Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कन्यादानापर्यंत तरी माझा बाप टिकू द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शेतकऱ्याला इमारती बांधण्यासाठी कर्जमुक्ती नकोय. शाही थाटात लग्न लावण्यासाठी कर्जमुक्ती नकोय. आलिशान कार खरेदी करता यावी यासाठी कर्जमुक्ती नकोय. साहेब, लेकीच्या कन्यादानापर्यंत तिचा बाप टिकला पाह‌िजे म्हणून तरी शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्या, अशी आर्त विनवणी प्रियंका जोशी या मुलीने शुक्रवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केली. प्रियंकासह आणखी काही शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केलेल्या मनोगताने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
शिवसेनेच्या वतीने नाशिक येथे आयोजित कृषी अधिवेशनात राज्याच्या विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी प्रियंका जोशी या मुलीने शेतकऱ्यांच्या व्यथा पोटतिडकीने मांडल्या. ती म्हणाली, होय आम्ही मागतोय कर्जमुक्ती. परंतु, ही कर्जमुक्ती घेऊन शेतकऱ्याला इमारती बांधायच्या नाहीत. शाही लग्नसोहळे करायचे नाहीत. तर आमचा बाप आमच्या कन्यादानापर्यंत टिकला पाह‌िजे म्हणून आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे. बाप रात्री अपरात्री बारे देण्यासाठी घरातून बाहेर पडतो. परंतु, तो पुन्हा घरी येईल की नाही याची खात्री आता राहिलेली नाही. संकटाच्या आझ्यामुळे तो आपली जीवनयात्रा संपवू शकतो. म्हणूनच सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या गळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी प्रियंका हिने केली. शेतकऱ्याने पिकविलेल्या मालास बाजारभाव दिला जात नाही. परंतु, या मालावर प्रक्र‌िया करणारे उद्योगपती गब्बर होत आहेत. असा उलटा न्याय का, असा सवाल प्रियंका हिने उपस्थित केला. हुंडा प्रत्येक क्षेत्रामध्ये घेतला जातो. पण आत्महत्या शेतकऱ्याचीच मुलगी करते, याकडेही तिने उपस्थितांचे लक्ष वेधले.

शेतकऱ्याला वेतन सुरू करा

सहकार राज्यमंत्री गुलाब पाटील यावेळी म्हणाले, ‘तरुण २१ व्या वर्षी नोकरीला लागतो. ५८ व्या वर्षी निवृत्त होतो. त्याला वेतन आणि पेन्शन मिळते. आमचा शेतकरी वयाच्या दहाव्या वर्षापासून मरेपर्यंत शेतात काम करतो. त्यालाही सरकारने वेतन द्यायला हवे, अशी मागणी पाटील यांनी केली. एक जूनपासून पेरणी सुरू होणार आहे. पण शेतकऱ्यांकडे पैसा नाही. ३५० कोटींच्या नोटा जिल्हा बँकांकडे पडून आहेत. राष्ट्र‌ियीकृत बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. या प्रश्नावर तोडगा निघायला हवा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

सर्वपक्षियांनी एकत्र यावे

निसर्ग, शासन, वित्तीय संस्था आणि बाजारपेठा या चौकटीत देशातील शेतकरी अडकला आहे. या चौकटीच्या मर्जीवरच शेतकऱ्याचा कारभार चालतो. त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडला असून, त्याला शासनाची बदललेली धोरणेही जबाबदार असल्याचे वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे प्रश्न हे दहा तोंडासारखे असून प्रत्येक तोंड वेगवेगळ्या आवाजात बोलत असल्याने गुंता वाढला आहे. कर्जमुक्तीवरून पाटील यांनी शेतकऱ्यांना खडे बोलही सुनावले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटील यांच्या भाषणावेळी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाटील यांनी आपले भाषण आटोपते घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शरयू, अदिती सर्वोत्कृष्ट खेळाडूचे मानकरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनतर्फे देण्यात येणारे २०१६- १७ चे पुरस्कारा जाहीर झाले असून, उत्कृष्ट खेळाडू म्हणून वरिष्ठ गटात नाशिकची शरयू पाटील, तर कनिष्ठ गटात अदिती सोनवणे हिला जाहीर झाला आहे. महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कटुळे, उपाध्यक्ष आमदार चंद्रकांत सोनवणे, सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी ही घोषणा केली आहे. पुरस्काराचे वितरण २० मे रोजी उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तलवारबाजी महासंघाचे सरचिटणीस अशोक दुधारे, प्रकाश कटुळे, डॉ. उदय डोंगरे उपस्थित राहतील. पुरस्कार यादीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेती अस्मिता दुधारे, तसेच राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी १२० खेळाडूंचा समावेश आहे.

पुरस्कारविजेते खेळाडू ः

सर्वोत्कृष्ट खेळाडू (वरिष्ठ गट) ः तुषार आहेर (औरंगाबाद), शरयू पाटील (नाशिक)

कनिष्ठ गट ः दुर्गेश जहागीरदार (औरंगाबाद), अदिती सोनावणे (नाशिक)

उत्कृष्ट पंच ः विनय जाधव कोल्हापूर,

उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा ः सातारा फेन्सिंग असोसिएशन

प्रगतिपथावरील जिल्हा ः लातूर जिल्हा फेन्सिंग असोसिएशन

२०१६-१७ वर्षातील शासनाचे जिल्हा पुरस्कारविजेते ः नितीन हिंगमिरे (संघटक नाशिक), कैलास जैन (धुळे), महेंद्र हेमने (गोंदिया), विजय पळसकर (बुलडाणा), शोयाब मोहम्मद (मार्गदर्शक, नागपूर), स्नेहल पवार (खेळाडू ठाणे), अनुज आदमाने (नागपूर), दामिनी रंभाड (नागपूर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसदीय कार्यपद्धतीवर जेसीआयतर्फे कार्यशाळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

प्रजासत्ताक राज्यपद्धतीत लोकसहभागावर आधारित निर्णय अपेक्षित असतात. उद्दिष्टपूर्तीसाठी सभासदाचे मतस्वातंत्र्य, विचार मांडण्याची पद्धती, सभासदांचे अधिकार व कर्तव्ये याची परिपूर्ण जाणीव सभासदांना असली पाहिजे, असे मत जेसीआय झोन तेराचे प्रशिक्षक पंकज जैन यांनी येथे व्यक्त केले. जेसीआय झोन तेराच्या वतीने नाशिक येथे ‘संसदीय कार्यपद्धती’ या विषयावर झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेत जेसीसच्या सभासदांना संसदीय कार्यपद्धतीचे धडे मिळाले. कोणत्याही संस्थेचा कारभार हा संसदीय कार्यपद्धतीने केला जातो. संसदीय कार्यपद्धतीचा प्रत्येक सभासदाने प्रभावीपणे वापर केल्यास संस्थेस आपले उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होते. बऱ्याचदा संसदीय कार्यपद्धतीच्या पुरेशा ज्ञानाअभावी प्रभावी कामकाज होत नाही. या पार्श्वभूमीवर संसदीय कार्यपद्धतीची माहिती व्हावी या उद्देशाने जेसीआय झोन तेराच्या वतीने सभासदांसाठी ही कार्यशाळा घेतली. कार्यशाळेत सभासदांना प्रशिक्षक पंकज जैन यांनी प्रशिक्षण दिले. सभासदांचे हित जोपासण्याबरोबरच सभासदांच्या कौशल्याचा वापर संस्थेच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी अध्यक्षांनी कसा केला पाहिजे, या विषयावर राष्ट्रीय प्रशिक्षक सुनील बोरसे यांनी मार्गदर्शन केले. झोनचे उपाध्यक्ष अजय चव्हाण, अंकुश सोमाणी, सुनील मराठे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या व्यथांनी पाणावले डोळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
शेतीमालाला भाव नाही. नैसर्गिक संकटामुळे शेती धोक्यात येते. शेतीला वीजपुरवठा होत नाही. समृध्दी महामार्ग शेतकऱ्यांना बरबाद करणार आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यामुळे कर्जमाफी व्हायलाच पाहिजे, अशी मागणी करीत शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात शेतकऱ्यांनी पोटतिडकीने त्यांच्या व्यथा मांडल्या.
उत्पादन खर्चाइतकेही पैसे शेतकऱ्याला मिळत नसतील तर शेतकरी ज‌विंत राहिलच कसा? शेतीमालाला भाव बांधून दिले पाहिजेत. शेतीसाठी हमखास पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. दिवसभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला रात्रीच्या वेळी वीज पुरवठा दिला जात असल्यामुळे जागरण करून पिकांना पाणी द्यावे लागते.
- साहेबराव पवार, धुळे
‘जय जवान, जय किसान’ असा नारा भारतात दिला जातो. आपला देश कृषीप्रधान समजला जातो. असे असताना शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते, ही दुर्दैवाची बाब आहे. निसर्गाच्या संकटाबरोबरच मानवनिर्मित संकटांनी शेतकरी अडचणीत येऊन कर्जबाजारी झाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा आहे. त्याची मुले मोठी झाल्यावर त्यांच्यावरही असाच कर्जाचा बोजा
ठेवणार का?
- कल्याणी ठाकरे, सटाणा
समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जम‌निी जबरदस्तीने, दंडुकेशाहीने घेण्यात येऊन त्यांना रस्त्यावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बळीराजाला संपविण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. नेत्यांनी शेतकरी घाण्याला जुंपला आहे. या महामार्गात १६५ शेतकरी बाधित आहेत. ते सर्व अल्पभूधारक आहेत. सरकार त्यांच्या जम‌निी दंडकशाहीने हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकशाहीत ही हिटलरशाही चालू देणार नाही. समृध्दी महामार्ग हा भांडवलदार, नेते यांच्यासाठी आहे. कष्टकऱ्यांची थट्टा करणाऱ्या योजना कशाला हव्यात?
- मंगला चव्हाणके, शिवडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वासुदेव म्हणतोय, जागो मतदार…

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेसाठी २४ मे रोजी मतदान होत आहे. वाढत्या उन्हामुळे मतदानावर परिणाम होवू नये म्हणून निवडणूक यंत्रणेकडून मतदार जनजागृतीवर भर दिला जात आहे. नाशिक येथून हाय टेक-इलेक्शन मल्ट‌सिर्व्हिसेस अॅण्ड कंपनीच्या पथकाकडून कव्वाली व वासुदेव पथकाकडून शहरातील चौकाचौकात प्रबोधन केले जात आहे.

गेल्या निवडणुकीत ६३ टक्के इतकेच मतदान झाले होते. यावेळी प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडून हाय टेक-इलेक्शन मल्ट‌सिर्व्हिसेस अॅण्ड कंपनीच्या जनजागृती पथकाला मालेगावी बोलाविण्यात आले ओह. ग्रामीण भागात भल्या पहाटे ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’ असे म्हणत लोकांना जागे करणारे वासुदेव शहरात मात्र या पथकाद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. ‘जागो मतदार जागो’ असा संदेश देत आहे. या दोन्ही पथकामध्ये आठ सदस्य आहेत.

कोई वोट का

पैसा न मांगे, दोस्तो...

कव्वाली पथकही कव्वालीद्वारे प्रबोधन करीत आहे. शहरातील बहुसंख्य मतदार मुस्ल‌मि असल्याने हे कव्वाली पथक विशेष आकर्षण ठरले आहे. यातील गायक ‘आपका वोट हि आपकी ताकद’, ‘महापलिकेने काम किया है, हर एक वोट डालके आना है दोस्तो’, ‘कोई अपने वोट का पैसा न मांगे मांगना हो तो शहर की तरक्की मांगे’, अशा फिल्मी गीतांच्या चालीत प्रबोधनपर गीते सादर केली जात आहेत. शहरातील रामसेतू, मोसमपूल, सटाणा नाका, रावळगाव नाका, मोतीबाग नाका, नवीन बसस्थानक आदी ठिकाणी हे पथक जनजागृती करीत आहे. या दोन्ही पथकासह पालिकेच्या निवडणूक यंत्रणेकडून विविध घोषवाक्य असलेल्या रिक्षा फिरवली जात आहे.

निवडणुकीसाठी आदर्श मतदान केंद्र

११४ इमारतीमधील ५१६ मतदानकेंद्रांवर मतदान होणार आहे. सर्व केंद्र आदर्श मतदान केंद्र असावीत यासाठी प्रशासनकडून तयारी करण्यात येत आहे. यावेळी मतदान केंद्रांवर आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक आयुक्त राजू खैरनार यांनी दिली. मे महिन्यात मतदान होत असल्याने मतदान केंद्रांवर मतदारांचा अनुभव सुखद असला पाहिजे यासाठी किमान सुविधा पुरविल्या जाणार आहेत. दिव्यांग मतदारांचा विचार करता सर्वच मतदान केंद्र ही तळमजल्यावर असणार आहेत. रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास मतदानाची वेळही वाढवून दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या दिवशीच वराची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वाखारी) येथील तरुणाने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्या दिवशी मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडणार त्याच दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

देवळा पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, पिंपळगाव वाखारी येथील प्रगतीशील शेतकरी नामदेव संपत खैरनार यांचा मुलगा प्रशांत खैरनार (वय २६) याचा विवाह गुरुवारी (दि. १८) वडनेर खाकुर्डी येथे होणार होता. प्रशांत नाशिक येथील डी. जी. एस. टी. एस. या कंपनीत ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरीस होता. विवाह समारंभ असल्याने तो पिंपळगाव येथे पाच सहा दिवसांपासून आला होता. बुधवारी (दि.१७) सायंकाळी प्रशांतला सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत हळद लावण्यात आली. तर रात्री १२ वाजेपर्यंत सर्व मित्रमंडळी, नातेवाईक वरातीत नाचले. गुरुवारी सकाळी सर्व लग्नाला निघण्याच्या तयारीत प्रशांतने घराजवळील पडक्यात घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशांतने गळफास घेतल्याचे कळताच सर्वांनाच धक्का बसला. देवळा पोल‌सि ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत प्रशांतचे देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत नाशिक येथील सपकाळ नॉलेज सिटी येथे बी. ई. मेकॅनिकलची पदवी घेऊन नाशिकमध्येच नो‌करीला लागला होता. मयत प्रशांतच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मयूर पंडित यांना अखेरची मानवंदना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

उत्तराखंडमधील कोसी नदीत पाय घसरून पडलेले सोनगाव येथील जवान मयूर पंडित यांच्यावर गुरुवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळाली कॅम्प येथील रेजिमेंटलच्या अकरा जवानांनी सलामी दिली. मयूर यांची पत्नी पूजा, आई अरुणा आणि वडील संताराम यांना अश्रू अनावर झाले होते.

मयूर यांच्या अपघाती निधनाबद्दल भारतीलय सैन्यदलाकडून मंगळवारी सायंकाळी कळव‌ण्यिात आले. मंगळवारपासून पंडित कुटुंबाला जवळपास ५० तास त्यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा करावी लागली. चौसाली हे कोसी नदीकिनारी अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे तेथून पार्थिव दिल्ली येथे आणण्यासाठी खूप वेळ गेला. त्यानंतर पार्थिव दिल्लीवरून मुंबई आणि तेथून देवळाली कॅम्प येथे आणले. गुरुवारी रात्री गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. भाऊ नीलेश याने भंडाग्नी दिला.

यावेळी उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार विनोद भामरे, आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, पोल‌सि निरीक्षक आंबदास मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

चार दिवसांपूर्वी घरातून गेलेल्या पतीला आज अखेरचे असे पाहतांना मयूरची पत्नी यांना हुंदके अनावर झाले. मयूर सुट्टी संपून रविवारीच उत्तराखंड येथे दाखल झाला होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वेच्छानिवृत्ती चौकशीच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत सध्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये स्वेच्छानिवृत्तीचे वारे दिसून येत असल्याने आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या सोडचिठ्ठीमुळे प्रशासनाने आता स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांच्या मार्गात स्पीड ब्रेकर उभा केला आहे. यापुढे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्या आहे. त्यामुळे आता स्वेच्छानिवृत्तीसाठी फिल्डिंग लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणींत वाढ होणार असून, चौकशीच्या चाळणीत अडकण्याच्या भीतीने स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज थांबण्याची शक्यता आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती डामाडोल झाल्यापासून महापालिकेत स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे अभियंता अविनाश बनकर यांनी स्वेच्छानिवृत्ती नुकतीच घेतली आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होताना दिसून येत आहे. अनुभवी अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने नवीन अधिकाऱ्यांना कामकाजाची माहिती होईपर्यंत विलंब होतो, तसेच कामाचा व्याप कमी वेळेत लक्षात येत नसल्याने चुका घडतात. सध्या अजूनही काही अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. बांधकाम व विद्युत विभागाच्या काही अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती दिल्यानंतर त्यांच्या कामाबाबत आयुक्तांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. एकदा अधिकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या चौकशीतही अडचणी येत आहेत.

आता स्वेच्छानिवृत्तीवर प्रशासनाने रामबाण उपाय शोधला आहे. स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती देण्यापूर्वीच त्यांच्या कामकाजाची चौकशी केली जाणार आहे. चौकशीबाबत निवृत्तीनंतर अडचण निर्माण होत नसल्याचा अंदाज काढून हा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला आहे. सध्या महापालिकेच्या कामकाजात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातून ताणतणाव वाढले आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना धारेवर धरले जात असल्याने परिणामी अनेक अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या मानसिकतेमध्ये आले आहेत. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती देण्यापूर्वीच ते ज्या विभागाशी संबंधित आहे त्याअंतर्गत विभागीय चौकशी केली जाणार आहे.

--

दोघ अधिकाऱ्यांचे काय होणार?

महापालिकेत यापूर्वीच वरिष्ठ पदांवरील दोन अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बाबतीतही अनेक तक्रारी होत्या. त्यासंदर्भातील तक्रार अर्ज दाखल झाले असतानाही ते चौकशीऐवजी सहीसलामत चौकशीच्या फेऱ्यातून सुटले आहेत. त्यामुळे या दोघांवरून प्रशासनाने आता चौकशीचा धडा घेतला आहे. स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्यांची चौकशी होणार असली, तरी या दोघांचे काय होणार, अशी चर्चाही आता महापालिका वर्तुळात आहे.

--

तिवारींची फाइल गायब?

महापालिकेच्या सेवेत मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना परदेशात जाण्यापूर्वी आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. परंतु, महापालिकेचे उद्यान विभागातील कार्यकारी अभियंता महेश तिवारी सध्या परदेशात गेले आहेत. मात्र, त्यांना परदेशवारीसाठी दिलेल्या परवानगीची फाइलच सापडत नसल्याचे चित्र आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा प्रशिक्षणासाठी महिनाभर मसुरी येथे गेले असताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यादरम्यान प्रभारींनी परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. परंतु, या परवानगीची फाइल प्रशासन विभागाला सापडत नसल्याने आता तिवारींची अडचण वाढली आहे. ही फाइल सापडली नाही, तर तिवारींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पश्चिममध्ये काँग्रेसला शिवसेना-मनसेची साथ

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिकेच्या पश्चिम सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला शिवसेना व मनसेची साथ लाभल्याने नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांची सभापतिपदी वर्णी लागली. या पदासाठी काँग्रेसच्या डॉ. पाटील व भाजपच्या प्रियंका घाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्ही उमेदवारांनी माघार न घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ज्योतिबा पाटील यांनी मतदान प्रक्रिया जाहीर केली. यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. पाटील यांना शिवसेनेचे नगरसेवक अजय बोरस्ते यांनी मतदान केल्याने त्यांनी एका मताने विजय संपादन केला. महापालिका निवडणुकीप्रमाणेच आता पश्चिम प्रभागाच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत आघाडीनेच बाजी मारली आहे. शिवसेनेचा भाजपाला असलेला विरोध अधोरेखित झाला आहे. नवनिर्वाचित सभापती डॉ. पाटील यांचे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले. या निवडणुकीवेळी मनसेच्या सुरेखा भोसले प्रकृतिअस्वास्थ्यामुळे हजर राहू शकल्या नाहीत. काँग्रेसचे नगरसेवक समीर कांबळे, भाजपचे शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके-आहेर, योगेश हिरे व स्वाती भामरे उपस्थित होते.

---

पंचवटीत मानेंची बिनविरोध निवड

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भाजपचे वर्चस्व असलेल्या पंचवटी विभागात प्रभाग समिती सभापतिपदी बिनविरोध निवड होणार हे निश्चित ठरलेले होते. प्रियंका माने यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला होता. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. विभागातील मनसेचे दोन, अपक्ष दोन व शिवसेनेचा एक असे पाच नगरसेवक यावेळी अनुपस्थित होते.

शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पंचवटी विभागीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडप्रक्रिया करण्यात आली. या पदासाठी प्रियंका माने यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला होता. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नगररचना विभागाचे सचिव ए. पी. वाघ यांनी या निवडणुकीविषयीच्या नियमांचे वाचन केले. प्रक्रियेनुसार अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यानंतर प्रियंका माने यांच्या नावाची सभापतिपदासाठी घोषणा करण्यात आली.

महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक उद्धव निमसे, अरुण पवार, सुरेश खेताडे, गणेश गिते, जगदीश पाटील, कमलेश बोडके, पुंडलिक खोडे, रुची कुंभारकर, शीतल माळोदे, पूनम धनगर, पूनम सोनवणे, सुनीता पिंगळे, शांता हिरे, मच्छिंद्र सानप, सरिता सोनवणे, हेमंत शेट्टी आदी उपस्थित होते.

--

शाहिन मिर्झा पूर्वमध्ये बिनविरोध

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

महापालिकेच्या पूर्व प्रभागाच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या नगरसेविका शाहिन मिर्झा यांचाच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्योतिबा पाटील यांनी घोषित केले.

पूर्व प्रभागात भाजपचे सर्वाधिक १२ नगरसेवक असल्याने पाचही वर्षे भाजपचाच सभापती राहणार आहे. सभापतिपदावर नगरसेविका मिर्झा बिनविरोध निवडून आल्यावर महापौर रंजना भानसी यांनी त्यांचा सत्कार केला. उपमहापौर प्रथमेश गिते, सतीश कुलकर्णी, संभाजी मोरुस्कर, चंद्रकांत खोडे, श्याम बडोदे, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अर्चना थोरात, रुपाली निकुळे, सुप्रिया खोडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये २१ गुन्हेगार ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नवनाथनगर येथील किरण निकम या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात शनिवारी पहाटे चार ते सकाळी आठ वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या २१ गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत दोन ठिकाणी छापे टाकून २,८०८ रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.

पंचवटी परिसरात पाथरवट लेन, चाणक्यपुरी आणि ओमकार बंगल्यामागील परिसरात धारदार हत्यारे घेऊन दहशत पसरविण्याचे, वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार घडले. नवनाथनगरमध्ये भररस्त्यात तरुणाचा खून करण्यात आला. या सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे पंचवटी परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसविण्यासाठी पोलिसांनी पंचवटीच्या विविध भागांत पहाटे कोम्बिंग ऑपरेशन केले. पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ पोलिस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शोधपथकाचे कर्मचारी, नियंत्रण कक्ष, स्ट्रायकिंग फोर्सचे कर्मचारी यांनी नवनाथनगर, फुलेनगर, भाजी मार्केट, वाल्मीकनगर येथे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांनी हे कोम्बिंग ऑपरेशन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण काढण्यावरून महात्मानगरमध्ये बाचाबाची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महात्मानगर आणि गंगापूर रोडवर रात्रीच्या वेळेस रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या टपरीधारकांविरोधात पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने सायंकाळी अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. जेहान सर्कल सिग्नल ते सोमेश्‍वर मंदिरापर्यंत वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्यात आले.

या मोहिमेदरम्यान महात्मानगरमध्ये हॉटेल कृष्णा येथील कारवाईदरम्यान गालबोट लागले. हॉटेलचालकांनी या कारवाईला विरोध केला. त्यावरून हॉटेल मालक आणि पथकातील अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. तर पोलिसांसोबतही बाचाबाची झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. नगरसेवक विलास शिंदे व संतोष गायकवाड यांनी गेल्या महिन्यात आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेवून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. जेहान सर्कलपासून आनंदवलीपर्यंत मोठ्या प्रमाणात हॉटेल तयार झाले आहेत. रात्री रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. हातगाडीवरील विक्रेत्यांकडून रस्त्यावर टेबल, खुर्च्या लावून व्यवसाय केला जात असल्याने हे अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेला अडीचशे कोटी मिळणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेला आर्थिक मदत देण्यासंदर्भात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे शनिवारी झालेली संचालक मंडळाची बैठक सकारात्मक झाली असून, दीडशे कोटींची थकहमी राज्य सहकारी बँकेमार्फत देण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले आहेत. सोबतच ३० कोटींपर्यंत खेळते भांडवल आणि कर्ज रूपांतरसाठीचे ७० कोटी रुपयेही जिल्हा बँकेला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास अडीचशे कोटी रुपये मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सहकारमंत्र्यांनी जिल्हा बँकेला पीककर्ज वसुलीचा डोसही दिला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकपदावर राजेंद्र बकाल यांची नियुक्ती राज्य सहकार बँकेने केली आहे.

जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळवून देण्यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने शनिवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे बैठक झाली. या वेळी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक परवेझ कोकणी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, गणपतराव पाटील, केदा आहेर, शिरीष कोतवाल यांच्यासह अनेक संचालक उपस्थित होते. जिल्हा बँकेचे राज्य सहकारी बँकेकडे १७८ कोटींच्या ठेवी आहेत. त्या बदल्यात राज्य सहकारी बँकेने दीडशे कोटींच्या कर्जाची थकहमी घ्यावी, अशी मागणी संचालकांनी केला. त्याला सहकारमंत्र्यांनी सहमती दर्शवत तातडीने ही थकहमी घेण्याचे निर्देश त्यांनी सहकारी बँकेला दिले. तसेच सध्या बँकेकडे खेळते भांडवल नसल्याने त्यासाठी जवळपास ३० कोटींची मागणी संचालकांनी केली. त्यालाही सहकारमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. सोबतच कर्जाच्या रूपांतराचे राज्य सरकारकडे ५० कोटी रुपये प्रलंबित आहेत. त्याचे व्याज मिळून ही रक्कम आता ७० कोटींपर्यंत गेले आहे. ही रक्कम मिळण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली. त्यालाही सहकारमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली असून, या संदर्भात अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे रविवारी आता पालकमंत्री, सहकारमंत्री यांची बैठक होऊन या अडीचशे कोटींच्या निधीसंदर्भात निर्णय होणार आहे. त्यामुळे बँकेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राजेंद्र बकाल नवे एमडी

जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट यांनी राजीनामा दिला आहे. शिरसाट यांच्या कार्यकाळात पीक कर्जाची वसुली थंडावली होती. सध्या थंड वसुलीला प्रशासनच जबाबदार असल्याचा ठपका राज्य सहकारी बँकेने ठेवला आहे. त्यामुळे १२ मेपासून रिक्त असलेल्या कार्यकारी संचालकपदावर आता राज्य सहकारी बँकेने राजेंद्र बकाल यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे आता पीककर्ज वसुलीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

वसुलीचेही डोस

जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती खराब होण्याला पीककर्ज वसुली प्रमुख कारण आहे. जवळपास २७९५ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांकडे थकीत आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी संचालकांना या पीककर्ज वसुलीबाबत खडे बोल सुनावले. शंभर कोटींचे पीककर्ज थकबाकी तातडीने वसूल करण्याचे आदेशही देशमुख यांनी दिले आहेत. या वसुलीनंतर मदतीचा आणखी विचार करू, असा आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे संचालकांचीही जबाबदारी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांनाह‌ी बसतोय उन्हाचा तडाखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बेसुमार वृक्षतोडीमुळे निराधार झालेल्या पक्षांना उन्हाचा तडाखा बसत आहे. नाशिकरोडसह शहरात पक्षी जायबंदी होत असून, काही कायमचे अपंग होत आहेत तर काहींचा मृत्यू होत आहे. नाशिकरोडला पक्ष्यांच्याबाबत अशाच एका घटनेने ही समस्या तीव्रतेने सामोर आली आहे. या घटनेत परिसरातील नागरिकांनी डॉक्टरांशी मिळून इंटरनेटच्या सहाय्याने या पक्ष्यांना जीवदान दिले.

नाशिकरोड कोर्ट परिसरात काही दिवसांपूर्वी पॉन्ड हेरॉन (pond Heron) हा पक्षी चक्कर येऊन झाडावरून पडला. तर गेल्या आठवड्यात याच भागात ब्लॅक क्रोन नाईट हेरॉन हा पक्षी झाडावरून पडला. यामुळे त्यांचे पंख निकामी झाल्याने ते आकाशी झेप घेऊ शकत नव्हते. मासे आणि नदीतील किटक त्यांचे खाद्य आहे. मात्र, ते उपलब्ध नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. पिण्यास पाणीही नसते त्यामुळे ते चक्कर येऊन पडल्याचा अंदाज डाक्टरांनी व्यक्त केला आहे.

पक्षी झाडावरून पडल्यावर संदीप राजगुरू, विजय कदम यांनी धाव घेतली. त्यांना औषधपाणी केली. शशिकांत कुरणे, राजू राजभोज, गुरमितसिंग, हेमंत भालेराव, डॉ. अक्षया पवार, अतुल पवार, राकेश हांडोरे, नितीन चंद्रात्रे आदींनी सहकार्य केले. यानंतर त्यांनी बिईंग कॉमनचे पक्षीमित्र विक्रम कदम यांच्याशी संपर्क साधला. कदमांनी या पक्ष्यांना डॉ. संजय गायकवाड यांच्याकडे नेले. मात्र, उपचारास उशीर झाल्याने ब्लॅक हेरॉनचे पंख निकामी झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

अशा परिस्थितीत काय करायचे हा प्रश्न पडला. तेव्हा इंटरनेटच्या सहाय्याने हे पक्षी कोणत्या जातीचे आहेत, त्यांचे खाद्य काय हे माहिती करून कदम यांनी अमेरिकेतील टेन थाऊजन्ड बर्डस या वेबसाईटवर दोन्ही पक्षांचे फोटो अपलोड केले. पुढे तज्ज्ञांशी चॅटिंग करून माहिती घेतली. घरातील गॅलरीत पाणी सोडून त्यात पक्षांना ठेवले. मासे खाऊ घातले. नंतर वनअधिकारी खैरनार यांना ब्लॅक हेरॉनच्या निवासासाठी विनंती केली तर पक्षीमित्र भंवर यांच्याकडे पॉन्ड हेरॉन पक्षी सोपवला.

पोपट गावकुसाबाहेर

इतर पक्ष्यांप्रमाणे पोपट स्वतःचे घर बांधू शकत नाही. तो वडाच्या ढोलीत राहतो. नाशिकरोडला पूर्वी वडाची असंख्य झाडे होती. द्वारका ते दत्तमंदिर चौक तसेच सिन्नरफाटा ते थेट पुण्याच्या चाकणपर्यंत ही वटवृक्ष होते. रस्ता रुंदीकरणात ही झाडे तोडल्याने पोपट बेघर झाले आहेत. नाशिकरोडला महावितरणच्या आवारात मात्र पोपटांची संख्या बऱ्यापैकी आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये वृक्षतोड झाल्याने अनेक पक्षी बेघ्‍ार झाले असून, राहिलेल्या निवाऱ्यावर ताबा मिळविण्यासाठी पक्ष्यांमध्ये लढाई होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बिटकॉइनचे जाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह राज्यातील पुणे, नागपूर, अहमदनगर आदी शहरांत बिटकॉइन खरेदी-विक्रीचे जाळे पसरले आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार मलेशियन नागरिक असल्याचे समोर येत असून, घोटाळ्याची व्याप्ती शोधून काढण्याचा प्रयत्न सायबर पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

मुख्यत्वे अंडरवर्ल्डमध्ये ज्या व्हर्च्युअल चलनाचा वापर होतो, त्या चलनाचा भारतात प्रसार आणि प्रचार करणाऱ्या एका टोळीला शहर पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. या टोळीकडे केलेल्या चौकशीनुसार, या टोळीने नाशिकसह पुणे, नागपूर, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अनेक बैठकी घेतल्याचे समोर आले आहे. मल्टिलेव्हल मार्केटिंग पद्धतीने ही टोळी बिटकॉइनचा प्रसार करून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बिटकॉइन हे इंटरनेटवरील चलन आहे. प्रत्यक्ष या चलनाचा वापर व्यवहारात होत नाही. भारतात तर अशा सर्वच व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. ड्रग्ज अथवा अवैध वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बिटकॉइनचा वापर केला जातो. नाशिकमध्ये अशा प्रकारे व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने पाच जणांना अटक केली. यात एका मलेशियन नागरिकाचा समावेश आहे. निशेद महादेवजी वासनिक (वय २९, रा. वसिम प्राइड सोसा., आराधनानगर, दिघोरी-खार्बी रोड, नागपूर), रोमजी बिन अहमद (जलान ईदाह-२, तमन सेताजी ईदाह, केदाह, मलेशिया), आशिष शंकर शहारे (२८, द्वारावती रेसिडन्सी, कोपरगाव, जि. अहमदनगर), दिलीप प्रेमदास बनसोड (२९, फाळके प्राइड अपार्टमेंट, पाथर्डी फाटा), कुलदीप लखू देसले (३८, रा. सुरेश बापू प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यातील रोमजी अहमद हा मलेशियामधील संशयित www.futurebit.com या वेबसाइटच्या मदतीने राज्यात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करीत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने यापूर्वी अनेक शहरांमध्ये बैठकी घेऊन गुंतवणूकदारांना बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली. नाशिकमध्ये जवळपास १५० गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतवले आहे, तर इतर ठिकाणांचा विचार करता हा आकडा सध्या तरी पाचशेच्या घरात पोहोचला आहे. सध्या चौकशी सुरू असून, गुंतवणुकीचा एकूण आकडा समोर आलेला नाही. मात्र, यात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी झंवरच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला संशयित सुभाष झंवर याच्या पोलिस कोठडीत जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली. संशयितास १३ मे रोजी आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

नाशिकरोड येथील फरसाण कारखान्यात काम करणाऱ्या महिलेच्या चार वर्षीय बालिकेवर ओढारोड येथे राहणाऱ्या संशयित झंवरने अत्याचार केल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये झंवर याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जमावाकडून बेदम मारहाण झाल्याने झंवरला उपचारानंतर कोर्टात हजर करण्यात आले होते. शनिवारी (दि. १३) सकाळी संशयितास कडेकोट बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. पंकज चंद्रकोर यांनी बाजू मांडून संशयिताच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत शनिवारी (दि. २०) संपल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर संशयित झंवरच्या कोठडीत पाच दिवसांची (२५ मेपर्यंत) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्वास स्थिर झाला की जगणे सोपे होते

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणसाचे सर्व आयुष्य हे श्वासावर अवलंबून असते. श्वास बिघडला की मनःस्वास्थ्य बिघडते. श्वास स्थिर झाला की आयुष्य जगणे सोपे होते, असे प्रतिपादन डॉ. राजीव शारंगपाणी यांनी केले.

वसंत व्याख्यानमालेत आयोजित विसावे पुष्प ‘तणावमुक्त आनंदी जीवन’ या विषयावर ते बोलत होते. हे पुष्प माधवराव लिमये यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते. वसंत व्याख्यानमालेचे ९६ वे वर्ष असून, गोदाघाटावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे.

डॉ. शारंगपाणी म्हणाले, की माणसाने नेहमी स्थिर श्वासात राहायला शिकले पाहिजे. बाह्यस्थिती बदलण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आतील स्थिती बदलण्याचा राजमार्ग आपण निवडला पाहिजे. आतील स्थिती बदलणे खूप सोपे असते. कारण आपले शरीर आपल्याला कळू लागलेले असते. जे होतेय त्यासाठी आपण तयार आहोत का हे पाहा. आपण अंतरंगाविषयी व बाह्यरंगाविषयी सजग राहिले पाहिजे. बाहेर काय चालले आहे व आत काय चालले आहे हे ज्याला पुरेपूर माहीत असते, त्याचे आयुष्य तणावरहित असते. माणसाला सतत समाधीअवस्था असते. फक्त त्याने काही गोष्टींचे अनुसंधान केले पाहिजे. व्यायामाने मनःस्थिती चांगली राहते. त्यामुळे जो व्यायाम केल्याने स्वस्थ वाटते तो व्यायाम करावा, मजेत राहायला शिकले पाहिजे. शक्यतो कोणत्याही गोष्टीचा तणाव करून घ्यायचा नाही. अपेक्षा करायची नाही. त्यामुळे माणसाचे जगणे सोपे होऊन जाते, असेही डॉ. शारंगपाणी म्हणाले.

अरुण शेंदुर्णीकर यांनी दिनविशेष सांगितले. या वेळी व्यासपीठावर डॉ. सुनीती शारंगपाणी, डॉ. विकास गोगटे, डॉ. शोभा नेर्लीकर, अविनाश गोठी, प्राचार्य शांताराम रायते, सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. माधवराव लिमये यांच्या स्मृतीस शेंदुर्णीकर यांनी उजाळा दिला. डॉ. शारंगपाणी यांचा परिचय संगीता बाफना यांनी करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरमोजणीनंतर मद्य दुकानांवर संक्रांतीची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हायवेपासून ५०० मीटरवरील मद्य विक्रीची दुकाने, हॉटेल्स बंद झाली. मात्र, मोजणीप्रक्रिया राबवताना संबंधित विभागाने चालढकल केली असून, यामुळे दिंडोरी, तसेच पेठ रोडवरील चार हॉटेल्स, तसेच मद्य विक्रीची दुकाने सुटल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर आज संयुक्त मोजणीप्रक्रिया राबवण्यात आली. याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले.

हायवेवरील फेटल अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हायवेपासून ५०० मीटरच्या आत येणारी मद्य विक्रीची सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू झाली. यामुळे शहरासह जिल्ह्यातील जवळपास ८०० दुकाने, परमिट रूम, बार बंद झाली. मात्र, दिंडोरी, तसेच पेठरोडवरील मोजणीप्रक्रिया सदोष असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतो आहे. तसे निवेदन नागरिकांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले होते. याबाबत बोलताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर. जी. आवळे यांनी सांगितले, की रस्त्यांच्या मोजणीचे काम त्रयस्थ म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. त्या अहवालानुसार दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत काही तक्रारी प्राप्त होत असल्याने शनिवारी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया या विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दिंडोरी, तसेच पेठरोडवरील रस्त्याची मोजणी केली. या मोजणीचा अहवाल समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल. शहरातून जाणाऱ्या एखाद्या हायवेचा भाग महापालिकेच्या ताब्यात असल्यास असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यातील तांत्रिक बाबींचादेखील आढावा घेतला जात असून, जाणीवपूर्वक दुकानांना अभय देण्याचा प्रश्नच उद््भवत नसल्याचा दावा आवळे यांनी केला. मालेगाव स्टँड परिसरातील काही मद्य विक्री दुकानांबाबत परिसरातील नागरिकांचा आक्षेप असून, या विरोधात अनेकदा मोर्चे काढून निदर्शने करण्यात आली आहेत.

पत्रकारास ठार मारण्याची धमकी

मद्य दुकानाबाबत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. देवानंद बैरागी (रा. हनुमान मंदिरामागे, मालेगाव स्टँड) यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सरकारी विभागाचे काही कर्मचारी रस्त्याचे अंतर मोजण्यासाठी मालेगाव स्टॅण्ड परिसरात आले होते. हायवेपासून ५०० मीटरवरील दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून, मालेगाव स्टँड येथील दुकानांबाबत परिसरातील नागरिकांचा आक्षेप आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी मोजणीप्रक्रिया सुरू असताना वार्तांकनासाठी बैरागी घटनास्थळी पोहोचले. या वेळी काळाराम मंदिराचे विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी मोजणी दिंडोरी नाका येथून करावी, असे सांगत अधिकाऱ्यांशी वाद घातला. संदीप शर्मा आणि बोडके यांनी बैरागी यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळणावरील रस्त्यावरच बसविले पेव्हर ब्लॉक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूर रोड

नाशिक शहरातील अतिमहत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गंगापूर रोडच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागत आहे. परंतु, यात जेहान सर्कलपासून अशोक स्तंभाकडे जाताना कॉलनीच्या वळणावरील रस्ते खोदून पेव्हर ब्लॉक टाकले जात आहेत. एकीकडे निधी नसल्याचे कारण देत पेव्हर ब्लॉकचे कामे शहरात अनेक ठिकाणी खोळंबली आहेत. तर दुसरीकडे चक्क वळणावरील रस्ते खोदून पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता मंजूर कामातून पेव्हर ब्लॉक टाकले जात असल्याचे सांगण्यात आले.

यात गरज नसलेल्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कारणच काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गंगापूर रोड भागात रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकवर वाहनांचीच पार्किंग होताना दिसत आहे. महापालिकेचाच खर्च यामुळे वाया जात असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. गंगापूर रोडच्या रूंदीकरणात अनेक अडथळ्यांचा सामना महापालिकेला पार पाडावा लागला होता. अजूनही अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात महापालिकेला काम करणे कठीण झाले आहे. ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणी ब्लॉक टाकण्याची गरजेचे आहे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पादचाऱ्यांचे काय?

दरम्यान, जुने पेव्हर ब्लॉक काढून नवीन ब्लॉक टाकण्याचे काम महापालिकेने जोमाने हाती घेतले आहे. परंतु, टाकण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकवर वाहनांचीच पार्किंग होत असल्याने पायी चालणाऱ्यांना चालायचे कुठून, असाही सवाल उपस्थित होत आहे. यात महापालिकेचाच खर्च वाया जात असल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहारिया यांनी मालेगावी घेतला निवडणुकीचा आढावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करताना मतदारांना सहजतेने मतदान करता यावे, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. आचारसंहिता भंग करणाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिले.

येथील महानगरपालिकेसाठी २४ मे रोजी मतदान होणार आहे. त्याची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यांत असून, त्याबाबतचा आढावा यावेळी राज्य निवडणूक आयुक्त जे. स. सहारिया यांनी घेतला. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक राधेश्याम मोपलवार, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोल‌िस अधीक्षक अंकुश शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त रवींद्र जगताप, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक कारणातून एकावर वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैसे देण्यास नकार दिल्याने कुंभारवाडा येथील तरुणावर एकाने धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना वर्दळीच्या शालिमार चौकातील नेपाळी कॉर्नर भागात घडली. या प्रकरणी प्रीतेश बळीराम चव्हाण (रा. काझीगडी, जुने नाशिक) याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप हाबसिंग जाधव (वय २२, मूळ रा. यवतमाळ, हल्ली कुंभारवाडा, जुने नाशिक) याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना हा प्रकार घडला. वाटेत भेटलेला संशयित प्रीतेश चव्हाण याने संदीपचा रस्ता अडवून त्याच्याकडे २०० रुपयांची मागणी केली. या वेळी संदीपने पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त प्रीतेशने त्याला शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने वार केले. उपनिरीक्षक हनुमंत वारे तपास करीत आहेत.

रिक्षा प्रवासात दागिने लंपास

रिक्षा प्रवासादरम्यान महिलेच्या सुमारे ७५ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेनंतर पोलिसांमध्ये हद्दवादाचा प्रश्न उद््भभवला. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात रिक्षाचालक आणि सहप्रवासी असलेल्या तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीना करणसिंग कच्छवा (वय ४६, रा. अशोकनगर, सातपूर) या महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. मीना शुक्रवारी दुपारी बाहेरगावाहून परत आल्या. अशोकनगरमध्ये घरी जाण्यासाठी त्यांनी हॉटेल राजदूत येथून शेअर रिक्षा केली. त्र्यंबकरोडने प्रवास करीत असताना अज्ञात सहप्रवासी असलेल्या तीन अनोळखी महिलांनी आसनाच्या मागे ठेवलेल्या त्यांच्या बॅगेची चैन खोलून छोट्या डब्यातील ८०० रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ७५ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना लक्षात येताच, त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, ही हद्द मुंबईनाका पोलिसांची असल्याने त्यांची रवानगी त्या पोलिस ठाण्यात करण्यात आली. तेथेही टोलवाटोलवी झाल्याने दुपारी घडलेल्या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा करण्यात आली. हवालदार ठाकूर तपास करीत आहेत.

पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास

दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी सुमारे ९५ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना गीताजंली कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयश जयकुमार गांधी (रा. हॉटेल तपस्वीमागे, इंदिरानगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गांधी यांच्या मातोश्री चंदा गांधी शुक्रवारी सकाळी आपल्या बंगल्यात एकट्या असताना चोरीचा प्रकार घडला. गांधी घरात एकट्या असताना दोन चोरटे तिथे पोहोचले. आम्ही दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत त्यांनी गांधी यांचा विश्वास संपादन केला. यानंतर दागिने पॉलिश करण्यासाठी गरम पाणी करण्यास सांगण्यात आले. दोन बांगड्या आणि एक सोनसाखळी उकळत्या पाण्यात टाकण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी तब्बल ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. सहाय्यक निरीक्षक वराडे तपास करीत आहेत.

सोन्याची मूर्ती चोरीस

घरात शिरलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीने देव्हाऱ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची मूर्ती लंपास केल्याची घटना महादेववाडीतील महालक्ष्मी चौकात घडली. या प्रकरणी प्रकाश कचरू मोरे (रा. मोरे मळा, नाशिकरोड) याच्याविरुद्ध सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पद्मा वसंत डोंगरे (वय ३८, रा. महादेववाडी, सातपूर) यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी संशयित मोरे हा डोंगरे यांच्या घरी आला होता. डोंगरे कुटुंबीय कामात व्यस्त असताना संशयिताने देवघरात प्रवेश करीत देव्हाऱ्यातील मोहाटादेवीची सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची मूर्ती लंपास केली. हवालदार बेंडकुळे तपास करीत आहेत.

शिवाजीनगरात मोबाइल स्नॅचिंग

रस्त्याने मोबाइलवर बोलत जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाइल दोघांनी हिसकावून पोबारा केला. ही घटना औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. या प्रकरणी सागर दिलीप वाघ व कृष्णा विशाल सूर्यवंशी (रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) या संशयितांविरोधात सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कौशल दिलीप चंद्रात्रे (वय २८ रा. गंगासागर, अशोकनगर) या तरुणाने तक्रार दिली आहे. कौशल दोन मे रोजी सायंकाळी शिवाजीनगर भागात कामानिमित्त गेला होता. काम आटोपून शिवाजीनगर येथून अशोकनगरकडे पायी जात असताना ही घटना घडली. मोबाइलवर बोलत जात असताना दोन तरुणांनी त्याचा रस्ता अडवला. त्यांनी बळजबरीने मोबाइल हिसकावून पोबारा केला. सहाय्यक निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

सिडकोत एक गजाआड

दहशत निर्माण करण्यासाठी धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या संशयितास पोलिसांनी गजाआड केले. हा तरुण सिंहस्थनगर परिसरात दहशत निर्माण करीत होता. या प्रकरणी अंबड पोलिसांनी शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मयुरेश शशिकांत वडे (वय २१, रा. छत्रपतीनगर, ६ वी स्किम, सिडको) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सिंहस्थनगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलजवळ एक तरुण हातात कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी पोहोचून मयुरेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून धारदार कोयता हस्तगत करण्यात आला. पोलिस नाईक भड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images