Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शाहू बोर्डींगचे विकसन विद्यार्थ्यांच्या हितासाठीच

$
0
0
छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने शंभरीकडे वाटचाल करणा-या श्री शाहू छत्रपती बोर्डींग मोडकळीला आल्याने तिच्या विकसनासाठी पारदर्शकपणे निर्णय घेतल्याचे सोमवंशीय शिक्षणवर्धक फंडने केला आहे.

संप मिटूनही पेट्रोलसाठी वणवण

$
0
0
भारत पेट्रोलिअमचे टँकरचालक आणि मालकांनी पुकारलेला संप गुरुवारी मध्यरात्री मिटला असतानाही शुक्रवार संध्याकाळपर्यंत नाशिककरांना पेट्रोलसाठी वणवण करावी लागली. संप मिटला तरी पेट्रोलची उपलब्धता नसल्याने शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंप संध्याकाळपर्यंत बंद होते.

'पीएफ'च्या २१ लाखांचा अपहार

$
0
0
कामगारांच्या वेतनातील भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम संबंधित कार्यालयात जमा न करता, त्याचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुरुदेव फोर्जिंग कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी तब्बल २१ लाख ९० हजार ३०५ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

लिंकरोडकडे लक्ष द्या

$
0
0
'महापालिकेच्या महसुलात वाढ करणारा तसेच शहरातील महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जात असतानाही गोविंदनगर परिसरातील समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय' असा आरोप करत नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांनी शुक्रवारच्या स्थायी सभेत अधिका-यांना जाब विचारला.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ३ मेपासून राज्यभरात सुरू झाल्या आहेत.

...तर सेट टॉप बॉक्स बंद होणार

$
0
0
केबलग्राहकांनी येत्या १५ मेपर्यंत ऑपरेटर्सकडे कस्टमर रेफरन्स फॉर्म (सीआरएफ) भरून न दिल्यास सेट टॉप बॉक्स बंद करण्याचा इशारा जिल्हा करमणूक कर विभागाने दिला आहे.

३७ कोटींचा महसूल बुडाला

$
0
0
जिल्ह्यातील ५१ वाळू ठेक्यांच्या लिलावास प्रतिसाद न मिळाल्याने सुमारे ३७ कोटी ३३ लाख रुपयांच्या महसुलावर जिल्हा प्रशासनाला पाणी सोडावे लागले आहे. आता हे लिलाव पावसाळ्यानंतरच होऊ शकणार आहेत.

गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाची नोटीस

$
0
0
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या सर्व सदस्य व अधिका-यांना नोटीस बजावण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्याची माहिती 'बाजार समिती बचाव समिती'चे पंडित कातड-पाटील यांनी दिली.

उपाशी नेता अन् उत्साही कार्यकर्ते..

$
0
0
शहरातील काही ठिकाणांवर नेहमी उपोषण सुरू असल्याचं दिसतं. कधी तेथे गर्दी असते तर कधी आख्खं मंडप मोकळ पडलेलं असतं. अशाच ठिकाणी दोन उपोषणाचे मंडप सजले होते. एका मंडपात कार्यकर्त्यांची गर्दीही ब-यापैकी होती.

पानवेलींचा 'गुंता'

$
0
0
स्थायी समितीसमोर मांडण्यात येणाऱ्या नसलेल्या पानवेली काढण्याच्या प्रस्तावात गडबड असल्याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने वाचा फोडताच शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले.

आमदार छाजेडांकडून दिशाभूल

$
0
0
एसटी कामगार कराराबाबत 'इंटक'चे (महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस) अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांच्याकडून दिशाभूल होत असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केला.

नाशिकरोडला हवंय पंखात बळ

$
0
0
धार्मिक, पर्यटन आणि औद्योगिकदृष्टया सक्षम असलेल्या नाशिक शहर तर, दुसरीकडे धाकट्या भावाप्रमाणे वाढत असलेले नाशिकरोड हे दुसरे शहर. दोन्ही शहरांच्या विकासाचा झपाटा वेग पकडतोय पण, हे घडत असताना नाशिकरोडकडे तेवढं लक्ष दिले जात नाही.

वेतनकरारासाठी उपोषण खेदजनक

$
0
0
वेतनकरारासंदर्भात युनियनच्या काही पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू करणे ही अत्यंत खेदजनक बाब असून या मार्गाने तोडगा निघणार नसल्याचे सांगत महिंद्रा एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष शिरीष भावसार यांनी नोटिसीद्वारे कामगारांचे लक्ष वेधले आहे.

टँकरचालकांचा संप अखेर मागे

$
0
0
इंधन वाहतूक दरात वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून इंधन वाहतूक करणा‍ऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसांपासून पुकारलेला संप शुक्रवारी मागे घेतला.

रेशनचा तीन टन गहू जप्त

$
0
0
सटाणा शहरातील एका प्रतिष्ठित व्यापा-याच्या गोदामावर छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवलेला रेशनचा तीन टन गहू पुरवठा अधिका-यांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

'गेम्स व्हिला'वर छापा

$
0
0
कॉलेजरोड ते डॉन बॉस्कोदरम्यान असलेल्या अनधिकृत 'गेम्स व्हिला'वर छापा टाकत पोलिसांनी शुक्रवारी स्नूकर खेळणाऱ्या १६ जणांविरुद्ध कारवाई केली. सरकारवाडा व गंगापूर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

चांदवडमध्ये दह्यातून विषबाधा

$
0
0
चांदवड येथे चारवस्तीतील ४५ जणांना दह्यातून विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यात सुमारे १५ ते २० मुलांचा समावेश आहे. त्यातील सात जणांना नाशिकच्या ‌सीव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

१००१ आदिवासी जोडप्यांचा विवाह

$
0
0
नाशिक जिल्हा आदिवासी समाज सेवा मंडळ व जिल्हा काँग्रेसतर्फे सुरगाणा येथे १००१ आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित केला आहे. ९ मे रोजी होणा-या या विवाहसोहळ्यास केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नाशिक-नगर पाणीवाद सुप्रीम कोर्टात

$
0
0
नाशिक, नगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग करा, या मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका गुरुवारी, २ मे रोजी सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली.

जळगावात उष्माघाताचे ५ बळी

$
0
0
जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून गुरुवारी उष्माघाताने पाचजणांचा मृत्यू झाला. सध्या येथील तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. भडगाव तालुक्यातील भोरटेक बुद्रुक येथील प्रभाकर वाणी (२२) या तरुणाने भर उन्हात पाणी भरल्याने त्यास अस्वस्थ वाटू लागले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images