Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘आरटीओ’त आता मॅन्युअली वाहन परीक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम

नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वयंचलित वाहन चाचणी आणि परीक्षण सेंटर सध्या तोडफोडीमुळे बंद आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच मॅन्युअली पद्धतीने वाहन तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून वाहन तपासणी मॅन्युअली पध्दतीने सुरू करण्यात आली आहे.

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात केंद्र शासनाच्या प्रयत्नातून स्वयंचलित वाहन चाचणी व परीक्षण केंद्र सुरू करण्यात आले होते. वाहनांची तपासणी करून वाहनमालकास प्रमाणपत्र दिले जात होते. यावेळी अनेक वाहने तपासणीदरम्यान फेल ठरत होती. यामुळे वाहनमालक आणि चालक यांच्यात नाराजी होती. यात वाद झाले आणि केंद्राची तोडफोड झाली. यामुळे हे स्वयंचलित केंद्र बंद पडले आहे.

वाहनचालक व मालक यांची होणारी गर्दी आणि अडचण लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणे तपासणी सुरू करण्यात आली आहे. स्वयंचलित वाहन केंद्र कधी दुरुस्त होईल, याबाबत खात्री नाही. त्यामुळे मंगळवारपासून पूर्वीप्रमाणे वाहनांची तपासणी करण्यात येईल, असे नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कलस्कर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिन्नर फाटा अडकला समस्यांच्या गर्तेत

0
0

म. टा. सिन्नर फाटा, प्रतिनिधी

नाशिक शहर, एकलहरे, सामनगाव, सिन्नर या सर्व रस्त्यांनी येणारी ट्रॅफिक सिन्नर फाटा येथे एकत्रित होते. अरुंद महामार्ग व महामार्ग रुंदीकरणाच्या निमित्ताने सुरू असलेली विविध कामे यामुळे या ट्रॅफिक जंक्शनला विविध समस्यांनी घेरले आहे.

नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पूर्वतयारी वेग धरू लागली आहे, तस-तसा सिन्नर फाटा वाहतूक समस्यांच्या चक्रव्यूहात फसत चालला आहे. या समस्यांच्या चक्रव्यूहातून येथील वाहतुकीला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदार असलेल्या चेतक एंटरप्रायजेस या कंपनीकडून कोणतेही नियोजन अद्याप तरी तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व दिशांनी येथे वाहने ये-जा करतात, त्यामुळे येथे दिवस-रात्र वाहनांची गर्दी असते. महामार्ग रुंदीकरणाच्या निमित्ताने येथे वारंवार खोदकाम केले जात आहे. त्यामुळे येथे वाहतूक कायमच संथ गतीने सुरू असते. अनेकदा वाहने मुख्य महामार्गावरच फसल्याने वाहतूक ठप्प होते. वास्तविक ठेकेदाराने खोदकाम केल्यानंतर पुन्हा ते योग्य पद्धतीने पूर्ववत करणे आवश्यक असतांनाही ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक खड्डे पडले आहेत. अवजड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळेही नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व समस्यांवर महामार्ग प्राधिकरण, सामाजिक बांधकाम विभाग, ठेकेदार व मनपा यांच्याकडून कोणते उपाय अद्याप तरी योजले गेलेले नाहीत. उलट महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची या सर्वांकडून वाट पाहिली जात आहे. या कामाची सुरुवातच अजून निश्चित झालेली नाही. त्यामुळे सिन्नर फाटा ट्रॅफिक जंक्शनवरील वाहतूक समस्या कायमच राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या विकासाला चिनी टच

0
0

युंग याँग सिटीच्या धर्तीवर सिस्टर सिटी बनणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाठीसाठी चीन सरकारने तयारी दर्शवली आहे. चीनच्या युंग याँग सिटीच्या धर्तीवर नाशिकचा विकास केला जाणार आहे. मुंबईतील कौन्सल जनरलने निमाच्या माध्यमातून युंग याँग सिटीच्या धर्तीवर नाशिकचा सिस्टर सिटी म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे. पालिकेनेही याबाबत तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत, युंग याँग सिटीसोबत सिस्टर सिटी करार करण्याची तयारी दर्शवली असून, त्याबाबतचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. चीनचे मुंबईतील काऊन्सिल जनरल हे २५ तारखेला नाशिकमध्ये येणार असून, त्यांच्या उपस्थितीत हा करार केला जाणार आहे.

नाशिक इंडस्ट्रीज ऑफ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे चीनमधील युंग याँग शहरातील उद्योजक व व्यापाऱ्यांकडून नाशिकमध्ये औद्योगिक व आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. निमाच्या या प्रयत्नांना यश आले असून, चीनने नाशिक हे महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठीचे उत्तम शहर असल्याचे ओळखून गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. शहराचा आर्थिक विकास, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, सामाजिक सेवा व आधुनिकीकरणासाठी दोन शहरांमध्ये करार केला जाणार आहे. या कराराच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक विकास केला जाणार आहे.
चीनमधील युंग याँग हे शहर आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगतीशील शहर असून, या शहराचे मॉडेल नाशिकच्या विकासासाठी वापरले जाणार आहे. दोन शहरांमधील राजनैतिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रयोजनासाठी दोन शहरांमध्ये कायदेशीर करारनामा केला जाणार असून, तसा प्रस्ताव चीनच्या कौन्सिल जनरलने दिला आहे. युंग याँग सिटीसोबत सिस्टरसिटी करण्याचा प्रस्ताव येत्या १७ मे रोजी होणा-या महासभेवर ठेवण्यात आला असून, त्या सभेत मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहराच्या विकासासाठी युंग याँग शहराची मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाड्यांची पुन्हा जाळपोळ

0
0

सहा दुचाकी भस्मसात; पोलिसांचा दिसेना वचक

म. टा. प्रतिनिधी, सिडको

अंबड लिंक रोडवरील महालक्ष्मीनगर भागातील श्री अपार्टमेंटमधील वाहनतळावर उभ्या असलेल्या सहा दुचाकी गाड्या मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींकडून जाळण्यात आल्या. रात्री दीड वाजताची ही घटना आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फिर्यादी वालाराम चौधरी यांना रात्री दीड वाजेच्या सुमारास इमारतीमधील रहिवाशांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी इमारतीमधील वाहनतळावर जावून बघितले असता, तेथील गाड्या जळत असल्याचे त्यांना दिसले. या आगीमुळे इमारतीत सर्वत्र धूर पसरला होता. इमारतीला वीजपुरवठा करणारी वायरही यात जळत असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही. अग्निशामक दल आल्यानंतर ही आटोक्यात आणण्यात आली. या घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, आमदार सीमा हिरे, नगरसेविका सुवर्णा मटाले व दीपक मटाले यांनी भेट देवून नागरिकांशी चर्चा केली.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी मटाले मंगल कार्यालय परिसरात अशाच प्रकारे गाड्या जाळण्याचा प्रकार झाला होता. त्याचा तपास पूर्ण झालेला नसून, संशयितांना पोलिसांनी अटक केलेली नाही. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी पोलिसांची गस्तच होत नसून, वारंवार होत असलेल्या अशा प्रकारामुळे सिडको परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, गाड्या जाळपोळीचे प्रकार केव्हा थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिडकोप्रमाणे इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीजवळ पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्याही जाळण्याचा प्रकार झाला होता. त्यामुळे वारंवार होत असलेल्या या प्रकारांना आळा बसला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जळालेल्या गाड्या

या आगीत एमएच १५ एफडी ६३६६, एमएच १५ डीजी ४१७३, एमएच ०१ एयू १६६५, एमएच १५ बीझेड ६८१३, एमएच ४१ डब्ल्यू ८८५२, एमएच १५ सीयू ९४८५ या गाड्या पूर्णपणे जळाल्या आहेत.

अजूनही तपास नाही

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उत्तमनगर भागात शिरूडे नावाच्या व्यापाऱ्यावर भरवस्तीत झालेल्या प्राणघातक हल्ल्याचाही अद्याप तपास झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट

0
0

महामार्ग बसस्थानकाचा होणार कायापालट

pravin.bidve @timesgroup.com

नाशिक : एअरपोर्टप्रमाणेच प्रवाशांना प्रीमियम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी राज्यातील काही मोजकी बसस्थानके विकसित करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. राज्यात महामंडळाच्या सहा प्रादेशिक विभागांमध्ये १३ ठिकाणी या प्रकारचे बसपोर्ट विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक बसपोर्ट म्हणून विकसित केले जाणार असून, त्यामुळे या परिसराचे रुपडे पालटणार आहे.

एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट सुरू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. एसटी केवळ सामान्य प्रवाशांची न राहता समाजातील सर्वच घटकांची तिला पसंती मिळावी या दृष्टीने महामंडळाकडून नवनवीन बदल अंमलात आणले जात आहेत. राज्यात पहिल्यांदाच १३ ठि‌काणी बसपोर्ट सुरू करण्याचा निर्णय रावते यांनी घेतला आहे. महामंडळाची प्रादेशिक कार्यालये असलेल्या सहा मोठ्या शहरांची पहिल्या टप्प्यात विशेषत्वाने निवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वच शहरांमध्ये महामंडळाकडे मोक्याच्या जागा असून त्यापैकी काही जागा बसपोर्ट म्हणून विकसित करण्यात येणार आहे. नाशिक प्रदेशात पहिल्या टप्प्यात नाशिक शहरातील महामार्ग बसस्थानक बसपोर्ट म्हणून विकसित करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जळगाव आणि धुळे शहरातील प्रत्येकी एक बसस्थानक निवडले जाऊ शकते. बसपोर्टवरून हिरकणीसारख्या सेमीलक्झरी तसेच शिवनेरी, स्कॅनिया यासारख्याच बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी ‌दिली आहे. बसस्थानकामध्ये प्रवाशांना लक्झरियस सेवा पुरविणे हा बसपोर्टचा उद्देश आहे. महामार्ग येथील बसस्थानक विकसित करण्यास मोठा कालावधी जाणार आहे. तेथे काही मजल्यांची अत्याधुनिक इमारत उभारली जाईल. या इमारतीमध्ये रॅम्प, लिफ्ट, सरकता जिना यासारख्या सुविधा असतील. बसस्थानकावर सुसज्ज असे यात्री निवास असू शकेल. याखेरीज हायजेनिक किचनयुक्त हॉटेल, विरंगुळा केंद्र, एटीएम मशिन, तिकीट बुकिंग काऊंटर, कमर्शियल कॉम्प्लेक्स सारख्या अत्याधुनिक सुविधाही तेथे असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ ठेकेदारांच्या निविदा उघडणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक


काळ्या यादीतील ठेकेदारांना घंटागाडी निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ देण्याच्या हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रशासनाने काळ्या यादीतील ठेकेदारांच्या निविदा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या ठेकेदारांना काळ्या यादीत कायम ठेवायचे की, बाहेर काढायचे याचा चेंडू हायकोर्टाने प्रशासनाकडे टोलवला आहे. त्यामुळे आता प्रशासन काळ्या यादीतील ठेकेदारांबाबत काय निर्णय घेतात याकडे ठेकेदारांच्या नजरा लागून आहेत. दरम्यान, घंटागाडी ठेकेदारांना हायकोर्टाकडून मिळालेल्या दिलासाबद्दल आता आश्चर्य व्यक्त केले जात असून पालिका भूमिका मांडण्यात अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेच्या चारही घंटागाडी ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करण्यावरून वाद सुरू आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले नसल्याने पालिकेने या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करत, घंटागाडी निविदा प्रक्रियेपासून दूर ठेवले होते. परंतु, या घंटागाडी ठेकेदारांनी हायकोर्टाकडे धाव घेत निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ देण्याचा आदेश मिळव‌लिा आहे. हायकोर्टाने या ठेकेदारांच्या निविदा उघण्याचे आदेश दिले आहेत. निविदा उघडल्या तरी, ब्लॅकलिस्टेड बाबतचा निर्णय मात्र प्रशासनावर सोपव‌लिा आहे.
घंटागाडीसाठी आता २८ निविदा प्राप्त झाल्या आहेत. या २८ पैकी ४ निविदा ह्या ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांच्या आहेत. त्यामुळे या चारही निविदा उघडण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली आहे. ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड ठेवायचे की, बाहेर काढायचा हा निर्णय आता प्रशासन घेणार आहे. ठेकेदारांनी किमान वेतनांसदर्भातील अटी व शर्ती पाळल्या तर त्यांना ब्लॅक लिस्टेडमधून बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरेच्या नव्या केंद्राला अजूनही खो

0
0

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

एकलहरे येथील प्रस्तावित ६६० मेगावॅट वीज निर्मिती केंद्राच्या परवानगीकडे नाशिककर डोळे लावून बसलेले असताना तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावरच या वीज निर्मिती केंद्राचा विचार केला जाईल, असे खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच बुधवारी सांग‌तिल्याने अजुनही हा प्रकल्प सरकारदरबारी लालफितीच्या कारभारात अडकलेला असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा नाशिककरांचा या नव्या वीज निर्मिती केंद्राच्या खात्रीबाबत भ्रमनिरासच झाला आहे.

बुधवारी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या भेटीवर आले होते. याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्यासोबत आमदार योगेश घोलप, उर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महानिर्मितीचे व्यवस्थापकिय संचालक बिपिन श्रीमाळी, संचालक (संचलन) विजयसिंग, कार्यकारी संचालक मनोज रानडे, मुख्य अभियंता पंकज सपाटे, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा) चंद्रशेखर रानडे आदी उपस्थित होते.

ऊर्जामंत्र्यांनी एकलहरे येथील ६६० मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित केंद्राबाबत माहिती दिली. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावरच या नव्या वीज निर्मिता केंद्राचा सरकार विचार करेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रकल्प अजुनही विविध तांत्रिक अडचणींत अडकलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकल्प कोणत्या तांत्र‌कि बाबींच्या पूर्ततेच्या प्रतिक्षेत आहे, याबाबत मात्र ऊर्जामंत्र्यांनी मौन धारण केले. यावेळी त्यांनी एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एकलहरे वसाहत, गोदावरी ओढा पॉईंट,वॅगन टिपलर, नियंत्रण कक्ष,राख हाताळणी विभाग, कुलिंग टॉवर, कोळसा हाताळणी विभाग आदी ठिकाणांना बेट देवून पाहणी केली.

खर्चाची ऊर्जामंत्र्यांना भीती

वीज क्षेत्रातील स्पर्धा वाढलेली असल्याचे कारण नमुद करीत वीज निर्मिती संच बंद पडू नये, यासाठी कोळसा, ऑईल व प्रशासकीय खर्चात बचत करण्याचे आवाहन यावेळी उर्जामंत्र्यांनी केले. वीज निर्मिती कामी वाढत असलेल्या खर्चाचीही ऊर्जामंत्र्यांना भीती वाटत असल्याचे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

कमी किमतीत घरे!

कंत्राटी कामगारांनी सहकारी संस्था स्थापन केल्यास कोराडी वीज निर्मिती केंद्राच्या धर्तीवर जागा उपलब्ध करून देण्यात येईल व त्या ठिकाणी म्हाडामार्फत कमी किंमतीत त्यांना घरे उपलब्ध करून देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती बुधवारी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलहरे येथे दिली.

एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला बुधवारी त्यांनी भेट दिली. कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींशी त्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी या कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींनावरील प्रमाणे माहिती दिली. याकामगारांच्या घरांच्या जागेसाठीचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेशही यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या प्रस्तावात कामगारांच्या मुलांसाठी सीबीएससी शाळेच्या जागेचाही समावेश करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी आमदार अनिल कदम, आमदार योगेश घोलप, आमदार सिमा हिरे, आमदार देवयानी फरांदे आदींनी वीज पुरवठ्याविषयक समस्या मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या विकासाला मिळणार चालना

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

थेट नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयाचे त्र्यंबकेश्वरवासीयांनी स्वागत केले आहे. त्र्यंबकनगरीच्या विकासास खिळ घालणाऱ्या संगीतखुर्चीच्या खेळास या निमित्ताने लगाम बसणार आहे. नगरसेवक नगराध्यक्ष निवडीच्या खेळातून बाहेर पडत नागरी समस्यांकडे लक्ष देतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. सिंहस्थ २००३ च्या दरम्यान या शहरास पुष्पा झोले या थेट नगराध्यक्षा लाभल्या होत्या. तर सन २००२ ते २००७ दरम्यान स्थिर कारभार पाहावयास मिळाला होता. मात्र त्यानंतर निवडणूक पॅटर्न बदलला आणि पाच वर्षात तब्बल पंधरा नगराध्यक्ष पाहावयास मिळाले.

विशेष म्हणजे यावेळच्या सतरा नगरसेवकांमध्ये तेरा नगरसेवक नगराध्यक्ष झाले. यामध्ये काहींनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नाव नोंदविले तर काहींना दुहेरी संधी मिळाली होती. नगराध्यक्ष बदलाचा हा सिलसिला त्यानंतर सन २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कायम राह‌िला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेली नगराध्यक्षांची निवड सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती. सिंहस्थासारखा महाउत्सव संपन्न झाला मात्र जिल्हा प्रशासनास त्याचे बहुतांश श्रेय मिळाले. तर नगरपरिषदेस यामध्ये आपला खास ठसा काही उमटवता आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नळाच्या पाण्यात अळ्या अन् किडे

0
0

जेलरोडच्या कलानगरवासीयांची तक्रार; शुध्द पाणीपुरवठ्याची मागणी‍

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडच्या कलानगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. नळामधून पाण्याबरोबर अळया आणि किडे येत असल्याची तक्रार संतप्त नागरिकांनी केली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.

नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होताच पाण्यात अळया आणि किडे आढळले. लतिका वाडिले, अर्चना कापसे, दीपाली ठाकूर, कल्पना तापडिया, सुवर्णा पाटील, अश्विनी शिंदे आदी महिलांनी समाजसेवक शशी चौधरी यांना ही माहिती दिली. कलानगर हे मध्यम व उच्चवर्गियांची वस्ती आहे. सुमारे एक हजार नागरिक येथे राहतात. सामाजिक कार्यात कलानगरवासी नेहमी पुढे असतात. या आधीही दूषित पाणीपुरवठा झाला होता. तेव्हा मळमळ व पोटीदुखीचा त्रास जाणवला होता. नागरिक पाणी उकळून पीत आहेत.

या सोसायटीसमोरील सेंट फिलोमीना शाळेजवळील ड्रेनेज लाईन तुंबून पाणी वाहत आहेत. असाच प्रकार पाणीपुरवठ्याच्या पाइपजवळ होऊन घाणपाणी नळाच्या पाण्याबरोबर येत असावे, अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. देवळालीगावाच्या काही भागात गेल्या आवठड्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. दूषित पाण्यामुळे नागरिकांना पोटदुखीचा त्रास होत आहे. लहान मुलांना डायरियाचाही त्रास होत आहे. यामुळे महापालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन दूषित पाणीपुरवठ्याचे कारण शोधून नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेचे १०७ कोटी जाणार पाण्यात?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेने विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. नगरसेवकांच्या विकास कामांसाठी उद्या (दि. १३) स्थायी समितीवर तब्बल १०७ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले आहेत. परंतु, या पावसाळ्यातच ही कामे सुरू होणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्त्यांचे डाबंरीकरण व अस्तरीकरण पावसात टिकेल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठेकेदारांकडून केवळ मलमपट्टीच केली जाण्याची शक्यता असून, जनतेचे १०७ कोटी पाण्यातच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या कामांच्या हेतूविषयीच शंका उपस्थित केल्या जात आहेत.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेला आता नवनिर्माणाची घाई झाली आहे. नगरसेवकांच्या दबावानंतर महासभेने शहरात १९२ कोटी रुपयांचे खडीकरण, डांबरीकरण व अस्तरीकरणाचे प्रस्ताव मंजूर केला आहे. निवडणुकांपूर्वी ही कामे झाल्यास नगरसेवकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महासभेने मंजूर केलेल्या या कामांच्या निविदा प्रक्रिया प्रशासनाने मंजुरीसाठी स्थायी समितीवर ठेवल्या आहेत. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली जाणार आहे.
जवळपास १०७ कोटी रुपये खर्चून शहरातील कॉलनी रस्त्यांवर खडीकरण, डांबरीकरण, जुन्या रस्त्यांवर अस्तरीकरण केले जाणार आहे. यातील सर्वाधिक कामे ही खडीकरण व डांबरीकरणाची आहेत. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर कंत्राटदारांकडून करारनामे करून घेतले जातील.
त्यामुळे अजून किमान पंधरा दिवस या कामांमध्ये जातील. त्यानंतर या खऱ्या अर्थाने कामांना सुरुवात होणार आहे. एकीकडे या कामांची लगीनघाई आणि दुसरीकडे पावसाला सुरुवात होणार असल्यामुळे कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निवडणुकांच्या आधी कामे सुरू होण्यासाठी नगरसेवकांना घाई असल्याने ठेकेदार पावसाळ्यातच ही कामे सुरू करणार आहेत. पावसाळ्यात केलेली ही कामे टिकण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी नवनिर्माणाची घाई सत्ताधाऱ्यांकडून केली जात असली तरी, ती अंगलट येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरूच असून, बुधवारीही जोरदार वाऱ्यासह शहरात आणि जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. कळवण आणि नांदगाव येथे वीज अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला; तर दोघेजण जखमी झाले. इगतपुरी तालुक्यातही वीज अंगावर पडून म्हैस दगावली. सायंकाळी साडेपाचपर्यंत नाशिक शहरात ४.४ मिल‌ीमीटर पावसाची नोंद झाली.

बुधवारी दुपारनंतर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांध्ये पुन्हा अवकाळी पावसाने धुडगूस घातला. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जिल्हावासियांची धांदल उडविली. दुपारी दोननंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहावयास मिळाले. काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. कळवण, इगतपूरी, नांदगाव, मालेगाव, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह आलेल्या पावसाचा झंजावात जिल्हावासियांनी अनुभवला. देवळा तालुक्यातील वाजेगाव येथील रहिवाशी संजय उर्फ पांडू सुखदेव कुवर हे काही कामानिमित्त कळवण तालुक्यात आले होते. निवाणे येथे बुधवारी वीज अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर संदीप भामरे आणि प्रवीण सुराणा हे जखमी झाले. नांदगाव तालुक्यातही वैभव विजय सांगळे (वय १५, रा. नांदगाव) या मुलाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. सटाणा तालुक्यामध्ये सोमवारी वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. यामध्ये विठ्ठल दादाजी पवार (रा. गाडीपिसोळ) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या तीन झाली आहे.

शहर, जिल्ह्यात वीजेचा लपंडाव

इगतपूरी तालुक्यातील मोडाळे येथे वीज अंगावर पडून भाऊसाहेब सखाराम बोडके यांची म्हैस दगावली. जिल्ह्यात काही भागात मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र या पावसामूळे बुधवारी देखील जिल्ह्यात काही भागात वीजेचा लपंडाव सुरू असल्याचा अनुभव रहिवाशांना आला. ग्रामीण भागातच नव्हे; तर शहरातही बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने व्यावसा‌यिक तसेच हातगाडीधारकांची धांदल उडविली. वीस मिनिटांनंतर पावसाचा जोर ओसरला. मात्र तरीही बराचवेळ पावसाची रिपरिप सुरूच होती. वादळी वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. यामुळे रस्त्यातील फांद्या काढण्यासाठी अग्न‌िशमन दलाच्या जवानांची धावपळ झाली.

तापमान घटले

जिल्ह्यात बुधवारी कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सियस तर किमान तापमान २३.४ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. सकाळी वातावणातील आद्रता ६२ टक्के तर सायंकाळी ७५ टक्के नोंदविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये टोळीयुद्ध भडकले, एक ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी । नाशिक

नाशिकमधील सिडको परिसरात दिवसाढवळ्या टोळीयुद्ध भडकले. दोन्ही टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गोळीबारही करण्यात आला. यात एक जण ठार झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पूर्ववैमनस्यातून हे टोळीयुद्ध भडकल्याचे सांगितले जाते.

सिडको परिसरात सर्वाधिक वर्दळीच्या स्टेट बँक चौकात आज भरदिवसा गायकवाड-काळे-दांडेकर या टोळ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. लोखंडी सळ्या, लाठ्या-काठ्यांनी दोन्ही टोळ्यांतील लोक परस्परांना मारहाण करत होते. गोळीबारही करण्यात आला. यात अशोक दांडेकर हा ठार झाला आहे. त्याचाच सहकारी तात्या दांडेकर अत्यवस्थ आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते. शहरात टोळीयुद्ध भडकल्याने पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे एसपीपदी एस. चैतन्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील यांची अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक आयपीएस एस. चैतन्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नूतन पोलिस अधीक्षक चैतन्य हे कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचे तपासधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या बदलीने कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील चौथ्या तपासधिकाऱ्याची बदली झाली आहे. धुळ्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे हे कोल्हापूर पोलिस अधीक्षक पदावर असल्याने त्यांच्यासमवेत असलेले अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांना बढती मिळून ते धुळ्याला आल्याचे समजते. धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवीन एसपी काय यंत्रणा राबविता याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्गातील ३५ झाडांना जीवदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम पंचवटीतील दिंडोरीरोडवरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या १०० ते १२५ झाडांपैकी ३५ झाडांचे टाकळी येथील मोकळ्या जागेत पुनर्रोपण करून त्यांना जीवदान देण्यात येणार आहे. परिसरात अशी भररस्त्यात येणारी झाडे काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे संबंधित भागात वाहतुकीचे फेरनियोजन केले जात आहे. आधुनिक यंत्राच्या सहाय्याने येथून काढण्यात आलेल्या झाडांच्या पुनर्रोपणसाठी टाकळी येथे व्यवस्था करण्यात आलेली असून, बुधवारी आणि गुरुवारी अशी दोन झाडे यशस्वीरीत्या काढण्यात आली असून, पुनर्रोपणासाठी पाठविण्यात आली आहेत. येथील झाडे काढून त्यांचे थेट पुनर्रोपणच करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दिंडोरीरोड परिसरात रस्त्याच्या मध्यभागी असलेली १०० ते १२५ पेक्षा अधिक धोकादायक झाडे वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी ठरत आहेत. या झाडांमुळे अपघात होऊ नये याकरिता त्यांना रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. मात्र, रिफ्लेक्टर लावले असले, तरी वाहनांचा वेग आणि रात्रीची वेळ व रोड अतिशय लहान यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना येथून वाहन चालविताना कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. म्हसरूळ गावच्या अगदी समोर आणि बोरगड चौफुली येथे रोडच्या मध्यभागी काही झाडी उभी आहेत. तसेच, गजपंथ, आकाश पेट्रोलपंप, साई मंदिर परिसर आणि रिलायन्स पेट्रोलपंपासमोरदेखील अशीच झाडे आहेत. त्यांचा वाहतुकीला कायमच अडथळा निर्माण होत आहे. परिसरातील वाढत्या नववसाहतींमुळे रहदारी वाढली असून, वाहनांची संख्यादेखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघात वाढले आहेत. त्यामुळे येथील झाडे काढण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेरीस ही झाडे काढण्याचा व त्यांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडात बंधाऱ्याच्या कामास प्रारंभ

0
0
गोदाघाटावरील रामकुंडात सध्या अजिबात पाणी नाही. त्यामुळे भाविकांना विविध धार्मिक विधींसाठी व स्नानासाठी पुरेसे पाणी मिळावे, या हेतूने रामकुंड व सीताकुंडात पुन्हा बंधारा बांधण्याचे काम बऱ्याच घडामोडींनंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने अखेर हाती घेतले आहे.

त्यांचं अंथरूण धरती अन् पांघरूण आकाश...

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी आदिवासी पाड्यांवर उन्हाळ्यात काम नसल्याने अनेकांची पावलं शहराकडे वळतात. शेती व बांधकाम मजुरीसाठी हे आदिवासी बांधव शहरात येतात. शेतीची कामे करणाऱ्यांची शेतावर राहण्याची व्यवस्था होते. मात्र, बांधकामांवर मजुरी करणाऱ्यांना जागेची व्यवस्था स्वतःच करावी लागते. अशा शेकडोंच्या संख्येने आलेल्या आदिवासींचे जणू गावच गोदाकाठावरील गौरी पटांगणावर वसले आहे. त्यांचे अंथरूण धरती अन् पांघरूण आकाश झाल्याचे चित्र येथे दिसत आहे. गौरी पटांगणावर मुक्कमी राहणारे मजूर हे शहरातील विविध भागात सुरू असलेल्या बांधकामांवर मजुरी करतात. पुरुषांना ३५०, तर महिलांना २५० रुपयांची मजुरी मिळते. पहाटे उठून शिदोरी घेऊन ते कामाच्या ठिकाणी दाखल होतात. त्यावेळी आपापली भांडी-कपडे, धान्य, सरपण यांचे गाठोडे बांधून ते पटांगणावर ठेवून देतात. प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी गाठोडी या मैदानावर दिवसा दिसत असतात. सायंकाळी मैदानावर परतल्यावर त्यांच्या चुली पेटतात. सायंकाळचे जेवण आटोपून मैदानावर उघड्यावरच ते सारे झोपतात. दिवसभराच्या थकव्यामुळे कधी डोळ्याला डोळा लागतो हे कळतदेखील नाही. पुन्हा पहाटे उठून आपापल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांची तयारी सुरू होते. पाऊस आल्यास त्यांच्या उघड्यावरच्या संसाराची चांगलीच धांदल उडते. रविवारी सायंकाळी आलेल्या पावसात त्यांनी तो अनुभव घेतला. ओल्याचिंब मैदानावर उघड्यावर झोपणे अवघड झाल्याने त्यांना गाडगे महाराज धर्मशाळेत आसरा घेण्याची वेळ आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांचे बि-हाड पुन्हा गौरी पटांगणावर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रक्रिया जाणूनच घ्या प्रवेश

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक इंजिनिअरींग, पॉलिटेक्निक, फार्मसी आदी क्षेत्रांतील प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेद्वारे फ्रीज, स्लाइड, फ्लोट या पर्यायांचा वापर करून हे प्रवेश होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी प्रक्रिया समजूनच प्रवेश घ्यावेत, असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक प्रा. ज्ञानदेव नाथे यांनी केले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर गंगापूररोड येथील मविप्र संस्थेचे रावसाहेब थोरात सभागृहात मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रा. नाथे यांनी प्रवेशप्रक्रियेचे नियम, स्वरूप याविषयी माहिती दिली. तंत्रशिक्षण (व्यावसायिक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०१६ व २०१७ या वर्षासाठी प्रवेशप्रक्रियेचे नियम तयार करण्यात आले आहेत. यंदा सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेद्वारे फ्रीज, स्लाइड, फ्लोट पद्धतीने प्रवेश होणार आहेत. त्यामुळे या प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र व प्रवेश उपस्थिती केंद्राची (रिपोर्टिंग) सुविधा उपलब्ध राहणार असून, विद्यार्थी व पालकांनी प्रवेशप्रक्रियेचे स्वरूप समजावून घ्यावे, असे आवाहनही प्रा. नाथे यांनी केले. या वेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सहाय्यक संचालक अनिल पवार, प्रशासकीय अधिकारी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. विभागीय स्तरावरील या मार्गदर्शनपर कार्यशाळेत नाशिकसह जळगाव, नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यांतील ३२५ संस्थांमधील ६०० हून अधिक प्राचार्य व प्राध्यापक प्रतिनिधींनी सहभाग होता. या वेळी प्रा. डॉ. राजीव रोटकर यांनी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम या कायद्यातील तरतुदींची माहिती सांगितली. माधवी खेर यांनी सूत्रसंचालन केले.

पर्याय अन् सुविधा स्लाइड पर्याय स्लाइड या पर्यायात विद्यार्थ्यांना जे अॅलोटेड कॉलेज मिळाले आहे, त्याच कॉलेजमधील इतर कोर्सेससाठी प्रवेश घेण्याचा पर्याय खुला राहणार आहे. मात्र, ऑप्शन फॉर्ममध्ये इतर कोर्सचे पर्याय विद्यार्थ्यांनी भरणे आवश्यक असणार आहे. प्रत्येक राउंडनंतर विद्यार्थ्यांनी स्लाइड ऑप्शन निवडला, तर त्याच्या संबंधित राउंडला मिळालेले अॅडमिशन सुरक्षित राहू शकते. शिवाय, त्यापेक्षा चांगल्या पर्यायासाठी त्याच संस्थेतील इतर कोर्सला अॅडमिशन घेण्यासाठीही विद्यार्थी प्रयत्न करू शकतो.

फ्लोट पर्याय फ्लोट हा पर्याय विद्यार्थ्याने निवडला, तर मिळालेल्या अॅलॉटमेंटनुसार प्रवेश घेता येतो. हा पर्याय निवडला, तर त्यातून मिळालेल्या अॅलॉटमेंट पर्यायापूर्वी असलेल्या सर्व कॉलेजमधील मार्ग खुला राहू शकतो. तसेच, सध्याच्या राउंडमध्ये मिळालेला प्रवेशही कायम राहू शकतो. अंतिम राउंडमध्ये उरलेले सर्व विद्यार्थी व ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राउंडमध्ये स्लाइड किंवा फ्लोट हा पर्याय निवडला आहे, असे विद्यार्थी व याशिवाय इतर विद्यार्थ्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राउंडमध्ये प्रवेश घेऊन वेळेच्या आत रद्दही करता येऊ शकतो. याविषयी विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक कॉलेजमध्येही माहिती मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य पुनर्रचना

0
0

मागच्या आठवड्यात आपण बघितले की राज्यांची भाषिक पुनर्रचना झाल्याला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आपण हा प्रवास कसा पूर्ण झाला याचा आढावा घेऊया. मागच्या आठवड्यात आपण बघितले की राज्यांची भाषिक पुनर्रचना झाल्याला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आपण हा प्रवास कसा पूर्ण झाला याचा आढावा घेऊया. केंद्र व राज्य यांच्यात तणाव पोट्टी श्रीरामलू यांच्या हैदराबाद येथील उपोषणाने वातावरण तापले. श्रीरामलू यांच्या उपोषणात त्यांचा मृत्यू झाला. नंतर दंगेच उसळले. देशाची भाषिक पुनर्रचना हा प्रश्न प्रांतांसाठी एक न्याय्य व यथोचित मागणी होती, केंद्र या प्रश्नाकडे राज्यांचा 'हट्ट' अशा दृष्टीने बघत होते. भाषिक पुनर्रचना झाल्याशिवाय भारत एक देश म्हणून उभा राहू शकला नसता. लोकांच्या तीव्र भावना बघून पंडित नेहरूंनी माघार घेतली व १९५३ मध्ये आंध्र प्रदेश या स्वतंत्र भारतातील पहिल्या भाषिक राज्याची घोषणा करण्यात आली. एकदा भाषिक पायावर एक राज्य स्थापन झाल्यावर इतर प्रांतानीही आपली मागणी लावून धरली. आता भाषावार पुनर्रचना करण्याशिवाय पर्याय नव्हता. केंद्र सरकारने न्यायाधीश फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची घोषणा केली. के. एम. पण्णिकर व हृदयनाथ कुंझरू हे या आयोगाचे सदस्य होते. या समितीने दोन वर्षे काम केले. संपूर्ण दोन वर्षांच्या कार्यकाळात आयोगाला सभा, निदर्शने आणि उपोषण यांना सामोरे जावे लागले. वापरलेले निकष राज्य पुनर्रचना कायदा नोव्हेंबर १९५६ मध्ये संसदेत पास करण्यात आला. चौदा राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. त्यामुळेच अनेक राज्यांचा एक नोव्हेंबर हा राज्य दिन असतो. आयोगाने भाषिक ऐक्य हा निकष प्रामुख्याने वापरला असला तरी त्या एकमेव निकषावर पुनर्रचना केलेली नाही. भौगोलिक सलगता, साधनांची उपलब्धता, प्रशासकीय सोय असे इतर घटकही विचारात घेतले. एक भाषा, एक राज्य असे सर्वसामान्य सूत्र असले तरी उत्तरेतील हिंदी भाषिक पट्ट्यात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशी एकाच भाषेची अनेक राज्ये निर्माण केली. दुसरीकडे मुंबई व पंजाबचे विभाजन करायला नकार दिला. नकाशाची पुनर्मांडणी दक्षिणेत मद्रास प्रांतातील मलबार वेगळा केला गेला व त्याला त्रावणकोर-कोचिन संस्थानांना जोडून केरळ राज्य तयार केले गेले. मुंबई, मद्रास, हैदराबाद आणि कुर्ग येथील कन्नड भाषिकांना म्हैसूर राज्याला जोडून कर्नाटक राज्य तयार झाले. कच्छ, सौराष्ट्र व हैदराबादचा मराठी बोलणारा भाग एकत्र करून जुन्या बॉम्बे मधून मुंबई प्रांत तयार झाला. भाषिक पुनर्रचनेची मुख्य मागणी मान्य झाली तरी सगळ्यांचेच समाधान झाले असे नाही. विशेषत: मुंबई प्रांतात असंतोष धुमसू लागला.

मुंबई कोणाची? आयोगाच्या शिफारसींवरून जानेवारी १९५६ मध्ये मुंबई शहरात दंगे उसळले. पोलिसांनी गोळीबार केला ज्यात ८० माणसे मृत्युमुखी पडली. विरोधी पक्षांनी जनमत आपल्या बाजूने वळवून जोरदार संघर्ष सुरू केला. दबावाखाली येऊन केंद्र सरकारने जून १९५६ मध्ये मराठी व गुजराती बोलणाऱ्या लोकांची दोन राज्ये प्रस्तावित करून मुंबई शहराला केंद्राच्या अमलाखाली आणायचे ठरवले. या कल्पनेला जोरदार विरोध झाला. शेवटी जुलै १९५६ मध्ये मुंबईला राजधानी करत बृहद मुंबई असे द्विभाषिक राज्य स्थापन करण्यात आले. हा निर्णयही लोकांनी मनोमन स्वीकारला नाही. मराठी लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समिती तर गुजराती लोकांनी महागुजरात जनता परिषद स्थापन करून चळवळीला सुरुवात केली. चिंतामणराव देशमुख यांनी या प्रश्नावरून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत मराठी माणसांची भावना देशापुढे मांडली. एका दैदिप्यमान पर्वाची ती सुरुवात होती. एकंदरीतच १९५६ हे वर्ष एक संस्मरणीय वर्ष ठरले. -भूषण देशमुख लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत. mata.upsc@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेस्ट कंट्रोलमध्येही ठेकेदारांची बनवेगिरी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने पेस्ट कंट्रोलचा ठेका दिला असतांनाही, शहरातील डासांची संख्या वाढण्याचे गौडबंगाल आयुक्तांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. पेस्ट कंट्रोलचे ठेकेदार फवारणी न करताच बिले काढत असल्याचे समोर आले आहे. पालिकेकडे जमा केलेल्या बिलांची तपासणी केल्यानंतर बिलातील नावे खोटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी दोन्ही ठेकेदारांना नोटfसा काढण्याचे आदेश आरोग्य अधिका-यांना दिले आहेत. योग्य खुसाला सादर केला नाही, तर फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही दिले.

नगरसेवकांनी महासभेत डासांवरून प्रशासनालाच धारेवर धरल्यानंतर आयुक्तांनीच या प्रकरणाची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. पालिकेच्या पथकांनी स्वतंत्रपणे धुरफवारणीची तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर साधली ‘सुवर्ण’संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्षय्यतृतीयानंतर सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून आलेल्या संधीचा फायदा करुन घेत गुरुवारी ग्राहकांनी पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर सोने खरेदी केले. गुरूपुष्यामृतचा योग ग्राहकांनी सोने खरेदी करून साधला. या दिवशी अनेक ग्राहक थोडे तरी सोने खरेदी करतात. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्याने दोन दिवस आगोदरच सराफ व्यावसायिक सज्ज झाले होते. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शक्य झाले नाही त्यांच्यासाठी गुरुवारचा दिवस आनंदाचा ठरला.
गुरुवारच्या दिवशी सर्वार्थ, अमृतसिद्धीसोबतच गजकेसरी असा सुवर्णयोग जुळून आल्याने या दिवसाला आगळे महत्त्व आले होते. यश, सफलता आणि सुख-समृद्धी देणारा हा योग पहाटे ५.५१ वाजेपासून ते रात्री १०.४५ वाजेपर्यंत होता. सोन्या-चांदीसह इतर धातू आणि जमीन, घरांची खरेदी तसेच इतर शुभकार्ये या मुहूर्तावर केल्यास त्यास स्थैर्य मिळून मांगल्य प्राप्त होते. यासाठी ग्राहक चांगली खरेदी करतील, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता, तो सार्थ ठरला. गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सराफानी १ ग्रॅम पासून सोन्याची शुध्द वेढी तयार ठेवली होती त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या स्किम्स देखील बाजारात आणल्या होत्या. काही व्यावसायिकांनी मजुरीवर सूट दिली, तर काहींनी भेट वस्तू दिल्या.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नाशिक शहरात सोन्याचा भाव तीस हजार होता. गुरू पुष्यामृतच्या दिवशी तो खाली येऊन २९ हजार ६०० इतका झाला. चांदीच्या दरात मात्र किलो मागे २ हजार रुपयांनी वाढ झाली. अक्षय्यतृतीयेला ४० हजार रुपये किलो असलेली चांदी गुरुवारी ४२ हजारावार पोहचली होती. तरीही ग्राहकांनी खरेदी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images