ही तीन धरणे आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता ९ हजार ३५० दशलक्ष घनफूट असली तरी आजमितीस त्यामध्ये एक हजार ७५४ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी समूहात या कालावधीत ४८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो आता १९ टक्के इतका खाली आला आहे. पालखेड धरण समूहामध्ये सर्वाधिक १४ धरणे आहेत. त्यापैकी पालखेड धरणात सर्वाधिक १४ टक्के पाणी शिल्लक आहे. वाघाड धरणात १० तर आळंदी धरणात ९ टक्के पाणी शिल्लक आहे. उर्वरीत आठ धरणांमध्ये एक ते आठ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तिसगाव, भोजापूर धरणातील पाणीसाठा शुन्यावर पोहाचला आहे. पुणेगाव, मुकणे धरणात केवळ एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड धरण समूहाची पाणी साठवण क्षमता २० हजार २३१ दशलक्ष घनफूट आहे. मात्र, त्यामध्ये सर्वात कमी म्हणजेच केवळ ६०६ दशलक्ष घनफूट एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

गिरणा खोऱ्यातील सहा धरणांपैकी नागासाक्या, गिरणांनी तळ गाठला आहे. पुनद धरणात सर्वाधिक ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चणकापूर धरणात ३३ टक्के, हरणबारीमध्ये ३० तर केळझरमध्ये १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या कालावधीत धरणात २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तो १३ टक्क्यांनी कमी होऊन सात टक्क्यांवर आला आहे.

जिल्ह्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता ६६ हजार १६१ दशलक्ष घनफूट असून, गतवर्षी या कालावधीत त्यामध्ये २४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यंदा पाण्याचे दुर्भिक्ष असून, धरणांमध्ये केवळ चार हजार ९२६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

टँकर्सच्या १७९ फेऱ्या विहिरी, बंधाऱ्यांनी तळ गाठला असून, भूजल पातळीतही कमालीची घट झाली आहे. त्यामुळे गावोगावच्या रहिवाशांची तहान भागविण्यासाठी टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. जिल्ह्यात रहिवाशांचा तहान भागविण्यासाठी १७९ टँकर फेऱ्या मारत आहेत. येवल्यासह, नांदगाव, सिन्नर, देवळा आणि बागलाणमध्ये सर्वाधिक टँकर धावत आहेत. पाण्याची मागणी वाढेल तसे अधिकाधिक टँकर पुरविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन पार पाडेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

धरण समूह उपलब्ध पाणी(दलघफू) साठा गंगापूर धरण समूह १७५४ १९ पालखेड धरण समूह ६०६ ३ गिरणा खोरे १८१३ ७

धरण पाणीसाठा टक्केवारी पाणीसाठा टक्केवारी (वर्ष २०१५) (वर्ष २०१६) गंगापूर ५८ २७ काश्यपी ५६ ११ गौतमी गोदावरी ११ ७ पालखेड २२ १४ करंजवण १३ ६ वाघाड १४ १० ओझरखेड २० ४ पुणेगाव ८ १ तिसगाव १२ ० दारणा ३० ४ भावली १५ ६ मुकणे २६ १ वालदेवी १५ ४ आळंदी ३० ९ पुनद ५६ ४१ नागासाक्या १ ० गिरणा १६ ० केळझर २२ १७ एकूण २४ ७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिका चाखणार हापूसची गोडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणच्या हापूस आंब्याची अमेरिकावारी लासलगावमार्गे सुरू झाली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर प्रक्रिया होऊन दोन कंटेनर शुक्रवारी अमेरिकेला रवाना करण्यात आले.

फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण पुढे करत युरोपीय महासंघाने भारतातून आयात होणाऱ्या हापूस आंब्यावर २०१३ साली बंदी घातल्याने त्यामुळे फाळांचा राजा असलेल्या हापूसचे आता काय होणार, अशी चिंता भेडसावत होती. पण, आता ही चिंता कायम मिटली असून गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत आहे.

गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात आठ मेट्रिक टन हापूस आंबा रवाना झाला आहे. अमेरिकेला पाठविण्यात येणाऱ्या हापूस आंब्यावर लासलगाव येथे प्रक्रिया केली जाते. या हंगामातील विकिरण प्रक्रिया आठ मेट्रिक टन आंब्यांवर करण्यात आली. गुरुवारी तेराशे तर शुक्रवारी अकराशे बॉक्स हापूस आणि केशर आंबा हंगामाच्या सुरुवातीला विकिरण करून अमेरिकेला पाठविण्यात आला.

२० एप्रिल ते ३० जून या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीच्यावतीने विकिरण प्रक्रिया केली जाणार आहे.

सर्वदूर पोहोचणार हापूस

लासलगाव येथून आंब्यांवर प्रक्रिया पूर्ण करून हापूस सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, हय़ूस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या येथे पाठविला जाणार आहे .

किरण प्रक्रिया म्हणजे?

लासलगावच्या केंदात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढव‌िली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच शिवाय कोयीतील कीडही नष्ट होते. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

यंदाच्या हंगामातील पहिल्या आठ मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून हा आंबा व्यापाऱ्यांकडून अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. मागील वर्षी सुमारे ३२८ मेट्रिक टन आंबा अमेरिकेला पाठविला होता. या वर्षी ४०० मेट्रिक टन आंबाचे उद्दिष्ट आहे.---

प्रणव पारेख, भाभा अणू संशोधन केंद्र, लासलगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडपड मंचने घेतली पैलवानांची स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

हनुमानाच्या जयंतीचे औचित्य साधत येवल्यातील धडपड मंचच्या वतीने तरुणांसह बच्चेकंपनीसाठी 'जोर-बैठका' मारण्याची स्पर्धा घेण्यात आली. आजच्या तरुण पिढीत बलसंवर्धनाची आवड निर्माण होऊन येवल्याचा नावलौकिक वाढविणारे मल्ल आगामी काळात तयार व्हावेत, या उद्देशाने घेतल्या गेलेल्या या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

येवले शहरातील अनेक पैलवानांनी एकेकाळी महाराष्ट्र गाजव‌िला आहे. ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी व तरुणांमध्ये बलसंवर्धनाची आवड निर्माण व्हावी म्हणून सेवाभावी संस्था धडपड मंचने शुक्रवारी हनुमान जयंतीचे औचित्य साधत 'जोर-बैठका' मारण्याची स्पर्धा घेतली. येवला मर्चंट बँकेच्या सभागृहात ही स्पर्धा पार पडली. एका मिनिटात कोण किती जोर तर कोण किती बैठका मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. श्रीरामपूर येथे कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदाचा मानकरी ठरलेला येवल्यातील युवा मल्ल रोहन लोणारी याचा यावेळी डॉ. यशवंत खांगटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यांनी मारली स्पर्धेत बाजी

एका मिनिटात ७७ बैठका मारून कुणाल संजय वाडेकर याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. ७५ बैठका मारणारा पंकज खैरनार हा द्वितीय, तर ७४ बैठका मारणारा अजय जावळे हा तृतीय क्रमांचा मानकरी ठरला. विजेत्यांना रोख बक्ष‌िसासह ढाल, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीजोड प्रकल्पाला राष्ट्रवादीकडूनच खोडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी व काँग्रेसने २५ वर्षाच्या सत्ताकाळात नदीजोड प्रकल्पाला चालना दिली असती, तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते. परंतु, आता भाजप सरकार कुठेतरी नदीजोड प्रकल्पांना चालना देत असतांना, त्याला खीळ घालण्याचे पाप राष्ट्रवादीचे नेते करीत असल्याचा आरोप, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला आहे.

दमणगंगा व पार खोऱ्यातील पाणी गुजरातला देण्यासंदर्भात करार झालेला नसताना आमदार जयंत जाधव दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, असा आरोप फरांदे यांनी केला आहे.

कोयनेचे पाणी मुंबईला तर वैतरणा धरणातील पाणी नाशिक आणि मराठवाड्यासाठी देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक दौऱ्यात दिले होते. परंतु, हा जलसंपदा मंत्री नाशिककरांना दिवास्वप्न दाखवून दमणगंगा व पार खोऱ्यातील पाणी गुजरातला वळविण्याचा डाच आखत असल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला आहे. त्याला भाजपतर्फे फरांदे यांनी उत्तर दिले आहे. देशात नदीजोड प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरुवात झाली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने या नदीजोड प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले. दमणगंगा-पिंजाळ या नदीजोड प्रकल्पाचा सामंजस्य करार हा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात झाला. परंतु, हा करार अंतीम झालेला नाही. त्या संदर्भातील अहवालही आलेला नाही. त्यामुळे गुजरातला पाणी देण्याचा जाधवांचा आरोप हा दिशाभूल करणारा आहे. याउलट, आघाडी सरकारनेच अशा प्रकल्पांना चालना दिली असती, तर आज राज्यातील सिंचनाचे चित्र वेगळे दिसले असते. सोबतच अप्पर वैतरणाचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्या संदर्भातील कामही सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अपूर्ण माहितीच्या आधारावर सरकारवर व पालकमंत्र्यांवर टीका करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पार, तापी, नर्मदासाठी समिती

कोकण खोऱ्याकडे जाणाऱ्या पश्चिम वाह‌िनी नद्यांचे पाणी पार, तापी व नर्मदा खोऱ्यात टाकण्यासाठी जलसंपदा विभागाने समिती तयार केल्याची माहिती फरादे यांनी दिली. कोकण खोऱ्याचे पाणी गोदावरीत खोऱ्यात आणण्यासाठी ही समितीची नेमणूक केली असून त्यात जलविद्युत विभागाचे सचिव, नाशिक, जळगाव येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांचा समावेश आहे. दोन दिवसापूर्वीच ही समिती घोष‌ित करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरेखा भोसलेंकडून स्थायीचा राजीनामा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे सभागृहनेते पद मिळताच नगरसेविका सुरेखा भोसले यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा महापौरांकडे सादर केला आहे. या जागेवर मनसेच्या दुसऱ्या सदस्याला संधी मिळावी, या उद्देशाने त्यांनी राजीनामा दिला आहे. भोसले यांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाकडून यशवंत निकुळे आणि मेघा साळवे यांना राज‌ीनामे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत फाटाफूट होऊ नये व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दगाफटका होऊ नये म्हणून मनसेने निष्ठावान नगरसेवकांना स्थायीत पाठविले होते. त्यात निकुळे, भोसले,

साळवे यांना कायम ठेवत, सलिम शेख, अशोक सातभाई यांना स्थायीवर संधी देण्यात आली. सभापतीपदाची निवडणूक झाल्यानंतर साळवे, भोसले, निकुळे यांच्याकडून पक्षाला राजीनामे अपेक्षित होते. भोसले यांनी सभागृहनेतेपदी निवड झाल्यानंतर स्थायीच्या सदस्यपदाचा महापौरांकडे राजीनामा सादर केला आहे.

तर यशवंत निकुळे आणि मेघा साळवे यांनाही आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु,

साळवे, निकुळे यांनी अद्याप

राजीनामे दिले नसल्याने पक्षाची अडचण वाढली आहे. त्यामुळे या दोघांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढवला असून त‌िघांचे राजीनामे आल्यानंतर नव्या सदस्यांना संधी दिली जाणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिव करणार नोकरभरतीची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास महामंडळ व शबरी वित्त व विकास महामंडळातील नोकरभरतीची गंभीर दखल मुख्यमंत्र्यानी घेतली असून, आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात या प्रकरणाची चौकशी सुरू होणार असून चौकशीपूर्वीच या प्रकरणाशी संबंध‌ित अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली.

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आदिवासी विकास महामंडळातील नोकरभरतीत ३०० कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मुख्यमंत्र्याकडे केला होता. या संदर्भातील पुरावेच त्यांनी सादर केले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशीचे आदेश आदिवासी विभागाला प्राप्त झाले आहेत. आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार असल्याची माहिती खासदार चव्हाण यांनी दिली आहे. सचिव पुढील आठवड्यात नाशिकमध्ये येऊन चौकशीला सुरुवात करणार असल्याचे आश्वासन चव्हाण यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिले आहे. सोबतच या प्रकरणाशी संबंध‌ित अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या जाणार असल्याचे सावरा यांनी सांग‌ितले. दोन दिवसापूर्वीच महामंडळातील कम्प्युटर्स हाय व्होल्टेजमुळे जळाले होते. त्यामुळे यासंदर्भातील संशय बळावला आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूबंदीसाठी ठाकरेंना छत्रपती सेनेचे साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्यासाठी छत्रपती युवा व युवती सेनेच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले जाणार असल्याची मा‌हिती संघटनेचे संस्थापक गणेश कदम यांनी दिली. उद्धव ठाकरे रविवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून यावेळी त्यांची भेट घेऊन राज्यात दारूबंदीची मागणी केली जाणार आहे.

ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ दिली असल्याची माहिती कदम यांनी दिली. महाराष्ट्रातील ७० टक्के तरुण पिढी दारूकडे ओढली गेली असून, सुजलाम् सुफलाम राज्य अधोगतीकडे चालले आहे. दारूपासून राज्याला मिळणाऱ्या महसुलामुळे लाखो कुटुंबांची राखरांगोळी झाली असून, अशा कुटुंबांना आणि येणाऱ्या भावी पिढीचे पर्यायाने महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल करण्यासाठी संपूर्ण राज्यात दारूबंदी आवश्यक असल्याचे

युवासेनेचे म्हणणे आहे. दारूबंदीसाठी संघटनेच्या वतीने दोन दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्र्यांना घेराव घालण्यात आला होता. आता मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली जाणार आहे.

राज्यातील सत्तेतील महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांनाही संघटनेच्या वतीने दारूबंदीसाठी साकडे घातले जाणार आहे. ठाकरे यांनीही संघटनेला भेटीचे निमंत्रण दिले असून, ते ताज हॉटेलमध्ये सकाळी साडेअकरा वाजता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे कदम यांनी कळविले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरडगावात बिबट्याची दहशत

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील कुरडगाव येथे शुक्रवारी रात्री बिबट्याने चांगलीच दहशत पसरविली. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात ५ शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. निफाड-कुरडगाव रस्त्यावर रतन एकनाथ चकोर यांचे शेत आहे. त्यांचा सालकरी भाऊराव विश्वनाथ माळी हा शेतात राहतो. माळी यांच्या एकूण पाच मोठ्या शेळ्या त्यांच्या घराबाहेर दररोज बांधलेल्या असतात. दररोज रात्री माळी कुटुंबीय घराबाहेर शेळ्यांच्या बाजूला झोपतात. शुक्रवारी रात्री ११ पर्यंत माळी कुटुंबीय घराबाहेर बसलेले होते. मात्र अकरानंतर घरात गेले आणि त्यादरम्यान बिबट्याने डाव साधला. सकाळी घराबाहेर तीन शेळ्या मृतावसस्थेत आढळल्या.

माळी यांच्या ५ शेळ्यांपैकी ३ शेळ्यांवर बिबट्यांनी हल्ला करून त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेळ्यांना जो दोरखंड बांधलेला होता तो न तुटल्याने बिबट्याने इतर २ शेळ्यांकडे मोर्चा वळव‌िला. त्या दोन्ही शेळ्यांना ठार करून ओढत नेले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नलला अखेर सापडला मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, नाशिक

इंदिरानगर अंडरपासच्या बहुप्रतीक्षेत सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. नॅशनल हायवे अॅथोरटी ऑफ इंडियाने (न्हाई) केलेल्या विनंतीनुसार महापालिका प्रशासन या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी करणार असून, लवकरच यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सततची वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे वादात सापडलेला इंदिरानगर अंडरपास शहर पोलिसांनी १२ जुलै २०१५ रोजी बंद केला होता. अंडरपास बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी विरोध केला. नागरिकांकडून सातत्याने विरोध प्रदर्शन सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांनी ८ मार्चच्या रात्री आपल्या निर्णयात बदल केला. अंडरपास सुरू झाला मात्र, या ठिकाणी सिग्नल यंत्रणाच नसल्याने वाहतूक पोलिसांनाच वाहतुकीचे नियोजन करावे लागत आहे. पोलिसांची पाठ वळली की पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना सर्वांना करावा लागला. हा रस्ता न्हाईच्या अखत्यारीत येत असल्याने पोलिस प्रशासनाने वाहतूक सिग्नल बसवण्याबाबतचे पत्र न्हाईला मार्च महिन्यातच पाठवले होते. टोलवाढीच्या वादामुळे न्हाईसोबत असलेल्या ठेकेदाराने काम करण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. न्हाईकडे फंडस् उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांनी हतबलता व्यक्त केली. महापालिकेने केलेला खर्च न्हाई परत करणार आहे. महापालिकेचे काम सिग्नल बसवण्यापुरतेच आहे. मात्र, भविष्यात या सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीचे काय यावर समाधानकारक माहिती समोर आलेली नाही. इंदिरानगर अंडरपास येथे सिग्नल यंत्रणा कार्यन्वित झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघू शकते.

१५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित दरम्यान, आमदार देवयानी फरांदे यांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर पर्याय सुचवला. त्यानुसार, न्हाईच्या विनंतीनुसार महापालिका प्रशासन येथे सिग्नल बसवणार आहे. याबाबतचे इस्टीमेट व प्लॅन महापालिका अधिकाऱ्यांनी तयार करून न्हाईला सादर केला आहे. या कामासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर एस. पी. बनकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत पंचवटीत महिला ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील पांजरापोळसमोरील रिक्षा थांब्याजवळ शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. प्रमिला पोपट जाधव (वय ५२) असे या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाला पाहून ट्रकचालक मात्र फरारी झाला.

पंचवटीतील अमृतधाम येथील परिमणी गणेश मंदिराजवळील लक्ष्मीदर्शन अपार्टमेंटमध्ये राहणारे निवृत्त मुख्याध्यापक पोपट जाधव पत्नी प्रमिला जाधव डियो (एमएच ४२१/एसी ८६०९) या दुचाकीने गंगापूर रोडवरून अमृतधाम येथील परिमणी गणेश मंदिराजवळील आपल्या घरी निघाले होते. मात्र, पांजरापोळजवळ मागून येणाऱ्या ट्रकचा (जीजे १६/व्ही ८५१२) धक्का लागल्याने प्रमिला जाधव खाली पडल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. निमाणीजवळ हा दुसरा जीवघेणा अपघात झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलचिंतन संस्थेने उपसला ५००० ट्रक गाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचे महत्त्व जाणणाऱ्या जलचिंतन संस्थेने नागलवाडी शिवारात गंगापूर धरणातून ५००० ट्रक गाळ स्वखर्चाने उपसून एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव व सदस्य विष्णू पाटील, उदय रकिबे आदींनी नाशिकच्या पाणीप्रश्नावर शासनदरबारी वेळोवेळी भूमिका मांडली आहे. त्यातच यंदा टंचाई निर्माण झाल्याने केवळ शेतीच्याच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील उपलब्ध साठा वाढविण्यासाठी त्यांच्यात साचलेला गाळ काढणे काळाची बनल्याचे ओळखून जलचिंतन संस्थेने गंगापूर धरणात साचलेला गाळ, माती काढण्यास सुरुवात केली आहे. या संस्थेने आतापर्यंत नागलवाडी गावाच्या शिवारात दोन पोकलॅन मशीन व पाच ट्रकच्या साहाय्याने ५००० ट्रक अर्थात, १०००० घनमीटर गाळ उपसला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील १० लाख लिटर जलसाठा वाढणार असून, जलसंपदा विभागाला ५० हजार रुपयांची अतिरिक्त पाणीपट्टीही मिळणार आहे. याशिवाय सिंचन पुनर्स्थापनेकामी येणाऱ्या सुमारे ६ लाख रुपयांच्या खर्चाचीही बचत होणार आहे.

रस्ताही केला तयार धरणातून काढण्यात आलेल्या गाळ व मातीच्या साहाय्याने जलचिंतन संस्थेने नागलवाडी ते धरणालगतच्या ग्रामस्थांची सोय व्हावी यासाठी रस्ताही तयार केला आहे. या कामी ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य लाभत आहे.

जलचिंतन संस्थेच्या माध्यमातून गंगापूर धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील ब्रिटिशकालीन बंधारे व कालव्यांचेही पुनरुज्जीवन केले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील गावतळी, पाझरतलाव, विहिरींचे पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. - राजेंद्र जाधव, अध्यक्ष, जलचिंतन संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेम्पोच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, नाशिक

भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने सिग्नलजवळ उभ्या असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास उडवले. यात या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पाऊणेएक वाजेच्या सुमारास शरणपूर पोलिस चौकीजवळील सिग्नलवर घडली.

धनराज जाधव (वय ३५) असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते घाटकोपर येथील पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. धनराज जाधव एका लग्नाच्या निमित्ताने शहरात आले होते. रात्री पाऊणेएक वाजेच्या सुमारास ते शरणपूर सिग्नल येथे रस्त्यावर थांबलेले असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने (एमएच १५ इके ६१५८) त्यांना जोराची धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेले जाधव जागेवर कोसळले. ही घटना झाली तेव्हा सरकारवाडा पोलिस स्टेशनचे गस्तीपथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी जाधव यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये वडाळागाव परिसरातील रामोशी वाडा येथे राहणाऱ्या टेम्पोचालक नईम शौकत शेख (वय ३८) याच्याविरोधात बेदरकपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. नईम शेखला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणी अधिक तपास सरकारवाडा पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेव्हा खासदारांचे नाव आमदारच विसरतात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप शिवसेनेतील नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची कोणतीही संधी सोडत नाह‌ी. त्याचा प्रत्यय सदगुरू फाऊंडेशन, गोवा यांच्यावतीने आयोजित पुरस्कार समारंभात आला. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या जागी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी कालिदास सभागृहात पूरस्कारमूर्ती खासदार हेमंत गोडसे यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना शालजोडीतले देऊन त्यांची दांडी गूल केली. हेमंत गोडसे यांनाच 'तुमचे नाव काय' असा उपरोधिक प्रश्न विचारत आपण लाटेत निवडून आलेले आहात याची जाणीव करून दिली. भांबावलेल्या गोडसे यांनी स्मितहास्य करीत काही काळाने सभागृहातून काढता पाय घेतला.

नाशिकमध्ये सध्या शिवसेना भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून, दोन्ही मित्रपक्ष एकमेकांना पाण्यात पहात आहेत. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला मेळाव्यात हल्ला केल्यानंतर दोघांमधील वितुष्ट वाढले आहे. आता जाहीर कार्यक्रमांमध्येही एकमेकांना कमी लेखण्यासाठी युक्त्या योजत आहेत. याचा प्रत्यय सदगुरू फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आला. खासदार हेमंत गोडसे यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार होता. हा सन्मान श्रीपाद नाईक यांच्या जागेवर आलेल्या आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमात खासदार गोडसे यांचे गोडवे गायले जाणे अपेक्षित असताना आमदार मॅडमने त्यांच्या इभ्रतीलाच हात घातला. बोलण्याच्या ओघात खासदार, आपले नाव काय असा प्रश्न सीमा हिरे यांनी विचारल्याने सभागृहही अवाक् झाले. आमदारांनी टाकलेल्या या गुगलीने गोडसे मात्र घायाळ झाले.

... सावजी, जरा बघा! आमदारांच्या फिरकीने घायाळ झालेल्या खा. गोडसे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेत असताना प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या कानाला लागून सावजी, जरा बघा असा टाहो फोडला. नाराजी व्यक्त करत बाईंना काहीतरी सांगा असा सल्लाही दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यासाठी चपलेत आणलेला गांजा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कारागृहात असलेल्या भावाला देण्यासाठी चपलेत आणलेला चारशे ग्रॅम गांजा कारागृह कमर्चाऱ्यांनी जप्त केला असून एकाला अटक केली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात नागेश भागवत सोनवणे हा कैदी आहे. त्याचा भाऊ विजय भागवत सोनवणे त्याला शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास भेटण्यासाठी आला. भावासाठी त्याने कारागृह प्रवेशव्दारावर चप्पल दिली. तेथील सुरक्षा कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने तपासणी केली असता दोन्ही चप्पलच्या सोलमध्ये चारशे ग्रॅमचा गांजा लपवलेला आढळला. त्याची किमत ११८० रुपये आहे. कारागृह कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही घटना कळवली. विजय सोनवणेला ताब्यात घेण्यात आले. नाशिकरोड पोलिसांनी त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून ई-टोल सुविधा

$
0
0

जिल्ह्यातील घोटी, पिंपळगाव बसवंत व चांदवड येथे अंमलबजावणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील निवडक २७५ टोल नाक्यांवर सोमवार, २५ एप्रिलपासून कॅशलेस पेमेंटची सुविधा उपलब्ध होत आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील तीन टोल नाक्यांचा समावेश आहे. मात्र, या ई टोल सुविधेबाबत वाहनधारक अनभिज्ञ आहेत. तसेच, या सुविधेसाठी आवश्यक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन स्टीकरच्या उपलब्धतेचीही माहिती नसल्याने वाहनचालकांना पारंपरिक पध्दतीनेच पैसे भरावे लागणार आहेत.

ई-टोलची पद्धत अंमलात आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेशी करार केला आहे. या बँकेद्वारे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन स्टीकर वाहनधारकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यातील मुंबई-आग्रा हायवेवरील घोटी, पिंपळगाव बसवंत व चांदवड या टोलनाक्यावर सोमवारपासून ही कॅशलेस पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कार, जीप आणि व्हॅनसाठी फास्टॅगचे एकरकमी शुल्क दोनशे रुपये असून, ई-टोलवसुलीसाठी आवश्यक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञान वाहनाच्या काचेवर लावण्यात येणार आहे. वाहन टोलनाक्यावर आल्यानंतर संबंधित यंत्रणा वाहनाच्या काचेवरील फ्रिक्वेन्सीचे वाचन करून प्री-पेड अकाऊंटमधील पैसे कापून घेईल. या योजनेत प्रीपेड अकाउंटमधील रक्कम संपल्यानंतर ती चेक अथवा ऑनलाइन माध्यमातून भरण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, बँकेतून फक्त स्टीकर मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. बहुतांश टोल नाक्यावरही याबाबत फारशी माहिती नसली तरी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन स्टीकर रिडींगची व्यवस्था मात्र त्यांच्याकडे आहे.

टोल नाक्यावर विचारणा ई-टोल कसा भरायचा, काही तरी स्टीकर मिळणार आहे ते तुमच्याकडे आहे का? बँकेत खाते आवश्यक आहे का? बँकेतून स्टीकर मिळेल की प्रीपेड कार्ड अशा प्रकारची विचारणा वाहनधारकांकडून टोल नाक्यावर केली जात आहे.

सुटीचा फटका महिन्यातील चौथा शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी अशा सलग दोन दिवस बँकांना सुट्या आल्या आहेत. त्यामुळे ई-टोलबाबतची माहिती वाहनधारकांना मिळू शकलेली नाही. तसेच, ग्राहक बँकेत जाऊ शकलेले नाहीत.

टोलवर स्टॉल लावा संबंधित बँकांनी टोल नाक्याच्या ठिकाणीच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन स्टीकर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे मत वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा, केवळ स्टीकर घेण्यासाठी संबंधित बँकांकडे जावे लागेल, त्यात वेळेचाही अपव्यय होणार असल्याचा वाहनधारकांचा सूर आहे.

आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेतून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञान असलेले स्टीकर मिळेल ते गाडीवर लावल्यावर ई-टोलची सुविधा मिळेल. आमच्या हे तंत्रज्ञान रिडींग करण्याची यंत्रणा आहे. पण हे स्टीकर बँकेतून मिळेल. अनेक वाहनधारक टोलनाक्यावर ह्याबद्दल विचारणा करत आहे. - पंकज झंवर, चांदवड टोल नाका

मला सोमवारी मालेगाव येथे लग्नाला जायचे आहे. ई-टोल सुरू होणार असल्याचे समजले. पण, ऑनलाइन पैसे कसे द्यायचे? काही तरी स्टीकर वाहनाला लावावे लागेल, असेही कळाले. ते कुठे मिळणार आहे? - संजय बिरारी, वाहनधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाऱ्या महिलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या काही घटना नुकत्याच घडल्या आहेत. नांदगाव तालुक्यातील वडाळी येथे शनिवारी विहिरीत पाणी भरण्यासाठी गेलेल्या ३७ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नांदगाव तालुक्यात पाण्याचे संकट गहिरे झाले असून, माणसांसह प्राण्यांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वडाळी (ता. नांदगाव) येथील शांताराम भास्कर गायकवाड (वय ३७) हे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेले असता पाय घसरल्याने ते विहिरीत पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. पोल‌िसांनी या घटनेची आकस्म‌िक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images