Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्ह्यात सोळा टक्के उपयुक्त जलसाठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत ६२.८७ दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ १६.८६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा एक टक्के कमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे ऐन मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील बारा मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी लाटीपाडा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर सुलवाडे या आठ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत उपयुक्त जलसाठा आहे. तर अमरावती, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी या चार प्रकल्पांत उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण नगण्य आहे. अक्कलपाडा वाडीशेवाडी प्रकल्पातून मार्च महिन्यात नदी काठावरील गावांसाठी पाणी सोडण्यात आले होते. अक्कलपाड्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ऐंशीपेक्षा अधिक तर वाडीशेवाडी प्रकल्पातील पाण्यामुळे वीसपेक्षा अधिक गावांची तहान भागली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील गावांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गैरहजर पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द

$
0
0

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील पंचायत समितीच्या सभांना तीन महिन्यांपासून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा निकाल नाशिक विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयाने दिला आहे. दि. २३ मार्च ते २६ जून २०१६ दरम्यान आयोजित पंचायत समितीतील सभांना हे सदस्य गैरहजर राहिल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत नुकताच निकाल देण्यात आला असून, या सदस्यांमध्ये विद्यमान सभापतींचा समावेश असल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

धडगाव येथील पंचायत समितीचे सदस्य तथा विद्यमान सभापती काळूसिंग सुन्या पाडवी, सदस्या मिसरीबाई गोविंद पाडवी, कविता तानाजी पावरा, देवजी पारशी वळवी, गौतम दशरथ वसावे हे पाच सदस्य २३ मार्च ते २६ जून २०१६ दरम्यान आयोजित पंचायत समितीतील सभांना वारंवार गैरहजर राहिले होते. याबाबत सदस्य रवींद्र पराडके यांनी सदस्यांविरुद्ध अपात्र करण्यात यावे, या मागणीची तक्रार नाशिक विभागीय आयुक्तांकडे केली होती. नुकतीच याबाबत सुनावणी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात घेण्यात आली. सभांना गैरहजर राहिल्यामुळे या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. हा निकाल नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या न्यायालयाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेचे मनपाकडे हस्तांतरण करू नये

$
0
0

शिवसेनेच्या सतीश महालेंचे धुळे महापौरांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे मनपाकडे हस्तांतरण करू नये, असा महापालिकेने महासभेत ठराव पारित करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख सतीश महाले यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन नुकतेच महापौर कल्पना महाले यांना दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बहुतांश दारू विक्रीची दुकाने १ एप्रिलपासून बंद झाली आहेत. मात्र, आदेशानंतर राष्ट्रीय व राज्य महामार्ग हा शहरातील जाणारे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मोठ्या प्रमाणात सपाटा लागलेला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. परंतु, धुळे महानगरामध्ये कुठल्याही परिस्थितीत नवीन दारू दुकाने उघडण्यात येऊ नये. याची दक्षता म्हणून धुळे महानगरातून जाणारे दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग मुंबई-आग्रा व सुरत-नागपूर महामार्ग हे धुळे महापालिकेकडे वर्ग करण्यात येऊ नये. तसेच यासंदर्भात तातडीने महासभेत ठराव करून सरकारकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी यात केली आहे. जेणेकरून धुळे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणूनच कायम राहतील. त्यामुळे महापालिकेला या दोन्हीही महामार्गांवर वर्षाकाठी येणारा ५ ते ६ कोटी रुपयांचा नूतनीकरणाचा खर्च पेलावा लागणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी गंगाधर माळी, सुनील बैसाणे, दिनेश पाटील, डॉ. माधुरी बाफना, संजय गुजराथी, प्रशांत श्रीखंडे, अॅड. राजू गुजराथी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात नवीन रेल्वे द्यावा

$
0
0

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील रेल्वेविषयक प्रश्नांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी भुसावळ-सुरत-मुंबई या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्याची मागणी केली. शिवाय मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याबद्दल रावल यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

रावल हे दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी नुकतीच याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली आहे. या भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. यावेळी रावल यांनी जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यात भुसावळ-नंदुरबार-सुरत-मुंबई या मार्गावर ‘साने गुरुजी एक्स्प्रेस’ ही नवीन गाडी सुरू करण्याची मागणी केली. तसेच अमृतसर-सीएसटी एक्स्प्रेसला धुळ्यासाठी टू-टायर वातानुकूलित डबा जोडण्यात यावा. डेक्कन ओडिसी या विशेष गाडीत काय सुधारणा करता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या वाढीसाठी महाराजा एक्स्प्रेसच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अशी गाडी सुरू करता येईल काय? याबाबत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना अडचण येता कामा नये

$
0
0

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच खरीप हंगामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी विकास अधिकारी बी. व्ही. बैसाणे, मोहीम अधिकारी आर. एम. नेतनराव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक आर. डी. पाटील व तालुका स्तरावरील सर्व निरीक्षक उपस्थित होते. या वेळी पेरणी क्षेत्र नियोजन, बी-बियाणे पुरवठा नियोजन, रासायनिक खते पुरवठा नियोजन व खत विक्रीचे नियोजन याबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सांगळे यांनी, जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७५ हजार ६०० हेक्टर असून, येत्या खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४ लाख ५८ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी कापूस, ज्वारी, बाजरी, भात, मका, मूग, सोयाबीन, उडीद, तूर व भुईमूग या प्रमुख पिकांसाठी एकूण ४७ हजार २४३ क्विंटल विविध पिकांचे व ९.८५ लाख कापूस बियाणे पाकिटे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाबीज संस्थेकडून १८ हजार ४२ क्विंटल विविध पिकांचे व खासगी कंपनीमार्फत २८८१६ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. तसेच कापूस बियाण्याच्या एकूण ९.८५ लाख पाकिटांची आवश्यकता असून, यामध्ये महाबीजकडून दहा हजार तर खासगी कंपनीकडून ९.७५ लाख पाकिटे पुरवठा करण्याचे नियोजन आहे, याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून बुध्दिबळ प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना व रेषा चेस अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० एप्रिल रोजी पुणे येथील फिडे ट्रेनर व छत्रपती पुरस्कारप्राप्त जयंत गोखले यांचा नाशिक येथे चार दिवसीय बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग होणार आहे. ३ ब, कौस्तुभ, एसटी कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक येथे सकाळी ९.३० वाजता हा प्रशिक्षण वर्ग होईल. हे शिबिर १६ विद्यार्थ्यांसाठीच आहे. बुद्धिबळाच्या सुरुवातीच्या चाली, पटावरील मध्यस्थिती व अंतिम स्थितीच्या महत्त्वाच्या पैलूंचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आशियाई बुद्धिबळ स्पर्धेतील विजेती आकांक्षा हगवणे यांच्यासह अनेक नामवंत खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. नाशिकमध्ये ते प्रथमच शिबिर घेत आहेत. शिबिरानंतर २९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता नाशिक जिल्ह्यातील पालक, खेळाडूंनाही ते वेळ देणार असून, खेळातील अडचणी, तसेच मुलांना बुद्धिबळ कसे शिकवावे यावर ते विशेष टिप्स देणार आहेत.

जयंत गोखले यांना उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून नुकतेच राज्य शासनातर्फे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. गोखले हे अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेचे स्पर्धाप्रमुख आहेत. संघटनेतील नवीन तत्त्वप्रणालीही समजून सांगणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर पगार, सचिव मिलिंद कुलकर्णी, पालक बुद्धिबळ संघटनेचे नीलेश बहाळकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी रेषा चेस अॅकॅडमी ९८२२०११९६७ येथे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे निवड चाचणी स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या संलग्नतेने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना व श्रेया चेस अॅकॅडमीतर्फे (एनडीसीए) ५ मे रोजी २५ वर्षांखालील, तर ६ मे रोजी १३ वर्षांखालील वयोगटातील जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा होणार आहे.
देवळाली कॅम्पमधील डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या हॉलमध्ये सकाळी दहा वाजता ही स्पर्धा होईल. गेल्या चार-पाच वर्षांपासून खंडित झालेली निवड चाचणी स्पर्धा प्रथमच अधिकृतपणे एनडीसीएच्या अधिपत्याखाली होत आहे. निवडलेला जिल्ह्याचा बुद्धिबळ संघ सांगली व पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधित्व करेल, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर पगार, सचिव मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. सांगली येथे २४ ते २८ मे रोजी २५ वर्षांखालील, तर पुणे येथे २७ ते ३१ मे रोजी १३ वर्षांखालील वयोगटातील स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचा संघ सहभागी होण्यासाठी ही निवड चाचणी आहे. इच्छुक खेळाडूंनी जन्मदाखला किंवा आधार कार्ड, तसेच बुद्धिबळ संच सोबत आणणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे चेस क्लॉक असतील त्यांनी ती सोबत आणावीत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३ मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत एनडीसीएच्या कार्यालयात नावनोंदणी करावी. मुदतीनंतर प्रवेश स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक श्रेया अॅकॅडमीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अखिल मराठी बुद्धिबळ संघटेना व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नियमाप्रमाणे संघ निवडण्यात येणार आहे. खेळाडूंनी अधिक माहितीसाठी एनडीसीए कार्यालय, ३ ब, कौस्तुभ, एसटी कॉलनी, गंगापूर रोड व श्री स्पोर्टस अॅकॅडमी, दत्त मंदिर रोड, नाशिक रोड येथे ९८२२०११९६७ व ९४२०६९१९९६ या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे संदीप नागरे, अनिल राठी, ओमकार जाधव, हेमंत फडणीस व डॉ. आशिष लेंडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी सुरक्षारक्षकांचे लक्ष स्थायी समितीकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हायकोर्टाच्या आदेशान्वये गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेले सुरक्षारक्षक हे केवळ दोन महिन्यांसाठीच घेण्यात आले आहेत. त्यामुळे या सुरक्षारक्षकांना मानधनावर घ्यायचे की मुदतवाढ द्यायची, असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे. त्यामुळे या सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीचा विषय आता स्थायी समितीवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या सुरक्षारक्षकांचे काय होते, हे आता स्थायी समितीमध्येच ठरणार आहे.

आयुक्तांच्या अधिकारात एप्रिलपासून ६० सुरक्षा रक्षकांना दोन महिन्याच्या करारावर घेण्यात आले आहे. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यासाठी सुरक्षा महामंडळाकडून या सुरक्षारक्षकांना महापालिकेने तात्पुरत्या मानधनावर घेतले आहे. परंतु, गोदावरीचे संवर्धन आता कायमस्वरूपी करावे लागणार असून, त्यासाठी कक्षही स्थापन झाला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर या सुरक्षारक्षकांचे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. या सुरक्षारक्षकांना मुदतवाढ द्यावी की कायस्वरुपी मानधनावर घ्यावे, अशा पेच प्रशासनापुढे पडला आहे. त्यामुळे गोदावरी संवर्धन कक्षाने स्थायी समितीवर प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हक्काच्या पैशांसाठी पोलिसांना साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पॅनकार्ड क्लब्ज् कंपनी लिमिटेड या खासगी कंपनीत गुंतवलेली रक्कम मुदतपूर्तीनंतरही मिळत नसल्याने नागरिक संघर्ष समितीने बुधवारी मोर्चा काढून पंचवटी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या कंपनीचे कार्यालय पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

पॅनकार्ड क्लब्ज् कंपनीचे निमाणी बस स्थानकासमोर सूर्या आर्किड इमारतीमधील तिसरा मजला शाखा कार्यालय होते. कार्यालयाच्या माध्यमातून शहरातील जनतेला वेगवेगळ्या स्किम सांगून या कंपनीने डोलारा उभा केला. गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात रकमा जमा केल्या आहेत. कंपनीच्या भूलथापांना बळी पडून दोन हजार २५७ नागरिकांनी वीस कोटी रुपयांची रक्कम दहा वर्षात कंपनीकडे जमा केली आहे. हा आकडा नाशिकचा आहे. जिल्ह्यातील उपलब्ध नाही. मात्र, सदर रक्कम कंपनी संचालकांनी नाशिक जिल्ह्याच्या बाहेर म्हणजेच गोवा, पुणे, पनवेल, शिर्डी, तसेच परराज्यात केरळ, राजस्थान, आंध्र प्रदेश दिल्ली, ओडिसा आदी ठिकाणी स्वतःचे प्रकल्प उभे केले. मात्र आज रोजी गुंतवणुकदारांना त्यांच्या परताव्याची रक्कम परत देण्यासाठी वेळ काढूपणाची धोरण स्वीकारून रक्कम बुडत करण्याच्या मार्गावर आहे.

रक्कम स्वीकारताना कंपनीने दीड पट रक्कम परत करण्याचे अमिष दाखविले होते. मात्र, मुदत संपूनही गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम देण्यास तीन वर्षांपासून टाळाटाळ केली जात आहे. नाशिकचे हे कार्यालय दोन महिन्यांपासून बंद आहे. अनेक नागरिकांनी मुंबईच्या कार्यालयाशी संपर्क साधून विनंती करीत रक्कमेची मागणी केली आहे. त्यांना अनेक कारणे सांगून टाळाटाळ केली जात असल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे.

गुंतवणूकदारांचे धनादेश वटलेच नाहीत

काही नागरिकांकडून एक वर्षापूर्वी बँकेचे खातेनंबर घेऊन नेफ्टी व ‘आरटीजीएस’द्वारे रक्कम जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, एकाही गुंतवणूकदाराला पैसे मिळालेले नाही. तसेच काही नागरिकांना चेक दिले होते ते वटले नाहीत. त्यामुळे या गुंतवणुकदारांसमोर संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक संघर्ष समितीचे गणेश पवार, धनंजय बुचडे, वि. गो. पेंढारकर, बी. टी. इंगळे, काशिनाथ दिंडे, रवींद्र पाटील आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात वृद्धाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. दिंडोरी रोडवरील प्रभात नगर परिसरात ही घटना घडली. अपघातात किसन धोंडीराम ससाणे (८०, रा. म्हसरुळ) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ससाणे आणि भाऊराव रामभाऊ नकुले (रा. दिंडोरी रोड) हे दोघे मोटरसायकलवरून नाशिककडे येत होते. त्यावेळी मागून येणाऱ्या टँकरने मोटरसायकलला धडक दिली. त्यामध्ये नकुले हे गंभीर जखमी झाले तर मागे बसलेले ससाणे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस स्टेशनमध्ये टँकर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर रोडवर मारहाण

जेहान सर्कल येथे थांबलेल्या एका व्यक्तीस कारमधील तीन ते चार संशयितांनी बेदम मारहाण केली. मंगळवारी (दि. २५) सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी विजय पांडुरंग आव्हाड (३९, रा. जेलरोड) यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात संशयिताविरोधात मारहाणीची फिर्याद दिली आहे. आव्हाड हे जेहान सर्कल बसस्टॉपवर उभे असताना अल्टो कारमधून तीन ते चार संशयित त्यांच्याजवळ आले. त्यांनी कुरापत काढून आव्हाड यांना शिवीगाळ तसेच बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर संशयित पसार झाले.

बस चालकास मारहाण

रिक्षाचालकाने शहर बसचालकास शिवीगाळ तसेच मारहाण केली. अंबड एमआयडीसीतील पॉवर हाऊससमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी दिलीप किसन धोंगडे (२९, रा. गोंदे दुमाला) यांनी अंबड पोलिसात रिक्षाचालकाविरोधात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. २५) सकाळी नऊच्या सुमारास धोंगडे हे बसने निमाणी ते युनिक कंपनी अशी फेरी मारत होते. त्यावेळी पॉवर हाऊससमोर येताच रिक्षाचालकाने विनाकारण बससमोर रिक्षा आडवी लावून धोंगडे यांना बेदम मारहाण केली. तसेच बसमधील प्रवाशांनाही शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. त्यामुळे धोंगडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रिक्षाचालकावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक

स्नॅपडील ऑनलाइन वेबसाइटवर क्रेडिट कार्डची माहिती मिळवून एका संशयिताने अंबडमधील शुभम पार्क येथील एका व्यक्तीस सुमारे एक लाख रुपयांना गंडवले. अंबड पोलिस स्टेशनमध्ये अमर तेजपाल आणि अनिल सिंग (दोघे रा. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) यांच्यावर आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज धीरज सावंत (४१, रा. शुभमपार्क) यांनी फिर्याद दिली आहे. ६ ऑक्टोबर २०१६ ते १५ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत स्नॅपडील कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने दोघा संशयितांनी गंडवले. सावंत यांच्याकडील एसबीआय क्रेडिट कार्डच्या माहितीचा वापर करून संशयितांनी एक लाख आठ हजार ७९८ रुपये काढून घेत फसवणूक केली.

देवळालीतून तरुण बेपत्ता

देवळाली कॅम्प ​: नाशिक येथे मुलाखतीसाठी जाऊन येतो, असे सांगून देवळाली कॅम्पमधील २९ वर्षीय तरुण घरातून बाहेर पडला. तो अद्यापपर्यंत परतलाच नाही. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. हर्ष भरत जोशी असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील भरत जोशी हे टेलर व्यावसायिक आहेत. त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. शरीराने मजबूत, रंग गोरा, घारे डोळे, उंची ५ फूट १० इंच, उजव्या भुवईजवळ जखमेची खूण, अंगात काळ्या रंगाचा शर्ट त्याने परिधान केलेला आहे.

सार्वजनिक मालमत्ता नुकसानीचा गुन्हा

नाशिक : महापालिका प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता रस्त्यात खोदकाम करणाऱ्या व्यक्तीविरोधात सातपूर पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सातपूर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अरविंद वामन जाधव (५७, रा. जेलरोड) हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सातपूर परिसरात पाहणी करीत होते. त्यावेळी जिजामाता चौक येथील सम्यक चौकात गौतम श्रीरंग गांगुर्डे (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांनी खोदकाम केल्याचे आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एपीआय वाघ यांची पॅरिससाठी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोल‌सि आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) शाखेचे सहाय्यक निरीक्षक केशव विठ्ठल वाघ यांची फ्रान्समधील पॅरिस येथे होणाऱ्या वाहतूक प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. येत्या ९ ते १२ मे दरम्यान ‘इन्व्हेस्ट‌गिेशन ऑफ ट्रॅफिक अॅक्सिडेंट केसेस’ यासंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम आहे.

वाघ हे १९८८ मध्ये नाशिक ग्रामीण पोल‌सि दलात शिपाई म्हणून भरती झाले. यादरम्यान, त्यांनी राज्यसेवा आयोगाची उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले. तत्कालीन पोल‌सि अधीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांनी त्यांना २००४ मध्ये प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त केले. प्रशिक्षण घेतल्यानंतर वाघ यांनी नागपूर शहर, विशेष सुरक्षा विभाग व महामार्ग सुरक्षा पथक याठिकाणी उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले. सध्या ते सहाय्यक पोल‌सि निरीक्षक म्हणून नाशिकच्या बीडीडीएस शाखेत कार्यरत आहेत. वाघ यांनी २०११ मध्ये नवी दिल्ली येथे इन्व्हेस्टिगेशन ऑफ ट्रॅफिक अक्सिडेंट केसेस संदर्भात प्रशिक्षण पूर्ण केले आहे. चार राज्यातून केवळ १५ पोलिस अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात ते प्रथम क्रमांकाने पास झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध व्यवसायांशी ‘सोयरिक’ पडणार महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांशी घनिष्ठ संबंध ठेवल्याप्रकरणी बडतर्फ का करू नये अशा आशयाची नोटीस पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी चार कर्मचाऱ्यांना बजावली आहे. या कर्मचाऱ्यांवरील आरोपांमध्ये तथ्य असल्याची खात्री पटल्यामुळेच ही नोटीस बजावण्यात आली असून खुलासा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या या कठोर कारवाईमुळे शहर पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

शहरात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असून अशा व्यावसायिकांना पोलिस दलातील काही कर्मचारी पाठबळ देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कुठलाही गैरप्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा देऊनही काही कर्मचाऱ्यांचे बाहेर ‘उद्योग’ सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांना प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत डॉ. सिंगल यांनी दिले होते. त्यानुसार, बुधवारी शहर पोलिस दलातील चार कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस काढण्यात आली. या कर्मचाऱ्यांमध्ये गुन्हे शाखेच्या तसेच मोटर ट्रान्सपोर्ट सेक्शनच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश असून अंबड आणि उपनगर पोलिस स्टेशनच्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. एक वर्षापासून त्यांचे अवैध व्यवसाय करणाऱ्यांशी संबंध असल्याचे पुरावे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांना बुधवारी बडतर्फ बाबतची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी दिली आहे. या कर्मचाऱ्यांची नावे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस डॉक्टरवर मालेगावात कारवाई

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर व तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू आहे. शहरातील सोयगाव भागातील अयोध्यानगर येथे विनापरवाना व मुदतबाह्य औषधसाठा बाळगणाऱ्या रमाई क्लिनिकवर येथील पालिकेच्या वैद्यकीय पथकाने छापा टाकून कारवाई केली. क्लिनिक चालविणाऱ्या रोशन वर्मा यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

शहरातील १२८ डॉक्टरांची तपासणी करण्यात आली आहे. बुधवारी येथील नागरी आरोग्य केंद्र पथकांच्या माहितीच्या आधारे अयोध्या नगर येथील रोशन शर्मा याच्या क्लिनिकवर छापा टाकण्यात आला असता तेथे ५० हजार रुपये किमतीचे मुदतबाह्य औषधसाठा आढळून आला. तसेच त्याच्याकडे असलेल्या वैद्यकीय पदवीलाही परवानगी नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी सांगितले. दरम्यान, तांत्रिक बाबींचा अभ्यास करून संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेदेखील डॉ. डांगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानावर महिलांचा हल्लाबोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगर भागात असलेल्या मद्यविक्रीचे दुकानावर संतापलेल्या महिलांनी बुधवारी हल्लाबोल करीत व्हॅनमधील देशी दारूच्या बाटल्या रस्त्यांवर फोडत आक्रोश व्यक्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत देशी दारूच्या बाटल्यांनी भरलेली व्हॅन ताब्यात घेतली. महिलांनी अशोकनगर येथील दारू दुकान बंद करण्याची मागणी केली आहे.

कोर्टाच्या ताज्या आदेशानुसार महामार्गापासून ५०० मीटरपर्यंत असलेली देशी, विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५०० मीटरच्या पुढे असलेली मद्य विक्रीची दुकाने यातून सुटली आहेत. यात सातपूर भागात अशोकनगरला एकमेव मद्य विक्रीचे दुकान आहे. यामुळे मद्य विकत घेण्यासाठी रोजच ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. यामुळे रहिवाशी भागात राहत असलेल्या महिलांनी मद्यविक्रीचे दुकानच बंद करण्याची मागणी केली होती. याबाबत उप जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवदेन देखील देण्यात आले होते. अशोकनगरच्या मद्य विक्रीच्या दुकानातून अवैद्य देशी दारू व्हॅनमधून नेत असल्याची माहिती दारूबंदी जनआंदोलनाच्या माधवी पाटील यांना मिळाली. मद्य विक्री दुकानाजवळ दाखल होत पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्लाबोल केला. यावेळी पकडण्यात आलेल्या व्हॅनमधील देशी दारूचे बॉक्स महिलांनी बाहेर काढले आणि बाटल्या दुकानासमोर फोडत निषेध व्यक्त केला. संतापलेल्या महिलांनी मद्य विक्रीचे दुकान बंद करण्याची जोरदार मागणी केली. यानंतर राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत देशी दारूची व्हॅन ताब्यात घेतली.

आंदोलन सुरू असतांना मद्य घेण्यासाठी आलेल्या पुरूषांनी बघ्याची भूमिका घेत बाजूला उभे राहणे पसंत केले. आंदोलन सुरू असतांनाही काही ग्राहक मद्य दुकानातील कर्मचाऱ्यांकडे मद्य देण्याची मागणी करत होते. कर्मचाऱ्यांनी मात्र नंतर या असे सांगत अखेर शेटरच बंद करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनामुळे पुरुष ग्राहकांनी बाजुला उभे राहणे पसंत केले.

ताहाराबादला दारू भट्ट्यांवर छापे

सटाणा : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद शिवारातील मोसम नदी किनाऱ्यावर सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापे टाकून तीन आरोपींसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. चौघांवर जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. ताहाराबाद शिवारातील मोसम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर गावठी दारूच्या भट्ट्या सुरू असल्याची गोपनीय माहिती नाशिकच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भाऊसाहेब माळी, नामदेव खैरनार, दीपक अहिरे, सुनील पानसरे यांनी मोसम नदी किनारी छापेमारी करत गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद‌्ध्वस्त करून तीन आरोंपीनां अटक केली. उद्धव सीताराम पवार, कस्तुरीबाई उत्तम अहिरे (रा. ताहाराबाद) यांच्या हातभट्टीवरही गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली. अनिल बापू मोरे व युवराज मल्हार सोनवणे या दोघांच्या गावठी हातभट्ट्यांवरही छापा टाकण्यात आला. पोलिसांनी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनिल मोरे घटनास्थळावरून फरार झाला असून युवराज सोनवणे यास अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनडीसीसी’ला छडीचा मार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रामाणिकपणे काम करूनदेखील पगाराचे हक्काचे पैसे बँकेतून मिळत नसल्याने संतापलेल्या शिक्षकांनी नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या (एनडीसीसी) पंचवटी शाखेला बुधवारी टाळे ठोकले.

‘वारंवार खोटी आश्वासने देऊन आम्हाला वेड्यात काढत आहात का?’ असा जाब विचारत शिक्षकांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेमार्फत शिक्षकांनी आंदोलन केले. या आठवड्यात पैसे न मिळाल्यास सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील खासगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार एनडीसीसी बँकेत होतात. नोव्हेंबर २०१६पासून नोटबंदीच्या निर्णयानंतर मात्र शिक्षकांना बँकेतून स्वतःचेच पैसे काढण्याला मर्यादा येऊ लागल्या आहेत. केवळ दोन ते पाच हजार पैसे त्यांना काढण्यात येत असल्याने घरखर्च चालवताना शिक्षकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. गृहकर्ज, विमा, इतर हफ्ते अशी अनेक कर्जे थकली असून आजारपण, मुलांचे लग्न अशा आवश्यक कारणांसाठीदेखील शिक्षकांना पैसे मिळत नाही. खात्यात पैसे असूनही कर्जाचे पैसे न भरल्याने अधिक व्याजाचा आर्थिक भूर्दंड सहन भरावा लागत असल्याची कैफियत यावेळी शिक्षकांनी मांडली. याशिवाय, दिलेले चेकही बाऊन्स केले होत असल्याने तसेच इतर बँकांचे धनादेश स्वीकारले जात नसल्याने आम्हाला पुन्हा पुन्हा शाखेत चकरा माराव्या लागत असल्याची परिस्थितीही शिक्षकांनी यावेळी मांडली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस प्रकाश सोनवणे, नाशिक महानगराध्यक्ष वासुदेव बधान, एकनाथ पाटील, के. एस. सूर्यवंशी, के. एम. देसले आदी उपस्थित होते.

कळवणच्या शिक्षकांचा ठिय्या

एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याचेच वेतन हाती न पडल्याने कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सर्व संघटना पुरस्कृत कळवण तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या प्राथमिक शिक्षकांनी एनडीसीसी बँकेच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी ठिय्या मांडला. तात्काळ वेतन झालेच पाहिजे, यांसारखी घोषणाबाजी करत बँकेचा प्रवेशद्वार दणाणून सोडला. त्याची दखल घेत पगारासाठी निधी देण्याचे आश्वासन बँकेकडून मिळाल्यानंतर शिक्षकांनी हे आंदोलन मागे घेतले. जिल्हाभरातील शिक्षकांचे पगार एनडीसीसी बँकेतून रखडल्याच्या कारणास्तव बँकेसमोर सातत्याने आंदोलने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हवालदिल झालेले शिक्षक आर्थिक कोंडीत सापडले आहे. प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारीचे वेतनही कळवण पंचायत समितीने चेकमार्फत कळवण शाखेला जमा केलेले आहे. परंतु, बँकेच्या मुख्य शाखेतून निधी मिळाला नसल्याने वेतन रखडल्याची माहिती शिक्षकांना देण्यात आली. तसेच हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासनही देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्कल हटले; सिग्नल रखडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

वाढते जीवघेणे अपघात आणि रोजच होणारी वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून एबीबी आणि जेहान सर्कल हटवून सिग्नल बस‌विण्यात आले. मात्र, सिग्नल यंत्रणा अद्याप कार्यान्वित न झाल्याने या दोन्ही चौकांमध्ये सकाळी आणि सायंकाळी वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. सिग्नलसाठी अजून किती काळ प्रतीक्षा करायची, असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

गंगापूररोडवरील जेहान तसेच त्र्यंबक रोडवरील एबीबी या दोन सर्कलवर सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावे, अशी वाहनचालकांची जुनी मागणी आह. जेहान सर्कलवर तर गेल्या महिन्यात एका महिलाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर गंगापूर रोडवरील स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या चालढकलपणाविरोधात तीव्र आंदोलन केले. तसेच प्रतिकात्मक सिग्नल उभारून प्रशासनाला चपराक लगावली होती. या आंदोलनात आमदार सीमा हिरे यांच्यासह अन्य लोक‌प्रतिनिधीही सहभाग घेतला होता. त्यानंतर जेहान चौकात गेल्या आठवड्यात सर्कल हटवून सिग्नल उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच त्र्यंबक रोडच्या एबीबी सर्कलदेखील हटविण्यात आले. तेथेही आता सिग्नल उभारला जात आहे. मात्र, सर्कल हटवून चार दिवस उलटल्यानंतरही तेथे सिग्नल यंत्रणा उभारणीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे या दोन्ही चौकांमध्ये उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा नेमकी कार्यान्वित कधी होणार, असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. सर्कल हटविल्याने जेहान आणि एबीबी चौकामध्ये एकाच वेळी चारही बाजुंनी वाहने येतात. त्यामुळे अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जेहान सर्कलवर सुटीच्या दिवशी व सांयकाळी वाहतूक कोंडीच नित्याचीच झाली आहे. त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कलवरही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. जेहान व एबीबी सर्कलवर सिग्नल यंत्रणा बसवावी अशी सातत्याने मागणी केली जात होती. अखेर महापालिका व पोलिस यंत्रणेने या दोन्ही चौकांमध्ये सिग्नल बसविण्याचे काम हाती घेतले. सिग्नलसाठी खांब उभारले, वायरिंगचेही काम करण्यात आले. चौकातील सर्कल जेसीबीद्वारे हटविण्यात आले. आता सिग्नल उभारले जातील असे नागरिकांना अपेक्षित होते. मात्र, सिग्नल यंत्रणा सुरू झालेली नाही. सिग्नल यंत्रणा उभाण्यासाठी आता कोणत्या मुहूर्ताची वाट बघितली जातेय, असा प्रश्न संतप्त वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

गंगापूररोडच्या जेहान सर्कलवर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिग्नल यंत्रणा उभारली आहे. परंतु, बंद सिग्नलमुळे वाहनचालकांची गोंधळ उडतो. प्रशासनाने सिग्नल तात्काळ सुरू करावा.
- विलास गाढे, वाहनचालक

त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कलवर वाहनांची रोजच वर्दळ असते. सिटी सेंटर मॉलेकडून येणाऱ्या वाहनांचा वेग आणि संख्या अधिक असते. त्यामुळे एबीबी सर्कल येथे

सिग्नल उभारणीसाठी मोठा संघर्ष झाला आहे. मात्र, अद्याप सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्याची वाहनचालकांना प्रतीक्षा आहे.
- संतोष गायखे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही बससेवा पुढील महिन्यापासून

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्याची घोषण केली होती. त्यानंतर नाशिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर यातील दोन वातानुकूलित बस मे मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने हालचाली सुरू केल्या असून, या बसला प्रतिसाद कसा मिळतो यावरुन पुढील नियोजन केले जाणार आहे.

शिवशाही बस गाडीच्या प्रति टप्प्याचे भाडे इतर बस गाड्यांच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. वातानुकूलित शिवशाही बस गाडीचे प्रति टप्प्याचे भाडेही कमी ठेवण्याचा निर्णय याअगोदरच झाला आहे. त्यामुळे भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या या बसला कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणे महत्त्वाचे असणार आहे. या दोन बस सुरू झाल्यानंतर तीन महिने सर्व्हे केला जाणार असून, त्यानंतर पुढील टप्पा ठरव‌ण्यिात येणार मंडळातर्फे सांगण्यात आले.

खासगी वाहतुकदार आरामदायी बस गाड्यांच्या भाड्यात सवलत देतात. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्यामुळे एसटीने या शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ५०० बस या राज्यभर टप्याटप्याने सुरु केल्या जाणार आहेत. राज्यातील विविध शहरांसाठी शिवशाही बस सेवा सुरू झाल्यानंतर खासगी बस गाड्यांचे प्रवासी एसटीच्या शिवशाही वळतील अशी मंडळाला आशा आहे.
एसटीने याअगोदरही शिवनेरी बससेवा सुरू केली होती. त्यानंतर शिवशाही बससेवा सुरू केली जाणार आहे. शिवनेरीपेक्षा या बससेवेचे दर कमी असणार असल्याचे बोलले जात आहे. या बससेवेला प्रतिसाद मिळाला तर नाशिक-पुणे ही बससेवा सुरू होणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय्यू महाराज दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनातील एक वजनदार व्यक्तिमत्व असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज हे दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. मध्य प्रदेशच्या डॉ. आयुषी शर्मा यांच्यासोबत येत्या ३० एप्रिल रोजी ते विवाहबद्ध होणार आहेत. आई व बहिणीच्या आग्रहाखातर महाराज पुन्हा लग्नास तयार झाल्याचं सांगितलं जात आहे.

'एबीपी माझा'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. दोन वर्षांपूर्वी महाराजांच्या पत्नीचं निधन झालं होतं. तेव्हापासून कुटुंबातून त्यांना लग्नाचा आग्रह केला जात होता. अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. इंदूर येथे हा विवाहसोहळा होणार आहे. भय्यू महाराजांचं सध्याचं वय अंदाजे ४० असून त्यांना कुहू नावाची १३ वर्षांची मुलगीही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांचा टाहो

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पंचवटीत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नगरसेवकांनी महापौरांसमोर नागरिकांच्या व्यथा मांडल्या. त्यावर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले आहेत.
पंचवटी विभागात पाणीपुरवठ्याच्या अनेक तक्रारी असून, अनेक भागात पाणीच पोहचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या तक्रारी असून, खुद्द महापौरांच्या प्रभागातही पाणीटंचाई जाणवत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या दालनात पाणीपुरवठा विभागाची बैठक झाली. पंचवटी विभाातील नगरसेवक अरुण पवार, गुरूमीत बग्गा, भिखूबाई बागूल, कमलेश बोडके, पुनम धनगर, सुनिता पिंगळे, जगदीश पाटील आदी या वेळी उपस्थित होते. गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असतांनाही पाणी टंचाई जाणवत असल्याबद्दल महापौरांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पंचवटी विभागातील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नसल्याचा आरोप गुरूमीत बग्गा यांनी केला.
महापौरांचे नियंत्रण नाही. महापौरांनी या बैठकीसाठी नगरसेवकांना आमंत्रित केले होते. परंतु, महापौरांचे या बैठकीवरील नियंत्रण मात्र काही काळानंतर राहिले नाही. बैठकीत सदस्य आणि अधिकारीच एकमेकांशी बोलत राहिले. त्यामुळे महापौर नेमके कोणाशी बोलताहेत हेच कळत नव्हते. बैठक सुरू असतानाच नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या संभाषणामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे बैठक की बाजार अशी स्थिती झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदपत्रे गहाळप्रकरणी बकरेंचे अखेर निलंबन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर
औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिक विभागाच्या कार्यालयातून एका उद्योजकाच्या महत्त्वाच्या फाइलमधून कागदपत्रे गहाळ झाल्याप्रकरणी भूमापक आर. डी. बकरे यांच्या निलंबनावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
या प्रकरणी सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक एन. एस. मांडवडे यांना दोषी ठरवत त्यांची यापूर्वीच तडकाफडकी बदली केली गेली असून, बकरेंच्या बचावासाठी दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप होत होता. मात्र, मंत्रालयात पेंडिंग असलेली त्यांच्या कारवाईची फाईल आता मार्गी लागली असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनीदेखील यासंदर्भात माहिती मागविली असून, या प्रकरणी लवकरच एफआयआर दाखल होण्याची चिन्हे आहेत. ‘मटा’ने या प्रकरणी पाठपुरावा केला होता. प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी वरिष्ठ कार्यालयात कागदपत्रे गहाळ प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन चौकशीची मागणी केली होती. वरिष्ठ कार्यालयाने सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक एन. एस. मांडवडे यांना दोषी ठरवत तडकाफडकी बदली केली, तर भूमापक बकरेंच्या बचावासाठी एमआयडीसीच्या वरिष्ठ कार्यालयात दबाबतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप होत होता. बकरे यांना वाचविण्यासाठी फाईल गहाळप्रकरणातील उद्योजक व एमआयडीसीतून बदलून गेलेल्या अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप होत होता. मात्र, एमआयडीसीच्या वरिष्ठ कार्यालयाने दबावाला बळी न पडता बकरेंवर थेट निलंबनाची कारवाई केल्याने उद्योगवर्तुळाने समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images