Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘विश्वकवितेत भारतीय कविता नाही’ : विष्णू खरे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विश्वकवितेत भारतीय कविता मला कोठेच दिसत नाही. कारण भारतीय कविता व्यापक नाही. तिला विषयांची बंधने आहेत. विज्ञानासारखा महत्त्वाचा विषय तिच्यात कुठेच डोकावताना दिसत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी विष्णू खरे यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तरी अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विष्णू खरे यांचे हिंदी कविता वाचन व संवाद झाला यावेळी ते बोलत होते.

खरे पुढे म्हणाले की, विश्वकवितेत शब्दसंपत्ती, विषयाचे वैविध्य अनेक प्रकाराने असते. त्यामुळे तेथे टिकण्यासाठी या गोष्टी आपल्या कवितेने आत्मसात करायला हव्यात. सवर्णांमध्ये किमान २० ते २५ नामदेव ढसाळांसारखे कवी असतील तरच ही कविता स्थान मिळवू शकेल. कवितेविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, माझी कविता गद्याच्या टोकापर्यंत जाते. परंतु तिचे गद्य होत नाही. हे कसे झाले, ते इतके प्रसिध्द कसे झाले ते मला कळलेच नाही. या कार्यक्रमात खरे यांनी वृंदावन की विधवाएँ, बेटी, कोशिश, डरो, प्रतिरोध अशा काही गाजलेल्या कविता यावेळी सादर केल्या. यावेळी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, कवी प्रफुल्ल शिलेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुरेश गायधनी यांनी केले. मराठीतील नामवंत कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी विष्णू खरे यांना अनेकविध विषयांवर बोलते केले. मराठी भाषा ही अनेकविध बाबींनी नटलेली असून मला त्यापुढे हिंदी भाषा खुजी वाटते असे मत ज्येष्ठ कवी विष्णू खरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, माझी संस्कृती ही मराठी आहे म्हणून मी बोलत नाही तर मी आयुष्यभर हिंदीत लिखाण केल्याने तसा अधिकार प्राप्त झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेळ्या-मेंढ्यांचा पुन्हा कार्गोप्रवास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील विमानतळावरून मंगळवार (२६ जुलै) शेळ्या मेंढ्यांची आखातातील शारजा येथे कार्गो विमानाद्वारे निर्यात होणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी यशस्वी निर्यात झाल्यानंतर आता १८०० शेळ्या मेंढ्या शारजाला जाणार असून, पुढील निर्यात येत्या २९ जुलैला केली जाणार आहे. नाशिक विमानतळालगत हलकॉन ही कार्गो सेवा आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड आणि कॉनकॉर यांच्या वतीने ही सेवा विकसित करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सानप अॅग्रो अॅनिमल्स प्रा. लि. आणि अमिगो लॉजिस्टिक प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नातून ओझरहून शारजा येथे १६५४ शेळ्या मेंढ्यांची कार्गो विमानाद्वारे यशस्वी निर्यात करण्यात आली. मान्सून काळात (पावसाळ्यात) समुद्रमार्गे प्राण्यांची निर्यात बंद असते. त्यामुळे थेट कार्गो विमानाद्वारे निर्यात करण्यात येत आहे. आखातात सध्या कडक उन्हाळा असून तेथे प्राण्यांची आवक कमी आहे. या पार्श्वभूमीवर थेट कार्गो विमानाद्वारे होणारी निर्यात अतिशय प्रभावी ठरत आहे. गेल्या वेळी शेळ्या मेंढ्यांना सरासरी ११ हजार ते १५ हजार रुपये भाव म‌िळाला होता. यावेळीही असाच भाव मिळू शकेल असा विश्वास संचालक हेमंत सानप यांनी व्यक्त केला आहे. सोमवारच्या निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध उपबाजारांमधून शेळ्या मेंढ्यांची खरेदी करण्यात आली असल्याचे संचालक शिवाजी सानप यांनी सांगितले. येत्या ऑगस्टअखेर एकूण ११ कार्गो विमानांद्वारे निर्यात करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे व्यवस्थापकीय संचालक साजिद खान यांनी म्हटले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कार्गो विमान सज्ज राहणार असून, त्यात शेळ्या मेंढ्यांचे बॉक्सेस ठेवले जाणार आहेत. दुपारी चार वाजेच्या सुमारास कार्गो विमान शारजाहला रवाना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नद्यांना पूर तरीही पाणीटंचाई!

$
0
0

निफाड तालुक्यातील पूर्व भागात टँकर सुरू

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात संततधार पाऊस झाल्याने कादवा आणि गोदावरी नदीला पूर आला होता. पण तरीही निफाड तालुक्यातील पूर्व भागातील काही गावांत अजूनही पाणीटंचाईची झळ कायम आहे. त्यामुळे निफाड तालुक्याच्या पंचायत समितीकडून या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. येत्या काही दिवसातही हा पुरवठा सुरू राहणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

निफाड तालुक्यातील पूर्व भागातील गावांची पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. पुरेसा पाऊस नसल्याने जानेवारीपासून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. दरम्यान मध्यंतरी झालेल्या पावसाने पालखेड डावा कालव्याचे पाणी गोई नदीस सोडले. त्यामुळे गोंदेगाव बंधाऱ्यात पाणी पोहचताच क्षणी पाटपाणी बंद झाले. हे कमी की काय टँकरने होणारा पाणीपूरवठाही बंद झाला. त्यामुळे वाहेगाव, दहेगाव, भरवस मानोरी या गावात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र ही टंचाई पाहता लगेच तालुक्यातील या गावांत शनिवारी (दि. २३ जुलै) रोजी निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तातडीने प्रशासकीय पावले उचलली. लासलगाव ग्रामपंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रत्येकी एक असे दोन टँकर वाहेगाव येथे पाठवले. या टँकरचे पाणी विहिरीमध्ये ओतून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली. काही दिवसांपूर्वी पालखेड धरणाचे ओव्हर फ्लो झालेले पाणी गोई नदीद्वारे वाहेगाव बंधाऱ्यात पोहचले नसतांनाच प्रशासनाने दि. १९ जुलैपासून वाहेगाव दहेगाव, भरवस-मानोरी खुर्द या गावांमध्ये चालू असलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद केले आहे. या गावांमध्ये अजून पिण्याच्या पाण्याची टंचाई असून बंद केलेले टँकर त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच या गावांच्या परिसरातील वंचित बंधारे भरू द्यावे अन्यथा निफाड तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा शिवसेनेच्या वतीने प्रकाश पाटील, राजाभाऊ दरेकर, संदीप सोनवणे आदींनी दिला आहे.

वाहेगाव, दहेगाव, भरवस, मानोरी खुर्द या सर्व गावांमध्ये रविवारपासून, (दि. २४) नियमितपणे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात येणार असून तेथील नागरिकांना पाण्याबाबत कुठलीही अडचण येणार नाही.

रत्नाकर पगार, गटविकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकचोरीच्या गुन्ह्यांचे वाढते गूढ

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक ः यंदा जानेवारी ते जून महिन्याच्या मध्यापर्यंत चोरट्यांनी शहरातील तब्बल १० ट्रकांवर हात साफ केला. नाशिकमध्ये पहिल्यादांच असा ट्रेंड समोर आला असून, एवढ्या मोठ्या वाहनांची चोरी करणारा एकही चोरटा अद्याप सापडलेला नाही, तर रातोरात चोरी जाणाऱ्या मोठ्या ट्रकच्या गुन्ह्याबाबत पोलिसांच्या मनातसुद्धा संदेह आहे. या वाहनांची खरोखर चोरी होते की ते स्क्रॅप करून नंतर चोरीची तक्रार दिली जाते, याचाही तपास सध्या पोलिस करीत आहेत.

शहर परिसरातून जूनच्या मध्यापर्यंत सर्व प्रकारच्या २६७ वाहनांची चोरी झाली होती. यात ३० चारचाकी व तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. सरासरी १० दुचाकींमागे एका मोठ्या वाहनाची चोरी होत असल्याचे दिसते. चोरी झालेल्या ३० वाहनांमध्ये आठ ट्रक, तसेच दोन डम्परचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दोन टेम्पोंवरही चोरट्यांनी हात साफ केला आहे. दरम्यान, शहरातील ट्रक रातोरात गायब होण्यामागचे कोडे पोलिसांना पडले आहे. ट्रक आणि दुचाकीच्या चोरीमध्ये फरक आहे.

का सापडत नाहीत ट्रकचोर?

अनेकदा जुन्या झालेल्या ट्रक स्क्रॅप केल्या जातात. यातून मालकास चार पैसे मिळतात. ट्रकचा इन्शुरन्स असेल तर मालक थेट चोरीची तक्रार घेऊन पोलिस स्टेशन गाठतात. ट्रकचे काय झाले, याचा तपास गुन्हा दाखल झाल्यानंतर होतो. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे मालकास इन्शुरन्स कंपनीकडे दावा करता येतो, असे मत काही पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. विशेषतः डिझेल वाहनांवर हळूहळू येत असलेल्या कालमर्यादेमुळे असे प्रकार वाढीस लागू शकतात, अशी शंकाही पोलिसांना आहे. दरम्यान, चोरी गेलेल्या ट्रकचा कोणताही तपास लागू शकलेला नाही.

खोटी तक्रार असल्यास कारवाई

पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की स्क्रॅप झालेल्या वाहनांची चोरी झाल्याची फिर्याद देण्याच्या घटना सर्वत्र आढळतात. शहरात गेल्या चार ते पाच महिन्यांत चोरीला गेलेल्या ट्रकसह सर्वच वाहनांचा कसोशीने शोध सुरू आहे. ट्रकचोरीच्या घटनांबाबत सर्व बाबी तपासल्या जात आहेत. त्यात स्क्रॅप केलेल्या वाहनांच्या चोरीची फिर्याद दिलेल्याचा प्रकार आढळून आला तर निश्चितच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

पोलिस स्टेशननिहाय वाहनचोरीच्या तक्रारी (आकडे वाहनसंख्येचे)

सरकारवाडा ः ३७ पंचवटी ः ४० भद्रकाली ः २५ गंगापूर ः २७ आडगाव ः १५ सातपूर ः ११ अंबड ः २२ देवळाली कॅम्प ः ०२ नाशिकरोड ः २९ उपनगर ः २५ इंदिरानगर ः ११ मुंबई नाका ः ११ म्हसरूळ ः १२

चोरी गेलेली मोठी वाहने

कार ः १३ पीकअप ः ०२ रिक्षा ः ०२ ट्रक ः १० टेम्पो ः ०२ ट्रॅक्टर ः ०१ एकूण ः ३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव आसनक्षमतेसाठी निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खासगी टॅक्सींच्या आसनक्षमतेवरून प्रादेशिक परिवहन विभाग आणि टॅक्सीचालक-मालक यांच्यात जुंपली आहे. टॅक्सींमध्ये नियमानुसार ४+१ प्रवासी बसविण्याच्या कायदेशीर नियमाच्या सक्तीविरोधात सोमवारी टॅक्सीचालक-मालकांनी धुळ्यात मोर्चा काढला.

गेल्या महिन्यात सुरत-नागपूर महामार्गावर कालीपिली टॅक्सी व कंटेनर यांचा भीषण अपघात होऊन टॅक्सीतील १८ जण जागीच ठार झाले होते. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी टॅक्सींना कायेदशीर मंजूर आसनक्षमता ४+१ याप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश पोलिस व परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत. मात्र, टॅक्सी चालक-मालक संघटनेकडून १२+१ आसनक्षमतेची मागणी करण्यात आली आहे. मात्र, दोनही विभाग नियमानुसार प्रवासी वाहतुकीवर ठाम आहेत. त्यामुळे सोमवारी टॅक्सी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेचे सदस्य बुधवारपर्यंत उपोषण करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानधनावरील कर्मचाऱ्यांवरून वादंग

$
0
0

९३५ कर्मचारी आलेच कसे? माहिती सादर करण्याचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत प्रशासन नोकरभरतीला विरोध करीत असताना दुसरीकडे मात्र मानधनावरील कर्मचाऱ्यांना वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने सदस्य संतप्त झाले आहेत. स्थायी समितीने सोमवारी मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीवरून प्रशासनाला जाब विचारत ९३५ कर्मचाऱ्यांची संख्या कशी झाली असा सवाल उप‌स्थित करीत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी मानधनावरील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचे तीन प्रस्ताव ठेवण्यात आले होते. तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये अर्भकांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या ७७ महिलांना मानधन देण्याचा २१ लाख रुपयांचा प्रस्ताव आला होता. त्यावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सुमारे ५२९ अंगणवाडी कर्मचारी मानधनावर भरले असता आता आस्थापना विविध विभागांमध्ये जवळपास ९३५ कर्मचारी व अधिकारी मानधनावर आले आहेत. त्यामुळे एवढी संख्या वाढीलच कशी, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. कोणत्या सदस्यांच्या ठरावाने या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली त्याची माहिती मिळावी, असा आग्रह सदस्यांनी धरला. नोकरभरती करायची नाही आणि दुसरीकडे मानधनावर कर्मचारी वाढवायचा पायंडा चुकीचा असल्याचा आरोप सदस्यांनी केला. अनुकंपा तत्वारील कर्मचाऱ्यांचा हक्क असतानाही त्यांची भरती केली जात नाही असा आरोप करण्यात आला.

सदस्यांच्या तीव्र भावना पाहून सभापती सलिम शेख यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची सर्व माहिती पुढील स्थायी समितीच्या बैठकीवर ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच, नोकरभरतीचा विषयही मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अग्निशमन दलातील रिक्त पदे व शिक्षकांच्या रिक्त जागांसह इतर विभागातील रिक्तपदांची संख्या पाहता नोकरभरतीला हिरवा कंदील मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले.

संपूर्ण शहरात स्पीड ब्रेकर

त्र्यंबकरोड, कॉलेजरोड, गंगापूर रोडवर सुसाट वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे भूत दाखवून स्पीड ब्रेकर लावले जात नाहीत. त्र्यंबकरोडवर अपघातामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कॉलेजरोडवरही तीच स्थिती आहे. त्यामुळे सभापती सलिम शेख यांनी संपूर्ण शहरातील स्पीड ब्रेकर्सचा आढावा घेऊन गरजेच्या ठिकाणी बसवणे शक्य आहे, त्या ठिकाणी तात्काळ बसविण्यात यावेत, असे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशाने नियुक्त केलेल्या समितीच्या माध्यमातून तत्काळ निर्णय घेण्याच्या सूचना केल्या.

रुग्णालयांत सीसीटीव्ही बसवा

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या प्रश्नांसह विविध समस्या भेडसावत आहेत. डॉक्टर्सही रुग्णालयात राहत नाहीत. त्यामुळे रुग्णालयांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी सूचना मनीषा हेकरे, अशोक सातभाई यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळू नका; सहकार्य करा

$
0
0

पोलिसांची वाहनचालकांकडून अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनचालकांची तसेच वाहनांची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक गुन्हे किंवा अपघातासारख्या घटनांना आळा बसू शकतो. पोलिसांना पाहून दूर पळणे काहीच फायद्याचे नाही. वाहनधारकांनी सहकार्य करावे, अन्यथा वाहन क्रमाकांच्या आधारे संबंधित वाहनचालकाच्या घराचा पत्ताही शोधणे सोपे असल्याचे मत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांत शहर पोलिसांनी भरधाव वेगात वाहने चालवणाऱ्या तब्बल २ हजार २०० वाहनचालकांना दंड ठोठवला. ही कारवाई यापुढे सुरू राहणार आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागणे आवश्यक आहे. अनेक तरूण किंवा टवाळखोर नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनतपासणीची विशेष मोहीमच सुरू केली आहे. विशेषतः कॉलेजरोड, गंगापूररोड, अंबड या ठिकाणी वाहन तपासणीवर जोर दिला जात आहे. वाहतूक विभागामार्फतदेखील दररोजचे काम सुरूच आहे. जागोजागी नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येते. याबाबत बोलताना परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, दोष असलेल्या वाहनांमुळे अपघात घडतात. बुलेटमध्ये केले जाणारे बदलसुध्दा त्यातच मोडले जातात. ९० डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या वाहनांना कायद्याने बंदी आहे. म्हणून चार ते पाच दिवस आम्ही अशा वाहनांचा शोध घेतला. वाहनचालकांवर कारवाई झाली. तब्बल ३५ बुलेट प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आल्या असून, त्यांचे परवाने रद्द करणे किंवा पाच हजारापर्यंत दंड ठोठवणे अशी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून फरार होणाऱ्या वाहनचालकांनासुध्दा आम्ही रडारवर घेत असल्याचे उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले. पळून गेलेल्या वाहनांचा पोलिस पाठलाग करीत नाही. आम्ही तशा सूचनाच सर्वांना दिल्या आहेत. मात्र, वाहन क्रमांक तसेच वाहनाचे वर्णन असेल तर आम्ही वायरलेसद्वारे माहिती प्रसारीत करतो. त्यामुळे सिग्नल्स किंवा एखाद्या जंक्शनला त्याला पकडलेच जाते. काही दिवसांपूर्वी शरणपूररोडवरील जैन होस्टेल येथे हाणामारीची घटना घडली होती. आम्ही सदर वाहनाची माहिती ऑनलाइन शोधली. आरटीओकडे तशी सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे संशयित आरोपी घरी पोहोचण्यापूर्वीच आमचे पथक संशयितांच्या घरी पोहचले होते. पळून जाणे हा पर्याय नाही. आपल्याकडे कोणती कागदपत्रे नाही हे वाहनचालकाने लक्षात घ्यावे. ती कागदपत्रे मिळवून ताब्यात ठेवावी. पालकांनीसुध्दा मुलांने वाहनामध्ये काय बदल केले, हे तपासले पाहिजे.

बुलेट शोरूम व्यवस्थापकांची बैठक

मोठा आवाज असला की सर्वांचे लक्ष संबंधित वाहनचालकाकडे जाते. या पार्श्वभूमीवर बुलेट वाहनांमध्ये फेरफार करून मोठा आवाज कसा निर्माण होईल याचा प्रयत्न बुलेटधारकांकडून केला जातो. कंपनीने दिलेले सायलन्सर काढून तरूण मुले इंदोरी किंवा पंजाबी अशा प्रकाराचे सायलन्सर बसवून घेतात. सोमवारी यासाठी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि बुलेट शोरूम व्यवस्थापकांची बैठक पार पडली. यात, वरील मुद्द्यांवर चर्चा झाली. कंपनीकडून येणाऱ्या सर्व अॅक्सेसीरीज योग्य दर्जाच्या असून, त्यामुळे कोणत्याही नियमाचा भंग होत नाही. मात्र, वाहनचालक खासगी गॅरेजमध्ये असे फेरफार करतात, असे शोरूम व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. वाहनांमध्ये अनाधिकृत फेरफार करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणार असल्याचे उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडवरील बेकरी आगीच्या भक्ष्यस्थानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजरोडवरील हॉटेल तुषारसमोर असलेली अय्यंगर बेकरी रविवारी मध्यरात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणेपर्यंत बेकरीतील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता अग्मिशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली.

कॉलेजरोडवरील अय्यंगर बेकरीस रात्री एक वाजेच्या सुमारास आग लागली असावी. या दरम्यान, रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना बेकरीच्या आतून बाहेर पडणारे धुराचे लोळ दिसले. त्यांनी ही माहिती तत्काळ कंट्रोल रूमला कळवली. त्यानंतर तेथून पुढील संदेश अग्निशमन दलाला कळविण्यात आला. अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील एक आणि आणि सातपूर अग्निशमन विभागाची दोन वाहने तत्काळ घटनास्थळी पोहचली. प्रमुख अधिकारी इक्बाल शेख, व्ही. पी. शिंदे, एच. व्ही. पवार तसेच इतर कर्मचाऱ्यांनी अर्धातासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची शक्यता आहे. मात्र, कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आगीमुळे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तहसीलमधील लाचखोर लिपिकास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकस्मात मृत्यू समरीच्या मंजुरीची प्रमाणित प्रत देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नाशिक तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास विशेष कोर्टाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

जावेद नूर महंमद शेख असे आरोपीचे नाव आहे. लाचप्रकरणी अॅन्‍टी करप्शन ब्युरोने २००८ मध्ये सापळा रचून शेखला अटक केली होती. सदर घटनेची तक्रार विमा एजंट म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने दिली होती. अंबड पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अकस्मात मृत्यूची समरी मंजूर झाली होती. मृताच्या नातेवाईकांना विम्याची रक्कम मंजूर होण्यासाठी अकस्मात मृत्यू समरीच्या मंजूर प्रमाणित प्रतीची आवश्यकता होती. त्यानुसार तक्रारदारांनी तहसील कार्यालय गाठले होते. मात्र, आरोपी शेखने सदर प्रत देण्यासाठी तक्रारदाराकडे ५०० रुपये लाचेची मागणी केली. त्यावरून तक्रारदाराने अॅन्‍टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन पोलिस उपअधीक्षक एस. टी. अवसरे यांनी १६ जून २००८ सापळा रचला. आरोपीने लाचेचे ५०० रुपये स्वीकारले असता एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहाथ पकडले. शेखविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल झाला. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. सरकारीपक्षातर्फे एस. एस. कोतवाल यांनी काम पाहिले. या खटल्यातील साक्षीदार तपासून युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी शेखला दोषी ठरवत सहा महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कैद, कलम १३ नुसार एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. दरम्यान, लाचखोरीबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा २५७५६२८ किंवा २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाने रस्त्यासाठी जागाच घेतली भाड्याने!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका एकीकडे रस्त्यांच्या भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपये मोजत असताना, सिटी सेंटर चौक ते गोविंदनगर रस्त्यावरील ६० मीटर जागेसाठी महापालिका चक्क दरमहा चार लाख रुपये व्याज भरत आहे. महापालिकेच्या या अजब कारभाराने स्थायी समितीही चकित झाली असून, स्थायीने जागामालकाला २३ लाख रुपये भाडे देण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवत अजब कारभाराला चाप लावला आहे. जागामालकाने ६० बाय ३० मीटरच्या जागेसाठी तब्बल १२ कोटींची मागणी केल्याने प्रशासनाने जागा भाड्याने घेण्याची शक्कल लढवली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत सिटी सेंटर चौक ते गोविंदनगर रस्त्यावरील उंटवाडी पुलाजवळच्या सर्व्हे क्रमांक ७४३ मधील ३० मीटर रुंद व ६० मीटर लांबीच्या रस्त्याचे भूसंपादन लटकले आहे. संबंधित जागामालकाने ११ कोटी ९५ लाखांचा मोबदला मागितला आहे. त्यासाठी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, सिंहस्थात या रस्त्यावर रिंगरोड झाल्याने संबंधित जागा प्रशासनाने चक्क भाडेपट्ट्यावर घेतली आहे! संबंधित जागामालकाला पैसे देण्याऐवजी भाडेपट्ट्याची शक्कल लढवण्यात आली आहे. संबंधित जागामालकाने आता भाडेपट्टा मागितला असून, त्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला. मात्र, संबंधित जागेचा मोबदला देण्याऐवजी ती भाडेपट्ट्यावर का घेतली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे दरमहा चार लाख रुपये दिले जात असून, पाच महिन्यांचा मोबदला म्हणून २३ लाख ६० मोबदला देण्यात येणार आहे. मात्र, स्थायीने प्रशासनाचा हा डाव तूर्तास थांबवला आहे. जागाच ताब्यात घ्या, असा सल्ला देत, तूर्तास या न्यायालयीन वादातून सुटका करून घेतली आहे, तर दुसरीकडे प्रशासनाला जागा भाडेपट्ट्यावर घेतल्याने मोबदला कसा द्यायचा, असा प्रश्न पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शविआ-तिसरा महाजमध्ये चुरस

$
0
0

मालेगाव स्थायी समिती सभापतीची आज निवड; तिन अर्ज दाखल

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील मनपाच्या स्थायी समिती सभापती पदाची निवड मंगळवारी (दि. २६) होणार आहे. तसेच या सोबतच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची देखील निवड केली जाणार आहे. स्थायीच्या सभापती पदासाठी एकूण ३ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, शहर विकास आघाडीचे गटनेता तथा उपमहापौर युनूस इसा व तिसरा महाजचे एजाज बेग यांच्यात खरी लढत आहे. सकाळी ११ वाजता ही निवड मनपा सभागृहात पार पडणार आहे.

स्थायी समितीच्या नवनियुक्त सदस्यांची नुकतीच निवड करण्यात आली. यात पक्षीय बलाबल लक्षात घेता तिसरा महाज तसेच काँग्रेस याचे समसमान ५ सदस्य आहेत. मात्र, विद्यमान स्थायी समिती सभापती ताहेरा शेख यांच्या सभापती पदासाठी गेल्यावेळी उपमहापौर युनूस इसा यांनी मदतीचा हात दिला होता. त्यामुळे शहर विकास आघाडीचे युनूस इसा यांचे स्थायी मध्ये केवळ २ सदस्य असले तरी काँग्रेसच्या मदतीची परतफेड त्यांना यावेळी केली जावू शकते. त्यामुळे काँग्रेसची ५ सदस्य आपल्या बाजूने वळव‌िण्यात ते यशस्वी होतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच सत्ताधारी तिसरा महाजकडे हाजी मोहम्मद इब्राहीम यांच्या रुपाने महापौरपद कायम आहे. या सोबतच स्थायीचे सभापती पद देखील आपल्याकडे राहावे यासाठी जोर लावला जात आहे. महाजचे एजाज बेग हे युनूस इसा यांना प्रतीस्पर्धी म्हणून या निवडणुकीत आहेत. त्यांच्या पक्षाचे ५ सदस्यसह अन्य ४ सदस्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी त्यांच्याकडून सर्व शक्यता पडताळून पहिल्या जात आहेत. अर्थातच बहुमत दोघांकडे ही नसल्याने प्रत्यक्ष सभागृहात कोण कुणाच्या परड्यात मत देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सेना, जद, माविआघाडी मते निर्णायक

स्थायी समितीमध्ये शिवसेनेची २, जनता दल व मालेगाव विकास आघाडी प्रत्येकी १ सदस्य आहेत. या निवडणुकीत या तिघांची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी यांना आपल्या बाजूने मत टाकण्यासाठी गळ घातली आहे. शहर विकास आघाडीचे युनूस इसा यांचे राजकीय सबंध सगळ्यांशी सलोख्याचे राहिले आहेत. तर इकडे तिसरा महाज देखील इतरांशी संपर्कात आहे. त्यामुळे ही निर्णायक मते कुणाच्या बाजूने जातात याची उत्सुकता कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीवर विरोधाची धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रस्तावित ३३ टक्के वीज दरवाढीबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत सोमवारी राजकीय पक्ष, ग्राहक प्रतिनिधी, उद्योजक व सामान्य नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी करीत विरोधाची धार आणखी तीव्र केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी दहा वाजता नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या पाच जिल्ह्यांतील वीज ग्राहकांनी केलेल्या हरकतींवर आयोगाचे अध्यक्ष अझीज खान, सदस्य दीपक लाड, अश्विनीकमुार यांच्यासमोर ही सुनावणी घेण्यात आली. या वेळी तब्बल ४४ हरकती दाखल झाल्या. त्यातील निम्म्याहून अधिक तक्रारदारांनी आयोगासमोर हजर राहत गाऱ्हाणे मांडले. या वेळी महाराष्ट्र विद्युत कंपनीने मॅनेजिंग डायरेक्टर पी. यू. शिंदे यांनी सुरुवातीला वीज दरवाढीचा प्रस्ताव मांडला व सर्व हरकतींनंतर विद्युत कंपनीची भूमिकाही मांडली.

आम्ही तक्रारी करतो, पण आयोग त्या ऐकतो का, आयोगाने नाशिक शहरात फिरावे, आयोग कसली सुनावणी घेत आहे, आयोग नेमके करते काय, असा असा प्रश्नांचा भडीमार करत ही सुनावणी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू होती. चार वर्षांची एकत्रित वीज दरवाढ करण्यासाठी नियामक आयोगाकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर वीज ग्राहकांच्या हरकती व सूचना घेतल्यानंतर वीज नियामक आयोग त्यावर निर्णय घेणार आहे.

भाजपवगळता सर्वच पक्षांची हजेरी

गेल्या वेळी आयोगाच्या सुनावणीकडे पाठ फिरवणाऱ्या पक्षांनी हजेरी लावत आपला संताप व्यक्त केला. या वेळी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, माकप यांनी कार्यकर्त्यांसोबत हजेरी लावली. आयोगानेही या पक्षांच्या नेत्यांना ताटकळत न ठेवता आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली. मात्र, या वेळी एकही भाजप नेता आला नाही. प्रस्तावित वीज दरवाढीवर विरोध तीव्र असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. हॉलमध्येही साध्या वेशातील पोलिस ठिकठिकाणी तैनात होते.

उद्योजकांच्या संघटना गायब

वीज दरवाढीचा सर्वाधिक फटका उद्योग व व्यापाऱ्यांना बसणार आहे; पण या सुनावणीत कोणत्याही उद्योग संघटनेने अधिकृत हरकत घेतली नाही. काही उद्योजकांनी आपली स्वतंत्र हरकत नोंदवत आयोगापुढे उद्योगांचे प्रश्न मात्र मांडले. व्यापारी संघटनाही या सुनावणीत दिसल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयास्पद औषध खरेदीला मंजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी रुपयांची केलेली औषध खरेदी संपलेली नसतानाच, वैद्यकीय विभागाने सोमवारी स्थायी समितीवर पुन्हा तब्बल तीन कोटीचे औषेध खरेदीसाठी संशयास्पद प्रस्ताव सादर करून मंजूर करून घेतला. सिंहस्थातील खरेदीचे तुकडे पाडून कार्योत्तर मंजुरीच्या आड ही खरेदी केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

खरेदीचे आवक-जावक रजिष्टर नसताना या खरेदीत गौडबंगाल असल्याचा आरोप सदस्यांनी केला. तर खरेदीचे प्रस्ताव अगोदरचेच असल्याचा धक्कादायक खुलासा प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी केला. तरीही सभापती सलीम शेख यांनी या खरेदीला मंजुरी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सभापती शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. त्यात भूसंपादनासह वैद्यकीय विभागासाठी तीन कोटी २ लाख रुपयांच्या खरेदीचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात हॉस्पिटल्ससाठी कोट्यवधी रुपयांची औषध खरेदी करण्यात आली होती. हा साठा संपला नसतानाही, पुन्हा सोमवारच्या स्थायी समितीवर खरेदीचे प्रस्ताव ठेवण्यात आले. या प्रस्तावावर सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. पालिका रुग्णालयातील डॉक्टर्स रुग्णांना चिठ्ठी देऊन औषधांची खरेदी खासगी मेड‌िकलमधून करायला लावतात, असा आरोप सदस्यांनी केला. दिनकर पाटील यांनी औषधांच्या खरेदीची आवक-जावक रजिष्टर आहे का असा सवाल केला.

वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावांवरच प्रकाश लोंढे यांनी आक्षेप घेतला. सदरील प्रस्तावातील खरेदी अगोदरच करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. प्रस्ताव ६० लाखांचा असला तरी, त्यातील २० लाखांची खरेदी अगोदरच केली आहे. परंतु, कार्योत्तर मंजुरीच्या नावाखाली एकत्र‌ित ६० लाखांचा प्रस्ताव ठेऊन सदस्यांची दिशाभूल करण्याचा वैद्यकीय विभागाचा प्रयत्न आहे. कार्योत्तर मंजुरीचे विषय हे पंधरा दिवसात स्थायी समितीवर आले पाहिजेत. परंतु, ते टाळून एकत्र‌ित प्रस्ताव करून पाठविला तसेच या खरेदीत मोठे गौडबंगाल असल्याचा आरोपही त्यांनी केला. डेकाटे यांनी आपण पदभार घेतल्यानंतर औषधांची मागणी वाढली. परंतु, खरेदीचे प्रस्ताव अगोदरच तयार होते. त्यांना कुणीही हात लावत नव्हते. आपण ते सभेवर ठेवले. तरीही सभापती शेख यांनी सदरील खरेदीला मंजुरी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात ही खरेदी आवश्यक असल्याने ती करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

निकुळेंचा अट्टाहास सिंहस्थ निधीतून बिटको रुग्णालयात एमआरआय व सिटी स्कॅन मशीन खरेदी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने तीनदा निविदा काढल्यात. परंतु एका ठेकेदाराने बाजारभावापेक्षा अधिकच्या दराची निविदा सादर केली. परंतु, तत्कालिन आयुक्त डॉ. गेडाम यांनी हे दर फेटाळून लावत केएम हॉस्पीटल्सच्या धर्तीवर खरेदी करावी अशी सूचना केली आहे. परंतु, मनसेचे सदस्य यशवंत निकुळे यांनी संबंधित ठेकेदाराकडूनच खरेदी करण्याचा अट्टाहास धरला. अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दर जादा असल्याने खरेदी करता येणार नसल्याचे सांगीतले. तरीही निकुळेंनी खरेदीचा अट्टाहास कायम ठेवल्याने अधिकारी व सभापतींनाही आश्चर्य वाटले.

पवार-डेकाटे वाद दरम्यान, स्थायीच्या बैठकीत सदस्या रंजना पवार यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्यावर गंभीर आरोप केले. पावडर खरेदीसाठी १५ ते २० रुपयांचा प्रस्ताव ठेऊ, अशी भाषा डेकाटेंनी केल्याचा आरोप केला. त्यावरून पवार चांगल्याच आक्रमक होवून त्यांनी सभेतच डेकाटे यांना सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोणीतून कांदा विक्रीला शेतकऱ्यांचा विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने संप स्थगीत करून सोमवार (दि. २५)पासून कांदा लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले. मात्र शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गोणीत भरून आणावा, अशी अट घातल्याने हा संप मिटला तरी शेतकरी समाधानी नसून अजूनही कांदा विक्रीस तयार नाही.

येत्या सहा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी गोणीतून कांदा विक्री करावा, असे ठरविण्यात आले असले तरी सायखेडा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी या विक्रीला विरोध दर्शवत खुल्या पद्धतीने कांदा खरेदी करावा, अशी मागणी केली आहे. याविषयी सायखेडा मार्केटमध्ये बाजार समितीचे संचालक, व्यापारी, शेतकरी यांची बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समिती संचालक गोकुळ गिते यांनी शेतकरी अन व्यापाऱ्यांमध्ये मध्यस्थीची भूमिका केली. सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी भरडला जात आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सायखेडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कमानकर म्हणाले, आम्हाला अडत बंद झाल्याने कांदा खरेदी परवडत नाही. तर, शेतकरी प्रभाकर रायते यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट बंद असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असून, गोणीत कांदा विक्री करणे परवडणारे नसल्याचे सांगितले. बाजार समिती संचालक विजय कारे, अश्पाक शेख यांनी मत व्यक्त केले. येत्या शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. लासलगाव

लासलगावात आज लिलाव सुरू!

बाजार समितीतील कांदा व्यापारी वर्गाने प्रशासनाशी चर्चा करून परवाने परत करण्यात मागणी केली. आम्ही लिलावात सहभागी होण्यास तयार आहोत, असे सांगितले. त्यामुळे लासलगाव बाजार समितीत मंगळवारी कांदा लिलाव सुरू होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीचा वाद मिटता मिटेना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेला घंटागाडीचा ठेका पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून अखेर दोन वर्षांपासून रखडलेला ठेका स्थायी समितीवर दाखल झाला असून त्यातील अटी शर्तींबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी समाविष्ट केलेल्या कडक अटीशर्ती नव्या प्रस्तावात दिसत नसल्याने शहरात जुन्याच घंटागाड्या धावणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे सध्याच्या वादग्रस्त ठेकेदारांनाच ठेका देण्याचा प्रस्ताव पुढे आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या या ठेक्याची रक्कम दीडशे ऐवजी १७६ कोटींवर पोहचलण्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना ठेका देवू नका, अशी मागणी करणारे सदस्य आता काय भूमिका घेतात. याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून घंटागाडी ठेक्याचा वाद थांबण्याची शक्यता दिसत नाही. दोन वर्षाच्या वादग्रस्त प्रतिक्षेनंतर आता हा ठेका स्थायी समितीवर आला आहे.

दहा वर्षांवरून घंटागाडीचा ठेका पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर निविदा प्रक्रियेत २७ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. परंतु, यात ब्लॅकलिस्टेड वाटरग्रेस, असिफअली या ठेकेदारांनी सहभाग घेण्यावरून वाद निर्माण झाला होता. परंतु, उच्च न्यायालयाने या दोघांना सहभागी होण्याचे आदेश दिल्यानंतर आरोग्य विभागाने निविदा उघडल्या. त्यात नाशिक पश्चिममध्ये वाटग्रेस, नाशिक पूर्वमध्ये असीफअली आणि नाशिकरोड, सातपूर, पंचवटी व सिडकोमध्ये पुण्याच्या जी. पी. एंटरप्रायजेसच्या निविदा या सर्वाधिक कमी आल्या होत्या. परंतु, एकाच कंपनीला दोन विभाग देता येत असल्याने आता ठेकेदारांनी रिंग करून वाटून घेतल्या आहेत. कचऱ्याचे दर प्रतिटन १४९० पासून ते २०८२ रुपयांपर्यंत ठरविण्यात आले आहेत.

तत्कालिन आयुक्त डॉ. गेडाम यांनी या ठेक्यात कडक अटीशर्तींचा अंतर्भाव केला होता. सध्याच्या घंटागाड्यांऐवजी नव्या घंटागाड्या खरेदी करण्यासह, दंडाची रक्कम वाढवणे, जीपीआरएस लावणे, अशा अटी टाकल्या होत्या. तर दहा वर्षांसाठी तीनशे कोटी खर्च येईल असे म्हटले होते. परंतु, स्थायी समितीवर आलेल्या प्रस्तावात मात्र या अटीशर्ती गायब झाल्याची शंका आहे. नव्या वाहनांसदर्भात कुठलाही उल्लेख नसल्याने शहरात जुन्याच घंटागाड्या धावतील काय, याबाबत शंका आहे. तर पाच वर्षांत घंटागाडी ठेकेदारांना १७६ कोटी रुपये देण्यात येणार आहे. डॉ. गेडाम यांच्या हिशेबानुसार पाच वर्षात दीडशे कोटीचा खर्च येणे अपेक्षित होता. परंतु, या ठेक्यात ही रक्कम थेट १७६ कोटीपर्यंत पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष घंटागाडीच्या सध्याच्या ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासह विविध विषयांवरून पालिकेची कोंडी केली होती. त्यावरून या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. काही ठेकेदारांवर थकबाकीही आहे. ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना कामच देऊ नये, अशी भूमिका सदस्यांनी घेतली होती. परंतु, आता तेच ठेकेदार घंटागाडीसाठी पुन्हा आल्याने स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे नव्या ठेक्यासंदर्भात सदस्यांचाही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एरोबिक्समध्ये इश्माला गोल्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा तिसरीतील विद्यार्थी इश्मा देशमुख याने भूतानमधील आंतरराष्ट्रीय एरोबिक्स, तसेच नाशिक येथील किकबॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले. भूतानमधील यशामुळे इश्मा १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या रशियन ओपन वर्ल्ड स्पोर्टस एरोबिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ही स्पर्धा मॅास्कोमध्ये होणार आहे.

भूतान स्पोर्टस एरोबिक्स अँड फिटनेस असोसिएशनतर्फे इंडो-भूतान स्पोर्टस एरोबिक्स, फिटनेस अँड हिप-हॉप चॅम्पियनशिप स्पर्धा जुलैमध्ये भूतानमध्ये झाली. इश्माने स्पोर्टस एरोबिक्समध्ये १० वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेसाठी सर्व वयोगटातील एकूण १६२ खेळाडू सहभागी झाले होते. दहा वर्षांखालील वयोगटात भारतत आणि भूतानतर्फे प्रत्येकी चार असे एकूण ८ खेळाडू खेळत होते. त्यात इश्माने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक मिळवला.

पंचवटीतील इश्मा स्पोर्टस अँड फिटनेस क्लबमध्ये नुकत्याच झालेल्या २३ व्या नाशिक सिटी अँड डिस्ट्रिक्ट किकबॅाक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इश्माने ७ ते ९ वर्षांखालील वयोगटात गटात पॉइंट फायटिंग या इव्हेंटमध्ये सुवर्णपदक मिळविले. स्पर्धेत जिल्ह्यातील २७५ खेळाडू सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेक्षकांना मनात भरली ‘गुरूवंदना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्रितालातील चक्रदार, परण, तिहाई, तोडे अशा एकापेक्षा एक कथ्थक नृत्याच्या सादरीकरणातून सोमवारची संध्याकाळ रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. निमित्त होते कीर्ती कला मंदिराच्या विद्यार्थींनींकडून आयोजित 'गुरूवंदना' या बहारदार कार्यक्रमाचे. गुरूपौर्णिमेनिमित्त रेखा नाडगौडा यांचे विद्यार्थिनींच्या वतीने गुरूपूजन करण्यात आले.

कालिदास कलामंद‌िरात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थिनींच्या वतीने सुरुवातीला रेखा नाडगौडा यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आदिती नाडगौडा यांनी नृत्यबद्ध केलेली श्रीराम वंदना सादर करण्यात आली. लहान मुलींनी सादर केलेल्या 'मोदक वाला बाप्पा तुझी किती किती रुपे' या बालगीतावर रसिकांनीही ठेका धरला. यंदाच्या कार्यक्रमात देवदेवतांच्या लिलांची थीम सादर करण्यात आली असून त्यात गणपती, शिवा, कृष्ण यांचा समावेश होता. सारडा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी त्रितालातील तोडा सादर केला. 'किती वेळा सांगीतले हो बाप्पा तुम्हाला' हे बालगीत इंद‌िरानगर आणि गोविंदनगर येथील विद्यार्थिनींनी सादर केले. नाशिकरोडच्या विद्यार्थीनींनी तोडे, तुकडे, चक्रदार, परण, तिहाई सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. शिवाचे रौद्र रुप सगळ्यांनी पाहिले आहे. मात्र, त्याचा शांतरस शक्यतो कुणी पाहीला नाही. शंकराचार्यांची 'वैद्यनाथष्टकम्' ही रचना नवरचना शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केली. त्यानंतर अजय अतुल यांच्या 'विश्वविनायक' अल्बम मधील 'जय गणपती सद्गुण सदन करीवर बदन कृपा' ही 'गणेश चाल‌िसा' नाशिकरोडच्या विद्यार्थिनींनी सादर केली. कोक स्टुड‌िओची रचना असलेले 'करे मन भजन हे' हे फ्यूजन नाशिकच्या विद्यार्थिनींनी सादर केले. 'भ्रजयी भ्रजयी कमंडलम्, समस्त पाप खण्डणम्' हे शंकराचार्य रचित 'कृष्णाष्टक' सादर करण्यात आले. त्यानंतर 'भैरवी' सादर करण्यात आली' यंदाच्या भैरवत तीन नायिकांची स्तुती सादर करण्यात आली. यात 'कैसी ये बला' ही ठुमरी सादर करण्यात आली. कृष्णाच्या लिलांचे वर्णन करणारी 'देखो मेरी चुरीया करक गयी', 'पायलीया बाजेरे मोरा सैय्या 'मै तोरे संग ना जाऊंगी' या रचना सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाचा शेवट 'तराना' ने झाला संपूर्ण कार्यक्रम हा विद्यार्थिनींनी आपल्या गुरूला समर्पीत केला होता. कार्यक्रमातील नृत्यरचना आदिती नाडगौडा-पानसे, रेणूका येवलेकर अनुजा फडके, केतकी साठे, मधुश्री वैद्य, वृषाली गोसावी, प्रसन्ना जोशी, दुर्वाक्षी पाटील, मृणमयी येडसीकर, ऐश्वर्या जोशी, शिवानी जोशी, नेहा केतकर, आकांक्षा कोठावदे, शुभलक्ष्मी बालाजीवाले, सृष्टी तेजाळे, भक्ती गाढे, ऋतुजा जोशी, श्रृती देवधर यांची होती. हार्मोनियमची साथ सुभाष दसककर, इश्वरी दसककर यांनी तर तबला साथ सुजीत काळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीविरोधात सामान्यांचा उद्रेक

$
0
0

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आक्रमक; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्युत नियामक आयोगासमोर भाजपचा अपवाद वगळता उर्वरित राजकीय पक्षांनी आपला विरोध नोंदवत ग्राहकांची बाजू मांडली. गेल्या वेळी आयोगाकडे पाठ फिरवणाऱ्या राजकीय पक्षांची ही उपस्थिती सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरली. विशेष म्हणजे या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका नेटकी व मुद्देसुदपद्धतीने मांडली.

सुनावणीसाठी शिवसेनेने आयोगासमोरच जर वीज दरवाढ झाली तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा दम भरला. राष्ट्रवादीने शेतकऱ्यांची व्यथा मांडली. काँग्रेसने सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. मनसेने मंडळाचा हिशोबच मांडला, तर डाव्या आघाडीतर्फे सरकार दरवाढीचे खापर आयोगाच्या माथी मारत असल्याचे सांगितले.

शिवसेना स्टाईल आदोलन करू

शिवसेनेतर्फे मी शहराचा ट्रस्टी म्हणून बोलत आहे. राज्यात प्रत्येक विभागात दर वेगवेगळे आहेत, असा दुजाभाव का केला जातो. मराठवाडा व विदर्भाला वेगळे दर व उत्तर महाराष्ट्रावर अन्याय का असे सांगत शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी वीज दरवाढीविरोधात संताप व्यक्त केला. आताची प्रस्तावित दरवाढ ही ३३ टक्केच्या आसपास असून ती अन्यायकारक आहे. त्याला आमचा विरोध असून ती रद्द करावी, गळती व भ्रष्टाचारामुळे नुकसान होते. ते ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. थकबाकी, भ्रष्टाचार, गळती कमी केली पाहिजे, थोडा पाऊस झाला तर वीज खंड‌ित होते. त्यामुळे आयोगाने नाशिकमध्ये फिरावे म्हणजे त्यांना ग्राहकांचे प्रश्न कळतील. वीज कनेक्शन घेतांना १५ हजार, डीपी दुरुस्तीसाठी ४० हजार घेतले जातात. ही लाजीरवाणी बाब आहे. देशातील इतर राज्यात वीज दर कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय का असा प्रश्न उपस्थित करत स्वस्त विजेचा पुरवठा करा. वीज दरवाढ लादली तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा, इशारा दिला.

आपली वीजच महाग

केंद्राची वीज ३ रुपये २५ पैसे, खासगी वीज ३.५० व महानिर्मितीकडून वीज घेतली जाते ४.१५ पैशाने. आपली वीजच महाग असेल तर मग कसे होणार, असा प्रश्न उपस्थित करत मनसेचे राज्य सचिव प्रमोद पाटील यांनी या दरवाढीला जोरदार विरोध केला. ५६ हजार कोटीच्या दरवाढीला मान्यता देऊ नये. आयोगाने असेंसमेंट बरोबर केली आहे का ते बघावे. एनर्जी ऑडीट झाले पाहिजे. बिल पोलीसी चुकीची आहे. प्रत्येक वेळेस नाशिकवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ही दरवाढ अयोग्य आहे. असेंसमेंट, आडीट व अकाऊंटब्लिटी असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही वीज दरवाढ करू नये. अपारंपरिक स्त्रोताचा वापरही वाढवणे गरेजेचे असल्याचे सांगत त्यांनी वीज मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

शेतकऱ्यांची परिस्थिती अवघड

जिल्ह्यात ७० टक्के शेतकरी आहेत. यावर्षी ५० आत्महत्या झाल्या. आता वीजेच्या दरात वाढ झाली तर रोज आत्महत्या होतील. शेतकऱ्यांची परिस्थिती अवघड आहे. ते हलबल झाले आहेत. ३३ टक्के वीजेची दरवाढ ही अन्यायकारक असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी पक्षातर्फे विरोध नोंदवला. विद्युत मंडळ ही काही प्रॉफीट मेकिंग कंपनी नाही. त्यामुळे आर्थिक चणचण भासत असेल तर सरकारच्या तिजोरीतून पैसे घ्यावे. पण ग्राहकांवर वीज दरवाढ करू नये.

राज्यात दुजाभाव नको

प्रस्ताव‌ित दरवाढीला आमचा विरोध आहे. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भला वेगळा न्याय देतात. त्याचे दर वेगळे करतात. हा दुजाभाव नाशिकवर अन्याय करणार आहे. त्यामुळे नाशिकला न्याय द्यावा, असे आवाहन करत काँग्रेसचे महानगराध्यक्ष शरद आहेर यांनी पक्षाची भूमिका मांडली. नाशिकमधून अनेक उद्योगांनी स्थलांतर केले आहे. तर अनेक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे ही दरवाढ अजून उद्योगधंदे बंद करणारी ठरेल. दरवाढी केली आणि जनतेचा उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी नियामक आयोगाची असेल असेही त्यांनी सांगीतले. शेजारच्या राज्यापेक्षा दर कमी असायला हवे. त्यामुळे त्याचे नुकसान सहन करावे लागते. याबरोबरच शेतीसाठी ही वीजदरवाढ अन्यायकारक आहे. या दरवाढीबरोबर त्यांनी वीज मंडळाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करुन डीपी शिफ्ट करायची तर पैसे लागतात. त्यामुळे हा भ्रष्टाचार रोखणे गरजेचे असल्याचे सांगीतले.

दरवाढ माथी मारली जातेच

सरकार दरवाढीची जबाबदारी आयोगाच्या माथी मारून नामनिराळे होऊ पाहत आहे. त्यामुळे ही दरवाढ करू नये. त्यामुळे सामान्य माणूस व छोट्या उद्योगांना मोठा फटका बसेल. आयोगाची ही सुनावणी केवळ औपचारिकता आहे. असे वाटू नये त्यावर निर्णय घ्यावा, असे आवाहन कामगार व डाव्या आघाडीचे नेते डॉ. डी. एल. कऱ्हाड यांनी केले. राज्यात ३५ हजार उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामागील ९७ टक्के कारण स्पर्धेत टिकू शकत नाही. चायनाचा मालाने त्यावर परिणाम केला आहे. जे उद्योग सुरू आहेत त्यांचीही मंदीमुळे ३५ टक्के क्रीयाशिलता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत ही दरवाढ अन्यायकारक ठरणार आहे. आयोगाने विशेष बाब म्हणून ही दरवाढ करू नये. रतन इंडिया कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा, कॉर्पोरेट कंपनीची सर्व व्यवहाराची तपासणी करा, अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानांचा लिलाव आजही ठप्प?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

राज्य सरकारच्या भाजीपाला व फळे नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांकडून आडत वसुली सुरू झाली असले तरी पानांच्या बाबतीत हा प्रश्न अजून सुटलेला नाही. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यातून केवळ बुधवारी होणाऱ्या पानाच्या लिलावावर मागील आठवड्यात व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला होता. आताही पानांचा लिलाव होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

मागील आठवड्यात व्यापाऱ्यांनी आडत देण्यास नकार देत लिलाव करण्यावर बहिष्कार घातला होता. पानमळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी माघार घेत आडत देण्याची तयारी दर्शविल्याने लिलाव झाले. मात्र, पुढच्या आठवड्यात पानाच्या लिलावावर बहिष्कार घालण्याचे पान खरेदीदार व्यापाऱ्यांनी ठरविले असल्याने बुधवारी (दि. २७) पानाचा बाजार भरणार की नाही, याविषयी निश्चित सांगता येत नाही. सातारा व सांगली जिल्ह्यातून नाशिकला पानांच्या टोपल्या येतात.

माल येणार की नाही? साताऱ्याहून साधारणतः रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पानांच्या ट्रक भरून नाशिकला निघतात. तेव्हा ते नाशिकच्या व्यापाऱ्यांना कळवितात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत नाशिकला पानांच्या टोपल्या दाखल होतात. दुपारी तीन-साडेतीनला लिलाव सुरू होतात. मागील आठवड्यातील अनुभव लक्षात घेता बुधवारी बाजार समितीत लिलावासाठी पानांच्या टोपल्या येतात की नाही, या विषयी साशंकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट ‘इसीएस’ने मिळणार पैसे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेयच्या ठेवीदारांना पैसे परत करण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होईल. त्यासाठी थेट इसीएस कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी स्पष्ट केले.

नाशिक पोलिसांकडे आजवर, नाशिकसह इतर ठिकाणांवरील १४ हजार १२६ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत. फसवणुकीचा आकडा ३२ कोटींच्या घरात पोहचला आहे. तर एस्क्रो खात्यात ६ कोटी ३५ लाख रूपयांची रक्कम जमा आहे. अद्यापही तक्रारदारांचा ओघ कमी झालेला नाही. पोलिसांकडे तक्रार केलेल्या अथवा न केलेल्या प्रत्येक ठेवीदाराला पैसे करण्यात येतील. कोर्टाच्या अटींनुसार मैत्रेयचे संचालक उर्वरीत पैसे जमा करतील. सध्या आम्ही मॅच्युरीटी पूर्ण झालेल्या गुंतवणुकदारांना प्राधन्यक्रमानुसार पैशांचे वाटप करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. इसीएस कार्यप्रणालीमुळे गुंतवणूकदारांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होतील. पुढील आठवड्यापासून ही कार्यवाही सुरू होईल. पैसे वाटपासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यात तपासधिकारी, तहसीलदार, तसेच मैत्रेयचा एक प्रतिनिधी आहे. ही कमिटी आठवडाभर गुंतवणुकदारांच्या नावांची प्राधन्यक्रम यादी तयार करेल. त्यानंतर सोमवारी किंवा फारतर मंगळवारी पैसे खातेदारांच्या खात्यावर जमा होतील. सध्या एस्क्रो खात्यात जमा असलेल्या पैशांचे वाटप होईपर्यंत आणखी पैसे जमा होतील, अशी अपेक्षा आयुक्त जगन्नाथन यांनी व्यक्त केली. मैत्रेय कंपनीने दिलेल्या आश्वासना इतकेच म्हणजे रक्कम आणि त्यावरील व्याज परत केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images