Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बाप्पांचा यंदा दिलासा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने मूर्तीकारांकडे कामाची लगबग सुरू झाली आहे. यंदा मूर्तींचे भाव वाढणार नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. मात्र, कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती डिसेंबर- जानेवारीपासूनच. याच कालावधीत मिळालेल्या ऑर्डरनुसार कामाला सुरुवात होते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांनंतर दसऱ्यापर्यंत मूर्तिकारांच्या कामाला विश्रांती असते. त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर हत्यारांचे व मातीचे पूजन करुन गणेश मूर्ती आकाराला येतात. सुरुवातीला मागील वर्षीच्या मूर्तींचा आढावा घेऊन यंदाच्या वर्षात कोणत्या डिझाइन्स तयार करता येतील, याचा प्रथम विचार केला जातो. मागील वर्षीच्या मूर्तींमध्ये बदल करुन व ग्राहकांची आवडनिवड लक्षात घेता कच्चे ड्रॉइंग तयार केले जाते. त्यानंतर मातीची मूर्ती साकारुन त्यावर साचे तयार केले जातात व त्यापासून असंख्य मूर्ती आकाराला येतात. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राह‌िले आहेत. ५ सप्टेंबरला गणपती बसणार आहेत. अनेक ग्राहकांनी आपल्या ऑर्डर आधीच बुक करुन ठेवल्या आहेत. मूर्तीकारांनी काम हातावेगळे केले असून रंगकामाला सुरुवात केली आहे. यावर चढवला जाणारा सोनेरी व चांदीचा रंग मात्र दोन ते तीन दिवस आधी दिला जातो. त्यावर अभ्रक असल्याने ते उडून जाते म्हणून ही प्रक्रीया उशिरा सुरू होते. दरम्यान, अनेक मूर्तिकारांनी मूर्तीला कुठलेही ओंगाळवाणे रुप न देता पारंपरिक शैलीतील मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. राजस्थानातून येणाऱ्या मूर्ती विच‌ित्र असल्याने ग्राहकांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली आहे.

यंदा हा ट्रेंड यंदा संगीत गणपती, व्हॉयोल‌िन वाजवणारा गणपती, नगारा वाजवणारा गणपती, उंदरावर आरुढ असलेला गणपती, सत्यविनायक, लक्ष्मी कुबेर (कमळात बसलेला) पेण पद्मासन, दगडूशेठ, टिटवाळा, पगडी फेटा, वेलिग मास्तर गणपती, शास्त्रानुसार गणपती आदी प्रकारच्या मूर्ती तयार आहेत.

यंदा पाऊस चांगला झाल्याने मूर्तींच्या किमती आटोक्यात आहेत. नेहमीपेक्षा चांगल्या डिझाइन्स तयार केल्या असून, शास्त्रोक्त मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. - शांताराम मोरे, मूर्तिकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा लिलाव ठप्प; शेतकरी रस्त्यावर

$
0
0

गोणीत कांदा आणण्यास शेतकऱ्यांचा विरोध; बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

टीम मटा

नियमनमुक्ती धोरणामुळे निर्माण झालेला कांदा लिलावाचा तिढा चिघळतच चालला आहे. त्यातच कांदा गोणीत आणावा, अशी आडमुठी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे बुधवारी नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, येवला, झोडगे, मुंगसे, उमराणे बाजार समितीत लिलाव सुरळीत होऊ शकले नाहीत. गोणी पद्धतीने कांदा लिलाव नको, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यामुळे शेतकरी-व्यापारी असा संघर्ष निर्माण झाला आहे.

कळवणला सर्वपक्षीय रास्ता रोको

कळवण ः गोणी पध्दतीऐवजी बाजार समित्यांमध्ये जुन्याच प्रचलित पध्दतीनेच विना आडत कांद्याचे लिलाव त्वरित सुरू करावेत, अशी स्पष्ट भूमिका घेत सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी कळवण बसस्थानकासमोर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाला कायदेशीर अडचण ठरवत आंदोलनकर्त्या सर्व शेतकऱ्यांना कळवण पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. दरम्यान, या प्रश्नी आज कळवण बंदची हाक देण्यात आली आहे.

बाजार समितीमध्ये गोणी पद्धतीच्या कांदा खरेदीला मंगळवारी सुरुवात झाली होती. मात्र सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शवत व्यापारी संघटनेचा निषेध नोंदवत बुधवारी सकाळी ११ वाजेपासून कळवण बस स्थानकासमोर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे कळवण-देवळा व कळवण-नाशिक रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार कैलास चावडे, कळवण बाजार समितीचे सचिव रवींद्र हिरे, सहाय्यक निबंधक प्रकाश देवरे, पोलिस निरीक्षक सुजय घाडगे यांना निवेदन दिले. या आंदोलनासाठी आमदार जे. पी. गावित यांनी हजेरी लावत या गंभीर प्रश्नावर आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत व विधानसभेत हा प्रश्न मांडणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष देवीदास पवार, शिवसेनेचे नेते कारभारी आहेर, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राजेंद्र भामरे, हेमंत पाटील, संजय वाघ, शैलेश पवार, प्रभाकर पाटील, भाई दादाजी पाटील, शांताराम जाधव आदींनी मनोगत व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. या आंदोलनाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे, नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, उपसभापती संजय पवार, सुधाकर पगार, निंबा पगार, मोतीराम पगार, साहेबराव पगार, संभाजी पवार, किशोर पवार, प्रवीण रौंदळ, अतुल पगार, प्रदीप पगार, जितेंद्र पगार, भाऊसाहेब पवार, संतोष देशमुख, भरत शिंदे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

सटाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

सटाणा ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांचे लिलाव पूर्णत: बदं असल्याने कांदा व भुसार मालाचे व्यवहार ठप्प झाले आहेत. कांदा सडू लागल्याने, तसेच गोणी पध्दतीला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने सटाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कचेरीच्या आवारात मोफत कांदा वाटप करण्यात आला. लवकरात लवकर प्रचलित लिलाव सुरू करावा, या मागणीचे निवेदनदेखील तहसीलदार सुनील सैंदाणे यांना देण्यात आले.

बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुका कार्याध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा कांदा सडू लागल्याने कांदा उत्पादकांच्या माध्यमातून तहसील कचेरीच्या प्रांगणात मोफत कांदा वाटप करण्यात आला. शेतमाल विक्रीची समांतर व्यवस्था उभारून कांदा व भुसार मालाचे विक्री व्यवहार तत्काळ सुरू करावेत, अन्यथा शेतकरी मालाचे ट्रॅक्टर्स भरून तहसील आवारात उभे करतील, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिभाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी संरपच संजय पवार, गटनेते काका रौंदळ, जे. डी. पवार, काकाजी सोनवणे, सुभाष सोनवणे, केशव सोनवणे, मयूर अहिरे, आप्पा पाटील, प्रसाद दळवी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मुंगसे, उमराणेत लिलाव ठप्प

मालेगाव ः नियमनमुक्ती धोरणामुळे निर्माण झालेला कांदा लिलावाचा तिढा अद्यापदेखील कायम आहे. मालेगाव बाजार समितीच्या झोडगे, मुंगसे कांदा खरेदी केंद्र, तसेच उमराणे बाजार समितीत बुधवारीदेखील लिलाव सुरळीत होऊ शकले नाहीत. गोणी पद्धतीने कांदा लिलाव नको, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यामुळे बुधवारी बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला.

मंगळवारी उमराणे बाजार समिती आवारात संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता, तर मुंगसे येथे देखील लिलाव बंदच राहिला. बुधवारीदेखील या दोन्ही ठिकाणी कांदा लिलाव सुरळीत होऊ शकला नाही. एरवी दोन ते तीन हजार क्विंटल आवक होणाऱ्या मुंगेस खरेदी विक्री केंद्रात बुधवारी अत्यल्प तीस क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती बाजार समिती सचिव अशोक देसले यांनी दिली.

आमदार चव्हाण यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

सटाणा ः कांदा गोणीत कांदा आणला तरच लिलावात सहभागी होऊ, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, यावर शासनाने तातडीने तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी आमदार दीपिका चव्हाण यांनी बुधवारी विधीमंडळात स्थगन प्रस्ताव मांडला.

कांदाप्रश्नांची दखल घेत आमदार दीपिका चव्हाण यांनी विधीमंडळाच्या स्थगन प्रस्तावाप्रसंगी आपली भूमिका विषद करताना स्पष्ट केले की, शेतीमाल नियमनमुक्त करण्याच्या अध्यादेशाविरुद्ध व्यापाऱ्यांनी महिनाभरापासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

मंत्रालयस्तरावर पणन मंत्र्यांसमवेत बैठका होऊन देखील व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. कांदा गोणीत भरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने शासनाने तातडीने या संदर्भात महत्त्वपूर्ण तोडगा काढण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनातिकीट रेल्वेप्रवास पडला महागात

$
0
0

रेल्वे प्रशासनाची प्रवाशांवर कारवाई

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वे गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांच्या विरोधात रेल्वे प्रशासनाने धडक मोहीम उघडली आहे. मनमाडचे वाणिज्य निरीक्षक अनिल बागले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तब्बल ४०९ फुकट्यांवर दंडात्मक कारवाई करून एक लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईचे स्वागत होत आहे.

मनमाड-नाशिक दरम्यान पंचवटी व कुर्ला एक्स्प्रेससह पवन एक्स्प्रेसमध्येही कारवाई सुरू असून, या मोहिमेने फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रेल्वेला आर्थिक फटका बसत असल्याचे स्पष्ट झाल्याने भुसावळ मंडळ व मनमाड वाणिज्य विभाग यांच्या वतीने विनातिकीट प्रवासी धडक मोहीम उघडण्यात आली आहे.

वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक सुनील मिश्रा, सहायक निरीक्षक अजयकुमार यांनी याबाबत विशेष दल गठीत केले. मनमाड वाणिज्य निरीक्षक अनिल बागले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक विनातिकीट प्रवाशांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई करीत असून, बुधवारपर्यंत एक लाख ३६ हजार रुपयांची दंडवसुली झाली आहे. ही धडक कारवाई चर्चेचा विषय बनली आहे.

फुकट्या प्रवाशांना शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू असल्याने रेल्वेने प्रवास करणारे प्रवाशी तिकीट काढण्याबाबत जागरूक होतील, अशी अपेक्षा आहे. आरक्षित डब्यात बसणाऱ्या अनारक्षित प्रवासी वर्गावर ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे रेल्वेचे उत्पन्न चांगले वाढले आहे.

- अनिल बागले, वाणिज्य निरीक्षक, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ काकडी फेकली थेट घंटागाडीत!

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दुपारच्या लिलावासाठी आलेल्या काकडीचे भाव कोसळले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी काकडी थेट घंटागाडीत फेकल्याचा प्रकार घडला. काढणीपासून ते बाजारात काकडी आणण्यापर्यंत आलेला खर्चही भरून निघत नसल्याने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी असे पाऊल उचलले. गेल्या आठवड्यात ४०० रुपये प्रती क्रेट अशा भाव असलेली काकडी ४० रुपये प्रती क्रेट भावात विकली गेली. एका क्रेटमध्ये ४० किलो काकडी मावते. म्हणजेच ४० रुपये दराने काकडीला प्रतिकिलो निव्वळ दोन रुपये भाव मिळाला.

नाशिक बाजार समितीत रोज सुमारे ४०० ते ५०० क्रेट काकडीची आवक होते. बुधवारी ही आवक दुपट्टीने वाढली. व्यापाऱ्यांना आडत द्यावी लागत आहे तेव्हापासून भाजीपाल्याच्या लिलाव चढ्या दराने होत नाहीत. बुधवारच्या लिलावात संगमनेर, अकोला येथून काकडीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि अचानक भाव कोसळले. काही शेतकऱ्यांना तर शेतापासून बाजारापर्यंत काकडी आणण्यासाठी आलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे त्यांनी काकडी बाजार समितीमध्ये आणून कोणताही फायदा झालेला नाही. त्यांनी बाजार समितीत आलेल्या घंटागाडी काकडी फेकून दिली.

असा आला खर्च अकोला येथून आलेल्या एका शेतकऱ्याला प्रति क्रेट ३० रुपये वाहतुकीची खर्च, १० रुपये प्रति क्रेट तोडण्याचा खर्च, दोन रुपये हमाली असा खर्च आला. त्याने आणलेल्या सात क्रेटला प्रती क्रेट ४२ रुपये खर्च आला. काकडी विकून प्रती क्रेट ५५ रुपये मिळाले. अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्याने जगायचे कसे, असे म्हणत त्याचे डोळे पाणावले.

काकडीच्या बियाण्यांच्या खरेदीपासून ते बाजारात विक्रीस आणण्यापर्यंत प्रती किलो कमीत कमी १० रुपये खर्च येतो. एक क्रेट २० किलो पेक्षा जास्त वजनाचे असते. म्हणजे क्रेट मागे १०० रुपये खर्च आहे. ती काकडी केवळ ५० रुपये प्रती क्रेट अशी विकली गेली. खर्च जास्त आणि भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांवर काकडी फेकून देण्याची वेळ आली.

- राजाराम तुपे, शेतकरी, सिन्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोलणी फिस्कटल्याने ‘रेशन’चा संप अटळ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन दुकानदारांच्या मागण्या तूर्तास मान्य होऊ शकत नसल्याचे बुधवारी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिनधारकांनी पुकारलेला संप अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सहा हजार ७०० व्यावसायिक ठरल्याप्रमाणे १ ऑगस्टपासून संपावर जाणार असून, त्यामुळे रेशन व्यवस्था ठप्प होणार आहे.

रेशन दुकानदारांना दरमहा ३५ हजार रुपये मानधन मिळावे, हमालीसह दुकानापर्यंत माल पोहोच करण्यात यावा, विविध योजनांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत यांसह अनेक मागण्या प्रलंबित असून, त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी रेशन दुकानदारांनी सरकारला ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय रेशन दुकानदारांच्या विविध संघटनांनी घेतला आहे. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी २७ जुलैला सायंकाळी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, सचिव महेश पाठक, उपसचिव सतीश सुपे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्याध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर, जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, गणपत डोळसे पाटील, बाबूराव मम्हाणे, विजय गुप्ता आदी उपस्थित होते. अर्धा ते पाऊण तास विलंबाने बैठक सुरू केल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन दुकानदारांच्या मागण्या तूर्तास मान्य होऊ शकत नाहीत. मात्र, चार महिन्यांनी आपण मागण्यांबाबत नक्की विचार करू, असे आश्वासन पाठक यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, महिनोनमहिने आमच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याने त्वरित मागण्या मान्य कराव्यात, असा आग्रह संघटना पदाधिकाऱ्यांनी धरला. रेशन दुकानदारांना पगार देण्यास सरकारने असमर्थता दर्शविली. तसेच कमिशन वाढवून देण्यास वित्त विभागाची मान्यता घ्यावी लागेल. त्यासही वेळ लागणार असल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक नसल्याचे स्पष्ट झाल्याने संघटना संपावर ठाम असल्याचे ठणकावून सांगण्यात आले.

सरकारने मागण्या मान्य करण्यास तयार नाही. चार महिने थांबूनही सरकार आमचा सकारात्मकतेने विचार करेल असे वाटत नाही. त्यामुळे हा संप अटळ आहे. जिल्ह्यातील २ हजार ६०० रेशन दुकानदार आणि ३ हजार ९०० केरोसिन विक्रते या संपात उतरणार आहेत.

निवृत्ती कापसे,

जिल्हाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयडीज’मुळे मंदावला केबीसीचा तपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केबीसी कंपनीच्या जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमध्ये पाच लाखांच्या वर आयडीज (गुंतवणूकदारांची तसेच त्यांच्या व्यवहारांची माहिती) सापडल्या आहेत. एवढ्या मोठ्या माहितीचे पृथःकरण करण्याचे अवघड काम सध्या कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये सुरू असून, त्यामुळेच तपासही रेंगाळला असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या केबीसी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब आणि त्याची पत्नी आरती चव्हाण सध्या नाशिक सेंट्रल जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. नाशिकसह पुणे सीआयडी, नांदेड पोलिसांनी देखील चव्हाण दाम्पत्याची चौकशी केली. मात्र, पुढे फार काही झाले नाही. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, केबीसी घोटाळ्याबाबत शहर पोलिसांकडेच दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक गुन्हा सुरुवातीस सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सीआयडीने त्यावेळी केबीसी तपासातील महत्त्वपूर्ण समजले जाणारे दस्तऐवज जप्त करून मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. केबीसी घोटाळ्याची सर्व जंत्री याच हार्ड डिस्कमध्ये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सदर हार्ड डिस्कमध्ये पाच लाख तीन हजार ३१० आयडीजची (गुंतवणूकदार तसेच त्यांचे झालेले व्यवहार) माहिती समोर आली आहे. या माहितीचे पृथःकरण करणे ही बाब फारच किचकट आहे. तपासाच्या दृष्टीने प्रत्येक प्रत्येक गुंतवणूकदाराची सविस्तर माहिती, त्यांच्याकडून जमा झालेले पैसे, बँकांचे खाते नंबर यांचे विवेचन आवश्यक आहे. तसे झाले तरच घोटाळ्याचा खरा आकडा समोर येऊ शकतो. सदर हॉर्ड डिस्कची मिरर कॉपी तयार करून त्यातील माहितीचा संदर्भ जोडण्याचे काम सुरू आहे. हे पूर्ण होऊन हार्ड डिस्क ताब्यात येताच नाशिक पोलिसांकडून तपासाला गती देण्याचे काम होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. चव्हाण दाम्पत्याला नाशिक पोलिसांनी ६ मे रोजी मुंबई विमानतळावरून अटक केली होती. नाशिक पोलिसांनी त्यांच्या सात बँक लॉकरमधून ५ कोटी रुपये किंमतीचे २१ किलो सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. यात १८ किलो ९६५ ग्रॅम सोने व दोन किलो ३०० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचा समावेश होता. केबीसी घोटाळ्याची व्याप्ती एक हजार कोटींच्या घरात असून लाखो गुंतवणूकदारांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन गेल्या आठ दिवसांपासून सतत फुटत असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आधीच दुष्काळाच्या झळांनी त्रस्त झालेल्या सिन्नरकरांना मुबलक पाऊस पडूनही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

जीर्ण झालेली पाइपलाइन गेल्या आठवड्यात चार वेळा फुटली. दुरुस्ती होऊन पंप सुरू होत नाही तोच दुसऱ्या ठिकाणी पाइपलाइन फुटते. दिवसरात्र काम करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे पालिका प्रशासन आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सिन्नरकरांना भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. पाइपलाइन दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मंगळवारी संध्याकाळी चार वाजता पुन्हा पाइपलाइन फुटल्याने पाणी पंपिंग होऊ शकले नाही. सिन्नर शहर उपनगरे व सरदवाडी रोडवरील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. स्वीकृत नगरसेवक हर्षद देशमुख यांनी टंचाईगस्त भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे ती फुटत आहे. ही जलवाहिनी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला शिफ्ट करून नव्याने टाकण्यात येणार असून येत्या एक महिन्यात हे काम पूर्ण होऊ शकेल. तोपर्यंत जुन्याचा जलवाहिनीतून पाणी पुरवण्यात येईल.

- सुनील पाटील, अभियंता, सिनपा





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतात होणार २०१८ मध्ये नाट्यकलावंतांचे ऑलिम्पिक!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक ः जगातील विविध नाटकांची पर्वणी समजले जाणारे 'थिएटर ऑलिम्पिक' २०१८ मध्ये प्रथमच भारतात होणार असून, विविध देशांतील नाट्यकलावंतांचा अभिनय पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती दिल्लीचे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (एनएसडी) डायरेक्टर वामन केंद्रे यांनी नाशिक येथे गुरुवारी 'मटा'शी बोलताना दिली.

केंद्र सरकारनेही याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनीदेखील यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या आयोजनात एनएसडीची मुख्य भूमिका असणार आहे.

ते म्हणाले, की भारतातील नाट्य कलाकार आपल्यातच मश्गूल आहेत. जागतिक स्तरावर नाटक कुठे चालले आहे, आपण कुठे आहोत याचा अभ्यास होताना दिसत नाही. तो होण्यासाठी २०१८ मधील थिएटर ऑलिम्पिक भारतात होणार आहे. नाटकांसाठी जागतिक स्तरावरील हा सगळ्यात मोठा महोत्सव असेल.

केंद्रे म्हणाले, की महाराष्ट्रात विविध परंपरा आहेत. इथल्या भूमीत कामगार नाट्य, बालनाट्य, दलित नाट्य, लोकनाट्य, पथनाट्य आहे. प्रायोगिक रंगभूमी आहे आणि त्याचबरोबरीने व्यावसायिक नाटकेदेखील आहेत. नाटकांची इतकी अंगे कुठल्याही रंगभूमीशी संलग्न नाहीत. तरीही जागतिक स्तरावर आपण आपले नाटक पोहोचवण्यात असमर्थ ठरलो आहोत. एखाद्या राष्ट्राची शक्ती त्याच्याकडे असलेल्या दारूगोळा व अण्विक अस्त्रे यांच्यावरून ठरत नाही तर त्याच्याकडे असलेल्या संस्कृतीवरून ठरत असते. आपण हे विसरलो आहोत. या बाबींवर मात्र चीनने आपल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध होण्याची गरज आहे.

हजार नाटकांची मेजवानी

या ऑलिम्पिकला १४ वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये सुरुवात झाली. २०१४ मध्ये चीन, २०१६ मध्ये पोलंडमध्ये आणि आता २०१८ मध्ये भारतात हे ऑलिम्पिक होणार आहे. या वेळी भारतातील निवडक कलाकारांना आपली कला जगाच्या समोर सादर करण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरील एक हजार नाटके पाहण्याची संधी भारतातील रसिकांना मिळणार आहे.

नाशिकमध्ये प्रयोग होणार

थिएटर ऑलिम्पिकमधील काही नाटकं ज्या ठिकाणी तांत्रिक अंगांची उपलब्धता आहे अशा शहरांत सादर केली जाणार आहेत. यातील तीन ते चार नाटकांचे प्रयोग मुंबईत होणार असून, नाशिकमध्येही एखादा प्रयोग व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मैत्रेय’चे पैसे आज ठेवीदारांना मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे काम सुरू करा, असा ऐतिहासिक निर्णय जिल्हा कोर्टाने दिल्यानंतर १२५ ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे पैसे शुक्रवारी (२९ जुलै) दिले जाणार आहेत. डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात हे पैसे देण्यात येणार असून, त्याचा समारंभ गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मैत्रेय कंपनीविरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तपास सुरू केला होता. मैत्रेय संचालकांचा जामीन मंजूर करण्याच्या निर्णयापर्यंत एस्क्रो खात्यात जवळपास साडेसहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे गुंतवणूकदारांना देण्यात यावे, अशी भूमिका पोलिसांनी सुरुवातीपासून घेतली होती. यासाठी कोर्टाने एक कमिटी गठीत करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पूर्तता केली. त्यानुसार, ठेवीदारांना पैसे परत देण्याचे आदेश कोर्टाने दिले. कोर्टाच्या निर्णयामुळे हजारो गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असून, एकप्रकारे हा ऐतिहास‌िक निर्णय ठरला आहे. या निर्णयानुसारच नाशिक पोलिसांनी ठेवींचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी होणार आहे. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते १२५ ठेवीदारांना डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात पैसे दिले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवयित्री जयश्री खिरे यांचे निधन

$
0
0

नाशिक ः शहरातील ज्येष्ठ लेखिका, कवयित्री जयश्री दिगंबर खिरे (८१) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. २००६मध्ये झालेल्या सावानाच्या ३९व्या जिल्हा साहित्य मेळाव्याच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांनी 'अमृत', 'सत्यकथा', 'हंस', 'माणूस' यांसारख्या नियतकालिकांमध्ये लेखन केले होते. 'हिरवे कण', 'मोत‌िया', 'तरंग' हे काव्यसंग्रह, 'काचरंग', 'काहिली', 'धुवाधार', 'वादळडोळा', 'मनमोगरी', 'उन्हातली घरे' या कादबंऱ्या, 'व व वाघाचा', 'रथाचा सारथी' ही बालनाट्ये प्रसिध्द आहेत. गुरुवारी सकाळी तिडके कॉलनी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर दुपारी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती दिगंबर ख‌िरे आहेत. कवी कुसुमाग्रजांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसने फुंकले रणशिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांच्यासह प्रभारी के. सी. पाडवी यांच्यासह प्रदेश पातळीवरील बडे नेते शनिवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसचे बडे नेते नाशकात दोन दिवस मुक्काम ठोकून आगामी निवडणुकांची रणनीती ठरव‌िणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्हास्तरीय नेत्यांनी बैठक घेवून या नियोजन केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली.

पुढील वर्षी फेब्रुवारीत नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व सहा नगरपालिकांच्या निवडणुका आहे. या निवडणुका काँग्रेसने गंभीर घेतल्या असून तयारी सुरू केली आहे. विशेषतः महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका काँग्रेसने गंभीर घेतल्या असून नाशिकमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व मनसेने सत्ता मिळवली आहे. परंतु, बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसला मोठे यश मिळालेले नाही. सध्या भाजप सेनेत वादावादी आहे. तर राष्ट्रवादी कोमात गेली आहे. मनसेचे इंजिन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे याचा लाभ उचलण्याची संधी काँग्रेसला असल्याने त्यांनी यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, नाशिकचे प्रभारी आमदार के. सी. पाडवी, प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांच्यासह प्रदेशपातळीवर डझनभर नेते दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकून निवडणुकीची रणनीती ठरव‌िणार आहेत. ३० जुलै रोजी हे नेते हॉटेल ग्रीन व्ह्यू येथे येवला, मनमाड, सटाणा, नांदगाव, भगूर व सिन्नर नगरापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तर त्याच दिवशी दुपारी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील नेते व पदाधिकाऱ्यांशी संदवा साधणार आहेत. रविवारी ३१ जुलैला सकाळी नाशिक महापालिका क्षेत्रातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काँग्रेसच्या आगामी वाटचालीची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस सात महिने आधीच मैदानात उतरली असून निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे.

काँग्रेसचा स्वबळाचा नारा महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा राहिला आहे. जिल्हा परिषदेत तर राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेतून बाहेर ठेवत शिवेसना व भाजपशी घरोबा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या कारागृहात असल्याने काँग्रेसला राष्ट्रवादीचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत काँग्रेसला पोषक वातावरण असल्याची स्थिती असून त्याचा थेट लाभ काँग्रेस उचलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑलिम्पिकचे नाट्यप्रयोग नाशिकला करू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थिएटर ऑलिम्पिकमधील काही नाटकं ज्या ठिकाणी तांत्रिक अंगांची उपलब्धता आहे अशा शहरांत सादर केली जाणार आहेत. यातील तीन ते चार नाटकांचे प्रयोग मुंबईत होणार असून, नाशिकमध्येही एखादा प्रयोग व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संचालक वामन केंद्रे यांनी 'मटाशी बोलताना दिली.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ( एनएसडी) आयोजित 'आदिरंग' महोत्सवाच्या निमित्ताने केंद्रे नाशिकमध्ये आले आहेत. त्या वे‍ळी ते बोलत होते. ते म्हणाले, की भारतातील नाट्य कलाकार आपल्यातच मश्गूल आहेत. जागतिक स्तरावर नाटक कुठे चालले आहे, आपण कुठे आहोत याचा अभ्यास होताना दिसत नाही. तो होण्यासाठी २०१८ मधील थिएटर ऑलिम्पिक भारतात होणार आहे. नाटकांसाठी जागतिक स्तरावरील हा सगळ्यात मोठा महोत्सव असेल. केंद्रे म्हणाले, की महाराष्ट्रात विविध परंपरा आहेत. इथल्या भूमीत कामगार नाट्य, बालनाट्य, दलित नाट्य, लोकनाट्य, पथनाट्य आहे. प्रायोगिक रंगभूमी आहे आणि त्याचबरोबरीने व्यावसायिक नाटकेदेखील आहेत. नाटकांची इतकी अंगे कुठल्याही रंगभूमीशी संलग्न नाहीत. तरीही जागतिक स्तरावर आपण आपले नाटक पोहोचवण्यात असमर्थ ठरलो आहोत. एखाद्या राष्ट्राची शक्ती त्याच्याकडे असलेल्या दारूगोळा व अण्विक अस्त्रे यांच्यावरून ठरत नाही तर त्याच्याकडे असलेल्या संस्कृतीवरून ठरत असते. आपण हे विसरलो आहोत. या बाबींवर मात्र चीनने आपल्यापेक्षा मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध होण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीचा वाद जाणार हायकोर्टात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडी ठेक्याचे राजकारण अधिकच तापणार असून मनसेतच या ठेक्यावरून दोन गट पडले आहेत. ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांनाच काम देण्यासह ठेक्यातील अटी व शर्तींवर मनसेच्या एका गटाने नाराजी व्यक्त केली असून पक्षीय पातळीवर निर्णय झाला नाही, तर थेट न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसऱ्या गटाने ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना हा ठेका देण्याची तयारी सुरू केली आहे. ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांनीही हायकोर्टाच्या निर्णयाआधारे आपण ब्लॅकलिस्टेड नसल्याचा कांगावा सुरू केला आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी मात्र, या ठेक्यापासून अंतर राखत ब्लॅकलिस्टेडचा निर्णय हायकोर्टच घेईल, असे सांग‌ितले आहे. त्यामुळे घंटागाडी ठेक्याचा पेच वाढला आहे.

वादग्रस्त ठरलेल्या १७६ कोटींच्या घंटागाडी ठेक्यावरून वांदग सुरू झाले आहे.या ठेक्यावरून मनसेच्या एका गटाने ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांवरच मेहरबानी करण्याची तयारी दर्शवली आहे. मूळ डॉकेट संशयास्पद असतांनाही, विद्यमान ठेकेदारांनाच ठेका कसा देता येईल याबाबत प्रयत्न सुरू केले आहे. तर दुसऱ्या गटाने या ठेकेदारांसह संपूर्ण प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे. हा वाद त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत पोहोचविला आहे. ठाकरेंच्या कोर्टात न्याय मिळाला नाही, तर थेट हायकोर्टात जाण्याचीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

एकीकडे मनसेतच या ठेक्यावरून वाद सुरू असतानाच अटी शर्तीवरील वादंग व ब्लॅकलिस्टेडवरून घंटागाडी ठेकेदारांनी ठेक्याला वेगळे वळण लागू नये म्हणून गुरुवारी घाईघाईत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. हायकोर्टाने आपल्याला निविदेत भाग घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आमच्यावरील ब्लॅकलिस्टेडचा शिक्का पुसला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे आयुक्तांनी ठेकेदारांवरील ब्लॅकलिस्टेडचा शिक्का पुसण्यास नकार दिला आहे. हायकोर्टच याबाबत निर्णय घेईल असे सांगून हायकोर्टाच्या अधीन राहून ठेका दिला जाईल. त्यामुळे ठेक्याचा पेच वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्याच्या चाव्याने चिमुरडी अत्यवस्थ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नामांक‌ित ठिकाणीही रेब‌िजवरील लस उपलब्ध नसल्याने कुत्र्याच्या चाव्याने जखमी झालेली इयत्ता पहिलीत शिकणारी सहा वर्षांची समीक्षा मृत्यूशी झुंज देत आहे. लशीच्या अनुपलब्धतेपुढे अत्याधुनिक वैद्यकीय व्यवस्था चिमुरडीला वाचविताना पंगू ठरली आहे. संगमनेर तालुक्यातील कासारे या जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात समीक्षा सोमनाथ लहामगे ही चिमुरडी शिक्षण घेते. शाळेच्या आवारात ती खेळत असताना मैदानात शिरलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने त‌िला चावा घेत गंभीर जखमी केले होते. शाळेतील शिक्षकांनी त‌िला त्वरित तळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे रेब‌िजवरील लस शिल्लक नसल्याने लोणी प्रवरा येथील रुग्णालयात त‌िला हलविण्यात आले. तेथेही लस शिल्लक नसल्याने नगर जिल्हा रुग्णालयात त‌िला पाठवण्यात आले. नगर येथील रुग्णालयात पाच दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. तेथे दोन लशी देऊन त‌िला डिस्चार्ज दिला. यानंतर दोन लशी राहता येथील ग्रामीण रुग्णालयात देण्यात आल्या. पण नंतर अचानक त्रास झाल्याने तिला नाशिक सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेतील नोकरभरती रद्द?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहकार विभागाचे सर्व कायदे धाब्यावर बसवून जिल्हा बँकेतील संचालकांनी केलेली वादग्रस्त साडेचारशे कर्मचाऱ्यांची भरती सहकार विभागाने रद्द ठरविल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे बँकेच्या एमडीलाच या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिले असून त्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीवर हा विषय ठेवला आहे. त्यामुळे संचालकांना मोठा झटका बसला असून आता संचालकांमध्येच हमरीतुमरी सुरू झाली आहे. या भरतीत मोठ्या प्रमाणावर अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचे आरोप झाले आहेत.

जिल्हा बँकेतील वर्तमान संचालक मंडळाने सर्व नियम धाब्यावर बसवत, सुरक्षारक्षक, क्लर्क, शिपाई अशी तब्बल साडेचारशे कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या भरतींसदर्भात आक्षेप घेतल्यानंतर विभागीय सह निबंधकानी ती यापूर्वीच रद्द ठरवली होती. परंतु, संचालकांनी सहकार मंत्र्यांकडे अपील करून स्थगिती मिळवली होती. परंतु, सहकार मंत्र्यांनी विभागीय संहनिबंधकांचा आदेश कायम ठेवत संचालकांना झटका दिला आहे. त्यामुळे भरतीप्रक्रिया रद्द करण्याचे आदेश सहनिबंधकांनी दिले आहेत. ज्या एमडींच्या आदेशाने नोकरभरती करण्यात आली, त्याच एमडींना आपले आदेश रद्द करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे या भरतीवरून आता संचालकांमध्येच हमरीतुमरी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेत कर्मचारी भरतीसाठी घेतलेले पैसे परत करण्याची वेळ आल्याने हा वाद सुरू झाल्याची चर्चा आहे. बँक अध्यक्ष आणि संचालकांच्या अपात्रतेबाबत पुढील सुनावणी १८ ऑगस्टला होणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर एचएएलला दिसले भगदाड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिक विमानतळाच्या सुरक्षेला पडलेले भगदाड 'मटा'ने उघडकीस आणताच हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एचएएलच्या महाव्यवस्थापकांनी तातडीने विमानतळ सुरक्षेचा अहवाल मागविला असून यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहेत.

नाशिक शहरालगत असलेल्या एचएएलच्या मालकीच्या विमानतळाच्या सुरक्षा कुंपणाला जानोरी गावालगत मोठे भगदाड पडल्याची बाब 'मटा'ने चव्हाट्यावर आणली. कार्गो कॉम्प्लेक्स आणि विमानतळाचा रन वे यांच्या लगत संरक्षक भिंतीला दोन मोठे भगदाड आहेत. तसेच, या दगडी भिंतीवर असलेले तारेचे कुंपणही कुचकामी आहे. अनेक ठिकाणी हे तारेचे कुंपण तुटलेले आहे. त्यामुळे या याठिकाणाहून अत्यंत सहजपणे रन वेच्या ठिकाणी आणि एचएएलच्या कॅम्पसमध्ये शिरणे शक्य आहे. तसेच, परिसरातील काही नागरिक सुरक्षा कुंपण भेदून कार्गो कॉम्प्लेक्सलगतच्या भागात शौचालयासाठीही जात आहेत. हा सारा प्रकार 'मटा'ने उजेडात आणल्यानंतर एचएएल प्रशासनला जाग आली आहे. या वृत्ताची दखल घेत एचएएलच्या महाव्यवस्थापकांनी सुरक्षा यंत्रणेच्या प्रमुखांना तातडीने पाचारण केले. तसेच, सुरक्षेसंबंधी त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. त्याशिवाय सध्या या सुरक्षा कुंपणाच्या ठिकाणी दिवसातून अनेकदा दक्षता विभागाच्या फेऱ्या वाढविण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. सुरक्षा विभागाने अहवाल सादर केल्यानंतर तो पाहून सुरक्षेच्या अन्य उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. तसेच, हे कुंपण भक्कम करतानाच विमानतळाभोवती गस्ती पथक तैनात करण्यासह अन्य प्रकारच्या कार्यवाहीबाबत एचएएल प्रशासन आग्रही आहे.

शेळ्यांची निर्यात उद्या किंवा परवा ओझर येथून शारजाह येथे तिसऱ्यांदा शेळ्यांची निर्यात होणार आहे. ही निर्यात शुक्रवारी (२९ जुलै) करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही तांत्रिक अडचणी आल्याने ही निर्यात शनिवारी (३० जुलै) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निर्यात शुक्रवारी होणार की शनिवारी हे गुरूवारी रात्री उश‌िरापर्यंत निश्चित झाले नव्हते. यावेळीही जवळपास १७०० शेळ्यांची निर्यात केली जाणार आहे.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसंख्या कोटीत, काहीही हं!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठेकेदाराच्या भल्यासाठी कुटुंब नियोजन मोह‌िमेलाच हरताळ फासला आहे. पालिकेतील वादग्रस्त घंटागाडी ठेकेदाराला फायदा पोहोचण्यासाठी आरोग्य विभागाने आगामी पाच वर्षात नाशिकची लोकसंख्या चक्क ९८ लाख ६१ हजारापर्यंत फुगवली आहे. एवढ्या लोकसंख्येमुळे घंटागाडीचा ठेका हा १७६ कोटींवर पोहचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात येताच आरोग्य विभागाने सारवासारव सुरू केली आहे. तर जनतेचा पैसा वाचवण्यासाठी बसलेले अधिकारी ठेकेदारासाठी पैशांची कशी उधळपट्टी करतात, याचा गजब नमुनाच समोर आला आहे.

महापालिकेची घंटागाडी योजना ही अटी व शर्तीमुळे वादात सापडली आहे. पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका हा दीडशे कोटीपेक्षा कमी जाणे अपेक्षित असतांना हा ठेक्का चक्क १७६ कोटींवर पोहचला आहे. हा ठेका फुगवण्यासाठी आरोग्य विभागाने आपल्या अकलेचेच तारे तोडले आहेत. त्यासाठी पाच वर्षात शहराची लोकसंख्या कशी कोटीवर पोहचेल अशी 'व्यवस्था' करण्यात आली आहे. घंटागाडी ठेकेदारांचे भले होण्यासाठी आरोग्य विभागाने ठेवलेल्या या डॉकेटमध्ये पाच वर्षात नाशिकची लोकसंख्या ही ९८ लाख ६१ हजार ४०८ पर्यत जाणार असल्याचा जावईशोध लावला आहे. पाच वर्षात सहा विभागाची लोकसंख्या कशी वाढेल याचा तक्ताच या डॉकेटमध्ये आहे. त्यात नाशिक पूर्व -१७ लाख, नाशिक पश्चिम १४ लाख, पंचवटी १९ लाख, नाशिकरोड १८ लाख, सिडको १७ लाख, सातपूर १४ लाख होणार असल्याचा दावा केला आहे.

त्या आधारावर शहरात साडेनऊ लाख टन कचऱ्याची निर्मिती होणार असून त्यासाठी १७६ कोटी रुपये खर्च येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग हा ठेकेदारांसाठी काम करतो की नाशिककरासाठी हा प्रश्न उभा राहिला आहे. विशेष म्हणजे आयुक्त अभिषेक कृष्णाही यामुळे आश्चर्यचकीत झाले असून हा सगळाच गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माता मृत्यू रोखण्यासाठी अॅप

$
0
0

gautam.Sancheti@timesgroup.com

नाशिक : माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य कार्यालनाने नवीन अॅप तयार केले आहे. त्यातून हे मृत्यूचे प्रमाण रोखण्यास मदत मिळणार आहे. कुंभमेळानिमित्त देशभरातून आलेल्या भक्तांचा आजाराची माहिती मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने एक सॉफ्टवेअर तयार केले होते. त्याच कल्पेनेतून हे अॅप तयार करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्ण यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. सुनील वाकचौरे यांनी हे अॅप तयार केले आहे. मातामृत्यूचा दर शून्यावर आणण्यासाठी हा अॅप उपयोगी पडणार आहे. गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, एनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि बाळाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे मातांचे मृत्यू होतात. ते रोखता यावे यासाठी हे अॅप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा अॅपद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तरावरची गरोदर स्त्रियांची माहिती ठेवण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे अॅन्ड्रॉइड फोन आहे. त्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यात सर्व माहिती अपडेट ठेवण्यात येणार आहे. या अॅपमधून प्रसूतीसाठी जेथे हाय रिस्क आहे त्या महिलेची माहिती व त्यावर मॉनेटरिंग केली जाणार आहे. त्यात तब्येत जर खालावली तर रेड अलर्ड बटन मधून ते कळणार आहे. याशिवाय प्रसूती संबंधित अनेक बाबांचा यात समावेश केला आहे. या अॅपसाठी टाटा कन्सलन्टन्सी यांची मदत घेण्यात आली आहे.

जिल्हा आरोग्य केंद्राकडून अद्ययावत माहिती रहावी व त्यावर त्वरित उपाययोजना करावी यासाठी वेगवेगळे अॅप तयार करण्यात आले असून त्याचा उपयोग रुग्णांना होणार आहे. त्यामुळेच हे अॅप तयार करण्यात आले आहे.

- डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा आरोग्यधिकारी





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात तीन ठिकाणी घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आडगाव, गंगापूर आणि सातपूर पोलिस स्टेशन हद्दीत तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. चोरट्यांनी घरफोडी करून एक लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल लंपास केला. यात एक घरफोडी भरदिवसा करण्यात आली आहे.

शिवाजीनगर येथील शिवशक्ती चौकात राहणारे रवींद्र मुरलीधर नारळे (रा. प्रियंका बंगला) हे मंगळवारी आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेल होते. ही संधी साधत चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून घरातील दोन लॅपटॉप आणि कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक पोटे करीत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना मुंबई आग्रा हायवेवरील जुने बळीमंदिर परिसरात घडली. येथील सरस्वतीनगर येथे राहणारे लहानु रामचंद्र पवार कुटुंबीय मंगळवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील सोन्याचांदीचे दागिणे, मोबाइल फोन व रोकड असा सुमारे ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

सातपूर कॉलनीत गुरुवारी रात्री शिवनेरी चौकात घरफोडी झाली. म्हाडाच्या आठ हजार वसाहतीत राहणारे सूर्यकांत व्यवहारे हे पायावरील उपचारासाठी पुणे येथे मुलाकडे गेले होते. ही संधी साधत गुरूवारी चोरट्यांनी घराच्या दरवाज्यांचे कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिनेही लंपास केले. जवळपास दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे सचिन व्यवहारे यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी ठसे तज्ज्ञांनादेखील घटनास्थळी पाचारण केले होते.

तरुणाची आत्महत्या

पंचवटीतील रामवाडी भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

सागर रमेश शिंदे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रामवाडी परिसरातील तळेनगर येथे राहणाऱ्या सागरने गुरूवारी सकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास लावून घेतला होता. ही घटना लक्षात येताच त्यास कुटुंबीयांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक वादातून तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वीसवर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याप्रकरणी आठ परप्रांतियांविरुध्द आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून तरुणाने आत्महत्या केल्याची तक्रार मुलाच्या पित्याने केली आहे.

रामकमलदास (वय ६९), विष्णूदास (वय ३५, रा. दोघे मरूई कुटी, जि. चंदवली), बलिरामदास (वय ६०), अभय रामदास तिवारी (वय ७०), पन्नासिंग (वय ५४, रा.तिघे मिर्झापूर, उत्तरप्रदेश), सफाईदास गुरू ब्रह्मानंद तिवारी (वय ६५), रामजीदास सेवकदास रवानी (वय ८० रा. मरूई कुटीया, उत्तरप्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. बजरंगीदास दुर्गाप्रसाद केसरी (वय २०) या युवकाने ९ सप्टेंबर २०१५ रोजी सिहंस्थादरम्यान अज्ञात कारणातून आत्महत्या केली होती. पंचवटीतील इंदिरागांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दुर्गा प्रसाद रामनारायण केसरी (रा. बरजीवनपूर, जि. मिर्झापूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. केसरी व बाबा रामकमलदास यांचा आर्थिक व्यवहार होता. त्यातून ही आत्महत्या झाल्याचा संशय केसरी यांनी व्यक्त केला. या प्रकरणानंतर अधिक तपासणीसाठी पोलिसांनी व्हिसेरा पाठवला असनू, अहवाल मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images