Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बंदमुळे चढे भाव

0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात व्यापा-यांनी पुकारलेल्या बंदचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसू लागला आहे. ऐन सणाच्या दिवशी जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याबरोबरच चढ्या दराने विक्री झाल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

विशेष सहाय्य योजनाच निराधार!

0
0
राज्य आणि केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजनांसाठीचा निधी नाशिक जिल्हा प्रशासनाला ​न मिळाल्याने या योजनांचे लाभार्थी निराधार बनले आहेत. अनेक महिने जिल्ह्यातील जवळपास पाच हजार लाभार्थी या योजनांपासून वंचित असून दीड कोटींहून अधिक निधी त्यासाठी आवश्यक आहे.

अखेर पुस्तक वाटप सुरू

0
0
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बालभारती भांडारामध्ये पडून असलेल्या पाठ्यपुस्तकांच्या वाटपाला अखेर मुहूर्त लागला आहे.

अरे व्यापार, व्यापार...

0
0
स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीला नाशिकच्या व्यापाऱ्यांनी विरोध करत संपाचं हत्यार उपसलंय. एलबीटी नको यासाठी व्यापारी अधिक आक्रमक आहेत. बंद पाळून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहचविण्याच्या व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. दोन दिवसांपुर्वी सिडको परिसरातून व्यापाऱ्यांची रॅली काढण्यात आली.

वैद्यकीय वाङ्मयचौर्याला आळा

0
0
विद्यापीठस्तरावर होणा-या संशोधनाच्या गुणवत्तेचा दर्जा सांभाळला जावा, यासाठी विकसित होणाऱ्या 'अॅण्टी प्लॅगॅरिझमच्या प्रोजेक्ट'ला बळकटी मिळणार आहे. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेत एका समितीची स्थापना केली आहे.

दारणासाठी गंगापूरमधील पाणी

0
0
दारणा धरणामधील नाशिक महापालिकेसाठी आरक्षित करण्यात आलेला पाणीसाठा मराठवाड्यासाठी सोडून दिल्यानंतर दारणा धरण कोरडेठाक झाले आहे. परिणामी देवळालीसह त्या भागात राहणा-या अनेक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

स्वाती चिखलीकरांना अटक होणार

0
0
लाचखोरीच्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर सतिश चिखलीकर यांच्या पत्नी स्वाती चिखलीकरांनी केलेला जामीन अर्ज सुनावणीपूर्वीच सोमवारी मागे घेतला. त्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

३१ पोलिस कर्मचारी निलंबित

0
0
अमळनेर येथे तातडीने बंदोबस्तासाठी जाण्याचे आदेश झुगारून गैरहजर राहणा-या पोलिस मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथकाच्या सहाव्या आणि आठव्या प्लॅटूनमधील ३१ पोलिस कर्मचा-यांना रविवारी सायंकाळी पोलिस अधिक्षकांनी निलंबन केले. या कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शाळेला रामराम ठोकून साखळीचोरी

0
0
एकाच शाळेत आणि एकाच बॅचला असलेल्या सहा अल्पवयीन मुलांनी शाळेला रामराम ठोकून साखळीचोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३० तोळे सोने हस्तगत केले असून सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राजीनाम्याचा आदेश नाही

0
0
चांगले आणि सोनवणे हत्याकांडात महापौर यतीन वाघ यांचे बंधू सहभागी असल्याचा संशय असला तरी या प्रकरणावरून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून राजीनामा देण्याचा कुठलाही आदेश मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिले आहे.

भगरीचे कोठार

0
0
नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने त्यावर आधारीत प्रक्रिया उद्योगांची स्थापना होणे स्वाभाविक होते आणि आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या कांद्यापासून पावडर बनविण्याचा कारखाना सुरु करण्यात आला. या पावडरला देशासह परदेशातही मोठी मागणी होती. पण, हा कारखाना बंद पडला.

जिल्हा उपनिबंधक बाजीराव शिंदे वेटिंगवर

0
0
गेल्या तीन वर्षांत नाशिकच्या जिल्हा उपनिबंधक पदावर कार्यरत असलेल्या बाजीराव शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगावचे जिल्हा उपनिबंधक एस. व्ही. बनसोडे यांना नियुक्ती देण्यात आली असून, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.

कृषी प्रक्रिया उद्योगाचे माहेरघर

0
0
नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात आता टोमॅटोच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. भाजीपाला पिकात महत्त्वाचा घटक बनलेल्या टोमॅटोच्या लागवडीला दिवसेंदिवस चालना मिळते आहे. पण, टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने त्याचा परिणाम शेतीवर होत आहे.

केळझरचे पाणी चौंधाणेपर्यंत पोहोचले

0
0
केळझर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी अखेरचे आवर्तन सोडण्यात आले. सटाणा शहरासह पश्चिम बागलाणमधील ४९ गावांना या आवर्तनामुळे पाणीटंचाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

डॉक्टर, कर्मचा-यांअभावी यंत्रसामुग्री पडून

0
0
बागलाणवासीयांच्या सततच्या आग्रही मागणीमुळे आणि लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने सटाणा शहरात अडीच कोटी रुपये खर्चून ट्रॉमा केअर हॉस्पिटलची उभारणी केली. मात्र या हॉस्पिटलातील अद्ययावत यंत्रसामुग्री डॉक्टर आणि अन्य कर्मचा-यांअभावी धूळ खात पडली आहे.

शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहा

0
0
उद्योजक व कामगार संघटनांनी एकत्र येऊन काम केल्यास उद्योगांचा पर्यायाने शहराचाही विकास होईल. त्यासाठी कामगार संघटनांची भूमिका महत्त्वाची असून उद्योजक व कामगार संघटनांनी त्यासाठी कटिबध्द राहा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

पुणे विद्यापीठाचा रोजगार मेळावा

0
0
पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळामार्फत २४ मे रोजी रोजगार मेळावा होत आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये हा रोजगार मेळावा होईल.

कुंभमेळ्यावर बहिष्कार टाकून राष्ट्रीय आंदोलन

0
0
साधू-महंतांना तपोवनात जागा न मिळाल्यास कुंभमेळ्यावर बहिष्कार टाकण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवर आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय श्री पंच निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास यांनी पत्रकार परिषदेत दिला.

'CET' साठी जिल्ह्यातून १३ हजारांवर नावनोंदणी

0
0
राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत इंजिनीअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून १३ हजार ६९६ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.

रिसिटशिवायही MPSC परीक्षेला बसता येणार

0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूचनांनुसार माहिती अपडेट केल्यानंतरही रिसिटपासून वंचित असणारे विद्यार्थी शनिवार, १८ मे रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ शकणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images