Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आता नजरा सभापत‌िपदाकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालानंतर आता मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ‘झेडपी’ अध्यक्षपदाच्या रुपाने लाल दिव्याची गाडी कुणाकडे येणार, अन् तालुक्यातील गावोगावच्या गावगाड्याची नाडी हाती असलेल्या पंचायत समितीच्या ‘सभापती’पदी नेमकी कुणाची वर्णी लागणार? याकडे येवला तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

निवडणुकीत दहापैकी सात जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केलेल्या शिवसेनेचाच सभापती व उपसभापती होणार हे येवल्यातील उघड चित्र लक्षात घेता या पदांवर पहिल्यांदा नेमकी कुणाला संधी मिळते? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

सभापती-उपसभापतीपदी अनेक नावे चर्चेत असताना इच्छुकांच्या आशेला देखील घुमारे फुटले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लक्षवेधी निवडणुकीत येवला तालुक्यात अगदी जोरदार मुसंडी मारलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादीच्या अनेक वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. सेनेच्या झंजावातात राष्ट्रवादीचा येवल्यातील गडाचे बुरुज ढासळले. शिवसेनेने ‘झेडपी’च्या तालुक्यातील पाच जागांपैकी तीन, तर पंचायत समितीच्या दहापैकी सात जागा जिंकल्या. पंचायत समितीत सेनेचे निर्विवाद बहुमत समोर आहे. त्यामुळेच या पदांच्या साधारण १२ अथवा १३ मार्चच्या होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसत आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी येवला पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी स्त्री राखीव प्रवर्गासाठी राखीव आहे. अंदरसूल गणातून विजयी झालेल्या नम्रता जगताप, सावरगाव गणातील आशाबाई साळवे यांचे नाव शिवसेनेकडून सभापतीपदासाठी अधिक चर्चेत आहे. या दोघींशिवाय पंचायत समितीच्या चिचोंडी गणातून विजयी झालेल्या सेनेच्याच कविता आठशेरे यांचे देखील नाव आता सभापतीपदासाठी चर्चेत येण्यास सुरुवात झाली आहे. आठशेरे या ओबीसी स्त्री राखीव जागेवर निवडुन आलेल्या नसल्या तरी त्यांच्याकडे ओबीसीचा दाखला असल्याचे बोलले जात आहे. जगताप, साळवे व आठशेरे या तिघींना प्रत्येकी दहा-दहा महिन्याची ‘टर्म’ असा फॉर्म्युला राबविला जाण्याची दाट शक्यता आहे. असा फॉर्म्युला राबवला गेला तर आताची पहिली संधी कुणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाषा ही माणसाची आत्मखूण असते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाषेचे गौरवीकरण करायला नको, तसाच तिचा तिरस्कारही करायला नको. भाषेला समान स्थान मिळाले पाहिजे. इंग्रजीचा तिरस्कार करू नका. परंतु, तिला वरचढही होऊ देऊ नका. कुसुमाग्रजांनाही तेच अभिप्रेत होते. आपली मराठी भाषा आपण जपली पाहिजे. कारण भाषा ही माणसाची आत्मखूण असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी केले.

कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी महाकवी कालिदास कलामंदिरात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्याहस्ते डॉ. राजाध्यक्ष यांना चौदावा जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे त्याचे स्वरुप आहे. राजाध्यक्ष म्हणाल्या, की कोणत्याही भाषेचे गुलाम होऊ नका. परंतु, तिचा गौरव मात्र स्वीकारायला मागे पुढे पाहू नका. प्रत्येक मराठी माणसासाठी मराठी माध्यमाच्या शाळा आवश्यक आहेत. मात्र दुर्दैवाने या शाळा बंद पडताहेत. सरकारचे निर्णय घातकच असतात. त्यामुळे त्यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवू नका. प्रत्येकाचा मराठीशी अनुबंध जुळला पाहिजे असे काहीतरी धोरण अस्तित्वात आणण्याची गरज व्यक्त करतानाच, आता शाळांमध्ये नवी पाठ्यपुस्तके तयार केली पाहिजे. ही पुस्तके परंपरावादी नको. त्यात ज्ञानेश्वर असलेच पाहिजे असे नाही तर परंपरावादी काही त्यात असण्यापेक्षा प्रस्तूत जे आहे ते त्या पुस्तकांमध्ये घ्या. विद्यार्थ्यांना मराठीविषयी कळू द्या, असेही राजाध्यक्ष यांनी नमूद केले.

व्यासपीठावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कार्यवाह मकरंद हिंगणे, उपाध्यक्ष संजय पाटील, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमित बग्गा, रवींद्र सपकाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मधु मंगेश कर्णिक यांनी कुसुमाग्रजांच्या काही आठवणींना उजाळा दिला. विजया राजाध्यक्ष या माझ्या समकालिन मात्र माझ्यापेक्षा थोर लेखिका आहे, असेही कर्णिक म्हणाले. मराठीच्या अस्तित्वाविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. मराठी अभिजातच आहे तिला अभिजाततेचा दर्जा द्या, असा गळा काढू नका कारण ती केवळ मान्यता होईल. हे सांगतानाच आम्ही कधीही आभासी साहित्य लिहिले नाही. परंतु, आजकालचे लेखक आम्हाला मानत नाहीत अशी खंतही कर्णिक यांनी व्यक्त केली. मकरंद हिंगणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुखदा बेहरे यांच्यासह कलावंतांनी ‘सरस्वतीच्या नौका या, युगयात्रेस निघाल्या’ या ग‌ीताने कार्यक्रमाची सुरूवात केली. मानपत्राचे लेखन व वाचन कवी किशोर पाठक यांनी केले. आतापर्यंत ज्यांना जनस्थान मिळाला आहेत, त्यांची चित्रकार अनिल माळी यांनी रेखाटलेली चित्रे कालिदासच्या अंगणात लावण्यात आली होती.

राजकारण्यांना खडे बोल!

अमृताते पैजा जिंकणारी मराठी आज कुठे आहे? असा सवाल करतानाच, डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी सरकारवर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, राजकीय नेते आपल्या तुंबड्या भरण्यात व्यग्र आहेत. त्यांना सामान्य माणसाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे तुम्ही आम्हीच स्वत:ला धीर दिला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. स्त्रीविषयी विचार मांडताना त्यांनी सांगितले की, दलित आणि आदिवासी स्त्री आजही दु:खातच आहे. त्यांच्यावर अन्याय होतोच आहे. स्त्रीमुक्ती चळवळ अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. आज कुणीही पुढे येऊन त्यांना छातीशी धरीत नाही. महात्मा ज्योतिराव फुले, आगरकर, महर्षी कर्वे काळाच्या उदरात गडप झाले आहेत. त्यांचे केवळ पुतळे शिल्लक असून, तेही जातीत वर्ग करण्यात आले आहेत. हल्ली कुणाचेही पुतळे उभे राहू लागले आहेत, असा टोलाही डॉ. राजाध्यक्ष यांनी लगावला.

बटाटेवड्याच्या पैशांत ‘विशाखा’ घेतले

विशाखा काव्यसंग्रहाची आठवण सांगताना डॉ. राजाध्यक्ष यांनी सांगितले, की आई-वडील बटाटेवड्यासाठी जे पैसे देत ते वाचवून त्यातून मी माझ्या स्वत:च्या पैशांतून पहिला काव्यसंग्रह विकत घेतला तो म्हणजे विशाखा. तेव्हापासून कवितेने माझा हात धरला तो कायमचाच. कुसुमाग्रजांची कविता मला अतिशय जवळची वाटत राहिली, नेहमीच वाटत राहील. दरम्यान, कार्यक्रमाआधी डॉ. राजाध्यक्ष यांनी कुसुमाग्रज स्मारक येथे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई महापालिकेत सेना-भाजपचीच युती’

$
0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे नैसर्गिक मित्र आहेत. दोन्ही नेत्यांनी अमंगल युती न करता परंपरागत युतीच्या मार्गाने चालायला हवे. दोन भावांची भांडणे होतात तशी ही घरातली भांडणे आहेत.

भांडण संपवायचे म्हटले की थोडा वेळ लागणार. राज्यातील सरकार स्थिर असून, मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षांची युती होईल, असा विश्वास महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी नाशिकमध्ये व्यक्त केला. त्यामुळे कुणीही मनातले मांडे खाऊ नयेत असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. बांधकाम ‌विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात आढावा बैठक घेण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, सायखेडा येथील पुलाच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. राज्यात १४ हजार पुलांचे तीन वर्षांत पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ठ आहे. त्यासाठी साडेचार हजार कोटी खर्चाचा इस्टीमेट तयार करीत आहेत. पहिल्या तीन वर्षांत धोकादायक पुलांची तातडीने दुरूस्ती केली जाणार आहे. सायखेडा येथील पुलासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर केले असून दुरूस्तीमुळे अशा पुलांचे आर्युमान आठ ते १० वर्षांनी वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात बसेसमध्ये वायफाय हॉटस्पॉट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना खूश करण्यासाठी एसटीमध्ये प्रवास करताना मोफत वायफाय सेवेचा देणार असल्याची घोषणा परिवहन केली होती. त्याबाबत येत्या दहा दिवसांत धुळे आगारातील १३५ एसटी बसेसमध्ये प्रवाशांना वायफाय सेवेचा लाभ मिळणार आहे.

एसटीच्या या वायफाय सेवेत सोशल मीडियाचा वापर प्रवाशांना करता येणार नाही. तर मराठी, हिंदी गीते, चित्रपट मालिकाचा या सेवेत लाभ होणार आहे. यामुळे एसटीकडे प्रवासासाठी नागरिकांची संख्या वाढणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. परिवहन महामंडळाच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नऊ आगारांतील सुमारे ९०० बसेसमध्ये वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यांत धुळे आगारातील १३५ बसेसमध्ये वायफाय सुविधा पुरविण्यासाठी यंत्र मीडिया सोल्युशन लि. कंपनीचे कर्मचारी आगारात दाखल होऊन यंत्रसामग्री बसविण्याचे काम करत आहेत.

वायफाय कसे असेल?

मीडिया सोल्यूशन कंपनीकडून एसटीमध्ये हॉटस्पॉट डिवाइस बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सॅटेलाइटच्या माध्यमातून रेंज मिळविली जाणार आहे. वायफायचा कोड क्रमांक हा प्रत्येक प्रवाशाच्या सीटजवळ असेल तो आपल्या मोबाइलमध्ये प्रविष्ट केल्यास वायफाय सेवा मोबाइलमध्ये सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपात समाजवादीचे अनोखे आंदोलन

$
0
0

कार्यकर्त्याने साकारला पिसाळलेला कुत्रा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नागरिक सध्या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील कुत्र्यांचा आणि डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या नगरसेवक आमिन पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनपात लक्षवेधी आंदोलन केले.

या अनोख्या आंदोलनात एका कार्यकर्त्याने अंगावरील कपडे काढून पिसाळलेल्या कुत्र्याची भूमिका मनपा आवारात साकारली. कुत्रे पिसाळल्यानंतर काय अवस्था होते याचे विविध प्रात्यक्षिके समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करून दाखविले आणि शहरातील समस्येची वस्तुस्थिती दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

धुळे शहरात विविध ठिकाणी पिसाळलेल्या व रोगट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिला, तरुणी व वृद्धांच्या अंगावर कुत्रे चावा घेण्यासाठी धाव घेतात. अशा घटना दररोज घडत आहेत. मनपाच्या यंदाच्या आर्थिक संकल्पात मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करणारे निवेदन महापौर कल्पना महाले यांना यावेळी देण्यात आले.

शहरातील नागरिकांच्या समस्येकडे मनपाचे लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पक्षाचे नगरसेवक आमिन पटेल व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन मनपात केले. जर मनपाकडून येत्या आठ दिवसांत मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर यापुढे मनपातील अधिकाऱ्यांच्या दालनात पिसाळलेले व मोकाट कुत्रे आणून सोडण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवमोगरा देवीच्या यात्रेस सुरुवात

$
0
0

नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा येथे तयारी जोरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्डीपाडा येथील देवमोगरा देवीचे मंदिर विसरवाडी गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ताही नाही. अशा ठिकाणी हे देवमोगरा मातेचे मंदिर उंच डोंगरावर वसलेले आहे. पायथ्यापासून सुमारे २६४० फूट अंतर पार करून या देवीच्या दर्शनाला जावे लागते. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमधील मराठी माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या आमावस्येला देवमोगराच्या मोगीची यात्रा भरते, याची तयारी आता सुरू झाली आहे.

गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील देवमोगरा मातेची ही प्रतिकृती नंदुरबारमधील बर्डीपाडा येथे पाहायला मिळते. तसेच आदिवासी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकडे घालायला या ठिकाणी येतात. कणीपूजन करून मंडल शिवारातील देव देवतांचे पूजन करतात. या यात्रेसाठी आदिवासी बांधव १५ दिवसांपासून तयारीला लागतात. मोगी ही आदिवासी समाजाची कुलदेवता असून, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात. मंदिराच्या पायथ्याशी सुरू होणाऱ्या पायऱ्यांपासून केलेल्या कच्च्या रस्त्याची पायवाट आहे. तेथूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक मार्गस्थ होतात.

देवमोगरा देवीला आदिवासी भाषेत ‘याहा मोगी’ म्हटले जाते. ‘याहा’ म्हणजे आई असा अर्थ आहे. महादुष्काळात याहा मोगीच्या या उदात्त आणि मानवतादी कार्यामुळेच त्यांना याहा, लोकमाता, कणी, कन्सरी आपली सर्व पालनहार संबोधून देवत्व बहाल केले. आदिवासी भाषेतच देवीचे पारंपरिक पद्धतीने पूजा-विधी होतात. आजही धान्य, वन भाजी, तांदळाची व ज्वारीची भाकरी आणि मव्हाच मद्य (दारू) असा नैवेद्य देवीला दिला जातो. त्यामुळे आदिवासी भाषेतच मंदिराचे पुजारी ग्रामदैवत देवमोगरा देवीची माहिती सांगतात.

प्रशासनाची उदासीनता

आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख असून, नवापूर तालुक्यातील आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग पहाडातून आणि दऱ्या, खोऱ्यातून, कच्या रस्ताने भाविकांना खडतर प्रवास करावा लागतो. येथेही सरकारी यंत्रणेची उदासीनता पाहायला मिळते. तरी देवदर्शनासाठी प्रवास सुखकर व्हावा, अशीच अपेक्षा आदिवासी बांधवांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन चोरटे सिडकोत जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिकेच्या निवडणुकीतील पोलिस बंदोबस्त संपल्यानंतर अंबड पोलीसांनी पुन्हा परिसरात गस्त सुरु केली असून संशयितांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू केलेल्या गस्तीपथकांमुळे माऊली लॉन्स परिसरात दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपयांचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

माऊली लॉन्स परिसरात बनावट नंबरची गाडी फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलिसांनी चौकशी करीत संबधित गाडीतील राहुल धनराज बडगुजर (२२, शिवशक्ती चौक) आणि राजेश रामशंकर शर्मा (२३, भद्रकाली) यांची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली; मात्र झडती घेतल्यावर गाडीत कटावणी आढळून आली. पोलिसांनी गाडीसह त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी केलेल्या गुन्ह्याची माहिती देत एक एलसीडी टीव्हीसह पल्सर २२० गाडी पोलिसांच्या स्वाधीन केली. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक तुषार चव्हाण, दत्तात्रय विसे, विष्णू हाळदे, शंकर काळे व देवरे, चंद्रकांत गवळी, विजय वरंदळ, दत्तात्रय गवारे, दृष्टांत जोपळे, मनोहर कोळी यांनी कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या दोघांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरच्या धडकेने वाहनचालकाचा मृत्यू

$
0
0


मुंबई-आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेजसमोर कंटेनरच्या धडकेत ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संशयित कंटेनरचालकास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. बाळासाहेब उर्फ समाधान निवृत्ती क्षीरसागर (३८, रा. देवरगाव, तालुका चांदवड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. क्षीरसागर हे रविवारी (दि.२६) नाशिककडून चांदवडच्या दिशेने ट्रक (एम. एच. १५, जी. ३१५५) घेऊन जात असता वाघ कॉलेजसमोर त्यांनी ट्रक थांबवला. मागील चाकाचा काय आवाज येतो, हे पाहण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला ट्रक उभा केला तसेच पार्किंग लाइटही लावले. क्षीरसागर चाकांची पाहणी करीत असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने (एम. एच. ४६, ए. एफ. १६०७) त्यांना जोरदार धडक दिली. यात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरचालक अर्जुनदल सिंघाल पाल (२०, रा. रोहिणी, खोजगीपूर, उत्तर प्रदेश) यास पंचवटी पोलिसांनी अटक केली. अतुल बाळासाहेब क्षीरसागर (रा. देवरगाव, चांदवड) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरपदासाठी पंचवटीची दावेदारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत पंचवटीकरांनी भाजपला नेहमीच झुकते माप दिलेले आहे. महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने पंचवटीतील २४ पैकी १९ जागांवर विजय मिळविला आहे. अनुसूचित जमाती राखीव जागेवर पंचवटीतून भाजपचे रंजना भानसी, सुरेश खेताडे, पुंडलिक खोडे आणि सरिता सोनवणे हे चार उमेदवार निवडून आलेले आहेत. यंदाचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने या चारपैकी एकाची वर्णी या पदावर लागण्याची चिन्हे असल्याने यंदाही पंचवटीलाच महापौरपदाची संधी असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडे बहुमत असल्यामुळे त्यांच्या नगरसेवकांना हमखास महापौरपद मिळणार आहे.

रंजना भानसींची पाचव्यांदा निवड

महापौरपदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने त्यात पुरुष, तसेच महिलाही दावेदार राहू शकते. त्यामुळे रंजना भानसी यांनी महापौरपद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून तब्बल पाचवेळा नगरसेविका होण्याचा मान त्यांनी मिळविलेला आहे. हे पद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असते, तर त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसता. सध्या पंचवटीत दोन पुरुष आणि दोन महिला यांची नावे चर्चेत असली, तरी पक्ष कोणाला संधी देईल, हे सांगता येणार नाही.

खेताडेंची तिसरी टर्म

सुरेश खेताडे हे तिसऱ्यांदा नगरसेवक झालेले आहेत. या अगोदर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकदा पोटनिवडणुकीत, तर दुसऱ्यांनदा त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत ते पुन्हा निवडून आले. २०१७ च्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी पंचवटीतून भाजपच्या सर्वच उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळविली आहे. महापौरपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.

खोडे, सोनवणेही चर्चेत

पुंडलिक खोडे हे १९९७ आणि २००२ मध्ये भाजपकडून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. २०१७ मध्ये त्यांना पुन्हा भाजपची उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. प्रा. सरिता सोनवणे प्रथमच निवडून आलेल्या आहेत. त्याही महापौरपदासाठी इच्छुक आहेत.


या पंचवटीकरांनी भूषवलेय महापौरपद

या अगोदर पंचवटीला (कै.) अॅड. उत्तमराव ढिकले, डॉ. शोभा बच्छाव, बाळासाहेब सानप आणि अशोक मुर्तडक यांच्या रुपाने महापौरपद मिळालेले आहे. या निवडणुकीत पंचवटीत भाजपचे वर्चस्व लक्षात घेता आणि भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप हे पंचवटीतील असल्याने ते पंचवटीकरांनाच झुकते माप देण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पंचवटीलाच महापौरपद मिळण्याची शक्यता वाढली आहे.

---
देवळालीत उपाध्यक्षपदासाठी चुरस

देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या पंचवार्षिक कार्यकाळातील उपाध्यक्षपदासाठीची चुरस आधीच रंगू लागली आहे. सध्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांचा कार्यकाळ मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपत असल्याने नवीन उपाध्यक्ष कोण होणार, याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

बोर्डात भाजपचे ५, रिपाइं १, शिवसेना १, तर अपक्ष १ असे संख्याबळ असून, आतापर्यंत सचिन ठाकरे यांनी एक वर्ष उपाध्यक्षपद भूषविले, तर सध्या बाबुराव मोजाड हे पद भूषवित आहेत.

एक-एक वर्षाची संधी

बोर्डात भाजप-रिपाइं युतीची सत्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी प्रत्येकाला एक-एक वर्ष उपाध्यक्षपदाची संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यातही यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे पद रिपाइंकडे जाण्याची शक्यता बोलली जात आहे.

महिला की ज्येष्ठांना संधी?

बोर्डात भाजपसोबत रिपाइंदेखील असून ५० टक्के महिला आरक्षण असल्याने यावेळी महिलांना संधी मिळणार, अशी अपेक्षा देवळालीकरांकडून व्यक्त केली जात आहे. त्यात आता ५० टक्के महिला आरक्षणाप्रमाणे रिपाइंच्या वॉर्ड क्रमांक १ च्या नगरसेविका प्रभावती धिवरे व भाजपच्या वॉर्ड ८ च्या नगरसेविका मीना करंजकर यांचा नंबर लागतो, की बोर्डात गटनेतेपदाची भूमिका बजावणारे दिनकर आढाव व वॉर्ड ३ चे नगरसेवक भगवान कटारिया यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडते, याकडे लक्ष लागले आहे.

--

ठरल्याप्रमाणे उपाध्यक्षपदाची कार्यवाही निश्चित होईल. मात्र, आगामी उपाध्यक्ष कोण, याबाबत आताच बोलता येणार नाही.

- बाळासाहेब सानप, आमदार तथा शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजेमालकाला पोलिसांचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ध्वनी प्रदूषणास आळा बसावा यासाठी डीजे व्यावसायिकांना हायकोर्टाने आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. मात्र, वऱ्हाडी मंडळींचा जोर वाढला की डीजेचालक कायद्याकडे दुर्लक्ष करतात. असाच एक प्रसंग आडगाव परिसरात घडला असून, पोलिसांनी नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या डीजेमालकासह लॉन्स मालकावर कारवाई केली.

दिलीप निवृत्ती निमसे (लॉन्स मालक) आणि विशाल संतोष मंडलिक (डीजेचालक, हनुमानगर, पंचवटी) असे कारवाई झालेल्या संशयित व्यक्तींची नावे आहेत. निमसे यांचे नांदूरनाका येथे साईलिला लॉन्स आहे. सोमवारी (दि. २७) रात्री येथे विवाह समारंभ झाला. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सदर लॉन्समध्ये विशाल मंडलिक याच्या डीजेवर मर्यादेपेक्षा जास्त आवाजात गाणी वाजवली जात होती. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आडगाव पोलिस स्टेशनचे पथक लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहचले. पोलिसांनी सदर डीजे यंत्रणा ताब्यात घेतली. पीएसआय धनश्री पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलिसांनी कलम १८८, १९० तसेच पर्यावरण संवर्धन कायद्यातील कलम १५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहे.

हातातील मोबाइल खेचला
नाशिक-पुणे महामार्गावरील शिखरेवाडी येथे रस्त्याने पायी बोलत जाणाऱ्या युवकाच्या हातातील मोबाइल पल्सरवरील दोघा चोरट्यांनी खेचला. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मानसी हॉटेलजवळ घडली. या प्रकरणी अभिनव महेंद्र जवे (अमरदीप सोसायटी, दत्तमंदिर स्टॉप) याच्या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेच्या वेळी जवे आपल्या २० हजार रुपयांच्या मोबाइलवर बोलत जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाची घोडदौड मैलाचा दगड

$
0
0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘नॅक’ मूल्यांकनात ‘ए’ श्रेणीतून ‘ए प्लस’ श्रेणीपर्यंत यंदा झेप घेतली आहे. ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती)च्या या पाहणीचा तपशील नुकताच जाहीर झाला. जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने विद्यापीठाची ही घोडदौड मैलाचा दगड ठरावी. गत पाच वर्षांतील विद्यापीठाच्या कामगिरीत कुलगुरूंच्या खालोखाल महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘बीसीयूडी’चे माजी संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्याशी विद्यापीठाच्या वाटचालीबाबत मुक्त संवाद साधता आला. यानिमित्त ‘ए प्लस’ श्रेणीच्या पाठीमागची विद्यापीठाची अविश्रांत धडपड डॉ. गायकवाड यांनी अधोरेखित केली.

--


•बीसीयूडी विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरचे आव्हान मोठे होते...

➤ पुणे विद्यापीठाचा आजवरचा लौकिक पाहता या वर्तुळातील प्रत्येक जबाबदारीला विशेष महत्त्व आहे. यादृष्टीने विद्यापीठाचा लौकिक टिकविण्यासोबतच त्यात भर घालण्याचे आव्हान नक्कीच मोठे होते. पण, बीसीयूडी विभागातील सर्व सहकारी, कुलगुरू डॉ. वासुदेव गाढे आणि विद्यापीठ वर्तुळातील सर्व घटकांच्या उत्कृष्ट समन्वयाने नवी झेप घेणे विद्यापीठासाठी शक्य झाले.•कुठल्याही मूल्यांकनाच्या दृष्टीने विद्यापीठाचा विस्तार अत्यंत विस्तृत आहे, ते नियोजन कसे सांभाळले?

➤ सुमारे ५०० एकरांवर विस्तीर्ण असे हे विद्यापीठ आहे. कुलगुरूंच्या संकल्पनेतून सुरुवातीला इतक्या मोठ्या विस्तारित कार्यक्षेत्रात सुशोभीकरणावर भर देऊन कॅम्पसला नवी झळाळी दिली गेली. या विद्यापीठात सुमारे ११ विद्याशाखा, १२१ संशोधन केंद्रे, ११५ अभ्यास मंडळे, ७४ तदर्थ मंडळे, ४२ पदव्युत्तर विभाग, पावणेतीनशे संलग्न व्यवस्थापन संस्था, पुणे, नाशिक आणि अहमदनगर अशा तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र, ७०० पेक्षाही अधिक संलग्न कॉलेजेस, सुमारे ६ लाखांवरील विद्यार्थी संख्या, जयकर ग्रंथालयातील सुमारे ५ लाखांवरील पुस्तके इतका मोठा कार्यविस्तार तपशीलवार अन् अचूक पद्धतीने सादर करायचा, तर ते मोठे आव्हान होते. मात्र, विद्यापीठ परिवारातील प्रत्येक घटकाच्या सहभागामुळे प्रत्येकाने आपापल्या वाट्याची जबाबदारी यथायोग्य व अचूक सांभाळल्याने ‘नॅक’ला यशस्वीपणे सामोरे जाता आले, हे संघटनाचे यश आहे.•‘ए’ श्रेणी ते ‘ए प्लस’ ही विद्यापीठाची मोठी झेप आहे...

➤ राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती समिती (नॅक) च्या पाहणीत एकूण ४ गुणांपैकीगुण द्यायचे होते. गतवेळी विद्यापीठाने ३.१० गुण मिळवत ए श्रेणीपर्यंत स्थान मिळविले होते. यंदा मात्र सर्व अनुदानांचे सूक्ष्म स्तरावर नियोजन करून परदेशी विद्यापीठांसोबतही महत्वाचे करार केले. विद्यापीठात गुणवततिा वाढीच्या दृष्टीने इंटरनल क्वालिटी अशुरन्स प्रणाली विकसित केली गेली. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यापीठ पूर्णत: टेक्नोसॅव्ही झाले. या सर्व मुद्द्यांचा फायदा ३.६० सीजीपीए गुण मिळविण्यापर्यंत झाला. परिणामी विद्यापीठ ‘ए प्लस’ श्रेणीपय्‍ंत पोहचू शकले. याचा काळात विद्यापीठाला नाशिक व नगरमध्ये उपकेंद्रांसाठी जागा मिळू शकली.•परदेशस्थ विद्यापीठांसोबतही मोठ्या प्रमाणावर करार झाले?

➤ सुमारे १०८ परदेशस्थ विद्यापीठांशी या काळात करार झाले. यात अमेरिकेसह जर्मनी, नॉर्वे आदी देशांमधील विख्यात विद्यापीठांसोबत मोठे करार झाले. विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्यासाठी हे करार अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ओबामा-सिंग करारांतर्गत योजना, स्टॉकहोम विद्यापीठ, दिल्ली-आयआयटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा एकत्रित प्रकल्प, स्वीडनच्या विद्यापीठातील प्रकल्प आदी मार्गांतून विद्यापीठास मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळत गेले. एकूणच विद्यापीठ विकासासाठी या अर्थप्रवाहाचा चांगला फायदा झाला. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे ४ हजारांवर शोधनिबंध प्रसिद्ध झाले.•विद्यापीठ बऱ्यापैकी ऑनलाइन झाले आहे...

➤ हो, टक्क्यांच्या भाषेत बोलायचे झाले, तर पुणे विद्यापीठ आता ९५ टक्क्यांपर्यंत ऑनलाइन बनले आहे. शोधप्रबंधातील वाङ्मयचौर्य रोखण्यासाठी अँटिप्लॅगेरिझमसारख्या सॉफ्टवेअरपासून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्कॅन स्वरूपात ई मेलवर उपलब्ध करून देण्यापर्यंतची सर्व महत्त्वाची कामे विद्यापीठाने ऑनलाइन स्वरूपात आणली आहेत. परिणामी कामकाजातील पारदर्शकता आणि वेळ वाचण्याच्या दृष्टीने या गोष्टीचा मोठा फायदा विद्यापीठाला होत आहे. याशिवाय आउटसोर्सिंगची कामे थांबवून ही कामे विद्यापीठातच करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा विद्यापीठात उभारली गेली. त्यासाठी कुलगुरूंचे व्हीजन विशेष प्रेरणादायी ठरले.•परदेशी विद्यापीठांप्रमाणेच इंडस्ट्रीसोबतही अनेक करार झाले?

➤ विद्यापीठ अॅकॅडमिक क्षेत्रात कार्यरत असले, तरीही विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची जोड मिळावी यादृष्टीने इंड्रस्ट्रीजसोबतही अलीकडच्या काळात जास्त करार झाले. त्यामुळे थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीही गोष्टींचे आदान-प्रदान वाढण्यास मदत झाली. रेल्वेसारख्या विभागांसोबतही थेट प्रकल्प विद्यापीठास हाती घेता आला. कॅरेक्टायझेशनसाठी विद्यापीठ बाह्य संस्थांवर अवलंबून राहत होते. आता ही सुविधा

विद्यापीठात सुरू झाली आहे. रुसासारख्या उपक्रमांतर्गतच्या अनुदानातून विद्यापीठात ३० स्मार्ट क्लासरूमही विकसित झाले. याशिवाय कौशल्य विकसनाचे नवे ९१ अभ्यासक्रम अस्तित्वात आणले गेले. कंपनी अॅक्टखाली विद्यापीठाचा अॅल्युमनी प्रोग्राम नोंदविला गेला. एम. फिल. आणि पीएच. डी.सारख्या प्रक्रियांमध्येही अनुकूल बदल करण्यात आले. विद्यापीठाचा स्वत:चा आयटी सेल विकसित झाल्याने ९५ टक्के विद्यापीठ ऑनलाइन झाले आहे. विद्यापीठाला २०१३ चे इ गव्हर्नन्स अॅवॉर्डही मिळाले.•विद्यापीठ अधिक समाजाभिमुख झाले आहे...

➤ विविध सामाजिक समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ महत्त्वाचा दुवा ठरू शकते, ही बाब राजगुरूनगर, सिवे, विज्ञानाश्रम, पाबळ आदी ठिकाणी विद्यापीठाने उभारलेल्या प्रकल्पांमधून प्रत्ययास येते. दिव्यांग किंवा ड्रॉप आउट स्टुडंट्ससारखे लक्ष्यगट विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाने उभारलेले प्रकल्प प्रेरणादायी ठरत आहेत. याशिवाय संशोधनास चालना देणाऱ्या अाविष्कारसारख्या संशोधनात्मक स्पर्धांमध्येही ‘नॅक’प्रमाणेच पुणे विद्यापीठाने ठसा उमटविला आहे. याचा थेट फायदा समाजाला होत आहे.•विद्यापीठासमोरील भविष्यातील आव्हाने कुठली जाणवतात?

➤ विद्यापीठाकडे जास्तीत जास्त व्यावसायिक संशोधनाचे पेटंट मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवावे लागेल. इंडस्ट्री आणि विद्यापीठ यांचे आपसातील सहकार्य वाढीला लागावे, यासाठी विशेष नियोजनाची आवश्यकता आहे. संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठाला आणखी भक्कम पावले रोवायला हवीत.

(शब्दांकन : जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियाच्या कारणावरून मारहाण

$
0
0


नाशिक : सोशल मीडियाचे काम सोडून देण्याची धमकी देत एकाला तिघांनी मिळून जबर मारहाण केली. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी भद्रकालीतील कुंभारवाडा परिसरात घडली. या प्रकरणी रवी शांतवन बैरागर यांनी फिर्याद दिली असून, भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. संशयित आरोपी पिंटू कुमावत, मनोज जवळकर आणि ओम जवळकर यांनी तिघांनी मिळून घटनेच्या दिवशी रात्री पाऊणे वाजेच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून बैरागर यांच्याशी वाद घातला. तसेच सोशल मीडियाचे काम सोडून देणार नाही, असे सांगितल्याने त्यांना लोखंडी रॉडसह फायटरने मारहाण केली. घटनेचा अधिक तपास पीएसआय बागुल करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिलांची आडगावात आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही घटनांमधील आत्महत्यांची कारणे स्पष्ट होऊ शकलेली नाहीत.

के. के. वाघ कॉलेज परिसरात राहणाऱ्या महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. उज्ज्वला भारत जाधव (रा. गुलमोहर हाईट, के. के. वाघ कॉलेजमागे) असे संबंधित महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी जाधव यांनी आपल्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले. ही घटना त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना नजीकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार भालेराव व गांगुर्डे करीत आहेत.

आडगाव परिसरातील वृदांवननगर येथील बजरंग रो हाऊस येथे राहणाऱ्या अश्विनी मनोज क्षीरसागर (२६) यांनी सोमवारी (दि. २७) सायंकाळी सात वाजेपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सत्ताबदलाने सुटणार का समस्या?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशकात भाजपला पहिल्यांदाच मतदारांनी एकहाती सत्ता दिली आहे. मात्र, भाजपचे कमळ जरी फुलले असले, तरी सर्वसामान्यांच्या समस्या सुटणार का, असा सवाल त्रस्त नागरिक उपस्थित करीत आहेत. सातपूर भागात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली आहेत, तर दुसरीकडे महावितरण कंपनीच्या उच्च दाबांच्या वीजतारांचा त्रास आजही रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांकडून याप्रश्नी त्वरित उपाययोजना केल्या जाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या वेळी मराठीबाण्याचा मुद्दा घेत मनसेचे राज ठाकरे यांनी सर्वाधिक नगरसेवक महापालिकेत निवडून आणून सत्ता मिळवली होती. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नाशिक दत्तक घेतो, असे आवाहन केल्याने नाशिककरांनी विश्वासाने भाजपला साथ दिली आहे. सातपूर विभागातदेखील प्रभाग ९ व १० मध्ये नागरिक पूर्णपणे भाजपच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मात्र, सातपूरला कमळ फुलल्यानंतर तरी सर्वसामान्यांच्या प्रलंबित समस्या सुटणार का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक ठिकाणी महापालिकेने रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. मात्र, या स्त्यांच्या कामात अनेकांना त्रासदेखील सहन करावा लागत आहे. त्यातच महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या वीजतारांचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा सवालही रहिवासी उपस्थित करीत आहेत.

किमान मूलभूत गरजांची केली जावी पूर्तता

अनेक ठिकाणी महावितरण कंपनीच्या डीपींना वेलींचा वेढा पडलेला आहे. काही ठिकाणी डीपींचाच त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. रस्त्यांची कामे होतीलच, परंतु महावितरण कंपनीच्या वीजतारांची समस्या कधी सुटणार, असा सवाल उपस्थित होत आहे. परिसरात अनेक भागात घंटागाड्या अनियमित येत असल्याने कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. नववसाहतींत रस्ते, वीज, पाणी आदी गरजांची वानवा दिसून येत आहे. भाजपला नाशिककरांनी दिलेली साथ सार्थ ठरविण्यासाठी नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची गरज व्यक्त होत आहे. परिसरात आरक्षित असलेल्या भूखंडांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले पाहिजेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

सातपूर विभागात भाजपला मतदारांनी पसंती दिली आहे. आता नगरसेवकांनी रहिवाशांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. रस्त्यांची कामे व महावितरण कंपनीच्या राहिलेल्या भूमिगत वीजतारांची समस्या प्राधान्याने सोडवावी.

-रूपम पाटील, स्थानिक रहिवासी

--

सिडकोत समस्यांचा डोंगर

इंदिरानगर ः महापालिका निवडणुका होऊन त्यांचा निकालही लागला असला, तरी वाढत्या समस्यांमुळे इंदिरानगर परिसरातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत. नूतन नगरसेवकांनी अद्याप पदभार घेतला नसल्याने प्रशासनावरही कोणाचा अंकुश दिसून येत नाही. इंदिरानगर भागातील पेठेनगररोडवर असलेला धोकादायक खड्डा व त्यातच लगतच्या ड्रेनेजमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे जलमय झालेला रस्ता यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. अनेक भागांतील रस्ते, वीज, पाणी आदींसह अन्य मूलभूत समस्यांदेखील प्रलंबित असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

इंदिरानगर येथील पेठेनगररोडवरील जाखडीनगर येथे मुख्य रस्त्यावर अनेक वर्षांपासून एक खड्डा आहे. रस्त्याच्या मधोमध हा खड्डा असल्याने या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. हा खड्डा बुजविण्यात यावा म्हणून अनेक वेळा नागरिकांनी स्थानिक नगरसेवक असो किंवा महापालिका असो यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, तात्पुरत्या स्वरूपात हा खड्डा बुजविण्यात येत असतो. मागील आठवड्यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर परिसरातील सर्वच रस्त्यांना डांबरीकरण करण्यात आले असतानाही केवळ हाच खड्डा तसाच ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांपासून या खड्ड्यालगत असलेल्या ड्रेनेजमधून दुर्गंधीयुक्‍त पाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे. निवडणुकीपूर्वी आश्वासने देणारे निवडणूक निकालानंतर या ठिकाणी फिरकलेही नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. हा खड्डा तातडीने बुजविण्याबरोबरच या ठिकाणी पथदीपांची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन व्हॉट्सअॅप यूजर्सना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोरक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकेल, असा मजकूर व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून नागरिकांच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अशोक कुलकर्णी (३१) आणि सागर राजेंद्र खैरनार (२१, दोघेही रा. सोमवार पेठ, मालेगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या दोघांनी जातीय तेढ परसवण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे पोलिसांनी शोधून काढले आहेत. मालेगाव शहरात १४ फेब्रुवारी रोजी बजरंग दल आणि गोरक्षा समितीचे प्रखंड जिल्हा सहमंत्री मच्छिंद्र शिर्के यांना ८ ते १० जणांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. या घटनेमुळे मालेगावमधील दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजांकडून मोर्चे काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तसेच काही ठिकाणी किरकोळ दगडफेक होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. याच दरम्यान, काही प्रक्षोभक मेसेज व्हॉट्सअॅपवर प्रसारीत करण्यात आले. याची गंभीर दखल घेत सायबर क्राइम विभागाने मालेगाव छावणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी कुलकर्णी आणि खैरनार या दोघा संशयितांना अटक केली. १४ फेब्रुवारीच्या दिवशी आणि त्यानंतर दोघा संशयितांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा मजकूर प्रसारित केल्याचे पुरावे पोलिसांनी शोधून काढले आहेत. पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस तसेच सायबर विभागाने ही कामगिरी केली. यापूर्वी, ग्रामीण भागात झालेल्या दंगलीदरम्यान अफवा पसरवणाऱ्याविरोधातही ग्रामीण पोलिसांनी ८ ते ९ गुन्हे दाखल केले होते.

व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडियाचा दुरुपयोग केल्यास समाजकंटकांना शोधून काढले जातेच. मेसेजेस, व्हिडीओ फॉरवर्ड करताना सर्वांनी खबरदारी घ्यावी.
- अकुंश शिंदे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. शिंदेला न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या डॉ. बळीराम शिंदेला कोर्टाने मंगळवारी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. डॉ. शिंदेची लागलीच नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली. डॉ. शिंदेला २० फेब्रुवारी रोजी मुंबई नाका पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कोठडीत होता. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास कोर्टासमोर हजर करण्यात आले. बचाव तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.

मुंबई नाका तसेच ओझर येथे डॉ. शिंदेचे दोन मोठे हॉस्पिटल आहेत. होमीओपॅथीची डिग्री असताना अनेक वर्षांपासून डॉ. शिंदे अॅलोपॅथीनुसार पेशंटवर उपचार करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. अवैधपणे गर्भपात करून डॉ. शिंदेने भरपूर माया जमवली आहे. मुंबई नाका येथील हॉस्पिटलची बाजार भावानुसार किंमत सात कोटी रुपये असल्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी स्पष्ट केले.

गर्भपाताचा गोरखधंदा
डॉ. शिंदेच्या मुंबई नाका येथील हॉस्पिटलमध्ये बंदी असलेली अनेक औषधे पोलिसांना सापडली आहेत. विशेषतः गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा यात समावेश आहे. दरम्यान, मुंबई नाका पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी ३ फेब्रुवारी रोजी गोळे कॉलनीतील बंद पडलेल्या मेडिकल एजन्सीच्या नावे बंदी असलेल्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या दीपक महाजन यास ताब्यात घेतले. गर्भपातासाठी वापरण्यात येणारी तीन हजार रुपयांची औषधे ३० हजार रुपयांना विकल्याचे या प्रकरणात निष्पन्न झाले आहे. महाजनच्या सासऱ्याच्या बंद पडलेल्या एजन्सीच्या नावाचा फायदा घेत हे काम सुरू होते. विशेष म्हणजे या प्रकरणी दोन मेडिकल व्यावासायिकांवर पोलिसांनी कारवाई केली.

कारवाईनंतरही सोनोग्राफी सुरू
अवैध गर्भपात करणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशिन यापूर्वी सील करण्यात आले होते. मात्र, डॉ. शिंदेने सील ठोकलेल्या मशिन्सच्या वायरींगमध्ये बदल केले. तसेच त्याचे कनेक्शन एका टीव्हीला जोडले. गर्भपातासाठी येणाऱ्या महिलांना तो याच टीव्हीवर सर्व चित्र स्पष्ट करून दाखवित होता. मुलगी नको यासाठी आग्रही असलेल्या कुटुंबातील किती महिलांवर डॉ. शिंदे असे अघोरी उपचार केले हे अद्याप समोर आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ नराधमास १० वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तानाजी उघडे यास नाशिक जिल्हा कोर्टाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दोन वर्षांपूर्वी इगतपुरीमध्ये ही घटना घडली होती. त्याची सुनावणी कोर्टात झाली. त्यावेळी कोर्टाने हा निकाल दिला.

इगतपुरी तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी २५ डिसेंबर २०१५ रोजी आपल्या मामाकडे (परदेशवाडी) जात होती. त्याचवेळी आरोपी तानाजी मुरलीधर उघडे (२३, रा. देवाची वाडी, ता. इगतपुरी) याने या मुलीचा रस्ता अडवून तिला शिर्डीला फिरवून आणण्याचे अमिष दाखवून अपहरण केले. यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत सोबत असलेल्या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर तानाजीच्या मोबाइलवर कुटुंबीयांनी फोन करून माहिती घेतली व दोघांनाही घेऊन गेले. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून घोटी पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी नाशिक जिल्हा कोर्टात सुरु होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या कोर्टापुढे ही सुनावणी झाली. सरकारी वकील दीपशिखा भिडे-भांड यांनी सहा साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी पिडीत मुलगी ही कोर्टात फितूर झाली. मात्र, कोर्टाने वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून आरोपी उघडे यास बलात्काराच्या गुन्ह्यात १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरी तर अपहरणाच्या गुन्ह्यात ३ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूल न देताच ‘त्याने’ खुडली कळी

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

गर्भलिंगनिदान आणि बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉ. बळीराम शिंदेने असह्य वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेचा भूल न देताच गर्भपात केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. होमिओपॅथीची डिग्री असलेल्या डॉ. शिंदेच्या या अनैसर्गिक पद्धतीच्या गर्भपाताने या महिलेचे पुन्हा मातृत्वाचे स्वप्नही भंगले आहे.

एका महिलेला पहिली मुलगी होती. दुसऱ्या वेळी काय होणार, याची उत्सुकता तिच्या कुटुंबीयांना होती. ओझर येथील डॉ. बळीराम शिंदेचा पत्ता मिळाल्यानंतर ही महिला तपासणीसाठी पोहोचली. तपासणीअंती गर्भ मुलीचाच असल्याचे डॉ. शिंदेने सांगितले. फक्त ३० हजार रुपये द्या अन् गर्भपात करा. अनेक यशस्वी गर्भपात केले. कोणालाही अडचण आली नाही, असे म्हणत डॉ. शिंदे याने महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतले. दुसऱ्या दिवशी डॉ. शिंदेने गर्भपातास सुरुवात केली. भूलतज्ज्ञ, सर्जन नसताना डॉ. शिंदे याने पशुवत गर्भपातास सुरुवात केली. महिला असह्य वेदनांनी ओरडत होती. भूल न दिल्याने वेदना मस्तकात जात होत्या. अखेर कसाबसा गर्भ काढला. मात्र, गर्भपिशवीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे या महिलेला पुन्हा कधीही मातृत्वाची संधी मिळणार नाही. बेकायदा गर्भपाताची ही अंगावर शहारे आणणारी ही कहाणी मुंबई नाका पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश हिरे आणि प्रणिता पवार यांनी तपासातून समोर आणली आहे.

मुंबई नाका, तसेच ओझर येथे डॉ. शिंदेचे दोन मोठे हॉस्पिटल आहेत. होमिओपॅथीची डिग्री असताना अनेक वर्षांपासून डॉ. शिंदे अॅलोपॅथीनुसार पेशंटवर उपचार करीत असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. मुंबई नाका येथील हॉस्पिटलची बाजारभावानुसार किंमत सात कोटी रुपये असल्याचे पोलिस उपनिरीक्षक हिरे यांनी स्पष्ट केले.

‘भूल द्या, नाही तर मला मारून टाका!’

गर्भपात करताना डॉ. शिंदे भूलतज्ज्ञालाही सोबत घेत नसल्याचे तपासातून समोर आले आहे. भूल न देताच गर्भपात सुरू असताना महिलेला प्रचंड वेदना होत होत्या. महिला विव्हळत होती. मात्र, डॉ. शिंदेचा पशुवत गर्भपात सुरूच होता. असह्य वेदनांनी त्रस्त झालेली ही महिला अखेर उद्वेगाने म्हणाली, ‘डॉक्टर, भूल द्या; नाही तर मला तरी मारून टाका!’ तिच्या या उद्वेगातच डॉ. शिंदेची गर्भपाताची प्रक्रिया किती क्रूर होती याचा प्रत्यय येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिशन कॉपीमुक्त परीक्षा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बारावीच्या परीक्षेत कोणत्याही पेपरला विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा बोर्डाने मिशन कॉपीमुक्त अभियानवर भर दिला आहे.

जिल्हाभरात कोठेही कॉपी होऊ नये यासाठी सात भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. एका पथकामध्ये पाच जणांचा समावेश आहे.

एचएससी बोर्डातर्फे मंगळवारी इंग्लिशचा पहिलाच पेपर झाला. अतिशय आनंदाच्या वातावरणात विद्यार्थी ठिकठिकाणी परीक्षा केंद्रांवर पेपरला बसले होते. नाशिकमध्येही शाळाशाळांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसत होते. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक होती. सेंटर सापडल्यानंतर आपापला नंबर सापडण्यासाठी विद्यार्थी लवकर परीक्षा केंद्रावर आलेले होते. काहीजणांनी आपापल्या पालकांनाही सोबत आणलेले होते. एचएससी बोर्डाची भरारी पथके कॉपीबहाद्दरांवर करडी नजर असून, कॉपीमुक्त अभियानासह तणावमुक्त परीक्षेवर भर देण्यात येत आहे.

२२ मार्चला अखेरचा पेपर
बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्यास यंदा दोन महिने उशीर झाला होता. हे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरही अखंड एकामागोमाग एक पेपर आल्याने वादात सापडले होते. विद्यार्थी , पालकांसह शिक्षक संघटनांनीही या वेळापत्रकावर आक्षेप घेतल्यानंतर यात अनुकूल बदल करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार आता परीक्षा पार पडत आहे. प्रत्येक दोन पेपर दरम्यान किमान एक दिवसाचा खंड देण्यात आला आहे. २२ मार्च रोजी या मालिकेतील अखेरचा पेपर पार पडणार आहे.

विभागातून १ लाख ६८ हजार विद्यार्थी
नाशिक विभागातून १ लाख ६८ हजार २८७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विभाग नाशिक जिल्ह्यात ७४ हजार ७१९ , धुळे जिल्ह्यत २५ हजार ४७४, जळगाव जिल्ह्यात ५१ हजार ७३९, तर नंदुरबार जिल्ह्यात १६ हजार ३५५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी नाशिक विभागात २१८ केंद्र आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील केंद्रसंख्या ८६, धुळे जिल्ह्यात ४३, जळगाव जिल्ह्यात ६९ तर नंदुरबार जिल्ह्यात २० परीक्षा केंद्र आहेत.

दत्तूही बसला परीक्षेला
निफाड/मनमाड : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चांदवड तालुक्याचे नाव जगभर नेणारा ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील महाविद्यालय या केंद्रावरून बारावीची परीक्षा देत आहे. मंगळवारी इंग्रजी या विषयाचा पेपर त्याने दिला. आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आपल्या बरोबर बारावीचा पेपर देत आहे ही बाब इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यासह तीन सदस्यांच्या भरारी पथकाने तपासणी केली. यावेळी त्यांनी दत्तूच्या वर्गातही पाहणी केली. रोइंग खेळातील ऑलिपिंकपटू दत्तूला दहावीनंतर कॉलेजला सहा ते सात वर्ष जाता आले नाही. म्हणून लासलगावच्या लोकनेते दत्ताजी पाटील कॉलेजमधून १७ क्रमांकाचा फॉर्म भरून तो बारावीची परीक्षा देत आहे. दत्तू पुण्यात प्रशिक्षण घेतोय. मात्र, लष्करात बढतीसाठी बारावी पास होणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विद्यापीठासाठी युवासेनेचा रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा न देणे आणि धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय याविरुद्ध युवासेनातर्फे बुधवारी (दि. १) पारोळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प झाली होती. या वेळी युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांच्यासह अनेक युवासैनिकांना पोलिसांनी कारवाई करीत अटक करून सुटका केली.

धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे निर्णय नेहमीच घेतले जात असून याविरुद्ध जिल्हा युवा सेनेने हे आंदोलन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. पारोळा चौफुलीवर हे रास्तारोको आंदोलन करून राज्य सरकारच्या धोरणाविरोधात युवकांनी घोषणाबाजी केली.

याआधीही युवासेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढून निवेदन दिले होते. कृषी विद्यापीठ धुळ्यात साकारून जिल्ह्याला न्याय देण्यात यावा, शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. हा निर्णय सरकारने तात्काळ मागे घ्यावा. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र शहरात उभारले जावे, यासारख्या मागण्यासाठी युवासेनेने आंदोलन केले. यासाठी देवूपरातील सर्व्हे नं. १११ व ११२ या जागेचा मनपाने पुन्हा ठराव करून उपकेंद्रासाठी जागा देण्यात यावी. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी महाराष्ट्र राज्यात एकच विद्यापीठ करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images