Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हेल्मेट नसल्यास मेड‌िक्लेमला मुकणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अपघातांबाबतचे गुन्हे दाखल करताना संबंधित वाहनचालकाने हेल्मेट घातले होते की नाही याची जाणीवपूर्वक नोंद करा, असे आदेश आपण सर्व पोलिस स्टेशन्सला दिले आहेत. हेल्मेटशिवाय वाहन चालविताना अपघात झालाच तर यापुढे मेड‌िक्लेम पॉलिसी मंजूर होण्यातील अडचणी वाढणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सोमवारी दिले.
प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस प्रशासन आणि आणखी काही सरकारी विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद््घाटनावेळी सिंघल यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिल‌िंद शंभरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, पोलिस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक पी. जी. खोडसकर, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, जयंत बजबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सिंघल म्हणाले, ‘ वाहतुकीचे नियम मोडूनही लोक दंड भरण्याऐवजी पोलिसांना फोन करून वाहने सोडण्यास सांगतात. तडजोड करण्याची मानसिकता बदलायला हवी.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. म्हणाले, अपघाती मृत्यूमुळे प्रॉडक्टिव्ह मॅनपॉवर कमी होत आहे. एकही अपघाती मृत्यू होऊ नये हा अभियानाचा उद्देश आहे.

अपघाती मृत्यू घटले
जिल्ह्यात २०१५ मध्ये १०२४ अपघाती मृत्यू झाले. त्यात ७९० ग्रामीण तर शहरातील २३४ नागरिकांचा समावेश होता. सन २०१६ मध्ये ९९१ जणांचा अपघातात मृत्यू झाला. ग्रामीण भागात ७७८ तर शहरातील २१३ नागरिकांनी अपघातात जीव गमावला.दोषी वाहनांमुळे अपघाताची शक्यता अधिक असते. म्हणूनच देशातील पहिले अत्याधुनिक वाहन फिटनेस सेंटर नाशिकमध्ये सुरू करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासमार्ग खुला!

$
0
0

विकास आराखडा भागश: मंजूर; बिल्डरांना झुकते माप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर विकास आराखड्याबाबत गेल्या चार वर्षांपासूनची नाशिककरांची प्रतीक्षा अखेर संपली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीने जाहीर केलेल्या या भागश: आराखड्यात बिल्डरांना झुकते माप देण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर आरक्षणांचा मूळ हेतू बदलण्यात आला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वापराच्या आरक्षणांना कात्री लावली असून, रहिवाशी क्षेत्रात वाढ केली आहे.

मंजूर विकास आराखड्यात ७७ आरक्षणांत बदल करण्यात आले असून, ७९ आरक्षणांमध्ये शासनाने बदल सुचविले आहेत. त्यावर हरकती व सूचना मागविल्यानंतर महिनाभराने अंतिम निर्णय घेतला जाईल. मंजूर आराखड्यातून ३१ आरक्षणे वगळली असून, २५ आरक्षणे स्थलांतरीत केली आहेत. मंजूर आराखडा हा राजपत्रात प्रसिद्ध केल्यापासून एक महिन्याच्या अंतराने लागू होणार आहे. आराखडा मंजूर झाला असला तरी नाशिककरांच्या दृष्टीने विकास नियंत्रण नियमावली महत्त्वाची आहे. त्‍यात कुठले बदल स्वीकारले आहेत, त्यावरून कपाटांचा प्रलंबित प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याने अजूनही बांधकाम व्यावसायिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य सरकारने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन सोमवारी नाशिकचा विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावली जाहीर केली. त्यामुळे पुढील २० वर्षांच्या विकासाची दिशा स्पष्ट झाली आहे. हा आराखडा भागशः जाहीर करीत, त्यात ७९ आरक्षणांमध्ये मोठे बदल सुचवले आहेत. बाधित मिळकतधारकांवर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी महिनाभर हरकती व सूचनांसाठी संधी दिली आहे. त्यासाठी सहाय्यक नगररचना सहसंचालक प्रतीभा भदाणे यांची नियुक्ती केली आहे. विकास नियंत्रण नियमावलीचे चित्रही दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होईल.

गोदापार्क, गंगापूर एसटीपी अडचणीत

मंजूर आराखड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वप्न असलेला गोदापार्कही अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोदापार्क येथील गार्डन व एसटीपी प्लॅनच्या जागेचा समावेश गोदावरी रिवर फ्रंट योजनेत करण्यात आला आहे. त्यामुळे गोदापार्कचे भवितव्य अधांतरी राहण्याची शक्यता असून, यावरून मनसे विरुद्ध भाजप असा संघर्ष उफाळून येऊ शकतो. गंगापूर एसटीपीचे आरक्षण बदलून ही जागा नागरी सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. गंगापूर एसटीपीसाठी अमृत योजनेतून ४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

`बॉईज टाऊन`च्या आरक्षणात बदल

अत्यंत महागडा परिसर असलेल्या बॉईज टाऊन शाळेची पाच एकर जागा ही रहिवाशी क्षेत्रात बदलण्यात आली आहे. विशेष म्हणजे या जागेवर एका खासगी विकासकाने दोन वर्षांपासून स्वतःचा बोर्ड लावून ठेवला आहे. त्यामुळे संबंधित जागामालकाला आरक्षणात झालेला बदल अगोदरच माहिती होता की काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

संक्षिप्त आराखडा

७७ आरक्षणांमध्ये बदल, ३१ आरक्षणे वगळली, २५ आरक्षणे स्थलांतरीत, ७९ आरक्षणा बदलावर हरकती व सूचना मागविल्या, तीस दिवसांत हरकती व सूचनांचा अहवाल सादर करावा लागणार, अध्यादेशात नोंद न घेतलेली आरक्षणे जैसे-थे, आडगाव येथील ट्रक टर्मिनल्सचे आरक्षण कायम, खेळाच्या मैदानाच्या आरक्षणांही मोठी कात्री, नदींनी नदीचा हरितपट्टा १५ मीटरवरून ३ मीटरवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, नायलॉन मांजासाठी नको ढील!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढिल दे दे ढिल दे दे रे भैय्या, असे म्हणणे आता महागात पडणार आहे. कारण अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा आढळून आला, तर पालकांवर कारवाई केली जाणार आहे. विक्री करणे, तसेच नायलॉन मांजाचा वापर करणेही गुन्हा असल्याने ही कारवाई होणार आहे.

नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यासह त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तींविरोधात कलम १८८, २९० तसेच २९१ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सांगितले. नायलॉन मांजाचा वापर पक्षांसह मनुष्यांनाही जीवघेणा ठरतो. नुकतेच वडाळा परिसरातून जाणाऱ्या एका दुचाकीचालकाचा गळा मांजामुळे कापला. या व्यक्तीच्या गळ्याला किमान ४० टाके घालावे लागले. सुदैवाने यात जीवितहानी टळली असली तरी हा धोका अद्याप कायम आहे. ग्रामीण भागातदेखील जिल्हाधिकारी कार्यालयाने मांजा विक्री व वापरास बंदी घातली आहे.

दोन विक्रेत्यांना अटक

नायलॉन मांजा विक्रीवर शहरात बंदी घालण्यात आलेली असताना त्याची विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छापे टाकून मोठ्या प्रमाणात मांजा हस्तगत केला. राजू योगेश जाधव (रा. संत जनार्दन नगर, विजयनगर) व कादीर गुलाब खान (रा. हेलबावडी मशिदसमोर, दूधबाजार) अशी संशयितांची नावे आहेत. किरकोळ विक्रेते हा मांजा कोठून आणतात, त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी स्पष्ट केले.

आम्ही सातत्याने नायलॉन मांजा विक्रेत्यांचा शोध घेत आहोत. क्राईम ब्रँचने रविवारी अशा दोन विक्रेत्यांना अटक केली. सोमवारी आणखी सहा जणांना अटक केली. यासाठी, क्राईम ब्रँचसह पोलिस स्टेशननिहाय कारवाई केली जात आहे.

- रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीविरोधात काँग्रेसचा थाळीनाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘आमची मागणी समजून घ्या जरा काळ्या पैशातून शेतकरी कर्जमाफी करा’, ‘जिल्हा बँक उपाशी उद्योगपती तुपाशी’ यांसारख्या घोषणा देत नाशिक शहर महिला काँग्रेसने नोटाबंदी विरोधात थाळीनाद केला. महिलांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतुकीची काही काळासाठी कोंडी झाली.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि थाळीनाद केला. ८ नोव्हेंबरनंतर देशात किती काळा पैसा सापडला, किती लोकांना आपला रोजगार गमवावा लागला, नोटाबंदीमुळे १२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यांना किती नुकसान भरपाई देण्यात आली, असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. ८ नोव्हेंबरपूर्वी २५ लाखांच्यावर रक्कम बँकेत भरणाऱ्यांची यादी जाहीर करा, छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना करांमध्ये ५० टक्के सवलत द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या, दारिद्र्य रेषेखालील महिलांच्या खात्यात २५ हजार रुपये जमा करा, कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या या मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात शहर काँग्रेसच्या महिलाध्यक्षा वत्सला खैरे, ममता पाटील, फतिमा खान, योगिता आहेर, शारदा खान, सुचिता बच्छाव आदी सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरची रणधुमाळी आजपासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून आज (दि. ९) पासून या निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. आजपासून अर्ज वाटपासह उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

सद्यस्थितीत काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे, भाजपकडून डॉ. प्रशांत पाटील तर माकपकडून राजू देसले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी तसेच मनसे या पक्षांनी अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. गेल्याच आठवड्यात निवडणूक तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार १० जानेवारीपासून उमेदवारी अर्जाचे वाटप केले जाणार असून १७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील तर १८ ते २० जानेवारीदरम्यान अर्ज मागे घेता येणार आहे. तसेच २० जानेवारीला अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. ३ फेब्रुवारीला मतदान होणार असून ६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

या पदवीधर मतदारसंघात नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदूरबार अशा पाच जिल्ह्याचे क्षेत्र असून सद्यस्थितीतीत उमेदवार हे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातीलच आहे. नगरमधून काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे मैदानात आहेत. तर भाजपकडून नाशिकचे डॉ. प्रशांत पाटील व माकपकडून राजू देसले मैदानात आहेत. राष्ट्रवादी, मनसे व शिवसेनेने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. अपक्ष म्हणून नाशिकमधून सचिन चव्हाण रिंगणात राहू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखडा, ‘कहीं खुशी कहीं गम’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चार वर्षांपासून प्रलंबित असलेला शहर विकास आराखडा सरकारने मंजूर केला असला तरी नाशिककरांच्या दृष्टीने विकास नियंत्रण नियमावली महत्त्वाची आहे. या विकास नियंत्रण नियमावलीतील बदलांवरच कपाटांचा प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने अजूनही बांधकाम व्यावसायिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

विकास नियंत्रण नियमावलीचे चित्र तीन ते चार दिवसांत स्पष्ट होणार असल्याने विकासकांच्या नजरा डीसीपीआरकडे लागून आहेत. दरम्यान, विकास आराखड्याबाबत शहरात ‘कहीं खुशी कहीं गम’चे चित्र आहे. शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र सेल नगररचनात स्थापन करण्यात येणार आहे.

सन १९८२ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९८५ मध्ये प्रथम शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. १९९३ साली अंशत: शहर विकास आराखडा मंजूर करण्यात आला. हा आराखडा टप्प्या टप्प्याने २० वर्षांसाठी लागू करण्यात आला. सन २०१३ मध्ये नवीन आराखडा मंजूर होणे अपेक्षित होते .परंतु, त्यास विविध कारणांमुळे विलंब झाला. राज्य सरकारने जुलै २०१० मध्ये नवीन आराखड्यासाठी अधिसूचना जारी केली होती. २०११ मध्ये आयुक्तांनी नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी नगररचना उपसंचालक सुलेखा वैजापुरकर यांची नियुक्ती केली. त्या दरम्यान आराखड्यात शेतकऱ्यांच्या जमिनींवर गैरवाजवी आरक्षणे टाकण्यात आल्याने शहरात आगडोंब उसळला होता. विशेष म्हणजे महासभेत मंजूर होण्यापूर्वीच आराखडा फुटल्याने शेतकऱ्यांच्या संतापात अधिकच भर पडली आहे.

नोव्हेंबर २०१३ मध्ये महासभेने आराखडा फेटाळल्याने नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची दुरुस्तीसाठी नियुक्ती केली. भुक्ते यांनी मे २०१५ मध्ये नगररचना विभागाच्या पुणे येथील संचालकांकडे आराखडा सादर केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहिताभंग सानपांना भोवणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी परिसरात ग्रीन जीमच्या उद््घाटनाच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नाशिक प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत.

आमदार बाळासाहेब सानप यांनी आचारसंहिता काळातही पंचवटी परिसरात ग्रीन जीमचे उद््घाटन केल्याची ओरड होऊ लागली आहे. श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेत सानप यांच्या निधीतून ग्रीन जीम उभारण्यात आल्याचा आक्षेप नोंदविला जात आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचा भंग झाल्याची ओरड होत असल्याने सुमोटो चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रांताधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करावा असे, आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या निवडणुकींसाठी आचारसंहिता कक्ष सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम क्षेत्राला मिळेल बूस्ट

$
0
0

शहर विकास आराखड्याबाबत जाणकारांचा सूर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला शहराचा विकास आराखडा मंजूर झाल्याने शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचा सूर शहरातील तज्ज्ञांचा आहे. विकास आराखड्यामुळे या पुढील काळात सुसंबद्ध विकास होतानाच शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बूस्ट मिळणार आहे. रस्त्यांसह विविध प्रकारच्या पायाभूत सोयी-सुविधा साकारण्यालाही मोठी चालना मिळणार आहे.


दीर्घ विलंबानंतर किरकोळ फेरबदलांसह मंजूर झालेला विकास आराखडा स्वागतार्ह आहे. परंतु, त्यात आधीच कमी प्रमाणात असलेल्या सार्वजनिक वापराच्या जागांना आणखी कात्री लावण्यात आली आहे. तसेच, लोकसंख्या घनतेच्या प्रमाणात गरजेपेक्षा खूप अधिक रहिवाशी क्षेत्र मंजूर झाले आहे. त्यामुळे विस्तारलेल्या क्षेत्रावर सर्व मूलभूत सोयी-सुविधा पुरविताना नाशिक महापालिकेवर प्रचंड ताण येणार आहे.

- प्रदीप काळे, अध्यक्ष, दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस्, नाशिक सेंटर

विकास आराखडा पूर्णतः नाही तर अंशतः प्रसिद्ध झाला आहे. नकाशे अद्याप प्रसिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे ते प्रसिद्ध झाल्यावरच सारे काही स्पष्ट होणार आहे. विकास नियंत्रण नियमावली अजून प्रसिद्ध झालेली नाही. ७८ सुधारणा नव्याने करण्यात आलेल्या आहेत. त्यावर हरकत नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गॅझेटमध्ये आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर महिन्याभराने त्याची अंमलबजावणी सुरू होईल. शहराच्या विकासात विकास आराखड्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे तो येणे आवश्यकच होते. काही विलंब झाला पण आता तो प्रसिद्ध होत असल्याने यापुढील काळात विकास कामांना वेग येईल.

- आर्कि. चंद्रकांत धामणे, नगररचना तज्ज्ञ

पूर्ण विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावली (डीसीपीआर) सरकारने लवकरात लवकर जाहीर करणे आवश्यक आहे. तसेच, आज ज्या काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकतींची मुदत आहे. मुळात आराखड्याला उशीर झाला आता तोही थोडा थोडा जाहीर होणे योग्य नाही. विकास आराखड्यामुळे सुसंबद्ध विकास होतानाच अवैध कामांना बंदी होते. नाशिकसारख्या वेगाने विकसीत होणाऱ्या शहरासाठी विकास आराखडा आवश्यकच आहे.

- आर्कि. विवेक जायखेडकर, नगररचना अभ्यासक

आराखडा प्रसिद्ध झाल्याने आता सुस्पष्टता आली आहे. शहरातील आरक्षणे नक्की काय आहेत, त्यात स्पष्टता येईल. त्यामुळे त्यापुढे विकास कामे करणाऱ्यांना मोकळीक मिळेल. शहरातील पिवळा पट्टा निश्चित झाल्याने घरांची मागणी, गुणवत्ता आणि किंमती यावरही परिणाम होईल. सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांशी थेट विकास आराखड्याचा संबंध असतो. विविध वित्तीय संस्था निधी आणि विकास कामांच्या संदर्भात त्यांचे निर्णय घेऊ शकतील. योग्य व्हिजनने शहराचे काम सुरू होईल.

-सुनील कोतवाल, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक

विकास आराखडा मंजूर झाल्याची वार्ता आनंददायी आहे. येत्या ४ ते ५ दिवसात विकास नियंत्रण नियमावली येईल, अशी अपेक्षा आहे. दीड वर्षापासून जी मरगळ रिअल इस्टेट क्षेत्रात आहे ती दूर होणार आहे. नोटीबंदीचा नाही तर त्यापेक्षा मोठा परिणाम गेल्या दीड वर्षात या क्षेत्रामध्ये झाला. आता ते चित्र बदलणार आहे. सारे जण वेगाने कामाला लागतील आणि त्याचा परिणाम शहराच्या विकासावर निश्चितच होईल.

- हेमंत दुगड, अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझायनर्स

हा विकास आराखडा महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅन कायद्याच्या सेक्शन २१ (४अ) नुसार प्रसिद्ध करण्यात आला आहे. याच सेक्शनला विरोध करणारी याचिका मी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. प्रथमच विकास आराखडा असणाऱ्या महापालिकांसाठी हे सेक्शन योग्य आहे. पण, नाशिकला ८० आणि ८९ मध्ये विकास आराखडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे सेक्शन ३८नुसार विकास आराखडा असायला हवा.

-मोहन रानडे, नगररचना तज्ज्ञ

माजी जेडीटीपी भुक्तेसाहेबांनी पॅराडाईम शिफ्ट म्हणून संबोधलेला व ब-याच नवीन संकल्पना असलेला विकास आराखडा शासनाने अतिशय किरकोळ बदलांसह मंजूर केला आहे. यात नाशिक शहरातील वास्तुविशारदांच्या आय. आय. ए. सह इतरही संस्थांनी सुचवलेल्या हरकती व सूचनांची योग्य दखल घेतली याचा विशेष आनंद आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रहिवासी क्षेत्रात केलेली वाढ मात्र तुलनात्मकरित्या जास्त वाटते. विकास आराखड्याचे यश हे मात्र सुनियोजित अंमलबजावणीवरच अवलंबून असेल.

- योगेश महाजन, सहसचिव, आय.आय.ए., नाशिक


बिल्डरधार्जिणे निर्णय घेणाऱ्या शासनाने नाशिक विकास आराखड्यातही तीच भूमिका घेतली आहे. शासनाकडे प्रस्तावित केलेला विकास आराखड्यात स्पष्ट तरतुदी होत्या. परंतु, शासन स्तरावर मंजूर केलेल्या विकास आराखड्यात संदिग्ध वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होईल यात शंका नाही. सर्व बाबी बाजूला ठेवून विचार केल्यास शहराचा पुढील २० वर्षांच्या विकासाची दिशा आज ठरली व या प्रक्रियेत शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीने मोलाची भूमिका बजावल्याने अनेक मिळकत धारकांवरील वगळण्यात आलेल्या आरक्षणाबाबत सरकारने लुडबुड करण्याची हिंमत दाखवलेली नाही.

उन्मेश गायधनी, तांत्रिक सल्लागार, विकास आराखडा शासकीय समिती

नाशिक पूर्व बाह्य वळण रस्त्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांवरील अन्याय विकास आराखड्यात कायम ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे बिल्डरांच्या हिताचे निर्णय या आराखड्यात घेण्यात आल्याने हा आराखडा हा बिल्डरधार्जिणा आहे.

निवृत्ती अरिंगळे, सदस्य, विकास आराखडा शासकीय समिती

राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकास आराखड्यात सर्वसामान्य नागरिक, बिल्डर्स व शेतकऱ्यांचा सर्वसामावेशक विचार करण्यात आला आहे. या सर्व घटकांना दिलासा देणारा आराखडा असून, यामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे. वडनेर रोड ते पाथर्डी फाटा येथील बाधित नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हा चांगला आराखडा आहे.

अॅड.नितीन ठाकरे,
सदस्य, विकास आराखडा शासकीय समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेशनचालकांच्या अनामतीवर टाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बेकायदेशीररित्या संप पुकारून सामान्य नागरीक तसेच प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या रेशन धान्य दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा विभागाने घेतला आहे. वारंवार आवाहन करूनही चलन न भरणाऱ्या तसेच धान्य उचल न करणाऱ्या विक्रेत्यांची अनामत रक्कम जप्तीची कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली.
रेशन दुकानदारांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. सरकार आश्वासने देण्यात धन्यता मानत असल्याने रेशन दुकानदारांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. एक जानेवारीपासून हा संप सुरू असून अनेक रेशन दुकानदारांनी धान्य उचल केलेली नाही. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा रेशन दुकानदारांनी स्वीकारला आहे. धान्य उचल आणि वाटप बंद ठेवल्याने जिल्ह्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य लाभार्थींना बसत असून पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना नोटीसा बजावण्यास सुरूवात केली. त्यामुळे विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसणाऱ्या रेशन दुकानदारांना थेट नोटीसा काढून पुरवठा विभागाने अल्टीमेटम दिला. पुरवठा विभागाच्या कारवाईच्या धास्तीने अखेर काही रेशन दुकानदारांनी चलन फाडण्यास तसेच धान्य उचल करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात २६०९ रेशन दुकानदार असून त्यापैकी ११९९ दुकानदारांनी चलनासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८३२ दुकानदारांनी पैसे भरले असून ११७ जणांनी या महिन्यात धान्य उचल केल्याची माहिती नरके यांनी केली आहे. सर्व रेशन दुकानदार संपामध्ये सहभागी असल्याचा दावाही त्यांनी फोल ठरविला आहे. प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या दुकानदारांच्या अनामत रकमा जप्तीची कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे. रेशन दुकानदारांनी आवाहनाला प्रतिसाद दिला नाही तर परवाने रद्दची कारवाई देखील होऊ शकते असा इशारा नरके यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन डीपीची अंमलबजावणी ऑनलाइन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांसाठी ऑटो डीसीआर यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे. येत्या मार्चपासून ही यंत्रणा सुरू होणार असून, बांधकाम व्यावसायिकांना ऑनलाइन पद्धतीनेच परवानग्या दिल्या जाणार आहेत.
योगायोगाने आता जानेवारीतच नवीन शहर विकास आराखडा जाहीर झाला असून, नव्या आराखड्याची अंमलबजावणीही आता ऑनलाइन ऑटो डीसीआरप्रमाणे करण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. त्यानुसार प्रशासनानेही कार्यवाही सुरू केली असून, १ मार्चपासून नव्या शहर विकास आराखड्याची अंमलबजाणी ऑनलाइन पद्धतीनेच केली जाणार आहे.
सॉफ्टेक या कंपनीला ऑटो डीसीआर तयार करण्याचे काम दिले असून, हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी हे पाऊल उचलले आहे. बांधकामविषयक कोणतीही परवानगी हवी असल्यास विकसकांना महापालिकेत खेट्या माराव्या लागतात. त्यात अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळताना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहारदेखील होत असल्याची ओरड नेहमी केली जाते. यासाठीच महापालिकेने बांधकामविषयक सर्व परवानग्या ऑनलाइन देण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रणालीनुसार विकसकांना आर्किटेक्चरल प्लॅन, नकाशा व इतर आवश्यक कागदपत्रे जोडून या सॉफ्टवेअरवर अपलोड करून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. या कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार पात्र अर्जदारांना सॉफ्टवेअरच्याच माध्यमातून ऑनलाइनच आवश्यक परवानग्या दिल्या जातील. अर्जाची प्रत्येक स्तरावर आपोआप पडताळणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींचा सेल्फी अपलोड झालाच नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
शालेय विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती स्टुडंटस अॅपद्वारे ऑनलाइन नोंदविणे व महिन्यातून दोनदा विद्यार्थ्यांसोबत वर्गशिक्षकांनी सेल्फी काढून अपलोड करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाला नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक संघटनांनी केराची टोपली दाखवली आहे.
सोमवारपासून राज्यभरातील शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती अटेंडन्स अॅपद्वारे ऑनलाइन भरण्यास सुरुवात झाली. याशिवाय वर्गशिक्षक व उपस्थित विद्यार्थ्यांची सेल्फीही अपलोड करण्याची सक्ती या निर्णयाद्वारे सर्व शाळांवर करण्यात आली आहे. मात्र, या महत्वाकांक्षी योजनेला पहिल्या दिवसापासूनच शिक्षक संघटनांच्या विरोधाची घरघर लागल्याचे नाशिक जिल्ह्यात दिसून आले आहे. विविध शिक्षक संघटनांनी या कामावर बहिष्कार टाकल्याने या योजनेच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

इतर संघटना बेकायदेशीर

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार या निर्णयाला विरोध करणाऱ्या शिक्षक संघटनांत केवळ शिक्षक भारती ही एकमेव अधिकृत शिक्षक संघटना असल्याचे म्हटलेले असल्याने उर्वरीत शिक्षक संघटना अनधिकृत असल्याची भूमिका जिल्हा शिक्षण विभागाने घेतली आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करणाऱ्या इतर शिक्षक संघटनांचा विरोध बेकायदेशीर ठरला आहे.

काही शाळांकडून पूर्ततेचा सोपस्कार

सोमवारी पहिल्या दिवशी काही शाळांनी मात्र विद्यार्थ्यांसोबत वर्गशिक्षकांची सेल्फीची पूर्तता करुन ठेवली आहे. मुख्याध्यापकांच्या लॉगीन आयडीवरुनच यासाठीचे अॅप शिक्षकांना डाऊनलोड करता येणार असल्याने मंगळवारी दुसऱ्या दिवशीही वर्गशिक्षकांना विद्यार्थ्यांसोबतची सेल्फी अपलोड करता आली नाही. नाशिक जिल्ह्यातील किती शाळांनी या निर्णयानुसार विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन भरली याची आकडेवारी जिल्हा शिक्षण खात्याकडे मंगळवारी दुसऱ्या दिवशीही उपलब्ध झाली नाही.

अगोदरच अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांच्या अध्यापनाच्या कार्यात अडथळे येत आहेत. त्यात पुन्हा ऑनलाइन हजेरी व सेल्फीची भर पडली आहे. याशिवाय या कामातील तांत्रिक अडचणींकडेही शासनाने दुर्लक्ष केलेले आहे.
- दिनेश देवरे, जिल्हा संघटक, टीडीएफ

विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी व सेल्फी अपलोड करण्याचा शासननिर्णय यापूर्वीच झालेला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली. या निर्णयास जिल्ह्यातील काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला असला तरी या निर्णयाचे पालन करणे त्यांना बंधनकारक आहे. शिवाय सामान्य प्रशासन विभागाने या निर्णयास विरोध करणाऱ्या अधिकृत शिक्षक संघटनांच्या जाहीर केलेल्या यादीत केवळ शिक्षक भारतीचा समावेश आहे. त्यामुळे इतर शिक्षक संघटना आपोआपच अनधिकृत ठरल्या आहेत.
- उदय देवरे, अधिक्षक,
शिक्षण विभाग, जि. प. नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिर्याणी कमी वाढल्याने मजूर मित्राचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

आपल्या ताटात बिर्याणी कमी वाढली या कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यावसन थेट हाणामारीत होऊन विह‌िरीवर काम करणाऱ्या मजूर विशाल तथा शंकर याचा खून करण्याची घटना बागलाण तालुक्यातील कऱ्हे शिवारात शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी दोघांना अटक केली असून, मुख्य आरोपी परार आहे. मंगळवारी सटाणा न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोल‌िस कोठडी दिली आहे.

एकत्र काम करणाऱ्या साथीदारांनी दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे बोलले जात असून, मुजराचा खुन करून त्याचा मृतदेह डोंगरावर फेकून देण्यात आला होता. सदर घटना वनविभागाचे कर्मचारी डोंगरवार गस्त घालत असतांना उघडकीस आली. त्यांनी सटाणा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक राकेश ओला, ग्रामीण पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक नखाते यांनी पोलिस ठाण्यात येऊन तपासाबाबत सूचना केल्या.

चौगांव येथील नानाजी रामभाऊ मांडवडे यांच्या विह‌िरीचे खोदकाम सुरू होते. हे काम हरिभाऊ मुरलीधर वाघ (रा.वैजापूर) या ठेकेदाराने घेतले होते. यासाठी पाच मजूर एकत्रित काम करीत होते. शनिवारी दुपारी कांतीलाल व विशाल यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. पुन्हा रात्री दारूच्या नशेत बिर्याणी वाढण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

कांतीलालने विशालल्या डोक्यात, तोडांवर व गुप्तांगावर लोखंडी दांड्याचे घाव मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कांतीलाल पळून गेला. तर उर्वरित बसराज व हरिभाऊ वाघ यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला. या प्रकरणी बसराज व हरीभाऊ या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सटाणा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक बशीर शेख हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यातील ट्रॉमा केअर लवकरच कार्यान्वित

$
0
0

कैलास येवला, सटाणा

तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या व तब्बल आठ वर्षांपासून धूळखात पडून असलेल्या येथील ट्रॉमा केअर युनिटसाठीच्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे हे युनिट सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. विधीमंडळात वेळोवेळी तारांकित व लक्षवेधी करून आमदार दीप‌िका चव्हाण यांनी ट्रामा केअरचा प्रश्न मार्गी लावला आहे.

तालुक्यातील १७९ गावांसह राज्यमहामार्गावरील अपघात, घात-पात तसेच तातडीचे रुग्ण या ठिकाणी दाखल होत असतात. त्याचबरोबर दैनंद‌िन रुग्णांची याठिकाणी तपासणी होते. त्या अनुषंगाने तत्कालीन आमदार संजय चव्हाण यांनी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांनी प्रत्यक्ष सटाणा ग्रामीण रुग्णालयाची भेट देवून पहाणी केली.

शासनाने ९ जुलै २००८ मध्ये ट्रॉमा केअर युनिटला प्रशासकीय मान्यता दिली. जुलै २००८ च्या अर्थसंकल्पात यासाठी १ कोटी ६३ लक्ष ७१ हजार २०० रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. जुलै २००९ मध्ये या सेंटरचे भूम‌िपूजन करण्यात आले. साडेतीन वर्षांत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या ट्रॉमा केअर युनिटसाठी अद्ययावत मशिन उपलब्ध करून देण्यात आली. मात्र तरीही युनिट सुरू होत नसल्याने ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले. गत दोन वर्षांपासून आमदार दीप‌िका चव्हाण यांनी पाठपुरावा केल्याने अखेर राज्य शासनाने २ जानेवारी

रोजी पदांचा आकृतीबंध जाहीर केल्याने पदनिर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे.
ट्रॉमा केअर युनिटच्या पदनिर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. विधीमंडळ अधिवेशनात निर्णय झाल्याने सटाणा ट्रॉमा केअर लवकरच सुरू होणार आहे. – दीप‌िका चव्हाण, आमदार बागालण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन्स्पेक्टर रॉय’ करणार त्र्यंबकमध्ये ‘क्राइम पेट्रोल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

समाजातील भयावह वास्तव मांडणाऱ्या क्राइम पेट्रोलसारख्या माल‌िकांमधून पोलिस निरीक्षकाची भूमिका करणारे अभिनेते निख‌िल रॉय आता त्र्यंबकेश्वर परिसरातही ‘क्राइम पेट्रोल’ करणार आहेत. त्र्यंबक पोल‌िस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी एनजीओमार्फत केल्या जाणाऱ्या कामात रॉय सहभागी झाले आहेत.

निख‌िल रॉय यांनी सीआयडी, क्राइम पेट्रोल यासारख्या गुन्हे विश्वाचे चित्रण करणाऱ्या माल‌िकांमध्ये काम केले आहे. समाजातील गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. एनजीओ मार्फत होणाऱ्या जनजागृती अभियानात ते सहभागी झाले आहेत.

येथून पुढे दीड वर्ष ते या भागात भेटी देतील असे समजते. त्र्यंबकेश्वर पोल‌िस ठाण्याच्या हद्दीत तळेगाव घटना घडली आणि त्याचे पडसाद उभ्या महाराष्ट्रात उमटले. अनेक दिवस परिसर धुमसत राहीला. गुन्हेगारी कमी करण्यासाठी किंबहुना समुळ उच्चाटन करण्यासाठी एनजीओंकडे काम सोपविण्यात आले आहे.

१८ महिने हे चालणार काम
‘रिसिलेन्ट इंडिया संवेदनक्षम भारत’ या संस्थेने शाळा कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून कौटुंबीक वातावरण निकोप करण्याचे ठरविले आहे. एनजीओमध्ये काम करणारे राजीव चौबे यांनी याबाबत अभ्यासपूर्ण प्रकल्प तयार केला आहे. सर्वप्रथम शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे. जवळपास १८ महिने हे काम चालणार आहे. याकरिता त्र्यंबक पोल‌िस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळा व कॉलेजची निवड करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारयादीतच गोलमाल?

$
0
0

प्रभाग क्रमांक एकमध्ये तब्बल बारा हजार बाहेरील मतदार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकींची धामधूम सुरू होत असतानाच, प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालण्यात आला आहे. प्रभागांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या चुका करण्यात आल्या असून एका प्रभागातील मतदारांची थेट अदलाबदल करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील मतदारयादीत तब्बल बारा हजार बाहेरील मतदारांची घुसखोरी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या यादीत नाशिकरोड, जेलरोड, सातपूर, मध्य नाशिक व जुने नाशिकमधील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रकार तांत्रिक कारणाने झाला असून १२ जानेवारीला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीनंतर नागरिकांना सूचना व हरकती घेता येणार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.

महापालिका निवडणुकांची घोषणा ही कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असताना मतदार यादीतील घोळ मात्र अद्याप संपलेला नाही. मनपा निवडणुकीसाठी विधानसभेचीच मूळ यादी ग्राह्य धरण्यात आली असून त्यात नव्याने ऑक्टोबर २०१६ मधील मतदार नोंदणी मोहिमेतील नावे समाविष्ट करण्यात येणार आहे.. त्या यादीवर मतदारांकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहे. त्यापूर्वीच या निवडणुकीसाठी महापालिकेने विधानसभा यादीची प्रभागनिहाय मतदार विभागणी केली असून ती प्रसिद्धही केली आहे. परंतु, प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये आता मोठा गोंधळ असल्याचे समोर येत आहे.

बाहेरील प्रभागातून घुसखोरी

या याद्यांमध्ये केवळ मतदारांची अदलाबदली झाली नसून चक्क विभागच बदलण्यात आले आहेत. प्रभाग क्र. १ च्या मूळ प्रारुप यादीमध्ये २५,३९५ मतदारांचा समावेश आहे. हा प्रभाग पंचवटीत असून यामध्ये मात्र सातपूर, नाशिकरोड, जेलरोड, मध्य नाशिक, मखमलाबाद, जुने नाशिकमधील कॉलन्याच समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तर जुन्या नाशिकमधील भद्रकाली, शिवाजी चौक, बडी दर्गा, नाशिकरोड येथील सिन्नर फाटा, विष्णू नगर, रेल्वे क्वार्टर्स, जेलरोड येथील दसक, सायखेड रोड, महालक्ष्मी नगर, हरिओम सोसायटी, सातपूर येथील अशोक नगर, विट्टभट्टी परिसर, आयटीआय कॉलनी असा परिसर समाविष्ट करण्यात आला आहे. जवळपास ८ ते १० हजार मतदारांची हे बाहेरील प्रभागातून घुसखोरी करण्यात आली आहे. तर या प्रभागातील मतदार हे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ना‌शिकचे रहिवास क्षेत्र दुप्पट

$
0
0

शहर विकास आराखड्यात ४८ टक्क्यांपर्यंत वाढ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नाशिक शहराच्या बहुचर्चित विकास आराखड्यात रहिवाशी क्षेत्र एकूण क्षेत्रफळाच्या ४८ टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. या धोरणामुळे शहरीकरणाला वेग मिळणार असला तरी पायाभूत सुविधा पुरविताना महापालिकेच्या नाकीनऊ येणार आहेत. आराखड्यात रहिवाशी क्षेत्रात तब्बल २७ टक्क्यांची वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिक खुशीत आहेत.

राज्य सरकारने सोमवारी (ता.९) नाशिकचा पुढील २० वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा अंशतः विकास आराखडा जाहीर केला. या आराखड्यात मोठ्या प्रमाणावर बदल सुचविण्यात आले असून, ३१ आरक्षणे वगळली आहेत. तर ७७ आरक्षणांच्या वापरात बदल केले आहेत. ७९ आरक्षणांमध्ये बदलही प्रस्तावित आहेत. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अजून बदल होण्याची शक्यता आहे. तत्कालीन नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते यांनी आरक्षणांची संख्या कमी करून ती ४८२ वर आणली होती. अनेक आरक्षणांच्या पर्पजमध्ये पब्लिक अॅमेनिटीज असा बदल करून अनेक पर्याय ठेवले आहेत. नव्या विकास आराखड्यात पर्यावरणासाठी मोठा ग्रीन पट्टा ठेवण्यात आला होता.परंतु, नव्या विकास आराखड्यात एकूण महापालिका क्षेत्रापैकी तब्बल ४८ टक्के क्षेत्र हे रहिवाशी क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.

रिंगरोडला नवीन टाऊनशिप

नव्या विकास आराखड्यात रहिवास क्षेत्रात मोठी वाढ असली तरी शहराच्या मध्यवर्ती भागात रहिवाशी वस्तींची वाढ झाल्यास सध्याच्या सुविधा तोकड्या पडण्याची भीती आहे. त्यामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या शहराबाहेरील रिंगरोड परिसरात नव्या टाऊनशीप उभारण्याचा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारणे शक्य आहे. तसेच, मध्यवस्तीवरील ताणही कमी होणार आहे. त्यामुळे रिंगरोडच्या आजूबाजूला नवीन टाऊनशीप उभारण्याला पालिका प्रोत्साहन देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरसाठी पहिल्याच दिवशी ५७ अर्जांची विक्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाल्यानंतर मंगळवारी (दि. १०) पहिल्याच दिवशी विभागीय महसूल आयुक्तालयातून ५७ उमेदवारी अर्ज नेल्याचे विभागीय महसूल आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्यावतीने तहसीलदार सुनंदा मोहिते यांनी सांगितले.

नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत निवडणूक आयोगाच्या या अधिकृत घोषणेनुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र इच्छुक उमेदवारांच्या एकूण २३ प्रतिनिधींनी ५७ उमेदवारी अर्ज विभागीय महसूल आयुक्तालयातून नेल्याची माहिती या कार्यालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज प्राप्त करणे व संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या प्रक्रियेत थोडासा बदल करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर इतर प्रशासकीय कामकाजांची जबाबदारी असल्याने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेच उपलब्ध होणार आहेत. त्यांच्याकडेच उमेदवारी अर्ज सादरही करावे लागणार आहेत. त्यामुळे नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर या जिल्ह्यांतील इच्छुकांनाही आता या बदलामुळे नाशिकलाच अर्ज सादर करावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवास योजनेच्या नावाखाली फसवणूक

$
0
0

काही संस्थांकडून परस्पर बनावट नोंदणी अर्जांची विक्री

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील बेघरांचे सर्व्हेक्षण सुरू होण्याआधीच काही संस्थांकडून आवास योजनेसाठी परस्पर बनावट अर्ज विक्री सुरू करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांना या अर्जांची ५० ते १०० रुपयात विक्री केली जात असून, महा-ई-सेवा केंद्रामार्फतच ही फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी झोपडीनिहाय सर्व्हेक्षण व मागणी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेव्दारे निवड केलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्यक्षपणे जाऊन विहीत नमुन्यात माहिती संकलित केली जाणार आहे. यासाठी सर्व्हेक्षणाचे काम सुरू होण्यापूर्वीच काही संस्थांकडून आवास योजनेसाठी बनावट अर्ज विक्री सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांकडून ५० ते १०० रुपये गोळा केले जात आहेत. विशेष म्हणजे या अर्जांवर महा- ई सेवा केंद्र असे लिहिण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे लक्षात येताच पालिकाही खडबडून जागी झाली आहे.

मागणी सर्व्हेक्षणाकरिता महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असणाऱ्या नागरिकांकडून त्यांची शासनाने निर्धारित केलेल्या घटकांनुसार मागणी सर्व्हेक्षणाव्दारे नोंद केली जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांत २० रुपये शुल्क आकारून रितसर नोंद करून अर्ज उपलब्ध होतील. सदर अर्जावर मनपाचा सांकेतिक क्रमांक व शिक्का असेल. इच्छुक अर्जदारास याकरिता समक्ष उपस्थित राहणे बंधनकारक असून, एका व्यक्तीस एकच अर्ज घेता येईल. तसेच अर्ज केवळ विभागीय कार्यालयांमध्येच भरले जाणार आहेत. त्यासाठी अगोदर प्रचार प्रसिद्धी केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे असे प्रकार आढळून आल्यास झोपडपट्टी सुधारणा विभाग, मुख्यालय राजीव गांधी भवन (फोन क्र. ०२५३-२२२२४६२, २५७५६३१/३२) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१० रुपयांचा अर्ज ५० रुपये नोंदणी शुल्क

महा- ई सेवा केंद्रावर पंतप्रधान आवास योजनेची नोंदणी करताना १० रुपयांचा अर्ज ग्राहकांना दिला जात आहे. तसेच ऑनलाइन नोंदणी करताना ग्राहकांकडून ५० रुपये शुल्क आकारण्यात येते. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी हजारो अर्जांची विक्री झाली आहे. तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी गर्दी होत आहे. परंतु, यात काही महा- ई सेवा केंद्रचालकांकडून १० रुपयांचा अर्ज २० ते ३० रुपयांना दिला जातो. तर ऑनलाइन नोंदणीचे शुल्क तब्बल १०० ते १५० रुपये आकारले जात असल्याचेही ग्राहकांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान आवास योजना गरिबांसाठी अत्यंत गरजेची आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून नोंदणी करून घेतली पाहिजे.

- निशा पाटील, ग्राहक

महापालिकेकडून कुठलेही शुल्क आकारले जात नाही. तसेच, विभागाीय कार्यालयांमध्येच अर्ज मिळणार असून, कोणत्याही खासगी संस्थेचा याच्याशी संबंध नाही. सदरील संस्थेची तक्रार प्राप्त झाली असून, त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

- अनिल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच

$
0
0

राष्ट्रवादीचे महाजन, मनसेचे कुंभारकर भाजपमध्ये

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपाठोपाठ भाजपमध्येही जोरात इनकमिंग सुरू आहे. भाजपने मंगळवारी (दि. १०) मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीनही पक्षांना झटका दिला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे उद्धव निमसे, राष्ट्रवादीचे सचिन महाजन व मनसेचे रुची कुंभारकर या तीन नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला आहे.

माजीमंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले सचिन महाजन यांनीही राष्ट्रवादी सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, यावेळी नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या शिवसेना व भाजपमध्ये इनकमिंग जोरात आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेत मनसेच्या सुमन ओहोळ व अपक्ष रशिदा शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपनेही मनसे, काँग्रेस अन् भाजपला धक्का दिला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मनसेचे नगरसेवक रुची कुंभारकर, राष्ट्रवादीचे स्विकृत नगरसेवक सचिन महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन दिवसात मनसेच्या दोन नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने मनसेची सदस्यसंख्या आता अकरावर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास आराखडा मूठभर लोकांसाठीच

$
0
0

दशरथ पाटील यांची भाजपवर टीका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन शहर विकास आराखड्यातील आरक्षणे वगळताना त्यांची कारणे दिलेली नाहीत. तसेच मोठ्या प्रमाणावरील आरक्षणे ही वगळण्यात आली आहे. त्यामुळे नवीन विकास आराखडा हा बिल्डर धार्जिणा असून केवळ मुठभर लोकांच्या भल्यासाठीच तो जाहीर करण्यात आल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे.

या आराखड्यात सार्वजनिक वापराच्या जमिनींचे आरक्षण काढून त्या रहिवाशी क्षेत्रासाठी आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे हा विकास आराखडा पारदर्शक नसून मुख्यमंत्र्यांनी तो अभ्यास करून जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. विकास आराखड्यावर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आराखड्यात ३१ आरक्षणे वगळण्यात आली असून त्याचा फायदा कोणाला होणार आहे, याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सार्वजनिक वापराच्या आरक्षणांमध्ये बदल करून ती निवासी क्षेत्रात टाकण्यात आली आहेत. त्यामुळे याचा थेट फायदा हा मुठभर बिल्डरांना होणार आहे. यापूर्वीही जवळपास ३० आरक्षणे ही व्यपगत झाली आहेत. प्रशासनाने जेव्हा भाव वाढले तेव्हा आर्थिक क्षमता नसल्याचे सांगून जागा मालकाला थेट फायदा करून देण्यात आला आहे, असेही पाटील यांनी सांगितले.



भूमाफियांचा भांडाफोड करणार

रस्त्यांची आरक्षणे बदलून पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकण्यात आली आहेत. त्यामुळे हा आराखडा शेतकरी विरोधी असून केवळ मुठभर लोकांच्या भल्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. हा आराखडा जाहीर करण्यापूर्वी आपण मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. परंतु, त्यांनी तिला नाही. नाशिकमधील काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोयीसाठी हा आराखडा जाहीर करून घेत त्यातून आर्थिक फायदा करून घेतला आहे. त्यामुळे या आराखड्याविरोधात आपण जनजागृती करणार असून भूमाफियांचा भांडाफोड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images