Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कपाटकोंडी अखेर फुटणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हायकोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर राज्यातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महापालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याच्या सूचना पालिकेल्या केल्या आहेत. यामुळे कपाटकोंडी फुटण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत केल्यानंतर राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी राज्यातील महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यात बाल्कनी, कपाटांसाठी अतिरिक्त एफएसआयचा वापर करून नियमित करण्याचा शासनाचा प्रस्ताव होता. परंतु, हा निर्णय न्यायालयात टिकला नाही. हायकोर्टाने हा निर्णय रद्दबातल ठरवला असला तरी, त्यासंदर्भात एक निश्चित धोरण ठरवण्याच्या सूचना सरकारला केल्या होत्या. त्याचाच आधार घेत राज्य सरकारने आता या अनधिकृत बांधकामांचा अभ्यास सुरू केला आहे. नाशिक महापालिकेकडूनही अनधिकृत बांधकामांसंदर्भात अभिप्राय मागवला आहे. त्यानुसार नगररचना विभागाने अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

मार्चनंतर निर्णय?

महापालिकेने शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांच्या माहितीची जुळवाजुळव सुरू केली असून, तसा प्रस्तावही तयार करण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जुन्या गावठाणातील बांधकामांसह कपाटाचा प्रश्न ८० टक्के निकाली निघणार आहे. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खेळाडू घडण्यासाठी गावांतून प्रयत्न व्हावेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अर्ध्या रात्रीतून खेळाडू तयार होत नाहीत. त्यासाठी गावपातळीवरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट पद्मश्री अंजू बॉबी जॉर्ज हिने केले. मविप्र मॅरेथॉनप्रसंगी पत्रकारांशी तिने संवाद साधला.
अंजू पुढे म्हणाली, आपल्याकडे खेळाडू मोठे झाल्यावर त्याच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात होते. खेळाडू लहान असताना त्याच्याकडे लक्ष दिले तर भारत कोणत्याही खेळात निश्चितच नाव कमावेल. ऑलिम्पिकसाठी ज्या मुलभूत सुविधा खेळाडूंना आवश्यक आहेत, त्या गावपातळीपासून उपलब्ध करुन द्यायला हव्यात. तर यशप्राप्ती होईल. प्लॅनिंग कम‌िशनने याकडेही लक्ष द्यायला हवे. ऑलिम्पिक होण्याच्या आधी भारतात एक वर्ष सरावाला सुरुवात होते. खेळाडूंना काय हवे काय नको ते त्यावेळी पाह‌िले जाते. त्यामुळे खेळाडू अपेक्ष‌ित यश मिळवू शकत नाही. यात सातत्य असले तरच खेळाडू पदके मिळवू शकतील. माझी क्रीडा प्रबोधिनी आतापासून २०२० व २०२४ च्या ऑलिम्पिकची तयारी करते आहे. त्यासाठी अपेक्षित खेळाडूंवर विशेष मेहनत घेतली जात आहे. तेव्हा या ऑलिम्पिकमध्ये निश्चित यश मिळेल अशी आशा आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात वातावरण चांगले आहे. सध्या ४०० मीटर, ८०० मीटर, रेसल‌िंग, टेनिस या खेळांमध्ये चांगली प्रगती आहे. येणाऱ्या काळात या खेळाकडून चांगल्या अपेक्षा आहेत. भारत सरकारने खेलो इंड‌िया यासारखे उपक्रम सुरू करुन खेळाडूंच्या प्रगतीला हातभार लावला आहे. मी सुध्दा त्या कमिटीत आहे. या माध्यमातून खेळाडूंना नवनवीन तंत्र शिकण्यास मदत होईल, असे ती म्हणाली.

डोपिंगच्या वाटेला जाऊ नका

डोपिंगचे प्रमाण आपल्या देशात अत्यंत कमी आहे. मात्र, डोपिंग हा गुन्हाच आहे. कोणत्याही खेळाडूने या मार्गाला जाऊ नये. त्यामुळे खेळाडूंची कारकीर्द लवकर संपुष्टात येते. परदेशी कोचविषयी ती म्हणली की, भारतीय कोचमध्ये काहीही कमतरता नाही. त्यासाठी त्यांनाही चांगली प्रसिध्दी द्यायला हवी. परदेशी कोचप्रमाणे त्याचाही रिफ्रेशर कोर्स होणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या डाएटबद्दल ती म्हणाली की, आपल्याकडे फक्त भाजी, पोळी, भात असाच डाएट असतो. परदेशी खेळाडूंच्या तुलनेत तो अत्यंत कमकुवत आहे. त्यासाठी भारतीय खेळाडूंनीही व्यवस्थित डाएट घ्यावा व तो उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारनेही प्रयत्न करावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वृक्षतोडीबाबत स्थगितीचे आदेश

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीबाबत राज्याचे लोकायुक्त टेहलानीय यांच्याकडे येथील सामाजिक कार्यकर्ते निखील पवार यांनी तक्रार दाखल केली होती. याबाबतची सुनावणी नुकतीच मुंबई येथे होऊन अवैध वृक्षतोडीबाबत स्थगितीचे आदेश देण्यात आले.

या तक्रारी प्रकरणी लोकायुक्त यांनी तक्रारदार पवार तसेच उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावर यांचे म्हणणे ऐकून घेत शहर परिसरात अवैध वृक्षतोडीतील लाकूड कुठे येते, कसे येते त्या ठिकाणांसह विशिष्ट सॉमील, लाकूड विक्री केंद्रे, फर्निचर तयार करण्याचे कारखाने याबाबत तक्रार केल्यास त्यावर लोकायुक्त कार्यालयास पुढील कार्यवाही करणे सोपे होईल, अशी सूचना करत तक्रार स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. लाकूड विक्री केंद्रांना परवाना आवश्यक आहे. फर्निचर कारखाने, सॉमील, सायजिंग यांना दस्तान डेपो परवाना आवश्यक आहे. त्यामुळे सॉमीलला लाकूड प्रक्रियेसाठी परवाना दिला जातो. तर त्याठिकाणी लाकूड खरेदी-विक्री अवैध आहे. वनविभाग अवैध वृक्षतोड रोखण्यास अपयशी ठरल्याने कठोर कारवाईची मागणीही पवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांची झोळी पुन्हा रिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ग्रामीण भागातील स्टेट बँकेच्या शाखांमध्ये अवघे ५० कोटींचे चलन शिल्लक असून, शहरातील शाखांमध्येही खडखडाट झाला आहे. नाशिककरांना सोमवारी रिझर्व्ह बँकेकडून चलन प्राप्त होईल, असे सांगितले जात आहे. तसे झाले नाही तर आणखी काही दिवस नाशिककरांना चलनटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यातून नागरिकांचा असंतोष उफाळून येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
८ नोव्हेंबर हा देशात ऐतिहासिक दिवस ठरला. काळ्या पैशाला ब्रेक लावण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. या नोटा नागरिकांनी बँकांमध्ये जमा केल्या असल्या तरी त्या मोबदल्यात पुरेसे चलन बँकांमध्ये अद्याप उपलब्ध झालेले नाही. परिणामी नागरिकांना चलन टंचाईला सामोरे जावे लागते आहे. रिझर्व्ह बँकेकडून मागणीएवढा पुरवठा होत नसल्याने नाशिककरांनाही या चलनटंचाईची झळ बसते आहे.
नववर्षाच्या सुरुवातीला स्टेट बँकेला अवघे साठ कोटी रुपये उपलब्ध झाले. मात्र, जिल्हावासियांची दररोजची निकड पाहता ही रक्कम तूटपुंजी ठरू लागली आहे. शहरी भागातील स्टेट बँकेच्या शाखांमधील चलन तोकडे ठरू लागल्याने ग्रामीण भागातून १२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु, आता ग्रामीण भागातील स्टेट बँक शाखांची परिस्थितीदेखील नाजूक बनल्याने रिझर्व्ह बँकेकडून नाशिकसाठी चलन पुरवठा होणे गरजेचे बनले आहे. पुरेसे चलन उपलब्ध झाले नाही तर जिल्ह्यात आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

असंतोष उफाळण्याची शक्यता

रविवारच्या (दि.८) सुट्टीमुळे बँका बंद असणार आहेत. त्यामुळे आता हे चलन सोमवारीच मिळण्याची शक्यता आहे. परंतु, चलन मिळणार की नाही, मिळालेच तर नेमके किती मिळणार याबाबत मात्र अधिकाऱ्यांनाही स्पष्ट माहिती नाही. सोमवारी पुरेसे चलन प्राप्त होऊ शकले नाही, तर चलन वितरणाची प्रक्र‌ियाच बंद पडेल. परिणामी नागरिकांमधून उसळणाऱ्या असंतोषाला बँका तसेच जिल्हा प्रशासनाला सामोरे जावे लागू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उध्दव निमसेंचा आज भाजपप्रवेश

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
काँग्रेस पक्षाच्या तिक‌िटावर दोनदा नगरसेवक झालेले उद्धव निमसे आणि राष्ट्रवादीच्या तिक‌िटावर दोनदा नगरसेवक झालेले सुरेश खेताडे आज (सोमवार दि. ९) रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. प्रभाग दोनमधून इच्छुक असलेल्या या दोन्ही आजी-माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला खिंडार पडणार आहे.
महापालिका प्रभाग दोनच्या भागात आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. पहिल्या पंचवार्षिकमध्ये अपक्ष आणि शेकाप, दुसऱ्यात काँग्रेस आणि शेकाप, तिसऱ्यात राष्ट्रवादी, चौथ्यात काँग्रेस आणि शेकाप, पाचव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळविलेला आहे. या भागातून अजून एकदाही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना यश मिळविला आले नाही. शेकापच्या तिकीटावर तीनदा नगरसेवक झालेले अॅड. जे. टी. शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता निमसे आणि खेताडे हे भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजप यांच्यातील चुरशीची लढत या भागातून दिसणार आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप यांची महापालिका निवडणुकीसाठी जर युती झाली तर पक्षात ऐनवेळी प्रवेश करणाऱ्यांची मोठी गोची होणार असल्याची चर्चा रंगत आहे.

प्रचारदौरा सुरू

गेल्या कित्येक दिवसांपासून निमसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. त्यांनी माजी नगरसेवक सुरेश खेताडे आणि डॉ. अनिता लभडे यांच्यासोबत प्रभागात प्रचार दौरा सुरू केलेला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाबरोबरच खेताडे आणि लभडे यांच्याही प्रवेशाचा निमसे यांनी भाजपकडे आग्रह धरल्यामुळे या तिघांचा आज प्रवेश सोहळा होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रभाग दोनमधून शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत.

मनसे नगरसेविका ओहोळ शिवसेनेत
उपनगर येथील प्रभाग ३७ मधील मनसेच्या नगरसेविका सुमन ओहोळ, माजी नगरसेवक विजय ओहोळ, मनविसेचे नाशिक मध्यविभाग अध्यक्ष ललित ओहोळ यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नाशिकरोडला मनसेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
रविवारी मुंबईत मातोश्रीवर उध्दव ठाकरे, संपर्कप्रमुख अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, सेना शहरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. नगरसेवक शिवाजी सहाणे, विलास शिंदे आदी उपस्थित होते. याआधी मनसेचे नगरसेवक रमेश धोंगडे, अशोक सातभाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर शोभना शिंदे, संपत शेलार यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. ते सेनेत दाखल झाले आहेत. मनसेच्या नगरसेविका संगीता गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते श्रीराम गायकवाड, सुनीता गायकवाड, विक्रम कोठुळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावोगावी कॅशलेस व्यवहाराचा जागर

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

हजार-पाचशेच्या जुना नोटाबंदीनंतर आता देशात हळूहळू नोटा आर्थिक व्यवहारांची पद्धत बदलली असली तरी आजही मोठ्या संख्येने नागरिकांत या नव्या पद्धतीविषयी अज्ञान आहे. भविष्यात अनेक व्यवहार हे ‘ऑनलाइन’ होणार असल्याने याची माहिती ग्रामीण भागातील नागरिक, शेतकऱ्यांना असायला हवी या हेतूने जिल्हा बँकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. कॅशलेस व्यवहार कसे असतात, याची सविस्तर माहिती देण्यासाठी बँकेने येवला तालुक्यात कॅशलेस व्यवहार साक्षरता मार्गदर्शन मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत प्राचार्य गितेश गुजराथी गावोगावी प्रात्यक्षिक दाखवत नागरिकांना सविस्तर माहिती देत आहे.

येथील विभागीय कार्यालयाने मोठ्या लोकसंख्या असलेल्या १९ गावात या डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन केले आहे. आतापर्यंत तालुक्यातील अनकाई, सावरगाव, रहाडी, गवंडगाव, अंदरसूल, मुखेड, जळगाव नेऊर, देशमाने या गावात ही साक्षरता कार्यशाळा झालेली आहे. यामध्ये नागरिकांना विविध चित्रफिती व प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. या शिबिरात कॅशलेस व्यवहाराकरिता आपल्या खात्यातून ऑनलाइन पैसे पाठवणे, केलेल्या व्यवहाराची माहिती घेणे, बँक स्टेटमेंट काढणे, मोबाइल बील, लाइट बील, इन्शुरन्स प्रीमियम याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. दरम्यान, बँकेचे विभागीय अधिकारी एस. एस. पैठणकर यांनी जिल्हा बँकेच्या सर्व खातेदारांना लवकरच बँकेद्वारे एटीएम कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. जिल्हा बँकेचे अधिकारी प्रवीण तनपुरे, बी. के. कदम, प्रा. वैभव धांडे याचे संयोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओत अद्याप ‘रोकडा’ व्यवहार

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

सरकारकडून ‘कॅशलेस’ व्यवहारांसाठी विविध उपक्रमांद्वारे आवाहन केले जात आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात अजूनही ‘रोकडा’ व्यवहार सुरू आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाला कॅशलेसचे वावडे आहे का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. केंद्र सरकार आवाहन करीत असले तरी विविध सरकारी विभागच यात मागे असल्याचे चित्र आहे.
सरकारचा आदेश आणि चलनटंचाईमुळे कॅशलेस व्यवहारांकडे अनेकांचा कल वाढला आहे. यात शासकीय व खासगी क्षेत्रातील विविध संस्था, कार्यालयांचा समावेश आहे. सर्वसामान्य माणसाकडून अचानकपणे स्वाइप, पीओएस मश‌िनची मागणी वाढत आहे. मागणीच्या तुलनेत या यंत्रांचा पुरवठा कमी होत असल्याने जिल्ह्यातील अनेक कार्यालये, संस्थांना ‘कॅशलेस’ साठी अडचणी येत आहेत.
स्वाइप मशिन नाही
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे व्यवहार हे अजूनही रोखीने सुरू आहेत. त्यात दुचाकी, तीनचाकी, चारचाकीअवजड वाहने आदी नवीन वाहनांचे कर, नोंदणी ही ई-पेमेंटद्वारेच केली जाते. नोटाबंदीनंतर दंड, कर हे फक्त डीडी किंवा कॅशने स्वीकारले जात आहेत. वाहन चालविण्याचा परवाना, नूतनीकरण, शिकावू वाहन चालविण्याचा परवाना, चाचणी, नोंदणी बुकावर बोजा चढविणे, बोजा कमी करणे, स्मार्ट कार्ड, आदी शुल्क हे रोखीतच भरले जातात. कारण हे शुल्क अगदी शंभर रुपयांपासून आकारले जातात. ई-पेमेंटद्वारे स्वीकारण्यासाठी मशीन किंवा तत्सम यंत्रणा बसविण्यात आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

0
0

कांदा अनुदानाबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील कांदा चाळींच्या थकित अनुदानाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत नुकतेच तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे अनुदान संबंधित शेतकऱ्यांना लवकर न मिळाल्यास कृषी विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात कृषी विभागात तालुक्यातील सुमारे ३०० ते ४०० शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील काहींना अनुदान प्राप्त झाले, मात्र त्यातील १८८ बांधवांना प्रस्ताव करण्यापासून ते अधिकाऱ्यांच्या भेटी पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला सुमारे पाच ते सहा हजार रुपये खर्च आलेला आहे. त्याने अनुदानाच्या आशेने व्याजाने, सोने तारण ठेऊन पैसे उपलब्ध केले आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. यानंतरही जर अनुदान प्राप्त झाले नाही, तर येत्या फेब्रुवारी महिन्यात तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी नारायण हिरे, सुभाष शिरोडे, गोविंद पगार, तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाल ‘कांदा’ करी ‘वांधा’

0
0

उत्पादकता वाढली, मात्र उत्पादन खर्चाचा मेळ नाही; बळीराजा चिंताक्रांत

म. टा. वृत्तसेवा, येवला

गेली तीन ते चार वर्ष अस्मानी संकट अन् नैसर्गिक आपत्तीच्या झटक्यातून सुटका होताना यंदा बळीराजाच्या झोळीत नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कांद्याचं दान पडलं. वरुणराजाच्या कृपादृष्टीने शेत शिवार फुलताना काळ्या आईच्या कुशीत तयार झालेल्या लाल ‘पोळ’ कांद्याची एकरी उत्पादकता वाढली. हजारो ट्रॅक्टर्सनी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सध्या चांगल्याच फुलून गेल्या आहेत. ही समाधानाची बाब असली तरी, दुसऱ्या बाजूला सध्या मिळणारा लाल कांद्याचा बाजारभाव बघता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फरफट सुरूच असल्याचं चित्र दिसत आहे. लाल कांद्याची उत्पादकता वाढूनही सध्या हाती पडणारे श्रम अन् घामाचे दाम झालेल्या उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवत नसल्याने नव्या वर्षातही बळीराजाच्या चेहऱ्यावर निराशेच्या छटा कायम आहेत.

कांदा हे नगदी पीक समजलं जात असलं तरी या हा कांदा पीकवणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांची कायमच फरफट केली आहे. या ना त्या माध्यमातून उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा बसलेला जबर झटका याने येवला तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामांमधील एकामागोमाग एक झालेली वाताहत यातून कांदादेखील सुटला नव्हता.

यंदाच्या हंगामात मात्र तालुक्यातील शेतशिवारात लाल ‘पोळ’ कांद्याचा मळा फुलला तो वरुणराजाच्या कृपादृष्टीसह. बऱ्याच वर्षानंतर झालेला दमदार पाऊस, त्यातून कांदा लागवडीचे क्षेत्र वाढतानाच वातावरण चांगले राहून किडी व इतर रोगांचा न झालेला प्रादुर्भाव याने एकरी उत्पादकताही वाढली. मात्र गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या या कांदा आवकने चांगल्याच गजबजल्या आहेत. येवला तालुक्याचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यात या लाल कांदा उत्पादनात जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शनिवारी (दि. ७) तर येवला बाजार समितीत लाल कांदा कमाल बाजारभावाचा आलेख सातशेच्या खाली आला होता. त्यामुळेच नव्या वर्षातदेखील लाल कांदा बाजारभावाचा आलेख वर सरकत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशेच्या छटा कायम दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजालाही मिळणार ‘नवप्रकाश’

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित झालेल्या शेतकऱ्यांनाही महावितरणने सुरू केलेल्या नवप्रकाश योजनेचा लाभ मिळणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर झालेल्या विशिष्ट प्रकरणांचाही या योजनेत समावेशही करण्यात आला आहे. थकीत देयकांमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीच्या मुक्तीसाठी महावितरणने १ नोव्हेंबरपासून नवप्रकाश योजना सुरू केली आहे. त्याचा आता थकबाकीदार शेतकरीही फायदा घेऊ शकणार आहेत.

नवप्रकाश योजनेच्या सुरुवातीला सार्वजनिक नळपाणी पुरवठा व शेतीपंप वगळण्यात आले होते. मात्र, आता थकीत देयकापोटी ३० मार्च २०१६ पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांनाही नवप्रकाश योजनेचा लाभ गेट येणार आहे. ३० मार्च २०१६ पूर्वी वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या उच्च व लघुदाब ग्राहकांसह संबंधित कृषिपंप ग्राहकांनी जानेवारी अखेरपर्यंत त्यांच्या मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होईल. ही योजना एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार असून फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान थकबाकीदारांना मूळ थकबाकी तसेच व्याज व विलंब आकाराची २५ टक्के रक्कम भरावी लागेल. या ग्राहकांना थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात ७५ टक्के सूट मिळेल. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा (डिक्री) मंजूर होऊन १२ वर्षे पूर्ण झालेल्या थकबाकीदारांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांनी अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in या वेबसाइटला भेट द्यावी. ग्राहकांना थकबाकीचा तपशील महावितरणच्या शाखेत मिळेल.

१७ हजार सहभागी
नाशिक परिमंडळातील सुमारे १७ हजार ग्राहकांनी आतापर्यंत नवप्रकाश योजनेत आपला सहभाग नोंदवला आहे. नाशिक शहर मंडळातील ४ हजार ९३१ ग्राहकांनी योजनेअंतर्गत १ कोटी ५५ लाख, मालेगाव मंडळातील ५ हजार ५५९ जणांनी १ कोटी ४९ लाख तर अहमदनगर मंडळातील ६ हजार ४५२ जणांनी २ कोटी ५ लाख रुपयाचा भरणा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्वमंजुरी, चौकशी नाही

0
0

नाशिक : अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) दाखल केलेल्या गुन्ह्यात सहा कलमांचा वापर करण्यात आला आहे. या कलमांबाबत शंका उपस्थित होत असून, गुन्हा दाखल करण्यापूर्वी एसीबीने संबंधित विभागाची मंजुरीदेखील नसल्याचे समजते.

प्रांताधिकारी वासंती माळी यांच्यासह २२ जणांविरोधात एसीबीने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलम १३ (१) ड आणि १३ (२), भारतीय दंड विधान कलम ४२०, १६७, १०९, १२० (ब) यांचा वापर केला आहे. यातील १३ (१) ड आणि १३ (२) ही कलमे लोकसेवकांसाठी तसेच लाचलुचपत विभागापुरती मर्यादित आहे. मात्र, याच कलमांचा वापर तब्बल १२ खासगी व्यक्तींविरोधात करण्यात आला आहे. त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर हे प्रकरण टिकणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील १३ (१) ड आणि १३ (२) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वी ‘एसीबी’ने संबंधित विभागाची मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र, या प्रकरणात तसे झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘एसीबी’ने केलेल्या तपासानंतर संबंधित व्यक्ती व महसूल कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे ‘एसीबी’ने सांगितले. प्रत्यक्षात, या प्रकरणाची एकतर्फी चौकशी झाली. मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी ५० लाखांची लाच मागितली होती. लाच दिली असती तर प्रकरण पुढे आले असते काय, असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला जातो आहे. याबाबत ‘एसीबी’चे अधिकारी मात्र मूग गिळून बसले आहेत.

तीन कोटींचा शोध
‘एसीबी’ने सर्व संशयितांना नोटिसा बजावल्या असून, झडती प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रकरणात बुडावला गेलेला तीन कोटी ८५ लाख रुपयांची नजरणाची रक्कम ‘एसीबी’ शोधत असल्याचा दावा केला जातो आहे. सर्व संशयित आरोपी परागंदा झाले आहेत.

‘जीआर’चा उपयोग काय?
सरकारच्या मालकीच्या नवीन अविभाज्य शर्थीच्या भोगवटादार वर्ग दोन जमीनींबाबत राज्य सरकारने १९८३ तसेच त्यानंतर २००२ मध्ये दोन वेगवेगळे अध्यादेश काढले आहेत. २००२ च्या अध्यादेशानुसार अशा जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया अगदी सुलभ केली आहे. मात्र, या गुन्ह्यात १९८३ मधील अध्यादेशाचा आधार घेतला आहे. प्रकरणाचा बागुलबुवा करण्याच्या हेतूने या अध्यादेशाचा दुरुपयोग होत असल्याचा दावा केला जातो आहे.

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजारात धोकादायक प्रदूषण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भंगार बाजार हटवण्याचे काम सुरू होताच येथील भयानक परिस्थिती आता समोर येत आहे. भंगार बाजारामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे वास्तव चित्र समोर येते आहे. हवेत लिडसह इतर धोकादायक वायूंचे प्रमाण जास्त असून, त्याचा थेट प्रभाव पोलिसांसह अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांवर होत आहे. अनेकांना घसादुखीचा त्रास सुरू झाला असून, यापासून बचाव करण्यासाठी सर्वांना मास्कचे वाटप करण्यात आले.

भंगार बाजारचे वाढलेले प्रस्थ पाहून सर्वसामान्य आवक् झाले आहेत. अवघ्या दोन दिवसात येथील साडेतीनशे दुकाने हटवण्यात आली. वर-वर रस्त्यालगत पसरलेला दिसणाऱ्या भंगार बाजाराचे एक-एक शकल उडत असून, येथील जमीन, पाणी व हवेवर होणारा परिणाम समोर येत आहे. प्रशासन हट्टाला पेटले असून, यावेळेस भंगार बाजार वाचणार नाही, याची कल्पना शुक्रवारी रात्री सर्वांना आली. रातोरात येथील भंगार अन्यत्र हलवण्यात आले. मात्र, या पाठीमागे राहिलेले प्रदूषण कायम आहे. याचा प्रत्यय एक हजार पोलिसांसह अतिक्रमण विभागातील ३०० पेक्षा जास्त महापालिका कर्मचारी सध्या घेत आहेत.

अतिक्रमण हटवण्याबरोबर उठणारी धूळ कर्मचाऱ्यांच्या नाका तोंडात जाते आहे. धुळीत लिडसह इतर घातक रसायने मुबलक असून, त्याचा थेट परिणाम श्वसन प्रक्रियेवर होतो आहे. घसा खवखवणे, सर्दी, त्यातून निर्माण होणारा ताप, असे प्रकार दिसून येत आहेत. शनिवारी सायंकाळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल भंगार बाजारात आले. त्यांनी ही बाब ओळखली. कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच कर्मचारी-अधिकाऱ्यांना मास्क देण्याचे आदेश सोडले. या आदेशाची रविवारी अंमलबजावणी झाली. कारवाई मोठी असून, कर्मचाऱ्यांची तब्येत व्यवस्थित राहणे आवश्यक असल्याचे मत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस भरती प्रकरणी तीन जणांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागाची बनावट वेबसाइट तयार करून बनावट नियुक्तीपत्र देत एकाकडून साडेदहा लाख रुपये उकळणाऱ्या सहा जणांविरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली. या टोळीने आणखी किती जणांना लुबाडले याचा तपास पोलिस करीत आहेत.

या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी सचिन परदेशी, पप्पू उर्फ सुरेश पाटील, अमित लोखंडे, पठाण, आधार बाविस्कर, केतन पाटील, तुकाराम पवार आदींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच हेमंत सिताराम पाटील (३१, रा. ९७, गवळेनगर, देवपूर, धुळे) सुरेश गोकुळ पाटील (३४, रा. प्लॉट क्रमांक ९, तुळशीराम नगर, देवपूर, धुळे ) आणि तुकाराम रामसिंग पवार (५६, रा. मु.पो. तामसवाडी, ता. पारोळा, जि. जळगाव) यांना अटक केली. या प्रकरणी संदीप कौतिक पाटील (रा. मु. पिंपळवाड म्हाळसा, पो. टाकळी, चाळीसगाव) याने फिर्याद दिली आहे.

संशयित आरोपींनी मिळून आदीवासी विकास विभागाच्या चिन्ह्यांचा वापर करीत बनावट वेबसाइट सुरू केली. या माध्यमातून त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांना शिक्षक व इतर नोकऱ्या देण्याचे अमिष दाखवले. याच पध्दतीने त्यांनी संदीप पाटील यास फसवले. प्राथमिक शिक्षकाची नोकरी देण्याचे अमिष दाखवून संशयित आरोपींनी संदीपकडून १० लाख ५० हजार रुपये उकळले. यानंतर संशयितांनी बनावट नियुक्तीपत्र तयार करून त्यावर अपर आयुक्त म्हणून बनावट सही तसेच शिक्का मारून शासकीय पत्र तयार केले. हे पत्र दिल्यानंतर उर्वरित सहा लाख ५० हजार रुपये संदीप संशयितांना देणार होता. मात्र, संशयितांचे बिंग फुटले.

संशयितांकडून जिवे मारण्याची धमकी
नोकरीसाठी दिलेले साडेदहा लाख रुपये परत देण्याबाबत फिर्यादी संदीप पाटीलने संशयिताकडे तगादा लावला. त्यावेळी संशयितांनी संदीपला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास क्राइम ब्रँचच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक एन. एस. माईनकर करीत आहे. दरम्यान, सं‌शयित आरोपींनी बनावट वेबसाईट सुरू केली होती. त्या माध्यमातून केवळ नाशिकच नव्हे तर अन्य जिल्ह्यांमधीलही तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसही त्या दिशेने तपास करीत आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माणुसकीची भिंत’ देतेय मायेची ऊब

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

मोठ्या शहरात सुरू झालेला ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम आता थेट शाळांपर्यंत पोहोचला आहे. यातून शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे हे साहित्य पडून आहे, त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने मविप्र कळवण तालुका संचालक रवींद्र देवरे यांच्या प्रेरणेने बेज येथील महात्मा फुले विद्यालयाने हा उपक्रम सुरू केला आहे.

उपक्रमाचे उद््घाटन मुख्याध्यापक जे. एस. पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष अशोक पवार, प्रभाकर निकम, दशरथ बच्छाव, प्रल्हाद देवरे, क्रांती देवरे आदी उपस्थित होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दररोज सकाळी शाळा भरल्यानंतर शाळेकडून या भिंतीजवळ ठेवण्यात आलेल्या वस्तूंचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जात असल्याचे मीरा आहेर यांनी सांगितले.

आपल्याकडील स्वेटर, कपडे, मुलांचे कपडे यांसारख्या वापरातील मात्र अनेक दिवसांपासून पडून असलेल्या सुस्थितीतील वस्तू या भिंतीसमोर ठेवल्या जातात. ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे, तो ती वस्तू घेऊन जातो. या भिंतीला टेकून टेबल बनविण्यात आलेल्या ठिकाणी, शाळेत येणारी मुले तसेच मुलांना सोडण्यासाठी येणारे पालक आपल्या पाल्याकडे असलेले अधिकचे साहित्य, स्केचपेन, स्कूल बॅग, वॉटर बॅग, पेन, पेन्सिल, युनिफॉर्म, बूट, माेजे यांसारखे साहित्य आणून ठेवत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना यातील ज्या साहित्याची आवश्यकता आहे ते विद्यार्थी त्या साहित्याची शिक्षकांकडे मागणी करतात. शिक्षक त्या साहित्याची विद्यार्थ्यांना वाटणी करत असून एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकच साहित्य हवे असल्यास पुढील आठवड्यात तसे साहित्य आल्यास देण्याचे आश्वासनही दिले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरुषांसंबंधी चुकांचा भडिमार

0
0

अकरावीच्या इतिहास पुस्तकावर अभ्यासकांचा आक्षेप

पंकज काकुळीद, धुळे

इतिहासात मानाचे स्थान असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावातच बदल करण्याचा प्रताप अकरावीसाठी पुस्तकनिर्मिती करणाऱ्या पुस्तक मंडळाने केला आहे. होळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील असताना हे स्थान बीड जिल्ह्यात दाखविण्यात आले आहे. या पुस्तकात व्याकरणाच्याही चुकांचा भडिमार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहाससंदर्भातही काही संदर्भ चुकल्याचा काही संघटनांचा दावा आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांची भूमी ज्यांच्या पराक्रमाने पावन झाली अशा अहिल्यादेवी होळकर यांचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी. या अनुषंगाने इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची माहिती प्रकरण क्र. तीनमध्ये पान क्र. २५ व २६ वर दिली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मान्यता पुस्तकास आहे.

‘नगर’ऐवजी ‘बीड’ जिल्हा

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणेच्या वतीने पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे खरे जन्मगाव चौंडी जिल्हा अहमदनगर हे आहे. मात्र अकरावी इतिहासाच्या पुस्तकात लेखन समितीने प्रताप करत अहिल्यादेवींचा जन्म बीड जिल्ह्यातील चौंडी गावी झाल्याचे प्रकाशित केले आहे.

सहावीच्या इतिहासातही चूक

इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची चुकीची माहिती दिली आहे. या संदर्भात बामसेफ, मूलनिवासी संघटनासह इतर संघटनांकडून आंदोलन तसेच मंडळालादेखील आवाहन देण्यात आलेले आहे. मात्र अद्याप चुकांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.


व्याकरणाच्या चुकांचा अतिरेक

अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराव होळकर १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढ्यात धारातीर्थ पडल्याचा इतिहास आहे. तर अकरावीच्या इतिहास विषयाच्या पुस्तकात ते कुंभेरीच्या लढ्यात धारातीर्थ पडल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पुस्तकात व्याकरणाच्या चुकांचादेखील अतिरेक आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. ते सद्यस्थितीत अभ्यासक्रमातदेखील आहे. तसेच नित्यनियमाने शाळा, कॉलेजेसमध्ये या पुस्तकाचे पारायण शिक्षकांकडून सुरू आहे. मात्र एवढ्या दिवसात एकाही इतिहास शिक्षकांनी अहिल्यादेवींच्या जन्मस्थानाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, हे विशेष. परीक्षेत विद्यार्थ्यांनी खऱ्या इतिहासाचे उत्तर लिहले तर नापास होण्याची भीती विद्यार्थ्यांसमोर आहे. तर चुकीच्या इतिहासाचे समर्थन करण्याची नामुष्कीदेखील आहे.


अहिल्यादेवी होळकरांचा जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यातील आहे. तशा नोंदीदेखील आहेत. पतींचा मृत्यू कुम्हेंरच्या लढ्यात झाला होता. याच्यादेखील नोंदी इतिहास संशोधकांकडे आहेत.

प्रा. डॉ. अनिल बैसाणे,
इतिहास संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जास्त दिवस टिकणार कांद्याचे नवीन वाण!

0
0

सुनील कुमावत, निफाड

कांदा उत्पादनात देशात नाव असलेल्या निफाड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्कृष्ट उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना क्षमताधिष्टीत व किमान सहा महिने नुकसान न होता साठवून ठेवता येईल, दर्जा आणि गुणवत्ता राहील अशा प्रकारचे कांद्याचे नवीन वाण तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठानने विकसित केले आहे.

या संदर्भात संशोधन केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. आर. के. सिंग यांनी अधिक माहिती सांगितली, लाल ४ - एल ७४४ असे या नवीन वाणाचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तीनही हंगामात कांदा पीक घेतात. आपल्या देशात कांद्याचे उत्पादन महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात घेतले जाते. खरिप, उश‌िरा खरिप आणि रब्बी या तीनही हंगामात घेतल्या जाणाऱ्या कांद्याच्या उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तर चीनचा प्रथम क्रमांक लागतो.

जगातील ४४४ दशलक्ष हेक्टर क्षेत्रात ८५.८० दशलक्ष टन कांदा उत्पादन घेतले जाते. भारतातून कांदा निर्यातही मोठ्या प्रमाणात होत असते भारतात १.१९ दशलक्ष हेक्टरपासून १९.३५ दशलक्ष टन कांदा उत्पादित होतो. ही उत्पादनक्षमता मागणीपेक्षा कमी आहे शिवाय नाशवंत पीक असल्याने कांदा खराबही होतो. उत्पादन क्षमता आणि दीर्घकाळ साठवून ठेवता येईल अशा दुहेरी फायदा असलेल्या वाणाची निर्मिती चितेगाव येथील विकास प्रतिष्ठानने केली आहे.


१५ ते २० टक्के जास्त उत्पादन क्षमता
NHRDF- लाल-४ या नवीन तयार केलेल्या वाणाची परीक्षा व चाचणी भारतातील कांदा उत्पादन करणाऱ्या राज्यात (AINRPOG) अखिल भारतीय नेटवर्क संशोधन यांच्यामार्फत झाली आहे. वेगवेगळ्या हंगामात परीक्षण केल्यानंतर असे लक्षात आले क‌ी हे नवीन वाण उत्पादनात १५ ते २० टक्के जास्त उत्पादन क्षमता असणारे आहे. शिवाय कांदा चाळीत याची साठवणूक केल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत फक्त २० टक्के एव्हडे नुकसान होऊ शकते जे इतर कांद्याच्या जातीत ३५ ते ४० टक्के होत असल्याचा अनुभव आहे.

असा असेल लाइन-७४४
वाणाची पात सरळ उभी हिरवी
कांद्याचा रंग गडद लाल, आकार गोलाकृती
व्यास ५.५-६५० सेंटीमीटर
२० कांद्याचे सरासरी वजन १.५० ते १.७० किलो
कापणीनंतर कांदा मजबूत असेल
लागवडीनंतर ११५ ते १२० दिवसांत पीक तयार
एका एकरात ७ ते ८ किलो बियाणे
एकरी १६० क्विंटलच्या आसपास उत्पादन
उश‌िरा खरीप आणि रब्बी हंगामासाठी शिफारस
हा कांदा stemphylium ब्लाइट, जांभळा अंगावरील डाग सारख्या रोगाला प्रतिकारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’चा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रोख रकमेअभावी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व औषधे खरेदी करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतमालाचे भाव कोसळत असून, शेतकऱ्यांसह विविध घटकांवर आर्थिक अरिष्ट ओढावले आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. शहरात संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोकोचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले. कांदा, टोमॅटो, भाजीपाला व अन्य शेतपीके कवडीमोल भावाने विकली जात असून, रोखीचे व्यवहारही थांबल्याचे या निवेदनातून जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. गेली चार वर्षे शेतकरी दुष्काळाशी सामना करत आहे. त्यामुळे त्याच्याभोवती आर्थिक अरिष्टांचा फास आवळला गेला आहे. नागरिकांना बँकांमधून स्वतःचे पैसे मिळणेही मुश्किल झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. परंतु, एवढा महत्वाचा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पूर्वतयारी करणे आवश्यक होते. तसे न केल्याने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना प्रचंड आर्थिक ताण सोसावा लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनता व मजुरांना हाल-अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. ही आर्थिक आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने यातून मार्ग काढून सर्वसामान्य जनतेला नोटबंदीच्या जाचातून दिलासा द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग अन् वैश्विक संगीताची मिळणार अनुभूती

0
0


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आपल्या देशात संगीताला पुरातन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व असून, भारतीय संगीताने जगभर प्रवास करून पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. याचेच दुर्मिळ उदाहरण नववर्षाच्या प्रारंभी नाशिककरांना आज, मंगळवारी (दि. १०) सहजयोग साधकांच्या माध्यमातून अनुभवायला मिळण्याची संधी सहजयोग केंद्राच्या माध्यमातून ‘म्युझिक ऑफ जॉय’ या कार्यक्रमातून मिळणार असल्याची माहिती सहजयोग ध्यान धारणा केंद्र नाशिकचे समन्वयक ऋषिकेश सम्मनवार व अनिल भालेराव यांनी दिली आहे.

अनेक भक्तांत आदराचे स्थान प्राप्त झालेल्या परमपूज्य श्रीमाताजी निर्मलादेवी एप्रिल १९८४ मध्ये भारतीय संगीत, संस्कृती आणि योग याच्या प्रसारासाठी ऑस्ट्रेलिया येथे गेल्या असता त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ‘म्युझिक ऑफ जॉय’ हे ऑस्ट्रेलियन बँड पथक स्थापन झाले होते. संगीतप्रेमींना मेजवानी ठरणारा हा कार्यक्रम नाशिककरांसाठी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे होणार आहे. हा कार्यक्रम निःशुल्क असून, या ‘संगीत आणि योग याचा संबंध’ व ‘भारतीय अध्यात्मातील ध्यानाचा आनंद’ यातून तो उलगडला जाणार आहे.

या बँड पथकाने गेल्या सात वर्षांपासून स्वखर्चातून विविध देशांत आपल्या ७० कलाकारांमार्फत हा कार्यक्रम सादर केला असून, भारतात २७ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यान प्रवास सुरू केला आहे. यादरम्यान त्यांनी दिल्ली, जयपूर, ग्वालीयर, इंदूर, पिंपरी चिंचवड आणि छिंदवाडा या ठिकाणी आपला कार्यक्रम सादर करून संगीतप्रेमींवर आपल्या संगीताची जादू पसरवीत त्यांची मने जिंकली आहेत. अधिकाधिक नाशिककर संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय दौऱ्याचे आयोजक व नियोजक स्वप्निल धायडे यांनी केले आहे.


सत्तर विदेशी कलाकारांचा सहभाग

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, मलेशिया, सिंगापूर, रुमानिया, इंग्लंड, जर्मनी, इराण आणि चीन या देशांतील सुमारे ७० कलाकार या म्युझिक ऑफ जॉय कार्यक्रमातून मंडोलीन, सरोद, गिटार, सतार, ढोलक, बासरी या भारतीय वाद्यांसह ‘डिडगेरिडू’ या ऑस्ट्रेलियन वाद्याच्या संगतीने श्री गणेशवंदना, शिवस्तुती, मराठी जोगवा, हिंदी कव्वाली, विविध भक्तिगीते, तसेच ऑस्ट्रेलियन व चायनिज संगीतरचना सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेल्फी’वर शिक्षकांचा बहिष्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने लागू केलेल्या सेल्फीच्या निर्णयात अनेक अडथळे येत असल्याने शिक्षकांनी या निर्णयावरच सोमवारी बहिष्कार टाकला. ९ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांची बैठक घेऊन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हा निर्णय प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अनेक अडथळे येत असल्याने शिक्षकांनी निर्णयावर निषेध नोंदवला.
शालेय शिक्षण विभागाने दर सोमवारी वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून तो सरल संलग्न असलेल्या अॅपमध्ये जोडावा, असा निर्णय नोव्हेंबर २०१६मध्ये दिला. मात्र, इंटरनेटसाठी पुरेशी साधने उपलब्ध नसताना अशा निर्णयांची अंमलबजावणी कशी करणार, एकाच सेल्फीमध्ये वर्गातील ७० ते ८० विद्यार्थ्यांना कसे सामावणार असे वेगवेगळे प्रश्न शिक्षकांसमोर उभे राहिले आहेत. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेत त्यांनी निषेध केला. काही शाळांमध्ये हा निर्णय पाळण्यासाठी प्रयत्नही केले गेले. मात्र, सरलशी जोडलेले उपस्थिती/सेल्फी हे अॅप वारंवार हँग होत असल्याने त्यांनीही या प्रकरणाचा नाद सोडला. पहिल्याच दिवशी असे अनुभव शाळा-शाळांमध्ये आल्याने हा निर्णय भविष्यात कितपत यशस्वी होईल, अशी शंकाही यामुळे शाळांमध्ये व्यक्त केली गेली.

देशात हुकुमशाही सुरू असून त्याचा फटका शेतकऱ्यांसह सामान्यांना बसत आहे. याचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन केले.
- जयंत जाधव, आमदार, नाशिक

नोटबंदीनंतर ५० दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा सरकारचा दावा फोल ठरला आहे. त्यामध्ये आजही सुधारणा झालेली नाही.
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, रा. काँ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, पक्ष्यांच्या दुनियेत हेरिटेज वॉकला !

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पक्षीवैभव म्हटले की, नाशिकचे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य डोळ्यापुढे उभे राहते ते पक्षांच्या विविधतेमुळे. पण नाशिक जिल्ह्यातील इतर भागातही मोठे पक्षीवैभव आहे. गंगापूर जलाशयालगतच्या गवतीमाळ परिसरातही अनेक पक्षी पहायला मिळतात. शहराच्या अगदी जवळचा हा पक्ष्यांचा सहवास अनुभवण्यासारखा असल्याने येत्या रविवारी (१५ जानेवारी) फ्रवशी शाळेजवळील विहंग पक्षी परिचय केंद्र तसेच जलाशयालगतचे पक्ष‌ीवैभव अनुभवण्याची संधी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित हेरिटेज वॉकच्या माध्यमातून नाशिककरांना मिळणार आहे.
पक्षीतज्ज्ञ बिश्वरूप राहा यांच्या ‘बर्डस ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट- कॉन्झर्वेशन गाइड’ अर्थात ‘नाशिक जिल्ह्यातील पक्षी-संवर्धन मार्गदर्शिका’ या अतिशय माहितीपूर्ण पुस्तकामुळे ना‌शिककरांना जिल्ह्यातील पक्षी वैभवाची अनुभूती झाली. तसेच गंगापूर धरणाजवळ उभारलेल्या विहंग पक्षी परिचय केंद्राने तर नाशिककरांना पक्ष्यांच्या जगात येण्याचे आवतनच दिले आहे. शहरात आपल्या आजुबाजूला पक्षी असणे हे निरोगी पर्यावणाचे प्रतीक असते अन् त्यातील विविधता ही सभोवतालच्या पर्यावरणाचा दर्जाही ठरवते. त्यामुळे आपल्या आजुबाजूला असलेल्या पक्ष्यांची माहिती व त्यांच्या जीवनाशी आपल्या जीवनांचा ऋणानुबंध समजणेही गरजेचे असते. पक्ष्यांचे जीवन अनुभवता यावे, यासाठी महाराष्ट्र टाइम्सतर्फे विहंग परिचय केंद्र व गंगापूर धरणाच्या जलाशयालगत असलेले पक्षी वैभव दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पक्षीतज्ज्ञ बिश्वरूप राहा यांच्या अनुभवी नजरेतून हे पक्षी वैभव आपल्याला पाहता येणार आहे.

३४० प्रकारचे पक्षी

नाशिक जिल्ह्यातील १० हजार चौरस किलोमीटर परिसरात ३४० प्रकारचे पक्षी आहेत. नाशिक जिल्ह्याच्या चार विभागात आढळणाऱ्या पक्ष्यांचा सचित्र परिचय या विहंग पक्षी परिचय केंद्रात करून देण्यात आला आहे. पक्ष्यांचे प्रकार, त्यांचे अस्तित्वाचे प्रमाण, तसेच कोणते पक्षी कुठे आढळतात याची माहिती केंद्रात मिळणार आहे. तसेच गंगापूर जलाशयात राजहंस, चक्रवाक, चक्रांग बदक, छोटा पाणकावळा, प्लवा, हिरवा तुतार, तपकिरी डोक्याचा कुरव, नदी सुरय, कंठेरी चिलखा, धान तीरचिमणी, पिवळा धोबी, डोंबारी, साईक्सचा तुरेबाज चंडोल, हिरवी तुतारी, ठिपकेवाली तुतारी, सामान्य तुतारी, टिटवी इत्यादी पक्षी पाहता येतील.

असा असेल हे‌रिटेज वॉक

रविवारी (१५ जानेवारी) सकाळी ८ वाजेपर्यंत विहंग पक्षी परिचय केंद्रात जमायचे आहे.
पक्षीतज्ज्ञ बिश्वरूप राहा व पर्यावरणतज्ज्ञ अजित बर्जे परिचय केंद्राची माहिती करून देतील व त्यानंतर ९ ते ११ पर्यंत गंगापूरच्या पाणथळ परिसरातील पक्षी वैभव पाहण्यासाठी जाणार आहोत.
कसे याल?
गंगापूर धरणाशेजारील फ्रवशी इंटरनॅशनल स्कूलपुढे विहंग प‌क्षी परिचय केंद्राचा फलक आहे. तेथून डाव्या हाताला जाणाऱ्या रस्त्याने अर्धा किलोमीटर आत आल्यावर विहंग केंद्र आहे.
नावनोंदणी आवश्यक : अजित बर्जे : ९४२०८९१७१८ / रमेश पडवळ : ८३८००९८१०७.
स्वतःच्या वाहनाने यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images