Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिन्याकाठी एक अर्भक रस्त्यावर

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला शहरात गणपतीचे जोरदार स्वागत झाले. गौरीपूजनाची सर्वत्र लगबग होती. स्त्रीशक्तीचा जागर होत असताना एका निर्दयी कुटुंबाने अवघ्या १५ दिवसांच्या मुलीला मरण्यासाठी रस्त्यावर फेकले. नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली. मात्र, सहा महिने झाले तरी तिच्या पालकाचा पत्ता नाही. २०१६ मध्ये अशा प्रकारे दहा मुलांना मरण्यासाठी रस्त्यावर सोडून देण्यात आल्याचे पोलिस नोंदीवरून स्पष्ट होते. हे अर्भक शिंदे हॉस्पिटलपासून काही फर्लांगावर आढळल्याने या घटनेचा संबंधही पोलिस आता नव्याने पडताळून पाहत आहेत.

मुंबई नाका पोलिस स्टेशनचा दूरध्वनी ९ सप्टेंबरच्या भल्या सकाळी खणखणला. कपड्यात गुंडाळलेलं लहान मूल मोकळ्या जागेत असून, रडत असल्याचे समोरील व्यक्तीने सांगितले. गर्भपात प्रकरणात चर्चेत असलेल्या डॉ. बळीराम शिंदेच्या हॉस्पिटलपासून काही फर्लांग अंतरावर हा प्रकार घडला होता. त्या वेळी पोलिसांच्या डॉग स्क्वॉडने भाभानगरमार्गे भारतनगर झोपडपट्टीपर्यंत माग काढला. मात्र, तपासात पुढे काही प्रगती झाली नाही. तपासाची फाइल बंद होण्याच्या मार्गावर असताना डॉ. बळीराम शिंदेच्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला गैरप्रकार उघडकीस आला. शिंदे हॉस्पिटलपासून काही फर्लांग अंतरावर हे अर्भक सापडले होते. त्या वेळी या दोन घटनांचा अर्थाअर्थी संबंध जोडला गेला नव्हता. आता मात्र पोलिस तसे कनेक्शन शोधून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तपासाधिकारी पीएसआय प्रणिता पवार यांनी सांगितले, की डॉ. शिंदे हॉस्पिटलमध्ये झालेल्या गैरप्रकारांबाबत गुन्हा दाखल असून, चौकशी सुरू आहे. त्यात या अर्भकाच्या प्रकरणाचे डॉ. शिंदे हॉस्पिटलशी काही कनेक्शन आहे काय, हे तपासून पाहिले जात आहे. यासाठी डॉ. शिंदे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली जाईल, असे पीएसआय पवार यांनी स्पष्ट केले. अर्भकास मरण्यासाठी रस्त्यावर सोडून देण्याचे शहरात महिन्याकाठी किमान एक प्रकरण समोर येते. कोवळे जीव वाचले तर त्यांना ‘वात्सल्य’मध्ये भरती केले जाते. गत वर्षात १० पैकी तीन अर्भक मृतावस्थेत आढळले होते.

पीएसआय पवारांची इच्छा अद्याप अपूर्ण

१५ दिवसांच्या त्या निरागस मुलीची दोन दिवस पीएसआय पवार यांनी देखभाल केली. रस्त्यावर सोडून देण्यात आल्याने डासांनी तिला हैराण करून सोडले होते. या मुलीला दत्तक घेण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी तसा अर्जही संबंधीत विभागाकडे केला आहे. मात्र, मूल दत्तक घेणाऱ्या पालकाला कोणते मूल दत्तक घ्यायचे हे सांगता येत नाही. तसा अधिकारच पालकांना नाही. माझे प्रयत्न सुरू असून, त्याला कितपत यश मिळते, याची प्रतीक्षा असल्याचे पीएसआय पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपमधील संघर्ष चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही भाजपमधील गटबाजी थांबत नसल्याचे चित्र आहे. निवडणूक काळात दोन लाख रुपयांच्या व्हिडीओ क्लिपमुळे हैराण झालेल्या भाजपची आता एक ऑडीओ क्लिप उघड झाली आहे. आमदार सीमा हिरे यांनी प्रभाग ८ मध्ये भाजपच्या एका उमेदवाराला मत देवू नका, असे आवाहन त्यात केलेले आहे. भाजपमधील या पाडापाडीच्या राजकारणाने अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी काही उमेदवारांनी तर थेट दोन लाख रुपये मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ दहा लाख रुपये दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यानच्या काळात प्रभाग क्र. ८ व ९ च्या उमेदवारीवरून आमदार सीमा हिरे आणि शहर उपाध्यक्ष दिनकर पाटील यांच्यातही संघर्ष झाला होता. प्रभाग क्र. ८ मध्ये पाटील यांचा मुलगा अमोल पाटील पराभूत झाला. त्याचवेळी पाटील यांनी सीमा हिरे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलास शिंदेंना गटनेतेपदाचे बक्षीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेतील सत्तेपासून दूर राहिलेल्या शिवसेनेने आता आक्रमक चेहऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या प्रभागात चारही शिवसेनेचे उमेदवार निवडून आणणाऱ्या विलास शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांनी बुधवारीच मातोश्रीवर जावून शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर गुरूवारी गटनेतेपदावर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकांपूर्वी आघाडीवर असलेली शिवसेना निकालात मात्र पिछाडीवर गेली. शिवसेना एक नंबर राहील असे चित्र असताना उमेदवारी वाटपाच्यावेळी झालेला गोंधळ पक्षाला हानीकारक ठरला आहे, तर एबी फॉर्मची पळवापळवीही पक्षाला घातक ठरली आहे. त्यामुळे पक्ष एक नंबरवरून दुसऱ्या नंबरवर फेकला गेला. शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होणार आहे. भाजपची सत्ता पालिकेत येणार हे जवळपास स्पष्ट झाले असून, सेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहणार आहे. त्यामुळेच भाजपला व्यूहरचनेत पकडण्यासह त्यांची कोंडी करू करणाऱ्या आक्रमक चेहऱ्यांना शिवसेनेकडून महत्त्वाच्या पदांवर संधी दिली जाणार आहे. त्याअंतर्गत शिवसेनेच्या गटनेतेपदी प्रभाग क्र. ८ मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांनी आपल्या प्रभागातून चारही नगरसेवकांना निवडून आणले होते. शिंदे यांना पक्षातर्फे ही बक्षिसी देण्यात आली आहे. शिंदे यांनी बुधवारी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवीदास पिंगळेंना आणखी एक दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
सेंट्रल बँक ऑफ इंडियाशी संलग्न असलेल्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेचे संचालक माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे. सेंट्रल गोदावरीचे अध्यक्ष नगरसेवक दिनकर पाटील यांनी सलग तीनवेळा अनुपस्थित राहिलेले पिंगळे यांचे पद रद्द करावे याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. यानंतर सेंट्रल गोदावरीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या मागणीवरून संचालक पिंगळे यांचे संचालक पद रद्द झाल्याबाबतचे अध्यक्ष पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
सेंट्रल गोदावरीचे सन २०११ ते २०१५ संचालक असलेल्यांनी अभ्यास दौऱ्यात बँकेच्याच पैशांचा अपहार केला असल्याचीही तक्रार अध्यक्ष पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. संबधित तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी अभ्यास दौऱ्यातील खर्च सन २०११ ते २०१५ मध्ये असलेल्या संचालकांकडून वसूल करण्यात यावा असे आदेश दिले असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. संचालक पद रद्द झालेले पिंगळे यांच्यासह त्यावेळी संचालक असलेल्यांना अभ्यास दौऱ्याचा खर्च द्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेज स्वच्छ; खड्डा मात्र जैसे थे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगरमधील पेठेनगर रोडवर असलेल्या जाखडीनगर भागातील रस्त्यावर वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त ड्रेनेजच्या पाण्याचे व येथील खड्ड्यांचे सचित्र वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन या ड्रेनेजची दुरुस्ती केली. रस्त्यावरून वाहणारे ड्रेनेजचे पाणी बंद झाले असले तरी धोकादायक खड्डा अद्यापही तसाच असल्याने आता बांधकाम विभागाला केव्हा जाग येणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

इंदिरानगर येथील पेठेनगर रोडवरील जाखडीनगर भागात मुख्य रस्त्यावर एक खड्डा अनेक दिवसांपासून आहे. या खड्ड्यामुळे येथे अनेक अपघात होऊन बरेच जण जखमी झाले आहेत. त्यातच दोन दिवसांपासून याठिकाणी असलेल्या एका ड्रेनेजमधून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत होते. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संबंधित ड्रेनेजमधून पाणी थांबविण्याबरोबरच आजूबाजुच्या ड्रेनेजचीही सफाई केली. मात्र रस्त्यातील धोकादायक खड्ड्याबाबत आता प्रशासन केव्हा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता बांधकाम विभागानेसुद्धा तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी म्हणजे भविष्यात होणारे अपघात टळण्यास मदत होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत हायमास्ट बंदच

$
0
0

मोठ्या दिव्यांचा पर्यायी वापर

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिवसाचे चोवीस तास गजबजलेला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बसविण्यात आलेला हायमास्ट बंद आहे. सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव ज्या भागात होतात. त्याच भागात हा हायमास्ट बसविण्यात आलेला आहे. हा हायमास्ट सुरू असता तर बाजार समितीचा सर्वच भाग प्रकाशित झाला असता. हायमास्ट बंद असल्यामुळे ठिकठिकाणी मोठे दिवे बसवावे लागले आहेत. बंद अवस्थेत पडलेला हा हायमास्ट का बसविण्यात आला असावा, अशी शेतकरी, व्यापारी, अडतदार, हमाल, मापारी यांच्याकडून विचारणा होत आहे.

बाजार समितीत पाच वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात बसविण्यात आला असला तरी या हायमास्टचा प्रकाश बाजार समितीच्या आवाराला बघायलाच मिळाला नाही. सायंकाळी बाजार समितीच्या आवारात पालेभाज्यांच्या लिलाव होत असतात. या लिलावाच्या वेळी हा भाग प्रकाशित असणे अपेक्षित असल्यामुळे हा हायमास्ट येथे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हायमास्टचा वापर केल्याने विजेचा वापर वाढला. त्यामुळे लाईट बील मोठ्या प्रमाणात येऊ लागले. तसेच या हायमास्टच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च जास्त असल्यामळे तो बंद ठेवणेच पसंत करण्यात आल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगितले जाते.

पालेभाज्यांच्या लिलावानंतर पहाटेच्या सुमारास या भागात किरकोळ भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाज्या खरेदी करण्यासाठी येणाऱ्या भाजी विक्रेत्यांची वाहने, हातगाड्या याच भागात थांबलेल्या असतात. तसेच आजूबाजूच्या व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर रात्रीच्या वेळी आलेल्या भाजीपाल्याच्या खरेदीनंतर पॅकिंगचे कामे याच भागात सुरू असल्याने एक हायमास्टच्या प्रकाशात हा सर्व भाग प्रकाशित होऊ शकला असता. एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवे लावण्याची गरज भासली नसती, असा सूर अडतदार, शेतकरी, व्यापारी यांच्या चर्चेतून येत आहे.

-------------------

हायमास्टच्या वापरामुळे लाईट बील जास्त येत होते. त्याचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्चही मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे हायमास्टच्या वापराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या ऐवजी मोठे दिवे लावण्यात आलेले आहेत. सायंकाळच्या पालेभाज्यांच्या लिलावानंतर हे दिवे बंद करण्यात येतात. त्यामुळे विजेची बचत होते.

- अरुण काळे, सचिव, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्यांची घसरण सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नगदी पिकांच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च निघावा, चलन खेळते असावे, घर खर्चासाठी हाती पैसा असावा, अशा उद्देशाने थोड्याशा कालावधीत विक्रीस तयार होणाऱ्या पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याचा शेतकरी प्रयत्न करतात. पालेभाज्यांचा चांगले दर मिळाल्यास चांगला पैसा हाती मिळत असल्याने शेतकऱ्यांचे पालेभाज्यांच्या लागवडीकडे कल असतो. मात्र, गेल्या सात-आठ महिन्यांपासून पालेभाज्यांच्या दरात वाढच झालेली नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने पिके तरी कोणती घ्यायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

इतर पिकांच्या तुलनेत म्हणजे दीड ते पावणे दोन महिन्यांच्या कालावधीत तयार होणाऱ्या पालेभाज्यांच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल असतो. बागायती शेतीत नगदी पिकांपेक्षा कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात आदींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. सध्या कोथिंबीर ५ ते ८, मेथी २ ते ३, शेपू १ ते ३, कांदापात ३ ते ५ रुपये प्रति जुडी या भावात लिलावात विक्री होत आहेत. फळे आणि भाजीपाला नियंत्रण मुक्त केल्यापासून आडत ही व्यापाऱ्यांकडून वसूल केली जाऊ लागली आहे. तेव्हापासून भाजीपाल्याची विशेषतः पालेभाज्यांच्या भावात वाढच झाली नाही. आवक मर्यादित असतानाही भाव वाढ झाली नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. भाववाढीच्या अपेक्षेने पालेभाज्या करीत शेतकऱ्याच्या पदरी निराशाच येत आहे. एकरी येणारा खर्च, मिळणारे उत्पादन यांची तुलना केल्यास पालेभाज्यांचे पीक तोट्यात येत आहे.



उत्पादन खर्चही भरून निघत नाही

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्याच्या विविध भागातून पालेभाज्या सायंकाळच्या लिलावासाठी बाजारात दाखल होतात. मुंबईला सर्वात जास्त पालेभाज्या नाशिक बाजार समितीतूनच पाठविला जातो. हंगामात साधारणतः पाच ते सहा लाख जुडी पालेभाज्यांची आवक बाजार समिती होत असते. सध्या ही आवक एक ते दीड लाख जुडी अशी आहे. आवक मर्यादित असतानाही भावात वाढ नसल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. मशागत, बियाणे, खते, औषधे, मजूरी, वाहतूक आदींच्या खर्चाचा हिशेब लावल्यास शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचे दिसते. काढणीला तयार झालेल्या पालेभाज्या शेतात तशाच पडू देण्यापेक्षा निदान खर्च तरी निघेल या अपेक्षेने विक्रीसाठी आणले जातात. कित्येकदा तर वाहतूक खर्चही निघत नसल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅलीत महिला पोलिसांचाही घुमणार आवाज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’ची बाईक रॅली आता अतिशय आकर्षक वळणावर येऊन ठेपली असून रोजच नोंदणी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. यात अनेक महिला ग्रुप ग्रुपने सहभागी होणार असून त्यांच्या सहभागामुळे बाईक रॅलीची रंगत आणखीनच वाढणार आहे. विशेष म्हणजे या रॅलीच्या आखाड्यात महिला पोलिसही उतरल्या असून, गुरुवारी बुकिंग करण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती.

बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी ग्रुप तयार केले असून एकादोघींनी मोटार सायकल घेऊन येण्यापेक्षा ग्रुपने येणे महिलांनी पसंत केले असून त्यासाठी आता महिला वर्ग थीमच्या शोधात आहे. पैकी काहीजणींनी नऊवारी साडी, तर काहींनी व्हाइॅट टी शर्ट, ब्ल्यू जीन्स अशा पेहरावात येण्याचे मनाशी पक्के केले असून महिला पोलिस त्यांच्या गणवेशात या बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत.

भोसला मिलिटरी कॉलेजपासून सुरू होणारी ही रॅली कॉलेजरोड, डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, जेहान सर्कल, नवशा गणपती, बारदान फाटा, साधना मिसळ, मोतीवाला कॉलेज, त्र्यंबक रोड, एबीबी सर्कल व पुन्हा भोसला मिलिटरी कॉलेज या मार्गाने पूर्ण होईल. महिलांनी सुरक्षेच्या कारणास्तव हेल्मेट घालून येणे बंधनकारक असून ‘हेल्मेट घाला, सुरक्षितता पाळा’ हे ब्रीद खरे करून दाखवायचे असेल तर याबाबत नो एक्सक्यूज ठेवण्यात आला आहे.

रॅलीमध्ये १८ वर्षांपुढील महिलांनाच सहभागी होता येणार आहे. मोपेड किंवा गीअर बाइकला सहभागाची परवानगी असून सुरक्षेसतव हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मोबाइलवर BIKERALLYNSK टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करता येणार आहे. किंवा ६६३७९८७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून देखील नावनोंदणी करता येणार आहे. http://allwomenbikerally.com या वेबसाइटवरही रजिस्ट्रेशन करता येणार आहे. महिलांनी बाइक रॅलीचा आनंद लुटण्यासाठी नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आतंकवादी प्रवृत्तींवर उपासमारीची वेळ

$
0
0

हंसराज अहिर यांच्याकडून नोटाबंदीचे समर्थन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीचे परिणाम आता दिसत असून गरिबी, काळापैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यास त्यामुळे मदत होत आहे. इतकेच नव्हे तर या निर्णयानंतर माओवादी, आतंकवादी प्रवृत्तींवर उपासमारीची वेळ आल्याचा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केला.

ठक्कर डोम येथे जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित डिजिधन मेळाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नीती आयोगाचे सहसचिव विक्रम गौर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आदी उपस्थित होते.

यावेळी अहिर म्हणाले, की केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतला. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. नोटाबंदी हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा सर्वात धाडसी निर्णय आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. कॅशलेस व्यवहारांमुळे करदात्यांची संख्या वाढून त्याचा लाभ जनकल्याणाच्या योजना राबविण्यासाठी होईल. नोटाबंदीचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेण्यात आला. आतंकवादी, माओवादी हत्यारे खरेदी रोखीने करीत असत. नोटाबंदीमुळे अशा व्यवहारांवर मर्यादा आल्या असून, अशा प्रवृत्तींवर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ गरिबी हटावच्या नाऱ्याने गरिबी कमी होणार नाही. त्यासाठी कॅशलेस व्यवहारांकडे मोठ्या प्रमाणावर वळावे लागले असे अहिर म्हणाले.

आर्थिक क्षेत्रात संगणकीय प्रणालीचा वापर वाढल्याने व्यवहाराचा वेग वाढला आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता येत असून, डिजिटल व्यवहाराने केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर सामान्य माणसाच्या जीवनातही क्रांती आणली आहे, असा दावा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी मेळ्यात लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेच्या सोडतीद्वारे अनेकांना पुरस्कार मिळविण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यात येत असून, विविध बँकांच्या ४०० पेक्षा जास्त शाखांनी प्रत्येकी एक गाव रोखरहीत व्यवहारासाठी दत्तक घेतले आहे, अशी माहिती दिली.

भीमअॅपचे डाऊनलोड १७ लाखांवर

डिजिटल व्यवहार आता खूप सोपे झाले असून डेबिट, क्रेडिट किंवा इतर कार्ड, यूएसएसडी, आधारकार्ड, युपीआय, मोबाइल वॅलेट, बँकेचे प्रीपेड कार्ड, पीओएस मशिन, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, रुपे कार्ड असे अनेक पर्याय यासाठी उपलब्ध झाले असून, भीमअॅपचे डाऊनलोड १७ लाखांवर झाल्याची माहिती या मेळ्यात देण्यात आली.

मराठी अन् हिंदीतून संवाद

सुरुवातीला मराठीत संवाद साधणाऱ्या अहिर यांनी नंतर मात्र हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. आपण केंद्रीय मंत्री आहोत. त्यामुळे मला हिंदीतही संवाद साधावा लागेल, असे म्हणत त्यांनी हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. कार्यक्रमास उपस्थित केंद्रीय मंत्री भामरे यांनी मात्र मराठीतच संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांसाठी झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण

$
0
0

दोन दिवसांत ११ हजार ७९३ अर्जांची विक्री

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा घरकुलासाठी अर्जांचा पाऊस पडत असून, दोन दिवसात ११ हजार ७९३ अर्जांची विक्री झाली आहे. शुक्रवारीही पालिकेच्या कार्यालयांमध्ये अर्जासाठी गर्दी कायम होती. दुसरीकडे झोपडपट्टीतील रहिवाशांचे आवास योजनेसाठी घरपोच सर्व्हेक्षण होणार असल्याने त्यांनी अर्जासाठी गर्दी करू नये, तसेच अर्जही करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

केंद्र सरकारने सन २०२२ मध्ये प्रत्येकाला घर देण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण केले जात आहे. शहरातील १६८ झोपडपट्ट्यांपैकी २९ झोपडपट्टीधारकांना जेएनयुआरएमंतर्गत घरे दिले आहेत. उर्वरित झोपडपट्टीधारकांचे एजन्सीमार्फत डोअर टू डोअर सर्व्हेक्षण केले जात आहे. तरीही झोपडपट्टीतील नागरिक हे घरकुलासाठी थेट महापालिकेच्या कार्यालयांमध्ये येऊन अर्ज भरत आहेत. काही जण महा ई सेवा केंद्राकडून अर्ज दाखल करीत आहेत. काही जणांकडून फुकटात घर मिळेल असे सांगून प्रचार केला जात असल्याने झोपडपट्टीतील रहिवाशी सर्व्हेक्षणाची वाट न पाहता थेट विभागीय कार्यालयामंध्ये येऊन अर्ज दाखल करीत आहेत. त्यामुळे पालिकेची अडचण झाली आहे. केवळ डिमांड सर्वेक्षणात आढळलेल्यांनाच अर्ज करण्याची गरज राहणार आहे. परंतु, सरसकट अर्ज दाखल केले जात आहेत.

झोपडपट्टीवासीयांना अर्जाची गरज नाही

झोपडपट्टीवासीयांनी अर्ज करण्याची गरज नाही. झोपडपट्टीधारकांच्या सर्वेक्षणासाठी थेट घरपोच कर्मचारी येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना अर्ज करण्याची गरज नसल्याचे पालिकेने स्पष्‍ट केले आहे. झोपडपट्टी वगळता अन्य घटकांनी मात्र पालिकेच्या कार्यालयांमध्ये डिमांड अर्ज भरावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ उमेदवारांवर गंभीर गुन्हे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या १२२ पैकी ११४ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करून विजयी उमेदवारांचे गुन्हेगारी, आर्थिक व इतर पार्श्वभूमीचे विश्लेषण केले आहे. यात आठ उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर लोड न केल्यामुळे त्याचे विश्लेषण यात नाही. या विश्लेषणात ११४ पैकी २७ उमेदवारांच्या विरोधात गुन्हे दाखल असून, त्यात १७ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याचे म्हटले आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दादागिरी, तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

या अहवालात वयोगटाची आकडेवारीसुध्दा देण्यात आली असून, त्यात ४१ ते ५० वयोगटातील सर्वाधिक ३७ उमेदवार असल्याचे म्हटले आहे. गंभीर गुन्हे असलेल्या विजयी उमेदवारांत भाजपच्या ६१ पैकी ४, शिवसेनेच्या ३२ पैकी ८, राष्ट्रवादीच्या ६ उमेदवारांपैकी २ व मनसेच्या ५ उमेदवारांपैकी दोघांचा समावेश आहे. कोट्यधीश उमेदवारांत भाजपचे उध्दव निमसे पहिल्या क्रमांकावर असून, त्यांची मालमत्ता २४ कोटी आहे. राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले (२० कोटी), शिवसेनेच्या कल्पना चुंबळे (१९ कोटी), भाजपचे शशिकांत जाधव (१९ कोटी ), राष्ट्रवादीचे गजानन शेलार (१३ कोटी), भाजपचे दिनकर आढाव (१२ कोटी ), भाजपच्या संगीता गायकवाड (१२ कोटी ), शिवसेनेचे दत्तात्रय सूर्यवंशी (१० कोटी), मनसेचे सलिम शेख (१० कोटी), शिवसेनेचे शामकुमार साबळे (१० कोटी) यांचा टॉपटेनमध्ये समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारविरोधात धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रात तसेच राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने सत्तेचा नियोजनबद्ध पद्धतीने गैरवापर केला असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांनी केला आहे. याविरोधात लोकशाही बचाव आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणाही दिल्या.

लोकशाही बचाव आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर हुतात्मा स्मारकात बैठक घेण्यात आली. सत्ताधारी फडणवीस सरकारने प्रशासनामार्फत सदोष मतदारयाद्या तयार केल्या. अंतिम मतदारयाद्या जाहीर झाल्यानंतर त्यांच्यात अनेकदा बदल केले. एका प्रभागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे खोडसाळपणे दुसऱ्या प्रभागात टाकून दुसऱ्याच प्रभागातील नावे पहिल्या प्रभागात टाकली. तसेच मशिनमध्ये घोळ करून कुठलेही बटण दाबले तरी अगोदर ठरलेल्या उमेदवारालाच ते मत जावे, अशी व्यवस्था केली. निवडणुकीची प्रशासनाच्या वतीने सखोल चौकशी करावी व ज्यांनी लोकशाहीचा गळा गोटण्याचे काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. संजय अपरांती, डॉ. डी. एल. कराड,​ समाधान भारतीय, विलास देसले यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग?

या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी व पालकमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचे सातत्याने उल्लंघन केले आहे. नाशिकच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी मी नाशिकला दत्तक घेत आहे, असे मतदारांवर प्रभाव टाकणारे आश्वासन दिले. मुख्यमंत्री सिन्नरच्या सभेत म्हणाले, की सिन्नरच्या विकासासाठी हवी ती रक्कम टाका, कोऱ्या लेटर हेडवर सही देतो. ही दोन्ही आश्वासने उघडपणे आदर्श आचारसंहितेचा भंग करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभागरचनेत प्रशासकीय बदल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने विभागीय प्रभागरचनेत फेरबदल केले असून १३, २४ आणि २६ प्रभागांमधील गोंधळ दूर करण्यात आला आहे. महापालिकेने नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, सातपूर, सिडको, पंचवटी आणि नाशिकरोड येथील समाविष्ट प्रभागांची घोषणा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
यामुळे नाशिकरोड व सिडको हे दोन प्रशासकीय दृष्ट्या सर्वात मोठे ठरले असून, तेथे सर्वाधिक सहा प्रभाग जोडण्यात आले आहेत. नाशिक पश्चिम हा विभाग प्रशासकीय दृष्ट्या सर्वात लहान प्रभाग ठरला आहे. येथे तीन प्रभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, या रचनेमुळे भाजपचे प्रभाग समित्यांचे गणितही सोपे झाले आहे.
महापालिकेच्या निवडणुका या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाल्या. त्यामुळे पालिकेत यापूर्वी द्विसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे तयार झालेल्या सहा विभागीय कार्यालयांमधील प्रभागांची प्रशासकीय रचना बदलण्यात आली होती. द्विसदस्यीय प्रभाग चार सदस्यीय झाल्याने प्रभागांची मोठी मोडतोड झाली. त्यामुळे काही प्रभाग मोठे तर काही प्रभाग लहान झाले. काही प्रभाग दुसऱ्या प्रभागांना जोडण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजासाठी या प्रभागांची रचना नव्याने करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते.
या प्रशासकीय प्रभागरचनेमुळे काही प्रभागांची गैरसोय झाली होती. सिडकोतील २४ हा प्रभाग नाशिक पश्चिममध्ये जोडला गेला होता. २६ हा प्रभाग सातपूरला जवळ असतानाही तो सिडकोत जोडला गेला होता. १३ हा प्रभाग पूर्वचा पश्चिमला जोडला गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्टिहीन कलाकार सादर करणार ‘अपूर्व मेघदूत’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
आरलीन निर्मित ‘अपूर्व मेघदूत’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग दि. १३ मार्च रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात होणार आहे. यात १९ अंध कलाकार असल्याची माहिती निर्मात्या रश्मी पांढरे व वीणा ढोले यांनी दिली.
संगीत, नृत्य नाटिका असलेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग पुणे येथे करण्यात आला. नाटकात १९ कलाकारांनी सहभाग नोंदविला असून, हे सर्वजण दृष्टीहीन आहेत. नाटकात कधी काम केले नाही किंवा नाटक पाहतासुद्धा येत नाही, अशा कलाकारांना पुण्यात एकत्र करून या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या नाटकाचा प्रयोग नाशिक शहरात व्हावा या हेतूने रोटरी क्लबने पुढाकार घेतला. दृष्टीहीन कलाकारांनी मेघदूतसारखे नाटक तयार करून सादर केले असल्याने या नाटकाला ‘अपूर्व मेघदूत’ असे नाव देण्यात आले आहे. लेखन, अनुवाद व गीतरचना गणेश दिघे यांनी केले असून, संकल्पना व दिग्दर्शन स्वागत यांनी केले आहे. बिपीन वर्तक यांचे संगीत असून अरविंद हसबनीस यांनी संगीत संयोजन केले आहे.
या प्रयोगासाठी दृष्टीप्राप्त व्यक्तींबरोबर बसून दृष्टीहीन मुलांना नाटक ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कालिदास कलामंदिरातील सुमारे ३७५ अंध विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिज‌िधन मेळ्यात इंटरनेट गायब!

$
0
0

bhavesh.brahmankar
@timesgroup.com
Tweet : @BhaveshBMT
नाशिक ः देशातील ६७वा डिज‌िधन मेळा पार पडल्याचा सुस्कारा जिल्हा प्रशासनाने सोडला असला तरी, प्रत्यक्षात या मेळ्यामध्ये इंटरनेटचेच धन गायब असल्याची बाब पुढे आली आहे. इंटरनेट कनेक्शनअभावी मेळ्याच्या ठिकाणी अनेक व्यवहार आणि सादरीकरणही होऊ शकले नाहीत. तर अनेक नागरिकांना कॅशलेस कारभार कसा करायचा याची माहितीही प्राप्त झाली नाही. त्यामुळे नाशिकमधील मेळ्याची हेतूपूर्तीच झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नागरिकांनी कॅशलेस व्यवहारांकडे वळावे आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी, या उद्देशाने नीती आयोगाच्या मार्गदर्शनानुसार देशभरामध्ये डिज‌िधन मेळे आयोजित केले जात आहेत. त्यानुसारच ६७वा डिज‌िधन मेळा नाशिक जिल्हा प्रशासनानेही आयोजित केला. ठक्कर डोम येथे होणाऱ्या या मेळ्यासाठी दोन केंद्रीय राज्यमंत्रीही आले. नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्रीही उपस्थित होते. मेळाव्याच्या ठिकाणी स्टॉलधारकांना सर्वाधिक क्षमतेचे इंटरनेट कनेक्शन आणि भेट देणाऱ्यांना मोफत वायफाय अशी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निश्चय आयोजकांनी केला होता. तशी घोषणाही केली. प्रत्यक्षात मोफत वायफाय तर सोडाच पण याठिकाणी साधे इंटरनेट कनेक्शनही स्टॉलधारकांना लाभू शकले नाही.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेळ्याच्या ठिकाणी मोफत फोरजी इंटरनेट आणि वायफाय सेवा देण्याची तयारी एका टेलिकॉम कंपनीने दर्शविली. मात्र, जिल्हा प्रशासनाने अन्य टेलिकॉम कंपनीची त्यासाठी निवड केली. कंपनीच्यावतीने मेळ्याच्या ठिकाणी १८ राऊटर्स लावण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणास्तव इंटरनेट कनेक्शन बंद झाले. याठिकाणी दोन्ही कंपन्यांचे प्रत्येकी १८ राऊटर्स लावले तर त्याचा अधिक फायदा होईल, असे जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले होते. त्याकडे काणाडोळा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दैव बलवत्तर म्हणून बचावले दोघे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील स्टेट बँक नजीक बारा बंगला परिसरात शुक्रवारी दुपारी भरधाव येणारी चारचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबास जोरदार धडक देत समोर असलेल्या सलून दुकानात खुसल्याने सलून दुकानाचा चेंदामेंदा झाला. दुकान मालक व दाढी करण्यासाठी आलेले गृहस्थ मात्र सुदैवाने बचावले. दोघांना किरकोळ दुखापत झाली. यामुळे बारा बंगला परिसरात मोठी गर्दी झाली होती.
शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्टेट बँकेच्याकडून साठफुटी रोडच्या दिशेने काळ्या रंगांची झायलो कार (एमएच १२ जी. झेड. ६२३८) वाहनचालक रोहित (वय २५ रा. पुणे) हा अत्यंत भरधाव वेगाने चालवत येत होता. त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या विजेच्या खांबावर ही गाडी जोरदार धडकली. धडक इतकी जोरदार होती की विजेचा खांब क्षणार्धात कोसळला. त्यानंतरही त्याला गाडीवर ताबा न मिळवता आल्याने समोर असलेल्या सलून टपरीवरीत कार घुसली. तेव्हा दुकानात मालक जयराम चित्ते हे एका गृहस्थची दाढी करीत होते. बेभान वेगाने आलेली ती गाडी टपरीवर जोरदार आदळली. दोघांनी टपरीतून बाहेर उडी घेत स्वतःचा जीव वाचवला.

या जबर धडकेने टपरीचा चेंदामेंदा झाला. तसेच बाजूला उभे असलेली दुकाचाकीचेदेखील नुकसान झाले. काही क्षणात हा भीषण अपघात झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या दोघांना तत्काळ नागरिकांनी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच छावणी पोल‌िस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारचालक चालक व मालक यांना ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत छावणी पोल‌िस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कारवाई सुरू होती. मात्र गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करी जवानाच्या चिठ्ठीने वाढला संशय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रकरण हाताबाहेर जाईल असे वाटले नव्हते. मॅडम कपडे धुवायला द्यायच्या इतकेच बोललो. तुम्हाला त्रास देण्याचा उद्देश नव्हता. सर्वांची माफी मागतो. कोर्ट मार्शलपेक्षा मरण परवडले, असे शेवटचे शब्द आहेत देवळाली कॅम्पमधील स्कूल ऑफ आर्टिलरीत आत्महत्या केलेल्या डी. एस. रॉय मॅथ्यू (वय ३५) याचे. मॅथ्यूच्या आत्महत्येमुळे देशभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रक्षा राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले आहेत.

स्कूल ऑफ अर्टीलरीतील मॅथ्यू (वय ३५) या जवानाने आत्महत्या केल्याची बाब गुरुवारी दुपारी समोर आली. चालक म्हणून नियुक्ती असलेला मॅथ्यू रॉकेट बॅटरी, बॅचलर बॅरेक येथे राहत होता. डिमोलेशन क्वार्टरमध्ये साधारणतः चार ते पाच दिवसांपूर्वी त्याने गळफास लावून घेतल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी मॅथ्यूचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यात मॅथ्यूने वरिष्ठांकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत आवाज उठवल्याचे समोर येत आहे. या व्हिडीओबाबत लष्करात चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे त्याला सतत कारवाईची भीती होती. त्यानंतर तो बेपत्ता होता. तसा रिपोर्ट लष्कराने त्याच्या मूळ गावी केरळ राज्यातील कोल्लम येथील जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी मॅथ्यूचा भाऊ जॉन मॅथ्यू याने केली आहे. ज्या व्हिडीओवरून हा प्रकार घडला, त्याच्या खोलात जाऊन आम्ही तपास करणार असल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी मटाशी बोलताना सांगितले.

आत्महत्या करणारा जवानाचा कुठल्या तरी साइटवरील स्टिंग आपॅरेशनमध्ये सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी समजते. तेव्हापासून तो अस्वस्थ होता. त्याने त्याच्या व्यथा वरिष्ठांना सांगितल्या नाहीत. २५ फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल.

- सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या शाहीमार्गावर सर्वाधिक हरकती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहर विकास योजनाच्या हरकती सुनावणी दरम्यान तीन दिवसांत २९० हरकत अर्जांवर सुनावणी झाली. तसेच समितीसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी ६० अर्जदार आलेच नाहीत. एकूण ४०० अर्ज दाखल झाले होते. सर्वाधिक हरकती सूचना शहरातील अंतर्गत रस्ते शाहीमार्ग रुंदीकरणावर घेण्यात आल्या.

शहराच्या विकास आराखड्यावर गेल्या तीन दिवसांपासनू विशेष समितीसमोर हरकतींवर सुनावणी सुरू होती. नागरिकांचे घरे, सार्वजनिक रस्त्यांवर आरक्षण टाकण्यात आल्यामुळे या आराखड्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिंहस्थ पर्वकाळात अवघ्या ७२ तासांचा सोहळा असतो. त्याकरिता नागरिकांना विस्थापित होण्याची वेळ आणू नका, अशी मागणी बहुतांश नागरिकांकडून करण्यात आली आहे. नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी आलेल्या सम‌ितीने अभिप्राय द्यावयाचा आहे. त्यानंतर नगररचना खाते पुढील अमलंबजावणी करणार आहे. सम‌ितीने काही जागेवर जाऊन पाहणी केली आहे.

नगराध्यक्षांचे आवाहन

सुनावनी दरम्यान नागरिकांनी मांडलेल्या मतांचा विचार होईल आणि शासनाकडे पाठपुरावा करून कोणाचेही नुकसान होणार नाही याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. अधिकाध‌िक आरक्षणे शासकीय जागेवरच होतील याकरिता प्रयत्न केले आहेत, असे आवाहन नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी केले आहे.

ग्राहक पंचायत आक्रमक

नागरिकांनी वैयक्त‌िक हरकती घेतल्या तशा सामाज‌िक संघटनांनीदेखील आपले मत नोंदवले आहे. शहरात नागरिकांना नाहक वेठीस धरले जाऊ नये, असे म्हणणे ग्राहक पंचायतीने मांडले आहे. जिल्हा चिटणीस नरेंद्र पेंडोळे, तालुका संघटक अमर सोनवणे यांनी समितीसमोर लेखी सादर केले. यामध्ये शहरात रस्ते रुंदीकरण, नदी पात्राची पूररेषा, पुरातत्व विभागाचे १०० ते ३०० मीटर नियम यामुळे संपूर्ण नागरी जीवन अडचणीत आले आहे. शहराची हजार वर्षाची परंपरा असेली वस्ती उठविण्याची वेळ आणू नका, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांना भरावा लागणार निवडणूक खर्च

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. येत्या एप्रिलच्या अखेरीस या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मनपा प्रशासन तयारीला लागले आहे. आगामी निवडणुकीत उमेदवारांचा निवडणूक खर्च भरण्याकरिता ‘ट्रु वोटर’ हे मोबाइल अॅप्लिकेशन वापरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना या अॅप्लिकेशनच्या वापरासंबधी माहिती व्हावी यासाठी येथील शिवाजी टाऊन हॉल येथे शनिवारी (दि. ५) दुपारी तीन वाजता प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आपल्या निवडणूक खर्चाबाबतचा तपशील या अॅप्लिकेशनद्वारे सादर करावा लागणार आहे. यात दैनंदिन निवडणूक खर्च, एकूण निवडणूक खर्च, शपथ पत्र, निधीचे स्त्रोत आदी माहिती सादर करण्यासाठी या अॅपचा वापर करता येणार आहे. उमेदवारांना हा ऑनलाइन खर्च सादर करणे सोपे व्हावे यासाठी ‘ट्रु वोटर’मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवाराने सादर करावयाचा खर्च याच अॅप्सच्या माध्यमातून सादर करावयाचा असल्याने त्या अनुषंगाने सर्व संभाव्य उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी शनिवारी होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त जगताप यांनी केले आहे.

उमेदवारांची माहिती एका क्लिकवर

राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘ट्रु वोटर’ अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोरवरून मतदारांना डाउनलोड करता येऊ शकते. या अॅपद्वारे आगामी पालिका निवडणुकीतील उमेदवारांची शैक्षणिक माहिती, संपत्ती, गुन्हेविषयक नोंदी तसेच निवडणुकीच्या दैनंदिन खर्च सहज पाहता येईल. तसेच त्यावर हरकत देखील घेता येणार आहे. सोबतच मतदारांना आपले मतदार यादीतील नावदेखील या अॅपद्वारे शोधता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बळीराम शिंदेचा जेलमध्ये मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान व अनैसर्गिकरीत्या गर्भपात करण्याच्या आरोपाखाली नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला डॉ. बळीराम निंबा शिंदे (वय ५३) याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. डॉ. शिंदे याच्या अचानक झालेल्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, त्याच्या मृत्यूबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले आहे. डॉ. शिंदेचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे कारागृह प्रशासनाने कारागृह रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हवाल्याने सांगितले. त्यामुळे डॉ. शिंदेचा मृत्यू हा आत्महत्या असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

डॉ. बळीराम शिंदे याला बेकायदा व अनैसर्गिक पद्धतीने गर्भपात केल्याच्या आरोपाखाली मुंबई नाका पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात डॉ. शिंदे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने २८ फेब्रुवारी रोजी त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. डॉ. शिंदे याने अनैसर्गिक पद्धतीने गर्भपात केल्याची घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्हाभरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. डॉ. शिंदे याला नाशिकरोड कारागृहात येऊन अवघे तीनच दिवस झाले होते.

रात्री १.४० ला मृत्यू

डॉ. शिंदे याची तब्येत गुरुवारी रात्री दीड वाजेच्या दरम्यान अचानक बिघडली. त्यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. आर. ससाणे यांनी त्याला रात्री १.४० वाजता मृत घोषित केले. तशी माहिती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली असून, नाशिकरोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

धुळ्यात शवविच्छेदन

कारागृहात डॉ. शिंदे याचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती कारागृह प्रशासनाने त्याच्या पुतण्यास तातडीने दिली. डॉ. शिंदे याचे पार्थिव शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धुळे येथील गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच डॉ. शिंदे याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images