Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भुजबळांच्या घबाडाची एसीबीकडून मोजदाद!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत दिवसेंदिवस भर पडते आहे. भुजबळांचे नाशिकमधील भुजबळ फॉर्महाऊस जप्त करण्याची तयारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)ने चालवली आहे. सोमवारी मुंबईहून आलेल्या विशेष पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)च्या मदतीने भुजबळ फार्महाऊसमधील आलिशान तीन महलांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली. एसीबीच्या पाच विशेष पथकांसह पीडब्ल्यूडीचे अधिकारी, आर्किटेक्ट, अभियंते आदिंच्या मदतीने सकाळपासूनच भुजबळांच्या महलांसह विदेशातून आणलेल्या कलाकृतींची मोजदाद केली. ही कारवाई आणखी दोन दिवस चालणार असल्याचे समजते.

गेले दशकभर नाशिकमधील राजकीय घडामोंडीचे केंद्र असलेले भुजबळ फार्महाऊस या कारवाईने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मनी लँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालया (ईडी)ने गेल्याच आठवड्यात छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील भुजबळ फार्मसह २२ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यातच सोमवारी मुंबईहून आलेल्या एसीबीच्या पाच पथकांनी अचानकपणे भुजबळ फार्मवर छापा घातला. त्यामुळे भुजबळ फार्महाऊस जप्तीची कारवाई `ईडी`ने सुरू केल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. भुजबळांवर बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी एसीबीकडे गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर एसीबीने राज्य सरकारकडे भुजबळ फार्महाऊसच्या मूल्यांकनाची मागणी केली होती. राज्य सरकारने एसीबीला या फार्महाऊसचे मूल्यांकन करून देण्याचे आदेश पीडब्ल्यूडीला दिले होते. त्यानुसार या विस्तीर्ण आलिशान महलांचे मूल्यांकन चालवले आहे.

मुंबई-आग्रा हायवेवर तब्बल दहा एकर जागेत असलेल्या आलिशान फार्महाऊसची रचना बघून एसीबीचे अधिकारीही चक्रावले असल्याचे समजते. साडेतीन एकरवरील भुजबळांचा चंद्राई हा बंगला सोडून उर्वरित साडेसहा एकरवर उभारलेल्या विस्तीर्ण दोन आलिशान महलांची तपासणी या पथकांनी सुरू केली आहे. या अलिशान महलासाठी वापरलेले साहित्य, सागवान लाकूड, विदेशातील शिल्प, पेंटिंग्ज, स्वीमिंग पूल, जीम, टेनिस कोर्टसह देश-विदेशातून आयात केलेल्या महागड्या वस्तुंचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू आहे. टेपमीटरसह विविध साधने वापरून या संपूर्ण महलांची मोजदाद दिवसभर सुरू होती. महलांची रेडिरेकनरनुसार सध्याची किंमत काढण्याचा प्रयत्न केला. समीर भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या नावे हे महल असून, त्यांचे कागदोपत्री दाखवलेले मूल्य व प्रत्यक्षात बाजारभावातील मूल्यात मोठी तफावत असल्याचे दिसत आहे.

मफलर अन् बुटांचीही गणती

भुजबळ फार्महाऊसमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या महलांमध्ये देशविदेशातील अत्यंत दुर्मिळ अशा महागड्या वस्तू वापरण्यात आल्या आहेत. त्यांची प्रत्यक्ष दाखवलेली किंमत आणि बाजारभावातील किंमत यात मोठी तफावत असल्याने या महलांची इंच न इंच मोजदाद केली जात आहे. लाकूड, शिल्प, विविध पेंटिंग, फर्निचर, शोभेच्या वस्तुंसह बांधकाम केलेल्या वस्तुंची मोजदाद सुरू आहे. विशेष म्हणजे या महलांमधील भुजबळ कुटुंबियांकडून वापरण्यात येणारे कपडे, चादरी, गालिचे, मफलर तसेच बुटांपासून ते सॉक्सपर्यंतची मोजदाद या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

दगड, मातीसाठी विशेष तज्ज्ञ

नव्या पॅलेससाठी वापरलेले लाकूड, माती व दगडांचे मूल्य शोधण्यासाठी विशेष तज्ञांची मदत घेण्यात आली आहे. या बंगल्यात वापरलेले लाकडू हे विदेशातील आहे. तर मातीही विशिष्ट कलरची आहे. दगडही वेगवेगळ्या आकाराची असल्याने हे सर्व परदेशातून आणल्याचा पथकाला संशय आहे. त्यामुळे लाकूड, माती व दगडांच्या तपासणीसाठी कृषी विभागाचे अधिकारी व तज्ञांना सायंकाळी बंगल्यात बोलविण्यात आले. त्यांच्याकडून या चिजवस्तुंची किंमत काढली जात आहे.

तीन दिवस चालणार कारवाई

एसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यत ही कारवाई सुरू होती. या फार्महाऊसमध्ये देशी व विदेशी वस्तुंची संख्या अधिक आहे. तसेच परिसरही बराच मोठा आहे. त्यामुळे एका दिवसात मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे सोमवारी नव्या महलांची तपासणी रात्रीपर्यंत सुरू होती. तर ही कारवाई अजून दोन ते तीन दिवस चालणार आहे. भुजबळांच्या चंद्राई या बंगल्याचीही मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर आर्मस्ट्राँग कंपनीच्या प्रकल्पांचीही मोजणी केली जाणार आहे.

जप्तीची अफवा

एसीबीच्या पथकांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे भुजबळांचे घर `ईडी`ने जप्त केल्याची माहिती शहरात पसरली. गेले दहा वर्षे नाशिमधील राजकीय घडामोंडीचे केंद्र असलेले भुजबळांचे घर जप्त होत असल्याची अफवा पसरताच ते पाहण्यासाठी नाशिककरांचीही मोठी गर्दी या परिसरात झाली होती. या परिसरात `एसीबी`च्या गाड्यांची संख्या व हालचाल बघून बघ्यांनी मात्र लांब राहणेच पंसत केले. भुजबळांच्या वकिलांनी मात्र ही जप्ती नव्हे तर मालमत्तेचे मूल्यांकन केले जात असल्याचा दावा केला.

''एसीबीने भुजबळ फार्महाऊसच्या मूल्यांकनाचा अर्ज राज्य सरकारकडे केला होता. त्याला सरकारने मंजुरी दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या मदतीने येथील मालमत्तेचे मूल्यांकन केले जात आहे. जप्ती संदर्भात कोणतीही नोटीस अथवा कागदपत्रे आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत.'' - अॅड. जालिंदर ताडगे, भुजबळांचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात चार चेनस्नॅचर जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील धूमस्टाइल चोऱ्यांमागील मोठी टोळी उघडकीस आणण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आले. नागरिकांच्या दक्षतेमुळे पकडलेल्या दोघा चोरट्यांच्या चौकशीतून तब्बल १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, तसेच इतर गावातील चार चोरट्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १७६ ग्रॅम सोने वजनाचे पाच लाखांचे १५ मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. ही सर्व मंगळसूत्रे महिलांना जिल्हा पोलिस प्रमुख चैतन्य एस. यांच्याहस्ते परत करण्यात आली.

'जिल्ह्यातील गुन्हेगारीसह कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. त्यावर पोलिस दल योग्य काम करीत आहे', अशा शब्दांत पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी निर्धार व्यक्त केला. शहरात गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याच्या साखळ्या हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. याविषयी अनेक गुन्हे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल होते.

यावर वचक बसवण्यासाठी एक पथक तयार करून शहरासह जिल्हाभरात चोरट्यांची शोध मोहीम राबविली. यात पोलिस व महिलांच्या दक्षतामुळे पोलिस मुख्यालयाजवळ दोन चोरट्यांना धूमस्टाइल चोरी करताना पथकाने पकडले. या चोरट्यांकडून अनेक गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. या पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव, पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपी पकडले असून, त्यात विक्की उर्फ समाधान कैलास कोळी (रा. चोपडा, जि. जळगाव), भरत श्रीराम कोळी (रा. चोपडा, जि. जळगाव), विजय भागवत पाटील (रा. खडकी, ता. चाळीसगाव), अन्य एक यांच्याकडून सोनसाखळी हस्तगत करून महिलांना परत करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकुल’ची उलटतपासणी पूर्ण

0
0

माफीच्या साक्षीदार सिंधू कोल्हेंना सरतपासणीसाठी समन्स
म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव घरकुल घोटाळ्याचा तपास करणारे तत्कालीन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांची उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर कोणतेही महत्त्वाचे साक्षीदार नसल्याने या प्रकरणात माफीच्या साक्षीदार सिंधूताई कोल्हे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत समन्स काढण्यात आला आहे. त्या बुधवारी (दि. २४) न्यायालयात उपस्थित राहिल्यास त्याची सरकार पक्षाकडून सरतपासणी होण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणातील सर्व साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात येत आहे. त्याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे जिल्हा विशेष न्यायालयात दररोज कामकाज चालविले जात आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांची १५ जुलैपासून साक्षी नोंदविण्याला सुरुवात झाली. ही सरतपासणी व उलटतपासणीची प्रक्रिया एक महिन्यापेक्षा अधिक काळ चालली.

या प्रकारणातील सर्व साक्षीदार संपल्याने माफीच्या साक्षीदार झालेल्या सिंधू कोल्हे यांना न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत न्यायालयाकडून समन्स काढण्यात आला. त्यानुसार त्या बुधवारी (दि. २४) उपस्थित राहिल्यास सरकार पक्षाकडून त्याची साक्ष नोंदविली जाईल. अन्यथा न्यायालयात अन्य कामकाज होऊ शकते. माफीच्या साक्षीदारांच्या उपस्थितीबाबत आणि त्यांच्या साक्षीबाबत मोठी उत्सुकता असून, त्यांच्याकडून या खटल्याबाबत महत्त्वाची माहिती न्यायालयात दिली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात चार चेनस्नॅचर जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील धूमस्टाइल चोऱ्यांमागील मोठी टोळी उघडकीस आणण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आले. नागरिकांच्या दक्षतेमुळे पकडलेल्या दोघा चोरट्यांच्या चौकशीतून तब्बल १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, तसेच इतर गावातील चार चोरट्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १७६ ग्रॅम सोने वजनाचे पाच लाखांचे १५ मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. ही सर्व मंगळसूत्रे महिलांना जिल्हा पोलिस प्रमुख चैतन्य एस. यांच्याहस्ते परत करण्यात आली.

'जिल्ह्यातील गुन्हेगारीसह कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. त्यावर पोलिस दल योग्य काम करीत आहे', अशा शब्दांत पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी निर्धार व्यक्त केला. शहरात गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याच्या साखळ्या हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. याविषयी अनेक गुन्हे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल होते.

यावर वचक बसवण्यासाठी एक पथक तयार करून शहरासह जिल्हाभरात चोरट्यांची शोध मोहीम राबविली. यात पोलिस व महिलांच्या दक्षतामुळे पोलिस मुख्यालयाजवळ दोन चोरट्यांना धूमस्टाइल चोरी करताना पथकाने पकडले. या चोरट्यांकडून अनेक गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. या पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव, पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपी पकडले असून, त्यात विक्की उर्फ समाधान कैलास कोळी (रा. चोपडा, जि. जळगाव), भरत श्रीराम कोळी (रा. चोपडा, जि. जळगाव), विजय भागवत पाटील (रा. खडकी, ता. चाळीसगाव), अन्य एक यांच्याकडून सोनसाखळी हस्तगत करून महिलांना परत करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् बाजार भरलाच नाही...

0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदाकाठी मंगळवारी भाजीबाजार भरलाच नाही. दिवसभर भाजीविक्रेते गटागटाने या भागात बसून होते. त्यांना भाजीपाल्याचे दुकाने मांडण्यास महापालिकेने मनाई केली होती. त्यांनी तसा प्रयत्न केल्यास भाज्या आणि विक्रीचे साहित्य उचलून नेण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी सतर्क होते. दिवसभर अतिक्रमण विभागाच्या गाड्या गोदाकाठवरील मैदानावर थांबलेल्या होत्या.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदाकाठ परिसर मोकळा करण्यासाठी येथील भाजीबाजाराची जागा खाली करून घेण्यात आली होती. तीन मुख्य शाहीस्नानाच्या पर्वणी आटोपल्यापासून या ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी भाजीबाजार सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, महापालिकेने विरोध ठेवल्याने त्यांना शक्य झाले नाही. सिंहस्थ पर्वाच्या ध्वजावतरण झाल्यानंतर दहा दिवसांनी रविवारच्या सुट्टीच्या दिवसाचा फायदा घेऊन काही भाजीविक्रेत्यांनी गंगाघाटावर भाजीबाजार मांडण्याचा प्रयत्न केला. सोमवारी विक्रेत्यांची गर्दी वाढली. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी भाजीबाजार खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मंगळवारी सकाळपासूनच महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभागाने या भागात सतर्क राहिल्याने भाजी विक्रेत्यांना दुकाने मांडण्याची संधी मिळाली नाही. पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तीन गाड्या घेऊन या ठिकाणी थांबून होते. भाजी विक्रेते या ठिकाणी जमा झाले. मात्र त्यांनी भाजीची दुकाने न लावता दिवसभर गटागटाने बसून राहिले. एका बाजूला विक्रेते बसले होते तर दुसऱ्या बाजूला अतिक्रमण विभागाचे कर्मचारी थांबून होते. हे चित्र सायंकाळपर्यंत तसेच होते. सायंकाळी पावसाच्या सरी आल्यानंतर विक्रेत्यांनी या जागेवरून काढता पाय घेतला. तर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी गाड्यांमध्ये सायंकाळपर्यंत बसून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांचा भर आता चौकसभांवर

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महापालिकेच्या जेलरोड येथील पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मतदारांच्या गाठीभेटीनंतर आता उमेदवारांनी चौकसभांवर भर दिला आहे. मॉडेल कालनी, इंगळेनगर, टाकेककर वसाहत, झोपडपट्टी आदी ठिकाणी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे.

जेलरोड येथील प्रभाग ३५ आणि ३६ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही प्रभागात प्रत्येकी चार उमेदवार असल्याने प्रचारात चुरस आली आहे. उमेदवारांनी प्रचाराची तिसरी फेरी संपवली असून त्यात त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना मतदानाचे आवाहन करतानाच आपणच भावी योग्य नगरसेवक कसे आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. जाहीर प्रचाराची अंतिम तारीख २६ ऑगस्ट आहे. त्यामुळे तीनच दिवस राहिल्याने उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनबरोबरच चौक सभांवर भर दिला आहे. प्रभागात कोणती विकास कामे करणार हे ते सांगत आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक तंबूत तळ ठोकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआयच्या ३५० विद्यार्थ्यांना नोकरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

आयटीआय पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी भटकंती करावी लागू नये यासाठी कंपन्यांकडूनच आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय रोजगार मेळाव्यात तब्बल ३५० विद्यार्थ्यांना नोकऱ्या प्राप्त झाल्याचे सातपूर 'आयटीआय'चे प्राचार्य डी. एस. जाधव यांनी 'मटा'ला सांगितले. येत्या सोमवारी (दि. २९) पुन्हा रोजगार मेळावा होणार आहे. आयटीआय पास झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सातपूर एमआयडीसी परिसरातील आयटीआयच्या शासकीय वसतिगृहाच्या सभागृहात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात दोन दिवस मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यापूर्वी, २२ ऑगस्ट रोजी झालेल्या मेळाव्यात ५० विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला होता. २३ ऑगस्टला झालेल्या रोजगार मेळाव्यात १०० विद्यार्थांना नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत. रोजगार मेळाव्यासाठी महिंद्रा सिआयसी ऑटोमोबाइल लिमिटेड, साळुंखे इंडस्ट्रीज, मुंगी ब्रदर्स, किर्लोस्कर इंजिनीअरिंग व स्टारलाइट आदी कंपन्यांनी सहभाग घेतला होता. रोजगार मेळाव्यासाठी ५०० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. यात ३५० विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेत त्यांच्या ज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली. आयटीआयचे एस. के. जाधव व व्ही. के. वाघ यांनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना रोजगार मेळाव्यात मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, देवघडे वडनेरच्या हेरिटेज वॉकला!

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवळाली कॅम्पच्या कवेत अन्‌ वालदेवी नदीच्या किनारी वसलेले वडनेर दुमाला म्हणजे नाशिकचा अनोखा वारसाच आहे. प्राचीन मंदिरे अन् देव घडविण्याची परंपरा आजही पुढे घेऊन जाणारे गाव अशी वडनेर दुमालाची ओळख मात्र अनेकांपासून अजूनही अज्ञात असल्यासारखीच आहे. म्हणूनच महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने येत्या रविवारी (दि. २८) वडनेर दुमाला येथे 'मटा हेरिटेज वॉक'चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकहून पाथर्डीमागे अन् देवळालीतून विहितगावमार्गे वडनेर दुमालात जाता येते. ५०० उंबऱ्यांचे गाव निसर्गाच्या कुशीत वसल्याने येथे गाव असेल असे वाटतही नाही. वडनेर दुमालाच्या गावामागे एक मजेशीर अख्यायिका सांगितली जाते. वडनेर म्हणजे वड आणि नेहर म्हणजेच वडांच्या झाडांचा समूह अथवा थापी. नदी किनारीच्या एखाद्या गावात वडाची झाडे जास्त असतील तर ती भूमी उपासकांसाठी आकर्षण ठरते. वडनेरबाबतही हे घडलेले दिसते. वडनेर दुमालाचे मूळ नाव आहे देवघडे वडनेर! गावात प्राचीन काळापासून सोने, चांदीत मूर्ती घडविणारे कलाकार देव घडविण्याचे कार्य आजही मग्न होऊन करताना पहायला मिळतात. गावात सध्या देव घडविणारे गडकर हे एकमेव कुटुंब आहे. ही परंपरा पुढे घेऊन जाणारे रामदास गडकर यांच्याशी संवाद साधण्याची संधीही हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झालेल्यांना मिळणार आहे.

वडनेर दुमालाला होळकर, विंचुरकरांच्या इतिहासाचाही संदर्भ आहे. या घराण्यांकडे दुमाला म्हणजे कर वसुलीचा अधिकार असल्याने गावाला वडनेर दुमाला म्हटले जाऊ लागले. प्राचीन वेगळेपण म्हणजे शंकराची पाच प्राचीन मंदिरे असणारे हे एकमेव गाव असावे. हेमाडपंती शैलीतील दोन मंदिरे अजूनही गावात पाहता येतात. हा वारसा देखील 'मटा'तर्फे आयोज‌ित हेरिटेज वॉकच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. दत्तात्रेय पाळदे व प्रा. रामनाथ रावळ उपस्थितांना गावची माहिती देणार आहेत.

शेवटच्या रविवारी हेरिटेज वॉक
'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मटा' हेरिटेज वॉकचे आयोजन केले जाणार आहे. या माध्यमातून नाशिकच्या ऐतिहासिक पाऊलखुणा, संस्कृती व परंपरांची अनोखी सफर घडविण्याचा मानस असून, नाशिककरांनी यात सहभागी व्हावे.

नावनोंदणी आवश्यक
वडनेर दुमाला गावातील हनुमान मंदिरासमोर रविवारी (दि. २८) सकाळी ८.४५ वा. एकत्रित जमायचे आहे. 'मटा' हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर आपले नाव एसएमएस करावे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : रमेश पडवळ, ८३८००९८१०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुप्रसिध्द खंडवा गजाआड

0
0

एअर गनचा धाक दाखवून करायचा लूट; आणखी एकास अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवयुवकांना एकटे गाठून त्यांना एअर गनचा धाक दाखवून लूट करणारा कुप्रसिध्द रिक्षाचालक खंडवा यास सरकारवाडा पोलिसांनी अखेर जेरबंद केले. खंडावाने चार ते पाच गुन्हे केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे वृध्द व्यक्तीला लुटणाऱ्या अन्य एका रिक्षाचालकास भद्रकाली पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून अटक केली.

नीलेश अशोक सोनवणे उर्फ खंडवा असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक एअर गन, दुचाकी, चार मोबाइल फोन असा मुद्देमाल जप्त केला. काही वर्षांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून त्याने उपनगर, पंचवटी, म्हसरूळ, आडगाव आदी पोलिस स्टेशन हद्दीत मुलांना लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, यश मिळत नव्हते. सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना खंडवाची पक्की खबर मिळाल्याने त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.

दरम्यान, भद्रकाली पोलिसांनी आणखी एका रिक्षाचालकास अटक केली. अनिल छबू जाधव (वय २०) असे संशयिताचे नाव असून, तो सिडकोतील हेडगेवार चौकात राहतो. जाधवने ७ ऑगस्ट रोजी सिडकोतील उत्तमनगर येथे राहणाऱ्या प्रमोद अनंत देशमुख (वय ६६) यांना लुटले होते. घटनेच्या दिवशी नाशिकरोड येथे आपल्या मित्रास भेटण्यासाठी देशमुख गेले होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते शालिमार येथून सिडको येथे जाण्यासाठी ऑटोरिक्षात बसले. संशयित रिक्षाचालकाने वृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी हेरून ही लूट केली. देशमुख यांना रिक्षाचालकाने रात्रीच्या वेळी इकडे तिकडे फिरवून बॉईज टाऊन शाळेच्या आवारात नेले. तेथे अंधाराचा फायदा घेऊन वृध्दास धक्काबुक्की करीत त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी, लिनोव्हा कंपनीचा मोबाइल, मनगटी घड्याळ, ९५० रुपयांची रोकड आणि एटीएम कार्ड असा सुमारे १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात अपहरण आणि लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोलिस नाईक मोजाड, जाचक, मन्सुरी शेख व कैलास शिंदे आदींच्या पथकाने कोपरगाव येथे लपलेल्या जाधवचा माग काढला. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि लुटमारीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

अशी करायचा लूट

तुझ्या मित्रासमवेत भांडण झाले, तू चल असे काहीतरी कारण सांगून एकट्या मुलास रिक्षात बसवून एअर गनचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे, मोबाइल, तसेच सोन्याचे दागिने काढून घेण्याची मोडस खंडवाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांवर जरब बसविणार

0
0

नवे पोलिस आयुक्त सिंघल यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आतापर्यंत आखलेल्या धोरणांना पुढे घेऊन जाणार. आवश्यक तिथे बदल, तंत्रज्ञानाचा वापर करीत गुन्हेगारांवर जरब बसविण्यात येईल, अशी ग्वाही नवनियुक्त पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे सिंघल यांच्याकडे सोपवली.

पदोन्नतीनुसार एस. जगन्नाथन यांच्या बदलीचे आदेश सोमवारी प्राप्त झाले. त्यांच्या जागी आलेल्या सिंघल यांनी आयुक्तलयाचा पदभार मंगळवारी स्वीकारला. गुन्हेगारी राजकीय असो, की इतर ती थोपवण्यासाठी धोरण आवश्यक असते. असे धोरण यापूर्वीच आखण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नाशिक जिल्ह्यात यापूर्वी काम केले असून, त्याचाही लाभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांना प्रभावी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले.

शहरात चेन स्नॅचिंग, खून, अपहरण, गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच मोटरसायकलींची वाढती चोरी रोखण्याचे सिंघल यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. आगामी महापालिका निवडणुकींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सिंघल यांना नियोजन करावे लागणार आहे. तसेच शहरात अलीकडे घडलेल्या खुनांच्या घटनांचा तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सिंघल यांना करावे लागणार आहे.

नाशिक नेहमीच स्मरणात

नाशिक शहरातील १५ महिन्यांच्या वास्तव्यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभागी होता आले ही बाब महत्त्वाची होती, असे प्रतिपादन तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले. माध्यमांमुळे पोलिसांच्या समोर आलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला. नाशिकचे सर्व अनुभव नेहमी स्मरणात राहतील, असे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आज सकाळी पोलिस आयुक्तालयात एस. जगन्नाथन यांच्यासाठी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संध्याकाळी आपला पदभार सोडल्यानंतर सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली.

मटा भूमिका

चेन स्नॅचिंग, वाहने तोडफोड, अपहरण, बलात्कार, गोळीबार अन् खून अशा गुन्ह्यांमुळे दहशतीचे वातावरण झाले असताना पोलिस नेतृत्वात बदल करून भाकर फिरविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. हा एकप्रकारे नाशिककरांना दिलासाच म्हणावा लागेल. गेली काही महिने गुन्हेगारांच्या कारवायांनी नाशिक खरोखरच भयकंपित झाले होते. दिवसाआड गोळीबाराच्या घटना घडू लागल्याने नाशिक जणू बेकायदा शस्त्र व्यवहाराचा अड्डा बनून गेले होते. वाहनांची तोडफोड करून पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगार पोबारा करीत होते. राजकीय गुन्हेगारांना वचक बसविण्याचा प्रयत्न पोलिस जरूर करीत होते, पण गुन्हे काही कमी होत नव्हते. बऱ्याच गुन्ह्यात तत्काळ आरोपी पकडण्यात व आर्थिक गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी आम जनतेला दिलासा देण्यात मात्र ते कमी पडत होते. अशा या निर्नायकी अवस्थेत पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना बदलून रवींद्र सिंघल यांची नियुक्ती केली गेली आहे. सिंघल यांनी काही वर्षांपूर्वी नाशिकचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेले असल्याने साहजिकच अपेक्षा वाढल्या आहेत. सिंघल यांचे स्वागत करतानाच त्यांनी नाशिककरांना भयमुक्त करण्याबरोबरच सर्व प्रकारची गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे काम जिद्दीने करावे, ही अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचओआयच्या कार्यालयाची झाडाझडती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट (एचओआय) या कंपनीच्या कार्यालयासह संचालकांच्या घरांची झाडाझडती सुरू आहे. लवकरच कंपनीचा डेटा ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांना असून, दुसरीकडे दोन दिवसातच कंपनी विरोधात सुमारे ४० गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. याची रक्कम तीन कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व संचालक फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मागील दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या एचओआयच्या प्रकरणात गत शनिवारी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीचा मुख्य संचालक विनोद पाटील यासह १० संचालकांवर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. यात विनोद बाळू पाटील (रा. नवीन नाशिक), सुशांत रमेश कोठुळे (रा. तपोवन), भगवंत कोठुळे (रा. तपोवन), महेश सुधाकर नेरकर (रा. नवीन नाशिक), अनिल निवृत्ती कोठुळे (रा. नवीन नाशिक), रवींद्र पुंडलिक दळवी (रा. पंचवटी), दर्शन विजय शिरसाठ (रा. नाशिकरोड), सतीश शेषराव कामे (रा. नवीन नाशिक), विजय लक्ष्मण खुनकर व सुरेखा भगवंत कोठुळे (रा. जेजुरकर मळा, तपोवन) यांचा समावेश आहे. संशयितांवर फसवणूक करणे, एमआयडीसी कायदा ३,४ सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टर कायदा कलम १९५६ चे कलम २३ व कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६७,३७४,७५,४४७ या कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांपासून तक्रारदारांचा ओघ सुरू झाला आहे. अवघ्या दोन दिवसांत ४० तक्रारी समोर आल्या असून, फसवणुकीचा आकडा तीन कोटीवर गेला आहे. सध्या कंपनीचे कार्यालय, तसेच संचालकांच्या घरामध्ये झडती सुरू आहे. कंपनीने केलेली गुंतवणूक व त्याची माहिती संकलीत केली जाणार असून, संशयित आरोपी फार दिवस पोलिसांना गुंगारा देणार नाहीत, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

असे आहे प्रकरण

वार्षिक २४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी तब्बल ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. कंपनीचे जवळपास ३० एजंट असून, त्यांच्यामार्फत तीन हजार २० गुंतवणूकदारांकडून ५० हजारांपासून एक कोटी रुपये उकळण्यात आले. जमा झालेले पैसे विनोद पाटीलने पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अॅण्ड सर्व्हिसेस, विनोद बुलियन्स दुबई, हाऊस ऑफ बुलियन्स, हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट, हाऊस ऑफ बिल्डकॉन, हाऊस ऑफ अॅग्रो कम्युनिटी या व इतर काही कंपन्यांच्या माध्यमातून शेअर मार्केट, तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवले. मात्र साधारणतः यार्षाच्या सुरुवातीपासून विनोद पाटील यांनी व्यवहारात अनियमितता सुरू केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ स्कूल वाहनांवर होणार कठोर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परवाना नसताना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट रद्द करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला असून, त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून होणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची १२वी बैठक पार पडली. त्यात, शाळेच्या परिसरात अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सर्व्हेक्षण व वाहनांचे परवान्यावर रूपांतर करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने शहरातील सर्वच शाळांबाहेर सर्व्हे केला.

या प्राथमिक सर्वेक्षणात किमान १५० पेक्षा जास्त वाहनचालक खासगी वाहनातून परमीट न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे स्पष्ट झाले. खासगी वाहनात विद्यार्थ्यांची वाहतूक करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्नही यामुळे उद्भवतो. याबाबत अनेक वाहनचालकांना अंतीम ताकीद देयणत आली असून, ही धोकायदाक वाहतूक त्वरित बंद होणे आवश्यक असल्याचा इशारा उपप्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेरा वर्षीय मुलाची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तेरा वर्षीय मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली. बालकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

समर्थ मनोजसिंग विंचर (वय १३) असे आत्महत्या कलेल्या बालकाचे नाव आहे. आर्टीलरी सेंटरमधील क्वॉर्टरनंबर ३३२-३ मध्ये राहणाऱ्या समर्थने रविवारी रात्री अज्ञात कारणातून राहत्या घरातील बाथरूममध्ये गळफास लावून घेतला होता. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवनचे ‘पावित्र्य’ मुख्यमंत्र्यांना पटले?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथील प्रभागांसह आगामी महापालिका निवडणुकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अपक्ष नगरसेवक पवन पवार याची उपयुक्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून देण्यात एका गटाला यश आले आहे. पवनची ही पावनता लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी आता डोळ्यावर पट्टी बांधून घेत 'नरो वा कुंजरोवा'ची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे या प्रवेशामुळे भाजपमध्ये गटबाजी उफाळून आली असून, बड्या पदाधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत. शहराध्यक्षांनी पुढाकार घेत गुन्हेगारांना पक्षप्रवेश दिल्याने भाजपचे जुने पदाधिकारी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.

शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी पवन पवारला केवळ भाजपमध्ये प्रवेश दिलाच नाही तर पवारमुळे आपण कशी निवडणूक जिंकली याचा जाहीर खुलासा करीत निवडणुकीत त्यांच्यासाठी झटणाऱ्या भाजप नेते अन् कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पवार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असूनही शहराध्यक्षांसह काही निवडक लोकांच्या प्रतापामुळे नाशिकमध्ये पक्षाची मोठ नुकसान होत आहे. सानप आणि त्यांच्या कंपूने मात्र या प्रवेशासदंर्भात प्रदेशस्तरावर उठलेले वादळ शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सानपांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतल्याची चर्चा आहे. पवनमुळे प्रभाग निवडणुकीत पक्षाला होणारा फायदा तसेच आगामी निवडणुकीत भाजपसाठी त्याची उपयुक्तता त्यांनी मुख्यमंत्र्याना पटवल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यानीही नागपूरच्या मुन्ना शेखच्या धर्तीवर पवनला अभय दिल्याची आता पक्षातच चर्चा सुरू झाली आहे.

पवनच्या प्रवेशावरून वरिष्ठ पातळीवर सारवासारव सुरू असतांना स्थानिक पातळीवर मात्र सानप यांच्या यांच्याविरोधात पदाधिकारी व आमदारही मैदानात उतरले आहेत. कोणालाही प्रवेश द्यायचा असेल तर त्याचा निर्णय पक्षाच्या कोअर समितीत घेतला जातो. या कोअर समितीच्या बैठकीत बहुतेक सदस्यांनी पवनच्या प्रवेशाला तीव्र विरोध केला होता. तरीही सानपांनी सदस्यांना अंधारात ठेवून ऐनवेळी पवनचा प्रवेश करवून घेतला. विशेष म्हणजे या ठिकाणी बोलविलेल्या आमदारांनाही या प्रवेशाची कल्पना दिली नाही. त्यामुळे या आमदारांनीच आता या प्रवेशापासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. या प्रवेशावरून भाजपमध्ये आता दोन गट पडले असून सानप विरोधाची धार तीव्र झाली आहे. मुख्यमंत्र्याकडे आता थेट लेखी तक्रार करण्याची तयारी एका गटाने सुरू केली आहे.

एका रात्रीत असे काय झाले?

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आदल्या दिवसापर्यंत खुद्द पवन पवार आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचा खुलासा करीत होता. मात्र, एका रात्रीत असे काय झाले ? आणि पोटनिवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जमलेल्या नेत्यांना कोणतीही पूर्वसूचना ने देता थेट कार्यक्रमस्थळी नेत पवन पवारचा पक्षप्रवेश कसा काय घडून आला?, याबाबत भाजपचे नेते देखील थक्क झाले आहेत.

भाजप नव्हे 'सानप पार्टी'

पक्षाला एका प्रभागाची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी गुन्हेगाराची आवश्यकता भासत असेल तर महापालिका निवडणुकीत पक्षाची काय स्थिती असेल अशी प्रतिक्रिया एका आमदाराने व्यक्त केली आहे. भाजपची ताकद असतांनाही गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देवून पक्ष संपवण्याचे काम केले जात असल्याचा आरोपच भाजपचे पदाधिकारी करू लागले आहे. नाशिकमध्ये भाजप नव्हे तर सानप पार्टी असल्याची चर्चा भाजपचे पदाधिकारी करत असून महापालिका निवडणुकीत पक्षाला देवच वाचवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया आता पदाधिकारी व आमदार खासगीत करत आहे. पक्ष सावरायचा असेल तर थेट शहराध्यक्षच बदला, अशी भूमिका प्रदेशाध्यक्षांकडे घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट व्हेरिफिकेशन आता ऑनलाइन

0
0

राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस स्टेशन एकमेकांशी जोडणाऱ्या सर्व्हर रूमसह सिटी व्हिजिटर इन्फर्मेशन अॅण्ड रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टिम (सीव्हीआयआरएमएस) या महत्त्वपूर्ण प्रणालीचे मंगळवारी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे शहरातील लॉजेस, हॉटेल्समध्ये मुक्कामी येणाऱ्या प्रत्येकाची माहिती पोलिसांना डिजिटल स्वरुपात लागलीच प्राप्त होणार आहे.

मागील वर्षापासून शहर पोलिसांनी डिजिटल कामकाजावर भर देण्यास सुरुवात केली आहे. प्रतिसाद अॅप, वाहन तक्रार पोर्टल, बदललेली वेबसाइट, सीसीटीनीएस अशा एक ना अनेक सुविधा पोलिसांना उपलब्ध झाल्या. आता त्यात आधुनिक सायबर लॅब आणि सीव्हीआयआरएमएस या प्रणालीने भर घातली आहे. सीव्हीआयआरएमएस तसेच नवीन सर्व्हरमुळे तर घरमालकांनी नोंदविलेली भाडेकरू नोंदणी, वाहन खरेदी-विक्री तपशील, मोबाइल आणि सिम विक्री याचीही नोंद ठेवली जाणार आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारी घटनांची दैनंदिन नोंद, पासपोर्ट आणि इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांची नोंद, पोलिस मित्र यादी आणि प्रतिसाद अॅप अशा अनेक गोष्टी या सर्व्हरशी जोडल्या गेल्या आहेत. पोलिस आयुक्तालयासह शहरातील सर्व पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना सर्व्हरच्या मदतीने आवश्यक ती माहिती तातडीने पाहता येऊ शकते. आमदार अपूर्व हिरे यांच्या आमदार निधीतून ही यंत्रणा पोलिसांनी कार्यान्वित केली आहे. उद्घाटनप्रसंगी आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासह उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त, विविध पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.

गुन्हेगारांचा माग काढणे तसेच पासपोर्ट, ना हरकत दाखला आदींसाठी माहितीची देवघेव करणेही पोलिस आणि नागरिकांना सहज शक्य होणार आहे. सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार आणि सहकाऱ्यांनी आभार प्रदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​भुजबळांचे फाईव्हस्टार ऐश्वर्य!

0
0

महालांची सजावट पाहून अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रसदन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्ममधील मालमत्तेची सलग दुसऱ्या दिवशीही एसीबी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोजदाद सुरू होती. ही कारवाई आज, बुधवारीही सुरू राहणार आहे. फार्महाऊसमध्ये असलेल्या आल‌िशान महालांमधील फाईव्हस्टार ऐश्वर्य पाहून अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले असून, प्राचीन तसेच कलाकुसरीच्या वस्तुंची मोजदाद कशी करायची, असा प्रश्न एसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला असल्याचे समजते.

भुजबळ फार्ममधील महाल व त्यातील संपत्तीचे मूल्यांकन एसीबी, पीडब्ल्यूडी व आर्किटेक्ट यांच्याकडून सुरू आहे. महालांमधील प्राचीन वाड्यांचे खांब, प्राचीन संस्कृती दर्शविणारे दगडी खांब, सभामंडप, हॉलमधील लाकडी कलाकुसर, लाकडांवरील आकर्षक कोरीव नक्षीकाम, राजवाड्याला शोभतील अशा आलिशान खुर्च्या, खास दिवाणखाना, राजेशाही झुंबर आदि वस्तू पाहून अधिका-यांनी तोंडातच बोटे घातली. महालांमध्ये मार्बलमध्ये घडविलेली पाश्चिमात्य शैलीची प्रशस्त बाथरूम आहेत. त्यात जाकुजीसह अनेक सुविधा असून, त्यांची सजावटही ऐतिहासिक आहे. संपूर्ण परिसरासाठी वॉटर फिल्टरेशन प्लांटही आहे.

किंमत दोनशे कोटी?

भुजबळ फार्मसह त्यातील आलिशान महालांची किंमत शंभर कोटींच्या आत असल्याचा दावा केला जात होता. परंतु, महालांमधील प्राचीन व पाश्चिमात्य शैलीच्या शोभेच्या वस्तूंची किंमतच कोट्यवधींच्या घरात आहे. त्यामुळे फार्महाऊसची किंमत दोनशे कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एसीबीने आता विशेष तज्ज्ञांना पाचारण केले असून, आठवड्याभरात महालांची नेमकी किंमत जाहीर केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा पाच पैसे किलो, शेतकरी बेहाल

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी कांदा उत्पादकांची दैना अद्याप सरलेली नाही. पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या सायखेडा उपबाजारामध्ये गोल्टी कांद्याला प्रति क्विंटल पाच रुपयांचा दर मिळाला. प्रति किलोला अवघ्या पाच पैशांचा दर मिळाल्याने बळीराजा पुरता बेहाल झाला आहे.

निफाड तालुक्यातील करंजगाव येथील शेतकरी सुधाकर दराडे यांच्या कांद्याला ५ रुपये क्विंटलचा दर सोमवारी पुकारला गेला. या कांद्याचा उत्पादन खर्च ६०० ते ७०० रुपये आहे. त्याशिवाय वाहतूक व भराई खर्च प्रतिक्विंटल ६० रुपये येतो. दराडे यांच्या १३ क्विंटल कांद्याचे मूल्यांकन अवघे ६५ रुपये झाले. त्यांना कांदा बाजार समितीत लिलावात आणण्यासाठी ७८० रुपये खर्च आला. उत्पादन खर्च दूरच पण वाहतुकीचाही खर्च न निघाल्याने संतापाच्या भरात दराडे यांनी हा कांदा घरी आणून शेतात ओतला.

दराडेंनी मागील वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये १० एकर क्षेत्रावर कांद्याची पुनर्लागवड केली. एप्रिल महिन्यात कांदा काढल्यानंतर दर वाढतील या अपेक्षेने त्यांनी १ हजार क्विंटल कांदा साठवला. जुलैत भाजीपाला नियमनमुक्ती व आडतीच्या निर्णयावरून ३५ दिवस कांदा लिलाव ठप्प झाले. त्यामुळे त्यांचा चाळीत कांदा सडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिर्यादीत होता अपहाराचा उल्लेख

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगांव घरकुल खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष न्यायालयात आणखी तीन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यात जळगाव शहर आणि जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुबेर चवरे यांनी आपल्या साक्षीत दोन पोलिस ठाण्यात नरेंद्र भास्कर पाटील यांनी दिलेल्या पाच फिर्यादीतून ६५६ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आल्याची माहिती विशेष न्यायालयात सरतपासणीच्या वेळी दिली.

धुळे जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याकडून सरतपासणी घेण्यात आली. त्यात सुरुवातीला पोलिस निरीक्षक कुबेर चवरे यांची सरतपासणी घेतली गेली. त्यांनी शहर आणि नवी पेठ पोलिस स्टेशनला नरेंद्र भास्कर पाटील यांच्याकडून देण्यात आलेल्या फिर्यादीबाबतची माहिती दिली, मात्र त्यावेळी सुरेश जैन यांना ओळखत नव्हतो. नरेंद्र पाटील हे दस्तऐवज घेऊन आल्यानंतर आपण त्यांना तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला नव्हता. कागदपत्र ठेवून त्याचा अभ्यास केल्यानंतरच फिर्याद नोंदविल्याची माहिती दिली. या काळात आर्थिक गुन्ह्याचा तपास करण्याबाबत स्वतंत्र शाखादेखील नसल्याची सांगितले. त्यांची उलटतपासणी आरोपींचे वकील ईस्माइल शेख, अॅड. आर. व्ही. मेटकर, अॅड. जितेंद्र निळे, अॅड. भुषण देव, अॅड. प्रमोद पाटील यांच्याकडून घेण्यात आली. त्यानंतर जळगाव जिल्हा कारागृहाचे कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांची सरतपासणी झाली. त्यांनी घरकुल घाटोळ्यातील आरोपी सुरेश जैन यांच्या लेटरपॅडवर महापौरांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याबाबत दिलेले पत्र आपल्याला ९ फेब्रुवारी २०१२ रोजी प्राप्त झाल्याचे सांगितले. त्याबाबतची नोंद रजिष्टरमध्ये केल्याचे स्पष्ट केले. त्यांचीही संशयितांच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली. शासनाच्या नगररचना विभागाचे अवर सचिव रामचंद्र कुलकर्णी यांनी जळगाव महापालिकाच्या महासभेचे दोन आणि स्थायी समितीचा एक ठराव विखंडीत करण्यात आल्याची माहिती देऊन त्याबाबतचे आदेश आपल्या सहीने काढण्यात आल्याची माहिती सरतपासणीत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा हिशेब वार्षिक वापरात धरावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

नाशिकच्या नांदुरमध्यमेश्वर जलद कालव्यातून मराठवाड्यास पाणी सोडल्यास या पाण्याचा हिशेब वार्षिक खरीप वापरात धरण्यात यावे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजिनीअर राजेंद्र जाधव यांनी विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.

नांदुरमध्यमेशवर धरण समूहातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची मागणी वैजापूर-गंगापुरच्या आमदारांनी नुकतीच लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी उपोषणाचा इशाराही प्रशासनाला दिला होता. त्यानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही नांदुरमध्यमेश्वर जलद कालव्यातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची नाशिक पाटबंधारे विभागाकडे नुकतीच केली. या पार्श्वभूमीवर जलचिंतन सस्थेचे अध्यक्ष इंजिनीअर राजेंद्र जाधव यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची भेट घेवून त्यांना वरील मागणीचे निवेदन दिले.

यावेळी चर्चा करताना जाधव यांनी सांगितले की, मुबलक पाऊस झालेला असल्याने मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी जरूर दिले पाहिजे. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठीच नांदुरमध्यमेश्वर धरण समूहातील भावली, वाकी व मुकणे या धरणांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे वैजापूर, गंगापूर या तालुक्यांना पाणी देण्यात यावे. मात्र या पाण्याचा हिशेब खरिपाच्या पाणी वापरात धरण्यात यावा, अशी आग्रही मागणी जाधव यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाचा ‘जनसंपर्क’ होणार हायटेक

0
0

सोशल मीड‌ियासह माध्यमांशी वाढवणार कनेक्ट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे विकासकामांसह पालिकेचे स्तुत्य उपक्रम नागरिकांपर्यत पोहचण्यासाठी महापालिकेचा जनसंपर्क विभागाने कात टाकली आहे. विभागाने आता हायटेक होण्याच्या दिशेने पाऊले उचलली आहेत.

यासाठी नाशिक मनपाच्या जनसंपर्क विभागाने पालिकेतील सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बैठक घेवून त्यांना बातमी कशी द्यावी याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून या ग्रुपद्वारे महापालिकेत घडणाऱ्या दैनंदिन घडामोडींचे वृत्त माध्यमांपर्यंत पोहचविले जाणार आहे.

महापालिकेच्या सकारात्मक कार्यक्रमांऐवजी नकारात्मक बातम्यांनाच प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ही नकारात्मकता पुसून काढण्यासाठी जनसंपर्क विभाग सरसावला असून त्यांनी पालिकेतर्फे नागरिकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, दैनंदिन कामकाज जनतेपर्यंत पोहचण्यासाठी व सोशल मीडियासह माध्यमांशी कनेक्ट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बातमीदारीचे प्रशिक्षण दिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images