Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मशिदीचा स्लॅब कोसळून २ ठार

$
0
0
मालेगाव येथील बडा कब्रस्थानजवळ असलेल्या सुलेमानी मशिदीचा स्लॅब कोसळून दोन ठार तर चारजण जबर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. रात्री उशीरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.

रामकुंडाच्या धर्तीवर दसककरांना लाभणार छत्र

$
0
0
रामकुंडावरील विधीमंडप छत्राच्या धर्तीवर नाशिकरोड येथील दसक-पंचक येथेही छत्र उभारण्यात येणार असून आता धार्मिक विधी करण्यासाठी ग्रामस्थांना विधीमंडप मिळणार आहे. या बांधकामाकरता ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून विशेष निधीतून विधी मंडपाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

कृषीपंपांना लागणार वीजमीटर

$
0
0
राज्यात सर्वच ठिकाणी भीषण पाणीटंचाई असल्याने पाण्याची बचत व्हावी व विजेचा वापर कमी व्हावा, यासाठी महावितरणने नाशिक परिमंडळातील सर्वच कृषीपंपाना वीजमीटर लावणे सक्तीचे केले आहे.

कलाकारांची मदार आता 'प्रशांत'च्या 'आदेशा'वर!

$
0
0
कलावंतांना वारंवार येणा-या अडचणी सोडविण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आता लवकरच कमी होणार आहे. सरकार आणि कलाकार यांच्यात मध्यस्थीसाठी शिवसेनेतर्फे एका कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.

बसची तोडफोड अन् सिव्हिलमध्ये तणाव

$
0
0
मंगळवारी रात्री मोहन चांगले आणि दीपक सोनवणे यांच्या झालेल्या हत्याकांडानंतर शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अॅड. आर. आर. वाघ यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करीत चांगले समर्थकांनी त्र्यंबक नाका येथील एसटी बसची तोडफोड करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

आतापर्यंत दीड लाख घनमीटर गाळाचा उपसा

$
0
0
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील ११ ठिकाणी सुरू असलेल्या जलसंवर्धन उपक्रमात आतापर्यंत सुमारे दीड लाख घनमीटर गाळाचा उपसा झाला असून यामुळे पावसाळ्यानंतर जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ५.५५ दशलक्ष घनफुट पाणीसाठा वाढणार आहे.

महापौरांच्या भावासह पाचजणांविरोधात हत्येचा गुन्हा

$
0
0
पूर्ववैमनस्यातून चौघांनी मिळून दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गंगापूररोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या भावासह पाचजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

एलबीटीतून किरकोळ व्यापा-यांना वगळावे

$
0
0
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरला सोडचिठ्ठी देत नाशिकच्या व्यापाऱ्यांनी कृती समिती स्थापन करून 'बेमुदत बंद'चा इशारा दिल्याने चेंबरने अखेर किरकोळ व्यावसायिकांना एलबीटीतून वगळण्याची मागणी केली आहे.

कच्च्या मालाला सव्वा टक्के एलबीटी घ्या

$
0
0
उद्योगांसाठीच्या कच्च्या मालावर सव्वा टक्के एलबीटी आकारण्यात यावा, अशी मागणी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

फरारी कैद्याकडून १० मोटारसायकली जप्त

$
0
0
येरवडा कारागृहातून संचित रजेवर सुटलेल्या फरारी कैद्याकडून नाशिकरोड पोलिसांनी दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

पोलिस महासंचालकांकडून संशयितांची चौकशी

$
0
0
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याने सध्या चर्चेत असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ यांची एसीबीचे महासंचालक राज खिलानी यांनी स्वत: चौकशी केली.

मविप्रत पुन्हा राजकीय संघर्ष

$
0
0
मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्यासह इतर घटनादुरुस्तीबाबत मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे दाखल केलेला बदल अर्ज फेटाळण्यात आला आहे. भाऊसाहेब गडाख व अॅड. अशोक मोरे यांनी या बदल अर्जास हरकत घेतली होती.

असे कितीक खेळ पाहते मराठी!

$
0
0
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचे संवर्धन व भरभराट होण्यासाठी दरवर्षी १ ते १५ मे दरम्यान 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा करण्यात यावेत, असे 'सरकारी' आदेश निघाले असले तरी याबाबत विविध शासकीय विभागांमध्येच अनास्था असल्याचा खेळ पाहण्याचे मराठीच्या नशिबी आले आहे.

एलबीटीविरोधात शिवसेना आक्रमक

$
0
0
एलबीटी लागू करण्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना शिवसेनेने त्याविरोधात आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी शहरातील व्यापा-यांशी समन्वय साधून एलबीटी लागू करण्याचा प्रयत्न हाणून पाडणार असल्याचे सांगितले.

दप्तराचे ओझे होणार हलके

$
0
0
सहा पुस्तके, वह्या, पाटी, डबा, वॉटरबॅग, ड्रॉईंग बुक असे ओझे पाठीवर वागवत शाळेला जाणा-या पहिली, दुसरीच्या मुलांचे ओझे येत्या शैक्षणिक वर्षापासून कमी होणार आहे. पहिली आणि दुसरीच्या पुस्तकांची संख्या कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता सहाऐवजी तीनच पुस्तके शाळेमध्ये घेऊन जावी लागणार आहेत.

कांदिवलीत करार, नाशिकचे काय?

$
0
0
महिंद्रा अँड महिंद्राच्या कांदिवली येथील प्लाण्टमध्ये व्यवस्थापन आणि कामगार युनियन यांच्यात वेतनवाढ करार झाला असताना नाशिकमधील कराराचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत.

'एमपीएससी'चा पुन्हा घोळ

$
0
0
कॉम्प्युटरमधील सर्व विद्यार्थ्यांचा डाटा करप्ट झाल्याने पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा घोळात सापडली आहे. १८ मे ला होणा-या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मागणी केलेली परीक्षा केंद्रे न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे निदर्शनास आले आहे.

नाशिक जपतंय उत्तर महाराष्ट्राचं आरोग्य

$
0
0
नाशिकने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. प्रत्येक आजाराच्या बाबतीत जागतिक दर्जाचे उपचार नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह जळगांव, धुळे, नंदुरबार आणि काही प्रमाणात औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांचं आरोग्यही जपण्याचं श्रेय नाशिककडे जातं.

आयएमए आणि आयडीए

$
0
0
नाशिकमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)आणि इंडियन डेन्टल असोसिएशन (आयडीए)अशा दोन प्रमुख संघटनांच्या शाखा आहेत. आयएमएचे अंदाजे १५०० सदस्य आहेत, तर आयडीएचे १००० सदस्य आहेत. या संघटनांकडे स्वतःची जागा असून तेथे डॉक्टरांसाठी विविध कार्यशाळा, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

चिमुरड्यांनी खेळायचे कुठे?

$
0
0
उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या असून या काळात चिमुरड्यांना सर्वाधिक आवश्यकता असते ती उद्यानांची. परंतु कामटवाडे परिसरात एकही मोठे उद्यान नसल्याने खेळण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images