Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ऑनलाइन सातबारा उतारे ‘अपलोड’ मोहीम वेगात

$
0
0

५० हजार ८५७ सातबारा ‘अपलोड’

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य सरकारच्या संकेतस्थळावर खातेदार शेतकऱ्यांसह जनतेला संगणकीकृत अद्ययावत सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यासाठी हे सातबारा संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या मोहिमेने महिनाभरात चांगलाच वेग घेतला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यात तर येवल्यातील महसूल यंत्रणेने तब्बल ५०,८५७ सातबारा उतारे आजवर संकेतस्थळावर अपलोड केले आहेत.

शेतकऱ्यांसह जनतेला ‘आपलं सरकार’ या संकेतस्थळावरून अद्ययावत संगणकीकृत सातबारा उतारे मिळावेत, यासाठी महसूल यंत्रणेने वर्षभरापूर्वी गावोगावच्या तलाठी सजांच्या दप्तरी असलेले पूर्वीचे सातबारा उतारे संगणकीकृत करण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, या मोहिमेत सातत्याने या ना त्या कारणाने अनेक अडथळ्यांची मालिकाच उभी राहिली होती. यामध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यात विशेष लक्ष घातल्याने नाशिक जिल्ह्याने राज्यभरात आघाडी घेतली आहे. महसूल यंत्रणेकडे संपूर्ण जिल्हाभरात एकूण १२ लाख १९ हजार ७७९ इतके सातबारा उतारेधारक असून त्यातील ७ लाख ३८ हजार ६०० सातबारा उतारे हे अपडेट करून आजवर संकेतस्थळावर अपलोड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विषय समित्यांची आज निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता या पालिकांमधील स्थायी समिती, विषय समित्या सदस्यांच्या नियुक्त्यांसह सभापतिपदांच्या निवडीसाठी आज (दि. १६) जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभा बोलावल्या आहेत. संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या विशेष सभांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड, नांदगाव, सिन्नर, सटाणा व भगूर या सहा नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुका नोव्हेंबरअखेर पार पडल्या होत्या. या पालिकांच्या आता जिल्हाधिकाऱ्यांनी या पालिकांची विशेष सभा आज (दि. १६) बोलावली असून यामध्ये स्थायी समिती, विषय समित्या सदस्यांच्या नियुक्त्यांसह सभापतिपदांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. सोमवारी, सकाळी विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी उमेदवारांना दुपारी १२ ते २ या वेळेत संबंधित पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे स्वतः नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. त्यानंतर अर्ज छाननी, माघार आणि आवश्यकता असेल तर या पदासाठी निवडणूक मतदान, निकाल या प्रक्रिया दुपारी २ ते ३ या कालावधीत होणार आहे.

सटाण्यात चुरस

सटाणा : नगरपरिषदेच्या विषय समिती सदस्य व सभापती निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात आज (दि. १६) यासाठी निवडणूक होत आहे. बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शहर विकास आघाडी सहा, भाजप सहा, राष्ट्रवादी काँग्रेस पाच, काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी दोन असे सदस्य विजयी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहापूरला पाणी कशाला?

$
0
0

भावली धरणातून घोटी-इगतपुरीतील गावांसाठी योजना राबवण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून शहापूर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सरकार व प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. मात्र, शहापूर तालुका व ठाणे जिल्ह्यात अनेक धरणे असतानाही इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून पाणी का? असा सवाल करीत सरकारने इगतपुरी तालुक्यातील व भावली धरण परिसरातील गावांना आधी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केली. या मागणीसाठी नुकतीच घोटी येथे शिवसेना पदाधिकारी व धरण कार्यक्षेत्रातील नेत्यांची बैठक झाली.

इगतपुरी तालुक्यातील घोटी, इगतपुरी शहरे व धरण परिसरातील गावांसाठी प्रथम पाणी आरक्षण व पाणीपुरवठा योजना राबविल्याशिवाय भावली धरणातून शहापूर तालुक्यासाठी पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. बैठकीत घोटी, इगतपुरी परिसरातील गावांना पाणी अगोदर द्यावे, अशीही एकमुखी मागणी करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातूनच पाणी नेण्याचे धोरण का, असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे.

ठाणे जिल्हा व शहापूर तालुक्यातील गाव, वाडे, पाड्यांना इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्याचे धोरण शासन व प्रशासनाने आखण्यात आले आहे. त्यात शहापूर तालुक्यातील बंद पडलेल्या योजनांचाही समावेश आहे. त्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठका होऊन प्रस्ताव मंजुरी स्तरावर आहेत. त्यामुळेच ठाणे जिल्हा व शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, मध्य वैतरणा अशी अनेक धरणे असून त्यातून या योजना राबवल्या जाव्यात, असा सूरही बैठकीत उपस्थितांनी व्यक्त केला.

नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत भावली धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी नगर जिल्हा, मराठवाडा, नाशिक जिल्ह्याला जाते. या धरणातील पाणीसाठा अवघा दीड टीएमसी असल्याने व मे अखेरीस हे धरण कोरडे होऊन धरण परिसरातील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यात आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेकडो गावांना या भावली धरणातून पाणी दिल्यास इगतपुरी तालुक्याने करायचे काय?

- काशीनाथ मेंगाळ, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप निष्ठावंतांसाठी संघ दक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या इतर पक्षांमधील आजी-माजी नगरसेवक, नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू आहे. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत खिंड लढविणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने त्यांनी नाशिकरोडला नुकतीच स्वतंत्र बैठक घेऊन रणनीती आखल्याचे सूत्रांनी सांगितले. निष्ठावतांनी नंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर महापालिका निवडणुकीत त्यांना बळ देण्याचा संघ पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे.

भाजप आणि संघ पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला प्रसिध्दी माध्यमांनाही प्रवेश नाकारण्यात आला होता. बैठकीला एका विद्यमान नगरसेवकासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, इच्छुक उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. अन्य नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नव्हते. वरिष्ठांनी बैठक होऊ नये, यासाठी दबाव आणूनही उपयोग झाला नाही. निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची, लादलेल्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.

निष्ठावंतांनी बैठकीनंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही खिंड लढवली. आता पक्षला चांगले दिवस आले असताना आम्हाला डावलण्यात आले. पक्षातील पदाधिकारीही हतबल आहेत. त्यामुळे न्याय मिळावा, अशी मागणी निष्ठावंतांनी केली. त्यावर ‘संघ तुमच्या पाठिशी खंबीर आहे, तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, काळजी करू नका’, असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निष्ठावंतांना सांगितले.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याकडे लागले लक्ष
नाशिकरोड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना भाजपने मुसंडी मारली आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये नाशिकरोडला भाजपचे दोन नगरसेवक होते. नुकत्याच झालेल्या जेलरोडच्या पोटनिवडणुकीत मंदा ढिकले आणि सुनंदा मोरे विजयी झाल्या. पाठोपाठ मनसेच्या संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया तसेच कन्हैय्य साळवे, अपक्ष नगरसेवक पवन पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे बळ वाढले आहे. महापालिकेत एकहाती सत्ता आणण्यासाठी दोन डझन नगरसेवक संख्या असलेला नाशिकरोड महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने पक्षश्रेष्ठींचे इकडे विशेष लक्ष आहे. इतके वर्षे भाजपचा किल्ला लढविणारे इच्छुक आयात उमेदवारामुळे नाराज झाले आहेत. उघडपणे नाराजी व्यक्त न करता नाशिकरोडला बैठक घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवस शाळा बंद

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी व शिक्षणातील जाचक शासननिर्णय रद्द करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या १८, १९ व २० जानेवारी रोजी असे तीन दिवस हे आंदोलन करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने घेतला आहे.

शिक्षक व शिक्षकेतरांच्या अनेक वर्षांपासून काही मागण्या प्रलंबित आहेत. शिक्षक भरतीपासून पेन्शन योजनेपर्यंत विविध मागण्यांचा यात समावेश आहे. त्या पूर्ण होत नसल्याने शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात २८ ऑगस्ट २०१५ रोजीचा शाळांची संरचना, संच मान्यतेबाबतचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकन निकष पात्र शाळांना त्वरित अनुदान द्यावे, भरतीवरील बंदी त्वरित उठवून सर्व संवर्गातील पदे त्वरित भरावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, आरटीई कायद्याचा फेरविचार करुन कला व क्रीडा शिक्षकांची पूर्ण वेळ नियुक्ती करावी, नगरपालिका संचलित शाळांना वैद्यकिय प्रतिस्फूर्ती योजना लागू करावी, राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता, वैयक्तिक मान्यता, बँकेमार्फत वेतन, भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, दोन लाख वैद्यकीय देयक मंजुरीचे अधिकार जिल्हा शिक्षणाधिकारी यांनाच द्यावे, सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, अशा मागण्या यावेळी मांडण्यात येणार आहेत. सर्व शिक्षकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे, नंदुरबारमधून घ्या मतदानयंत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात सुमारे सहा हजार ५०० मतदान यंत्राची (इव्हीएम मशिन्स) गरज भासणार आहे. मध्य प्रदेशातून हे मशिन्स मागविण्याची तयारी आयोगाने ठेवली असली तरी तत्पूर्वी धुळे आणि नंदुरबारमध्ये ती उपलब्ध होतात का याची चाचपणी करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा यंत्रणेला दिले आहेत.

नाशिकमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकाच दिवशी होणार आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बैठक घेऊन प्रशासनाकडून तयारीची आढावा घेतला. त्यामध्ये इव्हीएम मशिन्सच्या उपलब्धतेचा मुद्दा पुढे आला. जिल्हा परिषदेसाठी आवश्यक असलेल्या मशिन्सची प्रथम नंदुरबार आणि धुळ्यात मागणी करा. यंत्रांची स्थिती तसेच संख्या पुरेशी नसेल तर त्यावर पर्याय शोधला जाईल, असे सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार, जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नाशिकमध्ये सहा हजार २०० मतदान यंत्रांची गरज आहे. याखेरीज १० टक्के राखीव यंत्रांचीही गरज भासणार आहे.

तालुकानिहाय दोन भरारी पथके
आचार संहितेची योग्य अंमलबजावणी व्हावी, कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकी दोन भरारी पथकांची नेमणूक केली जाणार आहे. तर प्रत्येक चेक नाक्यावर, मुख्य रस्त्यांच्या जोड रस्त्यांवर त्याच बरोबर मुख्य तालुक्यांच्या चौकाच्या ठिकाणी सर्व्हेलन्स पथकं सज्ज ठेवण्यात येणार आहेत. वाहन तपासणीसह इतर बाबींवर ही पथके लक्ष ठेवणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस‌तर्फे आज मुलाखती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून इच्छुक उमेदवारांना काँग्रेसने मुलाखतीसाठी बोलावले आहे. अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत काँग्रेसने तयारीत आघाडी घेतली असून सोमवारी (दि. १६) दुपारी एम. जी. रोडवरील काँग्रेस कार्यालयामध्ये या मुलाखतींना सुरुवात होणार आहे.

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी पुढील महिन्यात रणसंग्राम होणार आहे. विजेतेपदाची माळ गळ्यात पडल्यास पुढील पाच वर्षे गटाचे तसेच गणाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार असल्याने सर्वच पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आता खऱ्या अर्थाने सत्ता संघर्ष सुरू झाला आहे. उमेदवारांचा प्रचाराचा मार्ग मोकळा व्हावा आणि त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी पक्षातर्फे उमेदवारांची घोषणा होणे आवश्यक आहे.

काँग्रेसने जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समित्यांच्या १४६ गणांमध्ये इच्छुकांना उमेदवारी देण्याची तयारी ठेवली आहे. पक्षाचे प्रदेश प्रभारी आमदार के. सी. पाडवी, सहप्रभारी डी. जी. पाटील, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिरीष कोतवाल, अॅड. अनिल आहेर, रामदास चारोस्कर मुलाखतीवेळी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश कहांडोळे यांनी कळविले आहे.

गड काबीज करण्यासाठी खटाटोप
गतवेळी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला निर्विवाद वर्चस्व सिध्द करता आले नव्हते. त्यावेळी काँग्रेसला १४ जागा मिळविता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे काँग्रेसला उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले होते. या सर्व पार्श्वभूमीवर यंदा जिल्हा परिषदेचा गड काबीज करण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. अन्य पक्ष कोठे कोणता उमेदवार द्यावा या विवंचनेत असताना काँग्रेसने सर्वप्रथम इच्छुकांना मुलाखतीला बोलावून या स्पर्धेत आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आघाडी’चे तळ्यात मळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या हातात हात गुंफून निवडणुकांना सामोरे जाणार की एकमेकांविरोधात दंड थोपटणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. काँग्रेसने सोमवारी (दि. १६) इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली असून त्यामध्येच आघाडीच्या मुद्याला अंतिम स्वरुप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे ठरविण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया २१ फेब्रुवारी रोजी राबविली जाणार आहे. जिल्हा परिषदेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून त्यांनी गतवेळी २७ जागा पटकावल्या होत्या. त्याखालोखाल शिवसेनेला १९ तर काँग्रेसला १४ जागांवर समाधान मानावे लागले होते. येऊ घातलेल्या निवडणुकीत आघाडी करून प्रतिस्पर्धी पक्षांना शह द्यायचा की ‘एकला चलो रे’चे धोरण अवलंबवायचे यावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून त्यांना प्रचार रणनीती आखण्यास मर्यादा येत आहेत. ‘राष्ट्रवादी’चे जिल्ह्यातील सर्वेसर्वा छगन भुजबळ, माजी खासदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर भ्रष्टाचार तसेच अपहाराचे आरोप झाल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’चे घड्याळ हातात बांधण्यास काँग्रेसजन फारसे उत्सुक नाहीत.

प्रबळ ठिकाणी स्वबळावर लढा
काँग्रेसने गट आणि गणांमधील सर्व जागा लढविण्याची तयारी ठेवली आहे. एक पाऊल पुढे टाकून सोमवारी इच्छुकांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. त्या-त्या तालुक्यांमधील पक्षाच्या स्थितीचा तसेच तेथील एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. त्यासाठी विविध तालुका पदाधिकाऱ्यांशी आघाडीबाबत चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रबळ ठिकाणी स्वबळावर लढा
गतवेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा पटकावणारा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यामुळे प्रबळ असलेल्या मतदार संघांमध्ये काँग्रेस ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊ शकते. तर काही तालुक्यात मैत्रीपूर्ण लढतीही होऊ शकतात, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोणत्या तालुक्यात आघाडी करायची आणि कोठे नाही यावर सोमवारच्या बैठकीत चर्चा होणार असून आघाडीबाबतच्या निर्णयाला अंतिम स्वरुप दिले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थंडीचा जोर ओसरला...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने रविवारी सुटी घेतली. पाच दिवसांपूर्वी ५.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेल्या तापमानाचा पारा मकरसंक्रातीनंतर दुसऱ्याच दिवशी १४.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला. नाशिकसह जवळपासच्या अन्य शहरांतही तापमानाचा पारा वाढला आहे.

यंदाच्या वर्षातील सर्वाधिक थंडीची नोंद गेल्या आठवड्यात झाली. त्यातही निफाड तालुक्यात ४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले. नाशिक जिल्ह्यात ११ जानेवारी रोजी यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी ५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. कमाल तापमान २६.३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. मात्र, त्यानंतर दिवसागणिक किमान तापमानात वाढ होते आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी ९.८ अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान ५ अंशांनी वाढून १४.६ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे नाशिककरांना दिवसभर उकाडा जाणवत होता.

द्राक्ष बागांना फायदा

वाढत्या थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या फुगवणीवर विपरीत परिणाम झाला होता. मण्यांची फुगवण होत नसल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र, दोन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे द्राक्षमण्यांच्या फुगवणीला मदत होणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांप्रकरणात आणखी एकाचा सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पण झाले आहे. संशयित आरोपी शहरातीलच असून, लवकरच त्यास जेरबंद करण्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

बनावट नोटा छापून त्याद्वारे नवीन नोटांची अदलाबदल करण्याच्या आरोपाखाली आडगाव पोलिसांनी संशयित आरोपी संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील यांच्यासह ११ जणांना जेरबंद केले. राजकीय पक्षांशी निगडीत मंडळींचा गंभीर गुन्ह्यात सहभाग समोर आल्याने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी शहर पोलिसांनी छबू नागरेच्या घरातील प्रिंटर, कम्प्युटर इत्यादी महत्त्वाचे पुरावे जप्त केले. तसेच संशयित आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी करून ते सील करण्यात आले. तपासादरम्यान कृष्णा रामस्वरूप अग्रवाल या नोटा छपाई करणाऱ्या १२ व्या संशयितांलाही पोलिसांनी जेरबंद केले. सध्या न्यायालयनी कोठडीत असलेल्या संशयितांकडून जमा केलेल्या पुराव्यांआधारे पोलिस तपास करीत आहे. या बाबत माहिती देताना आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले, की सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, तपास सुरू आहे. या गुन्ह्यात अटक केलेल्या १२ जणांव्यतिरिक्त आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता आम्ही सुरुवातीपासून पडताळून पाहतो आहोत. तपासानुसार, आणखी किमान एकाच्या सहभागा विषयी आमची खात्री झाली आहे. संशयित आरोपी शहरातीलच असून, लवकरच त्यास जेरबंद करण्यात येईल, असा दावा सानप यांनी केला.

नागरेची पत्नीही फरार
पतसंस्था वजा फायनान्स संस्था चालवणाऱ्या छबू नागरेला अटक झाल्यानंतर ही जबाबदारी छबू नागरेची पत्नी प्रिती यांच्याकडे आली. मात्र, कर्जदाराला फोनद्वारे शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी प्रिती नागरेविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. ११ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला असून, सध्या प्रिती छबू नागरे फरार झाली आहे. पोलिस तिच्या मागावर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगतिपुस्तक महापालिकेचे!

$
0
0

प्रगतिपुस्तक महापालिकेचे!


प्राचार्य डॉ. हरीश आडके

नाशिकमधील विविध विषयांना वाचा फोडण्याचे कार्य ‘महाराष्ट्र टाइम्स’ने नेहेमीच केले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानेदेखील नाशिकमधील अनेक विषय केंद्रस्थानी ठेवून ‘मटा’ने शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांमध्ये ‘मटा जाहीरनामा’ या व्यासपीठाद्वारे चर्चा घडवून आणली. अनेक मान्यवरांनी चर्चेदरम्यान शहर विकासासंदर्भात महापालिकेची कार्यपद्धती, सोयी-सुविधा आदींबाबत वर्तमान स्थिती व भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन मते मांडली, अपेक्षा व्यक्त केल्या आणि सोबतच गुणदान करून महापालिकेचे प्रगतिपुस्तकच जनतेला उपलब्ध करून दिले. महिनाभराहून अधिक काळ चाललेल्या या समाजसाक्षर अभियानातून जाणवलेले काही निष्कर्ष वाचकांच्या माहितीसाठी देत आहे.

‘मटा जाहीरनामा’ या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या उपक्रमामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जनतेला आपले प्रतिनिधी निवडताना निश्चितच एक दिशा मिळाली आहे. दि. २१ नोव्हेंबर २०१६ पासून प्रारंभ झालेल्या या चर्चासत्रात डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), ज्येष्ठ नागरिक संघटनांची मध्यवर्ती संघटना– फेस्कॉम, निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी, रिक्षा व टॅक्सी संघटना, महापालिका शाळांतील शिक्षक व त्यांचे प्रतिनिधी, आयटी व अंबड-सातपूर परिसरातील उद्योजक आणि आयमा, निमा, नाशिक बार असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी, हॉटेल्स असोसिएशन, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे पर्यावरणप्रेमी, अार्किटेक्ट आणि इंजिनीअर्स, ट्रॅव्हल्स एजंट्स असोसिएशन ऑफ नाशिक- तान व टुरिझम व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाई, जैविक कचरा क्षेत्र, ज्येष्ठ रंगकर्मी, गायक, चित्रपट महामंडळ, हेरिटज- वारसा जतन, कचरा वेचणाऱ्या महिला, घरेलू महिला कामगार प्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी व कर्मचारी, खासगी विनाअनुदानित शाळा, विद्यार्थी प्रतिनिधी, ग्राहक पंचायत, कॉलेजेसचे प्राध्यापक, चार्टर्ड अकौंटंट्स- कर सल्लागार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सहकारी बँकांचे प्रतिनिधी, गृहनिर्माण सोसायटी प्रतिनिधी अशा समाजातील सर्वच क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.

विकासासाठी...

‘मटा जाहीरनामा’मध्ये आपापल्या क्षेत्रातील सद्यःस्थिती व भविष्यातील अपेक्षा व्यक्त करण्याबरोबरच विविध मान्यवरांनी त्यांनी महापालिकेच्या पायाभूत सोयी-सुविधांपैकी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, उद्याने-करमणूक, महापालिकेच्या शाळा, विविध करांची आकारणी, पार्किंगचा प्रश्न, रस्ते-फूटपाथ आणि स्मार्ट सिटी यासंदर्भात एकूण दहा गुणांपैकी गुणदान केले. महापालिकेच्या पायाभूत सोयी-सुविधांसंदर्भातील गुणदानाचे प्रगतिपुस्तक पाहिल्यावर महापालिकेला विकासाचा किती मोठा पल्ला गाठावयाचा आहे याची कल्पना येते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे व विकासाभिमुख कार्य करण्याची इच्छाशक्ती असणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची नितांत आवश्यकता आहे, असे प्रकर्षाने जाणवले.

विश्लेषणाचा अन्वयार्थ

वरील विश्लेषण असे दर्शविते, की नाशिक महापालिकेकडे पाण्याची मुबलक उपलब्धता असून, त्याचे वितरणही चांगल्या दर्जाचे आहे. त्याचबरोबर नाशिक महापालिकेची कर वसुलीही चांगली आहे. याचा अर्थ नाशिक महापालिकेकडे विकासकामांसाठी पर्याप्त निधीची उपलब्धता आहे. मात्र, महापालिकेच्या मनुष्यबळाकडून दूरदृष्टीने नियोजन होत नसल्याने व लोकप्रतिनिधींकडून वैयक्तिक स्वार्थासाठी होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे महापालिकेला लोककल्याणकारी व विकासाभिमुख होता आलेले नाही, हे स्पष्ट होते.

गुणदान अन् वस्तुस्थिती
विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केलेल्या गुणदानानुसार सरासरीचा विचार करता पाणीपुरवठा व्यवस्थापनाला सर्वाधिक म्हणजे ७०.९६ टक्के व त्या खालोखाल कर आकारणीला ५९.१५ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. काही क्षेत्रांतील स्थिती असमाधानकारक म्हणावी लागू शकेल. त्यामध्ये रस्ते व फूटपाथ ५१.६५ टक्के, सांडपाणी व्यवस्थापन ५०.१९ टक्के, सार्वजनिक वाहतूक ४३.३४ टक्के, सार्वजनिक आरोग्य ४३.१९ टक्के, महापालिका शाळांची स्थिती ४१.९२ टक्के अशी परिस्थिती आहे. काही क्षेत्रांतील स्थिती मात्र अत्यंत असमाधानकारक म्हणावी अशा स्वरूपाची आहे. यामध्ये स्मार्ट सिटी ४० टक्के, उद्याने व करमणूक ३९.५३ टक्के, तर पार्किंग व्यवस्था २६.१५ टक्के अशा स्वरूपाची आहे. सोबतच्या आलेखात ही वस्तुस्थिती दर्शविण्यात आली आहे.

पाणीपुरवठा व्यवस्थापन ७०.९६

कर आकारणी ५९.१५

रस्ते व फूटपाथ ५१.६५

सांडपाणी व्यवस्थापन ५०.१९

सार्वजनिक वाहतूक ४३.३४

सार्वजनिक आरोग्य ४३.१९

मनपा शाळांची स्थिती ४१.९२

स्मार्ट सिटी ४०

उद्याने व करमणूक ३९.५३

पार्किंग व्यवस्था २६.१५

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुचक्र!

$
0
0

ऋतुचक्र!

इच्छुकांना इलेक्शन फीव्हर चढला असला, तरी शहराला अजून तो चढायचा होता... रायबा-सायबासारख्या कार्यकर्त्यांवर मात्र तो कधीच भारी पडू लागला होता... इलेक्शनच्या नादात आता हळूहळू सारंच मागं पडू लागलं होतं. इलेक्शनच सारं काही होतं. तेच जगणं, तेच मरणं होतं. नेहमीप्रमाणं युती, आघाड्यांसाठी बैठका सुरू झाल्या होत्या... त्यामुळं पुढचे काही दिवस साऱ्यांनाच पॉलिटिकल मेजवानी मिळणार होती. तशी ती यापूर्वीही मिळतच होती... परंतु, आता प्रत्येक पार्टी दहा हत्तींचं बळ संचारल्याचं वागत असल्यानं गमतीजमती घडत होत्या... त्या पुढे काही दिवस घडणारच होत्या...

एका-एका जागेसाठी आपल्याकडे डझनभर इच्छुक असल्याचा दावा करीत कमळवाल्यांनी मुलाखतींचा रतीब लावला होता... बाणवाल्यांनी ते कर्म आधीच उरकून घेतलं होतं... घड्याळ अन् पंजावालेही तेच सोपस्कार पाडत होते... गेल्या वेळी घेतलेल्या परीक्षेचा पाच वर्षांत पूर्ण विचका झाल्यानं इंजिनवाले मात्र ताकही फुंकूनच पित होते... बिगर पार्टीवालेही जोमात असल्याचं भासवत होते... प्रत्यक्षात चार सदस्यीय पॅनलमुळं त्यांचं धाबं दणाणलेलं होतं... पण, ते तसं भासवत नव्हते... राजकारणात जे नसंत ते दाखवायचं असतं आणि जे असतं ते झाकायचं असतं, यात अपक्षही चांगलेच सरावले होते... कोंबडं झाकलं तरी उजाडायचं राहत नाही, हेही त्यांना पुरतं ठाऊक होतं...

खरी गंमत पुढेच होती... जाहीरनामे, वचननामे अजून तर यायचेच होते...त्यानंतर धुरळा उडणार होता... एकमेकांवर चिखलफेक होणार होती... चार कुळांचा उद्धार करीत आरोपांची राळ उठणार होती... शेवटी हाणामाऱ्या अन् नंतर सारे गळ्यात गळे घालून फिरणार होते... धार्मिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या नगरीत असं सारं काही घडत होतं... तसं बघायला गेलं, तर त्यात नवीन असं काहीच नव्हतं... वर्षानुवर्षे तेच तर घडत होतं... कधी कमळ, कधी धनुष्य, तर कधी घड्याळ, तर कधीच सगळे मिळूनच खुर्चीवर बसत होते... पाच वर्षांत शहर तर तिथंच होतं... कुणी भाकरीसाठी मरत होता... तर कुणी न्यायासाठी लढत होता... नव्या घंटागाड्या येऊनही गल्लोगल्ली कचरा साचत होता... कुठं नळाला पाणी येत नव्हतं... कुठं कशासाठी तरी मोर्चा निघत होता... रस्त्या-रस्त्यावर जाम लागत होता... कुणी औषधांअभावी मरत होता, तर कुणी अपघाती... मिळणारा पैसा जिरतो कुठं, कळत नव्हतं.... वर्षानुवर्षं इलेक्शनच हे ऋतुचक्र असंच फिरत होतं... पात्र तेवढी बदलत होती... बाकी सारं तेच तर होतं...

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवीदास पिंगळेंची जेलमध्ये पुन्हा रवानगी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, एक्सरे रिपोर्टमध्ये गंभीर बाबी आढळून आल्या नाहीतर त्याची रवानगी पुन्हा नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये होण्याची शक्यता आहे.

छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने पिंगळेंना शनिवारी (दि. १४) सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्याच्या रक्कमेचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी ‘एसीबी’ने अटक केलेले पिंगळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जेलमध्ये त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, इसीजी व टुडी इको यासारख्या टेस्टमध्ये काही गंभीर आढळून आले नाही. यानंतर, सोमवारी त्यांनी चक्कर येत असल्याची तक्रार केल्याने डॉक्टरांनी त्यांच्या एक्सरे व इतर काही चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. या चाचण्याचे सर्व अहवाल मंगळवारी (दि. १७) मिळण्याची शक्यता असून, त्यानुसार त्यांची सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० हून अधिक जागा जिंकू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अन्य पक्षांमधून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असून आऊटगोईंग कमी आहे. पक्षाला अत्यंत पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा ३० हून अधिक जागांवर आम्हाला यश मिळेल असा दावा काँग्रेसने केला आहे. जिल्ह्यात स्थानिक पातळीवर परिस्थितीनुरुप आघाडी करण्यास कार्यकत्यांनी संमती दर्शविली असून जानेवारी अखेरपर्यंत उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश पातळीवरून जाहीर होईल, अशी माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून काँग्रेसने सोमवारी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते. यावेळी आमदार के. सी. पाडवी, आमदार निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी आमदार शिरीष कोतवाल, नानासाहेब बोरस्ते, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष प्रभारी शाम सनेर, सुनील आव्हाड आदी उपस्थित होते. यावेळी १५ पैकी ११ तालुक्यांमधील विविध गट आणि गणांमधील उमेदवारांकडून त्या-त्या मतदारसंघातील परिस्थिती समजून घेण्यात आली. तसेच ‘उमेदवारी का द्यावी?’ हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेळेअभावी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि दिंडोरी या तालुक्यांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत. त्या-त्या तालुक्यांमध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

निवडणुकीत आघाडी करावी की नाही, याबाबतही यावेळी चर्चा झाली. भाजप व शिवसेना हेच या निवडणुकीत खरे प्रतिस्पर्धी असून काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीद्वारेच या निवडणुकीला सामोरे जायला हवे, असा सूर काही तालुक्यातील प्रतिनिधींनी व्यक्त केला. मात्र, आघाडीबाबतचे अधिकार तालुकास्तरावर देण्याची काँग्रेसचीही भूमिका आहे. निवडून येण्याची क्षमता व पक्षाशी एकनिष्ठपणा या दोन मुख्य निकषांच्या आधारे उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमधील दुराव्याचा फायदा शिवसेना-भाजपला होऊ नये, यासाठी काही ठिकाणी आघाडी करावी लागेल, असे पाडवी यांनी स्पष्ट केले.

तालुकास्तरीय समित्यांना अधिकार
जिल्हा परिषदेचे ७३ गट व १४६ गणांसांठी निवडणूक लढण्याची काँग्रेसची तयारी आहे. भाजप आणि शिवसेना युतीला रोखण्यासाठी आघाडी करण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे. परंतु, त्यासाठी सन्मानपूर्वक आघाडीचे पर्याय पुढे यायला हवेत. तालुकास्तरावर आघाडी करण्याचे अधिकारी समित्यांना दिले असून चर्चेतून आघाडीबाबत अंतिम निर्णय होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

निवड समिती जाहीर
जिल्हा परिषदेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी निवड समिती तयार करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. याशिवाय समितीत सदस्य म्हणून जिल्हा प्रभारी आमदार के. सी. पाडवी, डी. जी. पाटील, राजाराम पानगव्हाणे,आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिरीष कोतवाल, रामदास चारोस्कर, अनिल आहेर, नानासाहेब बोरस्ते आदींचा समावेश आहे. ही समिती उमेदवारीवर शिक्कामोर्तब करेल.

गटात किंवा गणात अधिक ताकद असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला संधी दिली जाईल. काही ठिकाणी दोन पावले मागे येण्याची तयारी ठेवावी लागले. काही दलबदलू लोक निवडणूक काळात पक्ष सोडून गेले. ते पक्षाचे कधीच नव्हते. संधीसाधूंना त्यांची जागा कळेल.
- राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरमध्ये रंगणार वाजे-कोकाटे स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे तालुक्यातील सहापैकी पाच गट ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने हिरमोड झालेले इच्छुक घरातील महिलांच्या माध्यमातून राजकीय लढाई लढण्यास फारसे उत्सुक नसले, तरी अनेकांनी सौभाग्यवतींना पुढे करून तयारी सुरू केली आहे. त्यातच नांदूरशिंगोटे गट सर्वसाधारण ओबीसीसाठी राखीव असल्याने अनेक इच्छुकांच्या नजरा या गटाकडे लागल्या आहेत.

पंचायत समितीचे १२ गण असले, तरी सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने सभापतिपदाचे लक्ष्य ठेऊन निवडणूक लढविणाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. ही निवडणूक माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठास्थेची असून ते आपला गड शाबूत राखतात, की विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे हा गड खेचून आणतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.राज्यात सर्वत्र भाजप-शिवसेना युती असताना सिन्नर तालुका यास अपवाद आहे. सिन्नरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातच खरी लढत होणार आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी नगरपालिका निवडणुकीत भगवा फडकवण्यात यश मिळविल्याने हा विजयी रथ आगामी निवडणुकीत राजकीय असाच दौडत ठेवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

विजयाच्या निश्चयाने शिवसेना कामाला लागली आहे. तर ही निवडणूक जिंकणे कोकाटेंसाठी राजकीय अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदेत पराजय झाल्यास राजकीय वर्चस्वाला पुरते ग्रहण लागणार असल्याने तसे होण्यासाठी कोकाटेंना भाजपकडून सर्व शक्ती पणाला लाऊन जिंकण्यासाठी लढण्याची व्यूव्हरचना करावी लागणार आहे.

नेतृत्व तेच, पक्ष बदलले!

गेल्या निवडणुकीत कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदेच्या सहा गटांपैकी चार जागांवर काँग्रेसने विजय संपादन केला होता. वाजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दोन उमेदवार विजयी झाले होते. यावेळी कोकाटे भाजपमध्ये तर वाजे शिवसेनेत असल्याने या राजकीय शक्ती गेल्यावेळेप्रमाणे यावेळीही एकमेकांच्या विरोधात मैदानात उभ्या ठाकल्या आहेत. आजी-माजी आमदार भाजप शिवसेनेच्या माध्यमातून प्रतिष्ठेची लढाई लढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘..तरच आघाडीचा विचार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी पुढाकार घेणार असेल तरच काँग्रेसने विचार करावा, अन्यथा स्वबळावरच निवडणूक लढविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षनिरीक्षक तथा धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर होते.

येथील सूर्या लॉन्स येथे आयोजित बागलाण तालुका काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी बैठकीत पक्षाच्या बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शामकांत सनेर म्हणाले, काँग्रेसची त्यागाची व बलिदानाची परंपरा आहे. तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला काँग्रेस एकमेव पक्ष आहे. विद्यमान मोदी व फडणवीस सरकारने महागाई कमी करण्याऐवजी वाढविली आहे. मोठ्या गर्वाने बदलाची नांदी करणाऱ्या या सत्ताधिशांनी श्रीमंताचे चोचले पुरवून गरिबांना अधिक गरीब करण्याचे डाव खेळले आहेत. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यातील मुजोरशाही संपविण्यासाठी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली.

या बैठकीस धुळे जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, तालुकाध्यक्ष साखरचंद कांकारीया, अ‍ॅड. विजय पाटील, माजी जि. प. सभापती यशवंत पाटील, जि. प. सदस्य अनिल पाटील, प्रल्हाद पाटील, माजी उपसभापती परशुराम अहिरे, शहराध्यक्ष किशोर कदम, धुळे लोकसभा प्रमुख सचिन कोठावदे, नारायण खैरनार, रवींद्र पवार आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा पालिकेत सभापती निवड बिनविरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगर पालिकेच्या विविध विषय समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या उपस्थितीत ही निवड झाली.

सटाणा नगरपालिका सभागृहात ही निवड झाली. नगराध्यक्ष सुनील मोरे, गटनेते संदीप सोनवणे यांनी सर्वच पक्षाच्या सदस्यांना विश्वासात व बरोबरीने घेत सभापत‌पिदांचे वाटप केले. पालिकेतील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस सर्वच पक्षांना सोबत घेत आपल्या राजकीय मुत्सद्दीगिरीची चुणूक दाखवून दिली.

सार्वजनिक बांधकाम समिती सभापत‌पिदी भाजपचे नगरसेवक दीपक पाकळे, पाणीपुरवठा समिती सभापत‌पिदी भाजपचे आरिप कासिम शेख, शहर विकास आघाडीचे नगरसेवक राकेश खैरनार यांना आरोग्य समिती सभापत‌पिदी, राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविका सुरेखा प्रकाश बच्छाव यांना महिला व बालकल्याण समिती सभापतीपद, तर सोनाली बैताडे यांना उपसभापती नियुक्त करण्यात आले. ‘शविआ’च्या नगरसेविका भारती सूर्यवंशी यांना शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्यसमिती सभापत‌पिदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीस नगराध्यक्ष सुनील मोरे, उपाध्यक्ष निर्मला भदाणे, संदीप सोनवणे, महेश देवरे, दीनकर सोनवणे, काकाजी सोनवणे, सुनीता मोरेकर, पुष्पा सूर्यवंशी उपस्थित होते.
यतीन पगार काँग्रेसच्या वाटेवर?
काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जि. प. सदस्य यतीन पगार उपस्थित असल्याने त्यांचे काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषदेसाठी २१ तर पंचायत समितीसाठी ४० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नगरपालिकेत सोमवारी दुपारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्य नियुक्त्यांसह सभापत‌पिदांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार समित्यांचे वाटप केले जाताना बिनविरोध पार पडलेल्या निवडीत सभागृहात सर्वाधिक ११चे संख्याबळ पाठीशी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात सर्वाधिक तीन सभापतीपदे पडल्याने राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसून आला. सत्तारूढ भाजपला एक, तर त्यांचा मित्रपक्ष सेनेला दोन सभापतीपदे मिळाली आहेत.

तहसीलदार नरेश बहिरम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी ही बैठक झाली. विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवधीत प्रत्येक समितीसाठी केवळ एकच अर्ज आल्याने पीठासन अधिकारी नरेश बहिरम यांनी सर्व समित्यांच्या सभापत‌पिदांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. येवला नगरपालिकेच्या एकूण सहा विषय समित्या गठीत करण्यात आल्या असून प्रत्येक समितीवर ७ सदस्य नेमण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमजिवी संघटनेचा एल्गार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रमज‌विी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विवेक पंड‌ति यांच्या नेतृत्त्वाखाली त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. त्र्यंबकेश्वर येथे १९९५ पासून घरे बांधून राहणाऱ्यांच्या नावे घरे करावीत, सिंहस्थ नियोजनाच्या नावाने झालेले बेरोजगारांचे पुनर्वसन करावे, अवाजवी दराने होणारी घरपट्टी, पाणीपट्टी, बाजार वसुली कमी करावी, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे येथे उपस्थित नसल्याने त्यांच्या प्रतीक्षेत कार्यकर्त्यांनी दिवसभर नगरपाल‌किेच्या बाहेर ठिय्या मांडला. त्र्यंबकेश्वर येथील वाहनतळाच्या बाजूस श्रमज‌विी संघटनेच्या कार्यालयाचे यावेळी उदघाटन करण्यात आले. तेथूनच मोर्चास सुरुवात झाली. पंड‌ति आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासन करत असलेल्या मनमानीच्या विरोधी जोरदार आवाज उठवला. तीन वेळा आंदोलन करूनही मुख्याधिकारी भेटत नसल्याने त्यांना जनतेच्या सेवकाची भूमिका बजवण्याचे आवाहन करून शासन दरबारी तक्रार करणार असल्याचे पंडित यांनी सांगितले. आंदोलनात जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, रामराव लोंढे, अशोक लहानगे, सुनील सोनी, मनोज लहांगे, रामचंद्र गुंड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल हिटलरशाहीकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल हिटलरच्या मार्गाने होत असल्याचा श्रमज‌विी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंड‌ति यांनी व्यक्त केले. त्र्यंबकेश्वर येथे बेरोजगारांच्या आणि बेघरांच्या प्रश्नावर अंदोलनासाठी ते आले होते, तेव्हा अत्यंत परखड मत मांडले.

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता ते हळूहळू फॅसीजमच्या दिशेने जात आहेत. नोटाबंदी असो वा खादी ग्रामोद्योगांच्या कॅलेंडरवरील फोटो असो, मोदींच्या प्रत्येक कृतीतून हिटलरशाही व्यक्त होत आहे, असे ते म्हणाले. चरखा घेऊन फोटोसेशन पुरते सूत कातणे अथवा गांधींजींचा चष्मा पळवून स्वच्छता अभियानाचा आव आणल्याने भारत सक्षम होणार नाही. मोदी यांना खरोखरच महात्मा गांधींचे तत्वे आचरणात आणायची असतील तर त्यांनी ग्रामीण भागाकडे लक्ष द्यायला पाह‌जिे. महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असे म्हणत स्वयंपूर्ण खेड्यांची आवश्यकता स्पष्ट केली होती. आज खेड्यांची अवस्था धड शहरी नाही आणि ग्रामीणही नाही. बेरोजगारी, आरोग्य, पाणी अशा सर्व समस्या भेडसावत असतांना चरखा घेऊन खादीचे सूत कातने म्हणजे केवळ ढोंग आहे. सोंग काढल्याने कोणी राजा होत नसतो तसा हा आहे, असेही पंडित म्हणाले.

नोटाबंदी फसवे जाळे...
नोटाबंदीचा प्रयोग हे फसवे जाळे आहे. पालघर ते त्र्यंबक या दोन तासाच्या प्रवासात मला दोन म‌निीटांचीदेखील कनेक्टेव्ही मिळाली नाही. तर कॅशलेस करतांना हा भाग वगळणार आहे काय, असा मार्मिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जेथे रोजगारच नाही तेथे मोबाइल फुकट देऊन कॅशलेस करून काय साध्य होणार आहे, असा परखड सवाल पंड‌ति यांनी उपस्थित केला. हातात झाडू अथवा चरखा घेऊन महात्मा गांधींचे केलेले अनुकरण हे केवळ प्रसिद्धीचे स्टंट असल्याचा टोला पंड‌ति यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images