Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

छत्रपतींची जन्मकुंडली सापडली!

0
0
कुंडलीत काय लिहून ठेवलेय कोण जाणे...असे वाक्य सहज कुणीही उच्चारते परंतु आतापर्यंत कोणीही न पाहिलेली कुंडली अचानक सापडली तर...अन् ती कुंडली चक्क शिवाजी महाराजांची असेल तर?... हो हो, साक्षात शिवाजी महाराजांच्या जन्मकुंडलीचे हस्तलिखित सापडल्याचा दावा भारतीय इतिहास संकलन समितीने केला आहे.

हॉटेलींगचा बदलता ट्रेण्ड

0
0
कुठल्याही शहरात होणारे बदल हे त्या शहराच्या जीवंतपणाचं लक्षण असतं. नाशिक त्यात वरच्या क्रमांकावर आहे. आज एकविसाव्या शतकात मागे वळून पाहिलं तर नाशिकमध्ये झालेले बदल इतर शहरांच्या तुलनेत गतिमान आहेत. आज मुंबई-पुण्यानंतर नाशिकचे नाव घेतले जाते.

निवृत्त कर्मचा-यांची हायकोर्टात धाव

0
0
मनमाड नगरपरिषदेतील २४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्क रजा, उपदान व सहाव्या वेतन आयोगाचे ६८ लाख १८ हजार ५० रुपये थकविल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

रेल्वे संघटनांच्या बेशिस्तीकडे दुर्लक्ष

0
0
रेल्वे कामगार संघटनांच्या मान्यतेसाठी एप्रिल महिन्यात नाशिकरोड येथे निवडणुका झाल्या. त्याकरता रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात फलकबाजी करुन स्टेशन विद्रुप करण्यात आले.

एजंटकडे जाऊ नका!

0
0
'आरटीओ कार्यालयातील विविध कामांसाठीची प्रक्रिया सुटसुटीत करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून नागरिकांनीही 'ऑनलाईन'सारखे पर्याय वापरून आरटीओकडील स्वतःची कामे स्वतःच करावीत. त्यासाठी एजंटकडे जाऊ नये', असे डेप्युटी आरटीओ जयंत पाटील यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

शिक्षक तुटवडा भरुन निघणार

0
0
विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत कमी असणारी शिक्षक संख्या ही शिक्षण विभागाची वर्षानुवर्षांची समस्या आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. निवडणुक प्रक्रिया वगळता शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका केल्यामुळे विविध सरकारी कार्यालयांमध्ये वर्ग केलेल्या शिक्षकांना आता पुन्हा शिक्षकी पेषा स्विकारावा लागणार आहे.

लोडशेडिंगमुळे मनमाडकर हैराण

0
0
पालखेड डाव्या कालव्यातून रोटेशनचे पाणी मिळाल्यामुळे मनमाडला काहीसा दिलासा मिळाला असतानाच, दुसरीकडे तब्बल सात तास ४५ मिनिटे होणाऱ्या लोडशेडिंगमुळे मनमाडकर ऐन उन्हाळ्यात हैराण झाले आहेत.

शिक्षणस्तर बदलाची अर्धवट अंमलबजावणी

0
0
प्राथमिक शिक्षणामध्ये पहिली ते आठवी या वर्गांचा समावेश करण्याच्या निर्णयाची अर्धवट अंमलबजावणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेला हा निर्णय केवळ परिपत्रकापुरताच मर्यादित ठेवल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

येवल्यात आढळली अजिंठा वेरूळकालीन मंदिरे

0
0
निसर्गाशी झुंज घेत अन् परचक्र भेदण्याचं बळ माणसाला देत शतकानुशतके अस्तित्व टिकविणारी येवला तालुक्यातील काही हेमाडपंथी मंदिरे ही अजिंठा वेरूळकालीन आहेत.

अनियमित घंटागाडी, पथदीपांवरून गोंधळ

0
0
पंचवटीतील घंटागाड्यांची अनियमितता व बंद अवस्थेतील पथदीपांच्या मुद्द्यावरून पंचवटी प्रभाग समितीच्या साप्ताहिक बैठकीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

धरणाचा जलसाठा वाढणार

0
0
शहर परिसरातील संस्था-संघटनांच्या पुढाकाराने गंगापूर धरणातून सुरु असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे यंदा या धरणात १२ कोटी लिटर अधिक पाणी साठू शकणार आहे.

१३ टक्क्यांनी वाढणारघरपट्टीचे ओझे

0
0
एलबीटीमुळे (लोकल बॉडी टॅक्स) उत्पन्नात घट झाल्यास काय करावे अशा विवचंनेत सापडलेल्या महापालिकेने ऐनकेन प्रकारे घरपट्टीत वाढ लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

लँडलाईनचा कॉल

0
0
मोबाईलच्या वापरातून अनेक बाबी सुसह्य झाल्या असल्या तरी इतरही अनेक बाबींना त्यातून चालना मिळाली आहे. एखाद्या व्यक्तीचा कॉल आला की त्याच्याशी बोलायचे की त्याला टाळायचे हा पर्याय मोबाईलमधून उपलब्ध झाला आहे.

बालभारतीला नाही पुस्तकांच्या मागणीचा पत्ता

0
0
वाहतूकदारांअभावी पुस्तक वाटप रखडल्याने एकीकडे गोंधळ उडाला असतानाच, पुस्तके उपलब्ध असल्याचे सांगणाऱ्या बालभारतीच्या भांडार विभागामध्येच समन्वय नसल्याचे निदर्शनास आले आहे.

'लोकराज्य'ची वाचकांना हुलकावणी

0
0
महाराष्ट्र सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहचाव्यात, यासाठी दरमहा प्रकाशित करण्यात येणारे 'लोकराज्य' हे प्रसिद्ध मासिक गेल्या काही महिन्यांपासून अनेक वाचकांना हुलकावण्या देत आहे.

यूपीएससीच्या यशात मुक्त विद्यापीठाचाही वाटा

0
0
यूपीएससीची तयारी करताना मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकांनीही बळ दिले. या अभ्यासक्रमाची रचना देशस्तरावरील परीक्षेलाही पूरक असल्याचा अनुभव या टप्प्यावर आला, असे मनमोकळेपणाने सांगत कौस्तुभ दिवेगावकरने मुक्त संवाद साधला.

आपत्कालीन व्यवस्थापनाचा फज्जा

0
0
अग्निशमन यंत्रणेचा अभाव... फायर ब्रिगेडचे वाहन आले तर धड रस्त्यांअभावी स्टेशनपर्यंत पोहोचू शकत नाही... आणि एखादे वाहन पोहोचलेच तर पाण्याचा पाइप स्टेशनात प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचू शकत नाही... असे धक्कादायक चित्र रविवारी रात्री कसारा स्टेशनात दिसले.

ललितकला प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात

0
0
कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र सरकारच्या कलासंचलनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. २०१३ १४ मधील प्रवेशांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया २९ एप्रिलपासून सुरू झाली आहे.

'त्या' अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

0
0
दीड महिन्यापूर्वी नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील नातेवाइकांनी पळवून नेलेल्या तीन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. नांदगाव पोलिसांनी त्या तीन नराधमांना अटक केली असून त्यांना ९ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयास बांधील नाही

0
0
रा‌सबिहारी इंटरनॅशनल स्कूल ही शाळा खासगी विनाअनुदानित असल्याने शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयास ही शाळा बांधील नसल्याची माहिती रासबिहारी शाळेमार्फत देण्यात आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images