Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पात्र उमेदवारांची यादी अखेर जाहीर

$
0
0

अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीत पात्र उमेदवारांची यादी शुक्रवारी नवीन निवडणूक निर्णय अधिकारी मधुकर ब्राह्मणकर, राजकुमार जॉली यांनी जाहीर केली. आरोप असलेले सत्ताधारी गटातील निखिल पांचाळ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. विरोधी गटाने उमेदवारी अर्ज दाखल करतांना उपस्थित नसलेल्या उमेश कोठावदे यांचाही अर्ज बाद करण्याची मागणी केली.

सत्ताधारी गटाकडून दबावतंत्र वापरून निवडणूक होत असल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता. तसेच उमेदवारी अर्ज सादर करतांना गैरहजर असल्याने सत्ताधारी गटातील पांचाळ व कोठावदे यांचे अर्ज बाद करण्याची मागणी विरोधी गटाने केली होती. विरोधकांचा रोष पाहून पोलिसांना बोलावण्यात आले होते. सत्ताधाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. तर पांचाळ व कोठावदे यांचे उमेदवारी अर्ज खोट्या सह्या करून सादर केल्याची तक्रारी विरोधी गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी पोलिसांकडे केली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. चंद्रशेखर यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ब्राह्मणकर, जॉली व अॅड. खर्डे यांनी निवडणूक अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. नवीन निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांची बाजू समजावून घेत शुक्रवारी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. पांचाळ यांचा अर्ज बाद झाल्याने विरोधी गटातील कैलास आहेर यांचा अर्ज शिल्लक राहिला आहे. यामुळे आता केवळ २४ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत.

नवा निवडणूक कार्यक्रम पात्र उमेदवारांचा यादी जाहीर झाल्याने निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. अर्ज माघारीसाठी २९ मे पर्यंत मुदत असून ३० मे रोजी माघारीनंतर पुन्हा उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. ५ जून रोजी मतदान होणार असून ६ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी ब्राह्मणकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तृप्ती देसाई यांच्या वाहनावर हल्ला

$
0
0

कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी पुन्हा नाशिकला आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा अॅड. तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुरूवारी रात्री हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. मंदिर प्रवेशासाठी येणाऱ्या अॅड. देसाई यांना सोमवारी दुपारी साडेचारला पंचवटी पोलिस ठाणे येथे आणण्यात आले. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना गुन्हे दाखल करावे, अशी मागणी अॅड. देसाई यांनी केली.

कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी आलेल्या अॅड. देसाई यांना गुरुवारी मंदिरप्रवेश मिळाला होता. मात्र, त्यांना गाभाऱ्यात जाता आले नव्हते. त्यांचा गाभाऱ्यातील प्रवेश रोखल्याचा जल्लोष सुरू असतांना जमावातून काही जणांनी पादत्राणे भिरकावले होते. त्या गर्दीतून त्यांना सुखरुप बाहेर काढून त्यांना पोलिसांनी सिन्नरपर्यंत सुखरूप पोचविले होते. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास त्या पुन्हा मंदिरात प्रवेशासाठी येत असताना पोलिसांनी त्यांना सिन्नरफाटा नाशिकरोड येथे रोखले. नंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्या पुन्हा नाशिकमध्ये आल्या. त्यांचे वाहन रामकुंड परिसरात आल्याचे कळताच जमाव त्यांच्या वाहनावर धावून गेला. अॅड. देसाई वाहनात बसून निघून गेल्या. काही जणांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करीत हल्ला केला. सुंदरनारायण मंदिरानजिक हा प्रकार घडला. या हल्ल्यात अॅड. देसाई यांचे सहकारी जखमी झाले.

पोलिसांचा खडा बंदोबस्त शुक्रवारी सकाळी अॅड. देसाई मंदिरात येणार असल्याचे कळल्याने पुन्हा गर्दी जमू लागली. पोलिसांच्या तीन व्हॅन रामकुंड परिसरात दाखल झाल्या. रात्री घडलेल्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण होते. शासकीय विश्रामगृहात थांबलेल्या अॅड. देसाई मंदिरात कधी येणार, या विषयी मात्र निश्चितता नसल्याने दुपारी एक वाजेनंतर मंदिर परिसरातील गर्दी कमी होत गेली. दुपारी साडेचार वाजता अॅड. देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पंचवटी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांच्याशी सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांच्याशी त्यांची चर्चा सुरू होती. अॅड. देसाई यांच्याकडे हल्ल्याच्या वेळेचे छायाचित्र तसेच चित्रिकरण असल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो लिटर पाणी गेले वाहून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
महात्मानगर पाण्याच्या टाकीसमोरील जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हला अचानक गळती लागल्याने शुक्रवारी सकाळी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. महापालिकेच्या अधिकारीकर्मचाऱ्यांनी माहिती मिळाल्यावर गळती बंद केली खरी. मात्र, एकीककडे शहरात पाणी कपात सुरू असताना सुमारे तीन तासांत हजारो लिटर पाणी वाया गेल्याने हा अपव्यय थांबणार तरी केव्हा, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेने ठिकठिकाणी असलेल्या व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेसमोर जून महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करण्याचे मोठे संकट पहिल्यांदाच ओढावले आहे. मात्र, ठिकठिकाणी होत असलेली पाणीगळती रोखण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अपयश येत असल्याचे येथील प्रकारावरून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रभाग १७ मधील महापालिकेच्या विविध विकासकामांच्या उदघाटनाप्रसंगी जलवाहिन्यांच्या गळतीकडे महापालिकेने विशेष लक्ष देण्याबाबत सूचना केली होती. पाणीगळतीमुळे मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून, स्वतः आयुक्तांनी पाणीगळतीची संपूर्ण माहिती घेऊन ती कशी थांबेल, याबाबत लक्ष घालण्यासदेखील सांगितले होते. परंतु, शहरात पाणीगळतीचे सत्र सुरूच असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे.
गेल्या आठवड्यातदेखील अंबड लिंकरोडवरील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या पाणीगळतीने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला होता. आता पुन्हा महात्मानगर पाण्याच्या टाकीसमोरील वाहिनीच्या एअर व्हॉल्व्हला गळती लागण्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. पहाटे जॉगिंगसाठी निघालेल्या नागरिकांना गळती होत असल्याचे समजले. परंतु, नेमकी तक्रार करावी कुणाकडे, याबाबत माहिती नसल्याने तीन तासांत हजारो लिटर पाणी वाहून गेले. त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गळती लागलेल्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करून गळती बंद केली. सद्यस्थितीतील पाण्याचे महत्त्व ध्यानात घेऊन महापालिकेने शहरातील ठिकठिकाणच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जॉगिंगसाठी पहाटे महात्मानगरच्या रस्त्यावरून जाताना व्हॉल्व्हमधून पाणी कारंजाप्रमाणे उडत असल्याचे आढळले. परंतु, नेमकी तक्रार करावी कुणाकडे, हेच माहिती नसल्याने सुमारे तीन तास पाण्याचा अपव्यय झाला. नंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही गळती थांबविली.
-राजेश जाधव, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकप्रतिनिधींकडूनच पार्किंगचे नियम धाब्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाच्या आवारात पार्किंगला प्रतिबंध असतानाही अनेक जण तेथे सर्रास पार्किंग करीत आहेत. काही नेते व लोकप्रतिनिधीच पार्किंगचे नियम धाब्यावर बसविण्यात आघाडीवर असल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

दुर्गा मंदिराशेजारील प्रशस्त जागेतील कार्यालयाच्या इमारतीच्या दोन्ही बाजूंना पार्किंगची सुविधा आहे. त्यामुळे प्रवेशद्वार आणि इमारतीच्या आवारात पार्किंगला प्रतिबंध आहे. मात्र, तरीही नागरिक व नेते नो पार्किंगच्या फलकापुढेच वाहने उभी करतात. सुरक्षारक्षक खासगी असल्याने त्यांना कोणी जुमानत नाही. काही नेते मंडळी, नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधी स्वतःच पार्किंगचे नियम मोडून आवारातच वाहने उभी करीत असल्याने व महापालिकेचे काही कर्मचारीही त्यात सामील झाल्याने बोलायचे कोणाला किंवा कारवाई कोणावर करायची, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी होणार ‘वेडिंग टाइम्स स्वयंवर’

$
0
0

भावी आयुष्यातील सुयोग्य जोडीदाराची निवड केली तर जीवनात येणाऱ्या असंख्य कटू गोड प्रसंगांना हसत-खेळत सामोरे जाता येतं. त्याच अनुषंगाने हव्या असलेल्या अपेक्षित जोडीदाराची निवड करण्यासाठी खास 'टाइम्स ग्रुप'तर्फे रविवारी (दि. २९) मराठा समाजातील वधू-वरांसाठी 'वेडिंग टाइम्स स्वयंवर' या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास खा. हेमंत गोडसे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लव मॅरेजवर अधिक विश्वास असलेल्या यंग जनरेशनला बऱ्याचवेळा आपण चुकीचा निर्णय घेतल्याचा पश्चाताप होतो आणि आपण अरेंज मॅरेज केले असते तर चांगले असते अशी भावना मनाला टोचून जाते. म्हणूनच 'टाइम्स ग्रुप'तर्फे 'वेडींग टाइम्स स्वयंवर'चे आयोजन केले आहे. सावरकर नगर, गंगापूररोड येथील विश्वास लॉन्स येथे दुपारी ४ वाजता स्वयंवर सुरू होणार आहे. मागील वधू-वर मेळाव्याला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे ‌अनेक विवाह जमले आहेत. मेळाव्यानंतर सुध्दा लग्न जमण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. यात वधू-वर मोफत यादी दिली जाणार आहे. 'अनुपम शादी डॉट कॉम'च्या माध्यमातून नोंदणी झालेल्या सदस्यांना यात सहभागी होता येईल. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील सदस्यनोंदणी केली जाणार आहे. मेळाव्यात मुंबई, पुणे आणि नाशिकचे वधू-वर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये रूपवर वधू-वरांना त्यांची ओळख, माहिती सांगून आपल्या जोडीदाराबद्दल असणाऱ्या अपेक्षा व्यक्त करता येणार आहे. तसेच मराठा समाजाच्या रुपवर वधू-वरांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार निवडता येणार आहे. यात ग्रॅज्युएट, डॉक्टर, इंजिनीअर, डिप्लोमा, डिग्री, डॉक्टरेट, आयटी सेक्टर अशा विविध क्षेत्रातील उच्चशिक्षीत उमेदवार सहभागी होणार आहेत. या वधू-वर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून नोंदणीसाठी अनुपम शादी डॉट कॉम,‌ शितल कॉम्प्लेक्स, अंजली प्लायवुडमागे, द्वारका, नाशिक मोबाइल क्रमांक ८३७८९१०९९९ / ८२७५०१६५०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वालदेवीतून उपसला २०० ट्रक गाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

शिवसेना व महिला जलपंचायतीतर्फे हाती घेण्यात आलेल्या वालदेवी स्वच्छता मोहिमेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशी दोन पोकलेन मशीनच्या सहाय्याने सुमारे २०० ट्रक गाळ उपसण्यात आला. संपूर्ण दिवसभर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
विहितगावाच्या बाजूकडील वालदेवी नदीपात्र शुक्रवारी रोकडोबावाडी पुलापर्यंत स्वच्छ करण्यात आले. येथून सुमारे २०० ट्रक गाळ काढण्यात आला. हा उपसण्यात आलेला कचरामिश्रित गाळ पोकलेनच्या सहाय्याने नदीच्या काठावर टाकण्यात आला आहे. या स्वच्छता मोहिमेनंतर या नदीकाठाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडही करण्यात येणार असून, नागरिकांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मोहिमेदरम्यान सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, योगेश गाडेकर, सुनील देवकर, श्याम खोले, नितीन चिडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविले

$
0
0

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून दसक येथील नियोजित स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.

दसक गावात दशनाम गोसावी समाजाची नियोजीत स्मशानभूमी आहे. तेथे दहा ते १५ वर्षांपासून २५ ते ३० पत्र्याची बेकायदेशीर घरे होती. घरमालकांना महापालिकेने तोंडी व लेखी कळवून अतिक्रण हटविण्याची सूचना केली होती. परंतु, ती न काढल्याने शुक्रवारी उपआयुक्त आर. आर. एम. बहिरम यांच्या नेतृत्वाखाली विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, अधीक्षक एस. एन. वसावे, महेंद्र पगार, अन्य विभागाचे विभागीय अधिकारी यांनी अतिक्रमण हटवले. दोन बुलडोझर, दोन जेसीबी, सहा ट्रक, दोन डंपर त्यांच्या मदतीला होते. उपनगरचे पोलिस निरीक्षक अशोक भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

गंधर्वनगरीत मोहीम देवळाली स. नं. १२२ /१/२/९ प्लाट क्रमांक नऊमधील धरती सोसायटी (गंधर्वनगरी) या इमारतीतील निवृत्ती पवार यांचे विटबांधकाम, सिमेंट पत्रे व छताचे बांधकाम, रोहिदास घोडेराव यांची तळमजल्यावरील विटबांधकाम खोली, जे. एन. निरभवणे यांची तळमजल्यावरील विटबांधकामातील खोली, संतोष चिंधे यांचे दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचे पत्रे व अँगल वापरून केलेले खोलीचे बांधकाम, गंगाराम पटेल यांचे तळमजल्यावरील कौलारू शेड तसेच १५ फुट सुरक्षा भिंत अतिक्रमणात होती. या फ्लॅटधारकांनी स्वत:हून ही बांधकामे काढून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसेंच्या हकालपट्टीसाठी ‘आप’ची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दाऊद इब्राहीम संभाषणप्रकरणी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांनी केली आहे. खडसे यांच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

यावेळी खडसे तसेच राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खडसे यांचे कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहीम याच्याशी संबंध असल्याचे 'आप' ने उघडकीस आणले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खडसे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय समिती स्थापून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. आंदोलनात जितेंद्र भावे, विनायक येवले, अॅड. प्रभाकर वायचळे, किरण अहिरे, स्वप्नील घिया, एकनाथ सावळे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत बांधकामांवर ‘खासगी’ हातोडा

$
0
0

शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्यासाठी खासगी ठेकेदारांना काम न देण्याचा महासभेचा ठराव शासनाने विखंडित केला आहे. शासनाच्या या हस्तक्षेपामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. महासभेचा ठराव विखंडित झाल्याने आता शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कामे खासगी ठेकेदारांना प्रशासनाला देता येणार आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील महापालिकेची मोहीम व्यापक होणार आहे. यातून अनधिकृत बड्या इमारतींसह पक्की बांधकामे तोडणे महापालिकेला शक्य होणार असल्याने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासह अतिक्रमण मोहीम राबविण्यासाठी महापालिकडे पुरेशी यंत्रणा नाही. एका उपायुक्तासह १० ते १५ कर्मचारीच अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे आहे. इमारतींवर अनधिकृत मजले चढवणे, गॅलरी बांधून घेणे, पार्किंगमध्येच प्लॅट काढणे, सामासिक अंतरातच पक्की बांधकामे करण्याचे प्रकार वाढले आहे. अनधिकृत बांधकामाच्या जवळपास ८२९ तक्रारी महापालिकेकडे पडून आहेत. परंतु, ही पक्की बांधकामे तोडण्याची यंत्रणाच महापालिककडे नाही. त्याचा थेट फायदा अनधिकृत बांधकाम करणारे घेत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणाच नसल्याने शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याची कामे खासगी कंपनीकडून करून घेण्याचा प्रस्ताव आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महासभेसमोर ठेवला होता. जवळपास वर्षाला सव्वा कोटी रुपये देवून संबंधित ठेकेदाराला देवून त्याच्याकडून हे काम करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

आयुक्तांनी महासभेवर ठेवलेल्या या प्रस्तावाला नगरसेवकांनी विरोध केला होता. जवळपास चार महासभांमध्ये प्रशासनाकडून हा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात येत होता. परंतु, प्रत्येक वेळेस सत्ताधाऱ्यांकडून हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात येत होता. हा प्रस्ताव मंजूर केल्यास ठेकेदारांची मुजोरी व दादागिरी वाढून सर्वसामान्यांना त्याचा त्रास होईल, असा दावा नगरसेवकांसह सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. अखेरीस महापौरांनी महासभेत हा अनधिकृत बांधकामे खासगी ठेकेदारामार्फत काढण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे प्रशासनाला आहे त्याच यंत्रणेकडून शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहीम सुरू करावी लागली.

महासभेने अनधिकृत बांधकामे तोडण्याचा फेटाळलेला ठराव प्रशासनाकडून सरकारकडे विखंडनासाठी पाठविण्यात आला होता. नगरविकास विभागाने या ठरावावर युक्तीवाद घेत, प्रशासनाच्या बाजूने कौल दिला. महासभेचा ठराव विखंडित करत, प्रशासनाला खासगी ठेकेदारामार्फत अनधिकृत बांधकामे पाडण्याची मुभा दिली आहे. हा ठराव विखंडित झाल्याने आयुक्तांना आता खासगी ठेकेदारामार्फत अनधिकृत बांधकामा विरोधातील मोहीम सुरू करता येणार आहे. नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.

गल्लीबोळातही फिरणार हातोडा शहरातील नागरिकांच्या महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या ८२९ तक्रारींवर काम सुरू केले आहे. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महापालिकेने सध्या १५ दिवस नवीन व १५ दिवस जुन्या तक्रारींवर काम सुरू केले आहे. परंतु, आता खासगी ठेकेदारांनाही काम देता येणार असल्याने अतिक्रमण निर्मूलन विभाग केवळ रस्त्यांच्या अतिक्रमणावरच लक्ष देणार आहे. तर खासगी ठेकेदारांकडून अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहीम व्यापक केली जाणार आहे. त्यामुळे या तक्रारींचा निपटारा जोमाने होवून मोठ्या इमारतींसह गल्लीबोळातील अनधिकृत बांधकामे तोडता येणार आहे. त्यामुळे बिल्डरांसह अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचेही धाबे दणाणणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये मिळणार ब्रोमेट फ्री ब्रेड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ब्रेडनिर्मिती करताना पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या घटकांचा वापर न करण्याचा निर्णय ब्रेड निर्मात्यांची ‌शिखर संघटना असलेल्या ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने घेतल्यानंतर नाशिकमध्ये सुध्दा त्याची अंमलबजाणी सुरू झाली आहे. ब्रेड, पाव यांच्या बहुतांश नमुन्यांमध्ये कॅन्सरकारक घटकांचा अंश आढळल्याने खळबळ निर्माण झाल्यानंतर ब्रेड कंपन्यानी हे पाऊल उचलले आहे.

नाशिकमध्ये ब्रेड निर्मात्यांनी शुक्रवारपासून आपल्या ब्रेड व पावमध्ये ब्रोमेट वापर बंद केले आहे. शहरातल्या काही ब्रेड निर्मात्यांनी आम्ही पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट यांचा वापर अगोदरपासूनच करीत नसल्याचे सांगितले. शहरात जहागिरदार, बाबा साई, माझदा, मेघराज, अभिषेक हे आघाडीचे बेकरी प्रॉडक्ट करणारे आहेत. तर, छोट्या प्रमाणात ब्रेड निर्माण करणाऱ्या बेकरीची संख्याही मोठी आहे.

दिल्लीत सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंटने (सीएसई) केलेल्या एका अभ्यासात बड्या ब्रॅण्डसह ब्रेडच्या ८४ टक्के नमुन्यांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या घटकांचा अंश आढळला होता. यापैकी पोटॅशियम ब्रोमेट अपायकारक असून, पोटॅशियम आयोडेट हे थायरॉइड विकारास कारणीभूत ठरू शकते, असा सीएसईचा दावा आहे. त्यामुळे देशभर ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने हे दोन्ही पदार्थ न वापरण्याचा निर्णय घेतला व नाशिकच्या ब्रेडनिर्मात्यांनी त्याची तातडीने अंमलबजाणी केली.

नाशिकमध्ये आम्ही पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या घटकांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. - पवन चांदवाणी, बाबा साई बेकर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबीसी घोटाळ्याच्या तपासाची दैना!

$
0
0

हार्डडिस्क कलिनाला, चव्हाण नांदेडला अन् सीए येईना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे लक्ष लागलेल्या केबीसी घोट्याळाचा तपास सध्यातरी हेलकावे खातो आहे. सीआयडीने जप्त केलेली महत्त्वाची कागदपत्रे व हार्डडिस्क मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पडून आहेत. चव्हाणने तोंडी दिलेल्या माहितीची शहानिशा होत असताना त्याची रवानगी नांदेडला झाली. या सगळ्यावर कळस म्हणजे उपलब्ध माहितीची तपासणी करण्यासाठी पुढे येणाऱ्या सीएंना देण्यासाठी पोलिसांकडे पैसेच नाही. राज्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या केबीसी घोटाळ्याचा तपास अडखळत चालल्याचे चित्र सध्यातरी दिसून येते.

राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची २१० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक करणाऱ्या भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण या दाम्पत्याकडे सध्या नांदेड पोलिस चौकशी करीत आहेत. सन २०१४ मध्ये उघडकीस आलेल्या या घोटाळ्याचा सुरुवातीला तपास पोलिसांनी केला. नंतर तपासाचे घोगडे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या गळ्यात घालण्यात आले. भाऊसाहेब चव्हाणला याच महिन्यातील ६ मे रोजी अटक झाली. त्यापूर्वी बरोबर आठ दिवसांपूर्वी हा तपास शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासाची दिशा वेळोवेळी बदलत गेल्याने आता अनेक महत्त्वपूर्ण पुराव्याची शोधाशोध करण्याची वेळ शहर पोलिसांवर आली आहे. सीआयडीने तपासाच्या पहिल्या टप्प्यातच केबीसी घोटाळ्याशी संबंधित कम्प्युटरच्या हार्डडिस्क तसेच कागदपत्रे जप्त केली. यातील, हार्डडिस्क मुंबईतील कलिना येथील फॉरेनिस्क लॅबमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. यास आता दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. सदर हार्डडिस्कमध्ये कंपनीची अनेक महत्त्वाची माहिती आहे. या हार्डडिस्कमधील माहितीबाबत अनभिज्ञ असलेल्या शहर पोलिसांची मात्र फरफट होत आहे. सदर हार्डडिस्क परत मिळाव्या म्हणून सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू असून, त्याचाही फायदा झालेला नाही.

मानधनाच्या पैशांची अद्याप तरतूद नाही

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांच्या कालावधीनंतर सिंगापूरहून परतलेल्या चव्हाणकडे तितकीशी माहिती नाही. त्याने तपासामध्ये दिलेल्या माहितीनुसार तसेच आपण जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तपासाचा काटा पुढे सरकला. मात्र जमा रक्कम, खर्च रक्कम, हवाला रॅकेटमध्ये वापरलेला पैसा, एजंटांनी परस्पर दाबलेला पैसा याचा काडीमात्रही संबंध सध्यातरी जुळत नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. हा तपास अधांतरी असून, चार्टड अकाउंटंटच्या मदतीने या घोटाळ्याच्या व्याप्तीवर काही प्रमाणात प्रकाश पडेल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. मात्र, यासाठी चार्टड अकाउंटंटला मानधन म्हणून देण्यासाठी ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे. दुर्दैवाने तशी तरतूदच नसल्याने हे कामदेखील रखडल्याची खंत संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्यातील निकाल शंभर टक्के

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरासह जिल्ह्यातील सर्व सीबीएसई पॅटर्न शाळांचा ऑनलाइन निकाल शनिवारी (दि. २८ मे) दुपारी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

शहरातील केंद्रीय विद्यालयाचा सलग चौथ्यावर्षी निकाल शंभर टक्के लागला. या परीक्षेत रागिणी सहदेव चतुर्वेदी हिने ९.२ सीजीपीए ग्रेड मिळवून प्रथम क्रमांक, रोशनी पाटील आणि हितेश निकम याने ९ सीजीपीए ग्रेड मिळवून द्व‌ितीय क्रमांक प्राप्त केला. या परीक्षेसाठी एकूण ३३ विद्यार्थी बसले होते.

तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूलचाही निकाल शंभर टक्के लागला. यात खुशी अग्रवाल हिला १० सीजीपीए ग्रेड प्राप्त झाली. तर शैलेश चव्हाण याला ९.६ सीजीपीए ग्रेड प्राप्त झाली. शंभर टक्के निकाल लागणाऱ्या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल, शिरपूर तालुक्यातील दहीवद येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलचा समावेश आहे. या शाळेतील रागिणी पाटील, शिवकुमार पाटील व सौरभ गावीत या तिघांनी प्रत्येकी १० सीजीपीए ग्रेड मिळवून धुळे जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेवीदारहित बैठकीचा पडला विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या नागरी सहकारी बँका, ठेवीदारांच्या बुडालेल्या ठेवी अशा प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दरमहा सहकारविषयक कृती समितीची बैठक होणे गरजेचे आहे. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून या बैठकीला मुहूर्तच लागू शकलेला नाही.

पाठोपाठ आलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका, सिंहस्थ कुंभमेळा, ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुका अशा अनेक कारणांमुळे या बैठका घेण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे.

बँका डबघाईला गेल्या की गुंतवणूकदारांचाही जीव टांगणीला लागतो. थकीत कर्जदारांवर कारवाई व्हावी आणि कर्जाची वसुली करण्यासाठीची दिशा ठरावी, यासाठी सहकार खात्याने चार वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती समितीची स्थापना केली. त्यामध्ये जिल्हा उपनिबंधक सदस्य सचिव आहेत. ही बैठक लोकशाही दिनाच्या दिवशी होत असे. मात्र तिचा फायदा होत नसल्याने ही समिती बरखास्त करा असे पत्र तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सहकार सचिवांना लिहिले होते. तेव्हापासून ही बैठक होऊ शकलेली नाही. दीपेंद्रसिंह कुशवाह यांचा वेळी निवडणुका, सिंहस्थ कुंभमेळा यामध्ये गेला. आता जिल्हाधिकारी राधाकृष्णन. बी यांनी या बैठका नियमित घ्याव्यात, अशी विनंती समितीचे सदस्य पां. भा. करंजकर यांनी केली आहे.

जिल्ह्यातील पीपल्स बॅँकेवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले असून, अन्य बॅँकाही अडचणीत आल्या आहेत. हे निर्बंध बॅँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांवर असून, त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम बँकेतून परत मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. श्रीराम बॅँक, कपालेश्‍वर, क्रेडिट कॅपिटल तसेच अन्य अनेक पतसंस्थांची अशीच अवस्था झाल्याने ठेवीदारांपुढील अडचणी वाढल्या आहेत. ठेवीदारांच्या हितासाठी तसेच बॅँका, पतसंस्थांच्या मनमानीपणाला चाप लागावा यासाठी या बैठका घ्या, अशी मागणी करंजकर यांनी केली आहे.

बैठकीचा उद्देश या समितीची दरमहा बैठक घेऊन कर्जदार संचालक व पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, याचा आढावा सादर करणे, किती वसुली झाली याची माहिती समितीपुढे ठेवणे, वसुलीसाठी पोलिसांची मदत घेणे किंवा गुन्हे दाखल करण्यासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करणे यांसारख्या विषयांवर पाठपुरावा होणे आवश्यक असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीचे फेक मेसेज व्हायरल

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सदर निकालानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. सदर मेसेजची पडताळणी करण्यासाठी अनेकांनी मेसेजमधील संकेतस्थळावर भेटी दिल्या आहेत. मात्र तेथे कोणत्याही प्रकारची या योजनांबाबत माहिती अपलोड नसल्याचे दिसून येते.

'दहावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेऊन ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारद्वारे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम आणि भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने शिष्यवृत्ती देणार आहेत. त्या संबंधित सगळी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.' हा व्हायरल होणार मेसेज आहे. संबंधित लिंकवर मात्र कोणत्याही प्रकारची माहिती अपलोड नसल्याचे दिसून येते. यामुळे नेमका हा मेसेज खरा की खोटा असा सवाल विद्यार्थी आणि पालक करत आहेत. गेल्या महिन्यात देखील हा मेसेज व्हायरल झाला होता. मात्र निकालानंतर हा मेसेज अधिकाधिक व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.

मेसेजमध्ये म्हटल्याप्रमाणे अशी कोणतीही शिष्यवृत्ती सरकारकडून जाहीर झाली नसल्याची माहिती वजा स्पष्टीकरण शिक्षण खात्याकडून मागील महिन्यातच देण्यात आले होते. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लवकरच दहावीचा निकाल सुद्धा जाहीर होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र शिक्षण खात्यानेच हे स्पष्टीकरण दिल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर वेबसाइट आर्मीची..!

-www.desw.gov.in ही वेबसाईट सदर मेसेजमध्ये देण्यात आली आहे. ही वेबसाईट एक्स-सव्हिर्स मॅन वेल्फेअर विभागाची आहे. या वेबसाईटवर मोदींच्या नावे देण्यात आलेल्या सर्व योजना या फक्त सैनिकी शाळा आणि सैनिकांच्या पाल्यांसाठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा पॉवर’मुळे उद्योगांना चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मँन्युफँक्चरर्स असोसिएशन (निमा) आयोजीत निमा पॉवर २०१६ या प्रदर्शनात उद्योगवाढीसाठी चालना मिळणार, असा विश्वास विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी व्यक्त केला.

निमा पॉवर प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. २७ ते ३० मे दरम्यान भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला हजारो नाशिककरांनी भेट देत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.

प्रदर्शनामुळे नाशिकच्या उद्योगांना चालना मिळणार असल्याने उद्योजकांनी संधीचा निश्चितच फायदा घ्यावा, असे आवाहन डवले यांनी केले. इलेक्ट्रानिक व इलेक्ट्रीकल हब म्हणून नाशिक विभाग नव्याने उद्यास आला असून एचएएलसारख्या नामांकीत कंपनीचे सुटे पार्ट निर्माण करणारे उद्योजक तयार झाले पाहिजेत असेही ते म्हणाले.

दरम्यान, या प्रदर्शनाला नाशिककरांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल निमाचे अध्यक्ष संजीव नारंग यांनी आभार मानले. निमा पॉवर प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी छोट्या व मध्यम उद्योगांना निमा पॉवरमुळे नक्की चालना मिळणार असल्याचे सांगतिले. सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी निमाचे माजी अध्यक्ष निशीकांत आहिरे, धनंजय बेळे, सतीश कोठारी. विरल ठक्कर, राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टीडीआर भूसंपादनाला हिरवा कंदील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील दोन डीपी रस्त्यांच्या भूसंपादनासाठी सव्वा कोटीचा निधी देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली असून ४० कोटीचे प्रस्ताव स्थग‌ीत ठेवण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील क्रिडांगणासाठी ५६ कोटी रुपये दिले असतांना देवळाली शिवारातील क्रिडांगणासाठी २५ कोटी देण्याचा प्रस्तावाचा स्थगीत ठेवण्यात आला.

दरम्यान, प्रथमच दोन रस्त्यांच्या जम‌िनीचे भूसंपादन करण्यासाठी टीडीआर देण्याच्या प्रस्तावालाही स्थायी समितीने मंजुरी दिली. विकासकामांचे विषयही मंजूर करण्यात आले आहेत.

सभापती सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. त्यात भूसंपादनाच्या विषयांवरून विरोधक व मनसेचे सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. नगरसेवक दिनकर पाटीलसह शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी भूसंपादनाच्या प्रस्तावांना विरोध करत निधी कुठून आणणार असा सवाल केला. तर शेतकऱ्यांच्या जम‌िनींचे पैसे द्यायचे नाहीत काय? असा सवाल मनसेच्या अशोक सातभाई यांनी केला. सभापतींनी या विषयावर दीर्घ चर्चा करत डीपी रस्त्यांच्या भूसंपादनाचे सव्वा कोटीचे दोन विषय मंजूर केले. तसेच देवळाली शिवारातील क्रिडांगणासाठी २५ कोटी देण्याचा, चिल्ड्रन पार्कसाठी ११ कोटी, विहीतगाव शिवारातील डीपी रस्त्यासाठी अडीच कोटी असे तब्बल चाळीस कोटीचे प्रस्ताव स्थगीत ठेवले. आडगाव व आगरटाकळी येथील दोन रस्त्यांच्या कामांसाठी टीडीआर देण्याचा प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंढेंचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

कोर्टात सुनावणीसाठी आणलेल्या कैद्यांना पाण्याच्या बाटलीतून मद्य देण्याचा प्रयत्न करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी (दि. ३ जून) सुनावणी होणार आहे.

सातपूर परिसरातील स्वारबाबानगर येथील नगरसेवक लोंढेंच्या पीएल ग्रुपच्या कार्यालयात तडीपार आणि सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड व निखील गवळे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींची मंगळवारी (दि. २४ मे) कोर्टात सुनावणी होती. तेथे कैदी पार्टी म्हणून पोलिस मुख्यालयातील कर्मचारी तैनात होते. त्यावेळी नगरसेवक लोंढे यांनी पोलिसांच्या वाहनात बसलेल्या संशयित आरोपींना पाण्याच्या बाटलीमधून मद्य देण्याचा प्रयत्न केला. कैदी पार्टीत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी संदीप आहेर यांनी लोंढे यांना विरोध केला. लोंढे यांनी आहेर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. यामुळे आहेर यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये लोंढे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाला तेव्हापासून लोंढे पसार आहे. अटक टाळण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सोमवारी (दि. ३०) त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीत घरात घुसून महिलेला दमदाटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलेच्या घरात घुसून तिला दमदाटी केल्याचा प्रकार भद्रकाली परिसरातील जुने टॅक्सी स्टँड जवळ घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मांतगवाडा परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली. संशयित सचिन लहू निरभवणे, जनाबाई लहू निरभवणे आणि लहू निरभवणे (सर्व रा. जुने टॅक्सी स्टँड) अशी संशयितांची नावे आहेत. रविवारी (दि. २९ मे) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते तिघे जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसले. तिला शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाण केली.

पेट्रोलपंपावर चोरी पेट्रोलपंपावर पैशांचा हिशेब करतेवेळी एका संशयिताने लबाडीने रोकड चोरून नेली. पंचवटीतील गुडअर्थ पेट्रोलपंपावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये काशिनाथ गंगाराम कुकडे यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटल्यानुसार ते स्वप्नील सुभाष चिखले याच्यासह पेट्रोलपंपावरील पैशांचा हिशेब करीत होते. त्यावेळी संशयित काळू पगारे तेथे आला. त्याने कुकडे यांची नजर चुकवून लबाडीने त्यांच्याकडील तीन हजार ५०० रुपये रोकड चोरून मोटरसायकलवरून पोबारा केला.

नवविवाहितेचा मृत्यू सातपूर परिसरात राहणाऱ्या नवविवाहितेचा भाजल्याने मृत्यू झाला. सोनी संदीप प्रजापती (वय १८, रा. क्रांतीचौक, सातपूर) असे तिचे नाव आहे. विवाहिता २५ मे रोजी घरात ५४ टक्के भाजली होती. सया प्रकरणी सातपूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संशयितांना अटक दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन फरार संशयितांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ताब्यत घेतले आहे. नितेश ऊर्फ बाब्या अजय सुरजाशे (रा. क्रांतीनगर, पंचवटी), संभाजी विलास कवठे (रा. एकतानगर, म्हसरूळ) आणि रवि निवृत्ती पारधी (रा. हनुमानवाडी) अशी त्यांची नावे आहेत. हे तिनही सराईत गुन्हेगार आहेत. बुधवारी (दि. २५ मे) रोजी मध्यरात्री सरकारवाडा पोलिसांनी सापळा रचून त्र्यंबकरोडवरील वेद मंदिरासमोरील परिसरातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील विकी दत्तात्रय काळे (२०, रा. रामवाडी), वैभव सुनील त्रिकोणे (२०, रा. रविवार पेठ) याच्यासह एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे मंत्र्यांकडून कौतुक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पंचवटी येथील वाघ खूनप्रकरणी शनिवारी मध्यरात्री स्विफ्ट कारमधून पळणाऱ्या दोघा संशयित आरोपींना शिताफीने पकडणाऱ्या येवला शहर पोलिस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांची पालकमंत्र्यांनी थोपटली पाठ थोपटली आहे.

शनिवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब टिळे, योगेश हेंबाडे व राजेंद्र बिन्नर या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून पालकमंत्र्यांनी तिघांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला.

शिताफीने पकडले संशयित

पोलिस कॉन्स्टेबल टिळे, बिन्नर व हेंबाडे हे तिघेही नाशिक-औरंगाबाद तसेच मनमाड-नगर या दोन राज्य महामार्गावरील महत्त्वाच्या अशा येवला शहरातील विंचूर चौफूलीवर शनिवारी मध्यरात्रीची नाकाबंदी करत होते. नाशिकमधील पंचवटी भागात दोन युवकांना दगडाने आणि लाकडी दांड्याने मारून मर्डर केला गेला आहे. तर आरोपी स्विफ्ट गाडी नंबर (एम.एच.-१५, डी.एस. ९७९९) हिच्यात फरार झाले असल्याची माहिती या तिघा पोलिसांना मिळाली. तिघेही सतर्क होऊन पोलिस फ्रेंड व्हाट्सअॅप ग्रुपवर असल्याने त्यांनी चौफुलीवर वाहनांची तपासणी सुरू केली होती. रात्री नाकाबंदी दरम्यान अडीचच्या सुमारास या तिघा पोलिसांनी पळून जाणाऱ्या मयुर कानडे व श्रीनिवास कानडे या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचनासाठी उभारणार चाळीस हजार कोटींचा निधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राज्य सरकार राज्यातील सिंचनासाठी चाळीस हजार कोटी रुपये निधी उभारणार आहे. या निधीतून जलसंपदा विभागाकडून बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचनप्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

खासदार भामरे यावेळी म्हणाले की, बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा-डावा कालवा, तळवाडे भामेर पोहच कालवा, केळझर चारी क्रमांक आठ यासारखी सिंचनाची कामे गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित आहे. सदरचे प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने तांत्रिक मंजूरी मिळवून जलसंपदा विभागाकडून प्रकल्पांना निधी उपलब्ध करून येत्या तीन वर्षांत सरकार दरबारी पाठपुरावा करून बागलाण तालुका सुजलाम-सुफलाम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही ते खासदार भामरे म्हणालेत. करंजाड येथे बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांची परिषद आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गिरीश जगताप होते. व्यासप‌िठावर बागलाणचे आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, द्वारकाधीश साखर कारख्यान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र पाटील, नारायण कोर, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, सुनीता पाटील, डॉ. विलास बच्छाव, यशवंत अहिरे, राघो अहिरे, अशोक सूर्यवंशी, नानाजी दळवी, लालचंद सोनवणे, सुभाष नंदन, केदा जाधव, अॅड. पंडित भदाणे, सोमनाथ ब्राम्हणकार, अॅड. सरोज चंद्रात्रे होते. प्रास्ताविक सचिन सावंत यांनी केले. परिषदेस धर्मराज खैरनार, महेंद्र भामरे, संजय भामरे, केदा काकुळते, परशुराम अहिरे, केशव पाटील, अण्णा जगताप, यशंवत अहिरे, दीपक पगार, संजय वाघ, नानाजी दळवी, भिका सोनवणे, भरत कापडणीस, सरला अहिरे, शिवाजी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images