Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हिंदू सरदाराची कबर बनलीय धार्मिक ऐक्याचे प्रतीक

$
0
0
दिल्लीच्या निजामाच्या अखत्यारित येणाऱ्या येवला तहसीलमधील निजामाचे हिंदू सरदार विसाजी देशपांडे यांची बांधली गेलेली कबर पाटोदा येथे धार्मिक ऐक्याचा आदर्श म्हणून आजही अस्तित्व राखून आहे. निजामाच्या काळापासूनचे सामाजिक सलोख्याचे हे उदाहरण भारतीय इतिहास संकलन समितीच्या संशोधनामुळे जगासमोर आले आहे.

येवला अन् दिल्लीचं नातं सांगणारं पत्र सापडलं

$
0
0
'विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात दोन जागा अन् सहा उमेदवार आहेत. या स्थितीत येवल्यातील काँग्रेसची स्थिती काय सांगते? तेथे जनसंख्येचे पाठबळ काँग्रेसच्या मागे आहे का?' अशी विचारणा दिल्लीतून करणारे आणि दिल्लीतील राजकीय परिस्थिती सांगणारे हस्तलिखितपत्र भारतीय इतिहास संकलन समितीला मिळाले आहे.

महासभा चौथ्यांदा तहकूब

$
0
0
महापालिकेची सर्वसाधारण महासभा कोणत्याही चर्चेविना तहकूब करण्यात आली. विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांचे चिरंजीव निख‌िल खडसे तसेच खडसे यांची बहिण कमलाताई पाटील, नगरसेवक शाहू खैरे यांच्या वहिनी मंगलाताई खैरे यांच्यासह इतर मान्यवरांचे निधन झाल्याने शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता.

'LBT' विरोधात व्यापाऱ्यांचा ९ मे पासून बेमुदत बंद

$
0
0
महापालिका क्षेत्रात लागू होणाऱ्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधातील आंदोलनात आता नाशिकच्या व्यापाऱ्यांनीही उडी घेतली असून येत्या ९ मे पासून नाशिकमधील व्यापार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एकलहरेच्या प्रदूषणाबाबत अहवाल द्या

$
0
0
एकलहरे येथील महाजेनकोच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेमुळे काही प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्याने याप्रकरणी येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) मंगळवारी दिले.

विद्युत सहाय्यकपदाची यादी शुक्रवारी जाहीर होणार

$
0
0
महावितरणने सुमारे सात हजार सहाय्यकांच्या भरतीची प्रक्रीया सुरु केली असून शुक्रवारी ( १० मे) रोजी सायंकाळी उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. महावितरणने ७ हजार विद्युत सहाय्यक पदासाठी १० वी आणि विद्युत तारतंत्री व्यवसायाचे आयटीआय उत्तीर्ण पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले होते.

कॉलेज प्रशासनाकडून माहितीच्या अधिकाराची दिशाभूल

$
0
0
वकीलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकाराच्या आधारे वकीली मुद्दे उपस्थित करून ठाकूर लॉ कॉलेजसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, कॉलेजचे प्रशासन 'पब्लिक अथॉरिटी' नसल्याचे पत्र देत प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे आव्हान परतविण्याचा प्रयत्न केला आहे.

ऑटो क्षेत्रातही नाशिक बूमsss

$
0
0
नाशिककरांनी चांगल्या आणि नव्या गोष्टींचं नेहमी स्वागत केलंय. त्यात वाहनांचाही समावेश आहे. बदलाची ही परंपरा ऐंशीच्या दशकापासून आतापर्यंत कायम आहे. १९८३-८४ च्या काळात नाशिक पुढारलेलं नसतानाही त्याकाळची सर्वोत्तम यामाहा ३५० बाईक नाशिकमध्ये होती.

रेल्वे स्टेशनवर होणार चौथा प्लॅटफॉर्म

$
0
0
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्टेशनच्या विकासासाठी प्रयत्न सुरू झाले असून स्टेशनवरील चौथ्या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी अधिकाऱ्यांकडून जागेची पहाणी करण्यात आली आहे.

सुरेश वाडकरांना तात्पुरता दिलासा

$
0
0
पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या भूखंडाची परस्पर विक्री करण्याच्या प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिलासा दिला आहे. प्रांत विनय गोसावी यांच्या निर्णयास पालवे यांनी स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची आता २५ जून रोजी सुनावणी होणार आहे.

स्वाती चिखलीकर एसीबीसमोर हजर

$
0
0
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याने सध्या चर्चेत असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर याची पत्नी स्वाती चिखलीकर या मंगळवारी सकाळी अँटी करप्शन ब्युरोत (एसीबी) स्वतःहून हजर झाल्या.

धुळे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

$
0
0
सन २०१३-१४ हे आर्थिक वर्ष सुरू होऊन एक महिना पूर्ण झाल्यानंतर महापालिकास्तरावर अर्थसंकल्पाच्या फाइलीवरील धूळ झटकली गेली आहे. स्थायी समितीच्या सभापती कल्पना महाले यांनी महापौर मंजुळा गावीत यांच्याकडे २०९ कोटी ४६ लाख रुपयांचे कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक सादर केले.

पन्ह्याचा झटका

$
0
0
उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळं शहरात सर्वत्र व्याख्याने आयोजित केली जात आहेत. संध्याकाळपर्यंत उन्हाच्या झळा सुरुच असल्याने हे व्याख्यान सुसह्य व्हावं म्हणून अनेक ठिकाणी सरबत, कोल्ड्रींक्स, पन्हे अशा पेयांचा पुरवठाही सुरू आहे.

मुंगसे ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल

$
0
0
तालुक्यातील मुंगसे आणि पिंगळवाडे ग्रामस्थांमध्ये पाण्यावरून झालेल्या हाणामारीप्रकरणी मुंगसे गावातील २२ ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल झाला असून उपसरपंच मोहिनी निकम आणि बाळू निकम यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सिंहस्थाच्या कामांना मंजुरी मिळणार

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सरकारने गठित केलेली राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक शुक्रवारी नाशकात होणार आहे.

'आयडिया'च्या मान्यतेला मिळाले नूतनीकरण

$
0
0
विद्यावर्धन्स 'इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन, एन्व्हायर्नमेंट अँड आर्किटेक्चर'(आयडिया) या कॉलेजला नुकतेच कौ‌न्सिल ऑफ आर्किटेक्चर या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने दिलेल्या मान्यतेचे नूतनीकरण केले आहे.

दीड कोटी झाडे लावूनही जळगाव ओसाड

$
0
0
कमी होत जाणारे पावसाचे प्रमाण आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत १०० कोटी झाडे लावण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असला तरी जळगाव जिल्ह्यात मात्र तो पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे.

प्राध्यापकांना 'समजवणार' संस्थाचालक

$
0
0
वेतन रोखणे, थकबाकीचे वितरण थोपविणे असे उपाय योजूनही प्राध्यापकांनी परीक्षा कामकाजावरील बहिष्कार आंदोलन जारीच ठेवल्यामुळे राज्य सरकारने आता ठेवणीतले अस्त्र बाहेर काढले आहे.

वनविभागाने केले १३७ पाणवठे तयार

$
0
0
वन्यजीवांना जंगलातच पाणी मिळावे यासाठी जळगाव वनविभाग व यावल वनविभागाकडून १३७ पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

टोपी, रुमाल, स्कार्फना वाढती मागणी

$
0
0
जिल्ह्यात 'मे हीट' चांगलीच जाणवू लागली असून उन्हापासून बचाव करण्यासाठी महिला टोपी आणि रुमालांना पसंती देत आहेत. त्यामुळे बागायतदार रुमाल, स्कार्फ यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images