Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राज्यासह जिलह्यात पावसाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वायव्य आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात सातत्याने कमालीचे चढ-उतार होत आहेत. परिणामी दिवसा उकाडा कमी होऊन रात्री गारठा वाढतो आहे. हे वातावरण पावसाला पोषक असून बुधवार (ता. २७) पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यास विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारी मालेगावात ४०. २ तर नाशकात ३४.९ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले.

पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तेलंगणा आणि तामिळनाडू दरम्यान समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटरवर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी (दि.१९) व बुधवारी (दि. २०) रात्री तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली. त्यामुळे राज्यात रात्री उकाडा वाढल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. सध्या महाराष्ट्रात वायव्य आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे वातावरणातील हवेच्या थरांमध्ये वेगाने बदल होत आहेत. परिणामी दिवसा तापमान कमी झाले आहे. त्यातच रात्रीच्या तापमानातही घट होऊन उकाडा कमी झाला आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमाल तापमात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास राहिले. विदर्भातील चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ४५ अंशांवर गेले आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, मंगळवारी (दि. २६) मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार (दि. २७) पासून मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलसंपदाकडून नाशिककर आरोपीच्या पिंजऱ्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

पाणीमीटर प्रकरणावर तोंडघशी पडलेल्या जलसंपदा विभागाने आणखी दोन पाऊले पुढे जात आता नाशिककरांची पूर्णतः कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून उचललेल्या पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन अभियंत्यांची नियुक्ती करीत, नाशिककरांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. जलसंपदाच्या या कृतीवर काँग्रेस, मनसे, शिवसेनेने तीव्र टीका केली असून एकीकडे पाणी पळवायचे आण‌ि दुसरीकडे नाशिककरांना चोर ठरव‌िण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महापालिका नाशिककरांसाठी अंधाधुदं पाणी उचलत असल्याचे निम‌ित्त करत, जलसंपदा विभागाने पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. महापालिका अगोदरच काटेकोरपणे पाण्याची उचल करत असतांना, जलसंपदा विभागाने पालिकेच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत, वॉच सुरू केला आहे. जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या या कृतीचा सत्ताधारी मनसेसह शिवसेना व काँग्रेसने निषेध केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करत एकीकडे नाशिकचे पाणी पळवून नेले आणि दुसरीकडे आमच्या शिल्लक पाण्यावर वॉच ठेवण्याची कृती निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. नाशिककरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे आयोग्य असून प्रथम दारू कंपन्याचे पाणी थांबवा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले आहे. आमच्या पाण्यावर वॉच ठेवून जलसंपदाला आता काय मिळणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

शिवसेनेनेही या कृतीवर टीका करत, मनपावर राग काढणे चुकीचे असून मनसे आणि भाजपच्या वादात नाशिककरांचे नुकसान करत असल्याचा आरोप केला आहे. गटनेते अजय बोरस्ते यांनी आमदार हे नगरसेवकही असून त्यांनी पालिकेचे प्रश्न प्रथम सभागृहात मांडले पाहिजे. नाही, मांडायचे तर राजीनामे दिले पाहिजे असे सांगत, मनसे व आयुक्तांवरील राग जनतेवर काढू नका, असा इशारा दिला आहे. नाशिकचे पाणी पळवायचे आणि मग आमच्याच पाण्यावर वॉच ठेवण्याची कृती सहन केली जाणार नाही. जनतेला भुर्दंड द्याल तर, सेना सहन करणार नाही, असा इशाराही बोरस्ते यांनी दिला आहे. मनसेनेही या कृतीवर टीका केली असून पालिकेने अगोदरच बचत सुरू केली असताना केवळ नाशिककरांना कोंडीत पकडण्याचा खेळ पालकमंत्र्यांनी सुरू केल्याचा आरोप गटनेते अनिल मटाले यांनी केला आहे.

आमचेच पाणी पळवायचे आणि शिल्लक पाण्यावर वॉच ठेवण्याचा जलसंपदा मंत्र्यांचा प्रयत्न हा नाशिककरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा आहे. मद्य कारखान्यांना पाणी देतांना मोजले जात नाही. परंतु, नाशिककरांना पाणी देतांना मोजले जाणे ही कृती चुकीची आहे.

शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस



भाजपचे आमदार हे नाशिककचे आहेत, की जलसंपदा विभागाचे आहेत तेच कळत नाही. मनसे व भाजपच्या वादात नाशिककरांना वेठीस धरले जात आहे. शिवसेना हा प्रकार सहन करणार नाही.- अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना



महापालिकेने अगोदरच कपात सुरू करून बचत सुरू केली आहे. असे असतानाही थेंबथेंब पाण्यावर वॉच ठेवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. नाशिककरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.-अनिल मटाले, गटनेता, मनसे.

शहरात नागरिकांच्या हिताचे व जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न असतांना मनसेसह सत्ताधारी महाआघाडीने त्याकडे दुर्लक्ष करत, केवळ पाण्याच्या प्रश्नावर राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे आता ही पाण्याची टेप बंद करा व नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या.-- सतीश कुलकर्णी, भाजपा गटनेते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत बारमध्ये राडा

$
0
0

पाच जण जखमी; दंगलीचा गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी​, नाशिक

आपापसात वाद सुरू असताना बियरच्या बॉटल्स फोडू नका, असे हॉटेलमालकाने सांगितल्याचा राग आल्याने १० ते १२ जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये जबर तोफफोड करीत पाच जणांना गंभीर जखमी केले. ही घटना पंचवटी कारंजावरील हॉटेल साहेब येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बारचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रात्रीच्या सुमारास हॉटेल साहेब रेस्टॉरंट आणि बारमध्ये संशयित रूपेश कोठुळे, नागेश कोठुळे, पप्पू कांदे, नाना कांदे, सुदाम ढगे, सनी वाघमारे व त्यांचे चार ते पाच साथिदार मद्य पिण्यासाठी आले होते. मद्य पिताना संशयितांमध्ये वाद उद्भवले. भांडण सुरू होताच त्यांनी बियर व इतर बॉटल्सची तोडफोड सुरू केली. यावेळी हॉटेलचे मालक जय सुरेश शर्मा यांनी संबंधिताना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शर्मा यांनी केलेल्या सूचनेचा राग आल्याने संशयित आरोपींनी थेट हॉटेलमध्ये तोडफोड सुरू केली. हॉटेलच्या काचा फोडल्या. यावेळी संशयित रूपेश कोठुळे याने आपल्या हातातील चॉपरने संदीप शर्मा व त्यांचा भाऊ चेतन शर्मा यांच्यावर वार केले. आरोपींनी हॉटेलमधील सर्व काचा व खुर्च्यांची तोडफोड केली. या भांडणात आकाश संदीप शर्मा, गौरव अनिल शर्मा, जय सुरेश शर्मा, चेतन अनिल शर्मा, ब्रिजलाल शर्मा गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे, सहायक पोलिस निरीक्षक मेश्राम यांच्यासह इतर कर्मचरी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी लागलीच रूपेश व नागेश कोठुळे या दोघांना ताब्यात घेतले तर उर्वरीत संशयितांची सोमवारी धरपकड सुरू होती. संशयितांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पीएसआय सारिका पिंपरे करीत आहेत.

रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरूच काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरात हॉटेलमधील दोघा कामगारांनी एका व्यक्तीचा खून केला होता. पहाटेच्या सुमारास बिल देण्याच्या वादातून हा प्रकार घडला होता. पंचवटीतील घटना सुध्दा साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत बोलताना सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, हॉटेल बंद करण्याच्या​ नियमाकडे दुर्लक्ष होत असल्यास संबंधित हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येतील. पंचवटीतील घटनेची माहिती घेण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसल्यास कारवाई करणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्नॅचर्स जोरात; पोलिस चक्रावले तपासकामात!

$
0
0

नाकाबंदीच्या वेळा बदलल्या तरी लुटीचा आलेख उंचावलेला

म. टा. प्रतिनिधी​, नाशिक

चेन स्नॅचर्सचा शहरात धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या २४ दिवसांत सरासरी दिवसाआड एक याप्रमाणे १७ चेन स्नॅचिंग झाल्या असून, त्यातील अवघ्या एका घटनेतील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. साधारणतः दिवसाआड आणि रात्री उशिरा किंवा सकाळच्या सुमारास चेन ओढण्याच्या घटना घडल्या असून, त्यादृष्टीने नाकाबंदीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या चेन स्नॅचर्सचा माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

जानेवारी ते मार्च या पहिल्या तीन महिन्यात शहरात १९ चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. वाढते शहरीकरण, चोरीची सहज संधी, तसेच गुन्हेगारांच्या वाढत्या संख्येच्या मानाने हा आकडा तितकासा जास्त नव्हता. मात्र, एप्रिल महिना उजाडला तसे स्नॅचर्सने डोकेवर काढले. गंगापूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, सरकारवाडा, मुंबई नाका अशा वेगवेगळ्या पोलिस स्टेशन हद्दीत सातत्याने चेन स्नॅचिंगच्या घटना सुरू झाल्यात. गेल्या २४ दिवसांत तब्बल १७ चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. साधारणतः सकाळी सहा ते नऊ आणि रात्री आठ वाजेनंतर चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याचे दिसते. सकाळच्या सुमारास रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. तसेच, रात्री नऊ वाजेनंतर रस्ते मोकळे होण्यास सुरुवात होते. सकाळी महिला मॉर्निंग वॉकसाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा इतर काही कामानिमित्त घराबाहेर पडल्यात की स्नॅचर्ससाठी या सहज टार्गेट ठरतात. रात्रीच्या दरम्यान लग्नकार्यावरून घराकडे परतणाऱ्या, शतपावली करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून चोरटे धूम ठोकतात. भाभानगर परिसरातील एक महिला घराबाहेर दुसऱ्या महिलेशी चर्चा करीत असताना चोरट्याने मंगळसूत्र ओरबोडून नेले. जानेवारी ते २४ एप्रिल या कालावधीत तब्बल ३६ चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. सरासरी दोन तोळे सोन्याची लूट गृहीत पकडली तर किमान ७२ तोळे सोने चोरट्यांनी लंपास झाल्याचे दिसते.

चेन स्नॅचिंगच्या घटना जानेवारी - ७ फेब्रुवारी - ६ मार्च - ६ एप्रिल - १९

चेन स्नॅचिंगच्या घटनांचा तपास माहिती मिळण्यावर अवलंबून असतो. आम्ही सर्वच घटनांचा बारकाईने तपास करीत असून, शहरात सकाळी सहा ते १० आणि रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत नाकाबंदी लावण्यात येते. हा गुन्हा सहजतेने करतो येतो. त्यामुळे अगदी शाळा कॉलेजातील मुलेही यात सहभागी होतात. नवीन गुन्हेगारांचा माग काढताना थोडा कालावधी खर्ची पडतो. - सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाथर्डीत आढळले सातवाहनकालीन रांजण!

$
0
0

ramesh.padwal@timesgroup.com

नाशिकमधील पांडवलेणी येथील अनेक शिलालेखांमध्ये व्यापाऱ्यांनी दान दिल्याचा उल्लेख आहे, तसेच पूर्व महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी कल्याण-कसारा-नाशिक हा व्यापारी मार्ग प्रसिद्ध होता. गोवर्धन व अंजनेरी ही प्रसिद्ध बाजारपेठ होती, या इतिहासाला भक्कम दुजोरा ‌देणारे सातवाहनकालीन दगडी तीन रांजण पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी गावात आढळले आहेत. व्यापारासाठी या मार्गाचा वापर करणारे व्यापारी या रांजणांत ठरवून दिलेला कर टाकत असत. या अनोख्या दगडी रांजणांमुळे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास समोर येणार आहे.

सातवाहन राजे हे महाराष्ट्राचे पहिले राजे म्हणून ओळखले जातात. साधारण इसवी सनापूर्वी २०० सालातल्या कालखंडात महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. त्याच्या खाणाखुणा इ. स. ७०० पर्यंत नाशिकच्या पांडवलेणीत पाहायला मिळतात. जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत. त्यानंतर हा माल सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (आताचे पैठण), उपराजधानी जीर्णनगर (आताचे जुन्नर), तसेच सातवाहनांच्या अधिपत्याखाली असलेल्या नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत म्हणजे गोवर्धन (गोवर्धन आता बाजारपेठ नाही.) येथे व्यापारी हा माल घेऊन येत. कल्याण-नाणे घाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरील जुन्नरची बाजारपेठ तेव्हापासूनच प्रसिद्ध होती. त्या काळी पूर्व महाराष्ट्रात जाण्यासाठी कल्याण-कसारा-नाशिक या मार्गाला व्यापारी पसंती देत. त्यामुळेच या मार्गावर त्रिंगलवाडी लेणी, पांडवलेणी (त्रिरश्मी लेणी) व अंजनेरी लेणी निर्माण झाल्या. डोंगराळ भागातून येणाऱ्या या व्यापारी मार्गाचे संरक्षण व्हावे, तसेच लूटमारीपासून बचाव व्हावा म्हणून या मार्गावर किल्ल्यांची निर्मितीही झाल्याचे दिसते. कावनई किल्ला, ‌त्रिंगलवाडी किल्ला, अंजनेरी किल्ला, ब्रह्मगिरी किल्ला याचीच उदाहरणे आहेत.

अंजनेरीची बाजारपेठही सातवाहनांच्या काळात प्रसिद्ध बाजारपेठ होती. या बाजारपेठेत येण्यासाठी व्यापाऱ्यांवर कर आकारणी केली जाई. त्या बदल्यात व्यापाऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत व्यवसाय करता येई, तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थान‌िक राजा घेत असे. त्याच्या पाऊलखुणा यापूर्वी नाशिकमध्ये उजेडात आल्या नव्हत्या. त्यामुळे नाशिकमार्गे महाराष्ट्रात इतरत्र जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारणी होत होती का, याचे उत्तर मिळत नव्हते. मात्र, पाथर्डीत कर आकारणी करण्यासाठी महत्त्वाचे असलेले दगडी रांजण मिळाल्याने कल्याण-कसारा-नाशिक या मार्गे नाशिकमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही कर द्यावा लागत असे, हे आता स्पष्ट झाले आहे. या रांजणांमुळे सातवाहनकालीन व्यापारावर नव्याने प्रकाश पडणार आहे.

लेण्यांसाठी व्यापाऱ्यांकडून दान

पांडवलेणी, अंजनेरी लेणी, तसेच जैन मंदिरांसाठी व्यापाऱ्यांनी दान दिल्याची अनेक उदाहरणे शिलालेखाच्या माध्यमातून लक्षात येतात. विदेशी बनावटची भांडी व काचेच्या वस्तू नाशिकमध्ये आढळल्या आहेत. जुनी नाणी, सोन्याच्या मोहराही व्यापारी मुक्त हस्ताने दान करीत असत. त्यामुळे नाशिकमध्ये बौद्ध लेणींची सातवाहन काळात भरभराट झाल्याचे दिसते.

ठेवा व्हावा संरक्षित!

पाथर्डीत सापडलेले दगडी रांजण चार फूट व्यासाचे आणि पाच फूट उंचीचे आहेत. हे रांजण पूर्वी जकातीसाठी वापरले जात असत. जकात कर रूपाने यात तत्कालीन 'कर्षापण' नावाची नाणी टाकली जात असत. पाथर्डीतील तीन रांजणांपैकी एक अजूनही सुस्थितीत आहे, तर दोन रांजण काहीअंशी जमिनीत गाडले गेलेले आहेत. आता हा अनमोल ठेवा सुरक्षित ठिकाणी हलवून त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाण्याचा क्रम ठरविणे आवश्यक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्रातील दारू कारखान्यांना पाणी देण्याअगोदर नागरिकांना, जनावरांना, शेतीला पाणी दिले गेले पाहिजे. त्यासाठी क्रम ठरविला गेला पाहिजे, असे मत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी धुळे तालुका दौऱ्यावर आले असताना बोलत होते.


ते म्हणाले की, मराठवाड्यात आता ऊसाचे उत्पादन घेणे शक्य नाही, कारण तेथील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. यामुळे साखर कारखाने देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून ऊसाचे उत्पादन न घेता मराठवाड्यात तुर, हरभरा, ज्वारी, बाजरी व तीळ हे पिके घेतली पाहिजेत. सध्या महाराष्ट्राला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी कोणती शेतीपिके घेतली पाहिजेत याबाबत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी यावेळी मार्गदर्शन केले. राजेंद्रसिंह यांनी धुळे तालुक्यातील जवाहर कृतज्ञता ट्रस्टतर्फे बोधगाव, वेल्हाणे, कुंडाणे गावालगत सुरू असलेल्या नाला, बंधाऱ्यांचे खोलीकरण व रूंदीकरण केलेल्या सिंचन कामांची पाहणी केली. त्यानंतर पांझरा नदीवरील फड पद्धतीची पाहणी करून अक्कलपाडा प्रकल्पाला भेट दिली.

एका लिटर दारूची बाटली बनविण्यासाठी चार लिटर पाणी लागते, असे असताना दारू कारखान्यांसाठी पाण्याचा अमाप वापर होणे ही बाब अयोग्य आहे, असे सांगत कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ऊस लागवड करावी वाटल्यास दारूचे कारखाने उभारावेत. मात्र त्याअगोदर नागरिकांना, जनावरांना, शेतीला आणि मग उद्योगांना पाणी असा क्रम ठरलेला असताना आपण हा क्रम मनमानी करून उलटा लावल्याने निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलो आहोत, असेही राजेंद्रसिंह यांनी शेवटी सांगितले. यावेळी जवाहर ट्रस्टचे आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषद शिक्षण सभापती मधुकर गर्दे, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गुलाबराव कोतेकर, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकुलचे काम सुरेशदादांच्या निर्देशांनुसार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेशी संबंधित वाघूर पाणीपुरवठा, विमानतळ विकास, रस्ते विकास आणि घरकुल यासारख्या मोठमोठ्या योजनांची माजी आमदार सुरेश जैन यांच्या मतानुसार आणि त्यांच्या निर्देशांनुसार सुरू करण्यात आली होती, अशी माहिती घरकुल प्रकरणातील साक्षीदार तथा तत्कालीन जळगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी धुळे जिल्हा विशेष कोर्टाला दिली.

घरकुल प्रकरणी धुळ्यात विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांच्या कोर्टात सध्या कामकाज चालू आहे. बुधवारी, साक्ष देताना जावळीकर यांनी सांगितले की, घरकुल योजनेसाठी म्हाडाकडून कर्ज घेतले जाणार होते. त्यासाठी योजनेची जमीन जळगाव नगरपालिकेच्या नावावर हवी, अशी अट म्हाडाने घातली होती. परंतु ही जमीन नगरपालिकेच्या ताब्यात नसल्याने नगरपालिकेने कर्जाचा प्रस्ताव पाठवला नाही.

अटींची पूर्तता नाही

ज्या जमिनीवर घरकुले होणार ती जमीन म्हाडाच्या नावावर झाली पाहिजे, लाभार्थींची यादी तसेच म्हाडाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड जळगाव नगरपालिका कशी करणार याची माहिती म्हाडाने मागविली होती. त्याची पूर्तता करू न शकल्याने नगरपालिकेने कर्जाचा प्रस्ताव म्हाडाला पाठविला नाही. याबाबतचे पत्र म्हाडाने मुख्याधिकारी यांना पाठवले होते. या पत्राला कशाप्रकारचे उत्तर देण्यात यावे यासाठी प्रदीप रायसोयनी यांनी शेरे मारले होते आणि त्यावर तत्कालीन न. पा. अभियंता डी. एस. खडके, आदरणीय दादा व प्रदीप रायसोनी यांच्या स्वाक्षरी होत्या.

'आदरणीय दादा म्हणजे सुरेशदादा'

हे पत्र घेवून मी रायसोनी यांच्या दालनात गेलो. त्यांनी सांगितले की, 'आदरणीय दादा म्हणजे सुरेशदादा जैन आहेत. नगरपालिकेच्या वाघूर पाणी योजना, विमानतळ विकास योजना, रस्ते विकास योजना आणि घरकुल यासारख्या मोठमोठ्या योजनांची कामे सुरेशदादा जैन यांच्या मतानुसार व त्यांच्या निर्देशांनुसार सुरू करण्यात येत आहेत.' जावळीकर पुढे म्हणाले की, सुरेश जैन हे सन १९९७ ते २००२ या कालावधीत जळगाव नगरपालिकेत कोणत्याही पदावर नव्हते. पालिका निवडणुकीतही निवडून आले नव्हते. ते स्वीकृत सदस्य देखील नव्हते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

$
0
0

नंदुरबारच्या महिला अधिकाऱ्यावर गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या अनुदान योजनेतून शेती साहित्य मिळवून देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांकडून २०,५२,००० एवढी रक्कम हडप करण्याचा प्रकार नंदुरबार कृषी विभागात घडला आहे. याप्रकरणी नंदुरबार कृषी सहायक सुरेखा सुरेश माळी यांच्याविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


जिल्हयातील शहादा व नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या अनुदान योजनेतून ट्रॅक्टर, टिलर, थ्रेशर, रोटावेटर, पेरणीयंत्र आदी साहित्यांवर ५० टक्के अनुदान दिले जाते. याच योजनेच्या लाभापोटी शेतकऱ्यांकडून रक्कम जमा करून कोणलाही कृषी साहित्यांचे वाटप न करता जमा पैशांचा अपहार करण्याचा प्रकार येथील कृषी अधिकारी सुरेखा माळी यांनी केला आहे. याबाबत छोटूलाल पुरूषोत्तम पाटील (रा. पटेल गल्ली, प्रकाशा ता. शहादा) या शेतकऱ्याने पोलिसात फिर्याद दिली आहे.

छोटूलाल पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांना ३० डिसेंबर २०१३ ते १३ जानेवारी २०१४ दरम्यान कृषी अधिकारी माळी यांनी अनुदानात ट्रॅक्टरसह विविध यंत्रसामुग्री वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास संपादन करीत या वस्तूंसाठी त्यांच्याकडून २०,५२,००० रुपयांची रोकड जमा केली.

शेतकऱ्यांना अनुदानापोटी मिळणारे धनादेश देऊन, जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत धनादेश बँकेत जमा करू नका असे सांगण्यात आले होते. आपल्या बँकेतील खात्यात पैसे जमा झाली की नाही याची खात्री शेतकरी वेळोवेळी करत होते. परंतु असे अनेक दिवस केल्यानंतर त्यांना पैसे तर मिळालेच नाही तर वस्तुही मिळाल्या नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला व त्यांनी पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाकाठी रविवारपासून ज्ञानयज्ञ

$
0
0

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या वसंत व्याख्यानमाला संस्थेच्या ९५ व्या वर्षातील ज्ञानसत्राचा प्रारंभ रविवार, १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता, यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे होणार आहे. नवी दिल्लीतील ज्येष्ठ माध्यम पत्रकार विनोद दुआ यांचे 'भारतीय होने का मतलब' या विषयावरील व्याख्यानाने या ज्ञानयज्ञास प्रारंभ होणार आहे.

व्याख्यानमालेचे उदघाटन महापौर अशोक मुर्तडक व महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर गुरूमित बग्गा, सलिम शेख, सुरेखा भोसले, कविता कर्डक, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, मिलिंद शंभरकर, डी. एस. पवार, प्रताप मोहंती, माधवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सोमवार, २ मे रोजी जतीन देसाई, ज्येष्ठ पत्रकार, समिक्षक यांचे मुंबई, 'भारत पाकिस्तान मैत्री किती खोटी? किती खरी?' या विषयावर व्याख्यान, मंगळवार ३ मे रोजी डी. बी. शेकटकर, लेफ्टनंट जनरल (नि), पुणे, यांचे '२१ व्या शतकाचा आतंकवाद आणि समाजाची भूमिका', बुधवार ४ मे रोजी नितीन भोसले यांचे 'महाराष्ट्राचा पाणीप्रश्न' या विषयावर व्याख्यान होईल. गुरूवार ५ मे रोजी डॉ. यशपाल गोगटे, नाशिक यांचे 'वजन कमी करण्याची गुरूकिल्ली', शुक्रवार ६ मे रोजी प्रा. अशोक गोडघाटे, नागपूर यांचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान', शनिवार ७ मे रोजी आमदार बच्चू कडू, अचलपूर यांचे 'व्यवस्था आणि आपण', रविवार ८ मे रोजी स्वामी अध्यात्मानंद, अहमदाबाद यांचे 'हमारे प्राचीन शास्त्र : दैनिक जीवन में विनिमय', सोमवार ९ मे रोजी किरण चव्हाण यांचे 'सायकल चळवळ- काल, आज आणि उद्या', मंगळवार १० मे रोजी कवी संमेलन : सूत्रसंचलन - प्रा.शंकर बोऱ्हाडे, सुभाष सबनीस, बुधवार ११ मे रोजी सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे 'राज्य सरकारचं धोरण आणि शेतकऱ्यांचं मरण', गुरूवार १२ मे रोजी रुबिना पटेल, नागपूर यांचे 'मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांची भूमिका', शुक्रवार १३ मे रोजी अनंत कळसे, प्रधान सचिव, विधी मंडळ यांचे 'महाराष्ट्राच्या प्रगतीशील वाटचालीत विधीमंडळाचे योगदान', शनिवार १४ मे रोजी प्रशांत देशमुख, रायगड यांचे 'छत्रपती संभाजी महाराज', रविवार १५ मे रोजी न्या. अंबादास जोशी, मुंबई यांचे 'न्यायाची संकल्पना व न्याय प्रक्रियेतील समाजाचा सहभाग' या विषयावर व्याख्यान होईल.

सोमवार १६ मे रोजी नवाकाळ वृत्तपत्राच्या संपादक जयश्री खाडिलकर-पांडे यांचे 'कामगार आणि शेतकरी', मंगळवार १७ मे रोजी प्रा. डॉ. दिनेश शिरूडे, नामपूर यांचे 'चैतन्याचा अखंड झरा : स्वामी विवेकानंद', बुधवार १८ मे रोजी मकरंद जाधव आर्ट ऑफ लिव्हिंग, लातूर यांचे 'जलजागृती - काळाची गरज', गुरूवार १९ मे रोजी मुक्ता दाभोळकर अंधश्रध्दा निर्मूलन समिती, दापोली यांचे 'विवेकवादी चळवळीची वाटचाल', शुक्रवार २० मे रोजी डॉ. भाऊसाहेब मोरे, नाशिक यांचे 'अवयव दान - सर्वश्रेष्ठ दान', शनिवार २१ मे रोजी राजयोगिनी ब्रह्माकुमारी शिलुदिदी, राजयोगि शिक्षिका, माऊंटआबू यांचे 'कर्मों की खेती', रविवार २२ मे रोजी खासदार विजय दर्डा, नागपूर यांचे 'मै कौन हूँ? और क्या हूँ?', सोमवार २३ मे रोजी निहिरा निसर्ग, निसर्ग देहूकर, यांचा अद्वैत धून (शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम), मंगळवार २४ मे रोजी ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, पश्चिम बंगाल, यांचे 'आसाम, केरळ, पाँडेचरी निवडणूक निकालाचा अन्वयार्थ' या विषयावर तर बुधवार २५ मे रोजी खासदार किरीट सोमय्या यांचे 'गुंतवणूकदारांचे प्रश्न' या विषयावर व्याख्यान होईल. गुरूवार २६ मे रोजी जयंत दिवेकर ब्रह्मविद्या साधक, ठाणे यांचे 'गुरूकिल्ली तुमच्या आरोग्याची आणि यशाची', शुक्रवार २७ मे रोजी यू. के. शर्मा चेअरमन, मंत्राज् ग्रीन रिसोर्सेस, नाशिक यांचे 'गोदावरी नदीचं प्रदूषण आणि उपाय', शनिवार २८ मे रोजी रणजित सावरकर, मुंबई यांचा 'धर्मनिरपेक्षता आणि स्वा. सावरकर' हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. रविवार २९ मे रोजी चित्रकार अतुल भालेराव आणि निलेश भारती, नाशिक यांचे 'अंतरात्म्याचा संवाद अर्थात निसर्ग चित्रण', सोमवार ३० मे रोजी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे 'पैशाचा प्रवास' तर मंगळवार ३१ मे रोजी भारूडरत्न निरंजन भाकरे आणि सहकारी, औरंगाबाद यांचा महाराष्ट्राची लोकपरंपरा कार्यक्रम होणार आहे.

३१ मे रोजी समारोप व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ३१ मे रोजी विविध व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे आदी उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात तीन महिला जखमी

$
0
0

शहरातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिला जखमी झाल्या आहेत. गणेशवाडीत डोक्यात दगड मारून महिलेला दुखापत करण्यात आली. भद्रकाली परिसरात एका महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले. तर, कान्हेरेवाडीत एका महिलेला शौचालयात कोंडण्यात आल्याचे उघडकीस आले.

मागील भांडणाची कुरापत काढून एकाने महिलेच्या डोक्यात दगड मारून दुखापत केल्याची घटना पंचवटी, गणेशवाडी परिसरात घडली. यात ताराबाई संतोष वायकंडे या जखमी झाल्या. रामा किसन गांगुर्डे याने हल्ला केला. कान्हेरेवाडी, शिवराम संकुलमधील सार्वजनिक शौचालयात युवतीस कोंडल्याची घटना उघडकीस आली. जेलरोड येथील युवती बुधवारी (दि.२७) सायंकाळी कान्हेरेवाडी येथील शौचालयात गेल्या. त्यावेळी संशयित रमेश कोरडे आणि वसिम अली अहमदनखान या दोघांनी शौचालयाला बाहेरून कडी लावली. टेलरकडे कपडे शिवण्यासाठी जाणाऱ्या महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना भद्रकाली परिसरात बुधवारी रात्री घडली. परवीन सलीम मेनन असे जखमी महिलेचे नाव आहे. संशयित जावेद सलीम पठाण याने मागील भांडणाची कुरापत काढत धमकावत हल्ला केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी स्टेडियमवर ‘आयपीएल’चा थरार

$
0
0

शहराच्या महात्मा गांधी रोडवरील छत्रपती स्टेडियममध्ये बसून आयपीएलच्या सामन्यांचा थरार अनुभवण्याची संधी 'बीसीसीआय'ने यावर्षी देखील नाशिककरांना मिळवून दिली आहे. शनिवार ३० एप्रिल व रविवार १ मे या दोन्ही दिवसांच्या प्रत्येकी दोन दोन सामन्यांचे थेट प्रक्षेपण 'बीसीसीआय'च्या 'फॅन पार्क' या योजनेनुसार चाहत्यांना मोफत पहायला मिळणार आहे.

प्रक्षेपणाच्या दोन्ही दिवशी ३ वाजल्यापासून प्रवेश मिळणार असून १२ वाजेपर्यंत - सामना संपेपर्यंत स्टेडियम खुले राहणार आहे. ३२ बाय १८ इंच एलईडी टीव्हीवर या सामन्यांचे प्रसारण दाखविण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या जोरदार प्रतिसादामुळे या वर्षी देखील 'बीसीसीआय'च्या 'फॅन पार्क'साठी नाशिकची पुन्हा निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी आयपीएल, त्यांचे प्रयोजक तसेच फ्रांचायजीतर्फे विविध खाद्यपदार्थ व पेयांचे विक्रेते माफक किमतीत विक्री करणार आहेत. याबरोबरच क्रिकेट व आयपीएलशी संबंधित विविध वस्तूही मिळणार आहेत. लहान मुले बालकांसाठी खास करमणूकीचा विभाग देखील या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. प्रत्येक चौकार, षटकार व बळी नंतर संगीताचा जल्लोष केला जाणार असून ज्यात खास आयपीएलचा बिगुल व त्या त्या संघांच्या गीतांचाही समावेश असणार आहे. मुले व त्यांचे पालक नवीन तंत्रज्ञानावर आधारित खास खेळ मोफत खेळू शकतील. क्रिकेटची अनुभूती मिळण्यासाठी व खेळण्यासाठी खास बॉलिंगची मशिन्स बसविली जाणार आहेत.

'लकी ड्रॉ'ची धूम सामन्यादरम्यान निरनिरळ्या भेट वस्तू वाटल्या जातील. लकी ड्रॉ अंतर्गत खेळाडूंच्या सहीच्या बॅटस व टी शर्टस मिळतील. भाग्यवान 'लकी ड्रॉ'च्या विजेत्यास व्हीवो मोबाईल मिळेल. तरी या संधीचा अधिकाधिक क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावेल, असे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी केले आहे.

शनिवारचे सामने १) दुपारी चार वाजता : दिल्ली डेअर डेव्हिल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स २) रात्री ८ वाजता : सन रायझर्स हैद्राबाद विरूद्ध रॉयल चायलेंजर्स बेंगळूरू

रविवारचे (दि. १ मे) सामने १) दुपारी चार वाजता : गुजरात लायन्स विरूद्ध किंग्स इलेवन पंजाब २) रात्री ८ वाजता : रायजिंग पुणे विरूद्ध मुंबई इंडियन्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकसाठी संघ ‘दक्ष’

$
0
0

केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला बळ देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही कंबर कसली आहे. भाजपचा राज्यस्तरीय मेळावा झाल्यानंतर आता संघाने राष्ट्रीय शिबिर नाशिकमध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. पुढील महिन्यात १७ राज्यांमधील निवडक ५०० स्वयंसेवकाचे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. तर विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २९) विविध कार्यक्रम होणार आहेत.

नाशिकमध्ये भाजप व शिवसेना या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांमध्ये संघर्ष पेटला असल्याने या दोन्ही कार्यक्रमांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संघाने राज्यातील मोठ्या शहरात विस्तार करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. आता नाशिकमध्ये २० दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. यात संघाच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत विविध विषयावर चर्चा होणार आहे. भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात १५ मे ते ५ जून दरम्यान प्रशिक्षण शिबिर होणार आहे. शिबिरात पहाटे पाच ते रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. यात बौद्धिक वर्ग, योगा, चर्चासत्र, प्रचार, सेवा विभाग यावरही मंथन केले जाणार आहे. शिबिराला ४५ ते ६२ वयोगटातील स्वयंसेवक हजेरी लावणार आहेत.

'विहिंप' देखील सक्रिय विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या उपस्थिती शुक्रवारी (दि. २९) गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास येथील मिटींग हॅालमध्ये परिषदेचे व बजरंग दलाचे कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी १२ वाजेपासून ४ वाजेपर्यंत ही बैठक सुरू राहणार आहेत. यात हिंदू हेल्पलाइन व हिंदू हेल्थ लाइन या संदर्भात माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजात नाशिकरोड येथील शिखरेवाडीच्या बालाजी मंदिर येथ डॉ. तोगडीया यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

'विहिंप'ने तयार केलेली हिंदू हेल्पलाइन व हेल्थलाइन हे मोठे उपक्रम आहे. हेल्पलाइनचे अगोदरच उदघाटन झालेले आहे. देशात कोठेही हेल्पलाइनद्वारे मदत मिळवता येवू शकते. त्यामुळे या हेल्पलाइन अधिक प्रभावी ठरावी यासाठी डॉ. तोगडिया मार्गदर्शन करणार आहेत. - एकनथा शेटे, प्रांताध्यक्ष, 'विहिंप'

स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी संघाचे शिबिर होत आहे. या निवासी शिबिरात १७ राज्यातील ५०० जण उपस्थित राहणार आहेत. यात विविध विषयावर चर्चा व बौद्धिक वर्ग होणार आहेत. - संजय चंद्राते, जिल्हामंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीचा पेच वाढला

$
0
0



वादग्रस्त घंटागाडी ठेकेदारांना मुदतवाढ देण्याचा व ठेकेदारांना काळ्या यादीतून बाहेर काढण्याचा तत्कालीन सभापती शिवाजी चुंभळे यांनी घाईघाईत मंजूर केलेला ठराव स्थायी समितीने रद्द केला आहे. त्यामुळे घंटागाडी योजनेचा पेच पुन्हा वाढला असून मुदतवाढ फेटाळल्याने ठेकेदारांना वेतन कसे देणार? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

पैसेच मिळणार नसतील तर ठेकेदार कचरा उचलणे बंद करू शकतात. त्यामुळे नागरिकांचीही कोंडी यातून होणार असून अस्वच्छतेला आमंत्रण दिले जाणार आहे. शिवाजी चुंभळे यांना दणका देण्याच्या नादात स्थायी समितीने एकाच वेळी ठेकेदार, प्रशासन व नाशिककरांची कोंडी केली आहे.

सभापती सलिम शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीची सभा झाली. यात मागील सभांचे इतिवृत्त मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. विशेषत: तत्कालीन सभापती चुंभळे यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४७ विषयांना संशयास्पद मंजुरी दिली होती. यात घंटागाडी ठेकेदारांना मुदतवाढ देण्यासह त्यांना काळ्या यादीतून बाहेर काढण्याचा प्रस्ताव होता. सदस्यांना विश्वासात न घेताच सभापतींनी परस्पर मंजूर दिलेल्या या विषयांना आपली संमती नसल्याचे पत्र काही सदस्यांनी दिले होते. त्यामुळे २९ फेब्रुवारीच्या दिवशी मंजूर केलेल्या प्रस्तावांचे इतिवृत्त मंजूर करायचे नाही, असा आदेश सभापती सलिम शेख यांनी दिला आहे. त्यामुळे घंटागाडी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव फेटाळल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे.

सद्यस्थितीत घंटागाडी योजनेची निविदा प्रक्रिया सुरू आहे. सध्या २८ ठेकेदारांनी प्रतिसाद दिला असून नवीन प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्याच ठेकेदाराकडून काम करून घेणे प्रशासनाला बंधनकारक आहे. परंतु, आता स्थायीने ठेकेदाराला काळ्या यादीतून बाहेर काढण्याच्या नादात या चारही ठेकेदारांची मुदतवाढ फेटाळली. त्यामुळे ठेकेदारांना पैसा कुठून द्यायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे. तर मुदतवाढ फेटाळल्याने ठेकेदार आपले कामही थांबवू शकतात. त्यामुळे शहरातील कचरा उचलण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्थायीच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

घंटागाडी ठप्प ? स्थायी समितीने ठराव क्रमांक ३२२ रद्द केला आहे. त्यामुळे विद्यमान ठेकेदारांना मुदतवाढ रखडली आहे. तर त्यांना काळ्या यादीतून बाहेर काढण्याची प्रक्रियाही थांबली आहे. आर्थिक देयके देण्याचा अधिकार हा स्थायीला आहे. स्थायीच्या संमतीशिवाय ठेकेदारांना वेतन देता येणार नाही. त्यामुळे चारही ठेकेदार या योजनेतून अंग काढून घेण्याची शक्यता आहे. घंटागाडी योजनेतून ठेकेदार बाहेर पडल्यास घंटागाडी ठप्प होवू शकते. महापालिकेकडे चालविण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने नाशिककरांचीच कोंडी होणार असून अस्वच्छतेला पुन्हा आमंत्रण दिले जाणार आहे.

शिवाजी चुंभळेंना दणका चुंभळेंनी आपल्या शेवटच्या म्हणजे २९ फेब्रुवारीच्या सभेत घंटागाडी ठेकेदारांना मुदतवाढ देण्यासह त्यांना काळ्या यादीतून बाहेर काढण्याच्या प्रस्ताव मंजूर केला होता. सदस्यांना अंधारात ठेवून जवळपास ४७ विषयांना संशयास्पद मंजूरी देण्यात आली होती. या सर्व विषयांचे इतिवृत्त फेटाळल्याने ते आता नामंजूर झाले आहेत. त्यामुळे चुंभळे यांना मोठा दणका बसला आहे. चुंभळे यांनी मंजूर केलेल्या ठरावांपासून सदस्यांनीच अंतर राखत, त्यांच्याशी आपला संबध नसल्याचे पत्रच नगरसचिवांना दिले होते. त्यामुळे या मंजूर विषयांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता स्थायी समितीने या विषयांना नामंजूर केल्याने चुंभळेंच्या अडचणीत भर पडली आहे.

संशयास्पद भूमिका स्थायी समितीने काळ्या यादीचा प्रस्ताव फेटाळणे अपेक्षित असतांना त्यांनी मुदतवाढही फेटाळली आहे. त्यामुळे स्थायीच्या कामकाजावर संशय वाढला आहे. ठेकेदारांनी काम ठप्प केल्यास नाशिककरांची कोंडी होवू शकते हे माहीत असतांनाही मुदतवाढ फेटाळली आहे. तर दुसऱ्या ठेक्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ठेकेदारांसह प्रशासनाला कोडींत पकडण्याची स्थायीची रणनीती आहे. ठेकेदारांची अडवणूक करण्याची स्थायीची भूमिका संशयास्पद ठरली आहे.

स्थायी समितीने ३२२ क्रमांकाचा ठराव नामंजूर केला आहे. त्यामुळे घंटागाडीची मुदतवाढही फेटाळली गेली आहे. घंटागाडी अत्यावश्यक सेवा असल्याने स्थायीचा ठराव प्राप्त झाल्यानंतर फेरप्रस्ताव सादर केला जाईल. - जीवन सोनवणे, अतिरिक्त आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कुशवाह यांची मुंबईत बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन नाशिकला जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना कुशवाह यांची अनपेक्षित बदली होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

सिंहस्थाच्या नियोजनासाठी राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१५ रोजी कुशवाह यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली होती. त्यांच्या जिल्हाधिकारीपदाच्या काळात सिंहस्थाचे उत्तम नियोजन झाले. याच कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारीपदाचा पुरस्कार देवून राज्य सरकारने नुकतेच सन्मानितही केले. मात्र, आता त्यांची बदली करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशिरा राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले. त्यात कुशवाह यांचेही नाव असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या खरीप आढावा बैठकीसाठी कुशवाह गुरुवारी मुंबईला गेले होते.

बी. राधाकृष्णन हे आयएएस २००८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. तामिळनाडू कृषी विद्यापीठातून त्यांनी बीएस्सी अॅग्रिकल्चरची तर नवी दिल्ली विद्यापीठातून त्यांनी एमएसस्सीची पदवी संपादन केली आहे. त्यांनी जालना येथील जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मूळचे तामिळनाडूचे असलेले बी. राधाकृष्णन यांनी जालना व रत्नागिरी येथे केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना नाशिकची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अखेर नाशिकला आलेच

बी. राधाकृष्णन यांची नाशिकला दुसऱ्यांदा जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने काढले. पाटील यांच्या जागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, पाटील यांची बदली रद्द झाल्याने राधाकृष्णन यांची नाशिकची संधी हुकली. त्यानंतर ते रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. अखेर अडीच वर्षानंतर त्यांना पुन्हा ही संधी चालून आली आहे.

संकेत अन् चर्चा

गेल्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची खरीप आढावा बैठक झाली. यावेळी सरकारी विश्रामगृहात झालेल्या डिनर डिप्लोमसीमध्येच कुशवाह यांच्या बदलीचे संकेत पालकमंत्र्यांनी दिल्याचे बोलले जात आहे. तर, मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप सरकारने कुशवाह यांची बदली मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी केल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावला प्रथमच आयएएस आयुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या आयुक्तपदी आयएसएस अधिकारी राजेंद्र जगताप यांची बदली करण्यात आली आहे. बुधवारी ७० हून अधिक आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात राजेंद्र जगताप यांची नियुक्ती मालेगाव मनपाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

मालेगाव मनपाचे विद्यमान आयुक्त किशोर बोर्डे यांची गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात नियुक्ती करण्यात आली होती. बर्डे यांच्या जागी नवनियुक्त राजेंद्र जगताप हे पदभार स्वीकारतील. जगताप सध्या पुणे महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मालेगाव महानगरपालिकेला कित्तेक वर्षापासून आयएसएस दर्जाचा सक्षम अधिकारी मिळवा अशी मागणी विविध होती. राजेंद्र जगताप यांची नियुक्ती झाल्याने सोशल साईटवरून मालेगावकरांनी त्यांचे स्वागत केले आहे. दरम्यान राजेंद्र जगताप यांच्या नियुक्तीबाबत मालेगाव प्रशासनास सायंकाळी उशिरापर्यंत कोणतेही

आदेश पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभागीय आयुक्तपदी के. गोविंदराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांची राज्य सरकारने बदली केली असून त्यांच्याकडे आता रोजगार हमी आणि जलसंधारण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्त्ती करण्यात आली आहे. कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेल्या डवले यांच्या बदलीमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ११ फेब्रुवारी २०१४ रोजी डवले यांची विभागीय महसूल आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. साईड पोस्टिंग अशी ओळख असलेल्या महसूल आयुक्तपदाचे सामर्थ्य डवले यांनी त्यांच्या कार्यशैलीतून दाखवून दिले. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनात डवले यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याचीच दखल घेत डवले यांच्याकडे रोहयो व जलसंधारण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. मदत व पुर्नवसन सचिव म्हणून कार्यरत असलेले के. एच. गोविंदराज यांच्याकडे नाशिक विभागीय महसूल आयुक्तsपदाचा कार्यभार राज्य सरकारने सोपविला आहे. नोव्हेंबर २०१४ पासून ते मदत व पुनर्वसन विभागात कार्यरत होते. वाशिम जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून ते काम बघत होते. महसूलमंत्री खडसे यांच्याकडे असलेल्या मदत व पुर्नवसन खात्यामुळे त्यांची वर्णी महसूल आयुक्तपदी लागल्याचे

बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांदळे तडकाफडकी नागपूरला सेवावर्ग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळातील नोकरभरतीत भ्रष्टाचार झाला नसल्याचा कांगावा करणाऱ्या महामंडळाने भरती प्रकरणाशी संबंध‌ित असलेले महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळेची नागपूरला तडकाफडकी बदली केल्याने याप्रकरणाबाबत संशय अधिकच बळावला आहे. मांदळेंच्या बदलीमुळे भरती प्रकरणात'दाल में कुछ काला है' अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव यांच्यासह महाव्यवस्थापक मांदळेंवर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आरोप केले होते. आदिवासी मंत्र्याच्या आदेशानंतर मांदळे यांना महामंडळाच्या नागपूर कार्यलयात याच पदावर सेवावर्ग करण्यात आले आहे. त्यातच विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांचीही बदली झाल्याने चौकशीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळातील वादग्रस्त नोकरभरती प्रकरणात तीनशे कोटीचा भ्रष्टाचार झाल्याच आरोप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे राज्यभर हे प्रकरण गाजले असून मुख्यमंत्र्यानी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. बुधवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदिवासी विकासमंत्र्यांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा दावा केला होता. पण अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत त्यांनी भाष्य केले नव्हते. बुधवारी रात्री अचानक बाजीराव जाधव यांनी या प्रकरणात आरोप असलेले महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची महामंडळाच्या नागपूरच्या कार्यालयात याच पदावर सेवावर्ग केल्याचे आदेश काढले. त्यांचा पदभार वित्त अधिकारी जी. तु. राजूरकर यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. मांदळे याची नागपूर येथे भरडाईसाठी आवश्यकता असल्याने त्यांची बदली केल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. परंतु, या प्रकरणातील खापर मांदळेंवर फोडण्याची तयारी वरिष्ठांकडून सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून मांदळेंना बळीचा बकरा बनवला जात असल्याची चर्चा आहे.

भरती प्रकरणात कोणतीही गडबड झाली नसतांना मांदळेंना नागपूरला तडकाफडकी पाठविण्यात आल्याबद्दल आता या प्रकरणातील गुढ वाढले आहे. मांदळेच्या अचानक झालेल्या या बदलीमागे भरतीप्रकरणात कुठेतरी गडबड झाल्याची कबुलीच मंडळाने दिल्याची चर्चा आहे. आदिवासीमंत्री विष्णू सावरा व सचिव राजगोपाल देवरा नाशिकमध्ये असतानाच ही बदली करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयातील अधिकाऱ्यांपर्यंत असल्याची चर्चा आता सुरू

झाली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांमुळे पालिकेची कोंडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

फाळके स्मारक व बुद्ध स्मारकातील सफाई कर्मचाऱ्यांचा ठेका संपल्यानंतरही साफसफाईचे काम त्याच कर्मचाऱ्यांकडून करून घेणे आता मनपाच्या अंगलट आले आहे. ऑगस्ट २०१५ ते मार्च २०१६ दरम्यान तब्बल सात महिने विनानिविदा काम केल्याने आता या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाने स्थायीच्या माध्यमातून वेतन काढून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्थायी समितीने प्रशासनाचा हा प्रयत्न हाणून पाडत, कायदेशीर सल्ला घेऊन वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे या कर्मचाऱ्यांनी १८० दिवस पेक्षा जास्त दिवस मनपाच्या सेवेत काम केल्याने या ७० कर्मचाऱ्यांना पालिकेला सेवेत कायम करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिका दुहेरी कात्रीत सापडली आहे. फाळके स्मारक व बौद्ध स्मारकाच्या सफाईचे काम जय बजरंग सेवाभावी संस्थेला दिले होते. संबंध‌ित ठेकेदारालाही वारंवार मुदतवाढ देण्यात आली. प्रशासनाने निविदा न काढता त्यालाच काम देण्याचे धोरण स्वीकारले. परंतु, या ठेकेदाराने ऑगस्टपासून काम सोडत असल्याचे पत्र पालिकेला दिले. पालिकेने पेस्ट कंट्रोल व घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्या ७० कर्मचाऱ्यांकडून काम सुरू ठेवले. या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा ठराव करण्यात आला. परंतु, महापौर कार्यालयाकडून हा ठराव प्राप्त झाला नाही.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्तबगार अधिकारीही पळविले

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह संपूर्ण विभागाच्या कामकाजाला शिस्त लावणारे विभागीय आयुक्त एकनाथ डवले तसेच पारदर्शी कारभार व सिंहस्थाच्या यशस्वीतेत मोलाचा वाटा उचलणारे जिल्हाधिकारी डॉ. दीपेन्द्रसिंह कुशवाह यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दोघांचाही कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आल्याने नाशिकचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमधून चांगल्या अधिकाऱ्यांची पळवापळवी करण्याचा हा प्रकार आहे. अनपेक्षित बदलीने या अधिकाऱ्यांसह नाशिककरांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. नाशिकच्या विकासासह दुष्काळाविरोधातील लढाईवरही या बदल्यांचा विपरित परिणाम होणार आहेत.

राज्य सरकारने बुधवारी ७३ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात नाशिकमधील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डवले यांनी वर्षभरातच जनतेचा थेट संपर्क असलेल्या पाच जिल्ह्यातील महसूलच्या कामकाजाला शिस्त लावली होती. ते दररोज जिल्ह्यांच्या कामांचा आढावा घेत, अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत असत. त्यामुळे अल्पावधीतच ते मॅनेटमेंट गुरू ठरले होते. तर कुशवाह यांनी सिंहस्थाची धुरा यशस्वीपणे पेलत हा जागतिक इव्हेन्टविना दुर्घटना पार पाडला. पुऱवठा विभागाला शिस्त लावण्यासह अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांपर्यंत जाण्यास त्यांनी भाग पाडले. तसेच यशस्वीपणे दुष्काळा व लढा सुरू केला होता. परंतु, या दोघांचीही सव्वा वर्षाच्या काळातच नाशिकमधून बदली करण्यात आली आहे. कर्तबगार अधिकाऱ्यांची बदली करून सरकारने नाशिकचा विकास रोखण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिकचे पाणी पळविण्यासह विविध योजना पळवून नेणाऱ्या भाजप सरकारने आता नाशिकमधून कर्तबगार अधिकाऱ्यांची पळवापळवी करीत नाशिकवर अन्याय केल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहे. दरम्यान, डवले, कुशवाह हे उत्तम काम करीत असतांना त्यांच्या बदलीला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विरोध का केला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर या दोन्ही बदल्यांच्या विरोधात नाशिककर भूमिका घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली मायलेकींचा मृत्यू

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, सिडको

विल्होळी जकात नाक्याजवळील महापालिकेच्या खत प्रकल्पात घरातील चूल पेटविण्यासाठी सरपण गोळा करायला गेलेल्या मायलेकींच्या अंगावर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने दोघींना जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र गुरुवारी सकाळपर्यंत याबाबत कोणालाही माहिती नसल्याने वेळीच मदत न मिळाल्याने मायलेकींचा गुदमरुन मृत्यू झाला. गुरुवारी दोघींचे मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्यात आले. घडल्या प्रकारातून खत प्रकल्पातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विल्होळीच्या खत प्रकल्पात परिसरातील महिला व लहान मुले सरपण व भंगाराच्या शोधात येथे नेहमी येतात. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास कवटेवाडीतील काही महिला येथे आल्या. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सरपण गोळा करताना अचानक सुमारे ५० फूटांहून अधिक उंच असलेला कचऱ्याचा ढिगारा कोसळला. यात पूनम माळी (४०) व त्यांची मुलगी कोमल माळी (१०) या गाडल्या गेल्या. त्यांच्यासोबत असलेल्या महिला यातून बचावल्या. त्यांनी घाबरून तेथून पळ काढला. कवटेवाडीतील कामावर गेलेली पुरुष माणसे सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घडला प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा शोधाशोध सुरू झाली. कवटेवाडीतील नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, खत प्रकल्पावरही कोणी नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. अखेर नागरिकांनी शिवसेनेचे पदाधिकारी सुदाम डेमसे यांच्याशी गुरुवारी सकाळी संपर्क साधला. डेमसे यांनी तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली.

खत प्रकल्पावरील कचऱ्याचा ढिगारा कोसळलेल्या ठिकाणी ५० ते ७५ फूट उंच कचऱ्याचा ढिगारा होता. या ढिगाऱ्याला आग लागल्याने त्यातून धूरही येत होता. पोलिस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चार ते पाच तास जेसीबीच्या सहायाने ढिगारा उपसला. दुपारी चारच्या सुमारास पूनमचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. कोमल यांचा मृतदेह रात्री साडेआठच्या सुमारास हाती लागला.
ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडली आहे. प्रकल्पाला संरक्षक भिंत आणि सुरक्षारक्षकाची गरज आहे.

सुदाम डेमसे, शिवसेना पदाधिकारी



सिन्नरला कार व ट्रकच्या अपघातात चार ठार

सिन्नर : सिन्नर शिर्डी रस्त्यावर मिरगाव फाटयाजवळ इनोव्हा कार व ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने चारजणांचा मृत्यू झाला. ठार झालेल्यांमध्ये मुंबई व गुजरातच्या प्रवाशांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथून शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या इनोव्हा कारची सिन्नर येथे सिन्नरच्या दिशेने येत होता. रात्री एकच्या सुमारास ट्रकइनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली. यात दोन महिलासहजण जागीच ठार झाले. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये रेखाबेन लक्षमण भाई लखांनी (४०, रा. ठाणे), डायाभाई लाक्ष्मन् भाई बदानी (६१) , पुरीबेन डायाभाई बदानी (५५. दोघे रा. भावनगर, गुजरात), मुक्ता दिनेश लखानी (३८, रा. विलेपार्ले, ठाणे) यांचा समावेश आहे. इनोव्हा कारच्या एयरबॅगमुळे चालक संतोष कुमार गुप्ता बचावला. याबाबत वावी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images