Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धुळे तहसील कार्यालयातील भिंती बाेलू लागल्या

$
0
0

जमीन विक्रीबाबत मार्गदर्शनाचा स्तुत्य उपक्रम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जमिनीची खरेदी-विक्री करताना कोणती काळजी घ्यावी, ग्रामीण भागात शेतीसह घराच्या वाटणीवरून होणारे वादविवाद टाळण्यासाठी येथील प्रांताधिकारी कार्यालय तहसील या दोन्ही कार्यालयांच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. 'गोष्टीरूपी जमीन व्यवहारांची नीती' या शीर्षकाखाली प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या संकल्पनेतून महसुली बोध कथांच्या फोटो फ्रेम लावण्यात आल्या आहेत. या बोधकथांमधून जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना काय करावे, काय करू नये, हे समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रांताधिकारी मिसाळ यांनी यापूर्वी हा प्रयोग जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे राबविला होता.

ग्रामीण भागात शेत जमिनींची खरेदी-विक्री, गहाण खत, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण, जमिनीची वाटणी, सावकारी व्यवहार, कर्ज प्रकरणातून अनेक वेळा वादविवाद होतात. त्यातून काही वेळा गुन्हेही दाखल होतात. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी हे माहिती व्हावे, या उद्देशाने प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमासाठी गणेश मिसाळ यांना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे मार्गदर्शन लाभल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळण्यास मदत होत असल्याची स्थिती आहे. याबाबत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या असून, निश्चितच शेतकरी बांधवांना जमीनविषयक कायदे नियम यांची माहिती होऊन त्यांची फसवणूक होणार नाही, असे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी माहिती देतांना सांगितले.

शेतकऱ्यांना फायदा

सांगली येथील जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठी सामान्य व्यक्तीला समजेल अशा भाषेत गोष्टीरूपात जमीन व्यवहारांवर आधारित ९१ कथांचे लिखाण केलेले आहे. त्यांनी 'जमीन व्यवहार नीती' हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील मार्मिक कथांपैकी मोजक्या २५ कथांची निवड करून त्यांच्या ७५ फोटो फ्रेम तयार करून त्या काही दिवसांपूर्वीच प्रांताधिकारी धुळ्यासह साक्री येथील तहसील कार्यालयाच्या भिंतींवर लावण्यात आल्या आहेत. या प्रत्येक कथेच्या खाली कथेतून कोणता बोध घ्यावा याचीही माहिती देण्यात आली आहे. कामानिमित्ताने प्रांताधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांनी या कथा वाचून बोध घ्यावा, हा यामागील दृष्टिकोन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिवहनमंत्र्यांनी दिले परवाना रद्दचे आदेश्‍ा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

येथील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर रिक्षाचालकाने बसचालकाला केलेल्या मारहाणीचे खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित रिक्षाचालकाचा परवाना, अनुज्ञप्ती प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच बसस्थानकाबाहेरील अनधिकृत रिक्षा थांबा हटविण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर गेल्या शनिवारी सकाळी कर्तव्य बजावणाऱ्या बसचालकास रिक्षाचालकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या मारहाणीत चालक जखमी झाला तर वाहकासही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेत संबंधित रिक्षाचालकाचा रिक्षा परवाना रद्द करण्यात यावा तसेच त्यास दिलेले अनुज्ञप्ती प्रमाणपत्रही रद्द करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मंत्री रावते यांनी या घटनेची माहिती जाणून घेताना बसस्थानकाबाहेर असलेल्या अनधिकृत रिक्षा थांबा हटवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिपूजनावर आडगावकरांचा बहिष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर म्हाडा प्रकल्पास विरोध करणारे आंदोलन मागे घेत असल्याचे गुरूवारी काही ग्रामस्थांनी जाहीर केले होते. मात्र, चार लोक गावाचा निर्णय कसा घेऊ शकतात, असे म्हणत गावकऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय झालेला नसल्याने ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवत भूमिपूजन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते म्हाडाच्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन झाले. यावेळी आमदार व भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी व स्थानिक नगरसेवक उ‌पस्थित होते. मात्र, याव्यतिरिक्त गावातील भाजप कार्यकर्त्यांनीदेखील कार्यक्रमाला न येणेच पसंत केले. कार्यक्रमस्थळी स्थानिकांची उपस्थिती तोकडी असल्याने अर्ध्यांहून जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या. म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आणि पोल‌िसच कार्यक्रमाला दिसत होते.

आडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलजवळील जागा शाळेलाच द्यावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असताना प्रशासनाने सर्व्हे १५६०/१ ही जागा म्हाडाकडे वर्ग केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आणि बैठकांचा जोर सुरू झाला. बुधवारी निषेध करण्यासाठी कडकडीत बंददेखील पाळण्यात आला. पण गुरुवारी गावातील काही निवडक मंडळींची पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेसाठी वाढीव एफएसआय आणि २० गुंठे जागा देण्याचे तोंडी आश्वासन दिले व आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

घरकुल योजना गरजूंपर्यंत पोहोचवा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरीब दुर्बल घटकांतील प्रत्येकाला स्वत:चे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देशात तीन कोटी घरकुले उभारण्यात येणार आहेत. ही योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाशिक येथील आडगाव मध्ये ४४८ सदनिकांच्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ भामरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिल‌िंद शंभरकर, म्हाडाचे मुख्याधिकारी रमेश मिसाळ, सुरेशबाबा पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भामरे म्हणाले, आज एकाच वेळी राज्यातील २० प्रकल्पांतील ४२ हजार सदनिकांच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे झाला. देशाला स्वातंत्र्य मिळून २०२२ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी देशातील प्रत्येक गरीबाला पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय व पोहोच रस्ता यासह पक्के घर देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे डॉ. भामरे यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिला बालकल्याण’ला नगर‌सेविकांची नकारघंटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मह‌लिा व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांच्या निवडीसाठी शनिवारी महासभा होत आहे. समितीवर भाजपचे पाच तर शिवसेनेचे तीन आणि आघाडीचा एक सदस्य निवडला जाणार आहे. परंतु, मह‌लिा व बालकल्याण समितीवर जाण्यासाठी भाजपसह सर्वच पक्षांमधील नगरसेविका नाखूष आहेत. त्यामुळे पक्षांचीही डोकेदुखी वाढली असून, नव्या जुन्यांचा संगम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापालिकेच्या अर्थकारणात या समितीला फारसे स्थान नसल्याने या समितीपासून लांब राहण्यासाठी सर्वपक्षीय मह‌लिांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महासभा होत आहे. या महासभेत मह‌लिा व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांच्या नियुक्तीसह विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने या समितीवरही भाजपचाच वरचष्मा राहणार आहे. समितीत भाजपचे ५, शिवसेनेचे ३ सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे समान सदस्य असल्याने दोघांपैकी एकच उमेदवार जाणार आहे. मह‌लिा व बालकल्याण समितीत फारसे अर्थकारण नसल्याने या समितीवर जाण्यासाठी सदस्य फारसे इच्छुक नसल्याचे चित्र आहे. या समितीवर गेल्यास प्रभाग सभापती तसेच स्थायी समितीवरील दावा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मह‌लिा या समितीवर जाण्यास फारशा उत्सुक नाहीत. या समितीवर सर्वच पक्षांकडून मह‌लिांना संधी दिली जाते. परंतु, या समितीच्या कामकाजाची माह‌तिी असलेल्या अनुभवी नगरसेविकांनी पक्षाकडे समितीसंदर्भात नकारघंटा कळवली आहे. े.

बोरस्ते विरोधी पक्षनेते

महापालिकेत भाजप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळणार असून, शिवसेनेकडून ज्येष्ठ नगरसेवक अजय बोरस्ते यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या महासभेतच त्यांच्या नावाचे पत्र देण्यात आले होते. परंतु, स्थगित महासभा असल्याचे कारण देत, महापौरांनी त्यांची घोषणा केली नव्हती. मात्र, शनिवारच्या महासभेत बोरस्ते यांच्या विरोधी पक्षनेतेपदावर महासभेत शिक्कामोर्तब होणार आहे. महापौरपदानंतर दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे पद सभागृहनेता हे आहे. या पदावर भाजपकडून कोणाची वर्णी लावली जाते याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. लहाडेंवर अखेर ‘एमटीपी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात केल्याप्रकरणी निलंबन झालेल्या डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर गर्भपात कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अतिरिक्त एक गुन्हा दाखल होणार आहे. महापालिका प्रशासनाला तसे पत्र प्राप्त झाले आहे. लहाडे यांच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल असून, या प्रकरणात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शनिवारी (दि. १५) कोर्टात सुनावणी आहे.

सिव्हिलच्या प्रसूती विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. लहाडे अवैध गर्भपात करीत असल्याचे प्रकरण २२ मार्च रोजी पुढे आले. या प्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडे तक्रार आली. प्राथमिक चौकशीत डॉ. लहाडेंविरोधात अनेक पुरावे समोर आल्याने राज्य सरकारने पाच सदस्यीय राज्यस्तरीय कमिटी स्थापन करून तसेच आरोग्य विभागाने अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांच्यामार्फत चौकशी केली. हे सर्व अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाल्यानंतर डॉ. लहाडेंच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. या दरम्यान, म्हसरूळ परिसरात डॉ. लहाडे यांचे प्रयाग हॉस्पिटल महापालिकेने सील केले. या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताशी संबंधित काही औषधे सापडली होती.

दरम्यान, ‘सिव्हिल’मधील गर्भपात प्रकरणी आरोग्य विभाग काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आरोग्य विभागाने सर्व अहवालांचा विचार करीत डॉ. लहाडेंवर गर्भपात कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोग्य विभागाचे संचालक सतीश पवार यांचे तसे पत्र ‘सिव्हिल’ प्रशासनाला १३ एप्रिल रोजी मिळाले. एमटीपी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे अधिकार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला असून, लागलीच हे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले. शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळपर्यंत डॉ. लहाडेंवर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक शेलारांचा सरकारी कामात अडथळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रुम बदलून दिली नाही म्हणून संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तसेच महापालिकेतील गटनेते गजानन शेलार यांनी गोल्फक्लब येथील शासकीय विश्रामगृहात गोंधळ घातला. शेलार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्याने व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत एकास मारहाण केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्रामगृहाचे कर्मचारी कौतिक माधवराव टाकेकर (रा. शिंगवेबहुला, देवळाली कॅम्प) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शिवनेरी इमारतीत खासदार रामदास तडस यांच्या नावाने बुक केलेला रुम बदलून द्यावा, या मागणीतून वादास सुरुवात झाली. विश्रामगृहात आलेल्या शेलार व त्यांच्या कार्यकर्त्याने तक्रारदार टाकेकर यांना गाठून रुम बदलून देण्याची मागणी केली. यावेळी टाकेकर यांनी रुम शिल्लक नसल्याचे सांगितले. मात्र, शेलारांकडून आग्रह सुरू झाल्याने टाकेकर यांनी या बाबत वरिष्ठांशी बोलून घेण्याचा सल्ला दिला. यानंतर शेलारांचा पारा चढला. संतप्त झालेल्या शेलार व त्यांच्या कार्यकर्त्याने टाकेकर यांना शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळताच व्यवस्थापक संपत चौधरी, अशोक देवळे व कर्मचारी सुनील बागुल यांनी घटनास्थळी धाव घेत शेलार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेलार व त्यांचा कार्यकर्ता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दोघांनी व्यवस्थापक चौधरी, देवळे व कर्मचारी बागुल यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत व कुटुंबीयांसह जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सुरू असताना कर्मचारी टाकेकर यांना मारहाण करण्यात आली.

पोलिसांकडून लपवाछपवी

दरम्यान, या घटनेची नोंद सायंकाळच्या सुमारास झाली. मात्र, मुंबई नाका पोलिस स्टेशनचे कर्मचारी असा गुन्हाच दाखल झाला नसल्याचे छातीठोक रात्री उशिरापर्यंत सांगत होते. गुरूवारी रात्री ड्युटीवरील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे पोलिसांच्या पुढील कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. दाखल गुन्ह्याची माहिती दडवून ठेवण्याच्या मुंबई नाका पोलिसांच्या या प्रयत्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाट पाहूनी जीव शिणला...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काहीवेळ टवटवीत दिसणारा पुष्पगुच्छ मंत्री महोदयांच्या प्रतीक्षेत कोमेजून गेला. आयोजकांनी दोन वेळा पाणी मारूनही बिच्चारा ताजातवाना होईना. भूम‌िपूजनाच्या मंत्रोच्चारासाठी बोलावलेल्या पूजाऱ्यांनीही वैतागून काढता पाय घेतला, अन् भूकेने व्याकुळलेल्या उपमहापौरांसह काही नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांनी बसल्या जागीच पोटपूजा उरकून घेतली. भाजप सरकारमधील मंत्र्यांना जाहीर कार्यक्रमांना उशिराने पोहोचण्याची सवयच जणू. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी त्यावर आज कडी केली. पंतप्रधान आवास योजनेच्या आडगाव येथील भूम‌िपूजन सोहळ्याला महोदय चक्क पावणेतीन तास विलंबाने पोहोचले. भूम‌िपूजनाचाच मुहूर्त चुकविणारे भाजप सरकार गरीबांना घरे तरी वेळेत देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रत्येकाला हक्काचे घरकुल मिळायला हवे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित केली. या योजनेचा भूम‌िपूजन सोहळा आडगावात पार पडला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना निमंत्रित केले होते. त्यासाठी मोकळ्या मैदानावर शामियाना उभारण्यात आला होता. दुपारी साडेबारा ही रणरणत्या उन्हाची वेळ कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आल्याने सर्वांच्याच कपाळावर आठ्या होत्या. आडगाव ग्रामस्थ आणि घरकुल लाभार्थींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. गर्दी दिसावी यासाठी महापालिका तसेच अन्य विभागांचे अधिकारी कुटुंबीयांसह कार्यक्रमस्थळी हजर झाले. उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह काही नगरसेवक दुपारी साडेबारा ते एक या कालावधीत कार्यक्रमस्थळी पोहोचले. परंतु, त्यांनाही मंत्री महोदयांची प्रतीक्षा करावी लागली. दुपारी साडेबाराची वेळ टळून गेली. एक, दीड, दोन, अडीच वाजले तरीही मंत्र‌िमहोदयांचे कार्यक्रमस्थळी आगमन होईना. त्यामुळे लोक अक्षरश: वैतागले. मंत्र‌िमहोदयांमागे कामाचा व्याप असतो हे खरेच! परंतु, लोकांनी किती वेळ प्रतीक्षा करावी याबाबतच्या चर्चेला कार्यक्रमस्थळी उधाण आले. येथे सभामंडपात कुलरची व्यवस्था असूनही उकाड्याने लोक हैराण झाले. कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलेल्या पूजाऱ्यांपैकी दोघे मंत्र‌िमहोदय येण्यापूर्वीच वैतागून निघून गेले. गुलाबाच्या फुलांचे गुच्छही सुकू लागले. पाणी मारून त्यांना पुन्हा टवटवीत करण्याचा केविलवाणा प्रयत्न आयोजकांनी केला. परंतु, तो निरर्थक ठरला. भूकेमुळे व्याकुळलेल्या उपमहापौरांसह काही नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळीच खाद्यपदार्थ मागवून त्यावर यथेच्छ ताव मारला. साहेबांचे लवकरच आगमन होत आहे, असे सांगणाऱ्या निवेदिकेनेही नंतर नंतर अशी ‘खोटी’ उद््घोषणा करणे बंद केले. अखेर तब्बल पावणेतीन तास उशिराने डॉ. भामरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. येण्यास विलंब झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करून त्यांनी अवघ्या दहा मिनिटांत भाषण आटोपते घेतले. एका रटाळ आणि मनस्ताप देणाऱ्या कार्यक्रमाचा अनुभव घेऊन नागरिक घरी परतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुगलवर जाहिरातीच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0

नाशिक ः गुगलवर जाहिरात देण्याच्या बहाण्याने बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातील पैसे परस्पर लांबवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलाकर बाबुराव चौधरी (रा. वृंदावननगर, कामटवाडा) यांची अंबड एमआयडीसीत आनंदा इंड्रस्ट्रीयल वर्क्स नावाची कंपनी आहे. व्यवसाय वृध्दीसाठी प्रयत्न करणाऱ्या चौधरी यांना २१ व २२ मार्च रोजी ७८४०८१६७९० आणि ९५४०८३५११६

या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता. गुगल अॅडव्हरटाईजमेंट केल्यास जास्त फायदा होईल, असे आमिष दाखवत संशयितांनी त्यांना जाहिरात देण्यास उद्युक्त केले. त्यानुसार चौधरींनी जाहिरात होकार दिला असता संबंधितांनी त्यांना ऑनलाइन १० हजार ६२५ रुपये भरण्यास सांगितले. या काळात चौधरी यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून संबंधितांनी त्यांच्या खात्यातील रोकड वेळोवेळी काढून घेतल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास निरीक्षक बांबळे करीत आहेत.
दुचाकीस्वाराचा उपचारावेळी मृत्यू

नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या सिडकोतील वृध्द दुचाकीस्वाराचा शुक्रवारी (दि.१४) मृत्यू झाला. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

जनार्दन शंकर देशमुख (६०, रा. दत्तचौक, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास देशमुख त्र्यंबककडून सातपूरकडे आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. पिंपळगाव बहुला येथील पुलावर पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट कारने दुचाकीस धडक दिली होती. या घटनेत देशमुख गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी प्रकृती खालवल्याने त्यांना मुलगा अनिल देशमुख यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

प्रवाशाचा मृत्यू

लॉजमध्ये थांबलेल्या पंजाब येथील प्रवाशाचा बेशुध्द पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सराफ बाजारातील आदर्श लॉजमध्ये घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुनीलकुमार जगन्नाथ शर्मा (६०, रा. ब्रह्मचारी, अमृतसर) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. शर्मा दोन दिवसांपूर्वी आपल्या मित्रासमवेत कामानिमित्त शहरात आले होते. ते सराफ बाजारातील आदर्श लॉज येथे थांबले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीटभट्टी व्यावसायिकांचे १८ एप्रिलला मुंबईत धरणे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या नेतृत्वाखाली वीट व्यावसायिकांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ एप्रिलला एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती नाशिकचे विभागीय संपर्कप्रमुख कचरू वैद्य व युवक अध्यक्ष ज्ञानेश रसाळ यांनी दिली. हे धरणे आंदोलन सकाळी ११ ते ६ या वेळेत होणार आहे.

या आंदोलनासाठी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्याकडून राज्यातील कुंभार समाजातील सर्व नागरिकांना संघटित करण्यात येत आहे. या आंदोलनात कुंभार समाजाच्या वीटभट्टी व्यावसायिकांकडून अकृषिक एनए (एन.ए.) व माती उखन्नन यावर २०१० पासून आकारलेल्या अनाठायी दंडाचे पैसे परत मिळावेत, सर्व तालुक्यात समान वीटभट्टी धोरण राबवण्यात यावे, कुंभार समाजावर तलाठी, तहसीलदार यांच्याकडून बळजबरीने वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम त्वरित परत करण्यात यावी, तसेच गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्र मातीकाम कलाकारी रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

या आंदोलनास नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुंभार समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक विभागीय पदाधिकारी कचरू वैद्य, ज्ञानेश्वर भागवत, अंबादास गारे, विजय चव्हाण आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी कचरू वैद्य (९३२६११३७९४), ज्ञानेश रसाळ (७२७६००६०६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्विनी मोरे यांची अध्यक्षपदी निवड

$
0
0

नाशिक: समाज कल्याण कर्मचारी संघटनेची (गट-क) नाशिक विभागीय कार्यकारिणी जाहीर झाली असून, अध्यक्षपदी अश्विनी मोरे, तर सचिवपदी सदानंद नागरे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकरिणीत उपाध्यक्ष आर. डी. देवरे, एस. बी. त्रिभूवन, सहसचिव सुभाष फड, सहसचिव संजय सैंदाणे, कोषाध्यक्ष मनीषा गांगुर्डे, सदस्य तथा प्रसिध्दी प्रमुख सुरेश पाटील, सदस्य तथा विधी सल्लागार संतोष सरकटे, बी. एन. पाटील, हिम्मत साळुंके, ओमेश पवार, एस. टी. चौधरी, मधुकर महानोर यांची निवड करण्यात आली आहे. सदर कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी आहे.

आज परिषद

नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य रं. कृ. यार्दी स्मृती व्याख्यानमालेंतर्गत भारतीय शिक्षणाच्या कक्षा आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका नवशैक्षणिक प्रयोग आणि आव्हाने या विषयावर राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमधील नूतन

ऑडिटोरियम येथे सकाळी ९.३० वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे.

रामभक्त मंत्रमुग्ध

नाशिक : वीर हनुमान आणि प्रभू रामचंद्र यांच्या विविध प्रसंगातील सुरेख वर्णन करणारी भक्तितीगीते, अभंग बागेश्रीच्या कलाकारांनी मैफलीत सादर करीत रामभक्तांना मंत्रमुग्ध केले. हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्ताने आगर टाकळी येथे बागेश्री व पारिजात भजनी मंडळाच्या वतीने मनोरमा वाडीकर यांनी रचलेल्या रामचरित गीतांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम नुकताच झाला. मेघा भट, मंगला जोशी, कुर्लेकर, प्रतिभा भट या कलाकारांनी वैविध्दयपूर्ण अभंग सादर करीत श्रोत्यांची दाद मिळवली. विविध गीतांना विद्याताई अनगळ यांनी संवादिनीवर तर चारूदत्त दीक्षित यांनी तबल्यावर साथ केली. प्रभू रामचंद्र आणि हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलभूषण जाधवला न्याय मिळवून देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाकिस्तान न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून देण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नाशिक येथील आडगावमध्ये ४४८ सदनिकांच्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ भामरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, जाधव यांना पाकिस्तान न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबाबत देशभरात आक्रोष आहे. सरकारही काही महिने सातत्याने कुलभूषण यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानकडे पाठपुरावा करीत आहे. पाकिस्तानच्या न्यायालयाने ज्या पध्दतीने हा खटला चालविला, कुलभूषण यांना शिक्षा सुनावली या एकूणच प्रक्रियेत पारदर्शकता नाही. त्यांनी काही नॉर्म्स पाळणे आवश्यक होते. परंतु, ते पाळले गेले नाहीत. परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांच्या अॅम्बॅसॅडरला बोलावून याबाबत समज दिली आहे. अशा प्रकारची शिक्षा सुनावणे हे पाकिस्तानकडून होणारे उल्लंघन आहे. ते कदापी मान्य होणार नाही. आम्हाला शेजारी राष्ट्राशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत, असे डॉ. भामरे यांनी नमूद केले.

पुरावे नसताना शिक्षा

कुलभूषण रॉ चा एजंट होता. त्याला बलुचिस्तानमध्ये कारवाया करावयाच्या होत्या असे आरोप पाकिस्तानने केले आहेत. याचे पुरावे त्यांनी भारताला तसेच इंटरनॅशनल कम्युनिटीला द्यावेत, अशी आमची मागणी आहे. परंतु, असे कोणतेही पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. सरकार या प्रकरणाबाबत अत्यंत गंभीर असून, कुलभूषणला न्याय देण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास डॉ. भामरे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंग काही थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात सक्रिय झालेले चेन स्नॅचर्स थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शहराच्या कुठल्या ना कुठल्या भागात एखाद दोन घटना घडत असून, महिला वर्गात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तिडके कॉलनी व सीटी सेंटर मॉल परिसरात गुरूवारी पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी तोडून धूम ठोकली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंदनगर येथील अर्चना मकरंद बागुल (रा. सत्यम स्विटमागे) यांच्या तक्रारीनुसार, गुरूवारी सायंकाळी त्या मैत्रिणीसोबत सीटी सेंटर मॉल परिसरात गेल्या होत्या. काम आटोपून ऐन वर्दळीच्या वेळी म्हणजे रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या घराकडे परतत असताना ही घटना घडली. सीटी सेंटर मॉल समोरून दोघी मैत्रिणी पायी जात असतांना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून नेली.

चेन स्नॅचिंगची दुसरी घटना तिडके कॉलनीत घडली. मीरा मनोहर जाधव, ही महिला गुरूवारी रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या. रात्री दहा वाजेच्या सुमारास राजे शिवाजी केंद्राजवळून घराकडे परतत असताना चोरट्यांनी संधी साधली. दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी क्षणार्धात ओरबाडून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत. सीटी सेंटर मॉल आणि तिडके कॉलनी हे अंतर फार नाही. मात्र, रात्री आठ वाजता झालेल्या चेन स्नॅचिंगनंतर फारशा उपाययोजना राबवल्या गेलेल्या दिसत नाही. नाका बंदी अथवा चेन पॉईंट लागलीच तैनात करण्यात आले असते तर तिडके कॉलनीत झालेली चेन स्नॅचिंगची घटना रोखता आली असती.

पोलिसाला धक्काबुक्की

हेल्मेट सक्तीच्या कारवाईचा राग आल्याने ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी वाहतूक पथकालाच धक्काबुक्की केली. ही घटना शरणपूर रोडवरील वाहतूक सिग्नलवर घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयितापैकी एकाने कारवाईच्या धसक्याने पोलिस स्टेशनमध्ये डोके फोडून घेतल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आले. राहुल देविदास मुसळे (रा. पाटीलनगर, सिडको), दर्शन अरविंद बाविस्कर (रा. चर्चमागे, इंदिरानगर) व त्यांचा एक साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. वाहतूक शाखेचे शिपाई गाढवे यानी तक्रार दिली. शरणपूररोडवरील सिग्नलवर पोलिस सेवा बजावत असताना ही घटना घडली.

श्रमिकनगरला घरफोडी

सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. वैभव विनायक येवले (रा. नमन सोसा. सातमाऊली चौक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. ९ ते १३ एप्रिल दरम्यान येवले कुटूंबिय बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकड तसेच सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ९० हजारांचा मुद्देमाल साफ केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ नराधमाचाही मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आपला लहान मुलगा आणि मुलीची हत्या करून स्वत:ला पेटवून घेतलेल्या नराधम पित्याचाही बिटको हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मृत्यू झाला. या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पित्याच्या हल्ल्यातून वाचलेल्या मोठी मुलगी संजीवनी हिच्या जीवाचा धोका टळला आहे. संपत्तीसाठीच पित्याने कुटुंबालाच संपविण्याचा डाव रचल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

नाशिकरोडच्या जगताप मळ्यातील तरण तलावाशेजारी ऋणानुबंध बंगला आहे. त्यामध्ये गुरुवारी भर दुपारी हे हत्याकांड घडले. सुनील बेलदार (५०) या पित्याने दुपारी लहान मुलगा देवराज (४), मुलगी वैष्णवी (६) यांची गळा दाबून हत्या केली. त्यांचे मृतदेह पलंगावर ठेऊन त्यावर चादर टाकली. त्यामुळे पत्नीला संशय आला नाही. नंतर सुनीलने मोठी मुलगी संजीवनीला (१२) विषारी औषध दिले. सुनीलची पत्नी अनिता या घराबाहेर धुणे धुत असल्याने त्या सुदैवाने वाचल्या. पत्नी अनितालाही संपवण्याचा त्याचा डाव असावा. मात्र, वेळीच सावध होऊन बाहेर पळाल्याने त्यांचा व संजीवनीचा जीव वाचला. सुनील खासगी क्लास घेत असे. दोन वर्षापासून तो बंद असल्याने त्याची पैशाची चणचण भासत होती. तो मनोरुग्ण झाला होता. पोटच्या पोरांचा खून केल्यानंतरही तो घरात शांतपणे वावरत होता. मुलाला तो अपशकून मानायचा. पत्नी अनिता यांच्या तक्रारीनुसार, सुनीलचे क्लासमधील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याला वैतागून अनिता माहेरी (रुदावली, ता. शिरपूर, धुळे) येथे राहत होती. सुनीलने बँक आणि विम्याचे पैसे शेअरबाजारात घालवले होते. पैशासाठी तो पत्नी व आई-वडिलांना मारहाण करत होता. त्यामुळे अनिता दोन वर्षांपासून माहेरी तर सुनीलचे आई-वडिल तपोवनातील वृध्दाश्रमात रहात होते. सुनील राहत असलेला बंगला आईच्या नावे होता. तो विकून मला पैसे द्यावेत, अशी तो मागणी करायचा. तथापी, सुनीलच्या मुलांच्या शिक्षण व विवाहासाठी पैसे शिल्लक रहावेत म्हणून त्याच्या वडिलांनी साफ नकार दिला होता. कुटुंबियांना संपवले तर घर आपल्या नावावर होईल, पैसे मिळतील, या हेतूने सुनीलने हा डाव रचल्याचा पोलिसांचा संशय आहे.

आधीही हत्येचा प्रयत्न

सूत्रांच्या माहितीनुसार, चौदा वर्षाच्या संसारात सुनीलने आधीही कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना फिरायच्या निमित्ताने समुद्रात ढकलण्याचा त्याचा डाव होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुनीलचा शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बिटको रुग्णालयात मृत्यू झाला. मरण्याआधी तो मीडियावाले बोलवा, बायबल, कुराण आणा, अशी असंबंध बडबड करत होता.

आजोबांचे डोळे पाणावले

सुनीलच्या वडिलांनी गवंडी काम करून बंगला उभा केला. काबाडकष्ट करून मुलांना उच्चशिक्षित केले. सुनीलला त्यांनी शिक्षणासाठी मुंबईला पाठवले. डबल ग्रॅज्युएट केले. सुनीलच्या पैशाच्या व्यसनाने ते चिंतीत होते. ते पैसे देत नसल्याने सुनीलने त्यांना वृध्दाश्रम दाखवला. त्याने मुलांचे हत्याकांड केल्याचे कळताच आई-वडिलांचे डोळे पाणावले.

तर प्राण वाचले असते

सुनील वैफल्यग्रस्त झाल्याने अनिताला नाशिकला पाठवू नका, असे त्याच्या वडिलांनी अनिताच्या पालकांना सांगितले होते. तथापी, सुनील १२ एप्रिल रोजी अनिताच्या माहेरी जाऊन गोड बोलून तिला घेऊन आला. १३ एप्रिल रोजी हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजेला कुटुबीयांना जेवणासाठी घेऊन गेला. घरी आल्यावर पत्नी मागे कपडे धुत असताना त्याने देवराज व वैष्णवीचा गळा दाबला. मोठी मुलगी संजीवनीला विषारी इंजेक्शन दिले. अनिता वेळीच सावध झाली असती आणि तिने सासऱ्यांचे ऐकून माहेरीच राहण्याचा निर्णय घेतला असता तर दोन मुले, पती असे सर्वांचेच जीव वाचले असते, अशी चर्चा परिसरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलकर्णींवर विनयभंगाचा गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर यशवंत कुलकर्णी यांच्या विरोधात शाळेतील शिक्षिकेने विनयभंगाचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल केला आहे.

‘नाएसो’चे माजी अध्यक्ष प्रभाकर यशवंत कुलकर्णी (७५, रा. विनायक अपार्टमेंट तिडके कॉलनी, नाशिक) यांनी शाळेतील शिक्षिकेशी आक्षेपार्ह वर्तन केल्याने सदर शिक्षिकेने त्यांच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला.

शिक्षक मंडळातही ठराव

प्रभाकर कुलकर्णी यांची चौकशी करण्यासंदर्भात ‘नाएसो’च्या शिक्षक मंडळाची बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. कुलकर्णी यांची चौकशी करावी आणि त्याचा अहवाल ‘नाएसो’च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात यावा, असा ठराव शिक्षक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तशी माहिती ‘नाएसो’च्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता कुलकर्णी यांची चौकशी होणार असून, त्रिसदस्यीय समिती त्यांचा अहवाल सादर करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणे, जिल्ह्यात नाही सावकारी!

$
0
0

नाशिक : खासगी सावकारीचे प्रकार नाशिक जिल्ह्यात सर्रास सुरू असतांना राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यात सावकारी व्यवसायाचे प्रमाण कमी असल्याची माहिती सहकार अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी वर्षभरात केवळ खासगी सावकारीच्या चार तक्रारी आले असल्याचे सांगत हा प्रकार जिल्ह्यात नसल्याचे सांगितले. खासगी सावकारीतून कामगार, शेतमजूर व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असतांना जिल्ह्यात त्याचे प्रमाण कमी कसे झाले, असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

नाशिक जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात सुध्दा खासगी सावकारीचा धंदा बिनबोभाट सुरू आहे. त्यातून अनेकांची पिळवणूक होत असतांना सहकारच्या अधिकाऱ्यांनी राज्यात इतर भागात खासगी सावकार आहे पण जिल्ह्यात नाही असे सांगून मंत्र्याचीही दिशाभूल केली. या आढावा बैठकीत बेकायदेशीर सावकारी प्रकरणाचा आढावा घेतांना अधिकाऱ्यांनी सांगितले, की सहकार विभागाकडे एकूण ४ प्रकरणे दाखल झाली. त्यात कालबाह्य प्रकरण, न्यायालयीन प्रकरण, उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेले प्रकरण, उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्याकडे चौकशीसाठी एकही प्रकरण नसल्याचे सांगितले. तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू असलेली प्रकरणही असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी एकाचाही निकाल लागला नाही. जमीन परत केलेली प्रकरण व विभागीय निबंधकाकडे दाखल केलेले एकही प्रकरण नसल्याचे म्हटले आहे.

राज्यात सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावल्यामुळे २००७ मध्ये याविरूध्द कायदा करण्याची तयारी सरकारने सुरू केली त्यानंतर तब्बल ७ वर्षाने त्याची अमंलबजावणी सुरू झाली. पण या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच धनधांडगे सावकार सर्वसामान्य गरजूंच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांना वेठीस धरताना दिसतात. त्यामुळे सावकारी त्रासाला कंटाळून काहीजणांनी आत्महत्या केल्या आहे.पण त्याची कोणतीही माहिती यावेळी आढावा घेतांना देण्यात आली नाही. जिल्ह्यात गेल्या वर्षी तब्बल ८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर या वर्षात साडेतीन महिन्यात हाच आकडा २१ झाला आहे. त्यामागे बहुतांश कारण हे खासगी सावकारीचे असल्याचेच बोलले जाते. शेतकऱ्यांच्या पिळवणूकीबरोबरच कामगार, शेतमजूर व मध्यमवर्गीय या सावकाराच्या पश्चात सहज अडकले जातात. त्यांना नंतर धमक्या दिल्या जातात. नाशिकमध्ये तर एकाचे अपहरणही करण्यात आले.

सामान्यांना बँकेच्या दारात जाणे आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटते. त्यामुळे ते खासगी सावकाराकडे जातात. पण सावकार त्या संधीचा फायदा घेऊन त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची पिळवणूक करतो. या व्यवहारात कागदपत्र तयार करतांना बऱ्याच वेळा आता खरेदी खत किंवा साठे खत केल्याचे बोलले जाते. त्यामुळे तक्रार करणाऱ्यांना संधी मिळत नाही.

पुण्यात छापे; नाशकात थापा

नाशिकमध्ये सहकार विभागाचे अधिकारी थापा मारत असतांना पुणे येथे मात्र सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने गुरुवारी कात्रज येथील लेकटाउन गृहसंकुलातील एका फ्लॅटवर छापा टाकून बेकायदा सावकारी करणाऱ्या वडील आणि मुलाविरुद्ध कारवाई केली. या दोघांनी पुण्यासह कोल्हापूर आणि सांगली परिसरातील लोकांना सुमारे २० कोटी रुपये व्याजावर दिले होते. त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ या कायद्याअंतर्गत उपनिबंधक कार्यालयाला कारवाई केली.

प्रभावी अमंलबजावणी नाही

महाराष्ट्र सावकारी अधिनियमाला सरकारने २०१० मध्ये पहिल्यांदा मान्यता दिली, मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे ते पाठविण्यात आले. राष्ट्रपती कार्यालयाकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन २०१४ च्या विधिमंडळात हे विधेयक पुन्हा ठेवण्यात आले. विधिमंडळात हे विधेयक मंजूर झाल्यावर राष्ट्रपतींकडे पुन्हा मंजुरीसाठी पाठविण्यात आले. २ एप्रिल २०१४ रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकास मंजुरी दिली. ४ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र सरकारने राजपत्रातून हा अधिनियम प्रसिद्ध करून लागू झाला. खासगी सावकारीच्या जाचातून मुक्तता होण्यासाठी शासनाने तयार केलेल्या नवीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेहरू उद्यानाची दुर्दशा

$
0
0

नाशिकरोडच्या उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य, पालिकाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड येथील वॉस्को चौकालगत असलेल्या नेहरू गार्डनची सध्या देखभालीअभावी दुरवस्था झालेली आहे. या उद्यानाच्या स्वच्छतेकडे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करित असल्याने या उद्यानाला कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे. गेल्या काही वर्षांपासून याकडे दुर्लक्ष झाल्याने कचऱ्याचा ढीग झाला असून संरक्षक भिंतही ढासळली आहे. यामुळे परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानच राहिलेले नाही. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाला केली आहे.

येथील वॉस्को चौकालगतच पालिकेचे नेहरू उद्यान असून, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे महत्त्वाचे उद्यान आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या उद्यानाची देखभाल पालिकेच्या उद्यान विभागाकडून होत नसल्याने या उद्यानाचे सौंदर्य लयास गेलेले आहे. आजमितीस या उद्यानात भिकारी, मद्यपी, जुगारी आणि भटकी जनावरे यांचा वावर वाढल्याचे चित्र आहे.

नेहरू उद्यान सर्वच बाजूंनी व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. काही व्यावसायिकांकडून तर या उद्यानाच्या जागेचाही वापर केला जाऊ लागला आहे. तसेच या उद्यानाची संरक्षक भींतही ढासळली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन पूर्णपणे सुस्त झालेले दिसून येत आहे. तरी याकडे लक्ष देत उद्यानाची स्वच्छता करून दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मद्याच्या बाटल्यांचा खच

या संपूर्ण उद्यानात मद्यपींचा दररोज अड्डा जमतो.त्यामुळे या ठिकाणी मद्याच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या दिसून येतात.या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या मंदिराचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेले असल्याने या मंदिराच्या आश्रयाने येथे भिकाऱ्यांचाही मोठा वावर असतो. या उद्यानाच्या प्रवेशद्वारालगतच सिंहस्थाच्या काळात एक सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. परिणामी, येथे कायमच दुर्गंधी असते. त्यामुळेही हे उद्यान ओस पडले आहे. या उद्यानात रेणुका देवीचे जुने मंदिर असल्याने या मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांना फोडला घाम!

$
0
0

प्रभाग समित्यांच्या रचनेवरून पहिल्याच महासभेत विरोधक वरचढ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, प्रबळ व अभ्यासू नगरसेवकांची उणीव पहिल्याच महासभेत जाणवली. याउलट प्रबळ व अभ्यासू नगरसेवकांचे मोठे अस्र विरोधकांकडे असल्याची चुणूक दिसून आली असून, सत्ताधारी पहिल्याच सभेत घामाघूत झाल्याचे चित्र दिसले. प्रशासकीय व भौगोलिकदृष्ट्या महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या रचनेच्या प्रस्तावातील त्रुटी शोधून विरोधकांनी चक्क प्रशासनालाच दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे एका सदस्याने भाजपलाच घरचा आहेर दिला.

महापौर रंजना भानसी यांची शनिवारी विविध विषयांच्या मंजुरीसाठी पहिलीच महासभा होती. या महासभेत लोकसंख्येचा विचार करून प्रभाग समित्यांची रचना सहावरून नऊ करण्याचा विषय सभापटलावर ठेवण्यात आला होता. सभागृहात भाजपला बहुमत असल्याने सर्व प्रस्ताव चुटकीसरशी पास होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, पहिलाच विषय मंजुरीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्षांनी अल्पसंख्येत असूनही घाम फोडला. अपक्ष नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाची चिरफाड केली. या प्रस्तावात नमूद केलेल्या लोकसंख्येत मोठी तफावत होती. प्रशासनाला गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. सुधाकर बडगुजर यांनी प्रस्तावावरून प्रशासनाचा घाम फोडला. प्रशासनाकडून कलम २६ (अ) नुसार प्रभाग समित्या विस्ताराचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, नगररचना अधिनियमामध्ये २६ (अ) कलम अन्य विषयांसाठी असल्याचे पुरावे बडगुजर यांनी सादर केले. तेव्हा चूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रशासन उपायुक्त विजय पगार यांनी प्रीटिंग मिस्टेक असल्याचे सांगून चुक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रशासन दिलगिरी व्यक्त करीत नाही तोपर्यंत सभा चालू देणार नसल्याचा इशारा दिला. त्यामुळे विजय पगार यांच्यावर सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की ओढावली.

दिनकर पाटलांचा भाजपला घरचा आहेर

मनसेच्या सत्ताकाळात आक्रमक राहिलेले नगरसेवक दिनकर पाटील भाजपच्या सत्ताकाळातही आक्रमकच राहतील, असे संकेत त्यांनी दिले. पाटील यांनी सभागृहात महापौरांसह पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारावरून त्यांनी प्रशासनासह महापौरांना जाब विचारला. प्रशासन माहिती देत नाही तोपर्यंत खाली बसणार नाही, असा इशारा दिला. तेव्हा भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाला तडजोडी सुरू झाल्या का असा सवाल करीत खडसावले. त्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळत त्यांनी सभागृहात गदारोळ सुरू केला.

महापौरांनी प्रशासनाचे उपटले कान

महापौरांनी पहिल्याच सभेत दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आल्याने संतप्त होऊन प्रशासनाचे कान उपटले. यापुढे असे चुकीचे डॉकेट मांडले, तर कारवाई करू असा सज्जड दम त्यांनी भरला. पाणीप्रश्न, टाक्यांच्या सुरक्षा यावरूनही सभागृहात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. भाजपकडे प्रबळ व अनुभवी व अभ्यासू नगरसेवकांची वाणवा असल्याचा प्रत्यय पहिल्याच सभेत आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणप्रतिष्ठेसाठी मंगळवारचा अल्टिमेटम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृहातील पार्वती मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापणेच्या मुद्यावर आक्रमक होत साधू-महंतांनी आता १८ एप्रिलचा अल्ट‌मिेटम दिला आहे. त्र्यंबकेश्वर येथील अन्नपूर्णा आश्रमात षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ. बिंदू महाराज यांनी मांडलेला ठराव सर्वानुमते पास करण्यात आला आहे.

गर्भगृहातील पावर्तीमातेच्या खंड‌ति मूर्तीबाबत महंतांनी देवस्थान ट्रस्टकडे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय माग‌तिला आहे. आठ दिवसाची मुदत संपली मात्र अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे महंतांनी येत्या मंगळवारी (दि. १८) देवस्थान ट्रस्टकडे असलेली नवीन पार्वतीची मूर्ती ताब्यात घेण्यात यणार आहे. त्यानंतर पुरातत्व खात्याच्या समन्वयाने आणि पुरोहितांचा सल्ला घेऊन महंत स्वतः मूर्तीची प्राणपतिष्ठा करणार आहेत.

या बैठकीत विश्वस्त ललीता शिंदे म्हणाल्या, माझा भाऊ कैलास देशमुख हा मंदिराचा पुजारी आहे. आपण गर्भगृहात गेलोलो नाही. मात्र त्याने ही मूर्ती खंड‌ति झाल्याचे आपल्या निदर्शनास आणले. त्यानंतर खूप प्रयत्न करून मी नवीन मूर्ती तयार करून आणली. मात्र ट्रस्ट त्यास साथ देत नाही. उलटपक्षी त्यांनी अनेक वेळा आपण केलेल्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत. अध्यक्ष स्वामी सागरानंद महाराज यांनी शांततेने हा विधी पार पाडावा, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लक्षणे ओळखा, त्वरित उपचार करा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धोकादायक स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्‍टरांनी लक्षणे ओळखून पेशंटवर तातडीने उपचार करावेत. थुंकीचा अहवाल येण्याची वाट पाहत बसू नका, असा स्पष्ट आदेश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिला.

जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, महापालिका वैद्यकीय अधिकारी, सर्व विभागाचे उपसंचालक, यांच्यासमवेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्हिडीओ कॉन्सफरन्सद्वारे संवाद साधला. अतिरिक्त मुख्य सचिव विजय सतबीरसिंग, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.

स्वाइन फ्लू रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. स्वाइन फ्लू आणि फ्लू यांची लक्षणे एकसारखी असतात. स्वाइन फ्लूच्या पेशंटला तीव्र ताप आणि तीव्र घसादुखी असते, तर साधा फ्लू असणाऱ्या रुग्णास कमी ताप व कमी घसादुखी असल्याने डॉक्‍टरांनी ही लक्षणे ओळखून तातडीने त्यावर टॅमी फ्लूच्या गोळ्या देऊन उपचार करावेत. सर्व खासगी मेडिकलमध्येही टॅमी फ्लूच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, संशयित पेशंटच्या थुंकीचे नमुन्यांच्या पुणे येथील प्रयोगशाळेकडील अहवालाची प्रतीक्षा न करता यापुढे लागलीच कार्यवाही करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले. पेशंटसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय ठरणार आहे. दरम्यान, चालू वर्षीही राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, राज्यात पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये सर्वाधिक २६ मृत्यू झाले आहेत.


स्वाइन फ्लूच्या १५ रुग्णांवर सध्या उपचार

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण ४४ हजार २४३ स्वाइन फ्लू संशयित पेशंट्सची तपासणी करण्यात आली. त्यातील ७१० जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले. १६२ पेशंट्सला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले. त्यापैकी १०२ पेशंट्स ठणठणीत बरे झाले. उर्वरित पेशंट्सपैकी १५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीम अॅप अखेर मराठीत

$
0
0

अपडेट केल्यावर मिळणार सुविधा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने मोबाइलद्वारे व्यवहार करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले भीम अॅप अखेर मराठीत उपलब्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या अॅपच्या नवीन सुविधांची माहिती दिली. आता या अॅपमध्ये पंजाबी, मराठी आणि आसामी या तीन प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे शुक्रवारी तरुणांना भीम अॅपची शिफारस करून पैसे कमावण्याची ऑफर दिल्यानंतर नाशिकच्या तरुणांनाही या अॅपने भुरळ घातली आहे. मराठीची सुविधाही उपलब्घ करून दिल्यामुळे हे अॅप वापर वापरणे आता सोपे झाले आहे. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर अनेक जणांनी हे अॅप डाऊनलोड करीत रेफरल पर्याय निवडण्यासाठी शोधा शोध सुरू केली आहे. मोबाइल उचला, भीम अॅप शिका, ते अधिकाधिक लोकांना शिकवा आणि पैसे कमवा, अशी साद घालत पंतप्रधान मोदी यांनी भावी पिढीला आपल्या मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्याला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

घरबसल्या रोजगार

हे अॅप वापरण्याची शिफारस केल्यानंतर समोरच्या यूजरने जर त्यावरून तीन व्यवहार केले, तर खात्यात दहा रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे हे अॅप कसे वापरायचे व त्यातून रेफरल कुठे आहे, अशी माहिती तरूण दिवसभर करून घेत होते. एका दिवसात तुम्ही २० लोकांना या अॅपशी जोडलंत तर २०० रुपये मिळणार असल्यामुळे घरबसल्या हा नवा धंदा मिळाल्याने तरुणांनी आपल्या स्मार्ट फोनवर कोणाला हे अॅप पाठवयाचे याचे गणित जुळवण्याचे काम सुरू केले आहे.

व्यापाऱ्यांचाही फायदा

व्यापाऱ्यांनी सुध्दा दुकानात या भीम अॅपवरून व्यवहार कसे करायचे याची माहिती करून घेतली आहे. त्यांना सुध्दा ठराविक व्यवहारांनंतर २५ रुपये मिळणार असल्यामुळे त्यांची चाचपणीसुध्दा केली. १४ ऑक्टोबरपर्यंत ही योजना सुरू असल्याने सहा महिने त्याचा फायदा घेता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नोटाटंचाईचा विषय पुढे येऊ लागल्याने या अॅपचा वापर नाशिकमध्ये वाढण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images