Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाणी चोरणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

$
0
0
मनमाड आणि येवला परिसरासाठी पालखेड धरणातून सोडण्यात आलेले पाणी चोरणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा पाणीचोरी कमी झाल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

निवडणूक विभाग बजावणार नोटीस

$
0
0
जिल्ह्याच्या मतदारयादीतील सुमारे दोन लाख १० हजार मतदारांची नावे वगळण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मतदारांचा मृत्यू तसेच स्थलांतर या कारणांमुळे या सर्व जणांना निवडणूक विभागातर्फे नोटीस बजावण्यात येणार आहे.

टोईंगच्या मुद्द्यावर आक्रमक

$
0
0
नाशिक महापालिकेतर्फे खासगी सेवेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या टोईंगला (वाहने उचलणे) नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने तीव्र विरोध केला आहे. आधी वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा द्या, मग ही मोहीम सुरू करा, अशी मागणी गुरुवारी असोसिएशनने महापौरांसह महापालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे.

व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

$
0
0
कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीम दिली नाही, याचा राग येऊन सहा जणांच्या टोळक्याने बुधवारी मंडप व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना हिरावाडीत घडली.

राजपूत यांचा भारतभर सायकलप्रवास

$
0
0
डोक्यात असंख्य विचारांचे काहूर... पायाला भिंगरी... सोबत फक्त एक सायकल... मनात एकच ध्येय... भारतभर फिरायचं आणि भ्रष्टाचाराविरोधात लोकांमध्ये जागृती निर्माण करायची. गाव आनंदवली. नाव भालचंद्र कारभारी राजपूत.

‘डॉग स्कॉड’ला राज्यभर एकच डाएट

$
0
0
पोलिस दलात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉग स्कॉडच्या पारंपरिक डायटमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्य पोलिस दलातील सर्व श्वानांना एकाच प्रकारातील रेडिमेड डाएट दिला जात आहे.

निखिल खडसे अनंतात विलीन

$
0
0
विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिंहस्थ: पहिला टप्पा ३३०० कोटींचा

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधान्याने करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा ३३०० कोटींचा असून जिल्हा समितीकडून तो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील हायपॉवर कमिटीकडे दिला जाणार आहे.

दुष्काळी जनतेला ‘बीपीएल’ दर्जा?

$
0
0
दुष्काळी भागातील जनतेला दारिद्र्यरेषेखालील (बिलो पॉव्हर्टी लाइन - बीपीएल) कुटुंबांचा दर्जा देऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे सूतोवाच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी केले. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीपुरताच हा निर्णय असणार आहे.

टँकर संपावर ‘मेस्मा’चा उतारा

$
0
0
वाहतूक दर वाढवून मिळावा यासाठी भारत पेट्रोलियमच्या टँकर मालक-चालकांनी पुकारलेल्या संपावर मेस्मा कायद्याचा उतारा शोधण्यात आला आहे. मेस्मा आणि जीवनावश्यक वस्तू कायदा याद्वारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून नाशिक जिल्ह्यातून परजिल्ह्यात टँकर पाठवण्यासाठी पोलिसांचा कॅन्व्हॉय तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जुनावणे गावात ८० पक्ष्यांचा मृत्यू

$
0
0
धुळे-औरंगाबाद रस्त्यावर जुनवणे गावाच्या परिसरात गुरुवारी सकाळी विविध जातींचे सुमारे ७० ते ८० पक्षी मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली.

चिखलीकरच्या बँक लॉकरमध्ये ५.७५ कोटींची मालमत्ता!

$
0
0
रस्त्याच्या कामापोटी मंजूर झालेल्या बिलाची रक्कम अदा करण्यापोटी लाच घेणा-या 'पीडब्ल्यूडी'च्या दोघा अधिकाऱ्यांपैकी सतीश चिखलीकर याच्या बँक लॉकरमधून गुरुवारी रोकड, सोने व ठेवी स्वरूपात पाच कोटी ७० लाखांची मालमत्ता सापडली.

आरटीओ कार्यालयाला एजंटांचा विळखा

$
0
0
नाशिकच्या आरटीओ कार्यालयाला एजंटांचा विळखा पडला असून, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येणार्या वाहनधारकांकडून यासाठी हजारो रूपये उकळले जात असल्याचे चित्र आहे.

कविता विवाहबंधनात...

$
0
0
चर्चेतील खेळाडूचा विवाह तेवढाच चर्चेचा विषय झालेला असतो. कविताचं लग्नही असच होतं पण, वेगळेपणा होता तो तिच्या यापुढील कारर्किदीच्या चर्चेचा. कविताची यापुढील कामगिरी अधिक बहरतच जाईल असा विश्वास तिच्यासह सर्वांनीच व्यक्त केल्याने तिच्यावरची जबाबदारी आणखीनच वाढली आहे.

लखमापूर, मनमाडला ग्रामक्रीडा संकुल

$
0
0
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राज्य सरकारने नऊ ठिकाणी ग्रामक्रीडा संकुल मंजूर केले असून यात नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील लखमापूर तसेच नगरपालिका क्षेत्रातील मनमाडचा समावेश करण्यात आला आहे.

औद्योगिक भूसंपादनाला गती मिळणार

$
0
0
जिल्ह्यातील औद्योगिक भूसंपादन धीम्या गतीने सुरू असल्यामुळे यासंदर्भात शनिवारच्या 'जिल्हा उद्योग मित्र'च्या (झूम) बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार आहे. त्यामुळे औद्योगिक भूसंपादनाला गती मिळण्याची शक्यता आहे.

करंजाडी खो-यात भीषण पाणीटंचाई

$
0
0
बागलाण तालुक्यातील करंजाडी खो-यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी मोसम खो-याचा आधार घ्यावा लागत आहे. टंचाई दूर करण्यासाठी उजव्या कालव्याद्वारे हरणबारी धरणाचे पाणी द्यावे, अशी मागणी करंजाडी खोरे पाणी संघर्ष समितीने जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

लोका सांगे ब्रह्मज्ञान...!

$
0
0
प्रस्थापित व विस्थापित ही दुफळी नेहमीच एकमेकांमध्ये भांडत राहिली आहे. विस्थपित भांडतात आम्ही प्र‌स्थापित नाही, प्रस्थापित भांडतात विस्थापित नीट वागत नाही परंतु यात एक मेख आहे, विस्थापित हे लक्षात घेत नाही की आपण कधीतरी प्रस्थापित होणार आहोत व प्र‌स्थापित हे लक्षात घेत नाही की आपण कधीतरी विस्थापित होतो.

मराठवाड्यासाठी गायत्री परिवारातर्फे चारा

$
0
0
मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या वतीने भरघोस मदत करण्यात येत असून उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, बीड, परभणी येथे ५० ट्रकपेक्षा जास्त चारा देण्याचा संकल्प परिवारातर्फे सोडण्यात आला आहे.

सिडको प्रशासकीयला हवंय अधिकारांच बळ

$
0
0
सिडको परिसरातील नागरिकांना सिडको प्रशासकीय कार्यालयाकडून वेळोवेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक कामासाठी अनेक खेटा माराव्या लागत असल्याने नाराजीचे वातावरण आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images