Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संशयिताला पाच दिवसांची कोठडी

0
0
अनैतिक संबंधातून पोटच्या मुलामुलीचा छळ करणाऱ्या वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीस कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. खुनाची घटना दुर्गानगर परिसरातील अपुर्वा रो-हाऊस येथे बुधवार ते गुरुवारच्या दरम्यान घडली होती.

कार्यकर्त्यांची यंत्रणा उभी करा

0
0
'आगामी निवडणुका लक्षात घेता पक्षाकडून करण्यात आलेली विकासकामे तळागाळात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांची भक्कम यंत्रणा उभी करा,' असे मत खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत भुजबळ प्रमुख मार्गदर्शक होते.

एलबीटीमुळे एक टक्क्याचा दणका

0
0
शहरात लोकल बॉडी टॅक्स अर्थात एलबीटीमुळे सुरू झालेल्या गोंधळाची परिस्थिती शांत झालेली नसताना एलबीटी लागू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.

३० विद्यार्थी स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत

0
0
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (एमपीएसपी) घेण्यात आलेल्या चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाइटवर गुरुवारी दुपारी ३ वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला.

शरद चांगलेला अटक

0
0
हाणामारी, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पंचवटीतील शरद चांगलेविरुद्ध गुन्हा दाखल करत पंचवटी पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

बेशिस्त वर्तनामुळे आणखी २ पोलिस घरी

0
0
आरिफ तांबोळी पाठोपाठ आणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी निलंबित केले. विलास मल्हारी पगारे आणि अंबादास माधव कुटे अशी त्यांची नावे आहेत.

एमआयडीसीचा कारभारच संशयास्पद

0
0
सातपूर आणि अंबड एमआयडीसीत जागा नसल्याचे सांगत अनेकांना वेटिंगवर ठेवणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) विशिष्ट जणांना प्लॉट दिले जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. एकीकडे काही जण एमआयडीसीच्या जागेवर बंगला बांधत आहेत, तर दुसरीकडे प्लॉटची विक्री छुप्या पद्धतीने होत असल्याचा आरोप होत आहे.

MPSC च्या गोंधळाचा सिलसिला सुरूच

0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत गोंधळाचा सिलसिला सुरूच आहे. एमपीएससीच्या ढिसाळ कारभाराचा फटका शनिवारी होणाऱ्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.

झोपडीतल्या मुलांच्या हाती पुस्तके आणि चेहऱ्यावर हास्य

0
0
झोपडपट्टीतील मुलांना पुस्तके वाचण्याचा आनंद मिळावा म्हणून नशिराबादच्या हेमंत बेलसरे यांनी दहा वर्षांपूर्वी एक उपक्रम हाती घेतला. कोणाच्याही मदतीवर अवलंबून न राहता बेलसरे यांनी झोपडपट्टीतल्या शेकडो मुलांच्या हाती पुस्तक देत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचला आहे.

कुंभमेळ्यात मिळणार ताजी भाजी

0
0
आगामी कुंभमेळ्यात नाशिक शहर परिसरात लाखो भाविक, भक्तांची हजेरी लागणार आहे. या सर्वांसाठी आवश्यक भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेंतर्गत नियोजन सुरू झाले आहे.

‘आयसीएसई’चा निकाल जाहीर

0
0
इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन (आयसीएसई)तर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. देशभरातील दहावीचा निकाल ९८.२० टक्के तर, बारावीचा निकाल ९५.१५ टक्के इतका लागला असून यात मुलींनी बाजी मारली आहे.

दाढीमुळे पोलिस निलंबित

0
0
बेशिस्त वर्तन, लाचखोरी आणि कर्तव्यात कसूर आदी कारणांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई नेहमी होते. मात्र नाशिक शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला दाढी राखल्याबद्दल निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

कॉलेजेसच्या ‘फी’ला चाप

0
0
शाळांच्या ‘फी’ इतकाच कॉलेजच्या ‘फी’चा मुद्दा सध्या ऐरणीवर आला होता. कॉलेजेसकडून विद्यार्थ्यांनी सुरू असलेली आर्थिक लुबाडणूक थांबविण्यासाठी पुणे विद्यापीठाने यंदापासून कॉलेजेसवर निर्बंध घातले असून कॉलेजेसना आता केवळ १ हजार रुपये स्टुडंट अॅक्टिव्ह‌िटी फी आकारता येणार आहे.

मोठे व्यापारी रस्त्यावर

0
0
व्यापारी संघटनेकडून एलबीटी (स्थानिक संस्था कर) विरोधात सर्व व्यापारी एकत्र असल्याचे सांगितले जात असले तरी शुक्रवारी परिस्थिती वेगळी होती. यात मोठे व्यापारी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असताना छोटे व्यापारी दुकानात ठाण मांडून होते.

नाशिक-कसारा ‘नॉन-स्टॉप’

0
0
कसारामार्गे मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एसटीच्या नाशिक विभागाने नाशिक-कसारा मार्गावर विनावाहक व विनाथांबा बससेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून एसटीने नाशिककरांना लोकल कनेक्टीव्हिटीचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

पाणी पुरवठा आज बंद राहणार

0
0
वीज वाहिन्यांची पावसाळ्यापूर्वी कामे करण्यासाठी वीज पुरवठा बंद राहणार असल्याने आज (१८ मे) शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असून रविवारी (१९ मे) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

रायझिंग'ने उलगडल्या नाशिकच्या विकासवाटा

0
0
झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिकच्या विकासात अनेक अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न व्हायला हवेत. मात्र यासाठी प्रत्येक क्षेत्राचा धांडोळा घेणे आवश्यक आहे आणि नेमकी हीच बाब 'नाशिक रायझिंग' या उपक्रमाद्वारे होत असल्याने यातून नाशिकच्या विकासवाटा उलगडल्या जात असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.

मालवाहतुकीतून १४२ कोटींचे उत्पन्न

0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनला मालवाहतुकीच्या माध्यमातून सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात १४२ कोटी आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ४२ कोटींनी वाढला असून दिवसेंदिवस स्टेशनवरून मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

सलग दहाव्या दिवशी शटर डाऊन

0
0
महापालिका क्षेत्रात लागू करण्यात येणाऱ्या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी सलग दहाव्या दिवशी बंद पाळतानाच शनिवारी मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. या संपामुळे सर्वसामान्यांचे आतोनात हाल होत असले तरी सरकार दरबारी हा बंद मिटविण्याबाबत कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने कोट्यवधींची उलाढाल बंद झाली आहे.

सिंहस्थ आराखड्याला मंजुरी द्या

0
0
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दोन वर्षांवर आल्याने सिंहस्थ कृती आराखड्याला त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौर यतीन वाघ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे सिंहस्थकामांना तातडीने सुरुवात करता येईल, असेही महापौरांनी म्हटले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images