Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीतील सामान्य रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने कॅन्टोन्मेंट प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने शहराच्या विविध भागांत प्रतिबंधक औषंधाची फवारणी करण्याचे काम सुरू केले आहे.

गेल्या आठवड्यात येथील कॅन्टोन्मेंट सामान्य रुग्णालयात डेंग्यूचा रुग्ण आढळून आला असून, तातडीची उपाययोजना म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी शहरात ज्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होऊन डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असेल अशा भागात डासांचा नायनाट करणारी उपाययोजना करून स्वच्छ करण्यात आलेल्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर तातडीने कर्मचाऱ्यांकरवी टाकून घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या आरोग्याला कुठलाही धोका पोहोचू नये याकरिता प्रशासन सज्ज असून, हाडोळा, सहा चाळ, संजय गांधीनगर, दगड चाळ, चारणवाडी, चौधरी मळा, गोडसे मळा आदी परिसराची स्वच्छता करण्यात येत असल्याची माहिती सीईओ विलास पवार व आरोग्य विभागाचे अधीक्षक सतीश भातखळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जलयुक्त’ला मुदतवाढ नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी सिन्नर फाटा

सन २०१५-१६ या वर्षासाठी जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या राज्यातील ६२०२ गावांतील कामे विहीत मुदतीत पूर्ण न झाल्याने त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र २०१६-१७ या वर्षासाठी राज्यभरातून निवडलेल्या ५२८१ गावांतील कामांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. नाशिक विभागात जलयुक्त शिवार अभियानाचे काम राज्यातील आतापर्यंत आढावा घेतलेल्या विभागांपेक्षा अधिक सरस असल्याचे गौरवोद्गार राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी येथे काढले.

येथील विभागीय महसूल आयुक्तालयात शनिवारी नाशिक विभागाची जलआयुक्त शिवार अभियान आढावा बैठक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी सचिव पुरुषोत्तम भापकर, महसूल आयुक्त एकनाथ डवले व इतर अधिकारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, पाणी टंचाईतून मुक्तता मिळविण्यासाठी ही योजना प्रभावी ठरू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील इतर राज्यांतही ही योजना राबविण्याचा मानस व्यक्त केला असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

२०१९ पर्यंत दरवर्षी पाच हजार गावे याप्रमाणे सुमारे २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट्य आहे. परंतु, पहिल्या वर्षी या योजनेचे निश्चित उद्दिष्ट्य साध्य झाले नाही. त्यामुळे मागील वर्षीचे अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. परंतु, सन २०१६-१७ या वर्षातील राज्यातील ५२८१ गावांचे उद्दिष्ट्य असून, मागील वर्षाच्या अनुभवाचा विचार करता या वर्षीच्या कामांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

११,६१,६२६ टीसीएम पाणीसाठा वाढ
सन २०२५-१६ मध्ये निवडलेल्या राज्यातील ६२०२ गावांतील २,०३,०७० कामे पूर्ण झाली असून, १८,१६२ कामे सुरू आहेत. तर २०१६-१७ साठी निवडलेल्या ५२८१ गावांतील २९४८७ कामे पूर्ण झाली असून, ११४५५ कामे सुरु आहेत. परिणामी आतापर्यंत राज्यात ११,६१,६२६ टीसीएम इतकी पाणी साठ्याची क्षमता वाढल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिताल अकादमीत गुरुपौर्णिमा सोहळा

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक येथील आदिताल तबला अकादमीचा गुरुपौर्णिमा सोहळा शनिवारी (दि. २०)अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेत रंगला. दर वर्षीप्रमाणे यावर्षीही मोठा उत्साह दिसून आला. सोहळ्याचा श्रीगणेशा उस्ताद अहमदजान थिरकवॉ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. अकादमीच्या चौदाव्या गुरुपौर्णिमा सोहळ्यास पं. नारायण (काका) जोशी, पं. नाना मुळे, पं. कमलाकर वारे यांची विशेष उपस्थिती होती.

तबला सहवादनात चार ते पंचवीस वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ताल-त्रिताल, झपताल, एकताल, मत्त या ताल प्रकारातील रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते दिगंबर सोनवणे व रसिक कुलकर्णी यांनी सादर केलेल्या त्रिताल तालातील बंदिशींचे प्रकार. गुरुपौर्णिमा सोहळ्याचे औचित्य साधून अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आदिताल तबला अकादमीच्या द्वितीय शाखेचा म्हणजेच ललित कला अकादमीचा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी ललित कला अकादमीचे समन्वयक सुभाष सबनीस, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष अजित चिपळूणकर, उपाध्यक्ष मुंगी, तसेच सिंगल विंडो सर्व्हिसेसचे अध्यक्ष रघुवीर अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दि जिनियसतर्फे घडले ‘नाट्यदर्शन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'अंतर्वक्र भिंगातून पहाताना : नाट्यदर्शन' या शीर्षकाने शनिवारी झालेला लघुनाट्य महोत्सवात प्रेक्षक रंगले. दि जिनियस व स्मिमाताई हिरे कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स अॅण्ड फॅशन डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाची सुरुवात दिवाकरांच्या निवडक नाट्यछटांनी झाली.

चक्रवर्ती सम्राट दिवाकर हे नाट्यछटेद्वारे मार्मिक विनोद, जगण्यातील विसंगती व तत्कालीन सामाजिक अन्यायाची जाणीव करून देत. हेच या नाट्यछटेतून समोर आले. काव्यमय व चिंतनात्मक लिखाणातून लिहिलेल्या या नाट्यछटांनी समाजजीवनाचे प्रतिबिंब दाखवले. या नाट्यछटांमध्ये सुयश लोथे, राजवर्धन दुसाने, चैतन्य देवरे, भूषण आहिरे, श्रद्धा उबाळे, ओवी भालेराव, पल्लवी ओढेकर, रिया हिंगणे, एकता आढाव आणि मनोज गुळवे यांनी भूमिका पार पाडल्या. दिग्दर्शन पूर्वा सावजी व सुहास जाधव यांचे होते. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही माणसांच्या मुलभूत गरजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती झाली असे म्हणता येणार नाही, हे मर्म विनोदी शैलीतून मांडण्यात आले ते बी. आर. ई गणेश तसेच डिजिटल इंडियाःहेंडल विथ केअर या प्रहसनातून. यात अभिषेक रहाळकर, ओवी भालेराव, रिया हिंगणे, एकता आढाव यांनी अभिनय केला तर दिग्दर्शन प्रतिक शर्मा आणि स्वराली हरदास यांचे होते. 'पिक्चर अभी बाकी है' हे सुनील जाधव लिखित लघुनाट्य सादर झाले. दिग्दर्शन नीलेश सूर्यवंशी यांचे होते. अपवादानेच सदर होणारी लघुनाट्यांची मालिका या महोत्सवात सादर झाली. लेखन देवेन कापडणीस यांचे तर चेतन वडनेरे, विश्वदीप यादव, अभिषेक रहाळकर, प्रतिक नाईक, प्रशांत सोनवणे, रिया हिंगणे यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांनी केले दुचाकींना लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर कॉलनीतील कामगार वस्तीत टवाळखोरांकडून तब्बल ११ चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा स्वारबाबानगरमध्ये पाच दुचाकींचे नुकसान केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. सातपूर पोलिसांनी स्वारबाबनगर येथे दाखल होत दुचाकींचा पंचनामा केला. आमदार सीमा हिरे यांनीदेखील तत्काळ सातपूर पोलिस स्टेशनला भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली. वाहनांचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

बुधवारी सातपूर कॉलनीत चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या घटनेतील संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात राजकीय पुढाऱ्यांच्याच वाढदिवसाच्या पार्टीतील कार्यकर्त्यांनी गाड्यांच्या काचा फोडल्या असल्याचे सातपूर कॉलनीत चर्चा आहे. सातपूर पोलिसदेखील यादृष्टिने तपास करीत आहेत. टवाळखोरांनी स्वारबाबनगरमधील दुचाकींचे सीट कव्हर धारदार हत्याराने कापले आहेत. मोठे नुकसान नसले तरी सीट पूर्णतः खराब झाले आहेत.

पार्किंगचा वाद

सातपूर भागातील अशोकनगर येथील जाधव संकुलला लागून असलेल्या श्रेया संकुल येथे वाहन पार्किंगचा वाद थेट सातपूर पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. एकाच ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी एकाच्या घराच्या प्रवेशद्वारावर दुचाकी वाहने पार्क करीत असतात. यामुळे घरातून बाहेर जाण्यासाठी रस्ताच राहत नसल्याने श्रेया संकुलमधील रहिवाशांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी रहिवाशांची समजूत काढत समझोत्याने मार्ग काढण्याबाबत सूचना केल्या आहेत. यात पार्किंगच्या वादावरून एकाने मोटरसायकलींचे नुकसान केले असल्याने एका संशयितास सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करारनाम्यापूर्वीच दिला पेस्ट कंट्रोलचा ठेका!

$
0
0

आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या करामती सुरूच असून, आता १९ कोटींच्या पेस्ट कंट्रोलचा ठेका ठेकेदाराला देताना अद्याप करारनामा केला नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराला आरोग्य विभागाने कार्यारंभ आदेश देऊन बारा दिवस उलटले आहेत. दुसरीकडे ठेकेदाराने बँक गॅरंटीही उशिरा दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा समोर आला आहे.

वाद आणि आरोग्य विभाग हे जणू समीकरणच बनले आहे. महापालिकेत घंटागाडी व पेस्ट कंट्रोल हे दोन ठेके सर्वात वादग्रस्त ठरले आहेत. पेस्ट कंट्रोलचा ठेक्याचा वाद, तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला होता. स्थायी समितीने दिग्विजय एंटरप्राईजेसला देण्यास विरोध केला होता. परंतु, आयुक्तांनी तो विखंडनासाठी पाठवला होता. शासनाने हा ठराव विखंडित केल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना करारनामा करणे व कार्यारंभ आदेश देण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार २३ जून रोजीच ठेकेदाराला कामाची सूचना देण्यात येऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले होते.

एक ऑगस्टपासून संबंधित ठेकेदाराला काम करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित ठेकेदाराने आठ ऑगस्टपासून कामही सुरू केले. कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी ठेकेदारासोबत करारनामा करणे अपेक्षित होते. परंतु, आरोग्य विभागाने ठेकेदाराला काम करून बारा दिवस झाले तरी, अद्याप करारनामा केलेला नाही. त्यामुळे कार्यारंभ आदेश कसा दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने १० ऑगस्टला ४९ लाखांची बँक गॅरंटी दिली. बँक गॅरंटी ही ठेका देण्यापूर्वी घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराचा फटका नाशिककरांना बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...त्या दोघा चिमुकल्यांना मिळाला ‘आधार’

$
0
0

गटविकास अधिकारी आहिरे यांच्या प्रयत्नांना यश

म. टा. वृत्तसेवा, येवला

...त्याचं वय चार तर तिचं वय अवघं दोन वर्षे...दोघंही भाऊ अन् बहिण. आईनं दोन महिन्यांपूर्वी जीवनाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग निवडला. आईनं नावापुढं बापाचं नाव लावलेलं खंर, मात्र त्या पित्याचा नेमका मागमुसचं नाही... तर आईचे ७५ वर्षीय काका अपंग असल्यानं सांभाळ करण्यास असमर्थ...अशा अवघड परिस्थितीत जगणाऱ्या दोघा चिमुकल्यांना शुक्रवारी आश्रमचा 'आधार' मिळाला...अन् त्यांना आधार मिळवून देण्यासाठी गेल्या महिनाभरापासून प्रयत्नशील असलेल्या येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा उमटल्या.

येवला तालुक्यातील कुसूर येथील मातृछत्र हरपलेल्या दोघा अनाथ बालकांना येवला पंचायत समितीत नाशिक येथील शासकीय आधार आश्रमातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

तालुक्यातील कुसूर येथील जान्वी संतोष पाटील (वय २) व कुणाल संतोष पाटील (वय ४) या दोघा बहिण-भावाच्या मातेने दोन महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतला. पित्याचा तर पत्ताच नव्हता. आई तिचे काका बाबुराव पुंजाराम पगारे यांच्याकडे राहत. पुढे आईच्या मृत्यूनंतर ही अनाथ चिमुकली आईच्या काकाकडे असली तरी ७५ वर्षीय आजोबा अपंग असल्याने या चिमुकल्यांचा सांभाळ करण्यास असमर्थ होते. ग्रामसेवक आय. ए. खैरनार यांनी याबाबत येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनिल आहिरे यांना सांगितले. चिमुकल्यांची व्यथा ऐकून आहिरेंना स्वस्थ बसवेना. या मुलांना आधार मिळवून देण्याचा त्यांनी निश्चय केला. खैरनार यांच्याकडून जान्वी अन् संतोष यांचे दाखले प्राप्त करून घेतले. बरोबरच बाबुराव पगारे यांच्याकडून अर्ज व आधार कार्ड देखील मिळवले. पुढे त्यांनी

तो अर्ज नाशिक येथील बाल न्यायालय रिमांड होम यांच्याकडे सादर केला. आहिरे यांनी बाल कल्याण समितीच्या सदस्य अश्विनी न्याहारकर तसेच अध्यक्षा श्रीमती वैशाली साळे यांची बाल न्यायालयात भेट घेवून ह्या दोघा मुलांना अनाथ आधार आश्रमात घेण्याचे साकडे घातले. बाल न्यायालयाकडून त्यांची विनंती मान्य करण्यात आली.

बाल संरक्षण अधिकारी भाग्यश्री जाधव (नाशिक) यांनी शुक्रवारी येवल्यात जावून जान्वी अन् संतोष या दोघा चिमुकल्यांना मायेचा हात दिला. येवला पंचायत समितीत झालेल्या एका छोटेखाणी कार्यक्रमात ह्या चिमुकल्यांना बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. पंचायत समितीचे सभापती प्रकाश वाघ,पंचायत समिती सदस्य रतन बोरनारे, वसंत पवार, ग्रामसेवक संघटनेचे सचिव रवींद्र शेलार, ग्रामसेवक आय. ए. खैरनार, कृष्णा बडे, बाळासाहेब बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र शेलार यांनी या मुलांना नाशिक मध्ये नेण्यासाठी मोफत वाहन उपलब्ध करून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक फेरीसाठी बंदोबस्त तैनात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तिसऱ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरी लाखो भाविक ब्रम्हगिरी प्रदक्षिणेस येण्याची शक्यता लक्षात घेता प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. यासाठी काही मार्गात बदल, पार्किंगची माहितीही देण्यात आली.

तिसऱ्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाशिक-त्र्यंबक मार्गावर रविवार सकाळ ते मंगळवारपर्यंत शहरात बाहेरील खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावर केवळ बस वाहतूक सुरू राहील.

उपजिल्हा रुग्णालय अहोरात्र सुरू असून प्रदक्षिणामार्गासह ठिकठिकाणी वैद्यकीय सुविधा मिळेल याकरीता पथकांचे नियोजन केल्याची माहिती डॉ. भागवत लोंढे यांनी दिली. त्र्यंबकेश्वर शहर बॅरेकेडिंग सिटी म्हणून ओळखले जात आहे कारण ठिकठिकाणी बॅरेकेड लावले आहेत. यामुळे नागरिकांना नित्य व्यवहार करण्यास अडचणीचे ठरते आहे. शहरात लाखो भाविक येणार असतानाही मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी अधिक पाण्याची गरज नसल्याचे सांगितले. या वक्तव्याने नगरपरिषदेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नगराध्यक्ष संतोष कदम यांनी भाविकांना सर्वोतपरी सुविधा मिळतील याकरीता पाहणी पूर्ण केली आहे.

भाविकांसाठीचा फेरीमार्ग

शहरात बसने सिंहस्थ बसस्थानकापर्यंत भाविकांना येता येईल. तेथून पुढे रेणुका हॉलमार्गे कला वाणिज्य महाविद्यालय व महादेवी रस्त्याने थेट निवृत्तीनाथ मंदिरमार्गे तेली गल्ली व कुशावर्तावर चालत जाऊन तेथे आंघोळ केल्यानंतर मंदिराचे बाजूने स्वामी समर्थ मार्गाने प्रयाग तीर्थावर जाता येईल. तेथे नवीन भुयारीमार्गाने प्रदक्षिणा मार्गावर भाविक रवाना होतील, असा मार्ग ठरविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगी वाहनांना उद्या त्र्यंबक बंदी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी चार लाख भाविक येण्याची शक्यता गृह‌ित धरून जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. खासगी प्रवासी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये बंदी घालण्यात आली असून भाविकांसाठी जादा बसेसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ब्रह्मगिरीला फेरी मारणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. हजारो शिवभक्त दरवर्षी नित्यनेमेमाने ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारतात. दरवर्षी नवीन भाविकांच्या संख्येत भरच पडते आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी फेरीमार्गावर गर्दीचा महापूर असतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने सीसीटीव्ही, बॅरिकेटिंग लावून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अती महत्त्वाच्या व्यक्तींना पासेसद्वारे मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. परिसरात प्रसाधनगृह, पिण्याचे शुद्ध पाणी यासह भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. फेरी मार्गावर चोरीच्या आणि लूटमारीच्या घटना घडू नयेत यासाठी २४ तास विद्युत पुरवठा कार्यान्वित राहणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये होणारी गर्दी विचारात घेऊन तिसऱ्या श्रावणी सोमवारी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी खासगी वाहनांना त्र्यंबकमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर मार्गावर धावणार ४०५ बसेस
तिस‍ऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे सोडण्यासाठी ४०५ बसेस धावणार आहेत. त्यापैकी २६५ बसेस एकट्या मेळा बसस्थानकातून सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख शिलावट यांनी दिली. त्यामध्ये २०५ जादा बसेसचा समावेश आहे. प्रवाशांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नाशिकरोड येथून ३५, निमाणी येथून ३०, सातपूर येथून २०, खंबाळे येथून ३०, घोटी येथून १०, अंबोली, सिडको, पहिने येथून प्रत्येकी पाच बसेस सोडण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्वासनानंतर उपोषण मागे

$
0
0

मनमाड शहरात मोर्चा; कडकडीत बंद

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहराला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी सोबतच विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला पाठिंबा वाढतच आहे. शनिवारी (दि. २०) या उपोषणाच्या समथनार्थ शहरातून मोर्चा काढत व्यापारी, व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. शनिवारी सायंकाळी प्रांताधिकारी वासंती माळी यांनी उपोषणस्थळी भेट देत लेखी आश्वासन दिले. यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले असल्याची माहिती समितीकडून दिली आहे.

मनमाड शहराला नेहमीच विकासासाठी झगडावे लागते. विविध योजनांसाठी वाट पाहावी लागते, या सर्व बाबींना या उपोषणाने वाचा फोडली आहे, अशी भावना मनमाडकर व्यक्त करीत आहे. शहरात अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे तसेच पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शहराला ग्रॅव्हिटीने पाणी योजना कार्यान्वित करण्यात यावी यासारख्या विविध मागण्याही यात क‌ेल्या आहेत. मनमाड बचाव कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी शहरातून मोर्चा काढून मनमाड शहरात बंद पाळण्यात आला.

व्यापारी महासंघाने दिलेल्या या बंदला शहरातील विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था तसेच शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला. मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरील दुकाने बंद होती. व्यापारी महासंघाचे राजाभाऊ पारीक, राजकमल पांडे, उद्योजक अजित सुराणा आदींच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी मनमाड बंदचा निर्णय घेण्यात आला होता. त्यास उत्स्फूर्त पाठिंबा देत व्यापारी, व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत आंदोलनाची धार अधिकच वाढवली.

गेल्या चार दिवसांपासून बचाव समितीचे सहा कार्यकर्ते उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली तरी उपोषणाची दखल घेतली गेली नसल्याचा संताप बचाव समिती पदाधिकारी अशोक परदेशी यांनी व्यक्त केला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. नागरिकांनी मोर्चा काढून सरकारविषयीच्या रोषाला वाट करून दिली.

रुग्णसेवा सुरू

मनमाड बंदमध्ये शहरातील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चा असेपर्यंत दवाखाने बंद ठेवण्यात आले. मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नंतर रुग्णसेवा सुरू करण्यात आली. सायंकाळी शहरातील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. मनमाड बचावचे आंदोलन योग्य मागण्यांसाठी असून या आंदोलनाकडे सर्वांनी सकारात्मकतेने पाहावे, असे आवाहन लायन्स क्लबचे शहराध्यक्ष डॉ. प्रताप गुजराथी यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कांदा उत्पादकांना तत्काळ मदत द्या’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

सध्या कांद्यास मिळणारा सरासरी भाव अत्यंत कमी असल्याने कांदा उत्पादकांना उत्पादन खर्च देखील मिळत नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने तांतडीने कांदा उत्पादकांना मदत करावी, अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे.

सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या बाजार आवारांवर उन्हाळ कांद्याची विक्री होत असून, एकट्या लासलगाव बाजार समितीत दररोज साधारणतः १५ ते २० हजार क्विंटल कांदा विक्रीस येत आहे. यंदा वर्षी कमी पाऊस व पोषक हवामानामुळे येथील शेतकऱ्यांनी ऊस व गहु या पिकाखालील क्षेत्र कमी करून उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. मात्र सध्या सदरच्या कांद्यास कमीत कमी २०० आणि जास्तीतजास्त ७९० व सरासरी ६०० प्रती क्विंटलप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी केंद्र व राज्य सरकारने तांतडीने उपाययोजना करावी अशी मागणी होळकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्या विजयात पवनचा वाटा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपण अपक्ष नगरसेवक पवन पवारची भेट घेतली व त्यांना मदत करण्याची गळ घातली. पवन पवार यांनीही आपल्याला निवडणुकीत मदत केली असून, माझ्या विजयात त्यांचा मोठा वाटा असल्याची मुक्ताफळे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी उधळली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पवन पवारमुळेच आपण निवडून आल्याचा खुलासा सानप यांनी केल्याने भाजपचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. दुसरीकडे या प्रवेशाने भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, तर जनमतानंतरच पवारला पक्षात घेतल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

नाशिकरोड येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व पोलिस हत्येतील प्रमुख आरोपी पवन पवार याला भाजपने शुक्रवारी शाही थाटात पक्षात प्रवेश दिला आहे. पवार याच्या प्रवेशाने भाजपमधीलच नेत्यांसह अन्य पक्षांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपने थेट गुन्हेगारालाच का पक्षात घेतले, याचे उत्तरही आमदार व शहराध्यक्ष सानप यांनी याच सभेत दिले. विधानसभा निवडणूक आपण पवन पवारच्या मदतीनेच जिंकल्याचा खुलासा त्यांनी या वेळी केली. महापालिकेत आम्ही एकत्र असल्याने मी त्यांना निवडणुकीत गळ घातली होती. पवन माझा मित्र असून, त्यांना एकत्रित काम करण्याचे आश्वासन मी दिले होते. त्यांनी मला मदत केली. माझ्या विजयात त्यांचा मोठा वाटा असल्याची कबुली त्यांनी दिल्याने भाजपच्या नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी व शिवसेनेने भाजपवर या प्रवेशामुळे टीकेची झोड उठवली असून, भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोप शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांनी केला आहे. टीकेनंतर पक्षाने मात्र सावरासावर सुरू केली आहे. पक्षवाढीसाठी व जनमत घेऊनच पवारला पक्षात घेतल्याचा दावा प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केला आहे.

प्रवेश अंगलट?

पवनचा प्रवेश भाजप नेत्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. प्रदेश पातळीवर या प्रवेशाची गंभीर दखल घेण्यात आली असून, माध्यमांमधील बातम्यांनंतर स्थानिक नेत्यांकडे खुलासा मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, थेट पालकमंत्र्यांनाच विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रवेशामुळे भाजपची डागाळलेली प्रतिमा सावरण्यासाठी थेट वरिष्ठ पातळीवरच धावपळ सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणाचा इशारा देणारे आमदार बालीश!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मराठवाड्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची बुद्धी बालीश असून, त्यांची बुद्धी तपासावी लागेल, अशी सणसणीत टीका राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नाशिक येथे रविवारी व्यक्त केली.

नाशिकचे पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात यावे या मागणीसाठी मराठवाड्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी ऐन पावसाळ्यात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रा. शिंदे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. नाशिक विभागाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या विभागीय आढावा बैठकीसाठी ते येथे आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात ५० गावांना पाणीटंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शिंदखेडा तालुक्यात तर परिस्थिती बिकट आहे. जिल्ह्यातील ५० गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने ५८ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आणखी तीन गावांना टँकरचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील टंचाईग्रस्त ५० गावांसाठी एकूण ५८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याच तालुक्यात सद्यस्थितीत गोराणे, वारूड, पथारे या गावांना टँकर सुरू करण्यात आले आहेत. भडणे, झिरवे आणि वायपूर या तीन गावांनी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे दिले आहेत. जिल्ह्यात एकूण ३९ मंडळ आहेत. धुळे तालुक्यात आतापर्यत ७२.५ टक्के, साक्री तालुक्यात १३८.४ टक्के, शिरपूर तालुक्यात ६७.०१ टक्के आणि शिंदखेडा तालुक्यात केवळ ५७ टक्के पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षांतराच्या चर्चेला इगतपुरीत उधाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,घोटी

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व पक्षांतर्गत गटबाजीचा धोका ओळखून अनेक पदाधिकारी पक्षांतर करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्या दृष्टीने एका राजकीय पक्षात चलबिचल सुरू असून, पक्षांतर्गत बैठकांवर बैठका सुरू असल्याचे वृत्त आहे. या पक्षांतराच्या भूमिकेमुळे तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पक्षांतर करणारे ते पदाधिकारी कोण? याबाबत खमंग चर्चा सुरू असून, प्राधान्यक्रमाने नावे घेतली जात आहेत. अनेकजन शिवबंधन करून घेणार असल्याची चर्चा आहे.

इगतपुरी तालुक्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षात गटबाजी असून, या गटबाजीने पक्षांतर दुफळ्या व मतभेदाने डोके वर काढले आहे. निवडणुकाजवळ आल्या की नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आवक-जावक सुरू होते. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने अनेकांना या पदाकडे लक्ष लागले आहेत. गटागणातील आरक्षण ग्राह्य धरून काही नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे. गट आपला आहे, उमेदवारीही मिळेल, परंतु गटबाजीचा धोका अनेकांना जाणवू लागल्याने पक्षांतराच्या दिशेने काही स्थानिक नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे. अनेक नेत्यांनी पक्षांतर करण्याच्या दृष्टीने शिवसेनेला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात पक्षांतर कारणाऱ्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. पक्षांतराची ही वार्ता संपूर्ण तालुक्यात पसरली असून कोण सदस्य, कोणत्या पक्षाचे पदाधिकारी व कोणत्या पक्षाचे नेते प्रवेश करणार अशी चर्चा इगतपुरी तालुक्यात होत आहे.

अफवांना ऊत

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अद्याप आरक्षण जाहीर झाले नसले तरी आपला गट व आपल्या गणाची उमेदवारी गृहित धरून काहींनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काहींनी विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी गटाचे व गणाचे आरक्षण बदलणार असल्याच्या अफवाही पसरवल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शाडूच्या गणेशमूर्तींची व्हावी स्थापना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत चाललेला ऱ्हास आणि त्यामुळे होणारे प्रदूषण हानिकारक ठरत आहे. त्यामुळे विविध सण साजरे करताना पर्यावरण संवर्धन गरजेचे झाले आहे. गणेशोत्सवातही प्रत्येकाने आपल्या घरात शाडूच्या मातीची गणेशमूर्ती स्थापन करावी, असे आवाहन नाशिक जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष द. वा. मुळे यांनी केले.

भगूरला नूतन प्राथमिक विद्यामंदिरात शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक ल. चं. जोशी, श. रा. वैद्य, के. डी. वाघ आदी उपस्थित होते. या उपक्रमात सुमारे १७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील गणेशमूर्ती स्वतःच्या हाताने बनविण्याचा

संकल्प केला होता. कार्यशाळेत मूर्तिकला प्रशिक्षक संदीप गायकवाड, विशाल शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या गणपतीचा आकार, बोटे, मूर्ती पूर्ण करण्याकामी लागणारे कौशल्य याविषयी प्रशिक्षण दिले.

या शाळेत ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी शिकत असून, त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी काही वर्षांपासून येथे गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात येते.

- विशाल शिरसाठ, प्रशिक्षक

--

आमच्या हाताने घडवलेली गणेशमूर्ती घरात बसविण्यासाठी आम्ही शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा प्रयत्न केला. शाळेतील उपक्रमात आम्हाला त्याचे प्रशिक्षण मिळाले.

- ऋषिकेश गायकवाड, विद्यार्थी

--

प्रदूषण टाळून पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्वहस्ते बनविण्याचा व तो घरात स्थापन करण्याकरिता कलाशिक्षक प्रोत्साहन देतात. प्रशिक्षणामुळे आम्ही गणेशमूर्तीला आकार देऊ शकलो.

- साक्षी दळवी, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सद्‍गुणांपेक्षा दुर्गुणांचेच प्राबल्य जास्त’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सध्या समाजात सद्‍गुणांपेक्ष ादुर्गुणांचेच जास्त प्राबल्य असून, ही विकृती दूर करण्याचे मोठे आव्हान आजच्या तरुणाईसमोर आहे. त्यासाठी आत्मविश्वास व प्रामाणिकपणा ठेवून व्यापक लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मनमाड येथे केले.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील अमृत मित्रपरिवारातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर चांदवड येथील शहीद वीरपुत्र शंकर शिंदे याचे पिता चंद्रभान शिंदे, महाराष्ट्र बार कौन्सिलचे पदाधिकारी अॅड. जयंत जायभावे, पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, उद्योगपती संपत सुराणा, माजी नगराध्यक्ष डॉ. सी. एच. बागरेचा, अमृत पतसंस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, सचिव के. के. गुंदेचा, संजय चोपडा आदी उपस्थित होते.

अॅड. उज्ज्वल निकम यांनी बदललेली समाजव्यवस्था व भरकटलेल्या तरूण पिढीबाबत चिंता व्यक्त केली. देशाचे भावी आधारस्तंभ आज व्हॉट्स अॅप व फेसबुकमध्ये रममाण आहेत. विकृतीला बळी न पडता देशाच्या तरुणवर्गाने वेळीच सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. महिलावर्गाने टीव्ही मालिकांच्या जास्त आहारी जाऊ नये. ते घातक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

उद्योजक अजित सुराणा यांनी अमृत मित्रपरिवारातर्फे उपस्थितांचे स्वागत केले. संदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक व अॅड. निकम यांचा परिचय करून दिला. पोपट सुराणा यांचा फेडरेशन निवडीबद्दल गौरव करण्यात आला. डॉ. सुनील बागरेचा व कल्पेश बेदमुथा यांनी सूत्रसंचालन केले. शांतीलाल गांधी यांनी आभार मानले. कलाशिक्षक सचिन बिडवे यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने उपस्थितांची दाद मिळवली. मनमाड येथील शुभम लोढा हत्याकांडाची आठवण अॅड. उज्ज्वल निकम यांनी ताजी केली.

ग्रंथालयाचे उद्घाटन

मनमाड न्यायालयात बार कौन्सिलच्या ग्रंथालयाचे उद्घाटन अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांचा विशेष सत्कार न्यायाधीश स्वाती फुलबांधे, न्यायाधीश टेकवाने, अॅड. जयंत जायभावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अॅड. व्ही. एम. कासार, अॅड. सुधाकर मोरे, अॅड. सुभाष डमरे, अॅड. किशोर सोनवणे, अॅड. किशीर चोरडिया आदी उपस्थित होते. मनमाड वकील संघाचे तरूण सदस्य अॅड. विशाल देशमुख यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर परिसरातील राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर भागात राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने कामानिमित्त आलेल्या कामगारांचे जाळे पसरलेले आहे. कामगार वस्तीचा शांत भाग म्हणून ओळख असलेल्या सातपूरला अलीकडे गुन्हेगारीचे गालबोट लागत आहे. सातपूर परिसरातील राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण लागले असून, येथील वाढत्या राजकीय गुन्हेगारीला आळा कोण घालणार, असा सवाल कामगारवर्गातून उपस्थित केला जात आहे. सातपूरच्या राजकारणात गुन्हेगारीचा नवा अध्याय सुरू झाला असल्याचे मतही अनेकडून व्यक्त केले जात आहे.

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नगरसेवक प्रकाश लोंढे व नगरसेविका सविता काळे यांचे पती रवी काळे यांच्यावर तडीपार होण्याची वेळ आली होती. दोघेही अनेक गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली होती. दोघांची तडीपारी संपल्यानंतर सारेकाही आलबेल असल्याचे वातावरण सातपूर भागात होते. अशातच ३१ डिसेंबर २०१५ च्या मध्यरात्री दोन सराईत गुन्हेगारांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना नगरसेवक लोंढे यांच्या कार्यालयात घडली. त्यानंतर या हत्येत सहभागी असल्याचा आरोप असलेला नगरसेवकपुत्र भूषण लोंढे आपल्या सहकाऱ्यांसह फरार झाला होता. न्यायालयातून लोंढे यांनी त्याच्या लग्नासाठी जामीन मंजूर करून आणल्यावर पोलिसांसमोरच लग्न करून भूषणने पोबारा केला होता. त्याचा शोध पोलिस घेत असतानाच याच गुन्ह्यातील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांना नगरसेवक प्रकाश लोंढे मद्य पुरवत असल्याचे समोर आले. पोलिस हवालदाराने हटकले असता नगरसेवक लोंढे यांनी अॅक्ट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नगरसेवक लोंढेवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारवाडा पोलिसांकडून अटक होणार हे बघताच नगरसेवक लोंढेदेखील फरार झाले होते. त्यानंतर न्यायालयातून जामीन मिळविण्यात लोंढे यांना अपयश आल्याने अखेर ते पोलिसांच्या स्वाधीन झाले होते. नुकताच लोंढे यांचा फरार मुलगा भूषण हादेखील पुण्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

दरम्यान, महिरावणी गावातदेखील नगरसेविकेचे पती गोकुळ नागरे व त्यांच्या नातेवाईकांमध्ये जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव लावण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी गावठी कट्ट्यातून एकाने हवेत गोळीबारदेखील केला होता. अनेक दिवस नागरे यांचे प्रकरण सातपूर भागात गाजले होते. त्यानंतर हे सर्व प्रकरण शांत होत असताना आता पुन्हा नगरसेविकापुत्र धीरज शेळके हे कोट्यवधी रुपयांच्या अपहरण प्रकरणात संशयित आरोपी ठरले आहेत. धीरजवर भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, उपायुक्त श्रीकांत पाटील, निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी शेळके यांचे कार्यालय व घराची झडती घेतली.


वाहनांना केले लक्ष्य

अपहरणाचा प्रकार घडल्यानंतर सातपूर कॉलनीत तब्बल ११ चारचाकी वाहनांच्या काचा समाजकंटकांकडून फोडण्यात आल्या. त्यामुळे परिसरातील वाढती राजकीय गुन्हेगारी रोखणार कोण, असा सवाल सातपूरमधील कामगारवर्ग उपस्थित करीत आहे. समाजकार्यासाठी आंदोलन करणाऱ्या राजकीय नेत्यांकडून व त्यांच्या निकटवर्तीयांकडून वैयक्तिक स्वार्थीसाठी गुन्हे घडत असल्याने राजकीय गुन्हेगारीचा नवा अध्याय सुरू झाला असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे. या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजनांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिलापूरची इलेक्ट्रिकल लॅब दृष्टीपथात

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिलापूर येथे प्रस्तावित असलेली केंद्रीय इलेक्ट्रिकल लॅब दृष्टिपथात आली असून लॅबसाठी आवश्यक जागेचे हस्तांतरण करण्यात आले आहे. केंद्रीय अनुसंधान संस्थेने (सीपीआरआय) या लॅबसाठी आर्थिक तरतूदही केली असून, येत्या काही महिन्यांतच या लॅबचे काम सुरू होण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या 'सीपीआरआय'च्यावतीने देशात विविध ठिकाणी लॅब स्थापन करण्यात आल्या आहेत. या लॅबद्वारे ठिकठिकाणी उत्पादित होणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच साहित्य यांची तपासणी केली जाते. भारतातील ऊर्जा क्षेत्राशी संबंधित तब्बल ३० टक्के इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे महाराष्ट्र आणि सेल्वासा येथे तयार होतात. पण, याठिकाणी उपकरणांच्या तपासणीची लॅब नसल्याने ती भोपाळ, हैदराबाद, नवी दिल्ली, बंगळूरू येथे पाठवावी लागतात. परिणामी वेळ आणि पैशाचा यातून मोठा अपव्यय होतो. 'सीपीआरआय'ची लॅब नाशिकमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार बाराव्या योजनेतील अनुदानातून पश्चिम भारतातील लॅब नाशिक जवळील शिलापूर येथे साकारण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या लॅबचा विषय अधांतरीच होता. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार ऊर्जा मंत्रालयाच्या अर्थ समितीने ही लॅब साकारण्यासाठी आवश्यक ११५.३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तसेच, औरंगाबाद हायवेवरील शिलापूर शिवारातील सर्वे नंबर २२० मधील १५० एकर जागा महसूल विभागाने 'सीपीआरआय'कडे हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे जागेसह निधीचाही प्रश्न सुटला आहे. काही दिवसांपूर्वीच 'सीपीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी नाशकात येऊन जागेची पाहणी केली आहे. या लॅबचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे. एकूण १,३६९ कोटी रुपये लॅबसाठी खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ११५ कोटी मंजूर झाले असून या निधीतील काम येत्या काही महिन्यातच सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

लॅबचा फायदाच फायदा
इलेक्ट्रिकल लॅबमुळे नाशिकसह राज्याच्या विविध भागातील इलेक्ट्रिकल उत्पादने तपासणीसाठी नाशिकला येतील. शहर परिसरातील इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांना या लॅबमध्ये संशोधन, अभ्यास करता येईल. लॅब नाशकात असल्याने अन्य मोठे, मध्यम आणि लघु इलेक्ट्रॉनिक उद्योग नाशकात येऊ शकणार आहेत. परिणामी, गुंतवणूक, रोजगार निर्मिती या दृष्टीनेही लॅबचे फायदेच फायदे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी आला शेतकऱ्यांच्या दारी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

राज्य सरकारने भाजीपाला आणि फळे हा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणातून बाहेर काढण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी अाडत बंद झाली. अाडत व्यापाऱ्यांकडून वसूल केली जाऊ लागल्यामुळे व्यापारी थेट शेतीबांधावर जाऊन खरेदी करू लागले आहेत. व्यापाऱ्यांच्या शिवार खरेदीमुळे कृषी बाजार समितीच्या आवारात भाजीपाला आणि फळांची आवक कमी होऊ लागली आहे.

खरीपाच्या हंगामात भाजीपाल्याच्या लागवड मोठ्या प्रमाणात होते. हा भाजीपाला ऑगस्टपासून बाजारात येत असल्याने या काळात बाजार समितीच्या आवारात सुमारे बारा हजार ते पंधरा हजार क्रेट फळभाज्यांची आवक होते. सध्याचे फक्त पाच ते सात हजार क्रेट फळ भाज्यांची आवक होऊ लागली आहे. भाजीपाल्याच्या मुख्य हंगामात या अगोदर अशी स्थिती कधी निर्माण झाली नसल्याचे चर्चा बाजार समितीत सध्या सुरू आहे.

शेतकऱ्यांकडून लिलाव पद्धतीने शेतमाल खरेदी केल्यावर बाजार समितीचा अधिभार लावला जायचा. त्याशिवाय मापाई, तोलाई, हमाली असे वेगवेगळे शुल्क आकारले जायचे. शेतकऱ्यांनी माल विकल्यावर त्यांच्या बिलांमधून हे पैसे द्यावे लागत होते. हे प्रकार सरकारच्या ताज्या आदेशामुळे बंद झाले. मात्र, व्यापाऱ्यांना अडत द्यावी लागल्याने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून बाजार समिती लिलावात शेतकऱ्यांना कधीच चढे दर मिळाले नाही. ज्या काळात शेतमालाची आवक कमी होती. त्यावेळीही भाजीपाल्याचे भाव कडाडले नाहीत.

मुंबईला थेट विक्री
सध्या कोबी आणि फ्लॉवर यांची तसेच पालेभाज्यांची शिवार खरेदी वाढली आहे. निफाड तालुक्यात गावांच्या शिवारात थेट भाजीपाला खरेदी करून त्याचे पॅकिंग करून मुंबईच्या किंवा गुजरातच्या बाजारपेठेत पाठविला जात आहे. या खरेदीत शेतकऱ्याला बाजारभावाचा अंदाज येत नाही अशी चर्चा बाजार समितीत होऊ लागली आहे. मात्र, शेतापासून बाजार समितीच्या आवारापर्यंत येणारा वाहतूक खर्च आणि जाणारा वेळ याचा विचार करता शिवार खरेदी शेतकऱ्याच्या हिताचीच ठरणार असल्याचेही मत काही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मुसळधार पावसाचाही फटका
मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या भागातील पिके पाण्याखाली गेली. बहुतांशी शेतांमध्ये पाणी साचल्याने तेथील पिके विशेषतः भाजीपाल्याची पिके सडून जाण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे भाजीपाल्यांचे आणि नव्याने लागवडीसाठी तयार होत असलेल्या रोपांचे नुकसाना झाल्याने या लागवडी लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची आवक वाढण्याची शक्यता नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images