Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नोट प्रेसचे अप‌ील फेटाळले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
केंद्र सरकारची जमीन असल्याचे सांगून महापालिकेला सहा कोटींचा मालमत्ता कर भरणा करण्यास नकार देणाऱ्या करन्सी नोट प्रेस व इंड‌िया स‌िक्युरिटी प्रेसचे अप‌ील राज्य सरकारनेही फेटाळले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४०६ मूल्य निर्धारण व कर याबाबतच्या आदेशाविरोधात राज्य सरकारकडे अप‌ील करण्याची तरतूद नसल्याचे सांगून सरकारने हायकोर्टात जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही संस्थांना आता मालमत्ता कर भरण्याशिवाय पर्याय नसून, विविध कर विभागाने आता सीएनपी व आयएसपीला वसुलीसाठी पुन्हा नोटीस पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पालिकेच्या सहा कोटी रुपयांच्या वसुलीचा मार्ग मोकळा होणार आहे.
नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसचे महामंडळात रुपांतर झाल्यानंतर सन २००८ पासून करन्सी नोट प्रेस व इंड‌िया स‌िक्युरिटी प्रेसने मालमत्ता कर भरण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारची जमीन असून संबंधित संस्था याही केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगून कर लागू होत नसल्याचा दावा या संस्थांनी केला आहे. परंतु, पालिकेने सीएनपी व आयएसपीचा हा दावा फेटाळून लावत त्यांना वसुलीच्या नोट‌िसा बजावल्या. परंतु, तरीही या संस्थांनी कर भरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेने दोन्ही संस्थांना अंतिम वसुलीच्या नोट‌िसा गेल्या वर्षी बजावल्या होत्या. महापालिकेच्या नोट‌िसांविरोधात सीएनपी व आयएसपीने थेट राज्य सरकारकडे दाद मागितली होती.
सीएनपीने महापालिकेच्या कर आकारणीचे आदेश हे महापालिका अधिनियमातील कलम ४५१ नुसार विखंडीत करण्याची मागणी केली होती. परंतु, राज्य सरकारने सीएनपीचे अप‌िल फेटाळले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४०६ नुसार मूल्य निर्धारण व कर या बाबतच्या आदेशाविरोधात राज्य सरकारकडे अपील करण्याची तरतूद नसल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले आहे.

महापालिकेकडून पुन्हा नोटीस
करन्सी नोट प्रेसकडे ५ कोटी ५३ लाख ५२ हजार रुपयांची थकबाकी आहे, तर इंड‌ियन स‌िक्युरिटी प्रेसकडे ५४ लाख ९१ हजार रुपये थकबाकी आहे. या रकमेच्या वसुलीसाठी पालिकेने वारंवार नोट‌िसा पाठवल्या. या कराच्या वसुलीविरोधातील, सीएनपी विरोधातील अपील राज्य सरकारने फेटाळल्यानंतर संबंधित संस्था हायकोर्टात जाण्यापूर्वीच पालिकेने वसुलीची कारवाई सुरू केली आहे. या संस्थांना पंधरा दिवसांच्या वसुलीचे पत्र पाठविण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा वसुलीच्या नोट‌िसा पाठविल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोकणगाव फाट्यावर अपघात; तीन तरुण जागीच ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

मुंबर्इ-आग्रा महामार्गावरिल कोकणगाव फाट्यावर शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील तिघांच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सच‌नि वसंत मुंजे (वय २१), दत्ता अशोक सूर्यवंशी (वय ३०), योगेश मंगळू पवार (वय ३०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कसबे सुकेणे येथील सच‌नि मुंजे, दत्ता सूर्यवंशी व योगेश पवार हे तिघेही पिंपळगाव बसवंत येथील औद्योगिक वसाहतीतील सिग्नेचर कंपनीत नोकरीस होते. शुक्रवारी सकाळी सहा वाजता तिघेही मोटार सायकलवरून (एमएच १५ डीपी ०८२१) कंपनीत जात असताना कोकणगाव फाट्यावर रस्ता ओलांडताना पिंपळगावहून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेही तरुण जागीच ठार झाले. या अपघात प्रकरणी संदीप मूंजे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक-ट्रेलर अपघातात सटाण्याजवळ दोन ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील वीरगावजवळ हॉटेल तुळजानजीकच्या वळणावर भरधाव वेगात असलेला मालवाहू ट्रेलर व ऊसाने भरलेल्या ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दोघाही वाहनांचे चालक जागीच ठार झाले, तर क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

हॉटेल तुळजा जवळ शुक्रवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास मालवाहू ट्रेलर (आरजे ५१ जीए ०१०८) व ऊसाने भरलेला माल ट्रक (एमडब्ल्यूए ७४११) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांही वाहनांचा समोरील बाजुचा चेंदामेंदा झाला. ट्रेलर चालक परमेश्वर गोपाळ जाट (वय २५, रा. कोलेरेडीया, राजस्थान) व ऊस मालट्रक चालक दौलत रामचंद्र साबळे (वय ४७ रा. देवगांव ता. निपाड) हे दोघेही अपघात जागीच ठार झाले. अपघाताचा मोठा आवाज आल्याने परिसरातील शेतकरी व ढाबा चालकांना तत्काळ पोलिसांना याबाबत कळविले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसाका’साठी धीर धरा, सहकार्य करा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेळकाढूपणामुळे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा यावर्षी गळीत हंगाम सुरू करण्यात कारखाना व्यवस्थापनास अडचण आली. मात्र, पुढील गळीत हंगाम वेळेवर व पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी प्राधिकृत मंडळ कटिबद्ध आहे. यासाठी कारखान्याशी संलग्न असलेल्या सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या प्राप्त परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सभासद व कामगारांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात शुक्रवारी (दि. १३) रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, जिल्हा बँकेने कारखान्याला कर्ज देण्यासाठी दिरंगाई केली. तसेच मुंबई जिल्हा बँकेला ना हरकत पत्र देण्यासही टाळाटाळ केल्याने कारखान्याला गळीत हंगाम सुरू करता आला नाही. मात्र, पुढील हंगाम यशस्वीपणे व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्राधिकृत मंडळ आत्तापासून कामाला लागले आहे. राज्य सहकारी बँक तसेच मुंबई जिल्हा बँकेकडे नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व सभासद व कामगारांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन आमदार आहेर यांनी केले.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वसाकाला अल्पमुदतीचे दोन कोटी रुपये कर्ज मंजूर केले असून, त्याचे रुपांतर मध्यम मुदतीच्या कर्जात करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची कारखान्याचे सभासद व कामगार यांचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. प्रास्तविक कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी केले. केदा आहेर, धनंजय पवार, अभिमन पवार, जिल्हा परिषद सदस्य रवीद्र देवरे, नितीन पवार उपस्थित होते.

इतर प्रकल्प सुरू करा
कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने सर्वांना विश्वासात घेऊन कारखाना, वीजनिर्मिती प्रकल्प तसेच आसवानी प्रकल्प खासगी व्यक्तीला अथवा कंपनीला चालविण्यास देण्यास प्रयत्न करावेत, अशी मागणी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संतोष मोरे, वसंत निकम, संतोष सूर्यवंशी, शिवाजी सोनवणे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर स्टेशनच्या भूमिपूजनाने खळबळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

केंद्रात, राज्यात अथवा महापालिकेत आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर तिचे नियम पाळणे सर्वांनाच बंधनकारक असते. परंतु, असे असताना औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता केदार नागपुरे यांच्या उपस्थितीत अंबडच्या सिमेन्स कंपनीसमोर फायर स्टेशनचे औपचारिक भूमिपूजन करण्यात आले. यामुळे आदर्श आचारसंहितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फायर स्टेशनच्या वृत्ताने शुक्रवारी (दि. १३) दिवसभर उद्योग भवनात खळबळ उडालेली होती. दरम्यान, काही वर्षांपूर्वी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांनी आचारसंहितेच्या काळात कामाची वर्क ऑर्डर दिल्याने त्यांच्यावरही आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली होती. तक्रार करण्यात आलेल्या कार्यकारी अभियंता यांची चौकशी होऊन त्यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली होती. आता चक्क फायर स्टेशनच्या भूमिपूनजना घाट पौष पौर्णिमेचा मुहूर्त साधत एमआयडीसीच्या बड्या अधिकाऱ्यांनी घातला. त्यातच भूमिपूजनाचे वृत्त प्रसारित झाल्यावर औद्योगिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे कामही एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जात असल्याचे समोर आले आहे.

उद्योजकांना प्रलोभन?

परंतु, शासकीय विभागात उच्च पदावर कार्यरत अधिकाऱ्यांनी आचारसंहिता पाळायची नाही का, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज काव्य उद्यानाच्या नूतनीकरणास प्रारंभ

0
0

१६ वर्षांनंतर कामास सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज काव्य उद्यानाचे रूप पालटणार असल्याचे महापालिकेच्या महासभेत वर्षापूर्वी घोषणा करण्यात आली होती. या कामास मंजुरीही मिळाली होती. सप्टेंबर २००० ला भूमिपूजन झालेल्या या उद्यानाचे उभारणी सात महिन्याच्या कालावधीत झाली. एप्रिल २००१ मध्ये तत्कालीन शिक्षण व सांस्कृतिक मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर दुर्लक्षित झालेल्या या उद्यानाची दुरवस्था झाली होती. आता उद्यानाच्या कामास सुरुवात झाली असून सध्या पाया खोदण्याचे काम संथगतीने सुरू आहे.

जीर्ण पाचोळा झालेल्या या उद्यानाला तेजाची लेणी करण्याचा ठराव महापालिकेत करण्यात आला. उद्यानातील जुन्या रचना काढून नव्याने साकारणाऱ्या या उद्यानात कॅफे, अॅम्पी थिएटर, येथील झाडांना तात्यासाहेबांच्या कवितांची नावे अलंकारित करण्यात येणार आहे.

सोळा वर्षांपूर्वी या उद्यानाची उभारणी करण्यात आली होती. या उद्यानाचे नूतनीकरणासाठी मागणी वाढली होती. या मागणीनुसार या कामासाठी २ कोटी २४ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.

मेकओव्हर होणार…

नव्या आराखड्यानुसार उद्यानाचा पूर्ण मेकओव्हर करण्यात येणार आहे. ५९६० चौरस फूट जागेवर नव्याने प्रशस्त असे उद्यान साकारले जाणार आहे. दोन अॅम्पी थिएटर, रॅम्प तयार केले जाणार आहेत. सध्या नदीकाठावर असलेल्या या उद्यानाचा भाग नदीपात्रापासून सहा फूट उंच उचलण्यात येणार आहे. येथे ‘कमळ कुंड’ तयार केले जाणार आहे. तसेच ‘संवाद कट्टा’ साकारला जाणार आहे. कॅफे एरियासाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात येणार आहे.

हे उद्यान शहरापासून दूरवरच्या अंतरावर असल्याने येथे जाणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. नदीच्या पात्रातून उद्यानात जाण्यासाठी बोटीची व्यवस्था केल्यास या उद्यानातील वर्दळ वाढण्यास मदत होऊ शकेल. पूराचे पाणी उद्यानात शिरून उद्यानाला फटका बसणार नाही, याचीही काळजी घ्यावी. तसेच उद्यानाची देखभाल दुरुस्ती चांगली ठेवल्यास हे चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकेल, असा विश्वास नागरिकांना आहे.

दुरुस्तीमुळे विटांचा खच

नूतनीकरणाच्या कामासाठी जुने काम काढून टाकण्यात येत असल्याने सध्या उद्यानात सर्वत्र दगड आणि विटांचा खच पडला आहे. कृत्रिमरीत्या बनविण्यात आलेल्या झाडांची खोडे आणि त्यांच्या रोषणाईसाठी जोडण्यात आलेल्या वायर इतरत्र पडलेल्या आहेत. पाण्याचा बनविण्यात आलेला धबधबा, पाण्याचा पूल यांचे केवळ अवशेषच शिल्लक राहिले आहेत. या उद्यानात मद्याच्या रिकाम्या बाटल्याही पडलेल्या दिसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत ‘लाललोई’ची रंगत

0
0

रुहानी मिशन सेंटरच्या वतीने आयोजन

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते त्यानिमित्ताने येथील सावन कृपाल रुहानी मिशन सेंटरच्या वतीने यांच्या वतीने काल येथील दर्शन अकादमीच्या प्रांगणात 'लोहडी'(लाललोई) सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्शन अकादमीच्या प्रांगणात सूर्यास्तानंतर काही वेळाने महिलांनी एकत्र येत लाकूड, गोवऱ्या, रेवड्या आदी सामग्री जमा करून 'लाललोई' चे पूजन करून विधिवत पद्धतीने पेटविण्यात येऊन तीळ, गजक (डिंक)गुळ, शेंगदाणे, कुरमुरे, मक्याचे दाण्याचे पोहे नैवेद्य म्हणून अर्पण करताना पल्लव मंत्राची अरदास केली. उरलेले साहित्य हे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. या वेळी पेटविण्यात आलेल्या लाललोईला महिलांनी प्रदक्षिणा मारल्या.

वैज्ञानिक महत्त्व विषद

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष हुंदराज नागदेव, थारुमल तेजवानी, टोपनदास नरसिंगानी, कौशल्या नागदेव, लता लुल्ला, लता देहलानी आदी मान्यवर उपस्थित होते. देवी लखमीयानी यांनी लाललोई विषयी असलेले धार्मिक,ऐतिहासिक व वैज्ञानिक महत्त्व महिलांना समजावून सांगत सावन कृपाल रुहानी मिशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन ‘डीपी’ने सातपूरकर खूश

0
0

८० टक्के परिसर रहिवासी भाग केल्याने शेतकरी समाधानी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने जाहीर केलेल्या नवीन विकास आराखड्यात सातपूरकरांना खूश केले आहे. सातपूर गावातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के भाग हा रहिवासी करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. महापालिकेने तात्काळ नकाशा प्रसिद्ध करून मुख्य रस्त्यांना मार्किंग करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करावी, अशी अपेक्षा सातपूरकर व्यक्त करत आहेत.

नाशिक महापालिकेने दीड वर्षांपूर्वी शहरात ठिकठिकाणी आरक्षणे जाहीर केली होती. परंतु, यात सातपूर गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवर आरक्षणे टाकण्यात आली होती. अगोदरच सातपूर औद्योगिक वसाहत स्थापन होतांना सातपूर गावातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेतजमिनींवर आरक्षणे पडली होती. यानंतर पुन्हा उर्वरित राहिलेल्या शेतजमिनींवर आरक्षणे टाकण्यात आल्याने सातपूरकरांना प्रचंड विरोध केला होता. प्रस्तावित विकास आराखडा फुटल्यावर सर्वात प्रथम सातपूकरांनी विरोध करण्यास सुरुवात केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांचे हित पाहता प्रस्तावित विकास आराखडा नामंजूर केल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यात पतंगोत्सवाची धूम

0
0

संजय लोणारी, येवला

रंगीबेरंगी पतंगांनी अवघं आकाश व्यापून जाई

मांजावर मांजा पडताना काटाकाटीचा पेच होई!

असाच माहोल सध्या येवल्याच्या पतंगोत्सवात आहे. ‘बढावss बढावss,अरे बढावsss’, ‘दे ढिल,अरे भैय्या दे देरे ढिल’ अशा जोरदार आरोळ्यांनी एकमेकांना साद घालताना प्रत्येक घरादारांच्या गच्ची व धाब्यांवरून वाहत्या हवेसरशी दिवसभर आकाशात घिरट्या घालणारे पतंग अन् अर्धीचा, पाऊणचा, सव्वाच्या रंगीबेरंगी पतंगांसह आण्णा ढोल पतंगांनी व्यापून टाकलेले आकाश आणि दिवसभर रंगलेली काटाकाटीची स्पर्धा अशा जोशपूर्ण वातावरणात शनिवारी येवला शहरात पतांगोत्सवाची मोठी धूम दिसली. दिवसभर आकाशात झेपावण्याऱ्या पतंग जणू काही चांदण्याच भासत होत्या.

धाबे, गच्ची गजबजली

कुठे येवल्याच्या प्रसिद्ध हलकडीचा कडकडाट, तर कुठे कर्णकर्कश आवाजातील जुन्या-नव्या उत्साहवर्धक गाण्यांच्या तालावर थिरकणारी पतंगप्रेमींची पावले...तरुणाईसह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त सहभागाने फुललेल्या शहरातील प्रत्येक घरादारांच्या गच्ची व धाबे अगदी भल्या सकाळपासून ते सायंकाळचा सूर्य मावळतीला गेल्यानंतरही गजबजले होते.

अबालवृद्धही उत्सवात

तरुणाईसह आबालवृद्धांनीही दरवर्षीप्रमाणे यंदाही पतंगोत्सवात धमाल केली. मित्रकंपनीच्या घरांचे धाबे, गच्चीवर हवेत ढिल देत पतंग बढवीले जात आहेत. ढिल दिली जातांना मांजावर मांजा पडताना काटाकाटीसाठीचा पेच रंगत आहे. सकाळी सकाळीच गच्चीवर चढलेला येवेलेकर सायंकाळी सूर्य अस्ताला गेल्यानंतर खाली उतरला नसल्याचे चित्र परंपरेप्रमाणे या पतांगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नजरेत पडले. रविवाररही येवलेकर उत्सवात अगदी उशिरापर्यंत पतंग उडविण्याची मनमुराद मजा घेताना

दिसणार आहेत.

‘कर’ही उत्सवात
रविवार ‘करी’च्या दिवशी (दि.१५) देखील येवलेकर पतंग उडविण्याची मजा लुटणार आहेत. अखेरच्या दिवशी सूर्य मावळतीला गेल्यानंतरही अगदी रात्रीच्या काळोखात फटक्यांच्या झगमगाटात देखील येवलेकर या उत्सवाचा पुरेपूर आनंद घेत असतात. रात्री उशिरा शहरात पतंगबाजी होताना जणू काही दिवाळी साजरी केल्यागत पतंगवेडे पतांगोत्सवाची सांगता करतील.


आसारी, मांजासाठी स्पर्धा
येवला मेड ‘आसारी’वरील मांजासह सरसर आकाशात वरवर सरकत इकडून तिकडे व तिकडून इकडे घिरट्या घालणारे रंगीबेरंगी पतंग अन् अगदी दिवसभर रंगलेली काटाकाटीची स्पर्धा रंगली होती. ‘भोगी’च्या पहिल्याच दिवशी येवलेकरांनी मोठी धूम करत उत्सवात रंग भरले. पतंगप्रेमींच्या गर्दीने शहरातील सर्वच घरांच्या गच्च्या व धाबे अक्षरशः फुलले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्तिनाथ यात्रोत्सवाचाप्रशासनाकडून आढावा

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
येथील निवृत्तिनाथांच्या यात्रोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी नियोजनाची बैठक घेतली. येत्या २२ ते २४ जानेवारी दरम्यान येथे होणाऱ्या निवृत्त‌िनाथ महाराज यात्रोत्सवाच्या बैठकीस तहसीलदार महेंद्र पवार, नगराध्यक्षा विजया लढ्ढा, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे, उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव उपस्थित होते. त्यांनी भाविकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी विविध शासकिय विभागाच्या प्रतिनिधींचा आढावा घेतला.

निवृत्त‌िनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय धोंगडे यांनी वारकऱ्यांसाठी गॅस उपलब्ध करून द्यवा, परिसर स्वच्छ ठेवावा तसेच मंदिर परिसरात २४ तास पाणी पुरवठा ठेवावा, पुरेशी वीज व्यवस्था ठेवावी अशी मागणी केली.

वैद्यकीय पथके तयार
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. भागवत लोंढे यांनी यात्रा कालावधीत जादा स्टाफ मागविणार असल्याचे सांगून कुशावर्त, अल्पबचत भवन, सापगाव फाटा आदी ठिकाणी पथके तैनात करणार असल्याचे सांगितले.

समस्या जैसे थे
दिंडीतील वारकरी भाविकांना पायी चालण्यास रस्ता नसतो. त्यांना रस्त्यावर दुकान मांडून बसलेल्या व्यावसाय‌िकांच्या रोषास सामोरे जावे लागते, याचा प्रामुख्याने विचार झाला पाहीजे. दरवर्षी किमान पाच लाखांच्या उपस्थितीत होणाऱ्या वारकऱ्यांच्या महामेळाबाबत शासनाच्या लेखी असलेली अनस्था या बैठकीस उपास्थ‌ित असलेल्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेमोक्रसी!

0
0

डेमोक्रसी!

दिवस उजाडण्यापूर्वीच रायबा-सायबाचं काम सुरू होत होतं. एरवी सूर्य डोक्यावर येईपर्यंत लोळत पडणारे दोघं वर्कर आता अंधार संपण्यापूर्वीच अंथरुण सोडत होते. त्यांच्या दारापुढं चढाओढीनं चारचाकी गाड्या येऊन उभ्या राहत होत्या. ठकसेन प्रत्येक मिनिटांचं नियोजन करीत होता अन् ही जोडगोळी त्याचा शब्द पडू देत नव्हती. रायबा सकाळी-सकाळी घराच्या व्हरांड्यात चकरा मारीत असतानाच सायबा तिथं दाखल झाला...

सायबा : स्वारी जरा लवकर उठली म्हणायची. माझं राव रात्री लईच जागरण झालं. आज पाय नको नको म्हणत आहेत. तिळगूळ वाटून जीभ गोड झाली असली तरी पाय कडू पडलेत राव! गृहमंत्र्यांनी तेल-मालिश केलं, नाहीतर काय खरं नव्हतं...

रायबा : अरं, तू तर फक्त मागं मागं चाललास. विचार करं त्ये कमळवालं इच्छुक सारखंसारखं पाया पडून किती जाम झालं असंल. तिळ हातात दिलं की नुसतं खाली वाकायचं. कंबरच गेली असंल त्याची. एका घरात लहान पोरापुढचं वाकला रावं. मला तर हासूच आवरंना तेव्हा!

सायबा : होय... भारीच गंमत झाली. दिवसभरात हजार उंबरे धुंडाळले की असं होणारच. काल पण असाच किस्सा घडला. एका इच्छुकाला भिकारी आडवा आला. सोबत कार्यकर्ते अन् समोर लोक असल्यानं त्याला मार्गही बदलता येईना. गड्यानं मग पाकीट काढलं अन् टेकवली शंभराची कोरी करकरीत नोट. दानधर्मात आपला हात कुणी धरू शकणार नाही, असंही वर म्हणाला. शेजारचा माणूस म्हणतं होता, हा केबलवाल्याचं बिलसुद्धा लवकर देत नाही. आता एकदम उदार झाला. (दोघंही एकदम जोरात हसले. रोजच्या गमतीजमती डायरीत टिपून पुढल्या खेपेल्या मजेशीर पुस्तक काढण्याचाही इरादा त्यांनी बोलून दाखवला. इतक्यात ठकसेनची फोरव्हीलरही दारात दाखल झाली. दोघंही हसत असल्याचं एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं.)

ठकसेन : नुसत्या गप्पाच करणार की, कामालाही लागणार. संक्रांत आटोपलीय आता. उमेदवारांनी प्रचाराचा बारसुद्धा उडवून दिलाय. नुसतं तळहात खाजवत बसू नका. खाटेवर कुणी आणून नाही देत.

रायबा : होय होय... गुरुजी. लाल माती पाहिल्यावर पहिलवानाचं रक्त जसं सळसळतं तसंच आमचंसुद्धा सळसळतंय. पण, अजून खरी रंगत चढलीच नाही. कुठं आजमावायचं तेवढं सांगा. तालमीतली पोरंसुद्धा तयार आहेत. सध्या निव्वळ गमतीजमतीनंच करमणूक होतेय. आज कुठं मोर्चा न्यायचा मग?

ठकसेन : मोर्चा-बिर्चा काही नाही. एका उमेदवाराचा हॅण्डलमधला पक्ष प्रेसमध्ये जावून ताबडतोब बदलायचा आहे. कालच त्यानं पार्टी बदललीय म्हणे. त्याचा रात्रीला फोन आला होता. घर अन् गाडीवरचे स्टीकर्स रातोरात बदलले. आज हॅण्डल बदलून टाकायचे.

रायबा : चला की मग... रात्रीत त्याची ओळख बदलून टाकू. आपण त्यात एकदम माहीर आहे.

(ठकसेन अन् रायबाचा संवाद सुरू असताना सायबा मात्र धीरगंभीर मुद्रा करून विचार करीत होता. सकाळी त्याच्या दुसरीत जाणाऱ्या मुलानं त्याला पप्पा डेमोक्रॅसी म्हणजे काय, असा प्रश्न केला होता. सायबाला तेव्हा त्याचं उत्तर देता आलं नव्हतं. पण, वारंवार पक्ष बदलण्याचं स्वातंत्र्य म्हणजेच डेमोक्रसी असं उत्तर बहुधा त्याला गवसलं असावं.)

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस अन् राष्ट्रवादी आघाडीची मोटबांधणी

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता सोमवार (दि. १६)पासून चर्चा होणार आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून, प्राथमिक बोलणी सोमवारपासून सुरू होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही, याबद्दलचा अहवाल काँग्रेस मंगळवारी (दि. १७) प्रदेशाध्यक्षांना देणार आहे. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतरच शहरात आघाडी होईल, असा निर्वाळा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे आघाडी अजूनही अधांतरीच असल्याचे चित्र आहे.

काँग्रेस, तसेच राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांकडून महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरच आघाडी करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार होता. परंतु, नाशिकमध्ये मध्यंतरी पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले असून, राष्ट्रवादीच्या अडचणींमुळे काँग्रेस आघाडीच्या मनस्थितीत नव्हती. राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे आणि बनावट नोटांप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेला राष्ट्रवादीचा पदाधिकारी छबू नागरे यांच्यामुळे काँग्रेस दोन पावले मागे आली होती. मात्र, आता बदललेल्या स्थितीत दोन्ही पक्षांकडे सक्षम उमेदवारांची वानवा आहे. त्यामुळे आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे चित्र असून, त्यासाठी काँग्रेस पुन्हा पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहे. त्याकरिता काँग्रेसच्या निवड मंडळाची बैठक मंगळवारी होत असून, त्यात आघाडीसंदर्भात अंतिम निर्णय घेऊन त्याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला जाणार आहे.


हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा

दरम्यान, मंगळवारच्या बैठकीपूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी करण्यासंदर्भात प्राथमिक बोलणी करण्यासाठी सोमवारी शरद आहेर व रंजन ठाकरे यांच्यात प्राथमिक चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर आघाडी करण्यासंदर्भातील प्राथमिक स्तरावर चर्चा होऊन त्यांनतर काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील निर्णयाची वाट पाहिली जाणार आहे. प्रदेशाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर तत्काळ जागावाटपाचीही बोलणी सुरू होणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा वर्षांत अॅट्रॉसिटीचे ८६६ गुन्हे

0
0

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet: @ArvindJadhav
अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाने विराट मोर्चांचे आयोजन केले. त्याच ताकदीने बहुजन समाजाने एकत्र येत अॅट्रॉसिटी कायद्याचे समर्थन केले. नाशिक जिल्ह्याने गत वर्षाच्या अखेरीस हा संघर्ष कोणत्या स्थराला जाऊ शकतो, याचा प्रत्यय दिला. या पार्श्वभूमीवर अॅट्रोसिटी कायद्यानुसार किती गुन्हे दाखल झालेत, गुन्ह्यामध्ये किती वाढ होते आहे, महिला व पुरूषांची संख्या या विषयी घेतलेला हा धांडोळा आजपासून.
--
विकासाच्या माध्यमातून मागील १६ वर्षात ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून स्पर्धात्मक युगात प्रवेश करणाऱ्या ग्रामीण भागात आजही सवर्ण-दलीत असा वाद सुरू आहे. २००० ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी) तब्बल ८६६ गुन्हे दाखल झालेत. वर्षागणीक सरासरी ५४ गुन्ह्यांची नोंद होताना दिसते. गुन्ह्यांचे प्रमाण कमी असले तरी त्यातून निर्माण होणारी विद्वेषाची भावना समाजाच्यादृष्टीने आव्हानात्मक ठरते आहे.
दरम्यान, या कालावधीत अनुसुचित जातीशी संबंधीत ५३३ तर अनुसुचित जमातीबाबत ३३३ तक्रारी पुढे आल्यात. या कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सर्वाध‌िक प्रमाण हाणामारी, डांबून ठेवणे, शिवीगाळ याबाबत दिसून येते. गत १६ वर्षात अशा प्रकारचे ४०८ गुन्हे दाखल झाले आहेत. यानंतर, विनयभंग (११९) बलात्कार (१०७), दंगल (१००) साधी दुखापत (४८), खून (२४) असा उतरता क्रम लागतो. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जाती व्यवस्था आजही तग धरून आहे. त्यातच राजकीय परिस्थिती या व्यवस्थेला आणखी मजबूत करते आहे.
--
९३२ पीड‌ित तर ३७२५ संशयित आरोपी
ग्रामीण भागातील कोणाताही एक तालुका या अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या नोंदीपासून वंचित राहिलेला नाही. समोर आलेल्या तक्रारीनुसार पीड‌ित स्त्री-पुरूषांची संख्या ९३२ इतकी आहे. तर संशयित आरोपी म्हणून तीन हजार ७२५ स्त्री-पुरुषांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्यांची आणि आरोपींची वाढती संख्या यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दोन्ही समाजाकडून आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यातच खरोखर झालेला अन्याय आणि कायद्याचा होणारा दुरोपयोग असा मुद्दाही यानिमित्ताने समोर येतो.
--
गुन्ह्याचा प्रकार-अनुसुचित जाती-अनुसुचित जमाती-एकूण गुन्हे
खून-१२-१२-२४
खूनाचा प्रयत्न-७-२-९
गंभीर दुखापत-९-३-१२
साधी दुखापत-३६-१२-४८
बलात्कार-४२-६५-१०७
विनयभंग-५३-६३-११९
पळवून नेणे-६-६-१२
दंगल-६४-३६-१००
जाळपोळ-२-७-९
जबरी चोरी-२-०-२
दरोडा-१०-३-१३
इतर-२८४-१२४-४०८
अत्याचार प्रतिबंधक कायदा-३-०-३
एकूण-५३३-३३३-८६६
(आकडेवारी २००० पासून नोव्हे. २०१५पर्यंतची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावले हजारो नाशिककर...

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संक्रांतीचा सण अन् नाशिक रन असा दुग्धर्शकरा योग जुळून आल्याने नाशिककरांची शनिवारची सकाळ अधिक प्रसन्नदायी झाली. झुंबा नृत्य, वॉर्म-अपमुळे मरगळ जाऊन ताजेतवाने झालेले अबालवृद्ध नाशिक रनचा आनंद लुटण्यासाठी रस्त्यावर उतरले. सलग पंधराव्या वर्षी ही रन जोशपूर्ण वातावरणात पार पडली.

‍नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी नाशिक रनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेसात वाजता या रनला सुरुवात होणार होती. परंतु, उत्साही नाशिककरांची सकाळी सातपासूनच महात्मानगर येथील मैदानावर मांदियाळी जमू लागली. नाशिक रन आपल्या उपस्थितीने अधिक श्रीमंत करणाऱ्या नाशिककरांच्या स्वागतासाठी ट्रस्टचे पदाधिकारी, प्रायोजकाची भूमिका बजावणाऱ्या शहरातील विविध कंपन्या आणि संस्थांचे प्रतिनिधी आवर्जुन उपस्थित होते. पिस्ता कलरचा टी शर्ट परिधान करून हजारो अबालवृद्ध थंडीची तमा न बाळगता नाशिक रनमध्ये सहभागी झाले. रजिस्ट्रेशनसाठी सकाळपासूनच काऊंटरवर गर्दी झाली होती.

अर्जुन पुरस्कारविजेती कविता राऊत, धावपटू ताई बामणे, आरती पाटील, मोनिका अाथरे आदी खेळाडूंचे मार्गदर्शक विजेंद्रसिंह यांच्या हस्ते मैदानात क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. मान्यवरांच्या हस्ते विविधरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. कविता राऊत आणि संजीवनी जाधव या खेळाडूंचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. संजीवनीच्या वतीने तिची आई भारती यांनी हा सत्कार स्वीकारला.

त्यानंतर व्यासपीठावर झुम्बा नृत्याला सुरुवात झाली. नाशिक रनमध्ये सहभागासाठी आलेले नाशिककरही त्यामध्ये उत्साहाने सहभागी झाले. वॉर्म-अप सेशन संपल्यानंतर सर्वजण नाशिक रनमध्ये धावण्यासाठी सज्ज झाले. यंदा या उपक्रमात दिव्यांग, तसेच गतिमंद बांधवांचा सहभागही लक्षणीय होता. विविध शाळांमधील विद्यार्थी, पालक, कंपनी प्रतिनिधी, तसेच विविध स्तरांवर काम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांनी यामध्ये उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सर्वप्रथम लहान मुले, त्या पाठोपाठ किशोरवयीन मुलांना धावण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांना धावण्यासाठी रस्ता खुला करून देण्यात आला. नाशिक रन हा उपक्रम निर्विघ्न पार पडावा, कुणाला शारीरिक इजा झालीच तर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ठिकठिकाणी रुग्णवाहिका थांबविण्यात आल्या होत्या. अर्धा ते पाऊण तासात जेहान सर्कलला वळसा घालून नाशिककर पुन्हा महात्मानगरच्या मैदानावर परतले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. नंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. शिल्पा भेंडे आणि अतुल नारंग यांनी सूत्रसंचालन केले.

...यांची लाभली उपस्थिती

महापौर अशोक मुर्तडक, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, उपायुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, गंगापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक महेश देवीकर, अतुल झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह रनचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, एच. बी. थोंटेश, मुकुंद भट, सुधीर येवलेकर, महिंद्रा आणि महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, अनिल दैठणकर आदी यावेळी उपस्थित होते.

---

नोंदणी १७ हजार; धावले सहा हजार

या उपक्रमात सहभागासाठी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टने बनविलेले खास टी शर्टस् परिधान करणे आवश्यक होते. यंदा १७ हजार टी शर्टस््ची विक्री झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. मात्र, तेवढ्या संख्येने लोक प्रत्यक्षात रनमध्ये सहभागी झाले नसल्याचे पाहावयास मिळाले. नाशिक रनमध्ये यंदा १३ ते १४ हजार नाशिककर धावल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. परंतु, पाच ते सहा हजार नागरिक सहभागी झाले असतील, असा अंदाज उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अनेकांनी धावण्याऐवजी चालणेच पसंत केले. या उपक्रमातून जमा झालेला निधी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल टॉवरचा लढा पालिकांनी जिंकला

0
0

विनोद पाटील, नाशिक

महापालिका हद्दीत मोबाइल टॉवर उभारून पालिकेला कर न देणाऱ्या मोबाइल कंपन्यांविरोधातील लढा नाशिक महापालिकेसह दहा पालिकांनी सुप्रीम कोर्टात जिंकला आहे. मोबाइल टॉवर हे जमिनी व इमारतीच्या कराच्या व्याख्येत येत असून, मोबाइल कंपन्याना स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर बंधनकारक असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांना आता कर भरणे अनिवार्य असून, त्याचा फायदा नाशिकसह नवी मुंबई, नागपूर, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर महापालिकांसह राज्यातील नगरपालिका व ग्रामपंचायतींना होणार आहे. या निर्णयामुळे मोबाइल कंपन्यांकडे असलेली दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांच्या वसुलीचा पालिकांचा मार्गही मोकळा झाला आहे.

नाशिक महापालिकेच्या हद्दीतील ४५० मोबाइल टॉवरपैकी सुमारे तीनशे टॉवर अनधिकृत आहेत. या कंपन्यांना नोटिसा बजावल्यानंतर त्यांनी महापालिकेला कर भरण्यास नकार देत, हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत, संबंधित कंपन्यांना कर भरण्यास सांगितले होते. त्यावर जीटीएल टॉवर कंपनीने सुप्रीम कोर्टात आव्हान देत हायकोर्टाच्या निर्णयाला एकतर्फी स्थगिती मिळवली होती. टाटा, ट्वेन्टी फोर सेंच्युरी, रिलायन्स या कंपन्यांनी सुप्रीम कोर्टात एकत्र येऊन पालिकेचा कर भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोबाइल कंपन्यांकडून करवसुलीसाठी नाशिकप्रमाणेच नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, सोलापूर या महापालिकांसह काही नगरपालिका व ग्रामपंचायतींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे या सर्व याचिका एकत्रित करून सुप्रीम कोर्टात तीन वर्षांपासून एकत्रित सुनावणी सुरू होती.

नाशिक महापालिकेने याबाबत स्वतंत्र पार्टी होऊन सुप्रीम कोर्टात मार्च २०१६ मध्ये स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. उपायुक्त रोहिदास बहिरम व निरिक्षक मनोज संगमनेरे यांनी स्वतंत्र वकील देत याचा पाठपुरावा केला होता. पालिकेचे रस्ते वापरता, सर्व सोयी-सुविधा घेता, मग कर का नको, असा सवाल महापालिकेने मोबाइल कंपन्यांबाबत सुप्रीम कोर्टात उपस्थित केला होता. महापालिका प्रांतिक अधिनियम ४०६ नुसार या कंपन्यांना कर भरणे आवश्यक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती गोगई व पंत याच्या पीठाने अखेर महापालिकांचे म्हणणे ग्राह्य धरत पालिकांच्या बाजूने निकाल दिला आहे. मोबाइल टॉवर हे जमिनी व इमारतीच्या कराच्या व्याख्येत येत असून, मोबाइल कंपन्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर बंधनकारक असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. महापालिकेच्या वतीने अॅड. सुहासकुमार कदम यांनी बाजू मांडली. त्यामुळे आता या कंपन्यांना पालिकांना कर भरावे लागणार असून, त्याचा फायदा नाशिक महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींना होणार आहे.

तीनशे टॉवर्सवर कारवाई

नाशिक महापालिका हद्दीत ४५० मोबाईल टॉवर्स असून, यातील ३०० टॉवर्स अनधिकृत आहेत. या टॉवर्ससाठी करभरणा तर दूरच, साधी परवानगीही घेतलेली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर पालिकेने या कंपन्यांविरोधात वसुलीची कारवाई सुरू केली आहे. २००८ पासून या कंपन्यांकडे पालिकेची जवळपास १० ते १५ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे या कराच्या वसुलीसाठी मोबाइल कंपन्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. संबंधित कंपन्यांना पालिकेचा कर भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाणार असून, मुदतीत कर न भरल्यास मोबाइल टॉवरच सील करण्याची कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपुड्यातील डाब गारठले

0
0

तापमान दोन अंश सेल्सिअसखाली; जनजीवन विस्कळीत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगामध्ये वसलेल्या डाब आणि त्याच्या दोन किलोमीटरच्या परिसरातील गावांचे गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमान दोन अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. त्यामुळे परिसरात दवबिंदू गोठण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवार (दि. १३) पासून सातपुड्यात कमालीची थंडी वाढली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाब गावाच्या परिसरातील पाटीलपाडा, गोलपदा यासह विविध गावांमधील नागरिकांना याचा त्रास होत आहे.

सातपुड्यातील अतिउंचीवर असलेल्या या डाब परिसरातील जंगलात वाहणाऱ्या झऱ्यावरही बर्फ जमत आहे. जणू सातपुडा परिसराने शुभ्र वस्त्र परिधान केल्याचे दृश्य याठिकाणी दिसत आहे. सातपुड्यात गेल्या चार वर्षांपासून डाब आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ परिसरात दवबिंदू गोठतात. त्यामुळे या भागात हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक याठिकाणी येतात. मात्र शक्रवारपासून तापमान कमालीचे खाली गेल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम

सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावाला ‘हेलाडाब’देखील म्हणतात. या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार गावाचे नाव ‘हेलाडाब’ पडले आहे. हेला या आदिवासी शब्दाचा अर्थ मराठीत थंड असा होतो. आदिवासी समाजातील कुलदैवत देवमोगरा माता डाब गावाची आहे, असे जाणकार लोक सांगतात. तर पहाटेच्या दवाचे रूपांतर थेट हिमदवांत होत असून, झाडांवरही हिमकण साचत आहेत. या भागात आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा असून, तेथील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर या परिणाम झाला आहे.

दिवसाही शेकोटी

सातपुड्यातील तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअसवर गेल्याने वयोवृद्ध व लहानमुले दिवसाही शेकोटी पटून शरिराला उष्णता देत असतात. त्यामुळे येथील अनेकांची प्रकृती खराब झाली आहे. या भागातील लोकांना उच्च शिखरावर हिमकण पडत असल्याचे अनुभव आला आहे.

पिकांचे नुकसान

दोन दिवसांपासून गारठ्यामुळे पाण्याच्या हंड्यात, शेतातील पिकांवर हिमकण आढळून येत आहेत. रात्री एक वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत हिमकणांचा वर्षाव होत असल्याचेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. थंडीच्या कडाक्‍यामुळे परिसरात अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून, स्ट्रॉबेरीला मात्र लाभ होणार आहे.

डाब येथील तापमान सध्या शून्याच्या जवळपास गेले आहे. कारण तेथे बर्फाची चादर पसरली आहे. मात्र त्याठिकाणी तापमान मोजण्याचे यंत्रसाधन नसल्याने हा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर तेवढे तापमान असेल तर तापमान व हवामान मंडळ हे प्रत्येक मंडळस्थानी असावेत.

- जयवंत उत्तरवार, तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेरी भी चूप, मेरी भी चूप!

0
0

तेरी भी चूप, मेरी भी चूप!

देवळांच्या शहरात इलेक्शनचा माहोल जमू लागला होता... घंटांच्या निनादातही हळूहळू इलेक्शनचा गोंगाट ऐकू येऊ लागला होता... युती, आघाड्यांचं चित्र अजून धूसर असलं, तरी इच्छुक नवरदेवाप्रमाणं प्रभागांमध्ये मिरवू लागले होते... काल-परवा मिशी फुटलेला जवान होर्डिंगवर स्वतःला इच्छुक म्हणवून घेऊ लागला होता... सोबत ८० वर्षांचे बुजुर्गही धोतर सावरत मीच जिंकणार असल्याचं म्हणत अन् दंड थोपटत सगळ्यांनाच मैदानात उतरून चॅलेंज देत होते... अर्थात, असे अनेक जण कट्ट्याकट्ट्यांवर टिंगलटवाळीचेच विषय झाले होते...

सोशल मीडियात दिवसाला शेकडो मेसेजेस पडू लागले होते... अमुक शुभेच्छा, तमुक शुभेच्छा!.. सारेच स्वतःला अण्णा, आप्पा, आबा, नाना म्हणवून घेऊ लागले... कालचा कार्यकर्ता आज एकदम नेता बनल्यानं भल्याभल्यांची पंचाईत झाली होती... सगळेच नेते बनल्यामुळं कार्यकर्त्यांचीच वानवा होती... त्यामुळंच रायबा, सायबा आणि ठकसेन अशा भाडोत्री वर्करचं फावलं होतं... इलेक्शनच काय, पण मयतालाही रडण्यासाठी माणसांपासून सारं काही पुरविण्याचं काम ती करीत होती... म्हणूनच इलेक्शनच्या काळात एकदम सोशल वर्कर झाल्याचं वाटणंही साहजिकच होतं... त्यातूनच सायबाही इलेक्शन लढवायचंच असं म्हणू लागला होता... गल्लीतल्या पोरांनी डोक्यात हवा भरल्यानं तो

हवेतच होता... सोबत पोरंही दिवस-रात्र ढगातच होती... नुसती चंगळमंगळ सुरू होती.

रायबा आणि ठकसेन या जिवाभावाच्या मित्रांचंही तो ऐकत नव्हता... सायबासारख्या कित्येक जणांना खुर्चीची स्वप्नं पडू लागली होती... स्वप्नं बघायला आणि ती पडायलाही कुणाची हरकत नव्हती... पण, वास्तवाचे भानही असायला हवं... त्यातच स्वप्नं जर चालता बोलता, दिवसाढवळ्याही पडू लागली तर नक्कीच चिंतेची गोष्ट होती... संक्रांतीच्या निमित्तानं सायबानं गावात एका महाराजांचं कीर्तन आयोजिलं होतं. कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच त्यानं स्वतःकडे माइक खेचून अर्ध्या तासाचं प्रवचन देऊन टाकलं... शेवटी ‘तुझं प्रवचन बस झालं, आता बाबाचं कीर्तन चालू करा’, असं म्हणत एक म्हातारी ओरडल्यानंतरच सायबानं महाराजांच्या हाती माइक दिला... वॉर्डावॉर्डांत असंच काहीसं घडत होतं...

सायबासारख्यांना जनता चांगलीच ओळखून होती... पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणं इच्छुकांचं पेव फुटलं होतं... जो-तो जनतेची सेवा करायचं म्हणत होता... प्रत्येकालाच कॉर्पोरेटर बनायचं होतं... पक्षांची फाटाफूट झाल्यानं पार्टीवाल्यांनाही इच्छुकांची गरज होती... म्हणून साऱ्यांनाच कामाला लागण्याचं सांगण्यात आलं होतं... तिकीट कुणालाही मिळालं, तरी त्याच्यापाठी उभं राहण्याचं वचन प्रत्येकाकडून घेतलं जात होतं... राजकारणात वचन, शब्द, आणाभाका हे सारं क्षणिक असतं, त्याची किंमत सगळ्यांनाच ठाऊक होती... तरीही तेरी भी चूप, मेरी भी चूप या उक्तीप्रमाणं सारं काही घडत होतं... सायबासारखे अनेक जण गंडवत होते किंवा गंडवले जात होते...

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमराणा ग्रामीण रुग्णालय बनले ‘शोभेचे बाहुले’

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

उमराणा (ता. देवळा) येथे मोठा गाजावाजा करून आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले होते. परंतु, या ग्रामीण रुग्णालयाची भव्य वास्तू वगळता सर्वच शोभेचे बाहुले बनले असून पुरेशा कर्मचारी, साधनसामुग्री यांच्या अभावी हे रुग्णालय शोभेचे बाहुले बनले आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांची आरोग्याची हेळसांड होत आहे.

राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी उमराणा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले होते. ग्रामपंचायतीच्या जुन्या छोटयाशा इमारतीत सुरू झालेले ग्रामीण रुग्णालय आत्ता मोठ्या वास्तूत रुपांतरीत झाले. तरी पुरेशा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी रुग्णालय अडगळीत आले आहे.

ग्रामीण रुग्णालयाची बिकट अवस्था

या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांची जागा रिक्त असल्याने देवळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. तर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना दोनच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून तेही इतर ठिकाणी राहतात. यासोबतच सात कर्मचारी मंजूर असताना चारच कर्मचारी कार्यरत आहेत. ऑपरेशन थिएटर आहे परंतु, पुरेशी साधनसामुग्री नसल्याने तेही बंद आहे. प्रयोगशाळेत कोणतीही चाचणी करता येत नाही, अशी बिकट अवस्था ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे.

तसेच ग्रामीण रुग्णालयाची भव्य वास्तू बांधण्यात आली असली तरी रुग्णालयात पुरेशी साधनसामुग्री नसल्याने सर्वच अडचणी होत आहेत. तरी याठिकाणी सर्व साधनसामुग्री प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उमराणा ग्रामीण रुग्णालयात पुरेशा साधनसामुग्री, कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. रुग्णालयात सर्व वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक, कर्मचारी नेमून सामग्री उपलब्ध करून देण्यात यावी.

- विलास देवरे, सभापती, उमराणा

उमराणा ग्रामीण रुग्णालयात साधनसामग्रीचा अभाव असल्याने कामकाज करताना अनेक अडचणी येतात. याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.

- डॉ. पी. जी. नरवटे, वैद्यकीय अधीक्षक, देवळा ग्रामीण रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे इनकमिंग ‘हाउसफुल्ल’!

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभराच्या कालावधीत पक्षांतराला वेग आल्यानंतर आता केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने इनकमिंग बंद केले आहे. निष्ठावंत व दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांची गर्दी वाढल्यामुळे त्यांनाच तिकीट देण्याची मारामारी सुरू झाल्यामुळे भाजप आता निवडणुकीसाठी उमेदवारी मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यास फारसा उत्सुक नाही. त्यामुळे एेनवेळी भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांचा इनकमिंग ‘हाउसफुल्ल’मुळे हिरमोड होणार आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विविध पक्षांकडून निवडून आलेल्या तब्बल ४४ नगरसेवकांनी भाजप, शिवसेनेसह इतर पक्षांत प्रवेश केला. त्यात सर्वाधिक फटका मनसेला बसला. या पक्षातील ४० नगरसेवकांपैकी तब्बल २७ नगरसेवक रेल्वे इंजिनातून उतरले. विविध पक्षांतून बाहेर पडलेल्या नगरसेवकांनी भाजप व शिवसेनेला प्राथमिकता दिली. त्यामुळे या दोन्ही पक्षांत निष्ठावंत व पक्षांतर केलेल्यांचा सुप्त वादही सुरू झाला आहे. निवडणुकीत उमेदवारी घोषित झाल्यानंतर काही प्रभागांत हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

केंद्र व राज्यात सत्तेत असल्यामुळे बहुतांश नगरसेवकांचा आेढा भाजपकडे आहे. त्यामुळे त्यांनी तूर्त जरी इनकमिंग बंद केले असले, तरी वेळप्रसंगी गरज पडल्यास ते आपल्याकडे एखादा नेता किंवा कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेतही ही गर्दी वाढली आहे. पण, शिवसेनेने आपली दारे अजूनही खुलीच ठेवली आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस आणि मनसेची दारे उघडी असूनही सध्या तरी कोणी तिकडे जाण्यास फारसे इच्छुक नाही. पण, शिवसेना व भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास या पक्षांकडेही लोंढा वाढण्याची शक्यता आहे.

सध्या आहे त्यांनाच तिकीटवाटपावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुलाखती व त्यानंतर उमेदवारी घोषित केली जाईल. जाहीरनामा व विविध कामे सुरू आहेत.

- बाळासाहेब सानप, आमदार तथा शहराध्यक्ष, भाजप


---

भाजपतर्फे उद्यापासून इच्छुकांच्या मुलाखती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मंगळवार (दि. १७)चा मुहूर्त निवडला आहे. त्यानंतर दोन दिवस या मुलाखती प्रभागनिहाय सुरू राहणार आहेत. मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात या मुलाखतींना सुरुवात होणार असून, त्यात १ ते १० प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर बुधवारी (दि. १८) ११ ते २० या प्रभागांतील मुलाखती घेतल्या जातील. गुरुवारी (दि. १९) ११ प्रभागांच्या इच्छुकांच्या मुलाखती होतील.

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात निष्ठावंत व पक्षांतर करून नव्याने आलेल्यांचा भरणाही मोठा आहे. त्यामुळे या मुलाखतींत निवडून येण्याचे निकष यावरच भर दिला जाणार असल्याची चर्चा आहे. परिणामी अनेक निष्ठावंतांना तिकीट न मिळण्याची भीती आहे. पण, भाजपने कोणावर अन्याय होणार नाही, असे सांगत सावध पवित्रा घेतला आहे.

या मुलाखती पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय संघटक किशोर काळकर यांच्यासह स्थानिक नेते घेणार असल्याचे बोलले जात आहे. यात शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे बहुतांश सूत्रे राहणार आहेत. त्याचप्रमाणे आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे व डॉ. अपूर्व हिरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, इच्छुकांकडून लाॅबिंगही सुरू झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंगांच्या दिवाळीची येवल्यात सांगता

0
0

यंदाची संक्रांत उत्साहाने बहरली

म. टा. वृत्तसेवा, येवला

रंगबेरंगी पतंगांनी नटलेले आकाश, पतंगांच्या काट छाटीची रंगलेली स्पर्धा अन् सलग तीन दिवसांपासून सहकुटुंब पतंगोत्सवासाठी घराच्या गच्चीवर मुक्कामी असणारे येवलेकर अशा अफाट उत्साहात येवलेकरांनी यंदाही पतंगांची दिवाळीच साजरी केली.

रविवारी (दि. १६) या उत्सवाला चांगलाच बहर आला होता. सूर्य मावळतीला गेल्यानंतरही उशिरापर्यंत आकाशात घिरट्या घालणारे पतंग...बहुरंगी फटाक्यांची आतिषबाजी असा माहोल येवल्यात नटला होता. राज्यात अग्रस्थानी असणारा येथील पतंगोत्सव यंदाही लौकिकाला साजेसाच ठरला.

रविवारी, सकाळपासून उत्साह ओसंडून वाहणाऱ्या शहरातील प्रत्येक घराच्या गच्चीवर तरुणाईची लगबग दिसून येत होती. हिंदी फिल्मी गीतांच्या ठेक्यावर तरुणाईने ताल धरला होता. सोबतीलाच ‘बढावss, बढावss,अरे भाई बढाओ’ चा आवाज दुमदुमत होता. पतंगांबरोबरच कुणी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडले होते, तर कुणाकडून आकाश उजळून टाकणारे प्रकाश देण्‍ाारे ‘बलून’देखील आकाशात सोडले जात होते. एकंदरीत यंदाही येवला शहरात पतंगोत्सवाची मोठी धूम होती. येवलेकरांनी त्याचा अगदी मनमुराद आनंद लुटला. रात्री उशिरा फटाक्यांच्या आतषबाजीने या पतंग उत्सवाची शानदार सांगता होताना येवलेकरांनी एकप्रकारे पुन्हा दिवाळीच साजरी केली. येथील पतंगबाजीने सर्वांनाच आकर्षित करताना राजकीय मंडळींनाही अपवाद ठेवलेले नाही. भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही दरवर्षीप्रमाणे यंदाही या पतंगोत्सवासाठी येवल्यात हजेरी लावली. गतवर्षी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील येवल्यातील उत्सवाला हजेरी लावत पतंगबाजी केली होती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images