Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिनाभरात बसणार दुभाजक

$
0
0

गंगापूररोडला मनपाकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू; नागरिकांत समाधान

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहरातील महत्त्वाचा रोड म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गंगापूररोडचे विस्तारीकरण व्हावे, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात होती. दरम्यान, महापालिकेने रस्त्याला अडथळे ठरणारी वृक्ष हटविल्याने येत्या महिनाभरात गंगापूररोडला दुभाजक टाकले जाणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्ता रुंदीकरणाचे कामही महापालिकेने हाती घेतले असून, यात काही ठिकाणी रस्ता आरक्षित नसल्याने रुंदीकरणाची अडचण महापालिकेला येणार असल्याचेही सांगण्यात आले.

या रस्त्यावरील अडथळे ठरणारी वृक्ष महापालिकेने न्यायालयाच्या समंतीनुसार हटविले आहेत. यात सर्वाधिक रस्त्यात असणाऱ्या वृक्षांचा त्रास गंगापूररो़ड भागात होता. रस्त्यात येणाऱ्या वृक्षांमुळे अपघातात अनेकांना आपले जीवदेखील गमवावे लागले होते. यासाठी गंगापूर रोड वासियांकडून नेहमीच रस्त्यात येणारी वृक्ष हटविण्याबाबत महापालिकेकडे मागणी केली जात होती. अखेर हरित न्यायालयाने महापालिकेला ही वृक्ष हटविण्याची परवानगी दिल्यानंतर वृक्ष मनपाने हटविली आहेत. यामुळे गंगापूर रोड रुंदीकरणाचे रखडलेले काम महापालिकेने जोमाने हाती घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवास योजनेच्या ४४८ सदनिका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २१ प्रकल्पांतील ४२ हजार सदनिकांच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे १४ एप्रिल रोजी होणार आहे. नाशिक येथील प्रकल्पाच्या ४४८ सदनिकांच्या कामाचा शुभारंभ संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते याच दिवशी होणार आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होतील. देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, २४ तास वीज व पोहोच रस्ता या सुविधांसह पक्के घर देण्यासाठी पंतप्रधानांच्या ‘२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेला अनुसरून प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेत जम‌निीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून, त्यावरील झोपडपट्टयांचा ‘आहे तेथेच’ पुनर्विकास करणे, कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती, खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान अशा चार घटकांचा समावेश आहे. यापैकी कर्जसंलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती हा घटक संपूर्ण राज्यात, तर इतर घटक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात लागू करण्यात आले आहेत.

२५० घरकुले आवश्यक

सादर करण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये २५० घरकुले असणे आवश्यक असून, त्यातील किमान ३५ टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणे आवश्यक आहे. अशा प्रकल्पांसाठी खासगी, तसेच शासकीय, निमशासकीय संस्था स्वतंत्रपणे सहभागी होऊ शकतील. ही घरे कुटुंबातील कर्त्या महिला किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावे असतील. अभियानांतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांची सहकारी संस्था स्थापन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

लाभार्थीचे घर नको

अनुदानासाठी कुटुंबातील कोणाच्याही मालकीचे देशात घर नसावे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतिवर्ष आर्थिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये आहे. राज्य शासनाने या योजनेसाठी म्हाडा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर शासकीय/निमशासकीय संस्थांना मंजूर गृहनिर्माण प्रकल्पांसाठी एक रुपये प्रति चौरस मीटर दराने शासकीय जमीन देण्याची सवलत जाहीर केली आहे. त्याचबरोबर अंमलबजावणी यंत्रणांना विकासशुल्क व मोजणी फी यात ५० टक्के सवलत असणार आहे. मुद्रांक शुल्काची प्रत‌ि घरकुल एक हजार रुपयांची आकारणी पहिल्या दस्ताला सवलतीच्या दरात करण्यात येईल.चेहेडी ग्रामस्थांचा प्रकल्पास विरोध

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

म्हाडा प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणास आडगावच्या ग्रामस्थांनी विरोध करण्याचे प्रकरण ताजे असतानाच चेहेडी येथील जमीन म्हाडाकडे हस्तांतरणास लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. गेल्या काही वर्षांपासून पडून असलेल्या या सरकारी जमिनीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे अचानक लक्ष गेल्याने ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चेहेडी शिवारातील महादेव नगर येथे भूमापन क्रमांक २३/१-क वरील ७१९.५० चौरस मीटर इतके क्षेत्रफळ असलेला भूखंड महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा आहे. सुमारे ७ गुंठे क्षेत्राचा हा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांनी म्हाडा प्रकल्पासाठी नुकताच हस्तांतरीत केला आहे. मात्र, हा भूखंड सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका, वृद्धाश्रम अशा सार्वजनिक कामांसाठी येथील समता समाज विकास संस्था या शासनमान्य व नोंदणीकृत सामाजिक संस्थेस मिळावा, अशी मागणी दोन वर्षांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली होती. हा प्रस्ताव

प्रलंबित असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक हा भूखंड गृहनिर्माणासाठी म्हाडाकडे हस्तांतरीत केल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सात गुंठ्यात प्रकल्प कसा?

चेहेडी पंपिंग स्टेशन येथे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची सुमारे सात गुंठे क्षेत्रफळाची जागा आहे. इतक्या कमी जागेवर म्हाडा गृहप्रकल्प कसा उभा करणार, असा सवाल केला जात आहे. या जागेपासून जवळच महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या असलेल्या भूमापन क्रमांक १२४/२ब-२ वरील ४८०३.३० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेचा म्हाडा प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक पंड‌ति आवारे, जयश्री खर्जुल यांच्यासह मधुकर सातपुते, रमेशचंद्र औटे, मंगेश ताजनपुरे, विजय ताजनपुरे, गोरख खर्जुल, नितीन खर्जुल आदींनी केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धनगर वळणावर अपघातांचा धोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या समृद्धनगर वळणावर वाहनांची रोजच वर्दळ होत असते. यामुळे समृद्धनगरच्या वळणावर वाढलेल्या वाहनांनी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे दुचाकी चालकांना वळणावर नेहमीच त्रास सहन करावा लागत असल्याने महापालिका व पोलिस प्रशासनाने गतिरोधक टाकावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर रोडवर नेहमीच होत असलेल्या अपघातांमुळे गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची सातत्याने मागणी वाहनचालक करत असतात. त्यातच अपघातांचा सर्वाधिक धोका आता समृद्धनगरचा वळण रस्ता बनला आहे. याठिकाणी त्र्यंबकला जाणाऱ्या भाविकांची वाहनेदेखील याच वळणावरून जात असतात. यामुळे त्र्यंबकहून येणारे, नाशिकहून त्र्यंबकला जाणारे व अशोकनगरकडे वळण घेणाऱ्या वाहनांचा अति वेग असताना अनेक अपघातही झाले आहेत. भविष्यात मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे याठिकाणी वळणावर गतिरोधक तसेच सिग्नलची यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

पर्यटकांची संख्या अधिक

देशातून येणारे पर्यटक गंगापूर, गोवर्धन शिवारातील वाइनरोडला जाणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. यामुळे वाइनरोडला जाणारे पर्यटकदेखील समृद्धनगरच्या वळणावरूनच जात असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीत विरोधक आक्रमक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीवर भाजपने वर्चस्व मिळवले असले तरी, स्थायीच्या पहिल्याच बैठकीत शिवसेनेसह विरोधी पक्षांनी भाजपला विविध विषयांवर आक्रमक होत भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.

जादा विषयांची घुसघोरी, घंटागाडीची अनियमितता, भूसंपादन, रुग्णालयांमधील अनागोंदी, मोकाट कुत्र्यांचा हैदोस यांसारख्या विषयांवर आक्रमक होऊन भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, सभापतींनीही आश्वासनांची खैरात करत, सदस्यांना शांत केले. दरम्यान, पहिल्याच बैठकीत दोन कोटींच्या पथदीपांच्या दुरुस्तीला मंजुरी देत, पालिकेच्या शाळांमध्ये २१ शिक्षकांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

स्थायी समिती सदस्य व सभापती निवडीनंतर पह‌िलीच बैठक गुरुवारी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थायीत भाजपचे वर्चस्व असले तरी, शिवसेनेच्या सदस्यांनी पहिल्याच बैठकीत आक्रमक बाणा दाखवण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक सूर्यकांत लवटे व मुशीर सैय्यद यांनी प्रारंभी सादर करण्यात आलेल्या भूसंपादन, सिग्नल देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावांना विरोध केला. जादा विषयांमध्ये विषय घुसविण्याची मागील स्थायी समितीत खंड‌ित झालेली परंपरा सुरू न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. धूरफवारणी व घंटागाडीचे लोकेशन मिळण्याची सोय आरोग्य विभागाकडे उपलब्ध असल्याने नगरसेवकांना ते उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन प्रवीण तिदमे यांच्या मागणीनंतर देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांनी अशोकनगर रस्ता अरुंद

$
0
0

अपघाताची वाढली संख्या; दुरुस्तीची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगारवस्तीत असलेल्या अशोकनगर रोडवर रोजच वाहनांची वर्दळ असते. त्यातच रस्ता रुंदीकरणात दुभाजकच टाकण्यात आले नसल्याने या रस्त्याला अपघातांची संख्या वाढली आहे. हा रस्ता पाहिजे त्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आला नसल्याने रस्त्याच्या कडेला अतिक्रमण धारकांचीही संख्या वाढल्याने रस्ताच अरुंद झाला आहे. त्याकडे स्थानिक नगरसेकांनीदेखील दुर्लक्ष केल्याने वाहतूक कोंडी रोजची झाली आहे. तरी, महापालिकेच्या बांधकाम विभागाने अशोकनगर रोडवरील अपघात थांबविण्यासाठी तात्काळ दुभाजक टाकावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर रोडच्या समृद्धनगर वळणावरून शिवाजीनगर ते बारदान फाटा गंगापूररोडकडे जाणाऱ्या अशोकनगर रस्त्यावर रोजच अपघातांचे सत्र सुरू आहे. त्यात या रस्त्याचे रुंदीकरण करतांना दुभाजकच टाकले गेले नसल्याने अवजड वाहनांमुळे इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशोकनगर रस्त्याला महिंद्राचे मटेरिअल गेट असल्याने त्याठिकाणी येणाऱ्या शेकडो वाहनांची नेहमीच गर्दी होते. परिणामी, ट्रान्सपोर्ट चालकांची अवजड वाहनेही अशोकनगर रस्त्याच्या कडेला उभ्या राहत असल्याने वाहनचालकांना त्याचाही त्रास होत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात या रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामध्ये या रस्त्यावर दुभाजकही टाकण्याचेही सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र अशोकनगर रस्त्यात दुभाजक तर टाकलेच नाहीत उलट लाईट केवळ एका बाजूला टाकून मनपा मोकळी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेच्या पदरी निराशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून जिल्हा बँकेला मदत मिळेल या आशेवर असलेल्या अध्यक्षांसह संचालक मंडळाच्या हाती निराशा आली आहे. अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह काही संचालकांनी देशमुख यांची भेट घेऊन राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली. त्यावर देशमुख यांनी मुंबईत गेल्यावर पाहतो, असे मोघम उत्तर देत संचालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांची बँक खाती गोठविणे आणि कर्जपुरवठा न करण्यासंदर्भातील धोरणा विरोधात राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली सहकारमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा बँकेने आर्थिक स्थिती संकटात असल्याचे सांगत, जिल्ह्यातील ६० हजार शेतकऱ्यांची बँक खाती गोठवली आहेत. तर नवीन कर्जपुरवठाही ठप्प केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, संचालक मंडळाच्या नावानेच शेतकरी आता दूषणे देत आहेत. जिल्हा बँकेच्या या कठ‌‌ीण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालकांनी देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राज्य सहकारी बँकेकडून मदतीची मागणी केली. राज्य सहकारी बँकेकडे जिल्हा बँकेचे ७४६ कोटींचा निधी राखीव आहे. हा निधी मिळाल्यास कर्जपुरवठा करता येईल, असा दावा संचालकांनी केला. तर देशमुख यांनी मुंबईत गेल्यावर पाहतो, असे सांगत बँकेला मदत करू असे आश्वासन देत वेळ मारून नेली. त्यामुळे संचालक मंडळाच्या पदरी निराशाच हाती आली आहे.

शेतकऱ्यांची तक्रार

शेतकऱ्यांनी देशमुख यांची भेट घेत संचालक मंडळाच्या बेबंदशाही कारभाराच्या तक्रारी केल्या. देशमुख यांनी मदत करू असे आश्वासन दिले.
बँकेस टाळे ठोकण्याचा प्रयत्न

नाशिक जिल्हा सहकारी बँकेतून शिक्षकांच्या पगाराच्या खात्यावर त्यांच्या हक्काचे पैसे जमा होत नसल्याने शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत. गुरुवारी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेस टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला गेला. सलग चार महिन्यांपासून या बँकेचे पगारी खात्याचे खातेदार असलेल्या शिक्षकांच्या हाती अवघी दोन ते तीन हजार रुपये रक्कम रोख स्वरुपात पडत आहे. बँकेने ही समस्या त्वरीत न सोडविल्यास बँकेला अचानक टाळे ठोकण्याचा इशारा दोन्ही संघटनांच्या वतीने देण्यात आला. यावेळी पुरुषोत्तम रक‌िबे, दशरथ जारस, प्रकाश वाघ, सखाराम जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य

$
0
0

वडारवाडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

देवळालीगावातील वालदेवी नदीच्या काठावर असलेल्या वडारवाडी येथील पालिकेच्या उद्यानाची देखभालअभावी अक्षरशः कचराकुंडी झाली आहे. या ठिकाणच्या अस्वच्छतेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच याठिकाणी असलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या वायरी खाली आल्याने त्यापासून अपघात होण्याची शक्यता आहे. तरी यावर प्रशासनाने तातडीने उपाय करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

वडारवाडी या झोपडपट्टी परिसरात वालदेवी नदीच्या काठावर पालिकेचे उद्यान आहे. या उद्यानात सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. पालिकेने आजवर या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याने या उद्यानाचा वापर सार्वजनिक शौचविधीसाठी व कचरा टाकण्यासाठी होत आहे. परिणामी, या उद्यानाचे अस्तित्वच संकटात आले आहे.

उद्यानातच समाजमंदिराचे बांधकाम

या उद्यानात सध्या समाजमंदिर बांधले जात आहे. मुळातच मुलांना खेळण्यासाठीच्या सुविधांकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असताना ती जागाही समाज मंदिरासाठी वापरल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कचऱ्याचे ढीग पडून

या उद्यानात गेल्या काही वर्षांपासून कचरा टाकला जात असल्याने सध्या कचऱ्याचे ढीग झाले आहे. त्यामुळे अस्वच्छता पसरल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचऱ्यामुळे भागात दुर्गंधीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या उद्यानाला वॉल कंपाऊंड गेल्या १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. परंतु, प्रवेशद्वाराला गेट नसल्याने हे वॉल कंपाऊंड असून नसल्यासारखे आहे.शिवाय काही ठिकाणी वॉल कंपाऊंड कमी उंचीचे बांधले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस वसाहतीत रस्त्यांची दुर्दशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकांनंतर अनेक ठिकाणी रस्ता दुरूस्तीचे कामे पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच कॉलनी व वसाहतींमधील रस्तेही दुरूस्त करण्यात येत आहे. असे असले तरी या कामात सुसूत्रता नसल्याची बाब समोर आली आहे. शरणपूर रोड येथील स्नेहबंधन पार्क पोलिस वसाहतीत गेल्या तीन आठवड्यांपासून रस्ता दुरूस्तीचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. रस्ता अगदी सुस्थितीत असूनही रस्ता दुरूस्तीचे काम येथे सुरू करण्यात आले. मात्र आता गेले तीन आठवडे उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने वसाहतीतील रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्नेहबंधन पार्क पोलिस वसाहतीत रस्ता दुरूस्तीचे २६ मार्च २०१७ पासून काम सुरू करण्यात आले. हा रस्ता अगदी चांगल्या परिस्थितीत असूनही नव्या नगरसेवकांनी श्रेय लाटण्याच्या चढाओढीत रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केले. मात्र ते डांबरीकरण योग्य पद्धतीने व वेळेत न केल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून रस्त्यावर रचून ठेवण्यात आलेली खच आता इतरत्र पसरत आहे. यामुळे वसाहतीतील पोलिस कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहन चालवितांनाही कसरत होत आहे.


पूर्ण रस्ता केव्हा दुरुस्त होईल?

याकडे नगरसेवकही लक्ष घालत नसल्याचे दिसून येत आहे. पंचवार्षिक निवडणुकांपूर्वी आमच्या येथील रस्ता चांगला होता. आता दुरूस्ती करण्याच्या नावाखाली उकरून खच टाकण्यात आली आहे. मात्र, तीन आठवड्यांनंतरही याचे डांबरीकरण न झाल्याने आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया वसाहतीतील रहिवाशांनी दिली आहे. अर्ध्या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने पूर्ण रस्ता केव्हा दुरूस्त होईल व त्याला किती वेळ लागेल, असा सवाल रहिवाशांसमोर उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणखी पाच दिवस उष्णतेच्या लाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराने गुरुवारी पुन्हा एकदा ४० चा पारा ओलांडल्याने नागरिकांची उन्हाच्या कडाक्याने चांगलीच दमछाक झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात आणखी पाच दिवस उष्णतेच्या लाटा राहणार आहेत. प्रामुख्याने नंदुरबार परिसरात उष्णतेच्या लाटांचा प्रभाव अधिक राहील. नाशिकचेही तापमान गुरुवारी ४०.९ नोंदविले गेल्याने नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी ४३.२ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. मालेगावमध्ये या तापमानाची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल येवला शहरातही ४२ डिग्री तापमान नोंदविण्यात आले. नाशिकमध्येही तापमान ४० डिग्री अंशांच्या खाली उतरण्यास तयार नाही, तर दुसरीकडे किमान तापमानाच्या नोंदीमध्ये अवघ्या २४ तासांमध्ये मोठा बदल होत आहे. रात्रीच्या वेळी नोंदविण्यात येणाऱ्या किमान तापमानात सुमारे अडीच अंशांनी वाढ होत गुरुवारी हे तापमान १८.८ डिग्री अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट मुंबईला

$
0
0

धुळ्यातील आरोपीच्या गळफासप्रकरणी सीआयडी तपासाला गती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील शासकीय हिरे महाविद्यालयातील निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली होती. यातील संशयित आरोपी प्रदीप वेताळ याने पोलिस ठाण्यातच आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात सीआयडीने पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि मृत प्रदीपचे डीएनए रिपोर्ट तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहेत. तर इतर संशयितांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

डॉक्टर मारहाणीच्या चौकशीत सीआयडी विभागाने शहर पोलिस ठाण्यातील चार गार्ड कर्मचारी, दोन ऑफिस पहारा कर्मचारी, एक सीसीटीएनएस कर्मचारी, मृताचे दोन नातेवाईक, तपासी अंमलदार राजेंद्र माळी यांची चौकशी केली आहे. तसेच मृताच्या शरीरातील काही अंश धुळ्यातील पॅथोलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहे. यापुढे १२ जणांचे जवाब घेण्याचे बाकी असून, ते घेतल्यानंतर व सर्व तपासणीचे अहवाल आणि शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाला चालना मिळणार असल्याची माहिती धुळे सीआयडी विभागाने दिली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय अधिकारी गणेश चौधरी, कर्मचारी नरेंद्र कुलकर्णी, मनोहर जाधव, उमेश येवलेकर, शरद काटके, सुरेश भालेराव हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर्स सेवेत

$
0
0

‘आयएमए’च्या संपाचे धुळ्यातही संमिश्र पडसाद

म. टा. वृत्तसेवा, धुळे

येथील निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. दोन दिवसानंतर नाशिक व ठाण्यातील रुग्णालयातही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडल्या. यामुळे आता ‘आयएमए’सह निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र, धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सर्व डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील सर्व डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मात्र, डॉक्टरांच्या मारहाणीच्या घटनेला धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरुवात झाली. त्याठिकाणी मात्र सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी कामावर आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सर्व डॉक्टर्स हे काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. तसेच शहरातील सुमारे तीनशेहून अधिक खासगी रुग्णालयांनी बुधवारी (दि. २२) बंद ठेवून राज्यातील काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांनी माघारी परतावे लागले.

दुसरीकडे राज्यातील निवासी डॉक्टरांवर सरकारने चालविलेली निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ आयएमए संघटनेने खासगी रुग्णसेवा बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत हा संप सुरूच होता. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा असल्याची माहिती धुळ्याच्या आयएमए अध्यक्षा विजया माळी यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक-सुमोचा अपघात

$
0
0

चार जणांचा मृत्यू, सुरत-नागपूर महामार्गावरील घटना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत-नागपूर महामार्गावरील तालुक्यातील मुकटी गावाजवळ रविवारी (दि. २६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर दहा जण जखमी झाले आहेत. सूरत-नागपूर महामार्गावरील खड्डे वाचवताना भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या सुमो गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडकेनंतर सुमोचा संपूर्ण चक्काचूर झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

गुजरात राज्यातील सूरत शहरातील सिद्दी कुटुंबीय सूरतहून पारोळा येथे साखरपुड्यासाठी जात होते. मुकटी गावाजवळ त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये २ महिलांसह २ लहान मुलींचा समावेश आहे. मृत फरजाना बानो सिद्दी (२२), सुमय्या इब्राहीम सिद्दी (१२), फरहद इसा सिद्दी (६), शहाजा बानो सिद्दी (२४) या चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींवर शहरातील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत मुकटी गावाची जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेजवळ पूल असून त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. ते वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक सुमोवर आदळला. यामुळे ही दोन्ही वाहने ५० फूट खोल शाळेजवळील पुलाच्या खाली कोसळली. सुमोमध्ये ११ जणांचा समावेश होता. ते पारोळ्याला नातेवाईकांकडे जात होते.

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

अपघातानंतर मुकटी गावातील संतप्त गावकऱ्यांनी यावेळी महामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन दोन्ही बाजूंनी लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील खड्डा वाचविण्याच्या नादात हा अपघात घडला असून, महार्गावर झालेल्या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असल्याचा माहिती गावकऱ्यांनी दिली. या अपघाताला जबाबदार म्हणून राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाला दोषी ठरवण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. महामार्ग प्राधिकरणाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दोन अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पोलिसांसमक्ष तत्काळ खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वेळीच खड्डे बुजवले गेले असते. तर निष्पाप बळी गेला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलन करणाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्‍ाुळ्यात आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या पाच कंदील परिसरातील घराला अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कापड बाजाराच्या बाजूला राम शर्मा यांच्या घराला रविवारी (दि. २६) पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास आग लागली. यात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेबद्दल पोलिसांनी घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला आहे. घटनास्थळी तत्काळ अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळीसह अधिकारी दाखल झाले होते.

शहरातील शिवाजी मार्केट व अकबर चौकात यामधील धनादाळ बोळीत राम शर्मा हे पत्नी, आई व दोन मुलांसोबत दुमजली घरात होते. या घरात ये-जा करण्यासाठी एकच दरवाजा होता. इतर तिन्ही बाजूनी भिंती असल्याने घरातील एकाही व्यक्तीला घराबाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत राम शर्मा (वय ४५), शोभाबाई छबूलाल शर्मा (वय ६२), जयश्री शर्मा (वय ३५), साई राम शर्मा (वय १२) आणि राधे राम शर्मा (वय १०) यांचा मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र पोलिसांनी काही घातपात आहे का? या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचा बंब उशिरा आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. घटना घडल्यानंतर बऱ्याचवेळा अग्निशमन विभागाला फोन केल्यावरही बंब दाखल झाला नाही. वेळेवर बंब आला असता तर कोणाचा तरी जीव वाचवता आला असता, अशी माहिती स्थानिकांनी दिली.


अग्निशमन विभाग सुस्त

शहरात गेल्या वर्ष दोन वर्षांच्या कालावधीत आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला नागरिकांनी फोन केला त्यावेळी ते कधीच वेळेवर पोहोचलेले नाहीत. रविवारीही, आगीच्या घटनेत अग्निशमन बंब वेळेवर पोहाचले नाही. त्यामुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. सुस्त अग्निशमन विभागाला शहरातील सर्व परिसरांची अर्धवट माहिती असून, चालक व कर्मचारी यांचा कोणताही परिपूर्ण अभ्यास नाही. सेफ्टी म्हणून गणवेश, शूज, टोपीही नाही. मनपाने अग्निशमन विभागात तात्पुरते कंत्राटी तत्त्वावर अप्रशिक्षित तरुणांना कामावर नियुक्त केले आहे. त्यामुळे आता प्रशिक्षित अनुभवी व रस्त्यांची माहिती असणारे कामगार नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

मुस्लिम बांधवांच्या प्रयत्नांना अपयश

राम शर्मा हे राहत असलेल्या ठिकाणी अकबर चौक आहे. त्याठिकाणी मुस्लिम बांधव रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलेले असतात. रात्री दीड ते दोनच्या सुमारास शर्मा यांच्या घरातून ‘वाचवा-वाचवा’ असा आवाज येत असल्याचे काहींच्या लक्षात आले आणि त्यांनी शर्माच्या घरांकडे धाव घेतली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी तत्काळ मनपा अग्निशमन विभागाला फोन करून बंबाची मागणी केली. तर काहींनी वीज वितरण कंपनीला घटनेची माहिती देऊन वीजप्रवाह खंडित करण्यात आला. हे सर्व मदत कार्य सुरू होते. मात्र आगीने उग्ररूप धारण केल्याने घरात प्रवेश करणे शक्य नसल्याने बंबाची वाट पाहावी लागली. अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर तब्बल अर्धा तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत शर्मा यांच्या कुटुंबातील पाचही जणांचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोन दुर्घटनांत नऊ जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरात रविवारी झालेल्या दोन दुर्घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दहा जण जखमी आहेत.

धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ पाचकंदिलजवळील रहिवासी राम शर्मा यांच्या घराला रविवारी पहाटे दीड-दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा आगीत मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत रविवारी, सकाळी धुळे तालुक्यातील मुकटी गावाजवळ सुरतहून पारोळ्याकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीवर महामार्गावरील खड्डे चुकविण्याचा नादात ट्रक आदळल्याने सुमो वाहनातील चार जणांचा मृत्यू झाला; तर दहा जण जखमी झाले. आगीच्या घटनेत धुळे मनपा अग्निशमन विभागाचा बंब वेळेवर दाखल न झाल्याने शर्मा कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. धुळे मनपा अग्निशमन विभागाच्या सुस्त कारभारामुळे या घटनेत काही लोकांचे प्राण वाचवता आले असते, अशी चर्चाही घटनास्थळी होती. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत-नागूपरवरील अपघातात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजवले असते, तर अपघात घडला नसता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात नववर्षानिमित्त मोटारसायकल रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

हिंदू-नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष स्वागतासाठी स्वागत यात्रा समिती गठीत करण्यात आली. या समितीकडून मोटारसायकल रॅलीसह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि. २८) सकाळी नऊ वाजता शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रॅलीत सामील झालेल्या प्रत्येक मोटार सायकलवर भगव्या रंगाचे झेंडे लावण्यात येणार असून, या रॅलीत युवक-युवतींसह महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर असणार आहे.

त्यानंतर सायंकाळी पाच वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेत राम दरबार भजनी मंडळ, वारकरी भजनी मंडळ तसेच सजीव देखावे असणार आहेत. त्यात शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राम, सीता, लक्ष्मण यांचा सजीव देखावे सादर करण्यात येणार आहेत. शोभायात्रेत स्वरमुद्रा ढोलताशांचे पथक संचलन हे विशेष आकर्षक असणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा निघून जुना आग्रारोडवरील राममंदिराजवळ या शोभायात्रेचा समारोप होईल. तरी सर्व धुळेकरांनी या शोभायात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष जितेंद्र शहा, योगीराज मराठे, महिला संयोजिका ज्योत्स्ना मुंदडा, संध्या कुलकर्णी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपासासाठी फॉरेन्सिक अधिकारी दाखल

$
0
0

धुळे : शहरातील पाचकंदिल भागात रविवारी (दि. २६) घराला लागलेल्या आगीत शर्मा कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. यात ही घटना अपघात की, घात अशी शंका आल्याने पोलिसांनी सोमवारी (दि. २७) नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. या पथकाने घरातील काही नमूने घेतले आहेत. पथकाने गॅस सिलिंडरची तपासणी केली असता सिलिंडरचे रेग्यूलेटर सुरू असल्याने आग घरात पसरली, अशी माहिती पथकाने यावेळी दिली. सिलिंडर ठेवले होते त्याठिकाण्‍ााचे नमूने घेण्यात आले असून, लवकरच आग कशामुळे लागली हे निष्पन्न होईल, असे पथकाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रास्ता रोको प्रकरणी चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

$
0
0

धुळे : धुळे तालुक्यातील मुकटी गावालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रविवारी (दि. २६) सुमो आणि ट्रक यामध्ये झालेल्या अपघातानंतर मुकटी गावातील ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली होती.

आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून, शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश केलेल्या जमावबंदीचे उल्लंघन करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांपैकी चाळीस जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी बी. बी. चौधरी यांनी फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात मुकटी येथील उमाकांत पाटील, सुदाम पाटील, हर्षल साळुंखे, शरद साळुंखे, भरत साळुंखे यांच्यासह अन्य जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकविरा देवीचा चैत्रोत्सव आजपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा देवीचा चैत्र नवरात्रोत्सव आणि यात्रोत्सवाला आज (दि. २८) पासून सुरुवात होत आहे. सकाळी विधीवत पुजा-विधी व शिखरावरील कळसपूजन, ध्वजारोहण करून गुढीपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता पालखी पूजन होऊन मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी वाजतगाजत काढण्यात येणार असल्याचे मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी सांगितले आहे.

दि. २८ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान चैत्र नवरात्रोत्सव आणि दि. ९ एप्रिल ते ११ एप्रिलदरम्यान चैत्र यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. दि.११ एप्रिललादेखील श्री एकविरा देवीची पालखीसह मिरवणूक काढून यात्रेला सुरुवात होईल, असे मंदिर संस्थानाकडून कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात उभारली शौर्याची गुढी

$
0
0

धुळे : सैन्य दलातील धुळे तालुक्यातील बोरविहीर गावातील जवान चंदू चव्हाण यांच्या घरी जावून पुण्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी उभारली शौर्याची गुढी उभारली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी चंदू चव्हाण, भूषण चव्हाण, बहिण रुपाली, आजोबा चिंधा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पुण्यातील अमित बागुल व सहकारी गुढी उभारण्यासाठी पुण्याहून ४०० कि.मी. थेट धुळ्यात दाखल झाले होते.

धुळे शहरात नववर्षानिमित्त मंगळवारी (दि. २८) सकाळी महात्मा गांधी पुतळ्यापासून तरुणी-महिलांनी भगवे फेटे परिधान करून मोटारसायकल रॅली काढली. शहरातील चौका-चौकात तरुणांनी नववर्षानिमित्त गुढी उभारली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाची बसचालकास मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी सकाळी बस चालकाला रिक्षा चालकांनी मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी तात्काळ घटनास्थळी महामंडळाचे चालक-वाहकांनी धाव घेतल्याने चालकाचे प्राण वाचल्याची माहिती प्रवाशांनी दिली. अन्यथा नुकत्याच ठाण्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती धुळ्यात घडली असती, असेही यावेळी सांगण्यात आले.

शनिवारी (दि. ८) सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी धुळे मध्यवर्ती बसस्थानकातून धुळे-जापी-शिरडाणे बस बसस्थानकातून बस बाहेर येतांना रस्त्यात अजय वाघ नामक रिक्षा चालकाने रिक्षा उभी केली. यावेळी बसचालकाने त्याला रस्त्यातून रिक्षा हटविण्यास सांगितले. याचा राग येऊन रिक्षाचालक अजय वाघ व त्याच्या चार-पाच सहकाऱ्यांनी बसचालक आर. डी. कोकरे आणि वाहक वाल्मिक पवार यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी बसस्थानकात गर्दी जमा झाली होती. मात्र बसचालकाला मारहाण होतांना काही चालक-वाहकांचे लक्षात येताच त्यांनी बसचालक कोकरे यांना सोडविले.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रिक्षाचालक अजय वाघ व त्याचे अन्य साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी या घटनेचे गांर्भीयाने घेतले नसल्याने, रिक्षा चालकांनी बसस्थानकांपासून दोनशे मीटर बाहेर रिक्षा लावण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना बसचालकांकडून मागणी करणयात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images