Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘एड्सवर नियंत्रणासाठी जनजागृती महत्त्वाची’

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

एड्सचे नियंत्रण करण्यासाठी तरुण पिढीमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत त्र्यंबकेश्वर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

‘मविप्र’च्या कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामीण रुग्णालय त्र्यंबकेश्वर यांच्यातर्फे एड्स जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. पोलिस मुख्यालय, ग्रामीण रुग्णालय, त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त, निवृत्तीनाथ मंदिर, बसस्थानक रस्ता व त्र्यंबकेश्वर कॉलेज या मार्गावरून फेरी मार्गस्थ झाली. याप्रसंगी तरुणा संयम पाळ, एड्स टाळ, एड्सवर नियंत्रण, सुखाला आमंत्रण, एड्स ला ठेवा दूर, बदला जीवनाचा नूर, स्वस्थ भारत, सबळ भारत अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी डॉ. स्मिता पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप माळी, प्रा. गोरक्षनाथ पिंगळे, प्रा.छाया शिंदे, प्रा.आशिष सोनवणे, प्रा.दिपाली पडोळ उपस्थित होते. प्रभात फेरी यशस्वीतेसाठी क्रीडासंचालक डॉ. सुनील पाचंगे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. लोंढे, डॉ. दुसाने, संतोष जगताप, अर्चना शिंदे, प्रा. अतुल गावंडे, प्रा. शरद कांबळे, प्रा. एस. एच. कोळी, प्रा. मनोजकुमार वायदंडे, प्रा. आर. डी. शिंदे आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन हजाराच्या नोटेची भरणा स्लीपमध्ये अडचण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर दोन हजाराची नोट बाजारात आली असली, तरी बँकेचा भरणा करण्यासाठी असलेल्या स्लीपध्ये या नोटेसाठी रकाना नसल्यामुळे बँकेच्या खातेदारांचा गोंधळ उडत आहे.

अगोदरच या नव्या नोटमुळे सुट्या पैशांचा प्रश्न डोकेदुखी ठरलेली असताना या नोटा भरण्यासाठी ही नवीन अडचण उभी राह‌िली आहे. स्लीपमध्ये बदल न केल्यामुळे खातेदारही त्याबाबत अनेक प्रश्न विचारुन बँक अधिकाऱ्यांना भंडावून सोडत आहेत. रद्द झालेल्या हजारच्या नोटेचा आकडा खोडून त्यावर दोन हजारच्या नोटांचा आकडा टाकल्यास त्यात फारशी अडचण येऊ शकणार नाही. मात्र, तरीही बँकेत त्याबाबत विचारणा करणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे.

अद्याप दोन हजाराच्या नव्या नोटा भरण्याची संख्या कमी असली, तरी प्रश्नच जास्त आहेत. एकीकडे नोटा रद्द केल्यानंतर नवीन नोटा छापण्याचा खर्च वाढलेला असताना आता सर्वच बँकांच्या अगोदरच छापून ठेवलेल्या लाखोंच्या संख्येतील या स्लिपांमध्ये पुढे बदल करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे बँकांनाही या नोटा रद्दची चांगलीच चाट बसणार आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी या स्लीप एकत्रित व मोठ्या संख्येने छापल्या जातात. त्यामुळे ही डोकेदुखी सर्वांनाच होणार आहे.

अद्याप एक हजाराची नवीन नोट बाजारात आली नाही. त्यामुळे तोपर्यंत त्याच्या जागी दोन हजाराचा आकडा टाकणे सोपे आहे. पण भविष्यात रोजच निर्णय बदलणाऱ्या रिझर्व्ह बँकेने पुन्हा हजाराच्या नोटांची घोषणा केली, तर दोन हजारांचा आकडा असणाऱ्या नवीन स्लिपची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

कोणत्याही बँकेत या स्लीपवर हजार ते दहा रुपयापर्यंत आकडे टाकलेले असतात. त्यावर किती नोटा आहेत, हा आकडा खातेदार भरतो. पण बहुतांश बँकांमध्ये या आकड्याबरोबरच एक रकाना खाली ठेवल्यामुळे तेथेही दोन हजाराच्या नोटांचा आकडा टाकता येणार आहे. पण त्यामुळे कॅशियरचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. छोट्या नोटा वर व मोठ्या नोटा खाली असेही चित्र यामुळे निर्माण होऊ शकते. या स्लीपमध्ये नोटांच्या तपश‌िलासाठी हा रकाना अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे त्यातून एकूण रक्कम व पैसे मोजणेही सोपे जाते.

गोंधळ वाढताच

दोन हजाराच्या नोटा अचानक आल्यामुळे आधी एटीएममध्ये रिकॅलिब्रेशन करावे लागले. त्यानंतर त्या बाजारात आल्यानंतर सुट्या नोटांचा प्रश्नही तयार झाला. त्यात त्या खेळण्यातल्या नोटा दिसत असल्यामुळे अनेकांनी सुरुवातीला नाकही मुरडले. आता त्या बाजारात आल्यानंतर त्या पुन्हा बँकेत टाकण्यासाठी त्याचा रकाना नसल्याची गोष्ट समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयकर विभागाची नाशकात छापामारी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयकर विभागाने लुधियानाच्या एका अॅटो पार्ट उत्पादन करणाऱ्या उद्योजकावर छापे टाकून १ कोटी १४ लाख रुपये जप्त केले आहेत. या छाप्यात ७२ लाखाच्या दोन हजाराच्या नोटा असल्यामुळे त्यांनी या उद्योजकाची कसून चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या उद्योजकांच्या देशातील पाच फर्मवर हे छापे टाकले असून, त्यात नाशिकच्या एका फर्मचाही समावेश आहे. त्यामुळे नाशिकमध्येही उद्योग क्षेत्रात खळबळ निर्माण झाली असून, आयकर विभागाने मात्र गुप्तता पाळली आहे.

या छाप्यानंतर आयकर विभागाने या नोटा कोणत्या बँकेतून आल्या यावर लक्ष केंद्रीत केले असून, त्यात काही बँक व्यवस्थापकांनाही रडावर घेतल्यामुळे नाशिकचे बँक अधिकारीही धास्तावले आहेत. नोटा रद्द झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात दोन हजाराच्या नोटा कशा आल्या हे शोधण्यासाठी या उद्योजकाचे आयकर विभागाने कंम्प्युटर, बॅलन्सशीट ताब्यात घेतले असून, बँकेतील पाच लॉकरही सील केले. छाप्यात लुधियानाचे दोन फर्म असून एक रुकी व एक नाशिकची आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरावरही हे छापे टाकले आहे.

या छाप्यानंतर आयकर विभागाने या उद्योजकांचे ८ नोव्हेंबपासूनचे सर्व व्यवहार तपासण्याचा निर्णय घेतला असून, त्यातून बरीच माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात दोन हजाराच्या नोटाही मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचे वृत्त आहे. त्यात आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्याची कारवाई इतर कारवाईपेक्षा वेगळी ठरली आहे. या छाप्यात दोन हजाराच्या नोटा सापडल्यामुळे अनेक प्रश्न आयकर विभागासमोर उभे राहीले असून बँकेच्या अधिकारी यात सामील असल्याचा त्यांना दाट संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात डोळ्याला दिसेना पैसा…

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रविवारची सुट्टी संपताच सोमवारी बँकामध्ये खातेदारांचा मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. एटएमवरही प्रचंडी गर्दी पहायला मिळाली. नोटाबंदीनंतर झालेल्या पाहिल्या पगाराचा पैसा घेण्यासाठी गेलेल्या वेतनादारांना कॅश शॉर्टेजमुळे मनस्ताप सहन करावा लागला. जिल्ह्यातील ५२५ राष्ट्रीयकृत व खासगी बँकेत पैशाचा पुरवठा कमी झाल्यामुळे काही बँकाचे सकाळापासून व्यवहार ठप्प झाले. कॅश शॉर्टेजमुळे महाराष्ट्र बँकेच्या ८८ शाखांपैकी ५० शाखेचे व्यवहार ठप्प झाले तर स्टेट बँकेने हात आखडता घेतला. देना बँकेतही हीच स्थिती होती. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख बँकांबरोबर इतर राष्ट्रीयकृत व खासगी बँकेतही हीच स्थिती होती.

रिझर्व्ह बँकेने गेल्या आठ दिवसात कोणत्याही बँकेला पैसा न दिल्यामुळे जिल्ह्यातील बँकेत कॅश तुटवडा जाणवत असून स्टेट बँक वगळता जवळपास सर्वच बँकांचे एटीएम बंद आहेत. तर अनेक बँकांच्या शाखांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. १ डिसेंबरपासून पगाराला सुरुवात झाल्यानंतर कॅश तुटवडा अधिक वाढला असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील स्टेट बँकेकडे अद्यापपर्यंत ४०० कोटी हून अधिक शिल्लक असली तरी त्यांच्याकडे पगारदारांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांनाही या कॅश शॉर्टेजचा प्रश्न भेडसावत आहे. त्यांनी रिझर्व्हे बँकेकडे १००१ कोटी रुपयाची मागणी केली असून, पाचशेच्या नोटाही देण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र बँकेच्या ८८ शाखा असून त्यांना रोज १० कोटीची आवश्यकता असताना त्यांना २ ते ३ कोटी रुपये मिळत आहेत. देना बँकेच्या जिल्ह्यात ७० शाखा असून, एका शाखेला केवळ ४० लाख रुपये देत आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने स्टेट बँकेला अद्यापर्यंत १२४ कोटी रुपये दिले असले तरी त्यांना त्यातून पाच जिल्ह्यात हे पैसे पुरवावे लागत आहेत. त्यामुळे त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. देना बँकेने पैशाचा तुटवडा होऊ नये म्हणून विर्लेपार्ले येथून आपल्या करन्सी चेस्टमधून पैसे मागवले आहेत.

बँक कर्मचारी धास्तावले

जिल्ह्यातील बँकेत कॅशचा तुटवडा झाल्यामुळे बँक कर्मचारी धास्तावले असून, त्यांनी आपल्या विभागीय कार्यालयात संपर्क साधून बँक बंदचा बोर्ड लावू का, अशी विचारणा सोमवारी केल्याचे वृत्त आहे. कॅश नसल्यामुळे ग्राहकांच्या रोषालाही अनेकांना सामोरे जावे लागत आहे.

पाचशेच्या नोटा गायब

जिल्ह्यात बँक ऑफ इंडियामध्ये पाच कोटी रुपयांच्या पाचशेच्या नवीन नोटा आल्या होत्या. त्यात त्या देना बँक, महाराष्ट्र बँक व इतर बँकेला वाटप करण्यात आल्या. पण इतर बँकेकडे त्या न आल्यामुळे दोन हजारच्या नोटांनीच सर्व व्यवहार सुरू आहेत. कॅशच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश बँकांचे एटीएम बंद आहेत. काही बँकांनी रिकॅलिब्रेशन करूनही त्यांच्याकडे एटीएममध्ये टाकण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे काही एटीएमच्या बाहेर नो कॅशचे फलक लावण्यात आले होते, तर काहींचे शटर खाली होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेच्या सर्वच व्यवहारांची चौकशी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत ४७ कोटी रुपयाच्या नोटा बदलण्याचा तपास करतांना आयकर विभागाही चक्रावून गेले आहे. जिल्हा बँकेत ऑनलाइन व्यवहार नसल्यामुळे नोटा बदलताना तपशील बदलून घेतल्याचा त्यांना संशय असून त्याचा तपास कसा करायचा असा प्रश्न या विभागाला पडला आहे. पण आयकर विभागाने याबाबत सूक्ष्म चौकशी करून त्यातील गैरप्रकार समोर आणण्यासाठी आता संपूर्ण बँकेचे पूर्वीचे व्यवहार तपासण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

सुरुवातीला आयकर विभागाने या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली असून, पहिल्या टप्यांत ३०० कोटी रुपये डिपॉज‌िट केलेल्या रकमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. यात अडीच लाखाहून अधिक पैसे भरणाऱ्यांना पैसे कोठून आणले हे विचारले जाणार असून, त्यासाठी बँकेच्या २१२ शाखेचे व्यवहार तपासण्याचे काम सुरू झाले आहे. नोटा रद्द झाल्यानंतर अनेक सहकारी बँकानी देशभर आपल्या पदाचा वापर करत नोटा बदलून घेण्याचा प्रकार केल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आयकर विभागाने जिल्ह्यातील सहकारी बँकेच्या व्यवहाराचे सर्वे केला असून, त्यात सुरुवातीला दोन बँकांचा डेटा जमा केला आहे. त्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्वच कागदपत्र जमा करून काही पदाधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. सहकारी बँकेबरोबरच काही खासगी बँकांबाबतही तक्रारी असल्या तरी त्याबाबत आयकर विभागाने अद्याप कोणतेच पाऊल उचलले नाही. जिल्हा बँकेचा विषय राज्यभर गाजल्यानंतर आयकर विभागाने त्याबाबत अनेक तज्ज्ञांची मदत घेतली आहे. त्यामुळे या व्यवहारात जिल्हा बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येळकोटचा गजर, भंडाऱ्याची उधळण

0
0

शहरात चंपाषष्ठीचा उत्साह; खंडेराव टेकडी येथे भक्तांचा जागर

टीम मटा

‘येळकोट…येळकोट जय मल्हार’, ‘खंडेराव महाराज की जय’ अशा घोषणा देत व भंडाऱ्याची उधळण करीत खंडोबाच्या भक्तांनी बारा गाड्या ओढल्या. शहरात पंचवटी, अमृतधाम, सातपूर कॉलनी तसेच देवळालीत खंडेरावाच्या मंदिरांत भाविकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातील मालेगावाजवळील चंदनपुरीलाही भक्तांनी ‘जय मल्हार’चा गजर एकच गजर केला.

देवळाली कॅम्प : येथील प्राचीन खंडेराव टेकडी येथे चंपाषष्ठी निमित्त मंदिरात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्या हस्ते व अण्णाज ग्रुपचे सदस्यांच्या उपस्थितीत पुजारी कमलाकर आमले व प्रकाश आमले यांनी महाअभिषेक महाआरती झाली. या वेळी नितीन आमले, प्रशांत म्हस्के, सचिन आमले आदींसह मंदिराचे विश्वस्त शिंगवे बहुला येथील भाविक उपस्थित होते.

टेकडीवर भाविकांनी आपल्या घरातील देवाचे टाक भेटीसाठी आणत बाहेर सूर, खंजिरी आणि संबळाच्या तालावर ‘हर हर महादेव,चिंतामण मोरया! देव गेले जेजुरा, सोन्याची जेजुरी’ असा नामाने देवाचा तळीभंडार उधळला, आपापले कुलाचार पार पाडले. टेकडी परिसरात खाऊची व खेळण्यांची दुकाने बच्चेकंपनींनी गजबजून गेली होती. सालाबादाप्रमाणे आमले परिवाराच्या वतीने भगूर येथून पालखी मिरवणूक टेकडीवर आण्यात आल्यावर तेथे पूजन व महाआरती झाल्यानंतर भाविकांना विश्वस्तांच्या वतीने महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात आला. दुपारी ३ वाजता देवळाली कॅम्प शहरासह परिसरातून वाजतगाजत काठी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. तर ६ वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी लक्ष्मण पाटोळे, सतीश मेवानी, प्रवीण पाळदे आदींसह भाविक उपस्थित होते. रात्री जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाने टेकडी परिसर गजबजून गेला होता. येथील अण्णाज् ग्रुपच्या वतीने महाआरती करण्यात येऊन उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नागेश देवाडिगा आदींनी भरीत भाकरीच्या महाप्रसादाचे भाविकांना वाटप केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटी सेलचे महापालिकेला वावडे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील ब वर्ग महापालिकेत पालिकेचा समावेश होवून दोन वर्ष लोटले तरी, पालिकेत माह‌िती तंत्रज्ञान कक्ष (आयटी सेल) स्थापन झालेला नाही. विशेष म्हणजे नव्या आकृतीबंधातही आयटी सेल बाबत कानावर हात ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या पालिकेत तांत्रिक विभाग असला तरी, त्यात मनुष्यबळाचाच अभाव आहे. राज्यातील सर्व ब वर्ग महापालिकांमध्ये आयटी सेल असताना, केवळ नाशिक महापालिकेतच त्याचा अभाव आहे. एकिकडे कॅशलेस कारभाराकडे वाटचाल करायची तयारी पालिकेने सुरू केली असतांना, या तयारीसाठी बॅकबोन असलेल्या आयटी सेलकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.महापालिकेचा समावेश क वर्गातून ब वर्गात झाल्यानंतर मनुष्यबळाची संख्या १४ हजारवर पोहचणार आहे. तसेच ब वर्गामुळे नवीन विभागांचीही निर्मिती केली जाते. त्यात माह‌िती तंत्रज्ञान विभाग महत्त्वाचा असतो. सध्या पालिकेत केवळ संगणक विभाग आहे. तएका अधिकाऱ्यासह तीन ते चार कर्मचारीच कार्यरत असून, ते पूर्ण प्रशिक्षीत नाही. आयटी सेल सुरू झाल्यास २५ ते ३० आयटी तज्ज्ञ उपलब्ध होवून पालिकेचा संपूर्ण कारभार सुरक्षित होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाहतुकीची तक्रार करा व्हॉट्सअॅपवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सेफ्टी मोहिमेंतर्गत प्रादेशिक परिवहन विभागाने पहिल्याच दिवशी ५१ वाहनांवर कारवाई केली. यातील १७ वाहने जप्त करण्यात आली असून, अवैध वाहतूक, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांना व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नाशिकरोड परिसरात चालती स्कूल पेटल्याची घटना नुकतीच घडली. गॅस कीटमुळे वाहनाला आग लागली होती. सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही. मात्र, अवैध विद्यार्थी वाहतुकीचा मुद्दा यामुळे पुन्हा समोर आला. आरटीओ विभाग खडबडून जागा झाला असून, अवैध विद्यार्थी वाहतूक, फ्रंट शीट प्रवासी, परवाना नसलेले वाहनचालक यांच्या विरोधात सोमवारपासून मोहीमच उघडली आहे. याबाबत बोलताना प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले, की अवैध वाहतूकविरोधात आम्ही ‘नाशिक सेफ्टी’ नावाने मोहीम हाती घेतली आहे. यात जनजागृतीबरोबर कारवाईसुद्धा करण्यात येत आहे. चार टप्प्यांत या मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून, मोहिमेची सुरुवात सोमवारपासून करण्यात आली. पहिल्याच दिवशी ५१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील १७ वाहनांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नऊ स्कूल व्हॅनवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यानंतर ३३ ऑटो रिक्षा, दोन स्क्रॅप झालेल्या मात्र वापरात असलेल्या रिक्षा, तसेच फ्रंट शीट प्रवासी वाहतूक करणाऱ्या सात रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान, आरटीओ विभागाने सुरू केलेल्या कारवाईची चाहूल लागल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्या वाहनचालकांनी रिक्षा, स्कूल व्हॅन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नियमांची पूर्तता करण्यासाठी बहुतांश स्कूल व्हॅन व रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयात गर्दी केली होती.

आमचा सध्या सर्व फोकस स्कूल व्हॅनवर केंद्रित आहे. परवाना व इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी काही स्कूल व्हॅन चालक आरटीओत आले आहे. मात्र, अद्याप काही वाहने बंद ठेवून कारवाईपासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. स्कूल व्हॅन चालकांनी नियमांची पूर्तता करावी.

- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मटा’तर्फे ‘तीन पायांची शर्यत’

0
0

कल्चर क्लबतर्फे रविवारी रंगणार नाट्यप्रयोग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाही विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिर येथे रविवारी (दि. ११) रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘तीन पायांची शर्यत’ या नाटकाचा शो होणार आहे.

नाटक तिकिटाच्या किमतीत कल्चर क्लब सभासदांसाठी ऑफर देण्यात आली आहे. कल्चर क्लबच्या सभासदांसाठी तिकीटात ५० टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. २०० रुपयांचे तिकीट १०० रुपयांत मिळणार आहे. तिकीट असेपर्यंत ही ऑफर सुरू राहील. तिकीट महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध तसेच कालिदास कलामंदिर येथे सकाळी ९ ते दुपारी १२.३० व सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत उपलब्ध आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबअंतर्गत अनेक कार्यक्रम घेण्यात आले. विविध सेमिनार, वर्कशॉप, स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम आदींचा यामध्ये समावेश होता. यावर्षीही अशाच स्वरूपाचे अनेक कार्यक्रम झाले. तर काही कार्यक्रम प्रस्तावित आहेत.

आगामी कार्यक्रम

कल्चर क्लब मेंबर्ससाठी गेट-टूगेदरनंतर झुम्बा वर्कशॉप झाला. येत्या ९ डिसेंबरला महिलांसाठी खास किटी पार्टी, ११ डिसेंबरला तीन पायांची शर्यत या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हेरिटेज टूर, एकदिवसीय सहल, संगीत महोत्सव, कुकिंग वर्कशॉप, रांगोळी स्पर्धा, प्रसिद्ध तारे तारकांना भेटण्याची संधी, राहुल देशपांडे यांची सांगितिक मैफल यासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम आगामी काळात होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेतही हवाय महिला खो-खो संघ

0
0

Mahesh.pathade@timesgroup.com
@maheshpathadeMT

नाशिक ः महिला खो-खोची वाटचाल चांगली आहे. ती उत्तम होण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. रेल्वेने पुरुष खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. मात्र, तेथे महिला संघ नाही. एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने यंदा प्रथमच महिला खो-खो संघ उतरवला आहे. रेल्वेतही महिला संघ आला तर नक्कीच महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. व्यावसायिक खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा खो-खोतील ‘गोल्डन स्लॅम’कन्या फलटणची विज्ञान शाखेतील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी प्रियंका येळे व अहमदनगरची कला शाखेतील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी श्वेता गवळी हिने ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

टेनिसमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच, यूएस ओपन, विम्बल्डन आणि ऑलिम्पिक या चारही स्पर्धांत गोल्ड मेडल मिळविणाऱ्या खेळाडूला ‘गोल्डन स्लॅम’चा बहुमान मिळतो. हा ‘गोल्डन स्लॅम’चा बहुमान आतापर्यंत जगातील चारच खेळाडूंना मिळाला आहे- स्टेफी ग्राफ, आंद्रे आगासी, रफाएल नदाल आणि सेरेना विल्यम्स. खो-खोमध्येही १४, १८ आणि वरिष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळविणाराही ‘गोल्डन स्लॅम’पेक्षा कमी नाही. भारतात केवळ दोन मुलींनी हा किताब मिळविला आहे- फलटणची प्रियंका येळे व अहमदनगरची श्वेता गवळी. या दोन्ही महाराष्ट्रकन्यांना १४ वर्षांखालील वयोगटात इला (वीरबाला) पुरस्कार, १८ वर्षांखालील गटात जानकी पुरस्कार, तर वरिष्ठ गटात राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळाला आहे. हे तिन्ही पुरस्कार राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला मिळतात. प्रियंकाला या पुरस्कारांव्यतिरिक्त शिवछत्रपती पुरस्कारही मिळालेला आहे, तर श्वेताने गुवाहाटीतील दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

एमएसईबी, पोलिस विभाग, महापालिकेतही स्पोर्ट कोट्यातून खेळाडूंना संधी मिळत असली तरी या विभागांचे संघ खेळताना दिसत नाहीत. किंबहुना या विभागांतर्गत स्पर्धांमध्ये तरी खो-खोचे महिला व पुरुष संघ सहभागी व्हायला हवे, असे प्रियंका व श्वेताने आवर्जून नमूद केले. कबड्डीला प्रो-कबड्डीमुळे ग्लॅमर मिळालं, तसा बदल खो-खोमध्येही व्हायला हवा. मराठमोळा खो-खो वेगवान खेळ असूनही मागे पडतोय. त्याला ग्लॅमर मिळण्यासाठी प्रो-खो खोसारखे इव्हेंट व्हायला हवेत, अशी अपेक्षा प्रियंकाने व्यक्त केली. आणखी एक-दोन वर्षे खेळून स्पर्धापरीक्षा देण्याचा प्रियंकाने निर्णय घेतला आहे, तर श्वेताला अजून खूप खेळायचे आहे. बदलत्या खो-खोबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की पूर्वी एक खेळाडू ९ मिनिटांपर्यंत खेळल्याची उदाहरणे आहेत. आता तीन-चार मिनिटांपेक्षा जास्त टायमिंग कोणतीही मुलगी देऊ शकत नाही. मुलींची क्षमता वाढायला हवी, अशी अपेक्षा प्रियंका आणि श्वेताने व्यक्त केली.

सुरक्षा गणवेश उत्तम

नाशिकमधील प्रत्येक स्पर्धेतून वेगळेपणा जाणवतो. यंदाही नाशिकने महिला खेळाडूंसाठी ‘सुरक्षा गणवेश’ तयार केला आहे. महिला खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो अत्यंत उपयुक्त आहे. सूर मारणाऱ्या महिलांसाठी तो खूपच चांगला आहे. कोणतीही इजा होत नाही. हा गणवेश सर्व दृष्टीने योग्य असून, धावण्यातील वेगावरही परिणाम झालेला नाही. स्पर्धांमध्ये या गणवेशाला परवानगी मिळायला हवी. सुरक्षित खेळासाठी तो उत्तम असल्याचे मत प्रियंका आणि श्वेताने व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खोमध्ये स्पीडपेक्षा स्कील महत्त्वाचे

0
0

फणिंद्र मंडलिक

नाशिक शहरात निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धा सुरू असून, यात स्पर्धकांप्रमाणेच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेले खेळाडू नाशिककरांच्या भेटीला आले आहेत. दक्षिण अशियाई खो-खो स्पर्धेचा कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या व सध्या मध्य रेल्वेकडून खेळणाऱ्या योगेश मोरेसोबत केलेली बातचीत.

तुझ्या खेळाची सुरुवात कशी झाली?

मी मूळचा इचलकरंजीचा. आमच्या गावात लहानपणापासून खो-खो गल्लीबोळात खेळला जायचा. त्यामुळे या खेळाकडे वळलो. हा खेळ पहिल्यांदा कधी पाहिला ते नीट आठवत नाही; परंतु पाचवीत असताना या खेळाची विशेष आवड निर्माण झाली. संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या जयहिंद क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. येथील प्रशिक्षक अमित नवाळे यांच्या मार्गदर्शनाने माझ्या खेळाला शास्त्रशुद्धता आली. घरची परिस्थिती बेताची असल्याने सुरुवातीला खेळण्याला विरोध होता. मात्र, खेळातील माझी प्रगती पाहून त्यांनीही प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. काही वेळा स्वतःच्या खर्चाने सामन्यांना जावे लागायचे. घरच्यांकडून पैसे मिळत नव्हते. कोल्हापूरला खेळायला गेलो आणि माझ्या खेळात आमूलाग्र बदल झाला. त्यांनतर सबज्युनिअर, ज्युनिअर अशा अनेक स्पर्धा गाजवल्या.

शालेय स्तर ते एकलव्य पुरस्कार प्रवास कसा होता?

कोल्हापूरपासून खेळाला सुरुवात केल्यानंतर कोल्हापूरच्याच संघाकडून सबज्युनिअर स्पर्धा खेळलो. २००४ मध्ये सीनिअर स्पर्धेत चार वेळा भाग घेतला. या कालावधीत भारतातील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. गावागावांतील खेळाचा अभ्यास करता आला. नामवंत खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी मिळाली. त्यामुळे नकळत खेळात प्रगती झाली. २००९ मध्ये भारतीय रेल्वेकडून खेळण्याची संधी मिळाली. आज मी मध्य रेल्वेकडून खो-खो खेळतो आहे. मध्य रेल्वेचा संघ संपूर्ण भारतात बलाढ्य संघ म्हणून मानला जातो. अशा संघात माझा समावेश झाला, यासारखे सुख नाही. लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव कसा होता?

लहानपणापासून खो-खोवर नितांत प्रेम केलं. त्याचं फळ मला मिळालं. ज्या वेळी भारताकडून मी दक्षिण अशियाई स्पर्धेसाठी सिलेक्ट झालो, त्या वेळी माझा आनंद गगनात मावत नव्हता. गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ व भारत हे पाच संघ सहभागी झाले होते. यात भारताचा संघ विजयी ठरला. माझी कर्णधारपदाची कारकीर्द फळाला आली. या वेळी आमच्या इचलकरंजीत माझे होर्डिंग लागले होते. मी गावात प्रवेश केल्यावर गावातील लोकांनी माझे स्वागतही केले होते.

आतापर्यंतचा आनंदाचे व दुःखाचे क्षण कुठले?

जीवनात आनंद आणि दुःख सारखेच आले. बारामतीमध्ये मला जेव्हा एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तो माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण होता. दुःखाचे म्हणाल तर एकदा आंध्र प्रदेशला खेळण्यासाठी गेलो असताना तेथे मला खेळण्याची संधी मिळाली नाही. प्रशिक्षकांनी राष्ट्रीय संघात माझा समावेश केला नाही. या वेळी खेळ सोडून द्यावा असे वाटायला लागले. पुन्हा खो-खोच्या खांबाला हात लावायचे नाही असे ठरवले. मात्र, काही कारणास्तव पुन्हा खेळाकडे वळलो. पुन्हा जोमाने सुरुवात केली. माझ्यातील उणिवा दूर केल्या आणि मोठ्या निश्चयाने दुसऱ्या वर्षी मी सिलेक्ट झालो.
खो-खोतील परिवर्तनाबाबत काय वाटते?

पूर्वीसारखा खो-खो राहिला नाही असे सर्वजण म्हणतात, तरीही आज तरुणाई या खेळाकडे पुन्हा वळते आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात खो-खो असोसिएशनच्या शाखा निर्माण झाल्या असून, खो-खोचा विस्तार वाढतो आहे. नवीन खेळाडू जुन्या खेळाडूंच्या चालींचा सखोलतेने अभ्यास करून यश मिळवीत आहे. पूर्वी खो-खोमध्ये बुद्धिचातुर्याचा वापर जास्त प्रमाणात व्हायचा. मात्र, आता तो तितकासा होताना दिसत नाही. सध्या फक्त चपळाईकडे खेळाडूंचे लक्ष आहे. यातील चालींचा अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मला प्रामुख्याने वाटते. प्रो कबड्डीमुळे कबड्डीला ज्याप्रमाणे सोन्याचे दिवस आले त्याप्रमाणे येत्या काही दिवसांत खो-खोलादेखील निश्चित येतील यात शंका नाही.

नवीन खेळाडूंना काय संदेश देशील?

खो-खोमध्ये बुद्धी आणि ताकद या दोघांचा वापर होत असतो. जे खेळाडू सध्या खो-खो खेळत आहेत ते खरंच भाग्यवान आहेत. खेळाडूंच्या आयुष्यात संधी येत असते. त्याचे सोने करता आले पाहिजे. प्रत्येक खेळात व्यावसायिकता आली आहे. तशी खो-खोतदेखील आली आहे. व्यावसायिक खेळाचे मार्ग खुले झाले आहे. पूर्वी या खेळात पैसा नव्हता. सध्याच्या काळात खो-खोमध्ये करिअर करणे शक्य आहे. जितके प्रामाणिकपणे खेळाल तितके यश तुमच्या हाताशी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी शिपाईपदासाठी उच्चशिक्षितांचीही रांग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंजिनीअर्स, एमबीए, आयटीआय, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी वर्ग एक व वर्ग दोनच्या नोकरीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. मात्र, नाशिक महापालिकेत नेमका उलटा प्रकार समोर आला आहे. इंजिनीअर्स, एमबीए, आयटीआय व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागातल्या कंत्राटी शिपाईपदासाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे केवळ नऊ पदासांठी उच्चशिक्षितांचे चक्क १२४१ अर्ज आल्याने प्रशासनही चक्रावले आहेत. त्यामुळे महापालिकेला आता शिपाईपदासाठी या इच्छुकांची लेखी परीक्षा घेण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागात सध्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत काही पदावंर कत्रांटी पदासाठी भरती सुरू आहे. यामध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर, लेखापाल, लॅब टेक्निशियन, सुपरवायजर, स्टाफ नर्स, शिपाई अशा ५८ पदासांठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी महापालिकेकडे जवळपास २६०० अर्ज प्राप्त झाले आहेत. वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, सुपरवायजर या पदांसाठी अधिक अर्ज येणे अपेक्षित होते. मात्र, चक्र मात्र उलटे फिरले आहे. या कंत्राटी पदाच्या भरतीत शिपाईपदाच्या नऊ जागांसाठी सर्वाधिक १२४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. एवढे अर्ज प्राप्त होणे स्वाभाविक असले तरी या पदासाठी उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज करणे हे धक्कादायक आहे.

वैद्यकीय विभागातील शिपाईपदासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान सातवी पास आहे. मात्र, या शिपाईपदाच्या अर्जांमध्ये इंजिनीअर, एमबीए, आयटीआय, एमसीएम, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांचा समावेश आहे. यात अनेक अर्ज द्विपदवीधरही आहेत. त्यामुळे शिपाईपदासाठी आलेले अर्ज पाहून पालिका प्रशासनही चक्रावले आहे. उमेदवारांची छाननी करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शिपाईपदापेक्षा उच्च पदाच्या वैद्यकीय अधिकारी, डाटा ऑपरेटर, सुपरवायजर्स अशा पदासांठी मात्र अर्जांची संख्या शंभर ते दोनशेच्या आत आहे.

वेतन फक्त चार हजार

वैद्यकीय विभागातील ज्या शिपाईपदासाठी उच्चशिक्षित उमेदवारांचा अर्जांचा पाऊस पडला आहे, त्या पदासाठी वेतन मात्र अवघे चार हजार रुपये आहे. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असून, त्यासाठी चक्क इंजिनीअर्स, एमबीए झालेल्या उमेदवारांचे अर्ज आल्याने बेरोजगारीची भयावह परिस्थिती समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने एकास ९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील इतर पाच संशयित अल्पवयीन असून, त्यांची रवानगी उंटवाडी रोडवरील बालनिरीक्षणगृहात करण्यात आली आहे. ही घटना समोर आल्याने सिडकोसह शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी विविध स्कूलमध्ये भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद सुरू केला आहे.

अश्विननगर परिसरातील १३ वर्षीय विद्यार्थिनीने रविवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी संभाजी स्टेडियमसमोर राहणाऱ्या किशन जयप्रकाश जागर (वय २१) याला अटक केली, तर उर्वरित पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिडकोतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पीडित मुलगी शिक्षण घेते. संशयितांपैकी दोन मुले तिच्याच शाळेत असून, त्यातून त्यांची ओळख झाली. या दरम्यान या दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या अन्य मित्रांशी पीडित मुलींची ओळख करून दिली. हे सर्व व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. यातील सज्ञान संशयित जागर हा कॉलेजचा विद्यार्थी असून, या ग्रुपमध्ये पीडित मुलीच्या काही ओळखीच्या मुलींचा सहभाग झाला. याच ओळखीचा फायदा घेत सप्टेंबर २०१६ मध्ये एका रविवारी नोट्स घेण्याच्या बहाण्याने पाच अल्पवयीन व जागर याने आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे पीडित मुलीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईला संशय आल्याने तिने मुलीकडे चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. काही व्हिडीओ क्लिप्स व व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगच्या आधारे संशयित आरोपी पीडित मुलीला ब्लॅकमेल करीत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

दरम्यान, अंबड पोलिसांनी रविवारी रात्रीच जागरला अटक करीत सोमवारी कोर्टासमोर हजर केले. व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेली चॅटिंगची माहिती, तसेच फोनमधील इतर पुरावे संकलित करायचे असून, बलात्काराचा कट कोणी व कसा रचला, याचा तपास करायचा असल्याने कोर्टाने जागरला ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य पाच अल्पवयीन मुलांची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांचे समुपदेशन व तपासणी

या घटनेचा संभाव्य परिणाम लक्षात घेता सोमवारी अंबड पोलिसांनी पीडित मुलीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. इंटरनेट व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांना पोलिसांनी मुलांना समजून सांगितल्या. याबरोबर शाळा बंक करून फिरणाऱ्या विद्यार्थ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. मोकळी मैदाने, गार्डन्स आदी ठिकाणी पोलिसांनी पाहणी सुरू केली असून, संशयास्पद मुलांच्या पालकांना ही माहिती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक छळाच्या घटनांची गंभीर दखल घेऊ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्येही लैंगिक छळाच्या तक्रारी असल्याचे सकृतदर्शनी दिसते. या घटनांबाबत आदिवासी विभागाकडून शहानिशा केली जाईल. प्राप्त तक्रारींचे पुढे काय झाले, याकडे जिल्हाधिकारी म्हणून आमची यंत्रणाही लक्ष ठेवेल. लैंगिक छळाच्या घटनांची गंभीर दखल घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी दिली.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पाळा आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सुमारे १५० आश्रमशाळांची ३० पथकांद्वारे तपासणी करण्यात आली होती. शाळांमध्ये ठेवलेल्या तक्रारपेट्यांमध्ये विद्यार्थिनींनी निःसंकोचपणे तक्रारी केल्या.

‘जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारी’ अशा शीर्षकाखाली ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. आदिवासी आयुक्तालय असलेल्या नाशिक जिल्ह्यातच आश्रमशाळांमधील मुली सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब यामुळे समोर आली. मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा विशेष सूचना म्हणून हिवाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे.

‘मटा’च्या वृत्ताची, तसेच मुलींकडून प्राप्त लेखी तक्रारींची दखल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी घेतली आहे. मुलींना तक्रारी करता याव्यात, यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत आनंदी पेटी ठेवली होती. या पेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आल्या. त्यामध्ये काही तक्रारी लैंगिक छळाच्या असल्याचे सकृतदर्शनी दिसते. आश्रमशाळांच्या तपासणीची प्रक्रिया आम्ही अत्यंत पारदर्शकपणे राबविली आहे. लैंगिक छळाच्या घटना आम्ही गांभीर्याने घेणार आहोत. कारवाई करण्यापूर्वी या तक्रारींची शहानिशा करणे आवश्यक आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या तक्रारींची शहानिशा केली जाईल. त्यावरही जिल्हा प्रशासनाचे लक्ष राहील. आश्रमशाळांमधील मुलींनी केलेल्या तक्रारी कदापी दुर्लक्षिल्या जाणार नाहीत, असेही राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. स्वयंपाकी, मुख्याध्यापक यांच्या वर्तवणुकीबद्दल काही मुलींनी आक्षेप नोंदविले आहेत. मुलींना स्वयंपाकात मदत करायला सांगितले जाते, पोटभर जेवण दिले जात नाही, शिक्षणाचा दर्जा खालावला आहे, आश्रमशाळांत महिला वॉर्डन नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, या सर्व तक्रारींची दखल घेतली जाईल, अशी माहिती राधाकृष्णन बी. यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्याचे समोर आले असून यामध्ये एका प्रौढासह पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब नाशिकमध्ये समोर आली आहे. यापैकी प्रौढ आरोपीस न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर पाच अल्पवयीन संशयितांची रवानगी उंटवाडी रोडवरील बालनिरीक्षणगृहात करण्यात आली आहे. या घटनेमुळे सिडकोसह नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

सिडकोतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १३ वर्षीय पीडित मुलगी शिक्षण घेते. नाशिकमधील अश्विननगर परिसरातील या विद्यार्थिनीने रविवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी संभाजी स्टेडियमसमोर राहणाऱ्या किशन जयप्रकाश जागर (वय २१) याला अटक केली, तर उर्वरित पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांपैकी दोन मुले तिच्याच शाळेतील असल्याने तिच्या ओळखीची आहेत.

पोलिसांकडून समुपदेशन

या घटनेचा संभाव्य परिणाम लक्षात घेता सोमवारी अंबड पोलिसांनी पीडित मुलीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. मोकळी मैदाने, बगिचे आदी ठिकाणी पोलिसांनी पाहणी सुरू केली असून, संशयास्पद मुलांच्या पालकांना ही माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्किंगसाठी मोबाइल अॅप

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिका प्रशासनाने शहरातील पार्किग व्यवस्था सुधारण्यासाठी तीन टप्प्यात नियोजन केले असून, दुचारी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. सुनियंत्र‌ित, सुत्रबद्ध पार्किंगसाठी ऑनट्रीट पार्किंग, ऑफट्रीट पार्किंग, रोटरी पार्किंग सिस्टीम अशा तीन प्रकारात पार्किंगचे विभाजन केले असून, या पार्किंग स्थळांचे पूर्ण नियंत्रण मोबाईल पार्किंग अॅपने केले जाणार आहे. पालिकेच्या या नियोजनामुळे शहरात ३४ रस्त्यांवर तर पाच खुल्या मैदानांवर पार्किंगची व्यवस्था होणार आहे. तसेच ११ ठिकाणी बहुमजली पार्किंगची सुविधा होणार असून, वाहतुकीच्या कटकटीतून नाशिककरांची सुटका होणार असल्याचा दावा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केला आहे.

शहरातील सध्या जवळपास सात लाख चारचाकी व दुचाकी वाहने आहेत. या वाहनामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असून, ध्वनी व वायु प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासह पार्किंगच्या व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आला आहे. पालिकेने पार्किंगचे तीन प्रकारात विभाजन केले आहे.

ऑनट्रीट पार्किंग प्रकारात शहरातील ३४ प्रमुख रस्त्यांवर चारचाकी व दुचाकीसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लांबीचा पट्टा व दुचाकीसाठी स्वतंत्र पट्टा असणार आहे. सदर जागेतच वाहनचालकांने वाहने पार्किंग करायची असून त्यामध्ये गंगापूर रोड, भद्रकाली, पंटवटी, त्र्यंबक रोडवरील रस्त्यांचा समावेश आहे. गजबजलेल्या ३४ ठिकाणी या पार्किंगची व्यवस्था असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रकारात ऑफट्रीट पार्किंग असणार आहे. शहरातील पाच मैदानांमध्ये ही सुविधा असणार आहे. बीडी भालेकरसह रामकुंड परिसर, इंदिरानगर जॉगिंग ट्रक येथे २३ हजार ४४५ चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. तसेच शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांसह ११ ठिकाणी बहुमजली पार्किंग करण्याचा प्रस्ताव आहे.

कॅशलेस पार्किंग सुविधा
महापालिकेकडून तयार केलेल्या या तीनही पार्किंग व्यवस्था या मोबाइल पार्किंग अॅपने नियंत्रीत होणार आहे. प्रत्येक पार्किंगस्थळी क्युआर सांकेतिक कोड असणार आहे. या कोडसमोर वाहन उभे करून त्याचा फोटो वाहनधारकाने काढल्यानंतर त्याच्या खात्यातून कॅशलेश पद्धतीने रक्कम वजा होणार आहे. मोबाइल पार्किंग अॅप हे जीपीएस प्रणालीवर आधारीत असणार आहे. वाहनधारकाला हे मोबाइल पार्किंग अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अॅपमध्ये पार्किंग जागा शोधणे, पेमेंट करणे, इ-बील मिळवणे व वाहनांचा शोध घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी हवेत व्यवस्थापन सल्लागार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर महापालिकेने स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनची(एसपीव्ही) स्थापना केली आहे. या कंपनीच्या सीईओपदी विजय पगार यांच्या नियुक्तीनंतर आता पालिकेने कंपनीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या असून या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारावर स्मार्ट सिटीच्या नियोजनासह अंमलबजावणीची जबाबदारी असणार आहे.

नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाल्यानंतर आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्हीची स्थापना केली आहे. या एसपीव्ही कंपनीची एक बैठक संपन्न झाली असून, दुसऱ्या बैठकीची तयारी सुरू आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कंपनीच्या सीईओपदी उपायुक्त विजय पगार यांची नियुक्ती केली आहे. आता पाठोपाठ कंपनीच्या कामकाजाला वेग देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचे काम सुरू केले असून यासाठी पालिकेने जाहीरात प्रसिद्ध केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा ठिकाणी होणार सिग्नल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने शहरात नव्याने ११ ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात पालिकेने निवादा काढल्या असून, यासाठी एक कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या सिग्नल्समधून बहुचर्चेतील इंद‌िरानगरचा अंडरपास टाळण्यात आला आहे. तसेच ज्या चौकांमध्ये हे सिग्नल बसव‌िण्याची तयारी सुरू असली त्या चौकांचे आधीच काही खासगी विकासकांनी सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे पालिकेसमोरही सिग्नल उभ्या करण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने आतापर्यंत शहरात ३४ ठिकाणी सिग्नल बसविले आहेत. परंतु पोलिसांनी पालिकेला अजून १९ ठिकाणी सिग्नल बसविण्याची मागणी केली आहे. स्मार्ट सिटी योजनेत पालिकेनेही वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे महासभेने सकारात्मक भूमिका घेत, १९ पैकी ११ चौकांमध्ये सिग्नल बसविण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी पालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी एक कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून, तीन महिन्यात हे काम पूर्ण करावयाचे आहे. या नव्या सिग्नल्समध्ये त्र्यंबकरोड व गंगापूर रोडवरील चौकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकट्या गंगापूर रोडवरील पाच चौकांचा यात समावेश आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनचालकांच्या वेगाला काही अंशी ब्रेक लागणार आहे.


सुशोभीकरणाची अडचणी

महापालिकेने नुकतेच खासगी विकासकांच्या मदतीने सीएसआर उपक्रमांतून प्रमुख चौकांचे सुशोभीकरण केले आहे. नव्याने सिग्नल बसविण्याच्या यादीत या प्रमुख सुशोभीकरण केलेल्या चौकांचा समावेश आहे. या ठिकाणी सिग्नल बसवल्यास चौकांमधील सुशोभिकरण काढावे लागणार आहे. त्यामुळे विकासकांनी केलेला लाखोंचा खर्च वाया जाणार असून, शहराच्या सौंदर्यालाही नुकसान पोहाचणार आहे. त्यामुळे सिग्नल कसे बसवायचे असा पेच पालिकेसमोर आहे.

या ठिकाणी होणार सिग्नल

जेहान सर्कल

प्रसाद सर्कल

विद्याविकास सर्कल

पाइपलाइन रोड चौक

मायको सर्कल

एबीबी सर्कल

सिबल हॉटेल चौक

निलगिरी बाक चौक

सारडा सर्कल

बिगबाजार सर्कल

एचडीएफसी सर्कल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वनीप्रदूषणाची तक्रार करा व्हॉट्स अॅप, ट्विटरवर!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सणांनिम‌ित्त होणाऱ्या आतषबाजीमुळे तसेच सध्या लग्नसराईमुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि नाशिक पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून ध्वनी प्रदूषणाची तक्रार नागरिकांना थेट करता यावी यासाठी नाशिक पोलिसांनी व्हॉटसअॅप, ट्विटर तसेच १०० हा तक्रार क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.

ध्वनीप्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, श्रवणशक्तीवर दुष्परिणाम, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्यतांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. ध्वनीप्रदूषण नियम व नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. याचीच दखल घेऊन मुंबई हायकोर्टाने ध्वनी प्रदूषणाच्या विविध याचिकांच्या सुनावणीत अतिशय स्पष्ट असे विविध निर्देश दिले आहेत. कोर्टाच्या या निर्देशांचे पालन होण्यासाठीच नागरिकांनी पोल‌िसांत तक्रार करावी व पोल‌िसांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सध्या लग्नसराई जोरात असून या दरम्यान डीजेचा वापर तसेच ध्वनी प्रदूषणाच्या उल्लंघनाच्या अनेक घटना घडतात. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक शहर पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीच नाशिककरांनी थेट तक्रार करावी यासाठी नाशिक पोलिसांनी विविध हेल्पलाईन उपलब्ध करुन दिली आहे.

उल्लंघन केल्यास

ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून यासंदर्भात कठोर कार्यवाहीचे आदेश राज्य सरकारने सरकारने पोलीस नियंत्रणास दिले आहेत.

अशी आहे ध्वनी मर्यादा

ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार औद्योग‌िक क्षेत्रात दिवसा ७५ डेस‌िबल तर रात्री ७० डेस‌िबल एवढी ध्वनीमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा ६५ डेस‌िबल तर रात्री ५५ डेस‌िबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेस‌िबल तर रात्री ४५ डेस‌िबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेस‌िबल ते रात्री ४० डेस‌िबल पर्यंत ध्वनीमर्यादा आहे.

येथे करा तक्रार

व्हॉट्सअॅप – ८३९०१८९५८४, ८३९०२०९५१८, ९०७५०११२२२

हेल्पलाइन – १००, ९७६२१००१००, ९७६२२००२००

शहर पोलिस वेबसाइट - http://nashikpolice.com/

नाशिक शहर पोलिस ट्विटर - @nashikpolice

डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त ट्विटर - @ravindersingal

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांनो, यांच्याकडे लक्ष द्या!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कॉलेज कॅम्पसमध्ये नसेल एवढी विद्यार्थ्यांची गर्दी आसाराम पुलाजवळील गोदापार्कवर होत असते. या ठिकाणी मंगळवारी पोलिसांनी हजेरी लावल्याने झाडाझुडपांत बसलेल्या मुला-मुलींची एकच धावपळ उडाली. कॉलेज बंक करून भविष्याची दिशा बिघडू पाहणाऱ्या या मुलांच्या पालकांशी संपर्क करून मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
सिडको परिसरातील एका तेरा वर्षांच्या मुलीवर सहा जणांनी सामूह‌िक बलात्कार केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर अंबड, सातपूर इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी विविध शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दुसरीकडे परिमंडळ दोनमध्ये पोलिसांनी कॉलेजरोड, आसाराम बापू पूल परिसर, कृषीनगर जॉग‌िंग ट्रॅक, गंगापूर रोडवरील अन्य काही ठिकाणी कारवाई केली. याबाबत बोलताना सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ म्हणाले की, कॉलेज किंवा शाळा बंक करून शेकडो विद्यार्थी दररोज या भागात टवाळकी करतात. यामुळे त्यांच्या पालकांची फसवणूक तर होतेच, मात्र मुलांचे भविष्यही खराब होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या विविध पथकांनी वरील ठिकाणी कारवाई केली. संबंध‌ित मुलांना शाळा किंवा कॉलेज बंक केल्याने होणाऱ्या नुकसानीची माहिती देण्यात आली. मुलांचे आयकार्ड तपासण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंध‌ित मुलांच्या पालकांना मुले बाहेर फिरतात, हे मोबाइलद्वारे कॉल करून अवगत करून देण्यात आल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. मुलांवर कारवाई करणे हा उद्देश आमचा नाही. मात्र, आपली मुले काय करतात, हे त्यांच्या पालकांना ठाऊक असायला हवे म्हणून पुढाकार घ्यावा लागत असल्याचे भुजबळ म्हणाले.

पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र होणे हा एकमेव पर्याय आहे. मुलांचे काहीतरी चुकतेय याची जाणीव पालकास झाल्यास अनेक गंभीर समस्यांवर उत्तर सापडेल. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. मुले दोन ते तीन दिवस कॉलेजला दांड्या मारतात, याची खंत कॉलेज व्यवस्थापनला वाटत नाही. आपला पाल्य काय करतो, याची माहिती पालकांनी ठेवायला हवी.
- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images