Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सावानात सुंदोपसुंदी सुरूच

$
0
0
'सार्वजनिक वाचनालय, नाशिक' संस्थेची आज, बुधवार १५ मे रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात यावी, अशी मागणी संस्थेच्या काही सभासदांनी केली आहे. कार्यकारिणीकडून नियमांना फासला जाणारा हरताळ, हे या मागणीमागचे मुख्य कारण आहे.

मेळ्याने घातले आनंदावर विरजण

$
0
0
डोंगरे वसतीगृह मैदानावर भरलेल्या आनंदमेळ्यामुळे बच्चेकंपनीचा आनंद व्दिगुणीत होत असला तरीही परिसरातील नागरिकांच्या आनंदावर मात्र या मेळ्याने विरजण टाकले आहे. मेळ्यासाठी कार्यरत कर्मचारी मैदानाच्या कोपऱ्यातच उघड्यावर कचरा टाकत असल्यामुळे अस्वच्छतेत प्रचंड वाढ झाली आहे.

'त्रुटींचा' अर्थसंकल्प अखेर मंजूर

$
0
0
फेब्रुवारी महिन्यात आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेला अर्थसंकल्प अखेर मे महिन्यात नवीन दुरूस्त्यांसह मंजूर करण्यात आला. तब्बल साडेसहा तास झालेल्या चर्चे दरम्यान विरोधकांसह सत्ताधा-यांनी देखील अर्थसंकल्पांमध्ये करण्यात आलेल्या आर्थिक तरतूदीबाबत सडाडून टिका केली.

मला तर चंद्रही दिसतो...

$
0
0
जुन्या नाशकातील गल्ल्यांमध्ये चक्कर मारली, तर विविध प्रकारचे किस्से ऐकायला मिळतात. एका व्यक्तीला तीन नावे असण्याची परंपरादेखील जुन्या नाशकातून सुरु झाली. पैकी एक पाळण्यातले, दुसरे घरच्यांचे अन् तिसरे गल्लीतले.

MIDC च्या जागेवर राष्ट्रवादीचा इमला

$
0
0
सातपूर एमआयडीसीत उद्योगांसाठी जागा नसल्याचा बनाव करणा-या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-याने अनधिकृतपणे बंगला बांधण्याचा 'उद्योग' केला आहे.

पत्रकारिता हा सुखद अपघात

$
0
0
'एका पक्षासाठी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अचानक पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश झाला. परंतु या क्षेत्रानेच मला दिल्ली समजून घेण्याची संधी दिली. पत्रकारिता हा आयुष्यातील एक सुखद अपघात होता', अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी आपला प्रवास उलगडला.

विभागीय महसूल कार्यालयाला लॉटरी

$
0
0
नाशिक महसूल आयुक्तालयाने ठरवलेल्या उद्दिष्टांपेक्षा १२१ टक्के जादा महसूलाची वसूली केली आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात आयुक्तालयाने तीनशे दोन कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवले होते परंतु प्रत्यक्षात तीनशे सदुसष्ट कोटींची वसूली केली आहे.

एलबीटीविरोधातील बंद यशस्वी

$
0
0
एलबीटीविरोधात धुळ्यातील व्यापा-यांनी मंगळवारी एक दिवसाचा बंद पुकारल्याने ग्राहकांचे अतोनात हाल झाले. व्यापाऱ्यांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला, मात्र त्यांना कुणीही वरिष्ठ अधिकारी भेटले नाहीत.

दलितनेते गायकवाड यांचे निधन

$
0
0
जुन्या पिढीतील दलितनेते प्रेम गायकवाड यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्यांचे नातेवाईक आणि संतप्त कार्यकर्त्यांनी शहरातील आस्था हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली.

चिखलीकर, वाघ यांना डिस्चार्ज

$
0
0
लाचखोरीच्या प्रकरणातील संशयित आरोपी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे एग्झिक्युटीव्ह इंजिनिअर सतिश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्यावरील उपचारांनंतर त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी निलंबित

$
0
0
पूर्ववैमनस्यातून गंगापूर रोडवर झालेल्या हत्याकांडप्रकरणी स्वतःच्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची नामुष्की नाशिक पोलिसांवर ओढविली आहे. हत्या झालेल्या मोहन चांगले याच्याशी संबंध असल्याचे तपासात आढळून आल्याने या दोघांवर ही कारवाई करण्यात आली.

बांधकाम कच-याचा विळखा

$
0
0
गंगापूर रोड असो किंवा पंचवटी, सिडको असो किंवा नाशिकरोड शहरातील कुठलाही भाग, येथून फिरले तर एका गोष्टीत साम्य लक्षात येईल ते म्हणजे जागोजागी असलेले रेती, विटा, खडीच्या कचऱ्याचे ढिगारे.

'लकी नंबर' आजपासून महाग

$
0
0
गाडी-मोटारसायकलीसाठी 'लकी नंबर' घेणा-या वाहनधारकांना आज, बुधवारपासून पूर्वीच्या तुलनेत तिप्पट फी भरावी लागणार आहे. ही दरवाढ वाहनधारकांसाठी डोईजड ठरणार असली तरीही, सरकारच्या तिजोरीत मात्र या निर्णयामुळे मोठी भर पडणार आहे.

नाशिक जेलचा बंदोबस्त वाढवला

$
0
0
संजय दत्तला आर्थर रोड कारागृहात आतंकवाद्यापासून धोका असल्याने पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवले होते. त्यावेळी शिक्षेचा कालावधी कमी होता. परंतु त्याला शिक्षा झाल्यास जास्त कालावधी व्यतीत करायचा असल्याने नाशिकचे मध्यवर्ती कारागृह सोयीस्कर असल्याचे वरिष्ठांचे मत आहे.

दारणा नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू

$
0
0
शेवगेदारणा नदीच्या पात्रात संसरी गावाजवळ पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली. नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाने बुडालेल्या तरुणांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले असून देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दमणगंगेतून जलसमृद्धीकडे...!

$
0
0
मुंबई-पुण्यानंतर आता नाशिक हे महानगर होत आहे. महानगर होण्यासाठी कुठल्याही शहराला चार बलस्थाने आवश्यक आहेत. ती म्हणजे, मुबलक पाणी, वीज, एअर/रेल्वे/रोड कनेक्टिव्हिटी आणि भौगोलिक स्थान व हवामान. नाशिकचे भौगोलिक स्थान पाहता आगामी काळाचा विचार करुन पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

'अभिनव भारत'ला लाभणार झळाळी !

$
0
0
नाशिक महापालिकेने स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र असलेल्या अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी पन्नास लाखाची तरतूद केली आहे. मंगळवारी महासभेत सादर झालेल्या अंदाजपत्रकात ही घोषणा करण्यात आली.

उद्‌घाटनानंतर रस्ता वा-यावर

$
0
0
गटार योजनेच्या नावाखाली फोडून ठेवलेला चांगला रस्ता दुरूस्त करण्यात महापालिकेने उदासिनता दाखवून दिली आहे. यामुळे सोमेश्वरच्या दिशेने जाणा-या गंगापूर रोड परिसरातील कॅनडा बॅंकेच्या समोरील इंजिनिअर देवरे मार्गावर रहिवासी हवालदिल झाले आहेत.

पात्रतेच्या प्रतिक्षेत १६० शाळा

$
0
0
स्वयंअर्थसाहाय्यित कायद्यानुसार मान्यता मिळविण्यासाठी पात्र ठरण्याच्या प्रतिक्षेत सध्या नाशिक जिल्ह्यातील १६० शाळा आहेत. शिक्षण विभागाकडून अपात्र ठरलेल्या ३५६ शाळांपैकी १६० शाळांनी या निर्णयावर अक्षेप घेत पुन्हा पात्रतेचे प्रस्ताव सादर केले आहेत.

कामगारांच्या थकीत वेतनासाठी राज्य सहकारी बँकेकडे उचल

$
0
0
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना थकीत वेतनासह अन्य देणी देण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडे उचल मागण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images