Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पालेभाज्यांचे कडाडले दर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळा व वाढत्या तापमानाचा भाजीपाला आवकेवर परिणाम झाला असून, आवक घटली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सर्वच पालेभाज्यांचे दर ३० रुपये जुडी पलिकडे गेले असून फळभाज्यांचे दर ७० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मात्र, दर वाढल्याने भाजीपाला उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भाजीपाल्याचे दर कडाडल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. सर्वसामान्यांना तर हिरवा भाजीपाला घेणे दुरापास्त झाले आहे. शंभर रुपयात एक किंवा दोन भाज्या घेणे त्यांना परवडत नाही. त्यातच डाळींच्या‌ किमतीही कडाडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य कात्रीत सापडले आहेत. मेथी, को‌थिंबीर, शेपू, पालक, कांदापात या पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. गिलके, कारले, दोडके, गवार यांचे दर जैसे थे आहेत.

किलोचे दर कारले - ७० ते ८०, गिलके - ७० ते ८०, दोडके - ७० ते ८०, मिरची - ७० ते ८०, गवार - ६० ते ७०, वांगे - ४०, कोबी - १० ते १५, वर - २० ते २५, शेवगा - ५० ते ६०, कांदे - १५, बटाटे - २०, काकडी - ३०, टोमॅटो - १५ ते २०, मेथी - ३० ते ३५, कोथिंबीर - ४० ते ५०, शेपू - १५ ते ३५, पालक - १० कांदापात - २० ते ४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तर मैत्रेयची मालमत्ता एस्क्रोला जोडू

0
0

पोलिस आयुक्तांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेयकडून लवकरात लवकर एस्क्रो खात्यावर रक्कम वर्ग होणे अपेक्षित आहे मात्र, त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्यास मैत्रेयची सर्व मालमत्ता एस्क्रो खात्यास जोडण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, आर्थिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची रक्कम त्यांना परत मिळवून देण्यास पोलिसांचे प्राधान्य आहे. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना वठणीवर आणावे आणि अन्य कुणी असा गुन्हा करण्याची हिंमतच दाखवू नये असा आमचा प्रयत्न आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पोलिस प्रशासन काम करीत आहे. तसेच कंपनीबाबतच्या काही आक्षेपार्ह बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत. मैत्रेयकडून एस्क्रो खात्यात जमा झालेली रक्कम गुंतवणूकदारांना देण्यासाठी पोलिस प्रशासन पहिली यादी चार दिवसात कोर्टात सादर करेल. गुंतवणुकदारांचा प्राधान्यक्रम ठरविताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही यादी सादर करता आली नव्हती. ज्या ज्या तक्रारी नाशिक पोलिसांकडे दाखल होतीत त्या सर्वांना त्यांची रक्कम मिळवून देण्यास आमचे प्राधान्य आहे. यादी सादर झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने एस्क्रो खात्यातून गुंतवणूकदारांना धनादेश देऊन किंवा थेट त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये कायदेशीर अडचण नसल्याचे पोलिस प्रशासनाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

तक्रार दाखल करणाऱ्यांसह कंपनीने फसवणूक केलेल्या देशभरातील सर्वच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे हा आमचा उद्देश आहे. कंपनीने कोर्टात सादर केलेले आराखडे भुलभुलैय्या असल्याचे निदर्शनास येताच त्यावर आक्षेप घेण्यात आला. आगामी काळात कंपनीने रक्कम भरण्यास टाळाटाळ केलीच तर कोर्टाची परवानगी घेऊन त्यांची मालमत्ता एस्क्रो खात्यास जोडण्याची तयारी पोलिस प्रशासनाने ठेवली आहे. यामुळे कोणत्याही स्थितीत गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवून देणे हाच उद्देश प्रशासनाने समोर असल्याची माहिती जगन्नाथन यांनी दिली.

पश्चिम बंगालचे खाते एस्क्रोच!

पश्चिम बंगालच्या पोलिस प्रशासनाने अशाच प्रकारे गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पिअर्लेस कंपनीवर कारवाई केली आहे. आठवडाभरापूर्वी त्यांनी दैनिकांमध्ये देशभर जाहिराती देऊन गुंतवणूकदारांना पैसे घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. त्या पोलिसांनी एस्क्रो खाते तयार केले असून, त्याद्वारे गुंतवणुकदारांना थेट धनादेश दिले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे फोडणार स्थायीतील कोंडी

0
0

अभ्यासू नगरसेवकांसाठी आखली रणनीती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीत एकटे पडलेले सभापती सलीम शेख यांची विरोधकांकडून होणारी कोंडी फोडण्यासाठी मनसेने रणनीती तयार केली आहे. स्थायीतल्या 'मनसे' शांत राहणाऱ्या सदस्यांचे राजीनामे घेवून त्यांच्या जागेवर अभ्यासू व बोलक्या नगरसेवकांची वर्णी लावली जाणार आहे. त्यामुळे स्थायीमध्ये युतीच्या नगरसेवकांकडून होणारी कोंडी फुटेल, अशी अपेक्षा आहे. सभागृहनेतेपदी निवड झालेल्या सुरेखा भोसलेंच्या राजीनाम्यानंतर उर्वरीत दोन सदस्यांवर राजीनामे देण्यासाठी पक्षाने दबाव वाढवला आहे.

स्थायी समितीत महाआघाडीचे बहुमत असले, तरी युतीच्या नगरसेवकांकडून प्रत्येक सभेत सभापतींची कोंडी केली जात आहे. भाजपचे दिनकर पाटील आणि आरपीआयचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्याकडून कायद्यावर बोट ठेवून मनसेच्या कामाला लगाम लावला जात आहे. सभापती सलीम शेख यांना सभा चालवू दिली जात नसून, कधी जादा विषय, तर कधी प्रशासनाच्या विषयांवरून सभापतींना निर्णय फिरवावे लागत आहेत. गेल्या वेळेस जादा विषय नसतानाही सभापतींनी जादा विषय मंजूर केल्याचे सांगितल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. सभापतींना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली होती तर गुरूवारच्या सभेत पाटील आणि लोंढेच सभेला निंयत्रित करीत असल्याचे चित्र होते. मनसेचे पाच सदस्य असले, तरी सभेत ते तोंडावर बोट ठेवण्याचीच भूमिका बजावतात. गेल्या वेळस राष्ट्रवादीच्या सभापतींना मार्गदर्शन करणारे यशवंत निकुळेही शांत असतात. अशोक सातभाई काही अंशी प्रतिकार करतात. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या सदस्यांचेही तोंडावर बोट असल्याने सलीम शेख एकांगी किल्ला लढवतात. परंतु हा प्रतिकार पुरेसा ठरत नसून, विरोधक कायद्यावर बोट ठेवून सभापतींची कोंडी करतात. त्यामुळे मनसेने या सदस्यांना आवरण्यासह सभापतींना कव्हर करण्यासाठी नवे अभ्यासू सदस्य स्थायीत आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सुरेखा भोसले यांनी अगोदरच राजीनामा दिला आहे. त्यामुळे आणखी दोन सदस्यांचे राजीनामे घेवून त्यांच्या जागेवर तीन सदस्यांची नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. त्यात डॉ. विशाल घोलप यांच्यासह काही अनुभवी नगरसेवकांचा समावेश असणार आहे. या नव्या सदस्यांद्वारे थेट विरोधकांना आव्हान दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यमान दोन नगरसेवकांवर राजीनामे देण्यासाठी पक्षाने दबाव वाढविला आहे. मनसेचे संपर्क नेते अविनाश अभ्यंकर हे पुढील आठवड्यात नाशिकच्या दौ-यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत राजीनामे घेवून नव्या सदस्यांच्या नावाचीही शिफारसही केली जाणार आहे. त्यामुळे स्थायीतील विरोधकांचा दबाव काही अंशी कमी होवून सभापतींचीही दबावातून सुटका होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरोप समारंभाला आयुक्तच गैरहजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल ३५ ते ४० वर्ष कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यासही पोलिस आयुक्तांना वेळ मिळाला नाही. आयुक्तांसह अन्य काही अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त असल्याने एका सहायक पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला. आयुक्तांच्या प्रतिक्षेत काही तास घालविणाऱ्या पोलिस कुटुंबीयांची यामुळे घोर निराशा झाली.

पोलिस दलात अनेक वर्ष सेवा करून काही कर्मचारी शनिवारी ३० एप्रिलला निवृत्त झाले. त्यांना निरोप देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची वेळ टळून बराच वेळ झाला तरीही पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन आणि अन्य काही सहकारी अधिकाऱ्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचता आले नाही. आयुक्तांची प्रतीक्षा करून पोलिस कुटुंबीय कंटाळले. मात्र, बैठकांमध्ये व्यस्त असलेल्या आयुक्तांना कार्यक्रमाकडे फिरकण्यास वेळ मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे आणि पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी कार्यक्रमाची सूत्रे हातात घेतली. या दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच निवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विद्यापीठ धुळ्यातच होईल

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कृषी विद्यापीठासाठी पाच हजार एकर जमिनीची आवश्यकता असून ती जागा द्यायला जळगावचे शेतकरी तयार नाही. अशा परिस्थितीत धुळ्यातच हे विद्यापीठ व्हावे यासाठी मी सरकारकडे सकारात्मक पाठपुरावा करेल, असे आश्वासन राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.

ना. खडसे जिल्ह्यात तीन नवीन स्वतंत्र तहसील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी कृषी विद्यापीठ कृती समितीची सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी खडसे यांनी कृषी विद्यापीठ संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी खडसे म्हणाले, खान्देशचे नेतृत्व करताना कधीही विकासाच्या बाबतीत भेदभाव केला नाही. बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अनिल गोटे, माजी आमदार प्रा. शरद पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकुलचे काम न करण्यासाठी राजकीय दबाव’

0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

घरकूल योजनेचे काम सुरू न करण्याबाबत राजकीय दबाबतंत्राचा वापर संबंधितांकडून केला जात असल्याने याबाबत खान्देश बिल्डर्सने पाच दिवसांत उत्तर देण्याची सूचना केली होती तरी देखील खान्देश बिल्डर्सकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते, अशी माहिती जळगाव नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी दिली.

घरकूल प्रकरणी सोमवारी, धुळे जिल्हा विशेष न्यायालयात कामकाज झाले. यावेळी धनंजय जावळीकर यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. ते पुढे म्हणाले की, माझ्या कार्यकाळात झालेल्या निवडणुकीत जळगाव शहर विकास आघाडीचे नगरसेवक सर्वाधिक संख्येने निवडून आले असताना नगराध्यक्ष मात्र, भाजपचा झाला होता. त्यानंतर नगरपालिकेकडून खान्देश बिल्डर्सला घरकूल योजनेचे काम सुरू करण्याबाबत देण्यात आलेल्या पत्राची जावळीकर यांनी माहिती दिली.

१९ मार्च २००२ रोजी, नगराध्यक्ष के. डी. पाटील यांनीही खान्देश बिल्डर्सला काम सुरू करण्‍याबाबतचे पत्र दिले होते. २७ मार्च २००२ रोजी, मुख्याधिकारी म्हणून आपण स्वत: पुन्हा खान्देश बिल्डर्सला पत्र देवून काम सुरू करण्याची सूचना केली. या पत्रात आपण खान्देश बिल्डर्सकडे पडून असलेल्या सात कोटी ५१ लाखांचा निधी पडून असल्याने नगरपालिकेचे आर्थिक नुकसान तर होत होते. तसेच लाभार्थी लाभापासून वंचित राहत असल्याने सामाजिक नुकसानही होत असल्याचा उल्लेख केला होता. यावेळी हुडकोने योजनेसाठी मंजूर केलेल्या कर्जापैकी २० कोटीची रक्कम येणे बाकी होती. ती रक्कम व खान्देश बिल्डर्सकडे पडून असलेल्या रकमेतून योजनेचे काम पूर्ण होवू शकले असते तरीही खान्देश बिल्डर्सकडून काम सुरू न झाल्याने ८ एप्रिल २००२ रोजी पुन्हा खान्देश बिल्डर्सला पत्र देवून त्याची माहिती नगरपालिका संचालनालय आणि जिल्हाधिकरी यांनाही दिली होती. काम सुरू न करण्याबाबत राजकीय दबाब तंत्राचा वापर संबंधितांकडून केला जात असल्याने याबाबत खान्देश बिल्डर्सने पाच दिवसांत उत्तर द्यावे अशी सूचना पत्रत केली होती. तरी देखील खान्देश बिल्डर्सकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. घरकुल योजनेबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर आपण खुलासा केला. त्यानंतर सरकारने आपल्याला कारणे दाखवा नोटीस मिळाली. त्याचे उत्तर मी दिले मात्र त्यावर नंतर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी माहिती जावळीकर यांनी दिली. आजपासून त्यांची उलटतपासणी होण्याची शक्यता आहे. या कामकाजाच्या वेळी विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. प्रवीण चव्हाण व आरोपींचे वकील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महसूल सेवा ऑनलाइन करणार’

0
0

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शेतकऱ्यांना आता सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. याचबरोबर तहसील कार्यालयातून मिळणारे विविध दाखले कार्यालयात न जाता हे घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली असून सर्व प्रकारच्या महसुली सेवा, दाखले, उतारे हे ऑनलाइन प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी धुळे शहराच्या अपर तहसील कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी दिली.

महसूल मंत्री खडसे म्हणाले, राज्य सरकारने लोकसंख्या व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून नवीन अपर तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. नागरिकांना वेळोवेळी तातडीने लागणारे दाखले मिळविण्यासाठी करावी लागणारी पायपीट, लागणारा वेळ व खर्च या सर्व गोष्टी यामुळे संपुष्टात येणार आहे. महसूल प्रशासनास अधिक बळकट करण्यासाठी नवीन ३२०० सज्जांची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. यापूर्वी १९८३ मध्ये ही निर्मिती झाली होती त्यानंतर सज्जांची निर्मितीचा निर्णयदेखील मंत्रिमंडळाने घेतल्याचेही खडसे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा सरला पाटील, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अनिल गोटे, आमदार जयकुमार रावल, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ, पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, तहसीलदार दत्ता शेजुळ आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् १३ वर्षांचा विद्यार्थी सापडला

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इयत्ता सातवीच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले म्हणून आई रागवली आणि त्याने घरच सोडले अन् आई-वड‌िलांच्या पायाखालची वाळू सरकली. पालकांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी देखील कसोशीने तपास करीत मुलाला मंगळवारी घरी आणले. त्याच्या घरी परत येण्याचा आनंद सगळ्यांना झाला. मात्र, परीक्षा, मार्क्स, मुलांचे वागणे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चत आले.

नाशिकरोड परिसरातील नारायणबापुनगर येथे आपल्या आई-वड‌िलांसोबत राहणारा १३ वर्षाचा विद्यार्थी नुकताच इयत्ता सातवीत उत्तीर्ण झाला. मात्र, त्याला कमी गुण मिळाले. यामुळे आईचे बोलणेही त्याला बसले. याचा राग आलेल्या मुलाने मात्र सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घर सोडले. आपल्या मित्रांसमवेत खेळत असेल या विचारात असलेल्या आई-वड‌िलांनी दुपारनंतर त्याची शोधा-शोध सुरू केली. सर्वत्र चौकशी करूनही थांगपत्ता मिळत नसल्याने अखेर त्यांनी उपनगर पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, तो आढळून आला नाही. बेपत्ता विद्यार्थी रेल्वेने गेला नसल्याचे स्पष्ट झाल्याने उपनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, क्राईम ब्रँचच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी इतरत्र तपास सुरू केला. आज, मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास पोलिस गस्तीवर असताना त्यांना दत्तमंदिर सिग्नल येथील मंदिरात एक अल्पवयीन मुलगा झोपला असल्याची माहिती समजली. त्यानुसार पोलिसांनी तेथे पोहचून हा आपण शोधत असलेला मुलगाच असल्याची खात्री केली. आईवडीलांना पाचारण करून त्याचा ताबा त्यांना देण्यात आला. या घटनेत सर्वकाही सुरळीत पार पडले. नशीब बलवत्तर होते म्हणून तो मुलगा आज पुन्हा कुटुंबीयांमध्ये दाखल झाला. मात्र, या घटनेमुळे परीक्षा, कमी किंवा जास्त मार्क्स, मुलांची मानसिकता असे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी साठवण क्षमतेत झाली वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात आतापर्यंत ४१९ तलावांमधील २३ लाख १० हजार ४२६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व तलाव आणि बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता २२ लाख ९ हजार घनम‌ीटरने वाढली आहे. लोकसहभागातूनच ही कामे करण्यात आली आहेत.

सरकारने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात गाळा काढणे, नाले, ओहळ रुंदीकरण, नदी रुंद आणि खोलीकरणाची कामे सुरू आहेत. परंतु, प्रत्येक ठिकाणी सरकारला काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनीच स्वत: यात सहभागी होत आपल्या गावाची सिंचनाची क्षमता वाढवित दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १४ तालुक्यांत ४१९ तलावांमधील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविली आहे. त्यासाठी सरकारकडून काही ठिकाणी जेसीबी, पोकलेनसह इतर मशिनरीज दिली जाते. तर काही ठिकाणी नागरिकच ती उभी करतात. त्याला सरकारकडून इंधनाचा पुरवठा केला जातो.

६ हजार ४० नागरिकांनी केले श्रमदान

जिल्ह्यात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामांमध्ये ६ हजार ४० नागरिकांनी स्वत: सहभागी होत श्रमदान केले. त्यात येवल्यानेच आघाडी घेतली असून, १८८१ जनांनी सहभाग नोंदविला आहे. तर चांदवडमध्ये १३४९ आणि नांदगावमध्ये ८९३ नागरिकांनीच गाळ काढला. जलयुक्त शिवारच्या कामांसाठी आवश्यक निधी सरकारकडून मिळण्याची वाट न पाहाता ही लोकचळवळ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आर्ट ऑफ लिव्हींगच्या पुढाकाराने गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. तब्बल १५ कोटी २९ लाख, २९ हजार ९९६ रुपयांचा निधी उभा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी महामंडळातही बदल्यांची लाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांपाठोपाठ राज्य मार्ग परिवहन महामंडळातही मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आले आहे. प्रादेशिक व्यवस्थापक मिलींद बंड यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांच्या वर्ष सव्वा वर्षात तर काहींच्या पाच सहा महिन्यांतच बदल्या झाल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा काळात प्रवासी वाहतुकीच्या नियोजनाची धुरा बंड यांच्यावर सोपविण्यात आली होती. याखेरीज अनेक सक्षम अधिकाऱ्यांची फौज बंड यांच्या सोबतीला होती. सिंहस्थाच्या मुख्य पर्वण्या पार पडल्यानंतर या अधिकाऱ्यांनी विभागातील कामकाजात आलेली मरगळ झटकण्यास सुरुवात केली.

मिलींद बंड यांची अवघ्या सव्वा वर्षांतच अमरावती विभागात त्याच पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई प्रदेशचे प्रादेशिक व्यवस्थापक रा. अ. तोरो यांची नियुक्ती करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जळगाव येथील विभाग नियंत्रक राजीव साळवे यांची उस्मानाबाद येथे त्याच पदावर बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे विभाग नियंत्रक रा. आ. देवरे यांची रायगड विभागात बदली करण्यात आली असून त्याजागी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातील सु. च. पंचभाई यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसील कार्यालयाचे लवकरच स्थलांतर!

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नऊ कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयानंतर प्रांताधिकारी कार्यालयाचे स्थलांतरीत झाले. लवकरच सेतू, तहसीलदार कार्यालय स्थलांतर होण्याच्या मार्गावर आहे. स्थलांतराला कळवणकरांचा विरोध असतांना एक-एक करीत कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थलांतराला विरोध दर्शविणारे आमदार जे. पी. गावीत आणि प्रांत डी. गंगाथरण यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

नागरिकांची गैरसोय टाळावी म्हणून तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी शहरापासून ५ किलोमीटर अंतरावरील कोल्हापूर फाटा येथे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच या इमारतीच्या बांधकामाला कळवणकरांनी तीव्र विरोध केला आहे. शहरातच मोठ्या प्रमाणात शासकीय जागा उपलब्ध असताना ५ किलोमीटर अंतरावर ही इमारत उभी करण्याच्या आग्रह का धरला गेला? या एकमेव मुद्द्यावरून ए. टी. पवारांनाही विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
तब्बल दोन वर्षाचा कालावधी लोटला तरीही उद‌्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतीत कार्यालयांचे स्थलांतर होऊ नये म्हणून विविध राजकीय पदाधिकारी, नागरिक, व्यापारी बांधव प्रयत्नशील होते. मात्र, या विरोधाला झुगारत सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डी. गंगाथरण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीत फेब्रुवारी महिन्यात सर्वप्रथम एकात्मिक आदिवासी विकास विभाग स्थलांतरीत झाला असून आता प्रांताधिकारी कार्यालय व लवकरच सेतू, तहसीलदार कार्यालय स्थलांतर होण्याच्या मार्गावर आहे.


या इमारतीच्या बांधकामाच्या विरोधाची तीव्रता इतकी होती की, तब्बल चाळीस वर्ष कळवण विधानसभा मतदार संघावर अधिराज्य गाजविणारे तत्कालीन आमदार ए. टी. पवार यांनाही व्यापारीवर्गाच्या रोषापुढे पराभूत व्हावे लागले. जे. पी. गावित यांनी ए. टी. पवारांविरोधात मिळालेल्या आयत्या संधीचे सोने केले. 'या इमारतीत एकही कार्यालय जाऊ देणार नाही', अशी ग्वाही देत गावीतांनी आमदारकी मिळविली. मात्र, आता तेच आमदार गावीत एकापाठोपाठ कार्यालयांचे स्थलांतर होत असतांनाही मौन बाळगून आहेत. शहरात भाडे तत्त्वावरील इमारतीत सुरू असलेली सरकारी कार्यालये सन् २०१६ पासून या मध्यवर्ती प्रशाकीय इमारतीत जातील असा संकेत प्रशासनाकडून मिळत होता. त्यास दोन वेळा कळवण बंदने कडाडून विरोध झाला. प्रांतांच्या भूमिकेस काळ्या फिती अर्पण करीत विरोध दर्शविण्यात आला. मात्र, तरीही स्थलांतर सुरू झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिणलेल्या मस्तकी लाभली चंदनाची उटी

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

धन्य धन्य निवृत्तीदेवा । काय महिमा वर्णवा ।। शिवावतार तुचि धरून। केले त्रैलेक्य पावन ।। समाधी ञ्यंबक शिखरी। मागे शोभे ब्रम्हगीरी।। निवृत्तीनाथांच्या चरणे चरणी । शरण एका जनार्दन ।।

असे गुणगान गात हजारो वारकरी मंगळवारी त्र्यंबकनगरीत नाथांच्या चरणी लीन झाले. संसार तापाने शिणलेल्या मस्तकी नाथांचा स्पर्श झालेली चंदानाची उटी लावूनी कृतार्थ झाले. मंगळवारी चैत्र वद्य एकादशीस संत निवृत्तीनाथांच्या संजिवन समाधीस दाहक उन्हाळा शितल व्हावा म्हणून चंदनाचा लेप म्हणजेच उटी लावण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. सभामंडपात उपस्थ‌ित वारकरी उटी सोहळा अनुभवत भजनात तल्लीन झाले होते.

मंगळवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा हरीनामाच्या गजरात संपन्न झाला. सभामंडपात सुरेशमहाराज गोसावी यांनी अभंग सेवा सादर केली. दुपारी दोन वाजता दर्शनरांग थांबवून संत निवृत्तीनाथांच्या समाधीस चंदनाची उटी लावण्यात आली. याप्रसंगी समाधी मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, विश्वस्त पुंडल‌िकराव थेटे, जयंत महाराज गोसावी, पंडीत महाराज कोल्हे, जिजाबाई लांडे, रामभाऊ मुळाणे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, त्र्यंबकबाबा भगत, भानुदास गोसावी, योगेश गोसावी तसेच नित्यसेवेकरी भाविक उपस्थीत होते.

त्र्यंबकेवर येथे दशमी पासूनच भाविकांची मांदियाळी अनुभवास आली आहे. चैत्र वद्य दशमीच्या सायंकाळपासून शहरात भाविकांचा ओघ सुरू झाला होता. मंदिर आणि परिसरात पेंडाल टाकून भजन कीर्तनात भविक दंग झाले होते. एकादशीला पहाटे पासूनच तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी रिघ लागली होती. टाळ मृदुंग भगव्या पताका यांनी पौष वारीच्या आठवणींना उजाळा देत यात्रा पटांगणासह संपूर्ण शहर वारकऱ्यांनी गजबजले होते. भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरात देखील वारकरी भाविकांची गर्दी झाली होती. गत काही वर्षांपासून पायी येणारे वारकरी संख्या वाढीस लागली असून नाशिक त्र्यंबक रस्त्यावर भगव्या पताकांची रिघ लागली होती. याच बरोबर जव्हार, मोखाडा, ठाणे परिसरातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेस आले होते.

उटीसाठी असलेले चंदन काही भाविक स्वत: घेऊन येत असतात. उटी लावून झाल्यावर दर्शन रांग सुरू करण्यात आली. भाविक रात्री साडेअकरा वाजेपर्यंत दर्शनासाठी रांगा लवून होते. विधीवत पुजनाने उटी उतरव‌िण्यात आली आणि भाविकांना ती प्रसाद म्हणून देण्यात आली.

बससेवा फायद्यात

मंगळवारी उटीच्या वारीस बस महामंडळास फायदा झाला आहे. सायंकाळपर्यंत १०० फेऱ्या झाल्या होत्या. बस वाहतूक भरभरून वाहत होती. सायंकाळनंतर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली होती.

सव्वाशे वर्षांच्या परंपरेने श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजिवन समाधीस चंदनाचा उटी लावण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळाचे संकट टळावे, अशी प्रार्थना केली.

- त्र्यंबकराव गायकवाड, अध्यक्ष, संस्थान ट्रस्ट

सर्व विश्वस्त मिळून वारकरी भाविकांसाठी सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून प्रयत्न करीत आहोत. सुमारे ५० कोटींचा मंदिर आराखडा प्रत्यक्षात आणणे हेच आता सर्वांचे स्वप्न आहे.

- जिजाबाई लांडे, विश्वस्त, संस्थान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मिन‌िटांत सप्तशृंगीचे दर्शन

0
0

फ्युनिक्युलर ट्रॉलीची चाचणी सुरू; भा‌िवकांसाठी गडावर लवकरच सुविधा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना फ्युनिक्युलर ट्रॉलीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार असून अवघ्या तीन मिनिटांत भक्तांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

गडावर दर्शनासाठी पायऱ्यांशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याने भाविकांचे हाल होत होते. तसेच यात्रोत्सवात पायऱ्यांवर खूपच गर्दी होत होती. मात्र, आता ट्रॉलीची सुविधा उपलब्ध झाल्याने भाविकांना दर्शन घेणे सुलभ होणार आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे. या टॉलीत छोटी वातानुकुलीत बोगी असणार आहे. त्यात ६० व्यक्ती एकाचवेळी ये-जा करू शकतील. या प्रकल्पास नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित अथवा वित्त हानी होऊ नये म्हणून अगोदरच डोंगरावर दरड प्रतिबंधात्मक जाळी बसविण्यात आली आहे.


जमिनीपासून ४ ते १५ मित्र उंचीवरून जाणारा २५० मी. लांबीचा मार्ग खालचे स्टेशन, वरचे स्टेशन, उपहारगृह, वाहनांसाठी पार्किंग, व्यवस्था, स्वागत कक्ष, स्वच्छतागृह, निवास व्यवस्था, पूजा साहित्याची दुकाने आदी सुविधा उपलब्ध आहेत. ज्या ट्रॅकवर बोगी धावणार आहे, त्याच्यावरील भागास ट्रॉलीच्या बाजूस लोखंडी पोल उभे करून शेड उभारण्यात येणार आहे. जेणे करून पावसापासून तसेच कोसळणाऱ्या दरडीपासून भाविकाच्या जीवितास धोका पोहोचणार नाही. गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. सुरुवातीस या प्रकल्पाची किंमत साधारणपणे ४१ कोटी इतकी होती. परंतु, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ८५ कोटी खर्च अपेक्षित आहे. या ट्रॉलीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प भाविकांसाठी सुरू करण्यात येईल, अशी माहिती सुयोग गुरुबक्षाणी प्रा. लि. या कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुम्बा यांनी दिली.

भाविकांना फायदेशीर

गडावर चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवासह वर्षभरात १० ते १५ लाखांवर भाविक दर्शनासाठी येत असतात. देवीचे मंदिर १०० मीटर उंचीवर डोंगराच्या कुशीत असून ५०० पायऱ्या चढून भाविक दर्शन घेत असतात. अपंग, अंध व वयोवृद्धांसाठी डोलीचा पर्याय उपलब्ध असून त्यासाठी ८०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात.

तासाभरात १२०० भाविकांची ने-आण

या प्रकल्पात प्रवाशी क्षमता ६० असून एका तसात १२०० प्रवासी मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. सिस्टीम १.० ते १.५ मी. रुंदीच्या रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या ट्रेन सारखी आहे. सिस्टीम मध्ये सलोह काँक्रिट स्तंभ, स्तंभावरील रूळ, रूळावरील २ ट्रॉलीज अशी तांत्रिक यंत्रणा आहे. ही सिस्टीम स्वित्झर्लंड, फ्रान्स या देशात ६३१ ठिकाणी कार्यरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयमा निवडणुकीकडे उद्योजकांचे लागले लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

अंबड औद्योगिक वसाहतीतील अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)ची निवडणूक या महिन्यात होणार असून, ही निवडणूक बिनविरोध होणार की, यातील लढती रंगणार याकडे उद्योजक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी आयमाच्या एका वास्तूमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीबाबतही उत्सुकता दिसून येत आहे.
शहरातील अंबड व सातपूर या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योजकांच्या विविध संघटना आहेत. त्यातील अंबडमधील उद्योजकांची आयमा ही संघटना असून, अंबडमधील सुमारे पंधराशेहून अधिक उद्योजक या संघटनेचे सभासद आहेत. आयमाच्या माध्यमातून उद्योजक सभासदांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू असते. सध्या तरी अंबड औद्योगिक वसाहतीतील अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्यातील मुख्य म्हणजे औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे व अग्निशमन केंद्र उभारणे हे दोन मुद्दे वारंवार चर्चेत येत असतात. मात्र, अद्यापपर्यंत या प्रश्न सोडविण्यात कोणालाही यश आलेले नाही.
सध्या असलेल्या कार्यकारिणीच्या विरोधात उद्योजक तुषार चव्हाण यांनी गतवर्षी निवडणूक रिंगणात प्रवेश केला होता. या वेळी आयमाच्या एका वास्तूचा वाद थेट न्यायालयात गेल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला होता. यंदा मात्र उद्योजकांमध्ये काही तडजोडी होऊन पदांचे वाटप होते, की निवडणूक प्रक्रिया राबविली जाते, याकडे सर्वच उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कुटुंबांना ‘सीटू’चा मदतीचा हात

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

विविध कारणांनी आत्महत्या करणाऱ्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 'सीटू'ने कामगारदिनी मदतीचा हात दिला आहे. सीटू कामगार भवनात झालेल्या कार्यक्रमात कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते सिन्नर तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना धनादेशांचे वाटप करण्यात आले.

केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर टीका करताना डॉ. कराड म्हणाले की, शेतकरी आत्महत्या करीत असताना भाजपचे मंत्री केवळ सांत्वनच करताना दिसतात. परंतु, ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष निघून गेला आहे, अशा कुटुंबीयांना सरकार कर्जमाफी का देत नाही? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वेळ पडल्यास आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाण्यासाठी एक लाख

मराठवाड्यातील मोहा गावात पाणी अडवा, पाणी जिरवा या उपक्रमासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत 'सीटू'तर्फे सरपंच अनिल बुरांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. धनादेश स्वीकारल्यानंतर सरपंच बुरांडे यांनी मराठवाड्यातील जगण्याची दाहकता उपस्थितांसमोर विशद केली. यात केवळ हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ मराठवाड्यातील महिलांवर आली असल्याचे त्यांनी अनेक गावांची उदाहरणे देऊन सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोम्बिंग ऑपरेशनने टवाळखोरांना आळा

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परिमंडळ दोनमधील अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प या पोलिस स्टेशन हद्दीत मंगळवारी सायंकाळी ७ वाजेनंतर कोम्बिंग ऑपरेशनअंतर्गत गुन्हेगारांची तपासणी, नाकाबंदी, वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासाठी पोलिस मुख्यालयातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील राजरत्ननगर आणि लेखानगर, सातपूर परिसरातील प्रबुद्धनगर आणि संतोषी मातानगर, इंदिरानगर पोलिस स्टेशनअतंर्गत वडाळागाव येथे तर उपनगरच्या रोकडोबावाडी आणि भालेराव मळा, श्रमीकनगर आणि एकलहरे परिसर तसेच देवळाली कॅम्प येथील संसारी नाका व रेल्वे स्टेशन परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरल्याने टवाळखोरांनाही आळा बसला. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

लाखाची पोत खेचली

लग्नावरून घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे सव्वालाख रुपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरील भामट्यांनी तोडून नेल्याचा प्रकार पंचवटी परिसरात घडला. पिंपळगाव बहुला येथील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या शारदा अरविंद जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. जाधव दाम्पत्य रविवारी औरंगाबाद नाका भागात विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह आटोपून आपल्या वाहनाकडे जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळ्याची सुमारे सव्वालाख रूपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भद्रकालीत घरफोडी

भद्रकालीतील काळेनगर भागात घरफोडून चोरट्यांनी रोख रक्कम तसेच सोन्याचांदीचे दागिने असा ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. प्रमोद संजय डगळे कुटुंबीय रविवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कपाटातील २२ हजार रूपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा ६० हजार रूपयांचा ऐवज पळविला.

रोहित्राच्या पट्यांची चोरी

वीज कंपनीच्या रोहित्राच्या पट्यांची चोरी केल्याने सातपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. किसन दशरथ खोकले व भिमा बाळू खोरले, अशी संशयीतांची नावे आहेत. अकोला तालुक्यातील पाचपट्टा येथे राहणारे हे दोघे बेळगाव ढगा येथील रोहित्रातील सुमारे ५० हजाराच्या कॉपरच्या पट्या काढताना मिळून आले होते. सहाय्यक अभियंता किशोर सरनाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांना पोलिसांनी अटक केली.



मेड‌िकल मालकास लुटले

मेडिकल स्टोअर बंद करून घराकडे परतणाऱ्या व्यावसायिकास रस्त्यात अडवून चौघांनी लुटल्याची घटना म्हसरूळ परिसरातील वाढणे कॉलनी परिसरात घडली. आरोपींने बेदम मारहाण केल्याने व्यावसायिक जखमी झाले असून, हा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री ११ ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ परिसरातील वाढणे कॉलनीतील रो हाऊसमध्ये राहणाऱ्या अनिलदत्त एकनाथ म्हसाणे (४०) यांचे याच परिसरात मेडिकल आहे. सोमवारी रात्री काम आटोपल्यानंतर दुकान बंद करून म्हसाणे घराकडे परतत होते. यावेळी त्यांच्याकडे चार हजार रूपये रोख आणि मोबाइल असा ऐवज होता. म्हसाणे वाढणे कॉलनी परिसरातील कृष्ण मंगल कार्यालयाच्या रस्त्याने पायी जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या चौघाजणांनी त्यांना घेरले. आरोपींनी थेट शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरूवात केली. त्यांच्यातील एकाने आपल्याकडील धारदार चाकुने म्हसाणे यांच्या पाठीवर चाकुने हल्ला केला. या झटापटीत आरोपींनी त्यांच्या खिशातील पैसे व मोबाइल असा ऐवज काढून घेतला. चाकू हल्ल्याने जखमी झालेल्या म्हसाणे यांना तिथेच सोडून संशयितांनी पळ काढला. म्हसाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून संशयिताचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खातेदारांची परवड थांबणार

0
0

महाराष्ट्र बँकेच्या उपनगर शाखेत पासबुक प्रिंटिंग मशीन व आधार कार्ड कॅश मशीन सुविधा

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर येथील महाराष्ट्र बँकेचे कार्यालय छोट्या जागेत असल्याने आणि कर्मचारीसंख्या अपुरी असल्याने त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक आणि अन्य खातेदारांनी केली आहे. त्यावर खातेदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी नवीन पासबुक प्रिंटिंग मशीन आणि आधार कार्ड कॅश मशीन मागविण्यात आले आहे. नवीन कार्यालयाचाही शोध सुरू असून, त्यामुळे ज्येष्ठ खातेदारांची परवड थांबणार असल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.
उपनगर येथे १९७७ मध्ये महाराष्ट्र बँकेची शाखा सुरू झाली. सध्याच्या जागेत सुमारे वीस वर्षांपूर्वी स्थलांतर झाले. सध्याची शाखा ही बंगलावजा दुमजली जागेत आहे. तीन वर्षांपूर्वी तर फक्त वरचा छोटा मजलाच कार्यालय म्हणून अस्तित्वात होता. तेथे उभे राहण्यासाठीही जागा कमी पडत असल्याने तळमजल्याची खोली घेण्यात आली. तेथे २५ हजारांपर्यंतचे रोखीचे, तर वरच्या मजल्यावर २५हजारांपुढील व्यवहार होतात.
बँकेच्या सूत्रांनी सांगितले की, कॅश काउंटरवरील गर्दी कमी करण्यासाठी बँकेत आधार कार्ड मशीन बसविण्यात आले आहे. आधार कार्डचा नंबर संबंधित व्यक्तीला सांगून मशीनवर थम्ब इम्प्रेशन करायचे. मग हवी तेवढी रोख रक्कम लगेच दिली जाते. असे आणखी एक मशीन आणि स्टाफ मागविला जाणार आहे. पासबुक प्रिंटिंगसाठीदेखील बराच वेळ लागतो. त्यामुळे पासबुक प्रिंटिंग मशीन घेतले जाणार आहे. खातेदारांनी स्वतःच ते ऑपरेट करून त्या आधारे पासबुक भरून घ्यायचे आहे.

नवीन जागेचा सुरू आहे शोध

सध्याच्या उपनगर येथील शाखेच्या परिसरातच नवीन कार्यालयाच्या जागेचा शोध दोन वर्षांपासून सुरू आहे. नवीन प्रशस्त जागा मिळाल्यावर ग्राहकांचा त्रास बऱ्याचअंशी कमी होईल, अशी माहिती बँकेने दिली. जागा कमी असल्यामुळे मनुष्यबळाचा प्रभावी वापर करता येत नाही आणि त्यामुळे ग्राहकांना ताटकळावे लागते, असे बँकेने सांगितले.


कामकाजाचा लोड वाढला

या शाखेत सुमारे 25 हजार खाती आहेत. त्यात पाच हजार निवृत्तिवेतनधारकांचा समावेश आहे. त्यामुळे येथे ज्येष्ठांची कायम गर्दी असते. बँकेत चार क्लर्क, तीन अधिकारी आणि दोन शिपाई आहेत. हे मनुष्यबळ या खातेदारांच्या तुलनेत तोकडे पडते. एखादा कर्मचारी रजेवर गेला, तर ग्राहकांना प्रमाणापेक्षा जास्त वेळ उभे राहावे लागते किंवा चकरा माराव्या लागतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्त भाजीपाला भागवतोय निराधारांचे पोट

0
0

फणिंद्र मंडलिक

शहराच्या वेगवेगळ्या भागात सातत्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला जप्त केला जातो. हा भाजीपाला फेकून न देता अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तो आधाराश्रमाला देऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल सातत्याने ओरड केली जाते; पण त्याच अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जप्त केलेला भाजीपाला आधाराश्रमाला देण्याचे काम महिन्यातून अनेकदा होत असते. महापालिकेच्या सहाही विभागांत रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजीपाला जप्त करण्यात येतो. जप्त झालेला माल कुठे ठेवायचा हा प्रश्न सातत्याने असतो. जप्त केलेला भाजीपाला गोडावूनमध्ये ठेवल्यास सडून जातो. हा भाजीपाला गरजवंताला मिळाल्यास त्याचा फायदा होईल, या विचाराने अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तो अशोकस्तंभावरील आधारआश्रमाला देण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरात सहा विभागांतील कर्मचारी महिन्यातून दोनदा तरी हा भाजीपाला आधाराश्रमाला देत आहेत. आधाराश्रमात ० ते १२ वयोगटातील १०० ते १५० मुली आहेत. त्यांना रोज हजारो रुपयांचा भाजीपाला लागतो. अतिक्रमण विभागाने दिलेल्या भाजीपाल्यामुळे मुलींची भाजीची गरज भागत आहे. गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मेथीच्या जुड्या, पालकाच्या जुड्या आधाराश्रमाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे वांगी, भोपळे, गिलके, कारले अशा अनेक प्रकारच्या भाज्या आणून दिल्या आहेत. फक्त भाजीपालाच नव्हे, तर अनेकदा फळेदेखील आणून दिली जातात. मध्यंतरी अतिक्रमण विभागाने फूटपाथवर विक्री करत असलेल्या टरबूज विक्रेत्यांचा माल जप्त केला होता. टरबुजांची संख्या जास्त असल्याने मुलींनी आनंदाने त्याचा आस्वाद घेतला. एक महिन्यापूर्वी पंचवटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मिरचीचे एक पोते दिले होते. यामुळे संपूर्ण महिन्याला लागणारी मिरचीची गरज भागली होती. अतिक्रमण विभाग देत असलेल्या भाजीपाल्यामुळे महिन्यातील काही दिवसांचा प्रश्न सुटत असल्याने भाजीपाल्यावर होणाऱ्या खर्चात बचत झाली आहे.

निरपेक्ष मदत

कोणतीही अपेक्षा न ठेवता अतिक्रमण विभागाकडून महिन्यात अनेकदा भाजीपाला आणून दिला जातो. त्यामुळे बराचसा खर्च वाचतो. त्याबद्दल अतिक्रमण विभागाचे आभार मानावे तितके थोडे आहे, असे मानद कार्यवाह प्रभाकर केळकर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी हवे? मग विकत घ्या हवे तेवढे!

0
0

pravin.bidve@timesgroup.com

सिन्नर ः ''दुष्काळ आताच नाही तर पाचवीलाच पुजलेला... गावात टँकर येतो, पण दर तीन दिवसांनी... टिपाड भरून मिळतं खरं; पण ते पाणीही डोक्यावरून वाहावं लागतं... गावापल्याड पाणी मुबलक आहे. ते मिळतं, पण विकत घेतलं तरंच...!'' ही सारी व्यथा आहे सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरीची. वर्षानुवर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या या गावचा दुष्काळफेरा काही केल्या मिटत नाही. या साऱ्यात चांदी होतेय ती पाणी विकणाऱ्यांची... पाण्याच्या या बाजाराच्या सुळसुळाटात माणुसकी मात्र पार हरवली आहे.

सबंध दिवस त्यांचा पाण्याच्या टँकरची वाट पाहण्यात जातो. टँकर दुरून येताना दिसला तरी त्यांच्या मनात आनंदाची लाट उसळते. सरकारी टँकर पाणी देतो; पण घरटी एक टिपाड. पुन्हा फेरी तिसऱ्या दिवशीच. मात्र पाणी विकत हवे असेल तर वाट्टेल तेवढे मिळेल. फक्त पाणी पुरविणाऱ्या खासगी टँकरवाल्याकडे पैसे मोजण्याची तयारी हवी. विशेष म्हणजे सिन्नर तालुक्यातील पाट पिंपरीकरांना पाणी विकत मिळते, परंतु ते निफाडचे. तेथील एक खासगी विहीर सिन्नर तालुक्यातील काही गावांची तहान भागविते आहे.

पाटपिंप्री हे सिन्नर तालुक्याच्या उत्तरेला असलेले गाव. सिन्नरपासून आठ-दहा किलोमीटर, तर नाशिक शहरापासून अवघ्या ४० किलोमीटरवर हे गाव असले तरी तेथील रहिवाशांची पाण्यासाठीची तडफड मन सुन्न करणारी आहे. या गावाची लोकसंख्या साडेतीन हजार. मात्र, दुष्काळ हा जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेला. येथील चिल्लीपिल्ली मोठी झाली ती दरवर्षी चार-सहा महिने गावात टँकर पाहतच. येथील एक पिढी तरुण झाली, पण टँकरने अजूनही त्यांची पाठ सोडलेली नाही.

इथे पाण्याचेही डेपो!

या भागातील पाणीवाटपाची पद्धत तशी गमतीदार आहे. एका ठिकाणी किमान ४० ड्रम ठेवले जातात. या ठिकाणाला डेपो असे म्हणतात. तूर्तास गावात असे सात डेपो आहेत. एका डेपोवर तीन दिवसांआड टँकर येतो. साधारणत: आठ हजार लिटरचा टँकर तेथे रिता केला जातो. प्रत्येक ड्रमची मालकी लक्षात यावी यासाठी त्यावर नाव लिहिलेले. कुणाचे घर या डेपापासून पाच- दहा फुटांवर, तर कुणाचे शे-दोनशे फुटांवर. त्यामुळे गरज भासेल तेव्हा जिने-तिने आपापल्या ड्रममधील पाणी घेऊन जावे हा येथील महिलांचा दिनक्रम ठरलेला.

डिसेंबरपासूनच टँकरच्या फेऱ्या

प्रतिमाणशी २० लिटर पाणी पुरत नाही, अशी कैफियत येथील ग्रामस्थांनी मांडली. किमान ५० लिटर पाणी मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. गावात १० हातपंप आहेत; परंतु ते निरुपयोगी ठरू लागले आहेत. सात वर्षांपूर्वी येथील भूगर्भात पाण्याचा चांगला साठा होता. त्यामुळे ग्रामस्थांना हातपंपाद्वारे पाणी मिळत असे. मात्र, भूगर्भातील पाणी आटले अन् ग्रामस्थांची पाणीटंचाईशी गाठ पडली. गेल्या तीन-चार वर्षांत तर पुरेसा पाऊसच न झाल्याने डिसेंबरपासूनच गावात टँकरच्या फेऱ्या सुरू होतात. माणसालाच पिण्यासाठी पाणी पुरेना, जनावरांना पाणी कोठून द्यायचे, असा सवाल व्यथित ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला.

''टँकरमधील पाण्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी टँकरचालकाच्या स्वाक्षरीसह आम्ही नोंदी ठेवतो. चांगल्या पावसावरच गावातील टंचाई निवारणाची भिस्त आहे. सातगाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यास पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल,'' असा विश्वास पाटपिंप्रीचे सरपंच भानुदास उगले यांनी दिली.

५० रुपयांत २०० लिटर पाणी...

गावात लग्नकार्य अथवा अन्य कार्यक्रम असेल तर त्यासाठी टँकरचे पाणी विकत घेण्याशिवाय ग्रामस्थांकडे पर्याय नाही. अशा वेळी हजार-बाराशे रुपये देऊन टँकरचे पाणी खरेदी केले जाते. गावातील एखाद्या कुटुंबाची पाणी विकत घेण्याची तयारी असेल तर त्यालाही ते घेता येते. मात्र, खासगी टँकरचालकाला तशी पूर्वकल्पना द्यावी लागते. ५० रुपयांत २०० लिटरचा ड्रम भरून दिला जातो. पाणी विकत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्श ग्राम योजनेचा आमदारांना निधीच नाही!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदारसंघातील विकासकामात खासदारांपेक्षा आमदारांच्या कामाचा टक्का जास्त असला तरी आदर्श ग्राम योजनेत मात्र १८ आमदारांवर जिल्ह्यातील दोन खासदार भारी पडले आहेत. आमदारांच्या आदर्श ग्राम योजना निधी अभावी रखडलेली असतांना दुसरीकडे मात्र खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या अवनखेड येथे पाच, तर खासदार हेमंत गोडसे यांनी दत्तक घेतलेल्या अंजनेरी गावात १९ कामे पूर्ण केली आहेत.

पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी सांसद ग्रामयोजनेची घोषणा केली व त्यानंतर दोन महिन्यात त्याची अमंलबजावणी सुरू झाली. याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यानंतर २० मे २०१५ रोजी आमदार ग्राम योजना सुरू केली. या योजनेला वर्षे झाले तरी निधी नाही. आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवरच करण्यात आली व त्यात प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातून जुलै २०१९ पर्यंत तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून विकसित

करण्याचे ठरवण्यात आले. पण पहिल्या वर्षात आमदारांनी निवडलेल्या गावांची यादीच आली.

सांसद ग्राम योजनेत मात्र खासदार चव्हाण व खासदार गोडसे यांनी निवडलेल्या गावात पहिल्या टप्यात अवनखेड व अंजनेरी येथे विकास काम तर सुरू केले. इतकेच नव्हे तर आधारभूत सर्वेही पूर्ण झाले. कुटुंब पत्रकांची माहिती ऑनलाइन नोंदवली. गावांकरिता जिल्हास्तरीय समिती व ग्रामविकास आराखडा समिती स्थापन करण्यात आली. ग्रामविकास आराखडा अंतीम करून तो ऑनलाइन

लोड करण्यात आला. आता दुसऱ्या टप्यात हे दोन खासदार गावाची निवड करणार आहेम. त्यात गोडसे यांनी इगतपुरी तालुक्यातील सांजेगावचे नाव सुचविले आहे तर, चव्हाण यांनी याबाबत अजून काही कळविलेले नाही.

मतदार संघ लहान असल्यामुळे आमदारांना निधीतून विकास कामे करणे सोपे असते. खासदारांचा

लोकसभा मतदार संघ मोठा असल्यामुळे खासदार निधी नेहमीच अपूरा पडतो. पण आदर्श ग्राम विकास योजनेत खासदारांनी कामे केली, तर आमदार निधीअभावी गाव निवडीपुरतेच मर्यादीत राहीले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images