Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेनकोट घोटाळा विधानसभेत

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विभागातील वादग्रस्त रेनकोट खरेदीचा घोटाळा विधानसभेत गाजला. या गैरव्यवहार प्रकरणी विरोधी पक्षांनी बुधवारी संबंधित विभागाचे मंत्री विष्णू सावरा यांची विधानसभेत चांगलीच कोंडी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेनकोट घोटाळ्याचे पुरावे देऊन सर्व खरेदींच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली. तर आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी सारवासारव करत चौकशीचे आश्वासन दिले. 'मटा'ने यासंदर्भातले वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विधानसभेत याची दखल घेण्यात आली.

आदिवासी विकास विभागातील वादग्रस्त रेनकोट खरेदी संदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर बोलताना विखे पाटील यांनी सावरा यांच्या विभागाचा चांगलाच समाचार घेतला. यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले,'या विभागातील अनेक खरेदी प्रक्रिया नियमबाह्य असून, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात रेनकोटचा पुरवठा करण्यासाठी ई-निविदा मागव‌िण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक संस्थांनी निविदा भरल्या. मात्र १६ जून २०१६ रोजी आदिवासी विभागाच्या सचिवांनी सर्व निविदा रद्द करुन रेनकोट खरेदीचे अधिकार मुख्याध्यापकांना दिले. परंतु, मुख्याध्यापकांना दिलेले हे अधिकार नाममात्रच होते. प्रत्यक्षात वरिष्ठ स्तरावर लागेबांधे असलेल्या एकाच पुरवठादाराने मुख्याध्यापकांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव आणून बोगस नावाने वेगवेगळी दरपत्रके सादर केली आणि ती मान्य करण्यास बाध्य केले. ज्या पुरवठादारांनी दरपत्रके दिली, ते पुरवठादार बनावट आहेत. त्यांच्या लेटरपॅडवरील पत्ते अस्तित्वात नसल्याने हे पुरवठादारही अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट होते, असे सांगून विखे पाटील यांनी सदर पुरवठादारांनी दिलेले पत्तेच बोगस असल्याचे पुरावे दाखवले. या संदर्भात उच्च न्यायालयाने २४ जून २०१६ रोजी सुनावणी घेऊन ४ जुलै २०१६ पर्यंत रेनकोट खरेदीला स्थगिती दिली. तरीही काही ठिकाणी रेनकोट खरेदी करण्यात आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील या खरेदीवर ताशेरे ओढल्याचे विखे पाटील यांनी पुराव्यासह सांगितले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेत रंगली जुगलबंदी

$
0
0

शिवसेनेत रंगली जुगलबंदी म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर पुन्हा आक्रमक झाले असून बुधवारच्या महासभेत त्यांनी एलईडीची पोलखोल करतांनाच आप्तस्वकीयांवर चांगलेच वार केले. आप्तस्वकीयांच्या मदतीने संजय खंदारे व डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, संकट ही संधी असते आणि तिच आपल्याला मिळाल्याचे सांगत एलईडी प्रकरणात सर्वात जास्त विरोधाचे पत्र आपले होते, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणात सर्वांचीच चौकशी करा, असे सांगून त्यांनी शिवेसनेतील काही नेत्यांवर निशाणा साधला. तर

गटनेता अजय बोरस्ते यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून सत्य बाहेर आणण्याचे आवाहन केले.

सुधाकर बडगुजर अतिक्रमण प्रकरणात अडचणीत आल्यानंतर शिवेसना नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर राखले होते. संपर्क प्रमुखांचा पुतळा जाळण्याच्या प्रकरणातही त्यांच्यावर ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, डॉ. प्रवीण गेडाम यांनी थेट त्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करत त्यांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्यामुळे बडगुजर यांनी मधल्या काळात आस्ते कदमचे धोरण स्वीकारले होते. परंतु, डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीने त्यांच्यावरील पुढील संकट काहीसे टळले आहे. तर खंदारे यांनी त्यांच्या बडगुजर अँड बडगुजर कंपनीशी संबध असल्यावरून कारवाई सुरू केली होती.

बुधवारी महासभेत खंदारे यांचेच कारनामे उघड झाले. तर गेडामांची बदली झाली आहे. त्यामुळे बडगुजर यांनी या दोन्ही आयुक्तांसह त्यांना मदत करणाऱ्या आपल्या स्वपक्षीयांवर वार केले. आयुक्तांना भेटल्यावर ते मला सांगायाचे, तुमचेच आप्तस्वकीय लोक पाणी ओततात, असा खुलासा बडगुजर यांनी केला. माझ्यावर संकटे आली. परंतु, मी शांतपणे सहन केली. माझे नुकसान करणाऱ्यांचे काय झाले, असे सांगून या प्रकरणात आगरकरच नव्हे तर सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींचीही चौकशी करा, अशी मागणी केली. एलईडी प्रकरणात रस घेतलेल्या शिवसेनेतील काही नेतेही यामुळे उजेडात येतील, असा टोलाही बडगुजर यांनी लगावला.

बडगुजरांच्या या अनपेक्षित हल्ल्याला गटनेता अजय बोरस्ते यांनीही जशास तसे उत्तर दिले. या प्रकरणाची चौकशी पालिका स्तरावर न करता थेट सीबीआय मार्फत करा, अशी मागणी त्यांनी केली. सीबीआय चौकशीत कोणाच्या कंपन्या असतील व कोण दोषी असतील ते समोर येईल, असे सांगत त्यांनी बडगुजरांच्या आरोपाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बडगुजर व बोरस्ते यांच्यातील कलगीतुरा मात्र चांगलाच चर्चीला गेला.

काँग्रेसचे मनसेला चिमटे बुधवारच्या महासभेत पर्यावरण विषयक अहवाल सादर करण्यात आला होता. परंतु, सदरील अहवाल हा मराठी ऐवजी इंग्रजीत सादर करण्यात आला होता. त्यावरून काँग्रेसचे सदस्य लक्ष्मण जायभावे यांनी मनसेची विकेट घेतली. महासभेत अहवाल फडकवत आपल्याला इंग्रजी येत नसतांनाही हा अहवाल इंग्रजीत ठेवण्यात आल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. मनसेचे मराठीवर प्रेम असतांनाही अहवाल इंग्रजीत का, असा सवाल करत त्यानी मनसेला चिमटे काढले. तसेच अहवाल इंग्रजीत छापल्याबद्दल प्रशासनाकडून पैसे वसूल करा, अशी मागणी केली. त्यावर महापौरांनी सर्व सदस्यांना मराठीतून अहवाल देण्याचे आदेश दिले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपोस्ट खताबाबत सूचनांचा पाऊस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या खत प्रकल्पातून तयार होणारे पाच टन कंपोस्ट खत सिन्नरच्या गुळवंच ग्रामपंचायतीला देण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला आहे. खत प्रकल्पातून तयार होणारे खताचा उपयोग कुठे आणि कसा करावा याबाबत सदस्यांनी विविध पर्याय सुचविल्याने महापौरांनी कंपोस्ट खत शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सविस्तर चर्चा करून पुन्हा तसा प्रस्ताव महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पाच टन कंपोस्ट खत सिन्नर तालुक्यातील गुळवंच ग्रामपंचायतीला विनामूल्य देण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. त्यावर काही सदस्यांनी मोफत खत देण्यास विरोध केला. महापालिका हद्दीतील गावांमधील शेतकऱ्यांना हे खत देण्यात यावे, अशी सूचना सदस्यांनी केली. तसेच खत विनामूल्य न देता पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळेल, त्याला काहीतरी दर लावण्यात यावा किंवा वृक्षलागवडीसाठी वापर करावा, अशी सूचना केली. त्यामुळे महापौर मुर्तडक यांनी संबंधित विषय हा तहकूब ठेवत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नव्याने प्रस्ताव ठेवण्याचे आदेश दिले. गुळवंचला खत देण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला आहे.

नगरसेवक निधीसाठी गटनेत्यांची बैठक महापालिका निवडणुका जवळ येऊन ६० लाखांच्या नगरसेवक निधीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नगरसेवकांनी महासभेत सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारला. नगरसेवक निधीबाबत प्रशासन व लेखा विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगरसेवकांच्या निधीचे काय केले, असा पश्न उपस्थित केला. त्याला अन्य सदस्यांनीही साथ दिल्याने महापौरांनी गटनेते व आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींना फासावर लटकवा

$
0
0

टीम मटा कोपर्डी येथील घटनेचा सर्वस्तरावरून निषेध व्यक्त होत आहे. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षा, शालेय विद्यार्थी, कॉलेजचे तरूण रस्त्यावर उतरले आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपींना फासावर लटकवा, अशी मागणी जोर धरत आहे. बुधवारी देवळा, सटाणा, निफाड येथे मूक मोर्चा काढून या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यात आला.

देवळ्यात मूकमोर्चा कळवण : कोपर्डी येथील बलात्कार व खून प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी देवळ्यात सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळून सकाळी ११ वाजता पाचकंदील येथून मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी देवळा येथील कर्मवीर रामराव आहेर कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक मोठ्या संख्येने मूकमोर्चात सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण आदींनी कोपर्डी येथील घटनेचा तीव्र निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी नायब तहसीलदार अनिल चव्हाण, पोल‌िस निरीक्षक सतीश माने यांना निवेदन देण्यात आले. मूकमोर्चात उपनगराध्यक्ष अशोक आहेर, बांधकाम सभापती लक्ष्मीकांत आहेर, संभाजी आहेर, अतुल पवार, जितेंद्र आहेर, शहरप्रमुख अशोक आहेर, मनसेचे तालुकाध्यक्ष योगेश आहेर सहभागी झाले होते. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी उमराणा बंदची हाक देण्यात आली आहे.

सटाण्यात विद्यार्थी रस्त्यावर सटाणा : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ बागलाण तालुका शिवसेना, आर.पी.आय, ब्राह्मण संघ, संभाजी ब्रिगेड, शालेय विद्यार्थी, देवमामलेदार यशवंराव महाराज ज्येष्ट नागरिक संघ, महाराणा प्रताप क्रांतीदल बागलाण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी बागलाणचे तहसीलदार यांना निवदेन देण्यात आले. घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मराठा इंग्लिश स्कूल, जिजामाता गर्ल्स हायस्कूल, जनता विद्यालय या शालेय विद्यार्थी-विद्यार्थिंनीसह बागलाण तालुका शिवसेना, आर.पी.आय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ताहाराबाद रोड, बाजार पेठ, टिळक रोड, चावडी चौक, नेहरू रोड, बस्थानक यामार्गाने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून नायब तहसीलदार धिवरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे, ज्येष्ट नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश बागड आदीची घटनेचा निषेध केला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमनमुक्तीसाठी तयार रहा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,पिंपळगाव बसवंत सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे पिंपळगाव बाजार समितीत लवकरच टोमॅटो, डाळिंब, कांदा व इतर शेतमालाचे लिलाव सुरू करण्यात येणार असून बाजार समितीतील व्यापारी, आडतदारांनी नियमन मुक्तीच्या नियमावलीप्रमाणे काम करण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी केले. नियमनमुक्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील बाजार समितीत टोमॅटो, डाळिंब, भाजीपाला आडतदारांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात बनकर यांनी समितीची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी उपसभापती गुरूदेव कांदे, संचालक भास्कर बनकर, निवृत्ती धनवटे आदी उपस्थित होते. बैठकीत अनेक व्यापारी, आडत्यांनी नियमनमुक्तीच्या अडचणी, त्रुटींवर चर्चा केली. बाजार समितीकडे अनेक नवीन व्यापाऱ्यांनी परवाने मिळावे, जागा मिळावी यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे नवीन धोरणानुसार त्यांच्या मागणीचा विचार करावा लागेल, याची नोंद जुन्या अडतदार, व्यापाऱ्यांनी घ्यावी असेही बनकर यांनी स्पष्ट केले.

टोमॅटो व्यापार संकटात? नियमनमुक्तीमुळे टोमॅटो व्यापार पुढील काळात नेमका कसा चालणार याबाबत टोमॅटो व्यापारी, आडतदार, शेतकरी व बाजार समिती यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने टोमॅटो हंगाम सुरू होण्यापूर्वीच धोरण जाहीर करावे, अशी मागणी येथील टोमॅटो व भाजीपाला आडतदार असोसियशनचे दीपक बनकर, उपाध्यक्ष अरुण चव्हाणके, सुभाष होळकर यांनी केली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावलोपावली खड्ड्यांचेच दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, घोटी

महाराष्ट्र राज्यात भाविक पर्यटकांनी खुलणारा घोटी-सिन्नर-शिर्डी महामार्गाची ओळख आता खड्ड्यांचा महामार्ग अशी होत आहे. या महामार्गावर दररोज शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची व पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ असते. दोनच महिन्यापूर्वी या महामार्गाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, पावसाळाच्या पहिल्या पंधरा दिवसातच या रस्त्यांची काय दशा झाली हे वाहनचालकांच्या निदर्शनास येत आहे. यावरून रस्ता दुरुस्तीचे काम कसे केले असेल, याची प्रचिती येते. प्रवेशद्वारावरच्या खड्ड्यांनीच या महामार्गाची सुरुवात होते.

घोटीजवळील घोटी-सिन्नर-शिर्डी महामार्गाचे प्रवेशद्वार व दारणा नदीवरील असलेल्या पुलावर अक्षरशः चाळण झाली आहे. भाविक प्रवाशांना व पर्यटकांना वाहन चालवताना फार कसरत करावी लागते. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपूर्वी या रस्त्यांची डागडुजी केली होती. परंतु, ही तात्पुरती मलमपट्टीही खड्ड्यांत गेली आहे. या पार्श्वभूमीवर भाविक, पर्यटक, वाहनचालक पुलावरून जीव मुठीत घेऊन वाहने चालवित आहेत. त्यामुळे पुलावरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.

यापूर्वी हा मार्ग राज्यमार्ग होता. तसेच या मार्गाचा कारभार रस्ते विकास महामंडळाकडे होता. मात्र, आता या मार्गाला केंद्र सरकारने महामार्गाचा दर्जा दिला आहे. एवढेच नव्हे तर घोटी-सिन्नर हा मार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग करूनही या रस्त्याची पहिल्याच पावसात अशी दुर्गती झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर-शिर्डी हा महामार्ग असूनही या मार्गावरील दारणा नदीवरील देवळे गावाजवळील पुलाची ही दैना झाल्याने या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०८ कोटींचा घोटाळा प्रकाशझोतात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वादग्रस्त २०८ कोटींच्या एलईडी घोटाळ्याचा सभागृहात पर्दाफाश झाल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून भिजत असलेल्या एलईडी घोटाळ्याच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवृत्त सनदी अधिकारी किंवा निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने अनेक बड्या अधिकाऱ्यांसह काही लोकप्रतिनिधींचाही पोलखोल होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे तत्काल‌िन आयुक्त संजय खंदारे, लेखाधिकारी राजेश लांडेसह लेखापरीक्षक एन. राजूरकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शहरात तेराव्या वित्त आयोगातून ७० हजार एलईडी लाईट बसवण्याचा निर्णय २०१२ मध्ये करण्यात आला होता. सुरुवातील ५४ कोटींचा हा प्रस्ताव भ्रष्टाचारामुळे थेट २०८ कोटींपर्यत पोहचला होता. त्यामुळे न्यायालयीन वादात हा प्रस्ताव अडकला. परंतु तरीही तत्कालिन आयुक्त संजय खंदारे, राजेश लांडे यांनी एमआयसी प्रकरणात ठेकेदारांना मदत केल्याचा आरोप महासभेत पुराव्यानिशी करण्यात आला. त्यामुळे बुधवारच्या महासभेत या सर्व प्रकरणात सविस्तर चर्चा होऊन या घोटाळ्याची पोलखोल करण्यात आली. उपअभियंता नारायण आगरकर यांच्या चौकशीसाठी आलेल्या प्रस्तावाचे रुपांतर सर्व अधिकाऱ्यांच्या चौकशीत झाले. त्यामुळे आता खंदारे, लांडे यांच्यासह अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या अडचणी वाढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य महामार्गावर होणार जनसुविधा केंद्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक

प्रवाशांना राज्य महामार्गावर चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उत्तर महाराष्ट्रात १३ ठिकाणी जनसुविधा केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रात कॅन्टीन, दोन दुकाने, शौचालय व पार्किंगची व्यवस्थाही असणार आहे. 'बांधा वापरा हस्तांतर करा' या पद्धतीने २०० स्वेअर मीटरवर हे जनसुविधा केंद्र बांधले जाणार असून याचा अंदाजीत खर्च ७५ लाख असणार आहे.

राज्य महामार्गावरील प्रवाशांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीवरुन सुरुवातीला सरकारने टॉयलेट ब्लॉकचे नियोजन केले. त्यानंतर आता त्यात बदल करून जनसुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात दोन, अहमदनगर येथे चार, जळगाव जिल्ह्यात चार, धुळे येथे एक व नंदुरबार जिल्हयात दोन सुविधा केंद्र होणार आहे. 'बांधा वापरा हस्तांतर करा' या योजनेत या सुविधा केंद्रात प्रशस्त अशा सुविधा देण्याचा शासनाचा हेतू आहे. त्यासाठी राज्य सरकार ३० वर्षाच्या कराराने जमीन देणार असून त्यासाठी अल्प मोबदला घेणार आहे. त्यानंतर कंत्राट दारानेच हे सुविधा केंद्र उभारायचे आहे. त्यासाठी नाशिक सार्वजनिक विभागाने या केंद्राचे स्थळही निश्च‌ित केले असून इच्छुकांकडून अर्ज मागव‌िले आहेत.

जिल्ह्यात सुरगाणा-पेठ-हरसूल-वाधेरा या त्र्यंबक-घोटी राज्य महामार्गावर त्र्यंबकेश्वर हे ठिकाण निश्च‌ित केले आहे. तर येवला तालुक्यातील मनमाड-येवला कोपरगाव या महामार्गावर देशामाने येथील जागा निश्च‌ित केली आहे. अहमदनगर येथे नेवासा, जामखेड, शेवगाव, पारनेर या ठिकाणी हे सुविधा केंद्र होणार आहे. जळगाव येथे रावेर, चोपडा तर जामनेर तालुक्यात पहूर आणि नेरी येथे हे सुविधा केंद्र होणार आहेत. धुळे येथे शिरपूर त नंदुरबार येथे शहादा व अक्कलकुवा येथे हे केंद्र उभारले जाणार आहे.

प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी जनसुविधा केंद्र उभारले जाणार आहे. यात हॉटले, दुकाने व पार्किंग व शौचालय असणार आहे.

-रणजीत हांडे , सुप्रीटेंण्ड इंजिनीअर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गटारीत उतरून अनोखे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरातील अस्वच्छता, उघड्या गटारींकडे पालिका प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करते. त्यामुळे या विषयाकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बद उन्वीनी मुक्त या संघटनेचे अंसारी रिजवान बेटरीवाला यांनी थेट उघड्या गटारीत उतरून आंदोलन केले.

शहरातील नवीन बसस्थानक फेमस बेकरी तसेच अग्निशामक दल समोर शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या गटारी आहेत. नवीन बसस्थानक परिसर नेहमीच वर्दळीचा असल्याने येथून अनेक वाहने, पादचारी, जनावरे यांची ये-जा असते. मात्र, या उघड्या गटारींवर अद्याप मनपाकडून झाकण बसविण्यात आलेले नाही. याबाबत रिजवान बेटरीवाला यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांनी थेट या उघड्या गटारीत ठाण मांडले. या परिसरातून महापौर, आमदार, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी नेहमीच प्रवास करतात. या गटारींबाबत त्यांना कल्पना आहे. अशा या धोकेदायक गटारी बंद करण्यासाठी हे लोकप्रतिनीधी आणि अधिकारी कशाची वाट पाहताय, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, बेटरीवाला यांच्या अनोख्या आंदोलनाने काही काळ या परिसरात वाहतूक कोंडी झाली. मात्र, परिसरातील उघडया गटारी किती धोकादायक आहे याचा प्रत्यय आला. अखेर मनपा आयुक्त रवींद्र जगताप, पोलिस उपाधीक्षक गजानन राजमाने यांनी थेट या ठिकाणी हजेरी लावली. त्यांनी बेटरीवाला यांची समजूत काढली तसेच त्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणाची वेळ चुकविली; विमान कंपनीला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी , नाशिक

विमानाच्या उड्डाणाची वेळ बदलल्यामुळे त्रास व वाढीव खर्चाचा फटका बसलेल्या दीपक पाटोदकर यांना ग्राहक न्यायमंचाने दिलासा दिला अहो. संबंधित विमा कंपनी व एजंटने पाटोदकर यांना ६५ हजार ९२१ रुपये भरपाई द्यावी, असे आदेश मंचने दिले आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी १५ हजार व अर्जाचा खर्च ५ हजार असा २० हजाराचा दंडही ठोठावला आहे.

तिडके कॉलनीत राहणाऱ्या दीपक पाटोदकर यांनी स्वतःसह पत्नीच्या नावाने जेट एअर वेज कंपनीचे लेह ते दिल्ली, दिल्ली ते पुणे या विमानाची परतीच्या प्रवासासाठी तिकीटे खरेदी केली होती. सदर तिकीट त्यांनी नाशिकच्या चतुरंग हॉलीडेज यांच्याकडून यात्रा डॉट कॉममार्फत घेतली. त्यासाठी १६ हजार ५३२ रुपयेही अदा केले. लेह ते दिल्ली विमान हे सकाळी ११.१५ मिनीटांनी निघणार होते. त्यासाठी ते वेळेअगोदर विमानतळावर गेले. पण विमानतळावर गेल्यानंतर त्यांना विमाने सकाळी ८.१५ वाजताच रवाना झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत आपल्याला काही कळवले नाही व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही, अशी तक्रार करत पाटोदकर यांनी गो एअर या विमा कंपनीचे तिकीट चढ्या भावाने घेतले. त्यानंतर त्यांनी लेह ते जम्मू,जम्मू ते मुंबई व त्यानंतर टॅक्सीने मुंबई ते नाशिक असा प्रवास केला व त्यासाठी ६६ हजार ९७६ रुपये खर्च आला, असे तक्रारीत म्हटले.

पाटोदकर यांनी केलेल्या या तक्रारीत त्यांनी जेट एअर वेज, यात्रा डॉट कॉम व चतुरंग हॉलीडेज यांना प्रतिवादी केले. जेट एअर वेजने तक्रार न्यायकक्षेत नाही, विमानाच्या उड्डाणाची वेळ गरजेनुसार पूर्वसूचना न देता बदलण्याचा अधिकार आहे. तरी पाटोदकर यांना एसएमएस करून संदेश दिला होता असा युक्तीवाद केला. त्यात यात्रा डॉट कॉम व चतुरंग हॉलीडेज आमचे एजंट नसल्याचेही सांगीतले. तर यात्रा डॉट कॉमने आम्ही केवळ मध्यस्थ म्हणून काम करतो. त्यामुळे वेळ बदलल्याची जबाबदारी जेट एअर वेज व चतुरंग हॉलीडेजची आहे. तर चतुरंग ‌हॉलीडेज यांनी वेळ बदलली हे सांगण्याची जबाबदारी आमची नाही. ती जेट एअर वेजची आहे. तरीसुद्धा पाटोदकर यांनी झालेल्या त्रासापोटी त्यांना यात्रा डॅाट कॉममार्फत १६ हजार ८० रुपये दिले आहे. या तीन्ही प्रवाशी कंपन्यांनी वेगवेगळा युक्तीवाद मांडला. मात्र, ही तक्रार फेटाळण्याची मागणी सर्वांची सारखी होती.

जिल्हा ग्राहक व तक्रार निवारण न्यायमंचाने वादी व प्रतिवादीचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आपला निकाल देतांना प्रतिवादींनी सेवा देण्यास कमतरता केली आहे. वेळ बदलल्याची जबाबदारी तिघांची आहे. त्यांनी ते समजेल अशा शब्दात ते कळवायला हवे होते. त्यामुळे तक्रारदार पाटोदकर यांना वैयक्त‌िक अथवा सुयक्तीकरित्या नुकसानीपोटी ६५ हजार ९२१ रुपये व्याजासह द्यावे, असा आदेश दिला व संबंधित कंपनीला २० हजाराचा दंडही ठोठावला. या निकालामुळे मनमानी करणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींना चाप बसणार आहे. या याचिकाकर्ते तक्रारदारातर्फे अॅड. एस. ए. पंडित यांनी युक्तीवाद केला. तर हा महत्त्वपूर्ण निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकूल’चे काम खान्देश बिल्डर्सला

$
0
0

धुळे : जळगाव घरकूल बांधकामाचे काम नगरपालिकेकडून खान्देश बिल्डर्सला देण्यात आले होते आणि खान्देश बिल्डर्सने हे काम ईसीसी कंपनीला करार देऊन कराराप्रमाणे १८ महिन्यांची मुदत दिली होती. या करारवर खान्देश बिल्डर्सचे संचालक जगन्नाथ वाणी यांची स्वाक्षरी होती. मात्र, नगरपालिकेकडून खान्देश बिल्डर्सला देण्यात आलेल्या मूळ करारामध्ये कामाचा कालावधी नऊ महिन्यांचा होता, असे असूनही ईसीसी कंपनीला १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती मुख्य तपास अधिकारी तत्कालीन जळगाव अप्पर पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी साक्ष नोंदविताना दिली. याप्रकरणी साक्ष नोंदविण्याचा सिंधू यांचा सहावा दिवस होता. याबाबत नगरपालिका व खान्देश बिल्डर्स यांच्यामध्ये आठ करार झाले होते. या करारासंबंधी कागदपत्रे जप्तही करण्यात आली, अशी माहिती साक्ष सिंधू यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस कोसळून आठ जखमी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, घोटी

अकोले (जि. अहमदनगर) येथून घोटीमार्गे कसारा येथे प्रवासी घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बारी घाटातील दरीत कोसळली. बस दरीत बऱ्याच खोलवर गेली; मात्र काही अंतरावर बस मोठ्या दगडाला अडकल्याने भीषण घटना टळली. यात आठ प्रवासी जखमी झाले. बसची सर्व चाके निखळून पडली होती.

अकोले आगाराची बस (एम. एच. १४ / बीटी-११५४) ही सुमारे ४० ते ५० प्रवासी घेऊन घोटी-कसारा येथे जात असताना वासाळी गावाजवळील बारी घाटातील रस्त्यावरील खड्यात बस आदळल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस घाटातील दरीत उतरली. बस हेलकावे घेत दरीत बऱ्याच खोलवर गेली. त्यात बसची चाकेही निखळून पडली. दरम्यान, बस दरीत कोसळण्यापूर्वी एका मोठ्या दगडाला अडकल्याने थांबली. यावेळी प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरत जखमी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान, बसचालकावर घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ले. या भीषण अपघातात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना संगमनेर, अकोले येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स ग्रुप’तर्फे आज ‘द कुकरी शो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'दि टाइम्स ऑफ इंडिया' व 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्या संयुक्त विद्यमाने शरणपूर रोड येथील हॉटेल एमरल्ड पार्कमध्ये आज दि. २२ जुलै रोजी 'द कुकरी शो'चे आयोजन करण्यात आले आहे. हा कुकरी शो दु. ४ ते ६ वाजेपर्यंत होणार असून, यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मास्टर शेफ विष्णू मनोहर लज्जतदार रेसीपीज् शिकवणार आहेत. जीभेवरची हरवलेली चव परत आणण्यासाठी चटपटीत किंवा खमंग पदार्थ खावेसे वाटतात. नाही तर जेवणातील मेनकोर्समध्ये काही तरी लज्जतदार रेस‌िपी खावीशी वाटत असते. यावर 'दि टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' यांच्या तर्फे खास लज्जतदार रेस‌िपी शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शरणपूर रोड येथील हॉटेल एमरल्ड पार्क येथे आज २२ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मास्टर शेफ विष्णू मनोहर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. हा कुकरी शो सर्वांसाठी खुला असून, फक्त महिलाच नव्हे तर ज्यांना जेवण बनवून इतरांना खाऊ घालण्यात आनंद मिळतो अशा सर्वांसाठी आयोजित करण्यात आला आहे. 'टाइम्स ग्रुप'तर्फे आयोजित 'द कुकरी शो'चे टायटल स्पॉन्सर सनबर्ड किचन, असो. स्पॉन्सर कारडा कन्स्ट्रक्शन, को स्पॉन्सर सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर व्हेन्यू पार्टनर हॉटेल एमरल्ड पार्क आहे. हा कुकरी शो मोफत असून जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहार पैसे वसुलीसंदर्भात चौकशीचे आदेश

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर अन् जिल्ह्यात पोषण आहाराच्या ऑडिटच्या नावाखाली शाळांचे सुरू असणारे आर्थिक शोषण 'मटा' ने उघडकीस आणल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा अनुभवास सामोरे जाणाऱ्या शाळांनीही शिक्षणाधिकाऱ्यांना या सारख्या प्रकारांची माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिका शिक्षण समिती व जिल्हा परिषदेच्या शाळांचे सन २०१० -२०११ या वर्षाच्या पोषण आहाराच्या ऑडिटलाही सुरु असताना हे ऑडिट आलबेल दाखविण्यासाठी प्रतिशाळा किमान ५०० रुपयांची वसुली होत असल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स' ने १५ जुलै रोजी प्रकाशीत केले होते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणारी शालेय पोषण आहार योजना भ्रष्टाचाराच्या नव्या कारनाम्यामुळे जिल्ह्यात पुन्हा चर्चेत आली होती. या प्रकरणाची दखल जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलनेते घेत तातडीने शाळास्तरावर चौकशीचे आदेश दिले आहेत. याकामी जिल्हा परिषदच्या शाळांमधील सर्व गटविकास अधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांना या चौकशीसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

म्हणे ऑडिट झालेच नाही!

संवेदनशीलतेने तत्परता दाखवत जिल्हा परिषदेने या प्रकरणी वृत्तानंतर उचललेल्या पावलांचे स्वागत होत आहे. असे असले तरीही या आठवड्यात ऑडिट झाले नसल्याची किंवा नजीकच्या कालावधीत असे कुठलेही पोषण आहाराचे ऑडिट नियोजित नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. या प्रकारचे ऑडिट न झाल्याचा किंवा नजीकच्या कालावधीत होणार नसल्याचा शिक्षण विभागाचा दावा असला तरीही सन् २०१०-२०११ या वर्षातील शालेय पोषण आहाराचे ऑडिट शहरात मनपा कार्यालयात घेण्यात आले असल्याची माहिती परिणाम भोगावे लागणाऱ्या सूत्रांनी 'मटा' ला दिली होती. यासंदर्भात महापालिका शिक्षण समितीच्या केंद्र प्रमुखांनी शाळांना १२ जुलै २०१६ रोजी मनपा कार्यालयात यासंदर्भातील सर्व दप्तर नोंदी घेऊन हजर राहण्याच्या थेट सूचनाही देण्यात आल्या होत्या. या अधिकृत सूचनांच्या नोंदीही सूत्रांच्या दप्तरी नोंदविल्या आहेत. या सूचनेनुसार विविध शाळांचे प्रतिनिधी तेथे हजर राहिल्यानंतर त्यांच्याकडून किमान ५०० रुपये या रकमेनुसार वसुली करण्यात आली. ऑडिट करणाऱ्या लेखा विभागांच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकारची झळ शाळांना बसल्याच्या तक्रारी आहेत. यावर शिक्षण विभागाच्या चौकशीत हाती काही माहिती लागण्याच्या अपेक्षा शाळांना आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेयच्या संचालकांचा २६ जुलैला फैसला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मैत्रेय' प्रकरणातील संचालकाच्या जामीन अर्जासह गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याबाबत २६ जुलै रोजी न्यायालय निकाल देणार आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीस कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा व सत्र न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. मैत्रेयने इस्क्रो खात्यावर पुन्हा एक कोटी ३५ लाख रुपये जमा केल्याने आता खात्यावर सहा कोटी ३५ लाख रुपये जमा झाले आहेत.या खात्यावरील जमा रकमेतून ठेवीदारांना पैसे देण्यासंदर्भातील आराखडा सरकार पक्षातर्फे कोर्टास सादर करण्यात आला. पैसे देण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात येणार असून, त्यामध्ये तपासी अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, ठेवीदारांचा प्रतिनिधी व एक सक्षम अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच, ज्या ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपली व त्यांना दिलेले धनादेश वटलेले नाहीत, अशांना प्राधान्यक्रमाने त्यांच्या रकमा दिल्या जातील. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ठेवीदारांचा विचार केला जाईल, असेही न्यायालयात सांगण्यात आले. यावेळी संचालकांच्या अंतरीम जामिनासंदर्भात युक्तिवाद झाला. पुरवणी दोषारोपपत्रानुसार तक्रारींच्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम इस्क्रो खात्यावर जमा आहे. भविष्यातही सातत्याने त्यामध्ये पैसे जमा केले जातील. त्यामुळे जामीन कायम करण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली. सरकारी पक्षाने यास हरकत घेतली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे व पंकज चंद्रकोर यांनी काम पाहिले तर कंपनीतर्फे राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्नॅचर्सने ओढले लाखाचे गंठण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथील नारायण बापू चौकातून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तब्बल एक लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने तोडून धूम ठोकली. स्नॅचिंगची आणखी एक घटना कॉलेजरोड परिसरातील डिसुझा कॉलनीत झाली असून, येथून चोरट्यांनी ६६ वर्षांच्या महिलेला टार्गेट करीत त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी तोडली. शहरात स्नॅचर्सची नवीन टोळी तयार झाल्याचे या घटनांमधून दिसत असून, गर्दीच्या वेळी स्नॅचिंग करून गुन्हेगार एकप्रकारे पोलिसांना आव्हान देत आहेत. नाशिकरोड येथील घटनेबाबत नारायणबापू नगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ राहणाऱ्या कांता सुभाषचंद्र नावंदर (५५) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. नावंदर बुधवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास नारायण बापू चौकातील इंदिरा गांधी पुतळ्यापासून घराकडे जात होत्या. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. याचा फायदा घेत दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एक चोरट्याने नावंदर यांच्या गळ्यातील एक लाख १० हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे गंठण तोडले. नावंदर यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी भरधाव वेगात धूम ठोकली. याप्रकरणी नावंदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांनी चोरट्यांविरोधात जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. स्नॅचिंगची दुसरी घटना कॉलेज रोड परिसरातील डिसुझा कॉलनी येथे घडली. याच परिसरातील शिवगिरी येथे राहणाऱ्या अंगुरी देवी शिवचरण गुप्ता (६६) या बुधवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घराकडे पायी जात असताना हा प्रकार घडला. अंगुरी गुप्ता कॅटमॉस शोरुमसमोर आल्या तेव्हा, समोरून दुचाकीवरून दोघे चोरटे त्यांच्याजवळ आले. चोरी करताना प्रतिकार होणार नाही, याची जाणीव असलेल्या चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी ओढून धूम ठोकली. गुप्ता यांच्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी अशोक स्तंभ ते आरके या वर्दळीच्या रस्त्यावर चेन स्नॅचिंग केली होती. दुचाकीची चोरी सातपूर कॉलनीत घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याबाबत धनंजय गोविंद म्हाळूकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. म्हाळूकर यांची हिरो होंडा पॅशन मोटारसायकल (एमएच ०९ बीवाय ५९८३) चोरीला जाण्याची घटना २५ मे रोजी रात्री साडेदहा ते २६ मेच्या सकाळी साडेवाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी वाहनचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७०६ केसेस अन् ७६ हजारांचा दंड!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक पोलिसांनी या वर्षात वाहनचालकांवर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. यासाठी जागोजागी नाकाबंदी लावण्यात येत आहे. बुधवारी वाहतूक शाखेने अशा पध्दतीने कारवाई करीत ७०६ वाहनचालकांकडून ७६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी तसेच अपघाताच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांमुळे इतरांना त्रास देखील होतो. विशेषतः वाहतूक सिग्नलवर नियमांची सर्रास पायमल्ली होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी यंदा जानेवारीपासून बेशिस्त वाहनचालकांना रडारवर घेतले आहे. चालू वर्षात १ कोटी २६ लाख ५० हजार ७०० रूपये दंड स्वरूपात वाहनचालकांकडून आकरण्यात आले आहे. दंड वसुलीचा हा विक्रम आहे. वाहतूक पोलिसांनी बुधवारी ७७६ वाहनचालकांवर कारवाई केली. विना परवाना, विमा नसणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन, मर्यादेपेक्षा अधिक वेग, काळ्या काचा, प्रवेश बंद मार्गाचा अवलंब करणे, सिग्नल न जुमानता तोडणे, रहदारीस अडथळा आणणे, फ्रंट सिट रिक्षा, वाहन चालविताना सीट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट दुचाकी, विना हेल्मेट, परवाना न बाळगणे, उंच लोड वाहतूक, सिग्नलचे उल्लंघन, नंबर प्लेट नसणे, झेब्रा क्रॉसिंग नियमांकडे दुर्लक्ष, मोबाइलचा वापर करणे, स्टॅण्ड सोडून वाहन उभे करणे, युनिफॉर्म न घालणे, नियमांपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे आदीसाठी कारवाई केली. यात १९ ट्रिपलसिट दुचाकीस्वारांकडून एकाच दिवसात ७६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बुधवारच्या कारवाईनंतर वाहतूक शाखेचा दंड वसुलीचा आकडा १ कोटी २६ लाख ५० हजार ७०० रुपयांपर्यंत पोहचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेड‌िक्लेम पॉल‌िसीचे पूर्ण पैसे देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाढीव तीन लाखाच्या विमा पॉल‌िसीचे पैसे नाकारण्याचा विमा कंपनीचा मुद्दा मान्य करुन जुन्या पॉल‌िसीतील रक्कम पूर्णपणे अदा केलेली नसल्याचा प्रकार ग्राह्य धरुन ग्राहक मंचाने विमा कंपनीला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे जुन्या पॉलिसीमधील ११ हजार रुपये व्याजासह देण्याचेही आदेश दिले. महामार्ग बसस्टॅण्डमागे राहणारे राजेश धनराज मनशानी यांनी दी. ओरिएटंल इन्शुरन्स कंपनीकडे आपल्या कुटुंबियांसाठी तीन लाखांची हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा १९ जानेवारी २०१३ ते १८ जानेवारी २०१४ पर्यंत पॉल‌िसीचे नूतनीकरण केले व त्यात तीन लाखांची वाढीव पॉल‌िसी घेतली. ही पॉल‌िसी घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीला कॅन्सरचे निदान झाले व त्यांनी निदानाचा खर्च विमा कंपनीकडे माग‌ितला. विमा कंपनीने उपचाराच्या खर्चाची रक्कम २ लाख ८९ हजार रुपये अदा केली. पण त्यानंतर झालेल्या खर्चाची रक्कम २ लाख ११ हजार ५५ मात्र नाकारली. त्यामुळे मनशानी यांनी ग्राहक तक्रार न्यायमंचाकडे तक्रार केली. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने आपली बाजू मांडताना सांगितले की पॉल‌िसीचे नूतनीकरण केल्यानंतर ३० दिवसांच्या आत कॅन्सरचे निदान झालेले आहे. त्यामुळे पॉल‌िसीतील एक्सक्लुजन क्लॉज ४.२ व ४.३ नुसार तक्रारदाराचा २ लाख ११ हजार ५५ रुपये दावा योग्यरित्या नाकारण्यात आला आहे. या दोन्ही युक्त‌िवादानंतर ग्राहक न्यायमंचाने ओरिएंटल कंपनीच्या एक्सक्लुजन क्लॉज ४.२ व ४.३ नुसार नाकारलेली रक्कम योग्य असल्याचे सांगितले. पण जुनी पॉल‌िसी तीन लाखांची असल्यामुळे त्यातून फक्त २ लाख ८९ हजार अदा केले. त्यामुळे त्यातून उर्वरीत ११ हजार द्यावेत, असे सांगून सेवेत कमतरता असल्याचा ठपका ठेवला. या रकमेवर २१ एप्रिल २०१५ पासून १० टक्के व्याज देण्याचाही आदेश दिला. मानसिक त्रासापोटी ७ हजार व अर्जाचा खर्च ३ हजार असा दंडही ठोठावला. तक्रारदाराकडून अॅड. एस. आर. नगरकर यांनी बाजू मांडली. हा निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरक्षणासाठी महिलांना बंदूक द्या

$
0
0

नाशिक ः कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर त्याचे पडसाद नाशिकलाही उमटले असून विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रसेने महिलांचे स्वरक्षण करता येत नसेल तर महिला व मुलींना आत्मसन्मानासाठी बंदूक परवाना द्यावा अशी मागणी करत आपला संताप व्यक्त केला आहे. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक कृती समितीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या निवेदनात प्रकरणातील आरोपींनी जामीन देऊ नये, खटला शीघ्र गती न्यायालयात चालवा, निष्णात वक‌िलांची नियुक्ती करा अशा मागण्या केल्या आहेत. या निवेदनावर राजू देसले, सुनील मालुसरे, युवराज बाबा, विष्णूपंत गायके, महादेव खुडे यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पूर्व विभागाने दिलेल्या निवेदनात खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा अशीही मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोपर्डी निषेधार्थ उमराण्यात बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत या घटनेच्या निषेधार्थ उमराणे येथे बंद पाळण्यात आला. गावातून मोर्चा काढून निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विश्वास देवरे, विलास देवरे, जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, राजेंद्र देवरे, धर्मा देवरे, प्रदीप देवरे आदींनी निषेधार्थ भाषणे केलीत.

या वेळी देवळा तालुका पोलिस स्टेशनचे पीएसआय साबळे, तहसीलचे प्रतिनिधी उमेश गोपनारायण यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब देवरे, बापू देवरे, मोतीराम देवरे, भाऊसाहेब देवरे, सुभाष देवरे आदींसह सर्व राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images