Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आज मिळणार ६५०० डॉक्टर

$
0
0
महाराष्ट्राच्या डॉक्टरांच्या संख्याबळात आज साडेसहा हजारांची भर पडणार आहे. यातील ६० डॉक्टर हे सुर्वणपदक विजेते असणार आहेत.

अन् पोलिसांची धांदल उडाली !

$
0
0
नागरिकांसाठी छळछावणी ठरलेल्या बहुचर्चित उंटवाडी पोलिस चेक पोस्टवर गुरूवारी सकाळी अर्धा तास मोठं नाट्य घडलं. या चेक पोस्टवरील पोलिसांनी गाडी अडवून शिविगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत बटाविया कुटुंबियांनी संताप व्यक्त केला.

आणखी तीन कोटींचे घबाड

$
0
0
अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) गुरुवारी चिखलीकरच्या अहमदनगर येथील दोन बँकांतील तीन लॉकरची तपासणी केली तेव्हा त्यात तब्बल ३ कोटी २७ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतीश चिखलीकर आणि इंजिनीअर जगदीश वाघ यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

आम्हा काय त्याचें...!

$
0
0
फाळके यांच्या सुपिक डोक्यातून निघालेल्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीला एव्हाना शंभर वर्षे पूर्ण झाली. अर्थातच या व्यवसायाला शंभर वर्षे झालीत. प्रचंड मोठा विस्तारलेला हा व्यवसाय पाहिला तर डोळे दीपतात.

मनमाडकरांची २ महिन्याची चिंता मिटली

$
0
0
मनमाड शहरासाठी पालखेड डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या रोटेशनच्या पाण्यामुळे पाटोदा येथील साठवणूक तलाव पूर्ण भरला असून हे पाणी शहराला दीड ते दोन महिने पुरेल असे नगरपालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

८५ तालुक्यांतील पाणीसंकट दूर

$
0
0
हरणबारी धरणाचे अखेरचे रोटेशन सोडण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या आदेशाची गुरुवारी रात्रीच अंमलबजावणी करण्यता आली.

नंदूरबारमध्ये साकारणार मेडिकल कॉलेज

$
0
0
आदिवासी व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदूरबारमध्ये मेडिकल कॉलेज साकारण्याच्या प्रकल्पाला पंधरा दिवसात गती मिळेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.

‘ते कॉल्स’ जेलच्या बाहेरून

$
0
0
विविध गुन्ह्याप्रकरणी नाशिक सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या दोघा गँगस्टारांनी मुंबईतील नगरसेवकाला खंडणीसाठी धमकावल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

संशयितांना पकडा

$
0
0
पुर्ववैमनस्यातून झालेल्या दोघांच्या हत्याकांडात फरार असलेल्या चौघा आरोपींना त्वरित अटक करावी, अशा आशयाचे निवेदन चांगले समर्थकांनी पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांना शुक्रवारी सादर केले.

मुख्य सचिवांचा दौरा पार ‘पडला’!

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती शुक्रवारी नाशकात आली. पण, कुठल्याही ठोस ‘कामगिरी’शिवाय या समितीचा दौरा पार पडला.

पाण्यासाठी पक्षांची तडफड

$
0
0
निसर्गात मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांनाही ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसत असून, पाण्याअभावी चक्कर येऊन पडणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढत आहे. अशा पक्षांना मीठ, साखर आणि पाणी देण्याची शक्कल नागरिकांकडून लढविली जात आहे.

पेट्रोल स्वस्त; रिक्षा महागच

$
0
0
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या दीड महिन्यात पेट्रोलचे दर तब्बल पाच रुपयांनी कमी होऊनदेखील शहरातील रिक्षांचे मीटर मात्र अजूनही ‘हाय’ आहेत.

आरोपांचा ‘चिखल’ अन् सचिवांची ‘कोंडी’

$
0
0
अफाट अपसंपदा जमा करणाऱ्या सतिश चिखलीकरच्या एकेक सुरस कथा बाहेर निघत असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव श्यामलकुमार मुखर्जी शुक्रवारी नाशिकला दाखल झाले खरे.

अशा गोष्टींची स्वतःहून चौकशी करावी लागते

$
0
0
सार्वजनिक बांधकाम खात्यातील लाच प्रकरणात निलंबित अभियंता सतीश चिखलीकर यांच्याविषयी बोलताना 'आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांची स्वतःहून चौकशी करायची असते, त्यासाठी कुणाच्या तक्रारीची गरज नाही' असे सांगत आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना अप्रत्यक्ष टोला हाणला.

गुन्हेगारांवर कारवाई करा

$
0
0
गेल्या काही दिवसात शहरात झालेल्या खून प्रकरणांमुळे नागरिक भयभीत झाल्याचे सांगत पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली.

नाट्यग्रंथ संहिता संग्रहालय लवकरच होणार खुले

$
0
0
सद्यस्थितीत नाट्य परिषदेच्या कार्यालयात अडीच ते तीन हजारांपेक्षाही जास्त नाट्यसंहिता आहेत. या संहितांचे स्कॅनिंग करून अद्ययावत ग्रंथालय निर्माण केले जाणार आहे. शहरातील रंगकर्मींसाठी हे ग्रंथालय म्हणजे संदर्भठेवाच असून कलावंतांना त्याची प्रचंड मदत होणार आहे.

शालेय व्यवस्थापन समित्यांना सोमवारपासून प्रशिक्षण

$
0
0
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत माध्यमिक शाळांमधील शालेय व्यवस्थापन समित्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याभरात १३ ते १९ मे दरम्यान ही शिबीरे घेतली जाणार आहेत.

कोंडी सोडविण्यासाठी सहा रस्ते होणार वन-वे

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी शहर पोलिसांनी सहा ठिकाणी वन-वे रस्ते बनवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी नागरिकांच्या काही हरकती आणि सुचना असल्यास १५ दिवसांच्या आता वाहतूक पोलिस कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आरोग्य विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

$
0
0
दोन महिन्यांसह थकलेल्या वेतनाबरोबरच धोक्यात आलेली पेन्शन योजना व इतर मागण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी दीक्षांत समारंभात काळ्या फित लावून सरकारचा निषेध नोंदविला.

ऑनलाइन होणार पहिलीच्या विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिलीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माहितेचे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवण्याचा उपक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images