Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'एमपीएससी'त वाहनांचा असहकार

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी सरकारी विभागांनी त्यांची वाहने न दिल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे संबंधित विभागांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यामुळे ही बाब या विभागांना महागात पडू शकते.

प्रशासनाच्या लालफितीत रामशेज

$
0
0
राज्यातील अजिंक्य किल्ल्यापैकी एक असलेल्या रामशेजकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी या किल्ल्याच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी केली.

शहरीकरणामुळे गुन्हेगारीचे स्वरूप बदलणार

$
0
0
सध्या नाशिक शहराची लोकसंख्या २० लाखांपर्यंत पोहचली आहे. लोकसंख्या वाढीचा दर असाच राहिला किंवा यापेक्षा वाढला तर आगामी २५ वर्षांत शहराची लोकसंख्या किमान ५० लाखापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

आनंदवलीकर अस्वच्छतेने हैराण

$
0
0
आनंदवली परिसरात घंटागाडी नियमीत येत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकीतील पारदर्शकतेलाच असहकार!

$
0
0
निवडणूक यंत्रणेत पारदर्शक कामकाज होण्यासाठी सध्या निवडणूक विभागाने एक विशेष मोहिम उघडली आहे. मतदारांकडील ओळखपत्र आणि मतदार यादीतील फोटो याचा ताळमेळ घालण्यासाठी ही मोहिम आहे. जिल्ह्यातील २ लाख १० हजार मतदारांच्या मतदान हक्कावर गदा येवू नये यासाठी मोहिमेद्वारे निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे.

दुष्काळी गावासाठी धावले मुंबईकर

$
0
0
नाशिक जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीने घेरले असताना मुंबईतल्या तरुण नाशिकरांची तहान भागवण्यासाठी पुढे आले आहेत. सिन्नर-शिर्डी रोडवरील खोपडी येथील दत्त मंदिरासमोर दादरच्या साईराज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बोअरवेल खोदून परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पोलिसांना 'वन-वे'चा विसर

$
0
0
काँक्रिटीकरणाच्या कामामुळे पंचवटीतील पेठ नाका ते मखमलाबाद नाका दरम्यानचा रस्ता 'वन-वे' करण्याचा आदेश असतानाही वाहतूक पोलिसांना मात्र त्याचा विसर पडला आहे. एकाच बाजूने दुतर्फा वाहतूक होत असल्याने पंचवटीच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांचा मनस्ताप मात्र चांगलाच वाढला आहे.

शिंगव्यातील दोन विद्यार्थी गुणवत्तायादीत

$
0
0
मार्च २०१३मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निफाडच्या शिंगवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे दोन विद्यार्थी गुणवत्तायादीत झळकले.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी पदयात्रा

$
0
0
मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, यासाठी मालेगावचे काँग्रेस शहराध्यक्ष तथा माजी महापौर आसिफ शेख यांनी मालेगाव ते मुंबई पदयात्रा सुरू केली आहे. मंगळवारी ही पदयात्रा नाशिकमध्ये पोहोचली असता शेख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

निवडणुकीचे काम नाकारणा-या शिक्षकांना नोटिस

$
0
0
शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारच्या शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला; परंतु निवडणुकीच्या अप्रत्यक्ष कामांना नकार दिल्यामुळे काही शिक्षकांना कारणे दाखवा नोटिस मिळाल्याने शिक्षकांमध्ये या निर्णयाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सिंहस्थाच्या कामाला प्राधान्य

$
0
0
नाशिक महावितरणच्या चीफ इंजिनीअरपदी के. व्ही. अजनाळकर यांची नुकतीच नियुक्ती झाली. नाशिक विभागाचा कामकाज पाहताना आगामी सिंहस्थ कुंभेळ्याच्या कामांना प्राधान्य देऊन विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचा निर्धार अजनाळकर यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बदलणार?

$
0
0
काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला असून राज्यातील दहा जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. त्यात जळगावचे जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांचेही नाव अग्रक्रमाने असून पद वाचवण्यासाठी उदय पाटील सध्या दिल्लीत रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सोयाबीन, मक्याचे लागवड क्षेत्र वाढणार

$
0
0
सन २०१३-१४ च्या खरीप हंगामासाठी ४ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात बाजरी, तूर, मूग, उडीद, भूईमूग, तीळ, कापूस आणि ऊस इत्यादी पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी यंदा सोयाबीन व मका लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रामीण आरोग्यव्यवस्था वा-यावर

$
0
0
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कशी वाऱ्यावर सोडली जाते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी डॉक्टरांना मुख्यालयात राहणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील तब्बल ७२ डॉक्टर तेथे रहात नसल्याचे उघड झाले आहे.

'MDS'च्या परीक्षेत इशानी कऱ्हाडे पहिली

$
0
0
दंत शाखेच्या उच्च शिक्षा अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या 'एमडीएस'च्या प्रवेश परीक्षेत नाशिकची डॉ. इशानी कऱ्हाडे हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

एसटीला 'लाभले' विनातिकीट प्रवाशी

$
0
0
रेल्वेप्रमाणेच एसटीपुढेही विनातिकीट प्रवाशांचे आव्हान कायम असून, गेल्या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाच्या भरारी पथकांनी अशा प्रवाशांकडून सव्वा लाखांची दंडवसुली केली आहे.

गिरणा धरणात चार तरुणांचा बुडून मृत्यू

$
0
0
नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणात मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या १७ ते २० वयोगटातील चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही सर्व मुले कोपरगाव येथील असून लग्नसोहळ्यासाठी गिरणा धरण परिसरा‌त आली होती.

महावितरणच्या कामगारांचे धरणे आंदोलन

$
0
0
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मंगळवारी नाशिकरोडच्या विद्युत भवनावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन चीफ इंजिनीअर के. व्ही अजनाळकर यांना दिले.

सभापती आले धावून!

$
0
0
जिल्ह्यातील खरीप पीक पद्धतीचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कृषी विभागाचे अधिकारी हे त्यांचे नियोजन, आकडेवारी आणि इतर माहिती देत होते.

औद्योगिक भूसंपादनाला चालना देणार

$
0
0
जिल्ह्यातील प्रस्तावित औद्योगिक भूसंपादनाला चालना देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी मंगळवारी 'जिल्हा उद्योग मित्र'च्या (झूम) बैठकीत घेतला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images