Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विल्होळीजवळ होणार एण्ट्री पॉईंट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तीर्थक्षेत्र, उद्योग नगरी अशी भूषणे घेऊन विकासाकडे झेपावणाऱ्या नाशिकला भेट देणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे. पण या पर्यटकांना व इतर कामानिमित्त भेट देणाऱ्यांना आठवण रहावी असा एण्ट्री पॉईंट नाशिकमध्ये २ कोटी ३५ लाख रुपये खर्च करुन तयार होत आहे. मुंबई-आग्रा रस्त्यावर विल्होळीजवळ होणाऱ्या प्रवेशद्वारासाठी खास डिझाइन तयार करण्यात आले असून, त्यासाठी नारोशंकराची घंटा हा सिम्बॅाल व मोठी अर्धवर्तुळाकर भिंत बांधून त्यावर मराठी व इंग्रजीत नाशिक हे नाव मोठ्या अक्षरात असणार आहे.

मुंबई - आग्रा रस्त्याच्या बाजूला वेगळा रस्ता करुन त्यात एण्ट्री पॉईंट तयार होणार आहे. येथील भिंतीची उंची ही ३.८ मीटर असणार असून, त‌िची लांबी साधारण २२० मीटर असेल. या सर्वांचे बांधकाम ५७ हजार स्क्वेअर फुटांपर्यंत असेल. त्यामुळे असा भव्य व आगळ्या वेगळ्या पध्दतीचे हे प्रवेशव्दार नाशिकला येणाऱ्यांना आनंद देणार आहे.

नाशिकचे आर्किटेक्ट विवेक जायखेडकर, नितीन कुटे, विजय अग्रवाल, धनंजय शिंदे, विजय सांखला यांनी हे डिझाइन केले असून, त्याचे काम कॉन्ट्रॅक्टर बी. टी. कडलक करणार आहेत. बारा महिन्यांत हे काम पूर्ण करायचे असून, नाशिकच्या शिरपेचात हा आणखी एक तुरा असणार आहे. मुंबईहून येणाऱ्या व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना हे स्वागद्वार बघायला मिळणार आहे. या एण्ट्री पॉइण्‍टजवळील फेन्स‌िंग व लॅण्डस्केप ब्यूटीसुध्दा महत्वाची असून, त्यामुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलणार आहे.


ठरणार सेल्फी पॉईंट

नाशिकला भेट दिल्याची आठवण म्हणून या एण्‍ट्री पॉइण्‍टवर सेल्फी काढल्यास त्याची गोड आठवण सर्वांना राहणार आहे. नाशिकच्या या आगळ्या-वेगळ्या व कल्पकतेमुळे एखाद्या शहराचा एण्ट्री पॉईंट कसा असावा, याचे इतर शहरांना उदाहरण ठरणार आहे.

कल्पक एण्ट्री पॉईंटने नाशिकच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्याबाबत आम्ही पाच आर्किटेक्ट मिळून डिझाइन केले असून, ते शहराचे वेगळेपण ठरेल. यासाठी वर्क ऑर्डरही मिळाली असून, त्याचे काम काहीअंशी सुरू झाले आहे.

- धनजंय शिंदे, आर्किटेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप मालेगावात स्वबळावरच लढणार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जिल्ह्यात मालेगाव व सिन्नरमध्ये भाजप भक्कम स्थितीत आहे. त्यामुळे मालेगाव व सिन्नर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी युतीचा प्रस्तावच आम्ही पाठविलेला नाही. तसेच आम्ही यापूर्वीच शिवसेना मुक्त मालेगाव तालुक्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सेना राज्यमंत्र्यांनी नाहक वल्गना करू नयेत, अशी प्रतिक्र‌िया भाजपचे नेते डॉ. अद्वय हिरे यांनी पत्रकान्वये दिली आहे.

सिन्नर येथील कार्यक्रमात राज्यमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव व सिन्नर येथे सेना-भाजप युती करणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. हिरे यांनी ही प्रतिक्रीया दिली.

हिरे यांनी पत्रकात म्हटले आहे की, आपण गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील प्रत्येक गावात-खेड्यात गट-गणनिहाय बैठका घेतल्या. शिवसेनेशी युती न करता स्वबळावर या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. तसा प्रस्तावदेखील पक्ष पातळीवर पाठवला आहे. कार्यकर्त्यांचीदेखील मानसिकता स्वबळाचीच आहे. युतीची चिंता राज्यमंत्र्यांनी करू नये, अशी टीकाही त्यांनी केली आहे. सेना मुक्त तालुका करून भाजप स्वबळावर लढवणार आहे, असा खुलासा हिरे यांनी केला आहे.


हिरे-भुसे पारंपरिक लढत रंगणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये तालुक्यात पुन्हा एकदा हिरे आणि भुसे अशी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सिन्नर येथील वक्त्यावर अद्वय हिरे यांनी लागलीच पलटवार केल्याने येथील राजकीय वातावरणात हिरे-भुसे युद्धाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या लढतीत कोण विजयी होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणमध्ये उमेदवारीसाठी चुरस

$
0
0

कैलास येवला, सटाणा

बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात पैकी चार गटांमध्ये दोन गट सर्वसाधारण तर दोन गट सर्वसाधारण महिला राखीव असल्याने या चार गटांमध्ये खऱ्या अर्थाने ‘दंगल’ होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. बागलाण विधानसभा मतदार संघ आदिवासी राखीव आहे. यामुळे खुल्या प्रवर्गातील राजकीय आखाड्यातील ‘पैलवानांना’ जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात आपली खुमखुमी दाखविण्यासाठी जागा आहे. यामुळे खुल्या प्रवर्गात यंदा मोठ्या प्रमाणात ‘दंगल’ रंगणार आहे.

तालुक्यातील सात पैकी पठावे दिगर (सर्वसाधारण), जायखेडा (सर्वसाधारण), ठेगोंडा (सर्वसाधारण स्त्री), ब्राह्मणगाव (सर्वसाधारण स्त्री) राखीव आहेत.

पठावे दिगर

सद्यस्थितीत पठावे दिगर हा गट राष्ट्रवादी कडे असून, या ठिकाणी सिंधुबाई सोनवणे या विद्यमान सदस्या आहेत. नव्याने गट सर्वसाधारण खुला झाल्याने त्यांचे पती संजय सोनवणे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. या गटात आदिवासी बहुल मतदार असल्याने माजी सदस्य भाजपचे पोपट गवळी या ठिकाणी इच्छुक आहेत. याच गटातून द्वारकाधीश साखर कारखान्याचे संचालक तथा जिल्हा बँकेचे संचालक सचिन सावंत यांचीही चर्चा जोर धरू लागली आहे.

जायखेडा गट

जायखेडा गट ओबीसी प्रवर्गात होता. या गटातून राष्ट्रवादीचे यतीन पगार विद्यमान आहेत. नवीन आरक्षणात गट खुला झाल्याने तेच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. मात्र त्यांची उमेदवारी अद्याप कुणाकडून करावयाची हे निश्चित नाही. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे हेदेखील इच्छुक आहेत. भाजपकडून तालुकाध्यक्ष संजय भामरे यांचे नाव पुढे येत आहे.

ठेंगोडा गट

हा गट पूर्वी ओबीसी पुरूष गटासाठी होता. या ठिकाणी राष्ट्रवादीचे शैलेश सूर्यवंशी हे विद्यमान सदस्य आहेत. नव्याने आरक्षणात ठेंगोडा हा गट सर्वसाधारण स्त्री गटासाठी खुला झाला आहे. यामुळे या ठिकाणी सूर्यवंशी यांच्या पत्नी हेमलता यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे माजी सभापती यशवंत पाटील यांनी त्यांच्या पत्नी माजी सदस्या संगिता पाटील यांचे नाव पुढे केले आहे. याच गटात काँग्रेसकडून वीरगाव गटाचे सदस्य अनिल पाटील यांनी त्यांच्या पत्नीसाठी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर भाजपाकडून सुरेश मोरे यांच्या पत्नी रिंगणात उतरणार आहेत.

ब्राह्मणगाव गट

हा गट शिवसेनेच्या प्रशांत बच्छाव यांच्या ताब्यात आहे. या ठिकाणी भाजपकडून मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव यांच्या पत्नी माजी जि. प. सभापती लता बच्छाव यांचे नाव पुढे आले आहे. तर शिवसेनेकडून प्रशांत बच्छाव यांच्या पत्नी विजया या उमेदवारी करणार आहेत. त्यामुळे तालुकक्यातील चारही जि. प. गटात सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेशिवाय लढण्यास भाजपची तयारी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात कुठलीच राजकीय ताकद अथवा पक्ष संघटन नसलेल्या भाजपने आता या निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या नारा दिला आहे. शिवसेनेबरोबर ‘युती’ करण्याची सुप्त इच्छा बाळगून असलेल्या भाजपला सेनेकडून युतीसाठी कुठलीही टाळी मिळत नसल्याची खंत वाटत आहे. त्यामुळे माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी येवल्यात झालेल्या स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘एकला चलो रे’चा सूर आवळण्यात आला आहे.

तालुक्यातील ५ गट आणि १० गणांसाठी तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठे संघटन असलेल्या शिवसेनेने जोरदार तयारी करत सर्वच गट अन् गणांमध्ये उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे. दहा वर्षे शिवसेनेचे आमदार राहिलेले व आता भाजपमध्ये असलेले माजी आमदार कल्याणराव पाटील हे पुढे सरसावले आहेत. आमदारकीतील जनसंपर्काचा फायदा भाजपला मिळून देण्यासाठी पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी येवल्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या नियोजनासाठी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत गायकवाड, शहराध्यक्ष आनंद शिंदे, नूतन तालुकाध्यक्ष राजुसिंग परदेशी यांच्यासह भाऊ लहरे, गोरखनाथ खैरनार यांची उपस्थिती होती.

उमेदवारांबाबत चर्चा

बैठकीत सर्व गट-गणातील इच्छुक उमेदवार कोण असतील, कुणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा झडली. तालुक्यातील संघटनेचा आढावाही घेतला गेला. निवडणुकीसाठी विविध समित्या तयार करण्यात अल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये शिवसेनेची पहिली यादी जाहीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत सम‌िती स्वबळावर लढविण्याची शंभर टक्के तयारी पूर्ण केली असून, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या उपस्थितीत तालुकाप्रमुख निवृत्ती लांबे यांनी इच्छुकांची पहिली यादी जाहीर केली आहे. माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य कमळू कडाळी, माजी सभापती देवराम भस्मे, मनोहर मेढे पाटील आदींसह शिवसैनिकांनी भगवा फडकवण्याचा निश्चय केला आहे.

सन १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेचेच आमदार निवडून आले आहे. त्यातही अंजनेरी गट आणि गण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गेल्या दहा वर्षांपासून तो हातातून निसटत आहे. त्यामुळे हा गड पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी सर्वतोपरी बळ लावण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. यामध्ये भाजप तालुक्यात निष्प्रभ असल्याने युती न झालेलीच चांगली असे शिवसैनिकांचे ठाम मत आहे. त्यामुळे तालुक्यातील गट आणि गणातील उमेदवार जवळपास निश्वित करण्यात आले आहे. किरकोळ अपवाद वगळता यामध्ये विशेष फरक होणार नाही. जेथे एकमेव इच्छुक आहे त्यांची उमेदवारी निश्च‌ित असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे

शिवसेनेचे इच्छुक उमेदवार

अंजेनेरी

गट- सविता कडाळी

अंजेनेरी गण-यमुनाबाई पोटीदे

देवगाव गण- सुंदराबाई जाधव

हरसूल

गट-पांडुरंग खाडे

हरसूल गण-मिथुन राऊत,

विठ्ठल भोये

वाघेरा गण-कृष्णा महाले,

अशोक उघडे

ठाणापाडा

गट-नितीन लाखन

ठाणापाडा गण-धीरज पागी

मुलवड गण- हेमराज पडेर,

समाधान बोडके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानभरपाईचा प्रस्ताव लालफितीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गेल्या वर्षी खरीप हंगामात अवकाळी, गारप‌िटीचा फटका आणि तळाशी आलेला बाजारभाव यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना सरकारने प्रतिक्विंटल शंभर रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले होते. या नुकसानभरपाईस पात्र शेतकऱ्यांचा प्रस्ताव अद्यापही पुणे येथे पणन संचालकांच्या कार्यालयात धूळ खात पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या वर्षी खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड झाली होती. परंतु जुलै व ऑगस्ट महिन्यात कांदा पिकाचे दर घसरले. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळेही कांदा पिकाचे आतोनात नुकसान झाले. त्यामुळे कांदा उत्पादकांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या. यामुळे राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान १०० व कमाल २०० रु. प्रति क्विंटल प्रति लाभार्थीप्रमाणे अनुदान देण्याची घोषणा केली होती. या घोषनेनुसार जिल्ह्यातील लाभार्थी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार सम‌ितीकडे प्रस्ताव दाखल केले होते.

त्यानंतर जिल्ह्यातील सर्व १५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडील एकत्रित लाभार्थींचा नुकसानभरपाई निधीसाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पुणे येथील पणन संचालक कार्यालयाला गेल्या ऑक्टोबर महिन्यात सादर केला होता. परंतु अद्यापही पात्र शेतकऱ्यांना या घोषनेनुसार द्यावयाची नुकसानभरपाई प्राप्त झालेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रस्ताव पणन संचालकांच्या कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत धीळखात पडून आहे.

प्रस्तावांकडे दुर्लक्ष

वास्तविक हा प्रस्ताव नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा आहे. तामुळे या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून तत्काळ मंजुरी मिळणे अपेक्षित होते. मात्र असे असुनही पणन संचालकांच्या कार्यालयात हा प्रस्ताव अडकला आहे. यावरून शेतकऱ्यांच्या समस्यांची लवकर दखल घेण्यासाठी सध्याच्या सरकारला वेळ नसल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन सराफांची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सोने विक्री झाल्याच्या व्यवहाराची आता इन्कम टॅक्स विभागाने तपासणी सुरू केली आहे. बुधवारी तीन नामांकित सराफांच्या शोरूमची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे काही सराफांना थेट अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या नोटिसा आल्यामुळे सराफांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

बुधवारी झालेल्या या कारवाईत शहरातील भंडारी, मिरजकर व आडगावकर सराफ यांचा सर्व्हे सुरू झाला. त्यानंतर एका ठिकाणी सर्चची कारवाईसुध्दा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर देशात ४८ तासांत चार टन सोने विकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या सोन्याची किंमत १ हजार २५० कोटींपेक्षा जास्त होती. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाने याची देशभर गंभीर दखल घेतली असून, आता त्यावर कारवाईचे सर्वत्र काम सुरू केले आहे. नाशिकमध्ये तीन सरफांच्‍या शोरूम्स रडारवर घेण्यात आले. पहिले हा सर्व्हे असल्याचे सांगण्यात आले पण एका सराफाचे सर्चही करण्यात आले.

नाशिकबरोबरच राज्यात इन्कम टॅक्स विभागाने ४१ ठिकाणच्या सराफांवर ही कारवाई केली. त्यात नागपूर, अकोला, पुणे, विभागाचा समावेश आहे. डायरेक्टर ऑफ सेंट्रल एक्साइज इंटेलिजन्सने केलेल्या पाहणीनंतर देशभर सोने मोठ्या प्रमाणात विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. नोटबंदी झाली त्या ८ नोव्हेंबरच्या एका रात्री दोन टन सोन्याची विक्री झाल्याचे त्यांना पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे देशभर आता ही कारवाई सुरू झाली आहे. त्यात नाशिकचाही समावेश आहे.

ईडीच्या नोटिसा

नाशिकमधील काही सराफांना या अगोदर ईडीने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांचा आकडा नेमका पुढे आला नसला तरी ज्यांचे व्यवहार संशयास्पद होते, त्यांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईबरोबरच ईडीची कारवाईसुध्दा शहरात चर्चेचा विषय ठरली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-राष्ट्रवादीत ‌थेट लढत

$
0
0

संजय लोणारी, येवला

जिल्हा परिषद अन् पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होताच येवला तालुक्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहे. तालुक्यातील पाच गटांसह दहा गणांसाठी नेतेमंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गट-गणात असलेले इच्छुक तिकिटावर डोळा ठेवून आहेत. तिक‌िटासाठी समर्थकांना पुढे सरकवत नेतेमंडळींनी राजकीय रंगमंचावर पक्षांतराचे नाट्य रंगविण्यास सज्ज झाले आहेत. या पक्षांतराच्या नाट्यात तालुक्यात सर्वाधिक ‘फेव्हरेबल’ वातावरण असलेल्या शिवसेनेकडे इच्छुकांचा मोठा ओढा आहे. तर गेली दहा वर्षे जिल्हा परिषद अन् येवला पंचायत समितीत सत्तारूढ असलेल्या राष्ट्रवादीकडे यंदा भुजबळरुपी ‘बळ’ नसल्याने सैरभैर झालेल्या पक्षातील इच्छुकांचे ‘आऊटगोईंग’ सुरू झाले आहे.

येवला तालुक्यात शिवसेना लंबी रेस का घोडा असल्याचे हेरून सेनेकडे सर्वाधिक इच्छुकांचा ओढा दिसत आहे. इच्छुकांनी घड्याळाची वाट सोडून भगवा हाती धरल्याचे चित्र आहे. माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँकेचे संचालक नरेंद्र दराडे, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, जिल्हा बँक संचालक किशोर दराडे आदी नेतेमंडळी सेनेकडे असल्यानेच सेनेच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

गेली दहा वर्षे तालुक्याच्या राजकारणात हुकमी एक्का असलेल्या राष्ट्रवादीची मोठी ताकद म्हणजे माजी मंत्री छगन भुजबळ. मात्र भुजबळांच्या अनुपस्थितीत ‘झेडपी’सह पंचायत समितीच्या राजकीय रणसंग्रामाला सामोरे जावे लागत असल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीची अवस्था म्हणजे सेनापतीविना मैदानात सैन्य अशी झाली आहे. माणिकराव शिंदे व ‘मविप्र’ संचालक अंबादास बनकर ही नेतेमंडळीच काय ती या पक्षाच्या जमेची बाजू आहेत.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाची हार झाली होती. जिव्हारी लागलेला हा पराभव अन् त्याचे पडसाद आता होणाऱ्या ‘झेडपी’ व पंचायत समिती निवडणुकीत कसे अन् कुठवर उमटतात यावरही राष्ट्रवादीच्या घड्याळाची ‘टिकटिक’ अवलंबून आहे, हे नक्की.

भाऊगर्दी व्हायला नको!

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत सुरू झालेले ‘इनकमिंग’ पक्षाचा उत्साह वाढवणारी असले तरी केवळ उमेदवारीवर नजर ठेवून इच्छुकांची भाऊगर्दी ‘सूज’ ठरणार नाही ना? याकडे सेनेला लक्ष द्यावे लागणार आहे.

भाजप-काँग्रेसच्या गोटात शांतता

शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातच खरा मुकाबला होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्हींची ताकद अद्याप तरी सक्षम नेतृत्व व कार्यकर्त्यांच्या फौजफाट्याअभावी केवळ कागदावरच दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी उशिरा घेतलेली उडी, कार्यकर्त्यांची सुरू केलेली जमवाजमव हिच काय ती भाजपसाठी आशेची बाजू आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात आलेल्या जनसंपर्काचा उपयोग कल्याणराव पाटील भाजपासाठी करून घेण्याच्या दृष्टीने पावले टाकल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे रसातळाला गेलेले संघटन, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांची वानवामुळे हा पक्ष निवडणुकीला कसा सामोरा जातो याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशकात मुख्यमंत्र्यांकडून गृहपाठ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा भाजपने दिल्यानंतर नाशिकमध्ये भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यानीही नाशिकच्या प्रचारसभा गाजवण्यासाठी पालिकेची कुंडली जमविण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून महापालिकेत गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासकामांची तसेच केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निधीचा तपशील जमव‌िण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून एकाच वेळेस मनसेसह शिवसेनेलाही घेरले जाणार असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच हा दारूगोळा मागविण्यात आल्या असून, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांने तो मंगळवारी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला आहे.

नाशिकमध्ये शिवसेना व भाजपमध्ये युती होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. भाजप व सेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी केल्याने भाजप व सेना आमनेसामने येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच गेल्या पाच वर्षात पालिकेत मनसेची सत्ता होती. त्यामुळे भाजपला एकाचवेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनेच्या तगड्या प्रचारकांचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्र्यानाच नाशिकच्या मैदानात उतरण्याची गळ घालण्यात आली आहे. त्याला मुख्यमंत्र्यानीही प्रतिसाद दिला असून, मुख्यमंत्र्यानाही प्रचारासाठी दारुगोळा जमविण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून महापालिकेच्या शिवेसना व मनसेच्या कार्यकाळात झालेल्या विकासाची कुंडलीच मागविण्यात आली आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेसाठी दिला जाणारा निधीचा तपशील मागवला आहे.

बुधवारी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी हा सर्व दारुगोळा घेवून मुख्यमंत्री कार्यालयात गेले होते. त्यांनी गेल्या पाच वर्षात मनसेच्या कार्यकाळात झालेली विकासकामे, केंद्र व राज्य सरकारकडून आलेला निधी याची जंत्रीच संबंधित अधिकाऱ्यांने मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केली आहे. सोबतच नाशिकमध्ये प्रस्तावित करता येणाऱ्या प्रकल्पांचाही तपशील सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री या जंत्रीचा बारीक अभ्यास करणार असून, हा दारुगोळा निवडणुकीत वापरला जाणार आहे.

फडणवीसांचा सामना ठाकरेंशी

निवडणुकीत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तर, मनसेकडून राज ठाकरे हे नाशिकच्या प्रचाराची धुरा साभांळणार आहेत. तर भाजपकडून स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्याना दोन ठाकरेंचा एकाच वेळी सामना करावा लागणार आहे. त्यासाठी चांगला दारुगोळा असावा या उद्देशाने मुख्यमंत्र्यांकडून नाशिकचा बारीकसारीक माहिती जमवली जात आहे. दोन्ही ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यानाच पेलावी लागणार असल्याने मुख्यमंत्र्यांकडून नाशिकचा गृहपाठ केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. विजया राजाध्यक्ष यांना ‘जनस्थान’ जाहीर

$
0
0

म.टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजे येत्या २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण

$
0
0

विजेत्या संघात नंदुरबारच्या सहा खेळाडूंचा समावेश

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गुजरात राज्यातील गांधी नगर येथे झालेल्या १४ वर्षाखालील वयोगटाच्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या संघाने सुवर्ण तर मुलांच्या संघाने रौप्यपदक पटकाविले आहे.

मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राची लढत जम्मू-काश्मिर संघाशी झाली. या लढतीत महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत जम्मू-काश्मीरच्या संघाला १०-० अशा फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकवण्याची कामगिरी केली. राष्ट्रीय स्पर्धेत विजय संपादन करणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नंदुरबार येथील यामिनी साठे, अक्षदा नांदेडकर, कल्याणी सूर्यवंशी, मोहिनी पाटील यांचा समावेश होता. प्रशिक्षक म्हणून अकरम शेख तर व्यवस्थापक म्हणून खुशाल शर्मा यांनी जबाबदारी सांभाळली.

मुलांच्या गटातील अंतिम फेरीत महाराष्ट्राची लढत तामिळनाडूशी झाली. चुरशीच्या लढतीत तामिळनाडूने १५-५ असा विजय नोंदविला. त्यामुळे महाराष्ट्र संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला. राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या महाराष्ट्र संघात नंदुरबार येथील अभय नुक्ते, प्रशांत वळवी यांचा समावेश होता. या संघास प्रशिक्षक म्हणून विकास चौरसिया तर व्यवस्थापक म्हणून शिवा सर यांनी काम पाहिले. विजेत्या संघाचे नंदुरबार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष राजेश रघुवंशी, खुशाल शर्मा यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पास-नापास!

$
0
0

पास-नापास!

रायबा भल्या पहाटे उठून फेरफटका मारायला गेला होता. वाढत्या वजनानं त्याचं टेन्शन वाढलं होतं. इलेक्शनचा व्याप वाढल्यानं तब्येतीकडं लक्ष देता येत नव्हतं. रोजच बाहेरचं खाऊन त्याला कंटाळा आला होता. पण, पुढचे काही दिवस पर्याय नव्हता. सायबा अन् इतर वर्करचीही अवस्था वेगळी नव्हती. वाटेतच सामोसे, पाववडे खावे लागत होते. रात्रीच्या पार्ट्या मात्र जोमात होऊ लागल्या होत्या. सायबाची शरीरयष्टी बारीक असल्यानं त्याला इतका प्रॉब्लेम नव्हता. घामेजलेला रायबा त्याला वाटेतच भेटला.

सायबा : काय नेते, आज कशी सवड काढली? उमेदवारांना घाम येण्याऐवजी तो तुम्हाला आलाय की. रोज वडापाव खाणार तर घामच येणार की! वहिनीसाहेबांना म्हणावं गरमागरम डबा देत जावा.

रायबा : पाव अन् बटाट्यानं सगळी गडबड होतेय राव. कालच घरात डब्याचं फर्मान सोडलं होतं. आजपासून सोय होणार आहे. (रायबानं स्मित हास्य केलं.)

सायबा : मग, आजचं काय प्लॅनिंग आहे. पुन्हा मुलाखतींमध्येच जायचं का घोषणाबाजीला? कमळावाल्यांकडं काल लई मनोरंजन झालं राव.

रायबा : होय होय, एक धोतरवाल्या उमेदवाराची उत्तरं ऐकून तर सगळेच हबकले. त्याला त्याच्या पक्षाच्या नेत्यांची चित्रच ओळखता येईना. पक्षाचं वय विचारलं तर स्वतःचच वय सांगून टाकलं. शेवटी म्हणाला, काहीही करा पण मलाच तिकीट द्या. पैसा-पाणी भरपूर आहे माझ्याकडं. सोबतीला त्याचं पैलवान पोरंगसुद्धा उभं होतं. तीन अपत्य असल्यानं पोरानं वयोवृद्ध बापालाच रिंगणात उतरवलं होतं.

सायबा : अरं ह्ये मुलाखत-बिलाखत नावाला असतंय. तिकिटं आधीच फायनल झालेली असतात. कोण किती देऊ शकतो, खर्चू शकतो त्याच्यावरच तिकीट ठरतंय. जास्त इच्छुक असले, की त्यांना गुंडाळण्यासाठी आयडिया म्हणजे मुलाखत.

रायबा : खरंच आहे. गेल्या वेळी नाही का इंजिनवाल्यांनी परीक्षा घेतली. ३५ मार्क मिळालेल्या उमेदवारालासुद्धा तिकीट वाटलंच की. केवढी चर्चा झाली होती तेव्हा परीक्षेची. नापास उमेदवार पक्षानं पास केले अन् आता उमेदवारांनीच पक्षालाच नापास केलंय. आता घ्या म्हणावं पुन्हा परीक्षा?

सायबा : बरोबरच आहे. राजकारणात शेवटी पास-नापास जनताच ठरवत असते. कुणी पेपर सोडवला काय, अन् नाही सोडवला काय? कॉपी करणारा तिथं कधीच पास होत नाही अन् कामं करणारा कधीच नापास होत नाही, हेच खरं.

(दोघं चालता-बोलता रायबाच्या घरापर्यंत आले होते. काल रात्रीच घरातलं सिलिंडर संपल्याचं वहिनीसाहेबांनी दारात आल्या आल्या त्याला बजावलं. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मोबाइलवरून सिलिंडरचा नंबर लावायला सांगितला होता. पण, रायबा ते साफ विसरला होता. आता दिवसभर पुन्हा वर्कर मंडळींसोबत खावं लागणार असल्यानं रायबाचा चेहरा एकदम बटाटेवड्यासारखा झाला होता. (सायबा त्याच्या ढेरीकडे बघून नुसतंच हसत होता.)

-संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुसंडीसाठी शिवसेना-भाजप सज्ज

$
0
0

मुसंडीसाठी शिवसेना-भाजप सज्ज



vinod.patil
@timesgroup.com

---

Tweet : vinodpatilMT

---

नाशिक : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर नाशिकमधील मनसेच्या सत्तास्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या नाशिक पूर्वमधील लढतींकडे सर्वांचे लक्ष आहे. जुन्या नाशिकमधील मतदारांचा कौल हा निर्णायक राहिला असून, आतापर्यंत या भागाने शहराला पाच महापौर, तर पाच स्थायी समिती सदस्य दिले आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा परिसर असलेल्या जुन्या नाशिकमधील राजकीय घडामोंडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी २४ नगरसेवकांपैकी मनसेचे तब्बल ९ नगरसेवक निवडून आले होते. असे असले, तरी काँग्रेस व राष्ट्रवादीचा गड म्हणूनही या भागाकडे पाहिले जाते. परंतु, आता स्थिती बदलली असून, या भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे मनसेच्या या गडावर कोण वर्चस्व मिळविणार, हा आता औत्स्युक्याचा विषय बनला आहे.

१९ नगरसेवक निवडणार

शहरातील सहा विभागांतील नाशिक पूर्व अर्थात, जुने नाशिक अशी ओळख असलेल्या या परिसरातून नव्या रचनेत १९ नगरसेवकांना निवडून दिले जाणार आहे. नव्या रचनेत याचा विस्तार हा आता पाथर्डी फाट्यापर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी या भागातून २४ नगरसेवक निवडून देण्यात आले असले, तरी प्रभागांच्या मोडतोडीत या भागातील सदस्यसंख्या घटली आहे. गेल्या वेळी नाशिक पूर्व हा विभाग काँग्रेस व राष्ट्रवादीकडून मनसेने हिसकावून घेतला होता. या भागातील २४ सदस्यांपैकी मनसेचे ९ नगरसेवक निवडून आले होते. पाठोपाठ राष्ट्रवादीचे ५, काँग्रेसचे ४, तर भाजप २ आणि शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला होता. तीन अपक्षांनीही या विभागातून बाजी मारली होती. या विभागातून ९ सदस्य निवडून आल्यानेच मनसेचा सत्तेचा मार्ग सुकर झाला होता. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जुने नाशिक, द्वारका, भाभानगर, काठे गल्ली, वडाळा, डॉ. आंबेडकरनगर, टाकळीरोड, इंदिरानगर, पाथर्डी फाटा आणि नाशिकरोडचा काही भाग नाशिक पूर्व विभागात येतो. त्यामुळे आकाराने या विभागाचा विस्तार बराच मोठा असून, राजकीय दिग्गजांचीही संख्या मोठी आहे. नव्या प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक १५, १६, २३, ३०, ३१ अशा पाच प्रभागांचा समावेश असून, प्रभाग क्रमांक १५ हा तीन सदस्यीय प्रभाग आहे. त्यामुळे १९ सदस्य या भागातून निवडले जाणार आहेत.

---

प्रभाग १५

अनेकांची प्रतिष्ठा पणाला

पाच प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १५ हा ‘व्हीआयपी’ असणार आहे. महापालिकेच्या भाजपच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी टाकलेल्या माजी आमदार वसंत गितेंची प्रतिष्ठा त्यांच्या चिरंजीवाच्या राजकारणातील प्रवेशामुळे या प्रभागात पणाला लागणार आहे. अनुसयानगर, गीताईनगर, घरकुल, बनकर चौक, रवींद्र विद्यालय परिसर, काठे गल्ली, भाभानगर, जनरल वैद्यनगर, किनारा हॉटेल परिसर, शंकरनगर परिसर, मिरजकरनगर, स्टेट बँक कॉलनी असा परिसर या प्रभागात असून, येथून तीन सदस्य निवडले जाणार आहेत. सुरुवातीला मनसेचा गड राहिलेल्या या प्रभागात मुसंडी मारण्यासाठी भाजप व सेना सज्ज झाली आहे. येथून शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक सचिन मराठे, भाजपच्या अर्चना थोरात, वंदना शेवाळे, मनसेकडून संदीप लेनकर, गुलजार कोकणी मैदानात उतरणार आहेत. सोबतच रेखा कैलास मोरे, प्रथमेश गिते, मिलिंद भालेराव, सुमन भालेराव, प्रिया मुनशेट्टीवार, कैलास मोरे, आशा परदेशी, प्रशांत रकटे, खुशाल पवार, अर्चना टाकेकर, नीलेश खैरे आदी इच्छुक आहेत. वसंत गितेंना आपली ताकद दाखवण्याची संधी या प्रभागात असली, तरी त्यांना पक्षांतर्गत विरोधकांसह शिवसेना व मनसेशी सामना करावा लागणार आहे. गेल्या पाच वर्षांत प्रभागात झालेल्या चांगल्या कामांच्या जोरावर मराठे, थोरात, कोकणी यांनी पुन्हा दावेदारी ठोकली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवारांची वानवा असल्याने मुख्य लढत ही शिवसेना, भाजप व मनसेमध्येच होणार असल्याचे चित्र आहे.

---

प्रभाग १६

एेनवेळी अच्छे दिनची चिन्हे

प्रभाग १६ मध्ये श्रीनिवास कॉलनी, उत्तरा कॉलनी, आशीर्वादनगर, आगर टाकळी, रामदास कॉलनी, जय भवानीनगर, समतानगर, रामदास स्वामीनगर, उपनगर, शांती पार्क, मातोश्रीनगर, ड्रीम सिटी हा परिसर येतो. गेल्या वेळेस मनसे व काँग्रेसचे प्राबल्य या प्रभागात होते. काँग्रेसचे राहुल दिवे, मनसेच्या सुमन ओहोळ, मेघा साळवे, भाजपचे प्रा. कुणाल वाघ या विद्यमान नगरसेवकांचा हा प्रभाग आहे. त्यामुळे मनसेसह काँग्रेस व भाजपला आपले वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहे. दुसरीकडे या प्रभागात मुंसडी मारण्यासाठी शिवसेना व भाजपने कंबर कसली आहे. माजी महापौर अशोक दिवे यांचे वर्चस्व या प्रभागात असून, त्यांची साथ निकालात निर्णायक ठरणार आहे. सद्यस्थितीत या चौघांसह दिनकर आढाव, अनिल ताजनपुरे, अनिल जोंधळे, गिरीश चांदवडकर, ऋषिकेश गायकवाड, उज्ज्वला हिरे, नंदिनी जाधव, आशिष साबळे, सचिन पाटील इच्छुक आहेत. भाजप व सेनेकडे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांचा कल असला, तरी या दोन्हींकडून उमेदवारी मिळाली नाही, तर ऐनवेळी मनसेसह काँग्रेसला या ठिकाणी अच्छे दिन येऊ शकतात.

---

प्रभाग २३

राजकीय गणित किचकट

प्रभाग २३ मध्ये भारतनगर, श्रीरामनगर, विनयनगर, हॅपी होम कॉलनी, अशोका मार्ग, खोडेनगर, गणेशबाबानगर, सावतामाळीरोड, डीजीपीनगर, कमोदनगर, इंदिरानगर हा परिसर येतो. विद्यमान नगरसेवक भाजपचे सतीश कुलकर्णी, राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले या प्रभागातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सोबतच गोपाळ पाटील, सुनील खोडे, अमित पाटील, रुपाली निकुळे इच्छुक आहेत. भाजप व राष्ट्रवादीचे या प्रभागात प्राबल्य असले, तरी हा संपूर्ण परिसर भाजपमय करण्यासाठी सतीश कुलकर्णी यांनी ताकद लावली आहे. त्यामुळेच गोपाळ पाटील यांना सोबत घेऊन त्यांनी सक्षम पॅनल तयार करण्याचे काम सुरू केले असून, ऐनवेळेस कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे या प्रभागातील राजकीय गणिताकडे लक्ष लागून आहे.

---

प्रभाग ३०

मुस्लिम मते निर्णायक

प्रभाग ३० मध्ये राणेनगर, इंदिरानगर, लिंकरोडच्या उत्तरेकडील भाग, राजीवनगर, वैभव कॉलनी, किशोरनगर, कानिफनाथनगर, पेठेनगररोड, हायवेपासून चार्वाक चौकापर्यंत, वडाळा गाव, चिंतामणी कॉलनी, श्रद्धा विहार, शिव कॉलनी, पांडवनगरी, गुरू गोंविद सिंग पॉलिटे‌क्निक कॉलेज परिसर आहे. विस्तीर्ण असा हा मतदारसंघ असून, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे, रशिदा शेख यांचा हा प्रभाग आहे. त्यामुळे हे तिघेही पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. कुलकर्णी, सोनवणेंनी मनसेचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोबतच सुनील खोडे, संजय चव्हाण, वंदना बिरारी, संध्या तोडकर, प्रकाश खोडे, आकाश खोडे, जगन पाटील यांनीही उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. गेल्या वेळी मनसेचे प्राबल्य असलेला हा विभाग असून, मुस्लिम मते या प्रभागात निर्णायक आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी एक मुस्लिम उमेदवार घ्यावा लागणार आहे.

---

प्रभाग ३१

मोठ्या विस्ताराचे आव्हान

प्रभाग ३१ मध्ये गणेश कॉलनी, नगरकर लेन, इच्छापुरी चौक, राणेनगर, सिमेन्स कॉलनी, साई पॅलेस हॉटेलच्या पूर्वेकडील भाग, अनमोल नयनतारा गोल्ड, हॉटेल सेवन हेवनच्या पूर्वेकडील भाग, ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर, वडाळा पाथर्डीरोड, गुरू गोविंद सिंग कॉलेजसमोरील भाग, पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावठाणाच्या पाथर्डीरोडच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील भाग, प्रशांतनगर, अयोध्या कॉलनी, नरहरीनगर, दामोदरनगर, दादासाहेब फाळके स्मारक व लगतचा भाग, पाथर्डी गाव, पाथर्डी दाढेगावरोडचा पूर्व-पश्चिम भाग, दाढेगाव, पिंपळगाव खांबरोडचा पश्चिमेकडील भाग असा विस्तीर्ण परिसर असून, पूर्व विभागातील हा सर्वांत मोठा प्रभाग आहे. विद्यमान स्थितीत या प्रभागातून वंदना बिरारी, सुदाम कोंबडे प्रतिनिधित्व करतात. परंतु, बदलेल्या परिस्थितीत कोंबडे यांनी मनसेची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोबतच देवानंद बिरारी, वंदना बिरारी, भगवान दोंदे, संजय नवले, अमोल जाधव, सुदाम ढेमसे हे इच्छुक आहेत.

--

ताकद लावलीय पणाला

महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापण्यासाठी नाशिक पूर्वचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेसह भाजपनेही या विभागावर वर्चस्व मिळवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मनसेनेही हा गड कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी नवख्या उमेदवारांच्या भरवशावरच त्यांना हे लक्ष्य गाठावे लागणार आहे. दुसरीकडे विरोधात असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीला उमेदवार मिळण्याची मारामार असल्याने सद्यस्थितीत तरी या विभागात शिवसेना, भाजप व मनसेतच तिरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

---

विभागातील आरक्षणांची स्थिती

प्रभाग १५

अ : नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग (महिला)

ब : सर्वसाधारण (महिला)

क : सर्वसाधारण

-

प्रभाग १६

अ : अनुसूचित जाती (महिला)

ब : अनुसूचित जमाती (महिला)

क : नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग

ड : सर्वसाधारण

प्रभाग २३

अ ः अनुसूचित जमाती (महिला)

ब ः नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग (महिला)

क ः सर्वसाधारण

ड ः सर्वसाधारण

-

प्रभाग ३०

अ ः अनुसूचित जाती

ब ः नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग (महिला)

क ः सर्वसाधारण (महिला)

ड ः सर्वसाधारण

-

प्रभाग ३१

अ ः अनुसूचित जाती

ब ः नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग (महिला)

क ः सर्वसाधारण (महिला)

ड ः सर्वसाधारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालिदास’ची दुर्दशा चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिर म्हणजे आर्थिक फायद्याचे ठरणारे व सध्या सुरू असलेले महापालिकेचे शहरातील एक महत्त्वाचे नाट्यगृह. परंतु, या नाट्यगृहापोटी मिळणारा निधीच केवळ महापालिका गोळा करीत असून, नाट्यगृहाच्या मेंटेनन्सकडे मात्र अजिबात लक्ष देत नसल्याची स्थिती अभिनेता प्रशांत दामले यांनी उघड केली आहे. दामले यांनी सोशल मीडियावर कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेचे फोटो टाकून अक्षरशः वाभाडे काढले असून, नाशिकमध्ये गुरुवारी दिवसभर हा चर्चेचा विषय ठरला.

महापालिकेच्या महत्त्वाच्या सभागृहांमध्ये महाकवी कालिदास कलामंदिराचे नाव सर्वांत वर येते. उत्पन्न मिळवून देण्यात कालिदासचा मोठा वाटा आहे. एकही दिवस या नाट्यमंदिराची तारीख रिकामी राहत नाही. नाटक, एकांकिका, बालनाट्ये, शाळांची स्नेहसंमेलने असे अनेकविध कार्यक्रम येथे होत असतात. दिवसभरात अनेक नाशिककर येथे भेटी देतात. परंतु, असे असतानाही कालिदासच्या मेंटेनन्सकडे महापालिका अजिबात लक्ष देत नाही. स्वच्छतागृहाचे पाइप फुटलेले, नळ तुटलेले, तसेच पाण्याची व्यवस्था नाही. खाण्यापिण्याची पाकिटे खुर्च्यांखालीच टाकलेली असतात. अनेक खुर्च्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. या खुर्च्या बदलण्यासाठी टेंडर निघालेले आहे, तसेच पैसेही मंजूर झालेले आहेत. मात्र, काम करण्यासाठी महापालिका कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे हेच कळत नाही.

प्रशांत दामले यांच्यासारखे अभिनेते येथे नाटक सादर करण्यासाठी येतात. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मध्यंतरी दामले यांनी याप्रश्नी आवाज उठवला होता. अभिनेता भरत जाधव यांनीदेखील महापालिकेला पत्र लिहून कालिदासची अवस्था सुधरविण्याची विनंती केली होती. परंतु, त्याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. प्रशांत दामले यांनी फेसबुकवर कालिदासचे काही फोटो शेअर केले आहेत. ते पाहिल्यानंतर नाट्यगृहाची दुरवस्था लक्षात येते. प्रेक्षक येथे नाटकाच्या प्रेमापोटी येतात. परंतु, नाट्यगृहात आल्यानंतर त्यांची निराशा होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर तरी किती अवलंबून राहणार, असा सवाल दामले यांनी केला असून, नाट्यगृह खासगी कंपनीला चालवायला द्यावे, असेही त्यांनी सुचवले आहे. नाट्यगृहाचा व्यवस्थापक नाटकाशी नाळ जुळलेला असल्यास त्याला या सर्व गोष्टींची उमज असते. त्यामुळे त्याकडेही लक्ष द्यावे, असेही दामले यांचे म्हणणे आहे.

---

कलाप्रेमींच्या सूचना

फेसबुकवर कालिदासचे फोटो पाहताच आतापर्यंत अनेक जणांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राजकारणीच याला जबाबदार आहेत, फंड खातात, काम करीत नाहीत, कलाकारांनी येथे येणे बंद करून टाकावे, कालिदास कलामंदिर बंद ठेवा, अशा आशयाच्या सूचना फेसबुकवर येत आहेत.

---

कालिदास कलामंदिराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. नळ, खुर्च्या तुटलेल्या आहेत, पाइप तुंबलेले आहेत. जेवणासाठी निश्चित जागाच नाही. असे असेल तर आम्ही येथे नाटक सादर करण्यासाठी का यायचे?

-प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेता

---

मटा भूमिका

---

महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह हे नाशिकचे भूषण समजले जात असले, तरी सध्या त्याची जी दुर्दशा झाली आहे त्यामुळे ते चक्क दूषण बनले आहे. अभिनेता प्रशांत दामले यांनी ही सल सोशल मीडियावर व्यक्त करताच दिवसभर नाशिकच्या कथित विकासाचा धिंडोरा पिटला गेला. सोशल मीडियावर काय चालले त्यापेक्षा या नाट्यगृहाची दुरवस्था दूर करणे हे आता महत्त्वाचे आहे. या नाट्यगृहाच्या बुकिंगपासून ते प्रत्यक्षातील त्याच्या वापरापर्यंत असंख्य चित्तरकथा पुढे येत आहेत. महापालिकेच्या अखत्यारीतील या वास्तूला भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरल्याचे पुढे येत आहे. कालिदासच्या दुर्दशेला प्रशासन जेवढे जबाबदार आहे, तेवढेच काही प्रेक्षकही आहेत, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. सभागृहातील खुर्चांचे सीट फाडणे, खाद्यवस्तूंची पाकिटे तेथेच टाकून देत उंदरांना आमंत्रण देणे अशा बेशिस्तीमुळेही नाट्यगृहाने मान टाकली आहे. आता दामलेंना साथ देत नाशिककरांनीही या कलामंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत.

---

महापालिकेला सुचले उशिराचे शहाणपण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर उठवलेली टीकेची झोड आणि महाकवी कालिदास कलामंदिराची दुरवस्था या विषयावर दिवसभर शहरात झालेल्या चर्चेमुळे महापालिका सुतासारखी सरळ झाली असून, गेल्या अनेक वर्षांपासूनचा कालिदास कलामंदिराचा स्वच्छता व आतील डागडुजीचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. याकामी तत्काळ काही निर्णय घेण्यात आले आहेत. यात नाट्यगृहे व सांस्कृतिक सभागृह कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कलामंदिरासाठी १२ सफाई कर्मचारीदेखील देण्यात आले आहेत.

महापालिकेचे सभागृह म्हणून अत्यंत प्रसिद्ध असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराची अवस्था अत्यंत बिकट बनत चालली होती. स्वच्छतागृह आणि आसनव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याप्रश्नी कुणीतरी आवाज उठवणे गरजेचे होते. मात्र, सांस्कृतिक संस्थांनी अनेकदा अर्जफाटे करून या विषयाला तोंड फोडूनही महापालिका ढिम्मच होती. अभिनेता भरत जाधव, प्रशांत दामले यांच्या अर्जांनंतरही महापालिकेने कलामंदिराच्या दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही केली नव्हती. मात्र, गेल्या सोमवारी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अचानक कालिदास कलामंदिराची पाहणी करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे ते कालिदासमध्ये गेलेही. परंतु, तेथे स्नेहसंमेलन सुरू असल्याने आतील भागाची पाहणी ते करू शकले नाहीत. मात्र, तरीही बाहेरील भागाची पाहणी करीत असताना तेथील दुरवस्था त्यांच्या लक्षात आली. त्याप्रमाणे त्यांनी कालिदास कलामंदिरात सोमवारी रात्री एक बैठक आयोजित केली. त्यात काही रंगकर्मींनाही बोलावण्यात आले होते. त्याच दिवशी कालिदासचा प्रश्न निकाली निघण्याची चिन्हे होती. मात्र, पुन्हा माशी शिंकली आणि बैठक होऊ शकली नाही.

अशातच कालिदासच्या दुरवस्थेबद्दल अभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल केले. त्यामुळे शहरात गुरुवारी दिवसभर याच विषयाची चर्चा होती. महापालिकेनेही तत्काळ काही निर्णय घेतले. यात नाट्यगृहे व सांस्कृतिक सभागृह कक्ष स्थापना हा मुख्य भाग असून, त्याअंतर्गत प्रसाधनगृह दुरुस्ती आणि रंगमंच दुरुस्ती केली जाणार आहे. खुर्च्या तत्काळ बदलण्यासाठी आदेश देण्यात आले असून, त्यासाठी कार्यवाहीदेखील लगेचच सुरू करण्यात आली आहे. या कक्षाची जबाबदारी अधीक्षिका एम. ए. शिरसाठ यांच्याकडे देण्यात आली आहे. कर्मचारी म्हणून एस. के. बहिरम, इलेक्ट्रिशियन म्हणून एस. आर. झाडे, लिपिक म्हणून एम. ए. बोरस्ते यांच्याकडे काम देण्यात आले आहे.

नाट्यगृहे व सांस्कृतिक सभागृह कक्षांतर्गत महाकवी कालिदास कलामंदिर, दादासाहेब फाळके स्मारक, दादासाहेब गायकवाड सभागृह, तसेच तारांगण यांचे काम देण्यात आले आहे. कक्षाची नियमावली तयार करण्यात आली असून, या सभागृहांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप देणे बंधनकारक करण्यात आले आहे. फाळके स्मारकासाठी दोन लिपिक आणखी देण्यात आले असून, हे स्मारक व दादासाहेब गायकवाड सभागृहाकडे दुरुस्तीसाठी लवकरच महापालिका मोर्चा वळविणार आहे, अशी माहिती आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली.

---

बल्क बुकिंगला बसणार चाप

महापालिका नाट्यगृहाचे तीन महिन्यांचे शो बुक करून खासगी संस्थांना दुप्पट-तिप्पट किमतीत विकणाऱ्यांना नाट्यगृहे व सांस्कृतिक सभागृह कक्षाच्या नियमावलीमुळे चाप बसणार असून, त्याबाबत त्यांना विचारणा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्वरूप देणे याअंतर्गत बंधनकारक असल्याने बल्क बुकिंग करणारे किती व कसे शो लावतात हे स्पष्ट होणार असून, इतर सांस्कृतिक संस्थांनादेखील महापालिकेच्या दरातच सभागृहे देण्यासाठी कटिबद्धता पाळावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. विजया राजाध्यक्ष यांना ‘जनस्थान’ जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने १९९१ पासून एक वर्षाआड गौरवास्पद लेखन करणाऱ्या मराठी साहित्यिकाला या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

ख्यातनाम लेखक सतीश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. बैठकीत डॉ. राजाध्यक्ष यांची एकमताने निवड करण्यात आली. समितीत दासू वैद्य, रेखा इनामदार-साने, मोनिका गजेंद्रगडकर, अनुपमा उजगरे यांचा समावेश होता. या पुरस्काराची घोषणा मुंबई व नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. नाशिकला प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी कुसुमाग्रज स्मारक येथे ही माहिती दिली. या वेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त अरविंद ओढेकर उपस्थित होते.

स्त्रीवादी लेखन करणाऱ्या लेखिका

डॉ. राजाध्यक्ष या मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहेत. जन्म ५ ऑगस्ट १९३३. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एसएनडीटी विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होत. कथाकार म्हणूनही त्या परिचित आहेत. महाविद्यालयात असताना त्यांनी लेखनाला सुरुवात केली. पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. ‘अधांतर’ हा त्यांचा पहिला संग्रह. त्यानंतर ‘विदेही’, ‘अनोळखी’, ‘अकल्पित’, ‘हुंकार’, ‘अखेरचे पर्व’, ‘उत्तरार्ध’, ‘आधी...नंतर’ असे त्यांचे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विजयाबाईंची कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवेशातील स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते. विशिष्ट कालखंडातील प्रश्नांपेक्षा जन्म व मृत्यू या टोकांतील जीवनाचे प‍्रयोजन, स्त्री-पुरुषांची आणि आई-मूल, पती-पत्नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ, यांचा परोपरीने वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते. तरल, काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. समीक्षात्मक लेखनात ‘कवितारती’, ‘जिव्हार’ ‘स्वानंदाचे आदिमाया’, ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’, ‘संवाद’ ही पुस्तके ख्यात आहेत. ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ या ग्रंथाला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविले आहे. २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विजया राजाध्यक्षा यांनी भूषविले आहे.

यापूर्वीचे ‘जनस्थान’प्राप्त साहित्यिक

विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागूल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३) अरुण साधू (२०१५).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमेदवारांनो तुमच्यावर ‘प्राप्तिकर’चॉ वॉच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काळ्या पैशांच्या जोरावर नगरसेवकपदाची निवडणूक जिंकण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाने जोरदार धक्का दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्चावर, तसेच त्यांच्या संपत्तीचा तपशील तपासण्यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक आयोगाने नाशिक महापालिकेसाठी प्राप्तिकर विभागाच्या पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. उमेदवारांच्या खर्चांवर त्यांची करडी नजर राहणार आहे. उमेदवारांचा खर्च तपासणी, तसेच त्यांच्याकडून मतदारांना दाखवल्या जाणाऱ्या प्रलोभनांसह त्यांच्या बारीक हालचाली थेट प्राप्तिकरच्या टप्प्यात येणार आहेत. त्यामुळे काळ्या पैसेवाल्यांना ही निवडणूक लढवणे चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आतापर्यंत उमेदवारांच्या खर्चाचा तपशील हा स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडेच सादर केला जात आहे. संबंधित उमेदवारांना आपला दैनंदिन खर्च हा त्या संस्थेच्या लिपिकाकडेच सादर केला जात असे. उमेदवारही किरकोळ खर्च दाखवून या कटकटीतून मुक्त होत असे. उमेदवारांचा खर्च फारसा गांभीर्याने घेतला जात नसल्याने उमेदवारही काळ्या पैशांचा सर्रास वापर करून निवडणुका जिंकत असत. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांचा खर्चच थेट प्राप्तिकर विभागाच्या टप्प्यात आणला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये प्रथमच असा प्रयोग करण्यात आला असून, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर प्राप्तिकरचे अधिकारी वॉच ठेवणार आहेत. यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे.

उमेदवारांना आपला दैनंदिन खर्चाचा अहवाल या अधिकाऱ्यांसमोर सादर करावा लागणार आहे. उमेदवारांना महापालिका निवडणुकीत चार लाखांचा खर्च करण्याची मर्यादा असून, हे चार लाख कुठून आलेत याचाही हिशेब बँक खात्यामार्फत द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे हा हिशेब पालिकेच्या नव्हे, तर प्राप्तिकर अधिकाऱ्यांसमोर द्यावा लागणार असल्याने उत्पन्नाचेही स्रोत उघड करावे लागणार आहेत, तसेच निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांना दिले जाणारे प्रलोभन, पैशांचे वाटप, सार्वजनिक जेवणावळी, दारूचा महापूर यावरही प्राप्तिकरचे अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे इच्छुकांना ही निवडणूक चांगलीच महागात पडणार आहे.

काळ्या पैशांवर नजर

नोटबंदीच्या निर्णयानंतर काळे पैसेवाल्यांवर प्राप्तिकरची विशेष नजर आहे. विशेष म्हणजे निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे निवडणुकीतील खर्च हा प्रथमच प्राप्तिकरच्या टप्प्यात आणला आहे. निवडणुकीवर थेट प्राप्तिकरची नजर राहणार असल्याने उधळपट्टी करणाऱ्यांची चांगलीच गोची होणार आहे. इच्छुकांच्या खर्चाचा अंदाज घेऊन त्यांना थेट चौकशीलाही बोलवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळ्या पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकणे अवघड बनले आहे.

या प्राप्तिकर अधिकाऱ्यांची नियुक्ती

बी. एस झाला (धुळे), संजयकुमार सिंग (मालेगाव), अनिमेस नासकर (औरंगाबाद), एस. एच मेंढे (जळगाव), मनीषकुमार सोनी (औरंगाबाद)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​बंडोबा ठरणार मनसेची ताकद?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राजकारणात शत्रूचा शत्रू हा मित्र मानला जातो. त्यामुळे एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढणारे परत गळ्यात गळे घालू लागले तर मतदारांना नवल वाटायला नको. कारण राजकीय पक्षांना अन् नेत्यांना विचारधारा नाही, तर तिकीट महत्त्वाचे असते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. ही बंडखोरी सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संजीवनी देणार काय याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण पाहून या पक्षांत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे या पक्षांची ताकद वाढणार असली तरी बंडखोरीचा धोका देखील दोन्ही पक्षांसमोर निर्माण झाला आहे. प्रभाग एक ते सहामध्ये शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत तर याच ठिकाणी भाजपाला उमेदवारी निश्च‌ित करताना नाकीनऊ येत आहे. अशीच काही परिस्थिती सिडकोमध्ये पाहण्यास मिळत आहे.

पाच वर्षापूर्वी मनसेचा गड म्हणून समोर आलेल्या सिडकोमध्ये मनसेला नवीन अथवा बंडखोर उमेदवारांवरच भरोसा ठेवावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी मनसेला काहीतरी चमत्कार होण्याची अपेक्षा आहे. मागील दोन दिवसात १२२ जागांसाठी तब्बल ४०० उमेदवारांना अर्ज सादर केले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येते आहे. इतर पक्षांच्या बंडखोरीनंतर यात वाढ होऊ शकते. अशावेळी स्थानिक पातळीवर उपद्रव देणारा उमेदवार मनसेच्या पारड्यात पडला तर पक्षासाठी ते महत्त्वाचे ठरू शकते. दुसऱ्या पक्षांमध्ये होणाऱ्या बंडखोरीवर मनसेचे नजर असून, २५ जानेवारीपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'या बकाल नाट्यगृहात प्रयोग कसा करायचा'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिक महापालिकेसारखं काम राज्यात कोणत्याही महापालिकेनं केल्याचं दाखवा? असं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांना नाशिक महापालिकेचं काम पुराव्यासह दाखवलं आहे. महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या नाशिकमधील कालिदास कलामंदिर या नाट्यगृहाच्या बकाल अवस्थेचे फोटोच दामले यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. इतकंच नव्हे तर, 'अशा नाट्यगृहात कसे करणार प्रयोग? अन् कसे येणार प्रेक्षक? असा उद्विग्न सवालही त्यांनी केला आहे.

महाकवी कालिदास नाट्यगृहातील असुविधांमुळं व्यथित झालेल्या प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहाच्या शौचालयाचे आणि पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणांचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. हे आहे या नाट्यगृहाचं भीषण वास्तव. कसे प्रयोग करणार? कसे येणार रसिक? कसं रंगणार नाटक? अशी प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. गेली अनेक वर्ष प्रयत्न करुनही हीच अवस्था... असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.




मनसेचा दामलेंना प्रतिसवाल

दामले यांच्या फेसबुक पोस्टमुळं गोची झालेल्या मनसेनं त्यांना प्रतिसवाल केला आहे. 'राज्यात इतरही अनेक नाट्यगृह आहेत. त्यांचीही दुरावस्था झाली आहे. मग आमच्यावरच टीका का केली जाते? असा प्रश्न मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दामले यांना केला आहे. त्यामुळं येत्या काळात दामले विरुद्ध मनसे असा वादाचा प्रयोग रंगणार अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीनशे हरकती ठरल्या रद्दबातल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ मिटवण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न केले असून आज, शनिवारी (२१ जानेवारी) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिकेल्या मिळालेल्या ६८४ हरकतींची तपासणी केली असून, यातील तीनशेच्या आसपास हरकती या मतदारांच्या अॅड्रेस बदलासंदर्भातील आहेत. या हरकतींचा निपटारा करणे शक्य नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला असून, या हरकती आता बेकार ठरल्या आहेत. तर मतदारांचे एकगठ्ठा प्रभाग बदलण्याच्या हरकतींमध्ये मात्र बदल केला जाणार आहे.

महापालिका निवडणुकांसाठी शनिवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करायची आहे. १२ जानेवारीला प्रभागनिहाय या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. १७ जानेवारीपर्यंत या यांद्यावर ६८४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. यात सर्वाधिक हरकती या मतदारांचे एकगठ्ठा प्रभाग बदलण्यासंदर्भातील होत्या. त्यामुळे प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून त्यावर काम केले आहे. जवळपास ६० हजार मतदारांच्या नावांचा गुंता असून, त्यांच्या नावांची अदलाबदल झाली आहे. महापालिकेने या सर्व हरकतींवर अहवाल मागवले असून, त्यात आता तीनशेच्या आसपास हरकती या मतदारांच्या अॅड्रेस बदलण्याच्या आहेत. मतदारांनी स्वतः दरवर्षी मतदार यादी प्रसिद्द होतांना बदललेल्या पत्त्यासाठी अर्ज करणे आवश्यक असते. परंतु, याद्या अंतिम जाहीर केल्यानंतर मतदारांचे अॅड्रेस बदलले जात नाही. तरीही या हरकती करण्यात आल्या आहेत. मात्र कायद्यानुसार आता त्यांचे पत्ते बदलणे शक्य नाही. त्यामुळे या तीनशे हरकती आता बेकार ठरल्या आहेत. उर्वरित हरकतींवर काम सुरू आहे. एकगठ्ठा मतदारांचा प्रभाग बदलण्याच्या हरकतींची दखल घेतली जाणार आहे. त्यानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत या याद्या प्रभागनिहाय प्रसिध्द केल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपरा-स्थानिक वादाने मुलाखती गाजल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने येवला तालुक्यातील गट-गणांमधील इच्छुकांच्या गुरुवारी मुलाखती घेतल्या. मात्र, या मुलाखतीदरम्यान पाटोदा गटातील इच्छुकांनी तालुक्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, त्यांचे पुत्र संजय बनकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करत थेट पक्षनिरीक्षकांसमोरच गोंधळ घातला. ‘आम्हाला गटातील स्थानिक उमेदवारच हवा, बाहेरचा नको’ असा आवाज बुलंद करत इतर इच्छुकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे मुलाखतीदरम्यान वातावरण चांगलेच गरम झाले होते.

येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटांसह पंचायत समितीच्या १० गणांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दुपारी येवला शहरातील भुजबळ संपर्क कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आमदार जयंत जाधव व पक्षनिरीक्षक चेतन कासव यांनी या मुलाखती घेतल्या. पाटोदा गटातील अपवाद वगळता इतर सर्व गट आणि गणातील मुलाखतींचे सोपस्कार सुरळीत पार पडले. मात्र, पाटोदा गट मुलखतीदरम्यान वाद निर्माण झाला. पाटोदा गटातील मुलाखतींना सुरुवात होताना या गटातून राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब पिंपरकर यांच्यासह एकूण १२ जणांनी मुलाखती दिल्या. पक्षाचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांचे पुत्र तथा बाजार समितीचे विद्यमान संचालक संजय बनकर यांनी पाटोदा गटातून इच्छुक म्हणून मुलाखत देताच इतर इच्छुकांच्या विरोधाचा मोठा भडका उडाला. इतर सर्वच इच्छुकांनी बनकर यांच्या उमेदवारीला विरोध करताना ‘आम्हाला बाहेरचा उमेदवार चालणार नाही, उमेदवारी स्थानिकालाच द्या’ असा जोरदार आवाज चढविल्याने गोंधळ उडाला. ‘उमेदवारी बाहेरच्या व्यक्तीला दिल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल’ असा इशारा काही इच्छुकांनी दिला. यामुळे चेतन कासव व जयंत जाधव यांनी आपले मत पक्षश्रेष्ठींना अहवालाद्वारे कळवू असे सांगत वेळ मारून नेली.

संजय बनकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचे नाव तालुक्यातील मुखेड गटातून चर्चिले जात होते. मात्र, स्वतः संजय बनकर यांनी पाटोदा गटातून उमेदवारी मागितली. पाटोदा गटातील मुलखाती दरम्यान उडालेला मोठा गोंधळ लक्षात घेता आता राष्ट्रवादी नेमकी कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

९६ इच्छुकांनी दिल्या मुलाखती
पाटोदा गटाचा अपवाद वगळता तालुक्यातील इतर गट व गणांच्या गुरुवारच्या मुलाखती मात्र शांततेत पार पडल्या. गट व गणांसाठी एकूण ९६ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. जयंत जाधव यांनी इच्छुकांचे कार्य, पक्षासाठी योगदान, जनसेवा कशी करणार आदी प्रश्न विचारून मनोगत जाणून घेतले. पाटोदा गटातून संजय बनकर, अण्णा दौंडे, बाळासाहेब पिंपरकर, निवृत्ती महाले, अशोक मेंगाणे, संपत बोरनारे, मोहन शेलार, ज्ञानेश्वर शेवाळे,

साहेबराव आहेर, नवनाथ घणघाव, नगरसूल गटातून जयश्री पैठणकर, उज्वला पैठणकर, तेजस्विनी शिंदे, राजापूर गटातून शकुंतला सोनावणे, कल्पना कुऱ्हे, अंजना दराडे, सुनीता खैरनार, अंदरसूल गटातून मकरंद सोनवणे, महेंद्र काले, हरिभाऊ जगताप, शिवाजी बेंडके यांनी, मुखेड गटातून कुसुम गुंड, शिवांगी पवार, सुवर्णा बनकर, संगीता मढवई यांनी मुलाखती दिल्या.


माणिकरावांचा काढता पाय..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा पक्षाचे येवला तालुक्यातील ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्यासह दिलीप खैरे, ‘मविप्र’ संचालक अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, पंचायत समितीचे सभापती प्रकाश वाघ व भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांची मुलाखती दरम्यान भुजबळ संपर्क कार्यालयात उपस्थिती होती. मात्र, मुलाखती सुरू होताच काही मिनिटातच माणिकराव शिंदे हे भुजबळ कार्यालयातून निघून गेले. त्यांनी काढता पाय का घेतला? यावरून नंतर चांगलीच चर्चा रंगली आहे. उपस्थित असलेले इच्छुक उमेदवार यावेळी अवाक् झाले. यावेळी अंदरसूल जिल्हा पर‌िषद गटात राष्ट्रवादीकडे गुरुवारी चौघांनी मुलाखती दिल्या. मात्र, ज्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जाते ते माणिकराव शिंदे यांचे पुत्र शाहूराजे शिंदे यांनी मात्र गुरुवारीदेखील मुलाखत न दिल्याने त्यांची देखील चर्चा आता सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images