Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दातांच्या ट्रीटमेंट अधिक सुलभ!

$
0
0
दातांच्या कोणत्याही ट्रिटमेंटदरम्यान बहुतांशवेळा ड्रीलचा वापर केला जातो. ड्रीलने दात स्वच्छ करताना किंवा त्यांना आकार देताना जिभ आणि गालांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. यावर नाशिकमधील 'टिश्यू प्रोटेक्टर' नावाचे उपकरण तयार करण्यात आले असून यामुळे जखमा टाळता येणार आहेत.

पब्लिक ट्रान्सपोर्ट हवे सक्षम

$
0
0
नाशिक शहरातील रस्त्यांचा विचार करता हे रस्ते सुमारे एक कोटी वाहन संख्येच्या तुलनेत कमी पडत असल्याचे जाणवते. त्यास बीआरटी बसेस, सीटी बसेस, मेट्रो ट्रेन, रस्त्यांचे योग्य नियोजन, सायकलींग इन्फ्रास्ट्रक्चर असे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत.

नाशिकरोडला हवी संजीवनी

$
0
0
नाशिक शहराच्या विकासात मोलाचा वाटा असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्टेशनमुळे नाशिकरोडच्या विकासाची दिशाही निश्चित झाली. मात्र देशाशी जोडणाऱ्या नाशिकरोडला नाशिक शहराशी जोडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

डोंगरची काळी मैना झाली महाग

$
0
0
कळवणच्या बाजारात डोंगरची काळी मैना म्हणून नावलौकिक असलेले करवंद पावसाआधीच बाजारात दाखल झाले आहेत. मात्र या करवंदाचे भाव चांगलेच वधारले असून एका किलोसाठी ५० ते ६० रुपये आकारण्यात येत आहेत.

राखीव प्रवेशाच्या लागेना थांग

$
0
0
प्रत्येक प्राथमिक शाळेत आर्थ‌िक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्यासाठी आदेश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले होते. या आदेशानुसार शहरातील १९० शाळांनी प्रवेशाबाबत अहवाल सादर करणे आवश्यक होते.

सिंहस्थ आराखड्याला मंजुरी द्या

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दोन वर्षांवर आल्याने सिंहस्थ कृती आराखड्याला त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौर यतीन वाघ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे सिंहस्थकामांना तातडीने सुरुवात करता येईल, असेही महापौरांनी म्हटले आहे.

सिन्नर तालुक्यातील अग्निशमन केंद्र वा-यावरच!

$
0
0
सिन्नर तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या अग्निशमन केंद्रासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असला तरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे हे केंद्र अद्यापही सेवेत आलेले नाही.

रातोरात सिन्नरला ऑफिस हलवले

$
0
0
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सिन्नर येथील कार्यालय बेकायदा नाशकात स्थलांतरित झाल्याची बाब 'मटा'ने चव्हाट्यावर आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हे कार्यालय रातोरात सिन्नरला हलविले आहे.

आजची 'झूम' वादळी ठरणार

$
0
0
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह अन्य अनेक सरकारी विभागांचा कारभार मंगळवारच्या 'जिल्हा उद्योग मित्र'च्या बैठकीत गाजण्याची दाट शक्यता आहे. तब्बल दहा महिन्यांनंतर या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी भूषविणार असून औद्योगिक समस्यांना उद्योजक वाचा फोडणार आहेत.

कळवणवासीयांची तहान भागणार

$
0
0
कळवणवासीयांना यंदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे.

वृक्ष​दिंडी, वृक्षारोपणाने मांडवाचा विधी

$
0
0
पर्यावरणाच्या अतोनात ऱ्हासामुळेच दुष्काळासारखे अरिष्ट कोसळले असतानाही ऐन दुष्काळातही लग्नाच्या मांडवाच्या निमित्ताने दररोज शेकडो वृक्षांची कत्तल होताना दिसते.

नाशिकरोडला माकडांचा सुळसुळाट

$
0
0
नाशिकरोड परिसरात माकडांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हवालदिल झाले असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून माकडांचा त्रास वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

अखेर शटर ऑन

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) ला विरोध करण्यासाठी नाशिकमधील व्यापा-यांनी सलग दहा दिवस संप पुकारल्यानंतर अकराव्या दिवशी म्हणजेच सोमवारी शहरातील सर्व दुकाने उघडली होती. त्यामुळे मुख्य बाजारपेठांमधील शुकशुकाट दूर झाला. लग्नसराई असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

व्यापा-याला धमकी देणा-या खंडणीखोरांना अटक

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथील नामांकित कांदा व्यापारी करशनदास ठक्कर यांच्याकडे पाच कोटींची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणा-या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अशाच प्रकारच्या अन्य एका प्रकरणात पोलिसांनी दोघा स्थानिकांना अटक केली आहे.

जिल्हा काँग्रेसची निवडणूक तयारी

$
0
0
लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवकाश असला तरी काँग्रेस पक्ष मात्र आतापासून निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

पोलिस स्टेशनसमोर भजन आंदोलन

$
0
0
जळगाव शहरात व जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याचे पुरावे पोलिस अधि​क्षकांना देऊनही कोणतीही कृती न झाल्याने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयडीसी येथील पोलिस स्टेशनसमोर भजन आंदोलन केले.

पिंन्टो कॉलनीला समस्यांची बाधा

$
0
0
नाशिकरोडच्या जुन्या सायखेडारोडवरील पिन्टो कॉलनीला विविध समस्यांनी ग्रासले असून या भागात साफसफाई होत नसल्याने डासांची समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेने या विभागात डास प्रतिबंधक धुर फवारणी करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

'नेट' सर्टिफिकेटपासून विद्यार्थी वंचित

$
0
0
रात्रंदिवस अभ्यास करून नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (नेट) पास झाल्यानंतरही अद्याप काही विद्यार्थी 'नेट'च्या सर्टिफिकेटपासून वंचित आहे‌त. तब्बल आठ महिने पाठपुरावा करूनही 'युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन'मार्फत (यूजीसी) हे ई-सर्टिफिकेट दिले जात नसल्याची माहिती संबंधित विद्यार्थ्यांनी 'मटा'ला दिली.

महासभा पुन्हा तहकूब

$
0
0
विविध कारणांमुळे महासभा तहकूब होण्याची परंपरा सोमवारीदेखील पहावयास मिळाली. यावेळी जिल्ह्याच्या पहिला महिला आमदार रुक्मिणीबाई वाजे यांच्यासह अनेक दिवगंतांना श्रद्धांजली वाहत महापौरांनी महासभा तहकुबीची घोषणा केली.

अॅड वाघच्या कोठडीत वाढ

$
0
0
पूर्ववैमनस्यातून गंगापूर रोडवर झालेल्या दोघांच्या हत्येप्रकरणी स्थानिक कोर्टाने अॅड. आर. आर. वाघ आणि व्यंकटेश मोरे यांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ केली. या प्रकरणातील उर्वरित चौघे आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images