Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पालिका उपायुक्तांना बडतर्फ करा

0
0
कामानिमित्त केबिनमध्ये आलेल्या महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या महापालिका उपायुक्तांची २४ तासांत चौकशी सुरू करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने केली आहे.

हॉल तिकीट ऑनलाईन

0
0
प्रश्नपत्रिका ऑनलाईन करण्याचा निर्णय घेणाऱ्या आरोग्य विद्यापीठाने परीक्षेचे हॉल तिकीटही येत्या परीक्षांपासून ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या निर्णयाचा फायदा सुमारे चाळीस हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.

जकात बंद, नाके चालू

0
0
महापालिका हद्दीत आयात होणाऱ्या मालावर लोकल बॉडी टॅक्स अर्थात एलबीटी मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. मात्र जकात बंद झाली तरी एस्कॉर्ट वसुली सुरूच राहणार असल्याने 'जकात बंद, नाके सुरू' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शूट आऊट अॅट रामकुंड

0
0
'अरे तो बघ सैफ अली खान...!', 'अरे छोटे नवाब नाशकात', 'करिना पण असेल का रे सोबत? ' अशा आरोळ्यांनी गोदाघाट परिसर काही काळासाठी प्रचंड दणाणून गेला. त्याला कारणही तसेच होते, स्वत: सैफ अली खान गोदाघाटावर प्रकटला होता.

अॅड वाघला न्यायालयीन कोठडी

0
0
गंगापूर रोडवर पूर्ववैमनस्यातून झालेल्या दोघांच्या हत्येप्रकरणी महापौर अॅड. यतिन वाघ यांचा भाऊ अॅड. आर. आर. वाघ आणि व्यंकटेश मोरे यांना स्थानिक कोर्टाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. एका दिवसाच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर या दोघांना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केले होते.

'दहशतवाद' दिन विसरले

0
0
महाराष्ट्र सरकारने २१ मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळण्याचे आदेश गृहखात्याने १६ मे २०१३ रोजी ‌दिले होते. असे असूनही सरकारी कार्यालयांनी या आदेशांना केराची टोपली दाखवली असून दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असूनही हा विसर कसा पडू शकतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रावेरः एकाचा उष्माघाताने मृत्यू

0
0
रावेर येथे ईश्वर गोविंदा महाजन या ३५ वर्षीय तरुणाचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. रावेर येथे भर दुपारी चुलत भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीत जाऊन आल्यानंतर ईश्वर महाजन यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना खासगी दवाखान्यात नेले असता तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

टँकरच्या संख्येत वाढ

0
0
अपुरा पाऊस व वाढते तापमान यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे १५७ गावांना १४४ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक टंचाई जामनेर तालुक्यात जाणवत आहे.

आ. शिरीष चौधरी यांची मुख्यमंत्री निधीला मदत

0
0
रावेर तालुक्याचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचा गुरुवार, २३ मे रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त खर्च होणारी सात लाख ४१ हजारांची रक्कम बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री मदतनिधीसाठी सोपवली आहे.

जळगाव जिल्ह्यात रोजगार हमीवर ११ हजार मजूर

0
0
जळगाव जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या ११ हजारांवर पोहचली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ यांनी दिली. जानेवारीत ३१८२ मजूर कामावर होते. फेब्रुवारीत ४२६०, मार्चमध्ये ६१३०, एप्रिलमध्ये ७२१९ तर मेमध्ये ही संख्या ११,७६५ वर गेली आहे.

राखीव जागा राहणार रिक्तच

0
0
प्रवेशादरम्यान २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा सरकारी निर्णय ‌खासगी शिक्षण संस्थाचालकांना जाचक ठरु लागला आहे.

छेडछाडीला निर्बंध हवाच

0
0
महिलांवर होणारा अत्याचाराचे प्रमाण छेडछाडीच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे या छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सुप्रीम कोर्टामार्फत नुकतीच काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली.

‘एसटी’चे स्वच्छता अभियान कच-यात

0
0
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १५ मे ते १५ जुन या कालावधीत बसस्थानकांवर विशेष स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. या आदेशाबाबत तसेच्या तिच्या अंमलबजावणीबाबत नाशिकरोड बसस्थानक कोसो दूर असून स्थानकावर मोठ्या प्रमाणात कच-याचे साम्राज्य पसरले आहे.

पाणी प्या अन् पैसेही द्या!

0
0
उन्हाळ्यात भर दुपारी प्रवास करायची वेळ आली तर आपल्याला ब्रम्हांड आठवतं. पण काही उत्साही कार्यकर्ते मात्र प्रवासाला ताठ असतात. अशा वेळी प्रवास करताना येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन ते त्यातूनही आपला फायदा साधतात. नुकताच असा एक किस्सा घडला.

‘एलबीटी’मुळे सराफांची ‘चांदी’

0
0
महापालिका हद्दीत आयात होणा-या मालावर एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) मध्यरात्रीपासून लागू झाला आहे. त्याचे दरपत्रक राज्यसरकारने बुधवारी जाहीर केले. एलबीटीत सोने-चांदी तसेच हिरे मोती यांच्या आयातीवर ०.१ टक्काच कर लावण्यात आल्याने त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतीवर होऊ शकतो.

कालिदास पुरस्कार पं. भानोसे यांना प्रदान

0
0
महाराष्ट्रात पहिलीपासून संस्कृत भाषेचे अध्ययन सुरू करण्याचा तसेच आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांतर्फे संस्कृत बातम्या प्रसारित करण्यासाठी पाठपुरावा करेन, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी येथे केली.

मान्यतेच्या माहितीसाठी शाळांची धावाधाव

0
0
स्वयंअर्थसाहिय्यित शाळांच्या कायद्यानुसार मान्यता मिळविण्यासाठी गेल्या महिनाभरापासून अनेक शाळांची धडपड सुरू होती. शिक्षण विभागामार्फत ही मान्यतेची यादी आयएसएम फॉन्टमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे शाळांना ती ऑनलाइन पाहता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अंगणवाडी सेविकांचे उपोषण मागे

0
0
आपल्यावरील अन्यायाविरोधात इगतपुरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी पुकारलेले उपोषण मनसेच्या शिष्टाईनंतर मागे घेण्यात आले.

डंपरवर बस आदळून २२ प्रवासी जखमी

0
0
बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमाराला नाशिक-धुळे ही बस डंपरवर आदळल्याने झालेल्या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी सरकारी रूग्णालयात दाखल केले आहे.

द्वारका ते बिटको रस्त्यास केंद्राची मंजुरी

0
0
द्वारका ते बिटको चौक (नाशिकरोड) हा मार्ग सहापदरी करण्याच्या कामास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images