Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्वबळाचे सोंग

$
0
0

आघाडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना-भाजपचे युतीबाबत तळ्यात मळ्यात असताना राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची शक्यताही धूसर होऊ लागली आहे. स्‍थानिक पदाधिकाऱ्यांमधील अबोला संपत नसून, आघाडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात टोलवत ताकद नसताना स्वबळाचे सोंग घेतले जात आहे. यामुळे आघाडीचा निर्णय आता मुंबईत होणार असल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीतील दुरावा अद्याप कायम आहे. आघाडीबाबत ठोस चर्चा न करता दोन्ही पक्षांनी स्वतंत्र मुलाखती घेऊन निवडणुकीची तयारी केली आहे. काँग्रेसने उमेदवारांची यादी अंतिम करण्यावर भर दिला असून, गुरुवारी ती प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केली जाणार आहे. राष्ट्रवादीही काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे सेना-भाजपकडे पलायन सुरू होताच, तीन महिन्यांपूर्वी घाईघाईत आघाडीची घोषणा करण्यात आली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते या बैठकीस उपस्थित होते. मात्र या बैठकीनंतरच काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे सुरू झाले होते. राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास काँग्रेसमधील काही निष्ठावंतांचा तीव्र विरोध होता. नाशिकचे प्रभारी आमदार भाई जगताप यांनी आघाडी करण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये आघाडी होईल असे चित्र होते.

दोन्ही पक्षांनी सर्व ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी मुलाखती घेतल्या आहेत. दोघांनाही आघाडीविना पर्याय नसताना व सक्षम उमेदवारांची वानवा असतानाही आघाडीबाबत ताणले जात आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत. कार्यकर्ते आघाडीबाबत इच्छुक असले तरी, काही पदाधिकारी अडचणी वाढवित आहेत. काँग्रेसमधील काही पदाधिकारी अजूनही स्वतंत्र चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आघाडीचे घोडे अडले आहे. राष्ट्रवादी आघाडीबाबत सकारात्मक असतानाही काँग्रेसमधील निवडक लोकांमुळे आघाडीत बिघाडी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आता प्रदेशाध्यक्षांकडे चेंडू टोलवला आहे.

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसोबत अद्याप चर्चा झालेली नाही. सर्व १२२ जागांसाठी काँग्रेसने मुलाखती घेतल्या असून, इच्छुकांची यादी गुरुवारी प्रदेशाकडे सुपूर्द केली जाईल. आघाडीचा निर्णय हा प्रदेश पातळीवरील पदाधिकारीच घेणार आहेत.

- शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात आमचे एक पाऊल पुढे होते. परंतु, आम्हाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे १२२ जागांसाठी मुलाखती घेऊन प्रदेशाध्यक्षांकडे यादी पाठवली जाईल. आघाडीचा निर्णय आता प्रदेशाध्यक्षच घेतील.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेजवळ हत्येप्रकरणी तिघे जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना कार्यकर्ता सुरेंद्र सिध्दार्थ शेजवळ उर्फ घाऱ्या याच्या हत्येप्रकरणी शहर पोलिसांनी तिघा संशयितांना शिर्डी येथून अटक केली. शेजवळकडून सतत होणाऱ्या अत्याचारामुळेच त्याची हत्या केल्याचा कबुलीजबाब संशयित आरोपींनी दिला आहे.

अनिल उर्फ बाळा सखाराम डिग्रसकर (२५, संजय गंधीनगर, जेलरोड), रामभाऊ किसन चव्हाण (४७, बी ३, संकल्प सोसायटी, पंचकृष्णा लॉन्सशेजारी, कोणार्कनगर) आणि राहुल देवराम गोतरणे (२४, गुरूनमन रो हाऊस, राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ, जेलरोड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी एक संशयित फरार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिली. संशयितांनी २० जानेवारी रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास सुरेंद्र शेजवळची भररस्त्यात हत्या केली होती. घटनेनंतर सर्व संशयित परांगदा झाले होते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी तपासाला लागले. सदर गुन्ह्याचा तपास क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, नाशिकरोड पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील प्रकाश आरोटे यांना संशयितांबाबत टीप मिळाली. त्यानुसार, मंगळवारी पहाटेच्या सुमारास संशयितांना शिर्डी येथून अटक करण्यात आली. गुन्ह्यावेळी वापरण्यात आलेली मरून कलरची एस्टिम कारसुध्दा पोलिसांनी जप्त केली.


वर्चस्ववादाचा जुना वाद

एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभावे असा वर्चस्ववादाचा प्रकार संशयित आरोपी आणि मयत शेजवळ यांच्यात सुरू होता. २००६ मध्ये नाशिकरोड परिसरातील श्रम‌िकनगर येथे या प्रकारास सुरुवात झाली. यावेळी श्रम‌िकनगर झोपडपट्टीत संशयित आरोपी रामभाऊ किसन चव्हाण याची चलती होती. मात्र, शेजवळने चव्हाण कुटुंबावर हल्ला चढवून महिलेसह एकास जखमी केले. चव्हाणला श्रम‌िकनगर सोडण्यास भाग पाडले. यानंतर २००८ मध्ये संशयित आरोपी अनिल डिग्रसकर याच्या पिंटू नावाच्या भावाची हत्या झाली. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपी होते. त्यात, शेजवळ मुख्य आरोपी होता. वयाने लहान असलेल्या अनिलची मयत शेजवळ नेहमीच हेटाळणी करायचा. सततचा अपमान त्याच्या मनात घर करून होता. त्यातच पिंटू डिग्रसकरच्या हत्या प्रकरणात शेजवळसह इतर आरोपी २०१४ मध्ये निर्दोष सुटले. सतत मानहाणीकारक वागणूक देणारा शेजवळ निवडणुकीची तयारी करीत असल्याची माहिती संशयित आरोपींना होती. राजकीय पक्षांकडून शेजवळला ताकद मिळाली तर तो जगणे मुश्किल करेल, या भितीतून तिघांनी मिळून शेजवळची हत्या केली.

रात्र आनंदात जागून काढली

संशयित आरोपींच्या मनामध्ये मयत शेजवळबाबत प्रचंड इर्षा भरलेली होती. शेजवळला काहीही करून संपवायचे अशी त्यांनी खूणगाठ बांधली होती. अनेक दिवसांपासून याबाबतचे त्यांनी प्लॅन‌िंग केले. मात्र, शेजवळ त्यांना एकटा सापडत नव्हता. २० जानेवारी रोजी दिवसभर संशयितांनी रेकी केली. सव्वानऊ वाजेच्या सुमारास घराकडे परतत असताना तो एकटा सापडला. हत्येच्या घटनेनंतर संशयित फरार झाले. मात्र, त्या रात्री त्यांना झोप आली नाही. अनेक वर्षांपासून मनावर असलेले दडपण दूर झाल्याने ती रात्र आनंदात जागून काढल्याचे संशयितांनी सांगितले.


ठाणे येथील महिलेची चौकशी

मरून रंगाची कार आणि वाहनाचा अर्धवट क्रमांक एवढीच माहिती पोलिसांकडे होती. त्यानुसार, पोलिसांनी ठाणे, शिर्डी, औरंगाबाद, अहमदनगर, श्रीरामपूर इत्यादी ठिकाणाच्या पोलिसांना माहिती दिली. संशयितांनी एमएच १५, एफ ४५५९ या क्रमांकाची कार वापरली होती. मात्र, ठाणे येथे मरून कलरची अशाच क्रमाकांशी साधर्म असलेली कार पोलिसांनी शोधून काढली. त्या महिलेकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.


अतिशय संवेदनशील प्रकरण अखेर उजेडात आले. दोन्ही गटात पूर्ववैमनस्य होते. संशयितांनी शेजवळच्या हत्येचा प्लॅन आखला होता. डिटेक्शन ब्रँचसह पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली नाही, याचा खेद वाटतो. आम्ही यात निश्चितच सुधारणा करू. शेजवळ हत्या प्रकरणात अद्याप राजकीय घटक समोर आलेले नाहीत.

- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदारसंघासाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, मतदारसंघातील मतदार कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा अनुज्ञेय नैमित्तिक रजेव्यतिरिक्त राहणार आहे.

निवडणुकीसाठी ज्या पाच महसुली विभागांतील २९ जिल्हे अंतर्भूत आहेत, त्या जिल्ह्यांतील पदवीधर व शिक्षक म्हणून नावनोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही रजा मिळणार आहे. या निवडणुकीसाठी नागपूर, औरंगाबाद, कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत, तसेच नाशिक, अमरावती, विभागातील पदवीधर, मतदारसंघातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांत निवडणूक होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ च्या शासन निर्णयान्वये या रजेची तरतूद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

याद्यांचा घोळ अखेर मिटला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाच्या धावपळीला यश आले असून, मतदारयाद्यांचा घोळ कमी करण्यात प्रशासनाला अखेर यश आले आहे. बारा हजार नावांमधील गोंधळही दुरुस्त झाला असून, दुरुस्तीसह मतदारयादी अखेर झळकली आहे. दोन प्रभागांतील एक हजार नावांमध्ये तांत्रिक दोष असल्याने रात्री उशिरापर्यंत तो दूर करण्यात आला आहे, तर फोटोंचा गोंधळही काही प्रमाणात मिटला आहे. त्यामुळे प्रशासनाने अखेर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मतदारयादी प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी असतानाही मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ होता. अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर १२ ते १७ जानेवारीदरम्यान प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मतदारांनी १७ जानेवारीपर्यंत मतदारयादीवर ६८४ हरकती दाखल केल्या होत्या. अंतिम यादी ही २१ जानेवारीला प्रसिद्ध करायची असल्याने घाईगडबडीत प्रशासनाने या हरकतींचा निपटारा करीत यादी प्रसिद्ध करून घेतली. मात्र, प्रसिद्ध केलेल्या यादीतही महागोंधळ असल्याचे उघड झाले होते. मतदारयादीतल्या मतदारांच्या नावासमोर त्यांचे फोटो नसल्याचे उघड झाले आहे, तर तर ५२ हजार नावांपैकी ११ हजार ९०७ आडनावांचाच उल्लेख आहे. यात मतदारांची पूर्ण नावे नसल्याने गोंधळ कायम होते. त्यामुळे प्रशासनाने आडनावांच्या गोंधळाची यादी शोधून काढत त्यातील दुरुस्तीसाठी पुन्हा आयोगाकडे धाव घेतली आहे. उपायुक्त विजय पगार यांच्यासह पालिकेचे कर्मचारी आयोगाच्या कार्यालयातच तळ ठोकला होता.

मंगळवारी ११ हजार ९०७ आडनावांतील गोंधळ मिटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. केवळ प्रभाग क्र. १७ आणि २४ या दोन प्रभागांतील जवळपास एक हजार नावांमध्ये तांत्रिक दोष होते. रात्री उशिरापर्यंत हे दोष दुरुस्त करण्यात आले, तर मतदारयाद्यांमधील नावांपुढे असलेल्या फोटोंचाही गोंधळ दूर झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. इच्छुकांना व मतदारांसाठी आता याद्या उपलब्ध झाल्या असून, त्या वेबसाइटवरही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आपली नावे आता वेबसाइटवरही पाहता येणार आहेत.

वासंती माळींकडे प्रभार

महापालिका निवडणुकांसाठी पालिकेत स्वतंत्र आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाची जबाबदारी पुरवठा अधिकारी सरिता नरके यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, नरके कौटुंबिक कारणास्तव रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता कक्षाचा पदभार येवल्याच्या प्रांताधिकारी वासंती माळी यांच्याकडे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये भाजपाची सेनाविरोधी आघाडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईत शिवसेनेसोबतची युती फिस्कटण्याची चिन्हे असतानाच, नाशिकमध्येही भाजपने शिवसेना वगळता महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेऊन नाशिकबाबत नव्याने रणनीती ठरवली. शिवसेनासोडून उर्वरीत रिपाइं, रासप व स्वाभिमानी पक्षासोबत चर्चा करून त्यांच्यासोबत युतीचा नवीन फार्म्युला ठरविण्यात आला आहे. एकीकडे घटक पक्षांशी चर्चा अन् दुसरीकडे सेनेला एकटे पाडण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यामुळे ता नाशिकमध्ये शिवसेना व भाजप आमनेसामनेच राहणार हे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेत युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू असली तरी नाशिकमध्ये दोन्ही पक्षांमध्ये दुरावा कायम आहे. भाजपने शंभर प्लसचे मिशन आखत स्वबळाचा नारा दिला आहे.

शिवेसनाही स्वबळासाठी सज्ज झाली आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र वरिष्ठ पातळीवर युतीसंदर्भात अंतिम निर्णयाचा पर्याय शिल्लक ठेवला होता. आता हा पर्यायही जवळपास बंद झाला आहे. सोमवारी भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्यासह आमदार व पदाधिकारी मुंबईत मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी गेले होते. मुख्यमंत्र्याची भेट झाली नसली तरी या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे व पालकमंत्री महाजन यांच्यासोबत चर्चा केली. भाजपने घेतलेल्या मुलाखतींचा व सक्षम उमेदवारांचा लेखाजोखा या वेळी सादर करण्यात आला. सेनेसोबत युती न करण्याची भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आग्रहाने मांडली. प्रदेशाध्यक्षांनीही पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना वगळता अन्य घटक पक्षांना सोबत घेण्याचा सल्ला दिला. शिवसेनेचीही स्वबळाची तयारी आहे. सेनेकडे सर्वाधिक इच्छुकांची संख्या असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत. मात्र, भाजपसोबत युती करण्याचा सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरेच घेणार आहेत, असे शिवसेना संपर्क प्रमुख अजय चौधरी म्हणाले.

शिवसेनेसोबत नाशिकमध्ये चर्चा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. शिवसेनेने प्रथमपासूनच युती संदर्भात गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे आम्ही महायुतीतील इतर आघाडी पक्षांसोबत चर्चा करणार आहोत. घटक पक्षांनी दिलेल्या प्रस्तावांचा आम्ही आदर करणार आहोत, असे भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाची दादागिरी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने नाशिकजवळच्या घोटी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यात, केबिनची काच नाकावर लागल्यानं संदीप घोंगडे हा कर्मचारी जखमी झाला आहे.

एका लग्नसोहळ्यासाठी नाशिकला गेलेले एकनाथ शिंदे रात्री उशिरा ठाण्याकडे परतत होते. मध्यरात्री तीनच्या सुमारास त्यांची कार घोटी टोलनाक्यावर पोहोचली. परंतु, तिथे त्यांना व्हीआयपी एन्ट्री देण्यात आली नाही. या प्रकाराने त्यांचा सुरक्षारक्षक खवळला आणि थेट टोल कर्मचाऱ्याच्या केबिनमध्ये शिरला. त्यावेळी त्याच्या हाताने एक काच फुटली आणि ती संदीप घोंगडेच्या नाकावर आदळल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतंय. ही काच सुरक्षारक्षकाने मुद्दाम फोडली आणि संदीप घोंगडेला जखमी केल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकाराबद्दल, शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाच्या मुजोरीबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय.

काचेचा जोरदार फटका बसल्यानं संदीप यांच्या नाकातून रक्त वाहू लागलं. त्यामुळे सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मारहाण झालीच नाही!- शिंदे

दरम्यान, घोटी टोलनाक्यावरील कर्मचारी काच फुटल्यामुळे जखमी झाला, माझ्या सुरक्षारक्षकाने त्याला मारहाण केलेली नाही, अशी सारवासारव एकनाथ शिंदेंनी केली आहे. परंतु, काच फुटली की फोडली, याबाबत त्यांनी मौन बाळगलं. सीसीटीव्ही फुटेज तपासून सुरक्षारक्षक दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्तला मिळावी आचारसंहितेतून सूट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जलयुक्तच्या निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश देणे यासह अन्य कामे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये जलयुक्तच्या कामांना आचारसंहितेतून सूट मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, सिमेंट नाला बांधणे आदी कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये १२९ गावे तर दुसऱ्या टप्प्यात १२३ गावांची निवड करून हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी विविध योजनेंतर्गत उपलब्ध करू देण्यात आलेला निधी दि. ३१ मार्च २०१७ अखेर खर्च करून कामे मुदतीत पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दि. ५ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रस्तावित कामांची प्रशासकीय मान्यता, कामांची ई-निविदा प्रक्रिया व ई-निविदा पूर्ण झालेल्या कामांना कार्यारंभ आदेश देणे इत्यादी कामे थांबविण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहो, शौचालयाचा दाखला हवाय!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष उमेदवार निश्चितीसाठी कंबर कसून कामाला लागल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येत आहे. याशिवाय इच्छुक मातब्बर उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी आवश्यक ते दाखले काढण्यासाठी घाईगर्दी सुरू आहे. यासाठी शौचालय असल्याबाबतचा दाखलाही आवश्यक असतो. म्हणूनच पालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांत सुमारे १५०० इच्छुक उमेदवारांनी शौचालय दाखल्यांसाठी अर्ज केले आहेत.
पालिकेचा रणसंग्राम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये गजबजली आहेत. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर करावे लागणारे विविध दाखले काढण्यासाठी पालिकेच्या विभागीय कार्यालयांत इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी दिवसभर गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेची सर्व सहाही विभागीय कार्यालये इच्छुक उमेदवारांच्या भाऊगर्दीने गजबजून गेली होती.
शौचालय असल्याचा दाखला मिळविण्यासाठी पालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात ९० इच्छुक उमेदवारांनी, पंचवटीत १५० तर उर्वरीत सातपूर, पश्चिम व पूर्व विभागीय कार्यालयांत प्रत्येकी सुमारे ३०० असे सुमारे १५०० अर्ज मंगळवारी सायंकाळपर्यंत दाखल झालेले होते. ही संख्या अजून वाढणार आहे.

अधिकाऱ्यांकडून खातरजमा
ज्या इच्छुक उमेदवारांनी शौचालय असल्याबाबतचा दाखला मिळण्यासाठी पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडे अर्ज केला आहे, त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याकडे शौचालय असल्याबाबतची खातरजमा पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडून केली जात आहे.

अर्धांगिन‌ीसाठी पतीमहाशयांची धावाधाव
महिला राखीव जागांसाठी उमेदवारी करणाऱ्या महिलांचे अर्ज त्यांचे पतीराजच पालिका कार्यालयांत घेऊन धावपळ करताना दिसून येत आहेत. प्रत्येक प्रभागात किमान २ जागा महिलांसाठी राखीव असल्याने इच्छुक महिला उमेदवारांची संख्या दररोज वाढत आहे. त्यांना हवे असलेले विविध दाखले मिळविण्यासाठी त्यांच्या पतीराजांवरच घामाघूम होण्याची वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदगाव बैठकीत मनसेकडून चाचपणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राजकीय पक्षांना सत्ता संपादनाचे वेध लागले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला आहे. स्वबळावर निवडणुका लढविणार तसेच सर्व जागांवर उमेदवार उभा करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.

मनसेचे जिल्हा संघटक योगेश सोनार यांनी याबाबत माहिती दिली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम यांच्या उपस्थितीत नांदगाव येथे नुकतीच बैठक झाली. यावेळी नांदगाव तालुक्यातील गणासाठीच्या आठ व जिल्हा परिषदेच्या गटातील चार जागांवर उमेदवार उभे करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तालुकाध्यक्ष शिवाजी आहेर, अशोक राजपूत, राजू तरंगे, रवींद्र सोनवणे, शहराध्यक्ष रितेश बूब, जमील पठाण, जळगाव खुर्दचे अंबादास सरोदे, कोंढारचे रावसाहेब गोटे, बापू मोरे, चिंचविहीरचे रामेश्वर तुरकणे, हिसव्हाळचे किरण चव्हाणके, निंबायतीचे निखिल पारख आदी कार्यकर्त्यांनी बैठकीत मते मांडली. तालुका कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून रोशन पांडे, सतीश हिरे, सरचिटणीस म्हणून संतोष आहेर, संघटक म्हणून पद्माकर महानुभाव, तसेच मनमाड शहराध्यक्षपदी नानासाहेब आहेर, नांदगाव शहर उपाध्यक्ष म्हणून बळवंत चौधरी, नीरज टाळणे, कैलास सोनावणे यांना इचम यांनी नियुक्तीपत्र दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरपीआय’ भाजपच्या पाठिशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पदवीधर मतदारसंघासह राज्यातील पाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘आरपीआय’ने (आठवले गट) भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.

रिपाइं नेते सुरेश बारशिंग यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नाशिक पदवीधरमधील भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांना आरपीआयसह रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा पाठिंबा जाहीर केला आहे. दलित समाजात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. भाजप दलित तरुणांना न्याय देईल. त्यामुळे भाजपला पाठिंबा जाहीर केल्याचा दावा बारशिंग यांनी केला आहे.

भाजपच्या वसंतस्मृती शहर कार्यालयात आरपीआयचे राज्य नेते सुरेश बारशिंग, रिपाइं पदवीधरचे प्रमुख घनश्याम चिरणकर, प्रा. जगन्नाथ बावा, प्रा. सुशील महाडिक, अॅड. संदीप केदारे, रो‌हित जगताप यांच्या उपस्थितीत भाजप प्रवक्ते माधव भंडारी, शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, चिटणीस लक्ष्मण सावजी यांची बैठक झाली. या बैठकीत पाठिंब्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याबाबत घोषणा करण्यात आली. देशात व राज्यातील भाजपचे सरकार दलितांचे प्रश्न सोडवणार आहे. त्यामुळे दलित समाजातील तरुणांच्या आशा उंचावल्या असून सुशिक्षितांचे प्रश्न सुटणार आहेत. ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने हा पाठिंबा जाहीर केल्याचे बारशिंग यांनी सांगितले. पदवीधर मतदारसंघातून भाजपचे डॉ. प्रशांत पाटील हे विजयी होतील, असा दावा त्यांनी केला आहे. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनीही डॉ. पाटील यांना पा‌ठिंबा जाहीर केला आहे.

पाचही जागा जिंकू
नाशिकसह राज्यभरातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पाचही जागा आम्ही जिंकू, असा दावा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यानी केला.

‘भाजप सोडविणार बेरोजगारीचा प्रश्न’
नाशिक पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनी बुधवारी जिल्ह्यातील महाविद्यालयांना भेटी देऊन तरुणांशी चर्चा केली. आपण आमदार म्हणून निवडून आल्यास पदवीधर तसेच बेरोजगारांचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. बेरोजगारीचा प्रश्न भाजपचे सरकारच सोडवेल, असा दावा त्यांनी यावेळी केली.

पदवीधर मतदार संघाच्या मतदानाला आता आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे व भाजपचे डॉ. प्रशांत पाटील यांनी थेट मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. भाजपचे डॉ. पाटील यांनी बुधवारी येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड तालुक्यांमधील कॉलेजेसला भेटी देत प्राध्यापक तसेच तरुणांशी चर्चा केली. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भाजपने देशातील बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मेक इन महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू झाला असून तरुणांना बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तरुणांनीही भाजपला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌शकात युती की स्वबळ?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणूक भाजप समवेत लढायची की स्वबळावर याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी (दि. २६) करणार आहेत. गोरेगाव (मुंबई) येथे सायंकाळी चार वाजता होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन सुमारे १५ दिवस उलटले आहेत. त्यातच उमेदवारी अर्ज देण्याची तसेच स्वीकारण्याचा कार्यक्रम शुक्रवारपासून सुरू होत आहे. मात्र, अद्यापही शिवसेना आणि भाजप यांचा निवडणुकीसाठी युती करण्याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी, दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी तसेच इच्छुकांमध्ये मोठी घालमेल सुरू आहे. दोन्ही पक्षांनी त्यांच्या इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेच्या ८१० इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. तर, भाजपनेही ६८४ इच्छुकांच्या मुलाखतींचा अहवाल प्रदेश पातळीवर सादर केला आहे. बुधवारी दुपार‌ी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, मंत्री, खासदार तसेच आमदार यांची बैठक घेतली. त्यांची मते जाणून घेतानाच युतीचा निर्णय काय असावा, याबाबत त्यांनी माहिती घेतली. शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यावेळी स्वतंत्र लढण्याची गळ घातली. या सर्वांनीच मुंबईवगळता पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि नाशिक या महापालिकांच्या निवडणुकीत स्वबळाचा सूर आळवला आहे.

पक्षप्रमुखांनी आमची मते जाणून घेतली आहेत. उद्या होणाऱ्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. युतीचा अंतिम फैसला तेच घेणार असून याबाबत ते मेळाव्यात बोलतील.
- हेमंत गोडसे, खासदार, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेचे कोकणी काँग्रेसमध्ये दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांसाठी एकीकडे मुलाखती सुरू असतांना, दुसरीकडे मनसेतून आऊटगोइंग सुरूच आहे. मनसे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सदस्य गुलजार कोकणी यांनी समर्थकांसह बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे हा सोहळा झाला. गुलजार यांनी मनसे सोडल्यानंतर आता मनसेच्या नगरसेवकांची संख्या आता १२ वर आली आहे.

महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतांना मनसेला धक्के बसणे सुरूच आहे. मनसेच्या नगरसेवकांनी आतापर्यंत शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करून लाटेवर स्वार होण्याचे प्रयत्न केले. परंतु, जुन्या नाशिकमधील मनसेचे नगरसेवक गुलजार कोकणी यांनी मनसेसह काँग्रेसला आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोकणी यांनी बुधवारी मुंबईत माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांची संख्या आता ४० वरून १२ वर आली आहे. चव्हाण यांनी गुलजार कोकणी आणि त्यांच्या समर्थकांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. कोकणी यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार आहे. काँग्रेसमध्ये त्यांचा योग्य सन्मान करण्यात येईल, चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समित्यांना कॅशलेसचे वावडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये झालेल्या शेतमालाच्या लिलावाचे पेमेंट शेतकऱ्यांना २४ तासांत अदा करण्याचे बंधन धाब्यावर बसवत व्यापारी नियमाची पायमल्ली करीत आहे. शेतमालाचे पेमेंट त्याच दिवशी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे बंधन सहकार विभागाने व्यापाऱ्यांना घालून द्यावे, अन्यथा जिल्हाभर रास्ता रोको, उपोषणे व घेराव यासारखी आंदोलने छेडण्यात येतील, असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांसह जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका निवेदनाद्वारे दिला आहे.

राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाच्या नियमाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये झालेल्या लिलावातील शेतमालाचे पेमेंट हे शेतकऱ्यांना २४ तासात अदा करण्याची जबाबदारी खरेदीदार किंवा व्यापारी वर्गाची असतानाही नोटाबंदीच्या निर्णयापासून हा नियम व्यापाऱ्यांकडून धाब्यावर बसविला जात असल्याच्या आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शासन दरबारी कॅशलेसचा मोठा बोलबाला असला तरी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाच्या लिलावानंतर ‘आरटीजीएस’ अथवा ‘पेटीयम’ यासारख्या मार्गाचा अवलंब व्यापारी वर्ग शेतकऱ्यांच्या बाबतीत करताना दिसत नाहीत. शेतमालाची विक्री झाल्यावर व्यापारीवर्ग शेतकऱ्यांना पुढच्या तारखेचे धनादेश देत आहेत. त्याच दिवसाचा धनादेश चेक वटण्यासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी जात असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतमजुरी, डिझेल तसेच खते, बि-बियाणे आदी मोठा खर्च शेतकऱ्याला अगोदरच रोखीने करावा लागत असतो. अशातच विकलेल्या शेतमालाचे पैसे वेळेवर हाती पडत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी ‘अर्थकोंडी’ झाली आहे. याकडे या निवेदनातून शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. बाजार समित्यामधील लिलावाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने आता वेळप्रसंगी शेतकऱ्यांना उधार उसनवार करतानाच सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेचा ‘नाशिक ब्रँडिंग’वर जोर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शालिनी ठाकरे यांच्या उपस्थित बुधवारी तब्बल २५०० महिलांनी नाशिकला भेट देत शहरात झालेल्या विकासकामांची माहिती घेतली. त्यामुळे हे ब्रँडिंग मुंबईसाठी की नाशिकसाठी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

नाशिकसह मुंबईच्या महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली असतांना नऊ दिवसांपूर्वीच मनसेने मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना घेऊन शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. तसेच विकासकामांची पाहणी केली होती. आता महिला आघाडीच्या पुढाकाराने मुंबईच्या महिला वर्गाने नाशिकला भेट दिली आहे. विशेष म्हणजे निवडणूक काळात सुरू झालेल्या या विकासकामाच्या ब्रॅडिंगचा खर्च निवडणूक खर्चात ग्राह्य धरला जाणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक भेटीत या महिलांनी सुरुवातील चिल्ड्रन पार्कची भेट घेतली. त्यानंतर शहरातील रस्ते व वाहतूक बेटही त्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालय, बोटॅनिकल गार्डन दाखवून या महिला पुन्हा मुंबईला रवाना झाल्या. सकाळी मुंबईहून निघालेल्या या महिलांना तब्बल ५० बसेसमधून आणण्यात आले होते. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या या बसमुळे अनेक ठिकाणी त्यांना जाता आले नाही. त्यामुळे शहरातील निम्माच विकास बघूनच ‘नवनिर्माणा’चे स्वप्न घेऊन या महिला परतल्या.

गड कसा राखणार?
नाशिकसह राज्यभर मनसेची अवस्था बिकट आहे. पक्षाकडे सांगण्यासाठी काही राहिलेले नाही. त्यामुळे नाशिकच्या विकासाचे ब्रँडिंग करून मुंबईत यश मिळवण्याचे मनसेचे मनसूबे आहे. मात्र, प्रत्यक्ष नाशिकमध्येही पक्षाला गड राखणे अवघड झाले आहे. जेथे विकास झाला तेथेच पक्षाचे ४० पैकी बहुतांश नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निघून गेले आहेत. त्यामुळे मनसेचा गड विकास कामावर जेथे रोखू शकत नाही तेथे नाशिकची कामे दाखवून काय साधणार? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींना साद घालण्यासाठी पदयात्रा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

एरवी दिंड्या, वारी अथवा या ना त्या कारणाने निघणाऱ्या पदयात्रांनी नेहमीच अनेकांचे राज्यमार्गाकडे लक्ष वेधले जाते. मात्र, बुधवारी येवल्यातून जाणाऱ्या नगर-मनमाड राज्य महामार्गाने अनेकांचे लक्ष वेधले ते या महामार्गावरून जाणाऱ्या युवक-युवतीच्या पदयात्रेने.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथून थेट दिल्लीकडे ही पदयात्रा निघाली आहे. महिलांवरील देशातील अत्याचाराच्या दुर्दैवी घटनांना पायबंद घालण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जावी, या मागणीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा निघाली आहे. या पदयात्रेत गोवर्धन जाधव, योगीता डाके यांचा समावेशे आहे.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांनी सध्या समाजमन ढवळुन निघाले आहे. देशभरामध्ये महिलांवर अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी ठिकठिकाणी आजवर कॅन्डल मोर्चे, निषेध मोर्चा निघाले. मात्र आजही महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये कुठलीही घट झाल्याचे दिसत नाही. याकडेच लक्ष वेधत शेवगावसारख्या ग्रामीण भागातील काही युवक-युवतींनी सध्या शेवगाव ते दिल्ली अशी पायी आगेकुच सुरू केली आहे.

१३७० किलोमीटरचा पायी प्रवास

‘शेवगाव ते दिल्ली’ असा तब्बल १३७० किलोमिटरचा पायी प्रवास करत हे युवक-युवती दिल्लीत पोहोचणार आहेत. ‘तिरंगा’ ध्वज हाती घेत निघालेली ही पदयात्रा सध्या मार्गावर सर्वांचेच लक्ष वेधत आहे. यात दोन युवती आणि दोन युवकांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यापासून रणधुमाळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या १२२ जागांसाठी शुक्रवार, २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल केले जाणार आहे. पहिल्याच दिवसाचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक जण इच्छुक असून ते राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाइटवर सकाळी ११ ते २ या वेळेत ऑनलाइन अर्ज भरू शकणार आहे. तसेच शहरात महापालिकेच्या १० ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात त्याच दिवशी अर्ज दाखल करू शकणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अधिसूचना जारी केली आहे. निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याची मुदत तीन फेब्रुवारीपर्यंत आहे. चार फेब्रुवारीला अर्जांची छाननी होऊन वैध उमेदवाराची यादी जाहीर केली जाणार आहे. सात फेब्रुवारी रोजी माघरीची मुदत तर आठ फेब्रुवारीला निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. याचवेळी मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीत रंगत वाढणार आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या याद्या शुक्रवारनंतर (दि. २७) प्रसिध्द होणार आहेत. मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

रविवारीही अर्ज स्वीकृती
निवडणुकीच्या कार्यक्रमात पूर्वी रविवारी २९ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नव्हते. पण आता त्यात बदल करून रविवारीसुध्दा अर्ज स्वीकारले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

$
0
0

विक्रेतेही संतापले; बंद पुकारून निषेध

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सिप्ला मे‌डिकल लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर व बिलांमध्ये अफरातफर केल्याप्रकरणी औषध प्रशासनाने आतापर्यंत सात घाऊक विक्रेत्यांचे परवाने रद्द केले असून, आणखी पाच जणांचेही चौकशीनंतर परवाने रद्द होण्याची दाट शक्यता आहे. या कारवाई विरोधात घाऊक विक्रेत्यांनी

बुधवारी बंद पुकारत औषध प्रशासन हेतूपुरस्सर ही कारवाई करीत असून, हे अन्यायकारक असल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. नाशिकच्या औषध प्रशासनाने बारा घाऊक विक्रेत्‍यांवर केलेली ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई आहे. औषध प्रशासनाच्या कारवाईविरोधात घाऊक विक्रेत्यांनी अनेक आरोप केले आहेत. यात प्रशासनाने औषध विक्रेत्यांची तपासणी केल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावून तत्काळ खरेदी, विक्री बंदचे आदेश दिले होते. कारणे दाखवा नोटीसनंतर उत्तर देण्यासाठी संबंधित घाऊक विक्रेत्याला वेळच दिला गेला नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. परवाने तडकाफडकी रद्द केल्याने घाऊक विक्रेत्यांनी बंदची हाक दिली असल्याचे म्हटले आहे. बुधवारी गोळे कॉलनीत घाऊक विक्रेत्यांनी बंद पुकारला होता.

बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन

औषध प्रशासनाने घाऊक विक्रेत्यांवर चौकशी करून कारवाई केलेली आहे. कोणावरही हेतूपुरस्सर कारवाई केलेली नाही. घाऊक विक्रेत्यांनी पुकारलेला बंद हा बेकायदेशीर असून, त्यामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त भूषण पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्याच्या अंगरक्षकाकडून टोलनाक्यावर तोडफोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

जनतेचे सेवक म्हणवणाऱ्या शिवसेना मंत्र्याच्या अंगरक्षकाने घोटी टोलनाक्यावर गाडी लवकर सोडली नाही म्हणून दादागिरी करीत टोलनाक्यावर तोडफोड केली. या अंगरक्षकाने कॅबिनच्या काचा फोडल्याने संदीप धोंगडे हा कर्मचारी जखमी झाला असून, या प्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एका लग्नानिमित्त नाशिकला आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला परतत असताना मंगळवारी रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. घोटी टोल नाक्यावर वाहन ताफ्यातील मंत्र्याच्या एका अंगरक्षकाने आमचे वाहन लवकर का सोडले नाही? म्हणून कुरापत काढली. टोल कलेक्टर संदीप धोंगडे याच्याशी हुज्जत घातली. तसेच, या अंगरक्षकाने जोरदार ठोसा मारत कॅबिनच्या काचा फोडल्या. या प्रकारात संदीप धोंगडे यांच्या डोळ्यात, मानेवर व डोक्यात काचा घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये ‌‌मंत्री शिंदे यांच्या अज्ञात अंगरक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मारहाण झालीच नाही

मुंबई : घोटी टोलनाक्यावरील कर्मचारी काच फुटल्यामुळे जखमी झाला. माझ्या सुरक्षारक्षकाने त्याला मारहाण केलेली नाही, अशी सारवासारव सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र काच फुटली की फोडली, याबाबत त्यांनी मौन बाळगलं. सीसीटीव्ही फुटेज तपासून सुरक्षारक्षक दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदूच्या वाटेकडे कुटुंबीयांच्या नजरा

$
0
0

भाऊ भूषणला खंत; कुटुंबाच्या नजरा लागल्या दिल्लीकडे

Prashant.desale@timesgroup.com

Tweet : @prashantdesaleMT

नाशिक : सीमेवरून नजरचुकीने पाकच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण सुखरूप भारतात आला असला तरी, तो कधी घरी परततो याकडे त्याचे कुटुंब तसेच गावा (बोरविहीर, ता. जि. धुळे) चे लक्ष लागले आहे. भारतीय सैन्याकडून सुरू असलेली चौकशी लवकर संपून चंदूने गावी यावे, अशी अपेक्षा त्याचे कुटुंबीय व्यक्त करीत आहेत. भारतीय लष्करावर आपला विश्वास असल्याचे चंदूचा भाऊ भूषणने ‘मटा’शी बोलताना सांगितले.

चंदू चव्हाण हा जवान पाकिस्तानच्या तावडीत जवळपास चार महिने होता. सुदैवाने गेल्या आठवड्यात चंदू भारतात परतला. आता तो सुखरूप असून, भारतीय सैन्य दलाच्या देखरेखीखाली आहे. आता कुटुंबीयांना त्याच्या भेटीची ओढ लागली आहे. चंदू कधी घरी येणार, त्याला भेटण्यासाठी काय प्रयत्न केले, त्याची अटक आणि सुटका या कालावधीत कुटुंबावर काय आघात झाले, याबद्दल भूषण कळकळीने बोलत होता.

भूषण आणि त्याचा परिवार चंदूला भेटण्यासाठी आतूर झाला आहे. गावातील त्याचे मित्रही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. ‘ज्या दिवशी त्याला टीव्हीवर पाकच्या सैन्याच्या गराड्यात पाहिलं तेव्हाच पळत सुटावं आणि त्याला हृदयाशी कवटळून घ्यावं असं वाटलं. सप्टेंबरच्या ‘त्या’ रात्री मला फोनवर ‘दादा, काळजी घे’ असं सांगून हरवलेला चंदू मला दिसताच मी खूप रडलो. बराच वेळ तर, शब्दही फुटला नाही’ असे सांगताना भूषणचा कंठ दाटून आला होता.

आर्मीवर विश्वास

चंदूची सुरू असलेली चौकशी आणि भविष्यात होणारे निर्णय यावर भूषण खूप मोकळेपणाने बोलला. तो म्हणाला, ‘आर्मीकडून अपेक्षा ठेवायला मी आणि चंदू खूप सामान्य आहोत. माझा भाऊ तिकडे का आणि कसा गेला हे त्यावेळची परिस्थिती आणि तेथे उपस्थित असलेले त्याचे सहकारी आणि अधिकाऱ्यांनाच माहीत. पण मला एक खात्री आहे. आपली आर्मी खूप सक्षम आणि संयमी आहे. आर्मी अधिकारी आणि आर्मीचे नियम हे सगळ्यांसाठी सारखे आहेत. चंदूने गेल्या चार महिन्यात जे भोगलं, ज्या यातना सहन केल्या असतील त्याचा आर्मी नक्क‌ी विचार करेन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुरंगी लढतीत अस्तित्वासाठी झुंज

$
0
0

दीपक महाजन, कळवण

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, माकप, पूर्णतः तयारीने उतरले आहेत. यंदाची निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची व पक्षांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीसाठी आठ गण आहेत.

खर्डेदिगर गटात राष्ट्रवादीकडून माजी ज‌ि. प. अध्यक्षा जयश्री पवार, भाजपकडून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी कलावती चव्हाण, जयमाला खांडवी, काँग्रेसकडून वंदना बहिरम, शिवसेनेकडून मीराबाई पवार प्रयत्नशील आहेत. मानूर गटातून राष्ट्रवादीकडून जयश्री पवार, जि. प. सदस्या डॉ. भारती पवार, काँग्रेसकडून रंजना पवार, भाजपकडून जिजाबाई पवार, सुरेखा जगताप तयारीत आहेत. कनाशी गटात राष्ट्रवादीकडून नितीन पवार, काँग्रेसकडून माजी सभापती काशिनाथ गायकवाड, भाजपकडून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे पुत्र समीर चव्हाण, अभोणा गटातून राष्ट्रवादीकडून जि. प. सदस्य नितीन पवार, डी. एम. गायकवाड, काँग्रेसकडून माजी सभापती यशवंत गवळी, भाजपकडून जितेंद्र ठाकरे, विशवनाथ थैल, शिवसेनेकडून मोहनराव गांगुर्डे इच्छुक आहेत.

मातब्बरांचा हिरमोड
कळवण तालुका आदिवासीबहुल असून, यावेळी चारही गट राखीव आहेत. त्यामुळे बिगर आदिवासी समाजाचा हिरमोड झाला आहे. गेली २० वर्षे जिल्हा परिषदेत वेगवेगळ्या गटातून निवडून आलेले रवींद्र देवरे, माजी सदस्य शैलेश पवार यांच्यासह मातब्बरांची यंदा अडचण झाली आहे. आतापर्यंतच्या स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार ए .टी. पवार हाच पक्ष असल्याने चार दशकांहूनही अधिक काळ तालुका त्यांच्या नेतृत्वाखाली होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत पवारांचा पराभव झाल्याने तसेच प्रकृती स्वास्थ्यामुळे तालुक्याचे नेतृत्व पुत्र नितीन पवार व जयश्री पवार यांच्याकडे गेले आहे.

चुरशीची लढत अटळ
कनाशी गटातून खासदार चव्हाण यांचे पुत्र समीर यांचा नितीन पवारांशी लढत होणार आहे. त्यामुळे खासदारांसाठी हा गट जिंकणे महत्त्वाचे आहे. माकप आमदार गावित हेदेखील भविष्याचा विचार करीत हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या गटात राष्ट्रवादीला कधी नव्हे असे आव्हान निर्माण झाल्याचे मानले जात आहे. नितीन पवार कनाशी गटात फाईट देतात की कनाशी गट सोडून अभोणा गटात उमेदवारी करतात हे येणारा काळच ठरवणार आहे. ए. टी. पवारांच्या दुसऱ्या स्नुषा तथा राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी कळवण तालुक्यात संपर्क वाढविल्याने त्यांची मानूर गटात उमेदवारी होऊ शकते. जयश्री पवार यांनी जनसंपर्कासह विकासकामांचा मुद्दा पुढे करीत संघटन मजबूत केले आहे. खर्डेदिगर व मानूर या दोन्ही गटातून त्यांची तयारी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच मोठी निवडणूक असल्याने आमदार जे. पी. गावित यांनीही तयारी केली आहे. गट व गणातील उमेदवारांच्या मुलाखती घेऊन माकप उमेदवार उतरविण्याच्या तयारीत असल्याचे समजते. भाजपनेही तालुकानिहाय बैठक घेऊन मातब्बर उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. राजकीयदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या अभोणा गटात काँग्रेसकडून यशवंत गवळी प्रबळ उमेदवार मानले जात आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी गवळींविरोधात नितीन पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी करू शकतात. असे झाल्यास या गटातील लढत लक्षवेधी ठरू शकते.

आघाडी-युती होण्याची चिन्हे
तालुक्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास प्रत्येकी दोन-दोन गट तर चार-चार गण वाटले जाऊ शकतात. याउलट भाजप-शिवसेनेत युतीचा समझोता होऊ शकतो. जागावाटपावर या दोन्ही पक्षांच्या एकूणच राजकीय अस्तित्वासह, उमेदवारांच्या इच्छुक प्रवाहावर सर्व गणित सुरळीत होण्यास अडचण निर्माण होणार नाही. माकप सर्वच गट आणि गणांमध्ये उमेदवार देण्याची उत्सुकता असली तरी आमदार गावित सर्वच ठिकाणी उमेदवार देण्याच्या तसेच स्वतंत्र लढा देण्याच्या तयारीत आहेत.

पवार प‌ती-पत्नी यांचा यू-टर्न
यंदा गटांच्या आरक्षणामुळे पवार घरातच तीन इच्छुक उमेदवार असल्याने राष्ट्रवादीपुढे मोठा पेच आहे. यातून मार्ग निघणार की नाही, याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. पक्षाच्या मुलाखत बैठकीच्या पूर्वसंध्येला नितीन व जयश्री पवार प‌ती-पत्नी शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली. मात्र, दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत आपण राष्ट्रवादीच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, तालुक्यात मानूर गटात जि. प. सदस्या डॉ. भारती पवारांच्या एंट्रीमुळे यंदा पवार घराण्यात व राष्ट्रवादीत निर्माण झालेला प्रसंग कसा मिटतो, याकडे सर्वांचे लक्ष असले तरी पवार घराण्याच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी माकप आमदार जे. पी. गावित व भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण पुढे सरसावले आहेत.

बापखेडा गणात इच्छुकांची गर्दी
तालुक्यातील एकमेव सर्वसाधारण गण म्हणून बापखेडा गणातून इच्छुक उमेदवारीसाठी गर्दी झाली आहे. राष्ट्रवादीकडून रवींद्र देवरे, संजय पवार, हिरामण पगार, शरद गुंजाळ, राजेंद्र भामरे, मनीषा भामरे, संदीप वाघ, प्रवीण रौंदळ, भूषण पगार, महेंद्र हिरे, ज्योती जाधव, विजय शिरसाठ इच्छुक आहेत. भाजपकडून मनोज बोरसे, विकास देशमुख, दीपक हिरे, काँग्रेसकडून प्रभाकर पाटील, प्रकाश पगार, सुनील बिरारी, रामदास रौंदळ, मनसेकडून शशिकांत पाटील, माकप सरचिटणीस हेमंत पाटील, महेंद्र देशमुख, शिवसेनेकडून वैभव पवार इच्छुक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images