Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दहावीची परीक्षा ६०० मार्कांची

0
0
दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याबरोबरच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेच्या मार्कांमध्येही बदल केला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीची बोर्डाची परीक्षा ६५० मार्कांऐवजी ६०० मार्कांची होणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली.

तात्या टोपे बघून घेतील

0
0
स्वत:ला पुढारी म्हणविणाऱ्या नेत्यांचा सामाजिक आणि राजकीय अभ्यास सार्वजनिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. विद्यमान नेता अन् राष्ट्रपुरूष यांच्या नामसाधर्म्यामुळे नेत्याऐवजी राष्ट्रपुरूषाचे नाव बोलण्याच्या त्वेषात कधी घेतले जाते.

बांधकाम मजूर सुविधांपासून वंचित

0
0
बांधकाम कामगारांसाठी नाशिक विभागातून लेबर सेसच्या नावाने २२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. मात्र, त्या कामगारांसाठी कवडीचाही खर्च करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

शाहू बोर्डींगचे अस्तित्व धोक्यात बोर्डींग बचाव

0
0
छत्रपती शाहू महाराजांच्या आशीवार्दाने सुरू झालेले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गंगापुर रोडवरील श्री शाहू छत्रपती बोर्डींगचे अस्तित्व धोक्यात आल्याचा दावा श्री शाहू छत्रपती बोर्डींग बचाव समितीने केला आहे.

साठवण तलावासाठी ठेंगोडाच्या जमिनीची मागणी

0
0
पाणीटंचाईतून कायमस्वरूपी सुटका व्हावी, यासाठी पालिकेने साठवण तलावासाठी ठेंगोडा येथील जमीन मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सुमनबाई दगाजी सोनवणे यांनी दिली.

शहरात १८७२ धोकादायक इमारती

0
0
ठाण्यात अनधिकृत इमारत कोसळून अनेकांचा बळी गेल्यानंतर राज्यभरातच धोकादायक आणि बेकायदा इमारतींचा मुद्दा चर्चिला जात आहे. याच धर्तीवर नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे १८७२ धोकादायक इमारती असल्याची बाब उघडकीस आली आहे.

प्रयोगशाळा ‌तपासणीचा फसलेला प्रयोग

0
0
दीड वर्षांपूर्वी नाशिक विभागीय बोर्डामार्फत हाती घेण्यात आलेली प्रयोगशाळा तपासणी मोहीम अर्ध्यावरच फसल्याचे निदर्शनास आले आहे.

विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हा

0
0
बोलेरो गाडी घेण्यासाठी माहेराहून पैशांची तजवीज करावी, या मागणीसाठी तब्बल तीन वर्षे विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या मालेगावातील सासरच्या कुटुंबाविरुद्ध उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोटरसायकलचोर जाळ्यात

0
0
खबऱ्याने दिलेल्या माहितीचा मागोवा काढत सरकारवाडा पोलिसांनी एका वाहनचोराला सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी सहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत.

कळवण अपघातात तरुण ठार

0
0
अॅपेरिक्षा व हिरोहोंडा मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार टकरीत मोटारसायकलस्वार कर्मा चैत्राम आहिरे (४५) हा युवक जागीच ठार झाला.

डीडीसीसी बँकेवरील निर्बंध उठवले

0
0
धुळे नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीडीसीसी) बँकेवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उठविले असून बँकिंग व्यवहार करण्याचा परवाना पुन्हा बहाल केला आहे. त्यामुळे सुमारे ११ महिन्यांनंतर बँक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य फुलले आहे.

वाळू ठेकेदारांचा प्रशासनाला पुन्हा ठेंगा

0
0
प्रशासनाच्या वाळू ठेका लिलावाला ठेकेदारांनी पुन्हा एकदा ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५१ वाळू ठेक्यांपैकी एकाही ठेक्याचा लिलाव मंगळवारी होऊ शकला नाही.

निकालाचे अपडेट नसल्याने गोंधळ

0
0
परीक्षेनंतर अवघ्या ४५ दिवसांच्या कालावधीत निकाल लागणे अपेक्षित असताना या निकालासाठी तब्बल १३५ दिवस लागले. विद्यार्थ्यांनी इथवरही सोसले खरे; मात्र जाहीर झालेले निकालही त्या दिवशी वेबसाइटवर विद्यार्थ्यांना बघायला न मिळाल्याने त्यांना निकालांसाठी कॉलेजवर अवलंबून रहावे लागले.

BP च्या पंपांवर इंधनटंचाईचे संकट

0
0
भारत पेट्रोलियमशी वाहतुकीच्या दरावरून वाद निर्माण झाल्याने पानेवाडी प्रकल्पातील इंधन वाहतूक करणा‍ऱ्या टँकरचालकांनी सोमवारी रात्रीपासून संप पुकारला आहे. त्यामुळे मंगळवारी एकही टँकर भरला न गेल्याने तब्बल १२ जिल्ह्यांमधील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपांवर आता इंधनटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

लाचखोर PWD इंजिनीअरना अटक

0
0
रस्त्याच्या कामापोटी मंजूर झालेल्या बिलाची रक्कम अदा करण्यापोटी लाच घेणाऱ्या 'पीडब्ल्यूडी'च्या (सार्वजनिक बांधकाम विभाग) दोन इंजिनीअरना 'अँटी करप्शन ब्युरो'च्या पथकाने मंगळवारी अटक केली.

एलबीटी ३१ मे पासून

0
0
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेला एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) ३१ मेपासून नाशिकमध्ये लागू होणार आहे. महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी ही माहिती दिली असून एलबीटीला विरोध करणारे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूर्व प्रभाग समितीचे अधिकारी धारेवर

0
0
अनेकदा सांगूनही कामे होत नसल्याबद्दल पूर्व प्रभाग समितीतील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारवेर धरले. मंगळवारी झालेल्या प्रभाग समितीच्या बैठकीत बहुतांश नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडत अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

बस अपघातात १७ जखमी

0
0
समोरासमोर होणारी धडक वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात मंगळवारी दुपारी एसटी बसमधील १७ प्रवासी जखमी झाले. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील त्र्यंबक विद्या मंदिरलगत असलेल्या वळणावर हा अपघात झाला.

कैदीही घेणार कम्प्युटर प्रशिक्षण

0
0
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून शिक्षा भोगून मुक्त झाल्यावर सुशिक्षित महिला व पुरुष कैद्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी नाशिकरोड कारागृहात कम्प्युटर प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षकांची माहिती संकलित

0
0
एकीकडे नोकरीतून कमाई आणि दुसरीकडे खासगी क्लासेसमधून वरकमाई करणाऱ्या शिक्षकांवर संबंधित शिक्षण संस्थांमार्फत कारवाई होण्याची शक्यता आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत नुकतीच शहरातील अशा चार खासगी क्लास चालकांची माहिती संबंधित शिक्षण संस्थांना देण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images