Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सटाण्याचा पाणीप्रश्न मार्गी लावणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

आगामी काळात राज्य सरकारच्या माध्यमातून सटाणा शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेवून प्रश्न निकाली काढण्यात येईल. पाणीप्रश्नावर कोणतेही राजकारण न करता सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न निश्चितमार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. शिवसेनेच्या वतीने आयोजित आजी माजी नगरसेवकांच्या कृतज्ञता सत्कार सोहळ्यात भुसे बोलत होते.

अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अजय सावंत होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबट, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, कार्यक्रमाचे संयोजक व माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे, शहरप्रमुख शरद शेवाळे, बाजार समिती संचालक अॅड. वसंत सोनवणे, कारभारी पगार, आदी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, तळवाडे येथील साठवण बंधाऱ्यांचे नुकतेच विस्तारीकरणामुळे साठवण तलावाची क्षमता ८७ दलघफू होणार असून चणकापूर धरणातील पाण्याची बचत होणार आहे. यामुळे चणकापूर धरणातील शेती सिंचनाचे पाणी दुष्काळामुळे केवळ पिण्यासाठी आरक्षित होत असल्याने शेती सिंचनावर विपरित परिणाम होत होता. तो बंद होवून चणकापूरचे पाणी आता शेती सिंचनासाठी मिळण्यास मदत होणार आहे. बागलाण, कळवण, देवळा तालुक्यातील शेती सिंचनाला लाभ मिळणार आहे. सटाणा शहराचा गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न केवळ राजकारणामुळे जैसे थे आहे. मात्र आपण तो आता निकाली काढण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करणार असल्याची ग्वाही दिली. याच बरोबर शहरातील ट्रामा केअर इस्पितळाच्या रिेक्त जागा भरून इस्पितळ सुरू करण्यासाठी आरोग्ययमंत्री दीपक सावंत यांना पुढील सप्ताहात भेटून मार्ग काढण्यात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

भुसे यांच्या हस्ते शहरातील माजी नगरसेवकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमास माजी नगरसेवक कन्हैयालाल पाठक, वसंत मुंडावरे, पंकज ततार, दिलीप बगडाणे, सुरेश येवला, सुनील मोरे, अनिल कुवर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतमध्ये राज्य सरकारने ७४ मुख्याधिकारींची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीत नाशिक जिल्ह्यातील निफाड, कळवण, पेठ व दिंडोरी या चार नगरपंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचातमध्ये दोन वर्षांसाठी नवीन मुख्याधिकारी देण्यात आले असून त्यांनी मंगळवारी पदभारही स्वीकारला आहे.

राज्यात स्थापन झालेल्या या नगर पंचायतीमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकारी पदच भरले नव्हते. त्यामुळे या नगरपंचायतमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांची प्रतीनियुक्ती करून काम सुरू होते. त्यामुळे या पदावर तहसीलदार किंवा जिल्ह्यातील दुसऱ्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काम करत होते. आता नव्याने भरलेल्या या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने निवड केलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रशिक्षण काळातच ही नियुक्ती दिल्यामुळे अगोदर रखडलेल्या कामांना वेग येईल का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

नाशिक जिल्ह्यात सहानगर पंचायतीची स्थापना ९ महिन्यांपूर्वी करण्यात आली. त्यात चांदवडला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला. ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रुपातंर केल्यानंतर या ठिकाणी कामात सुधारणा अपेक्षीत असतांना या नगर पंचायतीचे काम वेगवेगळ्या कारणाने रखडले. अजूनही या नगरपंचायतमध्ये नव्याने कामगारांची भर्ती झालेली नाही. त्यासाठी शासनस्तरावर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत असलेला स्टाफच नगरपंचायतीचे काम करत आहे. त्यातच मुख्याधिकारी पद कायमस्वरुपी नसल्यामुळे या नगरपंचायतींमध्ये नोव्हेंबर २०१५ मध्ये निवडणुका होवूनही कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे केंद्र व राज्याचा निधीही या नगरपंचायतीत निर्णयाविना पडून आहे.

आता नव्याने स्थापन झालेल्या या मुख्याधिकारी यांना ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर कामाला गती देण्याची जबाबदारी सुद्धा असणार आहे. विशेष म्हणजे सुरगाणा येथे ही नियुक्ती का करण्यात आलेली नाही. पण जिल्ह्यातील उर्वरीत चार नगरपंचायतमध्ये कायमस्वरुपी मुख्याधिकारी यांची नियुक्ती केल्यामुळे येथील कामाला गती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थेट भाजीपाला विक्रीला महापालिकेचा अडथळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य सरकारचे धोरण असले, तरी महापालिकेला मात्र त्यात रस नसल्याची बाब पुढे आली आहे. आतापर्यंत कृषी विभाग, पणन मंडळ व 'आत्मा' यांच्या अनेक बैठका झाल्या. पण महापालिकेने त्यात कोणतेही औत्सुक्य दाखविलेले नाही. कृषी विभागाने भाजी विक्रीसाठी नाशिक शहरात एकूण १७ जागा मागितल्या असल्या, तरी महापालिकेने केवळ एका जागेचे औदार्य दाखविले आहे. परिणामी, नाशिककरांना थेट भाजीपाला मिळण्यात अडचणी निर्माण
झाल्या आहेत.
शेतकरी व ग्राहक थेट जोडले जावे व मध्यस्थ व्यापारी त्यात असू नये या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेत शेतकऱ्यांना थेट मोबदला तर ग्राहकांना कमी दरात शेतमाल मिळणार असताना मनपाने त्यात डिव्हायडर टाकले आहे. कृषी व पणन मंडळाने मनपाकडे मागितलेल्या जागा या संपूर्ण शहरातील ग्राहकांना फायदा देणाऱ्या असल्या तरी महानगरपालिकेने मात्र जागा न दिल्यामुळे स्वस्त शेतीमालापासून नाशिककरही मुकले आहेत.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिकमध्ये महाराष्ट्र शासन, कृषी पणन मंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त प्रयत्नातून गंगापूर रोडवरील मॉडर्न चौक व डॉ. भाभानगर येथील नवशक्ती चौक येथे ही दोन विक्री केंद्रे सुरू करण्यात आली. त्यात एक केंद्र मनपाच्या जागेत असले तरी दुसरे केंद्र मात्र खासगी जागा भाड्याने घेवून सुरू करण्यात आले आहे. काठे गल्लीतील केंद्र सहा महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे. या सर्व केंद्रांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण यासारखी केंद्रे शहरभर सुरू झाली, तर त्यातून अधिक ग्राहकांपर्यंत हा शेतमाल थेट पोहचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’विद्यार्थ्यांच्या हाती पडणार दात्यांचं देणं!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या वर्षात ९० टक्क्यांच्या पार झेंडा रोवला, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शाबासकीची थाप अन् दात्यांच्या संचिताची शिदोरी रविवारी (२१ऑगस्ट) देण्यात येणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेणाऱ्या स्ट्रगलर्सना भविष्यात उज्ज्वल यशाचा झेंडा रोवण्यात मदत करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे हेल्पलाइन हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातून जमा झालेले धनादेश त्या मुलांना हस्तांतरित करण्यासाठी येत्या रविवारी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये रविवार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विचारवंत व सीएचएमई सोसायटीच्या नाशिक शाखेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर. जी. आगळे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीएचएमई सोसायटीचे सचिव डॉ. दिलीप बेलगावकर हे उपस्थित राहणार आहेत.
अश्विनी जाधव, वेदांगी भावसार, भाग्यश्री पाटील, प्रसाद देवकर, नीलेश सावळे, श्रीवरद चव्हाण, कुणाल सोनवणे, अशोक खाडे, शिवानी देशमुख, कृष्णा निंबाळकर हे ते 'मटा'ने हेरलेले दहा विद्यार्थी आहेत. 'मटा हेल्पलाइन'चे हे सहावे वर्ष आहे. या सहा वर्षांत नाशिककरांनी विद्यार्थ्यांच्या ओंजळीत भरभरून दान टाकलेले आहे.
आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना या विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नुसते शिक्षणच नाही घेतले तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविले. दारिद्र्याच्या या दशावतारांमधून बाहेर पडण्यासाठी हे विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत. भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचे आहे; पण त्यासाठी आता आर्थिक मदतीची गरज आहे.
या गरीब विद्यार्थ्यांसाठी 'मटा'तर्फे हेल्पलाइन या उपक्रमांतर्गत मदतीची हाक देण्यात आली होती. त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला.
नाशिककरांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याची तयारी दाखवली. कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आम्हीच पूर्ण करू असा हट्ट धरला, तर कित्येक कॉलेजेसने या विद्यार्थ्यांना तीनही वर्षे मोफत शिकवू, असे सांगितले. हा उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातून ओढला जावा, असा हेतू होता. नाशिककरांच्या भरभरून प्रतिसादामुळे तो पूर्णदेखील झाला आहे. हा रथ ओढणाऱ्या हातांना, या उपक्रमात योगदान देणाऱ्यांना तर या
कार्यक्रमाचे निमंत्रण आहेच, पण नाशिककरांनीही या हृद्य सोहळ्याला उपस्थित रहावे अशी विनंती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांना लुटणारे संशयित गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोघा युवकांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत एटीएम कार्डद्वारे जबरदस्तीने २५ हजार रुपये काढून घेण्यात आले. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.
म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर किशोर कुवर (वय २७ रा. मोतीबाग नाका, मालेगाव), संदीप शांतीलाल वाघ (वय ३५, रा. ओम निवास), प्रशांत रघुनाथ गांगुर्डे (वय ३० रा. सुदर्शन कॉलनी, दत्तनगर), ललित दिनकर चौधरी (वय ३७, रा. गोटीराम गल्ली, रविवार कारंजा) व अनिल पुंडल‌िक पाटील (वय ४०, रा. लिबर्टी पॅलेस, गंगापूर रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
मुकेश चंदूलाल जैन (२८ रा. परिमल अपार्टमेंट, मायको सर्कल) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जैन व त्यांचा मित्र अनिल सूर्यवंशी हे दोघे घराजवळ उभे असताना संशयितांसह दहा ते बारा जण तेथे आले. दोघांना जबरदस्तीने वाहनात बसवून म्हसरूळ येथील दिल्ली पब्लिक स्कूल परिसरात नेले. त्यांना मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी देत दोघांच्या खिशातील एटीएम कार्ड घेवून त्याद्वारे २५ हजार रुपये काढून घेतले. दोघांनी संशयितांच्या तावडीतून सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठले.
सातपूरला घरफोडी
सातपूर औद्योगिक वसाहतीत घरफोडीची मालिका सुरूच आहे. चोरट्यांनी सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. मंगेश कैलास सोनवणे (वय ३३, रा. वरदेश्वर गणपती मंदिर, एमएचबी कॉलनी, समतानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे कुटूंबीय रविवारी बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व २० हजार रुपये रोख असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
जुगार अड्ड्यावर छापे
पोलिसांनी अवैध धंद्यांना लक्ष्य केले असून, पंचवटी आणि भद्रकाली परिसरात दोन जुगार अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. पंचवटीतील कुमावत नगर भागात नवीन इमारतीच्या गाळ्यामध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छापा टाकून पोलिसांनी अभिजीत वसंत परदेशी (रा. कुमावतनगर) व अन्य चौघांना ताब्यात घेतले. दुसरी कारवाई द्वारका परिसरात करण्यात आली. अमरधाम रोडवर दुपारी साडेबाराच्या सुमारास गयाउद्दीन फयाजउद्दीन सय्यद (रा. जहागिरवाडा, बागवानपुरा) हा मटका जुगार खेळताना मिळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबार, वाहन तोडफोडीने नागरिक धास्तावले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोळीबार, वाहनांची तोडफोड यांसारखे गुन्हे शहरात पुन्हा खुलेआमपणे घडू लागल्याने शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींनी डोकेवर काढल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून पोलिस नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगण्याचा आनंद मिळवून देणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

कधीकाळी शांतताप्रिय शहर अशी ओळख असलेल्या नाशिक नगरीचा उल्लेख आता गुन्हेगारांची नगरी म्हणून होऊ लागला आहे. केवळ हाणामाऱ्या आणि चोऱ्या अशा किरकोळ गुन्ह्यांची नोंद होणाऱ्या या शहरात आता खून, अपहरण, जबरी चोरी आणि बलात्कारासारखे गुन्हे सर्रास घडू लागले आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आणि गुन्हेगारांना पाठशी घालणारे लोकप्रतिनिधी शहरात खुलेआम वावरत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. बुधवारी उंटवाडी येथे बाल न्यायालयाच्या आवारात अल्पवयीन संशयितांवरील गोळीबार तसेच सातपूर भागात वाहनांच्या तोडफोडीसारख्या गंभीर गुन्हयांमुळे शहरात खळबळ उडाली. या घटनांच्या तळाशी जाण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले असले तरी अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात पोलिसांना अजूनही यश येऊ शकलेले नाही. शहरात गावठी कट्टे, पिस्तुलं विक्रीसाठी येत असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. अशी शस्त्रं शहरात येतात कोठून, आतापर्यंत अशी किती हत्यारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विकली गेली याचा कोणताही तपशील पोलिसांकडे नाही. शस्त्रं जप्तीच्या कारवाया पोलिसांनी अनेकदा केल्या असल्या तरी ती शहरात येणारच नाहीत यासाठी पोलिसांना ठोस कार्यवाही करावी लागणार आहे. गुन्हेगारांना राजकीय अभय मिळत असल्याने अशा राजकीय पदाधिकाऱ्यांचा पर्दाफाश करणे हे पोलिसांपुढील मोठे आव्हान ठरले आहे. वाहन जाळपोळीच्या सत्राबरोबरच आता वाहनांच्या तोडफोडीद्वारे नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम गुन्हेगारी प्रवृत्तींनी हाती घेतले आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार बळावण्याची शक्यता असून, अशा घटना रोखण्यासाठी पोलिस काय करतात, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

सात महिन्यांत दोन हजार गुन्हे

शहरात सात महिन्यांत २ हजार ३० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी २६ गुन्हे खुनाचे आहेत. एका खूनातील संशयितांना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश येऊ शकलेले नाही. वाहनचोरीचे सर्वाधिक ३२१ गुन्हे घडले आहेत. चोरीच्या २६७ घटनांची पोलिस स्टेशन्समध्ये नोंद आहे. चेन स्नॅचिंग आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अजूनही हवे तेवढे यश येऊ शकलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार नगरसेविकापुत्राचा पोलिसांकडून शोध सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुजरातमधील कंपनीत गुंतविलेल्या भांडवलाच्या वसुलीसाठी कंपनीमधील कमिशन एजंटचे अपहरण करून तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असणारा नगरसेविकापुत्र धीरज शेळके (रा. सातपूर) व त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भद्रकालीचे वरिष्ठ पोल‌िस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या गुजरातमधील विनटेक या कंपनीत संशयित ललित भानुभाई पटेल, हितेश अमृतलाल पटेल, संदीप गणेश पटेल (रा. शंकरनगर, गंगापूररोड, नाशिक) यांनी कमिशन एजंट दीपक कु‌कडियामार्फत दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, तीन महिन्यांपासून ठरल्याप्रमाणे कमिशन वा भांडवल मिळत नसल्याने संशयितांनी कंपनी मालक जिग्नेश पानसरीया व दीपक कुकड‌िया यांना चर्चेसाठी नाशिकला बोलावले. संशयित पटेल यांनी सातपूर विभागाच्या माजी प्रभाग सभापती उषा शेळके यांचा मुलगा धीरज शेळके व त्याचा साथीदार रवी कावळे यांची मदत घेऊन दीपक कुकड‌ियाचे अपहरण केले. त्याचे वडील मुकेश कुकड‌िया यांच्याकडे तीन कोटींची खंडणी मागितली. मात्र भद्रकाली पोलिसांनी सापळा रचून दीपकची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना चार दिवसांची पोल‌िस कोठडी सुनावण्यात आली होती. कोर्टाने ही कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईहवादापासून लांब पळून चालणार नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भोवतालच्या जगात अनेक प्रश्न ज्वलंत आहेत. सक्र‌िय सामाजिक सहभाग हाच या प्रश्नांच्या सोडवणुकीचा मार्ग आहे. मात्र, अध्यात्माच्या चुकीच्या संकल्पनांआड लपून बहुसंख्य लोक ईहवादाला तिलांजली देतात आणि सामाजिक सहभागातून पूर्णत: निष्क्र‌िय होतात. हे चित्र बदलायला हवे. ईहवादापासून पळवाट काढून चालणार नाही, त्याला सामोरे जायला हवे, असे मत कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार विलास पाटील यांनी व्यक्त केले.
ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास यांच्या वतीने आयोजित 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे होते.
पाटील यांनी 'अध्यात्माचा पंचनामा'हा विषय मांडला. ते म्हणाले, 'देव ही संकल्पना माणसाने त्याला हवी तशी निर्माण केली आहे. आजवर माणसाच्या मनावर अध्यात्माच्या मनुष्यनिर्मित संकल्पना वेगवेगळ्या पध्दतीने बिंबविल्या गेल्या. माणसाच्या गुणसूत्रांमध्ये या संकल्पना दडल्या गेल्या आहेत. त्या बदलणेही अवघड बनले आहे. तरीही प्रयत्न करायलाच हवेत.'
'केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांमध्येही अध्यात्माच्या संकल्पना पिढ्यान् पिढ्या रूजत गेल्या. माणूस प्रत्येक पिढीमध्ये चिक‌ित्सक आणि विवेकबुध्दी विसरून अनेक प्रसंगांत भावनेच्या आहारी गेल्याने तो या संकल्पनांना नकळत शरण गेला. जगाला मिथ्या मानण्याची चूक माणसाने करून स्वर्ग व नरकाच्या खोट्या कल्पनांमध्ये तो रमत गेला. या परिणामांमुळे प्रत्यक्षात भौतिक म्हणजेच ईहलोकाचे मोठे नुकसान माणसाइतके कुणीच केलेले नाही,' असेही मत त्यांनी व्यक्त केले. पाटील पुढे म्हणाले, अखेरीला हे जग काही नियमांनी बांधले आहे. विवेकबुध्दी आणि चिक‌ित्सेवर तपासता येणाऱ्या नियमांवर विश्वास ठेवणे म्हणजे देवावर विश्वास ठेवणे, अशी देवत्वाची व्याख्याही त्यांनी यावेळी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडांना राख्या बांधून ‘रक्षाबंधन’

$
0
0

वैनतेयच्या चिमुकल्यांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश

म. टा. वृत्तसेवा, निफाड

'रक्षाबंधन' म्हणजे प्रेमबंधन, भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. सद्यस्थितीला पर्यावरणाचा असमतोल बघता वृक्षाचे रक्षण करण्यासाठी निफाडच्या वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील कब-बुलबुल पथकातील विद्यार्थांनी झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

या वेळी विद्यार्थ्यांनी वह्यांचे पुठ्ठे, टिकल्या, रंगीत कागद, जुन्या साड्यांची लेस अशा टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकर्षक राख्या तयार केल्या. त्यांना शिक्षक गोरख सानप यांनी सणाचे महत्त्व समजावून सांगितले. शाळेत विद्यार्थ्यांचे गट तयार करून शाळेच्या आवारातील झाडांना पाणी घालण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आकर्षक मकुट घालून त्यावर 'झाडे लावा झाडे जगवा' हा संदेश दिला. मुख्याध्यापिका अलका जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन पाटील वडघुले, विश्वस्त वि. दा. व्यवहारे, अॅड. ल. जि.उगांवकर तसेच पालकांनी कौतुक केले.

'आम्ही दररोज या झाडांसमोरून जायचो. पण त्या झाडाला राखी बांधल्यापासून आम्हाला झाडांबद्दल आपुलकी वाटू लागली. त्यामुळे या झाडांची जोपासना करण्याचा आम्ही संकल्प केला' असे विद्यार्थिनी यशश्री नागरे, पायल म्हस्के यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वातंत्र्यसैनिकांचा फलक धूळखात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना अभोणा ग्रामपालिकेने मात्र ज्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानामुळे आपण हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचे फलकच अडगळीत टाकण्याचा पराक्रम केला. यावर नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक लावण्यासाठी जागा रिकामी व्हावी यासाठी हे फलक काढल्याचे कारण देण्यात आले.

स्वातंत्र्यदिनी नागरीकांनी ग्रामसभा सुरू असताना ग्रामपालिकेने जुनी मोटार सुस्थितीत असताना नव्याने खरेदी केलेल्या पाणीपुरवठ्याच्या मोटारीची माहीती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस समर्पक उत्तर न मिळाल्याने त्यांनी जुनी खराब झालेली मोटार दाखवण्याची मागणी केली. मोटार दाखवण्यासाठी कर्मचाऱ्याने डेड स्टॉकची रुम उघडली असता जुनी मोटार तर मिळालीच नाही. परंतु तेथे स्वातंत्र्यसैनिकांचे नावे असलेला फलक धूळखात आढळला. हा प्रकार बघून ग्रामसभेत गोंधळाचे वातावरण झाले होते. घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभोणा गावात दिवसभर ग्रामपंचायतीच्या कृत्याचा ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष दिसून येत होता. ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या नावाचीही पाटी टाकून दिल्याने माजी सरपंच व नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ ग्रामसेवकावर अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

महिला सक्षमीकरण, स्त्रियांचा सन्मान हे शासकीय कार्यालयांचे ब्रीद असताना गावाची प्रथम नागरिक असलेल्या सरपंच महिलेला ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने झेंडावंदन करण्यापासून रोखल्याची घटना नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथे सोमवारी (दि. १५) घडली. याबाबत संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिनी झालेल्या या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथील ग्रामपंचायतीत सरपंच रोहिणी आहेर यांनीच शासकीय शिरस्त्यानुसार त्यांच्या झेंडावंदन करावे अशी अपेक्षा असताना ग्रामसेवक एन. के. अमृतकार यांनी उपसरपंच सुदाम आहेर यांना ध्वजवंदन करण्यास सांगितले. त्यामुळे सरपंच आहेर यांनी आपण महिला असल्यानेच आपला झेंडावंदन करण्याचा हक्क हिरावून घेतला, अशा आशयाची तक्रार नांदगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत गटविकास अधिकारी चित्रलेखा कोठावळे यांनी हा प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक नगरपरिषदेकडून गाळे सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नगरपरिषद वसुली विभागाने थकबाकी असलेल्या व्यावसायिक गाळ्यांना सिल करण्याच्या धडक मोहीमेस प्रारंभ केला. यामध्ये नगरपरिषदेच्या भाजी मंडई, बसस्थानकाच्या समोरचा परिसर आणि पंचायत समिती आवाराच्या लगत असलेल्या व्यावसायिक गाळेधारकांनी लाखोंची थकबाकी वारंवार नोटीस बाजावूनदेखील भरलेली नाही. त्यामुळे मंगळवारी (दि. १६) मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे, अभियंता कांगणे, कर निरीक्षक मंगेश सोनार, सहायक अधिकारी प्रशांत पोतदार यांनी पोलिस पथकाची मदत घेऊन ठोस कारवाई केली. यामध्ये काही व्यावसायिकांनी ७५ टक्केपर्यंत थकबाकी भरल्याने त्यांना वगळण्यात आले. या कारवाईच्या दरम्यान काही गाळे अनाधिकृत वापर होत असल्याचे आढळले तर काही ठिकाणी गाळाधारक वेगळीच व्यक्ती असून परस्पर पोटभाडेकरू म्हणून गाळा वापरात असल्याचे आढळून आले. हे गाळेही सील करण्यात आले असून परस्पर पोटभाडेकरू असेल तेथे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगि‌तले.

शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुल आहेत. त्याठिकाणी साधरणत: प्रती गाळा ७०० ते ३००० रुपयांच्या दरम्यान जागा आणि लिलावाप्रमाणे मासिक भाडे आकारले जाते. यात काही गाळेधारकांनी गाळ्यांना खासगीत दहा हजारांपर्यंत भाडे आकारुन कमाईचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे या गाळ्यांचा नव्याने लिलाव करून सुधारित भाडे आकारणार असल्याचे प्रशासनाने ठरविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेती, पाण्याचा प्रश्न मिटणार

$
0
0

राज्यमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तळवाडे साठवण बंधाऱ्याचे विस्तारीकरणामुळे साठवण तलावाची क्षमता ८७ दशलक्ष घनफूट होणार आहे. यामुळे चणकापूर धरणातील पाण्याची बचत होणार असून बचत झालेले पाणी कालवा व नदीद्वारे सिंचनासाठी दिले जाणार असल्याने त्याचा फायदा शेती, व्यवसायाला होणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

मालेगाव येथील महानगरपालिकेस पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण बंधाऱ्याच्या विस्तारीकरण कामाचा शुभारंभ ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालेगाव आमदार आसिक शेख, मनपा महापौर हाजी मो. इब्राहिम, स्थायी सभापती एलाज बेग, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, नगरसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. हा प्रकल्प मार्गी लागत असून तालुका व शहराच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची काळजी दूर होणार असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालुका दर्जासाठी आंदोलन

$
0
0

मनमाड बचाव कृती समितीकडून उपोषण; शहरवासीयांचा पाठिंबा

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

वर्षानुवर्षे मनमाड शहर विकासापासून वंचित असून मनमाड शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा तसेच नांदगाव तहसीलचे विभाजन करून मनमाड शहराला अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे या मागण्यांसाठी मनमाड बचाव कृती समितीने आंदोलन तीव्र केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन आता तीव्र झाले असून बुधवारी (दि. १७) अद्वय हिरे यांनीही याला पाठिंबा दर्शविला आहे. प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे.

मनमाड शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या या उपोषणात समितीचे भीमराज लोखंडे, पोपट शेठ बेदमुथा, दादा बंब, महेंद्र गरुड, विष्णू चव्हाण, कैलास शिंदे यांचा समावेश आहे.

शहरात अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे, मनमाड पालिकेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासारख्या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. शहराला विकासापासून दूर सारल्याने आता शहराला सरकारने न्याय द्यावा, अशी आर्त हाकही यावेळी देण्यात आली. आपल्या मागण्यांवर उपोषणकर्ते ठाम असून 'आता केवळ आश्वासन नको तर आता ठोस कृती हवी' अशी भूमिका मनमाड बचाव कृती समितीने घेतली आहे. समितीचे प्रमुख संयोजक अशोक परदेशी यांनी या प्रश्नी समिती आता आरपारची लढाई लढणार असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून प्रांताधिकारी वासंती माळी, नांदगावच्या तहसीलदार रचना पवार, पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी भेटी देत उपोषणकर्त्यांची मनधरणीचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरत-नागपूर महामार्ग रोखला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पातर्गंत डाव्या कालव्याचे काम त्वरीत सुरू करावे यासह विविध मागण्यांसाठी धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरत-नागपूर महामार्गावर भदाणे गावाजवळ रास्ता रोको केला. हे काम लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

निम्न पांझरा अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, उजवा कालव्याचे कामही संपुष्टात आले आहे. मात्र, या प्रकल्पांतर्गंत डावा कालव्याचे साधारण एक किमी अंतराचे काम होणे बाकी आहे. उर्वरित काम पूर्ण झाले आहे. यावर्षी अक्कलपाडा प्रकल्प भरून त्याचे पाणी गेटव्दारे पांझरा नदीत सोडण्यात आले होते आणि डावा कालव्याचे पाणी हे तालुक्यातील भदाणे, खंडलाय, अकलाड, मोराणे, नेर यासह अन्य गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणे अपेक्षित आहे. मात्र, डाव्या कालव्याचे काम अपूर्ण असल्याने या गावातील शेतककरीवर्गाला पाण्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या कालव्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूजीसीचे रॅगिंगवर लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रॅगिंगला कॉलेजेस आणि विद्यापीठांमध्ये आळा बसावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रॅगिंगच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी आता यूजीसीने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही प्रतिज्ञापत्र भरण्याची सक्ती केली आहे.
विविध ठिकाणी फोफावणाऱ्या कॉलेज कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर रॅगिंगच्या घटना अलिकडे उघडकीस आल्या होत्या. तरुणांमध्ये फोफावणाऱ्या या विकृतीला वेळीच आळा घालण्यासाठी यूजीसीने आणखी कडक धोरण स्वीकारले
आहे. यूजीसीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या रॅगिंगविरोधी समितीच्या बैठकीत विद्यार्थी व पालकांकडून ऑनलाइन प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात यूजीसीच्या
वतीने सर्व विद्यापीठांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही विद्यापीठांकडून या मुद्द्याला मिळालेला थंड प्रतिसाद लक्षात घेऊन यूजीसीने विद्यार्थी आणि पालकांना हे प्रतिज्ञापत्र सक्तीचे केले आहे.

विविध उपक्रम
रॅगिंगच्या विरोधात कॉलेजेसचा सहभाग वाढावा, यासाठी यूजीसीने कॉलेज स्तरावर अँट‌िरॅगिंग समिती, सीसीटीव्ही बसविणे, अँट‌‌िरॅगिंग वर्कशॉप्स, व्याख्याने, चर्चासत्रे व प्रबोधन कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हल्लेखोर पिता पोलिसांना शरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोटच्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्याच्या हेतूने बाल न्यायालयाच्या आवारातच संशयितावर गोळी झाडणारा पिता प्रलिन बाव‌िस्कर गुरूवारी दुपारी स्वत:हून पोलिसांना शरण आला. गुरूवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुंबई नाका पोलिस ठाण्यात बाविस्कर याने स्वत:हून शरणागती पत्कारली. दरम्यान, आज (१९ऑगस्ट) बाविस्कर यास कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.
बुधवारी एका खून प्रकरणातील सुनावणीसाठी संशयित बाल गुन्हेगारास बाल न्यायालयासमोर हजर करत असताना न्यायालयाच्या आवारातच प्रलिन बाविस्कर याने संशयितावर गोळी झाडली होती. दरम्यान, संशयिताने सावधतेने गोळी चुकविण्याचा प्रयत्न केल्याने ती गोळी त्याच्या शरीरास चाटून गेली होती. या घटनेनंतर हल्लेखोर बाविस्कर जागेवरून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी त्वरीत पथकेही रवाना केली होती.
वर्षभरापूर्वी सप्टेंबर महिन्यात मोहीत प्रलिन बाविस्कर या अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी त्याचे वडिल प्रलिन यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली होती. त्या अगोदरच मोहीत याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या घटनेस अवघा ११ महिन्यांचा कालावधी उलटला. दरम्यान, मुलाच्या खुनामुळे प्रलिन याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मुलाच्या हत्येचे दुःख पचवू न शकल्याने त्याने गोळीबार केला आणि त्यानंतर आता तो स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिदुर्मिळ वनस्पतींना संजीवनीसाठी पुढाकार

$
0
0

सौरभ झेंडे, कॉलेज क्लब रिपोर्टर

जैवविविधतेत वनस्पती, प्राणी आणि मानव यांची नैसर्गिक साखळी अतिशय महत्त्वाची मानली जाते. या साखळीतला प्रत्येक घटक कुठल्या ना कुठल्या कारणाने एकमेकांशी निगडित आहे. पण, सद्यःस्थितीत वनस्पतींच्या काही प्रजाती अतिदुर्मिळ त्याचप्रमाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा जैवविविधतेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे अशा वनस्पतींना संजीवनी देण्यासाठी व्ही. एन. नाईक कॉलेजने पुढाकार घेतला आहे.

जैवविविधता हा विषय फक्त पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता त्यासाठी काही प्रयत्न करावयास हवेत, या उद्देशाने दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कॉलेजच्या बॉटनी विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी इको क्लब अंतर्गत सर्वे ऑफ रेअर मेडिसिनल प्लांट्स अराउंड नाशिक हा उपक्रम हाती घेतला असून, या उपक्रमात दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या औषधी, त्याचप्रमाणे अन्य वनस्पतींचे प्रोपोगेटिंग पार्टस कलेक्ट करून त्यांचे कल्टिवेशन करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अंजनेरी, तोरंगण, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी भागात नामशेष होत चाललेल्या वनस्पतींच्या काही दुर्मिळ प्रजाती आढळून येतात. एन्डेजर्ड म्हणजे संपुष्टात येणाऱ्या या वनस्पतींचे प्रोपोगेटिंग पार्टस, त्यात त्यांची बियाणे, ट्यूबर्स, कंद कलेक्ट करून कॉलेजच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये त्यांचे कल्टिवेशन करून जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुर्मिळ वनस्पतींच्या यादीत बऱ्याच अशा वनस्पती आहेत ज्या आजच्या असंख्य आजारांवर उपयुक्त आहेत. परंतु, नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्या खूप दुर्मिळ स्वरूपात आढळतात. या कारणांमुळे त्यांचा उपयोग होऊ शकत नाही. जर या वनस्पती नवीन ठिकाणी कल्टिवेट करून जगवता आल्या, तर नक्कीच याचा जैवविविधता संवर्धनासाठी फायदा होईल, असे व्ही. एन. नाईक कॉलेजच्या बॉटनी विभागाचे प्रमुख प्रा. एच. पी. शिंदे यांनी सांगितले. कॉलेजच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रथमतः हा उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला. यावेळी नाशिकजवळील भागांतून काही वनस्पतींचे प्रोपोगेटिंग पार्टस कलेक्ट करून कल्टिवेशन केले गेले. त्यात क्लोरोफायटम बोरिविलियम (सफेद मुसळी), सेरोपेजिया सह्याद्रिका (कंदीलपुष्प), डायोस्कोरिआ बल्बिफेरा (डुक्कर कंद), ग्लोरिसा सुपर्बा (कळलावी), सेरोपेजिया हिरसूटा (हमिल) या वनस्पतींचा समावेश आहे. जैवविविधता टिकवण्यासाठी त्यातील घटकांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. त्यासाठी कॉलेजच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना दुर्मिळ वनस्पतींमधील विविधतेचा अभ्यास तर होतोच, परंतु एकंदरीत वनस्पतींमधील जैवविविधता टिकविण्याच्या दृष्टीने हातभार लागेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. या उपक्रमास कॉलेजचे प्राचार्य.

डॉ. व्ही. जी. वाघ आणि उपप्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

दुर्मिळ व नामशेष होणाऱ्या वनस्पतींचे प्रोपोगेटिंग पार्टस कलेक्ट करून जर त्यांचे कल्टिवेशन करून त्या जगत असतील, तर ही नक्कीच चांगली बाब आहे. आमच्या कॉलेजच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये काही अशाच वनस्पतींचे जतन व संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-प्रा. एच. पी. शिंदे

अशा अनेक वनस्पती आहेत ज्या गंभीर आजारांवर उपयुक्त आहेत. परंतु, नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांचा उपयोग होऊ शकत नाही. कल्टिवेशन करून त्या जगवता आल्या, तर नक्कीच जैवविविधतेला याचा फायदा होईल आणि उपयुक्त वनस्पती वापरातदेखील येतील.

-प्रा. एम. पी. सांगळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणलेल्या महिलेवर एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संदीप (पूर्ण नाव व पत्ता नाही) नामक तरुणाविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) येथील २४ वर्षीय महिलेशी ओळख वाढवून संशयिताने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (१४ ऑगस्ट) संशयिताने चाळीसगाव येथे जाऊन त्या महिलेची भेट घेतली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिला नाशिकला पळवून आणले. रात्री भद्रकालीतील पिंपळ चौक भागातील लॉजवर व दुसऱ्या दिवशी मनमाड येथील सुखसागर लॉज येथे बलात्कार केला. त्यानंतर महिलेस सोडून त्याने पोबारा केल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली असून याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला उपनिरीक्षक जाधव याचा अधिक तपास करीत आहेत.

एकाला अटक
धारदार चाकू बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी उंटवाडी रोडवर एकास अटक केली आहे. दिनेश भटू चौधरी (वय २९, रा. दंडेवाला बाबानगर, मोहाडी, धुळे) असे संशयिताचे नाव असून तो बुधवारी दुपारी उंटवाडी येथील मुलांच्या निरीक्षणगृह परिसरात संशयास्पद फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी करीत अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे धारदार चाकू मिळाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार अड्डे उद्ध्वस्त
गंगापूर पोल‌िस ठाण्याच्या हद्द‌ीतील संत कबीरनगर परिसरात जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संत कबीरनगरमधील साई मंदिरासमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी संशयित विलास बुधाजी गायकवाड (वय २८, रा. संत कबीरनगर) व तीन साथीदार हे ५२ पत्त्यांच्या कॅटवर जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी, दत्त चौकातील मटण मार्केटच्या भिंतीलगत सुरू असलेल्या कल्याण मटका व मेन स्वरलाइन नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी संशयित किशोर प्रभाकर खेले (वय २५), सुभाष अशोक मुर्तडक (वय २७) हे मटका आकडा जुगार खेळताना मिळाले. त्यांना ताब्यात घेऊन अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरण फुल, पाणी मात्र गुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गंगापूररोड

गंगापूर धरणात पुरेसे पाणी असतानाही गंगापूररोड परिसरातील नववसाहतींचा मोठा भाग आजही तहानलेलाच आहे. गंगापूररोडच्या वाढत्या लोकवस्तीसाठी बळवंतनगर येथे नवीन जलकुंभ मंजूर आहे. परंतु, निधीअभावी हा जलकुंभ उभारता येत नसल्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढणाऱ्या गंगापूररोड भागात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

शहरातील सर्वांत वेगाने वाढणारा भाग म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. त्यातच बंगल्यांसह मोठ्या इमारतींचे जाळे गंगापूररोड परिसरात उभे राहिले आहे. उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून नावारूपाला आलेल्या गंगापूररोड भागात नव्याने स्थापन होत असलेल्या वसाहतींत रस्त्यांची समस्येबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.

गंगापूररोडवरील सिरीन मेडोज, बळवंतनगर, कडलगनगर, नवश्या गणपती सेक्टर, आनंदवली गाव, गोदावरी हाइट्स, शंकरनगर, नरसिंहनगर, अभियंतानगर आदी भागांमध्ये पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पाण्यासाठी गंगापूररोडवासीयांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानादेखील गंगापूररोड परिसर तहानलेलाच असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. गंगापूररोडवासीयांनी स्थानिक नगरसेवक व महापालिकेकडेदेखील पिण्याच्या पाण्याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र, उपाययोजना झालेली नाही. महापालिकेने येथील वाढलेला परिसर पाहता बळवंतनगर भागात नवीन जलकुंभ मंजूरदेखील केलेला आहे. परंतु, निधीअभावी मंजूर पाण्याची तो रखडला आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष घालावे, अशी

मागणी नगरसेवक विलास शिंदे यांनी केली आहे.

गंगापूररोड परिसरात नवीन इमारतींचे बांधकाम करण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली पाहायला मिळते. परंतु, वाढत्या लोकवस्तीत रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. महापालिकेने गंगापूररोडवासीयांनी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

-विलास शिंदे, नगरसेवक

---

शहरातील सर्वाधिक झपाट्याने वाढलेला परिसर म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. त्यातच नवीन वसाहतींचे मोठे जाळे गंगापूररोड भागात उभे राहिले आहे. परंतु, पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नसल्याने रहिवाशांना भटकंती करावी लागत आहे.

- मधुकर मंडलिक, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्षाबंधनाने गहिवरले २००० लष्करी जवान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी आपल्या कुटुंबीयांपासून कोसो दूर असणाऱ्या आर्टिलरी सेंटर येथे कार्यरत दोन हजार लष्करी जवानांना राखी बांधून मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी रक्षाबंधन साजरे केले. याप्रसंगी आपल्या सख्ख्या बहिणींची उणीव या बहिणींनी भरून काढल्याने उपस्थित अनेक जवानांना गहिवरून आले.

आर्टिलरी सेंटरमधील ड्रील मैदानावर हा भावाबहिणीच्या अतूट नात्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी देशाच्या विविध प्रांतांतून येथे लष्करी प्रशिक्षणासाठी आलेल्या जवानांच्या मनगटावर जिजाऊ ब्रिगेडच्या माहिला सदस्यांनी राखी बांधून त्यांचे औक्षण केले व निरोगी दीर्घायुष्याची ईश्वराकडे प्रार्थना केली. याप्रसंगी लेप्टनंट कर्नल हिमांशू पांडे, सुभेदार मेजर युर्मिदास आदी लष्करी अधिकारी उपस्थित होते.

माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा माधुरी भदाणे, प्रदेश महासचिव सुनंदा जरांडे, उषा पाटील, मीरा निसाळ, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष दपक भदाणे, सचिव उदय बोरसे, उद्योजक विशाल देसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images